विनोद जाधव एक संग्राहक

Monday 30 October 2023

श्रीमन्छत्रपती राजर्षी शाहूमहाराजांचा अस्सल जाहीरनामा.

 

मराठ्यांनो! तुम्ही केवळ जातीने मराठाच नाही तर तुम्ही वर्णाने क्षत्रिय आहात यासाठींचा करवीर रियासतीचा
म्हणजे





श्रीमन्छत्रपती राजर्षी शाहूमहाराजांचा अस्सल जाहीरनामा.
मराठ्यांना क्षत्रियत्व जाणवून देवून एकप्रकारे क्षत्रिय मराठ्यांचा गुरु व क्षात्रपीठ स्थापित करत मराठ्यांना धार्मिक स्वातंत्र्य देवू केल्याचा जाहीरनामाच श्रीमन्छत्रपती राजर्षी शाहूमहाराजांनी प्रसिद्ध केला.
बरोबर १०३ वर्षापूर्वी कोल्हापुरचे राजर्षी शाहूमहाराजांनी १२ आॕक्टोबर १९२० रोजी क्षात्रजगतगुरु म्हणून सध्या कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर वसलेल्या छोट्याशा बेनाडी गावातील बेनाडीकर पाटील घराण्यातील थोर व्यक्तिमत्त्वं श्री. सदाशिवराव पाटील- बेनाडीकर यांची वेदविद्या उच्चशिक्षीत तरुणाची नेमणूक करत एक मराठ्यांला क्षात्रगुरुपदी बसवून दिेले.
तो दिवस होता,
११ नोव्हेंबर १९२० रोज गुरुवार या दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी मराठा उपाध्यायांनी वैदिक मंत्राच्या घोषात सदाशिवराव लक्ष्मणराव पाटील यांना सशास्त्र पट्टाभिषेक केला. पाटगावच्या क्षत्रिय जगद्गुरुपीठाची पुनर्स्थापना केली.
या क्षात्र जगद्गुरुपीठासाठी कोल्हापूर येथे राजेशाही थाटाचा समारंभ झाला.....
या क्षत्रिय मराठ्यांचे क्षात्र जगदगूरुंचे पद निर्माण करणार्या राजर्षीं शाहूमहाराजांनी या पदाच्या निर्मितीसाठी जो जाहीरनामा स्वतःच्या सहीने प्रसिद्ध केला त्यातून आपणास समजून येते.
राजर्षी शाहूमहाराज स्वता:ला क्षत्रिय मराठा मानत हे सिद्ध होते.
त्याचबरोबर त्यांनी १२२ वर्षापूर्वीच मराठा समाजाची चिंताजनक आर्थिक स्थिती पाहून पहिलेवहिले मराठा आरक्षण देवू केले.
म्हणून राजर्षी शाहूमहाराजांनी ज्या विचारांने अगर स्वता:ला क्षत्रिय मराठा मानले तर आपण मराठ्यांनी
मराठा म्हणूनच मराठा आरक्षणाच्या मागणीचा रेटा आता वाढवला पाहिजे.
महेश पाटील -बेनाडीकर
२५.१०.२०२३

मराठा स्वराज्यातील निष्ठावंत घराणीशाही मधील एक महत्वाचे कर्तबगार मराठा घराणे म्हणजेच ‘घोरपडे’ घराणे.

 


मराठा स्वराज्यातील निष्ठावंत घराणीशाही मधील एक महत्वाचे कर्तबगार मराठा घराणे म्हणजेच ‘घोरपडे’ घराणे..
“शस्त्रशास्त्रात म्हणजे रणविद्येत प्रवीण होऊन जो एकथा क्षत्रिय दहा हजार योद्ध्यांबरोबर लढू शकतो त्या रणधुरंधरासच मरहट्टा- महारथ महारथी म्हणतात”
उपरोक्त श्लोकात वर्णनकेले प्रमाणे ‘महारथ’ या शब्दापासूनच मराठा या शद्बाची उत्पती झाली असे डॉ. भांडारकर नमूद करतात. डॉ. भांडारकर नमूद करतात आपल्या विवेंचनात नमूद करतात “महारथ, महारथी, मरहट्टा व मराठा” असे या उत्पतीचे विश्लेषण करता येईल. मराठा ह्या शब्दाचा जरी एका जात समुहासाठी उपयोग केला जात असला, तरी इतिहासात या शब्दास फार मोठी मान्यता आहे. मराठा या शब्दात स्वराज्याची कित्तेक यज्ञकुंड-अग्निहोत्र सामवलेली, शेतकऱ्याच्या नांगराची तलवार बनविण्याची क्षमता आणि महाराष्ट्राधर्माची केसरी पताका यामध्ये सामावलेली आहे. महाराष्ट्रात यादवांचे राज्य नष्ट झाल्यानंतर जवळजवळ तीनशे वर्ष महाराष्ट्रात स्वातंत्र्याचा सुर्य उगवलाच नव्हता. अशा परिस्थितीत स्वराज्य निर्मीती आणि आत्म गौरवासाठी बेलभंडारा हाती घेणारी इतिहास प्रसिध्द अशी क्षत्रिय जमात म्हणजेच “मराठा” होय..!
कित्येक काळांपासून चालत आलेले धर्म अनेक वेळेस नष्ट झालेले आहेत, परंतू क्षात्र धर्माने त्यांचा उद्धार आणि प्रसार केलेले आहे. युगा-युगात आदिधर्म (क्षात्रधर्म) ची गरज दिसून आलेली आहे, म्हणूनच क्षात्रधर्म लोकांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. या क्षत्रिय धर्माची जोपासणा आणि वृध्दी महाराष्ट्राती प्रत्यकाने आपल्यापरीने करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. राष्ट्रकुट, चालुक्य, मोर्य, परमार इत्यादी पासून ते भोसले, पवार, शिंदे, मोहिते, होळकर अशा अनेक कुळांनी या यज्ञकुंडात आपल्या आहुती दिलेल्या आहेत. भगव्या झेंड्यासाठी आणि महाराष्ट्र धर्मासाठी आपले जीवन सुध्दा तुच्छ मानले. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या इतिवृत्त शके १८३७ नुसार, छ.संभाजीनगर येथील भगवंतराव यादव मुनशी नावाच्या कवीने चौपन्न श्लोकांचे एक लहानसे स्तुतिपर काव्य रचून ते श्रीमंत नानासाहेब पेशवे यांस अर्पण केले होते. त्यात बाळाजी विश्वनाथापासून नानासाहेबांपर्यंत झालेल्या ऐतिहासिक पुरुषांचे काव्यमय वर्णन आले आहे. तसेच आपल्या कुलधर्माचे पालन करत स्वराज्याच्या सेवेत कर्तृत्व गाजवणाऱ्या काही घराण्याचा उल्लेख केलेला आहे..
● कवि मराठा साम्राज्यातील निष्ठावंत घराणी याबद्दल उल्लेख करताना लिहतो :
ज्याच्या दुंदुभिचा ध्वनी करितसे दिग्व्याळ बाधिर्यता ।
शौर्ये वीर्ये पराक्रमे निज यशें शोभे ध्वजा उन्नता ॥
गायकवाड पवार जाधव भले ब्रीदें जया साजती ।
सेनाधीप असंख्य थोर कुळिचे वर्णू तयातें किती ॥
.
ढमढेरे कवडे हि भापकर ते समरंगणीचे गडे ।
शस्त्राचे रगडे करुनि दभिती शत्रुदळा रोकडे ॥
शिंदे होळकरादि सैनिक बळी वीरश्रिये शोभले ।
अश्वी धारकरी अनेक चढती भारी शतायाकळे ॥
.
शिवपूर्व कालखंड हा आत्मविस्मृति आणि पारतंत्र्याचा कालखंड म्हणून इतिहासात ओळखला जातो. यवनी राजसत्तेचा अमंल हिंदुस्थानावर होता. दिल्ली, मालवा, गुजरात, बंगाल, बहामनी इत्यादी अनेक हिंदुस्थानच्या प्रदेशावर सुलतानशाही तख्त नशीन होत्या. ‘तख्ता या ताबूत’ चा सुलतानशीत बोलबाला असल्याने सामान्य जनता यामध्ये भरडली जात होती. अनेक कर्तुत्वान मराठा घराणी आपल्या पराक्रमाचा उपयोग ह्या शह्यांच्या सत्तेच्या सरंक्षणासाठी करीत होत्या. मुळातच सुलतांनाच्याकडे मराठे हे एकटे आपली सेवा देत नसत, शिया-सुन्नी मुसलमाना बरोबरच पठाण, अफगाण सारख्या मुस्लिम जमातीसुध्दा होत्या. मुसलीमातील शिया-सुन्नी त्याच बरोबर इतर जमाती मधील वादात मराठा घराण्याचा वापर करुन प्रबल होवू पाहणाऱ्या सुलतांनामुळे अनेक मराठ्यांना उत्कर्षाची संधी मिळाली. या परिस्थितीचा योग्य वापर करत, कर्तुत्वाच्या जोरावर अनेक मराठा घराणी उदयास आली..
सतराव्या शतकाच्या आरंभी भोसले घराणे दक्षिण हिंदुस्थानात उदयास येण्यापुर्वी घाटगे, शिर्के, फलटणचे निंबाळकर, मलवडीकर, मोरे, महाडीक वगैरे मराठा घराणी प्रसिध्दीच्या आणि समृध्दीच्या मार्गावर होती. यातील एक महत्वाचे कर्तबगार मराठा घराणे म्हणजेच ‘घोरपडे’ घराणे होय..!
मराठ्यांच्या इतिहासात घोरपडे घराण्याने बजावलेली कामगिरी अनेक अर्थांनी गौरवास्पद ठरावी अशीच होती. हे घराणे उत्तरेकडून राजपुतांच्या इतिहासाशी निगडित, तर महाराष्ट्रात मराठ्यांच्या इतिहासाशी ते निकटचे संबंधित. दक्षिण भारतात या घराण्याने स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतंत्रपणे आपला इतिहास घडवला. एवढ्या विविध क्षेत्रात शौर्य गाजवणाऱ्या घराण्याचे ऐतिहासिक महत्त्व अनेक थोर इतिहासकारांनी गौरवाने उल्लेखले आहे. विशेषतः शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात ज्या शर्थीने या घराण्याच्या थोर पुरुषांनी तलवार गाजवली तिची प्रशंसापर वर्णने फार्सी इतिहासकारांनाही करावी लागली. त्यांना संताजी, बहिर्जी आणि मालोजी या घोरपडे बंधूंचे पराक्रम आपल्या इतिहासात नमूद करणे अपरिहार्य वाटावेत एवढे मोठे होते..
――――――――――
चित्रकार : Ram Deshmukh 👌🏼♥️🔥

हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज (करवीर राज्य)

 

नतमस्तक छत्रपती चरणी शी








हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज (करवीर राज्य)
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य तर्फे संतोष झिपरे ९०४९७६०८८८
अहमदनगरमध्ये दिल्लीगेटच्या पुढे आल्यावर अहमदनगर मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यु आर्टस् कॉमर्स ऑड सायन्स कॉलेज समोर रस्त्याच्या पुर्व बाजुस "हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज (कोल्हापुर गादी)" यांचे स्मारक आहे .
स्मारक सुंदर आहे त्यामध्ये पुर्णाकृती छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचा पुतळा,समाधी स्थळ आणि वाचनालय आहे .
छत्रपती राजाराम महाराजांच्या अकाली निधनानंतर करविर गादीवर ८ वर्षाचे शिवाजी महाराज कोल्हापुर राज्यांचे छत्रपती झाले .महाराजांना घोडेस्वारी ,शस्त्र-शास्त्र व राज्यकारभारत विशेष रुची होती .त्यांचे मराठी ,हिंदी,ईंग्रजी ,मोडी(लिपी) भाषेवर प्रभुत्व होते .ब्रिटीशाकडुन होणारे जुलुम छत्रपतींनी पाहीले होते .त्याबाबत महाराजांकडे माहीती येत होती .आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत व त्यांच्या पुण्याईने हे राज्य मिळाले आहे .रयतेच्या कल्याणाची फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे या भुमिकेतुन सतत कार्यरत राहीले .
इ.स.१८७६ साली भारतात फार मोठा दुष्काळ पडला होता .छत्रपती चौथे शिवाजी महाराजांनी कोल्हापुर संस्थानात दुष्काळ निवारन यंत्रणा राबवली ,दुष्काळावर मात केली .छत्रपतींची ही कामगीरी पाहुण जानेवारी १८७७ मध्ये ब्रिटिश साम्राज्याची महाराणी- mininath ravsaheb gernge patil.१८७८ साली श्रीमंत वाघोजीराव शिर्के यांची कन्या यमुनाबाई यांच्याशी महाराजांचा विवाह संपन्न झाला .छत्रपतींनी आपल्या कारकिर्दीत कोल्हापुर संस्थानात खुप मोलाचे कार्य केले .रंकाळा तलाव निर्मीती कार्यास सुरवात , पुल उभारणी,रस्ते,नवीन राजवाडा,शासकीय इमारती ,कचेर्या ,टाऊन हॉल आदी. वास्तुची उभारणी याच काळात झाली.तेच आता कोल्हापुर शहराचे वैभव आहे .
महाराजांनी ईग्रजाविरुध्द बंड पुकारले .जानेवारी १८७८ साली ब्रिटीशांनी स्टेट कारभारी म्हणुन महादेव वा.बर्वे याची नेमनुक केली .बर्वे हा फार स्वार्थी लाचार आणि जातीयवादी ध्रुत व्यक्ती होता त्याने स्वजातीचे शंभ्भरच्यावर लोक प्रशासनात घुसवले .त्याने ईग्रजांच्या मदतीने कटकारस्थानाला सुरवात केली .महाराजांना वेड लागले अशी आफवा बर्वे पसरवु लागला .महाराज एकटेच लढत होते त्यांनी हार मानली नव्हती .ईग्रजांच्या मदतीने महादेव बर्व्याने कोल्हापुरमध्येच महाराजांना एकांतत बंदीस्त केले नंतर १९ जुन १८८२ रोजी त्यांना गुप्तपणे पुणेमार्गानी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यावर हालवले किल्ल्यात एका ईमारतीत एकांतात ठेवले .कोणीही ओळखीचा चेहरा दिसनार नाही याची पुरेपुर दक्षता घेण्यात आली .महाराजावर मानसिक व शारीरिक छळ सुरुच होता.आडदांड सोल्जर ग्रीन याची महाराजांचा आंगरक्षक म्हणुन नेमनुक केली
ग्रीन हा आंगरक्षक नसुन भक्षक होता .तो महाराजांना मानशीक छळ करु लागला .एके दिवशी महाराजांनी ग्रीन वर झडप टाकली आणि ग्रीनला उचलुन आपटले.नरपशु आडदांड ग्रीनने महाराज्याच्या पोटावर जबरदस्त प्रहार केला .महाराज जमीनीवर कोसळले .महाराजांचा सेवक मल्हारीने धाव घेतली.महाराजांचे डोके आपल्या मांडीवर घेतले .महाराजांनी मल्हारीच्या मांडीवरच "जगदंब जगदंब" म्हणत प्राण सोडले, तो दिवस होता २५ दिसेंबर १८८३ .महाराजांवर अंतसंस्कार दिल्लीगेटपुढील परिसरात करण्यात आले .कोल्हापुरचे कोणीही उपस्थीत नव्हते ,महाराजांना अग्नी परशुराम ऊमाजी भोसले यांनी दिली .त्याठिकाणी समाधी आहे, आता भव्या सुंदर स्मारक आहे .
पुढे राजर्षि शाहु महाराज करवीर संस्थानचे छत्रपती झाले .राजर्षी शाहु महाराजांनी अहमदनगरला येऊण समाधीचे दर्शन घेतले .आपल्या वडीलांची स्मृती चिरंतन राहावी म्हणुण त्यांच्या नावानी वस्तीगृह सुरु करण्याची त्यांची प्रबळ ईच्छा होती ,त्याची ईच्छा व प्रेरणेतुन पुढे १९१४ रोजी श्री छत्रपती चौथे शिवाजी महाराज मराठा बोर्डींग हाऊस अहमदनगर या नावानी वस्तीगृह सुरु झाले .त्यातुनच पुढे जानेवारी १९१८ रोजी अहमदनगर मराठा विद्या प्रसारक समाज या शैक्षनिक संस्थेची स्थापना झाली .
राजर्षी शाहू महाराजांचे वडील छत्रपती चौथे शिवाजी महाराजांना बलिदान दिनी विनंम्र अभिवादन _/\_
साभार मराठा
लेख याचा आहे छान माहिती दिली आहे धन्यवाद
- mininath ravsaheb gernge patil

गृहकलह करू नये:- छत्रपती शिवाजी महाराज

 


गृहकलह करू नये:- छत्रपती शिवाजी महाराज

लेखक ::नागेश सावंत

  • हिंदवी स्वराज्याचे उत्तराधिकारी संभाजी महाराज की राजराम महाराज
  • थोरले शाहू महाराज ( सातारा ) की महाराणी ताराबाई ( कोल्हापूर )
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली . ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक संपन्न झाला. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीतच स्वराज्याच्या वाटणीचा प्रस्ताव समोर आला . ३ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराजांचे निधन झाले राजकीय घडामोडी घडून आल्या व संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले.
छत्रपती संभाजी महाराजांची ११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने निर्घुण हत्या केली. स्वराज्याचे उत्तराधिकारी म्हणून ९ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराज यांनी संभाजी महाराज मोगली कैदेत असतानाच मंचकारोहण केले. छत्रपती राजाराम महाराज यांनी कधीच स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला नाही. २ मार्च १७०० रोजी राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले. यावेळेस संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज हे मोगल कैदेत होते.
राजाराम महाराजांचे आणि महाराणी ताराबाई यांचे पुत्र शिवाजी महाराज यांनी १० मार्च १७०० रोजी मंचकारोहण केले. १७०१ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.राज्याभिषेकाची निश्चित तारीख उपलब्द नाही. राजाराम महाराज यांच्या पत्नी महाराणी ताराबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वतीने स्वराज्याचा राज्यकारभार चालवण्यास सुरवात केली.
औरंगजेबाच्या मृत्यू पश्चात मोगल बादशहा आजीमशहा याने मे १७०७ रोजी मराठा साम्राज्यात फुट पाडण्यासाठी छत्रपती थोरले शाहू महाराज यांची मोगली कैदेतून मुक्तता केली. शाहू महाराजांच्या स्वराज्यात येण्याने महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात संघर्ष निर्माण झाला व त्याची फलश्रुती स्वाराज्याचे विभाजन होऊन कोल्हापूर व सातारा या दोन गाद्या निर्माण झाल्या .
सदर लेखात स्वराज्याचे उत्तराधिकारी कोण याची चिकित्सा संदर्भ साधनाच्या आधारे करण्याचा प्रयत्न
  • गृहकलह करू नये.
१ मार्च १६७८ रोजी शिवाजी महाराज यांनी आपले धाकटे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांना लिहिलेल्या पत्राचा सारांश “ शहाजीराजे यांचा कैलासवास झाल्यानंतर शहाजीराजे यांनी स्व:पराक्रम करून संपादन केलेले राज्य व्यंकोजीराजे १३ वर्ष उपभोगत होते. सदर राज्यात थोरला पुत्र म्हणून वारसाहक्काने आपला देखील अर्धा वाटा आहे अशी मागणी शिवाजी महाराजानी केली. गृहकलह करू नये. आपला अर्धा वाटा आपणास द्यावा. परंतु व्यंकोजीराजे यांनी दुर्योधानासारखी दुष्ट बुद्धी मनी धरून शिवाजी महाराजाविरोधात युद्धास प्रवृत्त झाले.
व्यंकोजीराजे व शिवाजी महाराज यांच्यात युद्ध होऊन व्यंकोजीराजे यांचा पराभव झाला असता त्यांनी शरणागती पत्करली. शिवाजी महाराज आपले सरदार रघुनाथपंत व हंबीरराव यांना पत्राद्वारे लिहितात व्यंकोजीराजे आपले धाकटे बंधू आहेत. मुलबुद्धी केली. त्यास तोही आपला भाऊ त्यास रक्षणे. त्याचे राज्य बुडवू नका.
छत्रपती शिवाजी महाराजांनी गृहकलह टाळावा यासाठी प्रयत्न केले वडिलांच्या मिळकतीत आपला अर्धा हिस्सा द्यावा अशी विनंती केली. व्यंकोजीराजे शरण येताच त्याचे रक्षण करत त्यांच्या राज्याचे देखील रक्षण केले. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर गृहकलह करू नये हा मोलाचा सल्ला मात्र त्यांचे उत्तराधिकारी विसरले. वडिलांच्या मिळकतीत पुत्रांचा समान वाटा असतो हे बाब येथे स्पष्टपणे अधोरेखित होते.
  • १ ) संभाजी महाराज की राजाराम महाराज
गृहकलह :- शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले . संभाजी महाराज हे स्वराज्याचे उत्तराधिकारी युवराज झाले. राजाराम महाराजांच्या आई सोयराबाई या स्वराज्याच्या महाराणी झाल्या.
परमानंद काव्यातील नोंदिनुसार महाराणी सोयराबाई यांनी शिवाजी महाराजांच्याकडे संभाजीराजे यांच्याविषयी आपला राग व्यक्त केला संभाजीराजे समर्थ असून आपला मुलगा राजाराम मात्र दुर्बल आहे. तसेच संभाजी राजांपासून राजारामास धोका असल्याचे व शंभूराजे आपणास मान देत नसल्याची तक्रार केली. राज्यविभाजानाचा प्रस्ताव शिवाजी महाराजांसमोर ठेवला . छत्रपती संभाजीमहाराज आपल्या दानपत्रात लिहितात “ सावत्र आईच्या रागामुळे वडिलांनी मला वाईट वागणूक दिली तरी मी दशरथपुत्र रामाप्राणे वागलो.
  • स्वराज्याच्या विभागणीचा प्रस्ताव
१३ डिसेंबर १६७८ संभाजी महाराज रागवून व नाराज होऊन दिलेरखानास मिळाले. दिलेरखानाने स्वराज्यात लुट माजवली व रयतेस त्रास दिला त्यामुळे संभाजी महाराज व्यथित झाले . दिलेरखानाशी या बाबत मतभेद होऊन संभाजी महाराज दिलेरखानास सोडून स्वराज्यात आले. १३ जानेवारी १६८० रोजी शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची पन्हाळ्यावर भेट झाली.
सभासद बखरीतील नोंदीनुसार “ हे वर्तमान राजीयास ( शिवाजी महाराज ) पुरंधरास कळताच संतोष पावून पुत्राच्या भेटीस पन्हाळ्यास आले. मग पितापुत्राची भेट झाली. बहुत रहस्य जाहले. त्या उपरी राजे म्हणू लागले कि लेकरा मला सोडून जाऊ नको. औरंगजेबाचा आपला दावा. तुजला दगा करावयाचा होता. परंतु श्रीने कृपा करून सोडून आणिला. थोर कार्य झाले. आता तू जेष्ठ पुत्र थोर झालास आणि सचंतर राज्य कर्तव्य हे तुझ्या चित्ती आहे असे आपणास कळले. तर मजला हे अगत्य आहे. तरी तुजलाही राज्य एक देतो. आपले पुत्र दोघेजण एक तू संभाजी व दुसरा राजाराम. येसियास हे सर्व राज्य आहे., यास दोन विभाग करतो एक चांदीचे राज्य, याची हद्द तुंगभद्रा तहद कावेरी हे ऐक राज्य आहे. दुसरे तुंगभद्रा अलीकडे गोदावरी नदीपर्यंत एक राज्य आहे. ऐसी दोन राज्य आहेत. त्यास तू वडील पुत्र , तुजला कर्नाटकीचे राज्य दिधले. इकडील राज्य राजारामास देतो. तुम्ही दोघे पुत्र दोन राज्य करणे. आपण श्रींचे स्मरण करून उत्तर सार्थ करीत बसतो . असे बोलिले तेव्हा संभाजी राजे बोलिले कि “ आपणास साहेबांचे पायाची जोड आहे. आपण दुधभात खाऊन साहेबांचे पायाचे चिंतन करून राहीन ”. असे उत्तर दिधले. आणि राजे संतुष्ट झाले.
“ आपण रायगडास जातो . धाकटा पुत्र राजराम याचे लग्न करून येतो . मग राज्यकारभाराचा विचार कर्तव्य तो करू असे बोलून रायगडास गेले. संभाजी महाराजांच्या या भेटीनंतर अवघ्या अडीच महिन्यात छत्रपती शिवरायांचे निधन स्वराज्याची राजधानी रायगड येथे शनिवार ३ एप्रिल १६८० रोजी झाले. स्वराज्याचा उत्तराधिकारी हा प्रश्न अनुत्तरित राहिला
  • रायगडावरील राजकारण
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर रायगडावर छत्रपती राजाराम महाराज यांना स्वराज्याचे भावी छत्रपती घोषित करण्यात आले. जेधे शकावलीतील नोंदीनुसार अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर “ वैशाख शुद्ध ३ तृतीयेस राजारामास अनाजीपंत सुरनीस यांनी मंचकी बसविले.”
संभाजी महाराज यावेळी पन्हाळगडावर होते . संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी अण्णाजी दत्तो व पंतप्रधान मोरोपंत पेशवे पन्हाळ्यास रवाना झाले. परंतु स्वराज्याचे सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या मदतीने संभाजी महाराजांनी अण्णाजी दत्तो व मोरोपंत पेशवे यांना कैद केले . “जेधे शकावलीनुसार संभाजीराजे रायगडास आले राज्य करू लागले. राजाराम कैदेत ठेवले.
छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या मंत्र्यांमध्ये कोणाला राजा करावे याबद्दल मतभेद होते . त्यामुळे स्वराज्यात दोन गट पडले गेले. इंग्रज त्यांच्या पत्रात लिहितात “ शिवाजीच्या प्रधानांमध्ये कोणाला राजा करावे याबद्दल मतभेद होता. अण्णाजी पंडित मुख्य प्रधान धाकट्याच्या बाजूचा होता. तर मोरो पंडित जेष्ठ पुत्र संभाजी यांचा पुरस्कृत करीत होता.पुढे संभाजीच महाराजा झाला .”
स्वराज्यात दोन गट निर्माण झाले. स्वराज्याच्या गादीसाठी संभाजी महाराज व राजाराम महाराज यांच्यात राजकीय स्पर्धा निर्माण झाली.
छत्रपती संभाजी महाराजांची ११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने निर्घुण हत्या केली. स्वराज्याचे उत्तराधिकारी म्हणून ९ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराज यांनी संभाजी महाराज मोगली कैदेत असतानाच मंचकारोहण केले. छत्रपती राजाराम महाराज यांनी कधीच स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला नाही. राजाराम महाराज रायगडावरून निसटले व जिंजीस गेले व स्वराज रक्षणाचा लढा चालू ठेवून स्वराज्याच्या आशा पल्लवित ठेवल्या . २ मार्च १७०० रोजी राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले. राजाराम महाराजांच्या निधनानंतर महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाशी प्रखर लढा देत स्वराज्याचा लढा चालू ठेवला. महाराणी ताराबाई यांनी आपले पुत्र शिवाजी यांना राज्याभिषेक करून स्वराज्याच्या कारभारास सुरवात केली.
  • स्वराज्यात मोगली आक्रमण
संभाजी महाराजांच्या निधानानंतर बऱ्याच प्रमाणात स्वराज्य संपुष्टात आले होते . स्वराज्याची राजधानी रायगड मोगलांनी जिंकली. भावी छत्रपती शाहू महाराज व राजपरीवार मोगली कैदेत गेला. औरंगजेब स्वराज्याचा घास गिळण्यासाठी महाराष्ट्रात तळ ठोकून बसला. स्वराज्यात सर्वत्र मोगली आक्रमण थैमान चालू होते. त्याविषयीच्या काही नोदी आढळून येतात.
जेधे शकावली :- रायगड मोगलास दिल्हा. संभाजीराजे याचे पुत्र शिवाजीराजे यास तुलापुरास औरंगजेब यासी नेले . पातशाहे त्यास हप्त हजारी केले शाहू राजे नाव ठेविले ते वर्षी कुल गड मोगले घेतले.
रामचंद्र अमात्य लिहितात “ युद्ध प्रसंगामुळे राज्याचा असा विज्वर प्रसंग होऊन गेला. संपूर्ण देशदुर्ग पादाक्रांत जाहले. राज्य असे नाव मात्र सावशेष उरले व तेहि निर्मर्याद
वाई परगण्यातील सुभेदारांच्या कारकीर्दीच्या नोंदी :- १६८९ रोजी संपूर्ण वाई प्रांत व गडकोट यावर मोगलांचा कब्जा झाला. राज्य बुडाले.
राजश्री राजाराम कर्नाटकात जावून प्रकट होऊन लष्कर जमाव केला व या प्रांती राजश्री रामचंद्रपंडित व शंकराजी पंडित सरकारकून व संताजी घोरपडे सेनापती व धनाजी जाधवराव यांनी लष्कर जमाव करून चाळीस हजार शाई मिळवली मुलुख सोडविला नवेच राज्य पैदा केले.
  • २ ) थोरले शाहू महाराज ( सातारा ) की महाराणी ताराबाई ( कोल्हापूर )
महाराणी ताराबाई यांनी आपला पुत्र शिवाजी व संभाजी यांची मुंज करून शिवाजीस राज्याभिषेक करण्याची तयारी केली. रामचंद्र अमात्य यांचा विरोध होता. शाहू महाराज मोगली कैदेतून सुटून आल्यावर शाहू महाराजांचा राज्याभिषेक व ताराबाई यांच्या पुत्रास युवराजपद द्यावे असे त्यांनी मत मांडले . सदर घटनेत शाहू महाराज मोगली कैदेतून सुटून येतील किंवा नाही याविषयी कोणतीची खात्री न्हवती व स्वराज्याच्या गादिस नवीन राज्याची गरज होती. स्वराज्याच्या गादिवर आपला हक्क आहे असे ताराबाई मानीत होत्या. ताराबाईनी रामचंद्र अमात्य यांची समजूत काढून इ.स. १७०१ आपला पुत्र शिवाजी याचा राज्याभिषेक घडवून आणला. महाराणी ताराबाई आपला पुत्र शिवाजी यांच्या नावाने स्वराज्याच्या राज्यकारभार पाहू लागल्या
औरंगजेबाच्या मृत्युनंतर मे १७०७ रोजी मोगली मांडलिकत्व स्वीकारून शाहू महाराज मोगली कैदेतून सुटून स्वराज्यात परत आले. चिटणीस बखरीतील नोंदीनुसार शाहू महाराजांनी ताराबाई , चिटणीस, अमात्य रामचंद्र यांना पत्र पाठवून निरोप दिला “ आम्ही पादशहापासून निघोन मुक्कामास येवून पावलो. लौकरच येतो. “ ताराबाईना सदर माहिती मिळताच सदर शाहू तोतया असल्याचे जाहीर केले. शाहुस ठार करावे अशी इच्छा धरली. संभाजीराजे यांनी राज्य व खजिना गमावला राजराम महाराजांनी श्रम करून राज्य सोडविले. त्यामुळे ताराबाई यांनी राज्यावर स्वतःचा हक्क प्रस्थापित केला.
महाराणी ताराबाई १७ सप्टेंबर १७०७ रोजी सैतवडे येथील सोमनाईक देसाई व देशकुलकर्णी यांना लिहिलेल्या पत्रात लिहितात “ शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रयासाने स्थापन केलेले राज्याचा संभाजीराजे यांनी विध्वंस केला त्यानंतर राजाराम महाराज यांनी स्व:पराक्रमे नवीन राज्य निर्माण केले. ताराबाई यांनी त्याचे संरक्षण करून मोगलांचा पराभव केला व राज्य वाढविले. दुसरी गोष्ट अशी कि हे राज्य शिवाजी महाराजांनी राजाराम महाराजांना देवू केले होते. त्यामुळे शाहू महाराजांचा या राज्याशी कोणताही संबंध नाही.
छत्रपती शाहू महाराजांनी १२ जानेवारी १७०८ रोजी राज्याभिषेख करून घेतला व चार दिवसांनी १६ जानेवारी रोजी एक तहनामा जाहीर केला त्यानुसार वारणा नदीच्या दक्षिणेला असलेला प्रदेश शिवाजीराजे यांच्याकडे असावा . शिवाजीराजे यांनी शाहू महाराजांचे छत्रपती पद मान्य करून त्यांचे मांडलिक म्हणून राहावे . वारणेच्या उत्तरेला फौजा पाठवू नयेत. आपल्या स्वतःच्या राज्यात स्वतंत्र राज्यकारभार करावा. परंतु ताराबाई यांनी हा तहनामा मान्य केला नाही .
  • मोगलांचे मांडलिकत्व
मोगल इतिहासकार खाफीखान लिहितो शाहू महाराजांच्या वकिलाने जुल्फिकार बहादूर याच्या मार्फत बादशाह बहादूरशहा याला विनंती केली “ दक्षिणेच्या सहा सुभ्यांची चौथाई व सरदेशमुखी यांचे फर्मान मिळावे म्हणजे बेचिराख झालेला मुलुख पुन्हा आबाद करू.
ताराबाई यांनी जुम्लतुल्मूल्काच्या याच्या मार्फत बादशाह बहादूरशहा याला विनंती केली “ आपल्या मुलाला शेकडा नऊ रुपयाबाबत सरदेशमुखीचा फर्मान मिळावे . आपण चौथाईचा प्रश्न काढत नाही. दक्षिणेत धामधूम करणाऱ्यांचा पाडाव करून मुलखाचाही बंदोबस्त करू.
शाहूचे हितचिंतक जुल्फिकार बहादूर व ताराबाईचे हितचिंतक जुम्लतुल्मूल्क यांच्या आपसातील मतभेदांमुळे सरदेशमुखीचे फर्मान निघण्याचे तहकूब झाले.
सदर प्रकरणात वजीर मुनीमखान याने बादशहास सल्ला दिला “ तूर्त कोणाशी सनद न देता शाहू व ताराबाई यांनी आपसात लढून निर्णय लावावा. यात जो पक्ष विजयी होईल त्यास सनद देण्यात येईल. बादशहास हा सल्ला योग्य वाटला व त्याने शाहू व ताराबाई यांना तश्या सूचना दिल्या व दिल्लीस प्रयान केले.
मोगल बादशाह बहादूरशहा याची मानसिकता मराठ्यांच्या आपसातील कलहाचा फायदा घेत मराठ्यांमध्ये यादवी युद्ध निर्माण करण्याची होती ती फलद्रूप झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यासाठी लढणारे आता मोगलांचे मांडलिक बनण्यासाठी आपसात लढू लागले.
करवीर रियासतकार स. मा गर्गे लिहीतात “ शाहूमहाराज व ताराबाई यांच्यामध्ये सत्तास्पर्धेचे आणि डावपेचाचे राजकारण चालू होते व त्यात कधी या पक्षाला तर कधी त्या पक्षाला विजय मिळत होता. हे विजय आणि पराजय तात्पुरत्या स्वरुपाचे असत. त्यांना निर्णायक स्वरूप येऊ शकले नाही.
रियासतकार देसाई लिहितात “ सारांश , ताराबाई व शाहू यांचा तंटा भाऊबंद्कीचा असून , दोघेही मराठेशाहीच्या गादीकरता भांडत होती. राज्याच्या दुर्दैवाने त्यांस हा कलह आपसात मिटवून राष्ट्राचे कल्याण करण्याची बुद्धी झाली नाही. ती झाली असती तर, म्हणजे मराठ्यांनी आपली प्रचंड शक्ती आपसात लढून फुकट घालविली, तिचा उपयोग त्यांनी अन्यत्र केला असता , तर प्रत्यक्ष दिल्लीपतीचा पाडाव करून हिंदुस्थानचे सार्वभौमपद त्यांस अल्पायासाने प्राप्त झाले असते. पण परिस्थीतीचा योग्य फायदा करून घेणाऱ्या शिवाजीप्रमाणे कल्पक व सर्वांवर छाप बसवून राज्याचे काम करून घेणारा वजनदार पुरुष यावेळी मराठाशाहीत निपजला नाही , तेणेकरून औरंगजेबाचा मतलब सिद्धीस गेला. वास्तविक औरंगजेबाच्या मृत्यूने मोठीच संधी मराठ्यांस आली होती. पंचवीस वर्ष लढाईचा व मुत्सदेगीरीचा चांगला अनुभव मिळून लोक तयार झाले होते. बादशहावर विजय संपादून त्यांचा प्रत्यक्ष हुरूप वाढलेला होता. बादशाहितील गादीच्या तंट्याचा फायदा घेऊन सर्व हिंदुस्थानभर आपले राज्य वाढविण्याची योग्य संधी मराठ्यांस त्यावेळी आली होती. आणि सर्व मराठी फौजा जोराने बाहेर पडल्या तर दिल्लीपद काबीज करण्यास त्यांस अवकाश लागला नसता.
  • महाराणी ताराबाई व राजसबाई यांच्यातील गुह्युद्ध
“ कालपरत्वे आमचा प्रसंग विस्कळीत होऊन चिरंजीव राजश्री संभाजीराजे व राजसबाई यांनी गिरजोजी जाधव , अंताजी त्रीमल व लोकखासकेल गडकरी व तुळाजी यांसी पुढे करून किल्ले पन्हाळा येथे चिरंजीव राजश्री संभाजी राजे यांसी राजपदास बैसविले आम्हास संकटी घातले. बहुत निकड केली. “
इ.स. सप्टेम्बर १७१४ च्या दरम्यान पन्हाळ्यावर नाट्यमय राजकारण घडून महाराणी ताराबाई व त्यांचे पुत्र शिवाजी कैद झाले. राजराम महाराजांच्या द्वितीय पत्नी राजसबाई यांचे पुत्र संभाजी कोल्हापूरच्या गादीवर विराजमान झाले.
छत्रपतींच्या घरात राज्याच्या गादीसाठी व सत्तेसाठी गृहकलह निर्माण झाल्याने स्वराज्याची हानी झाली.
लेखन आणि संकलन :- नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ : सभासद बखर , परमानंदकाव्य , जेधे शकावली , शिवकालीन पत्रसारसंग्रह , चिटणीस बखर , ऐतिहासिक पत्रबोध , करवीर रियासत , मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध , आज्ञापत्र , मराठी रियासत ,मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८ , २०, शिवचरित्र साहित्य खंड ६

दक्षिणेतील तंजावर च्या भोसले राजघराण्याचा दैदिप्यमान इतिहास-

 






























दक्षिणेतील तंजावर च्या भोसले राजघराण्याचा दैदिप्यमान इतिहास-
लेखक ::जयदीप भोसले
सन १६२४ ला भातवडीच्या लढाई मध्ये निझामशहा चे वजीर शहाजीराजे भोसले यानी अवघ्या वीस हजार फोजे ने शहाजहान बादशहा आणि आदिलशहा च्या दोन लाख फौजेचा पराभव केला. शहाजीराजे भोसले यांचे किर्ती अवघ्या भारतात दुमदुमली. पण १६२६ ला निझामशहा आणि त्यांच्या कुटुंबीयांना फतेह खान याने कपटाने मारले त्या नंतर शहाजीराजे भोसले यांनी फतेह खान चा बंदोबस्त करून निझामशहा चा वारसदार म्हणून मुर्तजा याला बादशहा नेमुन राज्यकारभार हातात घेतला. पण पुढे तीन वर्षांत शहाजहान ने ४८००० फौजेकडून अहमदनगर वर हल्ला करून मुर्तजा ला आणि त्याची आई ला कैद केले. त्यामुळे शहाजीराजे यांनी शहाजहान शी तह करून मुर्तजा च्या सुरक्षेसाठी हमी घेतली आणि तहा प्रमाणे शहाजीराजे आदिलशाहीत सरदार झाले. त्याना पुणे सुपे चाकण इंदापूर प्रांताची जहागिरी देण्यात आली. त्या जहगिरीचे शहाजीराजे याचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य घडवले. १६३८ ला आदिलशहा सरदार रणदुल्ला खान आणि शहाजीराजे यांनी बेंगळुरू च्या नायक चा बंदोबस्त करून बेंगरूळ ताब्यात घेतले. आदिलशहा ने शहाजीराजे यांचा फर्जंद किताब देऊन त्यांना बेंगरूळ ची जहागीर देण्यात आली. त्यानी आणि शहाजीराजे यांचे थोरले सुपुत्र संभाजी राजे यांनी नंतर दक्षिणेतील नायकांचा बंदोबस्त करून बेंगरूळ ची जहागीर वाढवली.
इ स१६७४ नंतर शहाजीराजे यांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई ( मोहिते घराण्यातील) यांचे चिरंजीव व्यंकोजी राजे यांना बेंगरूळ ची जहागीर देण्यात आली. १६७५ ला व्यंकोजी राजे यांनी अलगिरी च्या नायकावर हल्ला करून तंजावर ताब्यात घेऊन राज्याची राजधानी बेंगळुरू हुन तंजावर ला हलवली.
इ.स १६८४ ला व्यंकोजी राजे यांच्या नंतर त्यांचे पुत्र शहाजीराजे हे तंजावरच्या गादी वर बसले स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे याना शहाजीराजे यांनी वेळोवेळी मदत केली. संभाजी महाराज यांनी जिंजी चा किल्ला आणि सुभेदारी आपले महुणे हरजीराजे महाडीक यांच्या कडे सोपवली. हरजीराजे महाडीक यांनी दक्षिणेत भागानगर चा अनेक सुभे जिंकून घेऊन स्वराज्याला जोडले. त्यावेळी तंजावरचे महाराज शहाजी राजे (शाहूजी) यांची मोठी मदत झाली.
पुढे छ संभाजीराजे यांच्या मृत्यूनंतर इ स१६९० ला छत्रपती राजाराम महाराज यांनी जिंजी येथे स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केली. मुघल सरदार झुल्फिकारखानने जिंजी ला वेढा टाकला तेव्हा तंजावर महाराज शहाजी राजे यानी मराठ्यांना रसद पुरवठा केला. झुल्फिकारखान याच्या वर सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजीराव जाधव यांच्यासह तंजावरच्या शहाजीराजे यांच्या सैन्याने सतत हल्ले करुन जिंजीचा वेढा काही वर्षांसाठी उठवण्यात यश मिळवले. त्रिचनापल्ली चा नायक आणि तंजावर चे शहाजीराजे यांचे हाडवैर होते. शिवाय तो झुल्फिकारखान आणि मुघलांना मदत करत असे. राजाराम महाराज आणि संताजी घोरपडे यांनी १६९३ ला त्रिचनापल्ली वर हल्ला केला. आणि त्रिचनापल्ली किल्ल्याला वेढा टाकला. मराठ्यांचा राजा , सरसेनापती सह त्रिचनापल्ली वर चालून आला हे पाहून नायक मराठ्यांना शरण आला. २३ एप्रिल १६९३ ला त्रिचनापल्ली मराठ्यांच्या ताब्यात आले.
इ स १६९४ तंजावरचे महाराज शहाजीराजे यांच्या सहकार्याने राजाराम महाराज यांनी पांडेचेरी चे फ्रेंच, मद्रासचे इंग्रज पोर्तुगीज डच यांचा बंदोबस्त करून खंडण्या वसुल करायला सुरुवात केली. आणि त्यांच्या वर जरब बसवली. शहाजीराजे यांचे नंतर तंजावर च्या गादीवर सरफोजी राजे बसले.
इ स १७१३ ला छत्रपती शाहू महाराज यांनी कर्नाटक चा सुभा शाहू महाराज यांचे मानस पुत्र अक्कलकोट चे फत्तेसिंह भोसले यांच्या कडे सोपवले. आर्काट चा नवाब सादुल्ला खान आणि तंजावर चे तत्कालीन महाराज सरफोजी राजे यांचे हाडवैर होते. नागपूरकर रघुजीराजे भोसले अक्कलकोट चे फत्तेसिंह भोसले आणि तंजावर चे सरफोजी महाराज यानी एकत्रित मोहीम काढुन कोप्पळ करनूर , कडप्पा, तिरुपती व्यंकटगिरी जिंजी अशा तंजावर ला स्वराज्यला जोडणार्या प्रदेशाची साखळी पुन्हा स्वराज्यात आणली. १७२३ ला छत्रपती थोरले शाहू महाराजांनी फत्तेसिंह भोसले आणि रघुजीराजे भोसले यांना निजामाचा उपद्रव कमी करण्यासाठी पाठवले. तंजावर कर राजांनी या मोहिमेत त्याना वेळोवेळी मदत केली. फत्तेसिंह भोसले आणि रघुजीराजे भोसले यांनी चित्रदुर्ग पासुन बिदनुर पर्यंत खंडण्या वसुल केल्या. आणि हा प्रदेश अंमला खाली ठेवला. सरफोजी महाराज यांच्या नंतर तुकोजी, प्रतापसिंह आणि तुळोजी यांची तंजावर चे महाराज म्हणुन कारकीर्द घडली. त्यानंतर १७८७ पासुन व्यासंगी विद्वान विद्याविभूषित प्रसिद्ध सरफोजी राजे दुसरे यांची कारकीर्द घडली.
शरभोजी उर्फ सरफोजी दुसरे यांचा जन्म २४ सप्टेंबर १७७७ साली तंजावरच्या राजघराण्यात झाला. तंजावरचे राजे तुळजाजी भोसले यांनी स्वतः ला वारस नसल्याने सरफोजीना दत्तक घेतले.
त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी जर्मन रेव्हरंड श्वार्ट्झ यांना देण्यात आली. या श्वार्ट्झला भारतीय संस्कृती आणि इतिहासात खूप रस होता . इंग्लिश, ग्रीक,लाटिन सोबतच संस्कृत, तमिळ, उर्दू या भारतीय भाषा सुद्धा त्याला अवगत होत्या. तल्लख सरफोजिंचा श्वार्ट्झला लळा लागला. सरफोजीनी सुद्धा वरील सर्व भाषांमध्ये प्राविण्य मिळवलं. त्याने श्वार्टझकडून राज्यकारभाराचे धडे घेतले.
सरफोजीना शिकवण्याच्या निमित्ताने तंजावरला आलेल्या श्वार्ट्झला तंजावर मध्ये असलेल्या “नायक” घराण्याच्या “सरस्वती महाल” लायब्ररीचा शोध लागला. या लायब्ररीमध्ये अनेक मौलिक ग्रंथ, हस्तलिखिते धूळ खात पडली होती. श्वार्ट्झला भारतीय भाषा येत असल्याने त्याने ती वाचून काढली. त्याला त्या ग्रंथांचे महत्त्व लक्षात आले. या ग्रंथांचे व्यवस्थित वर्गीकरण करून ते ग्रंथालय पुन्रोजीवीत करण्यात आले.
सरफोजी महाराजांना इथेच वाचनाची सवय लागली.
१७८७ साली महाराज सरफोजी हे तंजावरच्या गादीवर आले. सावत्र भाऊ अमरसिंग याच्या बंडामुळे काही काळ सरफोजी यांना सत्तेवरून बाजूला जावे लागले होते. मात्र श्वार्टझने इंग्रजांकडून सरफोजिंचा हक्क मिळवून दिला. १७९८ साली राजे सरफोजी ना परत राजगादी वर आले मात्र इंग्रजांनी त्यांना मांडलिकत्व स्वीकारायला लावले.
येथून पुढे सरफोजी राजांनी आपला वेळ युद्धलढाई राजकारण याच्यात घालवण्यापेक्षा सुसूत्र राज्यकारभार आणि विद्यासंचय या मध्ये घालवला.
तंजावरला विद्येचे माहेरघर बनवण्याचा मान सरफोजी महाराजांना जातो.
त्यांनी सरस्वती महाल लायब्ररीसाठी जगभरातून ४००० पुस्तके विकत आणून ग्रॅंथालय समृद्ध केले. अरबी फारसी भाषेतील पुस्तकांचे अनुवाद केले. ग्रॅंथालयानध्ये अनेक ग्रॅंथासोबतच अनेक नकाशे आणि डिक्शनरी त्यांनी जमवल्या होत्या. १४ भाषा अवगत असणाऱ्या महाराजांनी लायब्ररीमधील सर्व म्हणजे जवळपास ३० हजार पुस्तके अभ्यासली होती. याचा वापर फक्त अभ्यास करण्यासाठी नाही तर जनतेच्या भलाईसाठी देखील केला.
तामिळ, मराठी, तेलगु भाषेतून विपुल वाङ्मयीन रचना सरफोजीराजांनी स्वत: केल्या आणि दरबारी पंडितांकडूनही करून घेतल्या. गोविंदकवी, विरुपाक्षकवी, गंगाधरकवी, अंबाजी पंडित, अवधूतकवी हे त्यांचे दरबारी होते.
सरफोजी महाराज यांना आयुर्वेदाचे ज्ञान होते. त्यांनी धन्वंतरी महाल बांधला होता जिथे आयुर्वेद, अलोपेथी, युनानी चिकित्सा पद्धती यावर संशोधन चाले. महाराज स्वतः रुग्णांवर उपचार करीत.
“महाराजांना नेत्रचिकित्से मध्ये विशेष रुची होती. महाराज फक्त औषधोपचार करत नव्हते तर ते शस्त्रक्रिया ही करायचे. साधीसुधी नाही तर मोतीबिंदू वरील शस्त्रक्रिया. १७८२ साली मोतीबिंदूवरील शस्त्रक्रियेचा शोध फ्रान्समध्ये लागला होता. त्याकाळात भारतामध्ये अतिशय कमी लोकांना या अवघड ऑपरेशनचे ज्ञान होते.”
महाराज सरफोजी त्या पैकी एक. त्यांनी फक्त ऑपरेशन केले नाही तर प्रत्येक ऑपरेशनचे डोक्यूमेंटेशन करून ठेवले. प्रत्येक रुग्णाच्या डोळ्यांची उपचारापूर्वी आणि उपचारानंतर अशी चित्रे काढून ठेवण्यात आली होती. आपल्या वैदकीय अनुभवावर महाराजांनी शरभेन्द्र वैद्य मुरगळ हा ग्रंथ लिहिला. यात अनेक रोग व त्यावरील उपचार यांचे व्यवस्थित वर्णन करून ठेवले आहे.”
संगीत नृत्य नाट्य चित्रकला या प्रत्येक कलेमध्ये सरफोजी महाराजांनी योगदान दिले. कर्नाटकी शास्त्रीय संगीताला व्हायोलिन आणि सनईची ओळख त्यांनी करून दिली.
कुमारसंभव चम्पू, मुद्राराक्षसछाया ,आणि देवेंद्रकुरुंजी या सारखे संगीतावरील ग्रंथ लिहिले. कर्नाटक संगीताला विकसित कलेचा दर्जा प्राप्त करून देणारे प्रसिद्ध संगीतकार त्यागराज, शामशास्त्री व मुथुस्वामी दीक्षितार हे तिघेही सरफोजींचे दरबारी गायक होते. पाश्चात्य संगीतकारांचे तंजोर बंड त्यांनी उभारले होते. हिंदुस्तानी राग आणि संगीताला पाश्चात्य नोटेशन वर बसवण्याची अभिनव कल्पना सरफोजी महाराजांचीच. कर्नाटकीसंगीत आणि भरतनाट्यमला सुवर्णकाळ त्यांनी मिळवून दिला. भरतनाट्यम मध्येही काही नवीन नृत्यरचना सरफोजी महाराजानी बसवल्या. तंजावर चित्रशैलीचा उगम, प्रसार त्यांनी केला. दरबारासाठी त्यांनी बनवून घेतलेली चित्रे आजही याची साक्ष आहेत.
तमिळ, तेलगु आणि तमिळ या भाषामध्ये अनेक ग्रंथ महाराजांनी स्वतः लिहिले अथवा पंडितांकडून लिहून घेतले. गोविंदकवी, विरुपाक्षकवी,अवधूतकवी हे त्यांच्या दरबारची शान होते...
अशा या मराठा साम्राज्याची सेवा करणार्या आणि मराठी संस्कृती दक्षिणेस रूजवणार्या तंजावरकर भोसले राजघराण्याला मानाचा मुजरा...

Friday 27 October 2023

छत्रपती शिवाजी महाराज, युवराज संभाजीराजे, शहजादा मोअज्जम आणि राजकारण !!

 




छत्रपती शिवाजी महाराज, युवराज संभाजीराजे, शहजादा मोअज्जम आणि राजकारण !!
साधारणपणे सप्टेंबर-नोव्हेंबर १६६६ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजीराजे दोघेही आग्र्याहून सुटका करून स्वराज्यात दाखल झाले. युवराज संभाजीराजे स्वराज्यात परत येताच छत्रपती शिवाजी महाराजांनी काही काळ स्वराज्यात शांतता रहावी म्हणून मोगलांशी तहाचे बोलणे सुरू केले. दुसरीकडे औरंगजेब याने मिर्जाराजे जयसिंह यांना दक्षिणेच्या सुभेदारीवरून काढुन उत्तरेत बोलावले आणि आपला पुत्र शहजादा मुअज्जम यास दक्षिणेचा सुभेदार म्हणून नेमणूक केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब तसेच छत्रपती शिवाजी महाराज - शहजादा मुअज्जम असा पत्रव्यवहार सुरू होता, हे सगळे सुरू असताना युवराज संभाजी महाराज यांना मोगलांकडून पुन्हा सप्तहजारी मनसब खानदेश-वऱ्हाडचा सुभा, १५ लाख होनाचा मुलुख मिळाला.
युवराज संभाजीराजे मनसबदार आणि खानदेश-वऱ्हाडचे सुभेदार म्हणून शहजादा मुअज्जम यास भेटण्यासाठी ९ ऑक्टोबर १६६७ रोजी राजगडावरून निघाले. शंभूराजे यांचे वय त्यावेळी फक्त १० वर्ष ५ महिने इतके होते. युवराज संभाजीराजे यांच्यासोबत सरनोबत प्रतापराव गुजर व आनंदराव मकाजी, प्रल्हाद निराजी, निराजीपंत आणि राहुजी सोमनाथ होते. २७ ऑक्टोबर १६६७ म्हणजेच आजच्याच दिवशी युवराज संभाजीराजे औरंगाबाद येथे पोहचले. त्याच दिवशी त्यांनी जसवंतसिंहाची औपचारिक भेट घेतली. दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ ऑक्टोबर १६६७ रोजी शहजादा मुअज्जम याची भेट झाली. शहजादा मुअज्जम याने हत्ती, घोडे, जवाहिर, वस्त्रे दिली. वऱ्हाड आणि खानदेश पंधरा लाख होनाचा मोकासा दिला. ४ नोव्हेंबर १६६७ रोजी शहजाद्याचा निरोप घेऊन युवराज संभाजीराजे प्रतापराव गुजर व निराजीपंत यांच्यासह राजगडाकडे निघाले, युवराज संभाजीराजे यांना राजगडी पोहचवून प्रतापराव गुजर आणि निराजीपंत यांना त्यांचे मुतालिक म्हणून औरंगाबादला शहजादा मुअज्जमकडे पुन्हा दाखल व्हायचे होते. त्यानंतर संभाजीराजे शहजाद्याकडे जाऊन येऊन असत..
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात काही काळ शांतता रहावी म्हणून मोगलांशी तहाचे बोलणे सुरू ठेवले होते आणि त्यांनतरच्या घडलेल्या काही घटनांची ही थोडक्यात पार्श्वभूमी, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे यामागील राजकारण काय होते याची नोंद आपल्याला अबे करे याच्या अहवालात मिळते. अबे करे याचा अहवाल खूप मोठा आहे, लेखनसीमेअभावी त्या अहवालातील काही ठळक गोष्टी नमुद करणे योग्य ठरेल.
अबे करे नमूद करतो " मला सुभेदाराकडून या शिवाजीच्या मुलाच्या बऱ्याच गोष्टी समजल्या. त्याने मला सांगितले की, या बालराजाला खानदेश प्रांतात ठेवण्याचा मुख्य हेतू म्हणजे त्यांनी औरंगजेबाच्या मुलाबरोबर गुप्त कट घडवून आणावा. पादशाहजाद्याची व या बालराजाची चांगलीच मैत्री जमली होती. एकमेकांच्या सारख्या भेटीगाठी होत राहिल्याने तर ते मोठ्यामोठ्या राजकारणात एकमेकांशी विश्वासाने खलबत करू लागले. ही गट्टी इतकी जमली की त्यांचेकडून एकमेकांपासून गुप्त काहीच राहत नसे. ज्या संभाजीराजेवर सैन्याचे व त्याच्या बापाचे विशेष प्रेम होते, त्या संभाजीराजास तो अधिकाधिक प्रेमाने वागवू लागला. कारण की मोअज्जमला संभाजीराजाच्याकरवी शिवाजी महाराजांची मदत पाहिजे होती. अबे करे पुढे लिहतो " पादशहजाद्याने त्याला औरंगजेबकडून होणाऱ्या त्रासाचे सर्व निवेदन केले. त्या बालराजाने या अनुकूल परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी हा सर्व मजकूर आपल्या बापाला कळवला. शिवाजीनेही आपल्या मुलाला पादशहजाद्याच्या विचारप्रणालीस अधिकच चालना देण्याची आज्ञा केली. आपल्या आकांशा सुफलीत करून घेण्यास नवीनच राजकारण हाती आल्यामुळे शिवाजीला फार आनंद झाला. अशा तर्हेने शिवाजींनीही आपल्या मुलाला युद्धशास्त्र शिकवताना राजनीतीचीही अनुभवसिद्ध शिकवण देण्याचा प्रयत्न केला "
या राजकीय घडामोडी सुरू असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांना आपला मुलुख सावरून बारदेशावर स्वारी करून जाळपोळ, तसेच देसाईना धडा शिकवण्याची संधी मिळाली.
- राज जाधव

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...