भाग २
लेखन आशिष माळी
शंभू महाराज जेंव्हा दिलेर खानापासुन सुटले तेंव्हा त्यांचा कबिला मुघलांच्या तावडीत सापडले. त्यात त्यांची द्वितीय पत्नी दुर्गाबाई आणि दोन क्रमांकाची बहिण राणुबाई ह्यात सापडल्या.
१६८४ मध्ये शंभु महाराजांचा आदेश नंतार मराठ्यांनी अहमदनगर किल्ल्यांवर हल्ला चढवला पण त्यात यश नाही आले. त्यावेळीं किल्लेदार चे पत्रात छत्रपति घरातील 2 बायका 1 मुलगी आणि 3 दासी आहे असे लिहलेले मिळते. 1 म्हणजे शंभु महाराजांची द्वितीय पत्नी दुर्गाबाई आणि बहिण राणूआक्का मुलगी दुर्गाबाई यांची कन्या कमाळजा (असावी) कारण दीलेर खानकडे असताना दुर्गाबाई गर्भवती होत्या.
राजे लखुजीराव यांचे चार मुले आणि कन्या जिजाबाई.
१) दत्ताजी खंडागळे हत्ती प्रकरणात मृत्यु दत्ताजी यांना 3 अपत्य
• यशवंत जे लखुजी राजे बरोबरच देवगिरी मध्ये मारले गेले.पण यशवंत यांना 3 मुले रतन रुस्तम आणि लखुजी (दुसरे) यांचा घरातील आचालोजी जे भुईंज लां स्थयीक झाले त्यांना शिवाजी महाराजांची कन्या रानु बाई यांचा विवाह झाला.रुस्तुमराव यांची कन्या दुर्गाबाईसाहेब या संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या.
•ठाकोरजी
•लिंबोजी
२) राघोजी :लखुजी बरोबर निझाम ने देवगिरी मध्ये केली हत्या.
३) अचालोजी:लखुजी बरोबर निझाम ने देवगिरी मध्ये केली हत्या.
यांचा मुलगा संताजी जाधव (कनकगिरी मध्ये थोरले संभाजी महाराज युद्धात मारले गेले) त्यांचा मुलगा शंभुसिंह जाधव जे पावनखिंडीत 350 मावळ्यावरोबर मारले गेले. त्यांचा मुलगा धनाजी जाधव राजाराम महाराज काळात संताजी धनाजी मधील प्रसिध्द. नर्मदा ओलांडून मुघल वर हल्ला करणारे मधील प्रथम . त्या बरोबर नेमाजी शिंदे होते.
४)बहादुर जी: लखुजी यांचे भाऊ भुतोजी यांना अपत्य नसल्यामुळे दत्ता गेले. पुढें संभाजी महाराजांचा मुलगे शाहु छत्रपति यांचा विवाह यांच्याच वंशज अंबिका बई बरोबर झाला
रुस्तुमराव व लखुजी(द्वितीय ).यामध्ये रतनाजी यांची वशंजशाखा जवळखेडा,ऊमरद (देशमुख) व करवंड येथिल जाधवराव होत.
लखुजी (2रे) यांचे वंशज भुईँज येथिल जाधवराव आहेत आणी ही शाखा अखेरपर्यँत स्वराज्यात राहिली.
ठाकोरजी हे दत्ताजीरावांचे द्वितीय पुत्र असुन लखुजीराव यांच्यानंतर याना दखनी जाधवराव म्हणत असत.हे देखिल इ स 1675 नंतर स्वराज्यातच राहिले. हे बहुतेक निपुत्रिक होते, या शाखेतील काहीजण प्रत्यक्ष स्वराज्यात होते आणी काहीजण मोगलाकडे राहुन स्वराज्याचे कार्य करीत होते असेच लक्षात येते...
दुर्गाबाईसाहेब जाधवराव घराण्यातील लखुजीराव यांच्या थोरल्या शाखेतील म्हणजे दत्ताजीराव जाधवराव (खंडागळे हत्ती प्रकरणातले) यांच्या वंशज शाखेतील .राजे लखुजीराव यांच्या खापरपणती व राजे दत्ताजीराव यांच्या पणती तर रुस्तमराव उर्फ रतनोजी यशंवंतराव जाधवराव यांच्या सुपुत्री.....
छत्रपती शिवरायांच्या सैन्याचा या मोहिमैत ठाकुरजी जाधवराव व सिद्दी हीलाल यांनी पाहिजे तसा प्रतिकार केला नाही.. कारण हे दोघे शिवरायांशी संधान बांधुन होते... या कारणे ठाकुरजी आणी हीलाल यांचा सरसुभेदार बहादुरखान यांच्यात वाद झाला..
यामुळे दोघे ही मोगलांची चाकरी सोडुन शिवरायां सोबत येऊन मिळाले.. यांच्या सोबत नाईक पांढरे हे देखील शिवरायांशी मिळाले....
यानंतर पुढील तिन वर्षांनी आदीलशहाचा मुलुख ताब्यात आणन्यासाठी शिवरायांनि मोगलांशी तहाच्या वाटाघाट्या सुरु केल्या तेव्हा शिवरायांनी ठाकुरजींना मोगलाकडे ऐका रणनितीने पाठवले....
या संदर्भात भिमसेन सक्सेना म्हणतो "" अकलुजच्या ठाण्यावर रणमस्तखान हा ठाणेदार होता तेव्हा रुस्तमजी उर्फ रतनोजी जाधवराव हे त्याच्यापाशी तैनात होते.. शिवरायांनी रुस्तुमजीच्या मुलीशी दुर्गाबाईसाहेब शी आपला मुलगा शंभाजीराजे यांचा विवाह ठरवला...
पुढे दुर्गाबाई यांची सुटका इ.स. १७१९ साली शंभुपुत्र शाहु यांनी केली ... मातोश्री येसुबाई ,मातोश्री जानकीबाई ,मदनसिंह याच्या समवेत दुर्गाबाईसाब यांची पण सुटका केली...
या संदर्भात शाहुनी इस. १७१८ साली मोगल सुभेदार सय्यद हुसेन याच्याशी करार करुन मराठास्वराज्याछे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या नेतृत्वात प्रधान बाळाजी विश्वनाथ,संताजी भोसले, राणोजीभोसले ,केरोजी पवार, तुकोजी पवार ,उदाजी चव्हान,राघोजी शिंदे, नारो शंकर आदी मराठा सरदार व १६००० सैन्य दील्लीत येसुबाईसाहेब ,मातुश्री दुर्गाबाईसाहेब ,मातुश्री जानकीबाईसाहेब (राजाराम महाराजांचाच्या पत्नी) व ईतर राजकैद्यांच्या सुटकेसाठी पाठवले त्यांच्या सोबत ऐक यादी दीली होती तो कागद "प्रथम भारतवर्ष " आणी नंतर "ईतिहास संग्रह" अशा मासिकात प्रसिध्द झाला असुन राजवाडे यांनी तो आपल्या पहील्या खंडाच्या प्रस्तावनेत प्रसिध्द केला आहे.
No comments:
Post a Comment