विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 18 July 2026

बाळाजीपंत नातू : मराठा साम्राज्याच्या अस्ताला कारणीभूत ठरलेला इंग्रजांचा विश्वासू सहकारी?

 


बाळाजीपंत नातू : मराठा साम्राज्याच्या अस्ताला कारणीभूत ठरलेला इंग्रजांचा विश्वासू सहकारी?

मराठा इतिहासात सूर्याजी पिसाळ यांचे नाव गद्दारीचे प्रतीक म्हणून घेतले जाते. मात्र, अनेक इतिहासकारांच्या मते मराठा साम्राज्याला सर्वाधिक हानी पोहोचवणाऱ्या व्यक्तींमध्ये बाळाजीपंत नातू यांचे स्थान अधिक गंभीर मानले जाते. कारण त्यांनी केवळ इंग्रजांशी संबंध ठेवले नाहीत, तर मराठा दरबारातील अत्यंत गोपनीय माहिती ब्रिटिश रेसिडेंटपर्यंत पोहोचवून इंग्रजांच्या विजयाला हातभार लावला.
मूळचे कोकणातील पेणजवळील वाक्रुळ गावचे असलेले बाळाजीपंत नातू पुढे पुण्यात आले आणि रास्ते यांच्या सेवेत रुजू झाले. रास्ते आणि दुसरे बाजीराव पेशवे यांच्यात मतभेद असल्याने, इंग्रजांशी संपर्क ठेवण्याचे काम बाळाजीपंतांकडे आले. याच काळात त्यांचा ब्रिटिश रेसिडेंटशी निकट संबंध निर्माण झाला. सन १८०३ पासून इंग्रजांशी त्यांचे संबंध दृढ होत गेले आणि पुढे एल्फिन्स्टनचा ते विश्वासू सहकारी बनले.
दुसऱ्या बाजीरावांनी त्यांना नोकरी देण्यास नकार दिला व अपमानित केल्याची नोंद काही स्रोतांत आढळते. त्यानंतर त्यांनी पूर्णपणे इंग्रजांची बाजू घेतली. एल्फिन्स्टनला पेशव्यांच्या हालचाली, योजना आणि गुप्त माहिती सातत्याने पुरवली जात असल्याने पेशव्यांचे अनेक डाव फसले. त्र्यंबकजी डेंगळे आणि पेशव्यांनी इंग्रजांविरुद्ध उभारलेल्या हालचालींची माहितीही नातूंनी इंग्रजांना दिल्याचे उल्लेख सापडतात.
सन १८१६ मध्ये गंगाधरपंत शास्त्री यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या राजकीय संकटाचा इंग्रजांनी प्रभावीपणे वापर केला. त्र्यंबकजी डेंगळे यांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई झाली आणि पुढे दुसऱ्या बाजीरावांवरही प्रचंड दबाव आणण्यात आला. अखेर १८१८ मध्ये बाजीरावांना पुणे सोडावे लागले. त्यानंतर शनिवारवाड्यावरून मराठ्यांचा ध्वज उतरवून इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत बाळाजीपंत नातू हे एल्फिन्स्टनचे प्रमुख भारतीय सहकारी होते, अशी नोंद अनेक ऐतिहासिक साधनांत आढळते.
पुढे साताऱ्याच्या छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या अधिकारांवर गदा आणण्याच्या आणि सातारा संस्थान खालसा करण्याच्या प्रक्रियेतही बाळाजीपंत नातू इंग्रजांच्या बाजूने कार्यरत असल्याचे उल्लेख इतिहासग्रंथांत सापडतात. रंगो बापूजी गुप्ते यांसारख्या स्वराज्यनिष्ठ व्यक्तींनी त्यांच्या कारस्थानांची जाणीव करून दिल्याचेही संदर्भ उपलब्ध आहेत.
या सेवांच्या मोबदल्यात बाळाजीपंत नातूंना इंग्रज सरकारकडून मोठ्या प्रमाणात मानधन व पेन्शन मिळत होती. उपलब्ध आर्थिक नोंदींनुसार सन १८४२ पर्यंत त्यांना वार्षिक ११,५२० रुपयांची पेन्शन दिली जात होती. त्या काळातील ही अत्यंत मोठी रक्कम होती आणि इंग्रज सरकारने त्यांच्यावर ठेवलेल्या विश्वासाची ती साक्ष मानली जाते.
इतिहासाचे मूल्यमापन करताना व्यक्तींच्या भूमिकेकडे भावनेपेक्षा पुराव्यांच्या आधारे पाहणे आवश्यक आहे. बाळाजीपंत नातू यांच्या कार्याचे मूल्यांकन करताना उपलब्ध कागदपत्रे, पत्रव्यवहार आणि समकालीन नोंदी यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
संदर्भ :
Marathyanchya Itihasachi Sadhane – वि. का. राजवाडे (खंड ४ व १०)
मराठी रियासत – गो. स. सरदेसाई
Peshwai – कौस्तुभ कस्तुरे
Balaji Pant Natu (Wikipedia – प्राथमिक माहिती; अंतिम पुरावा म्हणून नव्हे तर संदर्भासाठी)

छत्रपती राजाराम महाराज

 राजाराम महाराजांना 30 वर्षाचे अवघे आयुष्य मध्ये पहिला 20 वर्षात ते घरगुती वादात अडकून राहिले .एक वर्ष रायगड पासून जिंजी ची धामधुमीच्या प्रवासातआणि पुढची 7 वर्ष जिंजी किल्ल्या मध्ये झुल्फिकारखानाच्या वेढ्यात अडकून राहिले.राहिल्या 2 वर्षात महाराष्ट्र मध्ये त्यांनी मुघल वर प्रति हल्ले केले.रायगड पासून त्यांनी जिंजी पर्यंतच्या काळात अनेक मुघल सारदारांशी चकमकी झाल्या, जिथे शिवाजी महाराजांनी अफझलघांशी युद्ध केले तिथेच 24 वर्षांनी काकरखं शि त्यांचे युद्ध झाले .बेडनूर कर्नाटक इथे तर मुघलांच्या हाती लागले होते त्यातून ते नशिबाने सुटले.

1670 मध्ये

छत्रपती राजाराम महाराज जन्माला आले. त्यांनी आपल्या वडिलांना म्हणजे शिवाजी महाराजांना वयाच्या 10 व्या वर्षी गमावले आणि 12 /13व्या वर्षी आईला गमावले.
त्यानंतर 1689 पर्यंत त्यांना धामधुमीच्या काळात तीक्ष्ण नजरेखाली राहावे लागले. संभाजी महाराजांची हत्या झाल्यावर त्यांचे मंचकारोहण झाले. आणि आपल्या वहिनीच्या म्हणजे येसूबाईच्या इच्छेनुसार ते रायगड मधून सटकले. रायगडावर ठरलेल्या मसलतीप्रमाणे राजाराम महाराज यांनी आपल्या दोन्ही राण्या, संताजी, धनाजी, निराजी यांच्यासोबत गुप्तपणे रायगड सोडला. राजाराम महाराज प्रतापगडावर दाखल झाले. परंतु फतेहजंग खान राजाराम महाराजांच्या पाठलागावर होतेच. तिथेच संताजी, धनाजी, विठोजी चव्हाण याचवेळी औरंगबजेबच्या छावणीवर गेले असावेत
फतेहजंग खान याने प्रतापगडाच्या पायथ्याशी पार या गावी छावणी केली. या वेळी फतेहजंग खान याच्या तुकडीचे नेतृत्व काकरखान हा करत होता. या मोगल तुकडी बरोबर छत्रपती राजाराम महाराज यांची पहिली लढाई लढले
प्रतापगडावर पोहचून पुढचे काहीतरी नियोजन करावे यासठी वेळ मिळेल असा महाराजांचा समज फसला. प्रतापगड पायथ्याला येऊन मोगली सैन्य भिडलं पारं गावाला त्यांची छावणी पडली, शत्रूसैन्याचे नेतृत्व काकरखान नावाचा सरदार करीत होता, तुडील गावाचा देशमुख लोधीखान, अंबाजी चंद्रराव(सिद्दीशी सामील होता), हिरोजी दरेकर ही मंडळी राजाराम महाराजांना सोडून काकरखं ला मिळाली होती होऊन.
यावेळी राजाराम महाराज हत्तीवर स्वार झाले आणि लढाईत उतरले सोबत पिलाजी गोळे, रुमाजीराव येरुणकर व जावजी पराटे हे मराठे सरदार होते. लढाई मोठी जोरात झाली. महाराजांच्या माहुताने आपला हत्ती ऐन रणधुमाळीत घातला, तेव्हा हिरोजी दारेकरांनी घेतलेल्या राजाराम महाराजांच्या विरोधातील आघाडीमुळे राजांना माघार घेणं भाग पडलं, या लढाईत उभय बाजूंची अनेक माणसे मारली गेली तर अनेकजण शेजारच्या कोयनेत बुडून मरण पावले.
राजाराम महाराज यांनी प्रतापगडावरून वासोट्या किल्ल्या मार्गे सातारच्या किल्ल्यावर आले व तिथून पन्हाळागडावर गेले. मोगल सैन्य इथेही पाठलागकरत पोहोचले त्याच वेळी इतर काही किल्ल्यांना देखील मोगल फौजेणे वेढे घातले होते. संताजी धनाजी नि घातलेल्या हल्ल्या मुले या घटनेमुळे मराठा सैन्याचे हिम्मत वाढली व स्वतः औरंगजेब या घटनेने धास्तावला गेला.त्यानिवट्या वेळी जिंजी ला जायचा निर्णय घेतला मराठा साम्राज्याची राजधानी जिंजी किल्ल्यावर स्थापन केल्यास औरंगजेबाच्या मोगल सैन्यास दोन आघाड्यांवर मराठयांच्या सैन्याबरोबर संघर्ष करावा लागणार होता. ति पन्हाळ्यात पोचले प्रतापगड च्या मार्गे.राजाराम महाराज स्वतः ह पन्हाळ्यास होते. मोगलांनी पन्हाळ्यास देखील वेढा घातला..पन्हाळ्याने पुन्हा मराठ्यांना साथ दिली. आधी शिवाजी महाराजांना सोडवले आता राजाराम महाराजांना रामचंद्रपंत हुकुमतपन्हा" किताब दिला आणि अंधार्या रात्री महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातुन निसटले.राजाराम महाराजांच्या या वेळी स्वराज्य फक्त सातारा सज्जन गड परळी पन्हाळा, विशाळगड, कोकणचा काही भाग व दोन्-पाच किल्ले ऐवढे मर्यादित झाले.आणि बाकीचा शिवाजी महाराजनांनी दक्षिण दिग्विजय मध्ये मिळवलेले जिंजी पर्यंतचे राज्य.30 ते 40 हजार असलेले मराठा सैन्य घेऊन त्यांनी संताजी धनाजी च्या साहाय्याने 10 वर्ष झुंज दिली ती पाच लाख सैन्य असलेल्या मुघल विरुद्ध.
त्यांनी विशेष युद्ध केले नाही.करण सात वर्षे ते जिंजी किल्ल्याच्या वेढ्यामध्ये अडकून पडले.जिंजीच्याबकिल्ल्यामधून बाहेर पडले.सततच्या दगडगीमुळे त्यांची तब्येत खराब झाली.3 मार्च 1700 ला त्यांचा मृत्यू झाला. जाण्याअगोदर वत्यानी त्यांच्या मुलाला(सगुणाबाई पासून झालेला) कर्ण यास राह्यवर बसवले पण त्याचाही लगेच मृत्यू झाला.
राजाराम महाराज हा अतिशय शांत स्वभावाचा होता. व्यवस्थित राजकारण केले.व्यक्तीगत रित्या , धोरणी व मुत्सद्दी राजकारणी होता. चिडचिडेपणा घाई त्याचा अंगी नव्हता. त्यांनी एका पत्रात दिल्लीवर स्वारी करायची इच्छा व्यक्त केली.
राजाराम महाराज महाराष्टात परत १६९८ मध्ये आले. त्यांनी आता मुघल वर प्रतिहल्ला चालू केला.
स्वराज्याला पैश्याची तगमग जाणवत होती तेंव्हा त्यांनी गदग, वर्हाड येथे जाउन संपती लुटून आणली. त्यांना छत्रपतीपदाचा मोह आजिबात नव्हता . कित्येक ऐतिहासिक पत्रामधून हे दिसुन येईल की तो बरेचदा राज्य थोरल्या भावाचे आहे व मी फक्त काही दिवस त्या राज्याची काळजी घेतोय असे त्यांनी इतर मराठा सरदारांना लिहले आहे.
तळ टीप -
1]रियासतकार
2] छत्रपती राजाराम महाराज
3]अभिषेक कुंभार -लेख
4]पार ची लढाई चि ऐतिहासक साधनांमध्ये उल्लेख सापडतात नाही फक्त अज्ञातदास यांच्या पोवाड्यातून माहिती होती.
5]मराठेशाही : धामधुमीचा काळ -छत्रपती राजाराम महाराज

"आम्ही गनीमलोक शिवाजी महाराजांचे शिष्य आहो."

 नमस्कार!


"आम्ही गनीमलोक शिवाजी महाराजांचे शिष्य आहो." हे वाक्य केवळ प्रेरणादायी नाही, तर ऐतिहासिकदृष्ट्याही महत्त्वपूर्ण आहे. हे वाक्य मराठा साम्राज्याचे तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव (नानासाहेब पेशवे) यांनी आपल्या पत्रव्यवहारात वापरलेले आढळते.
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्याला कुशल राजकारण, मुत्सद्देगिरी आणि साम्राज्यविस्ताराच्या दिशेने नेणाऱ्या नेतृत्वात नानासाहेब पेशव्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यांच्या पत्रव्यवहारात अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या विचारांचा, कार्यपद्धतीचा आणि भाषाशैलीचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.
पिलाजी जाधवरावांना लिहिलेल्या एका पत्रात नानासाहेब म्हणतात—
«"आम्हांसी स्नेह चित्तपासून करावा. सर्व प्रकारे आम्हां निखालस करावे, यासाठी नबाबांनी (निजामाने) जानबास व खानास पाठवले. त्यापासी किल्ल्याचा मजकूर नबाबाचा मर्जीप्रमाणे आम्ही कबुल केला. आमचा स्वार्थ त्यामध्ये काही नाही. असे असता नबाबाने सर्व एकीकडे ठेऊन गरमी दाखवू लागले तर आम्हांस श्रीकृपेने काय चिंता आहे? आम्ही किल्ल्याविषयी काय इमान देणे ते देऊ. नाहीतर जे त्यांस बरे दिसेल ते करतील. आम्ही गनीमलोक शिवाजी महाराजांचे शिष्य आहो."»
या शेवटच्या वाक्यातून नानासाहेबांची मानसिकता आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येतो. ते स्वतःला शिवाजी महाराजांचे शिष्य म्हणवतात. हे केवळ आदराचे शब्द नसून, स्वराज्याच्या धोरणांचा, शौर्याचा आणि राजकारणातील दूरदृष्टीचा वारसा आपण पुढे नेत आहोत, अशी त्यामागची भावना होती.
नानासाहेबांच्या पत्रांतील अशी अनेक उदाहरणे दाखवून देतात की, शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व आणि विचार पुढील पिढ्यांच्या नेतृत्वासाठी प्रेरणास्थान होते. मराठा साम्राज्याची वाटचाल ही केवळ तलवारीच्या बळावर नव्हे, तर शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या तत्त्वांवर आणि राज्यकारभाराच्या परंपरेवर उभी होती.
हे ऐतिहासिक वाक्य आजही तेवढेच प्रेरणादायी आहे. म्हणूनच अनेक इतिहासप्रेमींसाठी "आम्ही गनीमलोक शिवाजी महाराजांचे शिष्य आहो." हे वाक्य इतिहासातील स्वाभिमान, धैर्य आणि स्वराज्यनिष्ठेचे प्रतीक आहे.

नाना फडणवीस आणि गंगाबाई पेशवा


 नाना फडणवीस आणि गंगाबाई पेशवा यांचे संबंध नव्हते. हे सर्व नाना फडणवीस चे शत्रू मुख्यतः इंग्रजांनी कोलकत्याच्या ऑफिस मधून उठावलेल्या वावड्या आहेत.

नारायणराव पेशवा चां खून झाल्यावर त्याची पत्नी गंगाबाई हिला राघोबा व आनंदीबाई यांच्या भीतीमुळें बारभाईंनीं पुरंदर किल्ल्यावर बंदोबस्तांत ठेविलें होतें. आनंदीबाई ला माहित होते की गंगाबाई गरोदर आहे.
बारभाई ची सर्व आशा गंगाबाई याना मुलगा होते या वर होती.त्यांना जर मुलगी झाली असते तर सर्वावर पाणी फिरले असते. राघोबा दादा याना पेशवा बनवावे लागले असते.
त्यावेळी नाना फडणवीस ह्यांचा उच्चार गंगाबाई यांचा मातोश्री असा करत.
मात्र नशिबाचा कौल लागला गंगाबाई ना मुलगा झाला . नारायण यांच्या मुलाला सवाई माधवराव नाव ठेवले. अजूनही माधवरावांची मोहिनी त्यावेळी मराठा सम्रजायारून जात नव्हती हेच उमजते.त्यांना पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून त्यांनी जेजुरीच्या खंडोबाला नवस पण बोलला होता .
पुरंदर मध्ये सवाई माधवरावा च जन्म झाला (१४ एप्रिल), व नंतर ४० दिवसांनीं त्याला पेशवाईचीं वस्त्रें मिळालीं.
यात काही लोकांचा आरोप होता की नाना फडणवीस आणि सवाई माधवराव यांचा चेहरा खूप मिळतं जुळता असल्यामुळे हा त्याचाच मुलगा आहे. पण हे थोडे अतार्किक वाटते. कारण नारायणराव यांचा खून झाले तेंव्हा गंगाबाई दोन महिन्यांची गरोदर होती. मुळात गंगाबाई यांचे नारायण राव व्यांचशी 1763 मध्ये झाले. त्यांचे वय 1774 ला 15 ते 16 वर्ष असण्याची शक्यता. त्यात घरात पार्वतीबाई , आनंदीबाई यांच्या सारखा मोठ्या स्त्रियांचा वावर त्यामुळे असे संबंध अशक्यच. त्यामुळे पेशव्यांच्या जिवंतपणी हे होन केवळ अशक्य. उलट हे कारस्थान म्हणजे अफवा उठवण्याचे काम नानाच्या हितशत्रू नी केले. त्यावेळी नाना फडणवीस यांचे अनेक शत्रू होते . त्यात मराठा साम्राज्याचे पण होते आणि बाहेरचे तर अनेक होते. त्यांनी ही वावडी उठवण्याची शक्यता दाट.
खूप जणांचा आरोप होतो की नाना फडणवीस हे कामुक होते. त्यांची आठ लग्ने झालेली. आणि दोन अंगवस्त्रे पण होती असा आरोप होतो. त्यावेळी आयुष्यमान त्यातल्या त्यात स्त्रियांचे कमी होते. बाळंतपणात अनेक स्त्रियांचा मृत्यू व्हायचा. नाना फडणवीस यांनी आठ लग्न केले ते पुत्र प्राप्तीच्या हेतूने. त्यांची लालीतागौरी या घाशीराम कोतवाल च्या मुलींशी ,वाखरे सावकार ची मुलगी अश्या अनेक स्त्रिया बरोबर नाव जोडले असले तरी गंगाबाई बरोबर नाव जोडणे जरा अतिशयोक्ती वाटते.
दुसरा आरोप होतो. नाना नी निरनिराळ्या जातीच्या समान मुदतीच्या गरोदर स्रिया गंगाबाई बरोबर प्रसुत कालावधीत पुरंदरास जातील असे केले होते. या अनेक गरोदर स्त्रियांच्या घोळक्यात रावजीभाई दिवेकर नावाच्या दैवज्ञ सोनाराची बायको होती. योगायोगाने त्या दोघींचा प्रसुत कालावधी बरोबर जुळला. दिवेकराच्या बायकोला मुलगा तर गंगाबाई पेशवे हिला मुलगी झाली. आणि नाना फडणवीसाचे अपत्य अदलाबदलीचे राजकारण दाते नावाच्या बाईने पुरंदरात पार पाडले. एक सोनाराचा पुत्र पेशव्यांच्या राजगादीचा एका क्षणात मालक झाला. आणि श्रीमंत पेशव्यांच्या पोटी जन्माला आलेली मुलगी एका सामान्य सोनाराची गरीब मुलगी झाली. गंगाबाई पेशवे यांना झालेली दुर्गाबाई नावाची मुलगी दिवेकर सोनाराच्या घरी वाढली. एका गरीब सोनाराबरोबर तिचे लग्नही लागले. परंतु थोड्याच दिवसात तिला अपत्याविना मरण आले. पण ती सोनाराची मुलगी नसून नारायणराव पेशव्यांची मुलगी आहे हे नानास पक्के माहित असल्याने व आपण राजकारण करून केलेल्या फसवणूकीच्या पापातून मुक्त होण्यासाठी नानाने नारायण पेठेत तिच्या नावे दुर्गावतीचे देऊळ बांधले. त्याच्या खर्चाची सोय पर्वती देवस्थानातून केली.मात्र या आरोपाला काही पुरावा नाही.ह्या पण अफवा असू शकतात किंवा इतिहासाला माहित खरे काय ते
नंतर राघोबानें पेशव्यांशीं भांडण सुरू केलें, ते पण इंग्रजांना हातात घेऊन. पण त्या सर्व संकटांचा सामना नानानीं केला .माधवराव तीन वर्षांच असतां गंगाबाई वारली. .यापुढें त्याचें सर्व सदाशिवरावभाऊची बायको पार्वतीबाई हिंने केलें. १७८३ च्या फेब्रुवारींत त्याचें लग्न थत्ते यांच्या मुलीशी होऊन तिचें नांव रमाबाई ठेवण्यांत आलें. १७९४ सालीं पहिली पत्नी वारल्यामुळें पेशव्याचें दुसरें लग्न गोखले यांच्या मुलीशीं झालें, तिचें नांव यशोदाबाई ठेवण्यांत आलें. याच सुमारास शनवार वाडयांतील काही भाग जळाला. राघोबाचा मुलगा दुसरा बाजीराव जुन्नर येथें बंदीत होता. त्यानें पेशव्याशीं गुप्त पत्रव्यवहार सुरू केला. हें नाना फडणवीसास समजतांच त्यानें पेशव्याचा राग केला. या व इतर प्रकरणांत पेशव्याचें नानांशीं जमत नाहीसें झालें. त्याचा परिणाम मनावर होऊन सवाई माधवराव आजारी पडले. १५ आक्टोबर १७९५ रोजीं झटका येऊन त्या भरांत शनवारवाडयांतील गणपतीच्या दिवाणखान्याच्या पूर्वेकडील खिडकीतून त्यानें खाल उडी टाकली, ती हौदांतील कारंज्यावर पडून दोन दिवसांनीं पेशव्यांचा जीव गेला. असे म्हणतात की नाना फडणवीस आणि सवाई माधवराव यांचे पटत नसल्यामुळे सवाई माधवराव मानसिक दृष्ट्या कमकुवत झाले आणि आत्महत्या केली.
संदर्भ -
पेशवे घराण्याचा इतिहास : ओक

अखबारनवीसांची(बातम्या आणणाऱ्यांची) प्रथा

 नाना फडणवीस यांची दोन लग्ने झाली होती. नानांचे पहिले लग्न दहाव्या वर्षी झाले; या स्त्रीचे नाव यशोदाबाई.

रावबाजीच्या म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या स्वभावाचा धसका नाना फडणवीस यांच्या जिऊबाई या पत्नीनेही घेतला होता. नाना गेल्यावर या बाजीरावाने नानांच्या अरबांचा पगार चुकता करून नानांचे वाडे, जहागीर व इनामी गावे जप्त केली.
नानांजवळील अफाट संपत्ती हाती येण्यासाठी जिऊबाईस शनिवारवाड्यात आणून ठेवले. दौलतराव शिंद्याचीही त्या संपत्तीवर दृष्टी असल्याने, त्याने बाईस दत्तक देऊन आपल्या ताब्यात देण्याबद्दल पेशव्यांस विनंती केली, पण पेशव्यांनी ती नाकारली, आणि नानांचा पक्का सूड उगवला.
यानंतर नानांच्या पक्षाच्या सर्व मंडळींस पेशव्यांनी प्रतिबंधात ठेवले. यशवंतराव होळकरांनी पुणे जाळले, तेव्हा रावबाजी पळून गेले होते. तेव्हा जिऊबाई वाड्यातच होती. नानांचा व आपल्या घराण्याचा पूर्वापार संबंध जाणून यशवंतरावाने बाईस लोहगड (हा किल्ला नानांस सरकारांतून बक्षीस मिळाला होता) किल्ल्यावर नानांचा विश्वासू नोकर धोंडोपंत नित्सुरे याच्या स्वाधीन केले. नानांचा मुख्य खजिना तेथेच असे.
पुढे दोन वर्षांनी जनरल वेलस्लीने मध्यस्थी करून बाजीरावाकडून बाईस दरसाल बारा हजारांची नेमणूक करून देऊन पेशव्यांच्या आग्रहावरून बाईस लोहगड किल्ला सोडावयास लावला. पुढे बाजीराव इंग्रजांच्या मदतीने पुन्हा पुण्यात आला. तेव्हा इंग्रजांनी जिऊबाई यांस पुण्यात येण्यास सुचवले. पण "बाजीराव याची खोड फार वाईट आहे. त्यामुळे माझी पुण्यात रहाण्याची इच्छा नाही" असे तिने सांगितले. तेव्हा इंग्रजांनी बाजीरावास तिला महिना हजार रुपये देण्यास सांगून तिला पनवेलला ठेवले व सुरक्षेसाठी स्वतःचे सैन्य ठेवले.
पुढे बाजीराव बिठूरला गेल्यावर तिला वाद, बेलबाग संस्थान व मेणवली गाव इनाम दिले. हजार रुपये पेन्शन सुरूच ठेवली. यानंतर शेवटपर्यंत ती मेणवली येथे राहिली. नंतर बाई इंग्रजांच्या आसऱ्याने पनवेलास पेशवाई नष्ट होईपर्यंत राहिली. पेशव्यांनी तिला आपल्या ताब्यांत आणण्याची फार खटपट केली, पण ती त्यांच्याकडे आली नाही.

अखबारनवीसांची(बातम्या आणणाऱ्यांची) प्रथा मराठ्यांच्या राज्यात अगोदरपासूनच होती. मराठी सत्तेचा हिंदुस्थानभर राज्यविस्तार झाल्यावर अखबारनवीसही प्रांताप्रांतांत ठिकठिकाणी नेमले गेले. पानिपतच्या प्रसिद्ध तिसऱ्या युद्धकाळात "बातम्या" वेळेवर न मिळाल्याने मराठ्यांचे फार मोठे नुकसान झाले.
नाना फडणीस यांनी तिसरे पानिपत युद्ध प्रत्यक्षात पाहिले होते. बहुदा यातूनच धडा घेऊन मराठेशाहीतील मुत्सद्दी नाना फडणीस यांनी त्यांच्या कारकिर्दीत अखबारनवीस आणि नजरबाज यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविली. या कारणामुळे नानांना हिंदुस्थानातीलच नाही तर परदेशातीलही बातम्या अत्यंत जलद कळत असत.
प्रत्येक ठिकाणच्या "आतल्या" बातम्या मिळविण्यासाठी नानांनी अतिशोधक आणि भेदतत्पर माणसे मिळविली होती. गायकवाड नामक एक मराठा सरदार नानांचा अत्यंत विश्वासातील पटाईत बातमीदार होता. निंबाजी माणकोजी नामक अखबारनवीस निजामाच्या दरबारातील खडान् खडा बातमी नानांना कळवीत असे.
त्यांच्या बातमीचा पल्ला फार दूरवर असून त्यांस बातमी जलद कळत असे. इंग्रज व फ्रेंच यांशी मराठी राज्याशी जसजसा संबंध अधिकाधिक जडू लागला तसतशी नानांस कलकत्ता, मद्रास, मुंबई, पांडिचेरी, माही इत्यादी ठिकाणांहून बारीकसारीक बातमी देखील कळू लागली. हिंदुस्थानबाहेर देखील फ्रेंचाच्या व इंग्रजांच्या काय काय चळवळी चालल्या आहेत इकडे नानांचे लक्ष असे. 'फ्रेंचांचा सरदार बुशी हा फ्रान्स देशाहून फौज घेऊन माॅरिशस बेटात आला..' 'युरोपात फ्रेंच, डच, पोर्तुगीज हे इंग्रजांवर उठले आहेत..' असली वर्तमाने त्यांना कळत."

छत्रपती शिवाजी महाराजांचे चार सरसेनापती (सरनौबत)

 


छत्रपती शिवाजी महाराजांचे चार सरसेनापती (सरनौबत)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या उभारणीत सरसेनापतींचे योगदान अत्यंत मोलाचे होते. महाराजांनी आपल्या कारकिर्दीत चार प्रमुख सरनौबत (सेनापती) नेमले. त्यांच्या कार्याचा संक्षिप्त पण संदर्भाधारित आढावा पुढीलप्रमाणे—
१. माणकोजी दहातोंडे (इ.स. १६५७ पर्यंत)
माणकोजी दहातोंडे हे शहाजीराजांच्या काळापासून भोसले घराण्याच्या सेवेत होते. बेंगळुरूहून बालशिवाजींसमवेत ते पुण्यात आले. जावळी मोहिमेत त्यांनी रडतोंडी घाट उतरून महत्त्वाची कामगिरी बजावली. सभासद बखरीनुसार जुन्नर–अहमदनगर मोहिमेनंतर त्यांची सरनौबतपदी नियुक्ती झाली. ते पदावर असतानाच त्यांचे निधन झाले, असे सप्तप्रकरणात्मक बखरीत नमूद आहे.
२. नेतोजी पालकर (इ.स. १६५७–१६६५)
नेतोजी पालकर हे शिवरायांचे अत्यंत पराक्रमी सेनापती होते. मिर्झा राजा जयसिंहाने त्यांचा उल्लेख "प्रति शिवाजी" असा केला होता. त्यांनी आदिलशाही व मुघल प्रदेशात अनेक यशस्वी मोहिमा केल्या. १६६२ मध्ये औरंगाबादपर्यंत धडक मारली. पन्हाळ्याच्या वेढ्यातून महाराजांना सोडवण्यासाठी त्यांनी वारंवार प्रयत्न केले.
१६६५ मध्ये पन्हाळा मोहिमेस उशीर झाल्यामुळे महाराज नाराज झाले. त्यानंतर ते आदिलशाहीकडे व पुढे मुघलांकडे गेले. १६६७ मध्ये त्यांचे धर्मांतर करून मुहम्मद कुलीखान असे नाव देण्यात आले. मात्र ९ जून १६७६ रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे पुनःशुद्धीकरण करून स्वराज्यात पुन्हा सामील केले.
३. कडतोजी उर्फ प्रतापराव गुजर (इ.स. १६६५–१६७४)
नेतोजी पालकर गेल्यानंतर कडतोजी गुजर यांची सरनौबतपदी नियुक्ती झाली. त्यांच्या शौर्यावर प्रसन्न होऊन शिवरायांनी त्यांना "प्रतापराव" ही पदवी दिली.
साल्हेरच्या महान युद्धात त्यांनी मराठा सेनेला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. १६७३ मध्ये त्यांनी आदिलशाहीचा वजीर बहलोलखान याला पकडले; परंतु दयाबुद्धीने त्याला सोडून दिले. यामुळे महाराजांनी त्यांना कठोर शब्दांत जाब विचारला. त्यानंतर बहलोलखानाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी प्रतापराव नेसरी येथे अल्प सैन्यासह त्याच्यावर तुटून पडले आणि २४ फेब्रुवारी १६७४ रोजी वीरमरण पत्करले.
४. हंसाजी उर्फ हंबीरराव मोहिते (इ.स. १६७४–१६८०)
८ एप्रिल १६७४ रोजी चिपळूण येथे हंसाजी मोहिते यांची सरनौबतपदी नियुक्ती झाली आणि त्यांना "हंबीरराव" हा किताब बहाल करण्यात आला. शिवराज्याभिषेकाच्या वेळी तेच स्वराज्याचे सरसेनापती होते.
दक्षिण दिग्विजय मोहिमेत त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. येलबुर्गा परिसरात हुसेनखान मियाँचा पराभव करून मोठी लूट मिळवली. एकोजीराजांविरुद्धच्या मोहिमेतही त्यांनी उत्कृष्ट नेतृत्व केले. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांनी संभाजी महाराजांना ठाम पाठिंबा देत स्वराज्याची बाजू भक्कम केली. १६८७ मध्ये सर्जाखानाविरुद्धच्या युद्धात त्यांना वीरमरण आले.
प्रमुख संदर्भ -
सभासद बखर
शिवभारत — कवींद्र परमानंद
जेधे शकावली
शिवचरित्र साहित्य (खंड ३)
शिवचरित्र प्रदीप
आलमगीरनामा
मोगल दरबारची बातमीपत्रे (संपा. सेतुमाधव पगडी)

हुंडीचा डाव आणि इंग्रजांची फजिती

 


हुंडीचा डाव आणि इंग्रजांची फजिती

मराठी इतिहासात युद्ध केवळ तलवारीच्या जोरावरच जिंकले गेले नाही; तर बुद्धिमत्ता, मुत्सद्देगिरी आणि आर्थिक डावपेचांच्या साहाय्यानेही शत्रूला नमवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना दिलेला असा एक चतुर धडा विशेष उल्लेखनीय आहे.
इ.स. १६७४ मध्ये राज्याभिषेकानंतर महाराजांनी मोठ्या प्रमाणावर तांबे विकत घेतले. इतिहासकारांच्या मते, या तांब्याचा उपयोग शिवराई नाणी पाडण्यासाठी करण्यात येणार होता. हे तांबे मुंबईतील इंग्रज व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात आले. मात्र, स्वराज्याविरुद्ध वारंवार कारवाया करणाऱ्या इंग्रजांवर महाराज नाराज होते.
तांब्याचा मोबदला रोख देण्याऐवजी महाराजांनी इंग्रजांना हुंडी (Bill of Exchange) दिली. त्या हुंडीनुसार इंग्रजांनी गोवळकोंड्यात जाऊन पैसे घ्यायचे होते. त्या वेळी गोवळकोंड्याचा कुतुबशहा स्वराज्याला ठरावीक रक्कम देत असे.
मुंबईचे तत्कालीन इंग्रज अधिकारी जेरॉल्ड ऑंंजियर यांनी ही हुंडी सुरतमार्गे गोवळकोंड्यास पाठवली. परंतु तेथे स्वराज्याचे प्रतिनिधी प्रल्हाद नीराजी नाशिककर रायगडावर गेले असल्यामुळे पैसे मिळाले नाहीत. इंग्रजांचा प्रवास, वेळ आणि खर्च वाया गेला.
यानंतर इंग्रजांचा दुभाषी नारायण शेणवी रायगडावर आला. मात्र तेव्हा प्रल्हाद नीराजी पुन्हा गोवळकोंड्यास गेले होते आणि महाराजही गडावर नव्हते. शेणवीने मग पेशवे मोरोपंत पिंगळे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यालाही जवळपास महिनाभर प्रतीक्षा करावी लागली.
भेट झाल्यावर मोरोपंतांनी रोख रक्कम नसल्याचे सांगितले आणि अलिबाग परिसरातील कररूपाने मिळणारे नारळ, सुपारी, भात इत्यादी वस्तू मोबदल्यात घेण्याचा पर्याय सुचवला. परंतु इंग्रजांनी हा प्रस्ताव नाकारला. त्यांना वाटले की मराठे प्रजेचा कर दुसरीकडे वळवतील आणि त्यांच्या हाती काहीच लागणार नाही.
पुढे इंग्रजांनी फ्रान्सिस मॉलीव्हेरेर याला नारायण शेणवीसोबत पुन्हा रायगडावर पाठवले. त्यांनाही बराच काळ प्रतीक्षा करावी लागली. अखेर महाराजांनी त्यांची भेट घेतली आणि यावेळी रोख रकमेऐवजी तितक्या मूल्याची सोनं किंवा चांदी घेण्याचा पर्याय दिला.
शेवटी इंग्रजांनी चांदी स्वीकारण्याचे ठरवले. मात्र मोरोपंत पिंगळ्यांनी आणखी एक डाव टाकला. बाजारात चांदीचा भाव २३ रुपये प्रति शेर असताना स्वराज्याने तो २८ रुपये प्रति शेर धरला. इतका वेळ, पैसा आणि श्रम खर्च झाल्यामुळे इंग्रजांना हा दरही मान्य करावा लागला.
या संपूर्ण व्यवहाराला सुमारे दीड वर्ष लागले. शेवटी जेरॉल्ड ऑंंजियरने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला पाठविलेल्या अहवालात नमूद केले की, हे प्रकरण सुमारे २२.५% नुकसान सहन करून मार्गी लागले.
हा प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आर्थिक दूरदृष्टी, मुत्सद्देगिरी आणि शत्रूला युद्धाशिवायही अडचणीत आणण्याच्या विलक्षण कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण मानला जातो. महाराजांनी इंग्रजांना केवळ रणांगणातच नव्हे, तर व्यवहारकुशलतेनेही प्रभावी धडा शिकवला.
संदर्भ : English Records on Shivaji

रास्ते घराण्यातील शिक्का 🚩🚩🚩

  रास्ते घराण्यातील शिक्का सदर शिक्का मोर्तब याचे महत्व त्या व्यक्तीच्या इतिहासातील कामगिरीवर लष्करी व मूलखी कारभारातील योगदानावर आधारलेला अ...