विनोद जाधव एक संग्राहक

Monday 6 May 2024

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

 🚩🚩


हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे🚩🚩
_____
मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घोरपडे मराठ्यांची शेवटची सेनापती बाप्पू गोखले यांच्या बलिदान आणि जसं मनाला चुटक लावून जातं तसेच तसंच सरसेनापती संताजी बाबा घोरपडे यांचे नातू असलेले व गुत्ती येथील सेनापती मुरारराव घोरपडे यांच्या बलिदानाची ही हे प्रत्येक मराठ्यांच्या मनाला पिळून टाकतं एका अजिंक्य युद्धाची खालील क्रूरकर्मी शेवट शेवट व हैदर आलेली टिपू सुलतान तिचा पत्रांनी त्यांचे केलेले हाल मनाला वेदना देऊन जाते खरंतर ते तुम्हाला टिपू सुलतान सांगतील तुम्ही फक्त सेनापती मुरारराव घोरपडे सांगा कारण इतिहासच्या दोन्ही अंगाने अभ्यास करताना करताना एखाद्याच्या पराक्रमासोबतच त्याच्या कुकर्माचाही पेढे वाचले गेले पाहिजे आणि तो कुठल्याही जाती धर्माचा असो त्याच्यासमोर एक मराठा इतिहास पूर्वी अभ्यासक म्हणून आम्ही नतमस्तक कारण मराठ्यांच्या चिरी पटक्या खाली लढणारा प्रत्येक जाती धर्माचा मावळा सरदार सेनापती हा मराठाच होता हीच आमची भावना आहे पण ज्यांनी ज्यांना इतिहास एकाच नजरेतून दिसतो व दुसरी नजर ही कुरकुर्माच्या समर्थनासाठी उभी राहते त्या आजच्या मराठ्यांनी सेनापती मुरारराव घोरपडी समजणार नाहीत शेवटी ज्या हैदरअलीला उभ्या कर्नाटकात सेनापती मुरारराव घोरपडीने 20 वर्ष पळवलं त्या सेनापतीचे दुर्दैवी अंत आणि झालेल्या शेवट मराठ्यांच्या काही पिढ्यांनी मराठ्यांच्या बलिदानाची त्यागाची आणि पराक्रमाची साक्षी देणार आहे एवढंच लक्षात ठेवा शेवटी म्हणत्यात⚔️⚔️ ना बाप तो बाप ही रहेगा⚔️⚔️
❗❗ जय सेनापती मुरारराव घोरपडे❗❗
इ. स. १७३० मध्ये सिधोजीराव घोरपडे पुत्र मुरारराव घोरपडे हे दक्षिणेस मराठ्याच्या वतीने कारभार पहात म्हैसूर आणि हैदराबादहून दरवर्षी सात लाख रुपये महसुल मिळत असत. अर्काटच्या नबाबाशी संबंधित इंग्रज-फ्रेंच युद्धातही त्यांनी भाग व १७४१-४५ मध्ये त्रिचन्नापल्ली (तिरुचिरापल्ली) येथील संपूर्ण प्रदेशात मराठ्यांच्या अंमलाखाली आणले १७५० नंतर कर्नाटकात त्यांनी अनेक स्वाऱ्या केल्या व अनेक स्थानिक सत्ताधीशांना पराभूत केले. कर्नाटकवरील स्वामित्वाकरिता हैदरअलीची त्यांना कडवी स्पर्धा होती. पुढे प्रसंगोपात पेशव्यांशीही त्यांचा संघर्ष झाला. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे कर्नाटकाकडे दुर्लक्ष झाले व त्यातच हैदरने गुत्तीवर मोठ्या सैन्यानिशी हल्ला केला (१७७५). चार महिने मुराररावांनी कडवी झुंज दिली; मात्र किल्ल्यातील रसद, दारुगोळा इ. संपल्यानंतर त्यांना शरणागती पतकरावी लागली. श्रीरंगपट्टणच्या किल्ल्यात हैदरने मुराररावांना कैद करून ठेवले. तेथेच १७७८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला हैदर अलीच्या मनात सेनापती मुरारराव
घोरपड्यांबद्दल
मनात
आत्यंतिक तीव्र राग होता. त्याने
त्याचा पुरेपूर बदला घेतला. हत्तीच्या
पायाला बांधतात अशा जाडसर
साखळ्या बांधून मुराररावांची धिंड
श्रीरंगपट्टणम मधून काढण्यात आली.
कपाळदुर्ग च्या अंधारकोठडीत
मुराररावांना आणि दोन चारशे
मराठ्यांना डांबण्यात आले. दहा बारा
दिवस रोज मुराररावांवर व मराठा सैन्यावर अनन्वित
अत्याचार होत होते.यावेळी सदर हैदर अलीच्या पुत्राने मराठ्यांनी अन्न पाणी बंद करून
धड प्यायला पाणीही देण्यात आलं
नाही.
उपासमारीने आणि
अत्याचारांनी मुराररावांची प्रकृती
खूपच खालावली. त्यातच त्यांचा
मृत्यू झाला. दोन चारशे मराठ्यांची
अमानुष कत्तल करण्यात आली
लेख व माहिती संकलित
अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संतोष झिप

Thursday 2 May 2024

कोल्हापूरचे छत्रपती भोसले आडनाव का लावत नाहीत ?

 


कोल्हापूरचे छत्रपती भोसले आडनाव का लावत नाहीत ?
फार पूर्वीपासून सामान्य लोक आपले नांव लिहिताना स्वतःचे नांव, वडिलांचे नांव व आडनाव या क्रमात लिहितात. पूर्वी बादशहांच्या पदरी असणारे मराठा सरदार फारतर नावापुढे आपला किताब अथवा बिरुद जोडायचे. शिवाजी महाराजांचे घराणेही यास अपवाद नव्हते. महाराजांचे वडील शहाजीराजे आपल्या नावाबरोबर फर्जंद व सरलष्कर ही बिरुदे लिहायचे(?) मात्र नांव लिहिताना स्वतःचे नाव व आडनाव असाच क्रम असायचा. शिवपूर्वकालापासून सर्वच मराठा सरदार याच पद्धतीने आपली नावे पत्रव्यवहारांमध्ये लिहीत असत. उदा., पिराजीराव घाटगे सर्जेराव, दौलतराव जाधव सरनौबत इत्यादी. अशापद्धतीने सामान्य रयतेप्रमाणे व सरदार-जहागिरदारांप्रमाणे नावामध्ये आडनावाचा उल्लेख शिवराय देखील करायचे. राज्याभिषेकापूर्वी शिवरायांनी जे पत्रव्यवहार केलेले आहेत त्या पत्रांमध्ये "राजेश्री सिवाजीराजे भोसले" असा अथवा अशा सर्वसामान्य पद्धतीनेच शिवरायांचा नामोल्लेख आढळतो. मात्र १६७४ साली महाराजांनी स्वतःस राज्याभिषेक करवून घेतल्यानंतर महाराज व महाराजांचे घराणे सामान्य राहिले नव्हते, शिवाजीराजे भोसले हे आता कुणी सरदारपुत्र नव्हते तर ते एक सार्वभौम अभिषिक्त राजे होते. शिवराय "छत्रपती" झाले होते. यामुळे साहजिकच आपल्या सर्वसामान्य नामाभिधानाचा त्याग करणे व नवीन नांव धारण करणे शिवरायांना क्रमप्राप्त होते, आणि म्हणूनच "राजेश्री शिवाजीराजे भोसले" या आपल्या नावाचा त्याग करुन सार्वभौम अभिषिक्त नृपतीस शोभेल असे,
"क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपति" असे नवीन नांव महाराजांनी धारण केले. राज्याभिषेकानंतरच्या एकाही पत्रव्यवहारामध्ये महाराजांनी आपल्या नावापुढे "भोसले" हे आडनांव एकदाही जोडलेले नाही. महाराजांनी इतरांना लिहिलेल्या व इतरांनी महाराजांना लिहिलेल्या अशा सर्व पत्रांमध्ये "क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपति" असाच उल्लेख आढळतो. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनंतर छत्रपतींच्या गादीवर विराजमान झालेल्या कोणत्याही छत्रपतींनी व छत्रपती घराण्यातील कोणत्याही सदस्याने आपल्या नावापुढे "भोसले" असे आडनाव लिहिलेले नाही व तसे ऐतिहासिक उल्लेखही आढळून आलेले नाहीत. छत्रपती, महाराणी व युवराजांसाठी वेगवेगळ्या बिरुदावल्या होत्या. उदाहरणासाठी अनुक्रमे :
क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपति,
अखंडलक्ष्मी अलंकृत महाराणी लक्ष्मीबाई छत्रपति,
युवराज राजेश्री राजाराम छत्रपति किंवा चिरंजीव विजयीभव राजे राजाराम छत्रपति. यामध्ये कुठेही भोसले आडनावाचा उल्लेख आढळत नाही. सर्वसामान्य लोक ज्या पद्धतीने आडनावासहीत आपले नाव लिहितात त्या पद्धतीने नाव लिहायला छत्रपती म्हणजे कोणी सर्वसामान्य नव्हेत. छत्रपती म्हणजे क्षत्रिय कुलातील सर्वोच्च आहेत, ते अभिषिक्त राज्यकर्ते आहेत, म्हणूनच त्यांचे नामाभिधानही सर्वसामान्यांपेक्षा पूर्णतः अलग आहे; ज्यामध्ये आडनावाचा उल्लेख नसतो. भोसले हा सर्वसामान्य वंश आहे तर "छत्रपती" हा एकमात्र सर्वश्रेष्ठ वंश आहे.
याचे ऐतिहासिक संदर्भ छत्रपती शिवाजी महाराजांपासूनची स्वतः महाराजांची पत्रे, स्वराज्याची नाणी, छत्रपती व सरदारांच्या राजमुद्रा, सरदार मंडळींच्या पत्रातील छत्रपतींचे उल्लेख असे अनेक पुरावे आहेत.
उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व कोल्हापूरचे छत्रपती दुसरे संभाजीराजे यांनी पाडलेल्या शिवराई, होण, शंभुराई या नाण्यांवर त्यांचा उल्लेख
- श्री राजा शिवछत्रपति
- श्री राजा शंभुछत्रपति असा आहे. तसेच महाराजांच्या पदरचे सरदार - जहागीरदार यांच्या मुद्रेतही महाराजांचा उल्लेख असाच असलेला दिसतो.
- कोल्हापूरच्या सर्व छत्रपतींच्या राजमुद्रेतही छत्रपतींचे नाव असेच आढळते. उदाहरणार्थ शाहू महाराजांची राजमुद्रा. ( श्री महादेव श्री तुळजाभवानी चांद्रीलेखेव वर्धिष्णुर्जनानंदप्रदायिनी शाहू छत्रपतेर्मुद्रा शिवसूनोर्विराजते.)
सदर लेखनास पूरक म्हणून एक प्रसंग सांगणे आम्ही उचित समजतो,
राजर्षि शाहू छत्रपती महाराजांचे चिरंजीव युवराज राजाराम महाराजांचा विवाह बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्या नातीशी होणार होता. या विवाहाच्या पत्रिका काढताना गायकवाडांनी राजाराम महाराजांचा नामोल्लेख "राजाराम छत्रपती" असा न करता "राजाराम भोसले" असा केला. पुढे विवाह समारंभासाठी शाहू छत्रपती महाराज व कोल्हापूरचे सहाशे लोक बडोद्यास गेले असताना त्याठिकाणी देण्यात येणाऱ्या विशेष निमंत्रणपत्रिकेत व हुंड्याच्या कागदपत्रांतही "राजाराम भोसले" असाच उल्लेख करण्यात आला होता. गायकवाडांनी आरंभलेला छत्रपती घराण्याचा उपमर्द कोल्हापूरच्या रयतेस रुचला नाही. कोल्हापूरकरांच्या वऱ्हाडामध्ये या प्रकरणामुळे तीव्र नाराजी उमटली. शाहू महाराजांकडे सरदारांनी गायकवाडांविरुद्ध नाराजी व्यक्त केली. अर्थात महाराजही या प्रकाराने संतप्त झाले होते मात्र ऐन विवाहप्रसंगात ठिणगी पडू नये व काही विपरीत घडून छत्रपतींच्या प्रतिष्ठेस बाधा पोहोचू नये म्हणून छत्रपतींनी या प्रकरणाचा भडका उडण्याआधीच ते दडपले. (संदर्भ- महाराष्ट्र शासन प्रकाशित राजर्षि शाहू गौरव ग्रंथ, कृ.गो. सूर्यवंशीकृत राजर्षि शाहू छत्रपती राजा व माणूस.)
कोल्हापूरच्या छत्रपतींना उद्देशून काही लोक म्हणतात की यांना (म्हणजे छत्रपतींना !) शिवरायांचे "भोसले" आडनाव लावायला लाज वाटते ! तर प्रश्न लाज वाटण्याचा अथवा अभिमान वाटण्याचा नाही ; प्रश्न आहे गौरवशाली परंपरेचा, जी दस्तुरखुद्द थोरल्या महाराजांनी सुरु केली होती आणि कोल्हापूरचे विद्यमान छत्रपति महाराज ती तितक्याच श्रद्धेने पाळतात...
आता लोकांचा प्रश्न उरतो की असे आहे तर मग सातारचे छत्रपती का आडनाव लावतात ? तर याचे उत्तर, सातारचे छत्रपती हेदेखील भोसले आडनाव लावत नव्हते. जोपर्यंत सातारची गादी स्वतंत्र होती तोपर्यंत सातारचे छत्रपती देखील आपला उल्लेख याच पद्धतीने करायचे. (उदा. क्षत्रियकुलावतंस श्रीराजा प्रतापसिंव्ह छत्रपति.) मात्र सन १८४८ साली इंग्रजांनी दत्तक वारस नामंजूर करुन सातारची गादी खालसा केली तेव्हापासून सातारच्या छत्रपतींचा उल्लेख कागदोपत्री भोसले असा होऊ लागला व पुढे तेच रूढ झाले. १८४८ पूर्वी सातारच्या गादीवरही कोणत्याही छत्रपतींनी भोसले आडनाव लावल्याची अस्सल कागदपत्रे मिळत नाहीत.
Credits- Karvir Riyasat

बलुचिस्तान मधील मराठे !

 



बलुचिस्तान मधील मराठे !
पानिपतचे तिसरे युद्ध होऊन आता अडीचशे वर्षे उलटली असली तरी अजूनही पानिपत हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या युद्धात जवळपास चाळीस हजार मराठी योद्धे, तसेच स्त्रिया व पुरुष मरण पावले आणि २२ हजार मराठी युद्धकैदी गुलाम म्हणून अहमदशहा अब्दालीने आपल्याबरोबर अफगाणिस्तानात नेले. युद्धानंतर मराठी युद्धकैद्यांच्या लांबच लाब रांगा केल्या गेल्या व त्यांना अफगाण सन्याबरोबर दिल्ली, मथुरा इत्यादी ठिकाणी नेण्यात आले. इतिहासात पानिपतच्या या दुर्दैवी युद्धकैद्यांविषयी जे थोडेफार उल्लेख आढळतात त्यापकी एक उल्लेख सियार उल मुत्ताखिरीन या इतिहासकाराने अशा तऱ्हेने वर्णन केलेला आहे : ‘दु:खी युद्धकैद्यांच्या लांबच लांब रांगा करण्यात आल्या आणि त्यांना थोडेबहुत र्अधकच्चे अन्न व पाणी देण्यात आले. युद्ध संपल्यावर जे काही पुरुष, स्त्रिया आणि लहान मुले वाचली त्यांना गुलाम म्हणून नेण्यात आले. अंदाजे बावीस हजार. त्यातले बरेचसे लोक मोठय़ा हुद्दय़ावरचे होते.’
पानिपतचे युद्ध कसे लढले गेले याविषयी इतिहासात सविस्तर माहिती उपलब्ध आहे; परंतु त्यानंतर मराठी युद्धकैद्यांचे पुढे काय झाले याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. या युद्धकैद्यांचा पानिपतानंतरचा प्रवास व त्यांच्या वंशजांची सध्याची परिस्थिती याविषयीची माहिती इतिहासाचा एक हौशी संशोधक म्हणून फेसबुकच्या माध्यमातून आणि पानिपतावरील युद्धकैद्यांच्या वंशजांबरोबर केलेल्या संभाषणातून मला मिळाली.
पानिपतच्या युद्धानंतर दोन महिन्यांनी.. म्हणजे २० मार्च १७६१ रोजी अहमदशहा अब्दाली अफगाणिस्तानात जाण्यासाठी दिल्लीहून निघाला. त्याच्यासोबत मराठे युद्धकैदीही होते. परत जाताना पंजाबमध्ये शिखांनी या युद्धकैद्यांपकी काही मराठी स्त्रियांना मुक्त केले, अशी इतिहासात नोंद सापडते. पश्चिम पंजाब (पाकिस्तान) ओलांडल्यानंतर बलुचिस्तान प्रांतातील डेरा बुगटी आदी भाग सुरू होतो. पानिपतच्या युद्धात बलुची सन्य अब्दालीच्या बाजूने लढले होते. पानिपत युद्धाच्या एक महिना अगोदर १५,००० बलुची घोडदळ अताईखान याच्या नेतृत्वाखाली अब्दालीला येऊन मिळाले. त्यामुळे अब्दालीची बाजू बळकट झाली होती. पानिपताच्या युद्धापूर्वी तीन वर्षे आधी १७५८ मध्ये अब्दाली आणि बलुचिस्तानचा त्यावेळचा शासक मीर नासीर खान नुरी (कलातचा खान) यांच्यामध्ये एक तह झालेला होता. या तहाच्या अटीनुसार मीर नासीर खान नुरीने अब्दालीला त्याच्या लष्करी कारवायांत सनिक पुरवायचे व त्या बदल्यात अब्दाली मीर नासीर खानाला सन्य ठेवण्यासाठी आíथक मदत करेल असे ठरले होते. अब्दाली जेव्हा पंजाब ओलांडून बलुचिस्तानात परत आला त्यावेळेस कलातच्या खानाने अब्दालीकडे सन्य पुरविण्याच्या बदल्यात आíथक मोबदला मागितला. परंतु अब्दालीला हिन्दुस्थानात फारशी रक्कम खंडणी म्हणून मिळाली नव्हती. कारण दिल्लीचा बादशहा सततच्या आक्रमणांमुळे तसा कफल्लकच झालेला होता. आणि मराठय़ांकडूनदेखील युद्धात हत्ती, घोडे आणि तोफांव्यतिरिक्त काहीच आíथक घबाड पदरात पडले नव्हते. त्यामुळे अब्दालीने मराठा युद्धकैदीच पशांऐवजी मोबदला म्हणून बलोच सरदारांना सुपूर्द केले. मराठा युद्धकैदी बलोच लोकांना देण्याचे दुसरे कारण म्हणजे मराठा युद्धकैद्यांची त्यावेळची शारीरिक अवस्था हीदेखील असू शकते. युद्धकैदी जवळपास दोन-तीन महिने कैदेत होते आणि त्यांना अगदी तुटपुंज्या अन्नपाण्यावर दिवस काढावे लागले होते. अजून बोलन िखडीसारख्या अतिशय अवघड व दुर्गम भागातून पुढचा प्रवास करायचा होता. अगोदरच मानसिक व शारीरिकदृष्टय़ा खालावलेल्या मराठय़ांना या प्रदेशातून आणखी प्रवास जिवावर बेतला असता. त्यामुळेच अब्दालीने हा पुढचा विचार करून मराठय़ांना बलोच सरदारांना देऊन टाकले.
पानिपतात लढलेले बलुची सन्य हे वेगवेगळ्या बलुची जमातींनी बनलेले होते. त्यामुळे मराठे युद्धकैदीही पानिपतात लढलेल्या निरनिराळ्या बलुची जमातींना विभागून देण्यात आले. मराठा युद्धकैद्यांची संख्याही बरीच मोठी होती. आणि सगळ्या मराठय़ांना एकाच ठिकाणी ठेवण्यात मोठा धोकाही होता. त्यामुळे या युद्धकैद्यांना विभागण्याचा निर्णय मीर नासीर खान नुरी याने घेतला.
या युद्धकैद्यांपैकी बुगटी, र्मी, मझारी, रायसानी व गुरचानी इत्यादी बलोच जमातींमध्ये मराठा उपजमात आजही आपली स्वतंत्र ओळख टिकवून आहे. पानिपत युद्धातील त्यावेळच्या मराठा युद्धकैद्यांचे वंशज आज धर्माने मुस्लीम झालेले आहेत खरे; परंतु त्यांना आपल्या मराठीपणाचा रास्त अभिमान आहे. या उपजमातींपकी फक्त बुगटी मराठय़ांविषयीची माहिती उपलब्ध आहे. बुगटी जमातीतील मराठय़ांचे तीन प्रमुख वर्ग पुढीलप्रमाणे-
बहुसंख्य मराठा युद्धकैदी हे काल्पर, मसोरी, शांबानी, नोथानी, पिरोजानी आणि रहेजा या बुगटी जमातींमध्ये विभागून देण्यात आले आणि आज हा समाज त्या- त्या बुगटी जमातीच्या नावाने ओळखला जातो. उदा. काल्पर मराठा, नोथानी मराठा, शांबानी मराठा वगरे. आज हा वर्ग समस्त बुगटी मराठी लोकसंख्येच्या सुमारे ८० टक्के आहे. या वर्गाला गुलामगिरीत दिवस काढावे लागले. परंतु १९४४ मध्ये नबाब अकबर खान बुगटी (बुगटी जमातीचे मुख्य सरदार) यांनी मराठय़ांना या गुलामगिरीच्या जाचातून मुक्त केले. १९४४ पर्यंत या मराठा वर्गाला प्रचंड शारीरिक कष्ट व हलाखीचे दिवस काढावे लागले. १९४४ पूर्वी त्यांची मुख्य कामे म्हणजे उंटांची देखभाल करणे, स्वयंपाक करणे, लोहारकाम व इतर छोटी-मोठी कामे करणे हेच असे. बुगटी मालक (आका) आणि त्यांचे मराठा गुलाम यांचे संबंध बऱ्यापकी जिव्हाळ्याचे होते. बुगटी मालक आपल्या कुटुंबाप्रमाणे मराठी गुलामांची देखभाल करीत असे. नियमाला ज्याप्रमाणे अपवाद असतो, त्याप्रमाणे काही बुगटी मालक क्रूरसुद्धा होते व ते मराठा गुलामांना अतिशय वाईट पद्धतीने वागवीत असत असे सांगितले जाते.
प्रत्येक बलुची जमातीमध्ये त्यांचे स्वत:चे असे कायदे (जिर्गा) असतात. पूर्वी मराठय़ांना इतर बुगटी जमातींच्या तुलनेत असमान आणि जाचक असे कायदे लागू होते. उदाहरणार्थ, सियाकारी- म्हणजे Honour killing च्या कायद्यानुसार एखाद्या बुगटी व्यक्तीने दुसऱ्या बुगटी व्यक्तीचा वध केला तर वध झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला वध केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला मारण्याची मुभा होती. परंतु एखाद्या बुगटी व्यक्तीने मराठा व्यक्तीचा वध केला तर वधास वध हा कायदा त्यांच्या बाबतीत मात्र लागू नव्हता. अपराधी बुगटी व्यक्तीला माफक दंड करून सोडून देण्यात येत असे. याउलट, एखाद्या मराठा व्यक्तीने बुगटी व्यक्तीचा खून केला तर एका वधास दोन वध- असा विरोधाभासी कायदाही अस्तित्वात होता.
१९४४ साली हा मराठा समाज गुलामगिरीतून मुक्त झाला व जिर्गातले असमान कायदेही काळानुरूप रद्द करण्यात आले. गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतरही काही काळ या वर्गाने त्यांच्या बुगटी मालकांबरोबरच राहणे पसंत केले. कारण इतकी वष्रे गुलामगिरीत राहिल्यानंतर त्यांच्यात एक कमीपणाची भावना होती. अलीकडच्या काळात मात्र हळूहळू हा वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहे.
१९६० नंतर या समाजाने अन्य बुगटी जमातींपेक्षा शिक्षणात बरीच आघाडी घेतली. कारण बाकीचा बुगटी समाज हा त्यांच्या भटक्या जीवनपद्धतीतच अडकून पडलेला होता. त्यामुळे सरकारी नोकऱ्या तसेच ‘सुई पेट्रोलियम कंपनी’त बहुसंख्येने या मराठा समाजाने आपले बस्तान बसविले. बलुचिस्तानमध्ये गॅस सापडल्यानंतर १९५० च्या दशकात सुई पेट्रोलियम कंपनी सुई येथे सुरू करण्यात आली. सुरुवातीला कामगार, फोरमन म्हणून मराठा समाजाला तिथे कामे मिळाली आणि हळूहळू त्यांच्यापकी काहीजण मॅनेजर, सुपरवायझर अशा पदांवरदेखील पोहोचले. आज हा मराठा समाज काळाशी जमवून घेत स्वत:च्या कर्तृत्वावर प्रगती करतो आहे व सुखात नांदतो आहे, ही निश्चितच दिलासा देणारी गोष्ट आहे.
दुसरा साऊ किंवा साहू मराठा समाज (शाहू मराठा). मराठा युद्धकैद्यांपकी हा एकच वर्ग सुरुवातीपासून मुक्त होता. बुगटी प्रांत हा बराचसा कोरडा व वाळवंटी आहे. तेथे शेती केली जात नव्हती. बलुची टोळ्या या भटक्या होत्या आणि शेती करण्याचे कसब त्यांच्याकडे नव्हते. मॅरो तसेच सिआहफ या डेरा बुगटीजवळील काही भागात पाणी उपलब्ध होते. मराठा युद्धकैद्यांपकी ज्यांना शेतीचे चांगले ज्ञान होते अशांना बुगटी सरदाराने या भागात शेती करण्यासाठी अनुमती दिली; जेणेकरून बुगटी लोकांसाठी अन्नधान्याची तरतूद होईल. साहू मराठय़ांनी त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवला व अतिशय उत्तम प्रकारे शेती केली आणि बलुचिस्तानात प्रथमच शेतीचे तंत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गहू व बाजरी यासारखी धान्ये ते पिकवीत असत.
इतर बुगटी जमाती या त्यांच्या मूळ सरदारांच्या नावाने परिचित आहेत. उदा. रहेजा बुगटी जमातीचे ‘रहेजा’ हे नाव त्यांच्या रहेजा या पूर्वज सरदाराच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. तसेच या वर्गाने आपली स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी ‘शाहू’ हे नाव छत्रपती शाहूंच्या नावावरून धारण केले. शाहू मराठय़ांच्या गढवानी, रंगवानी, पेशवानी, किलवानी वगरे सात उपशाखा आहेत. या शाखा कशा तयार झाल्या, याबद्दलची माहिती मात्र अजूनही उपलब्ध नाही. परंतु ‘पेशवानी’ हे नाव पेशव्यांशी संबंधित असण्याची दाट शक्यता आहे.
शाहू मराठे जरी धर्माने मुस्लीम असले तरी त्यांच्या लग्नातील विधी अजूनही मराठीच पद्धतीने केले जातात. उदा. घाना भरणे, हळद, नवऱ्या मुलाची लग्नाअगोदरची आंघोळ, लग्नात उपरण्याला बांधली जाणारी गाठ बहिणीने पसे उकळल्यावरच सोडवणे, मानलेला भाऊ या पद्धती आजही त्यांच्यात अस्तित्वात आहेत. घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर झाडाला दोरा बांधणे, घरात एखादी नवीन वस्तू घेतली तर तिला सोन्याच्या दागिन्याने ओवाळणे, इ. पद्धती महाराष्ट्रात जरी आज लुप्त होत आल्या असल्या (केवळ काही ग्रामीण भागातच टिकून असल्या) तरी साहू मराठय़ांमध्ये अजूनही त्या प्रचलित आहेत. त्यांच्यामुळे काही मराठी शब्दही बलुची भाषेत आलेले आहेत. उदा.‘आई’ हा शब्द साहू मराठय़ांमध्ये आईला संबोधित करायला अजूनही वापरला जातो. मूळच्या बुगटी समाजानेही हा शब्द स्वीकारला आहे. स्त्रियांची काही मराठी नावे- कमोल (कमळ), गोदी (‘गोदावरी’चे संक्षिप्त रूप), गौरी, सबुला (सुभद्रा) अजूनही त्यांच्यात वापरली जातात. विनोदाची गोष्ट म्हणजे जसे मराठीत सुनीलचे ‘सुन्या’ असे टोपणनाव होते तसेच अजूनही साहू मराठय़ांमध्ये टोपणनाव ठेवले जाते. उदा. कासीम या नावाचे टोपणनाव ‘कासू’ असे केले जाते.
तिसरे- दरुरग मराठा! बुगटी मराठय़ांच्या तीन वर्गापकी हा वर्ग संख्येने सर्वात कमी आहे. हा वर्ग सुरुवातीपासून बुगटी सरदारांशी संबंधित होता व त्यामुळे त्यांना मोठा मान मिळत असे. आज या वर्गातले काही लोक मोठे जमीनदार आहेत. या समाजातील युवकांना शिवाजी महाराजांचा अभिमान आहे. बऱ्याच युवकांच्या फेसबुक प्रोफाइलवर शिवाजी महाराजांचा फोटो दिसतो.
या तिन्ही वर्गातील मराठी बांधवांनी इतर बुगटी जमातींपेक्षा शिक्षणात लवकर प्रगती केली. आज या समाजातील लोक इंजिनीअर्स, सरकारी अधिकारी, शिक्षक, प्रोफेसर व उच्चपदस्थ राजकारणी आहेत. त्यांची सांपत्तिक स्थितीही इतर बुगटी समाजापेक्षा चांगली आहे. १९९५ साली अकबर एस. अहमद (पाकिस्तानी राजनतिक अधिकारी व समाजशास्त्रज्ञ) यांनी लिहिलेल्या एका संशोधनपर निबंधातही या मराठा समाजाचा त्यांच्या पूर्वीच्या बुगटी मालकांपेक्षा अधिक उत्कर्ष झाल्यामुळे एकुणात बुगटी समाजात झालेल्या सामाजिक उलथापालथीची नोंद घेण्यात आली आहे.
सध्या डेरा बुगटी गावातील २०,००० लोकसंख्येपकी ३० टक्के म्हणजे ७००० लोक मराठा आहेत. तर सुई शहराच्या ८०,००० लोकसंख्येपकी दहा टक्के लोकसंख्या- म्हणजे ८००० लोक मराठा आहेत. सुई म्युनिसिपल कौन्सिलचे व्हाइस चेअरमन व डेरा बुगटी म्युनिसिपल कौन्सिलचे विरोधी पक्षनेते व १४ सदस्यांपकी सातजण हे मराठा सदस्य आहेत. इतर बुगटी जमातींप्रमाणे मराठा समाजाचा जिर्गादेखील आहे.
१९६० च्या दशकात सिल्विया मॅथेसन या ब्रिटिश लेखिकेने लिहिलेल्या ‘टायगर्स ऑफ बलुचिस्तान’ या पुस्तकात बुगटी मराठा समाजाचे उल्लेख आढळतात. लेखिकेचे पती सुई पेट्रोलियम कंपनीत नोकरीला होते. लेखिकेने बुगटी मराठा समाजजीवनाचे वास्तवदर्शी वर्णन या पुस्तकात केले आहे. मट्रा (‘मराठा’ शब्दाचा इंग्रजी अपभ्रंश) लोक रंगाने काळेसावळे, लहान उंचीचे आहेत आणि इतर बुगटी समाजापेक्षा वांशिकदृष्टय़ा भिन्न आहेत. या लेखिकेच्या म्हणण्यानुसार, या मराठा लोकांना १५ व्या शतकात हुमायून बादशहाला जेव्हा मीर चाकूर खान (बुगटी सरदार) याने दिल्लीजवळील युद्धात मदत केली त्यावेळेस बंदी बनवून गुलाम म्हणून येथे आणण्यात आले. परंतु हे साफ चुकीचे वाटते. कारण १५ व्या शतकात मराठा सन्य उत्तरेत गेले होते याबद्दलचे कुठलेही संदर्भ उपलब्ध नाहीत. याव्यतिरिक्त या पुस्तकात मराठा व पठाण गटांमध्ये झालेल्या दंगलीचे, तसेच दोन मराठा पोस्टमन रोज रात्री सुई ते डेरा बुगर्ट व पुन्हा परत असे ६० कि. मी. अंतर पायी कसे चालत जात, आणि एका मराठा गुलाम व्यक्तीने एका अवघड कडय़ावर चढून जाऊन आपल्या मालकाबरोबर लावलेली पज कशी जिंकली आणि त्या बदल्यात स्वत:ची गुलामगिरीतून कशी सुटका करून घेतली, याचे वर्णन केलेले आहे.
१९९० च्या दशकात जेव्हा िहदी चित्रपटांवर पाकिस्तानात बंदी नव्हती, त्यावेळेस डेरा बुगटी येथे ‘तिरंगा’ हा चित्रपट एका चित्रपटगृहात लागला होता. त्यात नाना पाटेकरांनी एका मराठी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. या चित्रपटात जेव्हा नाना पाटेकर ‘मैं मराठा हूँ. और मराठा मारता हैं या मरता हैं’ हा संवाद म्हणतात, त्यावेळी चित्रपटगृहातील या मराठा प्रेक्षकांनी हर्षांने शिट्टय़ा वाजवत एकच गोंधळ घातला होता. त्यामुळे या समाजाला स्वत:च्या मराठीपणाचा निश्चितच अभिमान आहे हे दिसून येते. बऱ्याच बुगटी मराठा बांधवांनी ‘द ग्रेट मराठा’ ही िहदी सीरियल इंटरनेटवरून डाऊनलोड करून बघितली.
बलुची कलाक्षेत्रातही या मराठा समाजाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. ‘बेबी डॉल’ हे प्रसिद्ध िहदी गीत ज्या बलुची गाण्यावर आधारित आहे, त्या गाण्याचे गायक सब्ज अली बुगटी हे मराठाच आहेत. सब्ज अली बुगटींचे मूळ बलुची गाणे यू-टय़ूबवर ऐकता येऊ शकते. जुन्या काळातील प्रसिद्ध बलुची गाणे ‘लवानी लला’ हे गीत गाणारे जाहरो बुगटी हेदेखील मराठाच होते. डम्बुरा या बलुची वाद्यावर बऱ्याच मराठा कलाकारांची चांगलीच हुकूमत आहे.
मात्र आज बुगटी मराठा समाज बुगटी जमातीमध्ये पूर्णपणे मिसळून गेला आहे. मध्यंतरी बराच काळ लोटल्यामुळे त्यांना मराठी भाषा, त्यांच्या पूर्वजांची नावे आणि इथल्या मूळ गावाचे नाव याबद्दल काहीच ज्ञात नाही.
एकंदरीने पानिपतावरील युद्धात झालेली हानी ही आपण समजतो त्यापेक्षा निश्चितच खूप अधिक होती. बहुसंख्य मराठा युद्धकैदी आणि त्यांच्या वंशजांना १८५ वष्रे त्यामुळे गुलामगिरीत दिवस काढावे लागले. आजवरच्या त्यांच्या पिढय़ांतील मराठय़ांची संख्या ही पानिपतात शहीद झालेल्या मराठा सनिकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त होईल.
बुगटी समाजाव्यतिरिक्त इतर बलुची समाजातल्या (र्मी, रायसानी वगरे) मराठा समाजाची आज काय स्थिती आहे, याची निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही. बलुचिस्तानात उन्हाळ्यात पारा ५०० से. च्या वर जातो. धुळीची मोठी वादळेही वारंवार होत असतात. अशा खडतर प्रदेशामध्ये टिकून राहून आपल्या पुढच्या पिढय़ांची उत्तम काळजी घेणाऱ्या आणि अद्यापही आपल्या मराठीपणाचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या या सहय़ाद्रीच्या कणखर मराठी समाजाचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. आजची बुगटी मराठय़ांची पिढी सुखात आहे. भारतातील मराठी समाजाने त्यांची दखल घ्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे.
सध्या बलुचिस्तान हा प्रांत पाकिस्तानी लष्कराच्या अमलाखाली आहे. भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंधही सध्या तितकेसे चांगले नाहीत. त्यामुळे बुगटी मराठा समाजाशी संबंध प्रस्तापित करणे तितकेसे सोपे नाही. भारतातील मराठी समाज या बुगटी बांधवांचे निश्चितच देणे लागतो यात दुमत नाही. जरी हा समाज स्वत:ला ‘मराठा’ म्हणवत असला तरी तो महाराष्ट्रातील केवळ ‘मराठा’ या जातीशी संबंधित नाही. कारण पानिपतात अठरापगड जातीचे सनिक व सरदार लढले होते. मराठीजन व महाराष्ट्र सरकार यांना या समाजाबद्दल माहिती मिळावी, या हेतूने केलेला हा लेखप्रपंच. भविष्यात आपल्यापासून दुरावलेल्या या मराठीजनांसाठी आपल्याला थोडेबहुत काहीतरी करण्याची इच्छा व्हावी, हीच त्यामागची अपेक्षा.

#तंजावरचं_मराठा_साम्राज्य_कायम_राखण्यात_मानाजीराव_जगतापांनी_मोठा_पराक्रम_गाजवलेला

 


#तंजावरचं_मराठा_साम्राज्य_कायम_राखण्यात_मानाजीराव_जगतापांनी_मोठा_पराक्रम_गाजवलेला
मराठेशाही साम्राज्य हे एकेकाळी प्रचंड पसरलेलं साम्राज्य होत. पण नंतर मुघलांचे आक्रमण, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता यामुळे हे साम्राज्य हळू- हळू कमी होत गेलं. या मराठेशाही साम्राज्यात अनेक संस्थान, अनेक प्रदेश सामील होते. त्यातलचं एक म्हणजे तंजावर संस्थान.
सध्या तंजावर तमिळनाडू राज्यातला एक प्रदेश आहे. पण त्याच्या कित्येक वर्ष आधी तो मराठा साम्राज्याचा भाग होता. मराठ्यांच्या शौर्याचं आणि अस्मितेचं प्रतीक असणाऱ्या संस्थानापैकी तो एक होता. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला येथे नायिकांची सत्ता होती. नंतर शहाजीराजांना हा भाग जहागीर म्हणून मिळाल्याने कालांतराने येथे मराठा सत्ता दृढ झाली.
त्यानंतर प्रचंड परसलेल्या साम्राज्यात वेगवगेळी संस्थान सरदारांना चालवण्यासाठी देण्यात आली. अश्या पद्धतीनं तंजावरच्या या मराठ्यांच्या गादीवर सुद्धा प्रतापसिंह महाराज सत्ताधारी झाले.
संस्थानाचा सगळा कारभार सुरळीत सुरु असतानाच, प्रतापसिंह महाराज यांचा इंग्रज अर्काटचे नवाब चंदासाहेब यांच्याशी मोठा संघर्ष सुरु झाला. कारण या दरम्यान ब्रिटिश सरकार हळू- हळू आपले हातपाय पसरत होतं. आणि इंग्रज अधिकाऱ्यांना तंजावरचा मध्यप्रदेशात सामावेश करायचा होता.
पण मराठा साम्राज्यातले सरदारही काही गप्प बसणारे नव्हते. त्यांनी इंग्रज अर्काटच्या नवाबासोबत युद्ध पुकारलं. या युद्धात रघुजी भोसले आणि फत्तेसिंह भोसले या मराठा वीरांनी चंदा साहेबाचा पराभव केला आणि त्याला कैद केले.
कित्येक दिवस हा नवाब मराठ्यांच्या नजरकैदेत होता. पण पुढे १७४८ मध्ये तंजावर मराठी साम्राज्यात हस्तक्षेप करणार नाही, या अटीवर सातरकर छत्रपतींनी चंदा साहेबांची कैदेतून सूटका केली. पण चंदासाहेबची सुटका ही तंजावरच्या मराठेशाही साम्राज्यासाठी धोक्याची घंटा ठरली.
कैदेतून सुटल्यानंतर चंदासाहेब आणखीनचं चवताळला. त्याने कर्नाटकात विध्वंस करायला सुरुवात केली. अर्काटचा नवाब अनवरुद्दीनचा पराभव केला. ज्यानंतर चंदासाहेबने तंजावरच्या प्रतापसिंह महाराजांना आव्हान दिलं. त्याने प्रतापसिंह यांना पैशांची मागणी केली, जी प्रतापसिंह महाराजांनी नाकारली.
तंजावरावर स्वारी करूनही चंदासाहेबला अपयश आलं. कारण यावेळी प्रतापसिंह महाराजांनी निजामचा मुलगा नासीरजंग आणि अर्काटचा नवाब अनवरुद्दीन खानाचा मुलगा नवाब मोहम्मद अली यांची मदत घेतली.
पुढे काय भडकलेल्या चंदासाहेबने आधी मदत करणाऱ्यांविरुद्ध युद्ध पुकारलं. त्याने फ्रेंचांची मदत घेऊन मोहम्मद अली विरुद्ध युद्ध पुकारले. पण दुसरीकडे मोहम्मद अलीने इंग्रजांची मदत घेतली. सोबतच आपल्याला साम्राज्याच्या मदतीला आले म्ह्णून छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी सुद्धा मोहम्मद अली यांची मदत करण्याचं ठरवलं.
छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी आपले सरदार मानाजी जगताप यांना मोहम्मद अली यांच्या मदतीला पाठवले.
मोहम्मद अली आणि चंदासाहेब यांच्यातला संघर्ष वाढतचं होता, याचाचं परिणाम म्हणून १७५२ च्या जून महिन्यात यांच्यात मोठे युद्ध झाले. यात मराठे सरदार मानाजी जगताप आणि चंदासाहेब यांच्यात लढाई झाली. आता चंदासाहेब कितीही खटाटोपी असला तरी मानाजी जगताप यांच्या शौर्यापुढे त्याच एक चाललं नाही. मानाजी जगताप यांनी चंदासाहेबचा पराभव केला आणि पकडून ठार मारले.
मानाजी जगताप यांच्या शौर्याची कथा प्रतापसिंह महाराज आणि मोहम्मद अली यांच्यापर्यंत पोहोचली. लढाईतल्या विजयामुळे मोहम्मद अली खुश झाला. त्याने तंजावर भागास १० वर्षांची खंडणी माफ केली. सोबतच कोईलाडू आणि यलंगाडू या दोन परगण्याची मानाजी राव जगताप यांना जहागीर दिली.
दरम्यान, मोहम्मद अली यांना या लढाईत मुरारराव घोरपडे आणि म्हैसूरचे नंदराज दलवाई यांनी देखील मदत केली होती. त्यामुळे मानाजी जगताप यांच्याप्रमाण आपल्याला देखील जहागिरी मिळायला हव्यात असं म्हणत घोरपडे यांनी त्रिचनापल्ली आणि नंदराज दलवाई यांनी श्रीरंगम ही दोन शहरे जहागिरी म्ह्णून मागितली.
पण या दोघांच्या या मागणीला मोहम्मद अली यांनी नकार दिला. ज्यामुळे घोरपडे आणि दलवाई यांनी मोहम्मद अली सोबतच मराठा साम्राज्य विरुद्ध खलबतं करायला सुरुवात केली. यासाठी फ्रेंच राज्यकर्त्यांची मदत घेऊन नवाब मोहम्मद अली यांच्याविरुद्ध युद्ध पुकारलं. सोबतच त्यांनी छत्रपती प्रतापसिंह यांचे दिवान सखोजी नाईक याला आमिष दाखवून फितूर केले. आणि हे एवढ्यावरचं थांबले नाही, त्यांनी सरदार मानाजीराव जगताप यांना बडतर्फ करण्यास भाग पाडले.
यावेळी १७५३ ते १७५४ या दोन वर्षात नानासाहेब पेशवे यांनी कर्नाटकात तीन वेळा स्वारी केल्या. यामागे पेशवे राज्यकर्त्यांचा विचार होता कि, श्रीरंगपट्टणला शह दिला कि, घोरपडे आणि म्हैसूरकर हे जेरीस येतील आणि तंजावरचे संकट दूर होईल.
पण तंजावर भागाच्या मदतीस महाराष्ट्रातून मदत आली नाही. उलट गुत्तीकर मुरारराव घोरपडे, म्हैसूरकर, नंदराज दलवाई आणि फ्रेंच यांच्या मदतीने घोरपडे यांचा संयुक्त फौजा तंजावरवर चालून आल्या.
यावेळी चंदासाहेब यांच्याविरुद्द विजय मिळवून देणाऱ्या सरदार मानाजी जगताप यांची बडतर्फी रद्द करून पुन्हा मराठा सैन्याचे नेतृत्व प्रतापसिंह महाराज यांना दिले. या लढाईत मानाजीराव जगताप यांनी मुरारराव घोरपडे यांना पराभूत केले.
लढाईत मानाजीराव जगताप यांनी मुरारराव घोरपडे यांना पराभूत केले आणि तंजावर मधून हाकलून दिले. तंजावर येथे आपले वखार मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार फ्रेंच आणि म्हैसूरकर यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला. हे सगळं झालं मानाजीराव जगताप यांच्यामुळे.
तंजावर येथे मराठा साम्राज्य कायम राखण्यात मानाजीराव जगताप यांनी मोठी भूमिका बजावली.
मात्र या लढाईनंतर प्रतापसिंह महाराजांना लगेचच बडतर्फ केले गेले. सोबतच मानाजीराव जगताप यांना सुद्धा बडतर्फ केले गेले. मात्र यामुळे तंजावर इथले मराठा साम्राज्य कोलमडून गेले. पुढे तंजावर हे संस्थान मराठा साम्राज्याच्या हातून गेले आणि इंग्रजांनी संस्थान पूर्णतः खालसा केले. आणि आज हे तामिळनाडू राज्यात आहे.
🚩 सरदार गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठान,सासवड महाराष्ट्र

## जगताप घराणे ##

 


## जगताप घराणे ##
"हरजी दादाजी जगताप "हे जगताप घराण्याचे मूळ पुरुष असून ते उत्तरेतून भरतपूर मधून दक्षिणेकडे आले असावेत . राजपूत असलेल्या या घराण्याचे मूळ नाव तुवर असे होते . जगताप घराण्याचे वंश आणि" तुवर" या घराण्याचा वंश एक असून गोत्र अत्रि .
गादी भरतपूर ,निशाण ढवळे, देवक उंबर आहे . राजा "अंगनपाळ" याने इ. स. ७३६ मध्ये दिल्ली स्थापन केली 'विग्रहराज्या" याने अंगनंपाळ याचा पराभव केला व दिल्ली काबीज केली
.ग्वाल्हेर ,भरतपूर इतरत्र हा राजवंश पांगला असावा असे वाटते" मान सिंग" (१४८६-१५१७)हा नावाजलेला राजा ग्वाल्हेर जवळील प्रांतात होऊन गेला . हरजी राजे फलटणजवळील झणझणे येथे सन १३३० मध्ये पाटीलकी करत असल्याचा पुरावा कागदोपत्री मिळाला आहे .
. याच शतकात म्हणजे सन १३३० मध्ये हरजी जगताप कऱ्हे काठावरील सरडी या गावी आले .येथे महादजी येसाजी कुटे पाटीलकी करीत होता. हरजी बरोबर एक व्यक्तीही आला होता तो' चौरे "घराण्याचा मूळ मुरुष होता त्याची समाधी सासवड येथील वटेश्वर मंदिराच्या पाठीमागे आहे
. हरजीनी कुटे कडून पाटीलकी खरेदी केली .तशेच' दाणे पिंपळगाव" (टाकमाईचे देवस्थान) येथील पाटीलकी मिळवली.
अशा रीतीने वरखेड ,सरडी , सदत,संवत्सर, दाणे पिंपळगाव, सनवडी या सहा वाद्य एकत्र करून त्यांनी सासवड वसवले . हरजी जगताप सिद्धेश्वर जवळच राहत होते . ते मयत झाल्यावर त्यांचे थडगे सर्व्हे ४९९ येथे बोरीच्या पटात बांधण्यात आले.
. . हरजी याना दोन मुले होती . हेमंत व नेमत तेही कर्ते मनुष्य निघाले असे दिसून येते . काही कागद पत्रातून असे दिसून येते." राजे मजकूर (हरजी राजे )यांचे पुत्र हेमंत नेमत जमीसदार कर्ते माणूस निघाले. त्यांचा मनसुबा गावची वस्ती वाढवावी सत्यावरून रुद्राजी,राघोजी,व काळोजी घराणे सध्याचे (वडसकर)वतनदार सहा गावचे रुद्राजी कर्ता भाऊपणा करून घेतला .करणे वडाखेलकर गुरव घराणे निम्मे पाटीलकी वडाखेलची आपल्यापाशी गहाण ठेऊन सदोसजी शिवाजी पटल्यास १०५ दिले व पाटीलकी अनुभवत होते. सहा गावचे साधन करून घेतले शिवार साधनात आणला .
" हेमंत यास मुलबाळ ना झाल्याने त्याचा वंश वाढला नाही . नेमत यास नरस पाटील व कान्हू पाटील हे वारसदार पुत्र झाले यादोघांनी शके १३२२ म्हणजेच सन १४०० मध्ये जमिनीचे नामकरण करून सासवड केलेले पाटीलकी करू लागले .
नरस पाटील पुन्हा आपल्या जुन्या गावी "झणझणे सासवड" या फलटण जवळील गावात निघून गेला. कान्हू पाटील याचे पुत्र माऊजी व रामजी पाटील हे होत . सन १४९६मध्ये सासवड गाव मौजे होता तो कसबा झाला .
कान्हू पाटलाचे रामजी पाटील यास बिदर च्या बादशहाने १२ गावची देशमुखी शिक्का करून दिला. त्यात पुणे गावची ४ गावे ,शिरवळ गावची ४ गावे ,सुपे गावची ४ गावे होती. मौजी नाईक जगताप यास खळद बेलसर,दिवे.मोढवे,राखुर्डी बांबूर्डी कारखेक कोरळी ,कोडीत बुद्रुक या ९ गावाची देशमुख राहिले. माऊजी पाटलांच्या फिरंगोजी या मुलास शंकराजी व मालजी असे दोन पुत्र होते
मालजीस अनाजी , गोदाजी ,राहुजी असे तीन मुलगे होते यापैकी गोदाजी जगताप हे शिवाजी महाराजांचे पराक्रमी सरदार होते त्यांच्याकडे १०००० फौजेची मनसबदारी होती .
गोदाजी जगताप यांचे सक्खे पुतणे राहुजी आणि खंडोजी हेही चुलत्या प्रमाणे १०००० फौजेची मनसबदारी असलेले सरदार होते पेशवाई मध्ये चमकलेले दिसतात .
माऊजी जगताप आणि रामजी नाईक जगताप यांच्या कालखंडात" एकनाथ "महाराजांचे परमशिष्य" नारायण गोसावी" हेसोपान महाराजांची सेवा करीत होते . त्यांना अलंकापुरीस मौजी बंधनासाठी मदत करावी म्हणून तळेगाव (ढमढेरे )येथील खंडोजी आणि रामजी पाटील याना पत्रातून लिहिले कि " स्थल विचारता तुमच्या सारखे नाईक सोडून कोणास न्ह्यावे .एकतरी कुलवंत जगताप राव तुमचा नामोस जैसा आमचा तसाच आहे . दुसरे आम्हाहुन तुम्ही सोपानदेवांची भक्तराज आहेत आणि महद पुण्यधिकारी आहात आप्त जाणवून तुम्हास हि विनंती लिहिले असे तीस रुपयांची भरती पाहिजे विनंती उदास न केली पाहिजे "
या पत्रावरून जगताप घराणे हे प्रमुख नामवंत घराणे हे प्रमुख नामवंत घराणे असे म्हणता येईल . बेलसरच्या लढाईत सासवडच्या पश्चिमेस असलेल्या पंढरीच्या ओढ्यात मुसलमानांशी लढताना धारातीर्थी पडलेले" सरदार नंदाजी जगताप हे नरस पाटील यांच्या वंशातील होते .
पहिल्या महायुद्धात पराक्रम करून जंगी इनाम मिळवणारे" नारायणराव सोपानराव जगताप ,"सुभेदार मेजर आसि . लेफ्ट ." गुलाबराव लक्ष्मणराव जगताप "सासवड नगरपालिकेचे भूतपूर्व नगराध्यक्ष" भाऊशेठ जगताप ",माधवराव पंढरीनाथ जगताप या कर्तबगार व्यक्ती"सरदार नंदाजी जगताप' यांचे वंशज होते .
कान्हू पाटीलदेशमुख यांचे वंशज "राधाकृष्ण खंडेराव जगताप देशमुख " "शंकरराव भगवंतराव देशमुख" (सुभेदार मेजर ) "सुभानराव देशमुख इत्यादी त्यांचे वंशज होते
".सरदार गोदाजी जगताप" यांचे वंशज "नानासाहेब नारायणराव जगताप होते." शंकरराव पांडुरंगजी जगताप" हे सरदार" खंडोजी जगताप "यांचे वंशज होते .
" सीताराम पाटील" हे" सरदार खंडोजींचे" सक्खे बंधू" आप्पाजी "यांच्या वंशातील होते
"भिकोबा नारायणराव जगता"प हे "शंकराजी यांचा मुलगा मानाजी" यांच्या वंशातील होते.
सासवड मधील सर्वात जुने घराणे म्हणून जगताप घराण्याचा उल्लेख करावा लागेल." जगताप" यांचे शिवकाळातील व पेशवाईतील क्षात्रतेज आजच्या पिढीला व सासवडच्या भूमीला निश्चितच भूषणावह आहे .यात कोणाचेही दुमत नसावे . या घराण्याने स्वराज्याच्या सुरवातीपासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत अनेक शूरांची आहुती दिलेली आहे . पुढील पिढीला त्यांचा उज्वल इतिहास नक्कीच प्रेरणादायी ,स्फुर्तीदायी आहे .
साभार - डाॅ . उदयकुमार जगताप

सन १७५८ मध्ये मराठ्यांनी सरहिंद, लाहोर, जिंकले.

 


सन १७५८ मध्ये मराठ्यांनी सरहिंद, लाहोर, जिंकले. अहमदशहा अब्दालीचा मुलगा तैमुर आणी सरदार जहानखान यांनी लाहोर सोडून पळ काढला. परंतु त्यांच्याजवळील अवजड तोफखाना व खजिना आणी दिल्ल्तीतील लुटीचा खाजींना त्यांनी तेथेच सोडून दिला. जाताना मात्र तैमुर ने आपला गुलाम तहमासखान यास गुलामगिरीतून मुक्त केले होते. तहमासखानाने मुक्त झाल्यामुळे लाहोरच्या वेशीचे दरवाजे उघडले. याच दरम्यान मराठा सरदार वीर मानाजी पायगुडे यांनी १० एप्रिल १७५८ रोजी लाहोरमध्ये पहिले पाउल टाकले. लाहोरमध्ये निधड्या छातीने पाउल टाकणारे ते पहिले मराठा शूर सरदार होते. तहमासखानाने आपल्या आत्मचरित्ररुपी तहमासनामा या ग्रंथात हि घटना स्पष्टपणे लिहून ठेवली आहे.
अब्दालीच्या सैन्याचा पाठलाग मराठ्यांनी चालूच ठेवला होता. मराठी सैन्य काही शांत बसले नव्हते. त्यांनी चिनाब, झेलम या मोठ्या नद्याहि ओलांडल्या. मराठ्यांनी रावळपिंडीही सर केले. मराठा फौजा सिंधू नदीच्या काठावर येऊन पोहचल्या. नदीच्या पलिकडच्या काठावर अटक किल्ला आहे. सध्या हा किल्ला पाकिस्तानात आहे. वायव्य सरहद्दीचे रक्षण करण्यासाठी १५८१ मध्ये अकबराने अटक बांधला होता. मराठी सैन्याने सिंधू नदीच्यावेगवान प्रवाहाचा अंदाज घेतला व नदीवर होडीचा पूल तयार करण्यात आला. मराठा फौज होडीच्या पुलावरून सिंधू नदी पार करून अटक किल्ल्यावर आल्या. किल्ल्यावर हल्ला करून अटक मराठ्यांनी काबीज केला. मराठा सैन्यानं अटकेपार झेंडा रोविला. मराठा साम्राज्याच्या इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला. १० ऑगस्ट १७५८
या मोहिमेमध्ये मराठा फौजेत त्यावेळी मानाजी पायगुडे, गंगाधर बाजीराव रेठरेकर, गोपाळराव गणेश, तुकोजी खंडोजी कदम, नरसोजी खंडोजी कदम, नरसोजी पंडित, साबाजी शिंदे,तुकोजी होळकर अशी मातब्बर सरदार मंडळी होते. या अटक मोहिमेचे नेतृत्व श्रीमंत रघुनाथराव पेशवे यांनी केले होते. बिपाशा नदीतीरावरून सड्या फौजा मानाजी पायगुडे यांच्यासह पुढे रवाना केल्या. पेशवे दफ्तर २७ / २१८ यामध्ये याबाबतचे पत्र उपलब्ध आहे

छत्रपती शिवाजी महाराज - २२

 


छत्रपती शिवाजी महाराज - २२
----------------------------
अंतिम काळ - कर्नाटक मोहिमेच्या अंतिम काळामध्ये त्यांनी भरघोस यश मिळवले असले तरी त्यांना दिङमूढ करणारी लढाई बेळगावच्या अग्नीला संपर्क किल्ल्याला वेढा देऊन झाली. सावित्रीबाई या विधवा स्त्री किल्लेदाराने तो किल्ला 27 दिवस लढवला व नंतरच हार पत्करली!
नबाब बहलोल खानाचा 23 डिसेंबर 1677 रोजी मृत्यूनंतर जमशेद खानाने विजापूरचा किल्ला आणि सिकंदर आदिलशहाला राजांच्या ताब्यात देण्याचे मान्य केले व त्यापोटी सहा लाख पागोडांची मागणी केली.
सिद्धी मसुदा त्याच्या हेरांकडून हे समजतात त्याने आजारी पडून मृत्युमुखी पडल्याची आवई उठवली. त्यांने आपल्या फौजेचे दोन भाग केले आणि एक भाग अडोनीला ठेवून चार हजाराची फौज जमशेद खानाकडे पाठवून त्यांना सांगितले की आमच्या राजाचा मृत्यू झालेला असल्यामुळे आम्हाला चाकरीसाठी ठेवून घ्या. त्याने ही फौज आपल्या चाकरीसाठी किल्ल्यात ठेवून घेतली आणि दोनच दिवसांत २१ फेब्रुवारी सोळाशे 78 रोजी जमशेदला ताब्यात घेऊन किल्ल्याचे प्रवेशद्वार उघडले आणि जिवंत सिद्दीचे स्वागत केले! अशाप्रकारे विजापूर सिद्धी मसूद च्या ताब्यात गेले. शिवाजी राजे बेलवाडी हून तुर्गळ मार्गे विजापूरच्या मार्गावर कुच करीत असताना ही बातमी समजली आणि ते पन्हाळ्यावर परत आले.
शिवाजी राजे कर्नाटक मोहिमेवर असताना संभाजी राजे यांना गोव्यातील पोर्तुगीज मुलुख काबीज करण्यासाठी पाठवले. फोंडा किल्ला शिवाजी राजांच्या ताब्यात होताच; आता संभाजीराजे यांनी त्याच्या अखत्यारीतील 60 गावांची पोर्तुगीजांकडे मागणी केली. पोर्तुगीजांनी ती नाकारली म्हणून पोर्तुगीजांवर हल्ला चढवला. त्यात संभाजी राजे यांना पराभूत व्हावे लागले. त्यानंतर मराठे नोव्हेंबर 1677 मध्ये दमण कडे गेले.
गोवळकोंडाच्या लष्कराने दिलेरखान आणि बहलोल खान यांचा सोळाशे 77 मध्ये पराभव केला. त्याचा फायदा घेऊन अनाजी दत्तो यांनी कानडी मुलखात छापे टाकले व हुबळीची लूट केली. सन सोळाशे अष्टयाहत्तर च्या जानेवारीत मोरोपंतांनी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक व मुघल मुलखात इतरत्रही लूट केली.
शिवाजी राजांनी मध्य आणि पूर्व म्हैसूर मध्ये मिळवलेले मुलुख स्वराज्याला जोडून घेण्यासाठी विजापूरच्या दक्षिण भागावरील कोपळ आणि पन्हाळा यांच्या दरम्यान चा धारवाड आणि बेळगाव भाग जिंकून घेणे आवश्यक होते. 3 मार्च 1679 रोजी कोपळ किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. आता हारपनहळ्ळी, रायदुर्ग, चितळदुर्ग, विद्यानगर आणि बुंदी कोटा हा संपूर्ण प्रदेश शिवाजी राजांच्या अंमलाखाली आला.
शिवाजी राजांच्या फौज्यांनी 1678 च्या एप्रिल मध्ये पैठण लुटले. तसेच शिवनेरी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. किल्लेदार राहुल अजीज खान याने मराठा फौजेला पराभूत केले आणि निरोप दिला की "मी किल्लेदार आहे तोपर्यंत तुम्हाला हा किल्ला कधीच जिंकता येणार नाही!" तर पकडलेल्या सैनिकांना त्याने भेटवस्तू देऊन सोडले!
पैसा दारूगोळा तोफखाना व फौज सर्व देऊनही शिवाजी महाराजांनी एखादा किल्ला अथवा लुटीतील काही हिस्सा न दिल्यामुळे चिडलेल्या कुटुंब शहाणे विजापूरकरांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी पंचवीस हजार घोडदळ आणि असंख्य पायदळ तयार केले. परंतु मुघल व मराठ्यांच्या कचाट्यात आणि अंतर्गत यादवीत वैतागलेल्या सिद्धी मसुदने शिवाजी राजांशी तह करण्याची तयारी दाखवून खलीता पाठवला की "आपण दोघांनी मिळून मुघलांना दख्खन मधून हाकलून लावलं पाहिजे."
या वाटाघाटींमुळे नोव्हेंबर 1677 च्या गुलबर्गा तहाचे उल्लंघन होत असल्याचे दिलेरखानाला समजताच तो संतप्त झाला आणि त्याने विजापूर वर आक्रमण करण्यासाठी कुच केले. त्यामुळे गोवळकोंडाच्या कुतुबशहाची योजना बारगळली.
शिवाजी राजांनाही आपल्या मागे आपल्या दोन युवराजांमध्ये तंटा होऊ नये म्हणून स्वराज्याची वाटणी करण्याचा विचार आला आणि त्यांनी दोन वारसांना स्वतंत्र करण्याचे ठरवले. संभाजी राजे अत्यंत तापट व मनस्वी स्वभावाचे असल्यामुळे त्यांना प्रशासनाचे धडे घेण्यासाठी राव केशव भट्ट उपाध्याय यांच्याकडे संगमेश्वर येथे त्या मुलखाचा सुभेदार करून व पेशव्यांचा मुलगा निळो मोरेश्वर यास सोबत दिवाण म्हणून पाठवले.
कर्नाटक मोहिमेवरून परतल्यानंतर शिवाजी महाराजांनी एप्रिल 1678 मध्ये वारस आणि विभाजन हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला. पिळदारिषरीयष्टीचे पराक्रमी बुद्धिमान संभाजी राजे कर्नाटकचा मुलुख सांभाळण्यासाठी योग्य व्यक्ती होती. म्हणून त्यांच्या मानाने फारच लहान वयाच्या राजारामांना महाराष्ट्रातील मुलुख द्यायची शिवरायांची इच्छा होती. अर्थातच संभाजी राजे यांना हे आवडले नव्हते त्यामुळे ते नाराज होते. याचा फायदा दिलेरखानाने घेऊन संभाजी राजे यांना मुघल फौजेच्या साह्याने त्यांचे देशावरची व कोकणातील वंशपरंपरागत मुलुख जिंकून देण्याचे वचन दिले.
संभाजी राजांना पाली इथे पाठवले होते. 13 डिसेंबर 1678 रोजी येसूबाईंना पुरुषी वेशात घोड्यावर बसवून संभाजी राजे निसटले आणि दिलेरखानाला जाऊन मिळाले. संभाजी राजे यांचा खलिता मिळताच दिलेरखानाने बहादुरगडावरून इखलास खान आणि धैरीयत खान यांना 4000 फौज घेऊन संभाजी राजे यांच्या स्वागतासाठी सुपे येथे पाठवले. स्वतः दिलेरखान करकंब जवळ येऊन भेटला. ही बातमी बादशहाला पाठवून बादशहाकडून संभाजी राजांना सात हजारी मनसबदार केले आणि राजा ही उपाधी दिली. आता त्याने विजापूर काबीज करण्यासाठी तयारी सुरू केली.
दिलेरखानाची कोण कोण लागताच सिद्दी मसुदने शिवाजीराजांकडे मदत मागितली. विजापूरच्या संरक्षणासाठी शिवाजी राजांनी सहा-सात हजारांचे घोडदळ पाठवले. परंतु या सैन्याला विजापूर हस्तगत करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यामुळे धूर्त सिद्दी मसुदने मराठ्यांच्या फौजेला किल्ल्याच्या आत घेतले नाही. तरीही ते छुपेपणाने किल्ल्याच्या आत जात होते. मसुद किल्ल्यात येऊ देत नाही हे पाहताच मराठा सैन्याने आदिलशाही मुलखात लुटालूट आणि खंडणी वसुली सुरू केले. अली रझाला कापून काढले आणि सिद्धी याकूतला जखमी केले. परंतु दुर्दैवाने किल्ल्यावरील तोफेतून सुटलेल्या गोळ्या मुळे सेनापती मारला गेला आणि मराठा सैन्य परत पळून आले. आता सिद्दीने दिलेरखनाशी तह केला आणि मुघल फौजेला विजापुरात आमंत्रित करून वेंकटाद्री मुरारी या सेनापतीच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या विरोधात फौज देऊन पाठवले.
दिलेरखानाने भोपळगडाकडे कोच केले. शिवाजी राजांनी हा किल्ला रसद व मालाच्या साठवणुकीसाठी बांधला होता. दोन एप्रिल 1679 रोजी नऊ वाजता भूपाळगडावरील हल्ला सुरू झाला आणि दुपारपर्यंत मुघलांनी गड ताब्यात घेतला. दोन्ही बाजूच्या सैन्याची प्रचंड कापाकापी झाली. मुघलांना भरपूर अन्नधान्य व इतर साहित्य मिळाले. शेजार मूलखांमधून आश्रयाला आलेल्या लोकांना गुलाम म्हणून नेले आणि शिबंदीतील वाचलेल्या 700 जणांचे एक एक हात तोडून सोडून दिले.
शिवाजी राजांनी किल्लेदाराच्या मदतीसाठी 16000 च घोडदळ पाठवलं होतं परंतु ते खूप उशिरा आले. नंतर त्यांनी इराझ खान आणि बाळाजीराव परांडाच्या वेढ्यातील लष्करांकडून रसद आणि इतर माल घेऊन येत होते त्या फौजेवर हल्ला चढवला. परंतु मदतीसाठी पाठवलेल्या इखलास खान याने खेड्याच्या तटबंदीत आश्रय घेऊन मराठ्यांचा हल्ला परतवून लावला आणि 1000 मराठ्यांना कापून काढले.
करकंब जवळ इराज खान सापडला आणि मराठ्यांनी त्याच्याकडचे अन्नधान्य व सामान लुटले.
यादरम्यान औरंगजेबाने येथील जनतेवर लावला होता. त्यालाही शिवाजी महाराजांनी (दरबारी नील प्रभुने लिहिलेले) विनम्र पणे पत्र पाठविले . सम्राट अकबर वगैरे बादशहांचे दाखले देऊन त्यांनी केलेल्या वैश्विक ऐक्याच्या कार्याचे गुणगौरव करून प्रखर विरोध केला. त्या पत्रावरून शिवाजी राजाच्या विविध पैलूंचे दर्शन घडते.
ऑगस्ट 1679 मध्ये दिलेरखानाने विजापूर वर स्वारी केली. सिद्धी मसुदने शिवाजी महाराजांना मदतीसाठी खलिता पाठवला आणि शिवाजीराजांनी विजापूरचे संरक्षण करण्यासाठी दहा हजार चे घोडदळ व दोन हजार बैलांच्या पाठीवर लादलेली रसद पाठवली.
७ ऑक्टोबर रोजी दिलेरखानाने विजापूरला जवळपास वेढले होते. दहा हजार घोडदळ व पायदळ घेऊन शिवाजी राजे ३० ऑक्टोबर रोजी सेलगुरला पोहोचले. ४ नोव्हेंबर रोजी राजांनी आपल्या फौजेच्या दोन तुकड्या करून दहा हजार घोडदळासह आनंद रावांना मुघल मुघलांवर धाडी घालण्यासाठी सांगोल्याकडे पाठवले आणि आपण मुसळा अल्मला मार्गाने कुच केले.
मराठ्यांचे सैन्य मदतीला येत असल्याचे पाहून दिलेरखानाने मसुद बरोबर तह करण्याचा प्रयत्न केला परंतु तो फसला. त्यामुळे त्याने 14 नोव्हेंबरला वेढा उठवून विजापूरकरांचा मुलुख लुटून उद्ध्वस्त करत मिरज पन्हाळा जिंकून घेण्यासाठी निघाला.
संभाजी राजे निसटले-
तिकोटा होनवाड तेलसंग मुलुख उध्वस्त करून दिलेरखान अथणी गावात पोहोचला. निष्पाप लोकांवर महिलांचे अत्याचार पाहून संभाजी राजे व्यथित झाले होते आणि मुघलांचा सेनापती व त्यांचे मतभेद झाले. अथणी बाजारपेठ लुटून गाव जाळून टाकले आणि तेथील हिंदु रहिवाशांची विक्री करण्याचे दिलेरखान्याने ठरवले. संभाजी राजे यांनी त्याला हरकत घेतली परंतु दिलेरखानाने जुमानले नाही. 21 नोव्हेंबर रोजी अथणी सोडून दिलेरखान ऐनापुर येथे गेला. त्याला रस्त्यातच समजले की संभाजी राजे निसटून विजापूरला गेले होते. 20 नोव्हेंबर रोजी रात्री येसूबाईंनी पुरुषी वेश धारण करून संभाजी राजे सोबत दहा घोडेस्वार घेऊन महिलांच्या शिबिरातून निसटले आणि विजापुरी पोहोचले. आता दिलेरखान ही विजापूरला आला आणि त्याने शहराच्या सुभेदाराला लाच देऊन संभाजी राजेंना आपल्या ताब्यात द्यायला लावावे असा निरोप दिला. संभाजी राजांना याचा सुगावा लागताच शिवाजीराजांनी त्यांच्या सुटकेसाठी पाठवलेल्या घोडदळासोबत ते चार डिसेंबर रोजी पन्हाळ्यावर पोहोचले.
इकडे शिवाजी राजांनी मराठ्यांच्या सैन्याच्या दोन तुकड्या करून मुघलांचा प्रदेश जाळून लुटण्याचा सपाटा लावला होता. नोव्हेंबरच्या मध्यावर ते जालना येथे आले आणि मिटालट सुरू केली. परंतु जालना येथील व्यापारी पैसा अडका घेऊन जान मोहम्मद फकीर यांच्या मठात आश्रयाला गेले होते. (कारण शिवाजी महाराज अशा ठिकाणी जात नव्हते.) शिवाजी महाराजांच्या सैन्याला हे समजतच ते मठात शिरले व लुटालुट केली. त्या फकिराने त्यांना ड्युटी पासून परावर्तन केले परंतु त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे फकीराने शिवाजी राजांना शाप दिला असे सांगितले जाते.
चार दिवस जालना लुटून भरपूर सोने-चांदी जडजवाहीर व किमती सामान घेऊन मराठा सैन्य जालना येथून माघारी फिरले. मुघल अधिकारी रणमस्तखान याने या सैन्याच्या पिछाडीवर हल्ला केला. सिद्धोजी निंबाळकर यांनी त्याला थोपवले. तोपर्यंत औरंगाबाद येथून केसरी सिंग आणि सरदारखान या सेनापतींची मोठी फौज आली. त्या फौजेचा तळ शिवाजी महाराजांपासून सहा मैलावरच होता. केसरी सिंगाने राजांना निघून जाण्याची इशारत दिल्यामुळे बहिर्जी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राजे आणि त्यांची मराठा फौज तिथून निसटली. 22 नोव्हेंबर रोजी शिवाजी राजे पट्टागडावर पोहोचले तेव्हा त्यांना बरीचशी लूट गमवावी लागली होती. शिवाय त्यांचे 4000 घोडेस्वार मारले गेले आणि हंबीरराव जखमी झाले होते. थकलेल्या फौजेने काही दिवस विश्रांती घेऊन डिसेंबर मध्ये राजे रायगडावर गेले.
कोकणात मराठ्यांची नव्या दमाची बारा हजार फौज होती. त्यांनी 26 नोव्हेंबर रोजी राजापुरात जाळपोळ केली आणि तिथून ते बुऱ्हानपुराकडे निघाले व बेत बदलून मलकापूर कडे कुच केले. तर मराठ्यांच्या एका तुकडीने नोव्हेंबर अखेर धरणगाव चोपडा आणि इतर गावे लुटून तिथे जाळपोळ केली.
डिसेंबर अखेरीस शिवाजी राजे रायगडावरून संभाजी राजे यांना भेटण्यासाठी पन्हाळ्याला आले व संभाजी राजेंची चर्चा केली. महाराजांबरोबरच यावेळी इतरही अनेकांनी संभाजी राजांची चर्चा केल्या. छत्रपतींनी संभाजी राजेंना खजिना व इतर अनेक तपशील दाखवले आणि संभाजी राजेंना कसोटीवर उतरण्याचे आवाहन केले.
छत्रपती शिवरायांचा अंत-
संभाजी राजे यांची भेट घेऊन शिवाजी राजे रायगडावर परतले तरी त्यांची शरीर प्रकृती खालावत चाललेली होती. भरीस भर राणी वर्षात आणि मंत्रिमंडळात कारस्थाने आणि प्रतिकारस्थाने सुरू होती. 23 मार्च 1680 रोजी राजांना ताप आला आणि रक्ताचे जुलाब होऊ लागले. सर्व उपचार होऊनही राजांच्या प्रकृतीत आराम पडत नव्हता; उलट राजे खंगत चालले होते. आता राजेंनी सरदारांना आणि अधिकाऱ्यांना काही अधिकार दिले. चैत्र पौर्णिमे दिवशी दिनांक 4 एप्रिल 1680 रविवारी शिवाजी राजे यांची प्राणज्योत मालवली.
(राजांच्या निधनानंतर राज्यांवर विष प्रयोग झाल्याची कुजबूज सुरू झाली आणि संशय सोयराबाईंवर घेतला जात होता. तथापि याआधीही राज्यांवर सातारा येथे विष प्रयोग झाला होता. त्यामुळे या वेळीही विष प्रयोगात झाला असावा आणि तो सोयराबाईंनी नाही तर अष्टप्रधानांपैकी अनेकांनी राबवला असावा व खापर सोयराबाईंच्या माथ्यावर फोडले असावे असे माझे वैयक्तिक मत आहे.)
दिलीप गायकवाड.
२१-०४-२०२४.

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...