विनोद जाधव एक संग्राहक

Monday 31 October 2022

कदम इंद्रोजी

 


कदम इंद्रोजी -
कदम घराण्यांतील एक शाखेंत कंठाजी कदमाच्याच काळांत इंद्रोजी कदम या नांवाचा एक प्रख्यात मराठा सरदार होऊन गेला. हा सातारा जिल्ह्यांतील साप गांवचा राहणारा असून, आपल्या पराक्रमाच्या जोरावर फार योग्यतेस चढला होता. शाहू महाराज दक्षिणेंत येऊन त्यांनीं सातारा येथील छत्रपतींच्या गादीवर आरोहण केलें त्यावेळीं इंद्रोजी कदम याचें प्राबल्य महाराष्ट्रामध्यें इतकें होतें कीं त्याचें नांव केवळ कर्दन काळासारखें वाटत होतें. त्याच्या शौर्यप्रभावाप्रमाणें त्याचें वैभव व थाटहि फार मोठा होता. त्याच्या जवळ ७०० निवडक सैन्य असून घोडेस्वारहि बरेच होते. तो आपल्या शौर्यप्रभावाच्या योगानें इतका गर्विष्ठ व प्रमत्त झाला होता कीं, त्यास आपल्यापुढें सर्व जग तुच्छ दिसत असे. एवढेंच नव्हे तर त्यानें आपल्या पागेंतील खाशा घोड्यांस रुप्याचे नाल लावून, असा हुकूम सोडला होता कीं, हे रुप्याचे नाल पागेंतील लोकांनीं न घेतां, शत्रूच्या हद्दींत पडूं द्यावे व ते परक्या लोकांनीं पाहून आपल्या वैभवाचें कौतुक करावें. एके वेळीं शाहू महाराजांच्या कानांवर इंद्रोजी कदम याच्या गर्विष्ठपणाची हकीकत सादर झाली. तेव्हां त्यानीं मुद्दाम त्यास निमंत्रण करून सातार्यास बोलाविलें. इंद्रोजी कदम मोठ्या थाटानें आपल्या सैन्यानिशीं सातारा येथें आला व आदितवार पेठेंतील माळावर तळ देऊन राहिला. त्यानें शाहू महाराजांस असा निरोप पाठविला कीं, ''तुमचे पेशवे मुख्य प्रधान तुम्हांस भेटावयास आले म्हणजे लष्करच्या नौबदी व नगारे बंद करितात, त्याप्रमाणें मी करणार नाहीं. मी माझ्या सर्व इतमामानिशीं डंकेनौबदी वाजवीत तुमच्या भेटीस येईन.'' शाहूमहाराजांनीं त्याप्रमाणें त्यास परवानगी दिली व त्याची रंगमहाल राजवाड्यांतील मुख्य दरबारांत भेट घेण्याची योजना केली. इंद्रोजी कदम यास आपल्या वैभवाचें प्रदर्शन करण्याची फार हौस असल्यामुळें, तो आपल्या सर्व सैन्यास कडीतोडे घालून व आपण स्वतः नाना प्रकारचे रत्नालंकार परिधान करून शाहूमहाराजांचे भेटीसाठीं नगारे व नौबदी वाजवीत राजवाड्यांत आला. शाहूमहाराजांस त्याचा हा डामडौलपणा पाहून फार तिरसकार वाटला. परंतु त्यांनीं तो व्यक्त न करतां, मुद्दाम त्याचा गर्वपरिहार करण्याच्या उद्देशानें आपलें स्वतःचें जडजवाहीर व रत्नालंकार आपल्या खंड्या कुत्र्याच्या अंगावर घातले आणि आपण अगदीं साधा सफेत पोषाख घालून दरबारास आले. इकडे इंद्रोजी कदम मोठ्या थाटानें व दिमाखानें आपल्या रत्नालंकारांचें प्रदर्शन करीत शाहूमहाराजांच्या भेटीस आला. त्याची अशी कल्पना होती कीं, शाहूमहाराजांच्या दरबारांतील अष्टप्रधान व उमराव हे माझें बहुमूल्य जवाहीर पाहून दिपून जातील आणि खुद्द शाहूमहाराज माझें वैभव पाहून खालीं मान घालतील. परंतु दरबारांत प्रवेश करितांच सर्व सरदार लोक व खुद्द शाहूमहाराज यांचा साधेपणा व शुभ्र पोषाख पाहून त्यास फार आश्चर्य वाटलें, व खंड्या कुत्र्याखेरीज दुसर्या कोणाच्याहि अंगावर अलंकार नसलेले पाहून तो मनांत फार ओशाळला व लज्जित झाला. आणि शाहूमहाराज छत्रपति हे केवळ अवतारी पुरुष आहेत, त्यांचा मी विनाकारण अपमान करण्याची पापबुद्धि मनांत धरिली, असा पश्चात्ताप पावून त्यानें शाहूमहाराजांच्या पायांवर डोई ठेविली आणि त्यांची क्षमा मागितली. शाहूमहाराजांनीं क्षमा करून त्याचा योग्य आदरसत्कार केला. इंद्रोजी कदम यानें शाहूमहाराज यांस सोन्याच्या मोहरांचें सिंहासन करून त्यांजवर बसविलें व आपल्या जवळचें जडजवाहीर त्यांस अर्पण केलें. महाराजांनीं त्यास व त्याच्या पदरच्या लोकांस मोठी मेजवानी देऊन पोषाख बक्षीस दिले. तेव्हांपासून इंद्रोजी कदम याचें नांव सातारच्या दरबारांत फार प्रसिद्धीस आलें. शाहूमहाराज मनुष्याची परीक्षा करण्यांत कसे चतुर असत व दुसर्या कोणाचाहि गर्व कसा युक्तीनें परिहार करीत ह्याची ह्या आख्यायिकेवरून साक्ष पटते. इ.स. १७३७ (मार्च) मध्ये बाजीराव साहेबांनीं झील तलाव (दिल्ली) येथें दिल्लीकर मोगलांचा जो पराभव केला, त्या लढाईंत ''इंद्रोजी कदम यांसी बोटास गोळी लागोन दोन बोटें उडोन गेलीं.'' या वेळीं इंद्रोजी हा राणोजी शिंदे यांच्या हाताखाली सरदार होता. पुढें रामराजे यांनां बार्शी पानगांवहून आणविण्याकरितां जी पेशव्यांची विश्वासाची मंडळी गेली होती. तीत इंद्रोजीहि होता (जानेवारी १७५०) (इ.सं. ५.७; म.रि.म.वि.).

माणकोजी बोधले महाराज


 माणकोजी बोधले महाराज
श्रीक्षेत्र धामणगाव दु. ता.बार्शी जि.सोलापुर येथील संत माणकोजी बोधले महाराज यांनी बोधलिलांबरी ग्रंथ/बखर लिहिला यात "मराठा कुळ" असा संदर्भ येतो. माणकोजी महाराजांचा जन्म सरदार घराण्यात ई. स 1640 चा त्यांच्या वडिलांचे नाव भानजी जगताप असे होते. माणकोजी महाराज युद्ध प्रविण असुन त्यांच्या कमरेस 5 तलवारी असत.
बोधले हे सासवडचे मुळचे जगताप घराणे. धाणगावची दु. देशमुखी यांच्याकडे होती.तसेच सरदारकी सुद्धा होती.

माझे आजोळ " लोभाजी निचळ-पाटलांची" कन्या "ममताई बाईसाहेब" माणकोजी बुवांच्या पत्नी होत.

आज धामणगावकर बोधले जगतापांचे नातेसंबंध रातंजणकर जाधव देशमुख (रातंजण परगण्यात 14 व्या शतकात प्रतिबालाजीची स्थापना केली) , काटिकर साळुंखे देशमुख, कौठाळीकर पाटिल, तसेच वैराग सरलष्कर निंबाळकर, पाटणकर, घोरपडे,तुळजापुरचे भोपे-कदम ई सोबत आहेत व हि घराणी ई. स 1600 च्या आधिपासुन बरीच पुरातन असुन आज जातीने 96 कुळी मराठा आहेत.

साभार मयूरजी देवकर (भोसले

राणी बायजाबाई शिंदे

 


राणी बायजाबाई शिंदे
आताच्या काळामध्ये ग्वाल्हेरच्या शिंदे (सिंधिया) घराण्याची राणी असं म्हटलं की डोळ्यासमोर राजमाता विजयाराजे सिंदिया यांचं नाव आणि प्रतिमा येते. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी भारतीय राजकारणात बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे त्यांचं नाव आपल्याला माहिती असतं. 'राजमाता' या त्यांच्या ओळखीमुळे त्यांची ग्वाल्हेरची राणी ही प्रतिमा आपल्या डोळ्यात येते.

पण आपण इथं ग्वाल्हेरच्या एका वेगळ्या राणीची माहिती घेणार आहोत. ती राणी म्हणजे बायजाबाई शिंदे.

या आजच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील होत्या. कागलच्या या मुलीने केवळ शिंदे घराण्याची सून म्हणून नाव कमावलं नाही तर अत्यंत दोलायमान राजकीय स्थितीत ग्वाल्हेर संस्थानचा कारभार पाहिला. बायजाबाई शिंदे यांच्या कर्तृत्वाचं वर्णन अनेक देशी-विदेशी इतिहास अभ्यासकांनी केलं आहे.

घाटगे घराण्याचा ग्वाल्हेरशी संबंध कसा आला?
कागल येथिल देशमुखी घाटगे घराण्याकडे होती. या घराण्यातील एक शूर पुरुष सखाराम म्हणजेच सर्जेराव घाटगे हे परशुराम पटवर्धन यांच्याकडे सरदार होते. पटवर्धन यांच्यासोबत त्यांचे पुण्यात येणे-जाणे होऊ लागले.
सर्जेराव घाटग्यांचे गुण पाहून त्यांनी पुण्यातच राहावे अशी विनंती नाना फडणवीसांनी केली आणि घाटगे पुणे दरबारातच रुजू झाले.
पुढे सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर दुसरे बाजीराव पेशवेपदी आले तेव्हाच्या काळामध्ये महादजी शिंदे यांचे दत्तकपुत्र दौलतराव शिंदे यांच्याशी सर्जेराव घाटग्यांचा संपर्क आला.

सर्जेराव घाटगे यांच्या मुलीशी दौलतराव शिंदे यांनी विवाह करावा असा प्रस्ताव दुसऱ्या बाजीरावांनी मांडला. ही कन्या म्हणजेच बायजाबाई शिंदे होय. त्यानंतर शिंदे यांच्या दिवाणपदावर सर्जेराव घाटगे यांची नेमणूक झाली आणि मार्च 1798 मध्ये बायजाबाई घाटगे आणि दौलतराव शिंदे यांचा विवाह झाला.

शिंद्यांच्या दरबारातील वाढत्या वजनामुळे अप्रिय झालेल्या सर्जेराव घाटग्यांची आनंदराव नावाच्या एका सरदारांनी आणि मानाजी फाकडे यांच्या मुलाने 1810 साली हत्या केली.

दत्तात्रय बळवंत पारसनिस यांनी महाराणी बायजाबाई शिंदे या नावाने 1902 साली एक चरित्र प्रसिद्ध केलं आहे. या पुस्तकात या सर्व घडामोडींचे वर्णन केलं आहे. पारसनिसांचं पुस्तक मुंबईच्या बाबाजी सखाराम आणि कंपनीने प्रकाशित केलं होतं.

दक्षिणेची सौंदर्यलतिका
बायजाबाई शिंदे दिसायला अत्यंत सुंदर आणि सुस्वरुप होत्या असं वर्णन अनेक इतिहासलेखकांनी केलं आहे. इंग्रज लेखकांनी तिला ब्युटी ऑफ डेक्कन (दक्षिणेची सौंदर्यलतिका) असं म्हटलं आहे.

द. बा. पारसनीस यांनी लिहिलेलं बायजाबाई यांचं चरित्र

बायजाबाई शिंदे ग्वाल्हेरला गेल्यावर त्यांचा सर्व कारभारात वावर असे. शिकारीमध्येही त्या सहभागी होत. भाला फेकणे, बंदुकीने शिकार करणे, घोडेस्वारी अशा सर्व कलांमध्ये त्या निपुण होत्या.

दौलतराव शिंदे यांचा 1827 साली मृत्यू झाला. तत्पुर्वी आपला राज्यकारभार बायजाबाई शिंदे यांनीच सांभाळावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे बायजाबाई शिंदे यांच्याकडे ग्वाल्हेरच्या सर्व कारभाराची सूत्रं आली.

राज्यकारभार आणि हिंदुराव घाटगे
1810 साली सर्जेराव घाटगे यांचं निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा राजा हिंदुराव (मूळ नाव जयसिंगराव) ग्वाल्हेरला येऊन राहिला. हे हिंदुराव दौलतराव शिंदे यांच्याबरोबर काम करू लागले. हिंदुराव घाटगे यांचं ग्वाल्हेरच्या दरबारात मोठं प्रस्थ तयार झालं.

दौलतराव शिंदे यांचा मृत्यू झाल्यानंतर बायजाबाईंनी शिंदे घराण्यातील मुकुटराव नावाच्या पुत्रास दत्तक घेऊन राजगादीवर बसवलं आणि त्यांचं नाव जनकोजी असं ठेवण्यात आलं.

त्यानंतर बायजाबाई यांनी आपला भाऊ हिंदुराव, बापूजी रघुनाथ, यशवंतराव दाभाडे, यशवंतरावभाऊ बक्षी, लालाभाऊ, फकीरजी गाढवे, माधवरावपंत ब्रह्माजी, लक्ष्मणराव विठ्ठल, रामराव फाळके, मणिराम शेट, दाजीबा पोतनीस, आत्माराम वाकडे या सरदारांच्या मदतीने आणि काही इंग्रज सैन्य अधिकाऱ्यांच्या मदतीने राज्यकारभार पाहायला सुरुवात केली.

बायजाबाई यांच्या राज्यकारभाराचं कौतुक अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालं आहे. 1 जुलै 1832 साली इंडिया गॅझेटमध्ये त्यांच्या वर्णनाबद्दल म्हटलं आहे, "The Regent Baee conducts the affairs of this state with great regularity, much better, I understand, than what was done in the time of late Maharaja" रिजंटबाई म्हणजेच बायजाबाई अत्यंत नियमितपणे कारभार चालवत असून दिवंगत राजे दौलतरावांपेक्षाही तो चांगला आहे, असं त्यात छापण्यात आलं होतं.

तर मिल्स हिस्ट्रीमध्ये बायजाबाई शिंदे या तेजस्वी, सत्वशील आणि कडक स्वभावाच्या होत्या असं म्हटलं आहे. मुंबई गॅझेटच्या पत्रकारांनी "बायजाबाई शिंदे यांचा कारभार पाहाता त्यांनी उत्तराधिकारी व्हावं हा दौलतरावांचा विचार किती बरोबर होता हे समजतं. त्या शांतता राखण्याच्या बाजूच्या होत्या", अशा आशयाचं वर्णन 1833 साली प्रसिद्ध केलं आहे. ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनीही बायजाबाईंना ज्ञानकोशात विशेष स्थान देऊन त्यांचं वर्णन लिहिलं आहे.

फोटो स्रोत,D. B. PARASNIS
बायजाबाई शिंदे आणि ग्वाल्हेरचा किल्ला
हिंदुराव घाटगे आणि बायजाबाई शिंदे
With thanks:
Mahesh Patil-Benadikar

जगदाळे घराणे ९६ कुळी मराठा घराणे


जगदाळे
"जगदाळे घराणे" हे मुळचे धार येथील राजे पवार यांच्या घराण्याची शाखा होय.पवार घराण्यापासून जगदाळे,निंबाळकर आणि पोकळे हि घराणी निर्माण झाली.


जगदाळे घराणे ९६ कुळी मराठा घराणे आहे.हे घराणे १६५९ पासून मराठा साम्राज्यात म्हणजेच स्वराज्यात समाविष्ट झाले.पानिपत च्या युद्धात गाजवलेल्या भीम पराक्रमासाठी हे घराणे प्रसिद्ध आहे.
अनुक्रमणिका
• १ घराण्याचा विस्तार
... • २ इतिहास
• ३ गणेशोत्सवाची सर्वात जुनी परंपरा
• ४ संदर्भ
घराण्याचा विस्तार
बहामनी काळापासून या घराण्याला सुमारे १६८ गावाची मसूर परगणा येथील देशमुखी होती.नंतर शिवशाही आल्यामुळे वतनदारी पद्धत बंद झाली आणि देशमुखी च्या ऐवजी जगदाळे घराण्याने सर-पाटीलकी स्वीकारली.मसूर परगण्यातीलच काही गावाची पिढीजात सर-पाटीलकी शिवाजी महाराजांकडे सुद्धा होती.त्यावेळी या घराण्याला मसूर,गराडे व दौंड-लिंगाळी येथील दीडशे गावांची सर-पाटीलकी मिळाली[१].जगदेवराव जगदाळे हे या घराण्याचे मूळ पुरुष समजले जातात.
इतिहास
मसूरच्या जगदाळ्यांनी आदिलशाहीची परंपरेनं चाकरी केली. अर्थात महाराजांना विरोध करणं त्यांना भागच पडलं. महादाजी जगदाळे हे तर शाही नोकर म्हणून अफझलखानाच्या सांगाती प्रतापगडच्या आखाड्यात उतरले. त्यात खान संपला. शाही फौजेची दाणादाण उडाली. महाराजांनी त्याचे हात तोडले. याच महादाजीला आठदहा वर्षाचा पोरगा होता. जिजाऊसाहेबांनी अगदी आजीच्या मायेनं या पोराला आपल्यापाशी सांभाळला[२]. त्याला शहाणा केला. तो स्वराज्याचाच झाला.
सरदार जगदेवराव जगदाळे,सरदार महादजी जगदाळे,सरदार मल्हारराव जगदाळे,सेनापती आबाजीराव जगदाळे,सरदार यशवंतराव जगदाळे,सरदार पिराजीराव जगदाळे असे अनेक पराक्रमी मराठा योद्धे या घराण्यात होऊन गेले.
सरदार यशवंतराव जगदाळे व सरदार पिराजीराव जगदाळे यांनी पानिपतच्या लढाईत भीम-पराक्रम गाजवला दत्ताजीराव शिंदे यांच्यासमवेत ते नजीबखान याच्या विरुद्ध बुराडीघाट च्या लढाईत लढले.शिंदे यांच्या बरोबरच या दोन सरदारांनी आपल्या प्राणाची आहुती या संग्रामात दिली[३].
गणेशोत्सवाची सर्वात जुनी परंपरा
या संदर्भातच १७३२ मधील नोंद उपलब्ध असून, गराडे या सासवडजवळील गावाची सर-पाटीलकी जगदाळे यांची होती.तर पोट-पाटीलकी थोरले बाजीराव पेशवे आणि त्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी विकत घेतली होती. ती नानासाहेब पेशवे यांनी पुरंदरे यांना देऊन टाकली. या पाटीलकीचे हक्क आणि मानपान याविषयी कलम असून, "गणेश गौरी पुरंदऱ्यांच्या पुढे व मागे जगदाळे यांच्या' असा स्पष्ट उल्लेख आहे.गराडेसारख्या गावातदेखील गणेश-गौरीची प्रथा पूर्वापार चालत होती आणि तेथेसुद्धा मिरवणुकीने मानाच्या क्रमांकासह प्रतिष्ठापना होत होती.वंश परंपरेनुसार पहिला मान जगदाळे यांना होता [४]
संदर्भ
1. ↑ जगदाळे कैफियत- मराठा इतिहासाची साधने
2. ↑ बाबासाहेब पुरंदरे - मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व
3. ↑ पानिपत- विश्वास पाटील आणि पेशवा दफ्तर
4. ↑ भारत इतिहास संशोधक मंडळ

सोमवंशी क्षत्रिय घराणे.

 


सोमवंशी क्षत्रिय घराणे.
महाराष्ट्रातील सोमवंशी घराण्याचा मुळ उगम पुरुरवा यांचा होय. सोमवंशी क्षत्रिय घराणे हे वंशसुचक आडनाव धारण करतात. राजपूत क्षत्रिय च्या ३६ मुळ शाखा असून क्षत्रिय सोमवंशी हे नऊ शाखेत विभागले गेले आहेत. त्यातील एक मुख्य शाखा प्रतापगढ ( उ.प्र )
येथील अत्रय गोत्र ही होय. या प्रतापगढचा उल्लेख रामायण व महाभारतात आढळतो.
प्रतापगढ येथील क्षत्रिय सोमवंशी घराणे १६२८ ते १६८२ साली नावारुपाला अाले. प्रताप बहाद्दूर यांच्या नावावरून याला प्रतापगढ नाव पडले.पुढे हे प्रतापगढ संस्थान म्हणून उदयास आले व १९४९ ला भारतात विलीन झाले.
या सोमवंशी घराण्यात आनेक पराक्रमी व कर्तबगार पुरुष जन्माले आले.
बाजीराव पेशवे यांना उत्तरेकडील मोहीमेत या सोमवंशी घराण्याचा सबंध अाला.
या सोमवंशी घराण्यातील दावलजी सोमवंशी याने बाजीराव पेशवे यांना अत्यंत महत्वाची अशा पालखेडच्या लढाईत साथ दिली.पालखेडची लढाई व त्यानंतर निजामाशी तह यात मराठ्यांच्या इतिहासता महत्वाच स्थान आहे.ही लढाई बाजीरावाच्या युध्दनेतृत्वाचा एक महत्वाचा पैलू होता. यात आनेकांचा सहभाग असलातरी दावलजी सोमवंशी याचा कार्यभाग ही महत्वाचा.
याच सोमवंशी घराणंयातील शाखा मौजे जावळे येथे आहे.
सोमवंशी जाहागिरदार म्हणून हे आळखले जातात.
यांचा राहता वाडा म्हणजे एक भव्य गढीच होय.
हे सोमवंशी जाहागिरदार यांनी सन १८५७ साली जावळ्याची जहागिरदारी चांगली गाजलीच.
१८ व्या शतकापूर्वीचा सोमवंशी जहागिरदार वाडा याची साक्ष देत आजही येथे भक्कमपणे उभा आहे. जवळे येथील पद्माजीराव यांना सन १८५७ च्या उठावानंतर दोन वर्षांनी म्हणजेच ३१ जानेवारी १८५९ साली इनामी जहागिरी मिळाली. यापूर्वी जवळे हे संस्थानशी जोडले गेले . पुणे व नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर हे गाव असल्याने राज्य कारभाराच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र म्हणूनच जवळे हे गाव पाहीले जायचे. जवळ्याच्या जहागिरदारांचा मुळ पुरुष दामाजीराव होय . मुलगा
पद्मजीराव यांना सरदेशमुखी मिळाल्यानंतर आनंदराव कृष्णराव सोमवंशी यांना २ एप्रिल १८७२ ला जहागिरी मिळाली. जहागिरदारांचा वाडा म्हणून ओळखला जाणारा ४ एकरावरील वाडा १८ व्या शतकापूर्वी बांधला असावा. जवळा गावाच्या उत्तरेला असणारा वाडा जहागिरदारीचे मुख्य कार्यालय होते. मुख्य दरवाजा रुंद, भव्य प्रवेशद्वार, शंभर मीटर लांब-रुंद असलेली ही कचेरी त्यावेळी होती. वाड्याच्या भेवती दार बुरुज भव्य होते ते आजही भक्कम आहेत. वाड्याच्या उजव्या बाजूला बुरुजातून मध्य भागातून खास एक तळघर पाडलेले आहे. या तळघराच्या भुयारातून जाता येत होते. पूर्व दिशेला नदी तर, दक्षिणेस कोर्टाची भिंत तर पश्चिमेला गुरांसाठी जागा होती. समोर घोड्यांचा पागा होता.

**शाहुपर्व**





 **शाहुपर्व**

अठरावे शतक हा काळ सांभाळला तो शाहूंनी, शाहूंचा सांभाळ केला नाही कोणी..सातार्यात बसून दिल्लीचे बादशहा बदलनारे शाहू छत्रपती, हयामधुन आपल्याला कळेल शाहुमहाराजांची सत्तेवर कशी पकड होती.
छ. शाहू महाराज यांच्या एवढा मुत्सद्दी राजा जगाच्या इतिहासात सापडणार नाही. १७ वर्षे शत्रूची कैद भोगून ४२ वर्षे एका खंडप्राय देशावर राज्य करण्याचे जगातील एकमेव उदाहरण म्हणजे थोरले शाहूमहाराज.
शाहूमहाराजांनी सर्वांचा मध्य साधत छत्रपती शिवरांयाच्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर केले आणि ते ही फक्त ४२ वर्षात. उगाच नव्हे रघुनाथ विनायक हेरवाडकर शाहूमहाराजांचा उल्लेख शिवाजीमहाराजांची सावली म्हणून करतात.शिवरायांची हीच व्यापक दूरदृष्टी पुढे सर्व छत्रपतींसाठी मोलाची ठरली.
कैदेतून सुटून येऊनही तत्कालीन भारतात शाहूंच्या केसालाही धक्का लावायची ताकद नव्हती कोणाची.
हीच ती ताकद जी शिवाजी महाराजांनी उभी केलेली आणि पुढे संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांनी सांभाळलेली.
औरंगजेबाच्या २७ वर्षांच्या अमानुष,दाहक हल्ल्यांने बेचीराख झालेल्या महाराष्ट्रात व विखुरलेल्या मराठ्यांच्यात आपल्या बुद्धीचातुर्याच्या आणि संघटन कौशल्याच्या बळावर विजिगीषू वृत्ती निर्माण करत छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्याला यशोशिखरावर घेऊन जाणारे छत्रपती थोरले शाहूमहाराज हे भारतातील आठराव्या शतकातील सर्वश्रेष्ठ शासक होते हे म्हणने गैर ठरणार नाही.राज्य उभारणी आणि राज्यविस्तार फक्त तलवारीच्या बळावरच होतो असे नाही तर त्यासाठी युद्धनिपुणतेबरोबरच उत्तम राजकिय जाण, कुशाग्र बुद्धीमत्ता, उत्कृष्ट कुटनिती, समससुचकता तसेच योग्य गुणसंचय असलेल्या लोकांचा सहभाग देखिल महत्वाचा असतो. कैदेतुन सुटुन येतानाच युद्धाची धामधुम करीतच निघाले ,यातुन त्यांचा मुलतः लढाऊ बाणा लक्षात येतो. त्यासमयी त्यांच्यासोबत पिलाजीराव जाधवराव,रायभानजीराजे भोसले,ज्योत्याजी केसरकर,रुस्तुमराव जाधवराव,क्रुष्णाजी राजेशिर्के आदी मंडळी होती.पुढे त्याना परसोजी भोसले व त्यांचे पुत्र येऊन मिळाले. खानदेशात सुजानसिंह राऊळ हे देखिल येऊन मिळाले.कंठाजी कदमबांडे, संताजी भोसले, राणोजी भोसले,कान्होजी भोसले आदी मराठा सरदार येऊन मिळाले. आणखी एक नोंद अशी सापडते,एका राजपुत राजाने देखिल व काही मुस्लिम सरदारानी देखिल प्रतिनीधित्व मान्य करुन येऊन मिळाले आणी विशेष या राजपुत राजाने सुरुवातीचा काही खर्चही स्वतः उचलल्याची नोंद मिळते.तसेच ८ ऑगस्ट १७०८ रोजी मराठा सरदार ज्योत्याजी केसरकर यास उत्तरेत पाठवुन मोगल प्रांतातील चौथ ,सरदेशमुखी च्या सनदाचे नुतनीकरण केल्याची नोंद सापडते.पुढे इ सन १७०९ साली आपल्या सरदाराना त्यानी एक पत्राद्वारे खास आदेश दिलेला आढळतो, "जा आणी मोगल प्रांतातुन चौथ व सरदेशमुखी वसुल करा आणी जर मोगल सरदार देत नसतील तर त्यांचे खजिने लुटा". हा आदेश असेच निर्देशीत करतो की,छत्रपती शिवाजी महाराजांपासुन चौथ व सरदेशमुखी कर मोगल प्रांतातुन वसुल केला जात असे व त्याबदल्यात तेथील संरक्षणाचे हमी घेतली जात असे. ही पऱपरा पुढे प्रत्येक छत्रपतींनी वंशपरंपरागत वसुल केली आणी पुढे तीच परंपरा शाहु महाराजांनी सुटुन आल्यानंतर लगेच चालु केलेली दिसुन येते.यावरुन छत्रपती शाहु महाराजांचे मनसुबे लक्षात येतात. पिलाजीराव जाधवराव हे रायभानजीराजे भोसले यांच्या म्रुत्युनंतर छत्रपती शाहु महाराज यांचे मुख्य सल्लागार व परराष्ट्रमंत्री व थोरले बाजीराव प्रधान व चिमाजी अप्पा यांचे गुरु होत !!! छत्रपती शाहु महाराज यानी जो मराठा स्वराज्याचा विस्तार करवुन घेतला यात स़िहाचा वाटा सुभेदार पिलाजीराव जाधवराव यांचा आहे.पिलाजींची तलवार थोर गाजली. फक्त तिची मांडणी योग्य झाली नाही इतिहासकारांकरवी.
राजा छत्रसाल यांना वाचवण्यासाठी जी लढाई झाली त्यात पिलाजीराव पुढे होते. त्या लढाईनंतरही उत्तरेत बऱ्याच मोठ्या लढाया त्यांनी मारल्या आहेत.
पोर्तुगीजांची तर त्यांनी पळता भुई थोडी केलेली.
समुद्रातून आंग्रे आणि जमिनीवरून पिलाजी, प्रचंड ससेहोलपट केलीय त्यांची या दोघांनी.
शाहूकाळ हा प्रचंड मोठा आणि अजून बऱ्याच जणांसाठी अभ्यासाचा विषय आहे. म्हणून परवा समुहावर एक पोस्ट केलेला आपण.
किमान १०० सरदारांची नावं या मंथनातून सापडली. या सर्वांचा कसून अभ्यास व्हायला हवा.
सर्वांचा पराक्रम आणि स्वराज्याप्रतीची निष्ठा मान्यच करायला हवी.
सगळं श्रेय एकाच्याच ओटीत टाकून विनाकारण कोणा एकाचा शक्तिमान करू नये एवढीच साधी विनंती.
छत्रपती शाहु महाराजांच्या काळातील त्यांच्या पदरी असलेल्या सरदारांची यांदी:-
--------------------------
धनाजीराव जाधव
पिलाजी जाधवराव
रायभानजी राजेभोसले
परसोजी भोसले
रुपाजी भोसलै
संताजी भो
थोरले बाजीराव प्रधान
बाळाजी विश्वनाथ
कान्होजी आंग्रे
मानसिंहराव मोरे
प्रतापराव मोरे
खंडो बल्लाळ
खंडेराव दाभाडे
हैबतराव निंबाळकर
संताजीराव भोसले
केरोजी पवार
तुकोजी पवार
सेनाखासखेल खंडेराव दाभाडे
सेनापती मानसिंग मोरे
रघुजी राजे भोसले
सरलष्कर सुलतानजी निंबाळकर
अबाजीपंत पुरंदरे
नारो शंकर
रायाजी प्रभु
राजजी थोरात
शहाजी निंबाळकर
महादजी क्रुष्णाजी नाईक
राजाज्ञा रंगराव उद्धव
पोतनीस महादेव
सावंतवाडीचे खेमसावंत
उदाजी चव्हाण
शंकरजी नारायण सचिव
परशुराम पंतप्रतिनिधी
बहिरोपंत पिंगळे
दत्ताजी थोरात
कान्होजी भोसले
रावजी जाधव
रुस्तुमराव जाधवराव किनगावकर
चिमणाजी दामोदर
राघोजी शिंदे
संताजी शिंदे
पिलाजी गायकवाड
अम्रुतराव कदमबांडे
त्र्यंबकराव दाभाडे
सिधोजी निंबाळकर
सिधोजी हिंदुराव घोरपडे
मुरारजी घोरपडे (दक्षिणची आघाडीचे सरदार)
शिवाजी दाभाडे
सेनाधुरंदर रघुजी भैसले नागपुरकर
भावसिंग ठोके
दलपतराव ठोके
कंठाजी कदमबांडे
बजाजी आटोळे
सिन्नरचा देशमुख कुँवर बहादुर
चिमजी अप्पा
सिदोजी पोळ
क्रुष्णराव शिर्के
संताजी जाधवराव
दमाजी निंबाळकर
शामजी बल्लाळ प्रभु
पंताजी शिवदेव
साबाजी भैसले
शहाजी निंबाळकर,त्रिंबकराव धायगुडे
कालोजी भोसले
दावलजी शिर्के
खंडोजी धुमाळ
होनाजी अंनत
राणोझी बंडगर
खंडोजी भोसले
योत्याजी केसरकर
देवजी सोमवंशी
काशीराव अनंत न्यायाधीश
माणकोजी व पदाजी बंडगर
चंद्रभान महाडिक
भिकाजीराव काकडे
रायाजी नलावडे
रणोजी काळभोर
संभाजी निकम
कुसाजी व येसाजी भोसले
मुरारजी शिंदे
विठोजी चव्हाण
खेलोजी भोसले
सिदोजी बाबर
मलारजी कानडे
खंडोजी काटे
महादजी जगदाळे
संभाजी पवार
चिमणाजी बाल्लाळ
हैबतराव शिंदे
सुभानजी पारटे
अमरस़िह शिर्के
सुभानजी खंडागळे
खंडोजी जगताप
मलोजी गाढवे
मदनसिंह भोसले
नेमाजी शिंदे
प्रातापरावबहादुर
नारायण ढमढेरे
जीवन हजारी
राणोजी निंबाळकर
क्रुष्णाजी पवार
होनाजी अनंत
दुर्गोजी महाडीक
खंडोजी जाधवराव
रेखोजी पांढरे
सुभानजी आटोळे
दौलतराव शिर्के
नवलोजी काटे
लखमोजी यादव
नागोजी धुमाळ
अंबाजी मोहिते
सखोजी वाघमोडे
विठोजी थोरात
दुर्गोजी भोईटे
राणोजी घोरपडे
यशवंतराव दाभाडे
सुभेदार सुभानराव मोरे
बाबुराव यशवंतराव दाभाडे
मानाजी पवार
जानोजी यादव
यमाजी शिवदेव
काळोजी बावणे
फिरंगोजी निंबाळकर
आनंदराव घाटगे
सुभानजी दरेकर
चिमणाजी दामोदर
कोंडजी यादव सोलसकर
क्रुष्णाजी आटोळे
बुवाजी पवार
जानोजी भोईटे
केशवराव धापटे
बाळाजी भोसले
खेत्रोजी शिंदे
नाईकजी कडु
सोमवंशी सरलष्कर
संभाजी घोरपडे
महिपतराव शिंदे
कान्होजी शिर्के
आनंदराव जगताप
जगनाथ चिंतामणी मुजुमदार
तुकोजी आटोळे
उदाजी व मानाजी पवार
तानाजी वाघमोडे
नरहरी राम
दावलजी सोमवंशी
आनंदराव सोमवंशी
रिम्बकराव सोमवंशी
आपाजी सोमवंशी
सरदार आनंदराव बर्गे
सरदार शंकराजीबर्गे
सरदार मनाजी बर्गे
सरदार अपाजी बर्गे
सरदार नावजी बर्गे
सरदार गणपतराव बर्गे
सरदार सामजी बर्गे
सरदार क्षेत्रोजीराव बर्गे
सरदार तुलाजी उर्फ़ तुळाजीराव बर्गे
सरदार खंडोजीराव बर्गे
सरदार सेखोजीराव बर्गे
सरदार राणोजीराव बर्गे
सरदार सखाराम बर्गे
सरदार बालोजीराव बर्गे
सरदार हैबतराव बर्गे
सरदार येसाजीराव बर्गे
सरदार सिदोजीराव बर्गे
सरदार साबाजीराव बर्गे
सरदार जानोजीराव बर्गे
सरदार सुल्तानजी बर्गे
सरदार त्रिम्बकजी बर्गे
सरदार गीरजोजी बर्गे
सरदार जानोजीराव बर्गे
सरदार बलवंतराव बर्गे
काळोजी पवार
कृष्णाजी पवार
तुकोजी पवार ( देवास थोरली पाती )
जिवाजी पवार ( देवास धाकटी पाती)
सरदार मनाजी पवार
सरदार ऊदाजी पवार
सरदार बाबुजी पवार
राजे यशवंतराव पवार ( पानिपतमध्ये खर्ची )
रायाजी जाधव
संताजी जाधव
तुलाजी जाधव
सरदार पांढरे (शरिफनमुलूक)घराणे
संताजी पांढरे
यशवंतराव पांढरे (शहामतमुलूक)घराणे
रत्नोजी पांढरे
रामराव पांढरे(समशेरबाहादर ) घराणे
लुयाजी पांढरे
नारायणराव पांढरे
गोविंदराव पांढरे
सरदार बंडगर (अमीर उल ऊमराव)घराणे
पदाजी बंडगर
माणकोजी बंडगर
हैबतराव बंडगर
(वजारतमाब)घराणे
राणोजी बंडगर
कामाजी बंडगर
खंडोजी बंडगर
दमाजी थोरात रूस्तूमराव
सुलतानजी थोरात
तावजी थोरात
खंडोजी थोरात
राजजी थोरात
लिंगोजी थोरात.
सरदार देवकाते (बळवंतराव)घराणे
सुभानजी बळवंतराव
धर्माजी बळवंतराव
चव्हाजी बळवंतराव
सेट्याजी बळवंतराव
मकाजी हटकरराव
सुभानजी हटकरराव
हंसाजी हटकरराव
सरदार आटोळे (धुरंधर समशेरबाहादर)घराणे
संताजी आटोळे
सुभानजी आटोळे (सेनाबारासहस्त्री)घराणे
बजाजी आटोळे
तुकोजी आटोळे (सफेजंगबाहादर) घराणे
सयाजी आटोळे(नागपूरकर सेनासाहेब सुभा रघोजी भोसले यांनी आटोळे सरदारांना आपला भाऊ मानलं होते.)
सरदार महारणवार (फतेजंगबाहादर)घराणे
सुभानजी महारणवार( सेनासप्तसहस्त्री )
शिवाजी महारणवार
जोगोजी महारणवार
सरदार वाघमोडे (सेनाबारासहस्त्री)घराणे
निंबाजी वाघमोडे
यमाजी वाघमोडे
सखोजी वाघमोडे
तानाजी वाघमोडे
सरदार कोकरे
भिकाजी कोकरे
सुलतानजी कोकरे
काशीराव कोकरे
सरदार धायगुडे
खंडोजी आढळराव धायगुडे
सिधोजी अभंगराव धायगुडे
संताजी सर्जेराव धायगुडे
सरदार करांडे
रघुजी करांडे
बापूजी करांडे
शिवाजी करांडे
सरदार हाके
मानसिंगराव हाके
खंडेराव हाके
सरदार सोनवलकर
आपाजी सोनवलकर
बिरोजी सोनवलकर
अस्रोजी सोनवलकर
सरदार खोमणे
सेट्याजी खोमणे
सरदार जनकोजी कोकणे
सरदार माणकोजी वायसे
सरदार होळकर
सुभेदार मल्हारराव होळकर
सरदार खंडेराव होळकर
गणोजी कोळेकर
विठोजी कोळेकर
सयाजी सिंगाडे
बहिर्जी व आम्रोजी सेंडगे
सखोजी रूपनवर
सेट्याजी रूपनवर
रायाजी लवटे
भीकाजी लवटे
धुळोजी लवटे
बहिर्जी खताळ
सरदार मानाजी सेळके
सरदार शिवाजी शेळके
सरदार नेमाजी शिंदे
सरदार पिलाजी बेलदार
सरदार बाजी ढोणे
सरदार धुळोजी सुळ
सरदार संताजी चितळकर
सरदार पुंजाजी गाढवे
सरदार सेट्याजी टेंगले सेनासप्तसहस्त्री
सरदार यशवंतराव वोलेकर
(प्रशांत लवटे पाटील यांची आजी या घराण्यातील आहे.)
सरदार जोगोजी उघडे
सरदार संताजी वाघ( पानिपतच्या लढाईत अंगावर पन्नासहून अधिक जखमा झेलून वीरमरण.होळकर घराण्याशी थेट नातेसंबंध चालू होता.)
सरदार विठोजी बुळे
सरदार सुलतानजी लांबहाते
सरदार अगाजी सरगर
सरदार होनाजी पारखे
सरदार गिरजोजी माने
यशवंतराव जाधवराव
मानसिंग जाधवराव माहेगावकर
संभाजी जाधवराव वाघोलीकर
सटवाजी जाधवराव वाघोलीकर
यशवंतराव जाधव परिंचेकर
लक्ष्मणराव जाधवराव किनगावकर
विठोजीजाधवराव
निळकंठराव जाधवराव
काळोजी जाधवराव
ज्योगोजी जाधवराव
रखमाजी जाधवराव
मानाजी जाधवराव
सरदार आबाजीराव जगदाळे:
शाहू छत्रपतींच्या आदेशावरून सरदार आबाजीराव जगदाळे (वय ७३) यांनी निजामाविरुद्ध १७४२ साली बेलूर मोहीम काढली , त्यावेळी त्यांनी महादजी शिंदे (वय ११) यांना मांडीवर बसवून मोहिमेस नेले ...(संदर्भ: शिंदे दफ्तर)
(क्रमश:)
( ही प्राथमिक यादी आहे, यात काही नावं राहिली असण्याची शक्यता आहे. आणि काही नावं थोडी संदिग्ध असण्याचीही शक्यता आहे. तर नजरचुकीने काही नावे दोन वेळा येण्याची शक्यता आहे.यादी वाचून काही बदल सुचवायचे असतील तर ते कमेंटमध्ये सुचवावेत. त्यांचा योग्य तो विचार नक्कीच केला जाईल.शाहूंच्या काळात एखाद दुसर्या गावच्या मोकासदारापासून ते शेकडो महाल परगण्यांचा मोकासा पदरी बाळगणार्या लहान थोर सरदारांची संख्या शेकड्यात नव्हे तर हजारांत जाईल.)

संदर्भ:-
*शाहु दफ्तर खंड-१.
*सरदार पिलाजी जाधवराव :व्यक्ती आणि कार्य.
*रणझुंजार पिलाजी जाधवराव पत्ररुप इतिहास.
*हटकर सरदारांची यादी श्री संतोष पिंगळे सर यांच्या सौजन्याने( पराक्रमी हटकर सरदार घराण्यांचे इतिहास अभ्यासक)

#शाहुपर्व
#जागर_इतिहासाचा.

फोटो साभार विशाल बर्गे

रामचंद्र गणेश कानडे

 


रामचंद्र गणेश कानडे -
उत्तरपेशवाईंतील एक प्रसिद्ध सेनापति व मुत्सद्दी. शाहूनें याला इनाम दिलें होतें. नाना, साहेब व थोरले माधवराव यांच्या कारकीर्दीत कर्नाटक उत्तरहिंदुस्थान वगेरे हिंदुस्थानच्या सर्व भागांत यानें अनेक मोहिमा व कामगिर्या केल्या. याचें लढाईचें शिक्षण सदाशिवरावभाऊसाहेब यांच्या हाताखालीं झालें होतें. जानोजी भोंसल्यावरील थोरल्या माधवरावांच्या स्वारींत रामचंद्रपंतावर श्रीमंतांचा मुख्य भरंवसा होता. त्यानंतर लागलीच जी उत्तरेत स्वारी झाली तिचा सर्व अखत्यार पंताकडेच दिलेला होता. पानपतामुळें रजपूत, जाठ, राहिले व वजीर (सुजा उद्दौला) वगैरे लोक मराठयांच्या विरुद्ध उठले होते, त्यांची खोड मोडण्याचें काम पंताकडे सोंपविलें होतें, तें त्यानीं शिंदेहोळकरांच्या मदतीनें उत्तम तर्हेनें पार पाडलें. शहा अलम बादशहास इंग्रजांच्या व सुजाच्या ताब्यांतून काढून मराठयांच्या ताब्यांत आणण्याचें व दिल्लीची पातशाही पेशवाईच्या पंखाखालीं घालण्याचें अवघड काम पंतानें केलें (१७७१). बिनीवाले व कानडे यांच्यांत तंटा उपस्थित झाला तेव्हां पेशव्यानीं पंतास दक्षिणेंत परत बोलाविलें (१७७२). ही मानखंडना त्या शूर पुरुषास सहन न झाल्यानें त्यानें संन्यास घेण्याचा बेत केला, पण श्रीमंतानीं त्याची समजूत केली. यानंतर बारभाईच्या पक्षांत बरींच वर्षे पंतानें कामगिरी केली. शेवटीं खंडाळ्याच्या लढाईंत इंग्रजांशी लढत असतां पंतानें धारातीर्थी देह ठेविला (ता. १२-१२-१७८०). त्यांच पुत्र माधवराव यानेंहि मराठेशाहींत बरीच कामगिरी केली. पंताचा वाडा पुण्यास शनिवारवाडयाच्या उत्तरेस नदीच्या कांठीं होता. हा वाडा व त्याचें नक्षीकाम अतिशय प्रेक्षणीय होतें. १९२४ सालीं शनवारवाडयापुढें नवा पूल झाला तेव्हां हा वाडा पाडण्यांत आला. [पेशवेबखर; खरे. भा. ७; अहवाल १८३७;म. रि.भा. ४.]

देवकाते घराणे भाग २



देवकाते घराणे भाग २
सुभेदार बळवंतराव देवकाते- संभाजीराजांना औरंगजेबाने ठार मारल्यानंतर स्वराज्यातील कित्येक सरदार वतनाच्या लालसेने मोघलांना मिळाले. अशा बिकट प्रसंगी संकटात सापडलेली स्वराज्यरूपी नौका पैलतीरास लावण्याचे काम सेनापतींच्या दिमतीला राहून देवकाते यांनी पार पाडले. जे सरदार स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. अशा सरदारांना राजाराम महाराजांनी इ. स.वी सन १६९० मध्ये वतने दिली. त्यात देवकाते घराण्याचाही समावेश आहे. यात धर्मोजी बळवंतराव देवकाते यांना प्रांत कडेवळीत मधील ८ महालांचे सरपाटील हे वतन दिले. धर्मोजींच्या मृत्यूनंतर त्यांचे पुञ सुभानजी यांना "बळवंतराव" तर मकाजी यांना "हटकरराव" असे किताब व सरंजाम देऊन त्यांचा गौरव केला. पुढे राजाराम महाराज व सेनापती संताजी घोरपडे यांच्यात बेबनाव निर्माण झाल्याने घोरपडे यांचे सेनापती पद काढून घेण्यात आले. व त्यांच्या दिमतीला असलेली स्वराज्याची फौज ही काढून घेण्यात आली. ही घटना १६९६ साली घडली तेव्हा सेनापतींच्या दिमतीला असलेले मकाजी हटकरराव आपले भाऊबंद व फौजेसह जिंजी येथे राजाराम महाराजांना जाऊन मिळाले. स्वराज्याच्या व नंतर साम्राज्याच्या अनेक महत्वपूर्ण लढायांत देवकाते सरदारांचे योगदान बहुमूल्य राहिले.
सरदार देवकाते यांचा सरंजाम- शाहूने देवकाते यांना लष्करी खर्चासाठी एकूण १६ महाल व २१ गावे सरंजाम म्हणून दिली होती. हा सरंजाम बळवंतराव व हटकरराव यांच्यात ३:२ प्रमाणात विभागला गेला. पुढे दोघांच्याही सरंजामात वारसांच्या संख्येच्या प्रमाणात भाग होत गेले.बळवंतराव घराण्याच्या ३ तकसीम (भाग) सरंजामापैकी २ तकसीम चव्हाजी बळवंतराव बाळगून असत तो असा.- प्रांत सुपे बारामती : ६ गावे प्रांत कडेवळीत : ३९ गावे प्रांत बालेघाट : अर्धा महाल सरकार नांदेड: १महाल व ३ गावे सरकार पाथरी : १ कसबा सरकार माहूर : ६ महाल दीड कसबे व १ गाव एकूण : साडे सात महाल अडिच कसबे व ४९ गावे.
सरंजामातील संबंधीत प्रांत,गाव व गावांवरील एकूण हक्काची सविस्तर माहितीही सरंजामपञात दिलेली असे. सरंजाम हा वंशपरंपरेने चालणारा अधिकार नसे. त्यामुळे त्या सरंजामात वारंवार बदल ही होत असत. अनेकदा सरंजाम जप्त अथवा कमी करण्यात येई. तसेच तो वेळप्रसंगी वाढविण्यातही येई.सरंजामातील काही गावे इनाम करून दिली असल्यास अशा गावांवरील संबंधित सरदारांचा अधिकार माञ वंशपरंपरेने चाले. देवकाते यांना बारामती येथील कन्हेरी,सोनगाव व निरावागज तर कडेवळीत मधील कोंढार चिंचोली,कवढणे व दिगसल अंब अशी ६ गावे शाहूने व पेशव्यांनी प्रांत गंगथडी मधील सेंदूरजने अशी ७ गावे वंशपरंपरेने इनाम होती. [३]
 संदर्भ : शाहू व पेशवा दफ्तर पुराभिलेखागार, पुणे.
सौजन्य : श्री. संतोष पिंगळे (वेध धनगर सरदारांच्या कर्तबगारीचा आणि गौरवांचा)

देवकाते घराणे भाग १

 


देवकाते घराणे भाग १
अतिप्राचीन काळापासून हट्टी लोकांमध्ये अग्निवंशी (अग्नीउपासक) यांची परंपरा आहे. अश्या हाटकर अग्निवंशी योध्यांनी महाराष्ट्रामध्ये मोठा पराक्रम गाजवलेला दिसून येतो. त्यामध्ये आतापर्यंत धायगुडे, पांढरे, बंडगर, शेळके, रूपनवर, खताळ आणि देवकाते इत्यादी सरदारांचे उल्लेख मिळाले आहेत. देवकाते घराणे हे अग्निवंशी असून चाहमान या अतिप्राचीन टोळीसंघ/कुळातील आहे.[१]
सरदार जिवाजीराजे देवकाते (सुभेदार बळवंतराव)- बळवंतराव हे विजापूर दरबारातील एक मातब्बर सरदार. विजापूरच्या पातशाहाकडून वंशपरंपरेने जहागीर, मनसब, इनामे व वतने घेऊन सेवाचाकरी करत होता. पहिल्या शाहूने देवकाते यांना दिलेल्या वतनपञातील नोंदीनुसार विजापूरकरांकडून कर्यात बारामती प्रांत सुपे येथील २२ गावांची सरपाटीलकी तर ६ गावांची पाटीलकी त्यास वंशपरंपरेने मिळाली होती. तसेच मौजे कन्हेरी हा गाव वंशपरंपरेने इनाम देण्यात आला तर मौजे सोनगाव या गावी एक चावर (६० एकर) जमिन इनाम देण्यात आली होती अशी नोंद सापडते.[२]
छञपती शिवाजी राजांनी रयतेचं राज्य उभे केल्यानंतर स्वताच्या जहागिरीला व वतनाला लाथ मारत देवकाते स्वराज्यात सामील झाले. अफजलखान मोहिमेतही शिवाजी राजांकडून देवकाते लढल्याच्या नोंदी मिळतात. इ.स.वी सन १६७४ च्या शिवछञपतींच्या राज्याभिषेकाला उपस्थित असलेल्या सरदारांच्या यादीमध्ये देवकाते घराण्यातील "भवानराव" व "बळवंतराव" यांचा उल्लेख येतो. "भवानराव" व "बळवंतराव" ही केवळ नावे नसून ते किताब असल्याचं शाहू व पेशवे कालीन कागदपञांवरून सिद्ध होतं. प्रत्यक्ष शिवछञपतींने दिलेले हे किताब देवकाते सरदारांनी स्वराज्यासाठी दिलेलं महत्वपूर्ण योगदानच अधोरेखित करतात. शिवछञपतींनी बळवंतराव यांना मौजे सोनगाव या गावी सवा चावर(७५ एकर)जमिन इनाम दिली असल्याची नोंद ही या कागदपञांमध्ये सापडते. आजही या गावातील देवकाते मंडळींची निवासीवस्ती इनामपट्टा म्हणूणच ओळखली जाते.

फर्जंद शहाजी राजे भाग 3

 

फर्जंद शहाजी राजे
पोस्तसांभार ::आशिष माळी

भाग 3
महाराज साहेब ध्येयपूर्तीसाठी अहोरात्र कष्ट करत होते. त्यांची होणारी प्रगती अर्थातच आदिलशाहीच्या काही सरदारांना खुपू लागली होती. अफजल खान, मुस्तफा खान, बाजी घोरपडे, बडी बेगम यांसारखा एक गट महाराज साहेबांना कायम पाण्यात पाहू लागला होता. त्यांनी आदिलशहाला मशहाजी राजांविषयी भडकवले व आदिलशहाच्या मनात विषयी घृणा निर्माण करू लागले.शहाजी राजांवर कित्येकदा कटकारस्थाने रचण्यात आली परंतु बुद्धीच्या आणि शौर्याच्या बळावर त्यांनी ती सर्व कटकारस्थाने मोडीत काढली.__________________________________________
महाराज साहेब फक्त प्रदेश जिंकत राहिले नाहीत तर त्यांनी दक्षिण भारतात आपले राजकीय संबंध इतके मजबूत करून घेतले की शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, संताजी धनाजी ,ताराबाई , या मराठ्यांच्या पुढच्या पिढीला ते पावलोपावली मदातीलच आले.
शहाजी महाराज यांचे काल आणि कर्तृत्व पाहताना एक गोष्ट मात्र नक्की दृष्टीआड करता येत नाही ती म्हणजे त्यांचे दोन कर्तृत्ववान पुत्र, एक संभाजी महाराज आणि दुसरे शिवाजी महाराज. दोघेही एकमेकांपेक्षा पराक्रमी आणि सरस. राजाधिराज संभाजीराजे म्हणजे महाराज साहेब शहाजीराजे यांची प्रतिकृती होय. . महाराज साहेब शहाजीराजे यांनी आपले दोन्ही पुत्र इतके कर्तृत्ववान आणि मुत्सद्दी घडवले की नियतीला ही त्याचा हेवा वाटावा. आणि कदाचित त्यामुळेच कि काय नियतीने महाराज साहेबा पासून संभाजी महाराजांना वेगळं केलं. कनकगिरीच्या एका लढाईत थोरले संभाजी महाराज धारातीर्थी पडले. एक पिता आपली स्वप्न आपल्या पुत्रामध्ये बघत असतो. महाराज साहेबांनीही आपली स्वप्न संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांमध्ये बघितली असतील यात शंका नाही. स्वतःचा पराक्रमी पुत्र गमावल्यावर त्या महान पुरुषाला काय यातना झाल्या असतील हे त्यांचे त्यांनाच माहीत.
त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच होदीगेरे या ठिकाणी शिकार करत असताना महाराज साहेबांच्या घोड्याचा पाय एका विवरात अडकला आणि महाराज साहेब घोड्याच्या रिकिबीत पाय अडकून फरफटले गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
शहाजीराजे यांच्या मृत्यूने स्वराज्याला फार मोठा धक्का बसला आणि स्वराज्या बरोबरच दक्षिण भारताचाही फार मोठा आधार नाहीसा झाला होता. नंतरच्या पुढच्या पिढीनी व्यंकोजी राजे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, शाहू महाराज ही स्वराज्याची आधार श्रंखला महाराज साहेबांना कधीच विसरली नाही. कारण शहाजीराजे केवळ त्यांचे पूर्वज च नव्हते तर उभे राहिलेल्या स्वराज्यरुपी वटवृक्षाचे मुळाधार शहाजीराजे होते. छत्रपती शाहू महाराज म्हणजे शहाजीराजांचा पणतू ने आपल्या पणाजोबंचे स्वप्न पूर्ण केले.
होदिगेरे या छोट्याशा खेड्यात संधी रुपात घेणारा हा राष्ट्रपुरुष आमच्या हृदयात कायम मराठा साम्राज्याचे प्रतीक रुपाने जिवंत राहील.
  1. शहाजी महाराज माहिती जेधे करीना
  2. मराठ्यांची बखर ग्रँड duff.

फर्जंद शहाजी राजे भाग 2

 

फर्जंद शहाजी राजे
पोस्तसांभार ::आशिष माळी

भाग 2
  • खेळोजी भोसले आणि शहजी भोसले यांच्यात संबंध बिघडले त्यावेळी १६२५ ला शहाजी महाराज नि निजामशाही सोडून पुन्हा आदिलशाही मध्ये गेले . १६२७ मध्ये इब्राहिम आदिल शाह मेल्यानंतर पुन्हा शहाजी राजे पुन्हा निझाम शाहीत गेले . त्यावेळी मलिक अंबर चे निधन झालेले होते , त्याचा मुलगा फतेह खान ह्याच्या हातात निझाम शाहीच्या चाव्या होत्या . त्यावेळी निजामशाहीची ताकद कमी झालेली . जहांगीर चा मृत्यू झाला आणि शाहजहान दिल्लीत सत्तेवर आला . शहाजहान ने दक्खन ला एक मोठी फौज निझामाविरुद्ध पाठवली पण शहाजी महाराजांनी खान्देशात पराभूत केले .१६३० ला लखुजी जाधव झाल्यावर शहाजी राजांनी पुन्हा मुघलकडे परतले .
शिवाजी महाराजांना इतिहासात एवढे मोठे झाले की अनेक लोक त्यापुढे खुजे झाले. मंदिर पाहताना आपण पाया मात्र विसरलो.दख्खनेतील राजकारणात सांभाळले दिल्लीच्या बादशाही कडून निजामशाही कुतुबशाही व आदिलशाही यांचे अस्तित्व टिकवणे महत्त्वाचे आहे हे महाराज साहेब शहाजीराजांनी पुरते ओळखले होते.
त्यामुळे मूर्तुझा सारखा लहान बालक त्यांनी मांडीवर घेऊन निजामशाही ला पुनर्जीवन देण्याचे काम केले. दुर्दैवाने निजामशाही टिकली नाही आणि मुर्तुजाला दिल्लीच्या बादशहाच्या स्वाधीन करण्यात आले व महाराज साहेब शहाजीराजांना आदिलशाहीत नोकरी पत्करावी लागली.
आदिलशाही दरबारात महाराज ना मान खूप होता त्यांनी मराठी लोकांना सरदारां पद द्यायला लावली . शहाजी महाराजांसाठी त्या भागातले छोटे नायक राजे शहाजी राजाना शरण येऊ लागले. शहाजी राजांनी या लहान लहान राजन अंकित बनवून मुळे त्यांची राज्य वाचली नाहीतर आदिशाही ला यांची राज्ये खुपत होती पण शहाजी राजांनी या लोकांना घेऊन अदृश्य फळी केलेली . आदिलशहा पेक्षा हे सर्व सर्व जण शहाजी राजन मनात होते . महाराज साहेबांच्या मुत्सद्देगिरीने व तलवारीच्या धाकाने आदिलशाहीच्या सीमा चार पटीने वाढल्या.

फर्जंद शहाजी राजे भाग १

 

फर्जंद शहाजी राजे
पोस्तसांभार ::आशिष माळी

भाग १
फर्जंद शहाजी राजे हे अत्यंत कर्तबगार असून त्यांना संधी मिळाली नाही. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाच्या मुळाशी जा,तिथं तुम्हाला शहाजीराजे दिसतील.पुत्राचा भाग्यविधाता पिताच असतो.बाकी आमच्याकडे उलटा विचार करायची पद्धत आहे हा भाग वेगळा,तसंही शहाजीराजे या नावाची ऍलर्जी आमच्यासाठी नवीन नाही. आदिलशहाचा नोकर हीच त्यांची ओळख.
शहाजी महाराजांनी निझामाच्या मुर्तझाला सत्तेवर बसवून कारभार हाती घेतला . अशा रीतीने त्यांनी कारभार चालावंला . तिन्ही शाह्या फिरून पूर्ण हिंदुस्थान मध्ये आपला वचक निर्माण केला . दुर्दैवाने पुन्हा संधी मिळाली नाही
चाकोरी बाहेर जाऊन विचार केला तर कळेल स्वराज्याचा पाया हा शहाजीराजे ह्या महान राष्ट्रपुरुषाच्या बुलंद खांद्यांवर मजबूत उभारला गेला आहे....आपल्या असे वाटते की शहाजी राजे यांची ओळख केवळ आदिलशाहीचा सेवक यापलीकडे काहीच नव्हती.शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याचा एक मोठा व्यापक कल्पना मांडली तो शहाजी महाराजांच्या डोळ्यातलीच.
जयराम पिंड्ये या कवीनेे तर म्हटले होते की, ‘‘इत साहजु है; उत साहजहॉं’’
पृथ्वीचे रक्षण दक्षिणेत शहाजी आणि उत्तरेत शहाजहान करीत आहे.
शहाजीराजे म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील दुर्लक्षित व्यक्तिमत्त्व. आमच्या इतिहासकारांच्या दुर्लक्ष पणामुळे त्यांना न्याय मिळाला नाही.
  • शहाजी महाराज मलिक अंबर कडून गनीम कावा शिकले शिकले . पण भातवडी मलिक अंबर नेतृत्वाखाली निझामाने मुघल आदिलशाही हरवले .
  • . निझाम शाही ला वाचवायला मलिक अंबर शहाजहानने दक्षिणेमध्ये अनेक हल्ले केली हि आक्रमणे १६१५ ते १६२१ या दरम्यान.
  • शहाजहानचे दक्षिणेमध्ये आदिलशाही , कुतुबशाही आणि अहमदनगरची निझाम शाही(हैद्राबादची निजामशाही नाही )यांच्याशी लढत होती . दक्षिणेकडचे छोटे छोटे अनेक हिंदू राज्य पण त्यांच्या डोळ्यात सलत होतीच . नीजामशाही सरदार मलिक अंबर याने कुतुबशहा व आदिलशहा आणि ठिकठिकाणचे मराठे आणि इतर लोक एकत्र केले. मलिक अंबर गनिमी कावा चा गुरु . मलिक अंबरने ब-हाणपूरलासुद्धा वेढा घातला. ब-हाणपूर वाचवण्यासाठी तेथील मोगल सुभेदार खान खूप वेळ लागले. मलिक अंबरने गनिमी काव्याचे सर्वाना प्रशिक्षण देऊन मांडू पर्यन्त धडक मारून मुगलांना चांगलेच मुसंडी काढले .त्याने नगर ते बुऱ्हाणपूर मध्ये युद्धक्षेत्र लांबवले . या मलिक अंबर आफ्रिकन हबशी माणसाने मराठ्यांना गनिमी काव्याची देणगी दिली असे खूप इतिहासकारांचे मत आहे.शहाजीराजांची प्रतिष्ठा, पराक्र‘म व मुत्सद्दीपणा या गोष्टी सिद्ध झाल्या. गनिमी काव्याची लढाई ही किती उपयुक्त आहे हे भातवडीच्या लढाईने सिद्ध केले. गनिमी काव्याचा तो श्रीगणेशा ठरला व पुढे मराठेशाहीत उपयोगी ठरला.शहाजी महाराजांच्या दैदिप्यमान यशापुढे ढे स्वतः मलिक अंबर असुरक्षित झाला. इतकेच काय शहाजी महाराजांचे चुलत भाऊ पण त्या यशापुढे जळत होते

Wednesday 26 October 2022

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ इंदोरचे होळकर घराणे - भाग 5

 

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ

इंदोरचे होळकर घराणे - भाग 5

 पोस्तसांभार ::

प्रशांत सुमती भालचंद्र ठोसर | मराठा नाणी संग्राहक, लेखक, व्याख्याते | नाणेघाट

हिंदवी स्वराज्याच्या कक्षा रुंदावण्यासाठी थोरल्या बाजीरावराऊस्वामींनी मध्य हिंदुस्थानात रोवलेले शिंदे-होळकर-पवार हे दख्खनदौलतीचे बुरुज यथावकाश बळकट तर झालेले होतेच, परंतु मनुष्यस्वभावानुसार थोडेफार स्ववर्चस्वासाठी देखील आग्रही बनलेले होते. अशाच वर्चस्वाच्या भावनेने बंधू काशिरावांना बाजूस सारून होळकरशाहीच्या गादीवर आरूढ झालेले हे कर्तृत्ववान महाराजा यशवंतराव होळकर पहिले, ज्यांनी संस्कृत शब्दांत देवनागरी लिपी असलेला ‘नजराणा’ रुपयाही पाडला होता.

होळकरशाहीचे संस्थापक मल्हारबाबा होळकर यांचे नातू असलेले आणि तुकोजीराव पहिले यांचे तृतीय पुत्र असलेले यशवंतराव होळकर (पहिले) यांचा जन्म 3 डिसेंबर 1776 रोजी पुण्यामध्ये झाला. पुढे वडील तुकोजीराव महाराज यांचे भावी वारसदार कोण असावेत, असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा सगळ्यात ज्येष्ठ असलेले काशिराव आणि द्वितीय पुत्र मल्हारराव यांच्यात विवाद झडले. मल्हाररावांचा युक्तिवाद होता की, तेच राजगादीवर बसायला पात्र आहेत कारण त्यांचा जन्म झाला तेव्हा तुकोजीराव ‘सुभेदार’ झालेले होते आणि वडीलबंधू काशिराव यांचा जन्म झाला होता. तेव्हा तुकोजीराव साधे शिपाई होते. मात्र, तुकोजीरावांनंतर काशिराव गादीवर आले. काशिरावांनी भाऊबंदकीमुळे अखेर बंधू मल्हारराव यांना इसवीसन 1797 मध्ये ठार मारले आणि त्यांचे पाठीराखे असलेले बंधू यशवंतराव जे त्यासमयी पुण्यात होते त्यांना दौलतराव शिंदेंच्या सांगण्यावरून नागपूरकर रघूजी भोसले यांनी कैद करून तुरुंगवासात टाकले. मात्र, लवकरच ते मोकळे झाल्यावर बंधू मल्हाररावांच्या मृत्यूनंतर दीडएक वर्षात ते खानदेशात येऊन दाखल झाले. तेथे त्यांना चिमणभाऊ हे त्यांचे भावी मार्गदर्शक भेटले ज्यांनी यशवंतरावांना एक उत्तम घोडी (षशारश्रश हेीीश) आणि 300 रुपये देऊन माळवा प्रांतात जाण्याचा सल्ला दिला. आता 22 वर्षांचे तरुण तडफदार यशवंतराव तेथून कूच करून आधी बरवानी येथे, नंतर धरमपुरी आणि अखेरीस धार संस्थानात येऊन पोहोचले. धार संस्थानाधिपती आनंदराव पवार यांनी त्यांचे अतिशय आपुलकीने स्वागत केले. येथील सुमारे तीन एक महिन्याच्या वास्तव्यात यशवंतरावांनी पिंढार्‍यांच्या हल्ल्यांपासून धार संस्थानाचे संरक्षण केले. या कामगिरीवर संतुष्ट होऊन आनंदरावांनी त्यांना दहा हजार रुपये आणि 7 घोडे दिले. या साहाय्याने यशवंतरावांनी आगेकूच करून देपालपूर हा परगणा जिंकला.

यानंतर यशवंतराव लोकांच्या मनात हे ठसवण्यात यशस्वी झाले की, ते मल्हारबाबा आणि खंडेराव यांच्याच मार्गाने पुढे जाऊन होळकरशाहीच्या उत्कर्षाकरिता झटत राहतील. त्यांच्यासोबत आता पिंढारी, भिल्ल, मराठे, अफगाण, राजपूत असे अनेक जण जाऊ लागले. देपालपूरच्या विजयानंतर यशवंतराव जावरा, बर्दावाड, महिदपूर, सस्नेर, सारंगपूर, शुजालपूर आदी ठिकाणी आक्रमण करून साम, दाम, दंड, भेद वापरून विजय आणि पैसे मिळविण्यात यशस्वी झाले. शुजालपूरला मिळालेले 10000 रुपये त्यांनी आपल्या सैनिकांत वाटले. या सर्व बाबींमुळे यशवंतरावांची प्रतिमा शूर आणि चतुरस्त्र धुरीण म्हणून लोकमानसात ठसली. इतके की काशिरावांच्या सैन्यातील लोक देखील यशवंतरावांना येऊन मिळाले. यांसोबत नजीबखान, कालेखान आणि रामपुरा प्रांताचा सद्रुद्दिन आदी महत्वाची मंडळी पण होती. आता यशवंतरावांकडे पाच हजार पायदळ आणि दोन हजार घोडदळ जमले होते. बेगमपूरवर आक्रमण करून त्यांनी ते लुटले. हे बघून शेजारच्या नरसिंहगढच्या अधिकार्‍याने नजराणा म्हणून रोख 2000 रुपये, 400 घोडे आणि 2000 सैनिक पाठवले. यशवंतरावांनी आता आसपासच्या राज्यकर्त्यांकडून जवळपास 30-32 हजार रुपये खंडणी स्वरूपात मिळवले. यानंतर त्यांनी सनावाड, खरगोण आदी ठिकाणाहून अजून 35000 रुपये मिळवले.

आता यशवंतरावांनी महेश्वरकडे कूच केले आहे, हे ऐकून पुणे येथे असलेल्या काशिरावांनी प्रतिकारार्थ नागो जिवाजी आणि ड्युड्रेनेक / र्ऊीवीशपशल या फिरंगी अधिकार्‍यासोबत 13000 सैनिकांची कुमक, तसेच इंदोरहून अजून एक 500 सैनिकांची तुकडी पाठवली. मात्र, यशवंतरावांनी या सैन्याचा कसरावद येथे सहज पाडाव केला. यशवंतराव महेश्वरला जाऊन जानेवारी 1799 मध्ये होळकरशाहीच्या गादीवर खंडेराव होळकरांचे प्रतिनिधी / ठशसशपीं म्हणून आरूढ झाले. मात्र, त्यांनी धूर्तपणे स्वतःची मुद्रा न वापरता खंडेराव यांचे विश्वासपात्र (दुय्यम) यशवंतराव अशी पर्शियन भाषेतील राजमुद्रा वापरून होळकरशाहीच्या निष्ठावंतांना एकत्र आणण्यात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. महेश्वर येथे त्यांच्याजवळ आठ हजार घोडेस्वार आणि 15 हजार पायदळ जमा झाले. याआधी पराभूत झालेला काशिरावांचा फिरंगी अधिकारी फिरून मार्च 1799 मध्ये यशवंतरावांवर चालून आला आणि त्याने चौली येथे युद्ध करून यशवंतरावांना परत महेश्वरला मागे ढकलले. महेश्वरला यशवंतरावांना अहिल्याबाईंचा खजिना आणि दागदागिने मिळवण्यात यश आले आणि त्याच्या जोरावर त्यांनी आपली फौज अधिक बळकट करून ड्युड्रेनेकची रसद तोडून त्याला तहासाठी, तसेच यशवंतराव महाराजांना होळकरशाहीचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून मान्यता देण्यास राजी केले.

या सततच्या युद्धप्रसंगातही यशवंतराव जातीने, तसेच गोविंद रघुनाथ गानू आणि भारमल होळकर यांच्यामार्फत पंतप्रधान पेशव्यांशी सातत्याने पत्रव्यवहार करून होळकर घराण्यात समझौता होण्यासाठी प्रयत्नशील होते, असे आढळते. पेशवे तसेच बंधू काशिराव यांच्यासोबत स्नेहभाव राखून तख्ताची सेवा करण्यासही मान्यता देण्यास यशवंतराव राजी होते. दुर्दैवाने 1801 मध्ये यशवंतरावांचे बंधू विठोजी होळकर हे आक्रमण / हल्ला ारीर्रीवळपस करताना पेशव्यांच्या सैनिकांकडून कैद केले गेले. पेशवे विठोजींशी सौहार्दपूर्ण वागण्यास तयार असताना देखील विठोजी स्वतःसाठी देहदंडासाठी आग्रही बनून राहिले होते. अखेर नाईलाजास्तव विठोजींना हत्तीच्या पायी देण्यात आले. यशवंतरावांनी या अघटित घटनेबद्दल पेशव्यांना कधीही क्षमा केली नाही. त्यांनी फत्तेसिंह माने यांना पाठवून शिंदे तसेच पेशव्यांच्या जहागिरीत धुमाकूळ माजवला आणि त्यांची दाणादाण उडवली. आघाडीवर राहून यशवंतराव ऐन दिवाळीच्या दोन दिवस आधी, म्हणजे 25 ऑक्टोबर 1802 रोजी पुण्यात येऊन धडकले. सुमारे तीन महिन्यांपर्यंत मग त्यांनी पुण्याची यथेच्छ धूळदाण उडवली. अशाप्रकारे स्वतःचे सैनिकी सामर्थ्य वाढवत असताना यशवंतरावांनी शिंद्यांवर हल्ला करून उज्जैनची धूळदाण उडवली. पुढे शिंद्यांचे सरदार सर्जेराव घाटगे यांनी 14 ऑक्टोबर 1801 ला इंदोर पासून 3 मैलांवर असलेल्या बिजलपूर येथे होळकरांवर जोरदार प्रतिहल्ला करून इंदोर शहराची वाताहात केली. खुद्द यशवंतराव विंध्य पर्वतराजीतील जामघाट येथे मागे हटले.

या आणि अशा असंख्य प्रसंगांतून यशवंतराव जात होते. यशवंतरावांनी स्वतःला ‘महाराजाधिराज राजराजेश्वर’ या उपाधीने गौरविले आहे. या वाटचालीत सेंधवा येथील युद्धप्रसंगात काशिरावांचा 1808 मध्ये मृत्यू झाला. ऑक्टोबर 1808 मध्येच यशवंतरावांमध्ये काहीशी वेगळी बुद्धीभ्रंशाची लक्षणे (ळपीरपळीूं) दिसून येऊ लागली. ते दिवसागणिक अधिक उग्रप्रकृती, कोपप्रवृत्ती (तळेश्ररपीं) होऊ लागले होते. त्यांची पत्नी तुळसाबाई या काही कारभारी मंडळीच्याद्वारे होळकरशाहीचा कारभार बघत होत्या. मात्र, आता आर्थिक स्थिती पण बिकट झालेली होती. सैन्याचे वेतन वेळेवर होत नव्हते, बंडाळीचे प्रसंगही उद्भवत होते. अखेर हा धाडसी महाराजा यशवंतराव होळकर यांचे भानपुरा येथे 27 ऑक्टोबर 1811 रोजी निधन झाले.

यशवंतरावांनी पाडलेली उल्लेखनीय नाणी म्हणजे म्हणजे संस्कृतमध्ये लिहिलेला नजराणा रुपया आणि त्याचसोबत अरेबिक भाषेत पाडलेला नजराणा रुपया. यातील संस्कृत रुपयावर शके 1728 यासह
‘श्री
इन्द्रप्रस्थस्तितो
राजा चक्रवर्ती
भूमंडले तत्प्रसादा
त्कृता मुद्रा लौकेस्मिन्वै
विराजते’
हे एका बाजूला
आणि दुसर्‍या बाजूला
‘श्री
लक्ष्मीकांतप
दांभोजभ्रमराय
तचेतसः येशवंतस्य
विख्याता मुद्रैषा
पृथवीतले’
असा मजकूर आहे . हा संस्कृत नजराणा रुपया आजही नाणीसंग्राहकांसाठी एक ‘मानाचे पान’ मानला जातो. यशवंतरावांनी मल्हारनगर, तसेच महेश्वर टांकसाळीत चांदीची नाणी पाडली आहेत. तांब्याची नाणी पण पाडलेली आढळून येतात. परंपरेनुसार महेश्वर टांकसाळीच्या रुपया, तसेच अर्ध्या रुपयावर शिवलिंग आणि बिल्वपत्र छापलेले आहे. मल्हारनगरच्या नाण्यांवर सूर्य अधोरेखित केलेला आहे. मागील बाजूस हिजरीसन कोरलेले असते ज्यावरून आपणांस हे नाणे कोणत्या राजाने पाडले हे ओळखता येते.

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ इंदोरचे होळकर घराणे भाग 4

 

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ

इंदोरचे होळकर घराणे भाग 4

 

प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर | मराठा नाणी संग्राहक, लेखक, व्याख्याते | नाणेघाट

मल्हारराव होळकर यांनी स्थापन केलेले आणि पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी स्थिरस्थावर तसेच वृद्धिंगत केलेले होळकर घराणे मराठेशाहीची धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलून शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा भगवा जरीपटका डौलाने मध्य तसेच उत्तर हिंदुस्थानात फडकत राहील, यासाठी सदैव प्रयत्नशील होते.

महाराज तुकोजीराव होळकर यांना तीन पत्नी आणि एकूण चार मुले होती. त्यातील काशिराव आणि मल्हारराव हे त्यांना धर्मपत्नीपासून झालेले होते आणि यशवंतराव तसेच विठोजी हे उपस्त्रियांपासून (चळीीींशीी) झालेले पुत्र होय.
काशिराव ज्येष्ठ असले तरी धाकट्या मल्हाररावांनी गादीवर हक्क सांगितला होता. कारण त्यांचा जन्म झाला तेव्हा वडील तुकोजीराव हे सुभेदार झालेले होते आणि काशिराव जन्मले तेव्हा ते एक साधे सैनिक होते. एक अशी वदंता आहे की, अहिल्याबाई आणि तुकोजीराव पहिले यांची अशी इच्छा होती की ज्याप्रमाणे अहिल्याबाई महेश्वर येथून राज्यकारभार बघत होत्या आणि तुकोजीराव राज्यरक्षण करीत होते. त्यानुसार काशिराव यांनी महेश्वर येथून राज्यकारभार करावा आणि मल्हारराव याने वडील तुकोजीरावांप्रमाणे सर्व सैन्याधिपती होऊन राज्यरक्षण करावे. मात्र याला कागदोपत्री दुजोरा मिळू शकत नाही. पुढे अहिल्याबाईंच्या निधनानंतर तुकोजीराव हे काशिराव गादीवर यावेत, यासाठी आग्रही होते. काशिराव हे शरीराने अधू होते; परंतु दुसर्‍या बाजीराव पेशव्यांनी आधी मल्हाररावांचा पक्ष घ्यावा, असा विचार योजला होता. कारण नाना फडणवीस हे मल्हाररावांना साहाय्य करीत होते. मात्र असे झाले तर नाना वरचढ होतील, या भीतीने अखेर त्यांनी काशिराव यांना 27 जानेवारी 1797 रोजी सुभेदारीची वस्त्रे दिली.
आपल्याला विरोध करणार्‍या बंधू यशवंतरावांना काशिरावांनी अंतर्गत कलहातून कारावासात टाकले, पण गोविंदपंतांच्या सांगण्यावरून त्यांना मुक्तही केले. यानंतर मात्र यशवंतराव तातडीने मल्हाररावांच्या सोबत जातात. या इतिहासातील मल्हारगर्दीत अखेर 14 सप्टेंबर 1797 च्या रात्री मल्हाररावांच्या गोटाला दौलतराव शिंदे यांच्या शिस्तबद्ध सैनिकांनी घेरले जाऊन मारले जाण्याच्या भीतीने निसटू पाहणार्‍या मल्हाररावांना भाऊबंदकीच्या वादातून ठार मारले गेले. असे म्हणतात की या कटासाठी काशिरावांनी शिंद्यांना 5 लक्ष रुपये देऊ केले होते, मात्र मल्हाररावांचा काटा काढल्यानंतर दौलतरावांनी 15 लक्ष रुपयांची मागणी केली आणि ती काशिरावांना पूर्ण करावी लागली. अखेर जेमतेम महिन्याआधी वडील तुकोजीरावांचे अंत्यसंस्कार जिथे केले होते तेथेच मल्हाररावांचेही केले गेले. या कारवाईमुळे शिंद्यांचे राजकीय वजन इतके वाढले की, त्यांनी पुढे जाऊन नंतर तर काशिराव होळकर महाराज तसेच दस्तुरखुद्द नाना फडणवीसांच्या गोटालादेखील घेराव घातला. काशिराव महाराज हे त्याअर्थाने सक्षम असे राज्यकर्ते नसल्याने होळकरशाहीची अवस्था याकाळात बरीचशी बिकटच झाली. सत्ता राखण्यासाठी सातत्याने पुणे दरबारात वाटाघाटी सुरू असल्यामुळे राज्यातील प्रशासनाकडे दुर्लक्ष झाले होते. सैन्याचे वेतन वेळेवर होत नव्हते. यामुळे असंतोष वाढला होता. व्यापारी, सावकार मंडळीही या कारभाराबाबत धास्तावलेली होती. दुसरीकडे काशिरावांचे स्वतःचे सरदार मालोजी गावडे आदीकरून होळकरांच्याच जहागिरीत धुमाकूळ घालून सैन्याला वेतन देण्यासाठी पैसे वसूल करीत होते.
एकूणच बघता काशिराव यांची कारकीर्द ही होळकरशाहीसाठी काही फारशी उपयुक्त ठरल्याचे आढळून येत नाही. स्वतः काशिराव महाराज हे महेश्वरला वास्तव्य करून राज्यशकट हाकण्याऐवजी पुणे येथेच राहिलेले आढळतात. याच अवधीत ते दौलतराव शिंद्यांवर विश्वासून राज्यासाठी जवळपास 50 लाखांचे कर्ज अंगावर बाळगून होते, अशा नोंदी आहेत. या अनावस्था परिस्थितीत त्यांनी राजधानी महेश्वर येथून हिजरी सन 1212 – 1214 या कालावधीत, त्या टांकसाळीचे शिवलिंग आणि बिल्वपत्र हे चिन्ह असलेली कोणतीही नाणी पाडल्याचा पुरावा आढळत नाही. एक प्रवाह असाही आहे की अहिल्याबाईंनी महेश्वर टांकसाळीत शिवलिंग, बिल्वपत्र चिन्हांकित नाणी पाडली. याचे कारण त्या शंकराच्या भक्त होत्या आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या. यामुळे अन्य राज्यकर्त्यांनी होळकरशाहीवर केलेले आक्रमण हे होळकर राजवटीतील लोक धार्मिक भावनेवर केलेले आक्रमण समजून त्याचा प्रतिकार करतील, अशी त्यांची समजूत असावी. मात्र त्यांच्यानंतर राजकीय वर्चस्वासाठी त्यांच्या वारसांत चाललेल्या लढ्यात या बाबीचा कोणाला विचार करावा, असे वाटले नसावे. मात्र होळकरशाहीच्या सैन्याचे मुख्यालय असलेल्या इंदोर येथील मल्हारनगर टांकसाळीत पाडलेली सूर्य / मार्तंड चिन्हांकित असलेली हिजरी सन 1212 आणि 1213 या दोन वर्षांची चांदीची नाणी (रुपये) उपलब्ध आहेत. आता ही नाणी सावकार तसेच व्यापारी वर्गाने किंवा स्थानिक अधिकार्‍यांनी आर्थिक व्यवहार निभावण्यासाठी पाडली असावीत, असाही मतप्रवाह आहे. कारण या कालावधीत महाराजा काशिराव होळकर हे पुणे दरबारीच रुजू होते. अखेर बंधू यशवंतराव आणि काशिराव महाराज यांची गादीसाठी लढाई होऊन यशवंतराव विजयी झाले आणि त्यांनी स्वतःला 6 जानेवारी 1799 रोजी राजाभिषेक करून घेतात. पुढे होळकरशाहीच्या एका अर्थाने कमकुवत असलेल्या या काशिराव महाराज यांचे बीजागड येथे इसवी सन 1808 मध्ये निधन झाले.


पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ ग्वाल्हेरचे शिंदे घराणे

 

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ

ग्वाल्हेरचे शिंदे घराणे

 

शिवविचारांचे पाईक असणार्‍या थोरल्या बाजीराव पेशव्यांनी भीमथडीची राकट तट्टं नर्मदेपार नेली. छत्रपती शाहू महाराजांच्या या मराठा सैन्याची वावटळ सोसायला मग भल्याभल्यांना अवघड गेलं. त्याचं कारण बाजीरावांनी संपूर्ण हिंदुस्थानात रोवलेले दख्खनदौलतीचे चार मजबूत आधारस्तंभ.

हिंदवी स्वराज्य संस्थापक शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज हे कालवश झालेले होते. छत्रपती शाहू महाराजांचा अंमल नुकताच कुठे सुरू झालेला होता. 27 वर्षे दक्षिणेत घालवून मराठ्यांचे स्वराज्य बरेचसे अस्थिर करूनही जिंकू न शकलेला औरंगजेब मृत्यू पावल्याने तमाम मुघल सैन्य आणि शाहजादे दिल्लीला तख्तप्राप्तीकरिता रवाना झालेले होते. कैदेत असलेल्या भावी छत्रपती शाहू महाराजांची अटीशर्तींवर सुटका झालेली असली तरी त्यांच्या मातोश्री मात्र अजूनही मुघलांच्या ताब्यात होत्या. शाहू महाराज स्वराज्यात परतल्याने वारसाहक्काने कोणती गादी मानायची, याबाबत अनेकांच्या मनात असलेला संभ्रम पूर्णपणे दूर झालेला नव्हता. कारण शिवपुत्र राजाराम महाराज जरी वारंवार सांगत होते की, ही गादी सुटकेनंतर बालशाहूंना मिळावी परंतु त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी ताराराणीने सक्षमपणे औरंगजेबाला 7 वर्षे तोंड देऊन युक्ती-प्रयुक्तीने स्वराज्य शर्थीने राखले होतेच. मात्र यामुळेच त्या स्वराज्यसत्ता शाहूंकडे देण्यास राजी नव्हत्या. या सार्‍यांमुळे परतलेल्या शाहू महाराजांनी सर्वात प्रथम अंतर्गत विरोध हर उपायेकरून मोडून स्वतःचे स्वामित्व सिद्ध केले. तद्नंतर राज्यातील प्राप्त परिस्थितीचे अवलोकन करून आधी बाळाजीपंत विश्वनाथ भट व त्यांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र थोरले बाजीराव यांच्याकडे पंतप्रधान पेशवाईची जबाबदारी सोपविली होती.
बाळाजी विश्वनाथ व आता बाजीरावराऊ स्वामी हे समर्थपणे शिवसैन्याचा डंका उत्तरेकडे समशेरी रोखून धाडसाने आणि अजिंक्य विश्वासाने वाजवत होते. भले भले सरदार, राजे-महाराजे, निजाम हे बाजीरावांची रणनीती ओळखण्यात चुकत होते, फसत होते. बाजीरावांचा हा वादळी झंझावात रोखणे हे आता त्यांना जवळपास अशक्यच वाटत होते. थोरल्या बाजीरावांनी दूरदृष्टीने एकएक करीत आपले बलवत्तर मोहरे हिंदुस्थानच्या राजकीय पटावर ठेवायला सुरुवातही केली. यांच्यापैकी एक तालेवार घराणे होते शिंदे यांचे. या घराण्याचे संस्थापक पुरुष होते राणोजीराव शिंदे. हे शिंदे म्हणजे महाराष्ट्रातील सातार्‍याजवळील कण्हेरखेडा येथील पाटील. राणोजीरावांचे अतिशय विश्वासू असे वर्तन बघून बाजीरावांनी त्यांना छत्रपती शाहू महाराजांच्या वतीने चौथाईच्या (उत्पन्नाच्या 25% देय कर) वसुलीसाठी समृद्ध अशा माळवा प्रांतात नामजाद केले, नियुक्त केले व सरदेशमुखीचे हक्कही प्रदान केले. राणोजीरावांनी आता मध्य हिंदुस्थानात उज्जैन येथे आपले बस्तान बसवले व कालांतराने तेच शिंदे संस्थानिकांचे राजधानीचे ठिकाण म्हणून गणले जाऊ लागले. पेशव्यांचे पर्यायाने शाहू छत्रपतींचे निष्ठावान असणारे राणोजीराव शिंदे बाजीरावांच्या इसवी सन 1740 मधील अकाली मृत्यूनंतर 1745 मध्येच मरण पावले. त्यांच्या पश्चात जयाप्पाराव, दत्ताजीराव, ज्योतिबाराव व तुकोजीराव तसेच महादजीराव असे पुत्र होते. जयाप्पाराव आता शिंदेशाहीचे वारसदार म्हणून कारभार बघू लागले. त्यासमयी त्यांचे वार्षिक उत्पन्न हे सुमारे पासष्ट लाख रुपये इतके होते, अशी नोंद सापडते. जयाप्पाराव इसवी सन 1756 मध्ये नागौर येथे मारले गेले. त्यांना मुलगा होता. त्याचे नाव होते जनकोजी. पण आता राज्यकारभार मात्र बंधू दत्ताजीरावच बघत होते. दुर्दैवाने दत्ताजीराव शिंदे हे देखील पानिपतच्या समरप्रसंगी 10 जानेवारी 1760 रोजी यमुनातीरेच्या बुराडी घाटात अब्दालीचा सरदार नजीबखानाकडून ऐन युद्धात वीरगती मिळवते झाले. नजीबने जबर जखमी होऊन रणांगणात पडलेल्या दत्ताजीला कुत्सितपणे विचारले, और लडोगे क्या? तेव्हा मृत्यू समोर उभा असतानाही दत्ताजी बाणेदारपणे उद्गारला, क्यों नही? बचेंगे तो और भी लडेंगे! इतिहासात हे तेजस्वी उद्गार अजरामर झाले आहेत. यानंतर नजीबखानाने दत्ताजीरावांना ताबडतोब मारले. एक शिंदेकुलोत्पन्न पानपतावर धाराशायी झाला.
पुढे पानिपतच्या 1761 मधील निर्णायक युद्धात जनकोजीराव शिंदे पण बरखुरदारखानाच्या स्वाधीन झाला होता. मात्र नजीबखानाने अब्दालीकडे चहाडी करून बरखुरदाराच्या तंबूची झडती घेण्याचा प्रसंग आणला. तेव्हा प्रकरण अंगावर शेकू नये, याकरिता बरखुरदारखानाने आश्रयास आलेल्या जनकोजीरावास ठार करून गुपचूप खड्ड्यात पुरूनही टाकले. अशा दुर्दैवी रीतीने हा अजून एक शिंदेकुलोत्पन्न मृत्यू पावला. यानंतर पानिपतच्या लढाईत वाचलेल्या महादजीराव शिंद्यांवर ग्वाल्हेर संस्थानची धुरा येऊन पडली.
ग्वाल्हेर संस्थानचा इतिहास तसेच पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचा इतिहास हा या कर्तृत्ववान महादजी शिंदे यांच्या योगदानाचा यथोचित आढावा घेतल्याशिवाय पूर्णत्वास जाऊ शकत नाही, असे म्हटले तर ते गैरलागू ठरू नये. महादजीराव पानिपतच्या युद्धानंतर महाराष्ट्रात परतले व आपले स्थान भक्कम करून पुनःश्च 1764 मध्ये माळव्यात आले. महादजीराव व त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर शिंदे घराण्यातील राजांनी आपापली अनेक वैशिष्ट्यपूर्ण नाणी पाडली. यात सोन्याच्या मोहरा, चांदीचे रुपये, तांब्याची नाणी यांचा समावेश आहे. यापुढील लेखांमध्ये आपण ती नाणी आणि त्यांच्या विविध टांकसाळी/मिंटस यांची माहिती घेणार आहोत


पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ कोकणातील मराठा संस्थानिक घराणे: सावंतवाडीचे सावंत - 1

 

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ

कोकणातील मराठा संस्थानिक घराणे: सावंतवाडीचे सावंत - 1

 

शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य संस्थापनेच्या उदात्त, उत्तुंग ध्येयात, कार्यात काही वेळा या सावंतवाडीच्या सावंतांनी त्यांना साथ दिली, तर काही वेळा शिवछत्रपतींचा रोषही त्यांना पत्करावा लागला होता. अन्य काही घराण्यांनीदेखील शिवछत्रपतींना विरोध केला होता, असे इतिहास सांगतो. परंतु हा विरोध अथवा सहकार्य हे त्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असायचे, हे इतिहासाचा अभ्यास करताना जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

2400 चौरस किलोमीटर भूभाग असलेल्या आणि तसे बघितले तर महाराष्ट्राच्या एका टोकाला कोकण प्रांतात असलेल्या या सावंतवाडी संस्थानाला अपभ्रंशित शब्दात ‘वाडी’ असे ही ओळखले जाते. उत्तरेस गड नदी, पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, पूर्वेस महाराष्ट्रभू रक्षक सह्याद्रीच्या पर्वतरांगा, त्याच्यापलीकडे कोल्हापूर व बेळगाव जिल्हा आणि दक्षिणेस तेरेखोलची खाडी अशा सीमांनी सावंतवाडी वेढले गेले होते. दक्षिण कोकण प्रांतात मालवण आणि गोवा राज्याच्या सीमेलगत सावंतवाडी वसलेले आहे. सावंतवाडी व आसपासच्या प्रदेशात गवसलेले ताम्रपट, शिलालेख यांच्यावरून या संस्थानचा गत इतिहास उजेडात येतो. हा प्रदेश सहाव्या ते चौदाव्या शतकापर्यंत चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार आदी राजवंशांच्या अधिपत्याखाली होता, असे दाखले आढळतात. त्यानंतर तो विजयनगर, विजापूरच्या अमलाखाली गेला. उदयपूरच्या सिसोदिया भोसले कुळातील मांगसावंत हे आदिलशाहीत सेवक होते. कालांतराने त्यांनी आदिलशाहीविरुद्ध बंड करून ते विजापूर सत्ताधीशांपासून वेगळे होऊन सावंतवाडीजवळील कुडाळ परगण्यातील ‘ओटवणे’ या ठिकाणी स्वतंत्रपणे राहू लागले होते. यांचे मूळ राजस्थानातील उदयपूर येथील सिसोदिया वंशाच्या राजपूत कुटुंबात होते. या कोकणात उतरलेल्या मांगसावंत भोसल्यांनी इसवी सन 1554 मध्ये स्वंतत्र गादी स्थापली आणि पुढे त्यांच्या वंशजांनी मग येथेच अनेक वर्षे राज्यकारभार केला. मात्र त्यांचे वारसदार भामसावंत हे फिरून आदिलशहाकडे गेले. पोर्तुगिजांसोबत झालेल्या झगड्यांत सावंतांनी आदिलशहास मदत केल्याने त्याने सावंतांना ‘सावंत बहाद्दर’ हा किताब दिला. हे सावंत भोसले स्वतःस सूर्यवंशी मानत असत. शिवपूर्वकाळात महाराष्ट्रातील बहामनी सत्तेचे विघटन होऊन गोवळकोंड्याची कुतूबशाही, अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, बीदर येथील बरीदशाही आणि वर्‍हाडची इमादशाही अशा पाच शाह्या निर्माण झाल्या. महाराष्ट्रातील अनेक मराठा सरदार घराणी नोकरीनिमित्त या शाह्यांत आपापला पराक्रम, कर्तबगारी दाखवत होती. सावंतवाडी संस्थानचे मूळ पुरुष ज्यांना मानले जाते ते खेमसावंत पहिले (इसवी सन 1627 – 1640) हेदेखील विजापूरच्या आदिलशाहीत कार्यरत होते. हे खेमसावंत म्हणजे मांगसावंत यांचे नातू होत. त्यांनी आदिलशाहीकडून देशमुखी प्राप्त केली होती. त्यांना सोम, फोंड आणि लखम असे तीन पुत्र होते. इतिहासातील नमूद दाखल्यांनुसार यांच्या पूर्वासुरींनी मेवाड प्रांतातील चितोड येथे सिंहासन स्थापलेले होते. आदिलशाहीच्या उतरत्या काळात सावंतवाडी संस्थान ‘जहागीर’ म्हणून इसवी सन 1627 ते 1640 पर्यंत खेमसावंत यांच्या ताब्यात होते. खेमसावंत पहिले यांच्या पश्चात त्यांचा मुलगा ‘सोमसावंत’ हा 1641 पर्यंत फक्त अठरा महिनेच गादीवर होता.

त्याच्यानंतर त्याचा कनिष्ठ बंधू ‘फोंडसावंत’ (कारकीर्द – 1641 ते 1651) याने सावंतवाडीचा पदभार स्वीकारला. हे व्यक्तिशः शांत आणि संयमी होते. यांच्या मृत्यूनंतर त्यांचे लहान भाऊ लखमसावंत (इ.स. 1651 – 1675 ) हे सिंहासनावर विराजले. लखम सावंत हे शूर, पराक्रमी आणि मुत्सद्दी होते. त्यांची कारकीर्द संघर्षमय असली तरी त्यांनी संस्थानच्या विकासासाठी खूप काम केलेले आहे. त्यांच्याजवळ सुमारे 12,000 ची फौज होती. यात पायदळ तसेच स्वतंत्र घोडदळ यांचाही समावेश होता. सावंतवाडी संस्थानचे त्या काळातही स्वतःचे आरमार होते, असे उल्लेख आढळतात. संस्थानच्या हद्दीत समुद्र तसेच मोठ्या नद्यांचा अंतर्भाव असल्याने आरमार असणे हे अपरिहार्य होते. त्या काळात समुद्रमार्गे मोठ्या प्रमाणात व्यापार-उदीम चालत असल्याने सागरावर आपले स्वामित्व असावे, या उद्देशाने हे आरमार उभारले होते. सावंतवाडी संस्थानच्या आरमारात लक्ष्मीप्रसाद, भवानीप्रसाद, साहेबराव नामक दोन डोलकाठ्या असलेली ‘गुराबा’ होती, ज्यांची क्षमता दीडशे ते तीनशे टन वजन वाहण्याची होती. काहीशा सपाट/उथळ तळामुळे गुराब तोल सावरण्यात तसेच हळुवारपणे वाहणार्‍या वार्‍यावरही ती जलद गतीने जात. या उपयुक्ततेमुळे अत्यंत चपळाईने शत्रूवर हल्ला करता येत असे. यासोबतच रामबाण, रघुनाथ, दुर्गा, यशवंती, लक्ष्मी, हनुमंत नावाची गलबतं पण होती. इसवी सन 1674 मध्ये लखमसावंत आणि त्यांचा पुतण्या खेमसावंत दुसरा यांनी वेंगुर्ल्याच्या किनार्‍यावर इंग्रज व्यापार्‍यांचे एक गलबत पकडले होते, अशी नोंद त्या जहाजावरील जॉन फ्रायर याने केलेली आहे. इंग्रजांच्या सुदैवाने सावंतवाडीचे इंग्रजांपेक्षाही दणकट आणि सामर्थ्यशाली असलेले गलबत काही कारणाने परत फिरले व इंग्रजांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यावरून सावंतवाडी संस्थानची आरमारी तयारी लक्षात येते.

लखमसावंत व त्यांचा पुतण्या खेमसावंत दुसरा यांनी कुडाळ प्रांताच्या देसायांना ठार मारून त्यांचा भूभाग बळकावला. आदिलशाहीची मर्जी राखण्यासाठी त्यांनी विजापूरचा सरदार खवासखान याला सोबत घेऊन शिवरायांवर चढाई केली. साधारणतः यापर्यंतच्या काळात शिवरायांनी स्वतंत्र साम्राज्याचे ध्येय अंगीकारले होते आणि ते हळूहळू आपल्या पराक्रमाच्या उत्कर्षाकडे मार्गक्रमण करीत होते. शिवरायांनी या वेळी या दोघांचा दारुण पराभव केला. तेव्हा लखमसावंत आणि खेमसावंत दुसरा यांनी पोर्तुगिजांचा आश्रय घेतला. मात्र महाराजांनी पोर्तुगिजांचा फोंडा किल्ला जिंकून घेतला. यासमयी पोर्तुगिजांनी तह केला आणि लखमसावंत यांनीही शिवरायांसोबत पाच कलमी तह करून फौजेसह मराठा राज्याची सेवा करण्याचे तसेच आपल्या देशमुखीच्या उत्पन्नापैकी सहा हजार होन प्रतिसाल महाराजांना द्यायचे कबूल केले. यानंतर काही काळ लखमसावंतानी शिवछत्रपतींना साथ दिली. परंतु शिवरायांच्या ध्येयधोरणांशी न पटल्याने त्यांनी 1659 मध्ये शिवरायांशी झालेला सलोखा झुगारून पुढे पुन्हा आदिलशाहीशी सूत जमवले. या घडामोडींमुळे संतप्त झालेल्या शिवरायांचे सरदार बाजी पासलकर यांनी सावंतवाडीवर हल्ला करून सावंतांचा पाडाव केला व त्यांना आपल्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडले. मात्र सावंत हेसुद्धा शिवरायांप्रमाणेच भोसले कुलोत्पन्न असल्याने त्यांनी उदात्त विचारांनी सावंत यांचे अधिकार अबाधित राखले. सावंतवाडी संस्थानची म्हणून ओळखली जाणारी अशी तांब्याची व चांदीची नाणी आढळून येतात. यातील तांब्याची नाणी राजा खेमसावंत बाहादर तिसरे ( कालावधी – इ. स. 1755 ते 1803 ) यांनी पाडली होती, असे स्पष्टपणे म्हणता येते. या खेमसावंत तिसरे यांचा विवाह ग्वाल्हेरनरेश महादजी शिंदे यांच्या बहिणीशी झाला होता आणि महादजी शिंदे हे त्यासमयी दिल्ली दरबारचे ‘वकील – ई – मुतालिक’ म्हणून नेमले गेले होते. त्यांनी शाहआलम बादशाहकडे आपले वजन टाकून त्यांचे मेव्हणे खेमसावंत तिसरे यांजकहिता 1785 मध्ये ‘राजा बाहादर’ हा किताब घेतला होता. या कारणाने या तांब्याच्या पैशांना ‘राजाबाहादूरी’ पैसे असेही म्हटले जाते. या पैशांवर एका बाजूला ‘राजाखेमसावंत’ आणि दुसर्‍या बाजूला ‘बहादर’ असे देवनागरीत लिहिलेले आढळते. या पैशाचे वजन 7.5 ग्राम्स च्या आसपास असते. तसेच त्यांनी पाडलेले व वरील मजकूर तसेच फुलांचे डिझाइन असलेले पाव पैसे (1/4 पैसा) ही आढळतो. मात्र या पाव पैशाचा धातू व एक पैशाचा धातू तसेच त्याची बनावट (ाळपींळपस ीीूंश्रश) यात फरक आढळतो. नुकताच 1.8 ग्राम्सचा एकअष्टमांश पैसाही आढळून आला आहे. या नाण्याचा आणि एक पैशाच्या नाण्याचा धातू/तांबे आणि लिखावट तसेच ाळपींळपस ीीूंश्रश ही समान (र्वीािू रिीींंशीप) आढळली आहे. यानंतर सावंतवाडीच्या चांदीच्या नाण्यांचा व उर्वरित इतिहासाचा आढावा आपण पुढील लेखात घेऊ.


पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ इंदोरचे होळकर घराणे भाग – ३

 

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ इंदोरचे होळकर घराणे भाग – ३

पोस्तसांभार ::

प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर | मराठा नाणी संग्राहक, लेखक, व्याख्याते | नाणेघाट

मल्हारराव होळकर यांचे पुत्र असलेले तुकोजीराव प्रथम यांचाही जन्म खंडेराव होळकर ज्या वर्षी जन्मले म्हणजे इसवी सन १७२३ मध्ये, त्याचवर्षी झाला. मल्हारबाबा पुत्र खंडेरावांच्या अकाली मृत्यूनंतर राजकीय हालचालींबाबत, होळकरशाहीच्या वृद्धीबाबत स्नुषा अहिल्याबाईंशी चर्चा करीत असत. मल्हाररावांच्या निधनानंतर होळकर राजवटीची धुरा त्यांचे नातू आणि अहिल्याबाईंचे पुत्र मालेराव महाराज यांच्याकडे आली. मात्र असे आढळून येते की, ते राज्यशकट हाकण्यास तितकेसे सक्षम नव्हते. अखेरीस लवकरच ते अवघ्या ८ महिन्यांच्या कारभारानंतर ५ एप्रिल १७६७ ला मृत्यू पावले. यानंतर अहिल्याबाईंनी होळकरशाहीची सूत्रे हाती घेतली. त्यांना त्या वेळी जोरदार अंतर्गत विरोधही झाला. परंतु पंतप्रधान पेशवे थोरले माधवराव यांच्या त्यांच्यावरील असलेल्या विश्वासामुळे अहिल्याबाईंच्या विरोधकांना अखेर नमते घ्यावे लागले. या वेळी सर्वसाधारणपणे असे धोरण ठरले की राज्यकारभार आणि महसूल विनियोग हा अहिल्याबाई करतील आणि होळकरांच्या संपूर्ण सैन्याचे नेतृत्व तुकोजीराव पहिले हे करतील. तुकोजीरावांनी पुण्याला माधवराव पेशव्यांची भेट घेऊन त्यांना सुमारे साडेसोळा लक्ष रुपयांचा महसूल / नजराणा दिला आणि सुभेदारीची वस्त्रे तसेच होळकरशाहीचे अधिकृत नेतृत्व म्हणून ही मान्यता मिळवली. इकडे अहिल्याबाईंनी आपली राजधानी ‘महेश्वर’ येथे केली आणि त्या तिथून त्यांच्या मृत्यूपर्यंत संपूर्ण राज्याचा कारभार बघत होत्या. त्यांनीच होळकरशाहीच्या सर्व सैन्याचे अधिपती अर्थात लेाारपवशी ळप लहळशष म्हणून निवडलेले तुकोजीराव पहिले हे त्यासमयी इंदोर येथून सारी सूत्रे हलवीत असत. याप्रकारे होळकरशाहीच्या कारभाराचा हा दुहेरी वाटणी केलेला प्रयोग अहिल्याबाई असेपर्यंत तब्बल २९ वर्षे सुव्यवस्थितपणे सुरू होता, हे विशेष.

तुकोजीरावांनी या कालावधीत होळकरशाहीच्या सैन्याचे अतिशय सक्षमपणे आणि तडफदारपणे नेतृत्व केले होते. राघोबादादांच्या फौजा इंदोरवर चालून आल्या तेव्हा अहिल्याबाईंनी लगोलग आजूबाजूच्या राज्यकर्त्यांना मदतीसाठी बोलावले होते तसेच त्या वेळी उदयपूर येथे असलेल्या तुकोजीरावांना पण सांगावा धाडला होता. जलदीने हालचाल करून ते आपल्या सैन्यासह क्षिप्रा नदीच्या काठी तळ ठोकून बसले. राघोबादादांना आतापर्यंत सहकार्य करणारे महादजी शिंदे आणि जानोजी भोसले हे अहिल्याबाईंनी माधवराव पेशव्यांशी केलेल्या पत्रव्यवहाराने आणि माधवरावांनी अहिल्याबाईंना दिलेल्या पाठिंब्यामुळे चलबिचल होऊन माघारीची हालचाल करू लागले होते. ते ससैन्य क्षिप्रेच्या काठी आले असता दुसर्‍या बाजूला असलेल्या तुकोजीरावांनी त्यांना खडसावले की, आपण नदी पार करून होळकरशाहीत प्रवेश करू पाहाल तर आमच्या सामर्थ्यवान सैन्याशी तुमची गाठ आहे. अर्थात शिंदे, भोसल्यांच्या संयुक्त फौजा आणि अखेर राघोबादादांच्या फौजा यांनी काळवेळ ओळखून यशस्वी माघार घेतली, हे सांगणे नकोच. तुकोजीरावांनी इ.स. १७६९ मध्ये गोवर्धन येथे तसेच पुनःश्च १७७३ मध्ये भरतपूर येथे जाटांच्या सैन्याला जोरदार मात दिली. या विजयामुळे अर्थातच त्यांना भरपूर साधन-संपत्ती मिळाली, जी त्यांनी मराठेशाहीच्या चारही प्रतिनिधींत वाटली. तुकोजीरावांनी सुरुवातीला काही काळ राघोबादादांचा पक्ष घेतला होता परंतु नंतर बारभाईंच्या घडामोडींमुळे राघोबादादांना पेशवेपदावरून हटवण्याच्या मोहिमेअंतर्गत तुकोजीरावांनी मराठा सैन्यासह माही नदीच्या काठी राघोबादादांचा पराभवही केला. माधवरावांच्या निधनानंतर सुरू झालेली पेशवेपदाची अंतर्गत लढाई ही पुरंदरच्या तहापर्यंत दहा एक वर्षे सुरूच होती. या दीर्घ कालावधीत आपल्या सैन्याच्या कराव्या लागलेल्या हालचालींमुळे तुकोजीरावांना आर्थिक झळदेखील मोठ्या प्रमाणात सोसावी लागली.

इ.स. १७७७ मध्ये तुकोजीरावांनी सहा हजारांच्या सैन्यासह ब्रिटिशांचा बोरघाटात पराभव केला. या कारणाने पेशव्यांनी त्यांना ५ लाखांचा नवा सरंजाम तसेच बुंदेलखंड आणि खानदेशची सुभेदारी दिली.
असे अनेक जय-पराजय स्वीकारत असताना महादजी शिंद्यांचा सरदार गोपाळरावांनी अनपेक्षितपणे तुकोजीरावांच्या सैन्यावर हल्ला करून त्यांचे मोठे नुकसान केले. या वेळी महादजी शिंदे देवदर्शनासाठी दक्षिणेकडे रवाना झालेले होते. हे वृत्त कळताच अहिल्याबाईंनी तातडीने मदत म्हणून ५ लक्ष रुपये तुकोजीरावांकडे पाठवले होते. यानंतरच्या लेखारी या ठिकाणी ही शिंदे आणि होळकरांच्या सैन्यात झडप झाली. यानंतर तुकोजीराव मोठ्या आर्थिक नुकसानीसह इंदोरला स्वगृही परतले. त्यांचे पुत्र काशिराव यांच्या सांगण्यावरून अहिल्याबाईंनी पुन्हा तुकोजीरावांकरिता ५ लक्ष रुपयांची तरतूद केली. यानंतर अहिल्याबाई १३ ऑगस्ट, १७९५ रोजी मृत्यू पावल्या. अहिल्याबाईंच्या मृत्यूसमयी तुकोजीराव आणि पुत्र काशिराव हे पुणे दरबारी रुजू होते. आता पंतप्रधान पेशव्यांच्या पाठिंब्याने तुकोजीराव हे संपूर्ण होळकरशाहीचे अधिपती झाले. तुकोजीरावांनी तातडीने पुत्र काशिरावांना महेश्वर ला पाठवले आणि प्रशासकीय बाबी सांभाळण्याची तसेच खजिन्याची मोजदाद करण्याची आज्ञा केली. या अत्यंत थोडया कालावधीत म्हणजे जेमतेम दीडएक वर्ष तुकोजीराव पहिले हे इंदोरचे अधिपती राहिले आणि लवकरच म्हणजे १५ ऑगस्ट, १७९७ ला त्यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या अतिशय अल्पस्वल्प राजवटीत महेश्वर आणि मल्हारनगर येथे चांदीची नाणी पाडली गेलेली आढळतात. या नाण्यांवर शिवलिंग, बिल्वपत्र तसेच सूर्य / मार्तंड छापलेले आढळते. तुकोजीरावांनी सोन्याची अथवा तांब्याची नाणी पाडल्याचे अजून तरी आढळून आलेले नाही. महेश्वर मिंटचा हिजरी सन १२११ आणि मल्हारनगर मिंटचे हिजरी सन १२१० आणि १२११ या वर्षांचा उल्लेख असलेले रुपये आढळून येतात.

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ – इंदोरचे होळकर घराणे : २

 

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ – इंदोरचे होळकर घराणे : २

पोस्तसांभार :: प्रशांत सुमति भालचंद्र ठोसर, ठाणे | मराठा नाणी संग्राहक, अभ्यासक, लेखक, व्याख्याते |  नाणेघाट


 

 

 मराठेशाहीच्या इतिहासातील एक मानाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे इंदूर संस्थानच्या महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. राजमाता जिजाऊसाहेब, येसूबाईसाहेब, ताराराणीसाहेब, ग्वाल्हेरच्या बायजाबाई शिंदेसाहेब आणि इंदूरच्या अहिल्याबाई होळकरसाहेब या मराठेशाहीतील कर्तृत्ववान राज्यकर्त्या स्त्रिया गणल्या जातात.

अहिल्याबाई होळकर !
जसे श्वशुर मल्हारराव होळकर हेदेखील मूळचे महाराष्ट्रातील तद्वत अहिल्याबाई पण मूळच्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंढी गावच्या. त्यांचा जन्म 31 मे 1725 रोजी झाला. एका आख्यायिकेनुसार मल्हारबाबांनी जे माळवा प्रांताचे सुभेदार होते, त्यांनी पुण्यास जात असताना छोट्या अहिल्याबाईंना बघितलं आणि त्यांस आपली सून करावी, या हेतूने आपले चिरंजीव खंडेराव याच्यासोबत लग्नबंधनात बांधले. मात्र अत्यंत अल्पकाळात खंडेराव होळकर 1754 मध्ये कुंभेरच्या लढाईत दुर्दैवाने मृत्यू पावले. मल्हारबाबांनी अहिल्याबाईंस तत्कालीन प्रथेनुसार पतीनिधनानंतर चितेवर सहगमन करण्यापासून महत्प्रयासाने रोखले. खंडेराव आणि अहिल्याबाईंच्या मुलाचे नाव होते मालेराव. मात्र पुढे पानिपतच्या संग्रामानंतर इसवी सन 1766 ला मल्हाररावदेखील इहलोक सोडून गेले.

मल्हारबाबांनंतर होळकरशाहीची धुरा त्यांचे नातू मालेराव बघू लागले होते. परंतु दुर्दैवाने तेदेखील अल्पायुषी ठरले आणि अत्यंत अल्पकाळ राज्यकारभार करून 5 एप्रिल 1767 ला मृत्यू पावले. मालेरावांच्या या अल्पशा कालावधीत नाणी पाडली गेली नसावीत, असाच तज्ञांचा अंदाज आहे. आता होळकरशाहीची धुरा सांभाळण्याची जबाबदारी अहिल्याबाईंच्या खांद्यावर आली. त्याही धीरोदात्त वृत्तीने समर्थपणे माळवा प्रांतात मराठेशाहीची धुरा वाहू लागल्या. श्वशुर मल्हाररावांचे दत्तकपुत्र आणि आपले दीर तुकोजीराव पहिले यांची त्यांनी सेनापती म्हणून नेमणूक केली आणि त्या स्वतः सुयोग्यपणे प्रशासकीय भाग पाहू लागल्या. इकडे या घडामोडींमुळे होळकरांचे दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड हे गादीला पुरुष वारस हवा म्हणून अहिल्याबाईंवर दबाव टाकू लागले; जेणेकरून गंगाधरपंतांचा राज्यकारभारातील दबदबा वाढेल. याहीपुढे जाऊन त्यांनी राघोबादादांशी संधान बांधून त्यांच्या फौजा माळव्याच्या प्रदेशात आणायला लावल्या. अहिल्याबाईंना या कारस्थानाची माहिती कळताच त्यांनी चाणाक्षपणे आजूबाजूच्या राज्यकर्त्यांकडे मदतीचा हात मागितला आणि त्यांनीही तो तातडीने देऊ केला. अहिल्याबाईंनी तातडीने उदयपूरला असलेल्या तुकोजीरावांना पण माघारी बोलावले. त्याचबरोबर अहिल्याबाईंनी एकीकडे थोरल्या माधवराव पेशव्यांशी संधान बांधताना राघोबादादांनाही चतुराईने आणि धीटपणे एका स्त्रीसोबतच्या युद्धात पराभूत झालात तर सर्वत्र छी-थू होईल, असा गर्भित इशारा दिला. आता राघोबादादांनाही आपली चूक कळली आणि त्यांनी मी सांत्वन करायला आलो होतो युद्धाकरिता नव्हे, असे उत्तर देऊन यशस्वी माघार घेतली.


अहिल्याबाईंनी आपली राजधानी महेश्वर ही केली. या महेश्वरच्या रुपयांवर, नाण्यांवर शिवलिंग आणि बिल्वपत्र छापलेलं असतं. अहिल्याबाई आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे इसवी सन 1795 पर्यंत महेश्वर येथेच राहिल्या. अहिल्याबाईंनी मल्हारनगर येथे ही स्वतःची नाणी पाडली. या मल्हारनगरच्या नाण्यांवर सूर्य छापलेला असतो. मल्हारनगर येथे हिजरी सन अ.क. 1182 – 1183 यावर्षी आणि अ.क. 1195 – 1196 यावर्षीदेखील नाणी पाडल्याचे आढळून येत नाही. त्यावर्षी नाणी का पाडली गेली नसावीत, हे सुयोग्य पुराव्यांअभावी, नोंदी अभावी कळू शकत नाही. समजा, ती त्या वर्षी पाडली गेली असतील, तरीही त्या वर्षांचे एकही नाणे आजतागायत उपलब्ध झालेले नाही. मल्हारनगर नाण्यांवरील छापलेला सूर्य म्हणजेच मार्तंड स्वरूप. मल्हारनगरचे प्रथम पाडले गेलेले/आढळून येणारे नाणे म्हणजे अ.क. 1184 या हिजरी वर्षाचे आहे. महेश्वर मिंट / टांकसाळीत प्रथम पाडले गेलेले नाणे हे हिजरी सन 1180 चे सापडते. महेश्वर आणि मल्हारनगर (इंदोर) या दोन्हीही टांकसाळींच्या तुलनेत मल्हारनगरची नाणी जास्त छापलेली आढळतात. अहिल्याबाईंनी तांब्याची नाणी पण छापली होती. मात्र ती चांदीची नाणी छापायला सुरुवात केल्यानंतर तब्बल 20 – 22 वर्षांनी. यातील काही नाण्यांवर कट्यार तसेच चवरी हे राजचिन्ह आढळून येते. महेश्वरहून राज्यकारभार करीत असताना अहिल्याबाईंजवळ एक अनमोल अशी चंदनाची चवरी होती, असे स्पष्ट उल्लेख आहेत. कदाचित तीच या नाण्यांवर छापली असावी, असा अभ्यासकांचा एक तर्क आहे.

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ - इंदोरचे होळकर घराणे : २
पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ – इंदोरचे होळकर घराणे : २

अहिल्याबाईंच्या कारकिर्दीत माळव्याच्या जनतेला एक न्यायाचे, समृद्धीचे, भरभराटीचे राज्य अनुभवायला मिळाले. अहिल्याबाईंनी अतिशय चोखपणे, दूरदृष्टी राखून जवळजवळ 30 वर्षे राज्यकारभार केला. त्या सात्विक, धार्मिक वृत्तीच्या असल्याकारणाने त्यांनी अनेक देवालयांचा, मंदिरांचा जीर्णोद्धार केला. पांथस्थ, प्रवाशांसाठी जागोजागी धर्मशाळा उभारल्या. नद्यांवर घाट बांधून मुबलक पाणीपुरवठा होत राहील, याकडे लक्ष दिले. मंदिरांमध्ये नित्यनेमाने पूजाअर्चा सुरू राहाव्यात यासाठी अनेक दाने दिली. माळव्यात रस्ते, किल्ले बांधले, अनेक उत्सव सुरू केले. सतीची कुप्रथा बंद करण्यासाठी सातत्याने लोकजागृती केली. यासाठी रामायण, महाभारताचे दाखलेही दिले. पुढे ब्रिटिशांच्या राजवटीत राजा राममोहन रॉय यांनी पुढाकार घेऊन ही अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केली.

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ - इंदोरचे होळकर घराणे : २
पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ – इंदोरचे होळकर घराणे : २

यावरून अहिल्यादेवींची दूरदृष्टी लक्षात येते. हस्तलिखितं लिहून घेणार्‍यांसाठी भरभक्कम पैसे मोजून त्यांच्याकरवी विविध महत्त्वपूर्ण दुर्मीळ ग्रंथ हस्तलिखित स्वरूपात करवून घेतले. अशा जीवनातील विविध बाबींवर उत्तमोत्तम कार्य करून, करवून घेऊन, समाजातील शेवटचा घटकदेखील सुखी व्हावा, यासाठी अवघे आयुष्य घालवून या महाराष्ट्रकन्येने, होळकर राजवटीच्या सम्राज्ञीने आणि माळव्याच्या जनतेच्या मनातील अहिल्यादेवींनी अखेर 70 व्या वर्षी हा नश्वर पृथ्वीलोक त्यागला. नंदादीपाप्रमाणे आपल्या लोककल्याणकारी कार्याने त्यांनी आपले आणि सामान्यांचे जीवन उजळून टाकले. म्हणूनच आजही लोक त्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ असे अत्यंत आदरपूर्वक आणि कृतज्ञतापूर्वक म्हणतात.

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...