विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 28 February 2021

श्रीमंत पेशवे बाजीराव बाल्लाळ आणि निजामाबरोबर भोपालची लढाई

 


श्रीमंत पेशवे बाजीराव बाल्लाळ आणि निजामाबरोबर भोपालची लढाई
( थोरले बाजीराव पेशवे )
लेखन :Indrajeet Khore
दिल्लीतबादशहा सादतखान आणि कमरुद्दीनखानावर खूप भडकला पेशव्यांना मारण्याच्या वल्गना करणाऱ्या या दोघांना अजून बाजीराव काय आहेत हे माहीत नव्हते
बाजीरावांना मात देईल असा कोणी रुस्थुम दिल्ली दरबारात तरी नव्हता.शेवटी दरबारी मुत्सद्दी आणि सरदारांच्या विनंतीवरून निजामाला बाजीरावांविरुद्ध
पाठवायचे ठरविण्यात आले.
वास्थवीक,निजामाने मोगल सत्तेविरुद्ध फारकत घेऊन आपला सावतासुभा उभा केला होता.म्हणून बादशहा त्याच्यावर नाराज होता.परंतु यावेळेस अखिल हिंदुस्थानात शूर,कपटी,मुत्सद्दी आणि प्रत्यक्ष आलमगीर औरंगजेबाचा चेला निजामच काय तो मराठयांना रोखू शकतो,असा विचार बादशहाच्या मनात घोळत होता.
म्हणून बादशहाने निजामाला पत्र लिहून कळवले की
" तू मोठा समशेरबहाद्दर आहे.त्या काफर पेशव्याला मात
देऊ शकेल असा तूच एक सेनापती आहेस.तू काहीही करून दिल्लीच्या रोखाने कूच करून आमचं रक्षण कर.
त्या बदल्यात आग्रा,बुंदेलखंड,माळवा या प्रांताच्या सुभ्यांवर नासीरजंगची नेमणूक दिल्ली दरबाराकडून
केली जाईल."
निजाम तो निजामच.सुटलं तोंडाला पाणी, आता माळवा,
आग्रा,बुंदेलखंडची सुबेदारी मिळते म्हणल्यावर काय झालं.मग बादशहाला मदत केलीच पाहिजे.
लघेच निजामानं सैन्याला फर्मान सोडलं ' चलो पुणे '
प्रचंड अशी सेना घेऊन निजामानं पुण्याकडे कूच केली
बाजीरावांना ही खबर कळाली की निजाम पुण्याच्या
रोखाने निघाला आहे.सोबत दाबजोर फौज आहे.
बाजीरावांना आपल्या इलाख्यात लढाई नको होती.ल
निजाम पुणे प्रांती दाखल होण्याअगोदरच,आपणच
त्याला गाठलेला बरा.अस म्हणून बाजीराव व चिमाजीआप्पांनी लगोलग पुण्यातून कूच केली
निजामाला ही खबर नव्हती.की बाजीराव पुण्याहून निघाले आहेत.तो पूर्णपणे गाफील होता.त्याचा तळ
भोपळाला पडला होता
( ऑक्टोबर १७३७ )
बाजीरावांनी दिन-रात मजला मारून अचानक पणे
निजामाची छावणी पूर्णपणे घेरली.फास आवल्यागत
मराठयांनी वेढा दिला.जवळून नर्मदा नदी वाहत होती
खरी,पण नदीच्या काठावर पण मराठयांचा कब्जा होता
निजामाला टाचा घासत,दाताच पाणी गिळत उभं राहण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता.
ही बातमी औरंगाबादजवळ असलेल्या निजामाचा
पोरग्या नासीरजंगला समजली.बापाच्या मदतीसाठी बिचारा नासीर ताबडतोब भोपळाच्या दिशेने वायूवेगाणे
निघाला.पण या सर्व गोष्टीची कल्पना बाजीरावांना होती म्हणून त्यांनी नासीरजंगचा बंदोबस्त आधीच केला होता
चिमाजीआप्पांना फौजेसह तापी नदीच्या खोऱ्यातच
पिछाडीवर थांबवलं होतं.
नासीरजंग हंडीयाच्या घाटाच्या दिशेने निघाला असता
एकदम चिमाजीआप्पांनी त्याला अडसर घातला.
नासीरजंग खालीच अडकून पडला.इकडं निजाम चांगलाच कोंडला गेला होता.मराठयांच रात्री-बेरात्रीच
छापा सत्र सुरू झालं.मराठयांन कडून सतत होणाऱ्या
गोळीबारि मुळे तर निजाम बेजार झाला.कारण मराठयांचे सततचे हल्ले.गोळीबारी मुळे त्याचे बरेच सैन्य खस्त झाले
शेवटी तर निजामाचे सैन्य लाकडाच्या आणि मातीच्या
भिंती रचून त्यामागे लपू लागले.निजाम तर आपल्या
टोलेजंग हत्तीच्या आंबारीत दडून बसला.लोकांना खणेही
अपुरे पडू लागले.अन्न एक रुपयास एक शेर मिळू लागल
घोडे,जनावरांचे खायचे हाल होऊ लागले.निजामाच्या
फौजांतल्या पठानांनी तर तोफा ओढणारे बैलच कापून काढले.राजपूत लोक गोमांस कसे खाणार?त्यांच्यावर तर
उपाशी मरायची वेळ आली.आख्खी फौज मेटाकुटीला आली.
याच दरम्यान बाजीरावांनी चिमाजीआप्पांना लिहिलेल्या
पत्रात बाजीराव म्हणतात," ऐसा प्रसंग जाहला,तेव्हा नबाब सर्वांचे दुःख पाहून बहुतच काहिला होऊन सलोखा
विसी( तहासाठी ) त्वरा केली.जो नबाब चौथाई व सरदेशमुखीची नावे घेत नव्हता त्याने माळवे दरोबस्त
ऐसे खास दस्तफाने लिहून दिले...."
निजामाने अखेर बाजीरावांन बरोबर तह केला.नर्मदा आणि चंबळा या नद्यांमधला दोआबातला सर्व प्रदेशात
व मोहिमेचा खर्च म्हणून पन्नास लक्ष रुपये द्यावेत
( बादशहाकडून देववावेत ) या आटीवर निजामाची
सुटका झाली.जो निजाम ' बाजीराव कफराला नर्मदेच्या
वर कधीच पाऊल ठेवू देणार नाही ' अशा बतावण्या
करत होता,तो निजाम स्वतःच बाजीरावांनासमोर खाल
मानेने नर्मदेच्या खाली उतरला.
मराठयांच्या या विजय तहाला " दुराई सराई करार " अस म्हणतात.डिसेंबर सन १७३७ मध्ये युद्ध झाल्यानंतर या
सर्व प्रदेशांची व्यवस्था लावून बाजीराव आणि चिमाजी आप्पांची विजयी फौज जुलै १७३८ रोजी परत पुण्यात
दाखल झाली.....।।

बुऱ्हाणपुर आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते...

 


बुऱ्हाणपुर आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते...
लेखन :Indrajeet Khore
बुऱ्हाणपूर हे शहर आजच्या मध्यप्रदेशातील पूर्व निमाड
जिल्ह्यातील तापी नदीच्या किनाऱ्यावर असून ते तालुक्याचे व उपविभागाचे मुख्यालय आहे.कापसाच्या
वापराचे केंद्र व हातमाग कापडाच्या उद्योग धंद्याचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.
बुऱ्हाणपूरचे पूर्वीचे नाव ' बसना ' खेडे असे होते.खानदे-
शाचे फारुकी नबाबांचे नेहमीचे राहण्याचे हे ठिकाण.
इ.स.१४०० मध्ये नासीरखान फारुकी याने राजधानी म्हणून उदयास आणले.पुढे आकबराने खानदेश जिंकले
आणि खानदेश सुभ्याचे मुख्यालय केले.मात्र फारुकी नबाबांनी हे शहर कसे कटकारस्थान करून वसविले
त्याचा एक काळा इतिहास आहे...
' नासीर फारुकीचा बाप मलिक फारुकी याचा मित्र असिरगडचा राजा ' आशा 'हा होता.अहिर जातीचे हे घराणे.राजा आशा आणि फारुकी घराण्याचे पूर्वी पासूनच
घरोब्याचे व मित्रत्वाचे समंध,( पण फारुकीने दोस्ततीत कुस्ती केली...त्याचा तरी काय दोष रक्तच हरामी...)असो
तर ' बागलाण आणि अंतूर या ठिकाचं सैन्य माझ्यावर
आक्रमण करण्यासाठी येत आहे तेव्हा तू मला तुझ्या किल्ल्यात आश्रय दे,असा निरोप फारुकीने राजा आशा
ला पाठवला,आणि पडद्याच्या पालख्यातून सशस्त्र सैन्य
किल्ल्यात घुसवल,फारुकीच्या हशमांनी लगेच आशा
राजाच्या कुटुंब-कबील्यावर हल्ला करून सर्व सदस्यांच्या
कत्तली केल्या व किल्ल्याचा ताबा घेतला.
आशा प्रकारे दगा करून विजय मिळवल्या बद्दल नासीर
फारुकीचा धर्मगुरू झैनुद्दीन याने फारुकीचे अभिनंदन
केले.दौलताबादचा संत बुऱ्हाणुद्दीन याची यादगारी म्हणून ' बुऱ्हाणपूर ' आणि धर्मगुरू झैनुद्दीन याची यादगारी म्हणून " झैनाबाद " ही दोन शहरे तापी नदीच्या तीरावर आमने-सामने वसवून फारुकीने धन्यता मानली.
(इ.स.१५९९)
स्वतः ला गझणीचे वंशज समजणाऱ्या नासीर फारुकीने
तापी नदीच्या उजव्या काठावर एक ठोलेजंग असा वाडा
बांधला.त्याला सीटाडेल ( citadel fort ) किल्ला म्हणतात.परत त्यात पिरबेन्ना नावाची मशीद बांधली तिचा मनोराच ८० फूट उंचीचा होता इतरही बरीच बांधकामे त्यांनी केली.पुढे अकबराने ( इ.स.१६०० ) मध्ये असिरगड व बुऱ्हाणपूर जिंकले,आणि शहरामध्ये
परत सुधारणा केल्या.मोगल साम्राज्याला शोबेल असे क्रमांक दोनचे शहर बनिवले. उद्यानाचे,बागबगीचे असलेले शहर म्हणून प्रसिद्ध असल्याचे " ऐन इ आकबरी
मध्ये नोंदविले आहे.
कलाकुसर,चांदीच्या तारा आणि सुवर्ण तारा गुंफण्याचे सुबक काम करणाऱ्या कारागिरांच्या कौशल्याची कमाल दाखवणारे हे शहर होते. बुऱ्हाणपूर शहराच्या बाहेर
नबाबापुरा,बहादूर,करणपुरा,खुर्रमपुरा,शहाजंगपुरा इ.-
सतरा पुरे मोगलांच्या काळात होते.त्यातील बहादुरपुरा
हा सर्वात श्रीमंत वस्तीचा पुरा होता.सोने, चांदी, हिरे मोती
उंची वस्तू,उंची अत्तरे,भारी किमतीची कापड-चोपड इत्यादी गोष्टी असलेले व्यापारी या ठिकाणी राहत होते
सर्वच लाखोपती,करोडपती,म्हणजे धनाढ्यांची कुबेरनगरी म्हणावी लागेल.
बुऱ्हाणपूर म्हणजे दख्खनच्या वाटेवरचं मोगलांचं मुख्य
संरक्षक ठाणं होतं.दिल्लीहून निघालेली मोगलांची फौज
आधी इथे टेकून,विश्रांती घेई नि मग पुढे जात असे.
उत्तरेतून येणारी सामग्री,दारूगोळा,खजिना आधी इथे
नि मग सैन्यच्या संरक्षणात दक्षिणेत धाडला जायचा.
दळणवळणाच्या वाटेवरचं मुख्य ठाणं म्हणून अनेक
व्यापारी,जवाहिरे,सावकार व सौदागर या शहरात वास्तव्याला होते.
तापी नदीच्या किनाऱ्यावर बुऱ्हाणपूरापासून ४ मैलाच्या
अंतरावर मोहना नदीच्या संगमावर मिर्झाराजा जयसिंहाची छत्री आहे.दक्षिणेतून परतीच्या प्रवासात
मिर्झाराजे तेथे वारले.( मिर्झाराजाच्या मनात आलं असत
तर नक्कीच त्यांनी दिल्लीच मयूर सिंहास हासील केलं
असतं )इ.स.१७१६ मध्ये मराठ्यांनी बुऱ्हाणपूरची चौथाई
वसूल केला.पुढे पशवे ( ग्वाल्हेरकर शिंदे १७७८ )यांनी हे
शहर घेतले.
या शहराचा औरंगजेब बादशहा यांच्या भावभावनांचा
अगदी घट्ट संबंध होता.औरंगजेबाची प्रथम प्रीती याच
बुऱ्हाणपूरात फुलली.दक्षिणेचा सुभेदार म्हणून औरंगजेब बुऱ्हाणपूरला थांबला.त्यावेळी मिरखलीद हा औरंगजेबाच्या मावशीचा नवरा सुभेदार होता.तो गडी पण रंगेल होता,आता सुभेदार म्हल्यावर सांगण्याची काही गरज नाही.भलामोठा जनानखाना होते सुभेदारसाहेबांचा
आणि त्या जनानखान्यातल्या हिराबाई या स्त्रीला औरंगजेबाने जैनाबादी बागेत पहिलं,आंबे तोडताना.
गडी खुश,पडला प्रेमात..मावशीला सांगून आणली तिला
आपल्या जनानखान्यात.आता राजपुत्रचतो कुणी बोलावं
मग पुढे याच बुऱ्हाणपूरात हिराबाई बरोबर प्रणयाचा
धुंद आस्वाद घेतला.सहा महिने तो बुऱ्हाणपूरात राहीला
पुढे हिराबाई वारली.तीच खर नाव हिराबाई होत पण ती
जैनाबादी बागेत भेटल्यामुळे तीच नाव जैनाबादीमहल
असं ठेवण्यात आले.(औरंगजेबा सारख्या निष्ठुर आणि कपटी माणसाला सुद्धा प्रेम होतं हे जरा नवलच वाटतंय)
असो...
आशा या औरंगजेबाच्या अंतरंगातील चिरंतर आठवणींचे
बुऱ्हाणपूर शहर फारुकी राजांपासून मोगली सम्राटांपर्यंत
गजान्तलक्ष्मीचे माहेरघर, कला आणि वाणिज्य यांचे
कीर्तीस्थान होते अत्तर आणि दक्षिणेस जोडणारा एक
मध्यबींधु म्हणून प्रसिद्ध होते.पण...अफसोस.. कारण
३० जानेवारी १६८१ रोजी सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी अचानक बुऱ्हाणपूरावर झडप घातली.
त्यावेळी बुऱ्हाणपूरचा सुभेदार होता ' खानजहान "
आणि त्याचा सहाय्यक होता काकरखान अफगाण.तो
जिझियाकर वसुली अधिकारी म्हणून तेथे राहिला होता
विशेष म्हणजे ७० मैलांची मजल मारून
सरसेनापती हंबीररावमामांचा २०००० चा सेनासागर
अचानक बुऱ्हाणपूरवर येऊन कोसळा.हरणांच्या कळपात भलामोठा दाबजोर वाघ शिरावा आणि हरणांची तारांबळ उडावी तशीच काहीशी गत झाली बुऱ्हाणपूरची
मराठ्यांनी पहिला हात मारला तो बहादुरपुऱ्यावर तो अतिशय संपन्न होता.लक्षाधीश असे सराफ सावकार
तेथे राहत होते.देशोदेशीचे जिन्नस,सामानसुमन,
जडजवाहिर,सोने-चांदी,रुपये,रत्ने असा बराच
लक्षावधी रुपयांचा माल तेथील दुकानात आणि घरात
होता.तो सर्व ऐवज स्वच्छ करण्यात आला.
मराठयांची वावटळ इतक्या अनपेक्षितपणे आली आणि
तुटून पडली की माणसांना एक पैसाही हलवता आला नाही.आल्याआल्याच मराठयांनी संपुर्ण शहराची नाकेबंदी केली होती आणि ५००० घोडदळाने शहर घेरून ठेवलं होतं. सर्व १८ पुऱ्यांची मनसोक्त लूट चालू होती.ज्यावेळी लुटलेल्या पुऱ्याना मराठयांनी आगीलावल्या आणि त्याचा धूर आकाशात पोहोचला
त्यावेळी कुठे बुऱ्हाणपूरचा नायब काकरखान आणि शहरातील लोकांना मराठे आल्याची खार समजली.
मराठे आल्याची बातमी काकरखाना कळाली,बुडाला
चटका बसावा तसा खान कींचाळला " या अल्लाह ! इतनी
तदाद में ये लोग कहाँसे आये..!मराठयांनचा प्रतिकार
करण्याची त्याची हिमत नव्हती, त्याने शहराचे दरवाजे बंद केले आणि तट बुरुज वेशी इत्यादींचा बंदोबस्त करू
लागला.पण सर्व व्यर्थ
आता सर्वच्या सर्व १८ पुरे मराठयांनच्या ताब्यात होते
प्रत्येक पुऱ्यात लाखो रुपयांचा माल सराफ,व्यापारी आणि इतर लोकांनकडे होता.तीन दिवसापर्यंत मराठे
नि:शंकपणे पुरे लुटीत होते,त्यांना मुबलक प्रमाणात लुट
मिळाली.अनेक वर्षांपासून जमिनीखाली पुरलेली संपत्ती
त्यांच्या हाती पडली.ज्या संपत्तीचा घरमालकांनाही पत्ता
नव्हता ती मराठयांनी शोधून हस्तगत केली.
तिसरा दिवस उजाडला लुट जवळजवळ संपत आली होती.सोने,चांदी,मोती,जडजवाहीर आणि इतर मौल्यवान वस्तू यांच्या गोण्या भरल्यागेल्या आणि घोड्यावर लादण्या आल्या.जे वाहून नेणे शक्य नाही त्या वस्तू आणि समान तीतच टाकून देण्यात आलं व मराठयांनी
माघार घेतली,आणि निघून गेले.
बुऱ्हाणपूरचा सुभेदार खानजहान हा त्यावेळी औरंगाबादला होता.त्याला लुटिची बातमी तिसऱ्या दिवशी कळाली आणि तो ताबडतोब निघाला पण
त्याची गती मंद असल्याने मराठे चोपड्याच्या मार्गे तडक
निघून चार- पाच दिवसात साल्हेरला पोहोचले.
बुऱ्हाणपूरच्या लूट ही औरंगजेबाच्या अंत:करणास झालेली मोठी जखम होती त्याने खानजहानची चांगलीच
खरडपट्टी केली आणि त्याची बदली केली.व त्यांच्या
जागी १ मार्च १६८१ रोजी इरजखान याची नेमणूक केली
बुऱ्हाणपूरच्या लुटीसंबंधी औरंगजेबाच्या दरबारच्या
१९ फेब्रुवारी १६८१ च्या अखबारातील पुढील लेख:-
" बुऱ्हाणपूरच्या वृत्तपत्रावरून समजले की,शत्रूसैन्य एकत्र आले,या बातमीमुळे खानजहान काकरखान येथे
आला होता.त्याने किल्ला बंद करून घेऊन खबरदारी
बाळगली.शत्रूंनी सर्व पुरे लुटले.रापुतांना नी:शस्त्र केले
व तीन दिवस शहरात राहून लूट केली." ( जु.२४ सफर
१० शनीवार ) शके १६०२ फाल्गुन शुद्ध ।। १२-१९
फेब्रुवारी १६८१…
मोगली इतिहासकार लिहितो :- मराठयांनी इतक्या पद्धतशीर पणे बुऱ्हाणपूरची लूट केली,की मराठे निघून गेले,मात्र पाठीमागे फक्त हाडे शिल्लक राहिली होती...
( नंतर बरोबर तेरा वर्षांनी सरसेनापती संताजी घोरपड्यांनी परत एकदा बुऱ्हाणपूरची लूट केली.त्यावेळी
बुऱ्हाणपूरचा सुभेदार मरहमतखान होता )

इराणचा राजा शहा अब्बास दुसरा याने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुस्थानात जो पराक्रम गाजवला त्याचा संदर्भ देऊन औरंगजेबाला पाठवलेलं पत्र.....

 




इराणचा राजा शहा अब्बास दुसरा याने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुस्थानात जो पराक्रम गाजवला त्याचा
संदर्भ देऊन औरंगजेबाला पाठवलेलं पत्र.....
लेखन Indrajeet Khore
दिल्लीच्या सिंहासनाचा औरंगजेब निर्विवादपणे मालक बनल्यानंतर इराणचा शहा अब्बास दुसरा याने,
औरंगजेबाचे अभिनंदन करण्याकरिता,त्याच्या बंदूकधारी
पथकाचा प्रमुख बुदाक बेग ह्याच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळाच पाठवले होते ( १६६१ ) .
इराणी लोकांना " आशियातील फ्रेंच " असे जे म्हणण्यात
येई, ते योग्यच होते असे म्हटले पाहिजे.संपूर्ण मुस्लिम जगतात जो काही नवीन विचार , सांस्कृति किंवा फॅशन
निर्माण होई , तिचा मूळ स्रोत इराणमध्ये सापडत असे
त्याकाळी . संपूर्ण मुस्लिम जगतातील काव्याला इराणनेच
वळण लावले होते. कार्डोव्हा पासून काँस्टॉन्टिनोपल पर्यंतच्या आणि दिल्लीपासून श्रीरंगपट्टणच्या सर्व मुस्लिम
दरबारात इराणी रीतीरिवाजांचे आणि आवडीनिवडींचे
प्रयत्नपूर्वक अनुकरण केले जात होते.
ह्या सर्व मुस्लिम राजांना शत्रूच्या तलवारींची भीती वाटण्याऐवजी पुष्कळवेळा फारसी विनोदी लेखकांच्या
उपहासात्मक धारदार शैलीचीच विशेष भीती वाटावयाची
अशा परिस्थितीत ज्यावेळी इराणच्या बादशहाकडून एक
शिष्टमंडळाच भेट देण्यासाठी येत आहे ही वार्ता पोहोचली
त्यावेळी मोगल दरबारात मोठीच खळबळ उडाली ! आपली आणि आपल्या देशाची जणू ही कसोटीची वेळ आहे असेच अगदी बादशहापासून तो सर्वांत खालच्या
शिपायापर्यंत सर्वांना वाटू लागले !
दिल्ली च्या मोगल दरबारातील रीतीरिवाज आणि एकूण वागणूक यांचा निर्णय आशियातल्या सामाजिक रीतीरिवाजात सगळ्या दृष्टीने सर्वात पारंगत असणाऱ्या
इराणी विशेषज्ञांकडून होणार आणि ह्या आवडीनिवडींच्या अचुकपणात किंवा रीतीरिवाजात जर
आपण थोडेही कमी पडलो तर साऱ्या मुस्लिम जगतात
औरंगजेब बादशहा उपहासाचा आणि विनोदाचा विषय बनविण्यात आला असता.
इराणच्या बादशहाकडून ज्या देणग्या आल्या , त्यांची
किंमत ४ , २२ , ००० रुपये होती . २७ जुलै १६६१ रोजी
इराणच्या वकिलाला इराणला परत जाण्याकरिता निरोप
देण्यात आला . औरंगजेब बादशहाने बुदाक बेग आणि
त्याच्याबरोबर आलेल्यांना देणग्या दिल्या , त्याची किंमत
५ , ३५ , ००० रुपये भरली.इराणचा शाह अब्बासने जे
पत्र औरंगजेबसाठी पाठवले होते , त्याचे उत्तर घेऊन
मुलतानचा सुभेदार तरबियत खान ह्याच्या नेतृत्वाखाली
२ नोव्हेंबर १६६३ रोजी औरंगजेबाने प्रत्युत्तरा दाखल
आपले शिष्टमंडळ पाठवले.ह्या आपल्या वकीलाबरोब
औरंगजेबाने ७ लाखांपेक्षा जास्त किमतीचे नजराणे पाठवले होते . वकीलाबरोब जे पत्र दिले होते , त्यात औरंगजेबाने शहा अब्बासने आपल्या पत्रात ज्या मित्रत्वाच्या भावना व्यक्त केल्या होत्या , त्याबद्दल आभार
मानले.
परंतु आपण सर्वस्वी अल्लाच्याच कृपेवर अवलंबून असल्याने आपल्याला कोणत्याही माणसाच्या मदतीची
आवश्यकता नाही असाही मोठेपणाचा विचार त्याने त्यात
व्यक्त केला.व आपल्याला आत्तापर्यंत जे आश्चर्यकारक
विजय मिळत गेले त्यावरून आपल्यावर परमेश्वरांची
भरपूर कृपा आहे याचा पुरावा मिळतो , असा निर्देश त्याने
केला . आपल्या भावांविरुद्ध आपण कसे नेत्रदीपक विजय मिळविले याचे मोठे सुरस आणि लांबलचक वर्णनही केले . औरंगजेबाला वाटलं शहा आपलं पत्र
वाचून खुश होईल पण झाल उलटंच शहा जाम भडकला
त्याला औरंगजेबाच्या बढाईखोरपणाचा फार राग आला होता.
मोगल शिष्टमंडळ व वकिल हे शहाला जाऊन भेटले पण
शहाने या सर्वांची चांगली खरडपट्टी केली , भरदरबारात
त्यांचा अपमान केला आणि आपण हिंदुस्थानवर स्वारी
करणार आहोत अशी थेट धमकीच दिली.आपला
लेखनिस ताहीर वाहादकडून एक लांबलचक खोचक पत्र त्याने लिहून घेतले आणि ते औरंगजेबाच्या वकीला कडे
दिलं आणि त्यांना निरोप दिला.
त्या पत्रात शहा अब्बास म्हणतो :-
" मला असे कळते की,हिंदुस्थानातील बादशहा हा दुर्बल
अकार्यक्षम आणि निष्कांचन झाल्यामुळे हिंदुस्थानातील
बहुतांशी जमीनदारांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले आहे
यातील एक प्रमुख जमीनदार म्हणजे शिवाजी भोसला
तो आतापर्यंत इतका गुप्तपणे राहत होता की , आत्ता-
पर्यंत त्याचे नावही कुणाला माहित नव्हते.परंतु आता
तुमच्याजवळ लढण्याकरीता पुरेशी साधने नाहीत हे
त्याला माहीत झाल्याने त्याचा फायदा घेऊन आणि
तुमचे सैन्य माघार घेत आहेत हे पाहून एखाद्या
पर्वताच्या शिखराप्रमाणे तो आता सर्वांना दृगोचर होत
आहे,तुमचे अनेक किल्ले जिंकले आहेत ,तुमच्या अनेक
सरदारांना व सैनिकांना त्याने ठार मारले आहे किंवा
कैदी बनविले आहे , तुमचा बराचसा प्रदेश त्याने
गिळंकृत केलेला आहे , तुमच्या प्रदेशातील बरीचशी
बंदरे , शहरे आणि खेडी त्याने लुटली आहेत किंवा
त्याची बरीच नुकसानी केली आहे आणि आता त्याला
तुमच्याविरुद्ध शेवटीच टक्कर घ्यावयाची आहे असे
आम्ही ऐकतो.तुम्ही स्वतःला जगज्जेता किंवा आलम-
गीर म्हणावीत परंतु खरी परिस्थिती अशी आहे की
तुम्ही तुमच्या वडिलांना फक्त जिंकले आहे व आपल्या
भावांचा वध करून आता तुम्हाला मन:शांती लाभली
आहे.बंडखोर शिवाचा बंदोबस्त करण्याची शक्ती आता
तुमच्यात उरली नाही.म्हणून प्रचंड सैन्यानिशी स्वतः
हिंदुस्तानात यावे तुम्हाला स्वतः भेटावे आणि आवश्यक
असेल ती मदत तुम्हाला करावी "......
पत्र वाचून औरंगजेबाचा मोठा तळतळाट झाला आणि त्याने आपला राग पत्र घेऊन येणाऱ्या आपल्या वकीलावर काढला.
ह्या शहाचा ऑगस्ट १६६७ मध्ये मृत्यू झाला आणि हिंदुस्थानावर आपण आक्रमण करू अशी जी त्याने धमकी दिली होती ती ही अशा रीतीने नाहीशी झाली
औरंगजेबाने मात्र शेवटपर्यंत इराणी सीमांवर सक्त नजर
ठेवली होती....
जय शिवराय....

छत्रपति संभाजी राजे ह्यांनी समुद्रावरचं आरमार बळकट केलं

 



छत्रपति संभाजी राजे ह्यांनी समुद्रावरचं आरमार बळकट केलं ह्याची नोंद मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रज ह्यांना एका पत्रात लिहिलेले आढळते -- १६ मे , १६८२
छत्रपति शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराचा पाया रचला आणि तो बळकट पण केला आणि स्वराज्याचे निशाण समुद्रावर दिसू लागले. जे शिवरायांचे धोरण तेच धोरण संभाजी महाराजांनी सुरू ठेवले.
१६ मे १६८२ मुंबईकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना लिहिलेले पत्र - संभाजी महाराजांजवळ ८५ गलबते , ५,००० माणसे , मायनाक भंडारी ह्यांचा मुलगा स्वता संभाजी महाराजांच्या सेवेसी आहे. छोट्या होड्या वगळून ५८ मोठ्या युद्धनौका , ५,००० सैनिकांचे तळ , ३० ते १५० टनांची मोठी गलबते , ३ शिडींची गुराबे इतकी आरमारी ताकद उपलब्ध आहे.
( ह्या वरून कळतं संभाजी महाराजांनी राज्यकारभारात सुरवातीपासून आणि आरमारी शक्ती वाढवण्यास लक्ष दिले)
Ref - Mumbai - Surat Records
- अमित राणे

शंभुराचांच्या बेखोफ पथकांनी औरंगजेबवर केले ला हल्ला....

 

गोवळकोंड्याचा वेढा सुरु असताना

शंभुराचांच्या बेखोफ पथकांनी औरंगजेबवर केले ला हल्ला....
अचानक ते आले .कुठून आले,कसे आले ते काहीच कळलं नाही तुंबळ लढाई उसळली.किशोरसिंग हाडा चे पुत्र रामनाथसिंह,हरीनामसिंह,किशोरसिंहाचा नातू केशरसिंह,मूहकमसिंह हे राजपूत वीर जिवाची बाजी लावून पाशहांचं रक्षण करू लागले.
पूर्ण जोषात असलेल्या मराठ्यांनी त्या सर्वांना ठार मारून त्यांचे ३०० लोक धरणीवर पाडले.
मग निजामुदिन खान हा सरदार आपले पुत्र मेहंदी अली,सुलतान अली व दोनशे पठाणाची कडवी तुकडी घेऊन पुढे झाला.मराठयांनी त्यांचीही
खांडोळी उडवली.
खुद्द पातशहा आता उगडा पडला.त्याच्या संरक्षणासाठी फार थोडे लोक शिल्लक राहिले .खर तर त्या दिवशी त्याच्या अंतच व्हायाचा .
पण ऐनवेळी गाजीउदीन फिरोजजंग कुमकेला धावला आणि मराठयांना माघार घ्यावी लागली.
इतक्या जवळून मृत्यूची जीवघेणी सळसळ पातशहांना कधी जाणवली नव्हती.शंभुराजांचं एक नवं नि भयंकर रूप त्याला दिसल.इतक्या
राजांनशी शत्रुत्व केलं .पण कुणी आजवर जिवावर उठायचं धाडस केलं नव्हतं..

सरदार हणमंतराव निंबाळकर, वैराग

 


सरदार हणमंतराव निंबाळकर, वैराग
यांना छत्रपती बुवासाहेब महाराजांनी "सरलष्कर" पद देण्याचे ठरविले. यासाठी महाराजांनी १० जुलै १८२६ रोजी एक खास समारंभ घडवून आणला. या समारंभावेळी भरलेल्या छत्रपतींच्या दरबाराचे तपशीलवार वर्णन इतिहासात आढळते, ते पुढीलप्रमाणे,
"कचेरी जाहली. त्यास हुजूरचे स्वारीची (छत्रपती महाराजांची) गादी उत्तराभिमुख समोर घातली होती. दुघई सोपा लांबी उत्तर - दक्षिण आहे. त्यात पूर्वेच्या बाजूने सोप्यात सदर होती. तेथे दोन्ही बाजूंस भले लोक, मानकरी बसले होते. पश्चिमेचे बाजूस पूर्वेकडे तोंड करुन मानकरी, भले लोक बसले होते. सदरचे पूर्वेस दुघई सोपा आहे. त्यात कारकून मंडळी होती. उत्तरेचे बाजूचे सोप्यात मानकरी होते. छत्रपतींची स्वारी सर्व मानकरी कचेरीत येऊन बसल्यावर मागाहून येऊन सदरेवर बसली. यानंतर भालदाराला आज्ञा करण्यात आली. हणमंतराव निंबाळकर बहाद्दर यांस घेऊन या. भालदाराने निंबाळकरांना बोलावून आणले. निंबाळकर जोहार करुन उजव्या बाजूस जागा राखून ठेवली होती तेथे जाऊन बसले. निंबाळकर आपल्या जागी बसल्यावर महाराजांच्या आज्ञेवरुन राजश्री हैबतराव गायकवाड विश्वासराव हे सणगाचा सरपोस व तरवार पडदाने घेऊन आले. राजश्री सदाशिवराव जोती दिवाण हे जवाहिराचे तबक शिक्केकटारीचा ताम्हण घेऊन सरपोस घेऊन झाकून आले. नंतर सरकारांची आज्ञा निंबाळकर यांस येण्याविषयी झाली. त्याप्रमाणे ते पुढे आले आणि जोहार करुन उभे राहिले. नंतर सरपोसातील तिवट काढून गायकवाड विश्वासराव यांनी सरकारचे हातात दिले. छत्रपतीने ते निंबाळकर बहाद्दर यास देऊन बसण्याविषयी आज्ञा केली. त्याप्रमाणे ते बसले आणि तिवट बांधिले. त्यावेळी त्यांना सरलष्करीची वस्त्रे जवाहीर जरीपटका हत्तीसुद्धा आणि शिक्केकट्यार वगैरे देणग्या देण्यात आल्या."
या वर्णनावरुन छत्रपतींच्या दरबारात सरदार व मानकरी मंडळींना किताब व पदे बहाल करण्यासाठी होणाऱ्या समारंभाचे व दरबाराचे स्वरूप समजण्यास मदत होईल.
Courtesy: Karvir Riyasat FB

#२२_जानेवारी_१६९३ जुल्फिकार खानचा पराभव

 


#२२_जानेवारी_१६९३
जुल्फिकार खानचा पराभव
स्वातंत्र्य लढा सरसेनापती संताजीराव घोरपडे
धनाजीराव जाधवराव , बेळगाव-धारवाड करत कर्नाटक प्रांतात नेला, नंतर ह्यांनी जिंजीकडे आपला मोर्चा वळवला.
जिंजी किल्ल्यास जुल्फिकार खान, त्याचा बाप असद खान, आणि शहजादा कामबक्ष वेढा घालून बसले होते. संताजी साधारण १५ हजाराचे घोडदळ घेऊन, तर धनाजी साधारण १० हजाराचे घोडदळ घेऊन जिंजीस थडकले.
प्रथम धनाजी आपली फौज घेऊन सामोरे आले आणि मोगली सैन्यावर हल्ला केला.
मागून येणाऱ्या संताजीस अलिमर्दाखान आडवा आला. अलिमर्दाखान हा जिंजीच्या मोगली फौजेला रसद पुरवीत असे, त्याची रसद मारीत संताजी पुढे निघून गेले.
या लढाईची फ्रेंच गव्हर्नर मार्टिन याने आपल्या डायरीत नोंद केली आहे. संताजी आणि धनाजी यांच्या या जोशासमोर मोगल सैन्याची दाणादाण उडाली.
जिंजीच्या मोगली सैन्याचीतर वाताहत झाली. त्यांची रसद तोडली गेली, अफवांचे पीक उठवले जाऊ लागले होते, त्यात किल्ल्यातून मोगली फौजेवर हल्ले होऊ लागले.
स्वतः जुल्फिकार खान रसद आण्यास बाहेर पडला असता त्याचा सामना संताजी बरोबर झाला. जुल्फिकार खान कसाबसा आपला जीव वाचवत परत छावणीत आला.
जुल्फिकार खानने संताजीकडे वाट मागितली आणि जिंजीचा वेढा उठवण्याचा वायदा केला. २२ जानेवारी १६९३ रोजी हुकमाची वाट न पाहता मोगली सैन्य जिंजी सोडून वांदीवाश येथे निघून गेले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
@sarsenapati_santaji_ghorpade

अरे मातीत मरणारे तर कित्येक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात!!

 

मुकर्रबखानाची फौज संगमेश्वराच्या वेशीला भिडलेली...आणि बघता बघता पाचशे मावळा सज्ज झाला, गनिमांच्या डोळ्यात डोळा टाकुन बघत होता...अफाट अफाट सेनासागर आणि टिचभर पाचशे मावळा राजांच्या रक्षणासाठी सिद्ध आहेत ! बघता बघता मुकर्रब हाजीर झाला.आणि कडाडला एल्गार !!! हर हर महादेव ची आरोळी दुमदुमली आणि बघता बघता तलवारी खनाणु लागल्या...झाडा-पानांवरची पाखरं फडफड करत उडाली...अरे काळोख थरारला....रात्र थरारली....अाक्रोश-किंकाळ्यांनी परिसर दुमदुमुन गेला,शौर्याची लाट उसळली...अवघं तुफान तुफान झालं...अरे एकेक मावळा झुंजत होता...शर्थीनं लढत होता....बस्स्स....मोगलांची कापाकापी करत होता...शिवाजी महाराज सांगायचे...माझा एक मावळा शंभराला भारी आहे! ईथं एक मावळा पाचशे ला भारी पडत होता, मोगलांना बस्स्स कापत होता !! मुकर्रब बघत होता...पण मराठ्यांच्या शौर्यापुढं काही चालत नाही. ईथला एकेक मावळा लढत होता राजासाठी. स्वत: साठ वर्षाचा म्हाळोजी दोन्ही हातात समशेर घेऊन लढतोय...जो समोर येईल त्याला सरळ कापतोय...रक्ताच्या चिरकांड्या,मांसांचे लगदे...अरे खच प्रेतांचा...आणि फिरतोय म्हाळोजी !! मुकर्रबनं ते शौर्य बघितलं आणि म्हणाला, इस बुढे को पहले लगाम डालो...! तसं सगळं यवनी सैन्य म्हाळोजीबाबाच्या भोवती जमा झालं..अभिमन्यु चक्रव्ह्युवात अडकावा तसा म्हाळोजी अडकला...दोन्ही हातात समशेरी...सगळ्या मोगली सेनेचे एकाच वेळी वार झाले..दोन्ही तलवारींवर पेलले,म्हाळोजी खाली बसला,साठ वर्षांचं रद्दाड शरीर, विज लखलखली...आणि रक्ताच्या चिरकांड्या उडवीत पहिली फळी गारद झाली. अरे तो जोश वेगळा..तो आवेश वेगळा...अरे ते शौर्य बघितलं, आणि मुकर्रबला कळालं, वाघ कसा असतो !! अफाट अफाट अफाट शौर्य ! पण त्याच वेळी मुकर्रबखानानं चाल खेळली,कमानमाराला बोलवलं...आणि तिस-या बाजुकडुन म्हाळोजीवर नेम धरला...तीर सुटला..उजव्या दंडात घुसला...समशेर खाली पडली..दुसरा तीर कंठात...दोन्ही समशेरी खाली पडल्या...नि:शस्त्र झाला म्हाळोजी...गुळाच्या ढेपेला मुंग्या डसाव्यात...असं मोगली सैन्य म्हाळोजीवर तुटून पडलं...शरीरावर अशी एक जागा शिल्लक राहली नाही...जिथं वार झाला नाही...रक्ताळलेला म्हाळोजीबाबा मातीत पडला...!! अखेरचा श्वास फुलला...डोळे लवले, ओठ हलले.त्या श्वासानं माती ऊंच उडाली...आणि त्या ऊंच उडालेला मातीला म्हाळोजी सांगता झाला...सांगा माझ्या राजाला...हा म्हाळोजी गेला..मातीत मेला...पण नुसता मातीत नाही मेला...मातीसाठी मेला..

अरे मातीत मरणारे तर कित्येक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात!!
सरलष्कर म्हाळोजी बाबा घोरपडे यांना अखंड मानाचा मुजरा ,,🙏🙏🙏

संत नरहरि सोना

 


संत नरहरि सोनार यांची समाधि !
शके १२३५ च्या माघ व. १ या दिवशी पंढरपूरचे प्रसिद्ध भगवद्भक्त नरहरि सोनार यांनी समाधि घेतली.
प्रारंभीच्या आयुष्यांत नरहरि सोनार हे एकांतिक शिवभक्त होते. इतर कोणत्याहि देवाचे दर्शन घ्यावयाचे नाही असा यांचा बाणा होता. पंढरपूरला राहूनहि यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले नाही. एकदा एका विठ्ठलभक्त सावकाराने विठोबाच्या कमरेस येईल असा सोन्याचा करगोटा करण्याचे काम नरहरि सोनारांना सांगितले. परंतु माप घेऊनहि करगोटा लांब तरी होत असे किंवा आंखूड तरी होत असे. असें चारपांच वेळां घडले. शेवटी डोळे बांधून नरहरि सोनार देवळांत गेले, आणि विठ्ठलास चांचपूं लागले. तो त्यांच्या हातांना पांच मुखें, सर्पालंकार, मस्तकी जटा, व त्यांत गंगा अशी शंकराची मूर्ति लागली. तेव्हां त्यांनी डोळे उघडले ; तो पुढे विठ्ठलाची मूर्ति! पुनः डोळे झांकले तो शंकराची मूर्ति ! असा प्रकार पाहिल्यावर हरिहर हे एकरूपच आहेत याचा बोध त्यांना झाला. नरहरि सोनार वारकरी मंडळांत येऊन मिळाले. याबद्दलचा त्यांचा अभंग प्रसिद्ध आहे
“शिव आणि विष्णु एकचि प्रतिमा। ऐसा ज्याचा प्रेमा सदोदित ॥१॥
धन्य ते संसारी नर आणि नारी। वाचे हरि हरि उच्चारिती ॥२॥
नाही पै तो भेद। द्वेषाद्वेष संबंधा उरी नुरे ॥३॥
सोनार नरहरि न देखे पै द्वैत । अवघा मूर्तिमंत एकरूप"
शिव आणि विष्णु यांच्यांत भेद नाही असा प्रचार फक्त महाराष्ट्रांतच वारकरी सांप्रदायाने जोराने केला ; त्यामुळे शैव-वैष्णवांचे वाद तेथे मुळींच माजले नाहीत. नरहरि सोनारांच्या जीवितांत याचे स्पष्ट प्रतिबिंब दिसते. ज्ञानदेवांच्या तीर्थयात्रेत हे होतेच. ज्ञानदेवादि भावंडांवर त्यांची फारच भक्ति बसली.
माघ व. १ ला नरहरि सोनार समाधिस्थ झाले, " शककर्ता शालिवाहन । बारा शतें पस्तीस जाण । प्रमादीनामें संवत्सर पूर्ण । माघ कृष्ण प्रतिपदा । भूवैकुंठ पंढरी क्षेत्र । नरहरि सोनार परम पवित्र । मध्यान्हि येतां कुमुदिनी मित्र । देह, अर्पिला तयानें"
-२ फेब्रुवारी १३१४

Saturday 27 February 2021

#स्वराज्याचे_पाचवे_सरलष्कर_म्हाळोजीबाबा_घोरपडे

 

जन्म - १६२०
संताजींचे वडील म्हाळोजींन पासूनच स्वराज्याच्या सेवेस सुरुवात झाली होती त्याची नोंद,【करवीर सरदारांच्या कैफियत】या पुढील प्रमाणे आहे मुळपुरूष म्हाळोजी बाबा घोरपडे व शककर्ते शिवराय यांचे वडील शहाजीराजे भोसले हे आदिलशाहीत सरदार होते हिंदू धर्माचे कामात विकल्प आलेवरुन म्हाळोजीराजे व छत्रपती शिवाजी राजे यांचे हिंदू धर्माचे संस्थापक करणे बद्दल एकमत होवून बेलभंडार परस्पर देऊन तह जाहला,तेथून पादशाहाचे हुकूमतीत न चालता राज्याधी व्रुध्दिस आरंभ करून प्रांत काबीज करत चालले तेव्हा मराठी फौजेचा बंदोबस्त करण्याबद्दल पादशाहाकडुन मुसलमान सरदार येऊन त्याजबरोबर कितीएक प्रसंग जाहले त्यात दिवसेंदिवस मराठी फौजेस जय प्राप्त जाहला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक युद्ध मोहिमांत म्हाळोजींनी महत्त्वपुर्ण कामगिरी केलेली होती त्याचे मुल्यमाप होऊ शकले नाही, छत्रपती शिवरायांच्या शेवटच्या कारकिर्दीत संभाजीराजांनी केलेल्या बंडानंतर ज्यावेळी युवराजांना पन्हाळ्यावर आणण्यात आले तेव्हा म्हाळोजीराजे पन्हाळ्याचे सरनोबत होते या विषयी पुढील प्रमाणे नोंद सापडते, श्री शिवछत्रपती शककर्ते महाराज यांनी राज्यास प्रारंभ केला त्या समयी घोरपडे यांचा पुरुष म्हाळोजी हे छत्रपतींपाशी पाचशे स्वारानिशी चाकरीस राहिले, काही दिवसांनी महाराजयांचे जेष्ठ पुत्र संभाजी महाराज पन्हाळ्यावर होते म्हाळोजी घोरपडे यांस स्वारांसुध्दा पन्हाळ्यास छत्रपतींनी पन्हाळा किल्ल्याचे सरनोबती देऊन संभाजी महाराज यांसपशी ठेवले पुढे शिवाजीराजे यांचा काळ झाला नंतर संभाजी महाराज यांनी म्हाळोजीबाबा घोरपडे पन्हाळ्यावर ठेऊन आपण रायगडास गेले पुढे हंबीररावांच्या निधनानंतर संभाजीराजांनी म्हाळोजी घोरपडे यांना घोडदळाची सरनोबती दिली, छत्रपती शिवाजी नंतर संभाजींच्या कारकिर्दीत म्हाळोजीराजांनी अनेक महत्त्वपुर्ण भूमिका बजावल्या एवढेच नाहीतर संभाजीराजांच्या अखेरच्या काळात त्यांना वाचविण्याकरिता म्हाळोजींनी आपल्या प्राणाची बाजी लावली छत्रपती संभाजीराजांना पकडण्याकरिता मुकर्रबखान उर्फ शेख निजाम आला तेव्हा राजांचा मुक्काम संगमेश्वर येथे होता २०० स्वार व १०००पायदळासह त्याने कोल्हापूरहुन अंबा घाटातून संगमेश्वर गाठले १फेब्रुवारी१६८९ ला त्याने संगमेश्वरला वेढा घातला तेव्हा संभाजींन जवळ कवीकलशासह फक्त तीनशे स्वार व काही निवडक अंमलदार उपस्थित होते संभाजींवर हल्ला करण्याकरिता आलेला मुकर्रबखानाला रोखण्याकरिता म्हाळोजीराजे संभाजीराजांना वाचविण्याकरिता झालेल्या धुमश्चक्रीत सरनोबती म्हाळोजीराजे धारातीर्थी पडले, या विषयी【घोरपडे घराण्याच्या वंशावळीत】उल्लेख पुढील प्रमाणे आहे इतक्यात अवरंगजेब पादशाहा याची फौज चालून आली, सबब म्हाळोजी घोरपडे महाराजांकडे संगमेश्वरास गेले तेथे पादशाही फौजेची व महाराजांची लढाई होवुन संभाजी महाराज यांसी धरून नेले त्या गर्दीत म्हाळोजी बाबा ठार जाहले या वेळी म्हाळोजीराजे सोबत त्यांचे तीन पुत्र अनुक्रमे【संताजी, बहिर्जी, मालोजी】यांनी विशेष पराक्रम गाजीवला.*
*【महाराष्ट्रातील इतिहासाची साधने】 ह्यात घोरपडे घराण्याच्या इतिहासाविषयी पुढील प्रमाणे माहिती आढळते छत्रपती संभाजी महाराज यांणी म्हाळोजी घोरपडे यांसी सरंजामी देऊन मुखत्यारी सांगोन सरनोबताची वस्रे दिल्ही आणी किल्ले पनालेस ठेऊन आपण रायगडास गेले पुढे राज्यात फौजा येवुन संभाजी महाराज मुलुख सर करित होते इतक्यात अवरंगजेब पादशाहा याची फौज चालून आली सबब.म्हाळोजी घोरपडे महाराजांकडे संगमेश्वरास गेले तेथे पादशाहीकडील फौजेची व महाराजांची लढाई होवून संभाजीराजास धरून नेले त्या गर्दीत म्हाळोजी बाबा घोरपडे ठार जाहले पुढे राजाराम महाराज छत्रपती यांनी सेनापतीची वस्त्रे संताजीबाबा घोरपडे यांसी दिली,
शके १६१०,【हिंदुराव घोरपडे घराण्याच्या इतिहासातही वाईच्या युध्दात हंबीरराव पडल्यानंतर संभाजीराजांनी म्हाळोजी घोरपडे यांना सेनापतीपद दिले व ते १ फेब्रुवारी १६८९ पर्यंत कायम आसल्याचे म्हटले आहे】
अशाप्रकारे खुद छत्रपती शिवरायांचा वारसा असणार्या म्हाळोजींच्या【संताजी, बहिर्जी, व मालोजी】या तिन्ही पुत्रांनी स्वराज्याची सेवा केली त्यात विशेष म्हणजे संताजी घोरपडेंचे स्वपराक्रमाने मराठ्यांच्या इतिहासात वेगळे स्थान राहिले आहे,
*१५ वर्ष ते शहाजीराजे यांचे सोबत होते. १६५४ पासून ते१६८०पर्यत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर स्वराज्य स्थापनेच्या कार्यात सहभागी होते स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांच्या सोबत स्वराज्य रक्षणासाठी कार्य केले आणि संभाजीराजे यानां शत्रूपासून वाचविताना संगमेश्वर येथे सतत५२ वर्ष स्वराज्यसेवा बजावून ते धारातीर्थी पडले, तेव्हा त्यांचे वय-६९ वर्ष होते.आणि तो दिवस होता१फेब्रुवारी १६८९
भोसले घराण्याचे तिन पिढ्यास़ोबत राहुन सतत ५२ वर्षे स्वराज्यसेवा केली,🚩
म्हाळोजी बाबांना अखंड मानाचा मुजरा🙏🚩
पोस्ट साभार - Instagram page 👇 @sarsenapati_santaji_ghorpade

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी काशिबाई राणीसाहेब

 



छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी काशिबाई राणीसाहेब 
लेखन :
डाॅ. सुवर्णाताई नाईक निंबाळकर ( वैराग /पुणे )
संदर्भ शिवपत्नी महाराणी सईबाई
 
शिवरायांचा सातव्या पत्नी काशिबाई राणीसाहेब. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विवाह काशीबाई जाधव यांच्याशी शके वैशाख शुद्ध पंचमीला ८/४/१६५७रोजी राजगडावर जिजाऊसाहेबांच्या उपस्थितीत पार पडला .काशीबाई साहेबांचा जन्म सन १६४८ मध्ये जाधव राव घराण्यात झाला. काशीबाईसाहेब सुज जाधव यांच्या कन्या होत. संताजी जाधव म्हणजे जिजाऊंचे भाऊ अचलोजी यांचे द्वितीय पुत्र, सुजनसिंह जाधवराव ( सुजनसिंह ह्याचे पुत्र म्हणजे,शुरवीर शंभुसिंह,जाधव आणि त्या पुत्र म्हणजे सरसेनापती धनाजीराव जाधवराव ) यांच्या कन्या म्हणजे काशीबाईसाहेब.
जिजाऊंचे वडील लखुजी जाधव राव व बंधू अचलोजी जाधव राव या दोघांनी जाधवराव घराण्याला १७व्या शतकाच्या आरंभी मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. दौलताबाद व सिंदखेड राजा मुलुख इत्यादी भागात त्यांचा मोठा दरारा होता, पण दौलताबादेस निजामशहा कडून विश्वासघाताने लखुजी जाधव राव व त्यांचे दोघे पुत्र अचलोजी, रघुजी आणि नातू यशवंतराव हे सर्व पुरुष एकाच वेळी मारले गेले .या प्रकारानंतर अचलोजींचा अल्पवयीन मुलगा सुजनसिंह जाधवराव यांचे पालन पोषण जिजाऊसाहेबांनीच रायगडावर केले. सुजनसिंह राजगडावरच राहिले होते ( हे,सुजनसिंह कनकगिरी च्या युध्दात शहीत झाले ). त्यामुळे त्यांच्या कन्या काशीबाई साहेबांचा विवाह मोठ्या थाटामाटात राजगडावर करून जिजाऊसाहेबांनी जाधव भोसले संबंध परत एकदा जवळ केले काशीबाईसाहेब यांना अपत्य नव्हते. त्यांचा मृत्यू ६ फेब्रुवारी १६७४मध्ये पाचाड येथे झाला..काशिबाई राणीसाहेब यांची समाधी पाचाड येथे कुशावर्त तलावाच्या ऊत्तरेस आहे.
🙏काशिबाई राणीसाहेब यांना आमचा मानाचा मुजरा 🙏

स्वतः शंभूछत्रपती नेतृत्व करत सामील असलेली टिटवाळा लढाई !!

 


स्वतः शंभूछत्रपती नेतृत्व करत सामील असलेली टिटवाळा लढाई !!
अकबर दक्षिणेत मराठ्यांच्या आश्रयाला गेल्याचे समजताच औरंगजेब मोठा धोका निर्माण झाला असल्याने अकबराचा नि:पात करण्यास आणि मराठा साम्राज्य जिंकण्यास दक्षिणेत उतरला. तेंव्हा त्याने हसनअली आणि शहजादा मुअज्जम (१६८२- १६८३ ) यास कोकणात शिरकाव करण्यास आदेश दिला पण या दोघांनाही मराठ्यांनी कोकणातून पिटाळुन लावले होते. आता या दोन्ही कोकण मोहिमा अयशस्वी ठरल्यावर औरंगजेबाने अजुन एकदा कोकण मोहीम काढण्याचे ठरवले आणि या मोहिमेचे नेतृत्व दिले ते रणमस्तखानाकडे. रणमस्तखानासोबत बहादुरखान, मुकर्रमखान, याकूतखान, रामसिंह राठोड़, पद्मसिंह असे मोगल सरदार होते..
रणमस्तखान कल्याणवर चालून आला पण त्याच्यासोबत मुकाबला करण्यास स्वता छत्रपती संभाजीराजे त्याच्यावर चालून आले होते. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांसोबत रुपाजी भोसले, केसोपंत, निळो पंत, मानाजी मोरे आणि दहा हजार सैन्य होते. अचानक हल्ले करून मराठ्यांनी रणमस्तखानाला पिसाळुन सोडले. खानाच्या रसदीच्या वाटाही मराठ्यांनी बंद केल्या. रणमस्तखानाची कोंडी होऊ लागल्याने बहादुरखान, पद्मसिंह, हरीसिंह यांनी मराठ्यांवर हल्ला चढ़वला. कल्याणच्या ईशान्यबाजूस टीटवाला गावाजवळ ही लढाई सुरू झाली. पहिल्याच टप्यात मराठ्यांनी मोगलांना लोळवले. पद्मसिंह राठोड़ यात ठार झाला हे पाहुन रामसिंह राठोड़ मराठ्यांवर चालून आला पण तो ही आजारी असल्याने जास्त प्रतिकार करू शकला नाही तो ही ठार झाला. मोगल सैन्याची पळता भुई झाली आणि यात जवळ जवळ त्यांचे २५ सरदार जखमी झाले तर अनेक सैनिक मारले गेले. हरीसिंह राठोड़ कैद झाला त्याला घेऊन मराठे निघुन गेले. कल्याण जवळ ही लढाई झालेली इतिहासात नोंद असलेली तारीख आहे २७ फेब्रुवारी १६८३
पुढे मराठ्यांनी रणमस्तखानाला कोकण भागात घेरले हे पाहुन औरंगजेबाने रूहुल्लाखान यास रणमस्तखानास मदतीला पाठवले पण या दोन्ही खानांना मराठ्यांनी घाटात कोडुंन ठेवले आणि त्यांचाही पराभव केला ( मार्च १६८३ )
◆ संदर्भ - शिवपुत्र संभाजी - डॉ कमल गोखले
छत्रपती संभाजी महाराज - वा सी बेंद्रे
राजा शंभूछत्रपती - विजय देशमुख

“महाराणी सरकार येसूबाईसाहेब” तब्बल ३० वर्षाच्या कैदेतून यांची मुक्तता....

 

२८ फेब्रुवारी १७१९...

“महाराणी सरकार येसूबाईसाहेब” तब्बल ३० वर्षाच्या कैदेतून यांची मुक्तता....
―――――――――――――――――――
आम्ही जंग जंग पछाडले, आसवांचे आगडोंब शमविले, पण त्या अश्रूतून जन्माला आलेला भडाग्नीतून असे काही निखारे फुलले, की आम्ही पाठ भिंतीला टेके पावेतो लढलो. हुंडी खंडी भरासाठी लढणाऱ्यांनी आपल्या जीवावर उदार होत लढा उभारला अन इतिहासाला आपल्या कर्तृत्वाची दखल घेणे भाग पडले. आणी यानंतर जेते म्हणून कित्येक दशकं मराठ्यांचाच इतिहासात लिहिला गेला...
पण तरी काही जुने प्रश्न मार्गी लागणे बाकी होते, याची सुरवाज झाली ती राजमातेच्या सुटकेच्या तयारीतून...
राजमाता येसूबाई यांच्या सुटकेसाठी त्यांचे पुत्र छत्रपती शाहूंच्या अधिपत्याखाली आणि खंडेराव दाभाडे तसेच शंकराजी मल्हार व सय्यद हुसेन अली यांच्या नेतृत्वात ३५००० ची मोठी फौज दिल्लीला रवाना झाली , बादशाह फारुखसियर ने येसूबाई व इतर राजबंदी यांच्या सुटकेच्या अटी मान्य केल्यातर ठीक नाहीतर बादशाह बाजूला करावा असा ठराव होता...
मराठे दिल्लीत पोचले आणि त्यांनी दिल्ली शहराचा ताबा घेऊन दिल्ली च्या किल्ल्याला वेढे दिले शंकराजी मल्हार आणि हुसेन अली ने शाहूराजांच्या मागण्या बादशहा समोर मांडल्या त्या बादशाह ने अमान्य केल्या त्यावेळी तिथे दोन्ही बाजूंमध्ये अश्लील शिवीगाळ झाली. दरम्यानच्या काळात दिल्लीमध्ये बादशहा समर्थकांनी मोठी दंगल घडवून आणली ज्यामध्ये २००० मराठे मारले गेले ज्यात सेनापती संताजी भोसले सुद्धा होते या गोष्टीमुळे मराठे चवताळले... बादशाह ऐकत नाही हे बघून दुसरा पर्याय म्हणजे बादशहा हटवण्याचे निश्चित झाले.
२७ फेब्रुवारी १७१९ ला लाल किल्ल्यातली सगळी बादशाही फौज आणि पहारेकरी हटवण्यात आले, मराठे आणि हुसेन अलीने स्वतःची माणसे नेमली २८ तारखेला हरम (शयनकक्षात) मध्ये लपलेल्या फारुखसियर बादशाह ला पकडून दरबारात आणले गेलॆ कुतुब उल मुल्क सय्यद अलीने बादशहाचे डोळे काढले आणि बादशहाला बंदीखान्यात टाकले रफी ऊत दर्जत ला नवीन बादशाह घोषित करण्यात आले. व ३० वर्षांचा राजबंदी नावाच्या सोनेरी कुंपणातून राजमाता येसूबाईसाहेबांची सुटका झाली...
पुढे १९ एप्रिल १७१९ रोजी बादशाह फारुखसियर चे मुंडके कापून त्याला संपवण्यात आले नवीन बादशहा रफी ऊत दर्जत कडून मराठ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य करून घेतल्या व कागदोपत्री येसूबाईंची सुटका झाली आणी मराठे पुन्हा साताऱ्याला परतले...
―――――――――――――――
चित्रकार : मिलिंद विचारे...
―――――――――――――――
Abhishek Kumbhar ♥️

२८ फेब्रुवारी १७३८ धारावीचा किल्ला....

 


२८ फेब्रुवारी १७३८ धारावीचा किल्ला....
वसईच्या किल्ल्याचे नाक म्हणून ओळखला जाणारा धारावी किल्ला हा भाइंदर जवळ आहे....
चिमाजी आप्पांच्या वसई मोहीमेत या किल्ल्याने महत्वाची भूमिका वठवली होती इ.स १७३७ मध्ये मराठे व पोर्तुगिज यांच्यात पेटलेल्या वसईच्या युध्दामुळे धारावी बेटाला महत्व आले धारावी किल्ला हा वसईच्या किल्ल्या समोर आहे एका बाजूला वसईची खाडी तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्रयामुळे धारावी किल्ल्याचे स्थान वसई मोहीमेत अतिशय महत्वाचे होते या किल्ल्यावरुन वसईच्या पोर्तुगिजांना समुद्र व खाडीमार्गे मिळणारी रसद तोडणे शक्य होते तसेच वसई किल्ल्यावर लक्ष ठेवणे व मारा करणे धारावी किल्ल्याच्या उंचीमुळे सहज शक्य होते...
१२ एप्रिल १७३७ मध्ये मराठ्यांनी धारावी बेटावर हल्ला केला आणि घाइघाइत धारावी किल्ला बांधायला घेतला पोर्तुगिजांना मराठ्यांच्या किल्ला बांधण्याची बातमी लगेच कळली व पुढील धोका ओळखून त्यांनी हल्ला करुन धारावी बेट व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला बांधून पुर्ण केला....
वसई किल्ल्याच्या दृष्टीने मराठ्यांना “धारावी किल्ला” जिंकून घेणे आवश्यक होते म्हणून ३० नोव्हेंबर १७३७ रोजी मराठ्यांनी ४००० हशम व १०० घोडेस्वारांच्या मदतीने धारावी किल्ला जिंकला त्यानंतर पोर्तूगिजांनी २८ फेब्रुवारी १७३८ च्या निकराच्या युद्धात धारावी किल्ला परत एकदा जिंकून घेतला पुन्हा चिमाजी आप्पांनी ९ मार्च १७३८ ला जातीने किल्ला घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला हा पराभव जिव्हारी लागल्यामुळे मराठे व पोर्तुगिज यांच्यातील संघर्ष वर्षभर चालू होता शेवटी ६ मार्च १७३९ रोजी मराठ्यांनी परत धारावीचा किल्ला जिंकून घेतला इ.स १८१८ मध्ये या किल्ल्याचा ताबा इंग्रजांकडे गेला....

हैदराबाद संस्थान (निजामशाही ) आणि मराठा साम्राज्य भाग ५

 





हैदराबाद संस्थान (निजामशाही ) आणि मराठा साम्राज्य
भाग ५
हैदराबाद, मोगल, मराठे, टिपू, ब्रिटिश आणि निजाम
आसीफ जाहच्या आधीच्या मोगल-मराठा संघर्ष काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठी फौजांनी काही स्वाऱ्या गोदावरी खोऱ्यात केल्याचे व मोगल अधिपत्याखालील प्रदेशात लुटी केल्याचे उल्लेख आढळतात. नेताजी पालकर-इ.स. १६६२, प्रतापराव-इ.स. १६७० बेरार, ऑक्टोबर इ.स. १६७२ रामगीर जिल्हा करीम नगर, ऑक्टोबर इ.स. १६७४ शिवाजी - बेरार. स्वतः छत्रपती शिवाजीने इ.स. १६७७ गोवळकोंड्याला भेट करून कुतुबशहाशी करार केले.
साताऱ्याचे छत्रपती शाहूंचे कारर्किर्दीत दिल्ली दरबारी होत असलेल्या गादीच्या संघर्षात यशस्वी बाजू घेतल्याने काही काळ मराठवाड्याचाचा काही भागाचे चौथ (शेतसाऱ्याचा चौथा हिस्सा) घेण्याचे अधिकार मिळाले, पण भावी निजाम असिफ्जहाने कोल्हापूर आणि सातारा संघर्षाचा फायदा घेऊन काही मराठा सरदार स्वतःकडे वळवले व चौथाई देणे बंद केले. तसेच दिल्ली दरबारातील संघर्षाच्या आणि स्वतःच्याचे सैनिकी यशाच्या बळावर इ.स. १७२४ पर्य़ंत स्वतःला स्वतंत्रपणे निझाम या नावाने प्रस्थापित केले.
छत्रपती शाहूंनी रघुजी भोसलेंना फुटीर मराठा सरदारांच्या मागावर पाठवले. मराठा-निजाम संघर्षात निजामास पालखेडच्या लढाईत इ.स. १७२८ मानहानी सहन करावी लागली. तर इ.स. १७३३ मध्ये भास्कर व रघुजी भोसलेंच्या ३०,००० मराठा फौजेस नांदेड निझामाबादचे आक्रमण सोडून माघार घ्यावी लागली. इ.स. १७३७ मध्ये बाजीरावाने भोपाळ येथे निजामाचा पराभव केला. पण निजामाने दक्षिणेत आपले नियंत्रण व्यवस्थित प्रस्थापित केले.
असिफ्जहाच्या मृत्यूनंतर निजामाच्या वंशजांमध्ये झालेल्या संघर्षात सलाबतजंगची बाजू घेऊन मराठ्यांनी पुन्हा चौथाईचे अधिकार मिळवले. पण सलाबातजंग गादीवर टिकू शकला नाही. नंतर आलेल्या निझाम अली या निजामास १७६३च्या राक्षसभुवनच्या लढाईत मराठ्यांनी पुन्हा नमवले. परंतु इ.स. १७६६ आणिइ.स. १७६८ साली ब्रिटिशांशी करार करून संरक्षणाच्या बदल्यात ब्रिटिशांची मांडिलकी करणे निझाम अलीने पसंद केले.इ.स. १८०३ मध्ये शिंदे, होळकर, भोसले या त्रयीने पुन्हा एकदा निजामास आव्हान दिले, पण अडगावच्या लढाईत मराठ्यांना पराभव झेलावा लागला. इ.स. १७९९ मध्ये टिपू राज्य संपले. इ.स. १८१८ मध्ये पेशवाई संपली. पेशवाईच्या अस्तानंतर निजामशाही पुढे १३० वर्षे टिकली पण ब्रिटिश म्हणतील ती पूर्व दिशा ठरली.
हैदराबाद संस्थानाचे चार प्रशासकीय विभाग होते. आणि एकूण मिळून १६ जिल्हे होते.
अ] औरंगाबाद विभाग-
१. औरंगाबाद जिल्हा २. बीड ३. नांदेड ४. परभणी
आ] गुलबर्गा विभाग-
५. गुलबर्गा ६. बीदर ७. उस्मानाबाद ८. रायचूर
इ] मेडक विभाग-
९. अतराफ इ बलदाह १०. महबुबनगर ११. मेडक १२. नलगोंडा १३. निझामाबाद
ई] वरंगळ विभाग-
१. वरंगळ २. आदिलाबाद ३. करमनगर

हैदराबाद संस्थान (निजामशाही ) आणि मराठा साम्राज्य भाग ३

 


हैदराबाद संस्थान (निजामशाही ) आणि मराठा साम्राज्य
भाग ३
निजामशाहीची स्थापना
इ.स. १६८७च्या दख्खन स्वारीत बादशहा औरंगजेबाच्या सैन्यातला चिन खालीच खान नावाचा सैनिक गोवळकोंडा किल्ल्यास घातलेल्या वेढ्यात जखमी होऊन मेला. चिन खालीच खानचा मुलगा नवाब गाझिउद्दीनखान हा औरंगजेबाचा पंतप्रधान सादुल्लाखानचा जावई होता. औरंगजेबाने नवाब गाझिउद्दीनखानचा मुलगा मीर क़मरुद्दीन यास औरंगजेबाने बालपणीच मनसब दिले होते. तरुणपणी त्याचे चिन फ़तेखान असे नामाभिदान केले. वयाच्या २६व्या वर्षी त्याला विजापूर आणि मावळचा निझाम बनवले नंतर संपूर्ण दख्खनची जबाबदारी त्यास दिली. औरंगजेबानंतर झालेल्या बादशहा फारुखसीयने त्यास निजाम उल मुल्क तर त्यानंतरच्या बादशहाने त्यास असिफ्जाह असे नाव दिले.
पण दिल्लीच्या बादशहानेच त्याला शह देण्याकरिता इ.स. १७२४ मध्ये एक लढाई घडवूवुन आणली ज्यात मीर कमरुद्दीन खान सिद्दिकीचा विजय झाला आधिच कमकुवत झालेली दिल्लीची बादशाही मीर ओमारुद्दीनची प्रगती थांबवू शकली नाही.
मीर ओमारुद्दीन / निजाम उल मुल्क/असिफ्जाहने आधी आपली राजधानी औरंगाबाद येथे ठेवली व लवकरच हैदराबाद येथे हलवली. हे राज्य सात त्याच्या सात पिढ्यांनी इ.स. १७२४ ते इ.स. १९४८ या काळात उपभोगले. असिफ्जाहने इंग्रज आणि फ्रेंच दोंघांशी चांगले संबंध ठेवले व मराठ्यांशी युद्धे करून स्वतःची गादी मजबूत केली. २१ मे १७४८ रोजीच्या त्याच्या निधनानंतर सत्तेच्या साठमारीत फ्रेंच व ब्रिटिशांनी वेगवेगळ्या वंशजाना पुढे करून परिस्थिती काही काळ अस्थिर ठेवली. नसीरजंग, मुज्जफरजंग, सालाबाथजंग आणि निझाम अली यांनी १३ वर्षे जम बसवण्याचा प्रयत्न केला. त्यात निझाम अली १७६३मध्ये निझाम झाला व नंतरची ४० वर्षे त्याने राज्य केले. हैदराबाद संस्थानात २२४ वर्षे राज्य करणारे घराणे समरकंद या मध्य आशियातील शहरातून आलेले, मुळात बगदादचे होते.[२]
मीर उस्मान अली खान हा शेवटचा निजाम होता. बऱ्याचदा तो 'हिंदू आणि मुस्लिम हे त्याचे दोन डोळे आहेत', असे म्हणे.

हैदराबाद संस्थान (निजामशाही ) आणि मराठा साम्राज्य भाग ४

 


हैदराबाद संस्थान (निजामशाही ) आणि मराठा साम्राज्य
भाग ४
निजाम उल मुल्क
मीर कमरुद्दीन खान सिद्दीकी - (शीर्षक: चिन किलिच खान) असिफ जाह १ इ.स. १७२४ - इ.स. १७४८
मीर निझाम अली खान - (शीर्षक: निझाम उल मुल्क) असिफ जाह २ इ.स. १७६२-इ.स. १८०२
मीर अकबर अली खान - (शीर्षक: सिकंदर जाह) असिफ जाह III इ.स. १८०२-इ.स. १८२९
मीर फर्खुंदाह अली खान - (शीर्षक: नसिरुद्दौला) असिफ जाह ४ इ.स. १८२९-इ.स. १८५७
मीर तेहनियत अली खान - (शीर्षक: अफजलौद्दौला) असिफ जाह ५ इ.स. १८५७-इ.स. १८६९
मीर महबूब अली खान - असिफ जाह ६ इ.स. १८६९-इ.स. १९११
मीर उस्मान अली खान - (शीर्षक: निझाम सरकार) असिफ जाह ७ इ.स. १९११-इ.स. १९४८
पहील्या निजामानंतर झालेल्या सत्ता साठमारीत इंग्रज उजवे ठरले. विविध करारांअंतर्गत निजाम ब्रिटिश सत्तेचे पाईक ठरले. निजामास पुरवलेल्या तथाकथित संरक्षणाचा व सैन्याचा आर्थिक मोबदला म्हणून निजामाकडील काही प्रांत, खास करून बेरार म्हणजे आताचे अमरावती इंग्रजानी मिळवले. निजामशाहीत निजामांच्या आशिर्वादाने हिऱ्या मोत्यांचा व्यापार बहरास आला.
नसिरजंग मीर अहमद इ.स. १७४८-इ.स. १७५०; # मुहिउद्दीन मुज्जफरजंग हिदायत इ.स. १७५०-इ.स. १७५१; # असिफ़ दौला मीर अली सालाबात इ.स. १७५१-इ.स. १७६२ - "निझाम" शीर्षक कधीच नव्हते

हैदराबाद संस्थान (निजामशाही ) आणि मराठा साम्राज्य भाग २

 




हैदराबाद संस्थान (निजामशाही ) आणि मराठा साम्राज्य
भाग २
दिल्लीचे अल्लुद्दीन खिलजी, मुहम्मद तुघलक, गुलबर्गाआणि बिदरचे बहामनी, इ.स. १४५५ जलालखान (तेलंगाणा), मुहम्मद खिलजी, गोळ्कोंड्याचा इब्राहीम कुतुबशाह. इ.स. १६००मध्ये अकबराच्या काळात अहमदनगर मोगलांनी घेतले. जहांगीर व तदनंतर शहाजहानच्या जातीने युद्धात उतरल्यानंतर इ.स. १६३२ पर्यंत तेलंगणापर्यंत मोगलांनी वर्चस्व निर्माण केले. विजापूरच्या आदिलशहाने शहाजहानशी तडजोड करून अहमदनगर राज्याचा काही भाग स्वतःकडे मिळवला. याच काळात शहाजीराजे भोसले प्रथम अहमदनगरच्या आणि नंतर विजापूरच्या दरबारी सरदार होते.
इ.स. १६५३ मध्ये औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार झाला. औरंगजेबाने सुरुवातीचा काळ करप्रणालीचा अमल घडवण्यात घातला. इ.स. १६५८ मध्ये औरंगजेबाने आग्ऱ्यास जाऊन बादशाही मिळवली. औरंगजेबाने वैयक्तिकरीत्या प्रयत्न करून इ.स. १६८६मध्ये विजापूर व इ.स. १६८७ मध्ये गोळकोंडा मोगलांसाठी मिळवले. मराठवाडा आणि बेरार अमरावतीतील मराठ्यांची पाठशिवणी तात्पुरती थांबली. इ.स. १६२० नंतर छत्रपती शिवाजी महराजांनी मराठी राज्याची रस्थापना केली. परंतु मराठ्यांचे राज्य औरंगजेबास मिळू शकले नाही. दुष्काळांचे उल्लेख विविध काळात दिसतात, त्यात्या वेळच्या राज्यकर्त्यांकरता तो काळ सर्वसाधारणता राजकीयदृष्ट्या कठीण गेल्याचे दिसून येते. ते काळ असे :- इ.स. १३९६ ते इ.स. १४०७; इ.स. १४२१ ते इ.स. १४२२; इ.स. १४७३ ते इ.स. १४७४; इ.स. १६२९ ते इ.स. १६३०. मध्ययुगीन इतिहासाचे दुसरे वैशिष्ट्य असे की दिल्लीच्या काही बादशहांना दक्षिणेस खास करून औरंगाबाद, अहमदनगर भागांत जातीने यावे लागले. परिणामी औरंगाबाद हे हैदराबाद राज्याचे मध्ययुगीन काळातील राजकीय हालचालींचे प्रमुख केंद्र राहिले.

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...