#शाहूंच धर्मांतर
1700 साली राजाराम राजेंचा मृत्यू झाला आणि त्यांच्या लहान मुलाला गादीवर बसवून कुलमुखत्यार म्हणून ताराराणी स्वतः कारभार पाहू लागल्या. युद्धात सहभागी होऊ लागल्या.सर्व बाजूंनी औरंगजेबाची प्रचंड हानी होत असताना.त्याला कुठच यश मिळत न्हवत, त्यातच मराठावीर सरदार नेमाजी शिंदे यांनी नर्मदा ओलांडली माळवा,गुजरात प्रांत काबीज करत औरंगजेबाची रसद तोडली आणि दिल्लीच्या दिशेने पाऊले उचलली होती.औरंगजेब भाजलेल्या पापडासारखा तडफडत होता.शाहू राजे आणि येसूराणी मात्र त्याची हि अवस्था पाहून खुश होत होते.औरंगजेबाच वाढत म्हातारपण त्याला आता सहन होत न्हवत.लष्करी कारवया मधून तो आता बाजूला झाला आणि त्याचा मनाची कपटाची दार उघडी झाली.त्याचामधला तरुणपणीचा मुत्सद्धी राजा त्याला आठवू लागला.सत्तेसाठी त्याने केलेलं प्रयत्न आठवू लागले. धर्मांध सत्तेचा मार्ग त्याचा आवडीचा होता.
मराठे कसेच हरणार नाहीत.युद्धात मराठ्यांना हरवणे आता शक्य नाही हे त्याला चांगलच माहित होत.जे जे राजे महाराजे,नवाब यांना औरंगजेब हरवू शकत न्हवता त्यांना कैदी करून त्यांनी धर्म बदलून त्यांची विटंबना केली होती.एकमेव धर्मवीर छत्रपती संभाजी राजांच्या बाबतीत तो सर्वच बाजूंनी अयशस्वी ठरला होता.आपल्या ताब्यातील शाहू राजे यांना बाटवण्याचा प्रयत्न त्यान अनेकदा केला होता. शाहू राजाच्या लग्नावेळी मुस्लीम मुलींसोबत लग्नाची बोलणी करून पहिल्यांदा शाहू राजांना बाटवण्याचा छुपा प्रयत्न केला होता.त्यात यश न आल्याने त्यान ७_8 वेळ शाहू राजांना धर्मांतराच्या धमक्या दिल्या होत्या.येसूबाई आणि शाहुराजांनी त्यांना लाथाडून लावल होत.
१० मे १७०३ चा तो दिवस होता.औरंगजेबाने त्याच्या गुलालबारीत शाहू राजांच्या सुरक्षेसाठी हमिमुद्धीन खान नावाचा एक पठाणी सरदार तैनात केला होता.त्याला औरंगजेबाने हुकुम दिला की संभाचा (छत्रपती संभाजी महाराज) मुलगा शाहू गुलालबारीत कैद आहे. त्याच्याकडे जा आणि त्याला सांग की , "तू मुसलमान हो." त्याप्रमाणे हमीदुद्दीन खान शाहूंकडे गेला आणि त्याने शाहूंना बादशहाचा निरोप सांगितला.चवताळलेल्या वाघासारखा शाहूराजा पेटून उठला. हमीदुद्दीन खानाच्या नजरेत नजर रोखून शाहूराजे कडाडले.
”आमच्या वडिलांसारखे तुम्ही आम्हाला मरण दिल तरी ते आनंदाने स्वीकारू पण धर्म बदलणार नाही.” शाहूने मुसलमान होण्यास नकार दिला. शाहूचा नकार बादशाहाला कळविण्यात आला. ते ऐकून बादशाहा म्हणाला की शाहूवर नजर ठेवा.
शाहूराजांच्या नजरकैदेत अजून सैनिक वाढवले गेले.शाहू राजे छावणीत बिन्दास्त फिरायचे त्यावर बंदी घातली गेली.शाहूंच्या सुखसुविधा काढून घेतल्या होत्या.येसूराणी आणि शाहू राजांच्या भेटीवर निर्बंध लावले गेले.शाहूराजे किंचित सुध्धा घाबरले न्हवते त्यांनी निडर पणे धर्मांतराच्या फतव्याला पायदळी तुडवलं होत.वाघाच्या जबड्यातले दात मोजणाऱ्या सिंहाचा, संभाजी राजांचा मुलगा होता.धर्मासाठी मरण पत्करणाऱ्या धर्मविराचं ते रक्त होत.भोसले कुळाच क्षत्रिय,पवित्र आणि गरम रक्त त्यांच्या शरीरातून वाऱ्याच्या वेगानं वाहत होत.प्रसंगी प्राण देऊ पण धर्माशी तडजोड करणार नाही म्हणत शाहू राजांनी कडक कैद पत्करली पण धर्मांतर करायला विरोध केला.इकडं येसूराणी आणि तमाम मराठी सरदारांचे काळजाचे ठोके चुकले.सर्वात जास्त काळजी येसुराणी यांना होती.त्यांचा जगण्याचा एकुलता एक आधार,विचार,सत्व आणि वारस शाहूराजे होते.त्यांच्या मनाची घालमेल वाढली.त्यांच्या मनात इतिहासातील काही गोष्ठी येऊ लागल्या.थोरल्या महाराजांवर जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा मावळ्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावून महाराजांना वाचवल होत.शिवा काशीद,तानाजी मालुसरे,बांदल,शंभूसिंह जाधव,नेताजी,मुरारबाजी अशा कितीतरी ज्ञात अज्ञात मावळ्यांनी आपल्या राजांसाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावून स्वराज्य आणि राजा अबाधित ठेवला,सुरक्षित ठेवला होता.शंभू राजांना पकडल गेल,तेव्हा सुद्धा मावळ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावजी होती.महलोजी बाबा घोरपडे,कवी कलश आशा कितीतरी मावळ्यांनी शंभू राजांसाठी हसत हसत प्राण दिले.ज्या दुधावर शंभूराजे लहांचे मोठे झाले त्याच दुधावर मोठे झालेले रायाजी-अंताजी तर धराऊंनी स्वराज्यासाठी अर्पण केले होते.अशा हजारो मावळ्यांच्या रक्तान फुललेले हे स्वराज्य. त्या मावळ्यांची स्वमिनिष्ठा,त्याग,पराक्रम,धाडस आणि साहस सार काही येसूरणींच्या डोळ्यासमोर उभ राहील असेल.येसुराणींनी मनोमनी जगदंबेचा धावा चालू केला “ हे जगदंबे तूच तुज्या लेकराला हलाल होण्यापासून वाचवू शकतेस,धर्मांध वाघाच्या तावडीत सापडलेल्या हरणासारखी तडफड होत असताना या संकटातून सावरायचं बळ त्याला दे.ह्या संकटातून सुटण्याचा मार्ग दे .”
औरंगजेब तर हट्टाला पेटला होता,काही करून आता शाहू ला बाटवायचाच आणि त्या साठी कुठल्याही थराला जायची त्याची तयारी होती.आशा अवघड प्रसंगी मोठ्या धीराने,हुशारीने आणि कौशल्याने येसूराणी आता राजकीय डाव खेळू लागल्या.वकील सज्ज झाले.वाटाघाटी चालू झाल्या आणि...............
क्रमश:पुढील भाग पुढील लेखात
संदर्भ- १)मुघल आखबारातील फारसी पत्र,
२)पुण्यश्लोक छत्रपती थोरले शाहू महाराज- गणपतराव साळुंखे,
३)छत्रपती थोरले शाहू महाराज(सातारा)-आसाराम सैदाने.
No comments:
Post a Comment