विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 31 October 2020

नाईक निंबाळकर गढी - फलटण

 























नाईक निंबाळकर गढी - फलटण

पोस्टसांभार :सौरभ कुलकर्णी

सातारा जिल्ह्यातील फलटण ह्या तालुक्याच्या गावी बाणगंगा नदीच्या तीरी नाईक निंबाळकरांची भव्य गढी म्हणजेच राजवाडा उभा आहे. "मनमोहन" राजवाडा व त्याच्या परिसरातील राममंदिर आणि ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर. जवळच असलेले एकदम प्राचीन जबरेश्वर मंदिर आपले मन मोहून टाकते. फलटणचा राजवाडा त्याची भव्यता आणि राजघराण्यातील सर्वांची विनम्र वागणूक आपल्या साम्राज्याचे मोठेपण दाखवून देते.
निंबराज पवार यांनी निंबळकमध्ये आपली वसाहत निर्माण केली. रामदेवराव यादवांचे राज्य अल्लाउद्दीन खिलजीने घेतल्यावर दक्षिणेतील मातब्बर व्यक्तींना पाचारण करण्यात आले. त्याच वेळी निंबराजांचे पुत्र पोदकुला जगदेवराव यांना खिलजी घराण्याने सरदारकी दिली. पुढे देवगिरी ऊर्फ दौलताबादची सत्ता तुघलक घराण्याकडे गेली. त्या घराण्यातील मुहंमद तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे हलविली. पुन्हा तो दिल्लीला गेला. त्याच्याबरोबर येथील काही सरदार गेले. त्यात जगदेवराव । निंबाळकर गेले. त्या वेळी त्यांनी आपल्या पराक्रमाने पंजाब प्रांतातील बंड मोडून काढले. परंतु बंडवाल्यांकडून त्यांच्या छातीवर भाल्याची जखम झाली व ते धारातीर्थी पडले. त्यांचे "धारापतराव" हे नाव तेव्हापासून घराण्याच्या इतिहासात नोंदले गेले. त्यांचा मुलगा निंबराज दुसरा यांस महंमद तुघलकाने १२०० स्वारांची मनसब दिली आणि नीरा नदी व शंभु महादेवाच्या डोंगरांची रांग यांमधील प्रदेश पश्चिमेस सरहद्दीच्या ओढ्यापासून पूर्वेस रायदंडच्या विठोबापर्यंतचा प्रदेश जहागीर म्हणून दिला. दरबारातून सन्मानाने 'नाईक' किताब दिला. मानाची वस्त्रे दिली. मंदिल, कंबरबंद पटका, चादर, मला, शिरपेच, मोत्याचा तुरा, सोन्याचा पायातला तोडा, पोच्या हिऱ्यांच्या, कलगी, १ कंठी मोत्याची, हिन्याच्या अंगठ्या, मोरचेल, पालखी, अंबारीसह हती, सोन्याच्या साजासह घोडा, भालदार-चोपदार ३० ...असा बहुमान झाल्यावर हे घराणे नाईक-निंबाळकर या नावाने प्रसिद्ध आहे.
पुढे त्यांनी बाणगंगा नदीकाठी भव्य गढी उभारली त्याच्या प्रवेशद्वारातून अंबारीसह हत्ती जाईल इतकी त्याची भव्यता. त्याबद्दल एक शाहीर म्हणतात.
धारचं परमार कुल अतिथोर । निमराजाची तेग समशेर ।
जगदेवराव पुत्र त्याचा थोर । करुनिया युद्ध घनघोर । शोभतो मर्द तसा बहादूर । फलटणला आला हा वीर ।
बाणगंगेच्या काठी मलठण । राजधानी केली फलटण । शत्रूची केली दाणादाण । किती गावं त्याचं गुणगान । जीऽऽजीऽऽऽजी...
पुढे दुसरे निंबराज यांचे पुत्र वणंगपाल आले त्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र मुधोजीराजे हे इ.स. १६३० मध्ये गादीवर आले. मुधोजीराजे यांचे शहाजीराजे भोसले यांच्याशी मित्रत्वाचे संबंध होते. जहागिरीत दुष्काळ पडल्यावर निजामशाहीत मुलखात लूटमार करून त्यातून आपल्या प्रजेला ते मदत करीत होते. आदिलशाही दरबार मुधोजी राजांची ही मनमानी समजून काळज गावाजवळ त्यांना पकडून सातारच्या किल्ल्यावर कैदेत टाकले. जहागीर जप्त केली. शहाजीराजांना हे समजल्यावर त्यांचे मित्र रणदुल्लाखान यांच्या मदतीने विजापूर दरबाराशी संधान साधून मुधोजीरावांनी अभय मिळविले. या उपकाराची फेड म्हणून मुधोजीरावांनी आपली कन्या सईबाई शहाजीराजांचे पुत्र शिवाजीराजे यांना वधू म्हणून स्वीकारण्याची विनंती केली. दि. १६ एप्रिल १६४० वैशाख शुद्ध पंचमी शके १६६२ सईबाईसाहेब छत्रपती शिवाजीराजांच्या ज्येष्ठ पत्नी म्हणून भोसले राजघराण्यात आल्या.
ह्याच फलटणमध्ये सईबाईंचे बालपण गेले.पुढे फलटणचा राजकारभार मुधोजींचे पुत्र बजाजींकडे गेला. सईबाईंना सखुबाई, अंबिकाबाई, राणूबाई व शंभूराजे सर्वात लहान ही अपत्य झाली. शंभूराजे सव्वा दोन वर्षाचे असताना सईबाईंना देवाज्ञा झाली. पुढे सखूबाईंचा विवाह बजाजी निंबाळकरांचे पुत्र महादजीं बरोबर लावून दिला.
साभार- महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे

राजे लखुजी जाधव (इ.स. १५७० - इ.स. १६२९)



 राजे लखुजी जाधव (इ.स. १५७० - इ.स. १६२९) विदर्भातील सिंदखेड येथील मराठा वतनदार होते. ते जिजाबाई यांचे वडील व शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा होते. निजामशाहीत त्यांना पंचहजारी मनसबदारीचा हुद्दा होता. विदर्भात सिंदखेड येथे त्यांचे वतन होते. सिंदखेडकर जाधवांचे घराणे ही मुळ देवगिरीच्या यादव वंशाचीच एक उपशाखा आहे. देवगिरी येथील यादवांच्या रायाचा अंत झाल्यावर यादवांची दैन्यावस्था झाली. उदरनिर्वाहासाठी ते सर्वत्र पसरले. याच घराण्यातले वारस पुढे काही पिढ्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे स्थायिक झाले. सिंदखेडच्या जाधव घराण्यात लखूजी हा कर्तृत्वान आणि विख्यात पुरुष उदय पावला. यादवांचे राज्य नष्ट झाल्यानंतर लखूजी जाधव यांनीच जाधव घराण्याला उर्जितावस्था प्राप्त करुन दिली. लखूजीचे नाव लक्ष्मणसिंह असेही होते तथापि तो लखूजी याच नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडच्या जाधवाचे घराणे प्राचीन आहे. शिवपूर्वकाळात विशिष्ट परिस्थितीत निजामशाही आणि आदिलशाही यांच्या आश्रयाने जी काही मराठी कूळे उदयास आली त्यात सिंदखेडकर जाधवराव, वेरुळचे भोसले, वासीमचे उदाराम देशमूख,पोतले आणि फलटनचे नाईक निंबाळकर,सरनाईक पवार ही कूळे विख्यात होती. जाधव घराणे हे लखूजी जाधवरावांच्या यांच्यामुळे निजामशाहीतच्या आमदानीत पुढे आले. लखूजीने बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडला देशमूखी मिळवली. यादव राजांच्या राजवटीत मराठी राज्य नष्ट झाले परंतु जाधव कुळात जन्मास आलेल्या कन्येच्या जिजाबाई पोटी तिनशे वर्षांनी पुन्हा मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करणारा छत्रपती शिवाजी हा असामान्य पुरुष जन्मास आला शिवाजी राजाला जन्म देणारी जिजाबाई लखुजी जाधवरावांची कन्या होती.

जाधवराव घराणे आणि स्वराज्यासाठीचे बलिदान..!!

 


जाधवराव घराणे आणि स्वराज्यासाठीचे बलिदान..!!

लखुजीराजे जाधवराव यांच्या पराक्रमाने ओळखली जाणारी सिंदखेडकर जाधवराव यांची शाखा ही शेवटपर्यंत स्वराज्यासाठी लढत होती.केवळ लढलेच नाहीत तर वेळप्रसंगी आपल्या प्राणांची आहुतिसुद्धा दिली.थोरले संभाजीमहाराज, छत्रपती शिवाजीमहाराज छ.संभाजींमहाराज छत्रपती, राजाराम महाराज राजमाता ताराबाईराणीसाहेब छ. शाहू महाराज यांच्यापासून चालू झालेला ईमान स्वराज्याच्या अखेरपर्यंत होता.
धनाजी राव जाधवराव हे जरी आपणास त्यांच्या पराक्रमामुळे माहित असले तरी हा पराक्रमाचा वारसा त्यांना त्यांच्या आजोबा-पणजोबा पासून मिळाला होता.राजे अचलोजीराव यांचे ते पनतु होते आणि राजे सृजनसिंह यांचे नातू.हे सृजनसिंह थोरल्या संभाजी महाराज यांच्यासोबत दक्षिणेत शहीद झाले.धनाजीराव यांचे वडील शंभूसिंह जाधवराव यांनी त्यांच्या पराक्रमाने बांदल सेनेबरोबर पावनखिंडीमधे अद्भुत पराक्रम गाजवून स्वराज्यासाठी देह ठेवला.तसेच ,छत्रपती शिवाज़ी महाराज याच्या पत्नी काशीबाई राणीसाहेब ह्या धनाजीराव यांच्या आत्या होत्या .हंबीरराव मोहिते यांच्या तालमीत तैयार झालेल्या धनाजीराव यांनी गाजवलेला पराक्रम आणि त्यामुळे उडलेली मोगलांची दैना आपल्या सर्वाना माहितच आहे.
याच जाधवराव यांची थोरली शाखा ही खास हेर म्हणून मोगलांकडे पाठवल्याचे पुरावे आत्ताच समोर आले आहेत. सिंदखेड राजा, आडगांवराज़ा ,देऊळग़ावराज़ा, किनगावराज़ा, मेहुनगांवराज़ा,जवळखेड, उमरद आणि माहेगांव येथे वंशज़ आहेतंथोरली शाखा ही लखुजीराव पुत्र राजे दत्तजीराव यांची.राजे दाताजीराव यांचे पुत्र राजे यशवंतराव,ज्यांचा मृत्यु देवगिरी येथे लखुजीराजे यांच्या सोबत झाला,त्यांचे थोरले मुलगे राजे रतनोजी उर्फ रुस्तुमराव यांची थोरली शाखा.संभाजी महाराज यांच्या द्वितीय पत्नी दुर्गाबाई राणीसरकार ह्या याच शाखेच्या
याच थोरल्या शाखेचे वंशज म्हणजे याच राजे यशवंतराव यांच्या कनिष्ठ मुलांची शाखा ही भुईंज येथे स्थायिक झाली.ही शाखा शेवटपर्यंत स्वराज्यासाठी लढली.याच शाखेचे वंशज आज भुईंज,सातारा परिसरात आहेत
शुर सरदार पिलाजीराव जाधवराव हे राजे अचलोजी यांचे द्वितीय पुत्रराजे देवराव आडगावकर या शाखेतील होत त्याचे वंशज़ आज़ही वाघोली, नांदेड,वाड़ी ( सासवड ) महाड येथें आहेत
जाधवराव घरण्याने आपल्याला केवळ मासाहेब जिजाऊ,धनाजीराव नाही दिले,तर शंभूसिंह,सृजनसिंह संताजी उर्फ सृजनसिंह आणि माळेगाव संस्थानने सुद्धा शंभुसिंहमहाराजू, रत्नसिंहमहाराज , अमरसिंहमहाराज यांच्यासारखे अनेक पराक्रमी योद्धेसुद्धा दिले आज़ही सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांचे वंशज माळेगाव आणि मांडवे ( बोरगाव ) येथे आहेतं
जाधवराव घराणे पराक्रम आणि बलिदानासाठी सतत प्रेरणादायी आहे आणि राहील.
स्वराज्याचे आद्य संकल्पक म्हणून लखुजीराजे जाधवराव यांच्याकडे पाहिले जाते.

यदु राजाचे वंशज. यादव / राजे जाधवराव या मराठा क्षत्रिय घराण्याचा वंशविस्तार !!

 


यदु राजाचे वंशज. यादव / राजे जाधवराव या मराठा क्षत्रिय घराण्याचा वंशविस्तार !!

यदु
अहीर राजा
यदु हा हिंदू पौराणिक साहित्यात वर्णिलेला वंशकर्ता राजा होता. तो राजा ययाति व त्याची पत्नी देवयानी यांचा थोरला पुत्र होता. विष्णु, भागवत व गरुड पुराणांनुसार यदूस चार पुत्र झाले, तर पौराणिक साहित्यात अन्यत्र त्यास पाच पुत्र असल्याचे उल्लेख आहेत. क्रोष्टु, सहस्रजित्, नल, अंतिक व लघु अशी त्याच्या पुत्रांची नावे आढळतात. याच्यापासून सुरू झालेल्या वंशाला यादव कुळ किंवा यदुवंश असे उल्लेखले जाते. कृष्ण हा यदुवंशात जन्मला. व त्यांनी जो समुह संघटीत केला त्या समुहाला यादव कुळ संबोधल गेल.
(यादीत फक्त ज्येष्ठ पुत्राचे नाव आहे)
यदूचे पूर्वज
ब्रह्मा - दक्ष - विवस्वत - मनु - चंद्र - बूध - सोम- पुरूरवा - आयु - नहुष - ययाति - (यदु). हे यदूचे क्रमशः पूर्वज होत.
श्रीकृष्णाचे पूर्वज
यदु - क्रोष्टु - वृज्जी - स्वाही - स्वती - रसदु - चित्ररथ - शशबिंदु - पृथुश्रवस् - अंतर - सुयज्ञ - उशनस् - शिनेयु - मरुत - कंबलबर्हिस् (?) - रुक्मकवच - परावृष्ट - ज्यामध - विदर्भ - क्रय - कुंती - धाष्टी - निवृत्ति - दशाई - व्योम - जीमूत - विकृति - भीमरथ - रथवर - नवरथ - दशरथ - एकादशरथ - शकुनी - कुरंभी - देवरत - देवक्षेत्र - देवन् - मधु - पुरूवश - पुरूहोत्र - अंशु - सत्वत् - भीम - भजमान - चित्ररथ - विदुरथ - शूर - शर्मन् - प्रतिक्षात्र - स्वयंभोज - हृदिक - देवभिथुश (?) - शूरसेन (२) - वसुदेव - कृष्ण
श्रीकृष्णाचे वंशज
(कृष्ण) - प्रद्युम्न - अनिरुद्ध - वज्रनाभ - प्रतिबाहु - सुबाहु - शांतसेन - सत्यसेन - श्रुतसेन - गोविंदभद्र - सूर्यभद्र - शांतिवाहन - सद्विजय - विश्वराह - क्षेमराह/खेंगार - हरिराज - सोम. जाधव माधव
प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. 1] श्रीमन्नारायण ते भगवान श्रीक्रुष्ण पर्यॅंत 2] भगवान श्रीक्रुष्णापासुन देवगीरीचे यादव 3] देवगिरीचे यादव ते सिॅंदखेडकर राजे जाधवराव पर्यॅंत.... पहिल्या दोन टप्प्यातील वंशविस्तार हा हेमाद्रीक्रुत व्रतखंडातील राजप्रशस्तीत दिलेले आहेत आणी दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील वंशविस्तार हा किनगावराजा येथील राजेजाधवरावाजवळील इ स 1720 च्या सुरतमजलीसच्या न्यायनिवाड्यावेळची शिक्यासह उपलब्ध वंशावळीत आणी गो दा दळवी क्रुत जाधव घराण्याची कैफियत या पुस्तकात दिलेला आहे. !! वंशावळी !! श्रीमन्नारायण - ब्रह्मा-अञि - समुद्र -सोम/चंद्र - ब्रुहष्पती-बुध - पुरुरवा - आयु-नहुष{सोमवंश येथुन सुरु झाला} - ययाति -यदु{याच्या वंशजाना यदुवंशी म्हणतात}-क्रुस्थ/क्रोष्ट{याच्या वंशजांचे हैहय साम्राज्य} - व्रुजिॅंस्व -स्वाप/स्वाहित-उर्भॅंग/न्रुशंकु-चिञरथ -प्रुथुश्रवा - सुयद्न्य-उशना-स्थितेयु/तितेकी-मुरित - विक्रम-कबंलबर्हि - वरिश्व-रुक्माव - रुक्मेव-प्रुथुक्म - हविष्मन-पराजित - जामुग-सव्यपी-जामाघ - विदर्भ{vidarbh kingdom}-रुक्मीन- क्रंथ -कुंति - व्रुष्णि -केशुक - निव्रुत्ति - लोमपाद /व्योमाच्छ - ध्रुति-जीमुत - ऋषभ-भीमरथ - नवरथ-दशरथ/दिध्रुत -शकुंत - करंभि - कर-देवरात - देवक्षेञ - माधि/मधु-कुरुबल - दुर्वसु-पुरुहोम - गुणी-पादुप-आयु-यंतु-सात्वत{सात्वत किॅंगडम}-भिमा-अंधक{अंधक किॅंगडम}-टांक- भुजमान-विदुरथ-शुरा -सेनी-स्वयंभोज-ह्यदिक-ईढुष-देवमीढ{याचे वंशज मार्तिकावर्तीचे भोज} -शुरा-वसुदेव-भगवान श्रीक्रुष्ण{भगवतगितेचे कर्ता}-प्रद्युम्न-अनिरुद्ध{काठेवाडात गिरनार/जुनागड येते राज्य स्थापले}-यक्ष-वज्र{याने सुरतपर्यॅंत राज्य पसरवले}-प्रतिबाहु{गुजराथ व खानदेश पर्यॅंत राज्य वाढवले}-सुबाहु{याने आपले राज्य ४ पुञात वाटणी केली}-द्रुढप्रहार{सर्वप्रथम दक्षिणेत राज्य स्थापिले व राजधानी चंद्रादित्यपुर/चांदोर जि नाशीक बनवली काळ इ स 860 ते 880}-सेऊनचंद्र 1ला{याने राजधानी सिॅंदिनेर/श्रीनगर-हल्लीचे सिन्नर येथे हालवली.याच्याचनावाने या भागास सेऊनदेश म्हटले गेले.काळ इ स 880 ते 900}-धाडियप्पा प्रथम-भिल्लम प्रथम-श्रीराज/राजगी-वडिॅंग/वद्दिॅंग प्रथम{इ स 950ते 970}-धाडियप्पा द्वितिय-भिल्लम द्वितिय{ इ स 975 ते 1005}-वेसुगि प्रथम-अर्जुन-भिल्लम त्रुतिय{इस 1020ते1045}-वडिॅंग 2रे-वेसुगी द्वितिय-भिल्लम 4था- सेऊनचंद्र द्वितिय{इस 1050 ते 1080}-सिॅंघणदेव प्रथम{इ स 1105 ते 1120}-मलुगी-भिल्लम पाचवा{याने देवगिरी येथे सार्वभौम राज्याची स्थापना केली इ स 1185 ते 1193}-जैञपाळ प्रथम-सिॅंघणदेव द्वितिय{इस 1200 ते 1246याने शिखर सिॅंघणापुरचे महादेवाचे मंदिर बांधले}-जैञपाळ 2रा-क्रुष्णदेव-महादेव-रामदेवराय{खिलजी कडुन पराभव}-शंकरदेव-गोविॅंददेव{याच्यापासुन जाधव हे आडनाव सुरु झाले}-ठाकुरजी-भुकणदेव/भुतजी-अचलकर्ण/अचलोजी-विठ्ठलदेव-राजेलखुजीराव{इ स 1550 ते 1629 घराण्यास उर्जितावस्था मिळवुन दिली} राजेलखुजीराव याना 4पुञ व एक कन्या = 1] राजेदत्ताजीराव- यांचे वंशज जवळखेडा , ऊमरद {देशमुख},करवंड व भुईॅंज येथिल जाधवराव आहेत, 2] राजे अचलोजी- यांचे वंशज मेहुणाराजा, आडगावराजा,माळेगाव बुद्रुक,उब्रंज व मांडवे येथील जाधवराव आहेत. 3] राजेबहादुरजी- यांचे वंशज देऊळगावराजा, सिॅंदखेडराजा व महेगाव देशमुख येथिल जाधवराव आहेत. 4] राजेराघोजी यांचा पुञ राजेबहादुरजी यानी दत्तक घेतला होता तीच पुढे देऊळगावराजा शाखा होय.5] राजमाता जिजाऊ आऊसाहेब या भावंडात सर्वात कनिष्ठ होत्या.यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्यासोबत झाला.. ..राजेलखुजीराव यांचे कनिष्ठ बंधु राजेभुतजी उर्फ जगदेवराव होत त्यांची वंशज शाखा किनगाव राजा, पाटेवडी व दिल्ली येथे आहेत. तसेच देऊळगावराजा, किनगावराजा, जवळखेडा,ऊमरद देशमुख, मेहुणाराजा, आडगावराजा व सिॅंदखेडराजा येथिल जाधवरावांचे विवाह देऊळगावराजा येथिल श्री बालाजी मंदिराच्या गाभार्यात लावण्याचा मान इ स 1693 पासुन आजपर्यॅंत चालु आहे. तसेच जरासंधाच्या पराक्रमामुळे यादव-जाधव क्षञियाना आपली राजधानी मथुरा येथुन द्वारका येथे स्थालंतरीत करावी लागली आणी पुढे यादव क्षञीयांची द्वारकासह आणखी 11 राज्य निर्माण झाली ती पुढिलप्रमाणे= द्वारका, चेदी, शुरसेनी, दशरन, करुशा, कुंती, अवंती, माळवा, गुर्जरा, हैयय, सौराष्ट्र आणी विदर्भ. तसेच यादव-जाधव मराठा क्षञियांची 12 कुळे आहेत असे वर्णन आढळते आणी ती 12 कुळे म्हणजे शिर्केॅंचे 6 कुळे,तोॅंवर-तौर यांचे 5 कुळे व यादव-जाधव यांचे 1 कुळ होत.तसेच महाराष्ट्रातील जी देवगिरी यादव-जाधव मराठा व्यतिरिक्त जी यादव-जाधव यांची जी मराठा कुळे आहेत ती यादव क्षञियांच्या 11 राज्यातुन आले असले पाहिजेत कारण या 12 राज्यातील यादव क्षञियाना महारथ-महारठ्ठ-MAHARATHA असेच संबोधले जात असे.
संदर्भ=1] हेमाद्रीक्रुत व्रतखॅंडातील राजप्रशस्ती 2] सिॅंदखेडकर राजे जाधवरावांची मोडी बखर 3] किनगावराजा येथिल राजे जाधवरावांजवळील सुरतमजलीसवेळची वंशावळी 4] गो दा दळवी क्रुत जाधव घराण्याची कैफियत 5] देवगिरीचे यादव - ब्रह्मानंद देशपांडे 6] जाधवरावांकडील उपलब्ध वंशावळी.

इतिहासप्रसिद्ध भातवडी लढाई आणि मालोजीराजे भोसले यांचे पुत्र शहाजीराजे यांचे धाकटे बंधू शरीफजीराजे भोसले


 इतिहासप्रसिद्ध भातवडी लढाई आणि मालोजीराजे भोसले यांचे पुत्र शहाजीराजे यांचे धाकटे बंधू शरीफजीराजे भोसले

पोस्टसांभार :राज जाधव

साधारणपणे ऑक्टोबर १६२४ मध्ये अहमदनगर जवळ भातवडी या ठिकाणी मोगल आणि आदिलशाही यांच्या संयुक्त फौजा आणि निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याच्या सैन्यात झालेल्या युद्धात शरीफजीराजे भोसले हे लढताना कामी आले. याप्रसंगी आपण भातवडीच्या युद्धाची पार्श्वभूमी आणि भातवडी युद्ध याची थोडक्यात माहीती घेणे प्रसंगोदत्त होईल..
जहागिर बादशहाचा दक्षिणेकडील प्रदेश जिंकावेत आणि तेथील शाह्या आपण अंकित कराव्यात हा बेत होता. आदिलशाह आणि कुतुबशहा मोगलांना खंडणी व प्रसंगी मदत करत असत त्यामुळे दक्षिणेत मोगलांचा जास्त धोका हा निजामशहास होता. १६२३ मध्ये आदिलशाहने निजामशाहीचा वजीर मलिक अंबर विरुद्ध मोगलांना लष्करी मदत केली होती, सरलष्कर मुल्ला महमद यास ५००० निवडक स्वारानीशी बऱ्हाणपूर येथे मोगलांच्या मदतीस पाठवले होते. मलिक अंबर यामुळे संतापला आणि कुतुबशहाशी मैत्रीचा करार केला आणि आदिलशाहीवर आक्रमण करून बेदरचा प्रदेश जिंकून घेतला आणि विजापूरवर चालून गेला. मलिक अंबरने विजापूरास वेढा दिल्याचे समजतास आदिलशाही सरदार मुल्ला महमद व मोगल सरदार सरलष्कर खान विजापूरच्या दिशेने निघाले, ही बातमी समजतास मलिक अंबरने विजापूरचा वेढा उठवला व त्वरित आपल्या सैन्यानिशी अहमदनगरच्या दिशेने निघाला. त्याचवेळी मोगल-आदिलशाही या संयुक्त फौजेची आणि मलिक अंबरच्या सैन्याची गाठ भातवडी येथे पडली आणि युद्धास तोंड फुटले. या युद्धात महाबली शहाजी महाराज, शरीफजीराजे भोसले तसेच इतर मराठा सरदारांनी आपल्या पराक्रम आणि शौर्याच्या बळावर निजामशाहकडे विजयाश्री खेचून आणला..
भातवडीच्या युद्धात मोगल, आदिलशाही तसेच निजामशाहीच्या फौजेत कोणतेकोणते सरदार लढत होते त्यांची नावे तसेच युद्धाचे अतिशय अचूक आणि रसाळ वर्णन हे शिवभारत या समकालीन साधनात आलेले आहे. लेखनसीमे अभावी या युद्धात महाबली शहाजी महाराज आणि शरीफजीराजे भोसले यांनी गाजवलेल्या पराक्रम यांचे वर्णन अतिशय थोड्या शब्दात देणे योग्य राहील. शिवभारतकार नमूद करतात " नंतर शहाजी व शरीफजी, महाबलवान खेळोजी, सिद्दी, त्याचप्रमाणे हंबीररावप्रभूति इतर पराक्रमी वीर यांनी हातात बाण, चक्रे, तरवारी, भाले, पट्टे, घेऊन मोगलांच्या अफाट सैन्याची खूप कत्तल उडवली. तेंव्हा ते भयभीत होऊन जीव वाचवण्यासाठी दाही दिशा पळू लागले. ती मोगलांची सेना पसार झालेली पाहून इब्राहिम आदिलशहाच्या सैन्यासही पळता भुई थोडी झाली. "
ही धांदल सुरू असतानाच मनचेहर नावाचा मोगल सरदार त्या सैरावैरा पळणाऱ्या सैन्याच्या पिछाडीचे रक्षण करू लागला. मनचेहर यास पाहून महाबली शहाजी महाराज, शरीफजीराजे इत्यादी सर्व भोसल्यांनी पुन्हा शत्रूची कापाकापी सुरू केली. युद्धात शरीफजीराजे भोसले यांनी भाल्याच्या फेकीने हत्तीदळावर हल्ला चढवला होता, याप्रसंगी शत्रूच्या बाणाच्या हल्ल्याने शरीफजीराजे भोसले धारातीर्थी पडले. आपला धाकटा भाऊ शरीफजीराजे धारातीर्थी पडलेले पाहून महाबली शहाजी महाराज मनचेहर व त्याच्या सैन्यावर वेगाने चालून गेले. महाबली शहाजी महाराज यांच्या भीतीने मनचेहर हा मोगल हत्तीदळासह पळून जाऊ लागला, तेंव्हा शहाजीराजे यांनी पळणाऱ्या शत्रूंचा पाठलाग केला आणि मनचेहरसहित अनेक लोकांना कैद केले..
भातवडीच्या युद्धात महाबली शहाजी महाराजांचे धाकटे बंधू शरीफजीराजे भोसले कामी आले. शरीफजीराजे भोसले यांची समाधी स्थान शोधून त्या समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम दुर्गमहर्षी, इतिहास संशोधक दिवंगत प्रमोद (भाऊ) मांडे सरांनी शिवप्रेमी आणि गावकऱ्यांच्या मदतीने केले. प्रमोद मांडे सरांचे हे उपकार इतिहासप्रेमी कधीही विसरणार नाहीत..
महापराक्रमी शरीफजीराजे भोसले यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन..
- राज जाधव

पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग २ )

 

पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग २ )

 चारच दिवसांनी नजरबाजांनी खबर आणली, फाझल आणि रुस्तमेजमा कोल्हापुरला आले आणि पन्हाळ्याजवळ सरकायला लागलेत. सदरेवर ठरल्याप्रमाणे हुकुम सुटले. यावेळी गनीमीकावा वापरायची गरज नव्हती. मोकळा मुलुखात शाही फौजेला आयुष्यभर लक्षात राहील असा धडा दिला कि पुन्हा विजापुरकर स्वराज्यावर आले नसते. घोड्यावर खोगीरा चढल्या,नाल मारले गेले,खरारे करुन घोडे सज्ज झाले.मावळे तर मनाने लढाईला आधीच तयार होते. पन्हाळ्यावर त्रिंबक भास्करांबरोबर बंदोबस्तासाठी बाजी, फुलाजी थांबणार होते. तर दहा हजार शाही फौजेला तोंड द्यायला पाच हजार मराठी वाघ निघाले. गोदाजी जगताप, वाघोजी तुपे,हिरोजी इंगळे, भिमाजी वाघ, सिधोजी पवार, महाडिक, जाधव, पांढरे, खराटे व सिद्दी हिलाल हे महाराजांचे साथीदार व अर्थातच सरनौबत नेतोजी होतेच. सोमेश्वराचे आशीर्वाद घेउन वेगाने सैन्य कोल्हापुरच्या दिशेने निघाले. थोड्या वेळात त्यांना आदिलशाही चाँदतार्‍याबरोबर असलेल्या फौजा दिसु लागल्या. फाझलला बहुधा शिवाजी ईतक्या लवकर आपल्या समोर असा उघड्या मैदानात येईल, याची अपेक्षा नसावी. पन्हाळ्यावर हल्ला करायची योजना तो तयार करत होताच, तो हि सगळी झुंड त्याच्यासमोर होती. धीर धरुन रुस्तमेजमान फौजेला तयार करु लागला.रुस्तम स्वतः मध्यभागी, रुस्तमच्या डाव्या अंगाला फाझलखान, उजव्या अंगाला मलिक ईतबार्,पिछाडीला अजिजखानचा मुलगा फतहखान, बाकी मुल्ला.बाजी घोरपडे, सर्जेराव घाटगे होतेच.
हे सगळे थोड्या अंतरावरुन मराठी फौज बघत होती.
नेतोजीने तातडीने आपल्या सैन्याला आदेश दिला आणि रचना केली.उजव्या अंगाला पांढरे,खराटे, डाव्या बाजु सिद्दी हिलाल,जाधवरावांवर सोपवली, सोबत हिरोजी ईंगळे,भिमाजी वाघ, गोदाजी जगताप, सिदोजी पवार्,परशुराम महाडीक होतेच. दोन्ही फौजा चढाईला सज्ज झाल्या. महाराज आपल्या फौजेला म्हणाले, "हिरोजी तु मलिक ईतबारला टिपायचे, महाडीक तुम्ही फत्तेखानाला धरा, सिदोजीची गाठ सादतखानाशी, गोदाजी तु सर्जेराव घाटगे आणि घोरपड्याला घेरायचे, नाईकजी राजे आणि खराटे राजे यांनी फौजेच्या उजव्या अंगाला कापायचे, जाधवराव आणि सिद्दी हिलाल डावी बाजु मारतील. रुस्तमेजमाशी आमचा स्नेह आहेच ,आम्ही जातीने त्याच्यावर यल्गार करतो.चला, उठा,झोडपा हि शाही फौज ! कळू देत विजापुर दरबाराला मराठी मुलुखात आल्याचा नतीजा".
राजाच्या शब्दांनी मावळ्यांना दहा हत्तीचे बळ आले, समोरच्या फौजेत हत्ती असले तरी आता मराठी वाघ त्यांना झोंबायला सज्ज झाले, भगवे झेंडे नाचु लागले, शिंग फुंकली, कर्ण्यांनी एकच गिलका केला. आपल्याला नेमून दिलेल्या सावजाच्या दिशेने पाण्याचा लोंढा फुटावा तसे मराठे आदिलशाही फौजेवर तुटून पडले.
आपली जुनी हुकलेली शिकार फाझलखानाच्या दिशेने नेतोजी मोठ्या तडफेने निघाला. राजांनी थेट रुस्तमेजमानचा वेध घेतला. शाही फौजेत हत्ती होते,त्यामुळे सरदारांना चपळपणे हालचाल करता येईना.बघता बघता मराठी फौजांनी विजापुरी फौजेला चारही बाजूनी घेरुन टाकले. राजांच्या जोरदार हल्ल्यामुळे रुस्तमेजम्याची फौज कापली जाउ लागली, तर नेतोजीचा आवेश फाझलखानाला आवरेना. विजापुरच्या सरदाराना पराभव डोळ्यासमोर दिसू लागला आणि अशावेळी काय करायचे ते त्यांना आता माहिती झाले होते. अगदी पुरंदरवर हल्ला केल्यानंतर फत्तेखानाच्या फौजेने तेच केले होते, अफझलखानाला फाडल्यानंतर त्याच्या फौजेने तेच केले होते.आताही काही वेगळे करायची गरज नव्हती. एकच गोष्ट म्हणजे "जीव वाचवून पळुन जाणे".प्रश्न ईतकाच कि आधी कोण पळून जाणार ? अर्थात नुकताच याचा अनुभव असलेल्या फाझलखानाशिवाय हे धाडस कोण दाखवणार. आणि फाझल मोहरा वळवून पळत सुटलाच. हत्तीवरुन उडी मारुन घोड्यावर मांड टाकून गडी विजापुरच्या दिशेने पळत सुटला. एकदा सेनापतीने पळायचे धाडस दाखवल्यावर फौजेला त्याच्या मागोमाग जायला अडचण नव्हती. रुस्तमेजमाही मागेमागे हटून एका क्षणी गर्रकन वळाला आणि पळत सुटला. याचीच वाट बघत असलेले बाकीचे सरदारही बेभानपणे विजापुरकडे दौडू लागले. रणभुमीत फक्त बेवारस हत्ती आणि घोडेच काय ते शिल्लक राहीले. शाही फौजेची पाठ बघणार्‍या मावळ्यांनी हसत हसत बारा हत्ती आणि दोन हजार घोडी ताब्यात घेतली आणि पन्हाळ्याचा चढ चढू लागले. अजून एक दैदीप्यमान विजय मिळवून राजे प्रसन्न मुद्रेने गडात प्रवेश करते झाले.
काय कमाल होती ना ? अवघ्या वीस वर्षापुर्वी हेच मावळे आदिलशाही नाही तर मोघली चाकरीत धन्यता मानायचे.आपण कधी जिंकु हा आत्मविश्वासच यांना नव्हता. बादशहासाठी प्रसंगी आपल्याच सग्यासोयर्‍यांचे खुन पाडयलाही यांनी कधी मागेपुढे पाहीले नव्हते. तेच मावळे आज पातशाही फौजेला सळो कि पळो करुन सोडत होते. सह्यशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आल्या कि काय चमत्कार होतो याचा अनुभव मराठी मुलुख घेत होता.
दुसर्‍या दिवशी सदरेवर सगळे मानकरी एकत्र जमले. एकुण पन्हाळा मराठी फौजेला शुभशकुनी ठरला होता. नेतोजी, गोदाजी कालच्या युध्दातील गंमतीजमती सगळ्यांना सांगत होते. सदरेवर हास्यकल्लोळ उठत होते.ईतक्यात महाराज येत असल्याची ललकारी आली.सगळे सावरुन बसले.
"महाराज, कालचे युध्द लाभदायक ठरले म्हणायचे. हत्ती,घोडे तर मिळालेच्,पण आदिलशाही फौजेला बसलेला हबका बघता आता तिकडून ईतक्यात कोणी पुन्हा स्वराज्यावर चालून येणार नाही असे वाटते" त्रिंबक भास्कर मुजरा घालून महाराजांना म्हणाले.
"खर आहे पंत ! मार मोठा जोरदार खाल्लाय. शाही फौजेला पराभव नवीन नव्हता. औरंगजेब द्क्षीणेत होता, तेव्हा विजापुर दरबार दबकून होता. ईकडे आम्ही त्यांचा मुलुख मारीत होतो, तिकडे आलमगीर किल्ले बळकावत होता. औरंगजेबाचा इरादा आदिलशाही बुडवावी असाच होता.नंतर त्याला आमच्याकडे लक्ष देता आले असते. पण नेमक्या वेळेला शहाजहान आजारी पडला आणि आम्हा दोन्ही दख्खनी शाह्यांचा हा मोघली दाब गेला. ह्याच संधीचा आता फायदा घ्यायचा आहे. विजापुर दरबार आता गलितगात्र झाला आहे. मोघलांचा कोणी नामी सरदार लगेच स्वराज्यावर येईल ईतका जवळ नाही. आपल्याला पुढची चाल लगेच खेळायला हवी. काका, तुम्ही आजच फौजा घेउन निघा. मिरज्,विजापुर परिसरात दौड मारा आणि शक्य तितका मुलुख मारा. आम्ही दोरोजीला कोकण ताब्यात घ्यायला दाभोळ, राजापुरकडे पाठविले आहे, त्याचीही काही खबर यायला हवी" राजे विचारात व्यग्र होते.
नेतोजी मुजरा घालून मोहीमेच्या तयारीसाठी निघाले.
पुढे चारच दिवसांनी सदरेत नेतोजीनी मिरजेच्या भुईकोटाला वेढा घातला आहे. आजुबाजुच्या गावातील जमीनीचे तंटे गडावर आले होते.कारभार्‍यांबरोबर बसून त्याचे निवारण सुरु असताना एक बातमीदार राजापुरकडून आला. मुजरा घालून त्याने खलिता पुढे केला आणि परामर्श सांगितला.
"महाराज, दोरोजीने दाभोळ बंदरावर झडप घातली,पण बातमी लागताच दाभोळचा सुभेदार महमुद शरीफ तीन गलबत घेउन राजापुरला पळाला आणि अंग्रेजांच्या आसर्‍याला गेला. पण आंग्रेजांना हे झेपणारे वाटले नाही, त्यांनी एक गलबत राखतो म्हणून सांगितले.आपला दोरोजी गप्प बसतोय होय.तो तातडीने राजापुरवर गेला. हि खबर लागल्याबरोबर शरीफ एका भाड्याच्या गलबतात बसुन वेंगुर्ल्याकडे पळाला. त्याची तिन्ही गलबत राजापुर बंदरातच उभी असल्याची पक्की खबर दोरोजीला मिळाली होती. गोर्‍यांनी युक्ती मोठी नामी केली होती, शरीफच्या गलबतावर त्यांनी आपली निशाणं लावली होती,पण दोरोजीला संशय आलाच्,त्यांनी गलबत तर ताब्यात घेतलीच पण फिलीप गिफर्ड म्हणुन एक गोरा अधिकारी पकडला आणि त्याला आपल्या खारेपाटणच्या भुईकोटात बंद करुन ठेवले आहे. त्याच्याबरोबर वाटाघाटी करुन काही कलम कबुल करुन मंजुरीला दोरोजीनं खलिता घाडला आहे".
जासुसाने बयाजवार सगळा मामला सांगितला. सगळ्या सदरेला वाटले, आता महाराज त्या गोर्‍याला सोडत नाहीत. पण महाराजांनी शांतपणे खलीता वाचला आणि लगेच मंजुरी दिली. सगळ्यांनाच या मसलतीचा धक्का बसला. न राहून त्रिंबकपंतानी विचारलेच,"महाराज टोपीकर तसे आपले शत्रुच आहेत. आपणही त्यांच्यावर नजर ठेवता.मग आयता आलेला हा गोरा का सोडायचा ?"
"पंत ! हे राजकारण आहे.ईथे दुरचा विचार करावा लागतो. साता समुद्रापलीकडून हे टोपीकर व्यापारी म्हणून येतात्,अलगद तागडी बाजूला करुन तलवार हाती घेतात.ईथल्या राजकारणात नाक खुपसतात.हे सगळे आम्हाला दिसते. पण त्याहून जास्त आम्हाला काय सलत असेल तर तो जंजिरा ! पाण्यात जैसा उंदीर असल्याप्रमाणे जंजिर्‍यात बसलेला सिद्दी. त्याच्या जीवावर तो आमच्या रयतेला उपद्रव देतो, मुलुख उध्वस्त करतो.त्याला मारायचे तर आरमार हवे,दारुगोळा हवा. या टोपीकरांनी मदत केली तर जंजिरा मोहीम अशक्य नाही. दोरोजीने नेमके हेच राजकारण आमच्या पुढे आणले आणि म्हणूनच आम्ही त्याला मंजुरी दिली. पंत काट्याने काटा काढलेला चांगला. अंग्रेजांची मदत घेउन सिद्दी बुडवला तर एक शत्रु कमी होईल आणि रायगडही सुरक्षित होईल. आमची नजर या पुढ्च्या चालीवर आहे. बघुया, टोपीकर कशी मदत करतात ते.नाही तर राजापुर आता आपल्याला फार लांब नाही."
सगळ्यांनीच या मसलतीला माना डोलावल्या आणि सदर पांगली.
राजे गडाच्या गडाच्या फेरीसाठी पुसाटी बुरुजाच्या बाजूला गेले होते. थंड वार्‍याच्या प्रसन्न झुळका मनाला सुखावीत होत्या. बरोबर असलेल्या सोबत्यांशी पुढचे बेत ठरविले जात होते. ईतक्यात हुजर्‍या जवळ आला आणि मुजरा घालून म्हणाला "महाराज, सदरेवर जासूस येउन थांबला आहे. मिरजेकडची खबर आली आहे".
मिरज ! म्हणजे नेतोजी काकांनी किल्ला घेतला कि काय ? सगळेजण लगबगीने सदरेकडे निघाले. नजरबाजाने खलिता पुढे केला, राजे उत्सुकतेने वाचू लागले. खलिता पुर्ण वाचून झाल्यावर त्यांनी बाजुला ठेवला. त्यांची मुद्रा काहिशी चिंताक्रांत दिसत होती.
"मिरज अडून बसले आहे तर ! काका मिरजेच्या कोटाबरोबर भांडत बसलेत्,पण मिरजेचा भुईकोट म्हणजे मातीचा. तोफा डागून उपयोग नाही.भोवती खंदकही आहे. आदिलशाही अंमलदारही हुशार दिसतो.काकांचा वेळ ईथे वाया जाता कामा नये. त्यांना मोठा आदिलशाही मुलुख मारायची आत्ताच नामी संधी आहे.असे एका ठिकाणी नेतोजी काका ठाणबंद होता कामा नयेत. दस्तुरखुद्द आम्ही उद्याच निघतो. काकांना मोकळे करणे गरजेचे आहे. गोदाजी,पंत,हिरोजी फौजेला तयार रहायचा हुकुम द्या.उद्या सुर्य उगवल्यावर आम्ही गडाबाहेर पडणार आहोत".
राजांनी एकाच मुक्कामानंतर मिरज गाठले. ईतक्या तातडीने राजे आलेले बघून नेतोजी घाईघाईने पुढे झाले आणि मुजरा घालून म्हणाले,"महाराज, वार्याच्या वेगाने आलात जणू. या कोटाला वेढा घातला, पण तोफा चालेनात, काही भेद दिसेना आणि किल्लेदार बी चिवट आहे. पण अजून मी हिंमत हरलो नाही.ह्यो चाँदतारा उखडून फेकणारच".
"काका ! तुम्ही पराक्रमाची शर्थ करीत आहात.पण या अश्या एका ठाण्याला वेळ घालवून उपयोगाचे नाही.अद्याप विजापुर दरबारातून काही हालचाल झालेली नाही. वेळ आहे तोपर्यंत त्यांच्या मुलुखात खोल शिरा.मिरजेच्या ठाण्याची आघाडी आम्ही सांभाळतो"
दुसर्या दिवशी सकाळी नेतोजी फौज घेउन आदिलशाही मुलुखात उगवतीकडे निघून गेले. महाराजांनी मिरजेच्या कोटाभोवती तातडीने वेढा आवळला. पण किल्लेदारावर त्याचा काही परिणाम झाला नाही, तो तितक्याच चिवटपणे पुन्हा उभा राहिला.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
माघाची कडाक्याची थंडी पडली होती. विजापुरावर रात्र पसरली होती. बहुतेक घरातील दिवे, महालातील हंडयातील दिवे विझले होते. नाही म्हणायला रस्त्यावरच्या मशाली अजून जळत होत्या. शहराच्या तटबंदीवर मात्र पहारेकर्यांची गजबज जाणवत होती. फांजीवर फिरता फिरता त्यांचे "होशिय्यार"च्या आरोळ्या सुरु होत्या. सगळे शहर निद्रेच्या अधीन झाले तरी राजवाड्यातील एका दालनात अजून जाग दिसत होती. बडी बेगम अवस्थपणे आपल्या पलंगावर कुस बदलत होती. 'सिवाचे काय करायचे?' हाच तीच्या अस्वस्थपणाचे कारण होते. गेले दहा वर्ष विजापुर दरबाराने सैन्य,सरदार त्या शहाजीच्या बेट्यावर पाठवायचे आणि फौज मार खाउन परत यायची हा शिरस्ताच झाला होता. शहाजीला कैद करुन पाहीले, नतीजा! त्याला सोडावे लागले. फत्तेखान्,फाझलखान्,रुस्तमेजमा हि किमान जिंदा परत आले तरी, मुसेखान आणि अफझलसारख्या बड्या सरदाराला त्या मावळाच्या मुलुखाने गिळून टाकले. गेले दहा वर्ष मुहमदशहा आजारी, त्यात दरबारात दख्खनी विरुध्द पठाण अशी सरदारात दुफळी. तरी आपण हि आदिलशाही धुरा सांभाळली.चार साल मागे मुहमद बादशहा अल्लाला प्यारे झाले आणि अलिवरुन दरबारात फिर एक बार नाराजी झाली, पण कशीबशी ती मिटवली, पण त्या सिवाची बंडखोरी अशीच चालु राहिली, तर मुष्कील आहे.नेतोजी आपल्या मुलुखात धुमाकुळ घालतो आहे,त्याला रोखायला सरदार नाही. काय करावे ?
अखेरीस पलंगावरुन उठून बडी बेगम येरझार्या घालू लागली. तीचे विचारचक्र सुरुच होते,'आता दरबारातील कोणा सरदाराला सिवावर पाठवण्यात अर्थ नाही. एकतर सगळेच मनातून घाबरलेत. डरा हुआ सिपाही पहलेही हारा होता है. आता अशी सोंगटी हलवायला पाहीजे, जी या सगळ्या पटापासून लांब असेल.'
अचानक तीला पाच दिवसापुर्वी आलेल्या खलित्याची आठवण झाली. कर्नुल जहागिरीतून पत्र आले, म्हणल्यावर तीच्या कपाळावर आठी उमटली. कर्नुल म्हणजे तो बगावतखोर सिद्दी जोहर ! खलिता उघडून तीने जेमतेम नजर फिरवली. काही वेगळे नव्हते, मुआफीनामा होता. आधीही तीन-चार वेळा मसुदने असाच मुआफीनामा पाठवला होता.तीने खलिता कारकुनाच्या हवाली केला आणि बस्त्यात गुंडाळून ठेवायला सांगितला.
एकदम बडी बेगमला कल्पना सुचली,' हा जोहर त्या मराठी मुलुखावर कधी गेला नाही.लांब तिकडे कर्नुलला कुतुबशाही मुलुखावर राहीला, त्यालाच पाठविले तर ?' पेच थोडा तरी सुटल्याचे समाधान बेगमेच्या चेहर्यावर दिसु लागले. पण एवढ्याने तो सिवा संपणार नव्हता. यापुर्वी महमंद बादशहा आणि शहाजहान यांनी शहाजीच्या खिलाफ वापरलेली युगत वापरायला हवी. औरंगजेबाला खलिता पाठवून त्याचा एखादा सरदार सिवाच्या मुलुखावर पाठवायला सांगायचा आणि विजापुर दरबार सिद्दीला पाठवेल. बस्स !'
आता कोठे बेगम शांतपणे पलंगावर आडवी झाली आणि दुसर्या दिवशी हे दोन्ही खलिते रवाना करायचे हे नक्की करुन शांतपणे झोपण्यासाठी तीने डोळे मिटले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
किल्ले कर्नुल ! आपल्या दालनात जोहर अस्वस्थपणे बसला होता. तो कोणाची तरी वाट बघत होता.इतक्यात पहारेकर्‍याने वर्दी दिली, "मसउद बाहेर आला आहे".त्याला ताबडतोब आत पाठवण्याची आज्ञा जोहरने केली. अदबीने मसुद आत आला, मुजरा करुन अदबीने समोर बसला. "अब्बाजान ! आप काफी फिकरमंद लग रहे हो ! क्या बात है ?"
"काय सांगु बेटा, विजापुर दरबार आमच्यावर सक्त खफा आहे, तीन मुआफीनामे आम्ही पाठवले, पण एकाचाही जवाब नाही. काय करावे समजत नाही?"
"पण अशी काय गलती झाली तुमच्याकडून ?" मसुदने विचारले.
"काय सांगणार बेटा ? तसे आपण सिद्दी या मुलुखाला परायेच ! आपल्या पुरखांचा देश अफ्रीकेतील हबसान. अरब व्यापार्‍यांना हिंदुस्थानात येताना गलबतावर स्वस्तात गुलाम लागायचे. हबसानातील आपले सिद्दी लोक स्वस्तात विकत घ्यायचे आणि त्यांना बरोबर घेउन या हिंदुस्थानात यायचे हा अरबांचा शिरस्ता. आज आपले जातभाई मराठ्यांच्या देशापासून , कर्नाटक, केरळ सगळीकडे गेले. मलिक अंबर्,जंजिर्‍याचा सिद्दी हे आपले लोग तर अधिकारी झाले.मी ईथे मलिक रेहमानचा चाकर म्हणून लागलो. मालकासाठी रात दिन देखी नही.बस मालिक हुकुम करणार, हा चाकर ती पाळणार.पण मलिक गेला आणि त्याचा बेटा निकम्मा असून हुकुम चालवायला लागला, त्याला बाजुला करुन मी या कर्नुलची जहागिरी घेतली, म्हणून सल्तनते आदिलशाही मुझपे खफा है". जोहरने त्याच्या मनाची व्यथा सांगितली.
"मसुद या आधी मी दरबारात तीन वेळा माफीनामा सादर केला,पण दरबाराकडून काहीच जवाब येत नाही".खुप वेळ जोहर व मसुद बोलत बसले.
एक आठवड्यानंतर जोहर रपेटीला बाहेर पडला, तोच हुजर्‍या धावतधावत आला आणि घाईत म्हणाला,"हुजुर जल्दी चलिये, बिजापुरसे कोई संदेशा आया है".
बिजापुर !!! तातडीने घोड्यावरुन उतरुन जोहर सदरेवर आला. सदरेवर विजापुर दरबाराचा खिदमदगार काशी तिमाजी वाटच बघत होता.जोहर आल्यावर त्याने खलिता पुढे केला आणि म्हणाला, "सरदार ! विजापुर दरबार आणि माबदौलतने आपल्याला याद फर्मावली आहे.आपको यहांसे लेके जाने के लिये मै आया हुं"
"खानसाहेब हा खलिता घ्या आणि वाचा" तिमाजीने खलिता पुढे केला आणि जोहर तो उघडून घाईने वाचू लागला, "आमच्या निसबतीस असे दुसरे पुष्कळ लोक आहेत की, जे आजच्यासारखे (शिवाजीला नेस्तनाबूत करण्याचे) काम करण्याची इच्छा करीत आहेत. एवढेच नाही, तर ते करुनही दाखवतील, पण तुम्ही स्वतः होऊन या चाकरीसाठी अर्ज केलात, म्हणून तुम्हास हुकूम करण्यात येत आहे की, हे काम तुम्ही करुन दाखवावे आणि बादशाही मेहरबानीस उमेदवार व्हावे".
विजापुर दरबाराला शेवटी आपली आठवण झाली तर ! आनंदाने तिमाजीचे हात हातात घेउन जोहर म्हणाला,"शुक्रीया काशिजी ! आपने मेरे इस अंधेरेभरे जीवन मे आशा का नया दीया जलाया. मै हमेशा आपका मेहेरबान रहुंगा. आप थोडा आराम फर्माईये. मै बिजापुर जाने कि तयारी करता हुं. हम कल सुबह ही रवाना होंगे"
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
विजापुर दरबाराचे नेहमीचे कामकाज चालु होते, इतक्यात दरबाराच्या हुजर्‍याने वर्दी दिली, कर्नुलचे सुभेदार जोहर आणि काशि तिमाजी पधार रहे है. बडी बेगमेच्या चेहर्‍यावर स्मित उमटले,मात्र चिकाच्या पडद्याआड असूनही तीने लगेच भाव बदलले आणि जोहर आल्याची दाद न घेता, तीने अलिला दरबाराचे पुढचे काम सुरु ठेवायची आज्ञा दिली. जोहर आणि तिमाजी आदबीने आले, मुजरा करुन एका बाजुला उभे राहिले.बराच वेळ दरबाराने त्या दोघांची दखल न घेता काम चालु राहिले. शेवटी एकदाचे जोहरला पुढे बोलवण्यात आले आणि बेगम कणीदार आवाजात म्हणाली, "जोहर, वैसे तुम्हारी बगावतखोरी के वजहसे माबदौलत तुम पे खफा है, लेकीन तुमने सच्चे दिलसे इस दरबार को माफीनामा पेश किया ऐसा मान कर हम तुम को मुआफी बक्षते है. लेकीन तुला इनामदारी दाखवावी लागेल.या दरबाराशी तु एकनिष्ठ आहेस हे सिध्द करावे लागेल".
बडी बेगमचे हे बोल एकून जोहरला दिलासा मिळाला.निदान या दरबाराने आपल्याला स्विकारले तरी ! आता जी काही कामगिरी मिळेल ती जी जान से पार पाडू आणि पुन्हा गेलेली पत मिळवू असा विचार करुन जोहर नम्रपणे म्हणाला,"जी माबदौलत ! जीस मोहिमपे आप हमे तैनात करेंगे हम वहां जाने के लिये तैय्यार है".
त्याचे हे बोल एकून आलि आणि बडी बेगम विलक्षण खुश झाले.मुख्य म्हणजे दरबारातील सरदारांना हायसे वाटले.पुन्हा सिवावर जायचे या कल्पनेनेच अनेकांना घाम फुटायचा. हि बला जोहरच्या गळ्यात पडलेली बघुन बहुतेक सरदारांना सुटल्यासारखे वाटले.
बेगमने त्याला कामगिरी सोपवली, "जोहर, शहाजीका बेटा सिवा मावल परगणे मे बगावत फर्मा रहा है. तसे तर या दरबारात त्याला मारायला बर्‍याच सरदारांचे हात शिवशिवत आहेत.पण तुझा अर्ज आला आहे, म्हणून हा मोका आम्ही तुला देत आहोत.इस दरबार को यकीन है, तु तुझा पराक्रम दाखवशील. तुला किती फौज्,घोडे,हाती पाहिजेत ते वजीराला सांग.पातशाही खजान्यातून तुला हवी तितकी रकम मिळेल.लेकीन हमे फतेह चाहीये. सिवा को पुरी तरह बरबाद करना है. तुम इस मोहिम के लिये तय्यार होकर माबदौलत कि हुकुम को सर आँखोपर रखा.इस लिये ये दरबार तुम्हे "सलाबतखान" ( म्हणजे कबुलीचा अधिपती ) इस खिताबसे नवाजता है और काशि तिमाजी को "दियानतराव" ये खिताब देता है"
"वाह्हवा !!" दरबारातून एकच आवाज उमटला.
जोहरला हि अंगात बारा हत्तीचे बळ संचारल्यासारखे वाटले. ईतक्यात सरदाराच्या गर्दीतून फाझलखान आणि रुस्तमेजमा पुढे आले, मुजरे घालून म्हणाले,"जर हुजुरांची परवानगी असेल तर या मोहीमेत जोहरबरोबर हमे भी शामील होनेकी ख्वाईश है"
बेगमेला काहीसे आश्चर्य वाटले. दोनदा शिकस्त खाउन आलेला फाझल पुन्हा सिवावर जाउ इच्छीतो. त्याच्या जिद्दीचे तीला आणि अलिला कौतुक वाटल्याशिवाय रहावले नाही. दोघांना या मोहिमेत सामील होण्याची परवानगी मिळाली. या एकुण नव्या मोहीमेने वारंवार मार खाल्लेल्या विजापुर दरबाराला नवसंजीवनी मिळाली.एक चैतन्य सगळीकडे पसरले. घोड्यांना खरारा सुरु झाला, नवे नाल ठोकले जाउ लागले, हत्तीना रपेट सुरु झाली.धान्य भरुन बैलगाड्या विजापुरच्या वेशीबाहेर उभ्या ठाकत होत्या, गवत भरुन छ्कडे माळावर पसरले होते,तोफांच्या गाड्यांना तेलपाणी सुरु झाले. मोहीमेची तयारी झाल्यानंतर एके दिवशी १५ ते २० हजार घोडेस्वार, ३० ते ४० हजार पायदळ आणि सोबत सरदार होते रुस्तमजमान, फाझलखान, सादतखान, बाजीराव घोरपडे, पिउ नाईक, भाईखान, सिद्दी मसुद आणि अर्थात सलाबतखान सिद्दी जोहर. एके दिवशी मावळतीच्या वेशीतून हा सेनासागर बाहेर पडून निघाला. कोठे ? काफीर सिवा भोसल्याचा नायनाट करायला.
राजे इकडे मिरज उर्फ मुर्तिजाबाद किल्ल्याशी अजून झुंजतच होते. आत्तापर्यंत बहुतेक आदिलशाही ठाणी मराठी फौजेसमोर लोळागोळा होत असताना, हे एकच ठाणे झुकायला तयार नव्हते. वेढा चालु असताना खबरा येत होत्या, नेतोजींनी घातलेला आदिलशाही मुलुखातला धुमाकुळ समजत होता. एके दिवशी मात्र काळजीत पाडणारी खबर आली. विजापुरातून सिद्दी जोहर नावाचा सरदार भलीमोठी फौज घेउन मिरजेच्या रोखाने निघाला होता. आता वेढा चालविण्यात अर्थ नव्हता. उघड्या माळावर मोठ्या फौजेशी मुकाबला शक्यच नव्हता.
"राजे आता आपल्याला हालचाल करायला पाहीजे.पुन्हा प्रतापगड गाठायचा का? ईतक्या मोठी फौजेला मार द्यायचा म्हणजे तशीच अडचणीची जागा पाहीजे." खलबतासाठी बोलावलेल्या बैठकीत सुर उमटला.
"हुं! प्रतापगड सुरक्षित जागा खरी, पण एक लक्षात घ्यायला पाहिजे, हा कोल्हापुर ते वाई सगळा मुलुख नव्याने आमच्या स्वराज्यात सामील झाला आहे. आम्ही प्रतापगडी गेलो तर जोहर आमच्या मागोमाग येणार आणि हा सगळा मुलुख उजाड करत जाणार. हि आता आमची रयत आहे, त्यांना तोशिष न लागू देणे आमची जबाबदारी आहे. अफझलच्या स्वारीच्या वेळी तर आमच्या देवदेवतांनाही उपद्रव झाला होता.स्वराज्य हे यासाठी आहे का? तेव्हा आपल्या मुलुखात शत्रुला खोल घुसायची संधी न देता, त्याला सीमेवरच रोखूया. स्वराज्यात नव्याने सामील झालेला पन्हाळा मोठा बळकट दुर्ग आहे. धान्य, दारुगोळा पुरेसा आहे.तेव्हा पन्हाळगडी बैसून सिद्दीशी मुकाबला करावा हे उत्तम ! शिवाय नेतोजी काका विजापुर मुलुखात आहेतच.गरज पडल्यास ते विजापुरवर गेले तर सिद्दीवर दाब आणता येईल."
सगळ्यांनाच हि मसलत पटली.एके दिवशी राजे सर्व सैन्य गोळा करुन मिरजेचा वेढा उठवून पन्हाळ्याच्या दिशेने निघून गेले. बडे बडे सरदार ज्याचे नाव एकले तरी कापतात, त्या सिवाची आपण डाळ शिजू दिली नाही म्हणून किल्लेदार बुरुजावर उभा राहून पाठमोर्‍या फौजेकडे पाहून छद्मी हसत होता.
( क्रमशः )

पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग १ )

 

पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग १ )

पोस्टसांभार : http://www.misalpav.com/node/47195

मौजे केर्ले-मार्गशीर्ष महिन्यातील एक निवांत दुपार. रब्बीची पेरणी होउन गाव तस निवांत झाले होते.गावकर्‍यांशी हवापाण्याच्या गप्पागोष्टी उरकून गावचा पाटील पारावर निवांत पसरला होता. डोक्याशी कुर्‍हाड ठेवून तो निवांत पारावर पसरला होता. भल्या पहाटे थंडीचे श्रम केल्याने त्याचा डोळा लागला इतक्यात गावच्या वेशीतून पोरेटोरे गलका करत चावडीकडे पळत आली. पोरांच्या दंग्याने जागा झालेला पाटील खेकसलाच,"काय कालवा लावला रे?". पोरं घाईघाईने बोलु लागली.पळाल्यामुळे धापा टाकता टाकता त्यांनी सांगितले कि उगवतीकडून एक फौज येत आहे.
फौज ?
पाटलाच्या कपाळावर आठ्या उमटल्या. आत्ता तर खरीपाची वसुली करुन बादशाही अंमलदार गेले होते.मग हि पातशाही भुतावळ पुन्हा गावाकडे कशासाठी आली असेल ? बर काही गुन्हा,तंटाही झाला नव्हता. आणि झाला असता तरी त्यासाठी इतकी फौज यायचे कारण नव्हते.
विचार करायला फार वेळ नव्हता,पाटलाने घाईघाईने कुर्‍हाड उचलली, पोरांना दरडावून घरात लपायला सांगितले आणि गावाच्या वेशीकडे तो निघाला. वेशीबाहेरच्या झाडाखाली डोळ्यावर हात धरुन पाटील निरखून बघत होता.धुळ उडत होती, घोड्यांचा टापा एकु येत होत्या.नक्कीच फौज होती. आता हि साडेसाती परत का आली? पुढ्च्या आक्रिताच्या कल्पनेने पाटलाच्या पोटात गोळा उठला.तरीही धीर धरुन तो नेटाने तिथेच उभा राहीला. फौजा जवळ आल्या, तसे धुळीतून सैनिक दिसायला लागले. आणि पाट्लाला एक महत्वाची गोष्ट दिसली.
भगवे निशाण !!
पातशाही फौजेत भगवे निशाण ? आँ ? अचानक त्याच्या डोक्यात उजेड पडला. हि आदिलशहाची भुतावळ नव्ह्ती.हे तर आपलच राजं ! शिवाजी राजे !! केर्ले गाव गेली कित्येक वर्ष करवीर परगण्यात आदिलशाहीच्या वरवंट्यात भरडत होतं.पण लांब तिकडे कर्यात मावळात्,पुण्याकडल्या अंगाला शहाजीच्या ल्येकाने स्वराज्याचा डाव मांडल्याच्या खबरा येत होत्या. जेजुरीला जाणारे भाविक,वारीला जाणारे वारकरी आणि व्यापार्‍यांकडून बातम्या मिळायच्या. आपला ह्यो मुलुख कधी या जाचातनं सुटायचा ? पाटलाला खंत वाटायची. शिवाजी राजाची नजर इकडे कवा वळायची तवाच सुटका व्हायची. पण त्यो क्षण आलाच जणु. आठवड्यामागं जावळीच्या रानात प्रतापगडाच्या पायथ्याला विजापुरच्या अफझुलखानाला मारल्याच्या बातम्या आल्या होत्या. आज दस्तुरखुद्द राजाची फौज गावात आली होती. हरखलेल्या पाटलानं कुर्‍हाड बाजुला टाकली आणि तो पुढ झाला.
इतक्यात फौज जवळ आली. खिंकाळणारी, फुरफुरणारी घोडी जवळ आली, निशाणाचा घोडा तर उधळत होता. बघता बघता मराठे सैन्य पाटलाच्या पुढ्यात आले सुध्दा. खुद्द शिवाजीराजेच पुढ होते. पाटलाने राजांना आधी बघितले नव्हते, पण त्या तेजपुंज घोडेस्वाराला बघून पाटील उमगून गेला, 'ह्येच शिवबा राजं'. पातशाही अमंलदारासमोर नाईलाजाने कंबर वाकवायची सवय लागलेल्या पाटील नकळत अदबीने झुकला आणि त्रिवार मुजरा केला. हात जोडून तो उभारला.
राजे घाईत होते. पन्हाळयाचा बुरुज आता उत्तर आस्मानात दिसत होता आणि त्यावर उन्मत्तपणे फडकणारे ते आदिलशाही निशाण आता उडवायचे होते. वेळ नव्हताच. पाटलाची वास्तपुस्त करुन आणि त्याला धीर देउन राजांनी घोडा फेकला आणि मागोमाग फौजा उधळल्या. पाटलाला भरुन आले. लई हाल सोसले, आयाबहीणी लुटताना पाहील्या, टोळधाड परवडली अशी बादशाही फौजांनी केलेली लांडगेतोड निमुटपणे सोसली. आता सुटका होणार ,सुखाचे दिस येणार, कधी नव्हे ती निवांत झोप लागणार. पाटलाने वाडी रत्नागिरीच्या डोंगराला हात जोडले,'देवा जोतिराया ! राजाला यश दे ! ह्यो मुलुख त्या पातशाही दैत्याच्या तावडीतून सोडव".
राजांची फौज गेल्या काही दिवसात विजयाची भुकेली होती. हात घालावं त्या मुलुखात यशच मिळत होत. आता समोर होता प्राचीन थेट शिलाहारांशी नाते सांगणारा पन्हाळागड, पर्णालक दुर्ग. आता हा गड घ्यायचाच. ताबडतोब फौजा पांगल्या एक तुकडी मावळतीकडे तीन दरवाज्याचा मोहरा घेउन पांगली. एक तुकडी उत्तर अंगाशी भिडली, तर खुद्द राजे उगवतीला उभे होते, त्यांच्या बाजूने चार दरवाज्याला मराठे गुळाला मुंग्या चिकटाव्यात तसे चिकटले. गडावरचा आदिलशाही किल्लेदार बावचळलाच. गड म्हणावा तसा चोख नव्हता. गरजच काय ? भोवताली एसैपैस आदिलशाही मुलुख पसरलेला. मोगलांचा थोडा धोका होता, पण औरंगजेब दक्षीणेतून उठून दिल्लीला गेला, पातशहा झाला आणि तो दाब गेला. नाही म्हणायला शहाजीचा मुलगा सिवाने तिकडे मावळात धुमाकुळ घातलेला होता, पण तो ईकडे लांब पन्हाळ्यावर कशाला येतोय. शिवाय पातशाहांनी अफझलखानाला नुकताच तिकडे पाठविला होता. तो त्या शिवाला संपवणार नाही तर पकडून विजापुरला नेणार.शहाजीला या अफझलखानाने असाच पकडून नेले नव्हते का ? आदिलशाही किल्लेदार का निवांत नसावा ?
पण पाच दिवसापुर्वीच गडावर खबर आली होती. अफझलखान बिन महमदशाहीला त्या शिवाने प्रतापगडावर फाडला होता. या खुदा ! किल्लेदार सुन्नच झाला. त्याचा कानावर विश्वास बसत नव्हता. पुन्हा पुन्हा त्याने जासुसाला खोदून विचारले, जवाब एकच, 'होय ! खानाला मारले'. किल्लेदाराचे हातपायच गळाले. हबकलाच तो. अचानक झट़का आल्यासारखा उठला आणि गंगा,जमुना कोठीकडे पळाला.कोठीजवळच्या पहारेकर्‍याला समजेना ,किल्लेदाराला काय झाले.कोठी उघडायचा हुकुम झाला.धान्याची पोती पुरेशी आहेत याची किल्लेदाराने स्वताच्या डोळ्यांनी खात्री केली. आता वेळ होती दारु कोठार बघायची. तीन दरवाज्याकडे किल्लेदार धावत निघाला. तिन्ही दरवाजे आणि बुरुजांची पहाणी करुनही त्याचे समाधान झाले नाही. जो सिवा अफझलखानासारख्या नामांकित सरदाराला सैन्यासह गिळतो, त्याच्याशी हा किल्ला किती दिवस मुकाबला करेल ? कसलीच खात्री नव्हती. पण आता आदिलशाही चांद तार्‍यासाठी, धर्मासाठी, इस्लामसाठी झुंजायचे होते. घाइघाईने त्याने गडावरचा जासूस बोलावला आणि रसद, दारुगोळ्यासाठी विजापुरला पत्र लिहीले.जासूस रवाना झाला. आता जरा किल्लेदाराचे मनाचे समाधान झाले.पण ..... अचानक दुपारी गडावर जासूस मनहुस खबर घेउन आला. सिवाने कोल्हापुर घेतले. सिवा कोल्हापुरात आला, म्हणजे तो आता पन्हाळ्यावर येणार हे नक्की! या खुदा ! गड अजून होशियार नाही आणि या सैतानाला तोंड द्यायचे कसे ?
आले,आले म्हणेपर्यंत ते मनहुस मराठे मुंगळ्यासारखे गडाच्या चोहोबाजूने पसरलेले दिसू लागले.गडाला चिकटून वर यायला लागले.घर फिरले कि वासे फिरतात, याचा प्रत्यय किल्लेदाराला आलाच. गडाच्या घेर्‍यातील गावे या सिवाच्या मराठ्यांच्या मदतीला धावली. दगाबाज ! पण आता वेळच नव्हता. वेड्यासारखा सैरावरा किल्लेदार तटावरुन पळायला लागला. आदिलशाही सैनिक बाण चालवायला लागले, गोफणगुंडे सुटले.तोफा फुटायला लागल्या.पण काही उपयोग होत नव्हता.एकीकडून या मराठ्यांना आवरावे तो दुसरीकडून चढून येत होते.बर गड औरसचौरस पसरलेला. आवरायचे तरी कसे ?नतीजा ?
आता सुर्य मावळून अंधार पडला होता. अंधार तर या मावळ्यांचा कित्येक वर्षाचा सखा. रात्र झाली कि सह्याद्रीच्या भुताना दुप्पट अवसान चढायचे, ते बादशाही फौजेला एकायचे होय. एखादा मावळा आत आला कि तो तोफा उडवणार्‍याला गारद करायचा.अखेर गडाला माळा लागल्या. भराभर मावळे चढून येउ लागले. ईकडे चार दरवाज्याच्या चोर दिंडीतून मराठे आत घुसले, दरवाजा करकरत उघडला आणि बघता बघता मावळी भुते आत घुसली.शाही किल्लेदार शर्त करत होता.'मारो ! काटो ! शिकस्त करो !' आरडाओरडा, थयथयाट सुरु होता, पण विजापुर सैन्याचा धीर सुटला.एवड्यात अंधारातून एक वार खाशा किल्लेदाराच्या मानेवर झाला, त्याचे मुंडकेच तुटून जमीनीवर पडले आणि शाही फौजेचा प्रतिकार संपला.
संबंध गडावर एकच आरोळी उठली. "हर हर महादेव !".
त्या अर्धवट प्रकाशात विजयी आनंदात काही मावळे गडाच्या खाली मशाली घेउन धावत सुटले. राजांना या आणखी एका नव्या विजयाची वार्ता द्यायची होती. अर्थात त्यात नवीन काय होते, कारण गेले पंधरा दिवस उगवणारा नवा सुर्य फक्त विजयाच्या वार्ता घेउन येत नव्हता का ? गडाखालच्या गावात राजे पुढचा मनसुबा रचत आणि गावकर्‍यांशी बोलत बसले होते. राजांना मुजरा घालून आनंदाची बातमी दिली गेली." राजे ! गड फत्ते, पन्हाळा काबीज झाला".सगळीकडे एकच खुशीची लहर उठली. राजांबरोबर असलेले बाजी, फुलाजी साखरा वाटु लागले.ईतक्यात राजे उत्तरले, "बाजी आम्ही गडावर जाणार"
बाजी थक्क झाले "इतक्या रात्री ? राजे गड आता आपल्याच ताब्यात आहे.उद्या सकाळी सगळेच गडावर गेलो तर?".
राजे आतूरतेने म्हणाले,"नाही बाजी ,आम्हाला हा पन्हाळा आत्ताच बघायचा आहे.अहो फार प्राचीन गड आहे हा. शिलाहारांनी वसवलेली हि राजधानी या पातशाही जुलुमाने बाटली होती.गडावरची दैवत जुलुम सहन करत निमुटपणे चोरून रहात होती.आता या गडावर भगवे निशाण लावले आहे.तीनशे वर्षानंतर आज कोठे गड मोकळा श्वास घेतो आहे. आज आमचे देवदेवता भरभरुन आशिर्वाद देत आहेत, आज या गडावर स्वराज्याचा मोकळा वारा वाहतो आहे.गड आम्हाला आजच बघायचा आहे.रात्र झाली, अंधार झाला म्हणून काय झाले? मशालीच्या उजेडात आपण हा महादुर्ग बघुया".
घोड्याला टाचा मारल्या गेल्या आणि अंधारात मार्गशीर्षाच्या थंडीची पर्वा न करता महाराज आणि साथीदार पन्हाळ्यात पायउतार झाले. मावळे दिवट्या घेउन धावले आणि त्यांच्या सोबत महाराज गड निरखू लागले. हा सज्जाकोठी, हा गरजणारा वाघ दरवाजा, उत्तरेला रोख धरलेला दुतोंडी बुरुज, पिछाडी सांभाळणारा पुसाटी बुरुज, शिलाहारांचे स्थापत्य सांगणारा तीन दरवाजा आणि शेजारचा जलमहाल असणारी श्रीनगर उर्फ अंधारबाव, पराशर ऋषींच्या तपश्चर्येची साक्षीदार असणारी लगुडबंद, दौलती बुरुज, कलावंतीणिचा सज्जा, सादोबा,सोमेश्वर तलाव हे गडाची तहान भागवायला समर्थ होते, तर पोटात अनेक धान्याची पोती साठवणार्‍या त्या गंगा,जमना कोठ्या.सारे सारे पाहून महाराज प्रसन्न झाले.
राजांना गड ताब्यात असण्याचे महत्व ठाउक होते. नवीन गड बांधाण्याची हौस होती.यामुळे प्रचंड खर्च व्हायचा. नवीन गड उभारण्यासाठी पैशाची तरतुद करायची वेळ यायची, तेव्हा कारभारी म्हणाले,"महाराज, हे गड उभारायचे म्हणजे फार खर्च येतो. हा खर्च करायलाच पाहिजे का ?"
"गड नसता राज्य देश मोकळा रहातो.परचक्र येता प्रजा निराश्रय होते. आमचा पुणे परगणा कसा उध्वस्त झाला पाहिला कि नाही ? त्याचवेळी गडाचे महत्व आमच्यावर ठसले. आता आम्हाला स्वराज्य उभारायचे असेल तर बळकट किल्ले तय्यार ठेवायला हवेत.तरच या पातशाह्यांशी आम्ही टक्कर घेउ शकतो".
गड ताब्यात येउन चार दिवस उलटले. महाराज सदरेवर बसून गडाची व्यवस्था तपासत होते.गडाखालची गावे.महसुल, खुद्द गडाची तब्येत सांगणारी कागदपत्रे राजे जातीने तपासत होते. तोच हुजर्‍या आत आला आणि मुजरा करून वर्दी दिली,"महाराज गडावर सरनौबत येत आहेत". सरनौबत म्हणजे नेतोजी काका. नेतोजीना महाराजांनी अफझलखानाला मारल्यावर आदिलशाही मुलुखावर सोडले होते. सरनौबतांनी मोठाच पराक्रम गाजवला होता. कवठे,बोरगाव्,मालगाव्,कुंडल,घोडगाव्,सत्तीकीर,दोदवाड, सांगली, गोकाक,मुरवाड, कागल,कुरुंदवाड्,किणी,आरग, अथणी,तिकोटे मोठा प्रदेश ताब्यात घेउन नेतोजी पन्हाळगडावर दाखल झाले. महाराज जातीने सदरेबाहेर आले, तोच नेतोजी आलेच. गळाभेट घेउन क्षेमकुशल झाले. नेतोजींनी सारी मुलुखगिरी सांगितली. महाराजांना परमसंतोष झाला. नेतोजीनी पुढची कामगिरी विचारली. महाराजांनी आज्ञा केली, "काका ! पन्हाळ्यासारखा बळकट किल्ला आताच स्वराज्यात दाखल झाला आहे.आता या मुलुखाचा चोख बंदोबस्त व्हायला हवा आहे. अजून काही आदिलशाही ठाणी आपल्या ताब्यात आलेली नाहीत. मिरजेचा भुईकोट असो किंवा मावळतीकडचा खेळणा असो, हि ठिकाणे नसतील तर पाचरीसारखी आपल्याला रोखत रहातील. तुम्ही एक तुकडी खेळण्याला पाठवा आणि तुम्ही स्वत: मिरज्,रायबागकडे कुच करा,अजून आदिलशहाचा दरबार भेदरलाय, त्यानाच आजून एक मावळी हिसका दाखवुया.".
लगोलग नेतोजी बाहेर पडलेच.यंदाचे सीमोल्लंघन जणु दसर्‍याला न होता मार्गशीर्षात झाले होते. लगोलग चार पाच दिवसात खेळणा घेतल्याची बातमी गडावर आली देखील. राजे लागलीच खेळण्यावर रवाना झाले. नवा मुलुख घेतल्याच्या बातम्या तर रोजच्याच झाल्या होत्या.
गजापुरच्या घनदाट झाडीतून राजे अखेरीस खेळण्याच्या पायथ्याशी आले. पाताळाशी स्पर्धा करणार्‍या त्या दर्‍या, फक्त वार्‍याला फिरकू देणारे सह्यकडे आणि आडवातिडवा पसरलेला तो खेळणा महाराजांना विलक्षण आवडला. गडाच्या उगवतीची वाट विलक्षण अरुंद, बर तिथून चढायचे म्हणजे अवघड पायर्‍या आणि वर लक्ष ठेवणारा तो मुंडा दरवाजा. मावळतीकडची वाट तर थेट घसरगुंडीच जणु. हा गड ताब्यात आला म्हणजे तळकोकणाचे नाकच हातात आल्यासारखे होते. ईथून आता मराठी फौजा आता आचर्‍यापासून कुडाळपर्यंत जायला मोकळया झाल्या.
एकदा महाराज आणि सर्व साथीदार फिरत फिरत कुवारखांबी कड्यापाशी आले. गडाचा वक्राकार कडा आणि त्याचे एका बाजुला असलेले सुळके मोठे भेदक दिसत होते. गडाच्या पुर्वेला सुर्याचे किरण जमीनीवर उतरणार नाहीत अशी घनदाट झाडी दिसत होती.महाराज हा नजारा बघत हरवून गेले.
नेतोजीच्या उदगारांनी महाराजांची तंद्री भंग झाली, "इतके काय निरखून बघताय महाराज ?".
"काका ! हि घनदाट झाडी बघता आहात. याच जंगलाने , सह्याद्रीने आणि या खेळण्याने एका शत्रुला आस्मान दाखवले होते" राजे उत्तरले.
"हि काय गोष्ट आहे?" सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली. महाराज सांगू लागले, "या गडावर एक निकराची लढाई दोनशे वर्षापुर्वी झाली होती. या भागात बहामनी सुलतानाचे राज्य होते. अल्लाउद्दीन अहमदशहा राजधानी बिदर मधून राज्यकारभार पहात होता.पुर्ण हिंदुस्थानात मुसलमानी राजवट पसरत चालली होती. पण आपल्या या मराठी मुलुखात अनेक मराठा सरदार होते जे स्वतःच स्वतंत्र अस्तित्व राखून होते. अनेकदा हज यात्रेसाठी जलमार्गाने निघालेल्या यात्रेकरूंची कोकणात लूट केली जाई. या सगळ्याचा बंदोबस्त करण्यासाठी अहमदशहाने आपला सर्वात पराक्रमी सरदार खलफ हसन मलीक उत तुज्जार याला कोकण मोहिमेवर पाठवले. मलिक उत तुज्जार सात हजाराची बहामनी सेना घेऊन निघाला. चाकणला त्याने आपली छावणी उभा केली आणि मावळातून तो कोकणात उतरला. रायरी वगैरे किल्ले ताब्यात घेतले. तिथल्या शिर्के नावाच्या मराठा सरदाराला त्याने आपल्या ताब्यात घेतले. या शिर्केना मलिक तुज्जारने मुसलमान होण्याची अट घातली. शिर्के म्हणाले, 'मी धर्मांतर करण्यास तयार आहे मात्र शेजारच्या खेळणा गडावरील माझा शत्रू शंकरराय मोरे याचे देखील धर्मांतर करावे.' शिर्केच मत होतं की फक्त मी जर धर्मांतर केले तर मोरे माझी अवहेलना करेल आणि माझी माझ्या बिरादरीत पत कमी होईल आणि प्रजेचं बंड होऊन माझ माझ्या वाडवडिलांपासुन ताब्यात असलेला प्रदेश माझ्या हातातुन जाईल. म्हणुन माझा प्रतीस्पर्धी शंकरराय याला प्रथम वठणीवर आणा आणि त्याच्या ताब्यातील प्रदेश माझ्या अधिका-यांच्या स्वाधीन करा. त्याचे देखील धर्मांतर झाले तर मला त्रास होणार नाही. अशी विनंती शिर्केनी मलिक उत तज्जारकडे केली. मलिक तज्जारला ठाऊक होते की खेळणा हा अजिंक्य आहे. तिकडे जाण्याचा रस्ता हा बिकट आहे. पण शिर्क्यांनी खेळण्यापर्यंत पोहचवण्याचे त्याला वचन दिले. खेळण्याचा मोह मलिक तज्जारला आवरला नाही. अख्खी कोकणपट्ट्यावर आपलं वर्चस्व निर्माण होईल सुलतानाची शाबासकी मिळेल म्हणून मलिक तज्जार आपली सेना घेऊन शिर्क्यांच्या पाठोपाठ विशाळगडाच्या दिशेने निघाला. शिर्क्यांच्या गोड बोलण्याला मलिक तज्जार भूलला.त्यांनी त्याला सह्याद्रीच्या उंच कड्यावर आणून अडकवले.एकीकडे हे आपण पहातो आहोत ते घनदाट जंगल तर दुसरीकडे हि भयानक दरीकपारी. वाटा वाकड्या तिकड्या. एवढ्या प्रचंड सेनेला धड चालता देखील येत नव्हते. विसाव्याला जागा नव्हती. त्यातच मलिक उतज्जारला रक्ताच्या हगवणीचा त्रास सुरू झाला. त्याची सेना त्या जंगलात बेजार झाली होती. अशातच बेसावध क्षणी शिर्के तिथून सुटले आणि विशाळगडावरच्या शंकरराय मोरेंना जाऊन मिळाले. दोघांनी मिळून ते हजारोंच बहामनी सैन्य सहज कापून काढलं. खुद्द मलिक उत तुज्जार या युद्धात मारला गेला. काका ! सह्याद्रीने हि केलेली मदत आपले लोक पुढे विसरले आणि आपल्या वाडवडीलांना या पातशाही गुलामगिरीला तोंड द्यावे लागले. फक्त आमच्या आबासाहेबांनी प्रयत्नाची शर्थ केली. अगदी हा खेळणा स्वकीयांच्या फितुरीमुळे तो आदिलशाहीच्या ताब्यात गेला."
राजे बोलता बोलता स्तब्ध झाले. सगळेच जण निशब्द झाले.
आडवातिडवा प्रशस्त पसरलेला , शंकरराव मोर्‍याचा पराक्रम आणि मलिक रेहानची फजितीची कथा सांगणारा हा खेळणा महाराजांना आवडला, त्यांनी त्याचे नामकरण केले "विशाळगड".
विशाळगडावर महाराज काही दिवस राहिले आणि पन्हाळ्याला परत आले.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
"बा अदब बा मुजा ! होशियार ! सल्तनते आदिलशाही अली बादशहा पधार रहे है ! खडी ताजीम हो" भालदार,चोपदाराने ललकारी दिली, आणि विजापुर दरबार सुरु झाला. अवघा अठरा वर्षाचा अलि आदिलशहा तख्तावर येउन बसला. गेले महिनाभर दरबार भरायचा, पण कामकाज चालायचे ते जान नसल्यासारखे. जय्,पराजय दरबाराला नवीन नव्हते. पण त्या बंडखोर शहाजीच्या सिवाने अफझलखानाला मारल्यानंतर एक उदासी वातावरणात आली होती. त्यात वाई,मिरज,कोल्हापुरचा बराच मुलुख सिवाने बळकावला होता.आला दिवस काही तरी मनहुस खबर घेउनच यायचा. नुसत्या खबर नाही, तर आठवड्यापुर्वी अफझलचा बेटा फाजलखान विजापुरात आला होता,पण तो अजून घराबाहेरही पडला नव्हता. आज फाजल दरबारात हजर होता.मान खाली असली तर सारखा अस्वस्थपणे हाताचा चाळा करणारा आणि अंग विलक्षण ताठलेला फाझल आज दरबाराने पाहीला होता. ईतक्यात चिकाच्या पडद्यामागे हालचाल झाली आणि समस्त दरबाराने त्या दिशेने मुजरा घातला, बडी बेगम आज जातीने हजर होती. फाझलने ताबडतोब एक अर्जी शिपायाला दिली आणि बडी बेगमकडे सुपुर्द करण्यासाठी दिली आणि मान खाली घालून तो हुकुमाची वाट बघत उभा राहिला.
"तो तुम सिवापर फिर एक बार जाना चाहते हो ?" अर्जी वाचल्यानंतर बडी बेगमचा तीक्ष्ण स्वर दरबारात घुमला.
"हां, बेगमसाहीबा" खाल मानेने पण निश्चयाने फाजल उत्तरला.
"हम तुम्हे जरुर ईजाजत देते है|लेकीन ये मुहीम आसान नही, पता है ना?" पुन्हा एकदा बडी बेगमेने खडया स्वरात विचारले.
"जानता हुं साहिबा, लेकीन पिछ्ले सात दिन सो नही पाया | सोता हुं तो वो शैतान मराठे, जावलीका वो पहाडी और घने झाडीभरा मुल्क और वो चुहा सिवाही सामने आते है | अब्बुजान को तो एक पलभी भुलना मुमकीन नही | उन्हे कोई ईस तरहसे मार सकता है, अभी भी यकीन नही आता | वो तो प्रतापराव मोरे साथ जो उस घने झाडीसे वापस तो आ गये और अल्ला का लाख शुक्र है, हमारा जनाना बच गया|लेकीन अब सोचता हुं, फिर एकबार सिवा पे जा के अब्बाजान कि मौत का इंतकाम लुं, अगर आपकी इजाजत हो तो" फाझलचा स्वर दीन पण निश्चयी होता. त्याला काहीही करुन सिवाला संपवायचे होते. सिवासारख्या दुष्मनाचा काटा निघत असेल असेल तर दरबाराला हवेच होते.अफझल मेल्याने दरबारात जी उदासी पसरली होती, ती फाझलच्या या अर्जीने उडाली आणि पुन्हा एकदा चैतन्य पसरले.बडी बेगमने अर्जी मंजुर केली आणि फौज गोळा करायचा हुकुम केला.
ईतक्यात रुस्तमेजमा पुढे आला आणि मुजरा घालून म्हणाला "बडी बेगम साहीबा, आपली ईजाजत असेल तर या मोहीमेत मलाही सोबत जाण्याची परवानगी द्यावी. त्या नेतोजी आणि सिवाजीने माझ्या मुलुखाला काबीज केले आहे.कोल्हापुर ते रत्नागिरी माझाच मुलुख आहे.मी ही बरोबर जातो आणि त्या सिवाला पन्हाळ्यावरुन हुसकावून शाही चाकरी बजावतो".
रुस्तमेजमा ???
तो पुढे आलेला बघून बडी बेगमेच्या कपाळावर नकळत आठी चढली. सिवा याच्याच मुलुखात घुसतो आणि बरोबर तीन हजार स्वार आणि पायदळ होते.तरी याने त्या भोसल्याला रोखले नाही. हा आणि याचा वालीद पहिल्यापासून शहाजी भोसल्याच्या नजदीकीचे.याचा विश्वास धरावा का?
पण फार विचार करायला वेळ नव्हता. आज सिवाने पन्हाळा घेतला.उद्या तो विजापुरवर आला म्हणजे पळायची वेळ येणार होती. काहीही करुन सिवाचा काटा दुर होत असेल तर बेगमेला ते हवेच होते. तीने ताबडतोब अर्जाला मंजुरी दिली.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
पन्हाळ्याच्या सदरेवर नेतोजी,बाजी,फुलाजी, पन्हाळगडाचे किल्लेदार त्रिंबक भास्कर सगळे जमले होते. गडाच्या आणि ताब्यात घेतलेल्या मुलुखाच्या बंदोबस्ताची चर्चा सुरु होती. आदिलशाही प्रदेशावर कोठे मारा करायचा आणि काय ताब्यात घ्यायचे, याचे बेत आखले जात होते. ईतक्यात हुजर्‍या आत आला आणि मुजरा करुन म्हणाला, "महाराज ! जासुस आला आहे, विजापुरची काही तरी खबर आहे".
"पाठव त्याला आत" राजांनी परवानगी दिली.
जासुस आत आला मुजरा घालून म्हणाला, "महाराज विजापुर दरबारात पुन्हा हालचाली चालु झाल्यात. फाजलखान आणि रुस्तमेजमा फिरुन स्वराज्यावर यायला निघालेत.फौजा जमा केल्यात आणि मिरजेकडे निघालेत. ह्या दोघां सरदारांसमवेत दहा हजार फौज दिली आहे. तसेच हत्ती, तोफा, उंट वगैरे सारा थाट केला आहे.बरोबर मलिक इतबार, सादातखान, फत्तेखान, बाजी घोरपडे, सजेराव घाटगे आदी सरदार आहेत."
"फाजलला पुन्हा मावळच्या मिरच्याच्या ठेच्याची आठवण झालेली दिसते आहे.यावेळी बादशहाने बराच नजराणाही सोबत पाठवलेला दिसतोय" महाराजांच्या मुखावर स्मित होते. सदरेवर एकच हास्य उमटले.
"महाराज, येउ दे फाजलला. वाईत छापा घातला तेव्हा हा फाझल जनान्याबरोबर थोडक्यात निसटला.तेव्हाच तलवारी खाली यायचा, पण नशीब बलवत्तर म्हणून अंधारातून पळाला. आता ह्यो मौका न्हाई सोडायचा.येउ देतच फाझलला".नेतोजी खुशीत म्हणाले.
"होय काका ! सोबत आमचा जुना सखा रुस्तमेजमा आहेच. रुस्तम आमच्या आबासाहेब शहाजी राजांच्या मित्राचा, रणदुल्लाखानाचा मुलगा. विजापुर दरबारात असला तरी आमचा आतून स्नेह आहे बरं का.तो बरोबर आहे म्हणल्यावर फाझल अलगद आमच्या तावडीत येतो कि नाही बघा" राजे उत्तरले.
सगळेजण या नव्या मोहीमेचा व्युह रचायची तयारी करु लागले.

क्रमशः

फतेहखानची स्वारी

 

फतेहखानची स्वारी

 

 

स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या कालखंडातील एक महत्त्वाची घटना (१६४८-४९). मावळातील काही किल्ले, महसुलाची ठाणी आणि काही भूभाग छ. शिवाजी महाराजांनी आपल्या अंमलाखाली आणला होता (१६४८). जी स्थळे आपण घेतली, ती विजापूर राज्याच्या सुरक्षिततेच्या हेतूनेच, अशी भूमिका महाराजांनी घेतली. विजापूर दरबारनेही सुरुवातीस महाराजांच्या या चळवळीकडे फारसे लक्ष दिले नाही; पण महाराजांनी कोंडाण्याच्या (सिंहगडच्या) किल्लेदाराला आपलेसे करून तो आपल्या ताब्यात घेतला. त्या वेळी मुहंमद आदिलशहाचे डोळे उघडले आणि महाराजांच्या विरुद्ध विजापूरचे सैन्य चालून आले.

दक्षिणेत कर्नाटकात विजापूरच्या सैन्यात शहाजीराजे हे अधिकारी होते. त्यांच्यावर फितुरीचा आरोप ठेवून विजापूरचा वजीर मुस्तफाखान, अफजलखान, बाजी घोरपडे यांनी दगलबाजीने अटक केली (१६४८). या अटकेमागे शहाजीराजांच्या कर्नाटकातील वाढत्या प्रभावाला अटकाव करणे आणि छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत व्यत्यय आणणे असे दुहेरी हेतू होते. शहाजीराजांचा संपूर्ण बंदोबस्त करण्याच्या हेतूने कर्नाटकात शहाजीराजांची जहागीर सांभाळणारे छ. शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्यावर फरहादखान आणि प्रत्यक्ष छ. शिवाजी महाराजांवर फतेहखान यांची नेमणूक करण्यात आली. कैदेत पडलेले वडील आणि आपल्यावर चालून येणारे मातबर सरदार यांना घाबरून शहाजीराजांची ही दोन्ही मुले शरण येतील, या गैरसमजातून ही मोहीम सुरू झाली.

सन १६४८ चा पावसाळा संपल्यावर फतेहखान ऑक्टोबर अखेरीस भीमा आणि नीरा ओलांडून जेजुरी जवळील बेलसर येथे पोहोचला. तो सिंहगडावर हल्ला करण्याच्या बेतात होता. परंतु या मोहिमेची कल्पना महाराजांना आधीच आल्याने त्यांनी पुरंदर किल्ला सामंजस्याने मिळवून तेथूनच या मोहिमेस तोंड देण्याचे ठरवले. महाराजांच्या या योजनेमुळे फतेहखानाला बेलसरच्या उघड्या मैदानावर आपला तळ ठोकावा लागला. सिंहगडावर हल्ला न करता त्याने महाराजांच्या ताब्यातील सुभानमंगळ जिंकून शिरवळचे ठाणे ताब्यात ठेवायचे ठरवले. या मागे खानाचे तीन उद्देश होते. एक म्हणजे छ. शिवाजी महाराजांचे लष्करी सामर्थ्य तपासणे, दुसरे पुरंदरावरून शिरवळ सुभानमंगळला होणारी रसद तोडणे आणि तिसरे विजापुरहून अधिक कुमक मागवून पुरंदर किल्ल्यावर सासवड आणि शिरवळकडून दुहेरी आक्रमण करणे.

मोहिमेच्या सुरुवातीलाच फतेहखानाच्या बाळाजी हैबतराव नावाच्या सरदाराने पुरंदरजवळून फारसा अडथळा न होता शिरवळ गाठले आणि सुभानमंगळचा भुईकोट आणि शिरवळचे ठाणे जिंकून घेतले. सुभानमंगळचा भुईकोट आणि शिरवळचे ठाणे जिंकून घेताना बाळाजी हैबतरावाला फारसा लष्करी प्रतिकार न झाल्याने फतेहखान निर्धास्त झाला. शिरवळसारखे महत्त्वाचे ठाणे हातून गेले, तरी विचलित न होता महाराजांनी पुरंदरवर खानाशी लढण्याची तयारी केली होती. सुमारे तीन हजारांहून अधिक जमाव पुरंदरवर जमा केला होता. या जमावात गुंजण मावळचे शिळीमकर देशमुख, मुसे खोऱ्याचे बाजी पासलकर देशमुख, हिरडस मावळचे बाजी बांदल देशमुख, कानद खोऱ्यातील बाबाजी झुंझारराव मरळ देशमुख तसेच गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, कावजी मल्हार, भिकाजी चोर व त्याचा भाऊ भैरोजी चोर इ. निष्ठावान मंडळी होती.

या मोहिमेची सर्व सूत्रे महाराजांनी आपल्या हातात ठेवत कावजी मल्हार यांना शिरवळ ठाणे पुन्हा जिंकून घेण्यास रवाना केले. कावजी मल्हारांचे आडनाव बहुधा खासनीस असून हे बाजी पासलकर यांचे कारभारी असावेत. गोदाजी जगताप, भिमाजी वाघ, संभाजी काटे, भिकाजी चोर, भैरोजी चोर यांच्या समवेत कावजी मल्हार पुरंदरवरून शिरवळवर चालून गेले. बाळाजी हैबतरावानेही कडवा प्रतिकार केला. पण महाराजांच्या सैन्यासमोर त्याचा टिकाव लागला नाही. अखेर कावजी मल्हाराने बाळाजी हैबतरावास गाठून ठार केले आणि शिरवळ पुन्हा एकदा मराठ्यांच्या ताब्यात आले. मोठी लूट आणि किमती ऐवज घेऊन शिरवळचा योग्य बंदोबस्त लावून कावजी मल्हार पुरंदरवर परतला. लगेचच महाराजांनी फौजेची एक तुकडी प्रत्यक्ष फतेहखानच्या तळावर म्हणजेच बेलसरवर पाठवली. या तुकडीचे नेतृत्व महाराजांनी बहुधा साठ वर्षांच्या अनुभवी बाजी पासलकरांकडे दिले असावे. या तुकडी सोबत कान्होजी जेध्यांचे चिरंजीव बाजी जेधे, कावजी मल्हार, बाजी बांदल आणि झेंड्याची तुकडीही होती. या तुकडीने खानाच्या तळावर हल्ला केला; पण विजापुरी फौजेचा प्रतिहल्ला न सोसल्याने मराठा सैन्याला काढता पाय घ्यावा लागला. मराठ्यांचा जमाव फुटला आणि तिथे झालेल्या लढाईत बाजी पासलकर आणि बांदलांचे सुमारे अडीचशे लोक मारले गेले. पण विजापुरी सैन्य फक्त प्रतिहल्ला करून थांबले नाही, तर त्यांनी मराठ्यांचा काही अंतरापर्यंत पाठलागही केला. खळद बेलसरच्या सपाटीवर मराठ्यांनी माघार घेतल्याने फतेहखानाचा आत्मविश्वास दुणावला. त्यानेही वेळ न दवडता पुरंदरवर हल्ला चढवला. एरवी हत्तीघोडे आणि पालखीतून फिरणारे खानाचे सरदार पुरंदरची अवघड चढण पायी चढत होते. महाराजांनी गडावरील तयारीचा अंदाज खानाला येऊ दिला नाही. शत्रू माऱ्याच्या टप्प्यात येताच किल्ल्यावरून दगडधोड्यांचा, पेटत्या पलित्यांचा आणि बाणांचा वर्षाव झाला. त्यातून वाचलेल्या अशरफखान, मिनादशेख, रतनशेख, मताजी घाडगे राजे निंबाळकर यांच्या विजापुरी सैन्यावर भैरोजी चोर, भिमाजी वाघ, गोदाजी जगताप यांची तुकडी तुटून पडली. या सगळ्यांचे नेतृत्व करणाऱ्या मुसेखानला गोदाजी जगतापाने ठार केले. मुसेखान पडल्यामुळे विजापुरी सैन्य चारी वाटांनी पळून गेले. या पळणाऱ्या सैन्याला स्वतः फतेहखानही रोखू शकला नाही. तोही विजापूरच्या दिशेने पळत सुटला (१६४८ अखेर). पुढे शहाजीराजेंच्या सुटकेसाठी महाराजांनी प्रयत्न केले. आदिलशहाने कोंडाणा किल्ला परत देण्याची अट घातली. महाराज किल्ला परत देण्यास नाखूष होते. सोनोपंत डबीर यांनी महाराजांची समजूत घातली व कोंडाणा किल्ला आदिलशहाकडे परत करण्यात आला. त्यानंतर शहाजीराजांची सुटका होऊन त्यांची बंगलोरला सन्मानाने रवानगी करण्यात आली (१६४९). अशा रीतीने स्वराज्यावर आलेले पहिले संकट छ. शिवाजी महाराजांनी यशस्वीरीत्या परतवले. वयाच्या अठराव्या वर्षी महाराजांनी दाखविलेले हे धाडस पाहून सर्वांचेच मनोधैर्य उंचावले.

या मोहिमेत मावळातील वतनदार मंडळींनी महाराजांना निष्ठेने साथ दिली. बाजी कान्होजी जेधे याने पराक्रमाची शर्थ केली; म्हणून महाराजांनी त्याला सर्जेराव ही पदवी दिली.

संदर्भ :

  • कुलकर्णी, अ. रा. जेधे करीना , पुणे, २००७.
  • दिवेकर, सदाशिव महादेव, शिवभारत (कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर), भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९२७.
  • देशमुख, विजयराव, शककर्ते शिवराय खंड १ (तिसरी आवृत्ती), नागपूर, २०१०.
  • पुरंदरे, कृष्णाजी वासुदेव, शिवचरित्र साहित्य खंड १, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९२६.
  • मुजुमदार, गं. ना.;  कर्वे, चिं. ग.; जोशी, चिं. ब. शिवचरित्र साहित्य खंड ५, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९४२.
  • मेहेंदळे, गजानन भास्कर, श्री राजा शिवछत्रपती खंड -१ (दुसरी आवृत्ती), पुणे, २००८.

Friday 30 October 2020

कोल्हापूरची लढाई

 

कोल्हापूरची लढाई
कोल्हापूरची लढाई
मराठे-अदिलशाही युद्ध ह्या युद्धाचा भाग
परिणती मराठ्यांचा विजय
प्रादेशिक बदल कोल्हापूरचा सारा प्रदेश महाराजांच्या ताब्यात
सैन्यबळ ५,००० १०,००० ब
ळी आणि नुकसान २,००० ७,०००
== पार्श्वभूमी ==शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा नोव्हेंबर १० १६५९ रोजी वध करून त्याच्या सेनेचा प्रचंड धुव्वा उडवला व काही दिवसातच अतिशय आक्रामक भूमिका घेउन अनेक किल्ले आपल्या अखत्यारीत घेतले. डिसेंबर १६५९ मध्ये शिवाजी महाराज कोल्हापूर नजीक पन्हाळ्यानजीक पोहोचले व याच सुमारास अदिलशाही सरदार रुस्तमजमान मिरजेपाशी पोहोचला.
लढाई
रुस्तमजमान कडे अनेक मातब्बर सरदार होते फ़ाजलखान, मलिक इत्बार, सादतखान, याकुबखान, हासन खान, संताजी घाटगे इत्यादी व त्याचे सैन्यबळही मोठे होते. शिवाजी महाराजांच्या सेनेत नेताजी पालकर , हणमंतराव खराटे, हिरोजी इंगले, भिमाजी वाघ इत्यादी सरदार होते.
शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आहेत असे कळाल्यानंतर पन्हाळ्यावर आक्रमणकरण्याच्या बेतात रुस्तमजमान होता. परंतु २८ डिसेंबरला पहाटेच अचानकपणे शिवाजी महाराजांनी रुस्तमजमानच्या सेनेवर जोरदार हल्ला चढवला. पुर्ण जोरदार हल्ला न चढवता पुढून मागून आजूबाजूने तुकड्यांनी हल्ले चढवले व आदिलशाही सेनेला नामोहरम केले. रुस्तमजमान रणांगण सोडून पळून गेला.

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...