विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 29 April 2020

!! देवगिरीचे #यादव ते सिंदखेड राजा येथील #राजेजाधव यांचे वारस

!! देवगिरीचे #यादव ते सिंदखेड राजा येथील #राजेजाधव यांचे वारस

postsaambhar:Raje Amarsingh Udaysingh Jadhavrao


!! देवगिरीचे #यादव ते सिंदखेड राजा येथील #राजेजाधव यांचे वारस ह्यांचा थोडक्यात आढावा
1)राजेरामदेवराव यादव यांच्या पराभवानंतर त्यांचे पुत्र राजेशंकरदेव हे मंडलिक राजे झाले ,परंतु राजेशंकरदेव यांनी सन १३०९ पासून खंडणी देणे बंद केले..म्हणून सन १३१२ मध्ये शंकरदेव यांना ठार केले....
2) शंकरदेव यांचे बंधू भीमदेव हेही ठार झाले...शंकरदेव यांची पतनी & पुत्र गोविंददेव यांचे पालनपोषण त्यांचे मेहुणे हरपालदेव यांनी केले..
3) सन १३१६ मध्ये हरपालदेव यांनी बंद करून स्वतंत्र राज्य स्थापन केले...परंतु हरपालदेव सन १३१८ मध्ये जिवंत पकडून सोलून ठार मारले....
4) गोविंददेव - यांनी बाग्लांच्या राजाची मदत घेऊन आपली सत्ता जळ्गाव जिल्ह्यामध्ये हतनूर परिसरात स्थापन केली...."in scott's ranslation it is Geodeo. In some copies of ferista,it is Govinddeo,but ferista says the chief of the Naiks was a descendant of Raja of deogadh,Ramdeo Rao Jadow was the raja of Deogadh accourding to all Hindoo Mss,& it isn't improbable that this chief's name may have been Govind deo jadow" Grant duff's history-page no 47......गोविंददेव यांचा १३८० मध्ये मृत्यू झाला...
5) ठाकुरजी जाधव देशमुख- गोविंददेव नंतर त्यांचा पुत्र ठाकूरजी गादिवर आले...यांनी हतनूर सोबतच सिंदखेड,पैठण, औरंगाबाद,etc एकूण ५२ प्रांताची सर्देश्मुखी मिळवली...हे १४४० साली मरण पावले...
6) भूकणदेव/भेतोजी(1440 to 1500)-ठाकुरजी नंतर त्यांचे पुत्र भूकणदेव गाधिवर आले...यांनी समस्त हिंदू मराठा लोकांना एकत्र आणण्याचे काम केले,यांचा म्रुतुए सन १५०० मध्ये झाला...
7) अचालोजी/ अचाल्कर्ण( इसवी सन 1500 to 1540)- यांच्या काळातच विजापूरच्या राज्याचे 5 भाग झाले..a) आदिलशाही b) कुतुबशाही c) इमादशाही d) निजामशाही e) बेरीदशाही ...आच्लोजी यांना ५००० घोड्याची मनसब मिळाली...यांच्या काळापासून सरकारी कामकाजात मराठीचा वापर सुरु झाला..
8) विठ्ठलदेव(सन 1540 to 1570)...
9) लक्षमनदेव /लखुजीराजे( SAN 1570 TO 1629)= राजे लखुजीराव यांचा जन्म इ सन १५५० चा आहे परंतु त्यांची कारकिर्द पिता राजे विठोजी यांच्या म्रुत्युनंतर म्हणजे इ सन १५७० साली चालु झालेली आहे....म्हणजे यांचा जन्म इ सन १५७० चा नसुन इ सन १५५० सालचा आहे.
सदर post मध्ये काही वंशावळी दिल्या,आहेत ह्या व्यतिरिक्त पण इतर शाखाच्या वंशावळी आहेत पण ह्यात दिलेल्या नाहीत
सदरील पोस्टमधील प्रत्येकाचा जो कालावधी दिला आहे तो त्यांच्या कारकिर्दीपासुन ते म्रुत्युपर्यंतचा आहे......जन्मापासुन ते म्रुत्युपर्यंतचा नाही . ही महत्वपुर्ण बाब लक्षात घेणे गरजेचे आहे..... त्यामुळे कारकिर्दीचे साल हे जन्मसाल धरण्याची गफलत करु नये आणी प्रत्येकजण प्रदिर्घकाळ जीवंत राहिले आणी म्रुत्युपर्यंत पदावर असल्याकारणाने पिढी मोजण्याचीही गफलत करु नये.........उदा - राजे लखुजीराव यांचा जन्म इ सन १५५० सालचा व म्रत्यु इ सन १६२९ सालचा...म्हणजे ८० वर्षे जगले....परंतु यांच्या या कार्यकाळात चार पुत्र,एक कन्य व नातु व पणतु देखिल जन्मले होते,परंतु पदावर शेवटपर्यंत राहिल्यामुळे त्यांच्या म्रुत्युनंतरच त्यांचा वारसदार आले.....पिढी मोजताना चुकिची गफलत करु नये....तसेच इ सन १३१२ साली शंकरदेवाचा म्रुत्यु झाला आणी त्यानंतर गोविंददेव अल्पवयी असल्याकारणाने शंकरदेवाचे मेहुणे हारपालदेव यानी गोविंददेव व राज्याचा सांभाळ केला .हारपालदेव यांना इ सन १३१८ साली ठार मारले आणी या कालावधीपासुन इ सन १३८० पर्यंत गोविंददेवानेच राज्य सांभाळले.......गोविददेवाच्या म्रुत्युनंतर म्हणजे इ सन १३८० साली त्यांचा पुत्र ठाकुरजी गादीवर आला....म्हणजे ठाकुरजीचे हे जन्मसाल नसुन कारकिर्द साल होय........ कारकिर्द सालास जन्मसाल समजण्याची गफलत करु नये.
तसेच इ सन १३१२ साली शंकरदेवाना ठार मारले,या सालापासुन राजे लखुजीराव यांच्या जन्मापर्यंत म्हणजे इ सन १५५० पर्यत गादीवर एकुण पाच पिढ्या राहिल्या....म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की,या काळात एवढेच वंशज जन्मले.......या २३८ वर्षाच्या कार्यकाळात पाचजण गादीवर राहिले......आणी प्रत्येकजण जवळपास ६०-७० वर्षाचा पुढे जगले आणी पुर्णकाळ पदावर होते........त्यामुळे कारकिर्दीपासुन म्रुत्युपर्यंत पदावर राहिल्याचा काळ हा जन्म-म्रुत्युचा काळ समजुन गफलत करुन इतिहासाची मोडतोड करु नये......
धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय लखुजी

Monday 27 April 2020

#ऐतिहासिक_किताब_व_कर्तबगार_सरदार_घराणी..

#ऐतिहासिक_किताब_व_कर्तबगार_सरदार_घराणी..
महाराष्ट्राचा इतिहासाचे अवलोकन करत असताना अनेक रथी महारथी सरदार घराण्याचा ऊल्लेख हा विविध नावाने येत असतो . ह्याला ऐतिहासिक भाषेत किताबत असे म्हणले जाते. ज्या राजाच्या वतीने मोहिमेत कर्तबगारी दाखवली जाते तो राजा त्यांच्या कर्तुत्वाला साजेसा असा किताब देऊन त्या सरदारांचा गौरव करत असतो.
सरदारांना दिलेल्या किताबा वरून त्यांचे त्या राज्यातील महत्व व स्थान विशद होते.
किताब हे छत्रपती घराण्याकडून आदिलशहा निजामशाही किंवा मोघल इ तत्कालीन प्रशासका कडून दिले जात असत.
एखद्या घराण्याला किताब मिळाला की तो पुढे त्या घराण्यास कायमस्वरूपी होई. अपवादात्मक परिस्थिती मध्ये किताब रद्द देखील होत असत.
छत्रपती हे मराठा साम्राज्यातील सर्वात उच्च पद होते. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या नंतर हा किताब पुढे सर्व भोसले कुळाला लागू झाला होता तत्पूर्वी मालोजी भोसले यांना निजामशाही मधून राजे हा किताब होता. पुढे शहाजी राजे व शरीफजी राजे ना ही लागू होता. तसेच त्या काळात इतरही अनेक सरदारांना राजे हा किताब होता त्यामधे सरदार नाईकजी राजे पांढरे ,तानाजी राजे कोकरे , धूळोजी राजे शेंडगे, देवजी राजे धायगुडे इ आदिलशाहीतील सरदार देखील राजे किताब लावत.
तसेच नेमाजी शिंदे व मानसिंग हाके हे मराठा कालखंडात राजे हा किताब धारण करत.
काही किताब व त्यांचे अर्थ वजारतमाब म्हणजे सर्व वजीरात श्रेष्ठ.
आमीरुल उमराव म्हणजे सर्व उमरावात श्रेष्ठ.
जफ्तन मुलुक म्हणजे प्रदेश काबीज करणारा.
*काही मराठा कालखंडातील सरदार व त्यांचे अधिकृत किताब*
1) संताजी घोरपडे जफ्तन मुलुक
2) बहीर्जी घोरपडे हिंदुराव ममलकत मदार समशेरबहाद्दर
3) मालोजी घोरपडे अमीरुल उमराव
4) परसोजी भोसले सेनासाहेबसुभा.
5) भोसले घराणे सेनाधुरंधर साहेब सुभा
6) माणकोजी पांढरे सेनासप्तसहस्री
7) संताजी पांढरे शरीफनमुलुक
8) लिंगोजी पांढरे वजारतमाब
9) लुयाजी पांढरे समशेरबहाद्दर
10) रत्नोजी पांढरे शाहमतमुलुक
11) धनाजी जाधवराव जयसिंगराव ( जफ्तन मुलुक संताजी घोरपडे यांच्या म्रुत्यु नंतर )
12) केरोजी पवार विश्वासराव
13) चिमणाजी बल्लाळ भट पंडित
14) पदाजी बंडगर अमीरुल उमराव / नुसरत जंगबहाद्दर व वजारतमाब
15) मल्हारराव होळकर सुभेदार
16) तुकोजीराव होळकर सुभेदार
10) देवजी सोमवंशी हिंदुराव / सेनाबारासहस्री
11) दावलजी सोमवंशी समशेरबहाद्दर
12) विठोजी चव्हाण हिम्मत बहाद्दर/ममलकत मदार
13) दमाजी थोरात रूस्तूमराव
14) खंडेराव दाभाडे सेनाखासखेल
15) महादजी शिंदे आलीजाबहादुर
16) शाबाजी शिंदे सेनाखासखेल
17) संताजी आटोळे धुरंधर समशेरबहाद्दर व सेनाबारा सहस्री
18) सुभाणजी महारणवर फत्तेजंगबहाद्दर व सेनासप्त सहस्री
19) कान्होजी आंग्रे सरखेल व वजारतमाब
20) प्रतापराव मोरे ममलकत मदार
21) हणमंतराव निंबाळकर सरलष्कर
22) कृष्णराऊ मल्हार उमदेतूलमुलुक
23) संभाजी काचगौड सेनाबारासहस्री
24) हंसाजी मोहिते हंबीरराव
25) जिवाजी राजे देवकाते
26) धर्माजी देवकाते बळवंतराव
27) मानाजी देवकाते बळवंतराव
28) मकाजी देवकाते हटकरराव
29)मकाजी देवकाते झुंजारराव
30) राजजी थोरात शाहमतपन्हा आमिरूल उमराव
31) खंडोजी थोरात रुस्तुमराव
33) वाघमोडे हिंदुराव
34) वाघमोडे यशवंतराव
35) सेट्याजी शिंदे सरनोबत ( ग्वाल्हेर )
36) माणकोजी बंडगर आमीरुल उमराव
37) हैबतराव बंडगर आमीरुल उमराव
38) खंडोजी बंडगर वजारतमाब
39) सुभाणजी आटोळे समशेरबहाद्दर
40) बजाजी आटोळे सेनाबारासहस्री
41) सयाजी आटोळे सफेजंगबहाद्दर
42) खंडेराव होळकर सुभेदार
43) मालेराव होळकर सुभेदार
44) तुकोजीराव होळकर सुभेदार
45) मल्हारराव होळकर दुसरे सुभेदार
46) महाराजा यशवंतराव होळकर महाराजाधिराज राजराजेश्वर आलिजाबहाद्दूर
47) संताजी वाघ राजे किताब
48) निंबाजी वाघमोडे वजारातमाब
49) यमाजी वाघमोडे सेनाबारासहस्री
50) अगाजी सलगर राजा वीर बहादुर
51) बहिर्जि सलगर राजा वीर बहादुर
52) पदाजी शेळके झुंझारराव लोणंदकर
53) खंडोजी शेळके राऊतराव निंबोडीकर
54) दीपाजी राऊतराव ? ( सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या समवेत दीपाजी राऊतराव बहलोलखानावर तुटून पडले होते हे राऊतराव म्हंजे शेळके असावेत )
55) रामोजी शेंडगे पतंगराव
56) वीरोजी शेंडगे पतंगराव
57) नाथाजी शेंडगे अमृतराव
58) सयाजी शेंडगे पतंगराव वजारतमाब
59) हीरोजी सोनवलकर हटकरराव
60) सरदार धायगुडे सरदारांच अधिकृत उपाध्या आढळराव , अभंगराव , झुंझारराव , परमाळराव , प्रचंडराव , रवीराव, भालेराव , गंभीरराव , सर्जेराव , सिंघारराव , अंकुशराव , विश्वासराव .
61) रविराव ढोणे वजारतमाब ( सर्व वजीरात श्रेष्ठ )
62) बाजी कोळेकर पंचसहस्री
63) सरदार मारकड अजगरराव
64) संताजी खांडेकर पंचसहस्री
65) बिडाजी खताळ सेनापंचसहस्री
66) खंडेराव हाके सेना सप्तसहस्री
67) आपाजी सोमवंशी सरलष्कर
68) बुबाजी पवार विश्वासराव
69) तूळाजी आंग्रे सरखेल
70) मानाजी आंग्रे वजारतमाब
71) रघोजी भोसले सेनासाहेबसुभा सेनाधुरंधर विश्वासनिधी.
72) चव्हाजी देवकाते बळवंतराव
73) येशवंतराऊ दाभाडे सेनापती
74) त्रिंबकराव दाभाडे सेनाखासखेल
75) पंतप्रतिनिधी समशेरबहादरजंग व मदारूल माहम
76) बाजीराव पंडित प्रधान
77) श्रीनिवास पंडित प्रतिनिधी
78) धनाजीराव गोरे नूर ए जंग रावठिकडा
इ किताब मराठा राजमंडळ व त्याच काळात मुघल प्रशासकाकडून मिळालेल्या सरदारांच्या पुरते मर्यादित आहेत.
वरील यादी परिपूर्ण नसून काही नावे नजरचुकीने राहिली असल्यास तसे निदर्शनास आणून द्यावे ती समाविष्ट केली जातील.
संदर्भ :
सरंजामी मरहट्टे संतोष पिंगळे व
इंटरनेट
संकलन
मधुकर हक्के
मरहट्टी इतिहास संशोधन मंडळ

Sunday 26 April 2020

''हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे,असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया.''

२७ एप्रिल १६४५
( तारखेमद्धे संभ्रम )

पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते. तेथे १६४५ साली शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यांमधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तिथे जमली होती. त्या किर्र अरण्यात झाडाझुडपात लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांबरोबर कसले खलबत ते मावळे करत होते. श्री शंकरापाशी कोणते मागणे मागत होते. शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते,पण यांच्या मनाची भरारी मोठी होती. त्यांनी एक मोठा घाट घातला होता. त्या देवालयात जमलेल्या सगळ्यांना ते कळकळीने म्हणाले,
''गड्यानो,मी आज तुमहाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का. आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत. त्यांनीच आम्हाला येथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे. सर्व कसे छान चालले आहे. पण गड्यानो,मला यात मुळीच आनंद वाटत नाही. सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का. दुसऱ्याच्या ओंजळीनेच आपण पाणी प्यावे का. आपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेत. त्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू असतात. आपली माणसे या युद्धात नाहक मारतात. कुटुंबेच्या कुटुंबे देशोधडीला लागतात. आपल्या मुलखाची धूळधाण होते. आणि इतके सोसुनही आपल्या पदरी काय. तर गुलामगिरी आपण हे किती दिवस सहन करायचे. दुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचे. सांगा, तुमीच सांगा वतनांच्या लोभाने आपण हे असेच चालू दयायचे का. शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहेरा रागाने लाल झाला होता. बोलता बोलता ते थांबले.

त्या तरुण सवंगड्यांकडे पाहू लागले. रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले. नवीच दृष्टी त्यांना मिळाली. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला,"बोला बाळराजे, बोला. आपला मनोदय सांगा आम्हाला. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत."हो राजे,तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू आमचे प्राणही देऊ.मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले. एकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले,''गड्यानो आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे,सर्वांनी खपायचे,सर्वांनी प्राण अर्पन करायलाही तयार व्हायचे. आपले हे ध्येय म्हणजे 'हिंदवी स्वराज्य' तुमचे ,माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे.परक्यांची गुलामी आता नको. उठा,या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू. स्वराज्यस्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार. सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले.


''हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे,असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया.'' शिवराय शेवटी निश्चयाने बोलले.रायरेश्वराच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडले,ते स्वराज्याच्या आणाभाका घेऊनच. शिवरायांचे मन उचंबळून आले. ते पुण्यास येताच तडक लाल महालात मातोश्रींकडे गेले. घडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला. त्या माऊलीला धन्यधन्य वाटले. आपण मणी जे धरले ते बालराजे पूर्ण करणार अशी आशा,असा विस्वास त्यांना वाटू लागला. शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले. मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले. घोडदौड करावी,डोंगरातील आडमार्ग शोधावे,खिंडी,घाट,चोरवाटा निरखाव्या,आसा त्यांचा नित्यक्रम सुरु झाला. शिवरायांनी मावळ्यांची अंतःकरने जिंकून घेतली. तरुण मावळे शिवरायांसाठी वेडे झाले. शिवरायांसाठी जगायचे शिवरायांसाठी मरायचे, असे ते मानू लागले. आता शिवरायांच्या हालचालींना उधाण आले,समुद्राला भरती यावी तसे.शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट,किल्ले आपल्या सवंगड्यांसह बारी नजरेने न्याहाळले.चोरवाटा,भुयारे,तळघरे,दारुगोळा,हत्यारे आणि शत्रूच्या फौजांची ठाणी यांची खडानखडा माहिती मिळवली.

🚩 जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
🚩 जय शंभुराजे 🚩

साल्हेरचा_वेढा

🛑#साल्हेरचा_वेढा
इ.स. १६७० मध्ये बागलाण भागात मराठे मोगल संघर्षाने उग्र स्वरूप धारण केले होते. औरंगजेबाने मराठ्यांचा नि:पात करण्यासाठी महाबतखान या महापराक्रमी आणि मातब्बर सरदाराला मुद्दाम दक्षिणेच्या स्वारीवर पाठविले होते. परंतु ऐषारामाची चटक असलेल्या महाबतखानाकडून कसलीही भरीव कामगिरी होण्याचे चिन्ह दिसेना. अहिवंतचा दुर्गम किल्ला जिंकताना महाबतखानाने आपले सारे शौर्य पणास लावले. परंतु किल्ला सर करण्याचे श्रेय शेवटी खानदेशचा सुभेदार दाऊदखान यास मिळाले. त्यानंतर तरी मराठ्यांचा मोड करण्याचे काम महाबतखानाने निष्ठापूर्वक करायला हवे होते. परंतु राजश्रीनी पारनेर (जि. अमहदनगर) येथे तळ ठोकला आणि प्रत्येक दिवस ख्यालीखुशालीत घालविण्यास सुरवात केली. अमीर लोकांकडून जबरदस्तीने त्याने मेजवान्या उपटण्यास कमी केले नाही. औरंगजेबाच्या कानावर ही वार्ता गेली. कोणीतरी तिखटमीठ लावून कळविले की, ’महाबतखान आतून शिवाजीला सामील आहे.’ त्यामुळे बादशाह संतप्त झाला आणि त्याने महाबतखानाला परत बोलविले. त्याच्या जागी आपला "दूधभाऊ" बहादूर कोका? (बहादूर कोकलताश) याला दक्षिणेत पाठविण्याचे ठरविले. बहादूरखानाने बादशहाचे समाधान करताना, ’तुम्ही दिल्लीची पातशाही खुशाल करणे आपण शिवाजीवर जातो त्यास हालखुद ठेवितो, त्याचे लष्कर पातशाही मुलखात न येईल असे करितो. पातशाहांनी फ़िकीर न करावी.’ अशा आशयाचे उदगार काढले अशी नोंद सभासदाने आपल्या बखरीत केलेली आहे.
बहादूरखानाने दक्षिणेत आल्याबरोबर साल्हेरच्या किल्ल्याकडे कूच केले कारण मोगल सेनेने अगोदरच किल्ल्याला वेढा घातलेला होता. परंतू मराठ्यांनी मोगलांची दाणादाण उडविण्यास सुरवात केलीली होती. मोगलांच्या तर्फ़े इखलासखान मियाना मोठ्या शर्थीने मराठ्यांना तोंड देत होता. शिवाजी महाराजांच्या योजनेप्रमाणे प्रतापराव गुजर सरसेनापती वरघाटाकडून आणि मोरोपंत पिंगळे कोकणातून साल्हेरकडे आलेले होते. त्यामूळे मोगलांच्या दोन्हीं बाजूच्या फ़ळीवर मराठ्यांना अचानकपणे हल्ला करणे शक्य झाले.साल्हेरला झालेली लढाई घनघोर स्वरूपाची होती. मराठ्यांनी नेहमीच्या गनिमीकाव्या ऎवजी उघडउघड "सुलतान ढवा" करून मोगलांना घेरले होते. या लढाईचे वर्णन करताना सभासद लिहतो, ’चार प्रहर दिवस युद्ध जाहले. मोगल, पठाण, रजपूत रोहीले, तोफ़ाची, हत्ती, उंटे, आरावा घालून युद्ध जहाले. युद्ध होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की, तीन कोस औरस चौरस आपले व परके माणूस दिसत नव्हते.’
इतर कोणत्याही लढाईपेक्षा साल्हेरच्या लढाईचा तपशील सभासदाने ब-याच बारकाव्याने दिला आहे. साल्हेरची लढाई मराठ्यांना अभिमानाची आणि प्रतिष्ठेची वाटली असावी कारण मैदानावर समोरासमोर लढाई करून मोगलांचा पराभव करण्यात मराठे या लढाईत यशस्वी झाले. गनिमी कावा हा तर मराठ्यांच्या युद्धशैलीचा खास प्रकार होता. परंतू सामन्याची लढाई देऊन आपण त्यातही मोगलांपेक्षा कमी नाही असे साल्हेरला मराठ्यांनी सिद्ध केले म्हणून "साल्हेरची लढाई" मराठ्यांच्या इतिहात महत्वपूर्ण मानणे आवश्यक आहे.
या लढाईत मोगलातर्फे इखलासखान मियाना, बहलोलखान (बहादूरखान ?), अमरसिंग, त्याचा मुलगा मुहकमसिंग हे मोठ्या त्वेषाने लढत होते. मराठ्यांच्या बाजूचे सेनापती प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, आनंदराव मोहीते, व्यंकाजी दत्ता, रुपाजी भोसले, सूर्यराव काकडे, शिदोजी निंबाळकर, खंडोजी जगताप व गोदोजी जगताप, मानाजी मोरे, विसाजी बल्लाळ, मोरो नागनाथ, मुकुंद बल्लाळ इत्यादी अनेक बिनीचे सरदार लढत होते. सभासदाला या लढाईचा बराच तपशील स्मरणात असावा. त्याने सर्व मराठे वीरांची नावे आठवून यादी दिली आहे.
प्रत्यक्ष युध्दात प्रचंड रक्तपात झाला. रक्ताचे पूर वाहीले. रक्ताचा चिखल झाला. त्यामध्ये हत्ती, घोडे आणि उंट फसू लागले. दोन्ही बाजूची मिळून दहा हजार माणसे मारली गेली. जनावरे किती मारली याची गणनाच करणे शक्य नव्हते.
मोगलांची हानी बरीच झाली. राव अमरसिंग आणि त्याचे काही सहकारी लढाईत ठार झाले. मुहकमसिंग आणि स्वत: इखलासखान जबर जखमी झाला. मराठ्यांची हानीही झाली. सूर्यराव काकड्यासाऱखा तेजस्वी हिरा तोफेचा गोळा लागून धारातीर्थी पतन पावला. सभासद लिहीतो, 'सूर्यराव म्हणजे सामन्य योद्धा नव्हे. भारती जैसा कर्ण योद्धा त्याच प्रतिमेचा, असा शूर पडला, परंतू युद्धात अखेर मराठ्यांचा जय झाला, मोगलांचा सारा सरंजाम त्यांच्या हाती आला. १२५ हत्ती व सहा हजार घोडे आणि तितकेच उंट मराठ्याना मिळाले. अलंकार, नाणी, कापडचोपड यांची तर गणतीच नव्हती.
शिवाजीमहाराजांना हे आनंदाचे वृत्त समजल्यावर खबर आणणार्‍या जासूदाना त्यांनी सोन्याची कडी घातली. जे मर्द मराठे जिवाची बाजी लावून लढले त्यांना महाराजांनी अपार द्रव्य दिले आणि त्यांची संभावना केली. दिलेरखान हे युद्ध झाले तेव्हां साल्हेरपासून काही अंतरावर होता. त्याला पराजयाची वार्ता कळताच तो मागच्या मागे पळला.
सक्सेना लिहीतो, 'या युद्धाची वार्ता कळताच बहादूरखान मोठ्या तातडीने बागलाणाकडे रवाना झाला. परंतु तो तेथे जाण्याच्या अगोदर साल्हेरवर जय मिळवून मराठे कोकणात उतरले होते.' बहादूरखान मराठ्यांच्या पाठलागावर निघाला. त्याची हिंमत कुठपर्यंत आहे हे महाराज जाणून होते.त्याच्या विषयी त्यांनी उद्गगार काढले 'बहादूरखान पेंडीचे गुरू आहे त्याचा गुमान काय आहे?

#मालोजीराजे_भोसले

#मालोजीराजे_भोसले
#वीरश्री_मालोजीराजे_बाबाजीराजे_भोसले
बाबाजी भोसले यांचे पुत्र मालोजीराजे भोसले यांचा जन्म इ.स.१५५२ साली वेरूळ येथे झाला.
दौलताबाद जवळ वेरूळ परिसरात भोसले राहत असत. देऊळगाव, हिंगणी, बेरडी, जिंती, वेरूळ, मुंगी, बनसेंद वगैरे दहा गावांची पाटीलकी बाबाजीराजे भोसले यांच्याकडे होती.
बाबाजी भोसल्यांना मालोजी आणि विठोजी असे दोन पुत्र होते. मालोजीराजे हे थोरले होते.
मालोजी राजे भोसले मराठ सरदार होते, त्यांनी मलिक अंबरच्या सैन्यात अहमदनगर सल्तनत सेवा केली.
ते शहाजीराजे भोसले यांचे वडील आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजीराजे यांचे आजोबा होते.
सोळाव्या शतकात निजामशाही, आदिलशाही,
मोगल यांच्यात सत्तासंघर्ष सुरु होता, यात लढणारे मात्र या भूमीचे पुत्र होते.
विध्वंस होत होता इथल्या भूमीचा.
विध्वंस होणारी आपली भूमी, युद्धात आणि सततच्या दुष्काळात होरपळणारी रयत, श्रद्धास्थानांची होणारी दुरावस्था, याचा सल उरात ठेवूनच हा पराक्रमी योद्धा त्याकाळच्या निजामशाहीत वावरला.
स्वपराक्रमाने 'सरगुर्हो' म्हणजेच 'सेनापती'यासारख्या सर्वोच्च दरबारी पदावर गेला.
शहाजी महाराजांनी सहा वर्षे चालवलेली प्रतिनिजामशाही, स्वतंत्रपणे राज्यकारभार चालवण्याचा केलेला धाडसी प्रयत्न;
पुढे त्यांच्या व जिजाऊंच्या प्रेरणेने शिवरायांनी
स्थापन केलेले स्वराज्य - यामागे मालोजीराजेंच्या शौर्याचा, पराक्रमाचा वारसा आहे.
छत्रपती शिवरायांच्या कर्तबगारीतून साकारलेल्या सार्वभौम स्वराज्याचा धागा मालोजीराजेंपर्यंत जातो.
शिवभक्त असणारे मालोजीराजे यांनी वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला होता.
शिखर शिंगणापूर येथे दुष्काळी परिस्थितीत तलाव खोदुन यात्रेकरुंसाठी पाण्याची व्यवस्था केली आणि अशीच
देव, देश आणि धर्म सेवेची एक ना अनेक कामे मालोजीराजेंनी आपल्या कारकीर्दीत केली होती.
या पराक्रमी योद्ध्याला इंदापूर जवळ वीरश्री प्राप्त झाली आणि त्यांना शेवटचा अग्नी इंदापूरच्या गढीच्या परिसरात देण्यात आला.
त्यांच्या समाधी पादुकांचे इंदापूरमध्ये दर्शन घेता येते.
#जगदंब...
|| एकच आवाज ||
|| जय जिजाऊ जय शिवराय ||
|| जय शंभुराजे ||

छत्रपती संभाजी महाराज यांचा इंग्रजासोबत करार.

*२६ एप्रिल इ.स.१६८४*🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

केग्विन हा सातत्याने चार्लस राजाला संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की, जेणे करुन संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा. त्याप्रमाणे २६ एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स , राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी संभाजी महाराजांच्याकडे पाठवले त्यांनी बिरवाडी येथे राजांची भेट घेतली व गर्व्हनर केग्विनला पत्र पाठवून उभयंतामध्ये होणाय्रा तहाच्या अटींना संमती दर्शवली होती.
संभाजी राजांचे केग्विनला पत्र :- "वकिलाने तुमचा मनोदय सांगितला त्याच्या बरोबर आम्ही आमची मान्याता पाठवली. तुमचा मनोदय तुम्ही तपशीलवार लिहून पाठवला त्या तहाच्या अटींना आम्ही संमती पाठवली आहे ती मिळेलच. तरी तुम्ही या अटींचे परिपालन करावे. आम्हीही त्या पाळू आमच्या वचनावर विश्वास ठेवून वागावे दिवसेदिवस आमच्या मैत्रीचे संबंध दृढ होत जातील असे करावे.... कॅप्टन गॅरीने सिद्दीशी तुमचे वितुष्ट आले आहे असे आम्हांला सांगितले त्याला काढून लावण्यासाठी आम्ही सहाय्य करावे अशी तुमची अपेक्षा आहे तरी सिद्दी आमचा शत्रू आणि तुम्ही आमचे मित्र म्हणून सर्वतोपरी सहाय्य करणे आम्हास आवश्यक आहे. तुमचा मित्र तो आमचा मित्र, तुमचा शत्रू तो आमचा शत्रू हे जाणून तुमच्यापरीने तुम्ही सिद्दीचा नाश करण्याचा प्रयत्न करावा आम्हीही तसेच करत आहोत. तुमच्या शत्रूचा नाश करणे तुम्हाला सोपे जावे म्हणून आम्ही तुम्हास सर्वतोपरीने मदत करु, आपली मैत्री वृध्दिंगत होवो. अधिक काय लिहणे."
यावेळी इंग्रज व संभाजी महाराज यांच्यात जो तह झाला त्यापैकी आरमाराविषयक कलम असे होते,
"वादळामुळे किंवा अन्य उत्पातामुळे जर एखादे जहाज गुराब, जहाज किंवा होडी माझ्या राज्यांतील बंदरात लागली तर ती जप्त करुन सरकार जमा होऊ नये हा रिवाज ख्रिश्चन लोकांच्या बाबतीत रुढ असेल तर ती सवलत इंग्रजांसही देण्यात येईल."
मुंबईसाठी दिलेल्या कलमामध्ये एक कलम असे होते की, :- "माझे आणि मुघलांची गलबते समुद्रात वावरतात तरी मुघलांचे एखादे जहाज माझ्या लोकांनी धरले आणि त्यात जर इंग्रजांचा माल असला व त्याच्यावर त्यांच्या खुणा वगैरे असल्यास आणि त्या पटवून दिल्यास त्यांना त्यांचा माल परत मिळेल. इंग्रजांनी धरलेल्या जहाजात माझ्या प्रजेचा माल आढळल्यास तो त्यांनी परत करावा."
छत्रपती संभाजी महाराज यांचा इंग्रजासोबत करार.

#जाणता_राजा #स्त्रीवर_हात_टाकणाऱ्या_मेहुण्याचे_डोळे_काढले

#जाणता_राजा
#स्त्रीवर_हात_टाकणाऱ्या_मेहुण्याचे_डोळे_काढले
छत्रपती शिवाजी महाराज व गोवळकोंड्याचा कुतुबशहा या दोघांच्या संयुक्त फौजांनी दक्षिण मोहीम हाती घेतली व आंध्र प्रदेश, तेलंगणा व तमिळनाडू राज्यातील बरेच प्रदेश व किल्ले ताब्यात घेतले नोव्हेंबर १६७८ रोजी परत येत असताना म्हैसूर व बेळगाव भागातील छोटे जहागीरदार असलेले देसाई व नाईक यांच्यासोबत मराठ्यांच्या छोट्यामोठ्या लढाया होत होत्या अशाप्रकारे परतत असताना बेळगाव जिल्ह्य़ातील गदग प्रांतातील बेलवडी येथील देसाई जहागीरदार यांच्या गढीला मराठ्यांनी वेढा दिला यावेळी मराठा सैन्याच नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराज यांचे मेहुणे सखोजी गायकवाड यांच्याकडे होत
छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नी असलेल्या सकवाराबाई साहेब या गायकवाड घराण्यातील होत्या त्यांचे बंधू कृष्णाजी गायकवाड हे छत्रपतींचे विश्वासू अंगरक्षक होते तर दुसरे बंधू सखोजी गायकवाड हे मराठा सेनानी म्हणून आपली कामगिरी बजावत होते बेलवडीचा प्रमुख असलेला येसाजी प्रभु देसाई मराठ्यांच्या लढाईत मारला गेला परंतु त्याची पत्नी मल्लव्वा देसाई हीने हार न मानता लढा चालू ठेवला तिने प्रखर व चिखट मारा करून मराठ्यांच्या फौजेला जवळपास बरेच महिने झुंजवत ठेवलं शेवटी बेलवडीची गढी मराठ्यांनी जिंकली तेव्हा सखोजी गायकवाड यांनी राणी मल्लव्वा देसाई व तिच्या सहकारी असलेल्या स्त्रियांना पुरूषी वृत्तीतून व रागातून थापडा मारल्या काही इतिहासकार राणी मल्लव्वावर सखोजी गायकवाड यांनी अत्याचार केला होता असं ही म्हणतात ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर गेल्यावर त्यांनी तडक बेलवडीची गढी गाठली व राणी मल्लव्वावर झालेल्या आत्याचाराची चौकशी करून मेहुणा असलेल्या सखोजी गायकवाड याला डोळे काढण्याची शिक्षा सुनावली
राणी मल्लव्वा देसाईने दिलेला चिवट लढा व तिच्या धाडसाचे कौतुक वाटून छत्रपती शिवाजी महाराजांनी बेलवडीची गढी तिला जहागीरी म्हणून बहाल केली व राणी मल्लव्वा देसाईला "सावित्रीबाई" असा किताब दिला या जानता राजाचा न्याय बघून राणी मल्लव्वा भारावून गेली तिने आपल्या जहागीरीतील प्रत्येक मंदीराच्या पुढे व मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांची शिल्पे कोरून घेतली होती यातील एक शिल्प धारवाड तालुक्यातील यादवाड या गावी आजही पाहायला मिळते जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीतच बनवले गेले होते 🙏
#पोस्टसाभार- Zunjar Babar

महाराणी सईबाई


महाराणी सईबाई
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अतिशय महत्वाचे स्थान असलेल्या सईबाई विषयी फारसे लिखाण कुठे आढळत नाही.खरे तर जिजाऊ साहेबांनंतर महाराजांच्या जीवनात यांचे खूप जास्त महत्व होते पण केवळ 26 वर्ष आयुष्य लाभलेली ही महाराणी इतक्या कमी आयुष्यात सुध्दा खुप मोठे काम करून गेली.
फलटणचे राजे श्री.मुधोजीराव निंबाळकर आणि रेऊबाई निंबाळकर यांच्या पोटी सईबाई।यांचा जन्म इ. स. 1633 साली फलटण येथे झाला. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्या काळातील पध्हतीप्रमाणे त्यांचे शिवाजी महाराजांबरोबर लग्न झाले आणि सईबाई पुण्याला जिजाऊंच्या छत्रछायेखाली आल्या.गौर वर्ण चुणचुणीत आणि मुळातच हुशार असणाऱ्या सईबाई च्या हुशारीला जिजाऊच्या छायेत अजूनच धार चढली .
हा काळ तसा खुप धामधुमीचा होता. शिवरायांचा स्वराज्य स्थापनेचा उद्योग जोरात चालू होता. त्यांचा पाय घरात ठरत नव्हता.सतत लढाई ,घोडदौड ,मोहिमा चालू होत्या.या काळात नवीनच आकाराला येत असणाऱ्या स्वराज्याचे फडावरील काम जिजाबाई पाहत होत्या आणि त्या हा सर्व पसारा यशवीपणे सांभाळत असताना त्यांच्या हाताखाली सईबाई तयार होत होत्या.
या नवीन आकाराला येत असणाऱ्या स्वराज्या मध्ये अनेक अडचणी होत्या. अनेक वेळी महाराजांना कुठे माघार घ्यावी लागायची ,कधी स्वकीयांचा त्रास ,कधी पैशाची कमतरता कधी सैन्याची कमतरता आणि समोर असलेले मुघल ,आदिलशहा आणि कूतूबशहा सारखे प्रबळ शत्रू .अशावेळी महाराजांना मानसिकरित्या खंबीर पाठिंबा जिजाऊंसाहेवा सोबत तितक्याच ताकदीने सईबाई ही देत होत्या. लहान वय ,नाजूक तब्येत याचा कुठलाही परिणाम त्यांच्या कर्तबगारी वर होत नव्हता.जिथे जिथे गरज लागेल तिथे आवश्यक तो सल्ला देणे , महाराजांचे माघारी जिजाऊंच्या सोबत सगळा कारभार पाहणे हे सर्व त्या अगदी समर्थपणे करत होत्या.
सईबाई ना एकूण चार अपत्य झाली. सखुबाई ,राणुबाई, अंबिकाबाई आणि छत्रपती संभाजी महाराज.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मावेळी त्यांना बाळंतव्याधी चा रोग जडला आणि शिवाजी महाराजांचा हा भावगड ढासळायला चालू झाला.अगदी संभाजी महाराजांना दूध पाजण्यासाठी म्हणूनही कापूर होळ गावच्या धाराऊ नावाच्या दूध आई ला आणावे लागले.स्वतः च्या मुलाला दूध न पाजता येण्याचे दुःख , तोळामासा झालेली तब्येत,अफजल खानाच्या रूपाने स्वराज्यावर आलेले संकट ,महाराजांची वाढत चाललेली चिंता सगळीच परिस्थिती भयावह होती. महाराज अफजल खान स्वारी च्या निमित्त अखंड बाहेर होते पण त्यांचे मन मात्र झूरत चाललेल्या त्यांच्या लाडक्या सई भोवती रुंजी घालत होते. काळजावर दगड ठेऊन महाराज सर्व कर्तव्य पार पाडत होते.एकीकडे संकटात सापडलेले स्वराज्य, लहान संभाजी राजे आणि दिवसागणिक क्षीण होत चाललेल्या सईबाई. असेच महाराज प्रतापगडावर असताना सईबाई ची तब्येत बिघडल्याची बातमी आली आणि महाराजानी धावतपळत राजगड गाठला.सईबाई अखेरच्या घटका मोजत होत्या. महाराज आले त्यांनी सईबाई चा हात हातात घेतला.काहीही बोलण्याची गरज नव्हती.नुसत्या स्पर्शातुन एकमेकांची मने दोघानाही कळत होती. सईबाईना काळजी होती लहानग्या शंभुराजांची.महाराजांना काही सुधरत नव्हते ,नुकतेच कुठे स्वराज्य आकाराला येत होते आणि अशावेळी सुखात सुख आणि दुःखात दुःख अशी पूर्णपणे त्यांच्या मध्ये विरघळून गेलेली सई अर्धा डाव सोडून निघाली होतq. महाराजानी संभाजी राजांना आणि तीनही मुलींना नीट सांभाळण्याची सई ना खात्री दिली त्यांची चिंता कमी करण्याचा प्रयत्न केला पण सईबाई महाराजांकडे पाहत असतानाच कधीच आपल्या कधीही एन संपणाऱ्या प्रवासाला निघून गेल्या होत्या. लहान पणाची सवंगडी ,तरुणपणीची भार्या, अनेक संकटात खंबीर पणे मागे असलेली सई महाराज संभाजी राजे, सखु, राणूआणि अंबिका यांना पोरके करून निघून गेल्या होत्या.महाराजांच्या, जिजाऊंच्या दुःखाला पारावार नव्हता. हि काळीकुट्ट तारीख होती 5 सप्टेंबर 1659.
महाराणी सईबाई ची समाधी राजगड येथे आहे. या राणीला त्रिवार मुजरा.
डॉ. आर. आर. देशमुख

थोरल्या आऊ- जिजाऊ



थोरल्या आऊ- जिजाऊ
जिजामाता असे म्हटले की आपले डोके आपोआपच आदराने झुकले जाते. स्वराज्य स्थापनेच्या मार्गदर्शक असणाऱ्या जिजामाता यांचा विचार करताना त्या कुठल्या मुशीतुन घडल्या असतील असा विचार सहजच मनात येतो. अनेक पातळ्यावर संघर्ष केलेली ही संघर्षयात्री आपल्या पराक्रमाने, विचारांनी फक्त छत्रपतींच्या माता न राहता सर्व महाराष्ट्राच्या माँसाहेब झाल्या.
जिजाऊंचा जन्म झाला तो काळ प्रचंड उलथापालथ असलेला काळ होता. महाराष्ट्रात पाच शहा होते. निजामशहा, आदिलशहा, ईमादशहा, बेरदशहा आणि कूतूबशहा आणि या सर्वांच्या वर मुघल बादशहा.
हे सर्व सुलतान अतिशय जुलमी होते आणि त्यांच्या साठी लढत होती महराष्ट्रातील अनेक शूर घराणी. त्यातील एक घराणे म्हणजे सिंदखेडराजा येथील जाधव घराणे. त्यातील एक म्हणजे लखुजीराव जाधव हे निजामशाही मध्ये मोठे नामांकित सरदार होते.त्यांच्या पत्नीचे नाव म्हाळसाबाई. या दोघांच्या पोटी 12 जानेवारी 1598 ला जिजाबाईंचा जन्म सिंदखेडराजा इथे झाला.
लखुजी राजे मोठे सरदार असल्यामुळे त्यांची 10000 ची फौज कायम सिंदखेड येथे असे.
अनेक सरदार अधिकारी यांचे त्यांच्याकडे येणे जाणे असे. जहागीर ही मोठी होती. त्यामुळे या सर्व वातावरणात आवश्यक ते सर्व संस्कार आपोआपच जिजाऊंवर होत होते.जिजाऊंना आपल्या वडिलांकडून शस्त्र शिक्षणही मिळाले होते. अश्वारोहन आणि विविध शस्त्र चालवण्यात त्या पारंगत होत्या. तेज नजर आणि तल्लख बुद्धी यामुळे मूळच्या सुंदर असलेल्या जिजाऊचे व्यक्तिमत्व अजूनच खुलून येत असे. 'राधामाधव विलास चंपू ' या ग्रंथा मध्ये जयराम पिंडे यांनी त्यांच्या सौंदर्याचे खुप छान वर्णन केले आहे.
॥जशी चंपकेशी खुले फुल्लजाई
भली शोभली ज्यास जाया जिजाई
जिचे कीर्तीचा चंबू जम्बुद्वीपाला
करी साउलीसी माउलीसी मुलाला ॥
अगदी यथार्थ असे हे वर्णन आहे.त्याच वेळी वेरुळ येथे मालोजीराजे भोसले आणि विठोजी राजे भोसले हे दोघे भाऊ आपली पाटीलकी सांभाळत जहागिरी ही सांभाळत होते. त्यांचा आणि लखुजी रावांचा चांगला स्नेह होता. यातीलच मालोजीराजे भोसले यांचे पुत्र म्हणजे शहाजी राजे भोसले.दोन्ही घराच्या स्नेहातून शहाजी राजे आणि जिजाऊ यांचा विवाह जुळून आला आणि या विवाहाच्या निमित्ताने ही दोन्ही मातब्बर घराणी 1605 साली एकत्र आली.
ही दोन घराणी एकत्र तर आली.दोन्ही घराणी निजामशाही मध्ये उच्च पदावर होती. शहाजी राजे ही मोठे सरदार होते. निजामशाहा हुशार होता अशी मोठी घराणी एकत्र आलेली त्याला परवडणार नव्हते. असेच एक दिवस निजामशाहचा दरबार भरला होता. दरबार सुटला आणि सर्व सरदार बाहेर पडू लागले. इतक्यात सरदार खंडागळे यांचा हत्ती पिसाळलला आणि फौजेला तुडवत पळू लागला.हत्तीला आवरण्यासाठी दत्ताजी जाधराव म्हणजे जिजाबाई चे भाऊ धावले तर दुसऱ्या बाजूने शहाजी राजांचे चुलत भाऊ संभाजीराजे उतरले. हत्ती बाजूलाच राहिला आणि तिथेच लढाई चालू झाली. स्वतः लखुजी राजे व शहाजी राजे एकमेकांविरुद्ध लढू लागले. शेवटी दत्ताजी जाधवराव आणि संभाजी राजे दोघंही लढता लढता ठार झाले आणि ही दोन घराणी एकमेकांची कायन दुश्मन झाली. निजाम शहा मात्र किल्ल्यावर बसून हसत होता. त्याचे काम बिनबोभाट झाले होते.
काय अवस्था झाली असेल जिजाबाईची. भाऊ वारला म्हणून दुःख करायचे की दीर वारले म्हणून शोक करायचा. याहून भयानक म्हणजे दोन्ही घराण्यात आलेला दुरावा. जिजाऊंचे तर माहेरच दुरावल्या सारखे झाले. हा प्रकार इथेच थांबला नाही तर पुढे 1629 मध्ये निजामशहाने भर दरबारात लखुजी राजे जाधव आणि त्यांचे तीन पुत्र अचलोजी राघोजी आणि यशवंत राव यांची दगलबाजीने हत्या केली. फक्त एक पुत्र बहादुरजी तेव्हडे तिथे नसल्यामुळे वाचले. असे होते सुलतान.
या वेळी जिजाऊ शिवनेरीवर होत्या आणि त्या गरोदर होत्या. काय वाटले असेल त्यांना ही बातमी ऐकून. किती व्याकुळ झाल्या असतील, काय काय विचार त्यांच्या मनात आले असतील सर्व काही विचार करण्याच्या पलीकडे आहे. शहाजी महाराज सतत मोहिमा मध्ये गुंतलेले, ज्येष्ठ पुत्र संभाजी ही शहाजी राज्यांबरोबर आणि जिजाबाई अवघडलेल्या अवस्थेत शिवनेरीला.
अशाच सगळ्या वातावरणात शिवाजी महाराजांचा 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी वर जन्म झाला.झालेल्या अनेक घटनांनी जिजाऊ खचून तर गेल्या नव्हत्या पण त्यांनी मनाशी नक्की काही तरी ठरवले होते. या आधी शहाजी महाराजांनी स्वतंत्र राज्य स्थापनेचा प्रयत्न केला होता पण तो फसला होता. तीही प्रेरणा जिजाऊंना होतीच.
त्या द्रुष्टीने त्यांनी शिवाजी राजांना लहान पणापासूनच तयार करण्यसाठी प्रयत्न चालू केले.रामायण, महाभारत तर सांगितलेच पण इतिहासातील अनेक दाखले देऊन त्यांना स्वराज्य निर्मितीचे महत्वही पटवून दिले. अगदी लहान वयातच अनेक प्रकारचे संस्कार त्यांनी शिवबावर केले. पुण्यात लाल महाल बांधून घेतला. कान्होजी शिर्के आणि इतरांच्या मदतीने सर्व जहागीर फिरून दाखवली. पुणे शहर वसवताना लोकांना कौल देऊन गावे बसवणे, रयतेशी सलगी करणे, त्यांचे सुख दुःख जाणून घेणेप्रसंगी कठोर होणे, माघार घेणे हे सगळे शिक्षण त्यांनी शिवरायांना दिले आणि त्यातूनच महाराष्ट्राला अष्टावधानी असे छत्रपती मिळाले.शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळातील मोहिमा म्हणजे सगळे नियोजन जिजाऊंचे होते. त्यातूनच महाराजांचे राजकीय कौशल्य, युद्धकौशल्य, रणनीती,स्त्री आदर हे सर्व गुण तयार होत होते. हे सर्व करत असतानच फडावरचा कारभार ही जिजाऊ सांभाळत होत्या. त्यातूनही महाराजांचे शिक्षण चालू होते.
माणसे कशी जोडायची, नवीन संबध कसे तयार करायचे, सैन्याशी आणि रयतेशी सलगी कशी करायची असे सगळे शिक्षण जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली महाराज घेत होते.अफजलखान वधाच्या वेळीही महाराज दुःखा त होते कारण नुकतेच सईबाई चे निधन झाले होते त्यावेळी ही त्यांना मानसिक आधार देत त्यांचे मनोबल तर उंचावलेच पण संभाजी राजांची जबाबदारीही आपल्यावर घेतली. खरे तर त्या आधीच काही दिवस ज्येष्ठ पुत्र संभाजी राजे यांच्या युद्धातील मरणाला अफजलखान कारणीभूत ठरला होता. ते दुःख खुप मोठे होते पण स्वतः चे सर्व दुःख जिजाऊंनी बाजूला ठेवले होते. शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकून पडले तेंव्हा ही त्या स्वतः समशेर घेऊन निघाल्या होत्या. महाराज आग्र्याला अडकून पडले तेंव्हा तर जिजाऊंची खरी कसोटी होती. मुलगा आणि नातू दोघेही शत्रूच्या मगर मिठीत अडकलेले पण याचा कुठलाही परिणाम होऊ न देता सर्व राज्य जिजाऊंनी अतिशय उत्तम रीत्या सांभाळले. महाराज नसताना ही त्यांनी स्वराज्याचा एकही किल्ला जाऊ दिला नाही उलट तीन चार नवीन घेतले.
त्यांच्या जागी असलेला हा बाणेदारपणा, धीरोदत्त अशी व्रुत्ती, धाडस या सर्व गुणांमुळे स्वराज्य उभारणे सोपे झाले. याच वेळी परत एक मोठे संकट त्यांच्यावर ओढवले.
इ. स. 1664 साली शहाजी राजे कर्नाटक मध्ये होदेगैरी च्या जंगलात शिकारी मागे जात असताना घोड्याचा पाय अडकून खाली पडले आणि त्यातच त्यांचे निधन झाले.जिजाऊंवर दुःखाचा डोंगर कोसळला. राजगडावर बातमी आली तेंव्हा शिवाजी महाराज सुरते च्या स्वारीवर होते. जिजाऊंनी सती जायची तयारी केली होती. पण तेव्हड्यात महाराज वापस आले आणि महत्प्रयसाने महाराजांनी जिजाऊंना सती जाण्यापासून रोखले.औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यानंतर महाराज आणि जिजाबाईंनी अत्यंत शांत आणि धोरणी पणाने तहामध्ये गेलेले राज्य तर मिळवलेच पण राज्याची सीमा अजून दूरपर्यंत वाढवली. इ. स. 1670 मध्ये शिवरायांनी आपली राजधानी राजगड वरून रायगडला हलवली आणि जिजाऊंना आयुष्यभर जपलेले स्वराज्याचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणारा याचा अंदाज येऊ लागला. शिवरायांनी राज्याभिषेक करून घ्यावा असे जिजाऊंचे ही मत होतेच. त्यादृष्टीने तयारी चालू झाली. हा सोहळा अभूतपर्व असा असणार होता. कारण महाराज चक्रवर्ती राजा होणार होते. महाराष्ट्राच्या भूमीला आपला हक्काचा राजा मिळणार होता. यातही अनेक अडचणी होत्या. पण शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांनी अत्यंत हुशारीने या सर्व अडचणी वर मात केली.दि. 6जून 1674 महाराज सिंहासनाधीश्वर झाले. महाराष्ट्रात स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. महाराजानी यवनी विळख्यातून महाराष्ट्राला मुक्त करून स्वराज्य अधिक्रुत रीत्या स्थापन केले. जिजाऊंच्या आयुष्यातला हा सर्वोच्च क्षण होता. शहाजी महाराजांची संकल्पना, जिजाऊंचे मार्गदर्शन आणि छत्रपतींच्या पराक्रमाणे अंमलबजावणी अशी ही साखळी होती. छत्रपतींवर राज्याभिषेक होत असताना जिजाऊंचे डोळे भरून येत होते. आयुष्यभर केलेल्या कष्टांची आज इष्टा पत्ती होत होती. हे भरलेले डोळे म्हणजे आनंद आणि आठवण यांचे संयुक्त मिश्रण होते. शिवराय राजे झाल्याचा आनंद होता तर शहाजी राजे, थोरले संभाजी राजे,सईबाई, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, प्रतापराव गुजर अशा अनेक विरानी दिलेल्या आहुतीची आठवण होती. शिवरायांचे तर आपल्या आईवर अतिशय प्रेम होते. त्यांच्यासाठी आई म्हणजे सर्वस्व होते. जिजाऊंना रायगडावरील थंड हवा मानवत नाही म्हणून महाराजांनी गडाखाली पाचाड येथे जिजाऊंसाठी वाडा बांधून घेतला होता.
राज्यभिषेक पाहून जिजाऊंना आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते. या आनंदात असतानाच जिजाऊंची तब्येत बिघडली. राज्याभिषेक प्रसंगी खुप श्रमही झाले होते. अनेक उपचार झाले पण तब्येत बिघडत गेली आणि राज्याभिषेकानंतर अवघ्या बाराव्या दिवशी म्हणजे 17 जून 1674 रोजी जिजाऊंसगळ्या महाराष्ट्राला, जनतेला शिवरायांना शंभुराजाना पोरके करून अनंता च्या प्रवासाला निघून गेल्या.
डॉ. आर. आर. देशमुख

महाराष्ट्राचा इतिहास




महाराष्ट्राचा इतिहास हा जितका वैभवशाली आहे तितकाच तो अंधारातही आहे! शालेय शिक्षणात आपल्याला हा इतिहास शिकवला तर महाराष्ट्राचे भविष्य उज्वल आहे!
इतिहासाचे मुख्य तीन भागात विभागणी होते. एक ज्ञान नाही असा इतिहास. एक माहिती आहे पण त्याचे फारसे उपलब्ध नाही. अन एक भाग ज्याची लिखित साधने उपलब्ध आहे. पहिल्या भागाला प्राचीन! दुसऱ्या भागाला मध्ययुगीन अन तिसऱ्या भागाला आधुनिक संबोधतो.
महाराष्ट्राच्या इतिहासाचा विचार केला तर साधारण एकूण ज्ञात दोन हजार वर्षांचा इतिहास आहे! पूर्वी महाराष्ट्राला रठ्ठ, महारठ्ठ, अश्मक वगैरे नावे होती! साधारण इसवीसनाच्या सुरवातीचा इतिहास पहिला तर संपूर्ण दक्षिण भारतावर राज्य असलेले मावळचे सातवाहनांना दक्षिणाधिपती म्हटले जायचे! हे तेच वीर आहेत ज्यांच्यामुळे शालिवाहन शकाची कालगणना मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली.
सातवाहन
तत्कालीन इराण, अफगाणीस्थातून आजच्या पाकिस्तानात उदयास आलेल्या शक नावाच्या बलशाली जमातीने भारतात दिग्विजय करत महाराष्ट्रावर चाल केली! अन आताच्या पंढरपूर भागात ती लाखोंच्या सेनेसोबत पराक्रमी सातवाहनांशी ते लढले. अन तो दिवस म्हणजे शालिवाहन शके सुरु झाले!
महाराष्ट्र हा मुळातच देशाचा अनभिषिक्त सम्राट! रक्षणकर्ता अन राष्ट्रपती! रठ्ठ या संस्कृत शब्दाचा अर्थ मुळी मार देणारा असा होतो. आता महारठ्ठचा अर्थ तुम्ही लावलाच! दंड देण्याचा अधिकार राजाला असतो या अर्थाने महाराष्ट्र हा देशाचा मुख्य अन रक्षणकर्ता होतो.
महाराष्ट्र इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात आंतरराष्ट्रीय व्यापार करीत होता. याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत! हे यासाठी सांगतो कारण काही भेळपुरी अन पाणीपुरीच्या दुकानांना विकास म्हणत असतात! देशातील गुप्त साम्राज्यातही गुप्तांनी महाराष्ट्राशी स्नेहाचे संबंध राखले व राजकीय डावपेचांनी महाराष्ट्राच्या तत्कालीन बलदंड वाकाटकांच्या साम्राज्याला आपल्यावर चाल करू दिली नाही!
तेराव्या शतकाच्या अखेरीस देवगिरीच्या यादवांचा पराभव पाताळयंत्री अल्लाउद्दीन खिल्जीने करून हा अजेय भूभाग पहिल्यांदा काबीज केला! लक्षात घ्या देशाच्या दीड हजार वर्षांच्या गुलामीच्या काळापैकी महाराष्ट्र केवळ ४५० वर्षे गुलामीत होता!
पुढील साडे तीनशे वर्षे महाराष्ट्र गुलामीच्या अंधकारात खिचपत पडला! पुढील इतिहास थोडाफार आजही माहिती आहे! स्वराज्यसूर्य शिवरायांच्या आगमनाने महाराष्ट्राने जुने कापडे फेकावीत तशी गुलामीच्या साखळदंड फेकले अन त्रिखंडावर अधिपत्य गाजवणाऱ्या मुघलांच्या सत्तेला सुरुंग लावला.
शिवरायांच्या गमनानंतर दख्खन काबीज करण्याच्या हेतूने मुघल बादशहा औरंगजेब स्वतःला पाच लाखांच्या अन मोठ्या खजिन्यासह महाराष्ट्रात तळ ठोकला. दगाफ़टक्यामुळे महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज त्याच्या तावडीत सापडले! मुघलांना साजेल अशी क्रूर अन निर्घृण हत्या त्याने करवली!
त्यानंतर न राजा न राजधानी पण महाराष्ट्राचे मराठा वाघ अतिविराट अशा शत्रूशी झुंज देत होते! पुढे बोलण्याआधी एक गोष्ट सांगतो. जो बोलायचा राहून गेला. प्राचीन रघुकुल नावाच्या संस्कृत ग्रंथात नमूद केल्यानुसार असा योद्धा जो दहा हजार योध्यांशी लढू शकतो असा मराठा! अशा मराठ्यांचे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र!!
मराठा या शब्दाचे संस्कृत रुप महाराष्ट्र आहे अर्थात ज्यांचे राष्ट्र मोठे आहे ते मराठे. मरहट्टा, महारठ्ठा,रठ्ठा म्हणजे राष्ट्र,रठ्ठा मार देणे,महारथ, महारथी म्हणजे मराठा उर्फ राष्ट्रपती या संज्ञा प्राचीनकाळी अत्यन्त शौर्यशाली रणधुरन्धर क्षत्रिय राजबिण्ड्या पुरुषांनाच लावीत असत. याला आधार रघुवंशाच्या ६व्या सर्गामधील पुढील श्लोक आहे-
“‘एको दस सहस्राणि योधयेद्यस्तु धान्विनाम। शस्त्रशास्त्रप्रवीणश्च स वै प्रोक्तो महारथ:। अमितान्योधयेद्यस्तु संप्रोक्तोऽतिरथस्तु स:। रथस्त्वेकेन योद्धा स्यात्तन्न्यूनोऽर्द्धरथ: स्मृत:।’ !!
भावार्थ – शस्त्रशास्त्रात म्हणजे रणविद्येत प्रवीण होऊन जो एकथा क्षत्रिय दहा हजार योद्ध्यांबरोबर लढू शकतो त्या रणधुरन्धरासच मरहट्टा- महारथ महारथी म्हणतात.”
२७ वर्षे अखंड युद्धानंतर मुघलांच्या पाच लाखांची सेना कापली तर गेलीच पण सातत्याने होणाऱ्या मराठ्यांच्या हल्ल्याने मुघल बादशाह हैराण झाला व गतप्राण झाला! अन तिथून महाराष्ट्राने मागे पाहिले नाही! अगदी दिल्ली अन पुढं आताचा पाकिस्तानही ताब्यात घेत महाराष्ट्राने देशातील परकीय शक्तींना नष्ट केले! दिल्लीचा बादशहा नामधारी बनला! महाराष्ट्राच्या वाघांनी अफगाणीस्थाच्या सीमेवर गुरगुरायला सुरवात केलेली.
लक्षात घ्या! शिवरायांच्या युद्धनीतीमुळे ब्रिटीश व युरोपियन सत्ता मराठेशाहीत खिळखिळ्याच नव्हे तर जमही बसवू शकल्या नव्हत्या. पुढे आपल्याच उत्तर भारताने घात केला अन पाठ दाखवून पळून गेलेला अब्दाली पानिपतात भारी पडला! पेशव्यांच्या नादानपणा व नियोजना अभाव , हेकेखोरपणा या तीन गोष्टीमुळे तीन आठवड्यांच्या उपासमारीने महाराष्ट्राचे वाघ पानिपतात तहानभुकेने व्याकुळ होते पण तरीही प्राणपणाने लढत होते.
जगातील सर्वात भीषण लढायांमधील ती एक भीषण लढाईत अफगाणी अब्दाली शिल्लक राहिला ह्यायोगे विजयी ठरला! शेकडो मराठी स्त्रिया व मुले गुलाम बनवल्या गेल्या. त्यातील बहुतांश व्यक्ती पुढे शिखांनी अब्दालीकडून सोडवून घेतल्या. परंतु, त्या युद्धानंतर महाराष्ट्राची अख्खी तरुणाई कामी आली! अन ह्या देशाचा वाघ कमकुवत झाला!
त्याचाच फायदा घेऊन ब्रिटिशांनी मराठ्यांशी चाळीस वर्षे झुंजून देश ताब्यात घेतला! लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की महाराष्ट्र बलदंड होता तर परकीय पाय ठेऊ शकत नव्हता! उत्तर भारतीयांच्या गद्दारीने देश दीडशे तर महाराष्ट्र शंभर वर्षांसाठी गुलामीत गेला.
मग माझ्या मराठी वाघांनो, तुम्ही ठरवूनही सामान्य राहू शकत नाही! चारशे मावळ्यानिशी उभा कडा चढणारा अन दोन हजाराच्या सेनेला पराभूत करणारा नरवीर तान्हाजी मालुसरे असो वा अख्ख्या सेनेला खिंडीत गाठणारा स्वयं यमराज झालेला बांदल सेना ,बाजीप्रभू देशपांडे वा शंभूसिंह ज‍ाधव असो! वा शत्रूला युद्धाची दाणादाण उडवणारे संताजी व धनाजी असोत! हे वाघ ह्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मले!
हा इतिहास आहे महाराष्ट्राचा! सोनं पिकवणारी जमीन अन पहाडाच्या छातीची माणसं ही ह्या महाराष्ट्राची ओळख! आता लक्षात आलं असेलच का हा इतिहास शाळेत शिकवत नाहीत! महाराष्ट्राचा इतिहास चे बाळकडू घेणारा कारकून म्हणून नव्हे तर वाघ बनून बाहेर पडेल!!
संकलन -महेश पाटील-बेनाडीकर
With thanks
Mahesh Patil-Benadikar

Thursday 23 April 2020

जंजीऱ्याच्या तटाला शिड्या लावणारे लायजी पाटिलांचा इतिहास…

जंजीऱ्याच्या तटाला शिड्या लावणारे लायजी पाटिलांचा इतिहास…

 

जंजीऱ्याच्या तटाला शिड्या लावणारे लायजी पाटिल

कोकण किनारपट्टीवर फिरंग्यांसोबत मराठ्यांचा अजुन एक शत्रु अजगरा सारखा विळखा घालून बसला होता. अगदी महाराजांच्या शब्दात वर्णन करायचे तर “जैसा घरास उंदीर, तैसाच राज्यास सिद्दी.”

महाराजांनी सिद्दीचा मुलुख तर काबिज केलि पण त्याचा बुलंद जंजिरा मात्र त्यांना प्रत्येक वेळेस हुलकावणी देत राहिला. १६५७ ते १६७८ पर्यंत किमान ८ वेळेस महाराजांनी जंजिरा काबिज करण्याचा प्रयत्न केला पण यात त्यांना यश आले नाही.

जंजिरा किल्ला हा कोकणातील सिध्दीचा गड,अनेक प्रयत्न करूनसुध्दा हा किल्ला मराठ्यांच्या हातात लागत नव्हता.छत्रपतींनी मोरोपंत पिंगळे वर या मोहिमेची जबाबदारी सोपविली.मोरोपंत घाटातील हशम (मावळे) घेऊन मुरूडला दाखल झाले

या सिद्दीचा अम्मल दंडाराजपुरीवर होता, तो स्वराज्यवर हल्ले करुन लूट घेउन पुन्हा आपल्या मुल्खात पसार होत असे.शिवकाळात शिवाजी महाराजांना कोकणात अनेक मानवी रत्ने मिळाली. वेंटाजी भाटकर , मायनाक भंडारी , तुळाजी आंग्रे , दौलतखान , सिद्दी मिस्त्री , कान्होजी आंग्रे , दर्यासारंग इत्यादी देवमासे आपल्या प्रचंड बळाचा स्वराज्यासाठी वापर करीत होते.
 जंजिऱ्यावर हल्ला कसा करायचा हि योजना आखत असतानाच  त्यातीलच एक मासळीहून चपळ असलेला कोळी. याचं नाव होतं , लायजी सरपाटील कोळी. हा कुलाब्याचा राहणारा. विलक्षण धाडसी , शूर आणि विश्वासू.लायजी पाटलाने जंजिरा किल्याच्या तटाला समुद्रातून शिड्या लावण्याची योजना सांगितली आणि स्वतः अशा जागत्या शत्रूच्या काळजात शिरायचं तरी कसं ? मुळात समुदात शिड्या लावायच्या तरी कशा ? आवाज होणार , हबशांना चाहूल लागणार. होड्यांत शिडी उभी करून तटाला भिडवली की , दर्याच्या लाटांनी शिड्यांचे आवाज होणार , शिड्या हलणार. वर गनीम जागा असणार. तो काय गप्प बसेल ? त्यांच्या एकवट प्रतिहल्ल्याने सारे मराठे भाल्या , र्वच्या , बंदुकांखाली मारले जाणार. एकूणच हा एल्गार भयंकर अवघड , अशक्यच होता , 

तरीही लायजी पाटलानं हे धाडस एका मध्यानरात्री करायचं ठरविलं. त्याने मोरोपंतांना आपला डाव समजविला. काळजात धडकी भरावी असाच हा डाव होता. लायजीने मोरोपंतांना म्हटलं , ‘ आम्ही होड्यांतून जंजिऱ्याचे तटापाशी जाऊन होड्यांत शिड्या , तटास उभ्या करतो. तुम्ही  मागोमाग होड्यांतून आपले लष्कर घेऊन येणे. शिडीयांवर चढून , एल्गार करून आपण जंजिरा फत्ते करू. 


मोरोपंतांनी तयारीचा होकार लायजीस दिला. किनाऱ्यावर लायजीच्या काही होड्या मध्यरात्रीच्या गडद अंधारातून शिड्या घेतलेल्या कोकणी सैनिकांसह किल्ल्याच्या तटाच्या रोखाने पाण्यातून निघाल्या. आवाज न होऊ देता म्हणजे अगदी वल्ह्यांचा आवाजही पाण्यात होऊ न देता मराठी होड्या निघाल्या.



 जंजिऱ्याच्या तटांवर रास्त घालणारे धिप्पाड हबशी भुतासारखे येरझाऱ्या घालीत होते.

लाय पाटील तटाच्या जवळ जाऊन पोहोचला. त्याच्या साथीदारांनी शिड्या होडीत उभ्या करून तटाला लावल्या. प्रत्येक क्षण मोलाचा होता. मरणाचाच होता. तटावरच्या शत्रूला जर चाहूल लागली , तर ?  मरणच.लाय पाटील आता प्रत्येक श्वासागणिक मोरोपंतांच्या येऊ घातलेल्या कुमकेकडे डोळे लावून होता. पण मोरोपंतांच्या कुमकेची होडगी दिसेचनात. त्या भयंकर अंधारात लायपाटील क्षणक्षण मोजीत होता.
किती तरी वेळ गेला , काय झालं , कोणास ठावूक ? ते इतिहासासही माहीत नाही.

 पण मोरोपंत आलेच नाहीत. लाय पाटलाने आपल्या धाडसी कौशल्याची कमाल केली होती. पण मोरोपंत आणि त्यांचे सैन्य अजिबात आले नाही. का येत नाही हे कळावयासही मार्ग नव्हता. आता हळुहळू अंधार कमी होत जाणार आणि ‘ प्रभात ‘ होत जाणार. (मूळ ऐतिहासिक कागदांत ‘ प्रभात ‘ हाच शब्द वापरलेला आहे.)

 अन् मग उजेडामुळे आपला डाव हबश्यांच्या नजरेस पडणार. अन् मग घातच! पुन्हा असा प्रयत्न करण्याचीही शक्यता उरणार नाही. काय करावं ? लायजीला काही कळेचना. त्याच्या जिवाची केवढी उलघाल त्यावेळी झाली असेल , याची कल्पनाच केलेली बरी.

अखेर लाय पाटील निराश झाला. हताश झाला. त्याने तटाला लावलेल्या शिड्या काढून घेतल्या आणि आपल्या साथीदारांसह तो मुरुडच्या किनाऱ्याकडे परत निघाला. न लढताच होणाऱ्या पराभवाचं दु:ख त्याला होत होतं. मोरोपंतांची काय चूक किंवा गडबड घोटाळा झाला , योजना का फसली हे आज कोणालाच माहित नाही.

 लायजी कोळ्याचा पराक्रम वाया गेला व जंजिरा जिंकण्याची एक सुवर्णसंधी मराठ्यांनी गमावली 

पुढे संभाजीराजेंनी राजापुरीच्या खाडीत भराव टाकून किल्ल्यावर हल्ला केला.  पण त्याच सुमारास औरंगजेबाने दक्षिणेस आघाडी उघडल्याने हाती आलेला विजय संभाजीराजेंना सोडून द्यावा लागला व किल्ला शेवटपर्यंत अजिंक्य राहिला जंजिरा किल्ला दर्यावीर लायजी पाटील कोळीचा पराक्रमाचा साक्षीदार आहे




मकर संक्रांति: पानीपत के युद्ध में मराठों की हार की दास्तान भाग 4

मकर संक्रांति: पानीपत के युद्ध में मराठों की हार की दास्तान
भाग 4

अंदरूनी लोग बनाम बाहरी आक्रमणकारी, हिंदू बनाम मुसलमान नहीं

तोपखाने और तोप-युद्ध में महारथ रखने वाले बहादुर योद्धा इब्राहिम खां गार्दी मुस्लिम वीर भी मराठा सेना की ताकत का हिस्सा थे. अफगान आक्रमणकारी अब्दाली से भारत की उत्तरी सीमाओं और दिल्ली की रक्षा के लिए, और अब्दाली से लोहा लेने के लिए मराठा सेना उत्तर की ओर 1,200 से 1,400 किमी की दूरी तय करके पहुंची थी. लेकिन उत्तर भारत के अप्रत्याशित कड़ाके की ठंड, एक लंबे समय तक सैन्य अभियान में शामिल रहने, खाद्य रसद की कमी और अपने काफिले में तीर्थ यात्रा के लिए जा रहे साथ मौजूद लगभग 60 हजार नागरिकों के रक्षा की जिम्मेदारी के साथ मराठा सेना इस बड़े युद्ध के लिए तैयार नहीं थे.

जंग के खलनायक

नजीबुद्दौला भारतीय था, जो आक्रमणकारी अफगान सेना में शामिल हो गया था. वह नजीब खान के नाम से भी जाना जाता था और वह रोहिल्ला कबीले से थे. वह बिजनौर जिले के नजीबाबाद शहर का संस्थापक था.
नजीब पहले मुगल सेना में सैनिक के रूप में सेवा कर चुका था, लेकिन बाद में अहमद शाह अब्दाली से जाकर मिल गया. लेखक विश्वास पाटिल नजीब की तुलना शेक्सपियर के 'ओथेलो' में खलनायक 'इआगो' से करते हैं.Image may contain: one or more peopleNo photo description available.

मकर संक्रांति: पानीपत के युद्ध में मराठों की हार की दास्तान भाग 3

मकर संक्रांति: पानीपत के युद्ध में मराठों की हार की दास्तान
भाग 3

पानीपत की हार से भाषा को हुआ फायदा

  • चूंकि यह संक्रांति का दिन था, जो मराठाओं के ऊपर मुसीबतों का पहाड़ बनकर टूटा, इसलिए इस घटना के बाद से किसी व्यक्ति पर होने वाले किसी भी बड़े आपदा को "संक्रांत कोसल्लानी" कहा जाने लगा, मराठी में जिसका मतलब है कि संक्रांति उसके/उनके ऊपर आपदा की तरह टूट पड़ा.
  • हालांकि कुछ लोग कहते हैं कि मराठी संस्कृति के मुताबिक, संक्रांति के दिन काले रंग के कपड़े पहने जाते हैं, क्योंकि इस दिन सर्दी के चरम अवस्था पर सूरज की गर्मी को अवशोषित करने का यह एक बेहतर माध्यम होता है. एक और विचारधारा के तहत यह भी तर्क दिया जाता है कि इस दिन 'अशुभ' काला रंग पहनने से बुराइयां, नकारात्मकता और विपदाएं उनसे दूर होंगी, क्योंकि 250 साल से भी ज्यादा समय पहले मकर संक्रांति के दिन ही मराठियों पर विपदाओं का कहर टूटा था.
  • वॉटरलू ऑफ इंडिया: पानीपत में शक्तिशाली और अपराजित मराठों का भारी नुकसान भारतीय इतिहास में एक महत्वपूर्ण घटना है. पानीपत की तीसरी जंग 'वॉटरलू' के युद्ध का भारतीय समकक्ष माना जाता है. "पानीपत ज्हाले" कहावत का मतलब है - वो स्थिति, जिसमें एक बड़ा नुकसान हुआ है.
  • ब्रिटिश राज के लिए मार्ग प्रशस्त: उस दौर में मराठा फौज शायद केवल उन दो असली भारतीय सैन्य शक्तियों में से एक थी, जो ब्रिटिश हुकूमत को चुनौती देने में सक्षम थी. लेकिन पानीपत की हार की वजह से मराठा फौज की ताकत कमजोर हो गयी, और 50 साल बाद एंग्लो-मराठा युद्धों में ब्रिटिश फौज को गंभीर चुनौती नहीं दे पायी. उस समय के ब्रिटिश इतिहासकारों सहित कई इतिहासकारों ने तर्क दिया है कि अगर पानीपत में मराठा शक्ति कमजोर नहीं हुई होती, तो ब्रिटिशों को भारत में कभी भी मजबूती से पांव जमाने का मौका नहीं मिल पाता.
  • रुडयार्ड किपलिंग की कविता "With Scindia To Delhi" के लिए प्रेरणा: हालांकि इस युद्ध को दोनों पक्षों के लिए वीरता और पराक्रम के दृश्य के रूप में भी याद किया जाता है. जंग के बाद मराठा सेना के सेनापति सदाशिव भाऊ का मृत शरीर लगभग 20 मृत अफगान सैनिकों के बीच में मिला था. संताजी वाघ के मृत शरीर में चालीस से ज्यादा घाव पाए गए. पेशवा के वारिसों (सदाशिव भाऊ, पेशवा बाजीराव-प्रथम के भतीजे और विश्वास, पेशवा बाजीराव-प्रथम और काशीबाई के पोते) की बहादुरी को अफगानों द्वारा भी स्वीकार किया गया था. यशवंतराव पवार भी बेहद पराक्रम से लड़े और बहुत से अफगानों की हत्या की. जंग में उन्होंने अब्दाली के वजीर के पोते अताईखान के हाथी के ऊपर चढ़कर उसे मार डाला था.
  • "आमचा विश्वास पानीपतात गेला": इस मुहावरे में 'विश्वास' शब्द बाजीराव के 17 वर्षीय बहादुर पोते और भरोसे, दोनों अर्थों के लिए इस्तेमाल किया जाता है. चूंकि विश्वास महाभारत के बहादुर योद्धा अभिमन्यु की तरह युद्ध में मारा गया था, और चूंकि मराठों की हार के बाद उनका यह विश्वास भी टूट गया था कि मराठों को कभी हराया नहीं जा सकता, इसलिए इस मराठी कहावत के मुताबिक: 1761 की लड़ाई में हमारा विश्वास मारा गया.No photo description available.Image may contain: one or more people, american football and outdoor

मकर संक्रांति: पानीपत के युद्ध में मराठों की हार की दास्तान भाग 2

मकर संक्रांति: पानीपत के युद्ध में मराठों की हार की दास्तान
भाग 2

'डेढ़ लाख चूड़ियां टूटीं'

मशहूर मराठी किताब 'पानीपत' के लेखक विश्वास पाटिल ने एक टीवी इंटरव्यू में कहा था कि चूंकि युद्ध का वह समय दक्षिणायन का समय था, इसलिए सूर्य की किरणें सीधे भूख से बेहाल मराठा सैनिकों और उनके घोड़ों की आंखों पर पड़ रही थीं. दक्षिणायन मकर संक्रांति पर होने वाली एक खगोलीय घटना है, जिसमें सूर्य मकर राशि में प्रवेश करता है. अफसोस की बात है, इस दिन मराठा सेना का विनाश हो गया.
मराठों में किसान और व्यापारी वर्ग के लोग शामिल थे, जो आमतौर पर मानसून और दशहरा (सर्दियों के आने से पहले) तक खेती करते थे. उन्होंने अपने तलवार की धार को तेज किया था, और मातृभूमि की रक्षा के लिए जंग लड़ने निकले पड़े.
इस बीच, अब्दाली ने जिहाद के नाम पर एक बड़ी सेना को इकठ्ठा कर लिया था. उस दिन दोनों सेनाओं में करीब छह घंटे तक युद्ध चला और इसमें एक लाख से ज्यादा (लगभग आधे ) सैनिकों की मृत्यु हो गई.
यहीं से मराठी कहावत- "डेढ़ लाख बांगड्या फुटल्या" या हिंदी में "डेढ़ लाख चूड़ियां टूटीं" की उत्पत्ति हुई, जिसका शाब्दिक अर्थ है कि उस दिन जंग में मारे गए सैनिकों की मौत का मातम मनाने के लिए डेढ़ लाख चूड़ियां टूटीं थीं.
एक मराठा सैनिक का स्केच जो पानीपत में लड़ने के लिए गया था. इतिहास दर्शाता है कि उत्तर भारत के ठंड में पतले कपड़े पहने सैनिकों को कितनी दिक्कतें हुई होंगी
(फोटो: विकिपीडिया)Image may contain: 1 person, drawing

मकर संक्रांति: पानीपत के युद्ध में मराठों की हार की दास्तान भाग १

मकर संक्रांति: पानीपत के युद्ध में मराठों की हार की दास्तान
भाग १
मकर संक्रांति का त्योहार जहां देश भर में तिल-गुड़ की मिठास, खिचड़ी के स्वाद, पूजा-पाठ और पवित्र स्नान जैसे तौर-तरीकों के साथ मनाया जाता हैं, वहीं महाराष्ट्र के लोगों के लिए मकर संक्रांति एक ऐसा त्योहार है जिसमें मिठास तो है, लेकिन उससे कहीं ज्यादा इतिहास में दर्ज एक ऐसी कड़वी घटना का दर्द है, जिसे याद कर मराठी समुदाय आज भी भावविभोर हो जाता है. मकर संक्रांति के ही दिन पानीपत के तीसरे युद्ध में हजारों मराठा मारे गए थे, और अफगान सेना ने बच्चों और औरतों को गुलाम बनाया था.

14 जनवरी 1761, पानीपत, हरियाणा

भारत के इतिहास में यह तारीख मकर संक्रांति के त्योहार को सुनहरे अक्षरों में दर्ज कर देती, अगर इस दिन मराठा सेना ने अफगान कबाइली योद्धा अहमद शाह अब्दाली ( जिसे दुर्रानी भी कहा जाता था ) की दुश्मन सेना को हरा दिया होता. लेकिन इसके बजाय, मराठाओं के लिए यह एक नरसंहार और बड़े नुकसान का दिन बन गया.No photo description available.Image may contain: one or more people, american football and outdoor

‘मराठा मरता नहीं, वो मारता है!’ भाग 4

‘मराठा मरता नहीं, वो मारता है!’
postsaambhar:अशोक इंदलकर, पोलिस निरीक्षक
भाग 4Image may contain: one or more people and outdoor
पुराणकाळात भगवान महादेवाची पत्नी सतीच्या शरीराचे तुकडे पृथ्वीतलावर ज्या ज्या ठिकाणी पडले ते मुख्य शक्तिपीठ हिंगलजा माता मंदिर ‘नानी का मंदिर’ हे बलुचिस्तानात आहे. या हिंदू धर्मस्थळावर पाकिस्तानी सैनिकांनी आक्रमण करून ते उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला होता; पण बलुच लोकांनी प्राणांची आहुती देऊन त्याचे रक्षण केले.
1947 साली पाकिस्तान स्वतंत्र झाला नव्हता, तेव्हा बलुचिस्तान हा पाकिस्तानचा भाग नव्हता; पण पाकिस्तान शासकांनी सैन्य पाठवून त्याचा ताबा घेतला. तेव्हापासून आजपर्यंत त्याचा विकास झाला नाही. पाकिस्तानच्या एकूण भूभागापैकी 44 टक्के इतका हा भूभाग आहे. तो सुजलाम्-सुफलाम् आहे. तांबे, पितळ, युरेनियम अशी प्रचंड खनिज संपत्ती मात्र पाकिस्तान लुटून नेतो... बलुचींना दुजाभावाची वागणूक मिळते. त्यामुळे स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. पाकिस्तानी सैनिक हे आंदोलन चिरडण्याकरिता बलुच लोकांवर अनन्वित अत्याचार करतात. नुकत्याच लंडन येथे झालेल्या क्रिकेट विश्वचषक सामन्यादरम्यान एका विमानाच्या मागे ‘फ्री बलुचिस्तान’ असा फलक फडकत होता. तर एका सामन्याच्या वेळी स्टेडियमबाहेर पाकिस्तानच्या प्रेक्षकांना बलुच प्रेक्षकांनी ठोकून काढले.
भारताचा बलुच लोकांना पाठिंबा आहे. पाकिस्तानी शासक, ‘आयएसआय’ ही त्यांची गुप्तचर संघटना इंडियन आर्मीला जेवढी घाबरत नाही, तेवढी फक्त एका अधिकार्‍याला घाबरते... तो अधिकारी म्हणजे अजित डोवाल. पंतप्रधानांचे खास असे सुरक्षा सल्लागार. ज्यांना पाकिस्तानची नस अन् नस माहीत आहे. सर्जिकल स्ट्राईकचे मास्टरमाईंड... बलुचिस्तानातील जनता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना साद घालते की, आम्हाला मदत करा... 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरील एका ऐतिहासिक भाषणात मोदींनी बलुच लोकांवरील ‘पापी’स्तानच्या आत्याचाराचा निषेध केला होता. त्यांना सहानुभूती दाखवली होती. नुकतेच दिल्लीमधे हिंंद बलोच फोरमद्वारे बलुच महिलांनी फोरमच्या हिंदू सदस्यांना राख्या बांधल्या. आजही बलुच युवक यूट्यूबवरून ‘दि ग्रेट मराठा’ ही सीरियल डाऊनलोड करून घेतात. कारण, आपण मूळचे मराठी असल्याची काहींची भावना आहे.
जावळीचे प्रवेशद्वार असे कमानीवर लिहिले आहे त्या सातार्‍याजवळ हायवेवरील आनेवाडी टोल नाक्याजवळील आनेवाडी गावाचे व मुंबईत स्थायिक झालेल्या सहायक पोलिस आयुक्त जाधव यांचा सुपुत्र निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव सध्या पाकिस्तानच्या कैदेत आहेत. त्यांना बलुचिस्तानात हेरगिरीच्या आरोपावरून पकडल्याचे पाकिस्तान सांगतो... असो उद्या बलुचिस्तान स्वतंत्र होईल न होईल तो वेगळा भाग आहे; पण महाराष्ट्रापासून दीड हजार किलोमीटर दूर असणार्‍या बलुचिस्तानचे मराठी कनेक्शन हे असे आहे... खासदार संभाजीराजांनी रायगड, दिल्ली येथे शिवराज्याभिषेक उत्सव सुरू केला आहे. छत्रपती शिवरायांच्या आज्ञेेने सरदार हिरोजी इंदलकरांनी बांधलेल्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात संभाजीराजेंनी केली होती, त्यावेळी आम्ही मोजकीच मंडळी त्यांच्यासोबत होतो. नंतर त्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले. त्यांनी नंतर दिल्लीमध्ये शिवराज्याभिषेक यशस्वीरीत्या सुरू केला. उद्या बलुचिस्तानात तो सुरू केला, तर त्याला नक्कीच तेथे प्रचंड पाठिंबा मिळेल याची खात्री आहे आणि आंतरराष्ट्रीय डावपेचाच्या द़ृष्टिकोनातून भारतासाठी ते एक उपयुक्त पाऊल पडेल.

‘मराठा मरता नहीं, वो मारता है!’ भाग 3

‘मराठा मरता नहीं, वो मारता है!’
postsaambhar:अशोक इंदलकर, पोलिस निरीक्षकImage may contain: one or more people, mountain, sky and outdoor
भाग 3Image may contain: sky and outdoor
पानिपतावर 14 जानेवारी 1761 या दिवशी हा रणसंग्राम झाला, त्या दिवशी युद्ध संपले तेव्हा मराठ्यांच्या सैन्यातील आणि अहमदशहा अब्दाली व नजीब खान आणि त्याच्या बाजूने लढणार्‍या अनेक छोट्या-मोठ्या राजे, संस्थानिकांच्या सैनिकांच्या मृतदेहांचे खच पडले होते, पानिपतची ही रणभूमी रक्ताने न्हाली होती, दारुण पराभव झालेल्या मराठा सैनिकांचे भयानक हाल झाले. लढाईतून जे जगले-वाचले त्यापैकी बरेचसे पळून जाण्यात यशस्वी झाले. पैकी पराभवामुळे शरण गेलेले सैनिक, खाशा सरदारांच्या स्त्रिया, कुटुंबीय, बाजार बुणगे अशांपैकी 2 हजारांवर मराठे गुलाम म्हणून अहमदशहा अब्दालीने सोबत घेऊन अफगाणी स्थानकाकडे कूच केले. मजल, दरमजल करीत तिकडे पोहोचल्यावर एवढ्या युद्धकैदी, बाजार बुणगे, कैद्यांचे करायचे काय, हा प्रश्न त्याच्या पुढे होता.शेवटी त्याने विचार करून या लटांबराचे गट केले आणि ज्या ज्या अफगाण टोळ्यांनी, सरदारांनी युद्धामध्ये मदत केली त्यांच्यामध्ये मीर नासीर याने बादशहाच्या हुकुमाने हे युद्धकैदी गुलाम म्हणून वाटून टाकले. डेरा बुकटी गावात साहू मराठा जे सरदार, उच्च कुलीन होते, त्यांची वस्ती झाली, ते गुलाम म्हणून वाटले नव्हते... बाकी गडवाही म्हणजे गड सांभाळणारे, किलवाणी म्हणजे किल्लेदार, पेशवाणी म्हणजे जे पेशव्याचे रक्षक होते त्यांना रंगमहाल सुरक्षा अशी कामे वाटून दिली.
अफगाण हे टोळ्यांनी राहत होते.लूटमार, लढाया, आक्रमणे करून लुटीचा माल आणून त्यावर त्यांची उपजीविका असे; पण जे मराठे गुलाम म्हणून आले व स्थायिक झाले. बुलूच परिसरात त्यांनी हळूहळू शेती विकसित केली. नंतर तो भाग चांगला विकसित झाला. समाजाच्या पुढच्या पिढ्या बलुच परिसर व धर्मात सामावल्या गेल्या; पण आजही त्यांच्यातही मराठी बीजे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात जिवंत आहेत. लग्नानंतर हळद लावणे, अक्षदा टाकणे, हातावर मेंदी काढणे. काही गाण्यांचे, ओव्यांचे शब्द आजही बोलले जातात. मातेला आई म्हणणे, गोदावरी, कमल, सुभद्रा ही नावे आजही प्रचलित आहेत.

‘मराठा मरता नहीं, वो मारता है!’ भाग 2

‘मराठा मरता नहीं, वो मारता है!’
postsaambhar:अशोक इंदलकर, पोलिस निरीक्षक
भाग 2No photo description available.Image may contain: drawing
सदाशिवराव भाऊ पेशव्यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठे सैन्य दिल्लीकडे कूच झाले. हरियाणाजवळ पानिपत येथे अहमदशहा अब्दाली आणि मराठ्यांचं नशीब अचानक फिरलं... काही विपरीत गोष्टी घडत गेल्या आणि मराठ्यांचा दारुण पराभव झाला... महाराष्ट्रात तेव्हा एक घरही राहिले नव्हते की, ज्या घरातला कर्ता पुरुष पानिपतावर कामी आला नाही. शेकडो मराठी स्त्रियांच्या कपाळीचे कुंकू या लढाईत पुसले गेले. पानिपतावरच्या पराभवाने मराठा साम्राज्यावर न भूतो, न भविष्यती असं महाभयानक संकट आलं. हिंदुस्थानच्या रक्षणासाठी, मराठ्यांनी दिलेले हे सर्वोच्च बलिदान होते. अहमदशहा अब्दालीच्या प्रचंड सैन्याला मराठ्यांनी निकराचा प्रतिकार केला; पण निसर्ग, विपरीत परिस्थिती अशा अनेक बर्‍या-वाईट घटनांमुळे मराठ्यांचा पानिपतावर दारुण पराभव झाला. विश्वासराव, सदाशिव भाऊ, ग्वाल्हेरचे शिंदे सरदार असे अनेक खासे, मातब्बर सेनानी आणि लाखाच्यावर मराठी सैन्य मारले गेले.
विपरीत परिस्थिती असूनसुद्धा मराठ्यांनी जी कडवी झुंज दिली, महापराक्रम केला, तो पाहून पराभव होता होता वाचलेला अफगाण बादशहा अहमदशहा अब्दालीने मराठ्यांच्या पराक्रमाची नंतर तोंड भरून स्तुती केली, तो शब्दशः अवाक् झाला. या महाभयंकर रणकंदनातून जे वाचले, त्यापैकी बरेचजण महाराष्ट्राकडे पळून जाण्यात यशस्वी झाले, बरेचसे पानिपताच्या आसपास लपून राहिले. नंतर ते तिथेच स्थायिक झाले. आजही ते तिथे रोड मराठा म्हणून वास्तव्यास आहेत... त्यांची खास गावे वसलेली आहेत... जोशी नावाच्या महाराष्ट्रीयन जिल्हाधिकार्‍यांनी पानिपत दिवस साजरा करायची प्रथा सुरू केली, त्यामुळे प्रत्येक वर्षी हा दिवस पानिपतावर पाळला जातो, त्याला महाराष्ट्रामधून अनेक नेते, मराठी मंडळी न चुकता हजर राहतात आणि स्थानिक रोड मराठ्यांसमवेत हा अनोखा सोहळा संपन्न होत असतो.

‘मराठा मरता नहीं, वो मारता है!’ भाग १

‘मराठा मरता नहीं, वो मारता है!’
postsaambhar:अशोक इंदलकर, पोलिस निरीक्षक
भाग १
‘मराठा..., मराठा मरता नहीं, वो मारता है।’ ‘तिरंगा’ या हिंदी चित्रपटामधील नाना पाटेकरच्या डॉयलॉगवर अख्खं सिनेमा थिएटर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. टाळ्या आणि शिट्ट्यांनी थिएटर दुमदुमून गेलं. ही घटना कुठली महाराष्ट्रामधील नाही, तर हिंदुस्थानचा जानी दुश्मन पाकिस्तानमधील आहे... हे वाचून बर्‍याच जणांना धक्का बसला असेल, भुवया उंचावल्या असतील, साहजिकच आहे. सहजासहजी विश्वास बसणार नाही; परंतु हे सत्य आहे... यासाठी आपल्याला थोडं इतिहासात डोकावावं लागेल.
सन 1761... या सनाला मराठ्यांच्या म्हणजे महाराष्ट्रामधील तमाम मराठीजनांच्या अस्मितेत, परंपरेत, संस्कृतीत खूपच महत्त्व आहे... बर्‍याच वेळा आपल्या बोलीभाषेत बोलले जाते ‘काय सांगू मित्रा, एक का दोन, सतराशे साठ भानगडी आहेत...’ ‘काय विश्वास ठेवा म्हणतोस. विश्वास गेला पानिपतच्या युद्धात.’ ‘क्यूं पाटील और भी लडोगे?’ अब्दालीने पानिपतावर महापराक्रम गाजवून मरणासन्न अवस्थेत रक्तबंबाळ हाऊन रणांगणावर शेवटच्या घटका मोजत पडलेल्या सरदार दत्ताजी शिंदे यांना कुचेष्टेने विचारले, तेव्हा ते बाणेदार इतिहास प्रसिद्ध शब्द बाहेर पडले... ‘हां, बचेंगे तो और भी लडेंगे...’
सातार्‍याच्या गादीवर शाहू महाराज विराजमान झाल्यानंतर त्यांच्या अधिपत्याखालील पेशव्यांनी शिंदे, होळकर, भोसले अशा पराक्रमी व मातब्बर सेनानींच्या मदतीने सारा हिंदुस्थान स्वराज्याच्या अंमलाखाली आणायला सुरुवात केली होती... मराठ्यांशी लढता-लढता औरंगजेबला महाराष्ट्रातच प्राण सोडावे लागले. मराठ्यांना संपवायला आलेल्या औरंगजेबची कबर या मुलुखात बांधली गेली. त्यानंतर मुघल साम्राज्य खिळखिळे झाले. पठाण, रोहिले, निजाम, राजपूत, शिखांची छोटी राज्ये प्रबळ झाली; पण पराक्रमी मराठ्यांचा विस्तार व दरारा सार्‍या हिंदुस्थानभर होता. दरम्यान, उत्तरेत इंदुरच्या मल्हारराव होळकरांचा मानसपुत्र असलेल्या नजीब खानने हिंदुस्थानवर हुकूमत गाजवण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी अफगाणी सुलतान अहमदशहा अब्दालीला हिंदुस्थानवर आक्रमण करायला भाग पाडले. बलाढ्य अफगाणी अब्दालीचा मुकाबला करायची हिंमत कुठल्याही हिंदुस्थानी शासकामध्ये नव्हती. अशा बिकट प्रसंगी त्याच्याविरुद्ध समशेरी उपसल्या त्या मराठ्यांनी... सातार्‍याच्या छत्रपती शाहू महाराजांचा आदेश घेऊन नानासाहेब पेशव्यांनी सर्व मराठी सरदारांना एकत्र आणले आणि अहमदशहा अब्दालीला आव्हान दिले.

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...