विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 30 June 2019

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मुख्य प्रधान अथवा पंतप्रधान शामराजपंत निळकंठ पद्मनाभी उर्फ रांझेकर

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मुख्य प्रधान अथवा पंतप्रधान शामराजपंत निळकंठ पद्मनाभी उर्फ रांझेकर यांचा प्रधानपदाचा शिका. यांच्या मृत्यूनंतर काही काळ प्रधानकी यांच्या पुत्राने, महादजी शामराज यांनी पाहिली. शिका पुढीलप्रमाणे-

१) श्री शिवन
२) रपती हर्ष
३) निदान साम
४) राज मतिम
५) त प्रधान
— at किल्ले राजगडचा दफ्तरखाना.
 
शिवरायांचा जन्म झाला त्यावेळी दक्षिणेमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालेली होती. इ. स. १६३० मध्ये दक्षिण भारतात एवढा प्रचंड दुष्काळ पडलेला होता की, या दुष्काळाच्या खाईत रयत अक्षरशः होरपळून निघत होती. गावेच्या गावे ओस पडली होती. अन्न काय पण पाणी मिळणेसुद्धा मुश्किल झाले होते. या विदारक दुष्काळाची वर्णने समकालीन लेखकांनी लिहून ठेवलेली आहेत. जनता हवालदिल झाली होती. दुष्काळाच्या संकटाला जोडूनच साथींच्या रोगांचा फैलाव सर्वदूर झाला. लोक मेटाकुटीला आले, अशी परिस्थिती असताना समकालीन राज्यकर्ते जनतेच्या प्रश्नांचा विचार न करता परस्परावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे राजकीय अस्थिरताही निर्माण झाली होती.
इ. स. १६३० चे सुमारास निजामशाही अतिशय कमकुवत झाली होती. आदिलशाही दरबारात अंतस्थ कटकटी सुरु झाल्या होत्या. कुतुबशाही जरी आपले अस्तित्व टिकवून असली तरी मुघलांचा प्रभाव तेथेही वाढू लागला होता. अशा परिस्थितीत १६३६ मध्ये शहाजहानने दक्षिणेची स्वारी काढली. कुतुबशहाशी सख्य जुळवून आदिलशहाबरोबर तह करून निजामशाही विरुद्ध लढा उभारला. शहाजीराजांनी निजामशाही वाचविण्याचा निकराने प्रयत्न केला तथापि १६३६ च्या अखेरीस शहाजीराजांना शरणागती पत्करणे भाग पडले. शहाजहानने निजामशाही खालसा केली आणि तो प्रदेश मुघल व आदिलशहा यांच्यामध्ये वाटून देण्यात आला. शहाजीराजांनी आदिलशाहीची नोकरी पत्करली आणि ते कर्नाटकात निघून गेले. पुणे जहागीरीची देखरेख करण्यासाठी शहाजीराजांनी दादोजी कोंडदेव यांची नेमणूक केली. या जहागिरीमध्ये इंदापूर, सुपे, पुणे आणि चाकण हे परगणे मोडत होते. शहाजीराजे जरी कर्नाटकात गेले तरी जिजाबाई व बालशिवाजी यांचे वास्तव्य शिवनेरी किल्ल्यावरच होते. समकालीन साधनांवरून अशी माहिती मिळते की इ. स. १६४१ च्या सुमारास शिवाजीराजे आणि जिजाबाई बंगलोरला शहाजीराजांकडे गेले. बंगलोरहून परत येताना शहाजीराजांनी शामराज नीलकंठ यांची शिवाजीराजांचा पेशवा म्हणून नेमणूक केली. याशिवाय माणकोजी दहातोंडे, सरनोबत बाळकृष्णपंत दीक्षित यांना मुजुमदार म्हणून नेमले. शिवाय सोनोपंत डबीर आणि रघुनाथ बल्लाळ सबनीस यांनाही शिवाजीराजांच्या दिमतीस दिले. अशाप्रकारे हा सरंजाम घेऊन शिवाजीराजे जिजाबाई व दादोजीपंत पुण्यास परतले अशा आशयाची माहिती सभासदाने आपल्या बखरीत दिलेली आहे.

 शहाजी राजे व त्यांची पत्नी राजमाता जिजाऊ मासाहेब ह्यांचे स्वप्न  मुलाच्या हातून घडले आणि साकार हि जहाले .सोबती असलेली मंडळी म्हणजे - अमात्य , शामराज निळकंठ रांझेकर , बाळकृष्णपंत हनुमंते , सोनो विश्वनाथ रघुनाथ बल्लाळ , हे सारी सर्वात अगोदर ची स्वराज्याची हक्का ची माणसे होती . या मंडळी मधे वाढलेला शिवाजी राजे प्रत्येक गावाची तक्रार ऐकून घेई आणि वसाहत पुन्हा उभी रहावी यासाठी प्रोत्साहित करी . तिथून स्वताचा एक शब्द खाली न पडता हा राजा पराक्रमाचे बीज पेरू लागला आणि हे अलौकिक राज्य स्थापन केले .

Saturday 29 June 2019

झांशीची राणि : लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर भाग ४

झांशीची राणि : लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर
पोस्तसांभार : https://karhadebrahmin.org/node/6



भाग ४
राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्र्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय अंमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला.तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकार्‍यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यूजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’
या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १७ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणार्‍या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणार्‍या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरूषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाही. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले. ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाईचा उल्लेख ’हिंदुस्थानची जोन ऑफ आर्क’ असा केला. राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधिस्थानावर इ.स. १९६२ मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला.
ते समाधिस्थान पाहिल्यानंतर कविवर्य भा. रा. तांबे यांनी पुढील यथार्थ ओळी सुचल्या :
रे हिंद बांधवा, थांब या स्थळी। अश्रू दोन ढाळी।।
ती पराक्रमाची ज्योत मावळे । इथे झांशीवाली।।
कवयित्री : सुभद्रा कुमारी चौहान
खुब लढी मर्दानी वो तो झांशी वाली रानी थी।
सिंहासन हिल उठे राजवंशों ने भृकुटी तानी थी,
बूढ़े भारत में आई फिर से नयी जवानी थी,
गुमी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी,
दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी।
चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी,
बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी।।

झांशीची राणि : लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर भाग ३

झांशीची राणि : लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर
पोस्तसांभार : https://karhadebrahmin.org/node/6

भाग ३
७ मार्च १८५४ रोजी इंग्रजांनी एक राजघोषणा प्रसिद्ध करून झाशीचे संस्थान खालसा केले. राणी लक्ष्मीबाई या अन्यायामुळे जळफळत असतांनाच इंग्रज अधिकारी मेजर एलिस लक्ष्मीबाई यांना भेटण्यासाठी आला. त्याने झाशी संस्थान संपुष्टात आणले गेल्याची राजघोषणा वाचून दाखवली. संतापलेल्या राणी लक्ष्मीबाई यांच्याकडे एलिसने परत जाण्याची अनुज्ञा मागताच चवताळलेल्या वाघिणीप्रमाणे त्या म्हणाल्या,”मेरी झाशी नही दूँगी!”, हे ऐकून एलिस निघून गेला. झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते.
इ.स. १८५७ चा उठाव हा पूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, इ.स. १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकार सूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना, मोरोपंत तांब्यांना खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणार्‍या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. दानशूर, श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणार्‍या हजार-दीड हजार गरीबांना, साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वतःबरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणार्‍या राणीने गोवध बंदी सुरू केली. रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवासारखे धार्मिक कार्यक्रम त्यांनी किल्ल्यावर केले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा, चित्रलेखा, बाणासूर इ. नाटके योजली. स्वतःही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर, सुरक्षित, समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला. यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नाते दृढ झाले.
दरम्यान २१ मार्च, इ.स. १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणींस नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणार्‍या ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज भवानीशंकर, कडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. घौसखान याने तर तोफेमधून असा मारा केला, की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात.
gwaliher fort

झांशीची राणि : लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर भाग २

झांशीची राणि : लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर
पोस्तसांभार : https://karhadebrahmin.org/node/6


भाग २
धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणार्‍या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता.मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणार्‍या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळविले. लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणार्‍या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले.
‘मेरी झाशी नही दूँगी’
jhanshi fortपूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांशी असणार्‍या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल. परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा, विश्वास वाटेल का?, अशी शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारचे आव्हान दिले.
Image may contain: sky and outdoor

झांशीची राणि : लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर भाग १

झांशीची राणि : लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर
पोस्तसांभार : https://karhadebrahmin.org/node/6
भाग १
लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, इ.स.१८३५ ते जून १७, इ.स. १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.
लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका तांबे होते. यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता. इ.स. १८४२मध्ये त्यांचा जन्म झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेंव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले.गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. इ.स. १८५३मध्ये गंगाधररावांचे निधन झाले. दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वत्त्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली.

मराठा साम्राज्याचे झाशी येथील सुभेदार, राजे नेवाळकर घराणे


मराठा साम्राज्याचे झाशी येथील सुभेदार, राजे नेवाळकर घराणे
हे नेवाळकर घराणे मूळचे रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील कोट या गावचे.) पूर्वी हे गाव बलवंतनगर या नावाने ओळखले जायचे. महाभारतातील चेदी वंशाचे (जयद्रथ) येथे राज्य होते.
चौदाव्या शतकात राजा वीरसिंह देव या ओर्च्छाच्या राजाने झाशीत किल्ला बांधला. राजाला समोरच्या पर्वतावर सावली (छाया) दिसली आणि तो ‘झॉई सी’ असे बुंदेली भाषेत म्हणाला. तेव्हापासून झाशी हे नाव रूढ झाले, असे म्हटले जाते. १७व्या शतकात बुंदेलखंडाचे राजे छत्रसाल यांनी बाजीरावांना मदतीसाठी बोलावले, त्या वेळी हा प्रदेश मराठ्यांकडे सुपूर्द केला. तेव्हा बाजीरावांनी नारोशंकर यांना सुभेदार नेमले. नारोशंकर होळकरांकडे आले आणि इ. स. १७३५पासून त्यांची चाकरी करू लागले. एक लढाऊ शिपाई म्हणून होळकरांनी नारोशंकरांची पेशव्यांकडे शिफारस केली. बाजीराव पेशव्यांच्या आदेशावरून नारोशंकर यांनी ओडिशाकडे कूच केले. वाटेत टिकमगड जिल्ह्यातील ओरछाच्या राजाचे नारोशंकरांशी भांडण झाले, तेव्हा त्यांनी ओरछाच्या राजाकडून अठरा लाख रुपयांचा खजिना मिळवून पेशव्यांना आणून दिला. बाजीराव पेशव्यांनी नारोशंकरांना ओरछाचा व इंदूरचा सुभेदार केले. इ. स. १७४२मध्ये पेशव्यांनी त्यांना राजेबहाद्दूर हा किताब दिला. नारोशंकरांना पेशव्यांनी दुसऱ्या कामगिरीसाठी बोलावून घेतले व झाशी नेवाळकरांकडे सोपविली. १७६६मध्ये विश्वासराव नेवाळकर सुभेदार झाले. त्यांच्याच काळात महालक्ष्मी मंदिर आणि रघुनाथ मंदिर बांधले गेले. गंगाधरराव यांच्यानंतरचा इतिहास सर्वश्रुत आहे.
गंगाधरराव नेवाळकर
(जीवनकाळ: इ.स.चे १९वे शतक) हे मराठा साम्राज्याचे झाशी येथील सुभेदार, राजे होते. इ.स. १८५७चा स्वातंत्र्यलढ्यातल्या सेनानी झाशीची राणी लक्ष्मीबाई या त्यांच्या पत्नी होत्या.
झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे पती होते. त्यांचात आणि लक्ष्मीबाई यांच्यात खूप वर्षाचे अंतर होते. झाशीच्या राणीचे पहिले मूल हे बालपणातच दगावले. म्हणून गंगाधरराव आणि लक्ष्मीबाई यांनी दामोदर नावाच्या मुलाला दत्तक घेतले. इ.स. १८५७ च्या भारतीय उठावापूर्वीच गंगाधरराव वारले. त्यांच्या मृयूनंतरदेखील झाशीची राणी लक्ष्मीबाई खंबीरपणे लढल्या. परंतु युद्धात ती धारातीर्थी पडली. झाशीचा लढा अपयशी ठरला आणि झाशी हे संस्थान ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जिंकले.

Thursday 27 June 2019

#छत्रपती_संभाजी_महाराजांचे_अद्भुत_राजकारण_आणि_फसलेला_औरंगजेबपुत्र_अकबर.

#छत्रपती_संभाजी_महाराजांचे_अद्भुत_राजकारण_आणि_फसलेला_औरंगजेबपुत्र_अकबर.

औरंगजेबाला चार बायका आणि त्यांच्या पासून झालेली दहा अपत्ये होती.
औरंगजेबाची पहिली बायको दिलरस बानु च्या पोटी ह्या अकबराचा जन्म सन ११ सप्टेंबर १६५७ रोजी औरंगाबाद येथे झाला.

हा शाहजादा अकबर महत्वाचा का? तर ह्याने खुद्द आपल्या बापाविरोधात म्हणजे औरंगजेबाविरोधातच मराठे आणि राजपुतांच्या मदतीने बंड करण्याचा प्रयत्न केला.

ह्या अकबराची आई दिलरस बानु हि अकबर केवळ दोनच महिन्यांचा असताना वारली. त्यामुळे हे पोर बापाच्या विशेष प्रेमात वाढले. ह्या वेळी औरंगजेब हा आपल्या भावांना ठार मारून दिल्लीच्या गादीवर बसला होता. 

औरंगजेबाने ह्या अकबराला इतर भाऊ बहिणींप्रमाणे लहानपणापासूनच राजकारणाचे शिक्षण दिलेले होते.

१६७८ साली घडलेल्या एका राजकीय घटनेमुळे ह्या अकबराचे आपला बाप औरंगजेबाबरोबर भांडण झाले. आणि इथून पुढे ह्या बाप बेट्यांतील संबंध हे कायमचे दुरावातच गेले. १० डिसेंबर १६७८ रोजी महाराजा जसवंतसिंगचा मृत्यू झाला. औरंगजेबाने महाराजा जसवंतसिंगाचे 'जोधपूर' खालसा करण्याचा घाट घातला. पण जसवंतसिंगाच्या राण्या आणि कारभाऱ्यांना हि गोष्ट मान्य नव्हती. त्यामुळे राजपुतांनी औरंगजेबाविरोधात बंड केले.

हे राजपुतांचे बंड मोडून काढण्यासाठी आता औरंगजेबाने आपली तीन मुलं शहाआलम, आझमशाह आणि अकबर ह्यांना पाठविले.

४ मार्च १६८० रोजी अकबराला चितोडची बाजू सांभाळण्यासाठी पाठविण्यात आले. प्रत्येक ठिकाणी अकबराचा सारखा पराभवाचं होत होता. अकबराने राजपुतांविरोधात लढण्यात पाच महिने असेच फुकट घालविले.राजपुतांपुढे आता काही आपला निभाव लागत नाही असे पाहून अकबराने आपल्या बापास औरंगजेबास हे युद्ध बंद करण्याची विनंती केली.
ह्या विनंतीने औरंगजेब भयंकर चिडला. आणि त्याने रागाने अकबराची चांगलीच कानउघडणी केले.

अकबरालाही बापाचा भंयकर राग आला. आता अकबराने चिडून जाऊन गूपचुप रजपुतांशीच बोलणी सुरु केली आणि दुर्गादास राठोड आणि राजा रामसिंग ह्यांच्या सल्यानुसार औरंगजेबाविरोधात बंड पुकारले. (हा राजा रामसिंग आठवला का? हाच तो मिर्झाराजा जयसिंगाचा मुलगा. शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीवेळी महाराजांची देखरेख करणारा हाच तो.)

सिसोदिया आणि राठोड ह्यांच्या मदतीने आता ह्या अकबराने औरंगजेबाच्या विरोधात जाऊन अजमेर येथे स्वतःस बादशहाच घोषित केले आणी लगेच स्वतःची नाणीही पडली.

"आपल्या आयुष्यात आपण सत्तेसाठी जशी आपल्या भावांची हत्या केले तसेच आता सत्तेसाठी आपली मुलंच आपली हत्या करतील" असे औरंगजेबास वाटू लागले.

औरंगजेबाने आपला मुलगा असलेल्या अकबरास पत्र पाठवून त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण ह्या अकबराने आता अजमेर येथे मोठी फौज गोळा केली. ह्याच वेळी मात्र औरंगजेबाजवळ कमी फौज होती. वस्तुतः जर अकबराने औरंगजेबावर लगेचच हल्ला केला असता तर ह्यात औरंगजेबाचा पराभव झाला असता. पण अकबर फौज गोळा करून नुसताच स्वस्थ बसून राहिला.

आता औरंगजेबाने त्याच आवडत शस्त्र बाहेर काढले ते शस्त्र म्हणजे "कपटनिती."

आणि ह्या शस्राने कारगर काम केले. औरंगजेबाने 'कपटनितीने' सगळे राजपूत सरदार अकबरापासून तोडले आणि स्वतःस जोडले. राजपूत सोडून जाताच अकबराने अजमेरवरुन जीव वाचून पळ काढला. आता अकबराची रानोमाळ भटकण्याची वेळ आली होती.

राजपुतांचे साहाय्य एकदम नाहीसे होताच अकबर भांबवलाच. काय करावे हेच त्याला सुचेना. प्रथम मारवाडला जाऊन तिथून इराणला पळून जायचा अकबराने विचार केला. अकबराची ही पळापळ पाहून औरंगजेबाने सर्व प्रांतांच्या सुभेदारांना ह्या अकबराच्या वाटा अडविण्याचा हुकूम जारी केला.
अश्या प्रकारे सर्व मार्ग बंद झाल्यावर अकबराने आता दक्षिणेत मराठ्यांचा राजा असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांकडे जायचे ठरविले.

अकबरास मराठयांवाचून दुसऱ्या कोणाकडूनही आश्रय मिळण्याची शक्यता नव्हती. संभाजी महाराजांचा राज-आश्रय मिळविण्यासाठी त्याला प्रथम संभाजी महाराजांकडून मान्यता हवी होती.

अकबर आणि दुर्गादास राठोड ह्यांनी ९ मे १६८१ ला 'महेश्वर' येथे नर्मदा नदी ओलांडली.

अकबराच्या ह्या पळापळीचे एक पत्र 'महेश्वर' येथून त्याने संभाजी महाराजांना लिहिले. हे पत्र ९ मे १६८१ च आहे. त्या पत्रात तो संभाजी महाराजांना म्हणतो, " औरंगजेबाबरोबर युद्ध करायची मला वेळच आली नाही. माझ्या कुटुंबाबरोबर मी मारवाडांत गेलो. तिथं दुसऱ्या दिवशी रात्री मला दुर्गादास राठोड त्याच्या सैन्यासहित येऊन मिळाला. मारवाडात दोन तीन वेळा मला भटकावं लागलं. माझ्या पाठलागावर शहजादा मुअज्जमची नेमणूक केलेली होती. पण त्याला काही मी सापडलो नाही, म्हणून त्याने मारवाडांत मला पकडण्यासाठी आपले सैन्य विखरून ठाणी उभी केली.

पळापळीला वैतागून मी राजा जयसिंगाच्या मुलखात गेलो. जयसिंगाचा 
मुलगा राजा रामसिंगाने मला घोडे आणि इतर जिन्नस दिले आणि आपल्याच मुलखात राहायची विनंती केले. पण त्याचा मुलुख हा दिल्लीपासून जवळ असल्याने मला तिथं राहणे सोयीचे वाटले नाही. मी नर्मदा नदी सुखरूप पार केली आहे. दुर्गादास राठोड माझ्याबरोबर आहे.

माझ्याबद्दल तुम्ही नि:शंक राहावे. अल्लाच्या कृपेने मला राज्य मिळाले तर नाव माझे आणि राज्य तुमचे राहील. औरंगजेब हा माझ्याबरोरच तुमचाही शत्रू आहे हे ध्यानात घ्यावे. आपण दोघांनी मिळून आपले उद्दिष्ट्य साध्य केले पाहिजे. शहाण्या माणसांस विशेष सांगण्याची गरज नाही. इशारा पुरे."

९ मे १६८१ ला नर्मदा नदी ओलांडताना अकबराने पाठविलेले हे पत्र रायगडास संभाजी महाराजांना मिळाले. पण संभाजी महाराजांनी ह्या पत्राला हेतुपूर्वक काहीही उत्तर दिले नाही.

'औरंगजेबासारख्या कपटी शत्रूच्या मुलाकडून पहिल्यांदाच आपल्याला असे पत्र आल्याने संभाजी महाराजांनी मनात शंका धरली कि 'ह्यात औरंगजेबाचेच काहीतरी कुटील राजकारण असेल.'

इकडं मात्र हा अकबर संभाजी महाराजांच्या आश्रयास येणास अधीर झाला होता.

पहिल्या पत्राचे उत्तर आले नाही तोच अकबराने आता परत २० मे १६८१ ला दुसरे पत्र संभाजी महाराजांस पाठविले. त्यात तो संभाजी महाराजांना म्हणतो, " हिंदुस्थानातील ह्या राजश्रेष्ठाने (म्हणजे संभाजी महाराजांनी) मीं पत्रात लिहिल्याप्रमाणे वागावे. म्हणजे जगात तुमचा लौकिक वाढेल. या पूर्वी मी तुम्हास एक पत्र पाठविले होते. बहुदा तुम्हास ते मिळाले नसेल. नाहीतर तुम्ही त्याचे उत्तर पाठविलेच असते.

मी तुमच्याकडे निघालोच आहे. त्यामुळे तुम्ही आता पत्र लवकर पाठवावे, उशीर करू नये. ह्या एकनिष्ठ राजाची (म्हणजे संभाजी महाराजांची) वार्ता ऐकण्यासाठी मला दीर्घ काळापासून उत्कंठा लागलेली आहे. तुम्हाला भेटण्यासाठी मी अत्यंत आतुर झालो आहे."

संभाजी महाराजांच्या पत्राची वाट न पाहता अकबराने आपला दक्षिणेतील मराठ्यांच्या राज्याकडील प्रवास चालूच ठेवला. मुघल फौजेचा पाठलाग चुकवीत दुर्गादास राठोड ह्या अकबराला त्रिंबक येथे घेऊन आला.

केवळ संभाजी महाराजच औरंगजेबाविरुद्ध टिकाव धरू शकतील अश्या विश्वासाने ह्या दुर्गादास राठोडने अकबरास संभाजी महाराजांकडे 'राज-आश्रय' मागायचा सल्ला दिला होता.

अकबर मराठ्यांकडे जात आहे हे पाहून औरंगजेबाने अकबरास दोन पत्रे पाठविली. त्यातील एका पत्रात औरंगजेबाने अकबरास सांगितले कि," चूक करून, शत्रूस जाऊन मिळण्याचा घातक मार्ग तू अवलंबिलेला आहे. ह्याचे चांगले परिणाम होणार नाहीत."

पण अकबराने ह्या पत्रांकडे दुर्लक्ष केले. अकबर दक्षिणेकडे जात आहे हे लक्षात येताच औरंगजेबाने आपला औरंगाबादचा सुभेदार बहादूरखान खानजहाँ ह्यास पत्र पाठवून अकबरास पकडण्याचा हुकूम जारी केला. पण तोपर्यंत हा अकबर बागलाणात पोहचला होता. 

बागलाणचा सुभेदार आणि मुल्हेरचा किल्लेदार असलेल्या देवीसिंह बुंदेला ह्याने अकबराची वाट अडविण्याचा प्रयत्न केला. पण अकबर त्याला हूल देऊन नाशिकला पोहचला. नाशिकहून तो परत त्रिंबकला आला आणि तिथून तो कोकणात पळून गेला.

इकडे संभाजी महाराजांनी अजूनही ह्या अकबरास पत्र पाठवून उत्तर दिले नव्हते.

"ह्या अकबराचा आपण फायदा करून घेतला पाहिजे" असा विचार संभाजी महाराजांनी केला आणि आपल्या मराठा राज्यात आलेल्या अकबरास आणण्यासाठी आपली माणसे पाठविली.

मराठ्यांनी आता अकबरास आपल्या बरोबर घेऊन सुधागडाच्या पायथ्याशी आणून ठेवले. सुधागड हा रायगडापासून दूर आहे. संभाजी महाराजांनी मुद्दाम ह्या अकबरास आपल्यापासून दूर ठेवले.

अकबराजवळ ४०० घोडे, २५० उंट, आणि थोडेसे पायदळ होते. अकबराचे लोक त्यास बादशहा म्हणून मुजरा करत असत. हा अकबर माध्यम बांध्याचा आणि रंगाने गोरा होता. त्याची व्यवस्था सुधागडाच्या पायथ्याशी पेंढ्यानी शाकारलेल्या आणि शेणाने सारवलेल्या घरात केली होती. त्यास बसावयास सतरंजी होती. कोकणातील ह्या साध्या घराबाहेर अकबर हा उघड्यावरच बसत असे. त्याच्या बरोबरचे राजपूत आणि मुसलमान लोक त्यास पहारा देत असत. संभाजी महाराजांनी अकबराच्या रक्षणासाठी ३०० हशम ठेवलेले होते.

१७ जून १६८१ च्या सुमारास संभाजी महाराजांनी हिरोजी फर्जंदास पत्र देऊन अकबराकडे पाठविले. बरोबर एक हजार पागोडे , मोत्याची माळ, हिरेजडित मोठा कंठा, एक हिरेजडित तुरा, आणि इराणी आणि हिंदू पद्धतीच्या काही गोष्टी नजराणा म्हणून दिल्या. अकबराला लागणाऱ्या धान्यसामुग्रीचीही व्यवस्था करण्यात आली.

अश्या प्रकाराने आता बळजबरीनेच न बोलावता घरी आलेल्या 'पाहुण्याचा पाहुणचार' करायची वेळ संभाजी महाराजांवर आली होती.
थोड्याच दिवसांनी संभाजी महाराजांनी २० हजार होन देऊन नेताजी पालकर आणि इतर लोकांस ह्या अकबराजवळ ठेवले.

ऑगस्ट १६८१ पासून ह्या अकबराने आजून फौज गोळा करायचा उद्योग सुरु केला. तो आता अधिक सैन्य गोळा करू लागला. संभाजी महाराजांच्या हेरांनी हि बातमी लगेच संभाजी महाराजांच्या कानावर घातली. अकबर स्वतःची फौज जमा करत आहे असे पाहून संभाजी महाराजांनी ह्या अकबराला ताबडतोब निरोप धाडला कि "तू जर स्वतःचे सैन्य जमा करत
असशील तर माझ्या मुलखातून ताबडतोब निघून जा. इथं राहून सैन्य गोळा करायचे नाही." संभाजी महाराजांनी ह्या अकबरास नव्याने येऊन मिळालेल्या सैन्यास हाकलून देण्याची आज्ञाच काढली.

इकडं हा अकबर अजूनही संभाजी महाराजांची आणि आपली भेट कधी होते ह्याची आतुरतेने वाट पाहतच होता. संभाजी महाराजांनी मात्र ह्या अकबरास भेटण्याची आजिबात घाई केली नाही.

इथं एक अकल्पित आणि संभाजी महाराजांसाठी धोक्याची घटना घडली. जुलै १६८१ च्या आसपास संभाजी महाराजांच्या पदरी असलेल्या आण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो ह्यांनी गुपचूप संभाजी महाराजांस मारायचा कट केला. आणि ह्यासाठी आमच्या मदतीला यावे म्हणून ह्या अकबराला पत्र पाठविली.

अकबर प्रथम ह्या गोष्टीचा फायदा घेण्यास तयार झाला होता. पण अकबराजवळील दुर्गादासाने ह्या अकबरास सल्ला दिला कि "तू असे काही करू नकोस. कदाचित खुद्द संभाजी महाराजच तुझ्या प्रामाणिकपणाची परीक्षा पाहत असतील." हा सल्ला पटून अकबराने त्याला आलेली हि पत्र संभाजी महाराजांस तशीच पुढे पाठवून दिली.

इकडे संभाजी महाराजांनी राजद्रोहाची हि पत्रे पाहून ताबडतोब ह्या कटातील सर कारकूनांस हत्तीच्या पायीच देऊन ठार मारले.
हा कट उघडकीस आल्यामुळे संभाजी महाराजांचा ह्या अकबरावरील विश्वास वाढला आणि आता त्यांनी ह्या अकबराची भेट घ्यायची ठरवली.
संभाजी महाराज हुशार होते. त्यांनी ह्या अकबरास रायगडास न बोलावता स्वतःच ह्या अकबरास भेटायला ते सुधागडास गेले.

१३ नोव्हेंबर १६८१ रोजी संभाजी महाराज आपल्या लष्करासहीत 'सुधागडाजवळील पादशाहपूर' येथे ह्या अकबरास भेटले. ह्या भेटीच्या वेळी दुर्गादास राठोडही बरोबर होता.

अकबर आणि संभाजी महाराजांच्या भेटीने तिकडे उत्तरेत औरंगजेबाचा अस्वस्थपणा आता अधिकच वाढला होता. त्याला भीती वाटली कि मराठे हे अकबराच्या मदतीने राजपुतांस हाताशी धरून आता सरळ आपल्यावर हल्ला करतील.

दक्षिणेत निघण्याअगोदर आता औरंगजेबाने घाई घाईने राजपुतांशी तह करून त्यांना अनुकूल करून घेतले. अजमेर येथून ८ सप्टेंबर १६८१ रोजी मोठी फौज घेऊन हा औरंगजेब दक्षिणेत यायला निघाला. १३ नोव्हेंबर १६८१
रोजी औरंगजेब आपल्या भव्य अश्या फौजेसहित बऱ्हाणपुरास पोहचला.
आता औरंगजेबाने परत आपले आवडते शस्र बाहेर काढले ते म्हणजे 'कपटनिती.' त्याने सिद्दी, पोर्तुगीज आणि कोकणांतील देसाई आपल्या बाजूस करून घेतले. इकडे संभाजी महाराजांनीही औरंगजेबाविरुद्ध लढायची जोरदार तयारी सुरु केली.

जंजिऱ्याच्या सिद्दीविरोधात संभाजी महाराजांनी जोरदार मोहीम उघडली होती. ह्या मोहिमेत आता संभाजी महाराजांनी ह्या अकबरालाही सिद्दीविरोधात आपल्या बरोबर सामील करून घेतले.

आता इथं सगळ्यात महत्वाचं आहे.

संभाजी महाराजांनी १६८२ च्या मे आणि नोव्हेंबर महिन्यांत दोन पत्रे राजस्थातील आमेरचा राजा रामसिंग (मृत मिर्झाराजा जयसिंगाचा मुलगा) यास लिहिली.

पत्रात संभाजी महाराज रामसिंगास म्हणतात कि, " तुम्ही सुलतान अकबरास तुमच्या राज्यात आश्रय दिलात हि फार चांगली गोष्ट केली. आपण सगळे हिंदू आहोत. त्यामुळे हिंदू म्हणून जी जी मदत करणे शक्य असेल ती ती मी तुम्हास करेल. तुम्ही पुढाकार घेऊन अकबरास गादीवर बसविण्याचे कार्य पार पाडावे. त्या यवनधमाला (म्हणजे औरंगजेबाला) असे वाटू लागले आहे कि आपण हिंदू तत्वशून्य झालो आहोत. त्याला असे वाटते कि आम्हाला आमच्या धर्माचा अभिमान राहिलेला नाही.

आम्ही क्षत्रिय आहोत. त्या यवनधमाची (म्हणजे औरंगजेबाची) वागणूक यापुढे आम्ही सहन करणार नाही. आमच्या धर्माला कमीपणा आणणारी कोणतीही गोष्ट आम्हास मान्य नाही. या दुष्ट यवनांशी युद्ध करण्यात आम्ही आमची संपत्ती, आमचा देश, आमचे दुर्ग असे सर्व काही पणास लावायला तयार आहोत.

ह्याच उद्देशाने आम्ही गेली दोन वर्ष अकबरास आणि दुर्गादास राठोडास आमच्या राज्यात आश्रय दिला आहे. आम्ही त्या यवनधमाच्या (म्हणजे औरंगजेबाच्या) अनेक सेनापतींचा वध केला. कित्येकांना कारागृहात टाकले. कित्येकांस दया येऊन सोडून दिले. आता खुद्द ह्या यवनधमाला (म्हणजे औरंगजेबालाच) पकडून कारागृहात टाकण्याची वेळ आलेली आहे.
तुम्ही ह्या वेळेस जर धैर्य आणि साहस दाखविले तर यवनांची शक्ती नष्ट करून आणि आपल्या देवतांची पुन्हा स्थापना करून आपली धर्मकार्ये निर्विघन पार पाडता येतील.

पण अश्या प्रसंगी धर्माभिमान सोडून तुम्ही नुसते गप्पच बसून राहिलात ह्याचे आम्हास मोठे आश्यर्य वाटते.

आम्ही लवकरच अकबर आणि दुर्गादास राठोडास गुजराथेत पाठविण्याचा विचार करत आहोत. आपणही धैर्य करून मदत करावी.

इराणचा शहा अब्बास ह्याने आपण अकबरास मदत करू असे लिहिलेच आहे. परंतु ह्या यशाचे श्रेय इराणच्या शहाने घ्यावे असे आम्हास उचित वाटत नाही. आपले पिताजी 'मिर्झाराजा जयसिंग' ह्यांनी जसे ह्या यवनधमाला (म्हणजे औरंगजेबाला) गादीवर बसविले तसेच तुम्ही अकबरास गादीवर बसवून यशाचे धनी व्हावे.

आपण उभयतांनी एक होऊन जर अकबरास गादीवर बसविले तर हिंदू धर्म रक्षणाचे कार्य होईल. ह्या कार्याने तुमच्या वंशाची शोभा वाढेल.

माझे मंत्री कवी कलश आणि जनार्दन पंडित तुम्हास आजून सविस्तर पत्र लिहीतच आहेत. प्रतापसिंहाच्या ( हा हेर होता) तोंडून तुम्हाला सगळा तपशील कळेलच. कुशल कळवीत जाणें. अधिक काय लिहिणे. "

पत्र लिहून संभाजी महाराजांनी ह्या राजपुतांना औरंगजेबाविरोधात उठाव करण्यास सांगितले. संभाजी महाराज ह्या अकबरास नामधारी गादीवर बसवून दिल्लीची सगळी सत्ता हिंदूंच्या हाती कशी येईल ह्याचे नियोजन करत होते.

पण रामसिंगने काही धाडस झाले नाही. घाबरून जाऊन रामसिंग स्वस्थच बसून राहिला. संभाजी महाराजांच्या ह्या धाडसी मनसुब्याला ह्या कचदिल रामसिंगाने काही परवानगी दिली नाही.

ह्या मोठ्या पत्रावरून संभाजी महाराजांचा आत्मविश्वास आणि झेप किती मोठी होती ह्याची कल्पना येते.

इकडे मराठी राज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाच्या फौजांचा मराठी राज्याच्या सीमेवरच पराभव सुरु झाला होता. औरंगजेबाचे मराठयांना जिंकायचे स्वप्न; मराठे औरंगजेबाच्या फौजेस हरवून धुळीस मिळवत होते.
१६८२ सालच्या ऑगस्टच्या महिन्याच्या अखेरीस संभाजी महाराजांची आणि अकबराची परत भेट झाली. ह्या भेटीनंतर संभाजी महाराजांनी अकबरास सुधागडावरून हलवून तिकोना किल्यावर ठेवले. पण त्याला काही तिथली हवा मानवली नाही. त्यामुळे अकबरास परत तिथून काढून जैतापुरास आणून ठेवले. पण तेथीलही हवा काही ह्या अकबरास मानवली नाही.

इकडे संभाजीमहाराज हे औरंगजेबाबरोबरच इंग्रज पोर्तुगीज आणि सिद्दीशी एकाच वेळी लढत होते.

अति-व्यस्ततेमुळे संभाजी महाराज आपल्याकडे मर्यादेपेक्षा जास्त लक्ष देत नाहीत ह्याचा अकबरास राग येत असे.

अश्याच प्रसंगी १६८२ च्या अखेरीस एक प्रसंग घडला आणि संभाजी महाराज आणि अकबराचे संबंध एकदम बिघडले.

संभाजी महाराजांनी ह्या अकबरास भेटीवेळी एक हिरेजडित कंठा आणि एक हत्ती भेट दिला होता. संभाजी महाराजांनी दिलेली हि भेट ह्या अकबराने परस्पर त्याच्या एका रखेलीस भेट म्हणून दिली.

अकबराच्या प्रत्येक हालचालींवर संभाजी महाराजांचे अगदी बारीक लक्ष असे. संभाजी महाराजांच्या हेरांनी हि बातमी महाराजांस येऊन सांगितली आणि संभाजी महाराजांच्या मस्तकाची आग तळपायातच गेली.

त्यांनी अकबरास निरोप पाठविला कि, " मी तुझ्या सन्मानासाठी तो हिरेजडित कंठा तुला दिला होता."

ह्याला अकबराने उलट उत्तर दिले कि ' " मी बादशहा आहे. माझ्या मनासारखे मी वागेल."

हे उत्तर येताच संभाजी महाराजांनी अकबराच्या मदतीस ठेवलेले २००० घोडदळ आणि २००० पायदळ परत बोलावले. अकबरास खर्चाची रक्कम देणेही बंद केले.

ह्या घटनेने रागावून जाऊन अकबराने राहत असलेल्या छपरांना आणि तंबूंना आगी लावून दिल्या आणि फकिराचा वेष धारण करून गोव्यास निघण्याची तयारी सुरु केली. त्याने जाताना संभाजी महाराजांस प्रवासासाठी मदत म्हणून फौज मागितली. पण संभाजी महाराजांनी ती मदत दिली नाही.
अकबर आता गोव्याला पोर्तुगीजांकडे गेला. तेथून तो मक्केस जाणार होता. 

पण तिथं त्याला कवी कलश येऊन भेटला आणि त्याची समजूत काढून त्यास परत संभाजी महाराजांकडे वेंगुर्ल्यास घेऊनआला.

संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या विरुद्ध सुरु केलेल्या युद्धात ह्या अकबराला बरोबर घेतले. मराठे आणि पोर्तुगीज तहात अकबराने बरेच मध्यस्तीचे काम केले.

पुढे संभाजी राजांनी अकबरास गुजरातला पाठविले. भडोच इथं अकबरास इराणच्या शहाचे आमंत्रण मिळाले.

१६८७ सालच्या फेब्रुवारी महिन्यात अकबर इराणकडे रवाना झाला. इराणला पोहचल्यावर शहा अब्बासचा मुलगा शहा सुलेमान ह्याने त्यास पुष्कळ नजराणे दिले आणि आपल्याकडे ठेऊन घेतले.

१७०४ साली वयाच्या सत्तेचाळिसाव्या वर्षी हा अकबर इराणमध्येच मरण पावला.

संभाजी महाराजांची ह्या प्रसंगी दूरदृष्टी दिसून येते. त्यांनी ह्या अकबराचा उपयोग जसा हिंदूंचे राज्य बळकट करण्यासाठी केला तसेच पोर्तुगीजांच्या विरुद्धही केला.

रामसिंगास पाठविलेल्या पत्रांतून छत्रपती संभाजी महाराजांचे अफाट बुद्धी कौशल्य दिसून येते.

संपूर्ण उत्तर हिंदुस्थान यवनांच्या हातून मुक्त करून हिंदू पतपादशाही स्थापन करायचे स्वप्न संभाजी महाराजांनी पाहिले; आणि ते स्वप्न पूर्ण करायचा आटोकाट प्रयत्नही केला.

छत्रपती संभाजी महाराजांच हे स्वप्न पुढे त्यांचाच मुलगा छत्रपती शाहू महाराज ह्यांनी पूर्ण केले.

उत्तर हिंदुस्तानातील स्वराज्य विस्तारक हे छत्रपती संभाजी महाराज हेच होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्याईचा परमोच्च बिंदू हा छत्रपती संभाजी महाराज होते.

सार्थ अभिमान आहे की देव देश आणि धर्म वाढविणारा असा राजा ह्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला.

लेख समाप्त.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम निरंतर

|| #अथ_राजव्यवहारकोश: ||

|| #अथ_राजव्यवहारकोश: ||

महाराष्ट्रातील पूर्वीच्या ३०० वर्षे नांदलेल्या राजवटीमुळे फारसी व दक्षिणी उर्दू या दोन्ही भाषांना राजभाषांचे स्वरूप प्राप्त झाले होते. म्हणून राजव्यवहारामध्ये प्राचुर्याने आढळून येणारे फारसी व दख्खनी उर्दूतील शब्द यांच्या ऐवजी संस्कृत पर्याय वापरून राजव्यवहाराचे मराठीकरण करण्याची योजना शिवप्रभूंनी आखली. अशा प्रकारचा एक कोश तयार करण्याचे काम त्यांनी प्रसिध्द मतुसद्दी व प्रशासक रघुनाथ नारायण हणमंते यांजकडे सोपवली. त्याने धुण्डिराज व्यास या विद्वानाच्या सहाय्याने राजकोश सिध्द केला ही घटना इ.स. १६७८ ची असावी.
आजही मराठीत रूढ करण्यात येत असलेले काही शब्द राजव्यवहारकोशात आढळतात हे पाहून मोठी गंमत वाटते. सचिव, मंत्री, सभासद, न्यायाधीश, दुर्ग, कोशागार, शस्त्रगार, चषक, आदाय, सभा, लेखा, आय-व्यय, वेतन, ऋण, प्रतिभू(जमीन), कारागृह, आयपत्र, सहकारी, अनक्रमाणीका, संवाद, गणना - तीनशे वर्षानंतर सुध्दा हा कोश आजही उपयुक्त ठरू पाहत आहे. हे लक्षणीय आहे. या कोशातील एक शब्द मन वेधून घेणारा आहे. राजदरबारातील खलबतखान्याला त्या काळात गुसलखाना म्हणत. आग्र्यातील दिवाण ई खास ला बरेच वर्षे गुसलखाना हेच नाव होते. याला पर्याय रघुनाथ नारायणाने मन्त्रस्थानं असा दिला आहे. आज ३०० वर्षांनी, मुंबईच्या सेक्रेटेरिएटला मंत्रालय हे नाव मिळालेले पाहून, शिवाजी महाराज व रघुनाथ नारायण हणमंते यांच्या आत्म्यास अगदि संतोष झाला असेल.

- सेतुमाधवराव पगडी
१०-०६-८१

संदर्भ :- राजकोश
संपादक :- अ.द. मराठे

🚩 जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩

#वाकणारही_नाही_अन्_मोडणारही_नाही.

#वाकणारही_नाही_अन्_मोडणारही_नाही.

मिर्झाराजा पुण्याच्या दिशेने सरकत होता. तो आणि दिलेरखान पुढच्या मोहिमांची चर्चा करीत असावीत असे दिसून येते. दोघांचेही हेतू एकच होते. शिवनाश! पण पद्धती वा मार्ग जरा भिन्नभिन्न होते. दिलेरचे म्हणणे असे की , ‘ या शिवाजीराजाचे किल्ले एकूण आहेत तरी किती ? फार फार तर चाळीस. ते सर्वच किल्ले आपण युद्धाने जिंकून घेऊ. हा विचार आपल्या प्रचंड सैन्यबळावर दिलेर मांडीत होता. हा विचार केवळ शिपाईगिरीचा होता. त्यात सरदारी नव्हती. डोके कमीच होते. मिर्झाराजांचा विचार वेगळा होता. त्यात अभ्यास दिसून येतो. मिर्झाराजांचे म्हणणे थोडक्यात असे शिवाजीराजाचे किल्ले घेणे वाटते तितके सोपे नाही. कारण त्या किल्ल्यातील मराठी माणसं अजिंक्य आहेत. ती फितवा फितुरीने विकत घेणे वा लढूनही जिंकून घेणे जवळजवळ अशक्य आहे. या माणसांचे म्हणजे लढाऊ सैनिकांचे घरसंसारच जर आपण तुडवून काढले आणि त्यांची बायकापोरे , शेतीवाडी आणि त्यांची खेडीपाडी पार मुरगाळून काढली तर गडागडांवर असलेले हे मराठी आपोआप भुईवर गुडघे आणि डोकं टेकतील. त्यामुळेच शिवाजीराजा हा आपोआप शरण येईल.
असा विचार आणि पुढे प्रत्यक्ष तो विचार कृतीत आणू पाहणारा मिर्झाराजा जयसिंग हा एकमेव शत्रू वा सेनापती ठरला. बाकीचे सगळे हाणामारी आणि जाळपोळ करणारे केवळ दंगेखोर. दिलेर आणि मिर्झा हे दोन सेनापती आपापले विचार घेऊन पुण्यात दाखल झाले.
महाराजांनी एक तिसराच प्रयत्न करून पाहिला. मोगलांचे बळ अफाट आहे आणि मिर्झाराजा हा सेनापतीही शहाण्या डोक्याचा आहे. जर हे प्रचंड मोगली वादळ आपल्या अंगावर न येऊ देता परस्पर विजापुरच्या आदिलशाहकडेच वळविता आले तर स्वराज्याला मोगली धक्का लागणार नाही , या हेतूने महाराजांनी मिर्झाराजाकडे अशी बोलणी वकिलामार्फत केली की , हा विजापूरचा बादशाह आदिलशाह दिल्लीचा शत्रू आहे. त्याचा तुम्ही पुरा मोड करा. आम्ही तुम्हांस मदत करू.
म्हणजे विजापूर खलास करून टाकायचं अन् त्यात आपणही चार ओंजळी कमवायच्या असा हा महाराजांचा डाव होता. तो डाव मिर्झाराजांनी अचूक ओळखला. आणि त्यांना दादच दिली नाही. मोगली फौज त्यांनी थेट पुण्यावर आणली. पुणे ही त्यांची केंद छावणी झाली. शाहिस्तेखानापासून पुणे मोगलांच्याच ताब्यात होते. आता आपण टाळू पाहात असलेले मोगली आक्रमण टळत नाही , हे महाराजांना कळून चुकले. संकट कितीही मोठे अंगावर आले तरीही आपला आब न सोडता ताठ उभे राहायचे हा महाराजांचा नेहमीचा स्वभाव.
मिर्झाराजा आणि दिलेरखान यांनी आपापल्या पद्धतीप्रमाणे मराठ्यांविरुद्ध डाव खेळायचं ठरविलं. मराठी स्वराज्याची जाळपोळ , लूट जनतेवर अत्याचार ही मराठ्यांना शरण आणण्याकरिता मिर्झाराजाने ठरविलेली खेळी त्याने सुरू केली. पुण्यात कुबाहतखानास , कार्ला , मळवली , वडगांव या मावळ भागात कुतुबुद्दीनखान आणि पुण्याभोवतीच्या भागात इंदमणबुंदेला , रायसिंग सिसोदिया इत्यादी सरदारांना ही धूमाकूळ घालण्याची कामगिरी सांगून धामधुमीस प्रारंभही केला. (मार्च. १६६५ ) ब्रिटीश भूमीवर सतत बॉम्बवर्षाव करून ब्रिटीश सैन्याचे धैर्य खचविण्याचा हिटलरने असाच प्रयत्न दुसऱ्या महायुद्धात केला होता हे आपल्याला आठवतंय ना ? अशाच घनघोर प्रसंगी राष्ट्राचे चारित्र्य दिसून येते. ते खचते तरी किंवा धगधगते तरी.
परीक्षा होती स्वराज्यातील जनतेची. मराठी सैनिकांना हा मोगलाई वणवा दिसत होता. आपली घरेदारे आणि बायकापोरे पार चिरडून निघत आहेत , हे मराठ्यांना उघडउघड दिसत होते. समोरासमोर मोगलांशी झुंजायला मराठी माणूसबळ कमी पडत होते. तरीही प्रतिकार चालूच होता. स्वराज्यास आरंभ झाल्यापासून आत्तापर्यंत (१६४६ ते १६६५ ) मराठी सैनिक सतत लढतोच आहे. विश्रांती नाहीच अन् आता तर ढगफुटीसारखे मोगली हत्ती आपल्यावर तुटून पडले आहेत. हे मराठ्यांना दिसत होतं. महाराजांनाही दिसत होतं. नकाशा पाहिला तर हा मोगली धूमाकूळ मुख्यत: पुणे जिल्ह्याच्या मध्य आणि पश्चिम भागावर मिर्झाराजांनी केंदित केला होता.
पण इथेच शिवशाहीचा मावळा सैनिक आपलं प्रखर धैर्य , शौर्य , सहनशीलता , त्याग , निष्ठा आणि नेतृत्त्वावरील विश्वास अन् प्रेम अगदी नकळत , अगदी सहज , अगदी उत्स्फूर्त अन् अगदी हसतहसत जगून वागून दाखवित होता. यालाच राष्ट्रीय चारित्र्य म्हणतात. या काळातील या आक्रमक आगीच्या वर्षावात कोणत्याही किल्ल्यावरचा वा दऱ्याकपारातल्या ठाण्याछावणीतला मराठा सैनिक हताश , निराश , गर्भगळीत वा अगतिक झालेला दिसत नाही. हे कशावरून ? फितुरी नाही. आपापल्या कामात कसूर नाही अन् महाराजांकडे केविलवाण्या विनविण्याही नाहीत की महाराज आमचे संसार मातीला मिळताहेत. महाराज हे युद्ध थांबवा. शरण जा. तह करा. आम्हाला वाचवा.
मराठी स्वराज्याच्या पाठीचा कणा वज्रासारखा आणि गर्दन शेषासारखी ताठ दिसून आली ती या मिर्झा-दिलेर यांच्या आक्रमणाच्या काळातच. असा हा कणा होता की , वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.

🚩 जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
🚩 जय शंभुराजे 🚩

#फर्जंद_शहाजी_राजे

#फर्जंद_शहाजी_राजे

पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व!

जेव्हा दिल्लीमध्ये दिल्लीपती शहेनशाह शहाजान आणि महंमद आदिलशहा या दोघांनी मिळून निजामशाही संपवली, त्या वेळी निजामशहाचा वारसदार मूर्तझा या लहान मुलाला स्वत:च्या मांडीवर बसवून शहाजीराजांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला, व जणू स्वत:वरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ 3 वर्षे टिकला होता. या प्रसंगातून छत्रपती शिवाजी महाराजांची तल्लख बुद्धी, पराक्रम, रयतेचे पालनपोषण करण्याची जबाबदारीची भावना, चारित्र्य याप्रमाणेच स्वराज्यसंकल्पना हे सर्व घटक आनुवंशिकतेने शहाजीराजांकडून त्यांच्या अंगी आले होते असे निश्र्चितपणे म्हणता येते.

फार वर्षांपूर्वी राजस्थानच्या चितोडगडच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसल्यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा 1603 साली विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.

दरम्यान अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतवर्षातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना शहाजीराजे वजीर मलिक अंबरच्या साथीने करीत होते (इ. स. 1624). त्यांना त्यात यश मिळाले. शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. पण पुढे मलिक अंबरची दरबारातील राजकारणी वागणूक पाहून शहाजीराजे आदिलशाहीत गेले. त्यानंतर 1639 साली आदिलशहाकडून सरलष्कर ही पदवी त्यांना देण्यात आली व बंगळूरची जहागिरीही त्यांना प्राप्त झाली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता.

शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. ते मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणूनच त्यांनी योग्य वेळ पाहून पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवले होते. त्याचबरोबर श्यामराज रांझेकर, बाळकृष्णपंत हणमंते, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बरांना जय्यत तयारीनिशी शिवाजी महाराजांसोबत राज्यकारभारासाठी पाठवले होते. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली.

दरम्यानच्या काळात आदिलशहाचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, मंबाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता 25 जुलै, 1648 चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वत: आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि. 16 मे, 1649 रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.

शहाजीराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही, मुघलशाही व निजामशाही - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. त्यांच्या कारकीर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे,

* इ. स. 1625 ते 1628 - आदिलशाही
* इ. स. 1628 ते 1629 - निजामशाही
* इ. स. 1630 ते 1633 - मुघलशाही
* इ.स. 1633 ते 1636 - निजामशाही
* इ.स. 1636 पासून पुढे - आदिलशाही

रियासतकार - सरदेसाई यांच्या मतानुसार १८ मार्च १५९४ हा शहाजी महाराजांचा जन्म दिवस

अरू उत्तर दछन रछन को इत ।
साहजु है उत साहिजहाँ ।।

याचा अर्थ असा की उत्तरेकडील प्रदेशाचे रक्षण करण्यास शहाजहाँ आणि

दक्षिणेचे रक्षण करण्यास शहाजी आहे.

🚩 जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
🚩 जय शंभुराजे 🚩

#मायनाक_भंडारी

कधी शत्रूचे घाव ना पाठीवरती
रणी झेलतो सिंहासा छातीवरती
श्री शिवाजी महाराजांनी कोकण प्रांतात वादळी चढाई मांडीत कित्येक जलदुर्ग, गिरीदुर्ग ,बंदर आणी ठाणी स्वराज्याच्या अधिपत्याखाली आणली. हिंदवी स्वराज्याची भागावी ध्वजा सागरी किनारपट्टीवर मोठ्या दिमाखात फडकू लागली होती. सुसज्ज मराठी आरमार खवळत्या समुद्रावर सत्ता गाजवू लागलं होतं.
स्वराज्याचा विस्तार दिवसेंदिवस वेगाने वाढतच होता
कोकणाच्या तुफानी मोहिमेत राजांना अनेक मोलाची रत्ने गवसली. निष्ठेची आणी कडक शौर्याची हि पोलादी रत्ने होती. या रत्नांमध्ये मायनाक भंडारी , वेंटाजी बाटकर , दौलतखान , इब्राहीमखान , लायजी पाटील कोळी , तुकोजी आंग्रे सारखे दर्यावर्दी होते. या साऱ्यांमध्ये पराक्रम, महत्वकांक्षा आणी दूरदृष्टी सागराएवढी विशाल होती. श्रीशिवाजी महाराजांवर स्वराज्याची अस्मिता या दर्याविरांमध्ये जागी केली. स्वराज्याचा शेला त्यांचे अंगावर पांघरीत हि निष्ठावंत हृदये
स्वराज्याच्या पवित्रकार्यात सहभागी करून घेतली
मायनाक भंडारी हे दर्यासारंग यांच्या बरोबरीने स्वराज्य आरमाराचे सुभेदार होते.पराक्रम मायनाक भंडारींच्या नसानसांतून ओसंडून वाहत होता. श्री शिवाजी महाराजांवर त्यांची आढळ निष्ठा होती. इ.स.१६७९ चे सुमारास महाराजांनी सागरी शत्रूंना थोपविण्यासाठी मुंबई बंदराच्या तोंडाशी असणाऱ्या खांदेरी-उंदेरी बंदरावर किल्ला बांधण्याचा ठरविला. त्यादृष्टीने राजाच्या वेगाने हालचालीही सुरु झाल्या .मुंबई बेटावर नजर ठेवून सागरी शत्रूंच्या हालचालींना प्रतिबंध करण्याची राजांची या मागची योजना होती. श्री शिवाजी महाराजांच्या या हालचालीने इंग्रज प्रचंड धास्तावले आणी त्यांचा हा हेतू तडीस जाऊ नये म्हणून इंग्रजांनी खांदेरी-उन्देरीवर आपला हक्क दाखवीत महाराजांशी उघड उघड युद्ध पुकारले.कॅप्टन विलियम मिन्चीन,रिचर्ड केग्वीन,जॉन ब्रान्डबरी,फ्रान्सिस थोर्प असे नामांकित सागरी सेनानी खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले.रिव्हेंज आणि हंटर नावाच्या दोन फ्रींगेटेस त्यांनी पाठवल्या होत्या
गेप नावाच्या माणसाकडून काही गुराबा भाड्याने घेऊन त्यावर कशातरी काही तोफा बांधून त्यांनी इंग्रजी आरमार पाठवण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याच्या हा छोट्याश्या आरमाराचा आपण सहजासहजी पराभव करू, आशा गुर्मीत ते होते महाराजांनी देखील इंग्रजांच्या या आव्हानास तोंड देण्याचा निर्धार केला . मायनाक भंडारींना रवाना केले. मायनाक भंडारींनी अतिशय पराक्रमाने आणी चिवटपणाने प्रखर संघर्ष मांडीत इंग्रजांचा हा मनसुबा हाणून पाडला .इंग्रज हाट चोळीत बसले .मायनाक भंडारींची चांगलीच दहशत इंग्रजी काळजात निर्माण झाली याच मायनाक भंडारींना महाराजांनी हर्णे गावाजवळील सुवर्णदुर्ग जिंकण्याची मोहीम फर्मावली सुवर्णदुर्गाच्या चारही अंगाला खवळलेला विशाल समुद्र होता.
महाराजांच्या आज्ञेवरून मायनाक भंडारी फौजेसह सुवर्णदुर्ग वर तुटून पडले . त्यावेळी त्यांचा पुतण्या देखील त्यांच्या समवेत होता .समुद्राच्या अंगाखांद्यावर धुमश्चक्री उसळली यामध्ये भांडारींचा पुतण्या धारातीर्थी पडला.मात्र मायनाक भंडारींनी सुवर्णदुर्ग अखेर स्वराज्यात दाखल केला
असे हे मायनाक भंडारी स्वराज्याच्या इतिहासात अजरामर झाले.
🚩 जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
🚩 जय शंभुराजे 🚩

Tuesday 25 June 2019

आता इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक आहे... भाग 6


आता इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक आहे...
भाग 6
सिंगापुर...
सिंगापुरचं मूळ नावच मुळी ‘सिंहपुर’ आहे. स्वतः सिंगापुरकरांनाही याचा सार्थ अभिमान आहे. त्यांच्या अधिकृत गाईड मधे तसा स्पष्ट उल्लेख आहे. पूर्वीच्या सिंहपुरात संस्कृतचा वापर कसा व्हायचा हे ही सिंगापुर सरकार अभिमानाने सांगते. सिंहपुर हे नाव असल्यानेच सिंगापुर ने "सिंह" ही स्वतःच्या देशाची खुण म्हणून स्वीकारली आहे.
_________________
एकुणात काय, तर हा संपूर्ण दक्षिण-पूर्व आशिया सुमारे हजार – बाराशे वर्ष हिंदुत्वाची सूक्तं गात होता. हिंदू पद्धतीनं जीवन यापन करत होता. भव्य आणि कलात्मक मंदिरं उभारत होता. यज्ञ-याग करत होता. देवाला आळवत होता. वेद, उपनिषद, पुराण यांच्या ऋचांनी आसमंत भारून टाकत होता. जगाला शांततेचे संस्कार देणारी हिंदू आणि बौध्द संस्कृती, त्या सर्व देशांना सुख समाधानाने, शांतीने जगायला शिकवत होती..!
या सर्व प्रवासात भारताने आपली वर्णव्यवस्था तिथे नेली नाही. आपली खाद्यसंस्कृती त्या देशांवर लादली नाही. त्या देशांना आपल्या #वसाहती समजल्या नाही. व्यापारासाठी त्या देशांना वेठीला धरलं नाही. तिथल्या लोकांना तुच्छ लेखलं नाही. तिथे कुठेही युध्द करून त्यांना जिंकलं नाही..!
हे सर्व फार महत्वाचं आहे, कारण पुढे सहाशे – सातशे वर्षानंतर इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, स्पेनिश या लोकांनी आशिया खंडात ज्या वसाहती उभारल्या, त्यांत वरील पैकी एकही गोष्ट त्यांनी पाळली नाही..!
आपलं दुर्दैव इतकंच, की ह्या वैभवशाली, उदात्त आणि अभिमानास्पद इतिहासाविषयी आम्हाला काहीही माहिती नाही आणि आजवर आपल्या राज्यकर्त्यांनी हा हिंदू इतिहास जनतेला माहिती करून देण्याची इच्छाही दाखवली नाही..!!
(Source : शोध दैवी शक्तींचा)

आता इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक आहे... भाग 5



आता इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक आहे...
भाग 5
थायलंड....
पूर्वीचे सयाम म्हणजे आजचे थायलंड. या सयाम देशातही एक अयोध्या (त्यांच्या भाषेत ‘अयुथ्या’) आहे आणि त्यांना तीच मूळ #अयोध्या वाटते. येथे प्रभू रामाचा प्रचंड प्रभाव आज ही आहे. थायलंड चे राजे स्वतः ला रामाचे वंशज म्हणवून घेतात. बँकॉक मधील प्रमुख रस्त्यांच्या नावात सुध्दा ‘राम’ आहे.

आता इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक आहे... भाग 4



आता इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक आहे...
भाग 4
लाओस....
लाओस हा देश ही एकेकाळी हिंदू संस्कृतीला मानणारा देश होता. लाओसच्या इतिहासात पहिल्यांदा उल्लेख होणारा हिंदू राजा होता, श्रुतवर्मन. याने वसवलेली राजधानी होती, श्रेष्ठपुर. सर्व हिंदू उत्सव लाओसमधे अत्यंत उत्साहाने आणि भव्यतेने साजरे व्हायचे. आजही लाओस आणि व्हिएतनाम, कंबोडिया सारख्या शेजारच्या देशांमध्ये हिंदू पद्धतीचे कॅलेंडर चालते. #बुध्दीस्ट कॅलेंडरमधे भारतीय महिने (चैत्र, वैशाख, जेष्ठ, आषाढ....) असतात आणि या भागातल्या अनेक देशांमध्ये हे कॅलेंडर चालते.
गंमत म्हणजे आपल्या वर्षप्रतिपदेच्या (गुढीपाडव्याच्या) वेळेसच लाओसचा नवीन वर्षारंभाचा उत्सव असतो आणि संपूर्ण लाओसमध्ये तो अक्षरशः प्रत्येक घरात साजरा केला जातो..!

आता इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक आहे... भाग 3


आता इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक आहे...
भाग 3
व्हिएतनाम....
व्हिएतनाम या देशाला आपण ओळखतो ते एक कम्युनिस्ट राष्ट्र, ज्याने सत्तर च्या दशकात अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला नमविले. मात्र हे व्हिएतनाम, कोणे एके काळी पूर्ण हिंदू राष्ट्र होतं. या देशाचं नाव तेंव्हा ‘चंपा’ होतं आणि याचे पाच प्रमुख विभाग होते –
1. इंद्रपुर
2. अमरावती (चंपा)
3. विजय (चंपा)
4. कौठर
5. पांडुरंग (चंपा)
इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून पुढे जवळपास एक हजार वर्ष हा देश हिंदू आचार, विचार वागवत समृध्द होत होता. श्री भद्रवर्मन, गंगाराज, विजयवर्मन, रुद्रवर्मन, ईशानवर्मन सारख्या महापराक्रमी राजांनी हा देश भरभराटीला आणला. इसवी सनाच्या पाचव्या शतकात सुरुवातीला भद्रवर्मनचा मुलगा गंगाराज याने सिहांसनाचा त्याग करून जीवनाची शेवटची वर्षे भारतात येऊन #गंगा किनारी व्यतीत केली. पुढे पांडुरंग वंशाने बरीच वर्षे राज्य केले.या संपूर्ण कालावधीत, ‘चंपा’ च्या इतिहासात, भारतीय संस्कृती खऱ्या अर्थाने राबविली गेली. भारतीय पध्दती प्रमाणे सेनापती, पुरोहित, पंडित वगैरे रचना होती. महसूल व्यवस्था ही भारताप्रमाणेच ठेवण्यात आली होती. मंदिरं भव्य नव्हती, पण कलात्मक होती. यज्ञ, याग, अनुष्ठानं मोठ्या प्रमाणात व्हायची. भारतीय ग्रंथ, पुराण यांना विशेष महत्त्व होतं. या ‘चाम’ संस्कृतीचे काही अवशेष आजही शिल्लक आहेत, जे ‘चम’ या नावाने ओळखले जातात. मुळात ही ‘चम’ म्हणजे हिंदू रीतीरिवाज पाळणारी माणसं आहेत. कंबोडिया आणि व्हिएतनाम या दोन देशात ह्या ‘चम’ लोकांना अल्पसंख्यांकांचा दर्जा मिळालेला आहे.

आता इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक आहे... भाग 2


आता इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक आहे...
भाग 2
इंडोनेशिया....
यवद्वीप -
जसं कंबुज देशाबद्दल, तसंच यव द्वीपाबद्द्ल. यवद्वीप म्हणजे जावा. आजच्या इंडोनेशियाचा एक भाग. कोणे एके काळी संपूर्ण हिंदू असलेला. अगदी रामायणात आणि ब्रम्हपुराणात उल्लेख असलेलं हे यवद्वीप. येथेही भारतीय नेमके केंव्हापासून आले, याचा निश्चित इतिहास उपलब्ध नाही. मात्र काही हजार वर्षांपासून येथे हिंदू संस्कृतीचा प्रभाव आहे हे निश्चित. जावा च्या लोकांची ही मान्यता आहे की ‘आजिशक’ ह्या भारतातून आलेल्या #पराक्रमी योद्ध्याने तेथील राक्षस देवतेच्या राजाला मारून, सामर्थ्यशाली राजवंश निर्माण केला.
सुमात्रा -
जसे जावा, तसेच सुमात्रा. प्राचीन काळात #सुवर्णभूमि किंवा सुवर्णद्वीप म्हणून प्रसिध्द असलेला भाग. आजचं इंडोनेशियातलं सर्वात मोठं बेट. या बेटावर साधारण सातव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत हिंदूंचे ‘श्रीविजय साम्राज्य’ होते. अत्यंत वैभवशाली आणि संपन्न असलेल्या ह्या साम्राज्याबद्दल आधुनिक जगाला सन १९२० पर्यंत काहीच माहिती नव्हती, हे आपलं फार मोठं दुर्दैव आहे. १९२० मधे एका फ्रेंच संशोधकाने ह्या साम्राज्याची माहिती लोकांसमोर आणली. त्यानंतर मात्र ह्या साम्राज्याकडे लोकांचं लक्ष गेलं आणि बऱ्याच माध्यमातून माहिती समोर येऊ लागली.
इत्सिंग नावाचा चिनी बौध्द प्रवासी, #बौध्द धर्माचं अध्ययन करण्यासाठी सातव्या शतकात (इसवी सन ६७१ मधे) भारतातल्या नालंदा येथे जायला निघाला. मात्र तिथे अध्ययन करायचं असेल तर संस्कृत भाषा आवश्यक आहे ही माहिती त्याला होती. म्हणून तो चीनच्या ‘ग्वांझावू’ प्रांतातून निघून #श्रीविजय येथे थांबला आणि संस्कृत मधे पारंगत झाला. आपल्या एकूण २५ वर्षांच्या प्रवासात, इत्सिंग ने ६ ते ७ वर्ष श्रीविजय साम्राज्यात काढली. या साम्राज्याबद्दल इत्सिंग ने बरंच लिहून ठेवलंय.
श्रीविजय साम्राज्याच्या काळातच त्रिमूर्ति प्रमबनन(‘परब्रम्ह’ चा अपभ्रंश) हे भव्य #हिंदू_मंदिर, जावा बेटावर इसवी सन ८५० मधे उभे राहिले. #दुर्गादेवी#गणपती आणि अगस्त्य ऋषींच्या त्रीमूर्ती चे हे मंदिर अत्यंत भव्य असून आजही तिथे व्यवस्थित उपासना चालते..!
जगातील सर्वात जास्त #मुस्लीम लोकसंख्या असलेला इंडोनेशिया हा देश आजही अत्यंत अभिमानाने आपल्या हिंदू खुणा मिरवतोय. याचं ‘दीपांतर’ (समुद्रापलीकडला भारत) हे नाव आजही अनेक ठिकाणी प्रचलित आहे. यांच्या नोटांवर(स्थानिक चलनांवर) श्री गणेशाचे चित्र असते. यांच्या विमानसेवेचे नाव ‘गरुडा एयरवेज’ आहे. ते बँकेला कोषागार म्हणू शकतात आणि त्यांच्या ‘बहासा इंडोनेशिया’ या अधिकृत भाषेत सत्तर टक्के संस्कृत शब्द येतात. इंडोनेशियाचे राष्ट्रीय बोधवाक्य ‘भिन्नेका तुंगल इका’ (विविधतेत एकता) हे आहे.
इंडोनेशियातलं बाली द्वीप हे निसर्ग सौदर्यानं नटलेलं विख्यात पर्यटन स्थळ आहे. आजही बाली ची ९०% लोकसंख्या हिंदू आहे आणि हिंदू आचार - विचारांवरच जगतेय. बालीत आढळलेला पहिला हिंदू शिलालेख #ब्राम्ही लिपीत आहे आणि तो इसवी सनाच्या १५० वर्षांपूर्वीचा आहे.

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...