विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 30 December 2025

श्रीशंभूपुत्र थोरले शाहू महाराज.

 थोरले शाहू महाराज मराठा शासनाचे नामधारी (Titular) प्रमुख नसून त्यांनी सक्षमपणे ४० वर्षे राज्य करताना युद्धमोहिमांना मार्गदर्शन केले. सेनापतींना आदेश दिले. गरज वाटली तर परत बोलविले. जरी प्रत्यक्ष रणांगणावर जाऊन सैन्य नेतृत्व केले नसले तरी सर्व प्रधान सरदारांवर पूर्ण नियंत्रण ठेवले होते. याप्रमाणे महाराजांच्या धोरणाची प्रशंसा करताना प्रत्यक्ष न्यायमूर्ती रानडे लिहितात...,

"In the 40 years of rule enjoyed by ShahuMaharaj they was not merely titular head of the Maratha Government, but he directed all operations, ordered and recalled commendars and he exercised a great controlled power on the chiefs, though he no led armies in the field..."
रानडे यांनी आपले वरील विधान सिद्ध करण्यासाठी शाहू महाराजांनी डभई युद्धानंतर दाभाडे, पेशवे, गायकवाड यांच्याशी संबंधित गुजरातचा मिटविलेला वाद, तसेच बाळाजी बाजीराव यांनी पूर्वेकडे बंगाल, बिहार मध्ये हस्तक्षेप केला, तेव्हा महाराजांनी रघुजी भोसलेंच्या बाजूने दिलेला निर्णय व पेशव्यांना माघार घेण्याचे दिलेले आदेश म्हणजे शाहूमहाराज नामधारी नसून सामर्थ्यवान होते...
:

श्रीशंभूपुत्र थोरले शाहू महाराज.
साभार सचिन जी पोखरकर

No comments:

Post a Comment

राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी

  राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांची बडवाई येथील कामगिरी ​१७३४ च्या सुमारास उत्तर हिंदुस्तानात मोहिमेवर असताना मराठा सरदारांनी माळवा प्र...