विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 4 December 2023

दुर्गाबाईसाहेब भाग १

 


दुर्गाबाईसाहेब
भाग १
लेखन आशिष माळी
शंभुराजेच्या दोन पत्नी होत्या प्रथम येसुबाईसाहेब दुसर्या दुर्गाबाईसाहेब....
दुर्गाबाईसाहेब जाधवराव घराण्यातील लखुजीराव यांच्या थोरल्या शाखेतील म्हणजे दत्ताजीराव जाधवराव (खंडागळे हत्ती प्रकरणातले) यांच्या वंशज शाखेतील .राजे लखुजीराव यांच्या खापरपणती व राजे दत्ताजीराव यांच्या पणती तर रुस्तमराव उर्फ रतनोजी यशंवंतराव जाधवराव यांच्या सुपुत्री.....
यांचा विवाह शिवरायांच्या साल्हेर गड मोहीम दरम्यान घडलेल्या राजनिती शी जुळलेला आहे....
साल्हेर गड मोहीम— इ.स.१६७२ साल्हेर गड मोहिमेसमयी दक्षिणेत मोगल सुभेदार बहादुरखान हा होता व नाशिकचा ठाणेदार हा जाधवरावांच्या थोरल्या शाखेचै ठाकुरजी उर्फ पतंगराव जाधवराव हे लखुजीरावाचे जेष्ठ पुत्र दत्ताजीराव यांचे द्वितीय चिरंजिव हे होते व सिद्दी हीलाल हे वणी दींडोरीचे ठाणेदार होते....
छत्रपती शिवरायांच्या सैन्याचा या मोहिमैत ठाकुरजी जाधवराव व सिद्दी हीलाल यांनी पाहिजे तसा प्रतिकार केला नाही.. कारण हे दोघे शिवरायांशी संधान बांधुन होते... याकारणे ठाकुरजी आणी हीलाल यांचा सरसुभेदार बहादुरखान यांच्यात वाद झाला..
यामुळे दोघे ही मोगलांची चाकरी सोडुन शिवरायां सोबत येऊन मिळाले.. यांच्या सोबत नाईक पांढरे हे देखील शिवरायांशी मिळाले....
यानंतर पुढील तिन वर्षांनी आदीलशहाचा मुलुख ताब्यात आणन्यासाठी शिवरायांनि मोगलांशी तहाच्या वाटाघाट्या सुरु केल्या तेव्हा शिवरायांनी ठाकुरजींना मोगलाकडे ऐका रणनितीने पाठवले....
या संदर्भात भिमसेन सक्सेना म्हणतो "" अकलुजच्या ठाण्यावर रणमस्तखान हा ठाणेदार होता तेव्हा रुस्तमजी उर्फ रतनोजी जाधवराव हे त्याच्यापाशी तैनात होते.. शिवरायांनी रुस्तुमजीच्या मुलीशी दुर्गाबाईसाहेब शी आपला मुलगा शंभाजीराजे यांचा विवाह ठरवला...
या रणनितीने महाराजांच्या सांगण्यावरुन इ.स.१६७२ साली मोगलांना सोडुन शिवरायांना येऊन मिळालेले ठाकुरजी जाधवराव व सिद्दी हीलाल यांना शुभकर्ण बुंदेलाच्या मध्यस्थीने परत आपला हेर माणुस म्हणुन मोगलाकडे पाठवले""
या रणनितीसाठी महाराजांनी त्यासाठी जाधवराव घराण्यातील रुस्तमराव ची कन्या दुर्गाबाईसाहेब सुन करवुन घेतल्या.....
यांचा विवाह १६७५ मधे झाला.....
पुढे शंभुराजे दीलेरखानाकडे गेले असता दुर्गाबाईसाहेब कैदेत पडल्या होत्या...
दुर्गाबाईसाहेब यांची सुटका इ.स. १७१९ साली शंभुपुत्र शाहु यांनी केली ... मातोश्री येसुबाई ,मातोश्री जानकीबाई ,मदनसिंह याच्या समवेत दुर्गाबाईसाब यांची पण सुटका केली...
या संदर्भात शाहुनी इस. १७१८ साली मोगल सुभेदार सय्यद हुसेन याच्याशी करार करुन मराठास्वराज्याछे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या नेतृत्वात प्रधान बाळाजी विश्वनाथ,संताजी भोसले, राणोजीभोसले ,केरोजी पवार, तुकोजी पवार ,उदाजी चव्हान,राघोजी शिंदे, नारो शंकर आदी मराठा सरदार व १६००० सैन्य दील्लीत मातुश्री येसुबाईसाहेब ,मातुश्री दुर्गाबाईसाहेब ,मातुश्री जानकीबाईसाहेब (राजाराम महाराजांचाच्या पत्नी) व ईतर राजकैद्यांच्या सुटकेसाठी पाठवले त्यांच्या सोबत ऐक यादी दीली होती तो कागद "प्रथम भारतवर्ष " आणी नंतर "ईतिहास संग्रह" अशा मासिकात प्रसिध्द झाला असुन राजवाडे यांनी तो आपल्या पहील्या खंडाच्या प्रस्तावनेत प्रसिध्द केला आहे......
ती यादी खाली पण देत आहे
साभार— Rajenaresh Jadhavrao यांचा शोधनिबंधातुन

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...