विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 30 March 2022

कोल्हटकर घराणे.

 

# इतिहासाच्या पाऊलखुणा.
कोल्हटकर घराणे.
आपल्यापैकी बहुतेक सर्व जण 'कोल्हटकर'नावाचा कुणी सरदार मराठ्यांच्या इतिहासात होऊन गेल्याचे आज प्रथमच ऐकत असल्याची शक्यता आहे.
भोसले कालीन लढाऊ ब्राह्मण सरदारांत भास्करराम कोल्हटकर यांचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे.भास्करराम वा भास्करपंत कोल्हटकरांचे पूर्वज रामाजी नारायण वाई प्रांतातील पांडवनगर येथील वतनदार देशमुख होते.नागपूरकर भोसल्यांचा मूळ पुरुष मुधोजी भोसलेची बापुजी,परसोजी व साबाजी हि तीन मुले कोयना नदीच्या तीरावर भैरवगड इथे राहत होती.भोसले व रामाजी यांच्यात घनिष्ठ मैत्री संबंध होते.एकदा जंजिऱ्याच्या सिद्धीने काही कारणाने भोसले बंधूना कैदेत टाकले.त्यावेळी रामाजी ने तीन हजार रुपये दंड भरून तिघा भोसले बंधूना सोडवून त्यांची पुढील व्यवस्था केली.रामाजी हे अतिशय धार्मिक वृत्तीचे होते,त्यांच्या आशीर्वादाने बिमबाजीस( बापुजी पुत्र) पुत्र झाला -रघुजी भोसले प्रथम-जो नागपूर येथील मराठ्यांच्या संस्थानाचा संस्थापक म्हणून प्रसिद्ध झाला.रामाजी च्या आदेशानुसार रघुजीने राजघराण्यात रामचंद्राची उपासना सुरु केली.भोसल्यांनी कोल्हटकरांस उपाध्यायकी दिली.१७३० साली रघुजीस वऱ्हाड-गोंडवना ची सनद व 'सेनासाहेब सुभा'हा किताब दिला.त्यावेळी रघुजी बरोबर कोन्हेराम आणि भास्करराम हे दोघे बंधू नागपूरला आले.रघुजीने कोन्हेरामास दिवानगीरी व मुजुमदारी पदे दिलीत तर भास्कररामास त्याचे उपजत लष्करी गुण पाहून सेनापतीचे सर्वोच्च पद दिले शाहू महाराजांनी अर्काटचा नवाब दोस्त महमद व त्याचा जावइ चान्दासाहेब यांचा बंदोबस्त करण्यास रघुजीस फर्मावले.भास्कररामाने चन्दासाहेबासकैद करून वऱ्हाडात नेले.त्यानंतर रघुजीने हळू हळू तेव्हाच्या बंगाल प्रांताकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.त्या वेळचा बंगाल म्हणजे आजचा प.बंगाल,बिहार ,ओरिसा व संपूर्ण बांगला देश होय.रघुजीने बंगाल वरील आक्रमणात भास्कर रामास आपला सेनापती नियुक्त केले. . मराठ्यांच्या स्वाऱ्यांपासून आपले व अन्य श्रीमंत लोकांचे संरक्षण करण्यासाठी इंग्रजांनी त्या काळात म्हणजे १७४० मध्ये उत्तर कलकत्त्यातील बाघबझार भागात एक प्रचंड खंदक खोदला जो 'मराठा डिच'नावाने प्रसिद्ध आहे.पहिली स्वारी १७४२ मध्ये झाली .ह्या स्वारीत मराठ्यांनी त्यावेळच्या बंगालच्या सुभेदार असलेल्या अलिवर्दी खांचा अनेक ठिकाणी पराभव केला,मुर्शिदाबादेत जगतशेठ आलमचंद्च्या पेढीतून अडीच कोटी रुपयांची लुट मिळवली.ह्या स्वारीने भास्कर रामाचा दरारा संपूर्ण बंगाल प्रांतात पसरला.१७४४ मध्ये तिसऱ्या स्वारीच्या वेळी त्याने ओरीसामधून बंगालमध्ये प्रवेश करून सर्वत्र धामधूम माजवली.
लष्करी बळावर भास्कर रामास आवरणे,त्याचा मुकाबला करणे अशक्य वाटल्याने अलिवर्दी खानाने त्यास वाटाघाटी,तह करण्यासाठी आपल्या एरियात आमंत्रित केले,पण त्याचा अंतःस्थ हेतू वेगळाच होता.३० मार्च १७४४ ला भास्कर राम कोल्हटकर आपल्या २१ सरदाराना घेऊन काहीसा गाफील राहून अलीवार्दी खानास भेटण्यास त्याच्या छावणीत गेला असता अलीवार्दीखानाने कपटाने भास्करराम व त्याच्या बरोबरच्या २१ मराठे सरदारांची कत्तल केली.भास्कर राम व त्याच्यासोबत असलेल्या २१ मराठा सरदारांच्या हत्तेचा बदल घेण्यासाठी रघुजीने आपल्या जानोजी व मुधोजी ह्या दोन मुलांना १७४८ मध्ये बंगालच्या स्वारीवर पाठविले.ह्या स्वारीत मराठ्यांनी पूर्ण ओरिसा जिंकून पाटण्या कडे कूच केले,पण अलीवार्दीखानाच्या जोरदार प्रतिकारामुळे मराठ्यांना माघार घ्यावी लागली,तसेच त्याच वेळी गोंड वनात बंड झाल्याचे कळल्याने रघुजीने आपली फौज माघारी बोलाविली.
भास्कर रामाचा थोरला भाऊ कोन्हेराम दुःखी होऊन कोंकणात परत गेला,रघुजीने भास्कर रामाच्या पत्नीस वऱ्हाडात १५ हजाराची जहागीर दिली.१७५७ पर्यंतकोन्हे रामचा मुलगा बाबुराव ,तसेच भास्कर रामचा नातू रामचंद्र हेही भोसल्यांच्या सेवेत राहिले होते.
भास्कर रामच्या बंगाल्वरील आक्रमणात तेथील जनतेस अमाप कष्ट,दुःख,त्रास झाल्याचे म्हणतात.तत्कालीन बंगाली लेखक गंगाराम ने 'महाराष्ट्र पुराण' नावाचे एक प्रदीर्घ काव्य लिहिले असून त्यात मराठ्यांच्या आक्रमणामुळे स्थानिक जनतेवर झालेल्या अत्याचारांचे वर्णन आहे.ह्या काव्याच्या पहिल्या खंडात मराठ्यांनी भास्कर रामच्या नेतृत्वाखाली १७४२-४४ मध्ये केलेल्या लष्करी मोहिमांची वर्णने आहेत.अलीवर्दीखान मराठ्यांच्या वेढ्यातून निसटल्यावर भास्कर रामाने वैफल्याने चिडून जाऊन सर्वसामान्य लोकांवर जे 'अत्याचार' केले,रेशीम,हातमाग उद्योगाची हानी केली त्याची पण वर्णने आहेत.मराठ्यांनी बंगाल मधील लुटलेल्या आणि पेटविलेल्या खेड्यांची एक मोठी यादीच गंगाराम ने पहिल्या खंडात दिली आहे.डच वखारीच्या लोकांनी मराठ्यांनी सुमारे चार लाख लोकांच्या हत्त्या व ८ लाख लोकांना मराठ्यांनी जखमी केल्याचे नमूद केले आहे.रियासतकार सरदेसाईनच्या मते 'महाराष्ट्र पुराण'' मधील ऐतिहासिक महत्वाची माहिती इतर तत्कालीन साधनांशी पडताळून पाहता खरी असल्याचे दिसते तर सदानंद मोरेंच्या मते,बंगाली लोकांना 'अतिशयोक्ती'करण्याची सवयच आणि मराठ्यांमध्ये चांगला इतिहासकार नसल्यामुळे 'हि बदनामी'वाढतच गेली.
(संदर्भ:१-मराठ्यांचा इतिहास,खंड १ व २-संपादक अ.रा.कुलकर्णी व ग.ह.खरे.,२ मराठी रियासत-गो.स.सरदेसाई,खंड ४,व प्रा.सदानंद मोरे यांचा ०४-०७-२०१४ ला दैनिक लोकसत्तातील लेख-( मराठ्यांचा) दरारा,दबदबा कि दहशत? हा लेख)

पंढरपूरचा तह : (११ जुलै १८१२).

 

पंढरपूरचा तह (Treaty of Pandharpur)
पंढरपूरचा तह : (११ जुलै १८१२).
पेशवे आणि जहागीरदार यांच्यातील तह. महाराष्ट्रात १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात पेशवे-जहागीरदारांच्या संघर्षाचे प्रश्न पुढे येण्यास सुरुवात झाली. यासाठी दुसरा बाजीराव व दक्षिणेकडील सरदार हे सारखेच जबाबदार होते. यांमध्ये पटवर्धन, पानसे, रास्ते, गोखले, निपाणीकर-देसाई, कित्तूरकर देसाई आदी जहागीरदारांचा समावेश होता. या संघर्षातूनच पुढे पंढरपूरचा तह घडून आला.
कृष्णा व तुंगभद्रा नद्यांच्या मधील प्रदेशावरून प्रामुख्याने हा संघर्ष होता. पेशव्यांनी हे प्रदेश विविध कारणांसाठी या जहागीरदारांना दिलेले होते. त्यासाठी त्यांना तैनात जाबते (अधिकार) दिले होते. या जाबत्यामध्ये काही बाबींचा स्पष्ट उल्लेख केलेला असे. उदा., कोणता प्रदेश, किती गावे, त्या प्रदेशातून किती महसूल गोळा होतो, महसूल गोळा करण्यासाठी किती सैन्य सरदारांनी पदरी बाळगावे इ. आणि यावरूनच पुढे संघर्ष सुरू झाला. याशिवाय इतर काही कारणे होती ती खालीलप्रमाणे :
१. पेशव्यांनी सरदारांना विशिष्ट भागात शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी काही प्रदेश तोडून दिलेला होता. त्यासाठी काही सैन्य बाळगून त्या भागातून महसूल गोळा करण्याचे काम सरदारांकडे होते. प्रत्येक प्रदेशांचा महसूल किती आहे, किती गोळा होतो तो कसा खर्च होतो, हे पाहण्यासाठी पेशव्यांनी जे आपले अधिकारी दरखदार म्हणून नियुक्त केलेले होते ते पेशवा-सरदार यांच्यामधील दुव्याचे काम करत.
२. सरदारांनी इनाम गावांच्या व्यतिरिक्त काही गावे, खेडी बेकायदेशीरपणे बळकावलेली होती. त्याचा कोणताही हिशेब पेशव्यांना दिलेला नव्हता.
३. जहागीरदारांना काही हक्क दिलेले होते, कामाच्या मोबदल्यात त्यांना काही जमिनी दिलेल्या होत्या; मात्र पुणे दरबारात सावळागोंधळ सुरू झाल्यानंतर जहागीरदारांनी इनाम गावाशिवाय आसपासचा भाग दडपून आपल्याकडे घेतलेला होता.
४. जहागीरदारांना त्यांच्या प्रदेशात शांतता, सुव्यवस्था टिकविण्यासाठी सैन्य बाळगण्याची परवानगी दिलेली होती. याला ‘सरंजामी सैन्य’ म्हणत. या सरदारांच्या फौजात त्यांच्या छोट्या जहागीरदारांच्या पथकांचा समावेश होत असे. पथकांच्या खर्चास सरकारकडून पैसा मिळत असे. इतलाखी फौजा म्हणजे नगदी फौजा होत. इतलाखी फौजांसाठी सरकारातून रोख पैसा मिळत असे. इतलाखी फौजांवर जहागीरदाराची पूर्ण सत्ता असे. प्रत्यक्षात इतलाखी फौजेसंबंधी पेशव्याला बऱ्याच वेळा माहितीही नसे. याचा फायदा जहागीरदार घेत. प्रत्यक्ष सैन्यापेक्षा जादा सैन्य कागदोपत्री दाखवून, वाढीव खर्च दाखवीत. जादा खर्चासाठी जादा प्रदेश अनधिकृतपणे बळकावीत असत.
५. जहागीरदारांना काही प्रसंगी वाढीव कामगिरीमुळे कर्ज होत असे, तेव्हा ते कर्ज फेडण्यासाठी पेशवे त्यांना काही काळासाठी प्रदेश तोडून देत. मात्र कर्ज फिटल्यावर तेवढाच प्रदेश पेशव्याला परत करणे जहागीरदाराची जबाबदारी असे. पण प्रत्यक्षात कर्ज फिटल्यावर तो प्रदेश तसाच अनधिकृतपणे जहागीरदारांकडेच राहात असे. उदा., पटवर्धन सरदाराकडे कर्नाटकातील प्रदेश हैदरचा बंदोबस्त करण्यापुरताच दिलेला होता. पण प्रत्यक्षात हैदरचा शेवट झाल्यानंतर तो प्रदेश पेशव्यांकडे परत आला नाही.
६. पेशवे काही विशिष्ट प्रसंगी सरदारांना जमीन तोडून देत असत. जहागीरदार काम झाल्यावर ती जमीन परत न करता स्वतःकडेच ठेवत. उदा., परशुरामभाऊ पटवर्धनला नौबत खर्चासाठी दिलेली जमीन परशुरामभाऊ मरण पावल्यानंतर रामचंद्रआप्पा पटवर्धन यांनी ती जमीन पेशव्यांना परत केली नाही. बापू गोखले यांनी पेशव्यांच्या आदेशावरून प्रतिनिधीच्या प्रदेशावर हल्ले करून प्रदेश जिंकून घेतला, मात्र प्रदेश जिंकून झाल्यानंतर गोखल्यांनी प्रतिनिधीचा प्रदेश स्वतःकडेच ठेवून घेतला.
पेशवे काळात पूर्वीपासून असे व्यवहार चालू होते. मात्र याकडे फारसे कोणी लक्ष दिले नव्हते. दुसरा बाजीराव सत्तेवर आला आणि यातून संघर्ष सुरू झाला. जहागीरदारांनी आपल्याशी कसे वागावे यासंबंधी पेशव्यांच्या अपेक्षा होत्या. पेशव्यांनी इंग्रजांमार्फत आपल्या अपेक्षा जहागीरदारांपुढे मांडल्या. त्या खालीलप्रमाणे :
१. वसई तहानंतर पेशव्यांना पूर्वापार देण्याचे कर व महसूल जहागीरदारांनी बंद केला. त्या महसुलातून स्वतःचे सैन्य वाढविले व पेशव्यांचा प्रदेश बळकावला आहे.
२. जहागीरदारांना दिलेल्या तैनात जाबत्यामध्ये ज्या सर्व अटींची नोंद केलेली असे, त्या अटींची पूर्तता जहागीरदार करीत नाहीत.
३. पेशव्यांना गरज असेल तेव्हा सैन्य घेऊन त्याला मदत करावी, असे जहागीरदारावर बंधन असे, मात्र जहागीरदार हे बंधन पाळत नाहीत.
४. जहागीरदार स्वतःकडे अपेक्षेपेक्षा जादा सैन्य ठेवतात व सैन्याचे जादा पैसे वसूल करण्यासाठी ते पेशव्यांचाच प्रदेश बळकावतात. तेव्हा जहागीरदारांनी जादा सैन्य बाळगू नये व त्यासाठी आलेला खर्च, त्याच्या प्रदेशासह पेशव्याला परत द्यावा.
५. जहागीरदाराकडे असणाऱ्या शिबंदीपैकी (अनियमित सैन्य) प्रत्येक सैनिकाच्या पगारातून एक दिवसाचा पगार कापावा व वर्षअखेरीस तो पेशव्यांना द्यावा.
६. जहागीरदारांनी गैरहजर सैनिकांचा पगार कापून तो पेशव्यांना परत करावा.
पेशव्यांच्या या अपेक्षा बऱ्याच वर्षांपासूनच होत्या. मात्र पेशवे स्वत: कायदा राबविण्यास असमर्थ असल्याने मध्यस्थ म्हणून त्यांना इंग्रजांची मदत घ्यावी लागली. वसईच्या तहाने (१८०२) पेशव्यांवर काही बंधने आली होती. आर्थर वेलस्लीने पेशव्यांच्या वतीने पहिल्यांदा या अपेक्षांच्या बाबतीत प्रयत्न केला. वेलस्लीने स्ट्रॅचीच्या नेतृत्वाखाली एक मंडळ जहागीदारांकडे पाठविले होते. मात्र या काळात इंग्रज-मराठा दुसरे युद्ध सुरू झाल्याने ते शक्य होऊ शकले नाही. पुण्याचा इंग्रज वकील असलेल्या रसेल याने पेशव्यांची बाजू मांडून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. रसेलने तैनाती फौजेच्या माध्यमातून जहागीरदारांनी पेशव्यांचा बळकावलेला प्रदेश व जमिनी परत करण्याचे कबूल केले; परंतु रसेलची बदली झाल्याने हा प्रयत्न थांबला. या व्यतिरिक्त पेशवे-जहागीरदार संबंध बिघडण्याची आणखी कारणे होती. उदा., आप्पासाहेब पटवर्धनाने अनाधिकाराने हुबळीचा किल्ला आपल्याकडेच ठेवला. माधवराव रास्तेने बदामीचा किल्ला बळकावला होता, तो परत करण्यास पेशव्यास नकार दिला.
पेशवे-जहागीरदार संबंध बिघडत असताना खुद्द पेशव्यांनी जहागीरदारांचे प्रश्न सोडविण्याचा एक वेगळाच मार्ग स्वीकारला. पेशव्यांच्याकडे एखाद्या जहागीरदारांचा वाद गेल्यास पेशव्यांनी त्यांच्या जहागिरीच्या वाटण्या करून त्यांची शक्ती क्षीण करण्याचे धोरण स्वीकारले. उदा., पेशव्यांनी मध्यस्थी करून सांगली संस्थान, मिरज सरंजामामधून स्वतंत्र केले (१८०८). जहागीरदारांना पेशव्यांचे हे धोरण धोक्याचे वाटत होते. या घटना घडत असताना मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन पुण्यात इंग्रजांचा वकील म्हणून रुजू झाला (१८११). एल्फिन्स्टनला पेशव्यांना दुबळे करण्याची ही आयतीच संधी प्राप्त झाली. पेशवे-जहागीरदारांचा प्रश्न सैन्याने सोडवल्याशिवाय महाराष्ट्रात ब्रिटिशांना यश मिळणार नाही, अशी एल्फिन्स्टनची धारणा होती. कारण या काळात पेशवे विविध मार्गांनी पैसे जमा करून सैन्याची जमवजमाव करत होते. पेशव्यांनी त्र्यंबकजी डेंगळे याला सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. इंग्रजांना या काळात पेशव्यांपेक्षा त्र्यंबकजी डेंगळे यांची जास्त भीती वाटत होती. पेशव्यांनी डेंगळ्यांच्या साहाय्याने आपले स्थान बळकट करण्यास सुरुवात केली. पेशव्यांनी एल्फिन्स्टनला या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. एल्फिन्स्टनने तिकडे दुर्लक्ष केले. मात्र त्याचा उलटा परिणाम झाला. पेशवे -जहागीरदार हळूहळू मतभेद विसरून एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली. आप्पासाहेब पटवर्धनाने पेशव्यांचा घेतलेला जादा प्रदेश परत करण्यास सुरुवात केली. माधवराव रास्तेने पेशव्यांच्या बळकावलेल्या जमिनी पेशव्यांना परत केल्या. बागलकोट व जालीहाळ परगणे परत केले. इतकेच नव्हे तर, बदामीचा किल्ला रास्तेने पेशव्यांना परत केला. बापू गोखल्याने प्रतिनिधीचा २५ किल्ले असलेला प्रदेश पेशव्यांना परत केला. चिंतामणराव पटवर्धनाने पेशव्यांपुढे एकदम नमते घेतले व पेशव्यांकडे ५०० सैन्य पाठविले. निपाणीच्या आप्पा देसाई याने कोल्हापूरकरांशी असलेले मतभेद मिटविण्याची तयारी दाखविली. पेशव्यांचे वाढते वजन लक्षात घेऊन, इंग्रजांनी तटस्थ राहणे योग्य नाही, हे एल्फिन्स्टनने ओळखले व कलकत्त्याच्या परवानगीने पेशवे-जहागीरदार संबंधांत हस्तक्षेप केला.
एल्फिन्स्टनने खरशेटजी मोदी या आपल्या प्रतिनिधीच्या मार्फत सर्व जहागीरदारांना पंढरपूरला जमण्याचे निमंत्रण दिले. पंढरपूरला सर्व सरदार एकत्र आले व पंढरपूरचा तह झाला (११ जुलै १८१२). या तहात खालील कलमांचा समावेश होता :
१. पेशवे आणि जहागीरदार यांनी आपापले पूर्वीचे अपराध विसरून जावेत.
२. पेशवे आणि जहागीरदार यांनी आपल्या पूर्वीच्या आर्थिक मागण्या सोडून द्याव्यात.
३. पेशव्यांनी जहागीरदारांच्याकडे तैनात जाबत्यामध्ये ज्या नोंदी आहेत, त्याच्यापेक्षा जादाची मागणी करू नये.
४. तैनात जाबत्याचे जहागीरदारांनी शब्दश: पालन करावे.
५. पेशव्यांशी जोपर्यंत जहागीरदार निष्ठावान राहतील, तोपर्यंत त्यांच्याकडे सरंजामी जमिनी असाव्यात. याला इंग्रज जामीन राहतील.
६. जहागीरदारांनी तैनात-जाबत्या व्यतिरिक्त जो प्रदेश घेतला असेल, तो पेशव्यांना परत करावा.
७. इंग्रजांच्या सल्ल्याशिवाय पेशव्यांनी कोणत्याही जहागीरदारांच्या जमिनी जप्त करू नयेत.
८. जहागीरदारांच्या संरक्षणाची जबाबदारी ब्रिटिशांनी घ्यावी.
९. जहागीरदारांना पेशव्यांनी पूर्वापार सन्मानाने वागवावे.
१०. पेशवे-जहागीरदार वाद उत्पन्न झाल्यास दोघांनी इंग्रजांचा निवाडा मान्य करावा.
११. ब्रिटिशांना कोणत्याही जहागीरदाराशी स्वतंत्रपणे करार करण्याचा अधिकार असावा.
या तहाची अंमलबजावणी सुरू झाली. कंपनीने जहागीरदारांची पुनर्रचना सुरू केली. कित्तूरकर देसाई यांना वर्षाला ४५ हजार रुपयांचा प्रदेश पेशव्यांना परत करावा लागला. पटवर्धनना याचा सर्वांत जास्त फटका बसला. रामचंद्रआप्पा पटवर्धन याने ३० हजार रु., चिंतामणराव पटवर्धन सांगलीकर यांनी ४५ हजार रु. आणि त्र्यंबक रघुनाथ पटवर्धन (कुरुंदवाडकर) यांनी रु. १० हजार किंमतीचा प्रदेश पेशव्यांस परत केला.
संदर्भ :
Varma, Sushma, Mountstuart Elphinstone in Maharashtra (1801-1827) : A Study of the Territories Conquered from the Peshwaas, K. P. Bagchi, Calcutta, 1981.
गोडबोले. कृ. ब. ना. मौन्टस्टुअर्ट एल्फिन्स्टन साहेब यांचे चरित्र, दामोदर सांवळाराम आणि मंडळी, मुंबई, १९११.
सरदेसाई. बी. एन. आधुनिक महाराष्ट्र, फडके प्रकाशन, कोल्हापूर, २०००.
समीक्षक : अवनीश पाटील
Post published : 09/07/2021
Post author : सुरेश शिखरे
Post category : आधुनिक इतिहास
मराठी विश्वकोश

Tuesday 29 March 2022

दिल्लीच्या सनदा .. आणि गुलामी

 

दिल्लीच्या सनदा .. आणि गुलामी
पोस्त सांभार ::सुरेश जाधव
___________________________
छत्रपती थोरले शाहू महाराज आणि
बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब
...............................................
छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या कुशल आणि आक्रमक नेतृत्वाखाली १७३० पर्यंत माळवा , बुंदेलखंड आणि गुजरात मराठ्यांच्या ताब्यांत आले होते . थोरल्या बाजीरावानंतर प्रधानपदी आलेल्या त्यांच्या मुलास , बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यांस , लोभ उत्पन्न झाला . त्यांनी सवाई जयसिंगामार्फत दिल्लीच्या बादशहाकडे बोलणी करून काही प्रांतांची सुभेदारी
मिळावी अशी ' अर्जी ' केली . बादशहास हे संशयास्पद वाटले . छत्रपती थोरले शाहू महाराजांवर विश्वास असल्याने ते जिवंत असेपर्यंत त्यांनी याची काही दखल घेतली नाही .
छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या माघारी दिल्लीत परिस्थिती बिघडत गेली . पण तोपर्यंत मराठ्यांचे वर्चस्व भारतभर प्रस्थापित झाले होते . त्या जोरावर पुन्हा एकदा बाळाजी बाजीरावांची इच्छा उफाळून आली . परत एकदा ' अर्जी ' दाखल झाली .
त्या ' अर्जीस उत्तर ' म्हणून बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यांचे मांडलिकत्व दिल्लीच्या बादशहाने मान्य केले . ही जी सनद नानासाहेबांनी मिळविली त्यात काय कलमे होती हे पाहू .
या सनदेत सातारच्या छत्रपतींचा उल्लेख नाहीय . कारभाऱ्यांनी स्वामींच्या परस्पर हा कारभार केला होता . या करारनाम्याच्या परिणामस्वरूप राजस्थानात मराठा-रजपूत , मध्य भारतात मराठा-जाट आणि पंजाबात मराठा-अफगाण संबंध बिघडले व त्याची परिणती म्हणजे सदाशिवराव भाऊंना पानीपत युद्ध हाताळण्यात अपयश आले ,
लाखभर मराठ्यांचा मृत्यू झाला .
या करारानुसार : -
१ . मोगल साम्राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी प्रधानांची असेल .
( छत्रपतींची नाही )
२ . मोबदला म्हणून बादशहाने काही रक्कम देऊ केली .
३ . अब्दालीच्या ताब्यात असलेल्या पंजाब आणि सिंध प्रांताचे चौथ वसुलीचे अधिकार दिले . अर्थात ते प्रांत जिंकूनच वसुली करता येणार .
३ . बादशहाने बाळाजी बाजीराव यांची आग्र्याचे सुभेदार व मथुरेचे फौजदार तसेच अजमेरचे सुभेदार व नरनाळाचे फौजदार म्हणून नेमणूक केली .
४ . ही ' जागिर ' दिल्लीच्या बादशहाचे मांडलिक म्हणून त्यांनी संभाळायची आहे .
५ . मराठा सरदार हे बादशहाचे मनसबदार असतील .
६ . श्रीमहादेवाची व खंडेरावाची व धर्माची व स्मृतीची शपथ व साक्ष ठेवून , आम्ही आमरणांत तुमची आज्ञा, सेवा , चाकरी करू या खेरीज आपली आज्ञा विशेष मानून धर्म व स्मृती यांचे जागी आपली आज्ञा मानू ....
मराठ्यांच्या इतिहासावर लिहिणाऱ्यांना ही सनद माहित आहे . पण चर्चा मात्र छत्रपती शाहू महाराजांनी दिल्लीतून सनदा मिळवून बादशहाची मांडलिकत्व मान्य केले , गुलामगिरी स्विकारली असा प्रचार होतो . पण तसे काही घडलेले नाही . प्रत्यक्षात दिल्लीच्या बादशहाने वारसाहक्काने छत्रपती थोरले शाहू महाराजांचे राज्य त्यांना परत केले होते व पुढे छत्रपती थोरले शाहू महाराजांनी सय्यद बंधुना वठणीवर आणून त्यांना शरण येण्यास भाग पाडले व त्यांच्या सोबत सरसेनापती खंडेराव दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली १५ हजारांची फौज देऊन दिल्लीच्या तीन बादशहाची हत्या करवून राजमाता येसूबाई साहेब व इतर राजकैद्यांची सुटका करवून घेऊन दक्षिणेतील सहा सुभ्यांचे चौथ व देशमुखी चे अधिकार आपल्या सारखे करवून घेतले होते...
उत्तरकालीन लेखकांनी विशिष्ट व्यक्तींना प्राधान्य देऊन गौरविण्याचा जो खटाटोप केला त्यात सत्य इतिहासाची मोडतोड झाली व जे खरोखरच स्वराज्यासाठी लढले त्यांना अडगळीत टाकले, यात रियासतकार सर्वात पुढे होते . इतिहासाला हे जे अनिष्ट वळण लागले तेच अनेकांनी स्विकारले व महाराष्ट्राचा इतिहास गढूळ झाला .आणि मग ब मो पुरंदरे सारखे कादंबरीकार मराठा साम्राज्याला ' दिल्लीच्या मोगलाई सुलतानांचे ' #फिद्वीय ' ( म्हणजे #गुलाम ! ) मांडलिक ' म्हणून हिणवतात . हे सर्व प्रकार अत्यत निंदनीय आहेत .

-|| बजाजी निंबाळकरांचे धर्मांतर – एक दंतकथा ! ||-

 

-|| बजाजी निंबाळकरांचे धर्मांतर – एक दंतकथा ! ||-

शिवकालात फलटण संस्थान हे मोठे मातब्बर.ह्या संस्थानाचे शिवकाळातील अधिपती बजाजीराजे नाईक निंबाळकर हे तो शिवाजी महाराजांचे व्याही. फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर यांच्यासबंधी एक प्रसिद्ध दंतकथा आहे. ती अशी की -

“विजापुरच्या आदिलशहाने त्यास विजापुरला धरून नेले व त्याचे धर्मांतर केले, नंतर ते देशी परतले व आपल्या केलेल्या कर्मांचा त्याना पश्चाताप झाला, बजाजीराव ह्यांची छत्रपती शिवाजी महाराजानी शिखर शिंगणापूर येथे शुद्धि करून घेतली, त्यानंतर काही दिवसानी बजाजीचा मुलगा महादजी निंबाळकर यास शिवाजी महाराजानी आपली मुलगी दिली.”

सत्य असे की धर्मांतर झाले असा कुठेही उल्लेख नाही आणि जर बजाजीराव यांचे धर्मांतर झालेच असेल तर मग त्यांचे ” मुसलमान “ नाव काय ?

हे आजतागायत कोणीही देत नाही. या कथेचा उल्लेख करताना कुठलीच तारीख – शक – संवत्सर काही सुद्धा आजपर्यंत उपलब्ध झालेले नाही. दंतकथाकार कथेत बजाजीराजे हे १६४२ मधे मुसलमान झाले असे म्हणतात, त्या हिशोबे त्याचे १६४२ ते १६५१ या कालखंडामध्ये जर धर्मांतर झाले असेल तर त्यांचा कागदोपत्री उल्लेख हा मुसलमान नावाने यायला हवा, पण तो येत नाहीच तर याच दरम्यान त्यांचा उल्लेख हा हिन्दू म्हणूनच केला जातोय, ते ही चक्क समकालीन कागद पत्रामंधे, पाहूया जरा हे समकालीन पुरावे -

१) शिवभारत हे अस्सल साधन आज उपलब्ध आहे, पहिले त्याचा संदर्भ पाहूया -
शिवभारत – अध्याय १३- श्लोक १०
घांटीको (घाटगे) मत्तराजश्च कुलीशोपमसायक: |
तथा फलस्थान (फलटण) पतिबलवान बाजनायक: ||

या मधे कविन्द्र परमानंद हे बजाजीराजेंचा उल्लेख ” बाजनायक ” असा करतात, शिवभारता मधे येणारा हा उल्लेख १६४८ मधल्या प्रसंगाचा आहे जेव्हा स्वराज्यावर फतहखानाचे संकट आले आहे. कविन्द्र परमानंद यांनी बजाजीस फलटणचा अधिपती आणि बाजनायक असे म्हटले आहे, श्लोकामध्ये जर बजाजीराजांचे धर्मांतर झाले असेल तर त्यांच्या यावनी नामाचा उल्लेख अजिबात नाही, शिवभारत हे विश्वासार्ह आहे कारण ते समकालीन आहे आणि त्यावर विश्वास ठेवणे हे क्रमप्राप्त आहे.कविन्द्र परमानंद हे महाराजांचा निकटवर्तीय आहेत.तेव्हा हा पुरावा निश्चित विश्वासपात्र आहे. 
२) एक छोटी कैफियत आहे निंबाळकर घराण्याची जी १८२२ मधे लिहली गेली, ती बापूसाहेब निंबाळकर यांच्या दफ्तरात सापडली, त्यात एक उल्लेख आहे की बजाजीरावांनी १६५१ मधे बेगम (विजापूरची बडी बेगम ?) हिच्याकडून फलटणची सनद घेतली.इथेही बजाजीरावांचे नाव हिंदूच तसेच त्यांच्या धर्मांतराचा काहीही उल्लेख नाही.

३) बजाजीराजे निंबाळकर १६५९ मधे अफजलखान स्वारीच्या वेळी फलटण मधे होते, त्यास अफजलखान याने पकडले व त्याची सुंता करून ठार मारण्याची धमकी दिली त्यावेळी अफजलखानाकडील मराठी सरदार ” नाइकजीराजे पांढरे ” यांच्या मध्यस्थिने बजाजीराजे निंबाळकर यांच्याकडून ६० हजार होनांची खंडणी घेउन अफजलखानाने त्यांना सोडले.

ह्या संदर्भातील अस्सल पत्र खाली देत आहोत -

” धनकोनाम जयचंदीभाई व जमामाव बाबानभाई मुक्काम मलवडी यास रिणकोनाम बजाजी नाइक निंबाळकर व सावित्रीबाई महादजी नाइक निंबाळकर देशमुख परगणे फलटण…कारणे लिहून दिला कर्जकतबा ऐसाजे बदल खान आजम आबदलाखान ( अफजलखान ) यासी पातशहानी साहेबी शिवाजी राजेवारी मसलत केलि. ते वख्ति आबदलाखान कुचावर कुच करून मलवडी उतरले, ते वख्ति अम्हाबद्दल शिवाजी राजे यानि नाइकजी राजेस ( नाइकजीराजे पांढरे) बहुत प्रकारे कागद लिहला होता आम्हास दस्त करून गल्यात तोफ घालून सुनता करून हत्तीच्या पायाखाले घालून मारावे, तो नाइकजी राजे यांनी बहुत काही आडमुड होउन आबदलाखानास अर्ज केल्यावरी साठी हजरावारी करार करून, होन साठी हजारावर दरम्यान नाइकजी राजे पांढरे जमान होउन सोडिवले

साक्षीदार – रतनजी माने देशमुख कसबे मह्सवड, मलजी राजे पांढरे, रविराव ढ़ोणे, जाधवराव देशमुख दौलताबाद, धूलाजी राजे सडगे, देवजी राजे धायगुड़े, तानाजी राजे काकरे, दत्ताजी माने देशमुख कर्यात मलवडी, विठ्ठल भालेरावजी दीवाण निरत नाइकजी राजे पांढरे ”
( शिवकालीन पत्रसारसंग्रह – खंड – २ – लेख.क्र. – १७९७ )

जर इ. स . १६५९ मधे अफजलखान बजाजीराजे नाइक यांची सुनता करायची धमकी देतो तर ह्यावरून काय सिद्ध होते की – १६५९ च्या अगोदर बजाजी निंबाळकर यांची सुनता झालीच नव्हती, कारण जर ती झालेली असती तर अफजलखानाने तशी धमकी बजाजीस दिलीच नसती.

सारांश बजाजीराजे निंबाळकर हे मुसलमान झाले होते ह्या विधानाला काहीही पुरावा नाही.

|| लेखन सीमा ||

                                                                                       --|| विशाल खुळे  ||--

---|| संभाजींच्या मातोश्री - सईबाई ||----

 

---|| संभाजींच्या मातोश्री - सईबाई ||----

सईबाई भोसले (निंबाळकर) (मृत्यू :- ५ सप्टेंबर १६५९.)

छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पत्नी. धर्मवीर संभाजी राजांच्या मातोश्री.


जिजाऊ मातोश्रींची सर्वात प्रिय व संस्कार प्रिय सून .

सईबाई या छत्रपती संभाजी राजांच्या आई होत्या ,
परंतु संभू राजे लहान असतानाच सईबाईंचा मृत्यू झाला.

सईबाईंचे वडील माधोजीराव निंबाळकर होते.
छत्रपती शिवरायांबरोबर सईबाईंचा विवाह झाला
तेंव्हा त्या फक्त ७ वर्ष्याचा होत्या आणि शिवराय ११ वर्ष्यांचे होते.
त्यांच्या चेहऱ्याचा रंग गव्हाळ होता .
त्या शिवरायांच्या स्फूर्तीस्थान आणि सामर्थ्यवान अश्या पत्नीहोत्या.

त्यांच्या मृत्युनंतर शिवरायांना त्यांची भरपूर उणीव भासली .
संभू राजांना पाहताना शिवरायान पुढे सईबाईंची आभास मूर्ती उभी राहत असे .

मृत्यू समयी शिवरायांच्या तोंडून शेवटचा शब्द "सई" निघाला होता.
सईबाईंना संभाजींच्या अगोदर तीन मुली होत्या .

त्यातील एका कन्येचा (" सखुबाई") विवाह सईबाईंच्या भावाचा मुलगा बजाजी नाईक निंबाळकर यांच्याशी झाला .

संभाजींचा जन्म झाल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली होती, संभू राजे २ वर्ष्यांचे असतानाच आपल्या मातोश्रीनपासून दुरावले होते. पुढे संभू राजांना त्यांच्या आज्जी व शिरायांच्या मातोश्री " जिजाउंनी " घडवले.

---|| पराक्रमी सेनानी सिधोजी निंबाळकर ||---

 

---|| पराक्रमी सेनानी सिधोजी निंबाळकर ||---



अरे भाई ये सिवा कब हात आयेगा खुदा जाने. बहलोल खानच्या सैन्यातील माहूत एकमेकांशी बोलत गजराजाला पाणी पाजण्यास न्हेत होते. अचानक आजूबाजूच्या झाडाफांदीवरील पाखरे उडाली इकडे तिकडे नजर फिरवताच लक्षात आले की मराठ्यांनी चारही बाजूने आपणास मराठ्यांनी घेरल्याचे लक्षात आल्यावर ती माहूत मंडळी जोरजोरात बोंबलू लागली. साऱ्या सैन्याचे लक्ष वेधू लागली. झाडांच्या आडगळीतून आलेल्या बाणांनी त्यांच्या नऱ्हडीचाच घोट घेतला

शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतल्यामुळे हडबडलेल्या विजापुरी सल्तनतीने राजांवर बहलोलखान सारखा खासा पठाण धाडला होता परंतु अष्टावधानी असणाऱ्या बहीर्जींच्या खबरी मंडळींनी ही बातमी वाऱ्याच्या वेगाने महाराजां पावेतो पोहचवली. आणि त्यांच्या बंदोबास्तालाच प्रतापरावांसोबत १५ हजार फौज फाटा धाडला होता आपल्या परिने योजना आखून खानास जेरीस आणावे. ही शिवरायांची ताकीदच होती.

अचानक कोसळलेल्या संकटामुळे खानाची फौज थोडी घाबरली. परंतू लगेचच त्यांनी लढाईची सिद्धता दाखविली. लवकरच दोन्ही कडचे घोडदळ पायदळ एकमेकांवर आदळू लागले. एकच कापाकापी सुरु झाली.

सिद्दी हिलाल, विठोजी शिंदे, कृष्णाजी भास्कर, विठ्ठल पिलदेव, विसोजी बल्लाळ, व आनंदराव असे मराठी रियासतीचे अनुभवी सरदार अंगावर येणाऱ्या प्रत्येक गनिमास आपल्या तरवारीने पाणी पाजत होते. यात तरणे वीर तरी मागे राहतीलच कसे रुपाजी भोसले. सोमाजी मोहिते. सिधोजी निंबाळकर हे देखील तिखट हत्यार चालवीत होते. पुढच्या फळीत लढणारे सिधोजी निबांळकर मोठ्या त्वेषाने दुष्मनावर तुटून पडत होते.

समोर येणाऱ्यांची खेर नव्हती. नंतर बहलोलखानाने आपल्या भोवती झालेली कोंडी फोडण्यासाठी त्याच्या फौजेत असणाऱ्या मदमस्त हत्तींना पुढे केले हे गजराज. मदोन्मत्त होऊन अनेक मराठ्यांना आपल्या पायदळी तुडवत होते. आकांत माजवत होते. अशा पिसाळळलेल्या जनावरास सिधोजींनी माहुता करवी जेरीस आणले. सायंकाळी सिधोजी निंबाळकरांनी तो हत्ती हस्तगत केला. आणि महाराजांकडे चालविला.


याच हत्तीच्या तोडीच्या कामामुळे राजांनी खुश होऊन राजेंनी सिधोजींना सैन्यात थोडी बढती दिली असेलच. साधनांच्या आभावी जास्त माहिती मिळत नाही बेहलोलखाना नंतर सिधोजींचा उल्लेख येतो तो जालानापुरीच्या लुटीत

राजांच्या आयुष्यातील शेवटची स्वारी म्हणजे जालण्याची स्वारी ४ दिवस राजेंनी पेठा मारिल्या, शहर लुटून फन्ना केले. जडजवाहीर कापड घोडे हत्ती उंट फस्त केले. जालना म्हणजे मोगलाईतील महत्वाचे शहर ते मारिल्या मुळे
मोगल संतप्त जाहले. मोगली फौज घेऊन रणमस्त खान चालून आला त्याची गाठ महाराजांच्या सैन्याच्या मागच्या तुकडीशी संगमनेर जवळ पडली महाराजांच्या लष्करातील संताजी घोरपडे आणि पराक्रमी सेनानी सिधोजी निंबाळकर

हे या पाच हजाराच्या तुकडीचे प्रतिनिधित्व करीत होते. अखेर लवकर जेरीस येतील ते कसले मराठे आणि कसला मराठी बाणा कडवट प्रतिकार देत सिधोजींनी आपल्या ५ हजार सैन्यानिशी रणमस्तखानास सलग ३ दिवस झुंजवत ठेवला अखेर याच युद्धभूमीत सिधोजी निंबाळकर यांस वीरमरण आले.

धन्य ते मावळे धन्य त्यांची स्वामीनिष्ठा.........

Source -
Shivaji and his time - Jadunath Sarkar
सेनापती संताजी घोरपडे - जयसिंगराव पवार
शककर्ते शिवराय - विजयराव देशमुख
सभासदाची बखर - कृष्णाजी अनंत सभासद
मराठी रियासत - गो. स. सरदेसाई
संदर्भ :  http://abhishekkumbhar.blogspot.in/2011/09/blog-post_29.html

--|| उस्मानाबाद राजे निंबाळकर ||---

 

--|| उस्मानाबाद राजे निंबाळकर ||---

छत्रपती शिवरायांविषयी संपूर्ण जगभर 
आदराची भावना असून त्याला मराठवाडा अपवाद असण्याचे कारण नाही. मात्र छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा अंमल आपल्या परिसरावर होता का? याविषयी सर्वांच्याच मनात साशंकता असते. मात्र मराठवाड्यासारख्या दूरच्या भागात छत्रपती शाहूंनी उस्मानाबादच्या राजे निंबाळकर घराण्याला दिलेल्या सनदेची अस्सल प्रत सापडल्याने तुळजापूर परिसरावरही स्वराज्याचा अंमल होता हे यावरून सिद्ध झाल्याने त्या परिसरातील लोकांमध्ये कुतुहल निर्माण झाले आहे.  मराठवाड्यासारख्या दुर्लक्षित भागामध्ये अनेक अस्सल कागदपत्रे दडलेली आहेत. अनेक कागदपत्रे आता जिर्ण अवस्थेत असल्याने ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ती बाहेर काढून त्यावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे, अन्यथा कालौघात ती नामशेष होऊन या परिसराचा इतिहास काळाच्या पडद्याआड जाईल.  मराठवाड्याचा इतिहास पाहात असताना या ठिकाणी नेहमीच मराठ्यांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे  सर्वसामान्यांची एक भूमिका आहे की, आपण कायमच मुस्लिम सत्तेच्या आधिपत्याखाली राहिलो आहोत. परंतु संशोधनातून आता ही मानसिकता बदलणे सोपे जाणार  आहे. फक्त उस्मानाबादसारख्या गावातून जर अनेक अशाप्रकारची कागदपत्रे उपलब्ध होत असतील तर इतरही अनेक घराण्यांकडे याची पुनरावृत्ती होऊ शकते. उपलब्ध झालेल्या कागदपत्रांत छत्रपती शाहू महाराज, महादजी शिंदेंचे पुत्र दौलतराव यांची अस्सल दानपत्रे उपलब्ध  आहेत. ही सर्व कागदपत्रे ही उस्मानाबादच्या राजे निंबाळकर घराण्याकडे सापडली असून या घराण्यातील कृष्णराव निंबाळकर धाराशिवकर हे निजामाबरोबर मराठ्यांनी केलेल्या युद्धात उस्मानाबाद या ठिकाणी ठार झाल्याचे रियासतीत नमूद करण्यात आलेले आहे. यापलीकडे या घराण्याचा इतिहास उपलब्ध होत नाही. परंतु सापडलेल्या अस्सल कागदपत्रांत अनेक कागदपत्रे अशी आहेत की, ती मराठ्यांचा इतिहास बदलू शकतील. कारण या घराण्याचे संबंध थेट छत्रपती शाहूंबरोबर होते. याशिवाय शाहूंनी आपले मानसपुत्र मानलेल्या अक्कलकोटच्या भोसले घराण्याबरोबर उस्मानाबादच्या निंबाळकरांचे विवाहसंबंध जोडलेले आहेत. याचबरोबर काही मजहरही सापडले आहेत ज्यामुळे उस्मानाबादच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकण्यास मदत होणार आहे.  राजे निंबाळकर घराण्याचा पूर्वेतिहास  उस्मानाबाद (धाराशिव) शहराला प्राचिन इतिहास असून या ठिकाणी असलेल्या धाराशिव आणि चांमर लेण्यावरून हे स्पष्ट होते. याचबरोबर प्राचिन कालखंडात व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले तगर किंवा तेर हे गाव उस्मानाबादपासून फक्त २० ते २२ कि.मी.वर असल्याने उस्मानाबादवर सातवाहन, राष्ट्रकूट यासारख्या पराक्रमी घराण्याची सत्ता असल्याचे दिसून येते. कारण राष्ट्रकुटांच्या काळातच येथील लेण्यांचे काम झालेले आहे. आज या लेण्या धाराशिव लेण्या या नावाने प्रसिद्ध असून त्या अतिशय चांगल्या अवस्थेत असून प्राचिन इतिहासाच्या त्या साक्षीदार आहेत.  मध्ययुगीन कालखंडात हा परिसर अहमदनगरचा 
निजाम, विजापूरचा आदिलशहा तसेच काही कालखंडापर्यंत मोगलांच्या ताब्यात होता. पुढे इ.स. १७२४ नंतर उस्मानाबादचा परिसर हा हैदराबादच्या निजाम राजवटीखाली गेला. पुढे स्वातंत्र्यापर्यंत हैदराबादच्या निजामाने आपले वर्चस्व ठेवले. या राजकीय समीकरणात उस्मानाबादच्या निंबाळकरांचा इतिहास शोधल्यास हे घराणे नगरच्या निजामशाहीपासून शिपाईगिरीवर असावे. कारण निंबाळकर घराण्यात पूर्वीपासूनच राजे ही उपाधी लावल्याचे त्यांच्याकडे सापडलेल्या वंशावळीवरून दिसून येते. 
निंबाळकर घराण्याचा मूळ पुरुष हा यमाजी असल्याचे वंशावळीवरून तसेच त्यांच्या घराण्यातून घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट होत असले तरी यमाजीच्याही अगोदर  रघुनाथराव नावाचा निंबाळकर घराण्यातील एक पुरुष जहांगिरच्या फौजेत असल्याचे एका पोथीत सापडलेल्या माहितीवरून स्पष्ट होते. मात्र रघुनाथरावांविषयी पोथीशिवाय अन्यत्र माहिती उपलब्ध नाही. त्याच वेळी यमाजीचे एक अस्सल चित्र उपलब्ध असून त्यात यमाजीचा राजेशाही पोषाख, घोडा आणि त्यांच्यावर धरलेले अब्दागिरी तसेच मोरचेल यावरून त्यांच्या ताकदीचा अंदाज येतो. वंशावळीत मात्र यमाजी हेच आद्य पुरुष असल्याचे स्पष्ट होत आहे, कारण वंशावळीत मूळ पुरुषात त्यांचे नाव आद्य पुरुषात दाखविण्यात आलेले आहे.  राधाबार्इंना दिलेली शाहूंची सनद  राजे निंबाळकर घराण्यात यमाजींना त्यांचा आद्य पुरुष मानून जवळपास सर्वच घरांमध्ये त्यांचा फोटो असला तरी अद्यापपर्यंत त्यांच्याविषयी कुठलेही कागदपत्र  उपलब्ध झालेले नाही. तरी परंतु त्यांच्या फोटोचे बारकाईने निरीक्षण केले असता ते कोणी तरी मोठे पुरुष असावेत हे स्पष्ट होते. त्या कालखंडातील घोड्यावरील सवारी, सोबत सेवक आणि त्यांच्यावर धरण्यात आलेले मोरचेल यावरून हे सिद्ध होते. काळानुरूप कागदपत्रांचा अपव्यय आणि नवीन पिढीत होणारे बदल यामुळे बरीच अस्सल साधने नष्ट पावलेली असतात. तरीपण काही मौखिक माहितीच्या आधारे इतिहासावर प्रकाश टाकण्यास मदत होत असते. त्यानुसार उस्मानाबादच्या निंबाळकर घराण्यात नेहमीच एक चर्चा कायम ऐकायला मिळत असते की, छत्रपती शिवरायांच्या घरातील एक मुलगी आपल्या घराण्यात देण्यात आलेली आहे. यापलीकडे अन्य कुठलाही पुरावा उपलब्ध होत नव्हता. सुदैवाने मला या घराण्यातील राधाबार्इंना छत्रपती शाहूंनी दिलेली वैयक्तिक स्वरूपातील अस्सल स्वरूपातील सनद येथील श्रीमती पुष्पाबाई विजयसिंह राजे निंबाळकरांकडे सापडल्याने उस्मानाबादच्या पर्यायाने मराठ्यांच्या इतिहासाला नवीन संदर्भ प्राप्त झाला आहे. 
त्यानुसार इ.स. १७२० साली छत्रपती शाहू महाराजांनी उस्मानाबादच्या राजे निंबाळकर घराण्यातील राधाबार्इंना चोळी-बांगडीकरिता उस्मानाबादची जहागिरी दिल्याचे यात स्पष्ट करण्यात आलेले आहे. या सनदेवर शाहू आणि त्यांचा पेशवा बाळाजी विश्वनाथचा  शिक्का आहे. अस्सल स्वरूपातील या सनदेचा विचार केल्यास निंबाळकर घराण्यातील या चर्चेला पुष्टी मिळते. कारण राधाबाई कोण? याविषयी इतर कुठल्याही कागदपत्रात याचा संदर्भ लागत नाही. त्याचबरोबर तत्कालीन धराशिव परिसराची जहांगिरी दिल्याने या परिसरावर मराठ्यांची सत्ता होती का? याविषयी माहिती घ्यावी लागणार आहे. आणि जर सत्ता नसेल तर किमान मराठ्यांकडून या परिसरातून चौथाई आणि सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांकडे असावेत हे स्पष्ट होत आहे.  उस्मानाबादच्या निंबाळकरांचे इतिहासातील स्थान  राधाबार्इंच्या सनदेशिवाय अन्य विशेष माहिती उपलब्ध होत नसली तरी या सनदेवरून उस्मानाबादचे निंबाळकर हे मराठ्यांकडून लढत असल्याचे स्पष्ट होते. पुढे पानिपत युद्धानंतर मराठ्यांची ताकद क्षीण झाली. तर याच वेळी हैदराबादच्या निजामाने मराठ्यांच्या प्रांतावर आक्रमण करतानाच त्यांचे एक-एक सरदारही फोडण्यास सुरुवात केली. या वेळी निजामाचा सरदार 
लाला ब्रिजनाथ याने मराठ्यांच्या प्रांतावर आक्रमण करून नळदुर्ग, गुंजोटी, अक्कलकोट हे भाग घेऊन उस्मानाबादवर आक्रमण केले. तेव्हा मराठ्यांकडील वैरागचे मकरंद आणि धाराशिवचे कृष्णराव असे दोन्ही निंबाळकर निजामाला जाऊन मिळाले. लाला ब्रिजनाथ हा एक-एक प्रांत घेत पुढे जात असताना धाराशिव या ठिकाणी मराठे आणि निजाम यांच्यात युद्ध झाले. या वेळी मराठ्यांविरुद्ध लढताना कृष्णराव निंबाळकर धाराशिवकर हे भाल्याची जखम लागून ठार झाले. या वेळी त्यांच्या पत्नी आनंदीबाई सती गेल्या. कपिलधार परिसरात जी मोठी समाधी आहे, ती याच आनंदीबार्इंची आहे. पेशवे कालखंडात उस्मानाबादच्या निंबाळकर घराण्याने बराच नावलौकिक मिळवलेला आहे. कारण कृष्णरावांचा मुलगा आनंदराव हा पुढे निजामाशी लढताना एका तहाप्रसंगी मुरादखान, हणमंतराव निंबाळकर यांच्यासोबत तहात भाग घेताना दिसून येतो.  याचबरोबर कृष्णरावांची एक मुलगी म्हैसळाबाई यांचा विवाह अक्कलकोट संस्थानाचे राजे मालोजी ऊर्फ बाबासाहेब (१८०३-१८२८) यांच्यासोबत झालेला होता. पुढे बाबासाहेबांचे पुत्र आप्पासाहेब (१८२२-१८५७) यांना कृष्णराव निंबाळकरांचा नातू नरसिंगाची  मुलगी अहिल्याबाई दिलेली होती. त्यामुळे कृष्णरावांविषयी बरीच माहिती उपलब्ध होत असतानाच तांदुळजा येथील बावणे घराण्याकडे सापडलेल्या कागदपत्रांत कृष्णरावांचा एक फोटोही सापडला असून फोटोंच्या निरीक्षणावरून त्यांचे स्थान निश्चित करता येऊ शकते. कारण याच फोटोत त्यांच्याकडील घोड्याच्या किमतीही दिलेल्या आहेत. त्यामुळे कृष्णराव निंबाळकर हे या घराण्यातील सर्वांत पराक्रमी आणि आपल्या कर्तृत्वाने नावारूपाला आलेले पुरुष असावेत हे स्पष्ट आहे. त्यातच तत्कालीन कालखंडातील अक्कलकोटचे भोसले हे सातारच्या छत्रपतींचे मानसपुत्र आणि या घराण्यात उस्मानाबादच्या निंबाळकरांचे नातेसंबंध असल्याने त्यांचा सामाजिक दर्जाही सांगता येतो.  निंबाळकर घराण्याची माहिती देणारा एक  मजहरही उपलब्ध झालेला असून त्यात उस्मानाबादच्या जहागिरीविषयी माहिती दिलेली आहे. या पत्रात संपूर्ण उस्मानाबादचा मोकासा आनंदीबार्इंच्या नावाने देण्यात आलेला असून यात संताजी आणि रघुनाथराव राजे निंबाळकरांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर या मजहरावर बारा बलुतेदारांच्या निशाणीसह सह्या आहेत. त्याचबरोबर पेशव्यांच्या आणखी एका पत्रावरून आनंदीबाई निंबाळकर (दुस-या) यांच्याकडे तुळजापूर परिसराचा मोकासा असल्याचे स्पष्ट होते.  त्यानंतर याच निंबाळकर घराण्याकडे महादजी शिंदेंचे पुत्र दौलतराव याने दिलेले पत्र उपलब्ध झाले असून त्यात फकिरजी निंबाळकरांनी आपली जहागिरीची व्यवस्था करण्यासाठी काळेंची नियुक्ती करण्यात आलेली होती. पुढे हा काळे ठरलेली रक्कम देण्यास टाळाटाळ करताना दिसून येतो. त्यातूनच उस्मानाबादच्या जहागिरीत फकिरजी निंबाळकर आणि काळे यांच्या दरम्यान तंटा उपस्थित झालेला असून त्यात दौलतरावाने निंबाळकरांची बाजू घेतलेली आहे. खरे तर या वादात दौलतरावाने बाजू घेताना या परिसरावर शिंदे घराण्याचा संबंध कशारीतीने आला हे स्पष्ट होत नसले तरी प्रथमच उस्मानाबादशी शिंदे घराण्याचा संबंध दर्शविणारा कागद सापडलेला आहे. हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. तर सुरुवातीपासूनच निंबाळकर घराण्यात मालमत्तेवरूनचे वाद मोठ्या प्रमाणावर चालत असल्याने यातून या घराण्याचे अनेक कागद सापडतात. अशारीतीने उस्मानाबादसारख्या दुर्लक्षित भागात छत्रपती शाहू, पेशवे आणि दौलतराव शिंदे यांच्या अस्सल स्वरूपातील सनदा सापडल्याने इतिहासातील उस्मानाबादचे स्थान निश्चित करता येते. मा. मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, ओमराजे निंबाळकर, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर हे याच घराण्यातील असून मा. विलासराव देशमुख यांच्या आत्या श्रीमती पुष्पातार्इंचा विवाह निंबाळकर घराण्यात झालेला आहे. अशारीतीने या परिसरावर दोनशे वर्षे निजामाची सत्ता असली तरी उस्मानाबादमध्ये छत्रपती शिवरायांच्या नातवाने दिलेला कागद सापडल्याने मराठवाड्याच्या इतिहासात छत्रपतींचा संबंध स्पष्ट होतो. 
डॉ. सतीश कदम 
मोबा. ९४२२६ ५००४४

---|| फलटण संस्थान ||---

 

---|| फलटण संस्थान ||---

मुंबई, सातारा जिल्ह्यांतील एक जहागीर. येथील जाहागीरदाराचें आडनांव निंबाळकर. मुख्य गांव फलटण. जहागिरीच्या उत्तरेस नीरा; पूर्वेस सोलापूर जिल्हा; दक्षिणेस माण, व खटाव तालुके; पश्चिमेस वाई व कोरेगांव हे तालुके. एकदंर गांवे ७२ आहेत क्षेत्रफळ ३९७ चौरस मैल व लोकसंख्या (१९२१) ५५९६६. उत्पन्न २ लाख रु. इंग्रज सरकारास ९६०० रु. खंडणी जाते. जहगिरीतींल उत्तरेचा नीराथडीचा प्रांत सुपीक व दक्षिणेचा डोंगराळ आहे. पाऊस फार कमी पडतो. हवा उष्ण आहे. ज्वारी, बाजरी, तूर, हरभरा ही मुख्य पिंके होत. नीरा व बाणगंगा या मोठ्या नद्या. फलटण गावीं रामनवमीचा मोठा उत्सव होतो. येथें मानभावांचे एक जुने देवस्थान आहे. येथें एक हायस्कूल, दवाखाना व म्युनिसिपालिटीही आहे.
इतिहास- महाराष्ट्रांतील राजघराण्यांत फलटणच्या निंबाळकराचें घराणे फार जुनें असून सुमारे सहा सातशें वर्षें तें राज्योपभोग घेत आहे. धारच्या परमार रांजावर दिल्लीच्या सुलतानांनीं पुन्हां पुन्हां हल्ले केले, त्या धामधुमींत निंबराज परमार नांवाचा एक पुरुष दक्षिणेंत फलटणनजीक शंभुमहादेवाच्या रानांत सन १२४४ च्या सुमारास येऊन राहिला. निंबराज ज्या गावीं राहिला त्यास निंबळक आणि त्यावरून त्याच्या वंशास निंबाळकर अशें नाव पडले. निंबराजाच्या वंशजांनी पुढे फलटण हें गाव वसविलें आणि तेथें ते वतन संपादून राहूं लागले. महंमद तुघ्लखाच्या वेळेस ह्यांस 'नाईक' हा किताब व फलटणची देशमुखी मिळाली. पुढें आदिलशाहींत निंबाळकराचें महत्त्व विशेष वाढलें. निंबराजापासून चवदावा पुरुष वणंगपाळ उर्फ जगपाळराव म्हणून झाला, त्याच्या पूर्वीची माहिती उपलब्ध नाहीं.
जगपाळराव हा शूर व फौजबंद होता. स.१५६९ च्या सुमारास तो फटलणचा कारभार पाहूं लागला.हिंगणी बेरडीचे भोंसले दरसाल चैत्रांत शंभुमहादेवाच्या यात्रोस जात. रस्त्यात त्यांचा मुक्काम फलटणास निंबाळकरांकडे होई. बाबाजी भोंसल्याचे दोघे मुलगे मालोजी व विठोजी हे जगपाळरावाचे समवयीच होते. भोसलें बंधूची इभ्रत, ज्वानी व हिंमत पाहून त्या उभयतांचा ॠणानुबंध वाढला. जगपाळराव आजूबाजूस आपला प्रदेश वाढवीत होता, त्या कामीं त्यास मालोजी व विठोजीचा चांगला उपयोग झाला. असे सांगतात कीं, स.१५९०-९२ च्या सुमारास जगपाळरावाची फौज कोल्हापुरकडील कांहीं प्रांत जिकीत असतां, त्याजवर आदिलशहाची फौज चालून आली. पुढें लढाई झाली, तींत भोसलेबंधूंनीं शौर्य प्रगट करून जगपाळरावाची बाजू संभाळिली. ह्यामुळे त्या उभयतांचा स्नेह वृध्दिंगत झाला.पुढें भोसल्यांचा भाग्योदय झालेला पाहून जगपाळरावानें आपली बहीण मालेजीस दिली. हीच शहाजीची आई दीपाबाई होय. पुढें जगपाळरावाच्या मदतीनें जिजाबाईचे लग्न शहाजीशीं झाले. शहाजीनें निमाजशाहीच्या तर्फेने शहाजहानशीं युद्ध केलें, त्यांत जगपाळरावानें शहाजीस मदत केली. ह्या लढाईंतच जगपाळराव स.१६२९ त अहंमदनगरजवळ मरण पावला.
पश्चात त्याचा प्रौढ मुलगा मुधोजीराव (दुसरा) फलटणचा अधिकारी झाला. त्याला दोन बायका असून वडील बायकोला साबाजीराव व जगदेवराव, आणि धाकटीला बजाजी राव व सईबाई अशीं मुलें होती. ह्या सावत्र मुलांत तंटे लागून ते विकोपास गेले. साबाजी व जगदेव हे दोघे घर सोडून मातुश्रीसह विजापुरास गेले. तेथें दरबारांत खटपट केल्यावर त्यांस दहिगांव व भाळवणी हे दोन गांव स्वतंत्र तोदून मिळले (१६३४). अशा रीतीनें निंबाळकरांच्या तीन स्वतंत्र शाखा झाल्या. ह्या गृहकलहामुळें जहागिरांचे नुकसान झालें. मुधोजीराव आजूबाजूस पुंडावे करूं लागला म्हणून त्यावर आदिलशहाची फौज चालून आली; त्याचा पराभव होऊन, आदिलशहानें त्यास बंडखोर ठरवून सातारच्या किल्ल्यावर कैदेत ठेविलें (स.१६३१). येथें तो सात वर्षें होता. त्या मुदतीत फलटणची जहागीर जप्त होती. मुधोजीनें आपली धाकटी बायको व तिची मुलें बजाजी व सईबाई यांस, आपल्याजवळ बोलावून घेतलें. पुढें शहाजी विजापूरच्या नोकरींत राहिल्यावर त्यानें आपलें वजन खर्च करून मुधोजीची (१६३८) सुटका करविली. ह्या उपकारामुळें मुधाजीनें आपली मुलगी शिवाजीस दिली. (१६३९).
शिवाजीनें पुढें जो स्वतंत्र होण्याचा उपक्रम चालविला त्यास मुधोजीचें साहाय्य होते ही गोष्ट  विजापूरदरबारास खपत नव्हती. शिवाय मुधोजीच्या मनात असे होतें कीं, आपल्या पश्चात फलटणचा कारभार बजाजीस मिळावा. ह्या गोष्टीस त्याचे वडील मुलगे कबूल नव्हते. ते विजापुरची मदत घेऊन मुधोजीवर चालून आले. शिरवळनजीक भोळी येथें लढाई होऊन मुधोजी एका वडाच्या झाडाखाली पुत्राच्या हातून मारला गेला, त्यास बापमारीचा वड असें म्हणतात (इ.स.१६४४). ह्या लढाईंत बजाजीस कैद करून विजापुरास नेलें. तेथे बापाच्या अपराधाबद्दल त्यास जिवें मारण्याची आज्ञा झाली. परंतु आदिलशाहाच्या मुलीनें त्याला बाटवून त्याच्याशीं लग्न केल्याने त्याची शिक्षा रद्द झाली. बजाजी काहीं काळ विजापुरी राहिल्यावर देशमुखीनें फर्मान घेऊन फलटणास आला (१६५१). फलटणास अद्यापि बजाजीची समाधि (घुमट) आहे. त्यास पुढें जिजाबाईनें शुंभुमहादेवाच्या देवळांत प्रायश्चित्त देऊन परत जातींत घेतले आणि त्याचा मुलगा महादजी ह्यास शिवाजीची मुलगी सखूबाई दिली.
इ.स.१६६१ च्या पावसाळयानंतर आदिलशहा कर्नाटकांतील बंडें मोडण्याकरितां त्या प्रांतीं गेला तेव्हा बजाजी त्याच्याबरोबर होता. इ.स. १६६५ (नोव्हेंबर) त मोंगल व शिवाजी यांचें संयुक्त सैन्य विजापुरच्या मोहिमेवर निघालें. तेव्हां त्यांनीं प्रथम बजाजीपासून फलटण, व ताथवडयाचा किल्ला घेतला. हीं ठाणीं पुढें १० वर्षांनीं बजाजींनें मोंगलांपासून परत घेतलीं. बजाजीची मदत शिवाजीस गुप्तपणे असे. बजाजीच्या मुसुलमान बायकोस मूल झाल्याचें दिसत नाहीं. हिंदु स्त्री सावित्रीबाई हिला महादजी, मुधोजी व वणगोजी (तिसरा) अशीं मुलें होतीं. महादजी हा शिवाजीचा जांवई असून त्याचा एक सरदार होता. तो बहुश: कर्नाटकाकडे असे. संभाजीला त्याची चांगली मदत झाली. संभाजीचा वध झाल्यावर औरंगझेबानें या नवराबायकोस पकडून ग्वाल्हेरीच्या किल्ल्यावर हयातीपर्यंत कैदेत ठेविलें. शिवाजीनें मोजे वाल्हें (जिल्हा पुणें) येथील पाटिलकी जांवयास आंदण दिली होती. महादजीचा पुत्र बजाजी (दुसरा) हा स. १७७४ पर्यंत हयात होता. महादजीचा धाकटा भाऊ मुधोजी. त्याचा मुलगा बजाजी (तिसरा) यास राजाराम छत्रपतीची मुलगी सावित्रीबाई दिली होती पहिला बजाजी स१६७६ च्या सुमारास वारला त्यावर त्याचा तिसरा पुत्र वणगोजी (१६७६-९३) गादीवर आला; याची विशेष माहिती आढळत नाहीं. त्याच्यानंतर जानोजीस (१६९३-१७४८) गादी मिळाली. हा पेशव्यांस मिळून मिसळून वागे. त्याचा मुलगा मुधोजी (तिसरा-१७४८-६५) यानें (तिस-या) मालोजांस दत्तक घेतलें. मुधोजीच्या पश्चात दत्तकाबद्दल भांडण होऊन, सखारामबापू यांच्या सल्ल्यानें पेशव्यानीं फलटणास जप्ती पाठविली. त्या वेळीं मुधोजीच्या सगुणाबाई नांवाच्या स्त्रीनें जप्तीवाल्यांशी लढाई केली तेव्हा पेशव्यानीं जहागीर जप्त करून ती मुधोजी बिन बजाजी एका भाऊबंदाकडे चालविली. बाई त्राग्यानें ६ वर्षें बालेघाटी जाऊन राहिली. पुढें जेजुरीस पुन्हां दत्तकाची चौकशी होऊन व पेशव्यानां लाख रुपये नजर देऊन मालोजीनें जहागिरीचा ताबा मिळविला (१७७४). मालोजी हा पेशव्यांबरोबर चाकरीस असे व जहागिरीचा कारभार सगुणाबाई करीत असें. या घराण्यांत ही बाई फार प्रख्यात झाली. मालोजी हा कर्नाटकांत हरिपंततात्याच्याबरोबर असतां वाख्यानें मेला (१७७७). त्यानें जानराव यास दत्तक घेतलें होतें. जानराव हा बापाप्रमाणेंच पेशव्यांच्या सैन्यांत असे व सगुणाबाईच जहागिरीचा कारभार पाही. ती स.१७९१ त वारल्यावर, जानराव स्वत: कारभार पाहूं लागला. तो स. १८२५त वारला. त्यावर त्याची बायको साहेबजीबाई हिनें स.१८५३ पर्यंत कारभार केला. तिनें मुधोजीराव बापूसाहेब यांनां १८४० त दत्तक घेतलें. त्यानां स. १८६० त संस्थानचा अधिकार मिळाला. त्यानीं पुष्कळ वर्षें राज्य केलें. त्यानीं संस्थानांत ब-याच सुधारणा केल्या. फलटणास पाणीपुरवठयाची योजना केली, मोफत शिक्षण सुरू केलें. हल्ली (१९२५ नोव्हेंबर) त्यांचे दत्तक चिरंजीव श्री मालोजीराव नानासाहेब हे गादीवर आहेत. (इसं; फलटणची हकीकत; वाड-कैफियती; डफ; म. रि. म. वि. २)

संदर्भ : http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-44-29/10086-2013-03-01-12-24-06

नाईक- निंबाळकर

 

नाईक- निंबाळकर:-
महाराष्ट्रांतील राजघराण्यांत फलटणच्या निंबाळकराचें घराणे फार जुनें असून सुमारे सहा सातशें वर्षें तें राज्योपभोग घेत आहे. धारच्या परमार रांजावर दिल्लीच्या सुलतानांनीं पुन्हां पुन्हां हल्ले केले, त्या धामधुमींत निंबराज परमार नांवाचा एक पुरुष दक्षिणेंत फलटणनजीक शंभुमहादेवाच्या रानांत सन १२४४ च्या सुमारास येऊन राहिला. निंबराज ज्या गावीं राहिला त्यास निंबळक आणि त्यावरून त्याच्या वंशास निंबाळकर अशें नाव पडले. निंबराजाच्या वंशजांनी पुढे फलटण हें गाव वसविलें आणि तेथें ते वतन संपादून राहूं लागले. महंमद तुघ्लखाच्या वेळेस ह्यांस 'नाईक' हा किताब व फलटणची देशमुखी मिळाली. पुढें आदिलशाहींत निंबाळकराचें महत्त्व विशेष वाढलें. निंबराजापासून चवदावा पुरुष वणंगपाळ उर्फ जगपाळराव म्हणून झाला, त्याच्या पूर्वीची माहिती उपलब्ध नाहीं.
जगपाळराव हा शूर व फौजबंद होता. स.१५६९ च्या सुमारास तो फटलणचा कारभार पाहूं लागला.हिंगणी बेरडीचे भोंसले दरसाल चैत्रांत शंभुमहादेवाच्या यात्रोस जात. रस्त्यात त्यांचा मुक्काम फलटणास निंबाळकरांकडे होई. बाबाजी भोंसल्याचे दोघे मुलगे मालोजी व विठोजी हे जगपाळरावाचे समवयीच होते. भोसलें बंधूची इभ्रत, ज्वानी व हिंमत पाहून त्या उभयतांचा ॠणानुबंध वाढला. जगपाळराव आजूबाजूस आपला प्रदेश वाढवीत होता, त्या कामीं त्यास मालोजी व विठोजीचा चांगला उपयोग झाला. असे सांगतात कीं, स.१५९०-९२ च्या सुमारास जगपाळरावाची फौज कोल्हापुरकडील कांहीं प्रांत जिकीत असतां, त्याजवर आदिलशहाची फौज चालून आली. पुढें लढाई झाली, तींत भोसलेबंधूंनीं शौर्य प्रगट करून जगपाळरावाची बाजू संभाळिली. ह्यामुळे त्या उभयतांचा स्नेह वृध्दिंगत झाला.पुढें भोसल्यांचा भाग्योदय झालेला पाहून जगपाळरावानें आपली बहीण मालेजीस दिली. हीच शहाजीची आई दीपाबाई होय. पुढें जगपाळरावाच्या मदतीनें जिजाबाईचे लग्न शहाजीशीं झाले. शहाजीनें निमाजशाहीच्या तर्फेने शहाजहानशीं युद्ध केलें, त्यांत जगपाळरावानें शहाजीस मदत केली. ह्या लढाईंतच जगपाळराव स.१६२९ त अहंमदनगरजवळ मरण पावला.
पश्चात त्याचा प्रौढ मुलगा मुधोजीराव (दुसरा) फलटणचा अधिकारी झाला. त्याला दोन बायका असून वडील बायकोला साबाजीराव व जगदेवराव, आणि धाकटीला बजाजी राव व सईबाई अशीं मुलें होती. ह्या सावत्र मुलांत तंटे लागून ते विकोपास गेले. साबाजी व जगदेव हे दोघे घर सोडून मातुश्रीसह विजापुरास गेले. तेथें दरबारांत खटपट केल्यावर त्यांस दहिगांव व भाळवणी हे दोन गांव स्वतंत्र तोदून मिळले (१६३४). अशा रीतीनें निंबाळकरांच्या तीन स्वतंत्र शाखा झाल्या. ह्या गृहकलहामुळें जहागिरांचे नुकसान झालें. मुधोजीराव आजूबाजूस पुंडावे करूं लागला म्हणून त्यावर आदिलशहाची फौज चालून आली; त्याचा पराभव होऊन, आदिलशहानें त्यास बंडखोर ठरवून सातारच्या किल्ल्यावर कैदेत ठेविलें (स.१६३१). येथें तो सात वर्षें होता. त्या मुदतीत फलटणची जहागीर जप्त होती. मुधोजीनें आपली धाकटी बायको व तिची मुलें बजाजी व सईबाई यांस, आपल्याजवळ बोलावून घेतलें. पुढें शहाजी विजापूरच्या नोकरींत राहिल्यावर त्यानें आपलें वजन खर्च करून मुधोजीची (१६३८) सुटका करविली. ह्या उपकारामुळें मुधाजीनें आपली मुलगी शिवाजीस दिली. (१६३९).
शिवाजीनें पुढें जो स्वतंत्र होण्याचा उपक्रम चालविला त्यास मुधोजीचें साहाय्य होते ही गोष्ट विजापूरदरबारास खपत नव्हती. शिवाय मुधोजीच्या मनात असे होतें कीं, आपल्या पश्चात फलटणचा कारभार बजाजीस मिळावा. ह्या गोष्टीस त्याचे वडील मुलगे कबूल नव्हते. ते विजापुरची मदत घेऊन मुधोजीवर चालून आले. शिरवळनजीक भोळी येथें लढाई होऊन मुधोजी एका वडाच्या झाडाखाली पुत्राच्या हातून मारला गेला, त्यास बापमारीचा वड असें म्हणतात (इ.स.१६४४). ह्या लढाईंत बजाजीस कैद करून विजापुरास नेलें. तेथे बापाच्या अपराधाबद्दल त्यास जिवें मारण्याची आज्ञा झाली. परंतु आदिलशाहाच्या मुलीनें त्याला बाटवून त्याच्याशीं लग्न केल्याने त्याची शिक्षा रद्द झाली. बजाजी काहीं काळ विजापुरी राहिल्यावर देशमुखीनें फर्मान घेऊन फलटणास आला (१६५१). फलटणास अद्यापि बजाजीची समाधि (घुमट) आहे. त्यास पुढें जिजाबाईनें शुंभुमहादेवाच्या देवळांत प्रायश्चित्त देऊन परत जातींत घेतले आणि त्याचा मुलगा महादजी ह्यास शिवाजीची मुलगी सखूबाई दिली.
इ.स.१६६१ च्या पावसाळयानंतर आदिलशहा कर्नाटकांतील बंडें मोडण्याकरितां त्या प्रांतीं गेला तेव्हा बजाजी त्याच्याबरोबर होता. इ.स. १६६५ (नोव्हेंबर) त मोंगल व शिवाजी यांचें संयुक्त सैन्य विजापुरच्या मोहिमेवर निघालें. तेव्हां त्यांनीं प्रथम बजाजीपासून फलटण, व ताथवडयाचा किल्ला घेतला. हीं ठाणीं पुढें १० वर्षांनीं बजाजींनें मोंगलांपासून परत घेतलीं. बजाजीची मदत शिवाजीस गुप्तपणे असे. बजाजीच्या मुसुलमान बायकोस मूल झाल्याचें दिसत नाहीं. हिंदु स्त्री सावित्रीबाई हिला महादजी, मुधोजी व वणगोजी (तिसरा) अशीं मुलें होतीं. महादजी हा शिवाजीचा जांवई असून त्याचा एक सरदार होता. तो बहुश: कर्नाटकाकडे असे. संभाजीला त्याची चांगली मदत झाली. संभाजीचा वध झाल्यावर औरंगझेबानें या नवराबायकोस पकडून ग्वाल्हेरीच्या किल्ल्यावर हयातीपर्यंत कैदेत ठेविलें. शिवाजीनें मोजे वाल्हें (जिल्हा पुणें) येथील पाटिलकी जांवयास आंदण दिली होती. महादजीचा पुत्र बजाजी (दुसरा) हा स. १७७४ पर्यंत हयात होता. महादजीचा धाकटा भाऊ मुधोजी. त्याचा मुलगा बजाजी (तिसरा) यास राजाराम छत्रपतीची मुलगी सावित्रीबाई दिली होती पहिला बजाजी स१६७६ च्या सुमारास वारला त्यावर त्याचा तिसरा पुत्र वणगोजी (१६७६-९३) गादीवर आला; याची विशेष माहिती आढळत नाहीं. त्याच्यानंतर जानोजीस (१६९३-१७४८) गादी मिळाली. हा पेशव्यांस मिळून मिसळून वागे. त्याचा मुलगा मुधोजी (तिसरा-१७४८-६५) यानें (तिस-या) मालोजांस दत्तक घेतलें. मुधोजीच्या पश्चात दत्तकाबद्दल भांडण होऊन, सखारामबापू यांच्या सल्ल्यानें पेशव्यानीं फलटणास जप्ती पाठविली. त्या वेळीं मुधोजीच्या सगुणाबाई नांवाच्या स्त्रीनें जप्तीवाल्यांशी लढाई केली तेव्हा पेशव्यानीं जहागीर जप्त करून ती मुधोजी बिन बजाजी एका भाऊबंदाकडे चालविली. बाई त्राग्यानें ६ वर्षें बालेघाटी जाऊन राहिली. पुढें जेजुरीस पुन्हां दत्तकाची चौकशी होऊन व पेशव्यानां लाख रुपये नजर देऊन मालोजीनें जहागिरीचा ताबा मिळविला (१७७४). मालोजी हा पेशव्यांबरोबर चाकरीस असे व जहागिरीचा कारभार सगुणाबाई करीत असें. या घराण्यांत ही बाई फार प्रख्यात झाली. मालोजी हा कर्नाटकांत हरिपंततात्याच्याबरोबर असतां वाख्यानें मेला (१७७७). त्यानें जानराव यास दत्तक घेतलें होतें. जानराव हा बापाप्रमाणेंच पेशव्यांच्या सैन्यांत असे व सगुणाबाईच जहागिरीचा कारभार पाही. ती स.१७९१ त वारल्यावर, जानराव स्वत: कारभार पाहूं लागला. तो स. १८२५त वारला. त्यावर त्याची बायको साहेबजीबाई हिनें स.१८५३ पर्यंत कारभार केला. तिनें मुधोजीराव बापूसाहेब यांनां १८४० त दत्तक घेतलें. त्यानां स. १८६० त संस्थानचा अधिकार मिळाला. त्यानीं पुष्कळ वर्षें राज्य केलें. त्यानीं संस्थानांत ब-याच सुधारणा केल्या. फलटणास पाणीपुरवठयाची योजना केली, मोफत शिक्षण सुरू केलें. हल्ली (१९२५ नोव्हेंबर) त्यांचे दत्तक चिरंजीव श्री मालोजीराव नानासाहेब हे गादीवर आहेत. (इसं; फलटणची हकीकत; वाड-कैफियती; डफ; म. रि. म. वि. २)

परमार वंश से पवार वंश तक का इतिहास

 परमार वंश से पवार वंश तक का इतिहास 

लेखक :सोनू भगत

परमार वंशाचा उदय इसवी सन पूर्व २५०० च्या आसपास राजस्थानमधील अबू पर्वतावरील अग्निकुंडामधून झाल्याचा उल्लेख भविष्यपुराणामध्ये मिळतो. हे ‘प्रमार’ परमार वंशाचे प्रथम शासक होते व त्यांची राजधानी अवंतिका (उज्जैन) होती. परमार राजवंशामध्ये सम्राट विक्रमादित्य व चक्रवर्ती राजा भोज यांच्यासारखे महान, वीर, पराक्रमी, विद्वान राजे होऊन गेले. परमार राजवंशाचा अस्त इसवी सन ७१० मध्ये शक आणि हूण यांनी केला. ‘कृष्णराज (उपेंद्र)’ यांनी परमार राजवंशाची राजधानी उज्जैन पुन्हा इसवी सन ८९७ मध्ये जिंकली व परमार साम्राज्य उभे केले. चक्रवर्ती राजा भोज यांचा जन्म ९८० मध्ये झाला. राजा भोज त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षी उज्जैनीचे शासक बनले. त्यांनी त्यांची राजधानी उज्जैनवरून धारमध्ये स्थलांतरित केली. त्यांनी त्यांच्या शासनकाळामध्ये शंभरपेक्षा जास्त लढाया जिंकल्या. त्यामध्ये भीम, कर्णाट, लाट, चालुक्य, अहिरात, तोग्गल, महमुद गजनवी ह्या लढाया मुख्य होत. त्यांनी हिमालय ते सागर व द्वारका ते बंग देश अशा चतुर्भुज दिशांमध्ये शासन केले. चक्रवर्ती राजा भोज साहित्य, लोककला, संस्कृती यांचे पुरस्कर्ता होते. त्यांनी स्वत: चौऱ्याऐंशी ग्रंथ लिहिले. त्यामध्ये चंपु रामायण, आयुर्वेद, रसायनशास्त्र, विमानशास्त्र, वाग्देवी स्तुती हे प्रमुख आहेत. तसेच, राजा भोज यांना मालव साम्राज्याच्या रयतेने मालव नायक, अवंती नायक, मालवाधीश, महाराजाधिराज परमेश्वर, लोकनारायण, कृष्ण, रंगमल्ल, आदित्यराज, मालवमांडन, धारेश्वर, त्रिभुवन नारायणन, विदर्भराज, अहिराज, अहिंद्र चक्रवर्ती अशा चौऱ्याऐंशी उपाध्यांनी अलंकृत केले आहे. त्यांचा उल्लेख सी.व्ही. वेंकटचलम यांनी ‘धार स्टेट गॅजेटियर’मध्ये केलेला आहे (पृष्ठ क्रमांक १०७).
राजा भोज यांचे निधन १०५५ मध्ये दीर्घ आजाराने झाले. त्यानंतर धारच्या गादीवर उदयादित्य पंवार विराजमान झाले. उदयादित्य यांनी त्यांचे साम्राज्य मजबूत केले. परमार साम्राज्याचे शासन माळवा व विदर्भ या क्षेत्रांमध्ये होते. उदयादित्य यांनी त्यांचे दोन लहान भाऊ लक्ष्मणदेव व जगदेव यांना विदर्भामधील नगरधन किल्ला (रामटेक) व चांदा किल्ला (चंद्रपूर) येथे सुभेदार नियुक्त केले. उदयादित्यानंतर मात्र परमार राजवंश खचत गेला. परमार राजवंशाचा अस्त अल्लाउद्दिन खिलजीच्या शासन काळापर्यंत झाला. माळवा हा प्रांत मोगलांनी जिंकला. सुभेदार साबुसिंह याच्या नेतृत्वाने हजारोंच्या संख्येने पंवार शिवाजी महाराज यांच्या आश्रयान्वये१६६४ मध्ये अहमदनगर-मधील सुपे या गावामध्ये स्थलांतरित झाले. त्यांचे वंशज मराठा साम्राज्याचे स्तंभ बनले. पेशवा बाजीरावाच्या काळामध्ये माळवा प्रांत मराठ्यांनीच काबिज केला. उदाजीराव पवार यांना धारचे सुभेदार म्हणून १७२७ मध्ये नियुक्त करण्यात आले आणि धारच्या गादीवर परमार/पवार वंशाचा ध्वज पुन्हा लहरला! आनंदराव पवार धारच्या गादीवर; तसेच, तुकोजीराव पवार देवासच्या गादीवर १७३२ मध्ये विराजमान झाले.
-udhajirav-pawarपवारांचे अनेक क्षेत्रांमध्ये स्थलांतर पुन्हा औरंगजेबाच्या दहशतीमुळे झाले, त्यामधील एक स्थलांतर गोंडवाना (विदर्भ) मध्ये आहे. गोंडवाना प्रांताचे राजे बख्त बुलंदशाह होते. त्याची राजधानी देवगढ होती. पवारांनी बख्त बुलंदशाह याच्या आश्रयामध्ये नगरधन किल्ल्यामध्ये आश्रय घेतला. बख्त बुलंदशाह याने त्याची राजधानी देवगढवरून नागपूरला १७०२ मध्ये हलवली. पेशवा बाजीराव यांच्या साहसामुळे नागपूर मराठा साम्राज्यामध्ये विलीन झाले. पवारांचे वंशज मराठा साम्राज्याचे आधारस्तंभ बनले. पवारांनी नागपूरचे राजे रघुजी भोसले यांच्या आदेशाने चांदा, देवगढ, छत्तिसगढ ते कटक शहरापर्यंत क्षेत्र मराठ्यांना १७४३ मध्ये जिंकून दिले. रघुजी भोसले त्या विजयाने अती हर्षित झाले व त्यांनी पवारांना वैनगंगा नदीचे खोरे भेट म्हणून प्रदान केले. पवारांनी वैनगंगा नदीकाठी नापीक क्षेत्राला सुपीक क्षेत्रामध्ये बदलवले. मुधोजी भोसले व ब्रिटिश यांच्यामध्ये युद्ध नागपूर येथील सीताबर्डी येथे १८१७ मध्ये झाले. मुधोजी त्या युद्धामध्ये पराभूत झाले. ते युद्ध मराठ्यांसाठी कलाटणी देणारे ठरले. त्या युद्धानंतर ब्रिटिशांनी नागपूर शहर काबिज केले. ब्रिटिशांनी राघोजी (द्वितीय) यांचे नातू राघोजीच्या (तृतीय) डोक्यावर राजमुकुट ठेवला. राघोजी तृतीय यांनी पवारांना मलपुरी - तिरखेडी (भंडारा जिल्हा) १८१८ मध्ये एकशेनव्वद गावांची जमीनदारी बहाल केली. तसेच, ब्रिटिशांनी महागाव - बडद (साकोली/भंडारा जिल्हा) ही जमिनदारी पवारांना १८४० मध्ये बहाल केली. नंतर, पवार ब्रिटिश शासनाचे आधारस्तंभ बनले. ब्रिटिशांनी पवारांना चारशेहून अधिक गावांची मालगुजारी, पाटिलकी व महाजनी बहाल केली.
हरिचंद चौधरी पवार यांनी जॉर्ज पंचम यांच्या विरोधामध्ये नारेबाजी १९११ मध्ये केली. त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात भंडारा जिल्ह्यामध्ये संघटन तयार केले, म्हणून त्यांना अटक करण्यात आली. तेव्हा पवार समाजामध्ये स्वातंत्र्याची चाहूल निर्माण झाली. पवार समाज शेकडोंच्या संख्येमध्ये गांधीजींच्या असहकार आंदोलन, जंगल सत्याग्रह, चले जाव आंदोलन यांमध्ये सामील झाला.
‘पवार’ या नावामध्ये १९५१ मध्ये बदल होऊन ‘पोवार’ असे झाले. पोवार समाज राजपूत जातिव्यवस्थेतून विभक्त होऊन स्वतंत्र जात म्हणून आला. मराठा समाजामध्ये शहाण्णव कुळ व राजपूत समाजामध्ये एकशेचोपन्न कुळ आहेत. तसेच, पोवार जातीमध्ये छत्तीस कुळ आहेत. पोवार जातीतील वैवाहिक संबंध या छत्तीस कुळांमध्येच होऊ शकतो. धार, उज्जैन, रतलाम, राजस्थान, गुजरात येथील परमार/पंवार/पँवार हे राजपूत समाजामध्ये तर पश्चिम महाराष्ट्रामधील पवार कुळ मराठा समाजामध्ये समाविष्ट झालेले आहेत. पण सर्व पंवार, परमार, पँवार, पोवार, पवार विभक्त नसून एकच आहेत.

पवार-विश्वासराव..

 


पवार-विश्वासराव..
विश्वासराव - विश्वासराव हा ख़िताब पवार घराण्याला शिवपूर्व काळात प्राप्त झाला होता.विश्वासराव हा मराठ्यांच्या ९६ कुळी पवार घरण्याचा ख़िताब आहे.
शहाजी राजे यांचे छोटे बंधू शरीफजी राजे यांच्या पत्नी दुर्गाबाईसाहेब ह्या विश्वासराव ह्या घराण्यातील होत्या.
करतलब खानने स्वराज्यावर आक्रमण केले त्या वेळी त्याच्या सोबत उदाराम देशमुख ह्याची बायको रायबाघिन हि होती. हि फ़ौज स्वराज्या चालून आल्यावर त्या सैन्यावर रामजी पाटिल देशमुख्, यशवंतराव रामजी विश्वासराव व दिनकरराव बागराव पाच पाच हजार मावळे लोकनिशी चालून गेले.(शिवदिग्विजय)
शिवदिग्विजय बखरीतील सरदार नामवलित रामजी विश्वासराव सरदार उल्लेखित आहे.
शिवराज्ञानी सोयरबाईसाहेब यांची कन्या दिपाबाईसाहेब यांचा शुभविवाह ई.स.१६७2 मधे सरदार रामाजी विश्वासराव पुत्र यशवंतराव रामाजी विश्वासराव यांच्या सोबत किल्ले रायगडावर झाला..
एका महजरतील उल्लेखा वरुण १५ में १६२३ मधे शिरवळ परगण्याचा हवालदार विश्वासराऊ होता.(शि.च.सा.ख़.१)
भोसले आणि पवार-विश्वासराव मोठी तोलामोलाची घराणी. भोसले कुळ सतत रणक्षेत्रात तर विश्वासराव अनुशासनात होते.
शिवनेरीचे गडकरी विजयराव सिधोजी विश्वासराव ह्यांची मुलगी जयंतीबाईसाहेब ह्यांचा शुभविवाह शहाजी राजांचे जेष्ठ पुत्र शंभु राजांशी झाला होता.(शिवभारत)
राजाराम महाराजांच्या काळात
ई.स.१६९४ मधे मोघलि अधिकारी हिम्मत खान याने अचानक केलेला हल्ला बुबाजी पवार यांनी परतुंन लावला. या पराक्रमवर खुष होऊंन राजाराम महाराजांनी बुबाजी पवार यांना विश्वासराव हे सन्मानाचे पद व विश्वासराई हा सरंजाम दिला.१६९४ साली संताजी घोरपडेवर हिम्मत खान ने हल्ला केला. हा हल्ला बुबाजी पवार यांनी परतावूंन लावला. सुप्यात असलेले बुबाजी पवारांचे मोठे घराणे विश्वासराव ह्या नावाने प्रसिद्धिस आले.बुबाजी पवारांची जेष्ठ शाखा विश्वासराव ख़िताब लावत असे. पवार -विश्वासराव असे. फ़क्त विश्वासराव असे लावत नसत. ते विश्वासराव ख़िताब म्हणून वापरत असत. परंतु शिवपूर्व काळातील विश्वासरावांचे वंशज हे फ़क्त विश्वासराव हे उपनाव म्हणून वापरत. विजयराव सिधोजी विश्वासराव या घरान्याची शाखा सध्या पनवेल तालुक्यात कल्हे या गावात आहे.तसेच विश्वासराव घराण्याचे वास्तव्य कोकणात राजापुर तालुक्यात झर्ये, करावली रात्नागिरि मधे लांज्या तालुक्यात कोंडगे,कुरंग गावी आहे.
तसेच मुळशी तालुक्यात शेडाणी या गावात असणारी वैद्य कुटुंब मुळची विश्वासराव आहेत..
कल्हे,झर्ये,कोंडगे,कुरण,शेडाणी येथील विश्वासराव हि शिवपूर्व काळातील विश्वासराव आहेत.
विश्वासराव हे घराणे स्वराज्याशी कायम एकनिष्ठ राहिले.

शाबूसिंग उर्फ साबाजी पवार (परमार ) यांची समाधी

 शाबूसिंग उर्फ साबाजी पवार (परमार ) यांची समाधी


शाबूसिंग उर्फ साबाजी पवार (परमार ) यांची समाधी पारनेर रोड सुपे = हंगे शिवेस लागून
शाबूसिंग पवार
पवार (परमार )यांचे वंशातील २3८ वा पुरुष = शाबूसिंग मालवी हिंदुस्थानी नाव पुढे दक्षिणी नाव साबाजी पवार
उत्तर हिंदुस्थान मध्ये माळवा व राजपुताना या प्रांतात परमार उर्फ पवार ह्या घराण्याचे थोर राज्य कित्येक शतके चालू होते मोगलाच्या आगमनानंतर उत्तरेतील हिंदू राज्यास उतरती कळा लागून पुढे त्यांचे राज्य लयास गेले.
तेव्हा या घराण्याच्या अनेक शाखा निरिनराळ्या मुलखात जाऊन स्थाइक झाल्या. यातील एका शाखेचा उदय महाराष्ट्रात १७ व्या शतकाचे आरंभी झाला. या शाखेचा मुळ पुरूष शाबूसिंग उर्फ साबाजी पवार हे होत. देवास व धार येथील राज्यकर्त्याचे दक्षिणेतील प्रसिद्ध असलेले हे मुळ पुरूष होत. शाबूसिंगाच्या वडीलाचे नाव किसनसिंग व आई नगीनाकुंवर होत. तसेच दूर्जनसिंग व लक्ष्मीबाई अशी दोन आपत्य किसनसिंगास होती.
शाबूसिंग यांचा जन्म धारानगरीत झाला. यांच्या पहील्या पत्नी राजपूत घराण्यातील त्यांचे नाव फुलकुंवर.
महाराष्ट्रात आल्यावर शाबूसिंगानी व त्याच्या वंशजानी येथील मराठे लोकांच्या रीतीभाती उचलून त्यांच्यात सामील झाल्यामुळे त्यांना पुढे मराठे मानले जाऊ लागले.
पुढे महाराष्ट्रात आल्यावर ऐका कुलीन मराठा मुलीशी लग्न केले त्यांच्या पत्नी चे नाव म्हाळसाबाई.
महाराष्ट्रात वास्तव्य
निजामशाहीच्या मुलखातील अहमदनगरजवळ हंगे गावचे रानात कांबरगावच्या डोंगरातील घाटात शाबूसिंग यांचे प्रथम ठाणे होते.
शाबूसिंग हे आपल्या पदरी घोडदळ,पायदळ बाळगत व या लढाऊ लोकांच्या पोषणार्थ ते आसपासच्या निजामशाही व मोगलांच्या मुलखात लुटालुट करीत असत.
पुढे शाबूसिंगानी अहमदनगर सुभ्यात सुखेवाडी उर्फ सुपे हे गाव वसवीले. याच सुमारास छ.शिवाजी महाराजांनी शुर वीर मावळे एकत्र करून स्वराज्यस्थापनेचे पवित्र कार्य आरंभीले होते.महाराजांनी शाबूसिगाना हाताशी धरले
१६५७ मध्ये कोकण प्रांत हस्तगत करण्यासाठी महाराजांनी कल्याणवर स्वारी केली त्यावेळी शाबूसिंगानी मोगलांवर चाल करून पराक्रम गाजवीला
शाबूसिंग पवार मृत्यू
दळवी पाटील हंगे हे गाव सुप्याच्या शिवेस लागून असल्याने गावाशिवेवरुन शाबूसिंग व हिंगेकर यांच्या मधे सारख्या झटापटी होत. दळव्यानी सुपे व हंगे गावचे दरम्यान जाबूळ ओढयात एकाकी छापा टाकून घात करुन ठार मारले
हा प्रसंग कार्तिक शु.२ सोमवार शके १५८o ( ता.१८.१о.१६५८ ) रोजी घडला.
माहिती साभार श्री संग्राम पवार सुपे

धार पवारांचा इतिहास


 इतिहास:- येथील संस्थानिक पवार आडनांवाचे मराठे असून, ९ ते १३ शतकापर्यंत माळव्यावर राज्य चालविणाऱ्या परमार रजपुतांचे ते वंशज आहेत. स. १६५० त धार अकबराच्या हातांत गेलें व त्याचा समावेश माळव्याच्या सुभ्यांत करण्यांत आला. १६९४ सालीं मराठ्यांनीं नर्मदा नदी ओलांडून ह्या प्रदेशांतील धरमपुरी जिल्हा व गांव लुटलें. यानंतर येथें एकसारख्या परकीय स्वाऱ्या येत गेल्या. १७२३ सालीं निजामानें माळव्याच्या सुभेदारीचा राजीनामा दिल्यावर त्याच्या जागीं गिरिधर बहादूर हा आला. त्यानें मराठ्यांनां जोराचा विरोध करून, मध्य हिंदुस्थानांत त्यांची सत्ता कांहीं वेळपर्यंत बसूं दिली नाहीं.सांप्रतच्या धारच्या पवार घराण्यानें शिवाजीपासून पुढें दीडशे वर्षें मराठी राज्यांत अनेक लहान मोठ्या कामगिऱ्या केल्या आहेत. शिवाजीच्या वेळीं यांचा मूळ पुरुष साबूसिंग (साबाजी अथवा शिवाजी) यानें कल्याण काबीज करतांना आंबेगांवच्या घाटांत मुसुलमानांशीं लढाई दिली, तींत तो जखमी झाला. साबूसिंगानें नगर जिल्ह्यांतील सुपें गांव हें आपलें मुख्य ठाणें केलें; तेव्हां शेजारच्य हंगे गांवच्या दळव्याची झटापट होई. अशा एका झटापटींत (जांभुळ ओढ्यांत) साबाजी मारला गेला: हल्लीं तेथें एक चबुतरा बांधलेला आहे. साबाजीच्या मरणानंतर त्याचा मुलगा कृष्णाजी हा लहान असल्यानें आजोळीं संगमनेरास राही. कृष्णाजी हा मोठा झाल्यावर त्यानेंहि शिवाजीच्या पदरीं नौकरी धरली यानें आदिलशाहींतील आपल्या शेजारच्या प्रांतांत स्वाऱ्याशिकाऱ्या केल्या व एका ब्राह्मणाच्या मुलीस मुसुलमानांच्या हातून सोडविलें. कृष्णाजीस बुवाजी, रायाजी व केरोजी अशीं तीन मुलें होतीं; कृष्णाजीचें व बुवाजीचें नांव शिवाजीच्या सरदारांच्या यादींत आहे. बुवाजी, रायाजी व केरोजी यांनीं राजारामाच्या वेळीं मोंगलांनां तोंड देऊन तापी तीरापर्यंत आपला अंमल बसविला, आणि मोठमोठीं मसलतीचीं कामें पार पाडलीं म्हणून राजारामानें यांनां विश्वासराव हा किताब व सरंजाम दिला. केरोजी याला सेनाबारासहस्त्री मनसब दिली. चाकणप्रांत त्याजकडे वहिवाटीस होता. केरोजी हा शाहूच्या कारकीर्दीतहि होता. त्याला चंद्रसेन जाधवावर शाहूनें एकदां धाडलें होतें (१७२४). बुबाजी, केरोजी व रायाजी यांचीं तीन निरनिराळीं घराणीं विद्यमान आहेत. बुवाजीपासूनच धार व देवास ही संस्थानें उगम पावलीं.बुबाजीचे पुत्र दोन, काळोजी व संभाजो. संभाजीस रामचंद्रपंत अमात्यानें योग्यतेस चढविलें (ज्ञा. को. वि. ९ यांत संभाजीस शिवकालीन म्हटलें आहे, तें गोडबाले यांच्या हिंदुस्थानांतील ऐ. वि. राज्यें या पुस्तकाच्या आधारें म्हटलें आहे.). पुढें १६९४-१७०० पर्यंत मराठ्यांच्या माळव्यांतील स्वाऱ्यांत ही पवारमंडळी असावींत. कारण स. १६९६ मधील मांडवगडच्या स्वारींत त्यांचा स्पष्ट उल्लेख आहे. संभाजी हा शाहूच्या वेळीं बराच पुढें आला; तो दीर्घायु होता. त्याचें ठाणें मलठण येथें असून त्यानें नगर जिल्ह्यांत बऱ्याच पाटिलक्या खरेदी केल्या. संभाजीस उदाजी, आनंदराव व जगदेव अशीं तीन मुलें होती (उदाजीबद्दलची माहिती ज्ञानकोश विभाग ९ मध्यें पहा; आंनदरावाबद्दलची माहिती विभाग ८ मध्यें पहा. त्याविरहित माहिती येथें दिली आहे).उदाडीनें स. १७०९ त मांडवगड सर केला. त्यानें गुजराथेंतहि बरींच ठाणीं घातलीं, तीं आपल्याकडे घेण्याची खटपट पिलाजी गायकवाडानें केली, परंतु ती साधली नाहीं. नारो शंकर यास (१७२०-२१) यावेळीं उदाजीच्या दिमतीस दिलें होतें. बाजीरावानें उदाजीस १७२२ सालीं माळवा व गुजराथ प्रांताचा निमा मोकासा सरंजामी करून दिला. यापुढें बहुधा दरसाल उदाजीनें माळव्यांत स्वाऱ्या केल्या. गुजराथबद्दल मात्र उदाजी व गायकवाड यांच्यांत नेहमीं संटे होत. ते शाहूनें तोडून, उदाजीस गुजराथमाळव्याची चौथाईसरदेशमुखी दिली (१७२६). यानंतर पालखेडच्या लढाईंत उदाजी लढला होता, व माळव्यांतील मोंगली सुभ्यावरहि त्यानें चढाई केली होती (१७२८). खानदेश, सोंधवाडा, काठेवाड, मेवाड, मारवाड, कच्छ वगैरे भागांतील मोकासावसुली उदाजीकडेच होती (१७३० पर्यंत). मात्र यावेळीं तो चिमाजीआप्पाच्या दिमतीखालीं होता. शाहूराजा हा उदाजीची सल्लामसलत घेत असे. सवाई जयसिंगाशीं या सालीं (१७३० मार्च) जी मसलत चालली होती तींत उदाजी हा होता. त्याचा व गुजराथचा निकट संबंध इ. स. १७३४ पासून सुटला असावा पेशव्यांचें व याचें वांकडें आलें असतां होळकरानें त्यांची समजूत केली होती. मध्यंतरीं (१७३५) शाहूची त्याच्यावर गैरमर्जी झाली होती, ती ब्रह्मोंन्द्रस्वामीच्या खटपटीनें नाहींशीं झाली (१७३५). उदाजी शूर व मुत्सद्दी असल्यानें माळव्यांत "जिधर उदा उधर खुदा" अशी म्हण लोकांच्या तोंडून अद्यापि ऐकूं येते. उदाजी ब्रह्मोन्द्राच्या प्रेमांतील होता. तो तापट व आग्रही असल्यानें आणि पेशव्यांच्या विरुद्ध तेढीनें वागत असल्यानें सन १७३६ नंतर त्याच्या उत्कर्षास आळा बसत

Friday 25 March 2022

महारठी आणि महाराष्ट्र

 



महारठी
आणि महाराष्ट्र
पोस्तसांभार :: ओंकार ताम्हनकर
महारठी हा शब्द महाराष्ट्रातील नाणेघाट, कार्ले, बेडसा, कान्हेरी या लेणी समूहातील लेखात आढळतो. तसेच महारठी हा शब्द कोरलेली नाणी सुद्धा सापडली आहेत.
महारठी (महारथी) हा शब्द २ शब्दांचे एकत्रिकरण आहे. महारठी/रथी. राष्ट्रीय/राष्ट्रिक - रठीक - रठी असा या शब्दाचा प्रवास आहे.
सातवाहनांच्या पूर्वीचा महारठी -
चंद्रगुप्त मौर्य, अशोक यांच्या लेखांमध्ये राष्ट्रीय हा शब्द एखाद्या प्रादेशिक विभागाचा प्रमुख या अर्थाने आलेला दिसतो. उदाहरणार्थ, रुद्रदामनाचा जुनागड लेखानुसार चंद्रगुप्ताने पुष्यगुप्त याची नेमणूक 'राष्टीय' या पदावर केली होती.
या राष्ट्रीय शब्दावरून रठी आणि महारठी असा शब्द तयार झाला असावा असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
सातवाहन काळ
बौद्ध लेण्यांतील शिलालेखांवरून असे दिसून येते की पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांचा प्रदेश, कोकण आणि देशाचा काही भाग यावर या महारठींची सत्ता होती.
सातवाहन काळात सुद्धा महाराष्ट्रात महारठी होते हे सातवाहन राजा सिरी/श्री सातकर्णीची पत्नी नागनिका/नायनिका हिच्या नाणेघाटातील शिलालेखातून कळते. नागनिका ही महारठी त्रणकयिर याच्या कुलातील होती असा उल्लेख आहे. तसेच आपल्याला हे ही माहीत आहे की ती कयलाळ नामक महारठी ची पुत्री होती.
यावरून सातवाहन काळात हे महारठी/महारथी सातवाहन राजसत्तेच्या अंतर्गत शासनव्यवस्था चालवत होते हे दिसून येते.
कार्ले लेण्यांतील उल्लेख
  1. कार्ले येथील लेण्यांमध्ये दान लेखात अशाच गोतीपुत्र महारठी अगीमित्रणक याचा उल्लेख आला आहे. त्याने सिंहस्तंभासाठी देणग्या दिल्या होत्या.
  2. राजा वाशिष्ठीपुत्र स्वामी पुळुमावि याच्या राज्यकाळात महारठी कौशिकीपुत्र मित्रदेवाच्या मुलाने म्हणजे महारठी वाशिष्ठीपुत्र सोमदेव याने लेण्यांतील संघाला कर,उपकर यांसाहित गावाला देय(रोख रक्कम) व मेय(धान्य) दिले, असा उल्लेख आला आहे.
तात्पर्य
या नाणेघाट व कार्ले येथील उल्लेखांवरून काही गोष्टी सिद्ध होतात.
१. महारठी एक मोठं पद होतं.
२. या पदावर असलेली माणसे धनाढ्य किंवा नावाजलेली होती. शासन व्यवस्था पाहणारी होती.
३. महारठी हे पद पिढ्यांपिढया दिलं जात होतं.
अतिरिक्त
महारठी वरून महाराष्ट्र अशा लावला जाणाऱ्या तर्काबाबत.
हल्ली महाराष्ट्र हे नाव महारठी किंवा मरहट्टी वरून आलं आहे असा तर्क लावला जातो. मुळात हा तर्कच चुकीचा आहे. महाराष्ट्र या नावाचे उल्लेख अगदी महारठीच्या काळापासून मिळतात. त्यातील काही महत्त्वाचे उल्लेख पुढील प्रमाणे,
  • महारठी हे शब्द ज्या काळात प्रचलित होते त्याच्याच जवळपासच्या काळात दिपवंसो, महावंसो या बौद्ध धर्मग्रंथांमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख मिळतो. महाराष्ट्र या देशात बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी महाधम्मरखित हा भिक्खू पाठवण्याचा उल्लेख आहे.
  • वररुचिने रचलेल्या प्राकृत भाषेच्या ग्रंथात भाषेचे नाव माहाराष्ट्री असे दिले आहे. यावरून महाराष्ट्रामध्ये बोलली जाणारी भाषा म्हणजे माहाराष्ट्री असा तर्क लागतो.
  • चालुक्य सम्राट द्वितीय पुलकेशी याच्या एहोळे येथील प्रशस्तीलेखात त्याच्या अधिपत्याखाली जे प्रदेश होते त्यात 'त्रिमहाराष्ट्र' आणि त्यातील ९९००० गावे' असा उल्लेख आला आहे.

करवीर राज्याचे इंग्रजांच्या हातावर उदक सोडण्यास भाग पाडणारे—शिधोजीराव उर्फ अप्पा देसाई निपाणीकर.

 Post By

-


करवीर राज्याचे इंग्रजांच्या हातावर उदक सोडण्यास भाग पाडणारे—शिधोजीराव उर्फ अप्पा देसाई निपाणीकर.
काही व्यक्तींच्या अंगी अफाट ताकद,शौर्य,धाडस,पराक्रम आदि गुणांचा समुच्चय असून देखील त्याचा राष्ट्र कल्याणासाठी उपयोग न होता उलट अशा व्यक्ती त्रासदायक समाजाला,राज्याला घातक ठरल्याची काही उदाहरणे मराठ्यांच्या इतिहासात आढळतात.अशाच एका बाहुबली सरदाराची ज्याने कोल्हापूर राज्याचे सार्वभौमत्व घालविण्याचे पुण्यकर्म केले,आज ओळख करून घेऊ या.
सध्या कर्नाटक राज्यात मोडणाऱ्या निपाणी या गावात नणंदीकर देसाई आडनावाचे जुने लिंगायत जहागीरदार घराणे होते.आदिल्शहा कडून ह्या घराण्यास शिरगुप्पी आणि निपाणी गावे इनाम मिळाली होती.हे घराणे मुळचे लिंगायत असले तरी मराठेशाहीत मराठा बनले.मुराराव देसाई यांच्या थोरल्या पत्नीचा मुलगा म्हणजेच शिधोजीराव.यांचा जन्म इ.स.१७७४ साली झाला.अंगयष्टी पहिल्या पासूनच इतकी धिप्पाड आणि धष्टपुष्ट होती कि साधारण घोड्याला शिधोजीरावांची सवारी पेलवत नसे.त्यांची बंदूक आणि तलवार दुसऱ्या कुणाला झेपत नसे.
करवीरचे छत्रपती शिवाजी महाराज(दुसरे-कारकीर्द इ.स.१७६२ ते १८१३)यांची एक राणी आणि शिधोजीरावांची आई ह्या सख्ख्या बहिणी होत्या.त्यामुळे छत्रपतींकडे शिधोजीरावांचा नेहमी राबता असायचा.महाराजांनी पुत्र समजून त्यांना एकांड्या मानकरी मंडळीत स्थान दिले.शिधोजीराव पण महाराजांना पित्यासमान मान देत असत..असे सर्व काही ठीक चालले असताना अशी एक घटना घडली कि ज्यामुळे छत्रपती आणि शिधोजी आयुष्यभर परस्परांचे कट्टर वैरी होऊन शेवटी महाराजांना शिधोजीरावांच्या बंदोबस्तासाठी राज्याचे इंग्रजांच्या हातावर उदक सोडावे लागले.शिधोजीरावांचे लग्न गजेंद्रगडकर घोरपडे घराण्यातील एका मुलीबरोबर ठरले होते.हि सोईरीक छत्रपतीना पसंत नव्हती.त्यांनी ह्याच मुलीचा विवाह आपले सरदार हिम्मतबहादूर चव्हाण यांच्या मुलाशी ठरवला.त्यामुळे शिधोजीराव संतप्त होऊन त्यांनी लग्न करेन तर खुद्द छत्रपतींच्या मुलीबरोबरच अशी प्रतिज्ञा केली आणि इथपासून सुरु झाला शिधोजीराव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील सूडाचा,मानहानीचा,जीवघेणा रक्तरंजित प्रवास!
छत्रपतींशी भांडून शिधोजीराव करवीर गादीच्या जुन्या शत्रूला म्हणजे मिरजकर परशुरामभाऊ पटवर्धन यांना जाऊन मिळाले.शिधोजीरावांसारख्या बलशाली माणसाला पटवर्धनांनी लगेच सरदार पदी नियुक्ति दिली.पटवर्धनांकडे असताना शिधोजीरावानी करवीर राज्यावरील विविध चढायात करवीर फौजांना खूपच जेरीस आणले.त्यातील काही प्रमुख लढायांची,छत्रपतीना दिलेल्या त्रासाची थोडक्यात माहिती घेऊ.
(अ) आळत्याची लढाई- इ.स.१७९३ मध्ये पटवर्धन आणि करवीर फौजात झालेल्या लढाईत करवीर फौजांनी पटवर्धनांचा पराभव करून रामचंद्रपंत पटवर्धनांना कैद पण केले.रामचंद्रपंतांचे वडील परशुरामभाऊ यांनी आपल्या मुलाच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पुन्हा एकदा कोल्ह्पुरला वेढा घातला.ह्यावेळी मात्र करवीर फौजांचा पराभव होऊन त्यांना पटवर्धनांना दहा लाख रुपये देऊन तह करावा लागला.टिपू सुलतान मे १७९९ मध्ये ठार झाल्या नंतर लगेचच परशुरामभाऊ पटवर्धनांनी जुलै पासून दक्षिणेकडे निरनिराळी ठाणी काबीज करण्यास सुरुवात केली.यात कोल्हापूर राज्यातील चिकोडी,मनोळी यांसारखी काही ठाणी पण होती.परशुरामभाउंच्या ह्या अभियानात करवीर आणि पटवर्धन फौजांची गाठ पट्टणकुडी येथे सप्टेंबर १७९९ मध्ये पडून त्यावेळी झालेल्या लढायीत पटवर्धनांच्या सैन्याचा पराभव होऊन खुद्द परशुरामभाऊ त्यात मृत्यू पावले.त्यांच्या अकल्पित मृत्यूने उत्तर मराठेशाहीतील शूर,धाडसी,आणि युद्धकुशल सेनापती नाहीसा होऊन त्याचा पेशव्यांच्या दक्षिणेकडील सामर्थ्यावर विपरीत परिणाम झाला.पट्टणकुडीचा विजय छत्रपती शिवाजी महाराजांसाठी(द्वितीय)त्यांच्या पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीतली सर्वात मोठी आणि भूषणास्पद घटना ठरली.
परशुरामभाउंच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांचा मुलगा रामचंद्रपंत यांनी पुण्याला जाऊन बाजीराव रघुनाथराव पेशवे,नाना फडणीस तसेच दौलतराव शिंदे यांना कोल्हापूरवर चढाई करण्यासाठी लष्करी साह्य करण्याची गळ घातली.दौलतरावांची संमती मिळताच संयुक्त फौजांनी जानेवारी १८०० मध्ये कोल्हापूरकडे कूच करून फेब्रुवारी १८०० रोजी टेंबलाई गाठले.छत्रपतींच्या फौजेत तोर्गलकर शिंदे,प्रतिनिधी,अमात्य,चतुरसिंग भोसले रायाजी जाधव इ.सरदारांच्या फौजा होत्या.दोन्ही पक्षांच्या दीड एक महिना विविध ठिकाणी लहानमोठ्या चकमकी झडत राहिल्या.ह्या सर्व घडामोडीं दरम्यान १३ मार्च १८०० रोजी नाना फडणीस निधन पावले.तर दुसरीकडे छत्रपतींनी सर्जेराव घाटगे ( दौलतराव शिंद्यांचे सासरे)यांच्या मार्फत दुसरे बाजीराव आणि दौलतराव शिंदे यांच्याशी तहा संबंधी बोलणी सुरु केली.ह्या दोन्ही गोष्टी रामचंद्रपंत पटवर्धनांसाठी मारक ठरल्या.दौलतराव शिंद्यांनी रामचंद्रपंतास कोल्हापूरचा वेढा ताबडतोब उठविण्यास कळविले.बाजीरावांनी यावर ताण करून सर्व पटवर्धन मंडळींस कैद करण्याचा हुकुम ब्राऊन ह्या शिंद्यांच्या पलटणीच्या इंग्रज अधिकाऱ्यास दिला.जासुदाच्या चुकीने हा हुकुम खुद्द रामचंद्रपंतांच्या हातात पडून ते सावध होऊन रातोरात वेढा उठवून निघून गेले.अशा घटना घडत गेल्याने पटवर्धनांच्या चाकरीत राहूनही शिधोजीरावांची करवीर छत्रपतींवर सूड उगविण्याची इच्छा मनाजोगती पूर्ण झाली नाही.नाना फडणीसांच्या मृत्यू(मार्च १८००) नंतर पुणे दरबारात दौलतराव शिंदे आणि त्यांचे सासरे सर्जेराव घाटगे यांचे महत्व अतोनात वाढले होते.धूर्त शिधोजीरावानी बदलत्या राजकीय वातावरणाचा अंदाज घेऊन पटवर्धनांची साथ सोडून देऊन बाजीराव(द्वितीय),सर्जेराव घाटगे आणि दौलतराव शिंदे यांच्याशी घरोबा केला.
(ब) सावगावची लढाई: पटवर्धनां पासून वेगळे झाल्यावर शिधोजीराव स्वतंत्रपणे लष्करी मोहिमा आखू लागले.सावंतवाडीच्या खेम्सावन्तांचे इ.स.१८०३ मध्ये निधन झाले.हे सुद्धा करवीर छत्रपतींच्या विरोधकांपैकी एक होते.वारसा युद्धात खेमसावंतांची पत्नी लक्ष्मीबाई भोसले यांनी छत्रपतींविरुद्ध शिधोजीरावांकडे मदत मागितली.बाजीराव रघुनाथ पेशव्यांचा यासंबंधीचा कल ओळखून शिधोजीरावानी मे १८०७ मध्ये मोठ्या प्रमाणावर अरबांचा समावेश असलेल्या प्रचंड फौजेनिशी कोल्हापूरवर स्वारी केली.कोल्हापूरकरांचा चिवट प्रतिकार आणि पावसाळा ह्या दोन्हीमुळे शिधोजीरावाना काही काळ माघार घ्यावी लागली.पावसाळा संपताच शिधोजीरावानी ऑक्टोबर १८०७ मध्ये पुन्हा एकदा मोठ्या तयारीनीशी कोल्हापूरकडे कूच सुरु केले.चिकोडी,मनोळी,कटकोळ आदि ठाणी काबीज करून बाजूच्या प्रदेशात एकच धुमाकूळ घातला.शिधोजीरावाना बाजीराव पेशवे(द्वितीय) यांचा पाठींबा असल्याने आजूबाजूचे छोटे मोठे सरदार पण शिधोजीरावाना मिळाले.करवीर फौजेचे नेतृत्व दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराज(द्वितीय) करत होते.दोन्ही पक्षांची ४ फेब्रुवारी १८०८ रोजी सावगाव इथे समोरासमोर गाठ पडली.कोल्हापूरचे सरलष्कर नारायणराव पाटणकर जे शिधोजींचे मावसभाऊ होते,ऐन युद्धात करवीर पक्ष सोडून शिधोजीरावाना जाऊन मिळाले.कोल्हापूरच्या तोफखान्याचे प्रमुख यशवंतराव घाटगे गोळा लागून जमिनीवर कोसळले.इतरही अनेक सरदार जखमी होऊन सैन्यात एकच गोंधळ माजला.शिधोजीरावांच्या फौजेने कोल्हापूर फौजेची प्रचंड कत्तल केली,दोन हजार शिपाई मरण पावले,दोन अडीच हजार जखमी झाले,कित्येक सैनिक,सरदाराना शिधोजीरावांच्या फौजेने कैद करून नेले.महाराजांचा जरीपटका,निशाणाचा हत्ती,डंका,तोफा आदि साहित्य शिधोजीरावांच्या हाती पडले.कोल्हापूर फौजेत झालेल्या पळापळीत शिधोजीरावांच्या काही घोडेस्वारानी छत्रपतींवर भाला फेकून त्यांना जखमी केले.तेवढ्यात रायाजी जाधव जपतनमुल्क यांनी मोठ्या शिताफीने आणि प्रसंगावधान राखून घोडा बाहेर काढून महाराजांना सुरक्षित ठिकाणी नेले.सावगावच्या लढाईचे वृत्त पुण्याला पेशव्यांना समजले. ` छत्रपतींचे रक्त भूमीस लागले,हि अतिशय वाईट गोष्ट झाली म्हणून पेशव्यांनी पुण्यात शांती करविली.`
शिधोजीरावानी नंतर छत्रपतींच्या सरदार,जहागिरदारांच्या मुलखात लुटालूट,जाळपोळ सुरु केली.शिधोजीरावांस आवर घालणे छत्रपतींच्या ताकदी बाहेर गेल्याने त्यांनी निरुपायाने बाजीराव पेशव्यांच्या मध्यस्थीने तहाची बोलणी सुरु केली.शिधोजीरावांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या प्रतिज्ञा पूर्तीसाठी--छत्रपतींच्या कन्येशी विवाह याहून अधिक अनुकूल वेळ दुसरी कुठली असणार होती? शिधोजीरावानी छत्रपतिं बरोबरच्या तहाच्या बोलण्यात उभय पक्षात सलोख्यासाठी छत्रपतींच्या कन्येचा विवाह आपल्या बरोबर करून देण्याची अट घातली.शिधोजीरावांची अपमानास्पद अट छत्रपतीना अजिबात मंजूर नव्हती.बाजीराव पेशवे,नारायणराव पाटणकर सरलष्कर आणि महाराणी सुंदराबाई ह्या सगळ्यांनी महाराजांचे मन वळविले आणि राजकन्या येसूबाई हिचा शिधोजीरावांबरोबर राक्षस विवाह कोल्हापूर इथे २१ जून १८०८ साली पार पडला.विवाहाच्या दिवशी शिधोजीराव निपाणकर सर्व फौजफाटा,लवाजमा घेऊन कोल्हापुरात आले होते.लग्नात छत्रपतींकडून दगा फटका होईल अशी भीती वाटल्याने अक्षता डोक्यावर पडताच न जेवता नववधूला घेऊन तडक निपाणी गाठली.
(क) कोल्हापूर राज्याचे सार्वभौमत्व गमवावे लागले: इ.स.१८०९ साली कोल्हापूर गादीचे कारभारी रत्नाकरपंत राजाज्ञा यांना अंतर्गत कारणांस्तव घरी बसवले गेले तर पराक्रमी सरदार प्रीतीराव चव्हाण सावगाव लढाईत झालेल्या जखमांमुळे इ.स.१८१० मध्ये मृत्यू पावले. छत्रपतींचा जामात झाल्यानंतर सुद्धा शिधोजीरावांच्या पूर्वीच्या मानसिकतेत काही बदल घडला नाही.त्यांनी ह्या संधीचा फायदा घेऊन करवीर राज्याला त्रास देण्याचा आपला पूर्वीचा उद्योग चालूच ठेवला.सर्जेराव घाटगे ,यशवंतराव घाटगे,बाजीराव पेशवे यांचा पाठींबा असल्याने तसेच इंग्रजांच्या तटस्थ राहण्यामुळे काही तरी निमित्त,कुरापत काढून ते करवीर राज्यात घुसून नुकसान करीत असत.इ.स.१८११ मध्ये शिधोजीरावनी पुन्हा कोल्हापूरवर आक्रमण केले.नेहमी प्रमाणे ह्यावेळी पण कोल्हापूर फौजेत फितुरी होऊन कोल्हापूरकरांचा पराभव झाला.शिधोजीराव कोल्हापूरकरांच्या पाच तोफा आणि १२०० माणसे घेऊन निपाणीला परतले.कोल्हापूर राज्याचा जेवढा प्रदेश बळकावता आला तेवढा त्यांनी बळकावला.ह्या वेळेपर्यंत शिधोजीराव दहा बारा लाखांचा सरंजाम असलेला मोठा सरदार बनले होते.शिधोजीरावांचा बंदोबस्त करणे अवघड होऊन बसल्याने छत्रपती शिवाजी महाराजांना(द्वितीय)इंग्रजांची मदत घेण्याशिवाय दुसरा मार्ग राहिला नाही.दुसऱ्या बाजीराव पेशव्यांबरोबर ३१ डिसेंबर १८०२ रोजी झालेल्या वसईच्या तहानंतर इंग्रजांना सिंधुदुर्ग वगळता जो कोल्हापूर राज्यात होता,पश्चिम किनाऱ्यावर रान मोकळे झाले होते.शिधोजीरावांचा बंदोबस्त करण्याचे इंग्रजांनी मान्य करून ८ ऑक्टोबर १८१२ रोजी छत्रपती आणि इंग्रज ह्यांच्यात तह झाला.ह्या तहान्वये छत्रपतींनी चिकोडी आणि मनोळी ह्या त्यांच्या राज्यात असलेल्या पण शीधोजीरावानी बळकावलेल्या महालांवरील हक्क सोडून दिला,मालवण बंदर आणि त्याच्या परिसरातील सिंधुदुर्ग,राजकोट,पद्मगड आणि सर्जेकोट हि ठिकाणे इंग्रजांना देऊन टाकली,इंग्रजांचा सल्ला घेतल्याशिवाय परकी सत्तेशी लढाई न करण्याचे,कोठेही आरमार/लढाऊ जहाज न ठेवण्याचे मान्य केले.हा तह झाल्यांनतर सहा महिन्यांनी छत्रपतींचे निधन झाले.
शिधोजीरावांचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रजांबरोबर केलेल्या तहाने करवीर राज्याचे सार्वभौमत्व संपुष्टात आले.
इंग्रजांनी बाजीराव पेशव्यांकडे शिधोजीरावांची भलामण केल्याने त्यांना पेशव्यांचे सरलष्कर पद देण्यात आले.इंग्रज आणि मराठे यांच्यात खडकी इथे झालेल्या लढाई पासून शिधोजीरावानी इंग्रजांशी आतून संधान साधून पेशव्यांकडील बित्तंबातमी एल्फिन्स्टनकडे पोचवल्या.बाजीराव पेशव्याचे इंग्रजांना शरण जाण्यासाठी मन वळविणारे पण शिधोजीरावच होते.बाजीराव इंग्रजांना शरण जाईपर्यंत शिधोजीराव त्यांच्या लवाजम्यात होते.याची बक्षिशी म्हणून इंग्रजांनी त्यांस तब्बल पन्नास लाख रुपये दिले.
पुढे शिधोजीरावानी इंग्रजांशी पण पंगा घेण्याचा प्रयत्न केला.इंग्रजांनी त्यांचं संस्थान जप्त करण्याची धमकी दिल्यावर त्यांनी इंग्रजांच्या नादी लागण्याचे सोडून दिले.शिधोजीरावानी एकवीस लग्न केली पण एकीपासून सुद्धा पुत्रलाभ झाला नाही.त्यामुळे त्यांना फेफऱ्याचा विकार जडला.जनतेवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या,दुष्ट स्वभावाच्या,वासनांध शिधोजीराव नाईक निंबाळकर उर्फ अप्पा निपाणीकरांचे इ.स.१८३९ मध्ये वयाच्या ६५ व्या वर्षी अत्यंत दयनीय अवस्थेत निधन झाले.त्यांच्या मृत्यू नंतर त्यांचा सरंजाम सरकारजमा करण्याचे इंग्रजांनी त्यांच्या हयातीतच ठरविले होते,त्यानुसार सरंजाम जप्त करण्यात आला.अशा प्रकारे शूर,धाडसी,पराक्रमी शिधोजीराव कोल्हापूर राज्यासाठी मारक ठरले तर इंग्रजांसाठी साहाय्यक ठरले.
संदर्भ:१-करवीर रियासत ले.स.मा.गर्गे
२-मंतरलेला इतिहास ले.हर्षद सरपोतदार
३-मराठी रियासत खंड ८—ले.गो.स.सरदेसाई
४-पेशवे-ले.श्रीराम मराठे.
५- छायाचित्र : पै पृथ्वीराज माने सरकार यांची ऐतिहासिक वाडे व गढी यातील post
#प्रकाश लोणकर.

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...