रणरागिणी महाराणी ताराबाई!
शंभू महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने भलीमोठी फौज घेऊन महाराजांचे राज्य संपवण्याचा चंग बांधला. मात्र मराठा स्वातंत्र्यसंग्राम एकदिलाने लढला जात होता. त्यामुळे औरंगजेबाचे स्वप्न पूर्ण झाले नाही. २ मार्च १७०० मध्ये राजाराम महाराजांचे निधन झाले.राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर आता मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम संपुष्टात येईल असे औरंगजेबाला वाटले होते.मात्र राजाराम महाराजांची पत्नी राणी ताराबाईंनी आपला लहान मुलगा शिवाजीस गादीवर बसवून मुघलांविरुद्ध लढ्यांची सुत्रे आपल्याला हाती घेतले. शिवरायांचे सेनापती हंबीरराव मोहित्यांची या कन्या होत्या. त्यांच्या रक्तात अभिजात क्षात्रवृत्ती होती. महाराणी ताराबाईंनी एका नवीनच युद्धतंत्र विकसित केले ज्याला "सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टिम " असे म्हणतात . त्यानूसार मुघलांनी किल्ल्याला वेढा दिल्यानंतर शक्य तेवढ्या वेळ तो किल्ला लढवायचा . व नंतर किल्लेदार फितूर झाला दाखवून औरंगजेबाकडून लाच घेऊन किल्ला त्याला दिला जायचा. किल्लेदार लाचेची रक्कम मराठी खजिन्यात जमा करायची. औरंगजेबाने त्या किल्ल्यावर धन , धान्य , दारुगोळा भरुन ठेवताच ताराबाईंच्या हुकूमाने तो पुन्हा जिंकून घ्यायचा.मुघल इतिहासकार खाफीखान महाराणी ताराबाईंबाबत म्हणतो की,"ताराबाई बुद्धिमान आणि शहाण्या होत्या. सैन्याची व्यवस्थापन आणि राज्यकारभार याबाबतीत नव-याच्या हयातीतच त्यांनी मोठा लौकिक मिळवला होता." ताराबाईंनी सतत सात वर्षे संघर्ष केला. अखेर औरंगजेब हताश झाला. अहमदनगरजवळील भिंगार येथे १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. बादशहाच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा स्वातंत्र्यसंग्राम थांबला. ताराबाईच्या कर्तत्वाचे वर्णन करताना शिवभारत कार परमानंदाचा मुलगा कवी देवदत्त याने म्हटले आहे , ताराबाई रामराणी ! भद्रकाली कोपली ! दिल्ली झाली दीनवाणी ! दिल्लीशाचे गेले पाणी ! रामराणी भद्रकाली ! रणरंगी क्रुदध झाली ! प्रयत्नाची वेळ आली ! मुगल हो सांभाळा !! अशा रणरागिणी महाराणी ताराबाईचे निधन ९ डिसेंबर १७६१ मध्ये झाला. त्याना विनम्र अभिवादन !
--- प्रशांत कुलकर्णी मनमाड
No comments:
Post a Comment