मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Wednesday, 30 September 2020
औरंगजेबाच्या अखेरच्या दिवसातील साक्षीदार असलेले शहर नगर
दक्खन ए सुभा (प्रांत ) आणि मराठे भाग ७
ज्या प्रदेशात या देवकार्याने जन्म घेतला व जे उत्तरोत्तर प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वृद्धीते पावले, त्याचे मूळ हे त्याचा ध्यास धरणाऱ्यांच्या पराक्रमात तर होतेच; मात्र त्या पराक्रमाला, त्या दृढनिश्चयाला खतपाणी घालणाऱ्या सह्याद्रीच्या अन् सिंधुसागराच्या प्रादेशिक दुर्गमतेतही होते. भूगोलाच्या कुशीतच इतिहास जन्म घेत असतो हे एक दुर्लक्ष न करता येण्याजोगे अन् विसरता न येण्याजोगे ऐतिहासिक सत्य या निमित्ताने आपल्या सामोरे येते.
डॉ. मिलिंद पराडकर
दक्खन ए सुभा (प्रांत ) आणि मराठे भाग ६
दक्खन ए सुभा (प्रांत ) आणि मराठे भाग ५
दक्खन ए सुभा (प्रांत ) आणि मराठे भाग ४
दक्खन ए सुभा (प्रांत ) आणि मराठे भाग ३
दक्खन ए सुभा (प्रांत ) आणि मराठे भाग २
दक्खन ए सुभा (प्रांत ) आणि मराठे
दख्खनच्या पठारावर राहणाऱ्या तुलनेत सुखासीन लोकांनी नव्हे, तर सह्य़ाद्रीच्या कडेकपारीत राहणाऱ्या रांगडय़ा, राकट, कणखर लोकांनी शिवाजी महाराजांना त्याच्या स्वराज्याच्या कामात मोलाची साथ दिली...
हिम्मतबहादर उदाजीराव चव्हाण(१६८०-२४ नोव्हेंबर १७६२)
हिम्मतबहादर उदाजीराव चव्हाण(१६८०-२४ नोव्हेंबर १७६२)
उदाजीराव चव्हाण यांचा जन्म १६८० मध्ये झाला ,उदाजीरव हे डिग्रजकर चव्हाण घराण्यातील ,सरसेनापती संताजी घोरपडे यांना मदत करणाऱ्या हिम्मत बहाद्दर विठोजी चव्हाण यांचा हा पुत्र होता.
या चव्हाण घराण्याचे मूळ पुरुष बालोजी. त्यांचे पुत्र राणोजीराव चव्हाण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महत्त्वाचे सरदार आणि लष्करातमोठय़ा हुद्दय़ावर काम करत होते.
राणोजीरावांनी महाराजांसोबत बऱ्याच मोहिमांत भाग घेतला होता. सुरतेच्या स्वारीत राणोजीराव होते, असा उल्लेख सापडतो. नंतर सिद्दी जोहरच्या जंजिरा मोहिमेत लढत असताना ते धारातीर्थी पडले. त्यांचे दोन पुत्र होते पैकी मोठे विठोजीराव व धाकटे मालोजीराव. विठोजीराव वयाने साधारण १८ वर्षांचे असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सरदार बनवले व त्यांना एका तुकडीवर लष्करी अधिकारी नेमून स्वराज्य सेवेत सामावून घेतले. महाराजानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीतही विठोजीरावांनी लष्करी सेवा इमानेइतबारे पार पाडली.
दक्षिणेतील आदिलशाही, कुतुबशाही व मराठय़ांचे स्वराज्य संपवण्याचे ठरवून औरंगजेब १६८१-८२ सालात दक्षिणेत उतरला. औरंगजेबाला मराठय़ांनी सलग ८ वष्रे स्वराज्यातील एकही किल्ला जिंकू दिला नव्हता. मोगलांनी १६८९ साली दगा करून संभाजी महाराजांना संगमेश्वर मुक्कामी पकडून औरंगजेबाच्या हवाली तुळापूर येथे दिले. तिथे औरंगजेबाने त्यांचे हाल करून क्रूरपणे हत्या केली. याचा राजा असलेल्या संताजी, बहिर्जी, मालोजी घोरपडे आणि विठोजीने औरंगजेबाचा सूड घेण्याचे ठरवले. हे घोरपडे बंधू व विठोजीने निवडक १५० शिलेदारांसह तुळापूर मुक्कामी असलेल्या औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला केला, पण औरंगजेब त्याच्या तंबूत सापडला नाही. त्यामुळे चिडलेल्या संताजी व विठोबानी तंबूचे तणाव घाव घालून तोडले, तंबू खाली पडला तेव्हा त्यांच्या खांबावर असलेले दोन सोन्याचे कळस काढून घेतले. परतताना त्यांनी सिंहगडाचा पायथा गाठला. तिथे किल्लेदार असलेल्या सिद्धोजी गुजर यांनी या लष्कराची सर्व सोय केली.
त्याच वेळी मोगल सरदार झुल्फीकार खान कोकणातून लूट घेऊन पुण्यास जात असताना त्याच्यावर हल्ला करून घोरपडे बंधूंनी त्यांचा पराभव केला व सर्व खजिना लुटला आणि तीन हत्ती काबीज करून हे सर्व पन्हाळगडावर छ. राजाराम महाराजांना सादर केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या महाराजांनी घोरपडे बंधूंना ‘ममलकतदार-ए-िहदूराव’ हा किताब दिला आणि विठोजीना ‘हिम्मतबहादर’ असा किताब, शिक्के व कटय़ार देऊन सन्मान केला. कर्नाटकात युद्ध सुरू असताना महानगर ऊर्फ बंगलोर इथे २२ मे १६९९ रोजी विठोजी मारला गेला. नंतर त्याचा पुत्र उदाजी याला राजाराम महाराजांनी हिम्मतबहादर पदाची वस्त्रे दिली. तालुका विजापूर व ठाणे मनगुत्ति वगैरे अठरा परगणे ,शिरोळ रायबाग वगैरे जहागिरी याच्य्कडे होत्या.
१७३२ रोजी सगुणाबाई िनबाळकर व िहदूराव घोरपडे यांना शाहूंची जी आज्ञापत्रे पाठविण्यात आली त्यात उदाजीरावांना ‘हिम्मतबहादर’ व ‘ममलकतदार’ असे दोन किताब लावलेले दिसतात. पैकी हिम्मतबहादर हा किताब जुना आहे. उदाजीही त्यांच्या पूर्वजाप्रमाणे पराक्रमी होते. शाहू आल्यावर ताराबाईंच्या पक्षात जाऊन ते बत्तीस शिराळ्यात गढी करून राहिले होते.
उदाजी व दामाजी थोरात हे सातारा प्रांतापर्यंत स्वारी करत व चव्हाणचौथाई वसूल करत, गाव लुटत असा कार्यक्रम सुरूच होता. शत्रूच्या मुलखातून जबरदस्तीने चौथाई वसूल करण्याची मूळ कल्पना शिवाजी महाराजांची. परंतु ही चौथाई प्रत्यक्ष स्वराज्यात उदाजीराव चव्हाण वसूल करत असल्याने त्याला कुचेष्टेने चव्हाण चौथाई असे नाव मिळाले होते, असे उल्लेख कागदपत्रात आहेत. याचा त्रास एवढा जाणवत होता की, त्या त्या प्रांतातील सरदारांनाही या अरिष्टनिवारणार्थ आपापल्या प्रजेवर ‘चव्हाणपट्टी’ असा एक स्वतंत्र कर लादला होता, आणि त्या पैशातून ते फौजा बाळगून उदाजीरावांशी लढा देत.
ताराबाई राणी सरकार यांच्यातर्फे सेनापती चंद्रसेन जाधवराव यांच्या सोबत छत्रपती शाहू महाराजांशी यांनी लढा दिला,यांची गाधी बत्तीस-शिराळ्यास होती,शाहू महाराजांनी उदाजीरावास कैद केले होते परंतु वारणेच्या तहानुसार ते परत कोल्हापूरकर छत्रपती यांच्याकडे गेले. उदाजीरावांचे चुलते मालुजी चव्हाण यांना इ.स. १७३८ मध्ये डिग्रज हा सरंजाम म्हणून शाहूराजाकडून मिळाला होता. शिवाय कर्नालपैकी निम्मा गाव त्यांना पालखीच्या खर्चासाठी शाहूंनी इ.स. १७४४ साली दिला होता. मिरज प्रांतापैकी फक्त हे दीड गाव आता या घराण्याकडे चालू राहिले.
अशा या पराक्रमी उदाजीरावांचा मृत्यू नेमका कसा झाला याची खात्रीलायक माहिती नाही. मृत्यूबाबत पहिला उल्लेख कै. रथाजीराव चव्हाण यांनी आपल्या कैफियतीत यासंबंधी जो मजकूर लिहून ठेवला आहे त्यानुसार इ.स. १७६२ च्या नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ात या विरण्यात योद्धय़ाचा एका लढाईत अंत झाला. अक्कलकोटकर व हिम्मतबहादर यांचे एका हद्दीच्या गावाबद्दल कलह चालू होता. तेथे लढाई झाली त्यात उदाजीराव ठार झाले.
दुसरा उल्लेख 'मिरज प्रांती एका खेड्यावर उदाजीने रोख केला,गावकऱ्यांनी मानला नाही.उदाजीने गावावर स्वारी केली,त्या प्रसंगी उदाजीचे घोडीस गोळी लागून उधळली .रिकिबीत पाय अडकून डोके फुटून मेले '
त्यांचे पुत्र विठोजीराव व प्रीतीराव हे उभयता नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथे होते. त्यांनी उदाजीरावांचा देह नळदुर्गला आणून अणदूर येथील श्रीखंडोबा मंदिराच्या बाहेर त्यांची समाधी बांधली. नंतर विठोजीराव डीग्रजेस तर प्रीतीराव करवीर नरेश छत्रपती शिवाजी महाराजांपाशी राहिले .
उदाजी राव चव्हाण यांची उत्कृष्ट समाधी बांधलेली आहे
नाईक-बावणे घराणे
धनगर समाजातील सरदार शेळके
धनगर समाजातील सरदार शेळके
हे लोणंद व निम्बोडी तालुका खंडाळा जि. सातारा या गावचे वतनदार घराणे होते. सरदार शिवाजी शेळके, सरदार पडजी शेळके यासारखे पराक्रमी वीर या घराण्यातून आले होते. छ. शाहू, सरदार फत्तेसिंग भोसले व पेशवे काळात त्यांनी पराक्रम गाजविले होते.
त्यांच्यापैकी असलेल्या वीर पुरुषांच्या समाधी खाली दिलेल्या असून लोणंद बाजारतळ व अहिरे रोड लागत अशाच समाधी आहेत ज्यांना मंदिराचे स्वरूप दिले गेले आहे.
research by - prof. santosh pingale.
मराठा सरदार त्रिंबकजी इंगळे
मराठा सरदार त्रिंबकजी इंगळे
१ नोव्हेंबर १६९२ ला पन्हाळगडाला बादशहाचा नातू मुहम्मद मुईउद्दीन बेदारबख्त याचा वेढा पडला.
हा पन्हाळा थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ८ वर्षे
मोघली फौजेशी झुंजला आणि शेवटी २४ मे १७०१
रोजी दाणागोटा-दारुगोळा संपल्यामुळे नाईलाजाने
मोघलांना शरण गेला.
या किल्ल्याचे राखणकरते होते त्र्यंबकजी इंगळे.
बादशहाने हा किल्ला घेण्यसाठी पिराजी घाटगे, सुहराबखान,लुत्फ़लुल्लाखान, मुख्तारखान, राजा किशनसिंह,मरहमतखान, तरबियतखान, मंसूरखान आणि असे अनेक नामवंत मोघली मनसबदार पाठविले होते. पण यातीलकुणाचीच डाळ त्र्यंबकजी इंगळे आणि त्यांच्या वीरांनी शिजू दिली नाही. मोघली सरदारांनी साम-दाम-दंड-भेद असे सर्व प्रकार पन्हाल्यावर करून पाहिले पण त्यांना यात कशातच यश आले नाही.
या लढ्यात बादशहाने प्रचंड प्रमाणात तोफेचा वापर केला.
इतकेच नव्हे तर पन्हाल्याच्या बाबतीत
इतिहासाची पुनरावृत्ति झाली होती, इंग्रज वकील विलियम
नॉरिस इंग्रज बनावटीच्या तोफा घेउन मोघलांनच्या छावणित
सामिल झाला. मोघली तोफांच्या माऱ्यामुळे
किल्ल्याच्या तटा बुरुजांना खिंडारे पडली होती पण त्यात
सुद्धा, मराठे पुन्हा ह्या तटा बुरुजांची दुरुस्ती करुन लढायांस
सिद्ध राहित.
हा वेढा चालू असतानाच बाहेरून धनाजी जाधव आणि त्यांचे
सैन्य मोघलांवर हल्ले करीत होते. अशा अनेक चकमकी होतच
होत्या. त्यातच किल्ल्यावरून सुद्धा, मराठे
मोघली छावणीवर हल्ले करीत आणि त्यांची रसद मारून
जमेल तेवढे मोघल कापून पुन्हा गडावर पसार होत.
मराठे सुद्धा किल्ल्यावरून तोफांचा भडिमार करीत होतेच.
एकदा तर मराठ्यांनी केलेल्या मारात, खुद्द
बेदारबख्ताचा घोड़ा जाया झाला. मराठे रात्रीचे तर
अति आक्रामक बनत असत, अशाच एका रात्री मराठे
कोंकणी दरवाजातुन बाहेर पडून मंसूरखानच्या छावणीवर
एल्गार केला.
त्याच्या काही तोफा निकामी केल्या आणि अनेक
मोघली सैनिकांस मारून ते गडावर पसार झाले.
१२ एप्रिल १७०१ रोजी,गडावरील मराठ्यांनी थेट
तरबियतखानाच्या तोफखान्यावर झेप घेतली. तरबियतखान
पान्हाळा व पवनगडच्या बेचक्यात उभा होता, या छाप्यात
मराठ्यांनी मोघलांनचा दारुगोळा उडवून दिला आणि त्यांचे
काही सैनिक कापून, पुन्हा गडावर पसार झाले.
अखेर दाणागोटा संपल्यामुळे
पन्हाळा मुघलांच्या हवाली केला गेला.
पन्हाळा किल्ल्यावरील त्र्यंबकजी इंगळे, बाळोजी इंगळे,
कान्होजी इंगळे, पवनगडाचे विठोजी केसरकर,
आणि त्यांची ८००-९०० ची शिबंदी तब्बल ८ वर्षे
बादशहाच्या थोडीथोडकी नव्हे तर ३० हुन अधिक
मनसबदारांना भारी पडले.
पन्हाळा किल्ल्याच्या वेढ्याचा संदर्भ
बादशाहच्या दरबारातील बातमीपत्रात मिळतो. पण दुर्दैवाने
आपल्याकडे याचा काहीच उलेख नाही. म्हणुनच या पत्रात
मोघलांच्या पन्हाल्याच्या रंगवलेल्या बातम्या मिळतात
आणि मराठ्यांना त्यांनी कसे हरवले हे सापडते.
राजराजेंद्र सरदार कृष्णराव मालोजीराव शितोळे देशमुख
सरसेनापती दाभाडे
सरसेनापती दाभाडे :—
पुणें जिल्ह्यांत दाभाड्यांचें तळेगांव म्हणून एक गांव आहे; तेथें राजाराम छत्रपतींचे सेनापती खंडेराव दाभाडे यांचा वंश आहे. खंडेराव हे या गांवचे मूळचे पाटील होते.
त्रिंबकराव दाभाडे:— खंडेरावांची मुदत संपल्यावर पुढील वर्षाच्या मे महिन्यांत त्याचा मुलगा त्रिंबकराव यास शाहूमहाराजाकडून सेनापतीची वस्त्रें मिळाली. त्यानंतर थोड्याच दिवसांनी गुजराथच्या मोहिमेवर त्याची रवानगी झाली. इकडे बाजीराव पेशवे यांस शाहूने माळव्यांत मुलुखगिरीकरितां पाठविलें.
इ. स. १७२९ मध्यें सरबुलंदखानापासून मराठ्यांस गुजराथच्या चौथ व सरदेशमुखीच्या सनदा मिळाल्यावर त्या प्रांताचा मोकासा दाभाड्यास देण्यांत आला, व सरदेशमुखीचा कांही अंश गोळा करण्याचें कामहि त्याकडेच सोंपविलें. परंतु बाजीरावानें गुजराथच्या कारभारांत ढवळाढवळ करावी, ही गोष्ट दाभाड्यास मुळीच न रूचून या दोन मराठा सरदारांत कायमचें वैमनस्य आलें. पुढें दोघांनीहि ही गोष्ट शाहूच्या कानांवर घालून त्याची आज्ञा विचारली. शाहूनें आज्ञा केली की, बाजीरावास माळव्याची मोहीम सांगितल्यामुळें त्यावर त्यानेंच अंमल करावा, मात्र त्रिंबकराव यानें जिंकलेल्या गुजराथेंत ढवळाढवळ करूं नये. यामुळें बाजीराव निरूत्तर झाला. परंतु दाभाड्याच्या मनांत बाजीरावाविषयी मत्सर उत्पन्न झाला असल्यानें त्यानें सैन्याची जमवाजमव करून राज्याचें रक्षण करण्याकरितां आपण जातो असा उद्देश जाहीर करून तो दक्षिणेंत निघाला. कंठाजी व रघूजी कदम बांडे, उदाजी व आनंदराव पवार, चिमणाजी मोघें, वगैरे सरदार त्यास सामील झाले व दक्षिणेंत आल्यावर निजामहि त्यांस येऊन मिळणार होता. त्रिंबकरावानें निजामाशी सख्य केल्याचें बाजीरावानें शाहूस सिद्ध करून दाखविलें. तरीहि पेशव्यानें लढाईला प्रत्य़क्ष सुरूवात होईपर्यंत दाभाड्याशी तहाचें बोलणें सुरू ठेविलें होतें. बाजीरावाजवळ दाभाड्याच्या अर्धे देखील सैन्य जमलें नसतांहि मोठमोठ्या मजला करून त्यानें दाभाड्याच्या सैन्यास गुजराथेंतच डभई व बडोदें यांच्या दरम्यान गांठलें ( १ एप्रिल १७३१), पहिल्याच हल्ल्याबरोबर त्रिंबकरावाच्या सैन्यांतील नवशिक्या सैनिकांनी पळ काढला तरी, त्रिंबकराव मोठ्या शौर्यानें लढत होता. परंतु त्याला अकस्मात् एक गोळी लागून तो ठार झाला. तेव्हां त्याची सर्व फौज पळून गेली. दाभाड्याकडील मालोजी पवार, पिलाजी गायकवाडाचा एक पुत्र वगैरे मंडळी टार होऊन उदाजी पवार व चिमणाजी मोघे हे कैद झाले. आनंदराव पवार व पिलाजी गायकवाड हे जखमी झाले, परंतु ते पळून गेले. अशा रीतीनें बाजीरावाचा जय झाला.
त्रिंबकरावास यशवंतराव नांवाचा एक अल्पवयी मुलगा होता. वापाच्या मरणानंतर त्याला सेनापतीची वस्त्रें मिळाल्यावर त्याच्या पालकत्वाचें काम त्याची आई उमाबाई हिजकडे आले; व पिलाजी गायकवाड त्याच्या मुतालकीच्या जागी कायम झाल्यामुळें सेनापतीचें सर्व कामकाज पाहूं लागला. अत:पर पेशवे व दाभाडे यांच्यामध्यें भांडणास जागा राहूं नये म्हणून, शाहूनें गुजराथचा सर्व कारभार दाभाड्याकडे सोंपवून, त्यानें त्या प्रांताच्या वसुलाचा अर्धा हिस्सा पेशव्यांमार्फत सरकारतिजोरित भरणा करावा असें ठरविलें. इतर स्वायामध्यें मिळालेला पैसा मात्र खर्च वजा जातां राजाच्या स्वाधीन करण्यांत यावा असा करार होता ( १७३१). पण हा करार दाभाड्यांनी पुरापुरा कधीच पाळला नाही, असें असतांहि शाहूच्या पश्चात नानासाहेब पेशव्यानें अर्ध्या गुजराथच्य सनदा यशवंतरावाच्या नांवें करून दिल्या ( १७५०).
बाबूराव:— त्रिंबकरावाच्या मृत्यूनंतर सेनापतीची वस्त्रें शाहूनें यशवंतराव दाभाड्यास दिली. त्याचप्रमाणें यापुढें पेशवे आणि दाभाडे यांच्यामध्यें वितुष्ट राहूं नये म्हणून शाहूनें स्वत: दाभाड्यांच्या गांवी (तळेगांव) येऊन त्रिंबकराव, यशवंतराव व बाबूराव दाभाडे यांची मातोश्री उमाबाई दाभाडे हिची भेट घेतली; व शाहूनें तिची समजूत केली कीं, बाजीराव हा तुझाच पुत्र आहे असें समजून याला तू क्षमा कर आणि यापुढे तुझ्या पुत्रांनी व बाजीरावाने एक चित्ताने राहावे असे कर.
सातार्यास परत आल्यावर शाहूने यशवंतराव व बाबुराव दाभाडे व बाजीराव बल्लाळ यांस बोलून यांचेही सख्य करून दिले. यशवंतरावांच्या ठिकाणी बाबुरावांची दृढभक्ती असून शाहूने त्यांस देऊ केलेली सेनाखासखेलीची वस्त्रे त्याने प्रथम नाकारली. परंतु शाहूने अत्यंत आग्रहपूर्वक हि वस्त्रे त्यांसच देऊन शिवाय हत्ती, घोडा, शिरपेच, कंठी वैगरे देऊन त्यांचा मोठा गौरव केला. हा बाबुराव पुढे फार पराक्रमी निघाला व त्याने अनेक पराक्रमाची कृत्ये करून मोठा लौकिक संपादन केला. यशवंतराव हा दुर्व्यसनी व दुर्बळ होता. पुढे शाहूने बाबुरावास सुरतेच्या मोहिमेवर पाठविले; या प्रसंगी बाबुरावाने मोठ्या शिताफीने अगदी थोड्या सैनिकांनीशी सुरतेच्या नबाबास गाठून त्यास अटकेत ठेविले आणि त्याच्या पासून सुरतेच्या अठठावीस महालांपैकी चौदा महालांच्या व चौथाइच्या सनदा छत्रपतींच्या नावे करून घेतल्या. इतक्यात यशवंतरावही मोठे सैन्य घेऊन सुरतेस आला. हे पाहून नवाबाने तहनाम्यातील अटी ताबडतोब पुर्या करून दिल्या, व या उभयतां बंधुंस मौल्यवान पोशाख दिला.
यशवंतराव आणि बाबुराव यांनी परत निघतेवेळी, खुद्द सुरतेस आपला एक अंमलदार ठेऊन सुरत अठठाविषीपैकी मिळविलेल्या चौदा महालांचा व खानदेशात जो प्रांत त्यांच्या ताब्यात आला होता त्याचा नित रीतीने बंदोबस्त लावण्याची योजना केली. या सुरतेच्या पराक्रमाबद्दल शाहूने बाबुराव दाभाड्यास सोन्याचा तोडा आणि पाच लाख रुपयांची जहागीर वंशपरंपरेने करू दिली. काही महिन्यांनी गुजराथेत पुन्हा बंडाळी माजली. दाभाड्यांचे कोणी माणूस गुजराथेत नाही व सर्व अंमल मुख्यत्याराच्या मार्फत चालला आहे हि संधी पाहून जोरावरखां नबाबी नामक अमदाबादच्या मुसलमान ठाणेदाराने दाभाड्याची ठाणी हळू हळू उठविण्याची खटपट चालवली. हे समजताच यशवंतराव व बाबुराव यांस अमदाबादेच्या स्वारीवर पाठवले. या स्वारी बरोबर उमाबाई हीही होती. दाभाडे आपल्यावर येत आहेत हे पाहून जोरावरने जय्यत तयारी केली. त्याचे बहुतेक सैन्य कडव्या पठानाचे असून चांगले कवायती होते. लाधैस सुरवात होऊन दोन्हीकडील मिळून सुमारे १५०० लोक पडले. अखेर दाभाड्याचा जय होऊन जोरावरचा पूर्ण पराभव झाला. दाभाड्याच्या फौजेने अमदाबादेस आपली ठाणी बसवून सर्वत्र शांतता केली आणि गुजराथेचा सर्व बंदोबस्त आपला विश्वासू नोकर पिलाजी गायकवाड यास सांगून व खुद्द अमदाबादेस अप्पाजी गणेश यास ठेऊन ते परत आले. या पराक्रमाबद्दल खुश होऊन शाहूने सोन्याचे दोन तोडे करून उमाबाईंच्या पायात घातले व तेव्हापासून या घराण्यातील स्त्रियांस पायांत सोन्याचे तोडे घालण्याचा अधिकार परंपरेने करून दिला. हा अधिकार फक्त छत्रपतींच्या राणीचा असतो.
अहमदाबादेवरील स्वारी हे बाबुरावांच्या आयुष्यातील शेवटचेच कृत्य होय. यानंतर खानदेशातील सत्तेत काही बखेडा झाला म्हणून बाबुराव हा तिकडील बंदोबस्ताकरिता चालता झाला. एकदा त्याची स्वारी मौजे रामेश्वर देवळे येथे असता त्या मुक्कामी त्याच्यावर विषप्रयोग करण्यात येऊन त्याला ठार मारण्यात आले. बाबुरावांच्या मृत्यूनंतर दाभाडे घराण्यात नाव घेण्यासारखा कोणीही शूर पुरुष अगर मुत्सद्दी झाला नाही. यांचा वंशज सांप्रत तळेगाव येथे नांदत आहे. [दाभाडे घराण्याची हकीगत; शाहूची बखर; पेशव्याची बखर; राजवाडे खं.३.]
लगड सरदार
लगड सरदार:-
बऱ्याच
ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या कार्यात या स्वराज्याचा कळस गगनाला जाऊन
भिडला., हर एक मावळ्याने मोठ्या निष्ठेने हे स्वराज्य वाढीस लागण्यासाठी
कधी आपल्या घरादारावर तर कधी स्वतःच्या आयुष्यावरच तुळशीपत्रे ठेवली.
त्यातले काही मावळे आज मोठ्या आदरार्थी भावनेने आपल्या मनात राज्य गाजवतात
पण काही मावळ्यांना इतिहासाच्या पानाआडच रुतून पडावं लागले
अशाच एका
अतिपरिचित मावळ्याचा आज उल्लेख आढळला ते मावळे म्हणजे "सरदार संभाजीराव
लगड" वेगवेगळ्या गोष्टींसाठी ठरावीक माणसांचे मंडळ गट हेच शिवकालीन स्वच्छ
प्रशासनाचे द्योतक होय.
शिवकालीन प्रशासनामध्ये १२ महाल १८ कारखाने आणि
विविध विभाग होते. त्यातल्या दान किंवा सनद दानपत्र वाटपासंबंधातली कामे
ज्यांच्याकडे होती त्यास. गोसावी म्हटले जात.
महाराज वेगवेगळ्या
जातीधर्माच्या प्रार्थनास्थळासाठी स्वरज्याच्यापरीने दिवा बत्तीची,
पुजाऱ्याची सोय केली जात असे. महाराजांच्या या दानपत्राची किंवा सनद
वाटपाची कामे संभाजीराव लगड या सरदाराकडे होती.
अपरिचित_असे_काही
बाजी मोहिते पाटील तळबीड
बाजी मोहिते पाटील तळबीड :-
.
तळबीडचे मोहिते तस मातब्बर घराण मुळात तळबीडची कुसहि समर्थ शिलेदार जन्माला घालणारी कुस फत्ते पावन हेच ध्येय सहाजिकच माराठा लश्करात तळबीडकरानी भरल होत.....,
रतोजी मोहिते निजामशाहीतील असा बलदंड माणुस की ज्याच्यावर झेंडा फडकवायला सारया शाह्या तग धरुन होत्या मुर्तुजा निजामशाहिचा विरोधक त्याच्याच लोकांनी बंड केला रतोजी त्यांना आडवा आला आणि असा पराक्रम केला कि ते बंडखोर जीव वाचवुन पळाले..हा पराक्रम पाहुण निजाम खुश झाला आणि या मोहिते बहाद्दरास ''बाजी "हा किताब बहाल केला
रतोजीँचा मुलगा तुकोजी तेथील मुतालीक चव्हाण यांना अभय,देउन तळबीडकरांच्या इच्छेनुसार पाटिलकी मिळवली...त्यांना तीन आपत्य संभाजी धारोजी आणि तुकाबाई.
निजामशाही सोडुण नावारुपास आलेले शहाजीराजे यांच्यावर सरदार संबाजी अणंत याला धाडले गेले ..त्याने सालगण्या घाटात राजेँना कोंडले .त्या वक्ताला तिथे मोहिते बंधु मदतीला आले त्यांनी पराक्रम केला ..नंतर संभाजी -धारोजीच्या प्रस्तावावरुन तुकाबाईंना भोसले घराण्यात देण्यात आले इथुनच भोसले- मोहिते सोयरिक जमली
यावेळेपावतो तळबीडची पाटिलकी असलेले मोहिते -पाटिल संभाजी- धारोजीच्या पराक्रमामुळे प्रत्यक्ष शहाजीराजेंच्या मेहेनजरेमुळे आणि
मोहित्यांच रक्त शिलेदाराच म्हणूनतर अदिलशाहित धारोजीनी "शुर सेनानी " मानाच स्थान हासील केल....
चंद्र कलेकलेने वाढतो तसेच छत्रपतीँच्या समर्थान हिंदवी स्वराज्य उभे झाले प्रत्यक्ष शिवछत्रपतींच्या खांद्याला खांदा लावुन शिलेदारी करणारे "मोहिते "स्वराज्यात हिराप्रमाने चमकले .प्रत्यक्ष संभाजी मोहित्यांचे पुत्र हंसाजी मोहिते हे मराठी दौलतीचे जुमलेदार होते ते सरनोबत झाले व """"हंबीरराव हा किताब मिळवला ...
आणि मग काय दौलतीत सामिल झालेल्या गावात तळबीडचा दबदबा वाढला ..
तळबीडचे बाजी- मोहिते
रतोजी बाजीमोहिते
संभाजी बाजीमोहिते
धारोजी बाजीमोहिते
हंबीरराव बाजीमोहिते
तसेच महाराणी ताराराणी
तळबीडच्या मातीत सगळ्यांना हेवा वाटेल असा सेनानी जन्मला
...
Regards abhishek kumbhar
सरसेनापती हंबीरराव मोहीते -
● शिवशाहीच्या उदयापुर्वी अनेक कर्तबगार घराणी उदयास आली होती त्यामध्ये मोहिते, घाटगे, महाडिक, सुर्वे, जाधव, सावंत या विविध घराण्यांनी पराक्रमी पुरुषांनी मुस्लिम शाह्यामध्ये लष्करी सेवा करून नावलौकिक मिळवला होता.त्यांच्या भोसले घराण्याशी संबंध आला त्यावेळी नावलौकीकात आणखीनच भर पडली.काही घराण्यांनी छत्रपती घराण्यांशी नातेसंबंध निर्माण केला.त्यापैकी मोहिते घराणे जवळचे घराणे होते.या घराण्यात अनेक कर्तबगार पुरुष निर्माण झाले.याच घराण्यातील हंबीरराव मोहिते यांना शिवरायांनी अष्ठ्प्रधान मंडळामध्ये सरसेनापती म्हणुन स्थान दिले.खर्या अर्थाने हंबीरराव हे स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते.हंबीररावांच्या अगोदर शिवरायांचे पराक्रमी सेनापती प्रतापराव गुजर व नेताजी पालकर यांचे स्वराज्यस्थापनेत मोठे योगदान आहे.परंतू त्यांच्याबाबतीत शोकांतिका झाली आणि साहजिकच हंबीरराव सरसेनापती झाले.
सरसेनापती हंबीररावांच्या गराण्याचा इतिहास पाहिला तर तो गौरवशाली आहे.हंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता.त्यांना निजामशाहीने “बाजी” हा किताब दिला होता.हे घराणे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते.तुकोजी मोहिते हे पराक्रमी पुरुष तळबीड येथे आला व तेथील पाटीलकी सांभाळत सेवा करू लागला या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्याशी सोयरीक जुळवून आणली.याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध येवून शहाजीराजांच्या लष्कारात सामील झाले व मोठे शौर्य गाजवले.संभाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील प्रराक्रमी सेनानी होते.त्यांच्या शौर्याची गाथा अदिलशाही फ़र्मानामध्ये पहावयास मिळतात.यातील संभाजी मोहितेचा मुलगा म्हणजे हंबीरराव मोहिते हा मर्दमराठा शिवरायांच्या सानिध्यात आले.स्वराज्याच्
या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते.संभाजी मोहिते पुढे कर्नाटकला गेले मात्र आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह शिवरायांसोबत लावून दिला व छत्रपती घराण्यांशी पुन्हा नाते निर्माण केले.पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंबीरराव मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा शिवपुत्र राजाराम महाराजांशी विवाह लावून दिला.मोहिते घराणे हे छत्रपतीचे अगदी जवळचे घराणे आहे.याच घराण्यातील उदयास आलेला मर्द मराठा म्हणजेच हंबीरराव मोहिते. शिवरायांच्या राज्याभिषेकापुर्वी महापराक्रमी सेनापती प्रतापराव गुजर बहलोल खानाशी झालेल्या संघर्षात मारले गेले.त्यांच्या शोकांतिकेनंतर ते सेनापती पद रिकामे झाले व ते पद हंबीरराव मोहितेंना दिले आणि अष्टप्रधान मंडळातील सरसेनापती पद म्हणुन मान मिळाला.हंबीरराव हा प्रतापरावांच्या सैन्यात सेनानी होता.ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेंव्हा हंबीररावांनी अदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला.शत्रुला विजापुरपर्यंत पिटाळून लवण्यात हंबिररावांचे मोठे योगदान आहे.सरसेनापती हा केवळ पराक्रमीच असून चालत नाही.तर तो प्रसंगाचा जाणकार व ह्रुदयाठायी शहाणपण आणि सबुरी असावी लागते.हे सर्व गुण हंबीररावांकडे होते.छत्रपती शिवरायांनी त्याच्या पराक्रमाचा गौरव म्हणुनच अष्ठ्प्रधान मंडळात स्थान दिले.हंबीररावांचे मुळ नाव हंसाजी मोहिते होते.महाराजांनी हंसाजी चा “हंबीरराव” हा किताबाने सन्मान केला.सरनौबत दिली.राज्याभिषेकानंतर मोघली सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश शिवरायांनी हंबीररावांना दिला.
मराठी संस्कृतीचा गर्व बाळगणारा हरयाणा राज्यातील ‘रोड मराठा’ समाज!
मराठी संस्कृतीचा गर्व बाळगणारा हरयाणा राज्यातील ‘रोड मराठा’ समाज!
१७६१ च्या पानिपत युद्धामधील पराभव हा वैभवशाली मराठी इतिहासाला लागलेला सर्वात मोठा काळा डाग ठरला. या युद्धापासून मराठा इतिहासाला उतरती कळा लागली ती कायमचीच ! रोहिले आणि अफगाणांविरोधात सदाशिवराव भाऊंबरोबर नेटाने लढलेले कित्येक मराठा शूरवीर आणि सैनिक या युद्धात धारातीर्थी पडले, तर मोजता येणार नाही इतके जण जायबंदी झाले. युद्धात सहभागी झालेली अनेक मराठा कुटुंबे लाजिरवाण्या पराभवानंतर आपल्या मायभूमीत परत गेली, तर जवळपास २९८ कुटुंबे तो पराभव सहन करत पानिपता मध्येचं राहिली. त्यांनी तेथेच आपले जीवन नव्याने सुरु केले.
आज युद्धाच्या २५४ वर्षांनतर त्यांची लोकसंख्या दहा लाखांच्यावर आहे. मुळचा मराठी मातीतला पण सध्या पानिपतामध्ये स्थायिक असलेला आणि ‘रोड मराठा’ या नावाने प्रसिद्ध असलेला आपला बांधव आज परमुलुखात मान उंचावून जगतो आहे यापेक्षा कौतुकास्पद गोष्ट दुसरी नाही.घोर पराभवाच्या जखमा मनावर आणि शरीरावर घेऊन त्या २९८ कुटुंबांनी काळानुसार पानीपताची भूमी स्वत:ची मानली आणि तेथील संस्कृतीचा प्रत्येक घटक अंगी बाणून घेतला. पानिपत, सोनपत, कर्नाल, कुरुक्षेत्र या भागातील जवळपास २०० गावांमध्ये हा रोड मराठा समाज विखुरलेला आहे. त्यांनी केवळ आपल्या देहबोली आणि पेहरावातचं बदल केला नाही तर आपल्या नावांमध्ये देखील बदल करून घेतले. पवारांचे पानवर झाले, महालेचे महल्ले आणि महालान झाले, जोगदंडाचे जागलन झाले.
आज पानिपतामध्ये गेल्यावर रोड मराठा समाज हा एका नजरेत ओळखता येत नाही. बहुतेक जण तर अस्सल जाट असावे असे दिसतात. परंतु बाहेरील रूपातील हा लक्षणीय बदल त्यांच्या अंतरंगातील मराठी संस्कृतीचा जाज्वल्य अभिमान मात्र बदलू शकला नाही. अनेकजण स्वत:चा उल्लेख आवर्जून ‘मराठा चौधरी’ असा करतात आणि हा रोड मराठा समाज गर्वाने सांगतो की, आम्ही शूर मराठा सैनिकांचे वंशज आहोत.
पानिपतामध्ये फिरताना मराठी नावांच्या दुकानाच्या पाट्या हमखास पाहायला मिळतात. आपली मराठा संस्कृती जपण्यासाठी एका मुलीचा रोड मराठा बाप आपली मुलगी फक्त रोड मराठा समाजाच्या मुला घरीच देतो. हेच कारण आहे की रोड मराठा समाज आजही आपले अस्तित्व टिकवून आहे.
गंमत अशी की महाराष्ट्रातील मराठ्यांना पानिपतच्या शौर्याचा विसर पडला आहे, पण या रोड मराठ्यांना अजूनही तो इतिहास सर्व तोंडपाठ आहे. त्यांच्या मते,
युद्धातील पराभव हा कोणाच्याही हाती नसतो. पेशव्यांनी आणि मराठ्यांनी अखंड भारत जिंकण्याची जी महत्त्वकांक्षा बाळगली तिचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाला असायलाच हवा. कारण मराठे युद्धातून पळून गेले नाहीत, त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला. म्हणजे त्यांच्या पराक्रमापेक्षा त्यांचे शौर्य कित्येक पटीने जास्त आहे.
हा रोड मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानतो. येथे काही तरुणांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी सेवा संस्था स्थापन केली आहे. या संस्थेमार्फत अहमद शाह अब्दाली व रोहील्यांशी लढताना मराठ्यांना आलेल्या वीरमरणाच्या शौर्यगाथेचा प्रसार केला जातो. ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रावर महाभारत घडले म्हणून सरकारने मोठे स्मारक उभारून त्या जागेला वॉर मेमोरीयलचा दर्जा दिला. त्याचप्रकारे पानिपतामध्ये देखील शूर मराठ्यांचे स्मारक उभारून त्या जागेला देखील वॉर मेमोरीयलचा दर्जा द्यावा अशी रोड मराठा समाजाची तीव्र इच्छा आहे आणि यासाठी हरयाणा आणि महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा अशी त्यांची मागणी आहे.
परमुलुखामधून आलेले म्हणून रोड मराठा समाजाला हरियाणामध्ये कोणीही बोल लावत नाही. हरयाणाच्या राजकारणात देखील रोड मराठा समजाचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. काही मतदारसंघ असे आहेत जेथे वर्षानुवर्षे केवळ रोड मराठा समाजाचा प्रतिनिधीचं निवडून येतो. हरयाणातील प्रत्येक स्तरावर त्यांनी आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे.
कधी पानिपताला भेट दिलीत तर आपल्या या बांधवांची भेट घ्यायला बिलकुल विसरू नका.
—शिवांजली नाईक निंबाळकर,पुणे
नावजी लखमाजी बलकवडे (इनामदार) :
नावजी लखमाजी बलकवडे (इनामदार) :-
प्रती तानाजी–पदाती सप्तसहस्त्री नावजी लखमाजी बलकवडे
उत्तर शिवकालात सिंहगड, राजगड, पुरंदर रायगड यासारखे बुलंद किल्ले मोगलांच्या ताब्यात गेल्याने मराठ्यांना देशावर प्रभावी हालचाली करणे अवघड जात होते. त्याच बरोबर कोकणात देखील प्रतिकारात अडथळे निर्माण होऊ लागले होते. अशा बिकट परिस्थितिवर मात करण्यासाठी, हे बलदंड किल्ले परत जिंकणे आवश्यक होते.
या सर्व गोष्टींचा विचार करुन इ.स.१६९३ मध्ये शंकराजी नारायण सचिव यांनी धाडसी लोकांच्या सहाय्याने किल्ले जिंकण्याचे विचार सुरु केला. या काळात अनेक शुरवीरांचा उदय झाला, त्यापैकीच एक नाव सरदार नावजी लखमाजी बलकवडे, नावजी हे सचिवांच्या पायदळात पदाती सप्तसहस्त्री होते. त्यांनी सिंहगड जिंकुन देण्याचे कबुल केले. त्या बदल्यात शंकराजी पंतानी त्यांना पवन मावळातील सावरगाव इनाम द्यायचे असे ठरले.
शंकराजी पंताना सिंहगडाच्या भौगोलिक परिस्थितिचा चांगला अंदाज होत. हे काम नावजीसारख्या एकट्या दुकट्याचे नाही हे त्यांनी जाणले होते. त्यामुळे नावजी बरोबर सरदार विठोजी कारके याना मदतनीस म्हणुन दिले. त्यानुसार प्रथम विठोजींनी एकट्याने आणि नंतर विठोजी आणि नावजी दोघांनी मिळून सिंहगडाच्या घेराची तपासणी केली. त्यांना असे आढळले की सिंहगड आधीच कठीण, त्यात मोगलांनी सावध होउन काही ठिकाणी किल्ल्याची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती करुन तेथे चौक्या, पहारे आणि रात्रीच्या गस्ती वाढवलेल्या होत्या. शिवाय जास्तीचे सैन्य देखिल या काळात किल्ल्यावर तैनात होते. दगा फटका करुन किल्ला घेण्याची सोय राहिली नव्हती. त्यामुळे सुभेदार मालुसरेनां जेवढ्या अडचणी आल्या तेवढ्याच आता पण असणार याचे जाण पंतसचीव, नावजी आणि विठोजी यांना होती.
दि. २५ जून १६९३ रोजी नावजी बलकवडे आणि विठोजी कारके यांनी निवडक माणसे घेतली आणि ते राजमाचीवरुन निघाले. पावसाळ्याचे दिवस त्यात अंधार अशा स्थितीत मराठे रान तुडवत सिंहगड नजीकच्या जंगलात येउन पोहोचले आणि योग्य संधीची वाट पाहत ५ दिवस दबा धरुन बसले.
दि. ३० जूनच्या मध्यरात्री नावजी बलकवडे शिड्या व दोर बरोबर घेउन सिंहगड चढू लागले. अवघड मार्गांनी खाचा-खळग्यातुन ते तटबंदीच्या खाली आले. परंतु किल्ल्यावर मोगलांची गस्त सुरु होती आणि पहारेकरी सावध होते त्यामुळे मराठ्यांना तटाला शिड्या लावता आल्या नाहीत. सुर्योदय झाला तेव्हा किल्ल्यावरच्या गस्तवाल्यांची वेळ संपून नवे लोक गस्तीसाठी येत होते. पावसाळ्यातल्या धुक्यामुळे लांब वरुन काय चालले आहे ते दिसत नव्हते. या लवचिक संधीचा फायदा घेउन नावजींनी शिड्या तटाला लावल्या आणि ते मावळ्यांसह सिंहगडवर आले. मराठे सैनिकांनी पहारेकरी गुपचुप कापुन काढले. अकस्मात हल्ला झाल्याने मोगलांची फार हानी झाली होती. मराठे किल्ल्यावर आले आहेत अशी चाहुल जर किल्लेदाराला लागली असती तर तो सावध झाला असता आणि मोगल सैन्याने एकवटुन नावजींच्या सैन्यावर हल्ला चढवला असता. पण नावजींनी त्यांचे काम चोख बजावले होते.
नावजींचे धैर्य बघुन विठोजी कारकेंना हुरुप आला. ते यावेळी तटाखाली योग्य संधीची वाट बघत थांबले होते. ते ही शिड्या लाऊन वर आले, आता मराठ्यांचे सर्व सैन्य गडावर पोहोचले होते. हर हर महादेवच्या गजरात सिंहगडाने परत एकदा स्वराज्याचा उंबरा ओलांडला. कुवारीगड – रायजी बाहुलकर फितुरास शिक्षा (डिसेंबर १६९५)
कुवारीगडाच्या पराभवाच्या बातमी सचिवांच्या कानावर येऊन पोहोचली. त्यावेळी ते राजगडावर होते. मोगलांनी किल्ला भेद करून घेतल्याच्या बातमीने ते दु:खी झाले पण खचले नाहीत, त्यांनी कुवारीगड परत जिंकून घेण्याचा निश्चय केला. त्यांनी ही कामगिरी नावजी बलकवडे या शूर मर्दमराठ्यावर सोपवली. सुमारे दोन वर्षांपूर्वीच त्याने सिंहगड मोठ्या हिंमतीने जिंकून घेतला होता आणि आता ते पौड मावळातच सचिवांच्या आज्ञोवरून धामधूम करत होते. नावजींनी किल्ल्याच्या घेऱ्यात आपली माणसं पसरवून किल्ल्याचा राबता तोडला. नंतर किल्ल्याच्या दिशेने येणारी रसद मारण्याचा जोरदार उद्योग सुरू केले. अशाच एका उद्योगात नावजी आणि बाळोजी नाईक ढमाले यांनी जुन्नरवरून किल्ल्याकडे रसद घेऊन येणाऱ्या सैन्यावर छापा घातला, जुन्नरचा फौजदार मन्सूर खानाच्या सैन्यात घोडदळ होते आणि जड तोफाही होत्या. पण नावजीने गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचा असा काही वापर केला की मोगल सैन्याची पार दाणादाण उडाली आणि पाहता पाहता खानाचे सैन्य विखुरलं गेलं. मराठ्यांनी मोगलांचे शेकडो घोडे ताब्यात घेऊन रसद मारली, मराठ्यांचा मोठा विजय झाला. पण आपल्या प्राणाची पर्वा न करता शौर्याने लढणारा बाळोजी नाईक ढमाले या लढाईत धारातीर्थी पडले. मोगल किल्लेदाराची चिंता दिवसेंदिवस वाढतच होती, कुवारीगड त्यांनी भेद करून जिंकला खरा पण तो त्यांना किती काळ टिकवता येईल याबद्दल शंकाच होती. पौड मावळातल्या मराठ्यांच्या वाढत्या लष्करी कारवाया, मराठ्यांनी कुवारीगडाची केलेली नाकेबंदी शिवाय किल्ल्याला बाहेरून मदतही येण्याची आशा नव्हती. इकडे नावजी एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन किल्ल्यावर हल्ले करत होते. मोगलही प्रत्युत्तर देत होते पण हल्ल्यागणिक मोगलांचं सैन्यबळ कमी होऊ लागलं तेव्हा मात्र मोगल किल्लेदाराला आपलं भवितव्य स्पष्ट दिसू लागलं. इतक्यात राजगडावरून सचिवांनी पंताजी शिवदेव, चापाजी कदम भोरपकर आणि दमाजी नारायण यांच्या हाताखाली मोठे सैन्य देऊन नावाजींच्या मदतीला पाठवून दिलं. किल्लेदार एक एक दिवस मोठ्या कष्टाने काढत होता किल्ल्यावरून त्याने मराठ्यांच्या मदतीला आलेली फौज पाहिली आणि त्याचं अवसानच गळालं. शत्रूशी लढत लढत मरणं किंवा सरळ त्याला शरण जाणं हेच दोन पर्याय आता शिल्लक होते. त्याने दुसरा पर्याय निवडला आणि नावजींशी बोलणी लावून कुवारीगड सोडला, मराठ्यांचं सैन्य भगवा झेंडा घेऊन किल्ला चढू लागले, नावजी बलकवडे किल्ल्यावर आले, त्यांनी त्र्यंबक शिवदेव आणि मोरो नारायण यांना कैदेतून सोडवले. त्यांच्या कुटुंबियांचीही सुटका केली आणि सदरेवर जाऊन भगवा झेंडा मोठ्या अभिमानाने फडकवला.
कुवारीगडासारखा महत्वाचा किल्ला ज्या फितुरांमुळे मोगलांच्या ताब्यात गेला होता, त्या रायजी बाहुलकरला नावजींच्या सैनिकांनी पकडून सचिवांसमोर हजर केलं. त्यांनी रायजीला चाबकाच्या फटक्यांची शिक्षा सुनावली, अखेर चाबकाचा मार सहन न झाल्यामुळे रायाजी बेशुद्ध पडला. नंतर त्याची रवानगी राजगडाच्या बालेकिल्ल्यावरील कैदेत करण्यात आली. नावजींच्या पराक्रमावर सचिव बेहद्द खुश झाले आणि त्याला मुलखेड हे गाव इनाम करून दिलं. अशा प्रकारे १६९५ च्या डिसेंबर महिन्यात आंबाघाटाचा संरक्षक कुवारीगड पुन्हा एकदा स्वराज्यात दाखल झाला तो कायमचा.
शूर शिलेदार कृष्णाजी कंक
शूर शिलेदार कृष्णाजी कंक :-
★पोर्तुगीजांना मराठी पाणी पाजणारे कृष्णाजी कंक★
छत्रपती संभाजी महाराजांचा गोव्याच्या पोर्तुगीजांशी तह पूर्ण झाला आणि त्याच दरम्यान औरंगजेबाने आपला दूत त्यांच्याकडे रवाना केला. औरंगजेबाने गोवेकरांना मराठ्यांच्या किनारपट्टीवर हल्ले करण्याची सुचना केली. गोव्याच्या फिरंग्याना सुद्धा दक्षिण कोकण हवेच होते, त्यात त्यांना कुडाळच्या सावंताची आणि वाडी वेंगुर्ल्याच्या देसायांची फूस होतीच, म्हणुनच संभाजी महाराजांशी झालेला तह मोडून फिरंग्यांनी औरंगजेबाला मदत करण्याचे ठरविले.
फोंडा किल्ला लढ़विण्याची जबाबदारी येसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक यांच्यावर होती. किल्ल्यात जेमतेम ६०० मराठ्यांची शिबंदी होती तर २०० जण किल्ल्याबाहेरच्या झाडीत लपून बसले होते.
१ नोव्हेंबर १६८३ रोजी विरजई आल्वोरने फोंड्याला मोर्चे बांधले, ३ तोफा रात्रंदिवस किल्ल्यावर आग ओकू लागल्या. दुसऱ्या बाजूने डोम रोड्रीगो द कोस्त हा हल्ला चढवत होता, दोन्ही बाजूंनी होणाऱ्या हल्ल्यांना निधड्या छातीने तोंड देत उभा अभेद्य तटबंदीचा किल्ले फोंडा एकही चिरा ढळत नसल्याचे पाहून विजरेईने तोफा किल्ल्याजवळ रस्त्यावर आणून मारा सुरु केला. आणि अखेर किल्ल्याची चिरेबंदी तटबंदी ढासळली; पण पाऊसाच्या जोरामुळे त्यांना पुढे सरकता येत नव्हते, त्यात किल्ल्यातील मराठे सुद्धा तडफेने प्रतिकार करीत होते.
एके दिवशी पोर्तुगीज सैनिक किल्ला चडून वर आले आणि तोफांच्या सरबत्तीमुळे पडलेल्या भगदाडातुन आत घुसण्याचा प्रयत्न करू लागले. त्याच वेळी येसाजी, कृष्णाजी कंकांनी असे काही रणकंदन माजविले की आत घुसलेले फिरंगी तर मेलेच पण तटाला झोंबलेले फिरंगी सुद्धा माघार घेऊ लागले. एकास चार असे शत्रु मराठे अंगावर घेऊ लागले. कृष्णाजी कंकांनी तर असे काही शौर्य दाखविले की शत्रु सैनिक आवाक झाले. किल्ल्यावरील मराठे पडत होते आणि पोर्तुगीज किल्ला घेणार इतक्यात १००० घोड़दळ आणि तितकेच पायदळ घेउन संभाजी महाराज फोंड्याच्या मदतीस आले. महाराजांना बघून किल्ल्यातील मराठ्यांना सुद्धा चेव आला. आता मात्र गोवेकरांची अवस्था बिकट झाली आणि त्यांनी पळ काढण्यास सुरुवात केली.
संभाजी महाराजांनी अंदाज बांधला तसेच झाले होते, विरजईने माघारीचा हुकुम देताच त्याचे सैनीक आल्या वाटेने परतीसाठी सैरभैर पळु लागले. दुर्भाटजवळ मावळी घोडेस्वारांनी माघार घेउन दौडत्या शत्रूस गाठले. मोर्चे धरलेल्या बंदुका कडकडल्या तशी मावळी घोडी बिचकुन मूस्काटे फिरवू लागली. ते पाहुन येसाजी पुत्र कृष्णाजी चालून गेले, शत्रूचे मोर्चे पार विस्कळीत झाले; घुसलेल्या काही मावळी भाल्यांच्या मा-यातुन खुद्द विरजई नशिबाने सलामत निसटला होता. कित्येकजण नदितुन पोहत होते, कित्येकजण गळाभर पाण्यात जिव मुठीत धरुन उभे होते. भेदरलेल्या विरजईने त्या लोकांची दुर्दशा डोळ्यांनी पाहीली होती.
अंगभर रक्ताने न्हालेला, मोर्चामागुन मोर्चे फोडत चाललेला, अंगी गोळयाच गोळ्या झेलून फुलल्या पळसवृक्षासारखा रक्तबंबाळ दिसणारा, घामेजलेला कृष्णाजी कंक छाताडावर वर्मी गोळी लागताच ग्लानी येवुन घोड्यावरुन कोसळले.
पिता येसाजी कंक ही जायबंदी झाले होते त्या ठिकाणी कृष्णाजी कंकांना कांबळ्यावर आणुन ठेवले.
आता दोन्हीकडचा मार सुमार झाला होता. कित्येक मावळे कामी आले होते. सांजावत आल्याने हत्यारेही थांबली होती.
संभाजी महाराज घोंगडिवर झोपविलेल्या येसाजीजवळ आले. त्यांना बघुन क्षीण आवाजात म्हातारबा येसाजी म्हणाले,
“सुक्षेम हाईसा न्हवं?”
काय बोलावे तेच राजांना सुचेना. ते कृष्णाजींच्या घोंगडिजवळ आले. ती घोंगडीच रक्ताने चिंब झाली होती कृष्णाजी ग्लानीने भरलेले डोळे किलकिले केले. आईच्या मायेने हात फिरवित महाराज म्हणाले,
ऐसा कैसा रे फुटोन गेलास तु कृष्णा !
संभाजी महाराजांनी पिता पुत्रांना कराडला त्यांच्या गावी पोहचवण्याची आज्ञा केली.
या युद्धात येसाजी कंक कायमचे जायबंदी झाले होते तर कृष्णाजी कंक यांना वीर मरण आले.
संदर्भ:
पोर्तुगीज पत्र, रियासतकार आणि डॉ. पिर्सुलेकर लेख
|| शोर्यगाथा शिंदे सरकारांची||
#राजराजेंद्र_शितोळे_देशमुख_घराणे
# नरवीर_पिलाजी_गोळे
सरदार पाटणकर घराणे
बाजीरावपुत्र समशेर बहाद्दर
बाजीरावपुत्र समशेर बहाद्दर
'श्री बल्लाल चेरणी तत्पर | समशेर बहाद्दर निरंतर'
इ.स.1734 मधे बाजीराव-मस्तानी यांच्या पोटी समशेर चा जन्म झाला.जन्म झाल्याच्या काही काळानंतर बाजीरावांचा मृत्यु झाला आणि त्यामुळे मस्तानी ने आत्महत्या केली.लहान वयातच अजानतेपनी पोरकेपन आले.परंतु बाजीरावांच्या नंतर गादीवर आलेले नानासाहेब पेशवे यांनी समशेर ला संभाळले.त्याचे शिक्षण,लग्ने करुण दिले.समशेर वयात येताच एक ख़ासा सरदार आणि पेशवे घरन्याचा आप्त म्हणून ओळखला जाऊ लागला.त्याने अनेक मोहिमा मधे आपला सहभाग नोंदवलाच पण पराक्रमाची चुनुक दाखवली.मराठे आणि निजाम यांच्यात झालेल्या भालकी येथील लढाइमधे त्याने पराक्रम गाजवला.
नानासाहेब यांनी इंग्रजांशी संगनमत करुण तुळाजी आंग्रे यांच्या विरोधात मोहीम उघडली.याचे नेतृत्व खुद्द समशेर ने केले.पावसाळ्यात तब्बल 2 महीने वेढा देऊन त्याने रत्नागिरी चा किल्ला जिंकून घेतला आणि आंग्रेनचा पराभव केला.तसेच ग्वाल्हेर,कुम्भेरि या मोहिमे मधेसुद्धा त्याची उपस्थिती वर्णनीय होती.
त्याने स्वतः बुंदेलखंड येथे स्वतंत्र मोहीम काढली आणि पाउन कोटींचा मुलुख मराठा साम्राज्याला जोडला.
मारवाडचा राजा बिजेसिंग याने धोक्याने राणोजीपुत्र जयप्पा शिंदे यांचा खून केला.तेव्हा समशेर शिन्द्यांच्या मदतीला गेला.समशेर आणि शिंदे यांनी मिळून मारवाड,जयपुर चा सारा प्रदेश उध्वस्त केला आणि बिजेसिंग ला शरण आणले.
जेव्हा दिल्ली वर अहमदशाह अब्दालीचे आक्रमण झाले,तेव्हा मराठे उत्तरेत दिल्लीच्या संरक्षणासाठी गेले.परंतु,पानिपत येथे झालेल्या युद्धात अहमदशाह अब्दाली विजयी ठरला.पेशव्यांच्या हुजूरातीच्या फौजेमधे समावेश असणार्या समशेर बहाद्दर या पराभव आणि सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव यांच्या मृत्यूनंतर सूरजमल जाट कडे गेला.परंतु,आंगावर असणार्या प्रानांकित जखमांमुळे काही दिवसातच त्याचा भरतपुर येथे मृत्यु झाला.
रूपवान,पराक्रमी अशा समशेर बहाद्दर चे लग्न मेहराम बाई सोबत झाले होते.आणि बांदा चे ' पाहिले नवाब' होण्याचाही मान मिळवला होता..आपल्या पराक्रमाने....
अशा 'समशेर बहाद्दर' योद्धयाविषयी आपल्याला विसर पडने,ही दुर्दैवाची गोष्ट आहे
कराडचे सरदार डुबल घराणे
कराडचे सरदार डुबल घराणे
स्वराज्य रक्षणासाठी दक्षिण महाराष्ट्रातील ज्या सरदार घराण्यांनी मोलाचे योगदान दिले, त्यामध्ये कराडच्या साळोखे-डुबल घराण्याचा अग्रकमाने आहे. सातारा आणि सांगली जिल्हय़ात वास्तव्यास असणाऱया या घराण्याचा सुमारे 400 वर्षांहून अधिक कालखंडाचा इतिहास येत्या जून महिन्यात प्रसिध्द होत आहे. गेली सहा वर्षे संशोधन व अभ्यास करून दुर्मीळ ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे लिहिलेला हा इतिहास डुबल घराण्याचा दस्तावेज ठरणार असून नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणारा आहे.स्वराज्याच्या उदयकाली महाराष्ट्रात अनेक लढवय्यी घराणी निर्माण झाली. त्यांनी आपल्या पराक्रमाने आणि कर्तृत्त्वाने मराठेशाहीत आगळा ठसा उमटवला. या घराण्यांमध्ये कराडच्या साळोखे-डुबल घराण्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. साताराच्या छत्रपती शाहू महाराजांचे आप्त असणाऱया या घराण्यातील व्यक्तींनी प्रसंगीप्राणांची आहूती देऊन स्वराज्यरक्षण केले आहे. या घराण्याच्या शाखा कराड, धुळगाव, बांबवडे, चरेगाव, नरवाड येथे आहेत. या घराण्याला 400 वर्षांहून अधिक काळचा इतिहास आहे.साळोखे-डुबल घराणे हे गुजरातच्या चालुक्यांचेवंशज आहेत. शिवपूर्वकालात हे घराणे महाराष्ट्रात आले असावे. हे घराणे पहिल्यांचा कराड येथे स्थायिक झाले. त्यानंतर या घराण्यातीलव्यक्
तींनी आपल्या कर्तृत्त्वाने विविध अधिकारपदे मिळवली. कराड पेठेचे महाजनपद, कराड प्रांताचे देशचौगुले वतन, मिरजेच्या भुईकोट किल्ल्याचे किल्लेदारपद, सांगली संस्थानचे सरंजामदार अशा अनेक पदावर डुबल घराण्यातील व्यक्ती कार्यरत होत्या. आजही हे घराणे राजकारण, समाजकारणात कार्यरत आहे. या घराण्याचा साधार इतिहास मिरज इतिहास संशोधन मंडळाचे मानसिंगराव कुमठेकर आणि कराडचे नानासाहेब राजेसाहेब डुबल यांनी लिहला आहे.मिरजचे इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांनी मिरजेचा इतिहास 2010 साली लिहला. या लेखनात डुबल घराण्याचा उल्लेख होता. मिरजेचे किल्लेदार असणाऱया डुबल घराण्याचा उल्लेख यात होता. त्यावेळी डुबल घराण्याच्या इतिहासाचा शोध घेण्याचा प्रयत्न नानासाहेब डुबल यांनी मानसिंगराव कुमठेकर यांच्या मदतीने केला. डुबल घराण्याच्या शाखा असणाऱया गावांना भेटी दिल्या. कराडमध्ये डुबल घराण्याची वंशावळ उपलब्ध झाली. तर धुळगाव येथे जुनी कागदपत्रे, फोटो मिळाले. त्यानंतर पुणे पुराभिलेख कार्यालयातील कागदपत्रांचे संशोधन करण्यात आले. विशेष म्हणजे हा ग्रंथ लिहताना त्यातील प्रत्येक वाक्य साधार देण्यात आले आहे. या पुस्तकात पुर्वपीठिका, डुबल घराण्यातील पराक्रमी पुरूष, त्यांचे मानपान, लष्करी परंपरा, स्त्रियांची कामगिरी, प्रशासकीय काम, छायाचित्रे, ऐतिहासिक कागदपत्र यावर भर देण्यात आला आहे. इतिहासविषयक लिखाण कुमठेकर यांनी केले असून उर्वरित लिखाण नानासाहेब डुबल यांनी केलेले आहे.ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे लिहलेल्या या ग्रंथात कराडच्या इतिहासावर प्रकाश पडणार आहे. त्याचबरोबर डुबल घराण्याच्या शाखा असणाऱया सातारा व सांगली जिल्हय़ातील 400 वर्षांच्या इतिहासावरही प्रकाश पडणार आहे.कराड पेठेचे महाजनपद आणि देशचौगुले वतनकराड हे प्राचीन काळापासून व्यापारासाठी प्रसिध्द होते. सातवाहनकालापासून येथे मोठा व्यापार होता. त्यामुळे कराडची पेठ त्याकाळात संपूर्ण देशभरात प्रसिध्द होती. या प्रसिध्द पेठेचे महाजनपद डुबल घराण्याकडे होते. सन 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीतझालेल्या पालीच्या महजर (निवाडा) मध्ये साक्षीदारांच्या यादीत शिवाजी बिन बाळोजी डुबल यांचे नाव आढळते. त्यामुळे शिवपूर्वकालापासून कराडचे महाजनपद या घराण्याकडे होते, असे अनुमान बांधता येते. बाळोजी साळोखे हे या घराण्याचे मुळपुरूष होत. महाजनपदाबरोबरच कराड प्रांतातील देशचौगुलेपणाचे वतनही या घराण्याकडे होते. सध्याच्या कराड, पाटण आणि सांगली जिल्हय़ातील काही गावे या देशचौगुले वतनासाठी डुबल घराण्याकडे असल्याचे आढळते.छत्रपती शाहूंचे आप्तबाळोजी डुबल (दुसरे) यांच्या पत्नी राणूबाई आणि साताराचे छ. शाहूंच्या पत्नी सकवारबाई या बहिणी होत. या आप्तसंबंधामुळे बाळोजींचा सातारच्या दरबारात प्रवेश झाला. तेथे त्यांनी आपल्या पराक्रमाने आणि कामाने छ. शाहूंचा विश्वास संपादन केला. सेना पंचसहस्त्री हा किताब मिळवला. तत्कालीन अनेक लढय़ात बाळोजींनी सहभाग घेतला.मिरजेचे किल्लेदारपदछ. शाहूंनी 1739 साली मिरजेच्या किल्ल्यावर स्वारी करून हा किल्ला मोगलांच्या ताब्यातून जिंकून घेतला. यानंतर त्यांनी हा किल्ला आणि मिरज प्रांताचा कारभार बाळोजींकडे सोपवला. सन 1745 पर्यंत बाळोजींनी मिरज प्रांतांचा कारभार नेटाने केला. बंडखोर सरदार उदाजी चव्हाण याच्या स्वाऱया परतवून लावल्या. मिरज प्रांताची घडी नीटबसवली. मिरज किल्ला ताब्यात घेण्यापूर्वी बाळोजींना छ. शाहूंकडून तासगांव गाव मोकासा इनाममिळाले होते. तर, मिरज तालुक्यातील गुंडेवाडी हे गावही पूर्ण इनाम मिळाले. बाळोजींनी आपले कुलदैवत असणाऱया म्हसवड येथील सिध्दनाथ मंदिराचा जीर्णोध्दार केला. बाळोजींचे बंधू शिदोजी हे उंबरच्या स्वारीत धारातीर्थी पडले. त्यांच्या या कामगिरीचे स्मरण म्हणून छ. शाहूंनीबाळोजींन
ा चरेगाव इनाम दिले.सरदार शिवाजी साळोखेबाळोजींचा मृत्यू 1745-46 च्या सुमारास झाला. त्यानंतर त्यांचे सुपूत्र शिवाजी साळोखे (दुसरे) हे काम पाहू लागले. शिवाजी साळोखेही आपल्या पित्याप्रमाणे पराक्रमी होते. त्यांनी उदाजी चव्हाणासह, अन्य सरदारांचे हल्ले परतवून लावले. मिरज प्रांत आणि किल्ल्याचे संरक्षण केले. 1755 पर्यंत मिरजेचा किल्ला आणि प्रांत शिवाजी साळोखेंच्या ताब्यात होता. त्यानंतर पेशव्यांनी मिरज किल्ला माधवराव पेशव्यांचे सासरे शिवाजी बल्लाळ जोशी यांच्या ताब्यात दिला.शिवाजी साळोखे-डुबल यांनी त्यानंतर कर्नाटक प्रांतातील हैदरवरील स्वाऱयांत सहभाग घेतला. या स्वारीत असतानाच तुंगभद्रेनजीक त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे सुपूत्र नाथाजीराव हेही पराक्रमी होते. त्यांनी कर्नाटकातील मोहिमांमध्ये सहभाग घेतला.सरदार अग्नोजी साळोखेशिवाजी साळोखेंचे धाकटे बंधू अग्नोजी साळोखे हेही पित्याप्रमाणे शूर होते. त्यांना धुळगाव येथे सरंजाम नेमून देण्यात आला होता. अग्नोजी साळोखेंना धुळगांवजवळील काही गावे मोकासा दिली होती. सोनीचे ठाणे काही काळ अग्नोजींकडे होते. उदाजी चव्हाणावरील लढायात अग्नोजी अग्रभागी होते. अग्नोजींचे वंशज सध्या धुळगाव येथे वास्तव्यास आहेत. अग्नोजींना माधवराव पेशव्यांचे सासरे शिवाजी बल्लाळ जोशी यांनी दंडोबाच्या पायथ्याशी कपटाने मारले. त्यानंतर त्यांच्या पत्नी ताराबाई सती गेल्या. त्यांची समाधी मिरजेत आहे.चारशे वर्षांची लष्करी परंपरासाळोखे-डुबल घराण्याला चारशे वर्षांहून अधिक काळाची लष्करी परंपरा आहे. बाळोजी, शिदोजी, शिवाजी, अग्नोजी, नाथाजी, आनंदराव, हणमंतराव, अमृतराव या व्यक्तींनी मराठेशाहीत पराक्रम गाजवला. साळोखे-डुबल घराण्याची पराक्रमाची ही परंपरा मराठेशाहीच्या अस्तानंतर आजतागायत टिकून आहे. पहिल्या महायुध्दात धुळगांवच्या रामचंद्रराव बळवंतराव आणि ज्ञानोबा बळवंतराव यांनी मोठा पराक्रम गाजवला. रामचंद्र यांनी पहिल्या महायुध्दात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना पदके मिळाली होती. दुसरे महायुध्द, भारत-चीन युध्द, भारत-पाकिस्तान युध्द, कारगील युध्द अशा विविध लढायांत डुबल घराण्यातील व्यक्तींनी पराक्रम गाजवला आहे. सन 1971 च्या भारत-पाकिस्तान युध्दात धुळगांव येथील विश्वासराव डुबल हे शहीद झाले. आजही कराड, बांबवडे, नरवाड, चरेगाव, धुळगांव येथील 250 हून अधिक डुबल व्यक्ती लष्करात विविध पदांवर कार्यरत आहेत.स्वातंत्र्यलढय़ात सहभागडुबल घराण्याने मराठेशाहीत स्वराज्य रक्षणासाठी काम केले. ब्रिटीशकाळात इंग्रजांच्या जुलमी राजवटीला विरोध करण्यासाठी डुबल घराण्यातील व्यक्तींनी काम केले आहे. कराड, चरेगाव, धुळगांव येथील काही व्यक्तींनी चलेजाव चळवळीत सहभाग घेतला. भूमिगत देशभक्तांना डुबल मंडळींनी आश्रय दिला होता. अशा विविध बाबींवर या ग्रंथात प्रकाश टाकण्यात आला आहे.
देवदास मुळे /कराड
“कोरलाईचा किल्ला”.
१३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
*राणूबाई भोसले-जाधव* राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच.शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजे "राणूबाई".त्यां...
-
## धनगर व माळी समाजातील लढवय्ये ## दामाजी थोरात postsaambhar:Udaykumar Jagtap ## ## ## नायगाव ,तालुका -पुरंदर जिल्हा -पुणे , गा...