विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 29 May 2021

#भोसले #कुळाचा #आनंदमय #क्षण #किल्ले #शिवनेरी




 #भोसले #कुळाचा #आनंदमय #क्षण

लेखनमाहिती :: Goutam Suman Tukaram Davakhar
ही उत्तम अशी चित्ररूप कलाकृति सर्व इतिहास प्रेमी अभ्यासक यांस शिवनेरी किल्ल्यावरील आनंदमय कौटुंबिक क्षण आपणास अनुभवन्यास दर्शविते. भोसले कुळातील हा सर्वोच्च आनंदमय हर्षउल्हासित सोहळा.
हे उत्तम साकारालेले चित्ररूपी कलाकृति
शिवनेरी किल्ल्यावरील 1630 सालातील समकालीन ईतिहासाकडे आपनास प्रवासास नेते व
याची देही l
याची डोळा ll
आपणास १६३० साला मध्ये घेवून जातो. आपण सर्वानी ही अनमोल कलाकृति चित्ररूपी साकरणार्या चित्रकाराचे अत्यंत विनम्रतेने ऋणी असलेच पाहिजे.
यात प्रामुख्याने
स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोंसले
राजमाता जिजाऊ मासाहेब
युवराज संभाजीराजे( शिवरायांचे थोरले बंधू, )
बाल शिवबा
साकारकेल्या प्रतिमा दिसत आहे.
दर्याखानाचा पाडाव केल्यानंतर शहाजीराजे शिवनेरी किल्ल्यावर आले. आपल्या पुत्राचे मुखावलोकन करण्यास अत्यंत आतुरता निर्माण झाली होती.
शिवनेरीवर पोचताच शहाजीराजानी बाळ राजाना आपल्या मांडीवर घेतले. ते एकटक बाळराजांकडे पहात राहीले. त्याना बाळ राजांचे फार कुतुहल वाटले. " रानीसाहेब पहातायना बाळराजे कसे हात हलवताहेत. किती तेजस्वी आहेत आमचे
बाळराजे ! शहाजीराजे जसे बोलत होते , तसे बाऴराजांच्या चेहरर्यावर विलक्षण असे हास्य उमटत होते. शहाजीराजानी मोठ्या प्रेमाने बालराजाना आपल्या हदयाशी धरले. केवढ़े हे प्रेम ! एक राजा आपल्या पुत्राचे मूके घेत होता, त्याच्याकडे एकटक पाहत होता. त्याच्या हृदयात आनंद मावत नव्हता. या आनंदा प्रित्यर्थ शहाजीराजानी आपल्या हर्षभरित अंतकरणाने गायी , सोने , हत्ती, घोड़े, रत्न यांचे दान दिले. त्यानी इतके दान दिले, की त्यानंतर या भागात याचक लोकापैकी कोणालाही किती तरी काळ पर्यंत दुसर्या कोनाकड़े याचना करण्याची गरज राहीली नाही.
शहाजीराजीराजांच्या दरबारातील
समकालीन कवि लेखक परमानंद याने अत्यंत सूरेख वर्णन केले आहे.
" नित्य पराक्रम गाजवनारा तो शहाजीराजा, संभाजीचा धाकटा भाऊ जो कमलनेत्र शिवाजी त्याचे आनंदाने मुखावलोकन करता झाला ll ९४ ll
त्या समयी त्या राजाने आंनदित होवुन गाई, मोहरा , हत्ती, घोड़े, आणि रत्ने ही इतकी वाटली की लगेच सर्व याचक लोकाना दुसर्या कोनाकडे तोंड वेंगाडन्याची पुष्कळ काळपर्यंत आवश्यकता राहिली नाही ll ९५ ll
जय जिजाऊ

कुकडेश्वर मंदिर l ऐतिहासिक क्रांतीची साक्ष



 कुकडेश्वर मंदिर l ऐतिहासिक क्रांतीची साक्ष l

1939 साली महादेव कोळी समाजाची दुसरी बैठक कुकडेश्वर मंदिरात झाली. बैठकित समाजाने असा निर्णय घेतला की,
"ब्रिटिश धारजीन्या सावकारशाहिला तोड़ देन्यासाठी सर्वानी तयार व्हावे आणि सावकार यांच्या विरुद्ध गावोगावी लोकमत तयार करावे "
यातूनच पूढे गावोगावी बैठका झाल्या व रांगड्या मावळयांची टोळी तयार झाली.
त्याचा नायक कोंड्या नवले झाला.
या क्रांतिकारी बंडकरी टोली सावकारांच्या घरावर धाड़ टाकुन प्रथम सावकारांच्या वह्यांची ( कर्ज खतांची ) होळी करित व नंतर रोकड रक्कम व दागिने घेत व मायबाप जनतेस वाटून टाकीत. लोकांच्या लग्न कार्यास मदत करीत.
या क्रांतिकारी बंडकरयानी एकून 13 सावकारावर अहमदनगर, पुणे नाशिक ठाणे रायगड जिल्ह्यात धाड़ी टाकल्या.
1 वसई ता मुरबाड
2 आंबेगाव ता आंबेगाव
3 खैरे ता जुन्नर
4 करंजाले ता जुन्नर
5 झाड़घर ता मुरबाड़
6 किसनसाखळ ता मुरबाड
7 टाकेद ता इगतपुरी
8 नारीवली ता मुरबाड़
9 नांदगांव ता कर्जत
10 कोतुळ आ अकोले
11 फांगुळगव्हाण ता मुरबाड़
12 निर्गुडपाड़ा ता मुरबाड़
13 डोळखांब ता शहापुर
बंडकरी
कोंडाजी हरी नवले
पिलाजी भिकाजी बो-हाड़े
लहू भीकाजी बोरहाडे
अनाजी बुधाजी साबले
पुत्या हीरू सावले
होनाज़ी रामजी साबले
कुश्या ठमा साबले
दगडू लक्ष्मण रढे
सोमा खंडू साबलें
हेमा सखाराम गोडे
जावजी बाला रढे
गणपत रामजी घुटे
कुमा देवजी मोड़क
धोंडू रामा साबले
धोंडी गंगा मराडे
महादु दगड़ू शिंदे न्हावी
सखा केसू कोकने
दला चिमाजी उंबरे
सोमा लुमा उंबरे
रामा सावला कचरे
लक्ष्मन आबा दिघे
रामा तुका शिंदे
मारुती रामजी मेमाने
देवजी सखाराम कालभोर
सोमा तुका कोकाटे
चीमा येसु बुळे
विठू पांडू मूठे
तुका गहीनाजी नवले
अंबु भवारी
भाऊ कृष्णा गोडे
संदर्भ
सहयाद्रितिल आदिवासी महादेव कोळी
लेखक डॉ गोविंद गारे
बबन
बंडखोर कोंड्या नवले
लेखक भाऊसाहेब लांडगे
By
गौतम डावखर
जुन्नरचं बारां मावळ

Friday 28 May 2021

🚩#मराठा #आरमार #दिन 🚩

 

Jai jijau Jay Aadivasi
कल्याण भिवंडी ताब्यात आल्यानंतर शिवरायांनी जहाज बांधणीच्या कामास सुरुवात केली. मराठ्यांच्या विख्यात आरमाराची ही सुरुवात ठरली. ( *शिवरायांचा* *प्रताप* - *अशोक* *राणा* )
कल्याण भिवंडी फिरंगीयावरी स्वारी केली. राजश्री सामराजपंत यांचे चुलतबंधु दादाजी बापू यांस रवाना केले. तेसमयी कान्होजी नाईक याजवळ दादाजी कृष्ण व त्यांचे बंधु सखो कृष्ण मागोन घेतले. त्याबरोबर मावळच्या देशमुखांचा जमाव व मावळे लोक होते .तो अगदी पोख्ता जमाव देवून कल्याणचा नामजाद हवाला दादाजी कृष्ण ( दादा कृष्ण लोहकरे , सखो कृष्ण लोहकरे )यास सांगितला व सखोपंतास भिवंडीचा हवाला सांगितला आणि रवानगी केली.( वा सी बेंद्रे - श्री छत्रपती शिवाजी महाराज )
सखो कृष्ण लोहकरे दादा कृष्ण लोहकरे यांचे बंधु फ़िरंगियाचे युद्ध पडले. ( मृत्युमुखी पडले)
दादाजी रांझेकर यांनी कल्याण तर सखो कृष्ण लोहकरे यांनी भिवंडी एकाच दिवशी स्वराज्यात सामील करून घेतले. (दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास )
अश्विन वद्य द्वादशिस दादजीस कल्याण
भिवंडी राजरश्रीनि घेतले ते समयी बापूजीस
सुभा सांगोन रवाना केले तेव्हा
कान्होजी नाईक जेधे याजपासुन
दादाजी कृष्ण लोहकरे त्यांचे भाऊ
सखो कृष्ण लोहकरे
शके 1579 हेमलंबी संवछर
यांस माग़ोन घेतले आणि दादाजी
पंत यांस कल्याणचा नामजाद हवा
ला व सखोपंतास भिवंडीचा हवाला
सांगितला येथील गोपीनाथ यांनी
आपले भाऊ कान्होजी नाईक जेधे यां
कडील कारभार आम्ही करीत होतो
तैसाच करावा म्हणून हाती दिल्हे
( शिवचरित्रप्रदीप- द वी आपटे स म दिवेकर
जेधे यांची शकावली)
पूर्वी कल्याण- भिवंडी असा संयुक्त प्रांत होता. 1657 च्या सुमारास शिवाजी राजांनी सखो कृष्णा लोहकरे या सेनापतीस पाठवून कल्याण-भिवंडी जिंकून घेतले.
(भिवंडी बयान- सुधीर घनवटकर)
पुण्याखाली 12 व जुन्नरखाली 12 अशी 24 मावळे त्या काळी होती.
शिवनेरी किल्ला मीना व कुकड़ी नदीच्या मध्यवर्ती खोरयात आहे.
नीर म्हणजे पाणी आणि नेर म्हणजे त्या खो-यातील विशिष्टय प्रदेश .
प्रत्येक मावळ म्हणजे नदीचे एक खोरेच होते.
मावळे
मिननेर किंवा मिन्नेर, जुन्नर किंवा कुक्कड़नेर
शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे. शिवाई देवी जुन्नर परिसरातील आदिवासी ठाकर कोळी समाजाची कुलदैवता आहे.
दादा कृष्ण लोहकरे व सखो कृष्ण लोहकरे हे आदिवासी महादेव कोळी समाजाचे लढवय्ये ,पराक्रमी शिलेदार. जुन्नर परगना म्हणजेच जुन्नरचे बारा मावळ. जुन्नर परगन्यातिल महादेव कोळी, ठाकर , भिल्ल समाजाने रक्ताच्या शाईंने स्वराज्यासाठी आपले बलिदान दिले. पण हा इतिहास दुर्लक्षित आहे.
आज इतिहासाची पाने उलगडत आहे.
कोळी चौथरा( शहाजीराजे यांचे कारकीर्दीत 1600 कोळी बांधवांचे शिवनेरी किल्ल्यावर मुंडक्यांचे शिरकाण मोगलानी केले , माहुली तहा नंतर
शिवनेरीवर शाहजीराजांच्या काळात, पेशवे काळात पेशव्याविरुद्ध उठाव.
इंग्रजांविरुध्द जुन्नरमध्ये आदिवासिनच्याच रक्ताचे सड़े पडलेले आहेत.
इतिहास आजही आदिवासी कोळी ठाकर यांच्या इतिहासाची गगनभेदी ललकारी देत आहे.
Wr by
गौतम डावखर
9890296490

धर्मवीर गड पेडगाव

 











धर्मवीर गड पेडगाव

.
हा पेडगाव चा भुईकोट किल्ला बहादूर गड आणि धर्मवीर गड या नावांनी प्रसिद्ध आहे. हा पेडगाव चा किल्ला तसा भव्य नाही पण या किल्ल्यात प्रवेश केल्या केल्या इतिहासातल्या काही घटना डोळ्यासमोर उभ्या राहतात आणि प्रत्येक माणसाच्या अंगावर शहारे आल्या शिवाय रहात नाही .प्रवेश केल्या केल्या समोर शौर्य स्तंभ दिसतो आणि त्या शौर्य स्तंभा समोर नतमस्तक झाल्या शिवाय माणूस रहात नाही.
त्यात त्या कवी कलशांच्या ओळी समोर दिसतात.
यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग|
लहु लसत सिंदुर सम, खुब खेल्यो रणरंग |
ज्यो रवि छबी लखतही खद्योत होत बजरंग|
त्यो तुव तेज निहारी के तख्त तज्यो अवरंग||'
.
या ओळी वाचल्यावर परत एकदा अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही . पण जेव्हा आपण धर्मवीर गडाला भेट देतो तेव्हा तिथली परिस्थिती पाहून आणि गडाची सध्याची अवस्था पाहून खेद वाटतो .
या जागेला एवढा मोठा इतिहास आहे आणि या जागेची झालेली दुर्दशा पाहून मनात नक्की एक विचार येतो की हीच का आपली देशभक्ती ???
अहमदनगर पासून एवढ्या जवळ अंतरावर असूनही किती जणांनी या गडाला भेट दिली असेल??हा प्रश्न दूरच राहतो,ही जागा किती जणांना माहीत असेल? हा प्रश्न मनात घोळत राहतो.
खरचं प्रत्येकानी या किल्ल्याला नक्की भेट द्या .
या किल्ल्यामध्ये ४ प्राचीन मंदिर आहेत आणि या सगळ्या मंदिराची रचना व कोरिवशिल्प काम नक्कीच मनात घर करुन राहत .
गडा शेजारून वाहत असलेल्या भीमा नदीच विहंगम दृष्य पाहून मनाला आल्हाददायक वाटतं.
.
लोकांकडे किती थोडा इतिहास असून त्याला ते भव्य रूप देतात आणि आपल्या या एकाच गडाला एवढा मोठा इतिहास आपण तो जगासमोर आणायचं तर सोडाच त्या इतिहासाची साक्ष देत असलेल्या या गडाची सध्याची अवस्था पाहून आपलीच आपल्याला लाज वाटल्या शिवाय रहात नाही .
-मनीष दाणी
. @mr.clickseeker
@maharashtra_desha @maharashtra_forts @gadkille @gadkot__ @ilovenagar @meahmednagarkar @myahmednagar @maharashtratourismofficial
@history_maharashtra

माने घराण्याचा इतिहास भाग २










 माने घराण्याचा इतिहास

#हस्तपंजरपत्र हा ज्यात लेखकाच्या हाताचा पंजा उमटवला जातो. त्याप्रकारचे एक पत्र #म्हसवड येथे असून त्यावरील हाताचा ठसा #शिवाजीमहाराजांचा आहे असा तर्क आहे. कारण पत्र महाराजांनी लिहिलेलं आहे. सध्या हे पत्र सातारा म्युझियम मध्ये आहे.
पत्र #सरदाररथाजीमाने या सरदारांना लिहिलेलं आहे
हा हाताचा पंजा ज्यावेळी दिला गेला तेव्हा महारा जांचे वय अवघे २०-२२ असावे असा अंदाज आहे. चंदना मध्ये हात बुडवून तो पत्रांवर उमटविला गेला असेल.
पृथ्वीराज माने (सरकार )
म्हसवड चे राजमाने यांचे एतिहासिक वाडे

माने घराण्याचा इतिहास भाग १

 माने घराण्याचा इतिहास


भाग १ 

माने यांचे मूळ म्हसवडच लागतंय रहिमतपूर आणि म्हसवड चे माने एकच म्हसवडचेच सगळी कडे जहागिरी देशमुखी मिळाल्यावर गेलेत सगळ्यांना सिद्धनाथ म्हसवड हेच कुलदैवत कोकण. मराठवाडा. कर्नाटक मध्ये हि तसेच तंजावर मध्ये हि तसेच धार मध्यप्रदेश मध्ये हि आहेत हि सगळी माने म्हसवडला कुलदैवत दर्शनाला येतात 30/35हजार कुटुंबे आहेत 

संताजी घोरपडे यांचेत व म्हसवडकर
माने यांचेत वैर निर्माण झाले होते
अमृत निंबाळकर हे माने यांचे मेहुणे
ते संताजी यांचे कडुन मारले गेले होते
नागोजी माने यांचा जमाव मोठा आहे त्यांना दुखऊ नये वगैरे मजकुराचे पत्र
छ.राजाराम महाराज यांचे आहे
महाराष्ट्रातील मराठ्या पैकी काही
घराणी उत्तरेतुन आली आहेत.त्याचेंत
जानवे घालतात दक्षिणेत देखिल मराठा
घराणी आहेत विषेशत: देशमुख मंडळी
तेजानवे घालत नाहित ते मुस्लीम काळापुर्वी गांवे वसाहती खाली आणित
त्यांचे मध्ये कुळींची नांवे नाहीत .
त्याचे कडील संपत्ती व इतर गोष्टीवरुन
त्यांची नांवे.निगडे ,हांडे,कोंडे,गाढवे,काकडे
काळे ,खुसपे इत्यादी आहेत.
जाधव,माने मोहिते वगैरेना असलेल्या देशमुख्या यवन काळच्या आहेत.
एका आख्यायीकेनुसार मानसिंह नावाचे
व्यक्ती ने माण परिसरात सत्ता स्थापन
केली व त्यावरुन माण नदी व माणदेश
ही नांवे आली
दुसरे मतानुसार माण हा खडक व मुरुम किंवा माती यापेक्षा वेगळा प्रकार आहे
या मध्ये सुरुंग उडत नाही. पण माण
मातीचा थर खूप कठिण असतो व
याचे पाठीवर पाणी असते.
महाराष्ट्रातील मराठा समाज
हा उत्तर दक्षिणेचा संयोग आहे.
म्हसवड भीम बहाद्दर सरकार भोस पूर्वी माने होते
भरपूर ठिकाण च्या मानें च कुलदैवत जोतिबा आहे. काशीळ , कसबा सांगाव.. भिमबहाद्दर माने सरकार क. सांगाव हे सासनकाठी क्र ६ चे मानकरी आहेत जोतिबाचे व वर्ग १ सरदार करविर दरबारातले..
माने नाव अनेक कुळात आहे , पण ज्यांचे देवक पंच पल्लव आहे ते अस्सल राव मराठा कुळी आहेत , हे राव माने कूळ प्रभू रामचंद्र ह्याचे बंधू लक्षुमन ह्यांचे वंशज आहेत , कोकणातील माजी मंत्री श्री रवींद्र माने ह्याच कुळातील आहेत , आणि फक्त ह्याच राव माने कुळाशी श्रृंगारपूर राव सुर्वे कुळाचे सगे सबंध आहेत
माने यांची लोक संख्या ज्या गावात जास्ती आहे तेथील मुख्य घराणे यांचे कडे 
१)म्हसवड माने२)रहिमतपूर माने ३)विसापुर व सावर्डे (सांगली) माने पाटील
४)शिरोळ(कोल्हापुर)भिमबहाधर माने पाटील,
व रूकडी (हातकंलगले) माने
५)वेळापुर (अकलुज) माने देशमुख,
खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले गावात देखील माने आडनावाची 80% लोकसंख्या आहे. पण कोणालाही नवामागचा इतिहास माहीत नाही..
१)कोणतेही माने घराणे मूळचे म्हसवड येथील असते.
२) माने घराण्याची बखर होती व ती ग. ह. खरे यांनी नक्कललेली होती याचा उल्लेख बाळासाहेब माने यांच्या पुस्तकात आला आहे. परंतु राजवाड्यातील मान्यांनी ती ना प्रसिद्ध केली ना कुणा इतिहास अभ्यासकास दिली.
३) कोणत्याही इतिहास संशोधकांना म्हसवडच्या माने घराण्यातील निंबाळकरांनी आपल्या घराण्यातील एकही चिटोरा दाखवला नाही. म्हणून मान्यांचा इतिहास उपलब्ध नाही.
४) सध्याचे वंशज समजले जाणारे राजवाड्यातील माने हे तांदळवाडीचे निंबाळकर आहेत. त्यांना आपले ब्रिटिश कालावधीत केलेले दत्तक पत्र उघडकीस येईल म्हणून ते कुणालाही कागदपत्रे दाखवत नाहीत.
५) मान्यांचा इतिहास उपलब्ध आहे परंतु तो आंधळी मलवडी व खानापूर शाखेच्या घराण्याकडील उपलब्ध कागदपत्रावरून मराठा कुळाचा इतिहास ह्या पुस्तकात आहे.
६) श्रीयुत गोपाळ दाजीबा दळवी ह्या पुस्तकात लिहीतात म्हसवडच्या माने घराण्यास आम्ही अनेक वेळा विनंती केली परंतु त्यांचेकडून कागदपत्रे मिळाली नाहीत.
आम्ही जो इतिहास प्रसिद्ध करत आहोत तो दुसऱ्या शाखेनी पाठवलेल्या कागदपत्रांवरून. त्यांच्या मूळ शाखेचा मान ठेवून आम्ही हा इतिहास प्रसिद्ध करत आहोत.
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे पण माने देशमुख घराणा आहे ते सर्व रहिमतपूरचे घराणा आहे
हिंमत बहाद्दर ही पदवी चव्हाण यांना
आहे.
शिरोळचे माने पाटील यांना
भिमबहाद्दर हा किताब आहे
कराड पासून दक्षिणेला माने गाव आहे, कुंभारगाव, मालदन येथेही माने आहेत
कोल्हापुरात कोडोली पन्हाळा तालुक्यात आहे तेथेही माने आहेत
सांगलीत शिराळा तालुक्यात कोकरुड गावातही माने आहेत


हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...