महादानी' साळुंखे चाळुक्य राजे
------------------------------
@.................✍️
सतीशकुमार सोळंके-देशमुख
राजासाठी दानी होणे अत्यंत जरूरी आहे. दानी राजा या लोकात तसेच परलोकात सुद्धा यश प्राप्त करणारा ठरतो. दान देण्यातून आपले कल्याण व्हावे असे वाटत असेल, तर दान हे नेहमी सत्पात्री असावे, कुपात्री दानाला देऊ नये. केवळ विद्या आणि तपाने कोणी सत्पात्री ठरत नाही, तर जो विहित कर्मे करतो, ज्याच्यात विद्या आणि तप दिसून येते, तोच उत्तमपात्री सांगितला जातो. हे सांगून साळुंखे चाळुक्य राजांनी अभिलेखातून दानाच्या 'महादान', 'मध्यमश्रेणीदान' आणि 'अतिदान'(अतिमहादान) या श्रेणी सांगितले आहेत.
-------------
श्लोक :
श्रोत्रियाय दरिद्राय शीलाचारयुताय च।
पुराणवेदविदुषे दानं देयं कुटुम्बिने॥
--------------
अर्थ :
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर राजे साळुंखे चाळुक्यांनी त्यांच्या अभिलेखातून सर्वप्रथम दानातील 'प्रतिग्रहिता' लक्षणांचा उल्लेख केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जो श्रुतींचा ज्ञाता, दरिद्री, शीलाचारयुक्त, पुराणवेदाचा पंडित तसेच योग्यकुटुंबी असेल तरच त्याला दान दिले पाहिजे.
राजे साळुंखे चाळुक्यांनी त्यांच्या अभिलेखातून दान आणि दानाच्या संकल्पनेला स्पष्ट केलेले दिसते. त्यांच्या अभिलेखातून 'महादान' आणि महादानाच्या संकल्पनेलाही स्पष्ट करण्यात आलेले दिसते. दानाच्या संदर्भात साळुंखे राजांच्या अभिलेखातून आलेल्या या नोंदी त्यांच्यातील 'दान' आणि 'दानी' प्रवृत्तीच्या सजीव चित्रणाला उभ्या करणार्या ठरतात.
-------------
श्लोक :
यद् यस्याभिमतं लोके यत् सुखं निजमन्दिरे॥
तत् सर्वं विदुषे देयं तदेवाक्षयमिच्छता॥
--------------
अर्थ :
राजे साळुंखे चाळुक्यांनी शेवटी एवढेच म्हटले आहे, की संसारात ज्याला जे अभिष्ट आहे तसेच आपल्या घरातील जे सुख आहे, ते सर्व विद्वानांना दिले पाहिजे. यामुळे अक्षयफलाची प्राप्ती होत असते.
साळुंखे चाळुक्य राजांनी प्रतिग्रहीतेसाठी 'दरिद्रस्य' शब्दाचा प्रयोग केलेला दिसतो. यातून दरिद्र प्रतग्रहितेलाच दान देणे सर्वश्रेष्ठ सांगितले आहे. योग्य कुटुंबीला दान देण्याचा प्रसंग चाळुक्य अभिलेखातून प्राप्त होतो. श्रोत्रिय तसेच शिलाचारयुक्त ब्राह्मणाला दान देणे हे त्यांनी अनंत फळाचे लक्षण मानले आहे. म्हणून या सर्व प्रसंगातून साळुंखे राजांच्या अभिलेखातून आलेले 'श्रोत्रियाय' आणि 'पुराणवेदविदुषे" हे शब्द सार्थक झालेले दिसतात.
याव्यतिरिक्त राजे साळुंखे चाळुक्यांनी दान देण्यातून मिळणाऱ्या फळांचे वर्णन केलेले दिसते. याच बरोबर त्यांनी महादानाला भगवान शंकराच्या संतुष्टीचे कारण मानले आहे. म्हणूनच भगवान शिवाच्या प्रसन्नतेसाठी महादान दिले पाहिजे असे साळुंखे राजांचे अभिलेखातील मत दिसते. साळुंखे चाळुक्य राजांनी महादान शब्दाचा प्रयोग करताना धन, सोने, रत्न, वस्त्र, शय्या, अासन, गज, अश्व, म्हशी, गाय, बलिवर्द, गृह, ग्राम, भूमी, दासी, अन्न, जल, तीळ, औषधी, अभयदान वगैरे वगैरे देणे उत्तम महादान सांगितले आहे. आपले माता-पिता, गुरू, मित्र, शुद्ध चरित्रवाले, दात्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे, दरिद्र, असहाय, ज्यांच्यात विशेष योग्यता आहे, अशा सुपात्री लोकांना दान दिल्याने फलाची प्राप्ती होते, मात्र कुपात्री दान देण्याने दान निष्फळ होते. हे सर्व साळुंखे चाळुक्य राजांनी अभिलेखातून सांगितलेल्या प्रतिग्रहिता दानाच्या भागात येते.
राजे साळुंखे चाळुक्यांनी त्यांच्या अभिलेखातून ज्या वस्तूंचे दान देण्याचे आदेश दिले आहेत, अशा दानांची त्यांनी वर्गवारी केलेली दिसून येते. त्यामध्ये कांचन, रत्न, वस्त्र, गज, अश्व, म्हैस, बलिवर्द, ग्राम, गृह, दासी, विभूषण, अन्न, तीळ इत्यादी वस्तू उत्तम तसेच महादाना अंतर्गत येतात, तर रौप्य, शय्या, अासन, औषधी, जल, अभयदान इत्यादी गोष्टी मध्यमश्रेणी दानात येतात. तसेच गो-दान, भूमीदान वगैरे दाने अतिमहादानाच्या प्रकारात मोडत असल्याचे साळुंखे राजांनी म्हटले आहे.
महादान करण्याच्या वृत्तीला साळुंखे चाळुक्य राजांनी महापातकांचा नाश करणारे म्हटले आहे. याव्यतिरिक्त महादान करण्याने महापुण्य फलाची प्राप्ती होते. तसेच गोदान, भूमिदान इत्यादी अतिदान प्रकारातील दाने देण्यामुळे स्वर्गरुपी महापुण्य फलाची प्राप्ती होते, असे साळुंखे राजांचे अभिलेख मत दिसते.
( अपूर्ण )
मार्गदर्शक :
प्रा. डॉ. नीरज साळुंखे,
असोसिएट प्रोफेसर,
पी.एचडी गाईड,
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी औरंगाबाद.
@........✍
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
👉 एम. ए. इतिहास,
बी.एड्., बी.पी.एड्.
👉मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
👉ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर
👉एम.डी.आर.टी. यू.एस.ए.
👉"अग्निवंश",
सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड
👉9422241339,
👉9922241339.

No comments:
Post a Comment