विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 18 July 2019

भारतातील इंग्रजांच्या उदयास आणि विस्तारास कारणीभूत पेशवा भाग 2

भारतातील इंग्रजांच्या उदयास आणि विस्तारास कारणीभूत पेशवा
भाग 2
कान्होजींची सत्ता कोकण किनाऱ्यावर कोट मांडवेपासून ते त्रावणकोरपर्यंत पसरली. ही गोष्ट तत्कालीन इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज व डच ह्या परकीयांस आणि जंजिऱ्याच्या सिद्दीस बोचत होती. इंग्रज, डच, पोर्तुगीज व फ्रेंच ह्यांनी कधी स्वतंत्रपणे तर कधी संयुक्तरीत्या कान्होजींवर चढाई केली. पण प्रत्येक वेळी त्या सर्वांचा पराभव झाला. आंग्र्यांच्या अंमलाखालील सागरी प्रदेशांतून जाणाऱ्या जहाजास दस्तक (परवाना) घ्यावयास भाग पाडून समुद्रावर त्यांनी आपले निर्विवाद स्वामित्व प्रस्थापिले आणि सिद्दीस वारंवार माघार घेण्यास भाग पाडले. कान्होजींनी पंढरपूर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर आदी अनेक देवस्थानांना इनाम तसेच देणग्या दिल्या. कुलाबा व विजयदुर्ग येथे जहाजे बांधण्यासाठी त्यांनी गोद्या बनविल्या. त्यांची जहाजे कच्छपासून त्रावणकोरपर्यंत सागरात निर्वेधपणे संचार करीत. कान्होजी प्रेमळ होते. तथापि त्यांचे हुकूम सक्तीचे व शिक्षा कडक असे. त्यांना मथुराबाई, लक्ष्मीबाई व गहिनाबाई या तीन धर्मपत्‍नी होत्या. त्यांना सेखोजी, संभाजी, मानाजी, तुळाजी, येसजी आणि धोंडजी असे सहा मुलगे झाले. असा हा सागरी अनभिषिक्त राजा अलिबाग येथे तारीख ३ जुलै १७२९ रोजी मरण पावला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...