विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 25 September 2024

“कोरलाईचा किल्ला”.

 १३ सप्टेंबर १५९४....

कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्ये सीमा ही कुंडलिका नदीची खाडी आहे खाडीवर रेवदांडा येथे साळावचा पुल असल्यामुळे दोन्ही तालुके गाडीमार्गाने जोडले गेले आहेत... कुंडलिका खाडीच्या मुखाजवळ उत्तरबाजूला रेवदांड्याचा किल्ला आहे तर दक्षिणेकडे कोरलाई गावाजवळ


“कोरलाईचा किल्ला”....🚩

इ.स.१५२१ मध्ये (Diogo Lopes De Sequeira) दिओगो लोपेज डी सेक्वीरा या पोर्तुगीजांच्या गव्हर्नरने निजामशहा कडुन परवानगी मागून प्रथम येथे धक्का बांधला व ही माची बांधून क्रुसाची बातेरी उभी केली...

पोर्तुगीज आणि निजामशाहीचे बिनसले आणि किल्ल्याचे काम अर्धवट राहिले पुढे पोर्तुगीजांचा वाढता धोका ओळखून निजामशहानेच १५९२ मध्ये इथे हा जलदुर्ग उभारला आणि त्याला ‘बुरहान दुर्ग’ असे नावही दिले हे एवढ्यावरच थांबले नाही तर १३ सप्टेंबर १५९४ रोजी या दुर्गावरूनच पोर्तुगीज आणि निजामशाहीत संघर्ष उडाला यामध्ये निजामशाहीचा पराभव झाला आणि गडाचा ताबा पोर्तुगीजांकडे आला पोर्तुगीजांचा हा कालखंड प्रदीर्घ असल्यामुळे या दुर्गाच्या स्थापत्यावरही मग त्यांचा प्रभाव पडला...

शिवकाळातही हा गड त्यांच्याकडेच होता ऑगस्ट १६८३ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी एकदा हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला होता पण तो अयशस्वी ठरला पुढे मार्च १७३९ मध्ये चिमाजी अप्पांनी शेजारच्या तळगडाचा हवालदार सुभानजी माणकर यांच्या मदतीने कोर्लई मिळवला आणि मराठ्यांच्या जरीपटका गडावर फडफडू लागला यानंतर इंग्रजांन बरोबरच्या शेवटच्या युद्धापर्यंत हा गड मराठ्यांकडेच होता...

📷 @gadwat_official ♥️🔥

#अभियंता_दिवस

 


#अभियंता_दिवस
किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी आणली...🚩

“किल्ले रायगडाचे बांधकाम पूर्ण झाले तेव्हा हिरोजी इंदुलकर मोठ्या आनंदाने छत्रपती शिवाजी महाराजांना रायगड दाखवीत होते...”
“Engineering is the art of directing the great sources of power in nature for the betterment of mankind....”

हिरोजी इंदलकरांसारखा कुशल कलाविष्कार बांधकाम बांधणीचे काम महाराजांनी गडावरच्या तटाकोटाबुरुजांसाठी आणि अन्य बांधकामांसाठी नामजाद केला.. हिरोजी कामाला लागले रायगडाच्या अंगाखांद्यावर श्रावणातल्या गोकुळासारखं बांधकाम सुरू झालं गडाचे कडे आणखी अवघड करण्यासाठी सुरुंगांच्या बत्त्या शिलगावल्या जाऊ लागल्या.. सुरुंगांचे पडसाद दाही दिशांस घुमू लागले...
महादरवाजा, चित्ता दरवाजा, नाणेदरवाजा, वाघ दरवाजा आणि अवघड सांदीसापटीत बांधलेला चोरदरवाजाही अंग धरू लागला.. तीन मनोरे रूप घेऊ लागले.. नगारखाना, सातमाडी महाल, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, शिरकाई भवानीचं देऊळ, कुशावर्त तलाव, गंगासागर कोळंब तलाव पाण्याने भरू लागले.. कमीजास्त चाळीस बेचाळीस दुकानांची दोरी लावून सरळ रांग उभी राहिली.. मधे रस्ता, समोर दुसरी रांग... जगदिश्वराचं भव्य मंदिर उभं राहिलं..असा रायगड पगडीवरच्या कलगीतुऱ्यांनी आणि नऊ रत्नांच्या फुलदार जेगो चौकड्यांनी सजवावा तसा हिरोजींने इंदलकरांनी सजवला...

केवळ राजधानीचा किल्ला म्हणून तो सुंदर सजवावा एवढीच कल्पना रायगडच्या बांधणीबाबतीत नव्हती तर एक अजिंक्य लढाऊ किल्ला म्हणून गडाचं लष्करी महत्त्व महाराजांनी आणि हिरोजींने दक्षतापूर्वक लक्षात घेतलं आहे गडावरच राजघराण्याचं वास्तव्य राहणार असल्यामुळे राजस्त्रियांची राहण्याची व्यवस्था हिरोजींने खानदानी पडदा सांभाळून केली या विभागाला बादशाही भाषेत म्हणत असत.., झनानखाना किंवा दरुणीमहाल किंवा हरमखाना पण रायगडावर या कौटुंबिक राजवाड्याला म्हणत असत.. ‘राणीवसा’ या राजकुटुंबाच्या विभागात प्रवेश करण्याकरिता स्त्रियांसाठी दक्षिणेच्या बाजूस एक खास दरवाजा बांधला त्याचं नाव ‘मेणादरवाजा’.. बारद्वारी आणि बाराकोनी उंच झरोक्याचे दोन मनोरे गडावर बांधले या मनोऱ्यात प्रत्येक मजल्यावर मध्यभागी कारंजी केली भिंतींशी लोडतक्के ठेवून सहज पंधरा-सोळा आसामींनी महाराजांशी गोष्टी बोलण्याकरता व राजकीय चर्चा करण्याकरता बसावं अशी जागा मनोऱ्याच्या दोन्ही मजल्यांवर ठेवली आहे...

( ✒️ @sachinpokharkar_ )

पुण्यातील प्रथम पूजेचा व ग्रामदैवताचा मान कसबा गणपती "जयति गणपति".

 


पुण्यातील प्रथम पूजेचा व ग्रामदैवताचा मान कसबा गणपती "जयति गणपति"...🙏🚩

कसबा गणपती म्हणजे पुण्याच्या कसबा पेठेत असलेल्या देवळातला गणपती...कर्नाटकातील इंडी येथून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने, कसबा गणपतीची स्थापना केली. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी हे देऊळ बांधले असे सांगतात हा गणपती एका दगडी गाभार्यात असून तांदळा स्वरूपात आहे. तांदळा म्हणजे हात-पाय वगैरे अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती पुणे शहरात अशा प्रकारच्या मूर्तीचे हे एकमेव देऊळ असावे.. राजमाता जिजाऊ आणि गणेशभक्त ठकार यांना झालेल्या दृष्टांतानुसार जमीन खणल्यावर ही मूर्ती सापडली अशी आख्यायिका आहे...

गणपतीच्या या मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभिस्थानी माणिक बसवलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत म्हणून या गणपतीला ‘जयति गणपति’ असे म्हणतात...

या गणपतीला पुण्यात प्रथम पूजेचा व ग्रामदैवताचा मान आहे...🙏🌺

――――――――――――
#गणपतीबाप्पामोरया #कसबागणपती
#गणेशोत्सव_२०२४ #गणपती
#गणेश_मंदिर #गणेशोत्सव #मानाचा_गणपती

धुळ्याचा पाठीराखा “किल्ला लळींग”

 १७ सप्टेंबर १४३७....

इतिहासकाळापासून उत्तरेकडील इंदूर, आग्रा, दिल्ली शहरांकडे धावतो आहे या अशा ऐतिहासिक वाटेवरच लक्ष ठेवण्यासाठी एक बळीवंत दुर्गठाणे कधीचे इथे ठाण मांडून बसलेले


धुळ्याचा पाठीराखा “किल्ला लळींग”...🚩

महाराष्ट्रातील ऐतिहासिक घराण्यांमध्ये खान्देशातील ‘फारूकी’ एक मोठे घराणे.. या घराण्याने या प्रदेशावर तब्बल पाचशे वर्षे राज्य केले या घराण्याची काही काळ राजधानी असलेला हा किल्ला लळींग...

लळींग हे गावही गडाएवढेच प्राचीन.. या गावातही इतिहासाचे काही धागेदोरे दडलेले आहेत गावातील महादेवाचे मंदिर हेमाडपंती चांगले हजार एक वर्षे प्राचीन पण या मंदिराचा मुखमंडप, सभामंडप सारे पडून गेलेले केवळ गर्भगृहच ते काय शिल्लक पण तरी शिल्लक भिंती त्या वरील कलात्मक कोनाडे, प्रवेशद्वारावरील नक्षीकाम हे सारे आजही कधीकाळचे वैभव दाखवते...

लळींगवरची ही सारी बांधकामे फारूकी काळातील इसवीसन १३७० मध्ये राजा मलिकने या फारूकी घराण्याच्या राज्याची स्थापना केली.. इसवीसन १३९९ मध्ये त्याचा मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा नसीरखान कडे लळींग आणि भोवतालचा प्रदेश आला त्यानेच लळींगला राजधानीचा दर्जा दिला त्याने फारूकी राजवटीचा विस्तार बऱ्हाणपूपर्यंत केला परंतु इसवीसन १४३६ मध्ये बहमनी सरदार मलिक-उल-तुजारबरोबर झालेल्या युद्धात या नसीरखानचा लळींग किल्ल्याखालीच पराभव झाला पराभवाच्या या अपमानातच १७ सप्टेंबर १४३७ मध्ये त्याचा गडावर मृत्यू झाला फारूकींची सत्ता बुडाल्यावर पुढे बराच काळ हा किल्ला मुघलांकडे होता इसवीसन १७५२ मध्ये झालेल्या भालकीच्या लढाईतून खान्देशातील अनेक गडांबरोबर लळींगच्या प्रवेशद्वारावर मराठी जरीपटका फडकू लागला तो १८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज लढाईपर्यंत होता इतिहासाचा हा एवढा मोठा कालखंड आज जणू इथे लुप्त झाला आहे...

――――――――――――
📷 : पंकज पाटील 👌🏼♥️🔥

राजे जगदेवराव जाधव यांची समाधी”.

 १९ सप्टेंबर १७०० मध्ये निवर्तले,


राजे जगदेवराव जाधव यांची समाधी”...🙏🚩

वऱ्हाडात बुलढाणे जिल्ह्यात सिंदखेड राजा हे गाव जाधवांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध आहे.. छत्रपती शिवाजी महाराजांची माता जिजाऊ यांचे वडील राजे लखुजी जाधव यांनी सिंदखेडची देशमुखी इ.स १५७५ च्या सुमारास संपादन केली मोगल दरबारातून त्यांना बारा हजार फौजेची मनसब होती. फौजेच्या बेगमीकरिता सरकारी दौलताबाद येथील २७ महाल त्यांना दिले होते या शिवाय सिंदखेड साकरखेल्डा, मेहकर इत्यादी महाल त्यांचे खासगत वतन होते त्यांनी सिंदखेड येथे तलाव, बाग, महाल वगैरे बांधून तेथे वास्तव्य केले...

प्रस्तुत राव जगदेव हे राजे लखुजी यांचे पणतु म्हणजे राजे लखुजींचा द्वितीय मुलगा राजे बहादूरजी त्याचा मुलगा राजे दत्ताजी महाराज आणि राजे राव जगदेव हा त्यांचा मुलगा. या सर्वांना मोगल दरबारातून वरील प्रमाणे मनसब असून त्याबद्दल बादशाही फर्मान होते. राजे दत्ताजी यास बादशहा अलमगीर याने कर्नाटकाकडील मोगल मुलखाच्या रक्षणार्थ फौजे सह नेमले होते कलबुरेनजीक निलंगे येथे त्याची छावणी असता विजापुरकर बादशहा लष्करासह त्याच्यावर चालून आला मोठे घनघोर युद्ध झाले त्या युद्धात त्यांना यश आले तरी स्वतः राजे दत्ताजी आणि त्यांचे दोन मुलगे राजे रघोजी आणि राजे यशवंतराव हे धारातीर्थी पतन पावले घरी केवळ पाच वर्षांचा धाकटा मुलगा राजे जगदेवराव एवढाच शिल्लक राहिला ही घटना इ.स १६६५ च्या सुमारास घडली...

उत्तर कोकण मोहीम आणि महाराज

 


उत्तर कोकण मोहीम आणि महाराज....🚩

सन १६६५ मधे महाराजांनी जावळी जिंकली आणि मग जहागिरीचे राज्यात रूपांतर झाले हे खरे जावळी खालील कोकण प्रदेश स्वाभाविकपणेच महाराजांच्या ताब्यात आला आणि रायगडसारखा अत्यंत मौल्यवान किल्ला त्याचवेळी त्यांनी प्राप्त केला त्या अनुसार महाराजांनी उत्तर कोकण जिंकण्याची योजना आखली म्हणजे नोव्हेंबर १६५६ मधे विजापूरचा महंमद आदिलशहा दीर्घ आजारानंतर मृत्यू पावला आणि त्या नंतर अली आदिलशहा हा गादीवर बसला या संधिकाळात दरबारात कट - कारस्थाने राजकारण चालू झाले उत्तर कोकणातील कल्याणचा सुभेदार मुल्ला महंमद या राजकारणात भाग घेण्याहेतू विजापूरला जाऊन थांबला होता ह्याच दरम्यान अजून एक घटना घडली होती ती म्हणजे आदिलशाही व मोगल यांच्यात युद्ध होऊन ते थांबले होते व उभयतांच्या करारानुसार आदिलशहाने हे उत्तर कोकण मोगलांकडे देण्याचे कबूल केले सहाजीक आहे जिकडे सत्ता कमी होते तिकडे त्याचं वैभव हि कमी होयला लागतं...

उत्तर कोकण मोगलांकडे जाण्या आधी महाराजांनी आपल्या ताब्यात घेण्याचा निश्चय केला उत्तर कोकण आदिलशाही सुभेदार मुल्ला महंमद विजापुरात असल्यामुळे उत्तर कोकणावर स्वारी करण्याची हीच मोठी संधी आहे असे जाणून महाराजांनी ऑक्टोबर १६५७ मधे आपल्या फौजा तेथे पाठविल्या...
२४ ऑक्टोबर रोजी आबाजी सोनदेव या सेनानीने कल्याण जिंकले त्याच बरोबर भिवंडी मराठ्यांच्या ताब्यात आणले आणि डिसेंबर मधे कल्याणजवळचा माहुलीचा किल्ला तो हि जिंकून घेतला महाराजांनी दादाजी कृष्ण लोहेकर यांच्याकडे कल्याण भिवंडीचा कारभार समजावून सांगितला आणि आबाजी सोंदेवला उत्तर कोकण चा सुभेदार म्हणून नेमले...

खुद महाराजांनी कुलाबा किल्ला आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशावर सैन्यसहीत प्रवेश केला आणि यावेळी त्यांनी तेथील तळा घोसळा, सुरगड, बिरवाडी, सुधागड, कांगोरी आणि इतर किल्ले जिंकून घेतले किल्ले जिंकताना महाराजांचा प्रथमच संबंध आला तो जंजिरेकर सिद्दीशी आणि मग अजून जबरदस्त संघर्ष सुरु झाला महाराजांनी सिद्धीवर रघुनाथ बल्लाळ ह्यांना पाठविले होते तेव्हा त्याने सिद्धीवर विजय मिळवून त्याचा दंडा- राजपुरीचा प्रदेश जिंकून घेतला आणि मग ह्या वेळी महाराजांनी कल्याण- भिवंडी व पालघर च्या जवळ आपले स्वताचे मराठा आरमार बांधण्यास सुरवात केली...

#स्वराज्यात_उत्तर_कोकण 🚩
――――――――――――
: इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार. ( मराठा सत्तेचा उदय )
――――――――――――
🎨 @rambdeshmukh 👌🏼♥️🔥

२४ सप्टेंबर १६७९...

 


२४ सप्टेंबर १६७९...

मिन्चीनच्या पत्राला २४ सप्टेंबर रोजी उत्तर आले व मुंबईकरांनी कळवले की दौलतखानाच्या अधिपत्याखाली शिवाजीराजांचे एक मोठे आरमार खांदेरीच्या रोखाने येत असल्याची खबर हेरांकरवी मिळाली आहे तरी तूर्त सार्जंट फुलरच्या नेतृत्वाखाली आम्ही १ मचवा व सुमार १५ सैनिक पाठवत आहोत त्यांना गस्तीचा ताबा देवून आपण त्वरीत डागडुजी व नौकांच्या देखभाली करिता परत यावे.. फुलर सोबत मुंबईहून जखमींना घेवून गेलेले शिबाडही परत आले होते.. सार्जंट फुलरच्या ताब्यात गस्त देवून मिन्चीन मुंबईला परतला...

मुंबईकरांना आता पक्की खबर मिळाली की दौलतखान मोठे आरमार (सुमारे २० गुराबा) घेवून खांदेरीच्या दिशेने येत आहे तेव्हा युद्धासाठी सज्ज असे मोठे आरमार आता अनुभवी कॅप्टन रिचर्ड केग्वीन याच्या नेतृत्वाखाली खांदेरीच्या नाकेबंदिकारिता पाठवण्याचा निर्णय मुंबईकरांनी घेतला. ह्या नाविक सैन्यामध्ये रिवेंज ही १ फ्रीगेट तर होतीच शिवाय २ गुराबा (यातील एकीचे नाव डव्ह होते), ३ शिबाडे, २ मचवे होते. ह्या सर्व ताफ्यावर सुमारे २०० अधिक सैनिक तसे इतर नावाडी लोक होते इंग्रजांना वाटत होते की हे आरमार पुरेसे आहे. तरी त्यांनी कॅप्टन केग्वीन ला आदेश दिले की दौलतखानाशी थेट झुंज करू नये अगोदर त्याला बेट इंग्रजांचे आहे हे पटवावे व त्याने न ऐकल्यास शक्तीचा प्रयोग करावा...

आदेशानुसार सज्ज ताफा घेवून ८ ऑक्टोबर १६७९ रोजी केग्वीन नाकेबंदीवर पोचला..१० तारखेला त्याला खबर मिळाली की दौलतखान खांदेरीच्या दिशेने येत आहे.

२४ सप्टेंबर १६९०... #ह्याला_म्हणत्यात_मराठी_बाणा

 


२४ सप्टेंबर १६९०... #ह्याला_म्हणत्यात_मराठी_बाणा 🚩

मावळ्यांच्या भीम पराक्रमामुळे ही गोष्ट साधता आली म्हणूनच १६८९ ते १६९१ पर्यंत जो मोगल मराठा संघर्ष चालू होता त्यात संपूर्ण मराठी रयतेस एक गोष्ट मनोमन उमजली की, मराठी राज्य आता बुडत नाही, औरंगजेब बादशाहाला-मोगलांना जाऊन मिळालेल्या मराठी सरदारांना देखील असेच काही उमगले असावे म्हणूनच नेमाजी शिंदे, माणकोजी पांढरे, नागोजी माने यांसारखे मराठे सरदार पुन्हा स्वराज्यात आले अखिल मराठी जनतेत आता एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला होता...

या सुमारास महाराष्ट्रात एक प्रकारे नवचैतन्याचे वारे वाहत होते याचे दर्शन घडविणारे एक महत्वाचे पत्र उपलब्ध आहे हे पत्र मावळ प्रांताचा सुभेदार... महादजी शामराज या मराठा अधिकाऱ्याने तर्फ मुठे खोऱ्याच्या हवालदारास लिहिले आहे २४ सप्टेंबर १६९० :

त्यात महादजी म्हणतात...,
“मोगलाची धामधूम आपल्या राज्यात आजी तीस वर्षे होत आहे यामुळे मुलुख वैराण जाला.. मुलखात मोगलाईचा अमल चालिला.. हली श्रीकृपेने आपल्या राज्याचा मामला थाटात चालला आहे....”

रायगड नोव्हेंबर १६८९ मध्ये मोगलांच्या हाती पडला तेव्हा आकाश कोसळल्यासारखी मराठ्यांची स्थिती झाली होती आणि अवघ्या वर्षभराने म्हणजे सप्टेंबर १६९० मध्ये मराठे मोठ्या आत्मविश्वासाने म्हणत होते की, ‘श्रीकृपेने राज्याचा मामला थाटात चालला आहे....’

इतिहासकार : डॉ.जयसिंगराव पवार..
(संदर्भ. सेनापती संताजी घोरपडे )
――――――――――――
📷 @gadwat_official 👌🏼♥️🔥
.
#marathaempire #chhatrapati
#raigad #chhatrapatishivajimaharaj
#rajdhaniraigad #gadkille #maharashtra
#रायगड #रायगडाची_श्रीमंती #photography

इंदूर होळकरशाही घराण्यातल्या, श्रीमंत गौतमाबाई राणीसाहेब होळकर..

 १९ व्या शतकात रेखाटलेलं चित्र इंदूर होळकर महाराजांचा राजवाडा..🚩


इंदूर होळकरशाही घराण्यातल्या, श्रीमंत गौतमाबाई राणीसाहेब होळकर...🙏🚩

तळोद्याचे जहागीरदार श्रीमंत भोजराज बाबा बारगळ यांची कन्या गौतमाबाई यांचे नाव प्रकाशाजवळ असलेल्या गौतमेश्वर ऋषींच्या नावावरून ठेवण्यात आलेले असल्याची माहिती श्रीमंत अमरजीतराजे बारगळ यांचेकडुन तळोदे मुक्कामी ऐकायला मिळाली होती. मोहिनीबाई आणि भोजराज बारगळ यांना नारायणराव नावाचे जेष्ठ चिरंजीव होते त्यांनी तळोदे जवळच्या कुंभाचे तीर्थक्षेत्र असलेल्या प्रकाशातील गौतमेश्वर महादेवाला नवस केला आणि नवसाप्रमाणे त्यांना झालेल्या मुलीचे नाव त्यांनी गौतमाबाई असे ठेवले होते. गौतमाबाई आणि मल्हारराव बालपणीचे मित्र आणि पुढे विवाह करुन पतीपत्नी झाले..

गौतमाबाई यांना होळकर रियासतीत खाजगीचा अधिकार मिळाला होता यासाठी त्यांना अंबड आणि कोरेगाव प्रांत मिळाले होते ज्यापासून तीन लक्ष रुपयांचे उत्पन्न मिळत असे. एकंदरीत गौतमाबाई यांनी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहुन राजघराण्यांचा वारसा चालवला तसेच हाताखालील लोकांना शिस्त लावून प्रसंगी कठोरपणाची भुमिका त्या घेत असे. सुभेदार मल्हारराव होळकर यांचे बालपण आणि तरुणपण मामांच्या गावी गेल्याने गौतमाबाई यांना आपल्या पतीच्या स्वभावाची संपूर्ण कल्पना होती गौतमाबाई आणि मल्हारराव महाराज यांनी "होळकर" राज्यात सुख समृद्धी आणुन रयतेला भयमुक्त केले. ओंकारेश्वर आणि उजैन ही दोन प्रमुख ज्योतिर्लिंग तीर्थ माळव्यातच असल्याने नेहमीच तीर्थकरुची गर्दी असायचे. गौतमाबाई यांनी त्यांच्या खाजगीतील शेकडो एकर जमीनी नागंरुन घेत शेतमळे, फळबागा फुलवल्या तर सुभेदार मल्हारराव महाराज यांनी शेतकऱ्यांना विशेष दर्जा देत शेतीला प्राधान्य देवुन पारंपरिक शेती ऐवजी त्यांनी अफुच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना तयार केले. अफुच्या फुलांचा वापर त्यावेळी मसाल्याच्या पदार्थासाठी होत असे. माळव्यातील अफु बाहेरदेशी विक्री साठी जावु लागल्याने राज्याचा महसूल वाढला तसेच शेतकऱ्यांना चांगले दिवस आले..

खरे तर हे दोघे पतीपत्नी शेती प्रिय व शेतीनिष्ठ शेतकरी होते माळव्याच्या सुभेदारी नंतर ही सुभेदार मल्हारराव होळकर यांनी जुन्नर येथील जमीन मेंढरांना चरण्यासाठी कुरण म्हणून उपयोगात आणली होती पुढे अर्धा वाडा महेश्वर जवळ आणला होता तर गौतमाबाई या आपल्या शेतातील पीक आणि फळभाजासह सर्व फळांचा ऋतुनुसार वापर करीत तसेच विविध सणावाराला राजवाड्यातील सर्वांना विशेष पंगतीत जेवणाचा मान ही मिळत असे..


शिवरायांचे ज्ञात अज्ञात कष्टकरी मावळे ‘बकाजी फर्जंद’...🚩

 

बकाजी फर्जंद यांस पाटीलकी बहाल २५ सप्टेंबर १६७५

शिवरायांचे ज्ञात अज्ञात कष्टकरी मावळे ‘बकाजी फर्जंद’...🚩
महाराजांची प्रामाणिकपणे सेवा करून त्यांना कठीण प्रसंगी साह्य करणाऱ्या हिरोजी फर्जंद प्रमाणे त्यांचा मुलगा बकाजी यांनाही महाराजांची सेवा एकनिष्ठेने केली. राज्याभिषेक प्रसंगी सेनापती, अष्टप्रधान, सुभेदार, किल्लेदार, नोकर चाकर, ब्राम्हण, पाहुणे, प्रजेला शिवरायांनी बक्षीस म्हणून, इनामवतानाचा लोभ न धरता आयुष्यभर आपली सेवा करण्याची संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली. स्वराज्याला भरभराटी आलो. वैभव प्राप्त झाले. जगभर शिवरायांचा नाव लौकिक वाढला. मान सन्मानाची अभिलाषा न बाळगणाऱ्या या दोन निष्ठावान सेवकांच्या मुलाबाळांना काहीतरी मान द्यावा असे महाराजांना मनोमन वाटत होते. महाराजांनी हिरोजी फर्जंद यांचा मुलगा बकाजी यास खामगाव मावळ येथील पाटीलकीचे कायमस्वरूपी वतन दिले. २५ सप्टेंबर १६७५ रोजी पाटील वतनाची सनद बकाजीस दिली...
● खांबगावकर भोसल्यांच्या घराण्याची काही कागदपत्रे इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी शिवचरित्र साहित्यखंड-२ मध्ये प्रसिद्ध केली आहेत. त्यात बकाजी फर्जद यास खांबगावची पाटीलकी दिल्याचा उल्लेख :
"बकाजी फर्जंद साहेबाचा कदीम इतवारी फर्जंद याच्या बापाने साहेबाचेये कस्तमशागत केली आहे व बकाजीही साहेबकामावरील कस्तमशागत बहुत करीतो याकरिता साहेब यावरील मेहेरबान आहेती. मेहेरबानीने बक्षीसही पावतो. याउपरी बहुतच मेहेरबानीने साहेबाच्या मनी जाले की यास यक काम करून द्यावे म्हणून त्यावरून मौजे खांबगाव बु.। ता.। का.। मावळ येथील पाटीलकी.. बकाजी फर्जद यास वतन महरमत केले असे. पाटीलकीचे काम घेत जाणे. पाटीलकीचा महजर बकाजीस करून देणे..'' सप्टेंबर १६७५ ची छत्रपती शिवाजीमहाराजांची मुद्रा असलेली दोन पत्रे पाहावयास मिळतात...
: इतिहासाचार्य वि.का. राजवाडे.
――――――――――――
✒️ @sachinpokharkar_

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...