विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 31 March 2020

छत्रपती संभाजी महाराजांचा हडकोळण शिलालेख


छत्रपती संभाजी महाराजांचा हडकोळण शिलालेख
post by पंकज समेळ,

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळातील पत्रव्यवहार उपलब्ध आहेत. त्याच्यावरून तत्कालीन राज्यपद्धती, करपद्धती, शासनव्यवस्था इ. अनेक गोष्टींबद्दल माहिती मिळते. या काळात कारकुनीच्या कामासाठी कागदाचा वापर होत असल्यामुळे शिलालेखांचे प्रमाण नगण्य आहे आणि जे शिलालेख उपलब्ध आहेत ते इतिहासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील असाच महत्त्वाचा शिलालेख म्हणजे हडकोळण शिलालेख. या शिलालेखात हडकोळण या गावाचा कोणताही उल्लेख नाही आहे. फक्त हडकोळण येथे होता म्हणून याचा उल्लेख हडकोळ शिलालेख असा केला जातो.

गोव्यातील हडकोळण गावात असलेल्या देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या चौथऱ्यावर शिलालेखाची शिळा होती. पण सद्यस्थितीत हा शिलालेख गोवा राज्य संग्रहालयात आहे. हा शिलालेख कोणत्या वर्षी मूळ ठिकाणावरून काढून संग्रहालयात आणला याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे. शिलालेखाच्या शेजारी “अडकोना, तालुका फोंडा येथे मिळालेला सन १६८८ मधील शिलालेख” एवढाच उल्लेख आहे. त्यामुळे हा शिलालेख कोणाचा आहे पटकन कळून येत नाही.

छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात वेगवेगळे कर होते. उदा. लग्न करणाऱ्यास ‘लग्नटका’ किंवा ‘वरातटका’, पुनर्विवाह करणाऱ्यास ‘पाटदाम’, घरमालकास ‘घरटका’, खेळणी विक्रेत्यास ‘भूतफरोसी’ इ. या करांबरोबर गोमंतक (गोवा) प्रांतात वाटसरूंकडून ‘अंगभाडे’ नावाच्या कराची वसुली करण्यात येत असे. मार्च १६८८ पर्यंत अंत्रुज येथे हा कर वसूल करण्यात येत होता. नंतर तो छत्रपती संभाजी महाराजांनी माफ केला व त्याचे आज्ञापत्र २२ मार्च, १६८८ ला दिलेले आहे. हेच आज्ञापत्र या शिलालेखात कोरले आहे.

हडकोळण शिलालेख

शिळेची लांबी ३६ इंच व रुंदी अंदाजे १२ इंच आहे. शिळेच्या चारी बाजूंना समास सोडलेला आहे. समासाच्या आत साधारणपणे अर्धा इंच खोल शिलालेख खोदलेला आहे. शिलालेखाची भाषा मराठी आहे. शिलालेखाच्या वरील भागात चंद्रसूर्य आणि आठ पाकळ्यांचे कमळ कोरलेले आहे. चंद्रसूर्याच्या वर “श्रीरामाय” असे कोरलेले आहे. परंतु याची अक्षरवाटिका मुख्य शिलालेखाच्या अक्षरवाटिकेपेक्षा वेगळी आहे. त्यावरून “श्रीरामाय” हे नंतरच्या काळात दुसऱ्या व्यक्तीने कोरले असावे. शिलालेख २२ ओळींचा असून शेवटच्या दोन ओळी समासावर कोरलेल्या आहेत. या दोन ओळींच्या खाली दोन्ही बाजूस गाईचे शिल्प कोरलेले आहे. पण ही दोन्ही शिल्प बरीच अस्पष्ट झालेली आहेत.

देवनागरी लिपी आणि मराठी व संस्कृत भाषांमध्ये हा लेख कोरलेला आहे. आज्ञापत्राचा भाग मराठीत, तर शापवाणी संस्कृतमध्ये आहे.

वाचन

श्रीगणेशायनम:
श्री लक्ष्मी प्रसन्न|| स्वस्ति श्री नृपशाळीवाहन शके||
१६१० वर्ष | वर्तमान विभवनाम संवत्सर चैत्रशुद्ध
प्रतिपदा गुरुवासर गोमंतक प्रांत अनंतउर्ज देश
क्षत्रियकुळावतंस राजा शंभुछत्रपति यांचे आज्ञानुव-
र्ती राजश्री धर्माजी नागनाथ मुख्य देशाधिकारी प्रां-
त मामले फोंडा याप्रति तिमनायकाचे पुत्र सा-
मनायक याहीं विनंती केलि जे पुर्विं मुसलमाना
च्या राज्यामध्यें तरि अनंतउर्जेसि लोकास आंगभा-
डें घेत नव्हते. तेणेंकरून व्यावहारीक लोके सुखें
येत. तेणेंकरून राजगृहिं हासिल होय. आता हे
हिंदुराज्य जाहालेपासोन आंगभाडे घेउं लागले तेणेंकरून राजगृहिं
हासिलासी धक्का बैसला. त्यासि ते कृपाळु होउन आंगभाडें उरपासि जाव
दुडुवा अर्धकोसी चौदा दुडु घेत आहेति मना करावे पण काहि राजा-
गृहिं आदाय होईल ऐसि विज्ञापना केलि ते प्रमाण जाणुन
भाणस्तरि व पारगावि व मांदुस कुडैचि येथिल आंगभाडें सोडी
लें. पुढें या प्रमाणें सकळांहि चालवावें सहसा धर्मकृत्यास नाश क
रूं नये करतिल त्यांसि महापातक आहे ||श्लोक||श्वकृत वा परे
णापी धर्मकृत्यं कृतं नर:|| यो नश्यती पापात्मा स यती
नरकान् बहून् ||१|| लोभान्मत्सरतो वापि धर्मकार्यस्य
दुस्यक:|| यो नर: स महापापी विष्ठायां जायते कृमि||२||
दानपाळनयोर्मध्ये दानात् स्त्रेयोनुपाळनं|| दानात् स्वर्गमवा
प्नोति पाळणादच्युतं पदं|| या धर्मकार्या समस्तिं मान देवावे

श्री गणेशाय नम. श्री लक्ष्मी प्रसन्न. शालिवाहन शक १६१० विभवनाम संवत्सर गुरुवार चैत्र शुद्ध प्रतिपदा. गोमंतक प्रांत अनंतउर्ज देश. क्षत्रियकुळावतंस छत्रपती शंभु महाराज यांचे मामले प्रांत फोंडा येथील मुख्यदेशाधिकारी धर्माजी नागनाथ. तिमनायकाचे पुत्र सामनायक यांनी विनंती केली मुसलमानांच्या राज्यात अनंतउर्ज येथे नदीवरील अंगभाडे घेत नव्हते. त्यामुळे व्यापारी लोक मालाची ने-आण जास्त करत होते. परंतु हिंदुराज्य झाल्यापासून आंगभाडे घेण्यास सुरुवात केल्यामुळे मालाची ने-आण कमी झाली आहे, त्यामुळे तो कर घेऊ नये. त्याप्रमाणे भाणस्तरि, पारगाव, मांदुस येथील दुडुवा अर्ध कोसी, चौदा दुडु घेत होत ते माफ केले. सहस धर्मकृत्यास नाश करू नये. जो धर्मकृत्याचा नाश करेल त्याला पाप लागेल. तसेच धर्मकृत्याचा नाश करणारा नरकात जाईल, विष्ठेमधील कृमि होईल. या धर्मकृत्याचा मान ठेवावा.

वरील शिलालेखात गोमंतक, अनंतउर्ज, फोंडा, भाणस्तरि, पारगाव आणि मांदुस या स्थळांचा उल्लेख आला आहे. अंत्रुज (शिलालेखातील अनंतउर्ज), फोंडा, भाणस्तरि ही सध्याच्या गोवा राज्यातील (शिलालेखातील गोमंतक) शहरे आहेत.

कर माफ केल्यामुळे लोकांना दिलासा मिळतो आणि मालाची ने-आण करण्यसाठी प्रोत्साहन मिळते. तसेच “धर्मकृत्यास नाश करू नये” व “हे हिंदू राज्य जाहाले” याच्यावरून छत्रपती संभाजी महाराजांची स्वधर्मावरील निष्ठा दिसून येते.

संग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांना इतिहासाची, छत्रपती संभाजी महाराजांच्या गोवा मोहिमेची जास्त माहिती नसल्यामुळे आणि शिलालेखाजवळ योग्य ती माहिती नसल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील हा महत्त्वपूर्ण दस्तऐवज दुर्लक्षित आहे.

संदर्भ

ज्वलज्ज्वलनतेजस संभाजी राजा, ले. सदाशिव शिवदे, डायमंड पब्लिकेशन्स, पुणे, २००८

Saturday 14 March 2020

संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न का झाले नाहीत

संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न का झाले नाहीत

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक व निधनाच्या काळात स्वराज्याची सेना एक मातब्बर फौज बनली होती - घोडदळ आणि पायदळ मिळून २ लाखाच्या आसपास सैन्य स्वराज्याच्या पदरी होते. नक्कीच ह्या सैन्याला संभाजी महाराजांच्या काळात अजून बळकटी मिळाली असणार. त्यामुळे एक प्रश्न साहजिक मनात येतो - अशा जीवावर उदार होऊन लढणाऱ्या आणि अभूतपूर्व पराक्रम गाजवणाऱ्या मर्दानी फौजेनी संभाजी महाराज फितुरीने पकडले गेल्यावर त्यांच्या सुटकेचे काहीच प्रयत्न का केले नाहीत ? जवळपास सगळेच पुरातन ऐतिहासिक ग्रंथ ह्या प्रश्नावर मौन बाळगून आहेत - कुठेही असे काही प्रयत्त्न झाल्याचा भक्कम संदर्भ लागत नाही. त्यामुळे असे वाटते की ह्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच त्या वेळच्या घटनाक्रम आणि परिस्थती ह्यांच्या ओघात लपले असणार .


मोगलांविरुद्ध मराठा फौजेच्या बहुसंख्य आघाड्या

मोगलांनी आधीच सुमारे दोनच वर्षांच्या काळात बिजापूर आणि हैदराबाद काबीज केले होते - परिणामी आदिलशाही आणि कुतुबशाही संपुष्टात आणून त्यांचा बराचसा प्रदेश मोगलाईत जिंकून घेतला होता. आता मोगलांची सगळी शक्ती एकवटली होती ते केवळ एका ध्येया भोवती - स्वराज्यावर हल्ला करून ते गिळंकृत करणे. औरंगजेबाची छावणी ह्या काळात भीमा नदीच्या तीरावर अकलूज येथे होती. मोगल फौजा आता उत्तर सीमेवर साल्हेर, कल्याण-भिवंडी पासून पूर्वेला औरंगाबाद-अहमदनगर ते दक्षिणेला पन्हाळा आणि कर्नाटकातही तळ ठोकून होत्या. मराठा सैन्य ह्या सर्व आघाड्यांवर मोगल फौजेचा कडवा प्रतिकार करत होतं. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की संख्यात्मक द्रुष्टिने बघितले तर अवघी २ लाख मर्द मराठा फौज ५ लाख मोगल फौजेशी लढा देत होती. त्यातच स्वराजायचे अनेक वर्षाचे सरनोबत आणि फौजेचा आदर्श असलेले हंबीरराव मोहित्यांना जवळपास १ वर्षापूर्वीच वाईच्या लढाईत दुर्दैवी वीरमरण आले होते. त्यामुळे स्वराज्याची सेना आता एका नव्या सरनोबतांचा अधिपत्याखाली होती - शूर म्हाळोजी बाबा घोरपडे.


संगमेश्वर आणि शिर्के

संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी कैद करण्यात आले - संगमेश्वर - ती जागा लक्षात घेणे गरजेचे आहे. कोल्हापूर आणि सातारा खालचा सह्याद्रीचा प्रदेश - श्रुंगारपूर , संगमेश्वर, सध्याचा चांदोली अभयारण्याचा प्रदेश तसेच प्रचितगडचा भाग हा सह्याद्रीचे खर्या अर्थानी रौद्र रूप प्रदर्शित करणारा भाग. हा संपूर्ण प्रदेश उत्तुंग डोंगररांगा, अतिशय दुर्गम असे घाट रस्ते आणि गर्द जंगल-झाडीनी परिपूर्ण असा भाग आहे - इथे कुठलाही गनीम छत्रपतींवर कुरघोडी करेल ही कल्पनाही करवत नाही. परंतु ह्या दुर्गम डोंगराळ भागाचा ताबा अशा लोकांकडे होता जे खरे तर स्वराज्याचे मातब्बर सरदार, पण निदान त्या वेळी तरी त्यांचे छत्रपतींशी वितुष्ट होते - सरदार शिर्के. सरदार गणोजी शिर्के हे खुद्द संभाजी महाराजांचे मेव्हणे पण त्या वेळी दोघांचे संबंध बिघडले होते कारण शिर्क्यांना वतन बहाल करायला महाराजांनी नकार दिला होता. तरीही ह्या भागात गनिमाला स्वराज्याच्या आतून मदत मिळाल्याशिवाय संभाजी महाराजांवर कुरघोडी करणे शक्य नव्हते आणि दुर्दैवाने अगदी असेच घडले.

ऐतिहासिक लिखाण सांगते की संभाजी महाराज रायगड हुन शृंगारपूर-संगमेश्वर भागात आले ते शिर्क्यांशी भांडण मोडून काढायला. शिर्क्यांनी कवी कलशांवर हल्लाबोल केला होता आणि त्यांची परिस्थिती इतकी अवघड झाली की त्यांनी पळून खेळणा(विशाळगड) ला आश्रय घेतला.संभाजी महाराजांना त्यांच्या मदतीसाठी स्वतः तातडीने यावे लागलं. शिर्क्यांची आघाडी मोडून काढत संभाजी महाराजांनी मोगली आक्रमणाखाली असलेल्या व फितूरीला जवळजवळ बळी पडलेल्या पन्हाळ्याची व्यवस्था लावली. त्यानंतर ते काही दिवस विशाळगडावर होते.तिथली व्यवस्था लावून संभाजी महाराज, कवी कलश, म्हाळोजी घोरपडे आणि इतर लोकांनी संगमेश्वर गाठले. ह्या ठिकाणी बरेचसे समकालीन इतिहासकार असे म्हणतात की कवी कलश ह्यांनी बांधलेल्या भव्य वाड्यात महाराज ऐषोआरामात दंग होते - इतके की त्यांच्या गुप्तहेरांनी मोगल फौज येत असल्याची वर्दी देऊन ही त्यांनी त्याकडे कानाडोळा केला.एकूण त्यावेळच्या परिस्थितीचा विचार करता हे सगळं सपशेल खोटं आणि अशक्य वाटतं. खरंतर महाराज आणि इतर लोक त्या वेळी कसबा संगमेश्वरच्या सरदेसाई वाड्यात राहिले होते - इथेच त्यांना मुकर्रब खानाने कैद केले. सरदेसाई हे शिवाजी महाराजांच्या काळापासूनचे स्वराज्याचे कारभारी होते त्यामुळे त्यांचा वाडा हा ऐषोआरामाचा अड्डा असेल हि शक्यताच नाही.

ह्या सर्व घटनाक्रमाचा आधीची एक घटना खूप महत्वाची आहे. मोगल सरदार शेख निझाम हैद्राबादीला (ज्याला मुकर्रब खान हा खिताब बहाल होता) किल्ले पन्हाळा सर करायच्या मोहिमे वर रवाना करण्यात आले होते. त्याचा मुक्काम त्यावेळी कोल्हापूर भागात होता. अशी एक शक्यता वाटते की वरवर जरी पन्हाळा जिंकायची मोहीम असली तरी त्यात एक गुप्ता योजना असावी. शिर्क्यांनी काही कुरापत काढून संभाजी महाराजांना रायगड उतरायला लावायचा आणि त्यांच्याशी शृंगारपूर-संगमेश्वर भागात लढाई करायला भाग पडायचे.त्या नंतर त्यांच्याशी सला करून त्यांना थोडे दिवस ह्याच भागात राहायला भाग पडायचे. अगदी ह्याच सुमारास मुकर्रब खानाने कोल्हापूरहुन निघून काही फितुरांच्या मदतीने आंबा घाट उतरून संभाजी महाराजांना पकडायचा प्रयत्न करायचा. हि योजना खरी मानली तर ह्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते की थेट रायगड गाठण्या ऐवजी महाराज व इतर लोकं संगमेश्वरला एखाद दोन दिवस का होईना पण का घुटमळले . दुसरी शक्यता अशी की आधी सांगितल्या प्रमाणे हा प्रदेश इतका दुर्गम आणि अवघड होता कि त्यामुळे इथे गनिमा पासून धोका नाही असा साहजिक आति आत्मविश्वास बाळगला गेला. असे दिसते की संभाजी महाराजांनी संगमेश्वरला थांबून रयतेचे काही निवाडे निर्णयी लावले तसेच तळ कोकणात नुकत्याच फितूर झालेल्या काही देशमुख-सावंतांची खबर घेतली. एका रक्तरंजित चकमकीनंतर, ज्यात सरनोबत म्हाळोजी घोरपड्यांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले, संभाजी महाराज आणि कवी कलश ह्यांना २ किंवा ३ फेब्रुवारी १६८९ ला जिवंत कैद करण्यात आले.


राजेंना कैद केल्यानंतर मोगल सैन्याच्या हालचाली

संभाजी महाराजांना कैद केल्यावर पुढची नोंद आढळते कि त्यांना वर घाटावर आणून बहादूरगड ला नेण्यात आले. साहजिक वाटते की आल्या वाटेने - आंबा घाटाने - मुकर्रब खान परतला असणार. सध्याचा कोयनानगर - चिपळूण च्या घाटरस्त्यांनी वर येण्याची हिम्मत त्याला झाली नसावी - ह्याचे कारण प्रचितगड व साताराच्या डोंगराळ प्रदेशातील मराठा फौज. त्यांना ह्या घटनेची माहिती कळताच त्यांनी नक्कीच छत्रपतींची सुटका केली असती त्यामुळे हा धोका मुकर्रब खानाने पत्करला नाही. पकडलेल्या लोकांची ओळख पटू नये म्हणून त्याचे वेषांतर करण्यात आल्याबद्दल काही गोष्टी ऐकिवात येतात. काही असो मुकर्रब खानाने त्याच्या परतीच्या मार्गावर प्रचितगड आणि मलकापूरची स्वराज्याची पागा ह्या दोन्ही पासून चार हात अंतर ठेऊनच मार्गक्रमण केले हे नक्की. अजून एक प्रश्न असा येऊ शकतो कि जे लोक संगमेश्वरच्या चकमकीमधून निसटले त्यांनी कुठून कुमक आणून सुटकेचे प्रयत्न का केले नाहीत ? पण तसे प्रयत्न केले असते तरी सगळ्यात जवळची कुमक यायची शक्यता होती ती तळकोकण, चिपळूण किंवा घाटावर मलकापूर\विशाळगड इथून - आणि ह्या सगळ्या ठिकाणहून वेगाने मार्गक्रमण करणाऱ्या मुकर्रब खानाच्या तुकडीला गाठायला किमान १ दिवस लागला असता.

असे दिसते कि पन्हाळा मोहिमेतली बरीचशी फौज मुकर्रब खानाने पन्हाळा जवळ ठेवली होती - हे मुद्दामून केले असावे ज्यामुळे पन्हाळा वरच्या मराठा फौजेला संभाजी महाराजांना सोडवायचा मोकाच मिळू नये म्हणून. आंबाघाट चढून कोल्हापूर - कराड मार्गे पकडलेल्या लोकांना बहादूरगडला आणण्यात आले. औरंगजेबाने पण ह्या अटकेची बातमी ऐकून स्वतःचा तळ आधी म्हणलेल्या अकलूजहून हलवून बहादूरगडनजीक आणला होता. पकडलेल्या महारथी लोकांना सुरक्षित बहादूरगड पर्यंत आणायला त्याने हमीदुद्दीन खानाला धाडले होते. त्यामुळे मुकर्रब खानाचा कोल्हापूर ते बहादूरगड हा प्रवास हमीदुद्दीन खानाच्या सैन्याच्या भक्कम संरक्षणाखाली झाला.

ह्या सर्व परिस्थितीमुळे कराड भागातल्या खुल्या मैदानी प्रदेशात मराठा फौजेनी आक्रमण करून सुटकेचे प्रयत्न करणे हि बाब जवळजवळ अशक्यप्राय होऊन बसली.


महाराज बहादूरगडला अटकेत

बहादूरगड हा महाराष्ट्रातल्या पेडगाव तालुक्यातला भीमा नदीच्या काठावर वसलेला एक भुईकोट किल्ला. किल्ला भुईकोट असल्याने आणि जवळपास कुठेच डोंगर-टेकड्या नसल्याने हेतुपुरस्सर संभाजी महाराजांना ह्या किल्ल्यात बंदी म्हणून ठेवण्यात आले. औरंगजेबाची संपूर्ण छावणी आणि मोगल सैन्यसमूद्र बहादूरगडचे संरक्षण करत होता. अशा वेळी महाराजांना इथून सोडवायचे प्रयत्न म्हणजे जाणूनबुजून अजून जीव धोक्यात घालणे असं झालं असतं. काही असे किस्से ऐकिवात आहेत कि खंडो बल्लाळ, रायप्पा ह्यांनी सुटकेचे प्रयत्न करून बघितले - पण ह्या गोष्टींना कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही. मोगल सैन्याचे सोडून इतर लोकांचे जे काही घोडे होते त्यांना बहादूरगड पासून कित्येक मैल लांब रोखले जात होते - त्यांना छावणीत प्रवेश नव्हता. तसेच एकूणच पूर्ण भागात अहोरात्र अतिशय चोख गस्त होती. अशा प्रकारे संभाजी महाराजांना मोगली फौजेला अनुकूल आणि मराठा सैन्याला प्रतिकूल अशा खुल्या सपाट प्रदेशात अडकवून ठेवण्यात औरंजेबाला यश आलं

अशा रीतीने आपणास लक्षात येईल की बरीच कारणं होती जेणेकरून मराठा सैन्याला छत्रपतींची सुटका करायची संधीच मिळाली नाही. सैन्य अनेक आघाड्यांवर लढा देत होतं. सैन्याचे सरनोबत धारातीर्थी पडले आणि छत्रपतींना फितुरीने अटक झाली होती. ह्या अनपेक्षित घटनांमुळे आणि खंबीर नेता न राहिल्यामुळे फौजेत नक्कीच थोडा विस्कळीतपणा आला असणार. आधी म्हणल्याप्रमाणे बहादूरगड व तुळापूर भागातून सुटकेचे प्रयत्न करणे म्हणजे जाणूनबुजून अजून बर्याच जीवांना मृत्यूच्या दरीत ढकलणे ठरले असते. खुल्या प्रदेशातून कोणाचीही सुटका करणे हे फार अवघड कार्य होतं - जवळपास अशक्यच. अजून एक महत्वाची बाब म्हणजे रयतेचं मोगल आक्रमणापासून संरक्षण - ह्या घटनेनंतर मोगलांचे आक्रमण बळावणार होतं आणि त्याच्या विरुद्ध लढणे आणि त्याचा प्रतिकार करणे हे खूप महत्वाचं होतं. ह्या सर्व परिस्थितीच्या परिणामी मराठा सैन्य संभाजी महाराजांचा अत्यंत दुर्दैवी अंत टाळू शकले नाही. पण ह्या तेजस्वी बलिदानानी स्वराज्याला एवढी मोठी प्रेरणा दिली की परिणामी स्वराज्याने उठून पलटवार करत मोगल साम्राज्य थोडे वर्षांनी पार मोडकळीस आणले.

सरदार रायाजी नाईक बांदल व कोयाजी बांदल

सरदार रायाजी नाईक बांदल व कोयाजी बांदल
शाहिस्तेखान म्हणजे सिद्दी जोहर कार्नुलकर नावाचा अजगर सैह्याद्रीच्या वाघाची शिकार करायला पन्हाळ्याला आवळून बसला होता तेंव्हाचे स्वराज्याच्या मुशीत शिरलेले मोगली हात.
त्या हातानी चाकण , पुणे, आणि मावळ लुटायला सुरवात केली सैह्याद्रीच्या वाघावर दोन दोन डुक्करांनी एकावेळी हल्ला केला . निसटायची वेळ आली त्यावेळी सगळ्या बांदल सेनेनी खिंडीत गनीम कापला आणि स्वारी राजगडापर्यंत आली . रायाजी नाईक बांदल व कोयाजी बांदल यांना बोलावण्यात आले . माना ची पहिली समशेर देऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले, पण त्यांच्या डोळ्यात फक्त आणि फक्त सूड दिसत होता कारण एकाचा बाप तर एकाचा वडील भावाच्या राख्ताने खिंड पावन झालेली होती .
त्याला एक कारण होता शाहिस्तेखान . आणि ठरला सूडाचा बेत ठरला , ते मोगली हात कलम करण्याचा बेत ठरला शिस्तेखानावर छाप्पा टाकण्याचा दिलदार , आणि खानदानी बेत ठरला पण शाहिस्ते खानाचे पाप त्याच्या बोटांवर गेले . शिवशाहीने मोगलीच्या हातांची बोटे कलम केली पण या वेळीही सुतक बांदालाच्या वाड्यावरच .......
कोयाजी बांदल जखमी झाले आणि गण गोतामध्ये मृत्यु पावले , शहीद झाले. इतिहासाने याची नोंद कधीच घेतली नाही पण ३५२ वर्षा नंतरही त्यांची समाधी जपून ठेवली आहे .
साभार- करण बांदल

◆सेनापती बहिर्जी नाईक◆

◆सेनापती बहिर्जी नाईक◆
बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं नावछत्रपती शिवरायांनी ज्या स्वराज्याची शपथ त्या स्वराज्याचा सुरुवातीपासुन ते महाराजांच्या निधनापर्यंतचा चा साक्षीदार म्हणजेच नाईक होते रायरेश्वराच्या मंदिरात घेतली
दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. महाराजांनी त्यांच्यातील कसब ओळखली, नाईक स्वराज्यनिर्मीतीच्या कामाला हिरा आहेत हे राज्यांनी ओळखेले आणि तात्काळ त्यांना त्या कामात रुजु करुन घेतले नेहमी आपल्या माणसांतील गुण ओळखुन त्यांना कामे वाटत असत. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला. खात्यात रुजु करुन घेतले.
बहिर्जी नाईक यांचे गुण सांगायचे ठरले तर अंगात स्फुरण आल्याशिवाय राहणार नाही. नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. फ़किर, वासुदेव, कोळि, भिकारी, संत, अगदी कुठलेही वेशांतर करण्यात ते पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातून शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होतं. ह्यातं सर्वात मोठं आश्चर्य हे कि विजापुरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व स्व:त अदिलशहा व बादशहा कडुन ते पक्कि माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच त्यांची बुद्धिमत्ता व चातुर्य दिसुन येतं.
महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तिन ते चार हजार गुप्तहेर असायचे.
ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होतं. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापुर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकिची माहिती देणार्यास कडेलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणुकाही एक भाषाच तयार केली होती.
ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वार्याचे आवाज असे. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचं.
त्याठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत. दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फ़क्त महराजांनाच ओळखायचे-थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहिच अशी सर्वांची समजुत असायची. ते फ़क्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते.
तलवारबाजी-दांडपट्टा चालविण्यात ते माहिर होते.
कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहित होते. कुठल्याही घटणेचा ते खुप बारकाईने विचार करी. शत्रुचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफ़वा पसरवायची असल्यास किंवा शत्रुला चुकिची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फ़क्त शत्रुच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पुर्ण माहीती ते ठेवत.
शिवाजी राजे व शंभु राजे जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला
भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काहि दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पुर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपर्यात लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले. हा एकच प्रसंग परंतु महारांजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणुन त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफजलखानाचा वध, पन्हाळ्यावरुन सुटका, शाईस्ताखाणाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लुट असो प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पुर्ण करत असत.
ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रुची इत्यंभूत माहिती महाराजांना दिली होती.बर्याच वेळा महाराज बहिर्जीनी दिलेल्या सल्यांचा विचार करुन पाऊल टाके. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्ट मंडळाची निर्मीती केली होती त्यात गुप्तहेर खातं तयार करण्यात आलं होतं. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते.
अश्या ह्या बहिर्जी नाईक पासून व त्यांच्या हुशारी पासुन आपण शिकण्यासारखं बरच काहि आहे. हे शक्य झालं नाही तरी नाईकांचे स्वराज्यासाठीचे लाखमोलाचे योगदान विसरु नका.

माहिती संकलन:- गुगल व आँनलाईन ॲप

रंगो बापूजी




रंगो बापूजी गुप्ते ……..1857 च्या बंडाचा मराठी चेहरा जो आपल्या ला कधी इतिहासात शिकवाला नाही ,जे चक्क 14 वर्ष इंग्लंड मध्ये राहिले नि संसदेत भांडले(.1839 ते 1853 मध्ये )
छत्रपती शिवाजी महाराजांशी संबध
दादाजी नरसप्रभू देशपांडे हे शिवरायांचे बालमित्र ,देशपांडे हा त्यांचा हुद्दा होता. मूळ आडनाव गुप्ते. दादाजी दीर्घायुषी होते. त्यामुळे शिवरायांनंतर छत्रपती शंभूराजे आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकीर्दीतही त्यांनी स्वराज्यात सेवा केली. पुढच्या पिढय़ांनीही निष्ठापूर्वक स्वराज्याचीच सेवा केली. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपतचा प्रचंड रणसंग्राम मध्ये दादाजींचे नातू रामाजी कृष्णाजी गुप्ते हेही होते.रामाजींचे पुत्र बापूजी आणि त्यांचे पुत्र रंगो म्हणजेच प्रस्तुत ‘रंगो बापूजी’ .
पूर्वेइतिहास
सातारच्या गादीवरचे शेवटचे छत्रपती महाराज प्रतापसिंह राजे भोसले (सन १७९३ ते सन १८४७) यांच्या दरबारातले रंगो बापूजी एक निष्ठावंत मानकरी होते. या छत्रपती कारकीर्दीचा धब्बा म्हणजे दुसरा बाजीराव या ने पेशववाई बुडवली , मराठी सरदारांच्या भांडायचे शिंदे विरुद्ध होळकर ,होळकर विरुद्ध भोसले ,भोसले विरुद्ध पवार यांचा फायदा इलफिन्स्टिन, रॉबर्ट ग्रँट आदी इंग्रज मुत्सद्यांच्या कावेबाज कारस्थानांच्या उठवला नाही तर नवल एल्फिन्स्टनने पेशवाई बुडवली. रॉबर्ट ग्रँटने छत्रपती प्रतापसिंहांना पदच्युत करून महाराष्ट्रापासून दूर काशीला नेऊन स्थानबद्धतेत ठेवले. १८१८ ला मराठा साम्राज्य संपले दुसरे बाजीराव ला पुणे सोडून बिठुर ला जावे लागले .१८५७ पूर्वी डलहौसी या गव्हर्नर जनरलने आसाम, कूर्ग, सिंध, पंजाब व ब्रह्मदेशातील पेगू हे प्रांत हस्तगत केले होते; गादीचे दत्तक वारस नामंजूर करून सातारा, झाशी, नागपूर, ओर्च्छा, जैतपूर, संबळपूर अशी संस्थाने खालसा केली; त्याच मुद्द्यावर दुसऱ्या बाजीरावाचा दत्तक मुलगा नानासाहेब याचा तनखा बंद केला;
तसे पाहिले तर रॉबर्ट ग्रँट किंवा इतरही इंग्रज हे इंग्लंडमधल्या सत्ताधारी सरकारचे नोकर नव्हते, तर ब्रिटिश सरकारच्या संमतीने हिंदुस्थानशी व्यापार करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’ या एका खासगी कंपनीचे नोकर होते
इंग्लंड ला रवाना
त्यामुळे कंपनीच्या नोकरांनी हिंदुस्थानात केलेल्या अन्याय, अत्याचारांची दाद ब्रिटिश संसदेसमोर लावावी, अशा उद्देशाने छत्रपती प्रतापसिंहांनी रंगो बापूजी या आपल्या विश्वासू मुत्सद्याला लंडनला पाठवले. सन १८४० साली रंगो बापूजी लंडनला गेले. आपल्या राजाची बाजू ब्रिटिश पार्लमेंटसमोर मांडण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. प्रथम दुभाषामार्फत आणि वर्षा-दोन वर्षांत स्वतःच इंग्रजी भाषा आत्मसात करून रंगो बापूजी न्यायासाठी धडपडत राहिले. इकडे सन १८४७ साली छत्रपती प्रतापसिंह स्वर्गवासी झाले. पण रंगो बापूजी परत न येता लंडनमध्येच इंग्रजी सत्ताधीशांचे बंद दरवाजे जिवाच्या आकांताने ठोठावीत राहिले. इंग्रजांनी त्यांचे कौतुक केले. अनेक सज्जन इंग्रज अधिकारी, खासदार त्यांचे मित्र बनले. त्यांनी पार्लमेंटमध्ये रंगो बापूजींची बाजू मांडलीदेखील. पण काहीही झाले नाही. कारण काही करायचेच नाही, असा मुळी निर्णय झालेला होता. अखेर रंगो बापूजी निराश होऊन सन १८५३ साली सातारला परतले. इंग्रजी राज्य कसे चालते, हे तेरा-चौदा वर्षे सतत पाहून अनुभवून रंगो बापूजी परतले होते.
इंग्लंड मधील त्यांचे visiting card
1857 चे बंड आणि बेपत्ता
त्यामुळे इंग्रजी राज्य उलथवून टाकण्याच्या प्रयत्नात असणाऱया क्रांतिकारकांनी अर्थातच रंगो बापूजींची भेट घेतली. रंगो बापूजी गुप्तपणे उत्तर हिंदुस्थानात गेले. ब्रह्मावर्त ऊर्फ बिठूर या ठिकाणी नानासाहेब धोंडोपंत पेशवे यांची नि त्यांची भेट झाली. रंगो बापूजी त्यांना म्हणाले, ‘‘माझ्या मावळातले हजार गडी नि माझे दोन पुतणे, तुमचा निरोप येताच, इकडे रवाना करतो. उत्तरेकडे पंचारतीचा गजर झालेला ऐकू येताच दक्षिणेत मी नौबतीवर टिपरी हाणतो.’’आणि मग सन १८५७ ची प्रचंड क्रांती झाली. ररअगो बापुनी सातारा पुणे सांगली कोल्हापूर बेळगाव इथे बंड चा सर्वत्र डंका केला. रंगो बापूजींचे दोन पुतणे दिल्लीच्या तुंबळ संग्रामात प्रत्यक्ष लढले. दक्षिणेत मात्र क्रांतीला अनुकूल दान पडले नाही. उत्तरेतही इंग्रजांनी चिवटपणे लढून फासा पलटवला. रंगो बापूजींच्या मुलाला आणि काही सोबत्यांना पकडून फाशी देण्यात आले. खुद्द रंगो बापूजी मात्र कुठे गेले हे इंग्रजांना जंग जंग पछाडूनही कळले नाही. आजही इतिहासाला ते ठाऊक नाही.
छत्रपती शाहू महाराजांनी प्रबोधनकारठाकरे याना रंगो बापू यांचे पुस्तक लिहायला सांगितले होते नि तसे वचन घेतले होतें.मात्र ते पुस्तक पूर्ण व्हायला 1948 उजाडले.
ते हे पुस्तक
रंगो बापुनी इंग्लंड मध्ये वास्तव्य मध्ये अतिशय हलखाची दिवस काढले…एकतर पैसे संपलेला आणि हाती यश नाही…कैक वेळ ते उपाशी राहून दिवस काढले.
1]रंगो बापूजी प्रबोधनकार तथाकारे

Tuesday 10 March 2020

वारणेचा तह

वारणेचा तह
शाहू महाराज स्वराज्यात आले तेव्हा, ताराबाई साहेब आणि संभाजी यांच्याशी शाहू महाराजांचे जुळले नाही. शाहू महाराजांना सहज जे मिळायला हवं होतं ते त्यांना स्वकीयांकडून कसे मिळाले हे सर्व जाणतात. तरी संभाजीने शाहू विरोधात जी काही परिस्तिथी उभी केली. त्यातून शाहू महाराज बाहेर आले. संभाजीचा ही हक्क स्वराज्यावर आहे हे शाहू महाराज जाणून होते. कस ही झालं तरी तरी तो आपला भाऊ हे ते जाणून होते.पालखेडवर निजामाचा पाडाव होऊन संभाजीला एकटं पडल्यागत झालं, आणि पन्हाळ्यावर परत येऊन कृष्णाजी परशुराम प्रतिनिधींचे सल्ल्याने जम बसवू लागला असता शाहूने १७३० च्या मार्चात त्यावर स्वारी करून संभाजीचा पराभव केला. ता. ८ ऑगस्ट स. १७३० रोजी शाहूराजे याजकडे जाऊन तहाची बोलणी करण्याची आज्ञा संभाजीने प्रधान नीलकंठ त्रिंबकास केली.
सातारचे शाहू छत्रपती व कोल्हापूरचे संभाजी महाराज यांच्या दरम्यान शके १६५३च्या चैत्र वद्य २ स जो तह नामा झाला त्यातील कलमे अशी होती.
तहनामा चिरंजीव राजश्री संभाजीराजे यांसी प्रति राजश्री शाहूराजे यांनी लिहून दिल्हा सुरूसन इहिदे सलासीन मया व अलफ फसली ११४० छ १६ साबान विरोधीकृत सवंत्सरे चैत्र वद्य २ स बितपसील
🔹कलम १ : इलाखा वारून महाल तहत संगम दक्षिण तीर कुल दुतर्फा मुलूख दरोबस्त देखील ठाणी व किल्ले तुम्हास दिले असत.
🔹कलम २ : तुंगभद्रे पासून तहत रामेश्वर देखील संस्थाने निमे आम्हाकडे ठेवून निमे तुम्हाकडे करार करून दिली असत.
🔹कलम ३ : किल्ले कोपळ तुम्हाकडे दिला त्याचा मोबदला तुम्ही रत्नागिरी आम्हाकडे दिला.
🔹कलम ४ : वडगावचे ठाणे ( किल्ला ) पाडून टाकावे.
🔹कलम ५ : तुम्हाशी जे वैर करतील त्यांचे पारिपत्य आम्ही करावे. आम्हाशी वैर करतील त्याचे पारिपत्य तुम्ही करावे. तुम्ही आम्ही एक विचारे राज्याभिवृद्धी करावी.
🔹कलम ६ : वारणेच्या व कृष्णेच्या संगमापासून दक्षिणतीर तहत निवृत्तीसंगम तुंगभद्रेपावेतो दरोबस्त देखील गड ठाणी तुम्हाकडे दिली असत.
🔹कलम ७ : कोकणात साळशी पलीकडे तहत पंचमहाल अकोले पावेतो दरोबस्त तुम्हाकडे दिली असत.
🔹कलम ८ : इकडील चाकर तुम्ही ठेवू नये. तुम्हाकडील चाकर आम्ही ठेवू नये.
🔹कलम ९ : मिरज प्रांत: विजापूरप्रांतीची ठाणी देखील-अथणी,तासगाव वर्गेरे तुम्ही आमचे स्वाधीन करावी.
एकूण नऊ कलमे करार करून तहनामा लिहून दिल्हा असे. सदरहू प्रमाणे आम्ही चालू. यास अंतर होणार नाही.
अशाने वारणेच्या तहाने कोल्हापूरचे राज्य निर्माण झाले. म्हणूनच वारणेचा तह हा स्वराज्यातला महत्वाचा तह मानला जातो.
संदर्भ : इतिहासमंजरी : दत्तात्रय विष्णु आपटे
: मराठी रियासत : गोविंद सखाराम सरदेसाई

होळकर आणि शिंदे सरदार यांचे आपसात वितुष्ट

होळकर आणि शिंदे सरदार यांचे आपसात वितुष्ट कोणत्या कारणांमुळे आले होते? त्यांच्या एकमेकांशी लढाया झाल्यात का?
saambhar :Ashish Mali, रासायनिक अभियंता

मराठेशाहीची खंदे समर्थक महादजी शिंदे , तुकोजी होळकर , अहिल्याबाई १७९४-१७९६ या दोन ते तीन वर्षात मरण पावले आणि तिथून होळकर शिंदे ची भांडणे पूर्ण टोकावर जाईल इतकी वाढली, आणि मराठेशाहीला शेवटची घरघर लागली.
नाना फडणवीस च्या मृत्यूनंतर (१८००) दुसरा बाजीराव कडे सत्ता आली . ते दौलतराव शिंदे च्या पूर्ण आहारी गेले आणि विठोजी होळकर ला हत्ती च्या पायी दिले . यशवंतराव होळकर नंतर पुणे लुटले . यशवंतरवानी शिंदे -होळकर एकत्र यावे म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली . शिंदे होळकर मध्ये नावापुरती दिलजमाई झाली पण युद्धात नाही . नंतर इंग्रजांशी स्वतंत्र करार करून नाममात्र सरदार म्हणून आणि मोठ्या हवेली बांधून इंग्रजांचे आयुष्याभर दास झाले .
📷
मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे हे बाजीरावचे दोन्ही खास सरदार.होळकरांना माहेश्वरी आणि शिंदे ना ग्वाल्हेर ला कायमस्वरूपी ठेवून स्वराज्याच मुघल वर, आणि राजस्थान वर कायमच वचक ठेवला.शिंदे होळकर आणि पवार याना सैन्याचा खर्च भागवण्यासाठी मध्य प्रदेश मधील सुपीक माळवा हा प्रांत देण्यात आला . उदाजी पवार यांनी सवाई माधवसिंग च्या युद्धात पेशव्याचे एक सरदार कुसजी गणेश याना मदत न करता शिंदे होळकर या विर्रुद्ध सवाई माधवसिंग ला मदत केल्यामुळे , पवार ना धार चा भाग देण्यात आला जो आकाराने कमी होता .
मराठयानी मुघल द्वारे, राजपूत द्वारे, राजस्थान, हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बंगाल पर्यंतच चौथाईचा हक्क आपल्या कडे ठेवला.आणि होळकरांची आणि शिंदे नची दुहीची बीजे इथेच चौथी च्य हक्कात रोवली आहे.१७३८ भोपाळच्या युद्ध निझामाला हरवल्यावर नंतरमाळवा चे हक्क शिंदे होळकर या कडे आले
पाहिले बाजीराव 1740 ला आणि राणोजी शिंदें 1745 ला मरण पावले.नंतर जयाजीआपा कडे ग्वाल्हेरच्या कारभार आला.
  1. राणोजी शिंदे आणि मल्हार यांच्यात प्रथम फरक १७३५ मध्ये जेव्हा राणोजी महिन्याभरात चिमणजी आप्पा यांना दोनदा तक्रार केलेली कि मल्हारराव होळकर मैदानात उशीर केला होता . मल्हारची सुस्तपणा मुळे सैन्याचा खर्च वाढत आहे .
  2. जयाप्पा शिंदे ना मल्हार राव होळकर बरोबर जास्त पटत नसल्यामुळे आघाड्या करून युद्ध करताना ते नाराज असायचे . १९५५ ला नागौर च्या युद्धात राठोड कडून जयप्पा याना वीर मरण आले कुंभेरीच्या वेढ्यात मल्हारराव यांचा मुलाचा आणि अहिल्याबाई होळकर यांचा पती खंडेराव हे एका बंदुकीच्या गोळीला शिकारी पडले त्यामुळे जयाप्पाच्या खुनात होळकर वर संशयीची सुई आणि खंडेराव याचा मृत्यनंतर होळकर याना शिंदे विषयी शंका आली.
  3. जयाप्पा शिंदे गेल्यावर दत्ताजीने जयाप्पाच्या मुलाला म्हणजे , जनकोजी शिंदे ला गादीवर बसवले . भोळा भाभडे दत्तोजी शिंदे पेशवे ची प्रत्येक आज्ञा शिरसवंध मानून उत्तर भारतात आणि सध्याच्या पाकिस्तान मध्ये वचक निर्माण केला आणि मल्हारराव ला ईर्षा निर्माण झाली . सर्व शत्रुंना संपवू नका नाहीतर पेशवे आपल्याला धोतरे धुवायला ठेवतील असा अनाहूत सल्ला मल्हारराव यांनी दत्ताजी ना दिला, जो दत्ताजी ने झिडकारला .
  4. मल्हारराव यांनी नजीब ला मानसपुत्र मानला आणि बुराडीच्या युद्धात अब्दाली आणि नजीबद्वारे दत्ताजी शिंदे (राणोजींचा मुलगा ) मारला गेला . त्यात होळकर यांनी वेळकाढूपणा केल्याचे आरोप जयाप्पा शिंदे यांचा मुलाने म्हणजे जनकोजी शिंदे ने केले .
  5. पानिपतात अख्खा शिंदे घराणे संपले फक्त महादजी निघून गेले ते एक पाय अधू होऊन . पण त्यांच्या मनात मल्हारराव यांच्या विषयी अढी राहिली . पुढे मल्हारराव १७६६ ला निधन झाले . पण महादजी नि अहिल्याबाई ला नेहमी योग्य ते मान दिला . तुकोजी होळकर आणि महादजी मध्य विशेष सख्य नसले तरी पानिपतच्या युद्धामुळे त्यांनी दोघांनी समंजस पण दाखवला .
  6. पुढे अहिल्याबाई यांचा आदर जरी महादजी शिंदे यांनी ठेवला पण तुकोजी होळकर आणि महादजी त्या मध्ये इतकसे पटत नसले तरी पानिपतच्या युद्धा नंतर ओढवलेल्या गंभीर प्रश्नासाठी ते एकत्र आले आणि राहिले.
  7. मराठ्या च्या राज्याला घरघर लागली ते दुसऱ्या बाजीराव च्या कारभाराची आणि शिंदे होळकर वादामुळे.त्यावेळी दौलतराव शिंदे (तुकोजी होळकर चा मुलगा) आणि होळकर कुटुंब मध्ये वादविवाद भांडण चालू झाले.
  8. दौलतराव शिंदे ची बायको बायजीबाई शिंदे अतिशय सुंदर .दौलतराव हा तिचे ऐकायचा.ती घाटगे कुटुंबातील आणि त्यामुळे दौलतराव सासर्याचा शब्द ठेवायचा नाही.दुसरा बाजीराव ने नंतर होळकर च्या वर्ष साठी भांडणे लावून दिली.त्यात दुसरा बाजीराव ने विठोजी होळकर ला हत्तीच्या पायाखाली दिले.त्यावेळी यशवंतराव ने पुणे जळाले.यशवंतराव ला इंग्रनज सुद्धा घाबरून असल्याचा .एवढा पार यशवंतराव ने दौलतराव शि तह करण्याचा लरायत्न केला आणि इंग्रज विरुध्द युद्ध पुकारण्याचा .पण तो अयशस्वी झाला.
  9. ४ जुलै १८०१ मध्ये यशवंतराव होळकरांनी उज्जैन मध्ये शिंदे वर हल्ला केला . त्यात शिंदे चे सेनापती जॉन hessing होते . त्यात शिंदे नि ३००० सैनिक गमावले . नंतर पुण्यामध्ये १८०२ होळकरांनी पुन्हा शिंदे ना हरवले त्या नंतर संधीचा प्रयत्न केला .दुसऱ्या मल्हारराव चा मुलगा सोडून द्या काशीराव च्या जागेवर खंडेराव च्या मुलाला मान्यता द्या . अशा अतिशय साधारण मागण्या होत्या . यशवंतरावानी नगर जळगाव नाशिक सिन्नर कुरकुंभ जिंकले जवळपास सारे मराठा राज्य त्याकडे गेले . त्यावेळी हडपसर जवळ शिंदे आणि पेशवा यांच्या फौजेला हरवले . त्यांनतर दुसरा बाजीराव पळून गेला . यशवंतरावीनं त्याला पुण्यामध्ये तरी ते फिरकले नाही . त्यांनतर यशवंतराव नि कोकण घेतला . आणि तिकडे दुसरा बाजीराव यांनी मराठेशाहीतील सर्वात ऐतिहासिक चूक केली . इंग्रज बरोबर वसई चा तह केला.

मुरार जगदेव

मुरार जगदेव
saambhar :शुभम् सरनाईक (Shubham Sarnaik),

मुरारपंडित हा मूळचा धोम गावचा ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण. हा विजापूरच्या आदिलशाही दरबारात सुरुवातीला जहागीरदार होता व पुढे १६२८-१६३५ च्या दरम्यान हा विजापूर सल्तनतीचा वजीर झाला.
१६२७-१६२८ मध्ये मुघल शासक शहाजहाँचा सरदार व सासरा आसफखान (नूरजहाँचा भाऊ , अर्जुमंद बानू उर्फ मुमताजमहल बेगमचा पिता) याला दख्खनवर पाठवले तेव्हा दौलताबादच्या वजीर फत्तेखान याने निजामशाहाला ठार करून मुघलांचा आश्रय घेतल्याने आसफखान विजापूरच्या दिशेने आला. तेव्हा महंमद आदिलशाहने त्याच्या बंदोबस्तासाठी मुरारपंतास पाठवले व मुरारपंताने आसफखानाचा खरपूस समाचार घेतला.
मुरारपंत इथेच थांबला नाही व त्याने थेट निजामशाही प्रदेशातील परिंंडा किल्ल्यावर धडक मारली व तेथील दोन इतिहास प्रसिद्ध तोफा मुलूख-ए-मैदान व कडकबीजली/धूळधाण या घेऊन तो विजापूरला परतलायला निघाला. रस्त्यात ही मुलूख-ए-मैदान तोफ भीमेच्या पात्रात बुडली पण मुरारपंताने द्राविडी प्राणायाम करून ती १४ फूट लांब व ४० खंडी वजनाची अक्राळविक्राळ तोफ पुन्हा वर काढली व २२/०८/१६३२ रोजी विजापुरास आणली पण धूळधाण मात्र बुडाली ती पुन्हा वर काढता आली नाही.
निजमशाहिवर शहाजीराजे भोसले यांनी एका अर्भकास गादीवर बसवून जेव्हा कारभार सुरू केला व आसफखान त्यांच्यावर चालून आलेला बघून मुरारपंत व रणदुल्लाखान निजामशाहिच्या मदतीला व दख्खनच्या रक्षणाला धावून गेले व त्यांनी मुघलांना पुन्हा हुसकावून लावले.
महंमद आदिलशाहाच्या हुकुमावरून मुरारपंत व रायाराव या सरदाराने १६२९ मध्ये शहाजीराज्यांची जहागिरी पुणे शहर जाळून बेचिराख केले. पुढे जाऊन त्याने जवळच पंताने दौलतमंगल किंवा मंगळगड हा किल्ला उभारला.
मुरारपंडित मोठाच धार्मिक व्यक्ती होता , त्याने भीमा-इंद्रायणी नदीच्या संगमरवरील नांगरगाव येथे संगमेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करून स्वतःची स्वर्णतुला करून घेतली. या प्रसंगी खुद्द शहाजीराजे भोसले उपस्थित होते व त्यांच्याच कल्पनेने भीमेच्या पात्रात एका होडीत हत्तीस बसवून जेवढा भाग पाण्यात बुडाला तेवढी खूण करून हत्तीस उतरवून तेथे दगडधोंडे टाकून त्याचे वजन करवून तेवढ्या वजनाचे दान मुरारपंताने केले. यानंतर उभयतांनी या गावाचे नाव तुळापूर केले जेथे १६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली.

मुरारपंडित व शहाजीराजे भोसले यांचे संबंध अतिशय चांगले होते व त्यामुळेच शहाजीराज्यांना आदिलशाहीत स्थान मिळाले व निजामशाही चालवण्यासाठी वारंवार विजापूरहून मदतही.
पण मुस्तफाखान व खवासखास यासारख्या काही आदिलशाही सरदारांना मुरारपंतासारख्या हिंदू व्यक्तीचे वाढते महत्व खटकत होते व त्यामुळे त्यांनी महंमद आदिलशाहाचे कान भरून मुरारपंताची हत्तीवर कैद करवून विजापूर शहरात धिंड काढली व शेवटी १६३५ मध्ये त्याचा शिरच्छेद करविला.
स्रोत : गो. स. सरदेसाई लिखित मुसलमानी रियासत भाग एक
चित्रस्रोत : गुगलImage result for मुरार जगदेव

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचे पाईक सेनापती कुडतोजी गुजर उर्फ प्रतापराव गुजर कुटुंबांने मराठा साम्राज्यासाठी दिलेले असीम बलिदान



छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचे पाईक सेनापती कुडतोजी गुजर उर्फ प्रतापराव गुजर कुटुंबांने मराठा साम्राज्यासाठी दिलेले असीम बलिदान
या महाराष्ट्र साठी ,हिंदू धर्मासाठी फक्त शिवाजी महाराजांचे कुटुंब खर्ची नाही पडले ,आणखी एक कुटुंबाने स्वतः कर्ता पुरुष (सेनापती ), आणि त्यांच्या चार मुलांनी आपले आयुष्य पणाला लावले आणि संपवले पण आज त्यांचा साधा उल्लेख ही कुठे कोण करताना दिसत नाही
दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही
ते म्हणजे स्वराज्याचे पाईक सेनापती कुडतोजी गुजर उर्फ प्रतापराव गुजर !
गुजर कुटुंबाने आपले सर्व काही या महाराष्ट्राच्या साठी असीम त्याग केला याची कुठेच तोड नाही ,या गुजर कुटुंबाची तेवढीच वाताहात झाली जेवढी शिवाजी महाराजांच्या कुटुंबाची पण झाली.
कुडतोजी गुजर उर्फ प्रताप राव गुजर स्वराज्याचे सेनापती, असंख्य लढाया मध्ये मराठ्यांना विजय मिळवून दिला.वेडात वीर दौडले सात मधील हे पहिले.नेसरी च्या मैदानात आज पण यांची समाधी डौलाने उभी आहे.पण त्यांच्या नंतर त्यांच्या कुटुंबांची शिवाजी राजांच्या कुटुंबसरखे हालहाल झाले .
प्रतापराव गुजर यांना चार अपत्य
  1. पहिलं अपत्य जानकीबाई जी प्रतापरावांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी मृत्यूपूर्वी 15 दिवस अगोदर राजाराम महाराज बरोबर लग्न लावले.
1689 मध्ये संभाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि रायगडला इतिहादखान उर्फ झुल्फिकारखान चा वेढा पडला .झुल्फिकारखान च्या वेढ्यातून राजाराम महाराज आणि त्यांच्या तीन राण्या ताराबाई राजसबाई अंबिकाबाई शिवाय प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ संताजी धनाजी सर्व आरामात निसटून गेले .मात्र प्रतापराव गुर्जर यांची कन्या आणि राजाराम महाराजांची पहिली राणी जानकीबाई ह्या येसूबाई आणि शाहू महाराजा बरोबर मुघलांच्या तावडीत सापडले.तिथून जानकीबाई चा मुघल कैदेतच अंत झाला.कारण 1719 ला बाळाजी पेशवानी येसूबाई ला सोडवले त्यात त्यांचे नाव नव्हते.
औरंगझेबाने शाहू महाराजांना आणि येसूबाई आणि जानकीबाई ला कैदेत ठेवले, मात्र औरंग्याची मुलगी झेबुनिस्सा ने मात्र त्यांची काळजी घेतली.औरंग्याने अनेकदा शाहूमहाराजना मुस्लिम होण्याची सांगितले त्यावेळी झेबुनिस्सा ते टाळले. छत्रपती संभाजी महाराजांचा मुलाला युवराज शिवाजी ऊर्फ शाहू महाराजांच्या धर्मांतर करण्यासाठी बादशहा औरंगजेब यांना सन 1700साल आदेश दिला दिले तेव्हा पण महाराणी येसुबाई यांनी ज्योतोजी आणि झेबुनिस्सा द्वारे बादशहा शी अप्रत्यक्ष तह केला ज्यात औरंगजेब यांना एक अट वर शाहू महाराजांच्या धर्मांतर रहीत किंवा रद्द केले" तो बोलला...
मी निश्चित केला तो मोडल्यास माझ्या शब्दाची किंमत जाते, बादशहाचा उच्चार लटका पडता नये, तर एक युवराज शाहु ऐवजी दुसरे दोन प्रसिद्ध पुरुष मुसलमान होत असतील तर मी शाहुपुरता आपला हुकुम मागे घेतो।।
2) दुसरा आणि तिसरा अपत्य खंडेराव गुजर आणि जगजीवन गुजर
सर सेनापती प्रतापराव गुजर यांचे दोन मुले खंडेराव गुजर व जगजीवन गुजर आता आपल्या राजाच्या (शाहू) बचावासाठी आले, 16 मे 1700 मध्ये मोहरम च्या मुहूर्तावर मुसलमान करून त्याचा नावे अब्दुर्रहीम व अब्दुरेहीमान अशी ठेवली खंडोजीचा हा उपकार शाहु राजानी कधी विसरले नाही . (जे लोक संभाजी महाराज आणि राजाराम महाराज भावा संबंधाविषयी बोलतात त्यांनीबलक्षात घायवे की प्रतापराव गुजर यांचे कुटुंब जास्त राजाराम महाराजांना जवळ होते ,कारण जानकीबाई ही त्यांची सख्खी बहीण राजाराम महाराजांची राणी होती)
" आमचा मामा आम्हाबदल मुसलमान जाहला" असे उल्लेख समकालीन शाहू महाराजांच्या कागदपत्रे मधुन दिसते
खंडेराव आणि जगजीवन गुजर याना हिंदू धर्म मध्ये घ्यायचे प्रयत्न झाले पण खंडेराव यांचे त्यांच्या मुस्लिम बायको वर प्रेम होते आणि तिला पण हिंदू धर्मात घ्या असा खंडेराव यांचा हट्ट होता. मात्र तत्कालीन ब्राह्मणांना ते मंजूर नव्हते आणि परिस्थितीचा वरवंटा या ना त्या कारणाने गुजर कुटुंबावर फिरताच राहिला.
3)चौथा अपत्य मुलगा सिधोजी गुजर
हे धाकटे अपत्य मात्र मराठांच्या आरमार आणि नंतर औरंगझेबविरुद्ध यांनी प्रचंड कामगिरी केली.कान्होजी आंग्रे आधी सिधोजी गुजर यांचे सहाय्यक होते.1690 नंतर कैक वर्ष मराठ्यांचे आरमार मधून त्यांनी कोकण पट्टीवर मराठ्यांचा धाक ठेवला.त्यांना सरखेल ही पदवी राजाराम महाराजांनी दिली , मात्र त्यांचा ही अंत लवकर झाला आणि पुढी सरखेल कान्होजी आंग्रे झाले.(बहुतेक १६९८)
4)पानिपतच्या युद्धात सुद्धा यांचे अनेक वीर कामी आले.
5) 1850 नंतर रघुनाथ गुजर हे त्यांच्या वंशजांचे एक जण त्याकाळी तत्कालीन सातारा चे शिवाजी महाराज यांचे वारस प्रतापसिंग याना मदत केली.आजही सज्जनगड जवळ कामठी गावात प्रतापरावांचे वंशनज भाऊसाहेब हैबतराव गुजर राहतात आणि त्यांची मुस्लिम वंशनज अमिनसाहेब देशमुख पण राहतात.आता कामाघी गाव धारणात गेले
6) वेडात मराठे वीर दौडले सात महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश असताना युद्धात मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला सह्याद्री मध्ये घाईला आणले . बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी बहलोलखान च्या गोड बोलण्याला पाघळला . प्रतापरावांनी त्याला माफी दिली तो जीव वाचवून गेला.शिवाजी महाराजांना खबर पोहोचली,“प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” तेंव्हा राजांनी प्रतापरावाना खडसावले " सला काय निमित्य केला " बेहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. २४फेब्रुवारी १६७४ हाच तो दिवस. नेसरी जवळ बेहलोलखान होता हेराला त्यांनी सैन्याकडे पाठवले . आणि सैन्याला स्वारीचे हुकूम दिला. पण सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला. हे सात शिपायी म्हणजे प्रतापराव गुजर,विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव विठ्ठल, पिळाजी अत्रे,कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल व विठोजी होते .
काहींना तो आत्मघात वाटेल पण केवळ मृत्यूवर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक "पराक्रम पर्व" आहे, जे इतिहासात कुठेच सापडणार नाही . प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार मरण पावले. स्वराज्याची खूप मोठी नुकसान झाली.
शिवाजी महाराज आणि कडतोजी ची भेट झाली कशी?
कडतोजी गुजर हे आपल्याच गावातून मुघलविरुद्ध लढा द्यायचे , एके दिवशी मुघलांच्या खजिन्यावर दोन मराठा वाघांनी एकदम धाड टाकली, शिकार तर मारली पण आता हक्काची वेळ आली, तेंव्हा यातील एक वाघाने म्हणजे शिवाजी महाराजांनी दुसऱ्या वाघाला म्हणजे कडतोजी ला स्वराज्याची संकल्पना सांगितली आणि स्वराज्यात सामील करून घेतले.[1]

वेडात मराठे वीर दौडले सात

वेडात मराठे वीर दौडले सात

प्रतापराव गुजर यांचे खरे नाव कुडतोजी गुजर असे होत.शिवाजी महाराजांकडून त्यांना ‘प्रतापराव’ अशी पदवी मिळाली होती.
प्रतापराव गुजर .........

कुडतोजी नावाच्या स्वाभिमानी मराठ्याने मोघलाई सहन न झाल्याने मोगलांशी आपल्या गावातून लढा देण्याचे ठरवले. प्रामुख्याने मुघल सैनिकांना विरोध करणे. गावातील स्त्रिया आणि गायींचे रक्षण करणे असा त्याचा कार्यक्रम असे.एकदा मोगलांच्या खजिन्यावर एकाच वेळी दोन मराठी वाघांनी झेप घेतली शिकार तर झाली मात्र शिकारीवर हक्क कुणाचा यावर हातघाईवर आलेली बाब शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार सांगून मैत्रीत परावर्तित केली. हे दोन वाघ म्हणजे दस्तूरखुद्द शिवाजी महाराज आणि कडतोजी गुजर यावेळी शिवाजी महाराजांनी कडतोजीला स्वराज्याचा विचार दिला आणि कडतोजींनी आपलं इमान शिवाजींना अर्पण केलं. पुढे कडतोजी स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच सरनौबत झाले. त्यांच्या पराक्रमाला साजेसे नाव (किताब) देऊन महाराजांनी त्यांचे प्रतापराव गुजर केले.बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले.महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला.मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.शिवाजी महाराजांना खबर पोहोचली,“प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका.त्याकाळी मावळ्यांचा शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल.महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न कडतोजींना दिवसरात्र सातावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले.सर्वत्र जासूद पाठवले.माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम .त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही.अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले.काही मैल गेल्या नंतर

त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे?तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही.त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला. हे सात शिपायी म्हणजे प्रतापराव गुजर,विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव विठ्ठल, पिळाजी अत्रे,कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल व विठोजी होत. अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात.यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही ! प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळल नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे. प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार मरण पावले. महाराजांना अतीव दु:ख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली.मात्र शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं. पराक्रमाला एक नवं कोंदण मिळालं होतं.वेडात मराठे हे गीत पहिल्यांदा ऐकल्यावर अंगावर शहारा आला होता. हा काय प्रकार आहे याची कल्पना नव्हती. मग माग काढायला सुरवात केली. काही पुस्तके मिळवली आणि अधाश्यासारखी वाचून काढली. अनेकवर्षांपुर्वी वाचलेली ही शौर्य

कथा वर दिली आहे.प्रतापरावांसारख्या वरिष्ठ योध्याने असं वागायला नको होतं असं सर्वाचंच मत.पण प्रतापरावांची बनावट आणि शिवाजीमहाराजाचे शब्द यांचा परिपाक म्हणजे त्यांची ती कृती असावी असं मला वाटतं .महाराजांनी हरतऱ्हेने पारखून घेतलेले प्रतापराव मूर्ख असतील असं मला वाटत नाही. मुळात त्याकाळी शिवाजी महाराज होणे हा एक चमत्कार आहे असं म्हणायला अडचण वाटत नाही. एक उदाहरण घेऊया. लढाईत एकतर मारायचं किंवा मरायचं असे दोनच पर्याय मराठी शिपाई गड्याजवळ असायचे. तेथे शिवाजी महाराजांनी गनीमीकावा आणि यशस्वी माघार यांसारखे प्रकार रुजवले.येथे शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता दिसून येते.महाराज कित्येकदा मराठ्यांना राजपुतांचा दाखला देत असत आणि म्हणत की राजपुत मरतात किंवा मारतात पण जिंकत नाहीत. रणात यश महत्त्वाचं आहे. माघार– पुढाकार नाही. वेळ पडली तर माघार घ्या पण लढाई जिंका. असं महाराजांचं तत्त्व. मात्र प्रत्येक मराठा शिपाईगडी हे पचवू शकला नव्हता. कदाचित आपले प्रतापराव सुद्धा याच प्रकारातले.पण त्यांचे शौर्य आणि पराक्रम त्यामुळे कुठेच झाकोळला गेला नाही. प्रतापराव आणि त्या

सहा वीरांना मानाचा मुजरा...!!

किल्ले रायगडावर असणाऱ्या लोहस्तंभाचे रहस्य

रायगड किल्ला वरील लोहस्तंभ.
फोटो स्रोत : Google
रायगड किल्ल्यावर एक लोहस्तंभ आहे .त्या लोहस्तंभा बद्दल अनेकांची वेगवेगळी मते आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की शिवाजी महाराजांनी जो हत्ती आणला होता त्या हत्तीला बांधन्यासाठी तो लोहस्तंभ उभारला होता .पण हत्तीला कधीही लोहस्तंभाला बांधले जात नाही.त्यामुळे तो हत्तीसाठी नव्हता आसे वाटते. काही लोक ही सुर्य घटी आहे म्हणतात.सुर्य घटी म्हणजे त्या वेळीचे घड्याळ.त्या लोहस्तंभाची सावली वरून वेळेचा आदाज लावला जायाचा .पण ज्या ठिकाणी तो लोहस्तंभ उभा केला आहे, तेथे ऊनपडण्यासाठी बराच वेळ जातु कारण समोर बाजार पेटेची भित आहे.त्यामुळे हा स्तंभ सुर्य घटी ही नसावी.सुर्य घटीजर उभी करायाची आसेल तर ती होळीच्या माळा वर केली आसते कारण तेथे कायम ऊन येथे त्या ठिकाणी सुर्य घटी उभा केली आसती.आणि जर ती सुर्य घठी आसते तर त्याला कढी वर बसवली गेली नसते.
काही लोकांनचे म्हणूने आहे की तो मल्लखांब आहे पण काही जन म्हणतात मल्लखांब शिवकाळात खेळला जात नव्हता . तो यादव काळात नामशेष झाला होता त्याची पुनर्स्थापना 1785 ला बाळंभट देवधर ह्यांनी पुण्यात दुसऱ्या बाजीरावाच्या प्रोत्साहनात केली .तर काही चे म्हणने आहे की शिवकाळात मल्लखांब नव्हते कारण कान्होजी आंग्रे यांनी जहाजावर व्यायाम करता यावा म्हणून मल्लखांब शोधला आसे म्हणतात.आणि मल्लखांब लोखंडी कधीच नसतो त्यामुळे तो मल्लखांब ही नव्हता. आसे म्हणता येवू शकते.
तर काही वेक्ती म्हणातात कि तो महाराणीसाहेब पुतळाबाई ह्यांची सती गेल्याची यादगीर म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी हा खांब उभारला आणि म्हणून त्यास सतीचा खांब असे नाव पडले . छावा कादंबरी मध्ये देखील असाच काहीसा उल्लेख आढळतो . पण सती गेल्याची यादगीर म्हणून कोणी कधी खांब उभा करण्याचे कुठेच पाहण्यात आलं नाही . त्यामुळे हा सतीचा खाब नसावा आसे वाटते.
आनेक लोकांनचे म्हणने आहे कि त्या जागी फटक्यांची शिक्षा देण्यासाठी तो लोहस्तभ उभारला आहे. व हा आदाज सर्वात योग्य वाटतो.कारण त्या लोहस्तभाला जी कढी केलेली आहे. कैद्यांला शिक्षा देताना त्याचे हात त्या कढीला बाधून त्याला फटक्यांची शिक्षा दिली जात आसावी. त्यामुळे त्या लोहस्तभाचा वापर फटक्यांची शिक्षाच देण्यासाठी केला जात आसवा.

मराठयांनी सर्वप्रथम दिल्लीवर भगवा केव्हा फडकावला? आणि दिल्लीमध्ये मराठयांच्या काही आठवणी






saambhar :-Ashish Mali, रासायनिक अभियंता

दैव नेते आणि कर्म नेते , शिवाजी महाराजांनी संधी नसताना संधी निर्माण केलाय पण नंतर मराठ्यांनी कैक वेळा संधी आल्या होत्या त्याचे उद्देश साधले नाही .
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज नन्तर चा मराठ्यांच्या इतिहासाची ओळख म्हणजे “लढाईत जिंकले पण तहात हरले” अशीच आहे. आपल्या पराक्रमाच्या जोरावर मोठमोठी युद्धे जिंकली पण त्यानंतर करावा लागणारा धूर्तपणा नसल्यामुळे मराठी माणूस एकहाती अख्या भारतावर राज्य करू शकला नाही
राजाराम महाराजांनि मराठ्यांनी दिल्ली जिंकावी अशी इच्छा हनमंतराव घोरपडे ह्या सरदाराला लिहिलेल्या पत्रात सांगितली होती .
पण दुर्दैवाने मराठ्यांनी एक नाही तर पाचदा दिल्लीवर भगवा आणि जरी पटका फडकावणाच्या पाच संधी घालवल्या. मुघल सत्ता कमजोर झाल्याने सत्तेत आता धर्माला महत्व कमी झाले होते त्यामुळे धर्माच्या आधारावर हिंदूची तेंव्हाही एकत्र आले नाही आणि आता पण एकत्र येत नाही .
पण दिल्लीच्या बसण्यापेक्षा तलवारीच्या जोरावर पराक्रम गाजवावे. चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करावी. ज्याला जमेल त्याने तशी खंडणी वसूल करावी. असा विचित्र मार्ग पत्करला. रजपूत ,शीख आणि जाटांना मराठे दिल्लीच्या गादीवर बसावेत हे कधीच मान्य नव्हते . त्यापेक्षा उध्वस्त झालेल्या मुघलशाहीतला कमकुवत बादशाह बरा अशी भुमिका मराठ्यांनी घेतली.
पहिली संधी
शाहूंमहाराजा च्या काळात बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या काळात दिल्ली जिंकण्याची पहिली संधी चालून आली. १७१३ मध्ये फारूख शय्यार सय्यद बंधूंच्या मदतीने चुलत्याला म्हणजे जहांदर शहा चा खून करून मुघल सम्राट झाला. पुढे फारूखला सय्यद बंधू नि डोकयावर बसले .फारूखला सय्यद बंधू अब्दुल्ला अली खान याची भिती जरा जास्तच वाटू लागली. त्यांना निझाम विरुद्ध वापरण्याचा फारूखसियारचा बेत केला. पण सय्यद बंधू नि पण राजकारण केले सईद अब्दूल्ला अली खान ह्याने दख्खनच्या मोहिमेवर असताना बाळाजी विश्वनाथ पेशव्याशी तह केला. सप्टेंबर १७१९मध्ये बाळाजी पंतांनी १६००० घोडदळासह दिल्लीवर चाल केली. दोन हजार मराठे मारले गेले पण दिल्ली मराठ्यांच्या ताब्यात आली. इतिहासातील सर्वात मोठा क्षण होता . पण शाहू महाराजांच्या निर्देश नुसार पेशव्यांना दिल्लीचे तख्त जिंकायचे नव्हते केवळ चौथाई-सरदेशमुखी मिळवायची होती. सईद बंधूनी फारूखसियारला पकडले, त्याचे डोळे काढले आणि भाल्यावर त्याचे शीर नाचवले.शाहू महाराजणांनी औरंगझेबाला आणि बहादुरशहा ला वचन दिले होते त्याचे मुळे आधी बालाजी नंतर बाजीराव चे हात बांधलं होते

मराठ्यांना दिल्लीचे तख्त ताब्यात घेण्याची दूसरी संधी आली होती ती मार्च,१७३७ मध्ये
मार्चच्या अखेरीस थोरल्या बाजीरावाने थेट दिल्लीवर आक्रमण केली. मराठा फौजा दिल्लीच्या बारापूला व काल्काच्या देवळापर्यंत धडकल्या. मुहम्मद शाह सम्राटाची पाचावर धारण बसली. दिल्लीच्या रकाबगंज भागात मुघलांच्या १०००० सैनिकांच्या पराभव केला. बाजीरावाने नंतर तालकटोरा मैदाने कडे आक्रम केले पण तिथे कमरूद्दीन खान चालून आला पण बाजीरावाने त्याचा पराभव केला . बाजीरावाचा दिल्ली जाळण्याचा इरादा होता शाहू महाराजांचे शब्द आठवून सर्व बेत रद्द केला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल सम्राटाने ओलीस ठेवलेल्या शाहूची व आई येसूबाईची सन्मानपूर्वक सुटका केली होती.

तिसरी संधी आली होती ती १७५७ साली.
त्यावेळी दिल्लीच्या तख्तावर आलमगीर दूसरा हा पळपुटा मुघल सम्राट राज्य करीत होता. अहमदशाह अब्दालीच्या दुसऱ्या स्वारीनंतर नजीब हा अतिशय लबाड प्रवृत्तीचा गोडबोल्या रोहिलाच खऱ्या अर्थाने राज्यकारभार पाहत होता. त्यामुळे इमाद ह्या मुघलांच्या वझीराने रघुनाथरावांशी संधान बांधले. मल्हारराव होळकर सखाराम बापूंनी नि थोर पराक्रम केला . रघूनाथरावांनी लाहोर गेटच्या दिशेने आक्रमण केले तर विठ्ठल सदाशिव यांनी काश्मीरी गेट पडला ; मानाजी पायगुडेंनी काबूलगेटच्या बाजूनी हल्ला केला . चारी बाजूनी मराठ्यांनी लाल किल्ला वेढल्याने नजीब घाबरला आणि वकिल मेघराज मल्हाररावांकडे पाठवून तहाची बोलणी करण्यात वेळ काढूपणा केला. मल्हारराव ने नजीब ला मानस पुत्र मानले होते . रघूनाथरावांचा धीर सुटला. त्यांनी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस दिल्ली वर स्वारी केली. नजीबने हातपाय पडून अखेर रघूनाथरावांना टाळून मल्हाररावांशी तह केला. त्यांनी लाल किल्ला जिंकला मराठ्यांना यावेळी ही दिल्लीच्या तख्तामध्ये रस नव्हता.दोघांनी पंजाब प्रांतात राज्यविस्तार करण्याकडे मोर्चा बांधला.(याच नजीब ने पुन्हा मराठ्यांशी गद्दारी केली आणि पानिपत झाले ) त्यामुळे बहलोल खानाला जिवंत सोडल्याबद्दल शिवाजी महाराजांनी का पत्र लिहले याचे महत्व कळते.
चौथी संधी आली ती १७५९ मध्ये
  • गाझीउद्दीन जो वजीर होता त्याने आलमगीर दूसरा याचा खून केला. आलमगीर दूसरा चा चिरंजीव अली गौहर बिहार पळून गेला. त्याने सदाशिव भाऊ पेशव्याची मदत मागितली. सदाशिवभाऊंनी दिल्लीवर चाल केली शहा जहान तिसरा याला हाकलवाले आणि अली गौहरला शाह आलम दूसरा नावाने मुघल सम्राट म्हणून सिंहासनावर बसवले. शाह आलम दूसरा नावापूरताच सम्राट होता. कारण दिल्लीची बादशाही खराब झालेली होती . सदाशिवभाऊंना दिल्ली तख्त जिंकणे अगदीच सोपे होते पण ती इच्छाच त्यांच्या ठायी नव्हती कारण त्या वेळी नजीब आणि दुर्रानी भारताच्या उरावर बसले होते . १७६१ मध्ये पानीपतची युद्ध झाले मराठेशाहीवर कोसळली. त्यात सदाशिवभाऊ गेले. शाह आलम दूसरा याने राज्यविस्तारासाठी बंगालकडे मोर्चा वळवला. पण १७६४ साली बक्सारच्या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीच्या रॉबर्ट क्लाईव्ह विरूद्ध त्याचा पराभव झाला. कंपनीने त्याला दिल्लीत प्रवेश करण्यास बंदी घातली.
पाचवी संधी आली महादजी शिंदे यांना
  • बक्सारच्या पराभवानंतर शाहआलम दूसरा वणवण फिरत होता.१७७२ मध्ये महादजी शिंदेनी शाह आलम दूसरा ह्यास पुन्हा दिल्लीच्या गादीवर बसवले. पण मराठ्यांनी दिल्ली पुन्हा ताब्यात घेतले नाही . दरम्यान महादजी रजपूतांशी भांडणात व्यस्त असताना पानीपतातला नजीब उदौला ह्याचा नातू गुलाम कादीर हा रोहिलाखंडचा नवाब सरळ दिल्लीत घुसला. त्याने शहा आलम दूसरा कडून जबरदस्तीने वझीर पदाचे अधिकार घेतले. शाह आलम दूसरा याचा भित्रेपणा जाणून त्याने लाल किल्ल्यातील सम्राटाच्या जनानखान्यातील स्त्रीयांवर बलात्कार केले. अब्रू लुटल्या आणि खजिना ही लुटला. शाह आलमचे डोळे काढले; दाढी सोलून काढली. महादजी शिंदे पर्यंत वार्ता जाईपोवेतो दहा आठवडे लोटले. शेवटी महादजीनेच गुलाम कादीर ह्या ला संपवले
  • पुन्हा असे काही घडू नये म्हणून १७८८ पासून पुढे वीस वर्ष मराठ्यांची फौज लालकिल्ल्याचे रक्षण करण्यासाठी दिल्लीत राहिली मराठे मुघलांचे संरक्षक झाले पण सिंहासनाधिपती किंवा दिल्लीच्या आसनावर बसले नाही .
  • १८०३ च्या दूसऱ्या इंग्रज-मराठे युध्दात मराठ्यांनी दिल्लीचा ताबा गमावला.
पुढे मराठ्यांचे नाव दूसरा बाजीराव पेशवा झाला . यशवंतराव होळकर मराठ्यांच्या सारख्या महान सरदाराला बाजूला ठेवले . पण शिंदे-होळकर-पेशवे आपापसात भांडत राहिले. या तिघांच्या भांडणात दिल्ली तर सोडा आहे ते स्वराज्य लयाला गेले . यशवंतरावांमध्ये ब्रिटीशांना दिल्लीतून हुसकावून लावण्याची हिम्मत आणि इच्छा होतो लॉर्ड वेलेस्ली ज्याने पुढे जाऊन वॉटर्लू युद्धात नेपोलियनचा पराभव केला, त्याने यशवंतरावां पुढे हार मनाली होतो . यशवंतरावाने इंग्रजांविरूद्ध रजपूत, रोहिला ,शिख , मराठा ,जाट एकत्र करण्याचा प्रयत्न केला. यशवंतरावांना दिल्ली ब्रिटीशांच्या ताब्यातून सोडवायची होती. पंजाबचे महाराजा रणजितसिंह मदतीला तयार ही झाले पण चाणाक्ष इंग्रजांनी बेत हाणून पाडला. शिंदे-होळकर-पेशव्यांत मनोमिलन घडवणारे द्रष्टा नेता दुर्दैवाने कुणी नव्हते.
saambhar :

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...