विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 30 March 2019

पेशवे

पेशवे :

 मुख्यप्रधान या अर्थी मराठी अंमलात वापरलेली संज्ञा. प्राचीन काळी मुख्यप्रधान हे पद अस्तित्वात होते किंवा काय ह्याविषयी विद्वानांत मतभेद आहेत. परंतु मुसलमानी अंमलात पेशवा ह्या शब्दाने मुख्यप्रधानाचा उल्लेख आढळतो. एखादे मोठे देवस्थान किंवा एखाद्या मोठ्या घराण्याची जहागीर ह्यांची व्यवस्था पाहणाऱ्या प्रमुख व्यक्तीस पेशवा किंवा प्रधान आणि पुढे मुख्यप्रधान म्हणू लागले. जेजुरी देवस्थानाचे पेशवे आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे प्रधान ही घराणी अद्यापि विद्यमान आहेत. शिवछत्रपतींचे पहिले प्रधान किंवा मुख्यप्रधान शामराज रांझेकर या नावाचे गृहस्थ होते.त्यानंतर महादेव मुख्यप्रधान झाले; पण दोघांच्याही शिक्यांत मुख्यप्रधान असा शब्द न वापरता ‘मतिमंत्‌प्रधान’ असा निर्देश आला आहे. शामराजाचा शिक्का शके १५८४ (इ. स. १६६२) पर्यंतच्या, तर महादेवाचा शिक्का १५९४ (इ. स. १६७२) पर्यंतच्या कागदांवर आढळतो. नंतर मोरोपंत त्रिमल पेशवे हे शिवाजी महाराजांचे मुख्यप्रधान झाले. पहिल्या दोन प्रधानांची कर्तबगारी समजण्यास मार्ग नाही; पण मोरोपंत पेशवे प्रधान होण्यापूर्वी कित्येक वर्षे शिवछत्रपतींच्या सेवेत असून, त्यांनी कोकणात व देशावर अनेक प्रकारच्या यशस्वी हालचाली केल्यानंतर त्यांना मुख्यप्रधानपद मिळाले. शिवराज्याभिषेकाच्या वेळी तेच मुख्यप्रधान होते. त्यांच्या पहिल्या शिक्क्यात प्रधानकीचा निर्देश नाही; पण पुढील दोन्ही शिक्क्यांत त्यांचा मुख्यप्रधान म्हणून निर्देश आला आहे. संभाजीच्या कारकीर्दीच्या आरंभी तेच मुख्यप्रधान होते. ते वारल्यानंतर त्यांचा थोरला मुलगा निळो मोरेश्वर हा मुख्यप्रधान झाला.⇨ छत्रपती शाहू मोगलांच्या कैदेतून १७०७ साली सुटून आल्यानंतर १७१३ पर्यंत निळो मोरेश्वराचा भाऊ बहिरो मोरेश्वर हाच मुख्यप्रधान म्हणून काम पहात होता; पण त्यानंतर शाहूने ⇨ बाळाजी विश्वनाथ (कार. १७१४ – २०) या कोकणातील भट घराण्यातील हुशार आणि कर्तबगार इसमास मुख्यप्रधानकी दिली. ती वंशपरंपरेने चालली, म्हणून भट घराण्यास पेशवे घराणे व त्यांच्या कारकीर्दीस पेशवाई असे म्हटले जाते. बाळाजीने मराठी राज्यातील कान्होजी आंग्रे, उदाजी चव्हाण इ. मातबर सरदारांना छत्रपती शाहूच्या छत्राखाली एकत्र आणून मराठी राज्याची विसकटलेली घडी पुन्हा नीट बसविली. त्यानंतर त्याचा थोरला मुलगा ⇨ पहिला बाजीराव (कार. १७२० – ४०) यास शाहूने पेशवेपदाची वस्त्रे दिली. पहिल्या बाजीरावामध्ये धडाडी होती. त्याने आपल्या पराक्रमाने छत्रपती व मराठे सरदार यांमध्ये परस्परविश्वास निर्माण केला आणि मोगलांच्या ऱ्हासाची संधी साधून मराठी राज्याचा विस्तार राजपूत, बुंदेले यांच्या मदतीने उत्तर हिंदुस्थानात केला. शिवाय दक्षिणेतील मोगल सुभेदार आसफजाह निजाम याचा अनेक लढायांत पराभव करून त्याच्यावर वचक बसविला आणि खंडणी वसूल केली.

चिमाजी आप्पा (? – १७४०) हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. बाजीराव मुख्यप्रधान झाल्यावर पहिली काही वर्षे तो अंबाजी त्रिंबक पुरदंरे यांच्यासह साताऱ्यास पेशव्यांचा वकील म्हणून काम करी. पण पुढे तोही स्वाऱ्यांवर जाऊ लागला. त्याने केलेल्या पहिल्या मोठ्या मोहिमेत आमझरे येथे झालेल्या लढाईत त्यावेळचा माळव्याचा मोगल सुभेदार गिरिधर बहादुर व त्याच्या नातेवाईक दया बहादुर यांना ठार करून सबंध माळवा आपल्या ताब्यात आणला आणि तो शिंदे, होळकर व पवार या तीन सरदारांत वाटूनही टाकला. नंतर त्याने कोकणातील मराठी राज्यास त्रास देणाऱ्या सिद्दी सात यास लढाईत ठार केले व कोकणात कायमचा वचक बसविला. या वेळी बाजीराव उत्तर हिंदुस्थानात होता. तो परत येत असता निजामाने भोपाळजवळ त्यास अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चिमाजी आप्पाने निजामाला दक्षिणेतून येणारी मदत बंद करून जेरीस आणले. तेव्हा तो बाजीरावांस शरण आला. चिमाजी आप्पाची सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे वसई हस्तगत करणे, ही होय. १७३७ ते १७३९ ही दोन वर्षे अटीतटीचा सामना होऊन शेवटी चिमाजी आप्पाने वसई जिंकली व पोर्तुगीजांचे तेथील बस्तान पार उखडून टाकले. नंतर पुढल्याच वर्षी बाजीराव व चिमाजी आप्पा यांनी औरंगाबादजवळ निजामास गाठून त्याची हांडे व खरगोण ही सरकारे हस्तगत केली. बाजीराव नर्मदेकाठी रावेरखेडी १७४० मध्ये मरण पावला. त्यानंतर त्याचा थोरला मुलगा ⇨ बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब (कार. १७४० – ६१) यास मुख्यप्रधानपद मिळाले. त्याला घेऊन चिमाजी आप्पा पावसाळा संपताच उत्तरेच्या स्वारीवर निघाला; पण या वेळी चिमाजीची प्रकृती अतिशय बिघडून तो १७ डिसेंबर १७४० रोजी एदलाबाद येथे मरण पावला.
बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीत मराठी राज्याचा उत्तरेत व दक्षिणेत विस्तार झाला. पेशवेपदाचे महत्त्व अनन्यसाधारण वाढले व शाहूच्या मृत्यूनंतर (१७४९) छत्रपतिपदाचे महत्त्व कमी होऊन मराठी सत्तेची सूत्रे पेशव्यांकडे आली. दिल्लीचा बादशाह पेशव्यानांच मराठी राज्याचा प्रमुख मानू लागला. बाळाजी बाजीरावाच्या कार्यात चिमाजी आप्पाचा मुलगा सदाशिवराव भाऊ (३ ऑगस्ट १७३० – १४ जानेवारी १७६१) याचे खूप साहाय्य झाले. हा पिलाजी जाधवाबरोबर १७४७ मध्ये प्रथम सोंध्याच्या स्वारीवर गेला होता. तदनंतर त्याने अनेक लहानमोठ्या स्वाऱ्यांमध्ये भाग घेतला. भाऊस राज्यकारभारात अधिकाधिक भाग घेण्यास संधी मिळत गेली. तो राज्याच्या आयव्ययाविषयी विशेष दक्ष होता. तिसऱ्या ⇨ पानिपताच्या लढाईत मराठ्यांचा फार मोठा पराभव झाला. या युद्धात भाऊसाहेब, विश्वासराव व समशेर बहाद्दर हे पेशवे घराण्यातील तीन कर्ते पुरूष धारातीर्थी पडले.

विश्वासराव (२२ जुलै १७४२ – १४ जानेवारी १७६१) हा बाळाजी बाजीरावचा ज्येष्ठ मुलगा. राज्यकारभार व सैनिकी शिक्षण मिळावे म्हणून सिंदखेड, उदगीर व पानिपत अशा तीन स्वाऱ्यांवर यास पाठविले होते. पानिपतच्या लढाईत हत्तीवर बसून लढाईचे निरीक्षण करीत असता शत्रूची गोळी लागून तो मरण पावला. समशेर बहाद्दर (? १७३४ – १४ जानेवारी १७६१) हा मस्तानीस पहिल्या बाजीपासून झालेला मुलगा. याच्याविषयी फार थोडी माहिती मिळते. याची मुख्य कामगिरी उत्तर हिंदुस्थानात १७५६ ते १७६१ पर्यंत आढळते. हा पानिपतच्या लढाईत मराठ्यांच्या सैन्यात एका पथकाचा सेनापती होता.
पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर बाळाजी बाजीराव मृत्यू पावला.त्यानंतर ⇨ थोरल्या माधवरावास (कार. १७६१ – १७७२) पेशवाईची वस्त्रे मिळाली. पानिपतच्या पराभवामुळे मराठ्यांचे झालेले नुकसान त्याने आपल्या कर्तबगारीने भरून काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला. राक्षसभुवनाच्या लढाईत त्याने निजामास नमवून दक्षिणेत हैदर अलीस वठणीस आणले आणि मराठ्यांचे वर्चस्व स्थापन केले. माधवरावाच्या अकाली मृत्यूने पानिपतपेक्षाही मराठेशाहीचे अधिक नुकसान झाले.

थोरल्या माधवरावाच्या मृत्यूनंतर त्याचा धाकटा भाऊ नारायणराव (१० ऑगस्ट १७५५ – ३० ऑगस्ट १७७३)याजकडे मुख्यप्रधानकी आली. ही प्रधानकी मिळाल्यापासून १० महिन्यांच्या आतच त्याचा खून झाला. नारायणरावानंतर त्याचा मुलगा ⇨ सवाई माधवराव हा सव्वा महिन्याचा असतानाच त्यास सातारच्या छत्रपतींकडून मुख्यप्रधानपदाची वस्त्रे आणविली होती. माधवराव लहान असल्यामुळे सखारामबापू बोकील व नाना फडणीस असे दोघे त्याचे प्रतिनिधी म्हणून मुख्यप्रधानकीचे काम पहात होते. नारायणरावाचा वध घडवून आणण्यात ज्याने प्रमुख भाग घेतला होता, त्या त्याच्या चुलत्याने म्हणजे ⇨ रघुनाथरावाने खुनानंतर मुख्यप्रधानपद स्वत:स मिळवण्याचा चंग बांधला; सवाई माधवरावापूर्वी थोडे दिवस त्याने ते पद उपभोगले. ऱघुनाथरावाची कृती निषेधार्ह वाटल्यामुळे सखारामबापू, नाना फडणीस व त्यांचे इतर सहकारी यांनी ते पद रघुनाथरावास काही झाले तरी मिळू द्यावयाचे नाही, असा निश्चय करून त्यासाठी पक्की योजना आखली. त्या योजनेला ⇨ बारभाईंचे कारस्थान असे म्हणतात.
रघुनाथराव बारभाईंना शरण आला व त्याचे राजकीय जीवन संपले. माधवराव सज्ञान झाल्यावर राज्यकारभाराचे काही काम पाहू लागला. ⇨ खर्ड्याचीलढाई झाली (१७९५), तेव्हा तीत सवाई माधवराव उपस्थित होता. ती लढाई म्हणजे नाना फडणीसाच्या मुत्सद्देगिरीचा कळस होता. खर्ड्याची लढाई संपल्यावर सवाई माधवरावाला ताप येऊ लागला आणि त्या तापाच्या भरात त्याने शनिवारवाड्यातील गणेश महालाच्या दुसऱ्या मजल्यावरून दक्षिणेच्या कारंजावर उडी टाकली. दोन दिवसांतच दिनांक २७ ऑक्टोबर १७९५ रोजी तो मृत्यू पावला. त्याला मूलबाळ नव्हते. यामुळे आता पेशवेपदावर कुणाला बसवावे, याविषयी नाना फडणीसास पेच पडला. त्याने सवाई माधवरावाची बायको यशोदाबाई हिच्या मांडीवर अमृतरावास (रघुनाथरावाचा दत्तक पुत्र) दत्तक देऊन राज्यकारभार सुरू केला. पण शिंदे व होळकर यांमध्ये वाढते वितुष्ट उत्पन्न झाले. तेव्हा नाना फडणीसाने ⇨ दुसऱ्या बाजीरावास (कार. १७९५– १८१८) पेशवेपदावर बसविले. नाना फडणीसास राज्याची बिघडलेली घडी पुन्हा नीट बसवता आली नाही. नाना फडणीस मेल्यानंतर (१८००) दुसऱ्या बाजीरावाच्या राज्यकारभारात गोंधळ उत्पन्न झाला. सरदार त्यास विचारीनासे झाले. तेव्हा निरूपाय होऊन १८०२ मध्ये दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांशी वसई येथे तह केला आणि त्यांची जवळजवळ मांडलिकी पतकरली. पुढे त्याने इंग्रजांविरूद्ध उठाव करण्याचे ठरवले; परंतु सर्व मराठी सरदारांना एकत्र आणून इंग्रजांशी लढण्याचे कर्तृत्व त्यास दाखविता आले नाही. ⇨ बापू गोखले हा त्याचा कर्तबगार सेनानी अष्टीच्या इंग्रज-पेशवे लढाईत मरण पावला (१८१८). पुढे इंग्रजांनी दुसऱ्या बाजारावाची उत्तर हिंदुस्थानात कानपूरजवळ विठूर येथे रवानगी केली आणि वार्षिक आठ लाख रूपये पेन्शन घेऊन तेथेच कायमचे वास्तव्य करण्यास त्यास सांगितले. अशा तऱ्हेने शिवकालात चालू झालेले पेशवेपद १८१८ मध्ये संपुष्टात आले.
१८२७ मध्ये दुसऱ्या बाजीरावाने माधव नारायणराव या आप्ताचा मुलगा नानासाहेब (१८२० ? – १८५९) यास दत्तक घेतले. त्याचे मूळ नाव गोविंद धोंडोपंत. बाजीरावाच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी त्याला पेन्शन नाकारले. १८५७ च्या उठावात २७ जुलै १८५७ रोजी त्यास तात्या टोपे व त्यांच्या सहकार्यानी पेशवा म्हणून जाहीर केले. या उठावात पराभव झाल्याने तो नेपाळात निघून गेला. त्याच्याविषयी अनेक आख्यायिका रूढ आहेत.
पहा : मराठी अंमल.

संदर्भ :1. Majumdar, R. C. Ed. The Maratha Supremacy, Bombay, 1977.
२. सरदेसाई, गो. स. मराठी रियासत, मध्यविभाग चार भाग व उत्तर विभाग, दोन भाग, पुणे, १९२५.

खरे, ग. ह.

सरखेल आंग्रे

सरखेल आंग्रे
मराठ्यांच्या इतिहासातील प्रसिद्ध नाविक योद्धा. पुणे जिल्ह्यातील काळोसे हे त्यांचे मूळ गाव व संकपाळ हे मूळ आडनाव. काळोसेतील आंगरवाडी या भागामुळे त्यांस आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले. कान्होजींचे वडील तुकोजी ह्यांना शिवाजीच्या आरमारात २५ असामींची सरदारी होती असे म्हणतात. औरंगजेब मराठ्यांना जिंकण्यासाठी १६८१च्या शेवटी महाराष्ट्रात आला. त्या वेळी कान्होजींच्या कोकणपट्टीतील कार्यास सुरुवात झाली. १६९४ पासून ९८ पर्यंत त्यांनी कोकणपट्टीतले मोगलांनी व इतरांनी काबीज केलेले मराठ्यांचे बहुतेक सर्व किल्ले परत घेतले. छत्रपती राजारामांनी त्यांची ही कामगिरी पाहून त्यांस ‘सरखेल’ हा किताब दिला. १६९६ मध्ये त्यांनी कुलाबा जिंकून ते आपले मुख्य ठाणे केले. पुढे राजारामांनी त्यांस मराठी आरमाराचा मुख्याधिकारी केले. राजारामांच्या मृत्यूनंतर (१७००) थोड्याच वर्षांत शाहूंची सुटका होऊन १७०७ मध्ये ते छत्रपतींच्या गादीवर आले. त्या वेळी राजारामांची पत्‍नी ताराबाई व पुतणे शाहू ह्यांत गादीबद्दल तंटा सुरू झाला. कान्होजींनी ताराबाईंचा पक्ष घेऊन १७०७ ते १०च्या दरम्यान अनेक विजय मिळविले. ताराबाईंनी सावंतवाडी ते मुंबईपर्यंतच्या किनाऱ्याच्या संरक्षणार्थ मराठी आरमाराचे प्रमुख म्हणून त्यांस नेमले आणि इंग्रजांच्या मदतीने शाहूंनी कोणतीही हालचाल करू नये, या हेतूने राजमाचीचा किल्ला व भिवंडी प्रांताचा बंदोबस्त करण्यास कान्होजींना सांगितले. १७१३त शाहूंनी कान्होजींविरुद्ध बहिरोपंत पिंगळे ह्यांस धाडले. कान्होजींनी त्यांचा पराभव करून त्यांस कैद केले. त्यामुळे शाहूंनी बाळाजी विश्वनाथ या पेशव्यास कान्होजींवर धाडले. बाळाजीने कान्होजींबरोबर सलोखा करून तह केला. त्यात कान्होजींस १० जंजिरे व १६ किल्ले मिळाले व त्यांनी शाहूचे अंकित बनून सालिना १२,००० रु. त्यास देण्याचे ठरले. त्याशिवाय त्यांची सरखेली त्यांजकडे कायम करण्यात आली व सर्व आरमाराचे आधिपत्य त्यांस दिले. अशा प्रकारे ते शाहूंच्या पक्षात सामील झाले व अखेरपर्यंत त्यातच निष्ठेने राहिले.

कान्होजींची सत्ता कोकण किनाऱ्यावर कोट मांडवेपासून त्रावणकोरपर्यंत पसरली. ही गोष्ट तत्कालीन इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज व डच ह्या परकीयांस आणि जंजिऱ्याच्या सिद्दीस बोचत होती. इंग्रज, डच, पोर्तुगीज व फ्रेंच ह्यांनी कधी स्वतंत्रपणे, तर कधी संयुक्त रीत्या त्यांवर चढाई केली. पण प्रत्येक वेळी त्या सर्वांचा पराभव झाला. आंग्र्यांच्या अंमलाखालील सागरी प्रदेशांतून ये-जा करणाऱ्यास दस्तक (परवाना) घ्यावयास भाग पाडून समुद्रावर त्यांनी आपले निरपवाद स्वामित्व प्रस्थापिले आणि सिद्दीस वारंवार माघार घेण्यास भाग पाडले. कुलाबा व विजयदुर्ग येथे जहाजे बांधण्यासाठी त्यांनी गोद्या बनविल्या. त्यांची जहाजे कच्छपासून त्रावणकोरपर्यंत सागरात निर्वेधपणे संचार करीत.

कान्होजी सुद्दढ व प्रेमळ होते. तथापि त्यांचे हुकूम सक्तीचे व शिक्षा कडक असे. त्यांना मथुराबाई, लक्ष्मीबाई व गहिनाबाई या तीन धर्मपत्‍नी होत्या. त्यांना सहा मुलगे झाले. असा हा सागरी अनभिषिक्त राजा अलिबाग येथे मरण पावला. त्यांच्या मरणानंतर त्यांच्या मुलांत तंटे सुरू होऊन पुढे आंग्रे घराण्याची वाताहत झाली.

संदर्भ : ढबू, दा. गो. कुलाबकर आंग्रे सरखेल, मुंबई, १९३९.

आपटे, भा. कृ.

बाजीराव पेशव्यांनी निजामाला चारली धूळ -


बाजीराव पेशव्यांनी निजामाला चारली धूळ -
इ.स. १७१३मध्ये छत्रपती शाहूने बाळाजी विश्वनाथला पेशवाईची वस्त्रे दिल्यापासून दहा-बारा वर्षांत बाळाजीने मोडकळीस आलेल्या मोगल साम्राज्याचे लचके तोडून मराठा साम्राज्यास जोडण्याचा उद्योग लावलेला होता. याचे पारिपत्य करण्यासाठी मोगल सम्राट मुहम्मद शाह याने ऑक्टोबर इ.स. १७२४मध्ये निझाम-उल-मुल्क यास दख्खनचा वजीर नेमले व त्यास दख्खनेत पाठवले. तोपर्यंत बाळाजीचा मुलगा बाजीराव पहिला पेशवेपदी आला होता.
याच सुमारास मराठा साम्राज्यात दुफळी निर्माण होऊ घातली होती. साताऱ्यास छत्रपती शाहू तर कोल्हापूरास छत्रपती संभाजी यांनी स्वतःला शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचे एकमेव वारस असल्याचे जाहीर केले होते. निझामाने याचा फायदा घेण्याचे ठरवले व कोल्हापूरच्या गादीस आपला पाठिंबा दिला. याउप्पर निझामाने दख्खनातील देशमुखांकरवी सरदेशमुखी व चौथ (महसूली उत्पन्नाचा चौथा भाग) मराठ्यांच्या हवाली करणे बंद करवले. या कारणांस्तव छत्रपती शाहू व बाजीराव पेशव्यांनी निझामास धडा शिकवण्याचे ठरविले.
१७२७च्या शेवटी बाजीराव आपल्या सैन्यासह कर्नाटकातील मोहीमेवर होता. निझामाने महसूल देणे बंद करविल्यावर छत्रपती शाहूस निझामाला धडा शिकवण्याचा व त्यानिमित्ताने मराठा साम्राज्याचा पूर्वेस विस्तार करण्याचा सल्ला बाजीरावाने दिला. छत्रपतींनी बाजीरावास सैन्यासह आपल्याकडे बोलावून घेतले. इकडे कोल्हापूरातील श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांनी छत्रपती संभाजीला निझामाशी वाटाघाटी करण्याचे सुचवले. पावसाळा संपतासंपता बाजीरावाने सैन्यास कुमक लावून घेतली व औरंगाबादकडे कूच केले. जालन्याजवळ त्याने निझामाच्या सैन्यावर छापा घातला आणि शत्रू सावध होउन लढायला तयार होईपर्यंत मराठा सैन्याने उत्तरेस बुऱ्हाणपुराकडे वाट काढली.
निझामाचा सरदार इवाझ खान याने बाजीरावाचा पाठलाग सुरू केला. बाजीराव खानदेशातून गुजरातकडे निघाला. बाजीराव आपल्याला पतंगाप्रमाणे ओढीत नेत असल्याचे लक्षात येउन निझामाच्या सैन्याने त्याचा नाद सोडला व बाजीरावास शह देण्यासाठी त्याने पुण्यावरच चाल केली. आपल्या राजधानीकडे शत्रू जात असल्याचे पाहून बाजीराव आपसूकच आपल्या जाळ्यात येईल असा निझामाचा डाव होता. निझामाने दक्षिणेकडे सरकत उदापूर, अवसरी, पाबळ, खेड, नारायणगाव जिंकले. त्यानंतर खुद्द पुण्यात घुसून तेथे तळ ठोकला आणि तेथून साताऱ्यावर चाल केली. आतातर त्याने सुपे, पाटस आणि बारामती पर्यंत धडक मारली आणि साताऱ्यातील छत्रपतींना धोका निर्माण केला.
असा शह बसल्यावर छत्रपती, बाजीराव किंवा दोघेही नाक मुठीत धरून आपल्यास शरण येतील असा निझामाचा हा डाव पूर्ण होत आला होता. बाजीरावाने त्यास भीक न घालता निझामासच काटशह देण्याचे ठरवले व खुद्द निझामाची राजधानी असलेल्या औरंगाबादवर चाल केली. निझामास ही खेळी अनपेक्षित होती. त्याला औरंगाबादचा बचाव करणे भाग होते पण हाताशी आलेला मराठा छत्रपती सोडणेही त्याच्या जीवावर आले होते. त्याने आता कोल्हापूरच्या छत्रपतींना साताऱ्यावर चाल करण्यास सुचवले. काट्याने काटा काढण्याची ही निझामाची हिकमत नामी होती. छत्रपती संभाजीला आपली सत्ता प्रबळ करणे ही लालूच दाखवून कोल्हापूरला आपले धार्जिणे राज्य करून घेणे निझामाला अपेक्षित होत. परंतु येथेही त्याचा अंदाज चुकला. संभाजी व पंतप्रतिनिधी यांनी छत्रपती शाहूवर हल्ला करण्यास नकार दिला. आता बाजीरावाच्या कचाट्यातून औरंगाबाद तरी वाचवावे यासाठी निझाम पुणे-सातारा परिसर सोडून उत्तरेस निघाला. बाजीरावाने औरंगाबादचा रस्ता सोडून निझामाला वाटेतच पकडण्याचा व्यूह रचला. औरंगाबादकडे निघालेल्या निझामाच्या सैन्यावर विद्युतवेगी हल्ले चढवत बाजीरावाने त्यास सळो कि पळो करुन सोडले. छापा घालून चकमकींचे लढाईत पर्यवसान होण्याआधी आपल्याला अनुकूल अशा दिशेस पळ काढत बाजीरावाने निझामास नाशिककडे ओढत नेले. असे करता फेब्रुवारी २५, इ.स. १७२८ रोजी पालखेड जवळील निपाणी प्रदेशात निझामाचे सैन्य आणि गोदावरी नदी यांच्यामध्ये ठाण मांडून बाजीरावाने निझामाला कोंडीत धरले. शेवटी फेब्रुवारी २८ रोजी निझामाने मराठ्यांची फळी फोडत गोदावरीपर्यंत पोचण्याचा आपल्या सैन्यास हुकुम दिला. जेरीस आलेल्या निझामी सैन्याने लढण्यास साफ नकार दिला. निझामाने इवाझ खानामार्फत बाजीरावास शरणागतीचा संदेश पाठवला व फारशी खानाखराबी न होता मराठ्यांनी निझामाच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला.

Tuesday 26 March 2019

बुऱ्हाणपूर वरील छापा

बुऱ्हाणपूर वरील छापा

तारीख: २८ जानेवारी १६८१
छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या बाहेर जावून मध्य प्रदेशातल्या बुऱ्हाणपूर वर छापा टाकला होता. हा छापा का आणि कशाप्रकारे केला ते पाहू.
ही मोहीम करण्याची कारणे –
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज छत्रपती झाले. औरंगजेब व त्याचा मुलगा अकबर यांच्यात गादीचा वाद निर्माण झाला होता.रजपूत सरदारांनी अकबराला पाठिंबा दिला त्यामुळे औरंगजेब त्या युद्धात गुंतला होता.त्याचे स्वराज्याकडे जास्त लक्ष नव्हते.पण याच काळात ओरंगजेबने हिंदू तसेच मुस्लिम नसलेल्या लोकांवर जिझिया कर लावला. हा कर खूप जाचक अटींनी युक्त होता त्यामुळे हिंदू राजे व प्रजा यावर खूप नाराज होती. तसेच या जिझिया करामुळे लोकांवर खूप अन्याय करण्यात आला.
मोहिमेसाठी बुऱ्हाणपूरची निवड का?
बुऱ्हाणपूर हे मुघलांसाठी दाक्षिणेचे प्रवेशद्वार होते.तसेच आग्रा,दिल्ली, सुरत यासारखे व्यापारी केंद्रही होते. बुऱ्हाणपूर शहराच्या वेशीबाहेर नवाबपुरा, बहादूरपुरा, करणपुरा, खुर्रमपुरा, शहाजंगपुरा असे वेगवेगळे सतरा पुरे वसविले होते. त्यातील बहादूरपुरा हा सर्वात श्रीमंत वस्तीचा पुरा होता. सोने, चांदी, हिरे, मोती, दागदागिने, जड जवाहिरे, उंची वस्तू, वस्त्रे, अत्तरे आदीच्या श्रीमंत व्यापाराचे हे एक प्रमुख केंद्र होते. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी मोहिमेसाठी या गावाची निवड केली.

बुऱ्हाणपूर ची मोहीम कशी झाली ?
रायगड ते बुऱ्हाणपूर हे १०००किमी पेक्षा जास्त अंतर आहे . परंतु फक्त ४ ते ५ दिवसामध्येच छत्रपती संभाजी महाराजांनी पार केले.मोहिमेच्या अगोदर सुरत लुटणार अशी अफवा पसरवली.याचे कारण म्हणजे शत्रूचे लक्ष एका ठिकाणी वळवणे करणे आणि दुसऱ्या ठिकाणी हल्ला करणे.छत्रपती संभाजी महाराज स्वतः या मोहिमेत सहभागी होते.
३० जानेवारी १६८१ हंबीरमामांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी बुऱ्हाणपूरावर अचानक हल्ला केला.खानजहान हा बुऱ्हाणपूरचा सुभेदार होता व काकरखान अफगाण हा त्याचा सहायक अधिकारी होता.सुभेदार खानजहान हा औरंगाबाद मध्ये होता.काकरखानाकडे दोनशे माणसांनिशी बुऱ्हाणपूराच्या रक्षणाची जबाबदारी होती. समोर मराठ्यांची सेना होती वीस हजारांची. मराठ्यांनी पहिला छापा थेट बहादूरपुऱ्या वर घातला. तेथील दुकानातील लक्षावधी रुपयांचा माल मराठ्यांच्या हाती आला. छापा इतका अनपेक्षित होता की तेथून एक माणूस किंवा एक पैदेखील हलवता आली नाही. पुऱ्यात आगी लावण्यात आल्या. त्याचा धूर वरपर्यंत गेल्यावर शहरात पत्ता लागला की मराठ्यांचा हल्ला झाला आहे. ताबडतोब शहराचे दरवाजे बंद केले गेले. दुसरा पर्यायच नव्हता. २०० माणसांना 20 हजार माणसांचा सामना करणे शक्यच नव्हते. एकेक करत मराठ्यांनी सर्व सतरा पुरे लुटले व सोबत लुटलेला खजिना घेऊन चार पाच दिवसातच साल्हेरकडे निघून गेले.या मोहिमेत हिरे मोती सोने नाणे अशी १ करोड पेक्षा जास्त होनांची दौलत स्वराज्यात आणली .
बुऱ्हाणपूरचे प्रतिष्ठित नागरिक, मुल्ला, मौलवी, विद्वान यांनी बादशाहाला विनंती केली ‘काफारांचा जोर झाला. आमची अब्रू आणि संपत्ती नष्ट झाली. यापुढे शुक्रवारची नमाज बंद पडेल’ यावर बादशाहने खानजहानला चिडून पत्र लिहून पाठविले कि ‘दक्षिणच्या काफरांचा बीमोड करण्यासाठी मी स्वतः येत आहे’ औरंगजेबाने खानजहानला बुऱ्हाणपूरच्या सुभेदारीवरून हटविले व ईरजखान यास नेमले.
या पद्धतीने बुऱ्हाणपूर ची मोहीम पार पडली.औरंगजेबला चांगलीच अद्दल घडली.त्यानंतर ओरंगजेबला छत्रपती संभाजी महाराजांची ताकद समजली.

Sunday 24 March 2019

#स्वराज्याचे_वैभव #होळीचा_माळ


#स्वराज्याचे_वैभव
#होळीचा_माळ
रायगडाच्या प्रभावळीतून लोक रायगडाकडे येत होते. सणाचा दिवस तो. होळीचा माळ अगदी गच्च भरून जाणार होता. जसजशी संध्याकाळ होत होती होळीच्या माळावर लगबग वाढत होती. कोण होळीची लाकडं जमा करत होत. कोण महाराजांच्या, आऊसाहेबांच्या आसनची व्यवस्था बघतंय. काही हवशे नवशे आपलं कर्तृत्व दाखवायला जमले होते. कोणी महाराजांचं रुपडं एकवार बघायला मिळेल म्हणून लांबून आले होते. गर्दी वाढतच होती. सणाचा दिवस असूनही पहारा करडा होता. त्यात तसूभरही कमी नव्हती. मावळतीकडे सूर्य कलत होता. आणि इथे होळीची सगळी सिद्धता होत होती. एक लांबलचक लाकूड मध्ये उभं करून त्या भोवती बाकी लहान लाकडं उभी केली होती. आणि त्यावर सुका पाला टाकला होता. ओलं लाकूड तोडू नका, सुखीच लाकडं घ्या हा स्वामींचा आदेश होता. त्यानुसार सगळी जय्यत तयारी झाली होती. मल्ल, तरवारबाज, पट्टेकरी, माशालवाले, सोंगाडे अगदी सर्व आपापल्या जागा घेऊन होते.
संध्याकाळी तर गर्दी थांबता थांबेना, त्या गर्दीला आवरता आवरता गडकऱ्यांचे नाकीनऊ आले. तरीही कोणी अदब सोडत नव्हते, हमरीतुमरीवर येत नव्हते. जमलेल्या प्रत्येकाल रायगडाची शान ठाऊक होती. हलगी वाजू लागली होती. वाढती गर्दी बघून वाजवणारा सुद्धा जोशात होता. त्यावर लहान पोर धुरळा उडवत नाचत होती. अचानक हलगी च्या आवाजाने आभाळ गाठलं. नागरखान्यात चौघडे वाजू लागले. आणि सगळ्या मावळ्यांच्या नजरा राजदरबाराच्या दिशेने वळल्या, शुभ्र सफेद रंगाचा पेहराव केलेले महाराज साहेब, कमरेला लटकलेली भवानी, भगवा जिरेटोप, कपाळी चंद्रकोर, आणि चेहऱ्यावर विलक्षण भाव आणि सोबतीला नारंगी रंगाचा पेहराव केलेले गोमटे युवराज शंभूराजे संथ पावलांनी होळीच्या माळावर येत होते. महाराजांच्या प्रत्येक पावलावर मुजरे झडत होते. त्या प्रत्येकाचा स्विकार करत स्वामी माळावर आले. व्यवस्था काय केलीय ह्यावर त्यांनी नजर फिरवली, आणि समाधानी होत आसनग्रहण केले. त्याचा बाजूलाच युवराज मांडी घालून बसले. लगोलग आऊसाहेब आल्या. त्यांची तेजस्वी मुद्रा बघून अस्ताला जाणारा सूर्य सुद्धा शरमून गेला असेल. त्यांच्यासाठी महाराजांच्या बाजूंचे आसन होते. बाकी राणीवसा चिकाच्या पडद्याआड बसून खेळ सुरू होण्याची वाट बघत होते. महाराज आसनावर बसल्यावर पुनः एकदा सर्वांनी लवुन मुजरे झाले. त्या सगळ्याचा हात उंचावून महाराजांनी स्वीकार केला. कार्यक्रमाला आता सुरवातच होणार होती. ह्याची सुरवात करणार होते वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले शाहीर. संबळ वाजवीत दिमाख्यात पोवाड्याची कवणे कानावर येऊ लागली. श्रोते मंत्रमुग्ध होऊ लागले. हलगी बेफाम वाजतच होती. एक एक शब्द कानावर येताच प्रत्येकाचे डोळे अगदी विस्फारत होते. स्वराज्याचे कार्य हेच देवाचे कार्य हे शाहीर सांगत होते. अगदी जशी हवी तशीच सुरवात झाली होती. आता समोर होता तो कुस्तीचा आखाडा. मल्लाच्या जोरानीं अक्खा माळ घुमून गेला. एकमेकांना अस्मान दाखवण्यासाठी कुस्तीगीर अगदी दातओठ खात होते. पण मागे कोणी हटेना. महाराजांनी धाकल्या धन्याला म्हंटल, काय युवराज कसं वाटतंय. शंभूराजे विस्फारून म्हणाले "असं वाटतं आताच उठावे आणि दोन डावात समोरच्या पठयाला चित करावं". ह्यावर महाराजांनी सुद्धा मनमोकळं हसून दाद दिली. तेवढ्यात विजेच्या चपळाईने डाव टाकत एका मावळ्याने कुस्ती जिंकली. महाराजांनी जवळ बोलावत त्याला स्वतःच्या हाताने पागोटे बांधले. अवघा कुस्तीचा फड तिथेच राजांनी जिंकला.
ह्यानंतर तरवारबाजानी आपली कला सादर केली. व्यवस्थित पावित्रे घेत एकमेकांवर वार करत तर समोरचा आपल्या ढालीने ते चुकवी. तरवरीचे सपासप वार काढत तरवारबाज लढत होते पण त्यांना बघून हात मात्र मावळ्यांचे सळसळत होते. सर्वात शेवटी नाईकांच्या पथकातील सोंगाड्यानी धमाल उडवून दिली. कोणी टोपीकर झाला होता. तर कोणी साधू. कोणी लाल बावट्यावाला इंग्रज तर कोणी मधूकरी मागणार गोसावी. कोण काय बनलंय कोणाच्याही कोणाला थांगपत्ता लागत नव्हता.
शेवटी ज्या साठी सगळे एकत्र आले तो कार्यक्रम सुरू झाला. आऊसाहेब आणि राणीवस्याने पूजा करून घेतली. लागोपाठ महाराजानीं होळीला नमन केलं. इतर सुहासिनीं नि पूजा करून मग होळी पेटवण्यात आली. हाहा म्हणता होळीने पेट घेतला सुद्धा. लालसर लाटा हवेत जात वातावरण अगदी गरम झालं. होळीला मनाची श्रीफळ अर्पण करण्यात आली. आता खरी गंमत होती. मानाचा नारळ कोण काढत ह्याची. दणकट काळजाचे काही मावळे पुढे आले. काहींचा त्या प्रचंड दाहापूठे निभाव लागेना. ते मागे फिरले. तर काही बंदुकीच्या गोळीप्रमाणे शिरले आणि आगीतून नारळ घेऊन आले. सगळ्या मैदानातुन एकच गलका झाला. ऐशा भले, ओ शाबास ओरडू लागले. स्वतः महाराज खुश होऊन उभे राहिले. महाराजांनी स्वतः सगळ्यांना सोन्याचं कडे घातलं. आऊसाहेब काही लागलं नाही ना विचारपूस करू लागल्या. त्यावर एक वीर उतरला, "नाही जी, महाराजांच्या हातून शाबासकी मिळावी ह्याची तर लय वाट बघितली म्या". त्या धगधगत्या होळीला नमन करून सर्व संकटाचा सामना करता यावा ह्याची प्रार्थना करून सगळे परतू लागले खरे पण सर्वांच्या डोक्यात आजची संध्याकाळच होती.
आजवर अशी अनेक सुख दुःख ह्या होळीच्या माळाने बघितली. मराठ्यांच्या पराक्रमाच्या गाथा येथे कोरल्या गेल्यात. आजही ३८८ वर्षानंतर त्याच होळीच्या माळावर लोक लांबून जमतात, गडकरी लाकडं जमा करून होळी उभी करतात. बोंब मारली जाते. आणि ह्याच शिवभूपतींना साक्षी ठेवून ही होळी साजरी केली जाते. सद्या हे स्वरूप अगदी साधं जरी असेल तरी इतके वर्ष परंपरा जपणं आणि पुढेही चालू ठेवणं म्हणजे दुर्लभ. ही इथे होळी पेटवली जाते ती छत्रपतींची सेवा म्हणूनच. आणि अशी सेवा प्रत्येकाच्या आयुष्यात येवो.
✍️स्वराज्याचे वैभव.

"सूर्याजी जेधे"

"सूर्याजी जेधे"
🚩🚩रामशेज🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने महाराष्ट्र जिंकायचा चंग बांधला होता. मोठ्या सैन्यबळानिशी तो इ.स. १६८२ ला महाराष्ट्रावर चाल करून आला. आपल्या शहाबुद्दीन फिरोजजंग ह्या सरदाराला त्याने नाशिक प्रांतातील किल्ले काबीज करायची आज्ञा दिली. फिरोजजंगाने रामशेजपासून सुरुवात केली. किल्ल्यावर सूर्याजी जेधे नावाचे किल्लेदार होते. हे मुळचे मावळातले. ते धाडसी, हट्टेकट्टे आणि पराक्रमी होते. सूर्याजी जेधे रामशेजच्या तटावरून फिरत राहायचे. दिवसा आणि रात्रीही. ते कधी झोपायचे हेच कोणाला माहित नव्हते. किल्ल्यावर तोफा नव्हत्या.
शहाबुद्दीन फिरोजजंग ३५ ते ४० हजार फौजफाट्यासह रामशेज किल्ल्यावर चाल करून गेला तेव्हा किल्लेदार सूर्याजी जेधे ५००-६०० मावळ्यांसोबत गडावर होता.
मुघलांची अपेक्षा ही होती की एका फटक्यात आपण हा किल्ला जिंकू. पण मराठ्यांच्या गनिमी काव्याने त्याच्या सैन्याला पुरते जेरीस आणले. गडावरील दगडगोट्यांच्या वर्षावाने मुघल सैन्याचे स्वागत झाले. गडावर असलेली रसद फारच तुटपुंजी होती. अशा वेळी रात्रीच्या अंधारात मावळे मुघल सैन्यातून दारुगोळा, शस्त्रास्त्रे आणि दाणागोटा गडावर पळवून आणीत.
संभाजी राजांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारुगोळा उपलब्ध करून ठेवला होता. किल्ल्यावरच्या किल्लेदाराने आणि मावळ्यांनी जनारावरांचे कातडे लावून लाकडाच्या तोफा बनवल्या. आणि किल्ल्यावरून खाली तोफगोळ्यांचा मारा सुरु केला. या आक्रमणाने शहाबुद्दीन खान पार गांगरून गेला. ५ महिने झाले पण तरीही किल्ल्या काही जिंकता आला नाही.
मोगलांचे तोफगोळे किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण किल्ला तर जिंकायचा होता. मग त्याने आपल्या सैनिकांना आजूबाजूच्या जंगलातील झाडे तोडायला सांगितली. सगळी लाकडे जमा केली. आणि किल्ल्याच्या उंचीचा ५० तोफा आणि ५०० सैनिक बसतील एवढा मोठा लाकडी बुरूज बनवला.
(याला लाकडी दमदामा असेही म्हणतात).
या लाकडी बुरुजांवरून मोगल सैनिक किल्ल्यावर तोफांचा मारा करू लागले. मराठेसुद्धा या लाकडी बुरुजांवर तोफगोळे डागत होते. मोठे घनघोर युद्ध चालू होते. मराठे मागे हटायला तयार नव्हते. शहाबुद्दीनच्या हाती यश काही शेवटपर्यंतआले नाही आणि किल्ला अजिंक्यच राहिला.
किल्यावर मुबलक पाणी साठा आहे गडाच्या तटबंदीच्या आतून एक पुरुषभर उंचीची नाळ आहे ज्यातून पहारेकरी टेहळणी करू शकत आणि बाहेरील कोणाच्या नजरेस पडत नसे,असे म्हणतात की राम जेव्हा वनवासात होते तेव्हा त्त्यांचे वास्तव्य मुक्कामी या गडावर असे,
त्यांची सेज(बेड) येथेच होती, त्यावरूनच या किल्ल्याचे नाव रामसेज असे पडले अशी आख्यायिका सांगितली जाते.

मुधोळकर घराण्याचा इतिहास

मुधोळकर घराण्याचा इतिहास
Posted by नवनाथ आहेर
छत्रपति शिवजी महाराज यांच्या वंशावळीचा अभ्यास करत होतो तेव्हा भोसले व घोरपडे वंश कसे निर्माण झाले आणि मग बहमनी राज्य नंतर मालिक अंबर नंतर बाबाजी भोसले (भोसले शब्दाचा अर्थ) अल्लाउदीन हे दोन होते एक मुहम्मद तुघलक नंतर दिलीच्या तखतावर अल्लाउद्दीन खलजी अला तो आणि जाफर खान या सरदारने दक्षिणेस येऊन स्वता अल्लाउद्दीन हे नाव धारण करुन बहमनी राज्य स्थापन केले.यात दोन अलाउद्दीन झाले एक दिल्लीच्या तख्तावरचा आणि दूसरा जाफर खान.आता या जाफर खानाला सजनसिंह आणि त्याचा पुत्र दिलीपसिंह यांनी मदत केली.राज्य स्थापने नंतर यांना सरदारकी आणि खर्चास दौलताबादेतील दहा गावांची जहागिरि दिली .स.१३५२मधे सजनसिंह मरण पावला त्याचा पाचवा वंशज उग्रसेन म्हणून होता.त्यास दोन पुत्र कर्णसिंह व शुभकृष्ण होय.
कर्णसिंह व त्याचा पुत्र भीमसिंह हे बहमनी वजीर महमूद गावान याच्याबरोबर स.१४६९”खेळणा किल्ला” जिंकन्यास गेले असता कर्णसिंहने घोरपड़ लाऊन किल्ला हस्तगत केला.त्यामुळे महमद शहा बहमनी संपुष्ट होऊन.कर्णसिंह या युद्धात मारला गेला त्यामुळे त्याचा पुत्र भीमसिंह यास”राजा घोरपडे बहादुर”हा किताब व मुधोळ जवलील ८४गावाची जाहागिर नेमुन दिली.तेव्हापासून भीमसिंहाचे वंशज घोरपडे आडनाव प्राप्त होऊन त्याचे वास्तव मुधोलास झाले.ते अद्यापि चालु आहे.करणसिंहचा भाऊ शुभकृष्ण हा दौलतबाद कडील वेरूळ वतनांचा मालक होऊन त्यांचे वंशज भोसले उपनाव प्राप्त झाले.या भोसले आडनावाची उत्पत्ति निश्चित लागत नाही.शुभकृष्णचा तीसरा वंशज बाबाजी भोसले होय.या वरुन लक्षात येईल की मुधोलकर घोरपडे व सातरकर भोसले ही दोन्ही घराणी एकाच सिसोदे येथील राणा वंशाच्या दोन शाखा असून घोरपडे वडील व् भोसले कनिष्ट घोरपड्यांनी मुसलमानाच्या तावेदारित कृतार्थता मानली आणि भोसल्यानी मुसलमानाचा पाडाव करुन स्वतंत्र राज्य स्थापिले या कारणास्थव या दोन शाखांत भाई बंदकीचे कलह बहुदा कायमचेच राहिले.
शुभकृष्णचा वंशज बाबाजी भोसले यांचा जन्म इ.स.१५३० मध्ये झाल्याचा समजतात.बाबजीने जमीन वैगरे दान दिली याचे कागद पत्र आहेत.बाबाजी यांना दोन मुले मालोजी भोसले आणि विठोजी भोसले त्यांच्या पासूनचा इतिहास व्यववथित सापड़तो.
(भोसे नामक गांव किवा भोसाजी नामक व्यक्ति या पासून भोसले शब्द निघाला असे सांगतात ते विशेष संयुक्तित दिसत नाही.तसेच भोसल,भूशवल इत्यादी प्रकारचे संस्करण कविने केलेले नीरनिराळ्या ग्रंथात आढ़लते.कोणी भोसले शब्द “होयसल”नावाचा अपभ्रंश मानतात)(मुधोलकर घराण्याचा इतिहास :-द.वि.आपटे कृत)
संदर्भ:-मराठी रियासत

कापशीकर घराणे हेच घोरपडे घराणे इतिहास भाग ३

कापशीकर घराणे हेच घोरपडे घराणे इतिहास
Posted by नवनाथ आहेर

भाग ३
त्यानंतर संताजींचे थोरले पुत्र राणोजीराजे यांचे युध्दात निधन झाले … राणोजीराजे यांच्या विधवा पत्नी संतुबाई या वयाने लहान आणी संताजींचे धाकटे पुत्र पिराजीराव हे त्यांच्यापेक्षाही लहान …. हे पिराजीराव संताजीराव घोरपडे हे कापशीकर घोरपडे घराण्याचे दुसरे ‘ चिफ ऑफ कापशी ‘ बनले … सन 1728 मध्ये दुसरे चिफ ऑफ कापशी सेनापती पिराजीराव संताजीराव घोरपडे हलकर्णी येथे युद्धात मृत्यूमुखी पडले …
पिराजीरावांचे एकमेव पुत्र राणोजीराजे हे सेनापती बनले … हे कापशीकर घोरपडे घराण्याचे तिसरे ‘चिफ ऑफ कापशी ‘ बनले … सेनापती राणोजीराजे पिराजीराव घोरपडे यांना नऊ पुत्र होते …
त्यापैकी पहिला पुत्र संताजीराव ( दुसरे ) हे सेनापतींच्या मुळ कापशीकर घोरपडे घराण्याचे चौथे ‘ चिफ ऑफ कापशी ‘ बनले … संताजीराव राणोजीराजे घोरपडे यांच्या उर्वरीत आठ भावांपैकी …
श्रीमंत मालोजीराव राणोजीराजे घोरपडे
श्रीमंत पिराजीराव राणोजीराजे घोरपडे
श्रीमंत राघोजीराव राणोजीराजे घोरपडे
श्रीमंत जयरामराव राणोजीराजे घोरपडे
श्रीमंत सुब्बाराव राणोजीराजे घोरपडे
श्रीमंत सखारामराव राणोजीराजे घोरपडे श्रीमंत नारायणराव राणोजीराजे घोरपडे आणी
श्रीमंत द्वारकोजीराव राणोजीराजे घोरपडे
… इथे कापशीकर घोरपडे घराण्याचा वंशविस्तार प्रचंड वाढला आणी कापशीकर घोरपडे घराण्यातील संस्थानातील काही गावे वाटणीस्वरुपात विभागली गेली …
हसूरकर घोरपडे म्हणून चिफ ऑफ कापशी संताजीराव राणोजीराजे घोरपडे यांचे दुसरे बंधु श्रीमंत मालोजीराव राणोजीराजे घोरपडे यांना अधिकार दिले गेले …
गलगलेकर घोरपडे म्हणून चिफ ऑफ कापशी संताजीराव राणोजीराजे घोरपडे यांचे तिसरे बंधु श्रीमंत पिराजीराव राणोजीराजे घोरपडे यांना अधिकार दिले गेले …
नवलिहाळकर घोरपडे म्हणून चिफ ऑफ कापशी संताजीराव राणोजीराजे घोरपडे यांचे पाचवे बंधु श्रीमंत जयरामराव राणोजीराजे घोरपडे यांना अधिकार दिले गेले …
पांगिरकर घोरपडे म्हणून चिफ ऑफ कापशी संताजीराव राणोजीराजे घोरपडे यांचे सहावे बंधु श्रीमंत सुब्बाराव राणोजीराजे घोरपडे यांना अधिकार दिले गेले …
खडकेवाडकर घोरपडे म्हणून चिफ ऑफ कापशी संताजीराव राणोजीराजे घोरपडे यांचे सातवे बंधु श्रीमंत नारायणराव राणोजीराजे घोरपडे यांना अधिकार दिले गेले …अशा तर्हेने पहिले चिफ ऑफ कापशी सरसेनापती संताजीराव घोरपडे यांच्या रक्ताच्या घराण्यातील तिसरे चिफ ऑफ कापशी यांच्या नऊ पुत्रांपैकी एक श्रीमंत जयरामराव घोरपडे हे नवलिहाळकर घोरपडे घराण्यातील पहिले पुरुष …
श्रीमंत संभाजीराजे शिंदे सेनाखासकील , श्रीमंत नारायणराव घोरपडे इचलकरंजीकर , श्रीमंत उदाजीराव चव्हाण हिंमतबहाद्दर , श्रीमंत सुलतानराव जाधव जप्तनमुलुख , श्रीमंत नारायणराव जाधव हवालदार , श्रीमंत सयाजीराव सरनौबत , श्रीमंत रामचंद्रराव घोरपडे अमीर उल उमराव , श्री जयरामराजे घोरपडे नवलिहाळकर वगैरे मानकरी …… ( हे श्रीमंत जयरामराजे घोरपडे नवलिहाळकर म्हणजे आत्ता कापशी मध्ये असणारे रामराव नवन्याळकर सरकारांचे पुर्वज ..) यांना त्यांच्या कोल्हापूर संस्थानातील फौजेच्या जबाबदारी प्रमाणे दरबारी सन्मान आणी आसन होते …
त्याप्रमाणे पुढे श्रीमंत जयरामराव राणोजीराजे घोरपडे यांचा वंशविस्तार होत गेला आणी त्यापैकी काही घराणी ही आत्ताच्या कासारीकर , माद्याळकर घोरपडे घराण्याप्रमाणे छोट्या छोट्या जहागीरीत तबदिल झाली … आज श्रीमंत जयरामराव घोरपडे हे नवलिहाळकर त्यांच्या नवलीहाळ या गावी असून त्या वंशातील त्यांचे पुतणे श्रीमंत रामराव बापुसाहेब घोरपडे हे पुन्हा वाटणीस्वरुपात कापशीमध्ये स्थाईक झाले आहेत …

कापशीकर घराणे हेच घोरपडे घराणे इतिहास भाग २


कापशीकर घराणे हेच घोरपडे घराणे इतिहास
Posted by नवनाथ आहेर
भाग २

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर मराठेशाहीवर परकीय हल्ले सुरु झाले …. छत्रपती संभाजीराजे आणी कवी कलश हे दोघे संगमेश्वरी असताना मुकर्रबखान या मोगल सरदाराने त्यांना घेरले … संताजींचे बंधु बहीरजी यांनी शंभूराजेना सुरक्षित स्थळी हलवायचा केलेला प्रयत्न फसला …. स्वराज्याच्या वारसदाराचे संरक्षण करताना म्हाळोजीराजेंनी संगमेश्वर येथे स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले ….. मुकर्रबखानाने शंभूराजे आणी कवी कलशांना कैद करुन तुळापूर येथे औरंगजेबाच्या समोर हजर केले …. आणी पाठोपाठ रायगडावर कब्जा केला ….. आणी इकडे तुळापुर मुक्कामी छत्रपती संभाजीराजेंना अक्षरशः हालहाल करुन ठार केले ….

शंभूराजेंच्या मृत्युनंतर राजाराम महाराज छत्रपती झाले पण स्वराज्यावर घोंगावणारी मोगली संकटे पहाता छत्रपती राजाराम महाराजांना , ताराराणी आणी राजसबाईंना सुरक्षित चंदीचंदावरास हलवण्यात आले आणी बेदनुरच्या राणीच्या सहाय्याने संताजींनी आपल्या नेतृत्वाखाली ही महत्वपूर्ण मोहीम यशस्वी केली …. तिथे गेल्यावर छत्रपती राजाराम महाराजांनी 1691 मध्ये संताजी घोरपडेंना ” सरसेनापती ” पद बहाल केले …. आणी आपली कापशी ही सरसेनापतींची ” सेनापती कापशी ” झाली … सोबत मानाचा जरीपटका , नौबत आणी ‘हिंदूराव ममलकत मदार ‘ ही पदवी दिली…. आजही संताजी हे ‘ चिफ ऑफ कापशी ‘ ‘ ममलकत मदार ‘ … आजही कापशीच्या मुळ राजचिन्हावर ‘ चिफ ऑफ कापशी ‘ असे कोरलेले आहे … त्यांचे दुसरे बंधु बहीरजी हे गजेंद्रगडकर घोरपडे ‘हिंदूराव ‘ आणी तिसरे बंधु मालोजी हे दत्तवाडकर घोरपडे ‘ अमिर-उल-उमराव ‘ म्हणून ओळखले जातात ….

तर अशातर्हेने सरसेनापती संताजीराव घोरपडे ( पहिले ) हे कापशीकर घोरपडे घराण्यातील पहिले ‘ चिफ ऑफ कापशी ‘ बनले …. सरसेनापती संताजीराव घोरपडे यांना दोन पुत्ररत्न होते … सरसेनापती संताजीरावांचे दोन विवाह झालेले होते …. त्या दोन्ही पत्नीला प्रत्येकी एक मुलगा होता …. पहिल्या पत्नीच्या मुलाचे नाव होते राणोजीराजे आणी दुसऱ्या पत्नीच्या मुलाचे नाव होते पिराजीराव …

या दोन मुलांच्या खेरीज संताजी घोरपडे यांचा एक मानसपुत्र होता … त्याचे नाव होते नारायण महादेव उर्फ नारोपंत जोशी … हेइचलकरंजीकर घोरपडे .. कापशीकर घोरपडे घराण्याच्या किताबांपैकी ‘ममलकतमदार’ व मानमरातबापैकीं जरीपटका व नौबतीचा मान संताजीरावांना मानलेले पुत्र या नात्याने बाळगण्याविषयीं नारोपंतांना मिळाले … इचलकरंजीकरांच्या घराण्यांत हा किताब व बहुमान अद्यापपर्यंत चालू आहे….

कापशीकर घराणे हेच घोरपडे घराणे इतिहास भाग १

कापशीकर घराणे हेच घोरपडे घराणे इतिहास
Posted by नवनाथ आहेर

भाग १
सेनापति कापशीकर नवन्याळकर घोरपडे
नवलिहाळकर ( आपण अपभ्रंषाने ‘नवन्याळकर ‘ म्हणतो ) हे घोरपडे घराणे मुळचे कोण ? आणी या घराण्याचा कापशीकर सेनापतींच्या घोरपडे घराण्याशी काही संबंध आहे काय ? “…

राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांच्या दत्तक विधानाच्या समारंभावर पहिल्यांदा ‘ जयरामराव घोरपडे नवलिहाळकर यांचे छत्रपतींच्या दरबारात आसन होते हा उल्लेख मिळाला … मात्र हे जयरामराव घोरपडे राजपुत्र ‘ अर्थात राजस्थानी परिभाषेत ‘ राजपूत ‘ आणी महाराष्ट्रातील राजपूत घराणी यांचा अभ्यास करत असताना मला नवलिहाळकर घोरपडे घराण्याचे उगमस्थान सापडले …
घोरपडे हे मुळचे सिसोदीया वंशीय भोसले … छत्रपती शिवाजी हाराजांचा आणी घोरपड्यांचा वंश एकच …. 1471 मध्ये कर्णसिंह , शुभकृष्ण आणी भिमसींह या तिघांनी घोरपडीच्या पाठीला दोर बांधून किल्लावर प्रवेश करुन किल्ला जिंकला त्यामुळे बहामनी सुलतान महंमद गवान याने त्यांना घोरपडे हे उपनाव दिले….. आणी तेव्हापासून कापशीकर , मुधोळकर , इचलकरंजीकर , दत्तवाडकर वगैरे सर्व घोरपडे घराण्यातील राजचिन्हावर ‘ घोरपड ‘हा प्राणी बघायला मिळतो ….
चोलराजा हे घोरपडे घराण्याचे आद्य पुरुष आणी फर्जंद शहाजीराजेंना कैद करुन विजापुरी नेणारे आदिलशाही सरदार बाजी घोरपडे यांचे आजोबा श्रीमंत पिलाजीराजे घोरपडे आणी वल्लभजी घोरपडे हे चोलराजांचे पुत्र … यापैकी पिलाजीराजे हे मुधोळकर घोरपडे आणी वल्लभजी हे वाई प्रांताचे सरदेशमुख… याच वल्लभजींचे नातू श्रीमंत म्हाळोजीराजे हे आपली स्वतःची पाचशे स्वारांची फौज घेऊन आपल्या संताजी , बहीरजी आणी मालोजी या तिन मुलांच्या सह स्वराज्यात सामील झाले …म्हाळोजीराजे हे पन्हाळा किल्ल्याचे तटसरनौबत आणी कोल्हापूर प्रांतातीलदेशमुख आणी सरदेशमुख ….. हेच कापशीकर घोरपडे … युवराज संभाजीराजे जेव्हा दिलेरखानाकडून स्वराज्यात परत आले तेव्हा त्यांना म्हाळोजीराजेंच्या संरक्षणात पन्हाळ्यावर ठेवले होते …. त्यांच्या सोबत त्यांचे पुत्र संताजी घोरपडेंनी आपल्या तलवारीने स्वराज्याच्या रक्षणासाठी थोर पराक्रम केला …
जालना शहर मराठयानी लुटले पण लूट परत आणताना रणमस्तखान या मोगल सरदाराने हल्ला केला आणि बरीच लूट परत घेउन गेला, या यूद्घात सिधोजी निंबाळकर कामी आले त्यामुळे शिवाजी महाराजांनी संताजीवर नाराज होऊन “मुजोरीयास ( मुजऱ्यास ) न येणेस ” फर्मावले … तरीही कालांतराने संताजीच्या पराक्रमाने स्वराज्याच्या निर्मितीमध्ये हातभार लावला आणी छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वास जिंकला … छत्रपती शिवाजी महाराजांनी संताजी , बहीरजी आणी मालोजी या तिन्ही बंधुंना स्वतंत्र पथके देऊन सेनापती हंबीरराव मोहीतेयांच्यासोबत मोहीमेवर पाठवले …. त्यांना जुमलेदारी दिली … आणी सातारा जिल्ह्यात पाटीलकीची वतने दिली …

छत्रपती शाहूमहाराजांचा दत्तकविधान समारंभ आणी कापशीकर सेनापती भाग ६

छत्रपती शाहूमहाराजांचा दत्तकविधान समारंभ आणी कापशीकर सेनापती

भाग ६

पुण्याच्या सार्वजनिक सभेच्या मानपत्रातील अनेक मुद्दे व त्यास पोलिटीकल एजंट यांनी दिलेले उत्तर हे आजच्या कोल्हापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे ...

" शककर्ते थोरले शिवाजी महाराजांच्या राज्याचा हा एक लहानसा संस्थानचा भाग असला तरीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातील वारसदार इथे राज्य करतात ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे ... तथापी कोल्हापूर संस्थानची प्रगती होणेसाठी नव्याने होत असलेल्या मिरज रेल्वेच्या स्टेशनमधुन एक रेल्वेचा फाटा कोल्हापूर संस्थानला जोडण्यासाठी प्रयत्न करणेत यावे... कोल्हापूरात विद्याभ्यासाची व्यवस्था चांगली आहे तेथेच महाराजांचा अभ्यास होईल " ...

त्यानंतर छत्रपती शाहूमहाराजांना पोशाख , नजराणे , सतके वगैरे देण्याचा समारंभ सुरु झाला ... त्यापैकी काही मान्यवरांचे आहेर व त्यांची तत्कालीन किंमत पुढीलप्रमाणे होती ....

श्रीमंत जयसिंगराव आबासाहेब घाटगे सर्जाराव यांनी ७५ रुपयांचा मंदिल , ८ रुपयांच्या जोट्या , २७ रुपयांच्या किनखाब , ५० रुपयांचे तिवट असा एकंदर १६० रुपयांचा आहेर छत्रपतींना केला ... आणी छत्रपतींनी परतीच्या आहेरात ७५ रुपयांचा मंदिल , ३ रुपयांच्या जोट्या , १२ रुपयांच्या किनखाब , ६० रुपयांचा दुपेटा असा एकंदर १५० रुपयांचा आहेर श्रीमंत जयसिंगराव घाटगे सर्जाराव यांना केला ...

श्रीमंत संताजीराव घोरपडे सेनापती कापशीकर यांनी ६ रुपयांच्या जोट्या , १० रुपयांच्या किनखाब , २० रुपयांचा दुपेटा आणी १५ रुपयांचा तिवट असा एकंदर ५१ रुपयांचा आहेर छत्रपतींना केला ... आणी छत्रपतींनी परतीच्या आहेरात ३ रुपयांच्या जोट्या , ९ रुपयांच्या किनखाब , २० रुपयांचा दुपेटा आणी १५ रुपयांचा तिवट असा एकंदर ४७ रुपयांचा आहेर श्रीमंत संताजीराव घोरपडे सेनापती कापशीकर यांना केला ...

श्रीमंत बळवंतराव घाटगे सर्जाराव यांनी १२५ रुपयांचा मंदिल , ४ रुपयांच्या जोट्या , १८ रुपयांच्या किनखाब , ६० रुपयांचा दुपेटा असा एकंदर २०७ रुपयांचा आहेर छत्रपतींना केला ... आणी छत्रपतींनी परतीच्या आहेरात १०० रुपयांचा मंदिल , ३ रुपयांच्या जोट्या , ३७॥ रुपयांच्या किनखाब , ६० रुपयांचा दुपेटा असा एकंदर २००॥ रुपयांचा आहेर श्रीमंत बळवंतराव घाटगे सर्जाराव यांना केला ...

श्रीमंत नारायणराव घोरपडे इचलकरंजीकर यांनी ३ रुपयांच्या जोट्या , २१ रुपयांच्या किनखाब , ६० रुपयांचा दुपेटा आणी १८ रुपयांचा तिवट असा एकंदर १०२ रुपयांचा आहेर छत्रपतींना केला ... आणी छत्रपतींनी परतीच्या आहेरात ३ रुपयांच्या जोट्या , ३७॥ रुपयांच्या किनखाब , ४० रुपयांचा दुपेटा आणी १८ रुपयांचा तिवट असा एकंदर ९८॥ रुपयांचा आहेर श्रीमंत नारायणराव घोरपडे इचलकरंजीकर यांना केला ...

श्रीमंत निपाणीकर सरकार यांनी ५ रुपयांच्या जोट्या , २४ रुपयांच्या किनखाब , १५ रुपयांचा दुपेटा आणी १६ रुपयांचा तिवट असा एकंदर ६० रुपयांचा आहेर छत्रपतींना केला ... आणी छत्रपतींनी परतीच्या आहेरात ५ रुपयांचा दुपेटा आणी १८ रुपयांचा तिवट असा एकंदर २३ रुपयांचा आहेर श्रीमंत निपाणीकर सरकार यांना केला ...

श्री अब्दुल सुलतान देसाई आलाबाद यांनी ७ रुपयांच्या जोट्या , ५।. रुपयांच्या किनखाब , ८ रुपयांचा दुपेटा आणी १५ रुपयांचा तिवट असा एकंदर ३५।. रुपयांचा आहेर छत्रपतींना केला ... आणी छत्रपतींनी परतीच्या आहेरात ८ रुपयांचा दुपेटा आणी २० रुपयांचा तिवट असा एकंदर २८ रुपयांचा आहेर श्री अब्दुल सुलतान देसाई आलाबाद यांना केला ...

असे अनेक आहेर व परतीचे आहेर छत्रपती शाहूमहाराजांच्या दत्तकविधान समारंभात देवाणघेवाण झाले ....

त्यानंतर रेसिडेन्सी दरबार सुरु झाला ... तिथे एका बाजुला मांडलेल्या खुर्च्यांच्या पहिल्या रांगेत दक्षिण महाराष्ट्रातील व सातारा संस्थानातील जहागीरदार व त्यामागच्या खुर्च्यांच्या रांगेत त्यांचे कारभारी , ट्युटर व कारकून यांच्या जागा होत्या ... दुसऱ्या बाजुला मांडलेल्या खुर्च्यांच्या पहिल्या रांगेत सेनापती कापशीकर यांच्यासारखे कोल्हापूर इलाख्यातील जहागीरदार आणी त्यामागच्या रांगेत त्यांचे कारभारी वगैरे लवाजमा बसला ... कोल्हापूर इलाख्यातील जहागीरदार वगैरेंच्या स्वागतासाठीं असिस्टंट पोलिटीकल एजंट आणी कोल्हापूर इंन्फंट्रीचे सेकंड इन कमांड रावबहाद्दर केंट्स साहेब हे स्वतः उभे होते ....

यावेळी पोलिटीकल एजंट साहेबांनी केलेल्या भाषणातील मुद्दे हे कोल्हापूर इलाख्यातील सुधारणेसाठी पायाभरणी होती ... छत्रपती शाहूमहाराजांच्या दत्तकविधान प्रित्यर्थ इंग्रज सरकारने कोल्हापूरला मिरजेतून रेल्वेचा स्वतंत्र फाटा , साखर कारखाना आणी दगडी कोळशावर आधारित उद्योगांच्या मंजूरीची घोषणा केली ... त्यामुळे आजचे छत्रपती शाहूमहाराज टर्मिनन्स म्हणून ओळखले जाणारे कोल्हापूर रेल्वे स्टेशन , छत्रपती राजाराम शुगरमिल म्हणून ओळखला जाणारा साखर कारखाना आणी रेल्वेच्या उड्डानपुलाखाली वसलेली लोणार वसाहत ( लोणार कोळसा ) या तिन्ही सुधारणा या इंग्रज सरकारने छत्रपती शाहूमहाराजांच्या दत्तकविधान कार्यक्रमात घोषित केलेल्या व वेळेत पुर्ण केलेल्या होत्या हे विषेश ...

त्यानंतर सत्कार , जाफती , आतशबाजी , मेजवानी , गायन समाजाच्या गाण्यांचा कार्यक्रम वगैरे होऊन दत्तकविधान समारंभ संपन्न झाला ...

कापशीकर सरकारांना कोल्हापूर संस्थानच्या राजकीय व छत्रपती राजघराण्यांच्या वैयक्तिक मसलती व समारंभात अनन्यसाधारण सन्मानाचे स्थान होते व आजही आहे ...

समाप्त

छत्रपती शाहूमहाराजांचा दत्तकविधान समारंभ आणी कापशीकर सेनापती भाग ५

छत्रपती शाहूमहाराजांचा दत्तकविधान समारंभ आणी कापशीकर सेनापती

भाग ५

त्यानंतर पुण्याहवाचन , गणपती पुजन , होम वगैरे विधी आटोपल्यावर श्रीमंत आबासाहेब घाटगे यांनी श्रीमंत आनंदीबाई राणीसाहेब यांच्या हातावर " हा मुलगा तुम्हांस दत्तक दिला " असे म्हणून पाणी घातले ... श्रीमंत राणीसाहेब यांनी मुलाचे मस्तक हुंगीले नंतर त्यास मांडीवर बसवून घेतले व त्याच्या तोंडात साखर घातली ... त्यानंतर त्यास श्रीमंत अहिल्यादेवी राणीसाहेब आणी सकवारबाई राणीसाहेब यांनी मांडीवर घेऊन त्यांस " श्रीमन्महाराज शाहू छत्रपती " असे नाव ठेवीले ....

श्रीमन्महाराज शाहू छत्रपती यांचे दत्तकविधान झाल्यावर पुन्हा एकदा खडी ताजीम झाल्यावर सर्व जहागीरदार आपल्या मानाच्या जागेवर बसले ... त्यांच्या उजव्या बाजुला पॉलिटीकल एजंट कर्नल रिव्हज साहेब व डावीकडे श्रीमंत आबासाहेब घाटगे सर्जाराव बसले ... मानाच्या जागेवर अक्कलकोटचे राजेसाहेब श्रीमंत शाहजीराव भोसले , श्रीमंत बळवंतराव घाटगे सर्जाराव , श्रीमंत नागोजीराव पाटणकर , सरलष्कर हणमंतराव निंबाळकर , श्रीमंत श्रीरामराजे भोसले सावंतवाडीकर , श्रीमंत व्यंकटराव घोरपडे मुधोळकर श्रीमंत हरीहरराव कुरुंदवाडकर , श्रीमंत व्यंकटराव योगीराव रामदुर्गकर हे राजघराण्याचे आप्त बसले ...

अष्टप्रधान मंडळातील श्रीमंत आबासाहेब पंतप्रतिनिधी , श्रीमंत माधवराव पंडित पंतअमात्य व त्यांच्या शेजारी श्रीमंत संताजीराव घोरपडे सरसेनापती कापशीकर बसले ... ( श्रीमंत संताजीराव घोरपडे सरसेनापती हे श्रीमंत जयसिंगराव घोरपडे उर्फ बाळमहाराज यांचे पिताश्री तसेच कापशीचे विद्यमान सेनापती श्रीमंत राणोजीराजे आणी उदयसिंहराजे यांचे आजोबा होय ) ...

त्यानंतर श्रीमंत संभाजीराजे शिंदे सेनाखासकील , नारायणराव घोरपडे इचलकरंजीकर , श्रीमंत उदाजीराव चव्हाण हिंमतबहाद्दर , श्रीमंत सुलतानराव जाधव जप्तनमुलुख , श्रीमंत नारायणराव जाधव हवालदार , श्रीमंत सयाजीराव सरनौबत , श्रीमंत रामचंद्रराव घोरपडे अमीर उल उमराव , श्री जयरामराजे घोरपडे नवलिहाळकर वगैरे मानकरी बसले ...... ( हे श्रीमंत जयरामराजे घोरपडे नवलिहाळकर म्हणजे आत्ता कापशी मध्ये असणारे नवन्याळकर सरकारांचे पुर्वज ..)

त्यापुढे अमृतराव पाटणकर , इस्माईलखान पन्नीसाहेब इनामदार यमगर्णीकर ( हे इस्माईलखान म्हणजे आलाबाद येथील नजीरखान इनामदार यांचे पुर्वज ) , अब्दुल सुलतान देसाई आलाबादकर ( हे आलाबाद येथील महंमदपाशा देसाई यांचे पुर्वज ) त्यानंतर पुढे चिटणीस , वाकनीस , कारभारी , मुजुमदार वगैरे मंडळींची आसने होती .... असा एकंदर 163 जहागीरदार , मानकरी कारभारी यांचा दरबार भरलेला होता ...

ही मंडळी आसनस्थ होताच कोल्हापूर म्युनिसीपल कमिशनर यांच्या मानपत्राचे वाचन व सार्वजनिक सभेच्या मानपत्राचे वाचन झाले ....

छत्रपती शाहूमहाराजांचा दत्तकविधान समारंभ आणी कापशीकर सेनापती भाग ४

छत्रपती शाहूमहाराजांचा दत्तकविधान समारंभ आणी कापशीकर सेनापती

भाग ४

या दत्तकविधान समारंभात छत्रपती घराण्याशी संबंधित अनेक पाहुणे , सरदार , राजेरजवाडे , जहागीरदार , मानकरी येणार होते त्यामुळे प्रत्येकाच्या मानमरातब , इशारत , आदब यांची काळजी घेण्यासाठी विशेष व्यवस्था करणेत आलेली होती .... येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांची तसेच जहागीरदार , सरदार , मानकरी हे शहरात जिथे रहाण्यासाठी उतरले असतील तेथे पाण्याची व्यवस्था पाहणेची जबाबदारी ओव्हरसियर रावसाहेब रघुनाथराव रामचंद्र शिरगावकर यांच्यावर होती .... संस्थानचे सिटी सर्व्हे मामलेदार रावसाहेब विनायक धोंडदेव बावडेकर यांच्यावर जे जहागीरदार , संस्थानिक , सरदार कार्यक्रमाला येतील त्यांना रहाण्यासाठी व्यवस्था पहाणेकामी आणी त्यांची सरबराई करणेकामी नियुक्ती केलेली होती ....

दत्तक समारंभास सर्व सरंजामानिशी येण्याबद्दलचे आज्ञापत्र श्रीमन्महाराज सकवारबाई राणीसाहेब यांच्यानावे करवीर संस्थान कडून व मेहेरबान पॉलिटीकल एजंट यांचेकडून मिळालेमुळे सरसेनापती संताजीराव घोरपडे कापशीकर हे त्यांच्या हिंमत बहाद्दर परिसरातील स्वतःच्या बंगल्यात उतरणार होते .... पंतप्रतिनिधी , पंतअमात्य वगैरे खासे मानकरी त्याच परिसरात उतरणार असल्याने त्या भागात स्वच्छता , पाणीपुरवठा वगैरे सोबत नोकरचाकर , दरबार संरक्षक वगैरे विशेष सुविधा देणेत आल्या होत्या ... त्याबाबत वर्दी नारायण सदाशिव देसाई या शहर फौजदारांनी छत्रपती महाराजांचे खाजगी कारभारी यांना तसेच मेहेरबान दिवाण बहाद्दर मेहेरजी कुंवरजी यांना दिलेली होती .... तसेच दत्तकविधान समारंभ फाल्गुन वद्य पंचमी सोमवार दिनांक 17 मार्च 1884 रोजी सकाळी 7.30 वाजता झाल्यानंतर लगेच जो दरबार अंबाबाई मंदिराच्या चौकात भरणार होता त्यास रिवाजाप्रमाणे दरबारी पोशाख करुन येणेविषयी दिनांक 16 मार्च 1884 रोजी पत्र भालदाराकरवी सरसेनापतींना प्राप्त झाले ....

फाल्गुन वद्य पंचमी सोमवार दिनांक 10 मार्च 1884 रोजी सकाळी 7.30 वाजता शास्त्रशुद्ध दत्तकविधान झाल्यानंतर छत्रपती महाराज कोल्हापूरच्या प्राचीन राजगादीवर विराजमान होताच 19 तोफांची सलामी देणेत येणार होती व त्यानंतर सर्व जहागीरदार , संस्थानिक , सरदार वगैरे खासे आपआपल्या सांप्रदायाप्रमाणे त्यांना पोशाख , नजराणे व सतके देणार होते ... संस्थान दिवाण ऑफिस , संस्थान सरन्यायाधीश ऑफिस , संस्थान खाजगी कचेरीतील एकंदर दहा कारकून हे दरबार चौकात येणाऱ्या सर्व मानकरी लोकांना सन्मानाने त्यांच्या दरबारातील आसनाकडे बसवण्यासाठी उभे होते ......

पन्हाळगडाचे तटसरनौबत ..... कोल्हापूर प्रांताचे सरदेशमुख वतनदार ..... हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती ..... हिंदूराव ममलकत मदार श्रीमंत संताजीराव घोरपडे कापशीकर सेनापती यांचे दरबारात आगमन होताच सर्व लष्करफडातील कारकूनांनी त्यांना मुजरे करुन खडी ताजीम दिली ..... शिरोळ मामलेदार रघुनाथराव वेचलेकर यांनी अतिशय अदबीने सेनापतींना त्यांच्या आसनाकडे नेले .... कोल्हापूर संस्थानचे दिवाण खान बहाद्दर मेहेरजी कुंवरजी यांनी त्यांचा सत्कार केला ... त्यानंतर दरबारात अनेक जहागीरदार , सरदार , मानकरी वगैरे आल्यावर सगळ्यांना मानाच्या जागा दिल्या गेल्या .....

मेहेरबान पॉलिटीकल एजंट साहेब बहाद्दर यांचे आगमन झाले .... पाठोपाठ आबासाहेब घाटगे सर्जाराव वजारतमाब कागलकर हे त्यांचे चिरंजीव व भावी कोल्हापूर छत्रपती यशवंतराव बाबासाहेब यांना घेऊन दरबारात आले ... श्रीमंत आबासाहेब घाटगे कागलकर यांच्या सन्मानार्थ नऊ तोफांची सलामी देणेत आली .....

छत्रपती शाहूमहाराजांचा दत्तकविधान समारंभ आणी कापशीकर सेनापती भाग ३

छत्रपती शाहूमहाराजांचा दत्तकविधान समारंभ आणी कापशीकर सेनापती भाग ३

टाऊनहॉल मधील सभेत सेनापती संताजीराव घोरपडे गेले नव्हते मात्र त्यांचे प्रतिनिधी श्री आप्पासाहेब सरलष्कर हे या सभेचे आभारप्रदर्शक पत्र श्रीमंत आबासाहेब घाटगे सर्जाराव वजारतमाब कागलकर यांच्या कोल्हापूर येथील बंगल्यावर जाणेकरीता नेमलेल्या ' डेप्युटेशन ' मध्ये हजर होते .... तेथे आबासाहेब घाटगे कागलकर यांना अत्यंत सन्मानाने हे आभारप्रदर्शक पत्र देणेत आले ... त्या आभारप्रदर्शक पत्रात लिहिले होते की

" श्रीमंत राजश्री जयसिंगराव आबासाहेब घाटगे सर्जाराव वजारतमाब कागलचे अधिपती यांसी - कैलासवासी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे अकस्मिक मृत्यूने आम्हां कोल्हापूरवासी जनांस बहुत दुःख झालें आहे . या शोचनीय गोष्टीमुळे रिकाम्या झालेल्या कोल्हापूरच्या गादीवर आपले प्रीय ज्येष्ठ चिरंजीव श्रीमंत यशवंतराव बाबासाहेब यांस दत्तक देऊन महाराजांचे गादीवर बसविण्याविषयीं इंग्लिश सरकाराने मेहेरबान होऊन अनुमोदन दिलें. अशा आनंदाच्या प्रसंगी करवीरस्थ प्रजाजन मोठ्या संतोषाने व समाधान बुद्धीने आपलें अभिवंदन करण्यासाठी आपणापाशी हजर झालों आहों . कारण या राष्ट्राच्या सुदैवाने श्रीमंत बाबासाहेब सारखा सकुलोत्पन्न आणी विद्याभ्यासशील अधिपती आम्हास प्राप्त झाला आहे . हे राजकूळ सतत राखण्याविषयीं व येथील राज्यव्यवस्था अबाधित व अविछिन्न चालविण्यासाठी इंग्रज सरकारांनी ज्या थोर राजनितीला अनुसरुन सतत वर्तन ठेविलें आहे तीबद्दल आम्ही त्यांचे कितीही उपकार मानिले तरी ते थोडेच ..." वगैरे

या सव्वीस जणांच्या ' डेप्युटेशन ' मध्ये श्रीमंत आबासाहेब सरलष्कर यांचेसहीत श्रीमंत आबासाहेब पंतप्रतिनिधी , श्रीमंत आप्पासाहेब राजोपाध्ये , श्रीमंत बाळासाहेब गायकवाड , श्रीमंत आनंदराव भोपे , श्रीमंत भाऊसाहेब इंगळे , दरबार सर्जन डॉक्टर सिंकलर, इंजिनीयर रामचंद्र तांबे , करवीर मामलेदार गोविंद तांबे , वेदशास्त्र संपन्न कांताचार्य पंडितराव , यशवंतराव अभ्यंकर वकिल , ज्ञानसागर वृत्तपत्राचे संपादक विठ्ठल मंत्री , गुजरीतील दुकानदार आबाहुसेन अल्लीभाई , सुरतराम मारवाडी वगैरे मान्यवर मंडळी होती ... या डेप्युटेशनचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यामध्ये सर्व क्षेत्रातील पारंगत असलेले मान्यवर होते ...( आजकाल कोणत्याही कमिटीमध्ये आपले ऐकणाऱ्यांचा भरणा केलेला दिसतो )

या पत्रास श्रीमंत आबासाहेब घाटगे सर्जाराव वजारतमाब कागलकर यांच्या वतीने त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी रावसाहेब कृष्णाजी भिकाजी गोखले यानी उत्तरादाखल पत्र दिले ....

" माझे चिरंजीव राजश्री बाबासाहेब यांस कोल्हापूरच्या गादीवर दत्तक घेण्यास श्रीमंत मातोश्री राणीसाहेब यांनी पसंत केले यामुळे सर्व लोकांस संतोष वाटला हे पाहून मला विशेष आनंद वाटतो . दैवयोगाने कोल्हापूर संस्थानात जे निरनिराळे फेरफार झाले , त्यावेळी त्या राज्याचे अधिपत्य व एकी इंग्रज सरकारांनी मोठ्या काळजीने राखली , यास्तव तुम्ही त्यांचे आभारी आहां असे आपल्या पत्रांत दर्शविलेत ही गोष्ट फार योग्य आहे . ".... वगैरे

त्यानंतर अनेक ब्राम्हणांच्या उपस्थितीत दत्तकविधान कोणत्या मुहूर्तावर व्हावे ? याबद्दल निर्णय झाला आणी फाल्गुन वद्य पंचमी सोमवार दिनांक 17 मार्च 1884 रोजी सकाळी 7.30 वाजताचा मुहूर्त ठरविणेत आला . त्यासाठी विस हजार रुपयांचे ' सांगसन '( सँक्शन ) मंजूर करणेत आले . तसेच कार्यक्रम व्यवस्थेकरीता रुपये 1250 कोल्हापूर म्युनिसीपल कमिटीने आणी रुपये 1250 संस्थान ट्रेजरीने देण्यासाठी मंजूरी देणेत आली . या 2500 रुपयात टाऊनहॉल पुढील हॉस्पिटल समोर ( आत्ताचे CPR हॉस्पिटल ) येथे कमान उभारण्यासाठी व तेथुन पुढच्या मिरवणूक मार्गावर ' चिराखदानी ' म्हणजे तेलाचे दिवे लावणे , पन्नास मुले व पन्नास मुली यांच्याद्वारे मंगलगाणी म्हणत मिरवणूक मार्गावर पुष्पवृष्टी करणे , ध्वज उभारणे , रस्ते स्वच्छ करणे , गुढ्यातोरणे उभारणे , मिरवणूक मार्गावर असलेल्या सगळ्या घरांना बाहेरुन चुन्याचा रंग लावणे वगैरे खर्च करण्यासाठी मंजूरी देणेत आली . ( आजकाल 25000 रुपये खर्च करुन नुसता ' चुना ' लावतात )

छत्रपती शाहूमहाराजांचा दत्तकविधान समारंभ आणी कापशीकर सेनापती भाग २

छत्रपती शाहूमहाराजांचा दत्तकविधान समारंभ आणी कापशीकर सेनापती
भाग २
कोल्हापूर छत्रपती घराण्यातील राजाराम महाराज ( तिसरे ) हे अतिशय परोपकारी आणी विद्वान होते ... विदेशातील व्यापार , राजकारण आणी कलाकौशल्य यांचा अभ्यास करण्यासाठी युरोप मध्ये गेले असता इटली देशातील ' फ्लॉरेन्स ' शहरात 1870 मध्ये त्यांचे निधन झाले ... त्यांच्या राजगादीवर दत्तक घेतलेले खानवटकर घराण्यातील नारायणराव म्हणजे शिवाजी ( पाचवे ) हे 1883 मध्ये अहमदनगर येथे मृत्युमूखी पडल्याने छत्रपती पद पुन्हा रिक्त झाले .... अशा वेळी कोल्हापूर संस्थान ताब्यात घेण्यासाठी ब्रिटिश व्हाईसरॉय हालचाली करणार ही भिती होती ... छत्रपती शिवाजी ( पाचवे ) हे लहान असल्याने कोल्हापूर संस्थानचा कारभार त्यांच्या वतीने रिजंट इन कौन्सिल म्हणून श्रीमंत आबासाहेब घाटगे सर्जाराव वजारतमाब कागलकर हे पहात होते .... रिक्त झालेल्या छत्रपती पदावर श्रीमंत आबासाहेब घाटगे कागलकर यांचे चिरंजीव श्रीमंत यशवंतराव घाटगे यांना दत्तक घेण्यासाठी अष्टप्रधान मंडळींनी हिंदूस्थान सरकारला कळवले आणी त्या मागणीस ब्रिटिश इंडिया सरकारने मान्यता दिल्यानंतर श्रीमंत यशवंतराव यांचे छत्रपती शाहू म्हणून दत्तकविधान करणेस अष्टप्रधान आणी कोल्हापूर म्युनिसीपल कमिटीने 27 फेब्रुवारी 1884 रोजी सायंकाळी चार वाजता कोल्हापूरच्या टाऊनहॉल येथे सभा घेणेत आली .... त्या सभेसाठी कोल्हापूर म्युनिसीपल कमिटीचे प्रेसिडेंट ' रावसाहेब' कृष्णाजी रामचंद्र आगाशे यांच्या सहीने इतर महत्त्वाचे जहागीरदार यांच्यासोबत श्रीमंत संताजीराव घोरपडे कापशीकर ( हे क्रिकेटप्रेमी ... यांनीच कोल्हापूर संस्थानचे रिजन्सी कौन्सिल आणी पॉलिटीकल एजंट यांच्यामधील क्रिकेटची मॅच क्रिकेटच्या माळावर म्हणजे आत्ताच्या mseb आणी व्हनबट्टे यांच्या शेतात आयोजित केली होती तसेच ते श्रीमंत जयसिंगराव घोरपडे उर्फ बाळमहाराज यांचे पिताश्री तसेच कापशीचे विद्यमान सेनापती श्रीमंत राणोजीराजे आणी उदयसिंहराजे यांचे आजोबा होय ) यांना खास निमंत्रण होते ....
क्रमशः

छत्रपती शाहूमहाराजांचा दत्तकविधान समारंभ आणी कापशीकर सेनापती भाग १

छत्रपती शाहूमहाराजांचा दत्तकविधान समारंभ आणी कापशीकर सेनापती
भाग १
हिंदूपदपातशाहा क्षत्रीय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हाळोजी घोरपडे आणी त्यांचे पुत्र संताजीराव घोरपडे यांना आपल्या सैन्यात जुमलेदारी आणी सातारा जिल्ह्यात पाटीलकीची वतने दिली ... छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर मराठेशाहीवर परकीय हल्ले सुरु झाले .... छत्रपती संभाजीराजे आणी कवी कलश हे दोघे संगमेश्वरी असताना मुकर्रबखान या मोगल सरदाराने त्यांना घेरले ... संताजींचे बंधु बहीरजी यांनी शंभूराजेना सुरक्षित स्थळी हलवायचा केलेला प्रयत्न फसला .... स्वराज्याच्या वारसदाराचे संरक्षण करताना म्हाळोजीराजेंनी संगमेश्वर येथे स्वराज्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले ..... मुकर्रबखानाने शंभूराजे आणी कवी कलशांना कैद करुन तुळापूर येथे औरंगजेबाच्या समोर हजर केले .... आणी पाठोपाठ रायगडावर कब्जा केला ..... आणी इकडे तुळापुर मुक्कामी छत्रपती संभाजीराजेंना अक्षरशः हालहाल करुन ठार केले ....
शंभूराजेंच्या मृत्युनंतर राजाराम महाराज छत्रपती झाले पण स्वराज्यावर घोंगावणारी मोगली संकटे पहाता छत्रपती राजाराम महाराजांना , ताराराणी आणी राजसबाईंना सुरक्षित चंदीचंदावरास हलवण्यात आले आणी बेदनुरच्या राणीच्या सहाय्याने संताजींनी आपल्या नेतृत्वाखाली ही महत्वपूर्ण मोहीम यशस्वी केली .... तिथे गेल्यावर छत्रपती राजाराम महाराजांनी 1691 मध्ये संताजी घोरपडेंना " सरसेनापती " पद बहाल केले .... आणी आपली कापशी ही सरसेनापतींची " सेनापती कापशी " झाली ... सोबत मानाचा जरीपटका , नौबत आणी ' हिंदूराव ममलकत मदार ' ही पदवी दिली.... त्यापैकी महाराणी ताराबाई यांचे पुत्र शिवाजी यांच्या मृत्यु नंतर म्हणजे इसवी 1712 नंतर राजसबाई राणीसाहेब यांचे पुत्र युवराज संभाजी यांनी कोल्हापूर संस्थानच्या अष्टप्रधान मंडळातील पंत प्रतिनिधी यांना विशाळगडाची , पंत अमात्य यांना गगनबावड्याची आणी सेनापती यांना कापशीची अश्या जहागीरी दिल्या .... छत्रपती ताराराणीसाहेबांच्या काळात कापशीकर घोरपडे घराण्याला सरंजाम मिळाला होता ... सन 1703 -04 मध्ये हा सरंजामजाबता महाराणी ताराबाई यांचे पुत्र शिवाजी यांनी पिराजीराव यांचे नावे दिला आहे ... त्यातील काही कलमे ही घोरपडे घराण्यावर छत्रपतींच्या असलेल्या मर्जीचे पुरावे आहेत ... कोल्हापूर संस्थान अत्यंत बळकट रहावे यासाठी रामचंद्रपंत अमात्य यांनी घोरपडे राजघराण्याला अधिकाधिक सन्मान दिला ... बहीरजीराजे घोरपडे - गजेंद्रगडकर यांचे पुत्र सिदोजीराजे यांना सेनापतीपद दिले ... मात्र कर्नाटकातील मोहीमेत व्यस्त राहिल्याने गजेंद्रगडकर घोरपडे घराण्याला कोल्हापूर संस्थानच्या मसलतीमध्ये भाग घेणे शक्य होईना ... अखेर कापशीकर घराण्यातील पिराजीराव घोरपडे यांना " सेनापती " बनवले गेले ... आजपर्यंत हे " सेनापती " पद कापशीकर घोरपडे घराण्याकडेच आहे ... अशा तऱ्हेने कोल्हापूर छत्रपती आणी कापशीकर सेनापती यांचे नाते दिवसेंदिवस अधिक दृढ होत गेले ....

Saturday 23 March 2019

...आणि मराठ्यांच्या नुसत्या दहशतीने आलमगीर औरंगजेब बादशाह लंगडा झाला !!




...आणि मराठ्यांच्या नुसत्या दहशतीने आलमगीर औरंगजेब बादशाह लंगडा झाला !!
पोस्तसांभार :Raj Jadhav

१६९९ साली स्वतः औरंगजेब बादशाह मराठयांचे किल्ले जिंकण्यासाठी ब्रह्मपुरीच्या छावणीतून बाहेर पडला. साधारणपणे १७०० सालात औरंगजेब याने वसंतगड, सातारा, परळी आणि भूषणगड हे किल्ले जिंकले. मोगल किल्ले घेत असताना मराठे औरंगजेबाच्या छावणीभोवती घिरट्या घालत, त्याच्या छावणीवर हल्ला करत तसेच रसद आणण्यास निघालेल्या मोगल पथकांवर हल्ला करत. औरंगजेब महिनोमहिने किल्ले घेण्याचा प्रयत्न करत असे त्यामुळे किल्ला लढवता येईल तितका मराठे लढवत असत शेवटी मनुष्यहानी न होता प्रचंड खंडणी घेऊन किल्ला मोगलांना देत, मोगल किल्ला जिंकून पुढे गेले की तोच किल्ला मराठे जिंकून घेत. याच कालावधीत मराठ्यांनी मोगल सेनापतींना शेकडो मैल पायपीट करायला लावली शिवाय मराठे दक्षिणेत संचार करून मोगलांची ठाणे मारत, मोगल प्रदेश उध्वस्त करत अनेक मोगली सरदारांना कैद करून खंडणी वसूल करत असत.
२५ जुलै १७०० रोजी औरंगजेबाने भूषणगड ताब्यात घेतला, औरंगजेबाने आपल्या शहजाद्याला व इतर सरदारांना सैन्यासह निरनिराळ्या भागात पाठवले, हेतू असा की सैन्याला विश्रांती मिळावी. भूषणगडाकडुन औरंगजेब हा पन्हाळा जिंकून घेण्याच्या तयारीत होता. भुषणगडापासून निघाल्यानंतर औरंगजेब याने माण नदीवरील खवासपूर येथे आपली छावणी कायम केली. पावसाळ्याचे दिवस असल्याने माण नदीला रात्री एकाएकी पूर येऊन मोगल छावणीची भयंकर वाताहत झाली. अनेक माणसे जखमी झाली. या घटनेबद्दल साकी मुस्तेदखान म्हणतो " डोंगरावर पाऊस पडला. डोंगरातील पाणी नदीच्या पात्रात वाहू लागले. लोक गाढ निद्रेत होते. पुढे काय वाढून ठेवले याची त्यांना कल्पना नव्हती. एकाएकी त्यांना जाग आली तेंव्हा बिछान्यावरून ते पाहतात तो काय ? चहुकडून पाण्याचा पूर आला आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी, सगळा प्रदेश जलमय झाला आहे. असंख्य माणसे व जनावरे पाण्यात बुडून मेली. अजून रात्र शिल्लक राहिली असती आणि पूर दिवसाच्या चार पाच घटकेपर्यंत चालू राहिला असता तर एक मनुष्यही जिवंत राहिला नसता.
याच घटनेचा वृत्तांत देताना मोगलांचा इतिहासकार खाफिखान लिहतो " पाण्याचा पूर येताच छावणीतून विलक्षण आक्रोश उठला. रात्रीच्या भयंकर अंधारात जो आरडाओरडा झाला त्यामुळे वातावरण कंपनामय झाले. त्यावेळी बादशाह शौचालयात होता. त्याला वाटले की मराठयांनी लष्करावर अचानक छापा घातल्यामुळे छावणीत आकांत झाला आहे. तो घाईघाईने उठून बाहेर येऊ लागला. त्या गडबडीत त्याचे पाय घसरले त्याच्या गुडघ्याला भयंकर मार लागला. तो काही बरा झाला नाही. बादशाह शेवटपर्यंत लंगडतच राहिला.नाही तरी तो तैमुरलंगाचा वारसच होय "
मराठ्यांच्या दहशतीचे असे हे वेगळे आणि अलौकिक उदाहरण..

Friday 22 March 2019

"#सरसेनापती_येसाजी_कंक_वाडा_भुतोंडे"


#छत्रपती_शिवाजी_महाराज#छत्रपती_संभाजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला स्वराज्याच्या एका सरसेनापतींचा वाडा,
"#सरसेनापती_येसाजी_कंक_वाडा_भुतोंडे"
ई. स. १६८३ च्या सुमारास मराठे अन गोवेकर ह्याच्यांत फोडां किल्ल्यावर रण झाले .
१ नोव्हेंबर १६८३ रोजी गोव्याचा विरजई (व्हाईसराॅय) कौटं दि अल्वर ह्याने प्रचंढ सैन्यानिशी फोड्यांच्या किल्ल्यावर हल्ला चढविला.
केवळ ४०० सैनिकांनिशी पोर्तुगिजांना तोंड देत येसाजीराव अन कृष्णाजी ह्या कंक पितापुत्रांनी पोर्तुगिजांच्या आधुनिक अन लांब पल्ल्याच्या तोफखान्यास यशस्वीपणे तोंड दिले .
किल्ल्याची तोफखान्याने ढासळवलेली तटबंदी पुनश्च बाधुंन काढीत अन मराठ्यांना धीर देत थोर पराक्रम गाजवला .
भगव्या झेड्यां निषाण्याचा मान राखला .
केवळ ४०० शिपायांनिशी फोडां किल्ला अजिंक्य राखला. अशाप्रकारे रणबहाद्दुर सरसेनापती येसाजीराव कंक अन त्यांचा पराक्रमी पुत्र कृष्णाजी कंक ह्यांच्या तळपत्या तरवारीच्या वीरगाथेनिशी मराठ्यानीं तो हल्ला यशस्वीपणे परतवुन लावला .

दुदैर्वाने ह्या हल्ल्यात येसाजी कंक यांचे पुत्र कृष्णाजी कंक यांना वीरमरण आले. "#पोर_रक्तात_पडलेला_पाहूनही_भगव्या_निशाणापायी_फोंडा_गडावर_भूतोंड्यातील_एक_बाप_लढत_होता". या लढाईत स्वतः संभाजीराजे येसाजी कंक यांच्या मदतीस धावून आले, मराठ्यांनी मोठ्या शौर्याने फोंडा किल्ला स्वराज्यात राखला होता. याच लढाईत सरसेनापती येसाजी कंक यांस अनेक जखमा झाल्याने ते जायबंदी झाले होते, पुत्राच्या वीरमरणासमोर पित्यास स्वतःचे दुखणे जाणावलेही नसावे.
स्वतः संभाजीराजांनी त्यांची आपुलकीने भेट घेतली, जखमी येसाजी कंक व मृत पुत्र कृष्णाजी यांस त्यांच्या मूळ गावी राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भुतोंडे येथे पाठविले.
त्यानंतर काही दिवसांनी स्वतः #छत्रपती_संभाजीराजे सरसेनापती येसाजी कंक यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी #भुतोंडे येथील याच #कंक_वाड्यात आले व कंक परिवाराच्या स्वराज्य निष्ठेचे बक्षीस येसाजी कंक यांस दिले...
आज हि सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज या कंक वाड्यात राहतात, येसाजी कंक यांनी वापरलेली शस्त्रे, जुनी भांडी, नाणी असा अनमोल ठेवा कंक कुटुंबियांनी आजही जतन करून ठेवला आहे. व हा सर्व अनमोल ठेवा शिवभक्तांसाठी पाहण्यास सदैव खुला असतो. आजही कंक वाड्यात अनेक इतिहास अभ्यासक, शिवभक्त संघटना, मावळे रोज भेट देत असतात.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वारसदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले (सातारा) व श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले (कोल्हापूर) यांनीही या वाड्यास भेट दिली आहे.
महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांस मी सांगू इच्छितो कि आपणही एकदा जरूर या ऐतिहासिक वाड्यास भेट द्यावी. कधी राजगड किल्ल्यावर आलात तर भुतोंडे गावी नक्की या.
पत्ता- सरसेनापती येसाजी कंक वाडा, भुतोंडे (ता-भोर, जि-पुणे) किल्ले राजगड पायथा
संपर्क- ०८८८८२७०२८८
चित्रकार- ओंकार हरीश्चंद्र घोलप (वाशी) Omkar Gholap
लेखन-
सरसेनापती सिद्धार्थ संजय कंक
Siddharth Sanjay Kank
Siddharth Sanjay Kank
-सरसेनापती येसाजी कंक यांचे थेट वंशज
-उपाध्यक्ष सरनोबत येसाजी कंक ट्रस्ट
संपर्क- ०८८८८२७०२८८
धन्यवाद 🙏

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...