विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 14 June 2021

नाईकबावने देशमुख भुईकोट

 लातूर सोडलं आणि अंधारी वाट अधिकच धडधडू लागली तसं रेणापूरजवळ नेहमीप्रमाणे मंदिरात मुक्काम ठोकला. सकाळी सुर्यनारायणानं आम्हाला पाहायच्या आधी पळ काढायचा होता. चांगली सोय मिळाल्याने पहाटे उठून आवरुन तांदुळजाची वाट धरली. ३५ किमीची वाट भरभर संपत होती. खेड्यांची पहाट, मराठवाड्याचा गारवा, पाखरांचा कलाबलाट, मोरांचा आवाज सुखद वाटत होता. नदीपूलावर अचानक गाडीसमोर आलेला आणि वाटच नसल्यामुळे बावरलेल्या सशाला जरा जास्तच पळावं लागलं. पुढे तांदुळजा आलं आणि पत्ता विचारत एका जुन्या वेशीजवळ पोहोचलो. थोड्याच अंतरावर उभी होती पुर्वाभिमुख उभी असलेली *जगजीवनराव नाईक बावने* यांची गढी. मराठे आणि निजाम यांच्यातील *उद्गीरचा तह* येथे झाल्याचं सांगितलं जातं. सुर्यदेवाचं दर्शन गढीसोबतच घेतलं. पश्चिम महाराष्ट्रातील गढ्यांत एक वेगळी आकर्षक बांधकाम स्वरुप असलेली ही गढी आहे. लहान प्रवेशद्वार, गोमुखी दुसरे प्रवेशद्वार, जुनी सांडपाण्याची व्यवस्था, सज्जा, जोत्यांचे अवशेष, आड, बुरुज इ. वैशिष्ट्यपूर्ण. येथील बाबासाहेब नाईकबावने यांनी त्यांच्याकडे असणारी ब्रिटिशकालीन दुर्बीण, तोफ, जुन्या वापरातील वस्तू, शूर पुरुषांच्या प्रतिमा, छायाचित्रे भल्या सकाळी झोपमोड झाली असतानाही मोठ्या आनंदाने सारं दाखवलं. चहा घेऊन पुन्हा गढीचा फेरफटका मारत गावातील कडेला असणाऱ्या अश्वदल सरदार नाईक बावने यांची छत्री व बारव माहितीसह दाखवली.

विकास चौधरी
*-

नाईकबावने देशमुख भुईकोट*
तांदुळजा जि. बीड

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...