विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label भारतावर इंग्रजी सत्तेचे आगमन. Show all posts
Showing posts with label भारतावर इंग्रजी सत्तेचे आगमन. Show all posts

Wednesday, 25 January 2023

भारतावर इंग्रजी सत्तेचे आगमन भाग ४

 

भारतावर इंग्रजी सत्तेचे आगमन
लेख :आशिष माळी




भाग ४
7)मुघल शासन , मराठा , टिपू चां घटता प्रभाव
1707 पासून औरंगझेब मेला , त्यानंतर मराठांच्या उदय आणी 1771 मध्ये मराठ्या पानिपत मध्ये पराभव आणि अस्ताला सुरुवात . टिपू विरुद्ध ब्रिटिशांनी मराठा आणि निझाम ची मदत घेतली आणि टिपूला संपवले. 1707 नंतर एका मोठ्या साम्राज्याचा अंत होऊन 22 सुभे स्वतंत्र झाले. मराठे नी कैक सुभेवर वर्चस्व मिळवले. बंगाल अवघं म्हैसोये हैदराबाद निझाम वेगळे झाले. राजपुताना वेगळा हमझळा. 1800 नंतर होळकर शिंदे पेशवे हे सुद्धा स्वतंत्र च राहू लागले. अश्या रीतीने 100 क्या वर संस्थान झाले. ब्रिटिशांना या वेळीच आयाती संधी मिळाली.
😎नाना फडणवीस चां शेवट
इ. स. 1800 मध्ये नाना गेले, पण 1771 ते 1800 जवळजवळ 29 वर्षे नानांनी महादजी, तुकोजीसह इंग्रजांना मराठेशाही पासून लांब ठेवले. त्यानंतर मात्र काळ फिरला नि अवघ्या 18 वर्षात शनिवारवाड्यावरील जरीपटका बाळाजी नातूच्या हातातून एल्फिन्स्टनने उतवराला आणि लगेच सातार्यामधूनही जरीपटका उतरून विक्टरीया क्रॉस चढला.
9) रॉबर्ट क्लाइव्ह आणि हेस्टिंग
या दोन मुरब्बी, मुत्सद्दी आणि क्रूर लोकांनी पूर्ण देशावर आपला वर्चस्व केला. त्यांनी साम-दाम-दंड-भेद ही नीती वापरली. नंतर एल्फिन्स्टननेही ह्यांचाच कित्ता गिरवला.
संदर्भ:
1.anarchy by William dalrymole

भारतावर इंग्रजी सत्तेचे आगमन भाग ३

 

भारतावर इंग्रजी सत्तेचे आगमन
लेख :आशिष माळी




भाग ३
ब्रिटिशांनी नक्की काय केले, की पूर्ण भारत त्यांनी जिंकला?
4) गद्दरीचा अभाव
एक देश एक संकल्पना भारतीय कडे नव्हती. ब्रिटिश 30 वर्ष राहिले पण एकही दगाबाज गद्दार निघाला नाही.पण मराठ्यांच्या राघोबा दादा , मुघलांच्या बंगाल चे नवाब, मुघल मध्ये कैक दगाबाज निघाले. एक देश म्हणून ते लढले. आपल्या 200 क्या वर संस्थाने होते त्यांच्या कधी एकी नव्हती.
5)आर्थिक ताकद
भारताची कर संकलन आणि सावकारी पद्धतीनें सामान्य जनता पिचून गेलेले. East india कंपनीने त्यांना लागणारा सारा पैसा इंग्लंड मधून गोळा केलच. पण भारतीय सावकारांना पण आपल्या बाजूने वळते केले. त्यामुळे भारतीय शसका कडे पैसा राहिला नाही. मात्र ब्रिटिशांनी बंगाल अवघं बिहार या सर्वात श्रीमंत सुभ्या कडून खुपणपैसा गोळा केला. अनेक भारतीय संस्थानात फुटीचे बीजे रोवली. इंग्रजांनी त्यांची करपद्धती वापर केला.
6)अंतःस्थ विरोध
रॉबर्ट क्लाइव्ह आणि हेस्तिंग सारख्या लोक ईस्ट इंडिया कडे पराक्रमी होते पण क्रूर होते. त्यांनी केलेल्या अन्याय ब्रिटिश राजदरबारात आणि संसदेत पोचत होता.ते लोक ईस्ट इंडिया वर चिडून त्यांची कारवाई थांबवत होते.पण
त्याच वेळी ईस्ट इंडिया कंपनीने आने संसदेतील खासदारांना आपले शेअर विकून त्यांना ईस्ट इंडिया कंपनीचा मालक मंडळी मध्ये समाविष्ट केले. त्याचा परिणाम ईस्ट इंडिया विरोध करणारे इंग्लंड मध्ये आवाज दाबला गेला.

भारतावर इंग्रजी सत्तेचे आगमन भाग २

 

भारतावर इंग्रजी सत्तेचे आगमन
लेख :आशिष माळी


भाग २
ब्रिटिशांनी नक्की काय केले, की पूर्ण भारत त्यांनी जिंकला?
1)फ्रेडरिक द ग्रेटचे रणकौशल्य आणि सामरिक संशोधन/कवायती सेना
फ्रेडरिक द ग्रेट हा प्रशियाचा राजा आधुनिक जगामधील पहिला ज्ञात संशोधक आहे. याचा वारसा इंग्रजांनी उचलला. कवायती सेना आपल्या सैन्याचा कणा झाला. इंग्रजांनी अवघ्या 3000 सैन्याने प्लासीची लढाई जिंकली, ती 50000 सैन्याच्या बंगालच्या नावाबाला हरवून. मराठा-इंग्रज तिसरी लढाईसुद्धा कमी सैन्य असून इंग्रजांनी जिंकली. कवायती सैन्याचे महत्त्व महादजी शिंदे आणि टिपूने ओळखले. बाकी कोणी नाही. या दोघांनी फ्रेंचांची मदत घेतली.
2)बंगाल बिहार ओडिशा जिंकणे
प्लासी ची युद्ध बंगाल च नवाब सिराज दौला याने 50000 सैन्याला घेऊन 3000 इंग्रज सैन्याशी लढाई केला आणि हरली. ब्रिटिशांच्या 3000 सैन्यामध्ये 2200 भारतीय आणि 800 ब्रिटिश होते. या युद्धाने बंगालवर ब्रिटिशांचा एकतर्फी अंकुश झाला. पुढे 1765 मध्ये शहा आलाम (आंधळा) आणि अवधाच नवाब शुजा आणि मिर कासिम याना हरवून अलाहाबाद च तह केला आणि ब्रिटिशांनी बंगाल बिहार ओडिशा सारखा संपन्न प्रदेश जिंकला. मराठ्यांनी शक्य असून या प्रदेशावर हक्क धरला नाही फक्त चौथ गोळा केले. जसे इंदूर बडोदा ग्वाल्हेर का कायम बस्तान केले तसेच मराठ्यांनी बंगाल बिहार अवध ओडिशा ल बस्तान करायल हवे होते. संपन्न प्रदेश मिलवाऊन इंग्रज आणखी धनाढ्य झाले.
3) नाविक ताकत
ब्रिटिशांनी आपले लक्ष किनारपटटीवरील शहरे कडे ठेवले.त्यामानाने शिवाजी महाराज सोडले तर कोणत्याही भारतीय शासकांनी नाविक दला कडे लक्ष दिले नाही. अस म्हणतात की जहांगीर शिवाय कोणत्याच मुघल शासकांनी समुद्र पहिला नव्हता.सुरत मुंबई मद्रास कोलकाता इंग्रज कडे , pondichery फ्रेंच, वसई अलिबाग रेवदंडा, गोवा दमण पोर्तुगिज कडे , वेंगुर्ला डच कडे. ज्याप्रमाणे आज आण्विक ताकद ल महत्त्व आहे तसे त्यावेळी नाविक दल ला महत्त्व होते.

भारतावर इंग्रजी सत्तेचे आगमन भाग १

 

भारतावर इंग्रजी सत्तेचे आगमन
लेख :आशिष माळी

भाग १
भारताच्या इतिहासमध्ये एक प्रश्न नेहमीच विचारला गेला
इ. स. 24 सप्टेंबर 1599 ला जेव्हा शेक्सपियर हॅम्लेट हे नाटक लंडनच्या थेम्स नदीजवळ लिहीत होता, तेव्हा त्याच्या काहीशे मीटर अंतरावर जगामध्ये वर्चस्व गाजवणार्या "ईस्ट इंडिया कंपनी"च्या स्थापनेसाठी वाटाघाटी चालू होत्या. सोने, रुपे, मसाल्याचे पदार्थ ह्यांच्या व्यापारासाठी नवीन आणि जुने धाडसी नाविक, व्यापार्यांनी समभाग घेऊन ही आस्थापना(कंपनी) स्थापली. ब्रिटिशांनी हिला इ. स. 31 डिसेंबर 1600 मान्यता दिली. जवळजवळ १५ निष्फळ अभियाने झाल्यानंतर पहिल्यांदा सर विल्यम हौकिंकच्या नेतृृत्वात नौका 1608ला सुरतला पोहोचल्या. त्याला मुघलांकडून मुंबई, ठाणे, सुरतला वखार आरंभण्याची अनुज्ञाप्ती(परवाना) मिळवायची होती. इ. स. 1609च्या एप्रिलपासून श्री. विल्यम 3 वर्षे जहांगीर दरबारात राहिला. खूप वेळाने त्याला भेट दिली. इ. स. 1611 ला सुरतला वखारीची अनुज्ञाप्ती मिळाली. त्यासह जहांगीरने त्याला एका बाई(बायको) भेट दिली.
तिथून इंग्रजांची सत्ता सातत्याने वाढली. काहीशे इंग्रजांनी साधारण 1.5 कोटी भारतीयांना 200 वर्षात गुंडाळले.

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...