माहूरगडाची रायबागण
पोस्तसांभार ::सतीश राजगुरे
'राजे
उदाराम' ही देशमुखांच्या कुटुंबाला शहाजहानने दिलेली मानाची उपाधी होती.
त्यामुळे उदाराम यांचे सर्व वंशज स्वतःला 'राजे उदाराम' म्हणवून घेत असत.
१८ व्या शतकाच्या सुरुवातीला पेशव्यांनी देशमुखांच्या या उपाधीस आक्षेप
घेतला. परंतु नंतर त्यांनी ही उपाधी वापरण्यास परवानगी दिली. १८०२ मध्ये या
जहागिरीची सहा मुलांमध्ये वाटणी झाली व प्रत्येक मुलगा स्वतःला 'राजे
उदाराम देशमुख' अशी बिरुदावली लावू लागला.
मराठी कोरावरील अभ्यासू लेखक शुभम् सरनाईक (Shubham Sarnaik)
यांचे देशमुख घराण्याशी घनिष्ठ नातेसंबंध असून त्यांनी देशमुख घराणे व
त्यांच्या जहागिरीबद्दल खालीलप्रमाणे महत्वाची दुर्मिळ माहिती पुरविली आहे.
त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार!
'रायबागन' आत्रेय गोत्री कवानकर देशमुख घराण्यातील होती, असे तिचे पुसदच्या शाखेतील आणि खुद्द कवानकर देशमुख सांगतात.सासरचे तिचे कौंडीण्य गोत्री ऋग्वेदी देशस्थ घराणे १८०२ साली ६ भावंडांमध्ये विभागून जहागिरीची माहूर, महागाव, उमरखेड, पुसद, भोजला आणि वाशीम अशी ६ शकले झाली. यातील काही लोक आजही 'राजे' आणि काही 'देशमुख' हे आडनाव लावतात.
No comments:
Post a Comment