विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 18 June 2021

सरष्लकर फर्जद राजश्री शहाजीराजे व सोलापूरचे भुईकोट किल्ला


 सरष्लकर फर्जद राजश्री शहाजीराजे व सोलापूरचे भुईकोट किल्ला

⚔⚔
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडील
सरष्लकर राजश्री शहाजीराजाच्या नेतृत्व खाली भातवडी येथील मोगल व आदिलशाही च्या सुयंक्त अली प्रचंड फौजाचा शहाजीराजे यांना कमी सैन्य शक्ती सह पराभवाचा धक्का दिले यामुळे शहाजीराजे याचातील लढवय्यैगिरी व राजकीय मुत्सद्देगिरी गुण ठळकपणे समोर आले व महाराष्ट्रातील व निजामशाही तील शहाजीराजे याचा महत्त्व वाढले पण भातवडीच्या लढाईत शहाजीराजांचे यश वजीर मलिक अंबर याच्या डोळ्यात खुपू लागले
यावेळी मलिक अंबर ८०वर्षाचे होते दरबारी शिरस्त्याप्रमाणे त्याला निजाम दरबारात अग्रेसरत्व मिळाले होते
तथापि निजामशाहीने विशेष बहुमान, अधिकार, तरुण शहाजीराजे यांना दिले त्यामुळे ह्या प्रसंगानंतर वृध्द मलिक अंबर याच्या मनात शहाजीराजे बदल द्वेष, मत्सर, वैमनस्य यांचा प्रवेश झाला .अगोदर लखुजीराजे जाधव यांच्या मत्सर करणार मलीक अंबर आज शहाजीराजे याचा मत्सर सुरू केली.......
भातवडीच्या लढाईनंतर निजामशाही च्या वतीने थेट विजापूरकर आदिलशाही कडे मोहिम काण्यात आले. विजापूरकर आदिलशाहीने वसविलेले नवरगपूर हे ठिकाण जाळून उध्दवस्त करण्यात आले नंतर सोलापूरचा भुईकोट किल्ला शके १५४७ च्या चैत्र वैशाखात इ. स१६२५मध्य सरष्लकर शहाजीराजे भोसले , व यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर चा भुईकोट किल्ला ताब्यात घेण्यात आले ।। या मोहिमेत खेळोजीराजे भोसले पण सहभागी झाले होते
पण याबद्दल निजामशाही दरबारात सोलापूरच्या भुईकोट किल्ला शहाजीचा पराक्रम नसून सारा पराक्रम खेळोजीराजे भोसले चा आहे असे भरवून देण्यात आले त्याबद्दल खेळोजीराजे चा गौरव निजामशाही दरबारात विशेष करण्यात आले.
वजीर मलीक अंबर, बादशहा मूर्तीजा व चुलत भाऊ खेळोजी हे विरुध्द झालेला पाहुन दुसरा सुरक्षित पर्याय म्हणून शहाजीराजे भोसले आदिलशाहीत व त्याना अक्कलकोट जहागीर बादशहा कडून देण्यात आले
विशेष बाब म्हणजे सोलापूर च्या भुईकोट किल्ला शी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडील शहाजीराजे येऊन गेले आहे त हे विशेष
या नंतर शहाजीराजे याचा पराक्रम व निजामशाही चा शेवटचा सुरूवात या भुईकोट किल्ला जिंकलेले नंतर सुरू झाले कारण शहाजीराजे सारखे रणसंग्रामवीर सेनानी व राजकीय मुत्सद्दी राजकारणी अहमदनगर च्या निजामशाही दरबारात सोडून गेले याचा संबंध सोलापूर च्या भुईकोट किल्ला तील लढाईशी असेन योगायोगच असावे
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख संतोष झिपरे ९०४९७६०८८८

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...