विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 27 June 2020

राजर्षी शाहू महाराज






राजर्षी शाहू महाराज

जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजविणाऱ्या छत्रपती शाहू महाराज म्हणजेच यशवंतराव जयसिंगराव घाटगे यांची आज जयंती. अस्पृश्य जातीतील गंगाराम कांबळे यांना हॉटेल काढून देऊन त्यांच्या हॉटेलातील चहा आवडीने पिणाऱ्या या राजाची जयंती 'सामाजिक न्याय दिवस' म्हणून साजरी केली जाते. चौथ्या शिवाजी महाराजांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेऊन शाहू असे नाव ठेवले. फ्रेंच शिक्षक सर फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उदारमतवादी शिक्षणाचे धडे 'धारवाड' ला गिरविले आणि त्यानंतर भारतभर प्रवास केला.
२ एप्रिल १८९૪ रोजी जनतेचे कल्याण करण्यासाठी शाहू महाराज कोल्हापूरच्या गादिवर विराजमान झाले. पुढील २८ वर्षाच्या राज्य कारभारात त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले .
टोकाचा जातीभेद असणाऱ्या काळात १९१८ साली आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा त्यांनी राज्यात लागू केला. शाहू महाराज हे कृतिशील समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या चुलत बहिणी चा विवाह इंदूरच्या यशवंतराव होळकर या धनगर समाजातील मुलाशी लावून दिला. मराठा राजघराण्यातील मुलीचा विवाह त्यांनी धनगर समाजातील मुलाशी लावून देऊन आंतरजातीय विवाह घडवून आला. आंतरजातीय विवाहासाठी स्वतःच्या घरून होणारा विरोध त्यांनी धुडकावून लावला. पुढे कोल्हापूर आणि इंदोर संस्थानात मराठा - धनगर आंतरजातीय विवाहाची योजना आखून २५ आंतरजातीय विवाह शाहू महाराजांनी त्या काळी लावून दिले. मित्रहो, आजही या शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात आंतरजातीय विवाह केल्यास खून केला जातो , वाळीत टाकले जाते. शाहू महाराज हे केवळ आरक्षणाचे जनक नाहीत तर जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणारे समाजसुधारक देखील आहेत हे आपण लक्षात घेतले. आजही जातीव्यवस्था टिकून असल्यामुळे जातीवर आधारित आरक्षण द्याव लागत आहे ही मोठी दुर्देवाची गोष्ट आहे.

समाजातील जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी आणि मागासलेल्या जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच बहुजनांमध्ये स्वाभिमान निर्माण करण्यासाठी, त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी शाहू महाराजांनी शिक्षण प्रसाराचे कार्य हाती घेतले. १९१६ साली प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा त्यांनी केला. या कायद्याची अंमलबजावणी नीट होण्यासाठी त्यांनी जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही अशा पालकांना १ रुपये दंडाची शिक्षा केली . मागासलेल्या जातींना विकासाची समान संधी मिळावी यासाठी त्यांनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात शासकीय नोकऱ्यांमध्ये मागास जातींसाठी ५० % आरक्षणाची तरतूद केली. विविध तत्कालीन परिस्थिती मध्ये जातीव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती ( उदा.पारधी समाज) चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गाचा अवलंब करीत होत्या.

सनातनी व्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेऊन त्यांना सत्ता आणि संपत्ती चा अधिकार नाकारला होता त्यामुळे त्यांच्यावर नैराश्यातून अशी कृत्ये करण्याची वेळ आली होती ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारून त्यांना गावकामगाराकडे रोज हजेरी लावण्याचा नियम केला होता . शाहू महाराजांनी ही हजेरी पद्धत रद्द केली आणि या जमातीतील लोकांना संस्थानात नौकऱ्या दिल्या. वणवण भटकणाऱ्या या लोकांना त्यांनी घरे बांधून दिली त्यांच्या पोटा पाण्याची सोय करून दिली त्यामुळे गुन्हेगार असा शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.' गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल मात्र त्यांना प्रेमाने मायेने आपलेसे करून सामाजिक दर्जा मिळवून देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळच '.

१८९९ साली कोल्हापूरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला . कोल्हापुरातील ब्राह्मण वर्गाने शाहू महाराजांचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र लेखले. राजालाच जर अशी वागणूक मिळत असेल तर प्रजेच काय? असा विचार शाहू महाराजांनी त्यावेळी केला. वैयक्तीक अपमानाकडे सुद्धा व्यापक दृष्टिकोनातून बघणारा हा राजा होता. याचा परिणाम म्हणजे महाराजांनी कुलकर्णी - महार वतने रद्द केली . शाहू महाराज सत्यशोधक समाजाच्या विचाराकडे वळाले . शाहू महाराजांनी ११ जानेवारी १९११ रोजी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शाहू महाराजांनी बहुजनांमध्ये शिक्षण प्रसाराची चळवळ सुरू केली. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहे काढली. गाव तिथे शाळा काढली.

राज्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाहू महाराजांनी केवळ सामाजिक बदलाकडे लक्ष दिले नाही तर उद्योग, कला,व्यापार, क्रीडा अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केली. १९०६ साली महाराजांनी शाहू स्पिनींग अँड व्हॅविंग मिल ची स्थापना केली , १९१२ ला खासबाग हे कुस्तीचे मैदान बांधून कुस्ती खेळाला प्रोत्साहन दिले , शाहूपुरी ही गुळाची बाजार पेठ वसविली , सहकारी कायदा करून सहकारी चळवळीस प्रोत्साहन दिले, शेतीच्या पाण्याची सोय करण्यासाठी भोगावती नदीवर जगातील मातीचे पहिले धरण बांधले असा हा सर्वांगीण विकास साधणारा दूरदृष्टी असणारा राजा.

महात्मा फुले यांनी सुरु केलेली सामाजिक परिवर्तनाची चळवळ शाहू महाराजांनी पुढे यशस्वी पणे चालू ठेवली. शाहू महाराजांनी पुढे या चळवळी चा वारसा योग्य अशा व्यक्तीकडे सुपूर्द केली त्या व्यक्तीने पुढे देशाची राज्यघटना निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले ती व्यक्ती म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर. १९१९ च्या सुमारास छत्रपती शाहू महाराजांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा 'खरा पुढारी' मिळाला आहे असे सांगितले.

१९१९ साली छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना 'राजर्षी' पदवी बहाल केली. त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसांत द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने ते खचून गेले, तशातच मधुमेहाने ते ग्रासले होते. अखेर मुंबई येथे ६ मे १९२२ रोजी वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले.

मित्रहो, शाहू महाराजांनी जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून, शिक्षण प्रसार करून खूप मोठे काम केले पण आपण त्यांचे विचार अंगिकारतो आहोत का? हा आज खरा प्रश्न आहे.

सिहाच्या जबड्यात हात घालूनी ,मोजती दात हि जात मराठ्यांची

सिहाच्या जबड्यात हात घालूनी ,मोजती दात हि जात मराठ्यांची
दिलेरखानाचे पारतंत्र्य सोडुन शंभुराजे ज्यावेळी रायगडावर परतत होते तेव्हा संभाजीराजे रायगडावर परततायत याची शत्रूला चाहुल लागेल म्हणुन व ते संभाजीराजांस पकडतील म्हणुन काही गुप्त हेर वेष पालटुन संभाजीराजांच्या १० पाउले पुढे चालत शत्रूचा ठावठिकाणा घेत संभाजीराजांस व सोबत काही मावळ्यांस डोळ्यांनी इशारा देत सावध करीत होते ...सिंहाचे कुटुंब हे वाघाप्रमाणे कळते झाल्यावर एकटेच कुटुंब सोडुन मोकाट फिरत नसते तर सिंह नेहमी आपल्या कुटुंबाला घेवुन फिरतो हे सांगण्याचे कारण कि त्यावेळी संभाजीराजांच्या गुप्तहेरांना आपल्या दहा-पावले पुढे सिंहाचे बछडे(पिल्ली) झाडीत दिसली त्यांनी पुढे आल्यावर ते उचलली ते बछडे(पिल्ली )हातात उचलली व पिल्ली गुप्तहेरांनी हातात घेतली शंभुराजे यावेळी काही कारणाने मागेच राहिले . त्यावेळी घाबरुन सिंहणीची पिल्ली गुप्तहेरांच्या हाताला नख मारु लागली तेवढ्यात त्यां पिल्लांच्या मातेला पिल्ली धोक्यात ओरडु लागल्याचा सुगावा लागला व ती गुप्तहेरांवर गर्जत धावुन आली पण त्यांच्या हातात भाला ,तलवारी व आणखी काही हत्यारे यांमुळे पिल्ली लांब झाडीत टाकली व हत्यारांनी तिच्यावर वार करत सिहीनींला दुर सारले..पिल्ली झाडीत पडाल्याने पिल्लांस काही झाले नाही .तितक्यात मोठा नर सिंह त्या सर्वांकडे रागाने बघत धावत त्यांवर आला .शंभुराजांना हे मागेच मावळ्यांसोबत चालत असल्याने माहितही नव्हते .गुप्तहेरांनी त्यावरही सिहिणीप्रमाणे वार करण्यास पाहिले पण त्याचा राग ,गर्जना ऐकुन व अक्राळविक्राळ रुप बघुन त्या गुप्तहेरातील एकाने तर थरथरत तलवारच घाबरुन खाली टाकली. तो सिंह रागात गोल फिरत एकाची गुडघ्यावरची मांडी तोंडात पकडुन त्याला मातीत लोळवले झोपवले इतर गुप्तहेर त्याला वाचवायला गेले पण रागीट सिंहाने लोळवलेल्या गुप्तहेरास सोडुन धावत वाचवायास येणाऱ्याच्याच आंगावर आला.हे घाबरलेले गुप्तहेर रडत असे ओरडत होते त्यावेळी मागुन येणाऱ्या संभाजीराजे व मावळ्यांस आपले गुप्तहेर संकटात आहेत याची जाणीव झाली व रागाने शंभुराजे हातात असलेली तलवार व घुपच्या या दोन हत्यारेच घेवुन रागाने पुढे गुप्तहेरांकडे पळु लागले त्यावेळी रागीट सिंह त्या गुप्तहेरांस फाडत मातीत लोळवत असताना शंभुराजांनी पाहिले व प्रचंड रागाने शंभुराजांनी धावुन सिंहाची आयाळ पकडुन त्याला दुर घासत नेले पण जबड्याला लागलेले रक्त जिभेने चाटत रागाने सिंह परत धावत येत रागात शंभुराजांवर झेप घेतली - तेव्हा संतापलेल्या मराठ्यांच्या वाघाने ( अर्थात शंभुराजे ) यांनी तलवारीच्या एका वारातच सिंहाला मागे फिरवले. इकडे घायाळ गुप्तहेर जिवाच्या आकांताने तडफडत ओरडत होते .संभाजींना ते हाल पाहावत नव्हते काय करावे हे त्यांस सुचेना पण इकडे लालबुंद सिंह पुन्हा तिसऱ्यांदा जेव्हा परत रागात ,गर्जत रागाने शंभुराजांवर चाल करीत आला तेव्हा शंभुराजेंचा राग त्या सिंहावर इतका अनावर झाला कि शंभुराजेंनी स्वतः ची तलवार दुर फेकली व त्यांवर चाल करीत आलेल्या सिंहाचा पाठीवर बसुन जबडा मधल्या दातांवर पकडून असा फाडला कि सिंहाचे खालचे व वरचे दात वेगवेगळेच झाले ....सिंह मृत्यू पावला ......

#इतिहास_माझ्या_राजांचा_परिवार_महाराष्ट्र_राज्य
#मो_नं_7385177944

मातोश्री पुतळाराणीसाहेब


मातोश्री पुतळाराणीसाहेब
( जन्म : अज्ञात - मृत्यू : २७ जून १६८० )

पुतळा मातोश्री या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पत्नी होत. पालकर घराण्यात त्यांचा जन्म झाला. १६५३ रोजी पुतळा बाईंचा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत विवाह झाला होता.पुतळाबाई राणीसाहेब या एक निष्ठावंत पत्नी म्हणून राजेंच्याबरोबर राहिल्या.शिवाजी महाराजांच्यानंतर स्वराज्याच्या जडणघडणीत त्यांचे मोठेच योगदान होते.सईबाई राणीसाहेब यांच्या मृत्यूनंतर राजांना एकच आधार वाटत होता ,तो म्हणजे धाकल्या राणीसाहेब श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न पुतळा बाई राणीसाहेब यांचा.

पुतळा राणीसाहेब यांनी संभाजी महाराजांना आपल्या पोटच्या मुलासारखे जपले,वाढवले.संभाजी राजांच्या वरती संस्कार करत असताना त्यांच्या कडून कोणतीही चूक होणार नाही, याची त्या काळजी घेत असत.पुतळा बाई राणीसाहेब अत्यंत प्रेमळ, भावनिक, मायाळू आणि छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे यांच्यावर अतिशय प्रेम करणार्या राणीसाहेब होत्या.आयुष्यात राजांना या राणीसाहेबांचा खुपच आधार होता.राजांनी कित्येक वेळा आपली व्यथा या राणीसाहेबांच्याकडे कथित केली होती.

अवघे आयुष्य राणीसाहेब यांनी राजांच्या नुसत्या चरणांकडे पाहून व्यथित केले होते.आजूबाजूच्या शंभूराजे यांच्या विरुध्दच्या कारवाया पाहून त्या हतबल होत ,परंतु शंभूराजे यांना त्यांनी कधीच अंतर दिले नाही. संभाजी महाराज यांना आपल्या आई आठवत नव्हत्या. जिजाऊ साहेबांच्या नंतर शंभूराजे यांच्यावर खरे प्रेम कोणी केले असेल तर पुतळा बाई राणीसाहेब यांनी.राजांच्या मृत्यूनंतर पुतळा बाई राणीसाहेब शिवरायांचे जोडे घेऊन सती जायला निघाल्या.

त्यावेळी शंभूराजे यांच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले होते. कंठ दाटून आला. शंभुराजे म्हणतात, आईसाहेब तुम्ही जाऊ नका. आमची अशीच माणसा उरली नाहीत तुम्ही राहीलात तर जगण्याला आम्हाच्या बळ येईल.आम्ही शंभूदेवांची शपथ घेऊन सांगतो ,ज्या निष्ठेने आबासाहेब मासाहेबांकडे पाहात होते ,त्याच निष्ठेने आम्ही राहू .तुमच्याविना आम्ही या जगात एकटे होऊ...." छत्रपतींच्या निधनानंतर रायगडावर अनेक घडामोडी घडत गेल्या.

संभाजी महाराज अनेक संकटांवर मात करतात न करतात तोच शिवाजी महाराजांच्या पत्नी पुतळाबाई ‘सती’ जाणार असं म्हटल्यावर अंगावर सरसरून काटा उभा राहिला. महाराजांच्या निधनानंतर रायगड जरा कुठे सावरतोय तोच हे संकट पुढे येऊन ठेपलेले. पुतळा मातोंश्रींचा सती जाण्याचा हा निर्णय कुणालाही मान्य नव्हता. संभाजी राजांनी पुतळाबाई राणीसाहेबांच्या पायावर मस्तक ठेवले. अश्रुंनी पुतळा राणीसाहेब यांचे पाय भिजत होते.पुतळा बाई राणीसाहेब यांनी शंभूराजे यांना आशिर्वाद दिला .त्या म्हणाल्या मी जाते म्हणून वाईट वाटून घेऊ नका. मरण चुकवू म्हणून चुकत नाही - मृत्यू अटळ आहे. मी कधी मरणाचा विचार केला नाही. मला कधी त्याच भयही वाटले नाही. तुम्हालाही मृत्यूचे भय कधी वाटू नये ,हा माझा आशिर्वाद आहे....."
राजांचे जोडे उराशी कवटाळून त्यावरील नजर न ढळू देता श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न पुतळाबाई राणीसाहेब सती गेल्या
🚩जय जिजाऊ, जय शिवराय 🚩

Thursday 25 June 2020

आमच्या ह्या कठीण प्रदेशात नुसता कल्पनेचा घोडा चालवणेही कठीण आहे. मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्टच कशाला ? - छत्रपती शिवाजी महाराज.

आमच्या ह्या कठीण प्रदेशात नुसता कल्पनेचा घोडा चालवणेही कठीण आहे. मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्टच कशाला ?
- छत्रपती शिवाजी महाराज.
___________________________

डिप्रेशन, टेन्शन बद्दलच्या बऱ्याच पोस्ट मागे वाचल्या. आपण एवढ्यात हरतोय ? जगद्गुरू तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील घटना जर पहिल्या तर आपल्याला असलेल्या चिंता त्यापुढे फार क्षुल्लक आहेत. पण परिस्थिती काहीही असली, 'आभाळ कोसळल्यावरही त्यावर पाय ठेऊन उभे राहायला शिकवतात ते हे दोन व्यक्तिमत्व!' शिवाजी महाराजांबद्दल आपल्या सर्वांच्या मनात प्रचंड आदर आहे, आपुलकी आहे. एक तरुण म्हणून मी तरी शिवाजी महाराजांकडून खूप काही शिकतोय आणि सर्वांनी शिकायलाही हवे.
शिवाजी महाराज हे मुघली सत्तेपुढे मोठ्या धाडसाने उभे राहिले होते. एखादा सामान्य माणूस त्याच्यात असलेल्या असामान्य कर्तृत्वाने कसा मोठा होतो हे शिवछत्रपतींनी आपल्याला दाखवलय. कुणापुढे वाकू नका, झुकू नका, तत्व सोडून वागू नका हे तर या मोठ्या लोकांच्या प्रत्येक हालचालीतून दिसून आलंय. या दोन्ही व्यक्तिमत्वांची मला सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे त्यांचा रोखठोकपणा! उगाच गोड हे लोक कधी बोललेले नाहीत. 'आहे ते आहे' अशीच यांची भूमिका होती आणि हीच भूमिका आपण स्वीकारायला हवी. इ.स. १६५९ पासून पुढील काही वर्ष हे शिवाजी महाराजांसाठी कठीण होते. मुघल बादशाह महाराजांवर एक- एक स्वारी पाठवतच होता आणि महाराज मोठ्या धाडसाने त्यांना तोंड देत होते. महाराज या स्वाऱ्यांबद्दल मुघल अधिकाऱ्याला काय म्हणतात ते एका पत्राचा दाखला देऊन मी तुम्हाला सांगणार आहे.

इ.स. १६६३ ला नीलप्रभू च्या हस्ते शिवाजी महाराजांकडून एका मोगल अधिकाऱ्याला पत्र लिहिल्या गेले. त्यात शिवाजी महाराज म्हणतात,

‘आज तीन वर्षे बादशहाचे मोठमोठे सल्लागार व योद्धे आमचा प्रदेश काबीज करण्यासाठी चालून येत आहेत, हे तुम्हा सर्वांना माहित आहेच. बादशाह हुकूम फर्मावितात 'शिवाजीचे किल्ले काबीज करा' तुम्ही जवाब पाठवता 'आम्ही लौकरच काबीज करतो' आमच्या ह्या कठीण प्रदेशात नुसता कल्पनेचा घोडा चालवणेही कठीण आहे. मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्टच कशाला ? भलत्याच खोट्या बातम्या बादशाहकडे लिहून पाठविण्यास तुम्हाला लाज कशी वाटत नाही ?'

शिवाजी महाराजांची परिस्थिती यावेळी बिकट असली तरी ते घाबरले नाहीत. आपल्या शत्रूचा अशा रोखठोक शब्दात समाचार घेतला गेला पाहिजे.
पुढे ते म्हणतात 'अफजलखान जावळीवर चालून आला आणि नाहक बळी पडला. हा प्रकार तुम्ही तुमच्या बादशहास का कळवीत नाही ? अमीरूलउमराव शाहिस्ताखान आमच्या गगनचुंबी डोंगरात व पाताळात पोहोचणाऱ्या खोऱ्यात तीन वर्षे सारखा खपत होता. शिवाजी चा पाडाव करून लौकरच त्याला काबीज करतो असे बादशहाला तो लिहून लिहून थकला. ह्या खोडसाळ वर्तनाचा परिणाम त्याला भोवला. तो परिणाम सूर्यासारखा स्वच्छ सर्वांसमोर आहे.'

शिवाजी महाराजांचा आपल्या कर्तृत्वावर असलेला विश्वास आपल्याला याठिकाणी स्पष्ट दिसतो. शिवाजी महाराजांना मुघल विरोधक होते आपल्याला आपल्या परिचयाचे असतील. पण घाबरण्याचे कारण नाही. सगळ्यांचे हिशोब होतात हे इतिहासानेच आपल्याला दाखवलंय.
या पत्राचा शेवट महाराज करतात कि,
आपल्या भूमीचे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे आणि तुम्ही बादशाह कडे कितीही खोट्या बातम्या लिहून पाठवल्या तरी मी आपले कर्तव्य बजावण्यास कधी चुकणार नाही.

थोडक्यात काय तर आपले कर्तव्य आपण प्रामाणिकपणे पार पाडायला हवे. आपल्या भूमीचे रक्षण करून जनतेचे, सर्वसामान्यांचे आणि सर्वांचे राज्य उभे करण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांवर होती आणि त्यांनी ती पार पाडली. आपणही आपल्यावर असलेली जबाबदारी पार पाडू.

टीप- तरुण असाल तर अभ्यास, वाचन, लिखाण करा तुमची जबाबदारी ती आहे.

- आशुतोष सुनील पाटील.

#HiStoryteller #AshutoshPatil

Tuesday 23 June 2020

श्रीमंत महाराजा महादजी शिंदे यांचे विविध पैलू-

श्रीमंत महाराजा महादजी शिंदे यांचे विविध पैलू-

१)स्वभाव - महादजी हे मोकळ्या स्वभावाचे होते. त्यामुळे ते अनेकांना आवडत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती होती. तरीही त्यांची रहाणी साधीच होती.

२)धार्मिक सहिष्णूवृत्ती- महादजी हे धार्मिक सहिष्णूवृत्तीचे असुन ते कृष्ण भक्त असल्याचे दिसुन येते. इश्वराच्या भजनात ते बराच वेळ घालवत. कपाळावर मुद्रा लावत असत. तसेच हातात स्मरणी(माळ) मथुरा, गोकुळ, वृंदावन, पुष्कर वगैरे ठिकाणी त्यांनी पैसा खर्च केल्याचे दिसते. महादजींचे गुरू हिंदूंबरोबरच मुसलमानांचे पीर, साधु, संत हेही असल्याचे दिसुन येते. वारकरी पंथातले संत मल्लाप्पा वास्कर हे त्यांचे गुरु होते. वास्कर महाराजांनीच महादजींना दिक्षा दिली. व त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ घातली. तीच माळ पुढे हातात घेऊन फावल्यावेळी पाटीलबाबा भगवंत नामाचा जप करीत असत.

३)शिक्षण- महादजी हे शिकलेले होते. त्यांनी मराठी बरोबरच फारशी, ऊर्दू भाषा आवगत करून घेतल्या होत्या.

४)लेखन - महादजी शिंदे हे कवी होते. त्यांना ज्या ज्या वेळी वेळ मिळत असे. त्या त्या वेळी ते पदे रचत असत. त्यांनी माधव या नावाने अनेक अभंग रचलेले दिसुन येतात. त्यांनी माधवविलास या नावाचा ग्रंथ लिहलेला दिसुन येतो.

५)प्रशासन- महादजी हे राज्य जिंकल्यानंतर त्या राज्याची चोख व्यवस्था लावत. राज्यात शांतता राखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करीत. प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष देत. राज्याच्या हिशोबा बाबत दक्ष असल्याचे दिसुन येते

६)युद्धनीती- महादजींना पानिपतच्या युद्धात अपंगत्व आले. महादजी युध्दाची तयारी करुन आक्रमण करीत. युध्दनीतीमध्ये ते नेहमीच वेगवेगळे प्रयोग करीत. एकदम सर्वांशी विरोध न करता ते एकाशी विरोध तर एकाशी मैत्री यानुसार आपले वर्तन ठेवत व डावपेच आखत.

७)सैन्यव्यवस्था-महादजींनी डी-बाँय या फ्रेंच अधिकार्याच्या साह्याने कवायती लष्करी फलटनी तयार केल्या. डी-बाँय, रानेखान, आंबुजी इंगळे, खंडेराव रायाजी पाटील, वगैरे आपल्या सरदारांच्या नियंत्रणाखाली फौज तैनात ठेवली. लष्कराचा तळ उज्जैन व आग्रा येथे पडलेला असे. स्वतः महादजींनी दारुगोळा व तोफा ओतण्याचा कारखाना आग्रा येथे चालू केला होता व त्याच्यावर सँगस्टर नावाचा परदेशी तज्ञ अधिकारी नेमल्याचे दिसुन येते.

८)परकीय धोरण- महादजी शिंदे यांनी वाँरन हेस्टींग्ज होता तोपर्यत इंग्रजां मांडलिक ठेवल्याचे दिसुन येते. नंतर मात्र त्यांनी इग्रजांना भारतातुन घालवुन देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेला दिसुन येतो. टिपू सारख्या इंग्रजांच्या बळकट शत्रूचा नाश होऊ नये असे महादजींना मनोमन वाटे. महादजीनी फ्रेंचाबरोबर तटस्थ धोरण स्वीकारल्याचे दिसुन येते.

९)महादजी गुणांचे पारखे- महादजी गुणांचे चाहते होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक अधिकार्यांचा उदय झाला. डी-बाँय, लखबा दादा, राणेखान, जगूबापू, आप्पा खंडेराव, अंबुजी इंगळे, जिवबा दादा वगैरे मंडळीतील गुण महादजींनी ओळखले व त्यांना आपल्या पदरी ठेवले.

१०)संगीताची आवड- महादजींना संगिताची आवड होती. त्यांच्या पदरी बीनकर महम्मद जमान सारखे सुरेख व उत्तमरितीने वाद्ये वाजवणारे संगितकार होते.अशा प्रकारे तलवार बहाद्दर, मुसद्दी राजनीती, कवी इत्यादी एकाच व्यक्तीत अनेक गुण असे महादजी शिंदे यांचे व्यक्तीमत्व असल्याचे दिसुन येते.

साभार शिंदे सरकार

॥ शिवरायांच्या पत्रांचे प्रकार ॥

॥ शिवरायांच्या पत्रांचे प्रकार ॥

शिवकाळामध्ये पत्रांत वेग-वेगळे प्रकार पडत असत. प्रत्येक ठराविक प्रकाराचे स्वत:चे आपले एक वेगळे महत्व व अधिकार होते. शिवरायांच्या पत्रांमध्येही आपल्याला वेग-वेगळे प्रकार आढळुन येतात. ते थोडक्यात आपन जानुन घेऊयात.

अजरख्तखाने :- अज हा फ़ार्सी शब्द आहे. अज म्हणजे पासून, कडून. र अख्त या फ़ार्सी शब्दाचे चीजवस्तू, भारी फ़र्निचर, कपडे असे अनेक अर्थ सध्या होतात. रख्तखाना हा शब्द आदिलशाही व निजामशाहीच्या फ़ार्सी व मराठी कागदपत्रांमध्ये कचेरी या अर्थाने येतो. अजरख्तकाने राजश्री सिवाजी राजे म्हणजे राजश्री शिवाजीराजांच्या कचेरीकडून.

इजतमाब :- इज्जत म्हणजे प्रतिष्ठा, मान आणि माअब म्हणजे निधान, एखादि गोष्ट ज्यात आहे अशी जागा (पद). इज्जतमाअब या अरबी शब्दाचा अर्थ होतो ज्याच्यात इज्जत आहे असा, इज्जतदार, पतिष्ठीत, माननीय व्यक्ती, इजतमाब हा इजतमाअबचा मराठी अपभ्रंश शब्द आहे.

कौलनामा :- कौल म्हणजे शब्द, वचन वा अभय वचन. नामा म्हणजे पत्र. कौलनामा म्हणजे अभयपत्र, आश्वासनपत्र. कौलनाम्यात इतरही प्रकार पडतात. रयतेला कराविषयी दिलेला कौल नामा व जे लोक पूर्वी कधीतरी शत्रूला मिळालेले आहेत किंवा त्यांच्याकडून काही चुक झालेली असेल व ते माफ़िमागुन परत राज्यात येन्याची विनंती करत असतील तर त्या व्यक्तीला तुला पुर्वीचे गुन्हे माफ़करून अभयदिले आहे. असे त्याला वाटावे व त्याच्या मनात शंकाराहूनये म्हणुन कौलदिला जातो. अशा कौलाला कौलनामा म्हणतात.

मसूरल हजरत, मसहूरल अनाम :- मसूरल म्हणजे राजमान्य व हजरत हा ही बहुमानाचा शब्द आहे.

सरंजामी तह :- सरंजाम हा फ़ार्शी शब्द आहे. त्याचा अर्थ व्यवस्थापना असा होतो. तह म्हणजे ठराव. सरंजामी तह म्हणजे व्यवस्थेविषयीचा ठराव. सरकारी अधिकार्यांणा अंमलबजावणीकरीता काढलेला हुकूम म्हणजेच सरंजामी तह.

शर्तनामा तह :- अटींचा ठराव. प्रत्येक अट सांगुन ती मान्यकेली असे यातील लेखनपध्दती असते.

जाबिता तह् :- अधिकार, कायदा, नियम, अंमल. जाबिता तह म्हणजेच एखाद्या व्यक्तीला विशेष अधिकार देऊन काही विशेष काम सोपने. त्या कामाचा ठराव.

महजर :- एखाद्या तंट्यासाठी त्या भागातील सरकारी अधिकार्यांना जमवून त्या तंट्याविषयी अनेक व्यक्तींच्या साक्षी घेऊन व कागदपत्रे पाहुन देण्यात आलेला निर्णय असतो. तो लिखित स्वरुपात करून वादी प्रतीवादींना देन्यात येतो. त्या निर्णयावरच तो तंटा मीटतो. यात यातंट्याचा निवाडा करतांना हाजीर असलेल्या मंडळींची नावे व त्यांचे पदही असतात.

स्वस्ति श्री राज्याभिषेक शक :- शिवाजी महाराजांनी ६ जुन १६७४ रोजी स्वत:चा राज्याभिषेक करून आपला एक स्वत:चा शक सुरुकेला. राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी काही पत्रांमध्ये या शकाचा उपयोग केलाला आढळुन येतो. पण जुन १६७४ च्या सर्व पत्रांवर आढळत नाही. या शकातील “स्वस्ति श्री” हे शुभसूचक शब्द आहेत.

शिवरायांच्या पत्रांमध्ये अशे एकुण ९ प्रकार प्रामुख्याने आढळुन येतात.

------------
साभार नितीन समुद्रेवार.

म्हसवडकर राजेमाने

म्हसवडकर राजेमाने
माने म्हटले की म्हसवड डोळ्यांसमोर येते . रतोजी माने हे आदिलशहाचे बडे सरदार होते आदिलशहाकडून रतोजीस दहा गावची वतनी होती कण्हेर दहिगाव अकलूज भाळवणी कासेगाव ब्रम्हापूरी सांगोला आटपाडी नाझरे वेळापूर मिर्झा जयसिंगाने विजापूरी स्वारी केली तेव्हा जी रतोजीने दरबाराची सेवा केली त्यामुळे 1666 साली वरील गावे रतोजीस आदिलशहाने दिली होती. परंडा वगैरे मोगली किल्ला आदिलशाहीत जिंकून दिला होता.
रतोजीस नागोजी पुञ नागोजी म्हटले कि त्यांचा पराक्रम तर समोर येतोच पण त्यांची गद्दारी ही मनाला खिळवून जाते. साबाजी निंबाळकर हे शिवरायांचे सावञ मेहूणे दहिगावस स्थायिक झाले . साबाजी हे मोगलांचे वतनदार झाले यांनी शहाजीराजे यांना सोडून मोगलशाही पत्कारली होती. साबाजीस रंभाजी व तुकाराम असे दोन पुञ यातील तुकाराम नाईक निंबाळकर यांचे पुञ अमृतराव निंबाळकर, जानोजी , पिराजी व राधाबाई असे कुटूंब यातील राधाबाई नागोजीस दिली गेली. अमृतराव हे नागोजीचे मेहूणे होतात. नागोजी हे ही आदिलशाहीत वडीलोपार्जीत वतनावर दरबारी चाकरी करत होते .
शिवछञपतींनंतर संभाजी महाराज यांचा अतिशय क्रुरपणे झालेल्या मृत्यूने मराठा सरदार खवळले होते आदिलशाही संपुष्टात येऊन नागोजी मोगलांकडे गेले होते . संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज गादिवर आले आणि मोगलांपासून बचावार्थ जिंजीस गेले पण जिंजीस ही वेढा पडला होता त्या वेढ्यातून काही मराठा सरदार स्वराज्यात आले त्यात नागोजी होते . हे सरदार जिंजीत आल्याने मराठे अजून उत्साहाने वेढा परतवून लावू लागले. 1691_1697 स्वराज्यात संपुर्ण सात वर्षांची चाकरी निष्ठेने केली होती .
स्वराज्यात दाखल झाल्यावर राजाराम महाराज यांनी सरदेशमुखीचे इनाम दिला त्याचा तपशील म्हसवड येथील बारा वाड्या दहिगाव अकलूज भाळवणी कासेगाव ब्रम्हापूरी सांगोला आटपाडी नाझरे वेळापूर कलेढोण महाराजांनी 1691 साली हे नागोजीस दिले होते . शिवाय सरदेशमुखीच्या तप्यासाठी मुलूख दिला त्याची यादि निमगाव भूम काटी भोसे टेंभूर्णी मार्डी पानगाव इटे वासी हवेली वांगी राजांजन पांगरी बारसी मांडवे उंदरगाव मोहोळ करकंब फूटगाव तेरखेड सावरगाव एवढा मोठा मान सन्मान छञपतींनी नागोजीस देऊ केला होता.
नागोजी माने यांनी चार पाच वर्षें अतिशय प्रामाणिकपणे स्वराज्य सेवा केली होता पण परकीय राज्यकर्त्यांची चाकरी मनातून उठवू शकले नव्हते 1696 सालांपासून नागोजीने बादशाही सरदारांना संधान साधून होते . मेव्हण्याच्या मृत्यूने पत्नी राधाबाईने ही भावाचा सुड उगवण्यासाठी पतीचे ( नागोजीचे ) कान फुकले असावे आणि बादशाही चाकरी स्वीकारण्यासाठी संताजी घोरपडेंच्या मृत्यूमुळे एक नामी संधी मिळाली होती.
धुर्त औरंगजेब स्वतःहाच्या मुलाबाळांना संशयास्पद घटनांवरून खून करतो त्याच्याकडे माफिची याचना देखील शुल्लक ठरते अशा या संताजींच्या खुनाची बातमी देणार्यास खुशखबरखान पदवी देऊन नागोजीस माफी देऊन त्याने दरबाच्या अटितूनही मुक्त केले होते.
विशेष पाहता टेंभूर्णी हे दळणवळणाच्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून फार महत्वाचे ठिकाण होते . शिवकाळ ते शंभूकाळात ही स्वराज्याची सीमा भिमेपर्यंतच होती पण राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत सोलापूर जिल्ह्यातील काही गावांची सरदेशमुखी नागोजीस दिल्याची नोंद सापडते. पुढे हाच मुलूख औरंगजेबाने त्या देऊ केला होता.
साभार बाळासाहेब पवार चिञ. 1) टेंभूर्णी गढीचे मुख्यप्रवेद्वार

शिवाजी महाराजांवर अगदी जवळून झालेले दोन प्राणघातक हल्ले.


शिवाजी महाराजांवर अगदी जवळून झालेले दोन प्राणघातक हल्ले.
शिवाजी महाराजांवर त्यांच्या आयुष्यात दोन प्रसंगी अगदी जवळून प्राणघातक हल्ले झालेले आहेत. पहिला हल्ला विजापूर सेनापती अफजझलखान प्रसंगी आणि दुसरा हल्ला सुरतेच्या स्वारीच्या वेळेस.
आता आपण ह्याचे मनोविज्ञानिक विश्लेषण पाहू.
विजापूरच्या अफझलखानाचा प्राणघातक हल्ला. ( हा जास्त महत्वाचा. कारण ह्यात अफझलखानाशिवाय आजून दोघांनी शिवाजी महाराजांवर प्राणघातक हल्ला केला.)
शिवाजी महाराज आणि अफझल खान ह्या दोघांनी 'भेटीस स-शस्र यावे' असा भेटीचा ठरावच होता. त्यामुळे शिवाजी महाराज आणि अफझलखान दोघेही आप-आपली शस्रे घेऊनच भेटीस आले.
ह्या भेटीत शिवाजी महाराजांवर पहिला हल्ला केला हा अफझलखानाने. लगेच दुसरा हल्ला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ह्याने केला आणि लगेच तिसरा हल्ला सय्यद बंडा ह्याने केला.
ऐतिहासिक पुराव्यांवरून असे वाटते कि अफझलखान प्रसंगी शिवाजी महाराजांस 'खान दगा करेल' ह्याची पूर्वकल्पना होती. पण खान दगा करीलच अशी १०० टक्के खात्री किंवा माहिती शिवाजीमहाराजांस नव्हती.
तरीही खानाविषयी शिवाजी महाराजांच्या मनात शंकाच होती.. ह्याला खानाचा पूर्वइतिहास कारण होता. बर खान दगा करील म्हणजे नेमकं काय करील? ह्याचेही खुप सारे विस्तृत अर्थ निघतात.
बडी बेगमेने अफझल खानास 'शिवाजीस जिवंत धरून किंवा नाहीच जमले तर जीवे मारून यश संपादावे' असे बजावून पाठविले होते.
ह्या वेळी खुद्द शहाजी महाराज हे विजापूरच्या दरबारात सेवेस असल्याने शहाजी महाराजांना दूर कर्नाटक प्रांती असतानाही आपल्या हेरांकरवी ह्या कटाची बातमी लगेच मिळाली असेल. ( शहाजी महाराजांच्या हेरांनी 'दग्याची' गुप्त बातमी शहाजी महाराजांस सांगितलीच असेल. हे नाकारताही येत नाही.) असो. कारण कुठलेही असो; पण शिवाजी महाराजांना 'खानाचे मन आपल्याविषयी काही साफ नाही' हे कळाले होते.
आता शिवाजीमहाराजांनी शंका घेण्याला काय कारण होते ते पाहू. सभासद बखरीत काय म्हणतात ते पहा: राजियांनी असा विचार केला कि अफझलखान यासी झुंज करावे. प्रतापगडास जावे. हा विचार केला. तेंव्हा सर्वांनी वारीले जे जुंज देऊ नये, सला करावा. त्यासी राजे बोलिले "जे सला केलियाने आगर भेट घेतलियाने संभाजीराजे ( शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ) जैसे मारिले ऐसे आपणास मारतील; हे गोष्ट न घडे. मारिता मारिता जे होईल ते करू. सला करणे नाही." हा विचार करून राहिले.
ह्याचा अर्थच असा होतो कि शिवाजीमहाराजांस खानाचा काही भरवसा नव्हता. आणि खानाशी मारामारीच करावी हा बेत शिवाजी महाराजांनी त्यांच्या 'मनाशी' पक्का केला होता. फक्त 'जीवे मारण्याची' पहिली सुरवात कोणी करावी हाच प्रश्न होता.
पण इथे महाराज पूर्ण सावध होते.
इथं काही अत्यंत महत्वाच्या गमती आहेत.
शिवाजी महाराज हे प्रतापगडावरून चालत-चालत खानाजवळ भेटायला आले. आणि नेमकं ह्याच्या उलट खान हा आळश्यासारखा पालखीत बसून शिवाजीमहाराजांस भेटवावयास आला.
खान शामियानात बसून 'महाराजांस मारायचे' नियोजन करीत होता तर महाराज चालत-चालत 'खानास मारावयाचे' नियोजन करीत होते.
चालल्याने शरीरातील रक्ताभिसरण वाढते आणि मेंदूस जास्त ऑक्सिजनचा पुरवठा होऊन चालणाऱ्या व्यक्तीस जास्त हुशार आणि चपळ वाटते. ह्या उलट बसल्याने किंवा आराम फर्मावल्याने आळस वाढून बुद्दी मंद होते. खानाच्या बाबतीत नेमके हेच झाले. खान बुद्धीने कमी पडला. नाहीतर खानानेही शिवाजी महाराजांस मारण्याची पूर्ण तयारी केलीच होती.
समकालीन बखरकारांनी ह्याचे विस्तृत वर्णन केलेले आहे. बखरींची भाषा समजण्यास थोडी क्लिष्ट असल्याने बखरींबरोबरच आपण आपल्या भाषेत तीच विश्लेषण पाहू:
खासे राजियांनी बारीक जिरे मुंडी अंगात घातली. त्यावर कुडत बिलाखीची घातली. डोईस मंदिल बांधीला त्यात तोडा बांधिला. पायांत चोळणा काच्या घालून कासा कसली. हाती बिचवा एक वाघनख चढविले. आणि बराबर जीवबा महाला म्हणोन मोठा मरदाना होता त्याजवळ एक पट्टा (दांडपट्टा), व एक फिरंग (कर्नाटकी धोप तलवार), एक ढाल तसेच संभाजी कावजी महालदार याजवळ एक पट्टा, एक फिरंग, एक ढाल ऐसी दोघे माणसे बरोबरी घेतली.
प्रतापगडावरून चालत-चालत शिवाजी महाराज आता खानास भेटावयास निघाले.
महाराज आले म्हंटल्यावर खान हि उभा राहून सामोरा येऊन राजास भेटला. शामियान्यात आल्यावर दोघांच्या वकिलांनी रिवाजानुसार एकमेकांस दोघांच्या ओळखी करून दिल्या. आणि दोघांनीही आपली हातातील मोठी शस्रे आप-आपल्या वकिलांच्या हातात दिली. (दोघांनीही छोटी शस्रे स्वतःजवळच लपवूनच ठेवली. )
आलिंगन देण्यासाठी खानाने शिवाजी महाराजांना जवळ घेतले; आणि लगेच खानाने महाराजांची मुंडी डाव्या बगलेत कवटाळून उजव्या हाताने महाराजांच्या कुशीवर जमदाड ( कट्यारीसारखे शस्र ) चालविली.
महाराजांनी अंगात चिलखत (जिरेमुंडी) घातले असल्याने वार कारगर झाला नाही. जमदाड नुसतीच खरखरली. अंगास लागली नाही..
हे पाहून राजांनी तत्क्षणी डाव्या हाती वाघनख होते तो हात खानाच्या पोटास चालविला. खानाने अंगात नुसता झगाच घातला होता. वाघनखाचा मारा करिताच खानाचा कोथळाच बाहेर आला. उजव्या हातून बिचवा सपासप पोटावर चालविला. ह्याने खानाचे पोट फुटून सगळी आतडी बाहेर आली.
जसे खानाचे पोट फुटले तसे राजांनी मुंडी हासडून भेटीच्या चौथऱ्यावरून खाली उडी टाकून निघाले; पण तेव्हढ्यात खानाने गलबला केले कि 'मारिले मारिले' 'दगा दिधला' 'वेगीं धावा,' 'लव्हा लव्हा.'
हे पाहून खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ह्याने खानाची आपल्या हातातील तलवार घेऊन राजांवर तलवारीचा वार केला. तो वार अडवून महाराज म्हणाले " ब्राम्हणास आम्ही मारणार नाही. शिवशंकर आम्हास हसेल. शहाजी महाराजांची आम्हास आन असे.. निघून जावे.." पण तरीही कृष्णाजी भास्कर कुलकर्णी महाराजांवर चालून आलाच. मग मात्र महाराजांनी त्याच्या ' ब्राम्हण्याचा' क्षणभरही विचार न करिता कृष्णाजीपंतास एकाच घावात ठार केले.
पण तेवढ्यात बाहेच्या लढाईच्या धामधुमीतून सय्यद बंडा पटाईत ( दांडपट्टा चालविणारा) शामियान्यात धावला. त्याने राजियाजवळ; पट्याचे वार राजियावरी चालविले. ( आता इथं महत्वाचे आहे.)
राजियाने जीवबा महालिया जवळील आपले हुद्दीयाचा ( स्वतःचा) पट्टा घेऊन व बिचवा ऐसे कातर (कात्री सारखे कोनात) करून सय्यद बंडियाचे चार वार वारिले. ( म्हणजे परतावून लाविले.)
पाचवे हाताने राजियास सय्यद बंडाने मारावे इतक्यात जीवबा महाला याने फिरंगीने ( सरळ पात्याची कर्नाटकी धोप तलवार ) खांद्यावरी वार सय्यद बंडियाशी केला. तो पट्याचा हात हत्यारासमवेत तोडीला. बंडा जीवे मारिला.
भोयांनी पालखी आणून खानास पालखीत घालून उचलून चालविला.
इतक्यांत संभाजी कावजी महालदार याने भोयांचे पाय मारून पालखी भुईस पाडून खानाचे डोसके कापून हाती घेऊन राजियाजवळ आला.
खानाचे शीर घेऊन राजे सीताब ( म्हणजे ताबडतोब ) गडावरी जिऊबा महाला व संभाजी कावजी महालदार ऐसे गेले.
ह्या पहिल्या हल्यात महाराजांनी, पहिला अफझल खान मारिला, दुसरा कृष्णाजी भास्कर मारिला आणि तिसरा सय्यद बंडा मारिला.
इथं महाराजांना विशेष सावधगिरी बाळगावी लागली . कारण बाकीचे दोन शिवाजीमहाराजांवर अचानक धावून आले.
आता दुसरा हल्ला सुरतेच्या स्वारीच्या वेळी झाला तो पाहू:
ह्या सुरतेच्या स्वारीच्या विषयी समकालीन लेखकांनी बरेच लिहून ठेवलेले आहे. आणि सगळ्यांचेच लिहिलेले हे 'कुतूहल' निर्माण करणारे आहे. आता सुरतेची स्वारी महाराजांनी का केली? ते आपण पाहू:
शिवाजीमहाराजांना दोन मोठ्या शाह्यांशी ( एक विजापूरची अदिलशाही आणि दुसरी दिल्लीची मुघल सल्तनत ) सतत तीन ते चार वर्ष लढून खूप मोठी आर्थिक हानी झालेली होती. अत्यंत निकडीने पहिली स्वराज्याची हि आर्थिक हानी भरून काढून स्वराज्य परत भक्कम उभे करणे क्रमप्राप्त होते.
शत्रू प्रदेशात खंडणी गोळा करूनच हि आर्थिक चणचण दूर होणार होती. त्यामुळे ह्याविषयी गुप्तपणे शोध सुरु झाला.
शिवाजी महाराजांच्या हेरखात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक जाधव ह्याने सुरतेची हेरगिरी करून शिवाजी महाराजांस येऊन अत्यंत सखोल माहिती सांगितली."सुरत मारियेल्याने अगणीत द्रव्य हातास लागेल." असे त्याने महाराजांस सांगितले.
आणि सुरतेच्या छाप्याची गुप्त तयारी सुरु झाली.
राजियानी विचार केला कि, "लष्कर पाठविल्याने चाकरी-नफरी काम मनासारखे होणार नाही. जावे तरी आपण खासा लष्कर घेऊन जावे." ऐसा विचार केला. दहा हजार पागा (घोडदळ ) आणि दहा हजार शिलेदार घेऊन कोळवनांतून ( जव्हार कोळ्यांच्या इलाख्यातून) नीट सुरतेत पाच गावे - सात गावे, मजल करीत एकाएकी सुरतेत पावले.
५ जानेवारी १६६४ मंगळवार-
गणदेवीला कोणी एक मोठा सेनापती आल्याची खबर सुरतेचा सुभेदार इनायतखानाकडे गेली. 'आपण बादशाही सरदार असून अहमदाबादेकडे जात आहोत' असे त्याने सांगितले. घोडदळ आणि पायदळ मिळून त्याच्याकडे आठ ते दहा हजार सैन्य असावे. 'तो शिवाजी असावा' अशी हकीकत कानावर आली.
६ जानेवारी बुधवार-
सुरतेपासून शिवाजी साडेचार मैलावरील उधना गावी आल्याचे कळले. 'आपण बादशाही सरदार असून महाबतखानाचे बंड मोडण्यासाठी जात असून, वाटेत आपल्याला उशीर झाला..' अशी बतावणी तो करतो आहे. सुरतेचा सुभेदार इनायतखानाने एक हस्तक शिवाजी महाराजांकडे पाठवून "येथील लोक भीतीने पळून जाऊ लागले आहेत तरी तुम्ही जास्त जवळ न येणे म्हणून निरोप देऊन पाठविले". या निरोपाने चिडून शिवाजीमहाराजांनी त्या हस्तकालाच अटक केली.
डच व्यापाऱ्यांनी दोन हेर 'खरे काय ते' पाहण्यास पाठविले. पण त्यांना शिवाजी महाराजांच्या स्वारांनी पकडले. त्यांना कैद केले. पण ह्या दोघांनाही शिवाजी महाराजांनी संध्याकाळी सोडून दिले. ह्यातील एकाने राजापूरला असताना शिवाजी महाराजांना पाहिलेले होते. त्याने बरोबर ओळखले कि 'हे शिवाजी महाराजच' आहेत.
पण सुभेदार इनायतखान काही 'हे शिवाजी महाराज आहेत' ह्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता.
महाराजांनी आपला एक वकील पाठवून सुरतेच्या सुभेदाराकडे खंडणीची मागणी केली. पण ती त्याने साफ धुडकावून लाविली. आता मराठ्यांची फौज सुरतेत घुसली. आता सुरतेत एकच पळापळ सुरु झाली. सुरतेच्या बाजापेठेत हाहाकार उडाला. डचांनी आणि इंग्रजांनी आपापल्या वखारी बंद करून घेतल्या. सुरतेची व्यापारी जस जमेल तसे आपले धन लपवू लागले.
मराठ्यांनी टोळ्या ( Group) करून हातात पेटत्या मशाली घेऊन एक एक घर, वाड्यांतील धन शोधून काढायला सुरवात केली.
सुरतेच्या वेशीबाहेर एका बागेत महाराजांनी शामियाना उभारला होता. पण ह्या शामियान्याला कणातीही नव्हत्या. केवळ चार भाले जमिनीत खोचून त्यावर चार कोनांत ऊन लागू नये म्हणून कापड अडकविलेले होते. ह्याच्या खालीच महाराज एका आसनावर (बहुतेक हि पेटी असावी) बसलेले होते.
महाराजांनी तिथं आपला मुक्काम केला; आणि इथेच महाराजांपुढे सुरतेच्या धनाची पोतीच्या पोती, सोन्याची पिंपे, थैल्या येऊन पडू लागल्या. महाराज ते धन पाहून काही ठेऊन घेऊन बाकीचे लगेच फौजेत वाटत होते. या तळावर खंडणी न दिलेले बरेच कैदी पकडून आणले होते.
ह्या स्वारीच्या वेळेस मराठ्यांच्या तावडीत एक इंग्रज सापडला. त्याच नाव अँथनी स्मिथ. ह्याला पकडून महाराजांकडे नेण्यात आले. मराठ्यांनी सरायांवरही धाडी घातल्या. इथे त्यांनी ऍबेसेनियाचा वकील पकडला.
सुरतेची जकातघर लुटले. अँथनी स्मिथला सांगून महाराजांनी इंग्रजांकडे ३ लाख खंडणी मागितली. पण इंग्रजांनी ती दिली नाही. संपूर्ण सुरत शहर; बंदरासहित मराठ्यांनी सगळे धन जमा केले . बंदरावरील जहाजात महाराजांना ३० पिंपे सोन सापडलं. बहर्जी बोहराजवळ ८० लाख संपत्ती सापडली. त्यात २८ शेर तर मोतीच होते.
७ जानेवारी गुरुवार-
महाराजांच्या तळावर खूप गर्दी होती. खुप लोक कैद केले होते. ज्यांनी खंडणी दिली नाही त्यांना वेगवेगळ्या शिक्षा तिथंच लगेच देण्यात येत होत्या. मराठावीर खंडणी आणीतच होते. थैल्या भर-भरून धन महाराजांसमोर पडत होते.
आजच्या दिवशी मात्र आता सुरतेचा सुभेदार इनायत खानाने आपला वकील शिवाजी महाराजांकडे पाठविला. हा वकील शिवाजी महाराजांच्या तळावर आला. त्याला पकडले गेले. त्याने आपण "इनायत खानाचे वकील असून महाराजांना खानाचा निरोप द्यायला आलोय" असे सांगितले. म्हणून ह्या वकिलाला महाराजांसमोर नेण्यात आले.
महाराजांसमोर उभे राहून "इनायतखान ह्याने नवीन अटी सांगून पाठविले आहे" असे हा वकील शिवाजी महाराजांना म्हणाला. आणि हे सांगत असताना अचानक एकदम त्याने महाराजांवर झडप खालून महाराजांवर लपून आणलेली कट्यार चालविली.
कट्यार महाराजांच्या काळजाचा वेध घेणार.... इतक्यात विजेच्या वेगाने महाराजांजवळ उभ्या असलेल्या एका शूर मराठ्याने आपल्या तलवारीचा खाडकन घाव त्या वकिलाच्या हातावर घालून तो कट्यारीचा हात वरचे वरच छाटून उडविला. वेगाने महाराजांच्या अंगावर आलेला तो वकील झोकांडून महाराजांच्या अंगावरच पडला.
वकिलाच्या वेगाने अंगावर पडण्याने महाराज ही कलंडून बाजूस खाली पडले. त्या वकिलाच्या तोडलेल्या हाताचे सगळे रक्त महाराजांच्या अंगावर उडून महाराज रक्तचिंब लालेलाल झाले...
मुंडक कापून वकिलाच्या चिरफाळ्या उडविल्या. रक्ताच्या तप्त चिळकांड्या उडाल्या. एकाच क्षणात शामियान्यात भयंकर गडबड उडाली.. मराठ्यांचा भयंकर क्रोध उसळला.
तेथे कैद करून आणलेल्या कैद्यांची आता मराठ्यांनी मुंडकीच उडवायला सुरवात केली. अनेकांचे हातच तोडण्यात आले. एकच गोंधळ आणि आर्त ओरडणे सुरु झाले..
महाराजांनी सावध होऊन स्वतःला सावरून 'मी ठीक आहे' असे सर्वांस सांगितले.
ह्या अँथनी स्मिथचेही डोके मारण्यात येणार; पण तेवढ्यात महाराजांनी त्याला मारू नये म्हणून सांगितले; आणि ह्या अँथनी स्मिथचा जीव वाचला. (ह्या अँथनी स्मिथने स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेले हे सगळे लिहून ठेवलेले आहे. )
मात्र ह्या नंतर मराठ्यांनी सगळ्या सुरत शहरालाच "मराठ्यांचा मार काय असतो" ते दाखवून दिले. मराठ्यांच्या क्रोधाग्नीने सगळे सुरत शहर आता आगीच्या भक्षस्थानी पडले.
सुरतेच्या ह्या स्वारीत तीन हजार घरांना आगी लावण्यात आल्या. २६ हात तोडले आणि काही मुंडकी उडविली.
पुढे कित्येक दिवस "मराठे सुरतेवर चालून येत आहेत " अश्या हुली उठून लोकांची धावपळ - पळापळ - पडापडा, होत होती.
अंदाजानुसार ३ करोड संपत्ती महाराजांनी सुरतेतून खंडणी रूपात मिळाली . (ह्याचे वेग वेगळे आकडे आहेत. )
ह्या स्वारीच्या वेळी औरंगजेब हा लाहोरला होता. तिथं त्याला ह्या स्वारीची बातमी कळली. शिवाजी महाराजांनी सुरतेत खंडणी गोळा केली हे कळून काय अवस्था झाली असेल बरे त्या औरंगजेबाची???
महाराज कायम म्हणायचे "सदैव चित्ती सावध असावे."
महाराजांच्या हयाच 'सदैव चित्ती सावधते' मुळे महाराज वरील दोनही प्राणघातक हल्यांपासून' निभावून गेले...
लेख समाप्त. (टीप: हा लेख लिहिताना कमी शब्दात लिहिण्यासाठी स्वतःवर खूपच आवर घालावा लागला. जितकं थोडक्यात लिहिता येईल तितकं लिहिलं.; त्याबाद्दल खेद व्यक्त करतो. )
साभार सतीश शिवाजीराव कदम

हिंदनृपती छत्रपती शाहूमहाराजांचे दुर्मिळ चित्र.

हिंदनृपती छत्रपती शाहूमहाराजांचे दुर्मिळ चित्र.
छत्रपती थोरले शाहूमहाराजांच्या आणखी एका दुर्मिळ छायाचित्राची माहीती देत आहे :

छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतार करणार्या त्यांच्या नातवाचा अर्थात हिंदनृपती छत्रपती थोरले शाहूमहाराज यांचा काळ असो, वा ब्रिटीश शासनाला न जुमाणार्या बाणेदार प्रतापसिंह महाराज(पहिले) यांचा काळ असो या दोन्ही कालखंडात अत्यंत निष्ठा राखलेल्या सातार्याच्या बाळाजी शिंपी(ढवळे) यांच्या वंशजांनी छत्रपती थोरल्या शाहूमहाराजांच्या स्मृती एका दुर्मिळ चित्राच्या माध्यमातून तब्बल २५०-२८० वर्षे जतन करून ठेवल्या आहेत.
साडेपाच बाय सव्वा आठ इंच आकाराचे हे पुर्ण उन्नत मराठा शैलीतील चित्र छत्रपती थोरले शाहूमहारांच्या तरूणपणातील आहे. राजवाड्यातील एका दालनात एका निवांत क्षणी बैठ्या तख्तावर बसलेले छत्रपती थोरले शाहूमहाराज रेखाटताना त्या अज्ञात चित्रकाराने खुपसे बारकावे टिपले आहेत. शाहूमहाराजांचे मानेपर्यंत रूळणारे काळे केस, आजोबा शिवछत्रपतींसारखे गरूड नाक, वडील छ. संभाजीराजेंसारखी भेदक नजर ही छत्रपती घरण्याची खास वैशिष्ट्ये चित्रकाराने या चित्रात पुरेपुरे उतरवली आहेत.
या चित्रात प्रामुख्याने विटकरी, गुलाबी, हिरवा, पिवळा व सोनेरी रंगाचा वापर करण्यात आला आहे. यातील सोनेरी रंगाचे वैशिष्ट्य असे की, हा रंग अस्सल सोन्यापासून तयार केलेला सोन्याचा वर्ख आहे. चित्रातील गादी, तीन लोडांवरील नक्षी, कानातील कर्णफुले, महाराजांनी घातलेल्या हिरव्या रंगातील पायघोळावरील फुलांची नक्षी,महाराजांना वारा घालणार्या नोकराच्या कानातील कर्णफुले, हातातील तोडे, पंख्यावरील फुलांची नक्षी यासाठी वापरलेला सोन्याचा वर्ख आजही आहे तसाच आहे.
हे दुर्मिळ चित्र देशप्रेमाचा प्रदिर्घ इतिहास लाभलेल्या व छत्रपती घरण्याशी अढळ निष्ठा असलेल्या ढवळे घराण्यातील शशिकांत भालचंद्र ढवळे यांनी अत्यंत प्राणपणे जपले आहे.
#हिंदनृपती.
#शाहूशाही.
#शाहूपर्व.

माहीती साभार : Gurudas Adagale व तरूण भारत,सातारा.

◆◆ श्रीमंत महाराणी बाकाबाईसाहेब भोसले ◆◆◆

◆◆ श्रीमंत महाराणी बाकाबाईसाहेब भोसले ◆◆◆ ________________________________________________
इतिहासामध्ये अनेक अशी व्यक्तिमत्वे आहेत जी आपल्या भारतीयांच्या व्यक्तिपूजक स्वभावामुळे इतिहासातच लपून बसली आहेत. महाराष्ट्राचा इतिहास म्हणले की आम्ही शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज इथे अडकून पडलो.
आपल्या इतिहासामध्ये जिजाऊमाँसाहेब आपल्याला माहीत होत्याच, त्यानंतर ताराराणीसाहेब आम्हाला माहीत आहेत. परंतु मराठा राज्याचे रूपांतर साम्राज्यात करणाऱ्या शाहू महाराजांच्या आईसाहेब आणि संभाजी महाराजांच्या पत्नी "त्यागमूर्ती येसूबाईसाहेब" आमच्या लोकांना माहीत नव्हत्या ज्या आत्ता कुठे माहीत झाल्या. अहिल्याबाई होळकर आहेत, दुसऱ्या जिजाबाई साहेब आहेत अशा अनेक पराक्रमी स्त्रिया ज्यांनी इतिहासाला कलाटणी देणारे कार्य केले. परंतु अशा अनेक स्त्रिया अजूनही आहेत ज्यांचा इतिहास आम्हा सामान्य माणसाला माहीत नाही. अशाच एक पराक्रमी स्त्रीची ओळख या लेखातून मला करून द्यावीशी वाटली (इतिहास अभ्यासक आणि संशोधकांना नक्कीच माहीत असेल पण सामान्य माणसांना माहीती व्हावे म्हणून ही पोस्ट) त्या पराक्रमी स्त्रीचे नाव म्हणजे "श्रीमंत महाराणी, बाकाबाईसाहेब भोसले" !! ________________________________________________
मराठ्यांच्या इतिहासात नागपूर हे ठिकाण खूप महत्वाचे. नागपूरचे राज्य स्थापन करणारे प्रथम रघुजीराजे भोसले. ज्यांनी स्वकर्तृत्वावर प्रचंड दौलत निर्माण केली. त्यांना चार मुले होती. परंतु त्यांच्यातील भाऊबंदकमुळे भोसल्यांच्या सत्तेचा रघुजीकालीन दबदबा राहिला नाही. यामुळे ओरिसा-बंगाल भागाकडे दुर्लक्ष झाले आणि इंग्रजांना बंगालमध्ये आपली सत्ता बळकट करता आली. दुसरे रघुजी भोसले (इ.स. १७८८ ते इ.स. १८१६) यांच्या काळात १८०३ पर्यंत भोसल्यांच्या सत्तेचा सुवर्णकाळ होता.वर्धा नदीपासून ते ओरिसातील सुवर्णरेखा नदीपर्यंत आणि उत्तरेला नर्मदापासून ते थेट गोदावरीपर्यंत भोसल्यांच्या एकछत्री राज्य होते. परंतु दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात (इ.स. १८०३) रघुजीराजांचा पराभव झाला आणि भोसल्यांच्या बराचसा मुलुख इंग्रजांना द्यावा लागला.
दुसऱ्या राघोजीराजांच्या मृत्यूनंतर (२२ मार्च १८१६) त्यांचा मुलगा परसोजी यांच्या अपंगत्वामुळे भोसले दरबारात वाद निर्माण झाला. कार्यकारी शासक (रिजंट) कोण असावा म्हणून बाकाबाईसाहेब व दुसऱ्या रघुजीराजांचा पुतण्या आप्पासाहेब यांच्यात स्पर्धा सुरू झाली. बाकाबाईसाहेब या दुसऱ्या रघुजीराज्यांच्या तिसऱ्या पत्नी होय. परसोजी यांना १४ एप्रिल १८१८ रोजी समारंभपूर्वक सिहासनावर बसवण्यात आले. परंतु, २७ मे १८१८ रोजी परसोजींनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा तह केला आणि नागपूर राज्याचे स्वतंत्र गमावले.
१८१८ ते १८५३ हा काळ खूप वेगवेगळ्या वळणाने सजलेला आहे ज्यामध्ये बाकाबाईसाहेब यांना कैद झाली अनेक संकटे आली. ११ डिसेंबर १८५३ रोजी तिसरे रघुजीराजे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी कोणालाही दत्तक न घेतल्यामुळे लॉर्ड डलहौसीला राज्य खालसा करण्याची संधी मिळाली. बकबाईंनी राज्य वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले अनेक इंग्रज अधिकाऱ्यांना पत्रे पाठवली अनेक शिफारसी केल्या. इतकेच नव्हे तीन वकील लंडनला पाठवले. परंतु त्यांचे सर्व प्रयत्न फसत चालले होते.
बाकाबाईसाहेब यांची कारकीर्द ४० वर्षांची. त्यांचा जन्म २ मार्च १७८१ रोजी चांदुर तालुक्यातील शंकरपूर येथे झाला. वडिलांचे नाव विठुजी व आईचे नाव राजकुवर असून आडनाव महाडिक होय. त्यांचे लग्न दुसऱ्या रघुजीराजांसोबत १७९० साली झाले. रघुजीराजांचे हे तिसरे लग्न होते. दुसऱ्या रघुजीराजांनंतर आप्पासाहेब उर्फ मुधोजी भोसले यांच्या गादीवर बसण्याच्या महत्वकांक्षेच्या आड बाकाबाईसाहेब भिंत म्हणून उभ्या होत्या. परंतु बाकाबाईसाहेबांना शह देण्यासाठी आप्पासाहेब व त्यांच्या दरबाऱ्यांनी तैनाती फौज स्वीकारली व नागपूर राज्य खालसा होण्याच्या पायरीवर नेऊन ठेवले. यावेळी बाकाबाईसाहेबांची भूमिका तत्कालीन परिस्थितीशी मिळते-जुळते घेऊन राज्य वाचवले व त्यांच्यामुळेच तिसरे रघुजीराजे इंग्रजांच्या मदतीने गादीवर येऊ शकले. राजा अल्पवयीन असल्याने बाकाबाईसाहेबांना अंतर्गत कारभार सांभाळण्याची मुभा मिळाली व त्यांनी उत्कृष्टपणे सांभाळला. १८२६ नंतर राजा सज्ञान झाल्यानंतरही १८३२ पर्यंत राज्यकारभारावर बाकाबाईसाहेबांची पकड होती ही गोष्ट रेसिडन्ट ग्रोमेनी मान्य केले आहे.
बाकाबाईसाहेब यांच्यावर इतिहासात अनेक गैरसमजुती व आरोप आहेत त्यांना एक वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून सदैव दाखवण्यात आले परंतु तत्कालीन राजकीय परिस्थिती पाहता आणि त्याचे गांभीर्य पाहता बाकाबाईसाहेब यांची भूमिका समजून येते आणि बाकाबाईसाहेब यांच्या कार्याचा व कर्तृत्वाचा इतिहासावर अमीट ठसा उमटला आहे हे आपणास नाकारता येत नाही.
तिसऱ्या रघुजीराजांच्या मृत्यूनंतर राज्य कोणाकडे सोपवायचे असा प्रश्न ज्यावेळी पडला त्यावेळी मॅनसेलने बाकाबाईसाहेब यांच्याबद्दल पुढील उद्गार काढले -
"Undoubtedly the person most competent to rule the country under any such modified condition is the "Banka Baee" the widow of the second Rughojee. Thought 75 years of age. She is still in the full possession of her intellects everything she has every done or said favour. She is really superior women of good feeling and good sense. There is no one in the state from her position in Mr. Jenkins time and from her personal character so capable of conducting the government as her self." ________________________________________________
बाकाबाईसाहेब यांच्यावर संशोधनात्मक लेखन डॉ. अंधारे यांनी केले आहे. आणि तत्कालीन सर्व कागदपत्रे, इंग्रजी दफ्तर, अप्रकाशित मूळ साधने, इंग्रज-मराठे पत्रव्यवहार अशा अनेक अस्सल कागदपत्रांच्या आधारे बाकाबाईसाहेब यांचे चरित्र डॉ. अंधारे यांनी मांडले आहे. बाकाबाईसाहेब यांच्या कार्याची माहिती घ्यायची असेल तर हे पुस्तक नक्की वाचावे.
साभार प्रशांत लवाटे पाटिल संदर्भ : श्रीमंत महाराणी बाकाबाईसाहेब भोसले. लेखक: डॉ. भा. रा. अंधारे. हिन्दी मराठी प्रकाशन - नागपूर.

बारामतीचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिर

बारामतीचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिर

बारामतीचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्देश्वर मंदिरास नुकतीच 840 वर्षे पूर्ण झाली. शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांपासून ते कविवर्य मोरोपंतापर्यंत अनेक युगपुरुषांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेले हे मंदिर बारामतीच्या वैभवशाली ऐतिहासिक परंपरेचे आजही साक्षीदार बनलेले आहे.

इ.स.पूर्व 1137 मध्ये राज रामदेवराव यादव यांनी या मंदिराच्या उभारणीचे काम हाती घेतले, चाळीस वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर महादेवाचे श्री सिध्देश्वर मंदिर साकारले. अखंड लिंग व अखंड दगडातील अत्यंत सुंदर नंदी हे या मंदीराचे वैशिष्टय. नंदीचे सर्व दागिनेही दगडातच कोरलेले आहेत, समोरुन नंदीकडे पाहिले तर त्याचा एक कान तुमच म्हणण ऐकतो आणि दुसरा कान महादेवाकडे आहे, जणू तुमच्या मनातील इच्छा महादेवापर्यंत पोहोचविण्याचे कामच तो करतो असा भास होतो.

या मंदिराच्या कळसामध्ये एक गुप्त लिंग होते व एक पाण्याच्या टाकीची सोय आहे. गुप्त लिंग आता तेथून काढून ठेवण्यात आले आहे, मात्र त्या काळातही वास्तूकला किती आधुनिक होती हे मंदीराकडे पाहिल्यावर जाणवते.
औरंगजेबाच्या काळात शहाजी महाराजांकडे व त्यांच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्यांच्याकडे हे मंदिर होते. त्या नंतर पहिले बाजीराव पेशवे यांनी पांडुरंग दाते यांच्याकडे या मंदिराची व्यवस्था सुपूर्द केली. तेव्हापासून दाते कुटुंबिय आजतागायत सिध्देश्वर मंदिराची दैनंदिन व्यवस्था पाहतात.
सन 1723 मध्ये बाळाजी विश्वनाथ भट यांनी मोडी भाषेत एक सनद लिहून ठेवली होती, जी आजही उपलब्ध आहे. त्यात मंदिराचा इतिहास नमूद आहे. संत ज्ञानेश्वर या मंदीरात नेहमी येत असत. त्यांनी येथे एका गणपती मूर्तीची स्थापना केली, त्यांच्या हातांचे व बोटांचे ठसे असलेला एकमेव दगड या मंदीरात आजही आहे. संत तुकाराम महाराजांचेही वास्तव्य येथे होते, या शिवाय कविवर्य मोरोपंत व श्रीधरस्वामींनी या मंदीराच्या आवारात बसून विपुल लेखन केलेले आहे. पूर्वी तुकाराम महाराजांच्या पालखीचे वास्तव्य याच मंदीरात असे.
मंदिराची वैभवशाली परंपरा...
बारामतीचे श्री सिध्देश्वर मंदीर ही वैभवशाली ऐतिहासिक परंपरा आहे, याचे जतन करण्याचा आम्ही प्रयत्न सातत्याने करतो. सर्वांची यात आम्हाला साथ मिळते आहे.
इथे तालुक्यात ऐतिहासिक असे शिवकालीन आणि काही शिवपुर्व काळातील सरदार काटे देशमुख ,काकडे ,वाबळे,रसाळ,भापकर,निंबाळकर,खलाटे,देवकाते,आटोळे, जगताप ,कोकरे तसेच पेशवे कालीन काळे ,बाबूजी नाईक यांची वतनी गावे आहेत

- समीर दाते, मुख्य विश्वस्त, श्री सिध्देश्वर मंदीर, बारामती.

पिलिव चे जहागीरदार भोसले




पिलिव चे जहागीरदार भोसले

सातारा-पंढरपूर मार्गावर अकलूजपासुन ३२ कि.मी तर सोलापुर महामार्ग इंदापुरपासून ६० किमी वर पिलीव नावाचे छोटेसे गाव आहे. पिलीव गावातुन दिसणाऱ्या गावाच्या मागील लहानशा टेकडीवरच पिलीवचा किल्ला आहे. किल्ला सुस्थितीत असुन किल्ल्याच्या आत आजही किल्लेदाराचे वंशज राहत आहेत. साधारण १.५ एकरात वसवलेला हा किल्ला दोन भागात विभागलेला असुन आयताकृती आकाराच्या या किल्ल्याचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख आहे. गडात प्रवेश करण्यापुर्वी दरवाजाच्या डावीकडील तटबंदी समोरच चुना मळण्याची दोन घाणी दिसुन येतात तसेच डाव्या बाजूस बुरुजाच्या अलीकडे तटबंदीपासुन बाहेर काढलेला एक आयताकृती सज्जा दिसतो. त्याला खालील बाजुस झरोके आहेत. काळ्या-तांबूस पिवळसर दगडांनी बांधलेल्या तटबंदीत हा सज्जा उठुन दिसतो. बुरुजांवर व तटबंदीवर जागोजागी मारगीरीसाठी जंग्या ठेवलेल्या आहेत. मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूच्या तटासमोर एक लहानशी कमरेइतक्या उंचीची भिंत आहे. येथे कधीकाळी एखादी खोली असावी. किल्ल्याच्या तटबंदीत एकुण दहा बुरूज असुन चार टोकाला चार भव्य बुरूज व उरलेले सहा मध्यम आकाराचे बुरूज तटबंदीत अशी याची रचना दिसुन येते. किल्ल्याचे एकुण बांधकाम पहाता किल्ला बांधताना अर्धवट सोडुन दिल्याचे दिसुन येते. किल्ल्याचा एकुण आकार पहाता किल्ल्याचा मुख्य दरवाजा या बांधकामाशी विसंगत वाटतो शिवाय दरवाजाच्या उजवीकडील बुरूज अर्धवट बांधलेला वाटतो शिवाय येथील बांधकामात चुना भरण्याचे काम राहून गेले आहे. किल्ल्याच्या या दरवाजातून आत आल्यावर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यासाठी असणाऱ्या देवड्या पहायला मिळतात. दरवाजासमोरच एक पडझड झालेली वास्तू आहे. या वास्तूच्या आत शिरुन उजव्या बाजुस गेल्यास आपण किल्ल्याच्या दुसऱ्या भागात पोहोचतो. या तटबंदीत असणाऱ्या बुरुजाखाली एक कोठार असुन त्याला आत हवा व प्रकाश येण्यासाठी दोन झरोके आहेत. बुरुजाखालील या खोलीत रचना या भागातील टेहळणीसाठी असावी असे वाटते. हा बुरुज पाहून पुन्हा दरवाजाकडे येऊन डाव्या हाताला थोडेसे चालत गेल्यावर तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. या पायऱ्यांनी तटबंदीवर फेरफटका मारून या भागातील तीनही बुरुजावर जाता येते. इथे मधल्या बुरुजावर एक ४ फुटी छोटी तोफ दिसुन येते.

अगदी पुढे टोकाला दिसणाऱ्या बुरुजावर जाण्यासाठी एका लहानसा दरवाजा असुन वाकुन पायऱ्यांनी या बुरुजावर जाता येते. या बुरुजाचा घेर साधारण ३६ फुट असुन बुरुजावरील ५ फुट उंचींच्या तटबंदीत जागोजागी जंग्या व तोफांसाठी झरोके केलेले आहेत. या बुरुजापुढील तटबंदी कोसळली असल्याने आपल्याला येथुनच मागे फिरावे लागते. किल्ल्याच्या इतर तीन भव्य बुरुजांवर जाण्यासाठी असेच अरुंद दरवाजे असुन तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्या कोसळल्या असल्याने तेथे जाता येत नाही. या बुरूजावरून किल्ल्याचा संपुर्ण परीसर दिसुन येतो. किल्ल्याच्या मध्यभागी एका प्रशस्त वाड्याचे चौथरे नजरेस पडतात. किल्ल्याच्या इतर भागात खाजगी मालमत्ता व वस्ती असल्यामुळे तिथे जाता येत नाही पण नव्या बांधकामात किल्ल्याचे मूळ अवशेष नष्ट झाले असावेत.

किल्ल्याचा हा भाग पाहुन झाल्यावर पुन्हा मूळ वाटेवर येऊन थोडे पुढे गेल्यावर वाटेच्या डाव्या बाजूने खाली उतरल्यास तटबंदीला लागुनच खाली उतरणाऱ्या पायऱ्या आहेत.या पायऱ्यांच्या शेवटी असणाऱ्या लहानशा दरवाजातून किल्ल्याच्या दुसऱ्या भागात जाता येते. किल्ल्याचा हा भाग मूळ किल्ल्यापासून पुर्णपणे अलिप्त असुन संपुर्णपणे तटबंदीने वेढलेला आहे. या भागात असलेल्या तटबंदीवर जाणाऱ्या पायऱ्या असुन मध्यभागी एक सुंदर दगडी बांधकाम असलेली अष्टकोनी बारव आहे. या विहीरीत उतरण्यासाठी पायऱ्या असुन पायऱ्यांच्या शेवटी एक सुंदर कमान आहे. किल्ल्याच्या या भागातील कोपऱ्यात असणाऱ्या बुरुजावरून किल्ल्याबाहेर पडता येते. येथे किल्ल्याच्या बाहेरील बाजुस दोन बुरुजांच्या मधील भागात म्हसोबाची घुमटी असुन ते किल्ल्याची क्षेत्रदेवता आहे. येथे आपली गडफेरी पूर्ण होते.

संपुर्ण गड फिरण्यास एक तास पुरेसा होतो. या किल्ल्यात फिरताना आमची भेट किल्ल्याचे मुळ मालक व जहागिरदारांचे वंशज श्री.पेरसिंग जयसिंगराव जहागीरदार यांच्याशी झाली व त्यांच्याकडे असलेली मराठा काळातील तलवार,भाला,दांडपट्टा यासारखी शस्त्रास्त्रे आम्हाला पहायला मिळाली इतकेच नव्हे तर त्यांनी आम्हाला फलाहार करवुन आमचा पाहुणचार केला व जातीने आम्हाला संपुर्ण किल्ला फिरवला.

जहागीरदार यांचे मूळ नाव भोसले असुन ते थेट अक्कलकोट भोसले घराण्याशी संबधित आहेत.
लोखंडे हे पिलीव चे जहागीरदार. पारद गावचे पाटील सयाजी लोखंडे यांना 3 मुले होती, सयाजी लोखंडे यांच्या मृत्यू नंतर त्यातील राणोजी लोखंडे यांना शाहूंच्या मांडीवर दिले गेले, तेच फत्तेसिहं भोसले. अक्कलकोट चे राजे
त्यांच्या बंधूंना (फत्तेसिंह यांच्या) पिलीव ची जहागिरदारी दिली गेली.
अक्कलकोट चे दुसरे राजे शहाजी भोसले हे पिलीव च्या लोखंडे यांच्याकडून दत्तक घेतले गेले होते.

शहाजी भोसले यांना 2 मुले
१. फत्तेसिंह भोसले( द्वितीय)
२. तुकोजी भोसले

यापैकी तुकोजी भोसले यांना सातारा जिल्ह्यातील कुर्ले हे गाव इनाम दिले गेले, तेच हे आजचे राजाचे कुर्ले!!
त्यांनी सांगितलेल्या इतिहासानुसार जहागीरदार घराण्याच्या मुळपुरुषाने छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात हा किल्ला बांधला. हि गढी नसून एक भक्कम भुईकोट किल्ला आहे. स्वराज्यातील सातारा कोल्हापूर भागावर मोगल सैन्याचे विजापूर-सोलापूर मार्गे होणारे आक्रमण थोपवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला. सदर किल्ला हा सध्या त्यांच्या जहागीरदारांच्या वंशजांच्याच अखत्यारीत आहे. किल्ला बांधून पुरा होत असतानाच कुठल्याशा लढाईत जहागीरदार यांच्या घराण्यातील मूळपुरुषाने प्रचंड पराक्रम गाजवला परंतु दिवाळी दरम्यान झालेल्या या लढाईत त्यांना वीरमरण आले व त्यामुळे किल्ला काही प्रमाणात बांधायचा राहून गेला. तेंव्हापासून या जहागिरदारांच्या वाड्यात दिवाळी साजरी केली जात नाही व दिवाळीला रोषणाई केली जात नाही. गडाचा यापेक्षा अधिक इतिहास उपलब्ध नाही.--------------

साभार
सुरेश निंबाळकर
प्रसाद चव्हाण
फोटो trekitshitiz

पतंगरावजी जाधवराव यांच्या समाधीचा शोध

पतंगरावजी जाधवराव यांच्या समाधीचा शोध:
चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याशी सव्वातीनशे वर्षांनंतरही अस्तित्व टिकून,इतिहासाला उजाळा
मराठ्यांच्या अनेक लढायांचा साक्षीदार असलेल्या चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या जांब-किकली गावात स्वराज्याचे सेनापती धनाजी जाधवराव यांचे थोरले पुत्र पतंगरावजी यांच्या समाधीचा शोध लागला
: मराठ्यांच्या अनेक लढायांचा साक्षीदार असलेल्या चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या जांब-किकली गावात स्वराज्याचे सेनापती धनाजी जाधवराव यांचे थोरले पुत्र पतंगरावजी यांच्या समाधीचा शोध लागला आहे. समाधी सव्वातीनशे वर्षांपूर्वी बांधल्याचे मत इतिहासप्रेमींनी व्यक्त केले.
चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्यास मोगल सरदार हमीदउद्दीन खानाच्या सैन्यासोबत सेनापती संताजी घोरपडे यांच्या तुकडीची लढाई झाली होती. यावेळी संताजी घोरपडे यांच्या सैन्यात असलेले पतंगरावजी जाधवराव मोगलांकडून मारले गेले. या युद्धाचे वर्णन सेतुमाधवराव पगडी अनुवादित, ‘मोगल दरबाराची बातमीपत्रे’ यात आढळते. ९ सप्टेंबर १६९५ रोजीच्या मोगल बातमीपत्रात ‘हमीदउद्दीन खानाने चंदनवंदन किल्ल्याखालच्या वाड्या जाळण्यासाठी फत्तेहुल्लाखान याला पाठविले होते. संताजी यांना ही बातमी समजली. ते फत्तेहुल्लाखानावर चालून आले.
हमीदउद्दीन खानही तेथे पोहोचला. युद्ध झाले. धनाजी जाधवांचा मुलगा, एक मराठा सरदार व अनेक काफर सैनिकांचा पराजय झाला. गनीम किल्ल्यात जाऊन बसले. खानाने किल्ल्याखालील पेठा जाळून टाकल्या व गुरेढोरे पकडली. या लढाईत धनाजी जाधवरावांचे पुत्र पतंगरावजी जाधवराव मारले गेले.’ असे नमूद केले आहे.जांबच्या पूर्वेस, कृष्णा मंदिरासमोरील बागेच्या विहिरीजवळ शेतात पतंगरावजी जाधवराव यांची समाधी आहे. बांधकामाची शैली जाधवराव घराण्याच्या इतर समाधीप्रमाणेच आहे. या समाधीचा शोध वीरगळ अभ्यासक अनिल दुधाने, इतिहास अभ्यासक दामोदर मगदूम-नाईक, अजय जाधवराव, राजनरेश जाधवराव, रमेश चंदनकर तसेच जामचे इतिहासप्रेमी संकेत बाबर यांच्या प्रयत्नाने लागला. जिजाऊंचे खापर पणतू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ यांचे धनाजी जाधवराव हे पणतू तर पतंगरावजी जाधवराव हे खापर पणतू होत. छत्रपती राजाराम महाराज यांनी धनाजी जाधवराव यांना ‘जयसिंगराव’ हा किताब बहाल केला.
By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, June 29, 2018 11:17pm सचिन काकडे । सातारा

मोहोळ परगणाचे गायकवाड़ देशमुख


मोहोळ परगणाचे गायकवाड़ देशमुख

औरंगजेब बादशहा च्या इस्लाम पुरी तळावरील तसेच पुढील मोहिमेवर " भास्करराव हरकारा " याचा उल्लेख पुन्हा. पुन्हा येतो.
भास्करराव हरकारा स्वत तर बादशहा च्या सेवेत होताच. शिवाय त्यांची दोन मुलें किशनराव .व शंकरराव ही बादशही सेवेत जुलैच्या य1694 ले हजार झालीहोती.
भास्करराव हरकारा यास या भागातील रास्त. मार्ग.किल्ले. गडकोट यांची चागंला माहिती असावी असे दिसते .बादशहा सन 1699 च्या नोव्हेंबरात पन्हाळगडच्या वाटेवर होता.अधाप तो या गडावर पोचलो झालेली नव्हते. बादशहा औरंगजेब आमणपूर . ( ताराबाईसाहेब.तास गाव .जिल्हा सांगली )येथे होता.त्यांस भास्कर राव पन्हाळागड किती दूर आहे याची विचारणा केला. त्यावेळी भास्कररावाने पन्हाळगड 9 कोसावर आहे अशी माहिती औरंगजेब बादशहा ला दिली .
हिचा गोष्ट पुढे वसंतगडच्या अंतर किती आहे असे बादशहा ने भास्कर राव यांना विचारले .यांवरून भास्कर राव हरकारा यांना त्या भागाची भौगोलिक माहिती चागंला होती असे दिसते .बादशहाने पुढे सातारगडाचे मोर्चा लावले .हे मोर्चा आणि त्या जागा कोणत्या बाजूला आहेत यांची माहिती भास्कररावनेच बादशहाला त्याने विचारणा केल्याने य5 डिसेंबर 1699 ला दिले ली आहे असे उल्लेख आहे. भास्करराव हरकारा यास 21 जुर्ले 1700 रोजी औरंगजेब बादशहा च्या नाराजीचाही सामना करावा लागले .परशुरामपंत प्रतिनिधी व रामचंद्रपंत अमात्य यांची वकील शहाजादा आज्जमकडे गुप्त वाटाघाटी करण्यासाठी आले.अशी वाटाघाटीना शहाजादाने नकार दिला .या वकीलाना त्यांना छावणी बाहेर केली .सदर वकील हे भास्करराव च्या छावणीत गेले व भास्करराव यांना त्यावेळी आपल्या छावणीत आशय दिले .हे गोष्ट औरंगजेबाला त्याच्या गुप्त हेल कडुन समजले तेव्हा त्यांना भास्करराव हरकारा यांचा 200 शी चे मनसबदारी होते औरंगजेबाशी 50 ने कमी केला .कारण मराठयाचे वकील भास्करराव हरकारा यांचा आपल्या घलीत ठेऊन घेतील पन्नास नेतृत्व कमी केला .खरी तर महाराणी ताराबाईसाहेब यांच्या मार्गदर्शन खाली वरीलपैकी वकील वाटाघाटी साठी आलेत यां वकीलना भास्करराव यांना आपल्या छावणीत आशय कशीसाठी दिले कोण होते भास्करराव हरकारा हे पुढील देऊ पण वाटाघाटी करून झुलफखराखान यांना रायगडावर महाराणी युसेबाई व बाल शाहू व महाराणी सकवरबाई ( छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी ) कैदी होत्या त्याच्या सुटकेसाठी वरील वकील गुपचुप औरंगजेबच्या छावणीत आलेत .भास्करराव यांना घालावे शिक्षाबाबत सियादतखान मध्यस्थी केला भास्करराव निरापराध आहे असे सागंतील तेंव्हा भास्कर राव माझ्या सोबत राहिल असे फर्मान औरंगजेबानी सोडले .बादशहा चा मुक्काम समय (येरला) ई ला नदीवर .आबंवडा .येथे होते .
बादशहा ए मुक्कामाला पुढे निघाणेपुर्वो पुढील मुक्काम कोठे करावयाचा यांचाही सल्ला भास्करराव हरकारा कडुन घेता. विशालगडास मोसिम संपवून औरंगजेबा बादशहा माघारी फिरवला .23 जून 1702 रोजी मलकापुर येथे पावसामुळे मुल फौजा व बादशहाचे हाल हाल झाले .बादशहा चा शय्यागृहाचा तंबू पावसाने गळू लागले .बादशहा च्या अंगावर पाऊस चे पाणी आले रात्री भर जागरणे केली .नोकर लोकांना तंबू च तणाव मजबूत बाधंल्या नाही म्हणून हमीदुदीनखान यांना शय्यागृहाचे तणावाला स्वतःची ओढून मजबूत बांधली. हमीद्दुदीनखान वर नाराजी होऊन बादशहा ना भास्करराव हरकारा यास विचारले की पावसाची त्रास होणार नाही असे पुढील मुक्काम चे ठिकाण कोणत हे सुचविण्यासाठी सागंतील तेव्हा भास्करराव हरकारा यांना सोयीची होतील अशी तीन ठिकाणे बादशहा ला 24जून 1702 रोजी कलविले.

भास्करराव हरकारा यास मराठा सैन्याच्या हालचाली कशी चालू आहे याबाबत च्या गुप्त बातम्या औरंगजेब बादशहा पोच करण्याची कामगिरी करावी लागते .त्या साठी स्वतंत्र असे 250 चे "जात "ची मनसब वेगळ होती.भास्करराव हरकारा अशा मराठ्याचे सैन्या च्या हालचाली बाबत माहिती देता नाहीत अशी तक्रारी डिसेंबर 1702 ले औरंगजेबानीआले .बादशहा ने अशी तक्रारीचे दखल घेतली व भास्करराव हरकारा यांचा मनसब 50 ने कमी केला .भास्करराव हरकारा यांचा मुलगा किसनराव याची हरकाराच्या कामावर (बातम्या लिहून पाठविणारा) कामावर बादशहाना तैनात केला .दुसरा मुलगा शंकर राव याची मनसब वाढविणारा आले भास्करराव हरकारा यास 250 स्वाराची मनसब होती . मोहोळ परगाणा त्याकाळी मंगळवेढा च्या किल्लेदार मुहंमद आकील यांच्या कक्षेत हे परगाणा होता. किल्लेदार मुहंमद आकील यांना भास्करराव हरकारा यास मोहोळ परगाणा साठी याने मागाणी केला .या मागाणीवर औरंगजेब बादशहानी मोहोळ परगाणा भास्करराव हरकारा यास तनखा य ( पगार ) जहागीर म्हणून 4 आगॅस्ट 1703 रोजी दिला होता . बादशहाने भास्करराव हरकारा यांचा तैनात औरंगाबाद सुभ्यात केला असता .त्याचा ठिकाणी 25 जानेवारी 1704 रोजी निधन पावला . यावेळी त्याचा मुलगा बादशहाने बोलावून पाठिवले . व मोहोळालाा जहागिर येथे अत्यंविधी झाले .भास्करराव हरकारा यास आणखी एक मुलगा कृष्णा त्यास ही औरंगजेबा बादशहाने बोलावून घेतले .त्यास भास्करराव यांच्या निधन नंतर 26 आगॅस्ट 1704 रोजी 4 हो न बक्षीस दिले ...........

भास्करराव हरकारा कोण ?
भास्करराव हरकारा गायकवाड घराण्यातील असावा .शिवाय छत्रपती च्या राणीसाहेब " सकवारबाई" गायकवाडच्या घराण्यातील होत्या . या दोघांचे जवळचे अथवा दूर चे नाते संबंध असावेत . कारण सकवारबाई इस्लामपुरीच्या तळावर छत्रपती संभाजी महाराजांचा पुत्र शाहू महाराजांच्या सोबत होत्या . समाधी - आज मोहोळ बसस्थानक च्या पाठिमागे देशमुखांच्या शेतात इस्लामी पध्दतीने बांधकाम केलेले भास्करराव हरकारा यांचा समाधी आहे .या समाधीले स्थानिक लोक राजे भास्कर ची समाधी म्हणून मानतात . सदर समाधीचे उंची 20 फुट असुन लांबी 25 फुट रूंदी 20 फुट आहे तर जाथ 4 फुट चे आहे . सदर समाधीअवस्था आज आता व बाहेरून मस्जीद सारखे कशीसाठी असे बघितले वर मला वाटते उत्तर - भास्करराव हरकारा च्या निधन नंतर औरंगजेब बादशहा च्या फर्मान नुसार हे समाधी बादशहा खर्चाचे बाधली तसेच सदर जहागिर भास्करराव हरकारा यांचा असेल तर समाधी बादशहा व मोहोळ परगाणा मगलवेढाचे किल्ले दारचे देखरोखी खाली झाले असेल्या म्हणून समाधी इस्लामी पध्दतीने नुसार आता व बाहेरून वाटते .

सदर समाधीचे फोटो इतिहास तील नोंद नुसार मी संतोष झिपरे यांना आमचे मित्र श्री .सुदर्शन मोरे ( वडील .तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर ) सागंतील व समाधीचे फोटो उपलब्ध करून दिले त्याबद्दल आभार सुदर्शन मोरे

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मध्यवर्ती महामंडळ सोलापूर संस्थापक मनोज भाऊ शिंदे सोलापूर संतोष झिपरे 9049760888 पुर्ण माहिती व लेख
संतोष झिपरे 9049760888

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...