विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label मराठा वीर पंडित भास्करराम. Show all posts
Showing posts with label मराठा वीर पंडित भास्करराम. Show all posts

Thursday, 19 August 2021

मराठा वीर पंडित भास्कररामचे बलिदान व मराठ्यांचे शौर्य भाग -2

 


मराठा वीर पंडित  भास्कररामचे बलिदान

  व मराठ्यांचे शौर्य भाग -2
भास्करराम पंडित यांनी ज्यावेळी बंगालमध्ये पहिली स्वारी केली ती स्वारी एवढी जबरदस्त होती त्या स्वारीत अलीवर्दीखानाचा पराभव झाला. मुर्शिदाबादेतील व्यापारी  जगतशेठ व तेथील स्थानिक सरदाराकडून चौथाई वसूल केली. मुळातच मराठ्यांच्या मोहिमा या चौथाई वसूल करणे . सर्व भारतीय प्रदेशात परकीयांचा शिरकाव होऊ नये यासाठी  असे. कोणतीही मोहिम काढण्यासाठी  पैसा लागत असे. संबंधित  लोक वेळेवर चौथाई देत नसत .आणि  मराठ्यांकडून युद्धात पराभव झाल्यावर तात्पुरता तह करुन तोडकी रक्कम देत असे. मराठ्यांमध्ये मानवता असल्याने संबंधित  लोकांवर मुघल किंवा  इतर लोकांसारखा अन्याय होत नसे. मात्र मराठ्यांच्या चांगुलपणाचा फायदा हे लोक घेत असे. त्यामुळे पुन्हा पुन्हा हल्ला करावा लागत असे. त्यांतून मराठ्यांना लुटारू वगैरे ठरविण्याचे उद्योग  ब्रिटिश इतिहासकार टॉड यांनी  केले. वास्तविक पाहता  ज्याला महान अकबर म्हणतात . तो अकबरही चौथाई वसूल करत असे. त्याला मात्र कोणी लुटारू म्हणत नव्हते. मात्र इतिहासलेखन करताना मराठ्यांवर अन्यायच झाला आहे. भास्करराम पंडितच्या नेतृत्वाखाली  तीनवेळा ओरिसापासून बंगालपर्यत सर्व ठिकाणी  स्थानिक राज्याचा प्रचंड पराभव झाला.  मराठ्यांनी त्यावेळी जगन्नाथपुरी या हिंदूच्या पवित्र मंदिराला अत्याचार मुक्त केले होते. त्याबरोबर ओरिसातील कोर्णाकचे सुर्यमंदिराची व्यवस्था लावली होती. हे धार्मिक कार्य ही मराठे करत होते. लुटारुसारखे मंदिरांची लूट करणे. मानवी मुंडक्यांचे मनोरे रचणे असले मुघली रित मराठ्यांमध्ये कधी नसून असल्या क्रुर मुघलांना इतिहासात क्लीनचीट मिळाली. आणि  सर्वांचे दुःख समजून घेणारे आपल्या देशाच्या सीमेसाठी प्राणार्पण करणारे मराठ्यांना लुटारु ठरणे हा मोठा अन्याय होता. मराठ्याचा दरारा व दबदबा होता मात्र दहशत नव्हती यांचा प्रत्येकाने काळजीपूर्वक  विचार करणे गरजेचे आहे.    १८व्या शतकात लष्करी बळावर मराठ्यांना हरवणे कोणालाही  शक्य नाही. हे समजल्यावर  अर्लीवर्दीखानाने पंडित भास्करराम  यांना वाटाघाटीसाठी बोलावले होते.३१ मार्च १७४४ पंडित भास्करराम अर्लीवर्दीखानास भेटण्यास तयार झाले.त्यावेळी मुस्तादाखानाने (अर्लीवर्दीखानाचा सेनापती) आपल्या धर्माच्या शपथ्था घेतल्या.भेटीत कोणतेही कपट करणार नाही.  मात्र ज्यावेळी पंडित भास्करराम व  निवड २१ मराठे सरदार अर्लीवर्दीखानाच्या छावणीत दाखल झाल्यावर अचानक हल्ला करुन त्यांची हत्या केली.  विश्वास ठेवल्यावर विश्वासघात करण्याची रीत ही त्यांची फित्तरत येथे सोडली नाही हेच खरे. ! रघुजी व जानोजी भोसले यांना पंडित भास्करराम  यांच्या हत्येने मोठा धक्का बसला. या हत्येचा बदला घेण्याचा ध्यास त्यांनी  घेतला.१७४८ मध्ये रघुजी भोसले यांनी स्वारी करुन पूर्ण ओरिसावर कब्जा केला. बंगालवर स्वारी करुन भास्कर पंडित यांच्या हत्येचा बदला घेतला. पंडित भास्करराम यांचे बलिदान मात्र द्यावे लागले. मराठ्यांचे घोडे फक्त अटकच नव्हे तर थेट बंगालपर्यत गेले होते. त्यामुळे मराठे पुढे येऊ नये म्हणून  ब्रिटिशांनी  मराठा डीच म्हणजे खंदक तयार केले. ज्या इंग्रजांच्या साम्राज्यावर  सुर्य मावळत नव्हता. त्या इंग्रजांनी मराठ्यांशी लढणे टाळले होते. यातून मराठ्यांच्या शौर्याचे दर्शन घडते. 

--- प्रशांत कुलकर्णी  मनमाड



संदर्भ- 
श्री.प्रकाश लोणकर -इतिहासाच्या पाऊलखुणा
१-मराठ्यांचा इतिहास,खंड १ व २-संपादक अ.रा.कुलकर्णी व ग.ह.खरे.,२ मराठी रियासत-गो.स.सरदेसाई,खंड ४,व प्रा.सदानंद मोरे यांचा ०४-०७-२०१४ ला दैनिक लोकसत्तातील लेख-( मराठ्यांचा) दरारा,दबदबा कि दहशत? हा लेख)

मराठा वीर पंडित भास्करराम व मराठा डीच लेन भाग-१

 

प्रसिध्द मराठा डीच लेन !


मराठा वीर पंडित भास्करराम व 

मराठा डीच लेन भाग-१

यहाँ के पच्चास -पच्चास कोस दूर गाँवमें जब रातको बच्चा रोता है तो उसकी माँ कहती है . बेटे सो जा नही तो भास्कर पंडित आयेगा....... अशाप्रकारचे वर्णन बंगाली लेखक  गंगाराम यांनी "महाराष्ट्र पुराण " नावाच्या प्रदीर्घ  ग्रंथात मराठा सैनिकांबाबत केले आहे.पंडित भास्करराम  कोल्हटकर नावाचा मराठा वीर एवढा शूर होता त्याचा  १७४२-४४ या काळात बंगालमध्ये जबरदस्त  दबदबा होता. त्याकाळातील बंगाल म्हणजे  आजचा बिहार ,ओरिसा , पश्चिम बंगाल व संपूर्ण  बांगलादेश होय. आता  पंडित भास्करराम कोण ? हे महाराष्ट्रातील  ब-याच लोकांना  माहित नाही. त्यामुळे तमाम भारतीयांना माहित असणे शक्य नाही. त्याला कारण म्हणजे  याबाबत ऐतिहासिक  दस्तऐवज  ओडियो ,बंगाली भाषेत मिळतात. मराठी भाषेत याबाबत विशेष  माहिती मिळत नाही. अगदी गुगल व यूट्यूबही   पंडित भास्कररामबाबत माहिती मिळत नाही.  त्यामुळे याबाबत पोस्ट लिहिण्याचे ठराविल्यावर मलाच संदर्भासाठी भरपूर  मेहनत लागली तेव्हा त्याबाबत काही माहिती मिळाली .  पंडित भास्करराम यांचे वडील रामजी नारायण  हे वाई प्रांतातील  पांडवानगर येथील  वतनदार देशमुख होते. नागपूरचे भोसले घराण्याचे मुळ पुरुष मुधोजी भोसले होते.   मुधोजी भोसले व रामजी नारायणहे जीवलग मित्र होते. मुधोजींना तीन पुत्र होते त्यांची नावे

 बापुजी ,परसोजी व साबाजी  होय. भोसले परिवार कोयना नदीच्या तीरावरा भैरवगड येथे राहत असे. एकदा जंजिरांच्या सिद्धीने भोसले बंधूना कैदेत टाकले. त्यावेळी तीनही बंधूना  रामजी नारायण यांनी  ३००० रुपये  दंड भरुन मुक्त केले. अगदी पूर्वीपासून कोल्हटकर  व भोसले घराण्याचा घरोबा होता. बापुजीँचे पुत्र रघुजी भोसले जे नागपूरच्या संस्थानाचे संस्थापक होय.इ.स. १७३० मध्ये रघुजींना व-हाड , गोंडवनची सनद मिळाली. त्यांच्या शौर्यामुळे सेनासाहेब  सुभा हा किताब मिळाला.  रघुजींच्या सैन्यात रामजी नारायण यांचे दोन पुत्र भास्करराम व को-हेराम  होते.पंडित भास्करराम यांचे उपजत लष्करी  गुण पाहून रघुजी भोसले यांनी त्याला आपल्या  सैन्याचा सेनापती बनवले, छत्रपती  शाहू महाराजांनी  रघुजींना अर्काटचा नवाब दोस्त महमंद व त्यांचा जावाई चंदासाहेब यांचा बंदोबस्त  करण्याचा हुकूम दिला. त्यावेळी या पहिल्या लष्करी  मोहिमेचे नेतृत्व  रघुजींनी पंडित भास्करराम यांना दिले.  

पंडित भास्कररामच्या नेतृत्वाखाली मोठी मराठी फौजेने अर्काटच्या नवाबांचा अक्षरशः  धुवा उडवला. वास्तविक  पाहता हा प्रदेश मराठ्यांचा चौथाईचा प्रदेश होता. त्यामुळे चौथाई वसूल व त्याबरोबर  संरक्षण  ही जबाबदारी  मराठे जबाबदारी  निभावत होते. तरी येथील लोक वेळेवर चौथाई देत नसत ; त्याबरोबरच  मंदिरांना उपद्रव  देणे. परकीय ब्रिटिशांना मदत करणे या गोष्टी  करत होते. मात्र पंडित भास्करराम यांच्या पहिल्या स्वारीचा धसका ब्रिटिशांनी  एवढा घेतला की ,इ.स. १७४० मध्ये उत्तर कोलकत्तातील बाद्यबझार भागात एक प्रचंड खंदक खोदले ते "मराठा डिच " नावाने प्रसिद्ध  झाले. त्या खंदकामुळे मराठ्यांचे घोडे कोलकत्ता येथे येऊ नये म्हणून  ही खबरदारी  होती. यांतून मराठ्यांचा दरारा बंगाल प्रांतात केवढा होता हे लक्षात येते.

                     क्रमशः 

--- प्रशांत कुलकर्णी  मनमाड


संदर्भ- 

श्री.प्रकाश लोणकर -इतिहासाच्या पाऊलखुणा

१-मराठ्यांचा इतिहास,खंड १ व २-संपादक अ.रा.कुलकर्णी व ग.ह.खरे.,२ मराठी रियासत-गो.स.सरदेसाई,खंड ४,व प्रा.सदानंद मोरे यांचा ०४-०७-२०१४ ला दैनिक लोकसत्तातील लेख-( मराठ्यांचा) दरारा,दबदबा कि दहशत? हा लेख)

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...