विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 26 November 2021

***महाराजा तुकोजीराव होळकर (तृतीय )***


***महाराजा तुकोजीराव होळकर (तृतीय )***
महाराजा तुकोजीराव होळकर यांचा जन्म १८९० मध्ये झाला, इंदोरच्या देल्ही कॉलेज व सिटी कॉलेज मध्ये त्यांचे शिक्षण झाले शिवाय शिक्षणार्थ काही दिवस ते अजमेर ला
देखील होते. १९१० साली तुकोजीरावांनी युरोपचा प्रवास केला. १९९१ मध्ये महाराणी व्हिक्टोरियाच्या अभिषेक कार्यक्रमाप्रसंगी दिल्ली दरबारात तुकोजीराव हजर होते. येथे
तुकोजीरावांचा मोठे आदरातिथ्य करण्यात आले.
सन १९१२ मध्ये निमाड येथे पडलेल्या भीषण दुष्काळात महाराज साहेबांनी निमड चा दौरा केला. जनतेची व्याकुळता जाणून घेत असतानाच. लोकांना अन्न आणि रोख
स्वरूपाची मदत महाराजांनी केली. शिक्षणाविषयी तुकोजीराव मोठे आग्रही होते. शिक्षण प्रसार झाला तरच राज्याची प्रगती होऊ शकते हे त्यांनी जोखले होते.
सन १९१४ मध्ये क्षय रुग्णांसाठी महाराजांनी एक सुश्रुषाकेंद्र उघडले. १० एप्रिल १९१४ मध्ये हुकुमचंद मिल च्या पायाभरणी कार्यक्रम तुकोजीरावांच्या हस्ते झला. १९१६ मध्ये
प्रिंस यशवंतराव होळकर यांच्या नावे होळकर लोहाचा कारखाना, प्रकाशनासाठी एक प्रिंटीग प्रेसचे, थर्मल कारखाना, रेशीम कारखाना यांची स्थापना केली. एकीकडे
औद्योगिकक्रांती करत असताना दुसरी कडे जुन्या चालीरीतीत अडकून पडलेल्या समाजाला प्रवाहाबरोबर वाहण्यास तुकोजीरावांनी विशेष प्रयत्न केले. सामाजिक सुधारणेसाठी
विशेष कायदे महाराजांनी आमलात आणले. पूर्वापार चालत आलेल्या बालविवाह पद्धतीवर तुकोजीरावांनी बंदी आणली. विधवा विवाह, सिव्हिल मॅरेज अॅक्ट यांसारखे कायदे
त्यांनी पास करून घेतले.
साहित्य क्षेत्रातील प्रगती साठी महाराज साहेबांनी साहित्य क्षेत्रातील प्रगती साठी कवी, लेखक, कलाकार यांना वेळोवेळी मोलाचे सहाय्य करून त्यांचे उचित आदरातिथ्य
देखील केले. वेळोवेळी इंदूर मध्ये हिंदी आणि मराठी साहित्य संमेलने आयोजित केली जात असत.
असे हे कार्यशिरोमणी महाराजा तुकोजीराव होळकर (तृतीय)

Saturday, 13 November 2021

#मराठ्यांमधले_देवक

 


#मराठ्यांमधले_देवक
देवक संकल्पना महाराष्ट्रातील मराठा व इतर बारा बलुतेदारात प्राचीन काळापासून अस्तित्वात असून खासकरून लग्नकार्यासारख्या विधीमध्ये याचा वापर होतो. विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज ही संकल्पना बुरसट वाटत असलीतरी त्या त्या कालखंडाचा तो एक ठोकताळा आहे. समान रक्त आणि नातेसंबंध याच्या फायद्यातोट्यासाठी देवक ही संकल्पना आजही कार्यरत आहे. याविषयी मतमतांतरे असलीतरी याठिकाणी देवकाच्या इतिहासावर फक्त भाष्य केलेले आहे.
मराठे व इतर समाजात परंपरेने मानली जाणारी ही एक देवकल्पना आहे. प्राचीन काळापासून अनेक अनार्य जाती जमाती आणि द्रविड वंशातील लोकांनी आपल्या कुळांना पशुपक्षी, वनस्पती किंवा एखादी वस्तू यांची नावे दिली. अशा कुळांना त्या वस्तूवरून ओळखले जाऊ लागले. तेच त्या कुळाचे देवक झाले. एकंदरीत त्या पशू, वनस्पती किंवा वस्तूला देवाचे स्थान दिले. देवकाचा त्या त्या कुळाशी रक्तसंबंध किंवा काही गूढ संबंध असावा. मराठी विश्वकोशात देवकाविषयी पुढील मत मांडण्यात आलेले आहे, देवक कल्पनेची उत्पत्ती बरीचशी गूढ आहे. प्रत्येक कुलातील लोक विशिष्ट वनस्पती किंवा प्राणी यांच्यावर उदरनिर्वाह करीत आणि त्यांचा व्यापार करीत. सर्वांना लागणारे अन्न जपण्याची अथवा घातक वस्तूचा नाश करण्याची जबाबदारी विशिष्ट कुलावर असे. विशिष्ट वस्तूत व्यक्तीचा आत्मा असतो, मृताचा आत्मा विशिष्ट वस्तूत जातो. आदिम स्त्रीला ती प्रथम गर्भवती राहिल्याची जाणीव होई, तेव्हा एखाद्या वस्तूने उदरात प्रवेश केल्याची जाणीव होई, अशा परिस्थितीत ती ती वस्तू देवक म्हणून मानल्याची शक्यता दिसते. व्यक्तिचे किंवा कुळाचे वेगळेपण दाखविण्यासाठी त्यांना वस्तूंची किंवा प्राण्यांची नावे दिली असावीत.
“आदिवासी अवस्था मानवाची प्रारंभिक अवस्था मानली जाते. अनादि काळापासून मानवाच्या मनात निसर्गाविषयी एकप्रकारची अनामिक भीती, आदर, कुतूहल अशा संमिश्र भावना होत्या. आपल्याभोवती घडणार्याि घडामोडींचा कार्यकारणभाव मन जाणून घेऊ शकत नाही. त्यामुळे त्या घटनाबद्दल पशुपक्षी, वृक्ष, नद्या, पर्वत, डोंगर याबद्दल आदरयुक्त भीती व कुतूहल वाटते. त्यातूनच निसर्गातील उपयुक्त वस्तूंची, घटकांची पूजा, प्रार्थना करणे प्रारंभ झाले.”
‘ नॉर्थ अमेरिकन इंडियन’ जमातीचा अभ्यास करताना जे लॉन्गनी ‘ देवक म्हणजेच ‘Totem’ ही संकल्पना पुढे आणली. त्यातूनच देवक किंवा कुलचिन्ह या संकल्पनेच्या व्याख्या तयार झाल्या. कुळाशी संबंधित असणार्या प्राणी, वनस्पती किंवा इतर वस्तु यांना देवक किंवा कुलचिन्ह असे म्हणतात. त्या विषयांच्या रितीरिवाजाला कुलचिन्हवाद किंवा देवकवाद म्हणतात.
देवक संकल्पना भारतापुरती मर्यादित नाही. तर अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि ईस्ट, फिजी, न्यू गिनिया, आयर्लंड आणि वेस्ट इंडिज इत्यादी बेटे याठिकाणी त्यांनी मानलेल्या सजातीयाचे जे नाव ठेवले जाते, त्यास टोटेम ( Totem ) असे म्हणतात. देवक हे त्याच्या जन्मावरून ठरते. टोटेम शब्द अमेरिकेतील ओजिब्वे ( Ojibwe) नावाच्या आदिवासी जमातीच्या भाषेतील ‘ ओतोतेमन’ ( Ototeman ) शब्दावरून घेतलेला आहे. यातील ओते ( ote ) शब्दाचा अर्थ होतो, एकाच आईचे, रक्ताचे. जगभर ज्याठिकाणी आदिवासीचा वावर राहिलेला आहे तेथे टोटेम अस्तित्वात असल्याचे दिसून येते. उत्तर अमेरिकेतील काही आदिवासीच्या ( हैडा, टिलीकिट, क्वाकीटुल ) बोली भाषेत ‘ओडम’ किंवा ‘डोडम’ हा शब्द प्रचलित असून त्यातूनच ‘टोटम’ शब्दाचा जन्म झाला. या आदिवासींचा विश्वास आहे की, त्यांचा विशिष्ट पशुपक्षी, वृक्ष अथवा एखादी विशिष्ट वस्तु यांच्याशी खास संबंध आहे.
देवक या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून Totem हा शब्द वापरला जात असलातरी धार्मिक बाबतीत दोन्हीच्या वापरात खूप फरक आहे. देवकला पर्याय म्हणून Totem शब्द तंतोतंत नसलातरी दोन्ही शब्दातील साम्य म्हणजे, यात आपला पूर्वज एखाद्या ठराविक वस्तूला मानतो आणि आयुष्यभर त्याचे पालन करतो. त्यामुळे केवळ भारतातच देवकाच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांना मानतात असे नाहीतर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फिजी, इजिप्त अशा अनेक देशात Totem च्या माध्यमातून लोक आपल्या पूर्वजांना आठवण करतात.
देवकाबद्दल असलेला विश्वास व श्रद्धेतून वाईट वागल्यास देवक शिक्षा करेल किंवा चांगले वागल्यास देवक वरदान देईल अशी भूमिका आदिवासींच्या मनात तयार होते. यातून पाप पुण्य ही संकल्पना निर्माण होऊन देवकाच्या पुजा प्रार्थना व विधीसाठी कुळातील सर्व सदस्य एकत्रित येतात. त्यामुळे समूह एका विशिष्ट बंधनात बांधला जाऊन परस्पर नियंत्रीत केला जातो. देवक एक असणारी मंडळी आपण एकाच वंशाचे असल्याचे मानत असल्याने एकमेकांच्या सुख-दु:खात सामील होतात. त्यातूनच माणसाला सामाजिक आणि मानसिक सुरक्षा प्राप्त होते. एकच देवक असलेले कुलसदस्य परस्परांना बंधुभगिनी मानतात. त्यामुळे देवक एक असेलतर ते अंतर्गत विवाह करत नाहीत. म्हणून आदिवासी समाजामध्ये देवक बहिर्विवाहाचे प्रचलन दिसून येते. कुळांतर्गत व एकच देवक असलेल्या कुटुंबाअंतर्गत विवाह निषिद्ध मानला जातो.
व्यक्तीचा जन्म ज्या कुळात झाला असेल त्याला त्या कुळाचे सदस्यत्व प्राप्त होते. व ते त्या कुळाचे देवक असते. या देवकामुळे लहान मुलांचे पालनपोषण, संरक्षण होते, देवकाच्या आराधनेमुळे अपत्यप्राप्ती होते, देवकाच्या पवित्र्यामुळे आपणाला अनेक अनिष्ट प्रवृतीपासून मुक्ति मिळते अशाप्रकारची संबंधित लोकांची भावना निर्माण होते.
काही लोकांच्यामते देवक म्हणजे समुदायाची खूण. त्यानुसार पुर्वी माणूस गुहेत रहात असे. पुढे जशी त्याची प्रगती व्हायला लागली तसे त्याचे रहाणे समुदायाने एखाद्या सुरक्षित जागी व्हायला लागले. शिकार करून आपली उपजिविका करणे हे त्याचे महत्वाचे काम होते. शिकारीसाठी समुदायाने गेलातर त्याला आणखी फायदा व्हायला लागला. शिकारीसाठी कितीही दूर गेलातरी तो आपल्या एका निश्चितजागी परत यायला लागला. परंतु त्याकाळी घनदाट जंगले असल्याने त्याला आपले वस्तीस्थान सापडणे कठीण व्हायला लागले. त्यामुळे शिकारीला जाताना उंच झाडावर किंवा आपल्या वस्तीच्याठिकाणी काहीतरी खूण अडकावून ठेवायला लागला. लोकांच्या वस्त्याही वाढायला लागल्या. आपले घर कोणते हे सहज ओळखता यावे ही धडपड सुरू झाली. त्यातच ज्या प्राण्याची शिकार केली त्याचे डोकेवगैरेआपल्या निवार्याजच्या वरच्या बाजूला अडकवायला लागला. ती त्याची खूण झाली. पुढे वस्ती वाढली तशी खूण म्हणून आणखी वस्तूची गरज निर्माण व्हायला लागली. त्यातूनच मग विविध प्राण्याचे डोके, पाने, फुले, शंख, शिंगे व त्यानंतर धातूचा शोध लागल्यानंतर त्याच्यापासून बनविलेल्या वस्तू अडकवायाला लागला. यामुळे त्याला त्याचा निवारातर समजलाच परंतु त्याचवेळी त्याने वस्तीवर लावलेल्या वस्तूमुळे त्याची विशिष्ट ओळख व्हायला लागली. ही वस्तुच त्याचे देवक तयार झाले. लोकसंख्या वाढलीतरी त्याच्या कुळाची ओळखमात्र त्या त्या वस्तूमुळे कायम राहिली. त्यामुळे तो कोठेही गेलातरी त्या त्या कुळाचे देवक तेच राहिले आढळून येते.
लेखन
Dr. Satish kadam Sir
9422650044
क्रमश:

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग ३५

 


#मराठा_साम्राज्यात_पवारांची
भाग ३५
आतापर्यंत पवार घराण्यातील पुरुषांनी मराठा साम्राज्यासाठी बजावलेल्या कामगिर्यांचा शक्य होईल तितका सालावार माहिती आपणास देण्याचा प्रयत्न केला.
पवार घराण्याचा मराठा साम्राज्य विस्तार करण्यासाठी कशा प्रकारे कामगिऱ्या बजावल्या हे आपण आतापर्यंत पाहिले. आता साम्राज्याचे घटक या नात्याने मराठा साम्राज्यात या घराण्यातील पुरुषांचा दर्जा कशा प्रकारचा होता हे थोडक्यात पाहू !!!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी कृष्णाची व त्यांचे पुत्र बुबाजी,रायाजी व केरोजी यांची नामांकित सरदारांमध्ये गणना केली जात होती.
छत्रपती राजाराम महाराजांच्या वेळी बुबाजी, रायाजी व केरोजी या त्रिवर्ग बंधूंना मोठमोठी विश्वासाची व पराक्रमांची अनेक कामे करून; "विश्वासराव" " सेना बाराहजारी " वगैरे सन्माननीय पदव्या व विश्वासराईचा मोठा सरंजाम मिळविला.
याच वेळी बुबाजींचे पुत्र संभाजी पवार हेही चांगल्या योग्यतेस चढले.
छत्रपती शाहू महाराजांच्या वेळी संभाजी पवारांचे पुत्र उदाजीराव व आनंदराव व नातू यशवंतराव हे अत्यंत प्रमुख व प्रबल सरदार गणले जात होते.
यशवंतरावांना तर " राजा " हा बहुमानाचा किताब ही मिळाला होता. दिल्ली येथील बादशहाशी व अन्य राज्यांशी बाजीराव व बाळाजी बाजीराव यांनी चालवलेल्या राजकारणात यशवंतराव दोन्ही पक्षात मध्यस्थ किंवा जामीनदार समजले गेल्याची दोन-तीन उदाहरणे वर आपल्या वाचनात आलीच आहेत. यावरून यशवंतरावांचे वजन व दर्जा किती वरिष्ठ प्रतीचा मानला जात होता ही गोष्ट स्पष्ट होते. शिवाय पानिपत येथील प्रसिद्ध रणसंग्रामात युद्धाचे मुख्य नेते सदाशिवराव भाऊ यांनी यशवंतरावांना युद्धात जे स्थान दिले होते, त्यावरून ते यशवंतरावांना किती मानीत होते हे ध्यानात येते.
यशवंतरावांप्रमाणेच त्यांचे बंधू रायाजी पवार (अमदाबादकर ) यांनाही " राव " ही सन्मानाची पदवी मिळाली होती व ती ते स्वतास लावीत असत.
इसवीसन सतराशे 1668-69 सालाचा एक महत्वाचा कागद" झाडा महाल हिंदुस्तान " (खांडेकर संग्रह) यामध्ये यावर्षी कोणकोणत्या सरदारांकडे उत्तर हिंदुस्थानातील कोणकोणते महाल सरंजामसाठी वहिवाटीस होते ,याबद्दलची नोंद आहे . त्यात होळकरांकडे सव्वा चौदा महाल दाखविले असून शिंद्यां पावणे एकोणावीस महाल असल्याचे म्हटले आहे. व पवारांकडे साडेसत्तावीस महाल असल्याचे म्हटले आहे ; त्यापैकी धारकर पवारांकडे सव्वा अठरा ; देवासकर पवारांकडे सव्वासात व अमदाबादकर पवारांकडे दोन असे दाखविले आहेत.
याशिवाय दक्षिणेतील पुष्कळ मोठा विश्वासराईचा सरंजाम ही पवारांकडे होता. यावरून त्याकाळी मराठा सरदारांत पवारांचा दर्जा कशा प्रकारचा होता व त्यांची सत्ता किती विस्तृत प्रदेशावर होती हे चांगले लक्षात येते.
धारच्या पवार राजघराण्यातील प्रतापी पुरुषांनी राष्ट्र कार्यासाठी आरंभापासून ते अखेरपर्यंत किती परिश्रम केले, कष्ट सोसले व अनेक मोठमोठ्या कामगिरी बजावून स्वपराक्रमाने आपला दर्जा व वैभव कसे वाढवले याचा हा अगदी त्रोटक वृत्तांत आहे. यात या घराण्यातील पुरुषांचे अनुवंशिक शौर्य, उज्वल स्वामीभक्ती व आढळ राष्ट्र प्रेम इत्यादी सद्गुण व्यक्त झाले आहेत.
।। समाप्त ।।
सर्व धार पवार बंधुना विनंती की , वरील मालिका आपणास कशी वाटली ? याबाबत आपले मत जरूर मांडावे !
याआधी ही बर्याच मालिका मी सोशलमिडीयावर चालवल्या होत्या ; पण आज ही मालिका संपते आहे हा विचार करून , मन खिन्न झाल ! एक प्रश्न परत परत पडतो आहे की ....
पवांरांची मराठा साम्राज्यासाठी इतकी वैभवशाली कामगिरी केलेली असुनही इतिहासात हवी तशी प्रसिध्दी या पवारांच्या इतिहासाला का मिळाली नाही ?
आता हा इतिहास सर्वांना समजण्यासाठी पवार बंधुनीच मेहनत घ्यावी !
धन्यवाद !!!!!!
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग २८

 


#मराठा_साम्राज्यात_पवारांची
भाग २८
इसवी सन सतराशेसाठ मध्ये उद्गीरची लढाई झाली त्यात मोगलांकडील चंडोल यशवंतराव पवार यांनी बुडविला यावेळी यशवंतरावांनी मोठया पराक्रमाने कवठयाच्या रानात मोगलांचे चंडोलचा अगदी मोड केला .(फडके परमार इतिहास पुस्तक 56 ) व फत्ते मिळवली.असे सांगतात की कवठयाजवळ घोडनदीच्या काठी फत्तेश्वर महादेवाचे देवालय यशवंतरावांनी बांधले आहे. ते या गोष्टीचे स्मारक आहे. या स्वारीत व श्रीरंघपट्टण वगैरे कडील स्वाऱ्यात यशवंतरावांनी पुष्कळ लूट मिळवून आणली व ती सर्व पेशव्यांना अर्पण केली. त्यातून पेशव्यांनी एक राज राजेश्वराची सुंदर मूर्ती व चौघडा यशवंतरावांना दिला. ही लुटीत मिळवलेली राज राजेश्वर ची सुंदर मूर्ती धार येथील राजघराण्यातील देवालयात तेव्हापासून कुलस्वामिनी म्हणून पुजली जात आहे. तसेच संस्थानातील राजवाड्यावर चौघडा ही त्याच वेळेपासून आहे या चौघडयाच्या पितळी नौबदी वर कानडी लिपीत व भाषेत उत्कीर्ण लेख व काही चिन्हे आहेत. यशवंतरावांना कर्नाटकातील विजया पासूनच जरीपटका आणखी 25०० स्वारांचे पथकही देण्यात आले.
अशा रीतीने यशवंतरावांनी निरनिराळ्या मोहिमांत पराक्रम गाजवून शेवटी इसवीसन 1761 च्या पानिपत येथील महा रणयज्ञात मराठी सम्राज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपली तेजस्वी कारकीर्द संपविली.
असा हा यशवंतराव पवारांच्या इसवी सन 1734 पासून 17 61 पर्यंतच्या हालचालींचा अगदी थोडक्यात वृत्तांत आहे. या 27 वर्षांच्या काळात यशवंतरावांनी अत्यंत महत्वाच्या कामगिर्य् बजाविल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या कारकिर्दीत एका वर्षाचा देखील खंड पडू न देता कधी उत्तरेस तर कधी दक्षिणेस याप्रमाणे एक सारख्या मोहिमांवर मोहिमा करुन मराठी साम्राज्याचा विस्तारासाठी जे अविश्रांत परिश्रम केले ते खरोखरच त्यांच्या सारख्या विरास अत्यंत भूषणावह असून त्यांच्या वंशजास अभिमानास्पद आहेत, यात काही शंकाच नाही !
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग २६

 

भाग २६
पुढे इसवीसन1753 मध्ये कर्नाटकची स्वारी झाली. होळीहुन्नूर किल्ल्यावर मोर्चे लावुन किल्ला सर केला गेला व नंतर धारवड किल्ला हस्तगत केला. (तारीख 13 मे 1753 ) यास स्वारीतही यशवंतराव पवार होते. तारीख 8/5/ 1753 रोजी यशवंतरावांचा मुक्काम मलप्रभा नदीवर होता. (कवठेकर राजोपाध्ये दप्तर ले. 20)
इसवीसन 1754 मध्ये रघुनाथराव दादांबरोबर हिंदुस्तानच्या स्वारीवर यशवंतराव पवार गेले होते.( भाऊसाहेबांची बखर पृष्ठ 4) त्यांनी कुंभेरीच्या वेढ्यात चांगली मदत केली.
या स्वारीत यशवंतराव पवार यांचे धाकटे बंधू रायाजी पवार हे ही होते .रायाजी पवारांचा मुक्काम इसवीसन 1754 च्या जून महिन्यात हस्तिनापुर येथे होता.( श्री भागीरथीसोरम येथील तीश्रोंउपाध्याय वे.रामकृष्ण बिन बेनीराम भट यांना लिहून लिहून दिलेल लेख तारीख 28/6/1754 ) यावेळेस रघुनाथराव दादासाहेब ही दिल्लीत होते. (पे.श.पृ.130 ) स्वारीत विजयी होऊन सर्व मंडळींसह इसवीसन 1755 ऑगस्ट महिन्यात रघुनाथराव परत आले. (राजवाडे खंड 6 पृष्ठ 122 )
यशवंतराव पवार व रायाची पवारांची सरदारी आरंभी एकत्र होती. पण पुढे उभयंतात परस्परांनी आपले मध्यस्थ देऊन मौजे कलसाडा प्रगणे, धार येथे दौलतीची, घराची व फौजेमुळे झालेल्या खर्चाची वाटणी इसवीसन 1744 च्या ऑक्टोबरात करून घेतली. ( धार दरबार दप्तर अप्रकाशित) या नंतर रायाजी पवार यांना निराळा सरदारकीचा अधिकार इसवीसन 1750 मध्ये मिळाला असला पाहिजे ; कारण त्यांच्या शीक्त सवंत 1806 वर्ष प्रमोद दिले आहे . असा सालाचा उल्लेख इसवीसन 1745 मधील रायाजी पवार यांच्या लेखावरील शिक्क्यात नाही.साधनांच्या अभावी रायाजी पवारांच्या इसवीसन सतराशे पन्नास पूर्वीच्या व नंतरच्या कामगिरी विषयी अधिक लिहिता येत नाही. खरे शास्त्री यांच्या ऐतिहासिक लेखसंग्रहात इसवीसन 1761 नंतर रायाजी पवार मोहिमांवर असल्याचे तीन-चार दाखले आढळले आहेत.
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग २५

 

भाग २५
निजामास असा प्रबळ सरदार आपल्या पक्षात हवाच होता म्हणून त्याने यशवंतरावांना माळवा प्रांतात जहागिरी व पंचहजारी साहेब नौबत हा काताब दिल्याचे जाहीर केले.( राजवाडे खंड 8 लेख 178 तारीख 19/8/ 1748 ) यावेळी मराठा राज्याची स्थिती फार नाजूक झाली होती .होळकर वगैरे दुसरे सरदारही निजामास मिळु पहात होते. ( म.रि.मध्य.वि.2 पृ. 241) तथापि यशवंतरावांनी प्रत्यक्षपणे असा विरोध मराठी राज्याशी केला नाही. शेवटी हे प्रकरण यशवंतरावां कडील काशीपंत (शिक्केनवीस) यांनी सदाशिवराव भाऊंचे दिवान रामचंद्रबाबा (सुखठणकर) यांच्याशी संधान बांधून मिटविले.( लेले दप्तर अप्रकाशित ) तेव्हा यशवंतरावांना पुन्हा जप्त झालेले महाल व किल्ले परत मिळाले.
इसवीसन 1751 च्या आरंभी मल्हारराव होळकर व जयाप्पा शिंदे यांनी वजीर सफदरजंग यास सहाय्य करून त्याचे शत्रू अहमदखान पठाण वगैरेंचा फारुखाबाद वगैरे ठिकाणी मोड केला ; व पेशव्यांचे नावांने दिल्लीच्या बादशहाकडून एक फर्मान करून घेतले. या फरमानाने मुलतान , पंजाब , राजपुताना व रोहीलखंड या सर्व मुलखात चौथाई वसूल करण्याचा हक्क मराठ्यांना मिळाला. या महत्त्वाच्या स्वारीत शिंदे , होळकर यांच्या बरोबर यशवंतराव पवार व तुकोजी पवार यांच्याकडील प्रत्येकी 1000 याप्रमाणे फौज देण्यात आली होती .या मदतीबद्दल स्वारीत वसूल झालेल्या सुरजमल जाटा कडील खंडणीचा हिस्सा पुढे यशवंतराव पवार व तुकोजीराव पवार यांना मिळाला होता.( इतिहास सं.पु. 7 अंक 1/2/3 स्फुट लेखन नंबर 2 पृष्ठ 203)
इसवी सन 1751 च्या ऑगस्टमध्ये यशवंतरावांनी पुन्हा स्वारीवर जाण्याची तयारी केली.( कवठेकर राजोपाध्ये दप्तर लेख 55) यावेळी ते पुण्यात होते (कवठेकर राजोपाध्ये दप्तर ले. 28) पुण्याहून पेशवे आॅक्टोंबरात गाजत गाजुद्दीनाच्या कामाकरता मोगलांकडे स्वारीवर निघाले होते ; त्यावेळी यशवंतरावांना दहाहजार फौजेनिशी खुदाबंद खाना वर पाठवले होते.(राज.खं.1ले 21 ता.11/10/1751) या स्वारीत घोडनदीचे युद्ध , कुकडी ची लढाई वगैरे लढायाही झाल्या.. शेवटी शिंगव्याचा तह जानेवारी1752 मध्ये झाला ; (मध्य वि.पृ.347 ) तथापि हे प्रकरण असेच पुढे चालले होते. अखेरीस भालकीचा तह नोव्हेंबर1752 मध्ये झाला तेव्हा ते प्रकरण मिटले. या युध्दाने पेशव्यांचे निजामशाहीवर चांगलेच वर्चस्व स्थापिले गेले.( मध्य.वि 2 पृष्ठ 357 )
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

० कमेंट्स



#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग २३

 


#मराठा_साम्राज्यात_पवारांची
भाग २३
पुढे 1741 च्या डिसेंबर महिन्यात पेशवे बाळाजी बाजीराव सातार्यावरून आल्यावर हिंदुस्थानात स्वारीस जाण्यास निघाले.(पे.श.पृ. 87) बरोबर पवार, शिंदे, होळकर होते.( थोरले शाहू महाराज चरित्र पृष्ठ 82) यावेळी रघुजी भोसले ही हिंदुस्थानच्या स्वारी वर गेले होते. पेशवे ,पवार, शिंदे व होळकर या सरदारांसह खानदेश ,नेमाड मधून माळव्यात उतरल्यावर त्यांनी प्रथमता गढा मंडळाकडे कूच केले; व तेथील ठाणी मार्च-एप्रिल महिन्यात काबीज केली. पुढे थेट अलाहाबादे पर्यंत चालून जाण्याचा बेत होता, परंतु मध्यंतरी रघुजी भोसल्यांचे चिथावणीवरून दमाजी गायकवाड व बाबूजी नाईक यांनी माळव्यावर स्वारी केली ; तेव्हा अगोदर माळव्याकडील बंदोबस्त करणे भाग झाले. माळव्यातील बंदोबस्त पाहून विशेष लढायचा प्रसंग न आणता गायकवाडांनीही मागे पाय घेतला. बाजीरावाच्या मृत्युनंतर धारेवर पुन्हा बादशाही कब्जा झाल्यामुळे मराठ्यांनी स्वारी करून पुन्हा धार काबीज केले,हे वर आलेच आहे; शिवाय या वेळी गायकवाडांच्या स्वारी मुळे ही माळव्यात आणखी गडबड झाली ; तेव्हा बाळाजी बाजीराव यांनी 1742 च्या पावसाळ्यात माळव्यात छावणीत करून त्यावेळी यशवंतराव पवारांना पुन्हा आपल्या तर्फे धार येथे कायम केले ; व गुजरात मधुन गायकवाड पुन्हा माळव्यात येऊ नये असा बंदोबस्त केला.(मध्य.वि. 2 पृ.43)
पुढे इसवीसन 1742-43 मध्ये नानासाहेब पेशवे यांनी आपल्या सरदारांना मार्फत माळवा ,बुंदेलखंड व बंगाल पार्यंतच्या प्रदेशात जिकडेतिकडे धुमाकूळ उडवून दिली. यावेळी नानासाहेबां बरोबर जे सरदार होते त्यात राणोजी शिंदे,मल्हारराव होळकर, यशवंतराव पवार व पिलाजी जाधव हेच प्रमुख होते.( शा.मं.बखर पृष्ठ 78) या सरदारांचा एकंदर बादशाही मुलखात मराठ्यांचे चौथाई हक्क मिळविण्यासाठी पुन्हा जोराचा प्रयत्न असुन त्यांत प्रतिस्पर्धी रघुजी भोसले यांच्या प्रयत्नांना आळा घालण्याचाही हेतू होता. शेवटी उद्दिष्ट हेतू प्रमाणे भोसले यांचाही पराभव झाला त्यानंतर महंमदशहाने माळव्याच्या सुभेदाराची सनद पेशव्यांना देऊ केली .त्यावेळी सनदेंतील शर्तींबद्दल यशवंतराव पवार , राणोजी शिंदे , मल्हारराव होळकर व पिलाजी जाधव या चौघे सरदारांनी एक जामीनकतबा म्हणजे जामीनदारीबद्दल कबुलायत तारीख 21 एप्रिल 1743 रोजी लिहून दिली आहे.( मालकम पेज 78, मध्य वि.पृ 55) यावरून वर दिलेल्या सर्व आधारांवरुन या एकंदर कारस्थानात यशवंतराव पवार यांचे आरंभापासून कसा सहभाग होता व त्यावेळी मराठा मंडळात, दिल्लीचा बादशहा व दुसऱ्या राजपूत राज्यात यशवंतरावांचे केवढे महत्त्व होते व योग्यता मानली जात होती हे चांगलेच लक्षात येते.
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग २२

 


#मराठा_साम्राज्यात_पवारांची
भाग २२
इसवी सन 1738 चा पावसाळ्यानंतर पोर्तुगीजांवर जंगी मोहिम करण्यासाठी सर्व मोठे मोठे सरदार तिकडे पाठविण्यात आले. या मोहीमेवरच पुढे ह माळव्यातील प्रमुख सरदारही गेले. इसवीसन 1739 जानेवारीत ही वसईची मोहीम जोरात होती. त्यावेळी तारापूरच्या हल्ल्यात यशवंतरावांनी चांगले शौर्य दाखविले.( ब्र च ले 49 ) या स्वारीत देवासचे तुकोजी पवार हजर होते. वसईचे कारस्थान रंगात येऊन चिमाजीआप्पा व मोठ्या फौजा वसई काबीज करण्यात गुंतल्या होत्या; तितक्यात नादीरशहाची धाड दिल्लीवर आली. मराठा मंडळाची व छत्रपती शाहू महाराजांची इच्छा बादशाह मदत करून नादिरशहास घालून द्यावा अशी होती ; परंतु सर्व फौजा वसईकडे गुतल्यामुळे , बाजीरावास एकदम जोराने हिंदुस्थानात जाता आले नाही. माळव्याची फौज मल्हारराव होळकर , राणोजी शिंदे व यशवंतराव पवार यांच्या हाताखाली पाठविण्याबद्दल बाजीरावांनी पिलाजी जाधव यांना लिहिले होते. (राजवाडे खंड 6 ले. 130) त्याप्रमाणे वसई कडील काम आटोपताच पवार , होळकर व शिंदे सरदार फौजांसह रवाना झाले व नंतर बाजीराव वही नादिरशहाच्या स्वारीस निघाले ; परंतु तारीख 22 मे चे सुमारास बाजीराव बर्हाणपुर जवळ आले असता, तेथे नादिरशहा निघून गेल्याची खबर त्यांना कळली. स्वारीवर निघालेली सरदार मंडळी माळव्यात येऊन पुढे बुंदेलखंडात गेली. बाजीरावही बुंदेलखंडात आले. तेथे तारीख एक जुलै सतराशे 39 रोजी छत्रसालाच्या मुलाशी एक करार झाला त्यात बाजीरावांनी मल्हारराव होळकर,राणोजी शिंदे व यशवंतराव पवार यांना आपल्या तर्फे मध्यस्थ म्हणून ठेवले होते.( तह करार मदार पृष्ठ 9 ) यानंतर बाजीराव परत पुण्यास आले.( शकावली पृष्ठ 84)
यानंतर दक्षिणेत नासिरजंगाच्या स्वारीवर जाऊन बाजीराव पुन्हा सतराशे 40 च्या मार्च महिन्यात उत्तरेकडे आले; ते पुढे खरगोन जिल्ह्यात रावेरखेडी येथे रेवातीरी तारीख 28 एप्रिल 1740 रोजी वारले.(ई.1925 पासून रावेरखेडी येथें बाजीरावांच्या समाधी जवळ त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम देवास पाती 2 चे दिवाण रावसाहेब य्ं)
बाजीरावांच्या मृत्यूनंतर निजामाने पुन्हा गडबड सुरू केली त्याने मोठा उपक्रम म्हणून उपद्व्याप मांडुन अजीमुल्लाखानास माळव्याची सुभेदारी देऊन वस्त्रे देऊन रवाना केले.
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग २१

 


#मराठा_साम्राज्यात_पवारांची
भाग २१
यशवंतराव पवार यांचे वडील आनंदराव हे वरील मोहिमेत होते. ते इसवी सन 1736 च्या जून महिन्यात उज्जैन येथे अपघात मरण पावले. तेव्हा ऑगस्ट महिन्यात बाजीराव पुण्यास आल्यावर यशवंतराव पवार यांना त्यांच्या वडिलांचे सरदारी वर नेमण्यात आले. (मध्य वि.1 पृष्ट 338 व धार दरबार दप्तर) अधिकार मिळाल्यावर लवकरच यशवंतराव पुण्याहून मोहिमेवर निघाले. त्यांचे तारीख 11 सप्टेंबर सतराशे 36 रोजीचे हिंगण्यास पत्र आहे, त्यात आम्ही मजल दर मजल पुढे जातो " हिशोब पाहणे अथवा करणे ते पुण्यास येऊ तेव्हा करू"( राजवाडे खंड 6 लेख 106) असे यशवंतरावांनी लिहिले आहे .यावरून गुदस्त साला प्रमाणे उत्तरेकडील प्रांतात पुन्हा मोहीम चालविण्याकरता ते माळव्याकडे आले असावेत. ठरल्याप्रमाणे पुढे बाजीराव ही इसवीसन 1736 च्या नोव्हेंबरात पुन्हा दिल्लीच्या स्वारीस निघाले. निरनिराळ्या मोगल सरदारांच्या फौजा एकत्र न होऊ देता त्यांना वेगवेगळे गाठुन त्यांचा पाडाव करण्याचा बाजीरावाचा विचार होता ; व त्याप्रमाणे अशा वेगवेगळ्या कामांवर आपल्याकडील सरदारांची ही त्यांनी योजना केली होती . इसवीसन सतराशे 37 च्या मार्च महिन्यात मल्हारराव होळकरांना दुआबात सादतखानाच्या मुकाबल्याला पाठविले होते ; व पुढे स्वतः फौज घेऊन एकदम बाजीराव दिल्ली जवळ जाऊन दाखल झाले. यामुळे तेंथे फारच गोंधळ उडाला. बाजीरावांनी झिलच्या तलावा नजिक आपल्या फौजेचा तळ टाकला होता. ही स्वारी कित्येक महिने चालली होती. इसवीसन 1737 एप्रिल महिन्यात या तलावाजवळ जी लढाई झाली त्यात यशवंतराव पवार यांनी चांगलाच पराक्रम गाजवला(ब्र.च.ले .27 तारीख 5/4/ 1737) या स्वारीत देवासचे जिवाजी व तुकोजी पवार हे ही सामील होते .
याचवेळी निजामानेही मोठी फौज तोफखाना घेऊन उत्तरेत येण्याची तयारी चालवली होती. पावसाळा संपताच मोठ्या तयारीनिशी तो माळव्यात चाल करून आला.निजाम येतो असे पाहून बाजीराव ही त्यावर चाल करून जाण्यासाठी फौजांसह निघाले. बाजीराव नेमाडात खरगोन जवळ नर्मदा उतरले. बाजीरावाच्या फौजांची व निजामाची इसवीसन 1737 डिसेंबरात भोपाळ नजीक गाठ पडली. तारीख 13 डिसेंबर 1737 ते 8 जानेवारी 1738 या लढाईत निजामाचा चांगलाच कोंडमारा केला गेला. ह्या लढाईला भोपाळची लढाई म्हणतात ही मराठ्यांच्या इतिहासातील एक प्रसिद्ध लढाई आहे. या लढाईतील यशवंतराव पवारांचा पराक्रम खुप नावाजला होता.( ब्र च ले 33,34,35 व 36) भोपाळची लढाई झाल्यावर तह पुरा करून घेण्याकरिता जिंकलेल्या मुलखात अंमल बसण्याचे काम चालले होते ; ते जुलैपर्यंत आटोपून बाजीराव परत गेले. पवार,शिंदे,होळकर वगैरे सरदार मंडळी पाठीवर ठेवले होते.( मध्य वि.1 पृष्ठ 374)
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

चक्रवर्ती सिंघणदेव महाराज

 Post  By

चक्रवर्ती सिंघणदेव महाराज; भारताच्या डेक्कन भागातील यादव घराण्याचे ते सर्वात शक्तिशाली राज्यकर्ते होते. महाराज सिंघणदेव यांचा जन्म 1186 साली सिन्नर येथे झाला. त्यांच्या आईचे नाव भागीरथीबाई, वडिलांचे नाव जैतूगीदेव. दरम्यान, त्यांचे आजोबा भिल्लमदेव हे चालुक्य फेडाल प्रभू होते. नंतर महाराज भिल्लमदेव यांनी 1187 साली स्वतंत्र घोषित करून सिन साम्राज्य स्थापन केले. 1187 साली देवगिरी येथे किल्ला बांधला आणि देवगिरीला राजधानी बनवले. 1187 ते 1191. या काळात त्यांनी महाराष्ट्रावर राज्य केले. 1189 साली त्यांनी सुरतूर येथील लढाईत होयसाळा शासक बल्लाळ यांचा पराभव केला. 1191-1200. पासून राज्य करणारे त्यांचे पुत्र महाराज जैतूगीदेव यांनी यशस्वी केले. तर दुसरीकडे उत्तर भारतात मोहम्मद गोरी यांनी अजमेरचा सम्राट पृथ्वीराज चौहान यांचा निर्णायक पराभव केला, त्यानंतर त्यांनी 1192 मध्ये घियाथ अल-दिन मुहम्मद यांच्यासाठी केला कनैजचा राजा जयचंदचा पराभव केला. अल-दिन मुहम्मदाने मोहम्मद गोरीला महाराष्ट्रावर आक्रमण करायला पाठवले, महंमद गोरीने माळवा आणि गुजरात या दोन राज्यांना ताब्यात घेऊन महाराष्ट्रावर आक्रमण केले, जेव्हा महाराज जैतूगीदेव यांनी महाराष्ट्राच्या हद्दीतून ढकलले.
यानंतर मोहम्मद गोरीने महाराष्ट्रावर तीन वेळा आक्रमण केले, 1195 साली, 1196 साली आणि 1197 साली महाराष्ट्रावर आक्रमण केले, तेव्हा महाराज जैतूगीदेव यांनी त्यांचा छळ केला. महाराज जैतूगीदेव वारंगल येथे वारंगलचा राजा महादेव सोबत लढायला गेले, युवराज सिंघणदेवही गेले, 12 वर्षांचे असताना वारंगल येथे महादेवाशी लढले, लढाईत युवराज सिंघणदेवा शत्रूंशी शौर्याने लढत होते महाराज जैतूदेवी होते विजयी भव आंध्र सेन साम्राज्य च्या अधिपत्याखाली आला, वयाच्या 13 व्या वर्षी चक्रवर्ती सिंघणदेव महाराजांचा विवाह पूर्व खान्देश चे सुभेदार सोमनाथराव यांची कन्या जेहाबाई शी झाला, त्यानंतर महाराज जैतूगीदेव यांचे निधन 31 ऑगस्ट 1200 रोजी झाले वयाच्या 35. व्या वर्षी महाराज सिंघणदेव हे वयाच्या 15. व्या वर्षातच सून साम्राज्याचे चक्रवर्ती बनले. 1201 साली घारीद शासक घियाथ अल-दिन मुहम्मद यांनी मोहम्मद गोरी यांना पुन्हा महाराष्ट्रावर आक्रमण करण्यासाठी पाठवले. मोहम्मद गोरी यांनी महाराष्ट्रावर पुन्हा एकदा आक्रमक. मोहम्मद गोरी ला काय माहीत चक्रवर्ती सिंघणदेव महाराज लहानपणापासून शूरवीर आहेत.
मोहम्मद गोरी यांनी विंध्याभर नर्मदा नदी ओलांडून महाराष्ट्रात प्रवेश केला. मोहम्मद गोरी महाराष्ट्रात दाखल झाल्याची बातमी लवकरच महाराजांपर्यंत पोहोचली. लवकरच मोहम्मद गोरीसोबत युद्धावर गेला. मोहम्मद गोरी विदर्भात होते 70,000 कैवलरी आणि 20,000 शिशु. महाराजांकडे 35,000 कैवल, 34,000 सैन्य होते, ते अशी फौज घेऊन विदर्भात आले, चक्रवर्ती सिंघदेव महाराज आणि मोहम्मद गोरी यांच्यात मोठी लढाई झाली, त्यात चक्रवर्ती सिंघणदेव महाराज जिंकले आणि मोहम्मद् गोरी हरले, मोहम्मद गोरि गझनीवर परतले पराभव झाला. 1202 साली घियाथ अल-दिन मुहम्मद यांच्या मृत्यूनंतर मोहम्मद गोरी गझनीचा सुलतान बनला.
1206 साली विजयपूर येथील आत्ताच्या विजयपूरचा विजय महाराजांनी केला होता. विजयपूरची जहागिरी महाराजाने सरदार केशवराव यांना दिली. 1215 साली महाराजांनी माळवा उत्तरेत घुसवून माळवा ताब्यात घेतला, आणि दक्षिणेस सुभेदार महादेवराव यांनी बनवासी ताब्यात घेतले, आणि महाराजांनी कराड संस्थानची जाहेडी सुभेदार महादेवरावांना दिली.
1216 साली महाराजांनी राजधानी कोल्हापूरचा राजा भोजदेव यांचा पराभव केला होता आणि शिलाहारांचे राज्य सेन साम्राज्यात विलीन झाले होते, चक्रवर्ती सिंघदेव महाराजांनी राजा भोजदेव यांची कन्या कवळाबाई यांच्याशी विवाह केला होता. 1219 साली महाराजांनी राजपूताना आणि सिंध या दोन राजवटींवर विजय मिळवला,
1220 साली चक्रवर्ती सिंघणदेव महाराज यांनी गुजरातला रवानगी केली. सरदार सोमेश्वररावांच्या नेतृत्वात सरदार सोमेश्वररावांनी पाटण येथे भीमदेव राजाशी लढला, या लढाईत भीमदेव पराभूत झाला, दक्षिणेकडे महाराजांनी तुंगाभद्रा नदीच्या उत्तरेकडे भाग गाठला, त्यानंतर महाराजांनी गोंडवाना आक्रमण करून या राज्यावर विजय मिळवला.
जेव्हा दिल्लीच्या सुलतान इल्तुटमिशने 1235 साली विल्सा राज्यावर आक्रमण केले आणि महाराष्ट्रावर आक्रमण केले, तेव्हा त्याला ग्वालियर, काशी, मथुरा आणि पटना या शहरांवर कब्जा केला, पाठोपाठ म्हैसूर, त्रावणकोर आणि तामिळनाडू महाराष्ट्र राज्य महाराजांच्या काळात भरभराट झाली, महाराष्ट्रातील जनता सुखात होती, चक्रवर्ती सिंघणदेव महाराजांना दैवत मानत होती. चक्रवर्ती सिंघणदेव महाराज यांचे 23 डिसेंबर 1246 रोजी वयाच्या 61. व्या वर्षी निधन झाले.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाबाई चक्रवर्ती सिंघणदेव महाराज यांच्या वंशज होत्या.

Tuesday, 9 November 2021

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग २०


 #मराठा_साम्राज्यात_पवारांची

भाग २०
माळव्याची वाटणी झाल्यापासून माळवा प्रांतातील सर्व व्यवस्था शिंदे,होळकर,पवार यांच्याकडे सोपवली गेली असल्याने ई.सन1 735 मध्ये ही सरदार मंडळी मुख्यतः माळव्याच्या व्यवस्थेत व माळव्या पुढील उत्तरेकडच्या मुलाखात विरुद्ध पक्षाशी झगडून सुभ्याच्या व चौथाईच्या सनदा मिळविण्याच्या कामात गुंतली होती. व त्यासाठी इसवीसन 1735 च्या पावसाळ्यानंतर या सरदारांनी एक मोठी जोराची उचल केली. बादशाही मूलखास व त्यांच्या ताब्यातील संस्थानिकांना त्रासवुन सोडण्याचे इराद्याने त्यांनी मेवाड, मारवड व अजमेरचा सुभा या प्रांतात स्वार्या करण्यास सुरुवात केली. इसवीसन 1735 च्या नोव्हेंबरात माळव्यात बाजीराव येऊन पोहोचल्यानंतर या स्वार्यांना अधिकच जोर आला. जयसिंगाने बादशहास पूर्वीच निक्षून सांगितले होते की माळव्याचा सूभ्यावर बाजीरावाची नेमणूक झाल्यावाचून मराठ्यांच्या स्वार्यांचा सालोसाल चा त्रास चुकणार नाही. यासंबंधीची वाटाघाट दिल्ली दरबारात कैक महिने चालू होती. यादगारखान काश्मिरी काही करारमदार करून पेशव्यास पेशव्यांच्या वकिलास घेऊन दिल्लीस गेला होता.( राजवाडे खंड अकरा ले. वीस ) शेवटी बादशहाणे जयसिंगाची सूचना मान्य करून सनंदा यादगारखाना बरोबर देऊन त्यास नजाबतअलीखान व कृपाराम यासह पाठवले तारीख 16 जुलै 1736 रोजी जयसिंग व बाजीराव यांची भेट धोलपुर येथे झाली. या प्रसंगी बाजीरावाबरोबर त्यांचे मुख्य सेनानी व सल्लागार राणोजी शिंदे ,मल्हारराव होळकर व यशवंतराव पवार हे होते. जयसिंग कडून सलोख्याचे बोलणे सुरू होऊन बाजीरावास माळव्याची नायब सुभेदारी दिल्याचे जाहीर करण्यात आले ; परंतु सनदा दिल्या नाहीत. होईल तितके बोला चालीवर काम भागवून सनदा देऊ नये अशी वजिराची यादगारखानास ताकीद होती. यामुळे सनदा दिल्या नाहीत .बाजीरावास ही बातमी अगोदरच कळलेली होती तेव्हा बाजीरावानेही आपल्या मागण्या वाढून अधिक चढाईचे बोलणे सुरू केले यामुळे याप्रसंगी तडजोड झाली नाही; तेव्हा पुढील मनसुबे करण्या करिता आपल्या सरदारांसह ऑगस्टच्या सुमारास बाजीराव दक्षिणेत निघून आले .(म.री.मध्य विभाग 1 पृ.357)
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग १९



 #मराठा_साम्राज्यात_पवारांची

भाग १९
उदाजीरावांचे दुसरे बंधू जगदेवराव यांच्याकडेही मराठ्यांचे लष्करात सरदारकीचा अधिकार असून ते ही मोहीमांवर जात असत परंतु , हल्लीच्या उपलब्ध साधनांमध्ये त्यांचा स्वतंत्रपणे उल्लेख फारसा कोठे आढळत नाही. इसवीसन 1731 ऑक्टोबरांत धार नजिक तिरला गावाजवळ बादशाही सुभेदार दयाबहाद्दर याच्याशी जी लढाई झाली त्यात जगदेवराव हजर असून त्यांनी हत्तीवर चढून दयाबहाद्दरचे शिर उडवले असा उल्लेख चितेगावकर पवारांच्या कैफियतीत आहे . (मावजी कै.पृ.72 )
धार येथील शाखेचे संस्थापक आनंदराव पवार यांच्या मागे त्यांचे पुत्र यशवंतराव हे उदयास आले. मराठी राज्याचा माळव्याबाहेर विस्तार होण्यासाठी मुख्यत्वे करून ज्या सरदारांनी महत्वाच्या कामगिर्या बजाविल्या व त्यास साम्राज्याचे स्वरूप आणले त्या सरदारात यशवंतराव पवार , मल्हारराव होळकर , राणोजी शिंदे व पिलाजी जाधव हे प्रमुख होते.
यशवंतराव पवार हे आपल्या वडिलांच्या हयातीत कधी त्यांच्या बरोबर तर कधी स्वतंत्रपणे मोहिमांवर जाऊ लागले होते . इसवीसन सतराशे पंचवीस-सव्वीस साली ते गुजरातेत आनंदाराव पवारां बरोबर उदाजीरावांच्या मदतीला गेले असल्याचे आयर्व्हिनने नमूद केले आहे. परंतु यापुढील सहा-सात वर्षातील त्यांच्या कामगिरीचे स्पष्ट दाखले उपलब्ध नाही, तथापि या सालात देखील ते मोहीमांवर गेले असावेत असे अनुमान करण्यास जागा आहे.
पुढे 1734 च्या जून-जुलैत राणोजी शिंदे , मल्हारराव होळकर यांच्या बरोबर यशवंतराव पवार व देवासचे तुकोजी पवार माळव्यात मोहिमेवर होते.( राजवाडे खंड 6 ले. 95-97) यशवंतरावांचे वडील आनंदराव पवार नुकतेच दक्षिणेत परत गेले होते.( धार दरबार दप्तर अप्रकाशित) या माळव्यातील मोहिमेत त्रिवर्ग पवार , शिंदे व होळकर सरदारांनी तमाम गिराशी यांचा बंदोबस्त केला.पठारीस ठाणे बसविले लालगडवाला लुटला , वगैरे कामगिर्या बजावून छावणी सोंदवाड्यांत व अागर परगण्यात केली होती.याशिवाय या सरदारांची यावेळी दिल्ली येथील वकिलामार्फत बादशहाकडून चौथाईच्या सनदा व स्वारीचा खर्च व माळव्याच्या सुभ्याची मिळविण्याची खटपट चालली होती.
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग १८

 


#मराठा_साम्राज्यात_पवारांची

भाग १८
माळव्याची वाटणी झाली त्यात धार प्रांत व त्याच्या आसपास चे काही परगणे शिवाय काही जवळच्या रजपुत सरदारांकडील खंड असे आनंदरावांना त्यांच्या हाताखालील लोकांच्या पोषणार्थ देऊन त्यास माळव्यात मुद्दाम कायम करण्यात आले होते ; यात मुख्यता हा हेतु होता की, गुजरातच्या बाजूने माळव्याच्या पश्चिम सरहद्दीवर येणाऱ्या मुसलमानांच्या व तिकडच्या विरोधी मराठी सरदारांच्या स्वार्यांपासून माळव्याचे रक्षण व्हावे.( ग्रॅंट डफ भाग 1 ) माळव्याचे वाटणी शिवाय उत्तरेकडील अजमेर, प्रयाग वगैरे सुभ्यात होणाऱ्या स्वार्यांमध्ये ही ठरावीक हिस्सा आनंदरावांना मिळत होता.( धार दरबार दप्तर अप्रकाशित )
माळव्याची वाटणी होऊन आनंदराव धार प्रांत मिळाल्यावर त्यांनी धार येथे आपले वास्तव्य कायम केले. म्हणूनच त्यांना या संस्थांचे संस्थापक समजण्यात येते. आनंदरावांना स्वतंत्र सरदारकीचा अधिकार मिळाल्यानंतर ते फार दिवस वाचले नाहीत. ते स्वारी वरून परत येत असताना ( विस्तारनामा अप्रकाशित) इसवीसन 1736 च्या जून महिन्यात उज्जैन येथे सर्पदंशाने मरण पावले.(राजवाडे खंड 11 ले.20 व धार दरबार दप्तर अप्रकाशित) माल्कम साहेबांनी आनंदराव यांचा मृत्यू इसवी सन 1749 मध्ये झाला असे लिहिले आहे, पण ते बरोबर नाही. आनंदरावांची सुंदर अष्टपैलू नक्षीदार उज्जैन येथें मंगळेश्र्वरानजीक मंदाकिनी घाटावर आहे. आनंदराव स्वारीवरुन परत आले त्यावेळी त्यांचे धाकटे बंधू जगदेवराव हे त्यांच्या बरोबर होते. आनंदरावांचा मृत्यू अगदी अल्पवयात झाल्यामुळे त्यांच्या स्वतंत्र कर्तबगारीस पुढे वाव मिळाला नाही. व त्यांच्या हातून पुढे मराठीसाम्राज्याची अधिक महत्त्वाची कामगिरी बजावली जाऊन त्यांचा विशेष पराक्रम व मुत्सद्दीपणा निदर्शनास आला नाही.
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...