विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label रणझुंजार_सरसेनापती_संताजीराव_घोरपडे. Show all posts
Showing posts with label रणझुंजार_सरसेनापती_संताजीराव_घोरपडे. Show all posts

Wednesday, 30 August 2023

एक महान सरसेनापती संताजी घोरपडे - भाग १०

 


एक महान सरसेनापती
संताजी घोरपडे
- भाग १०
Written By Nikhil salaskar
संताजी जिंजी कड़े येत असताना, वाटेत अर्काट नजिक त्यांचा मुकाबला जुल्फिकार खानाशी झाला. या युद्धात संताजिचा पाडाव झाला आणि ते पलुन गेले असे भीमसेन सक्सेना लिहितो. ते थेट गेले ते जिंजित, तिथे त्यांनी मद्रास आसपास मोहिम करण्याचे मनसूबे रचले असे कही इंग्लिश पत्रे लिहितात. पण याच दरम्यान त्यांचे आणि राजाराम राजांचे काही तरी बिनसले. नक्की काय झाले याचे दाखले कोणीच देत नाहीत.पण राजारामशी वितुष्ट येताच संताजी आपल्या २० हजार फौजेसह जिंजी बाहेर पडले. संताजिचा बीमोड करण्यासाठी खुद्द राजाराम राजे सोबतीला धनाजी जाधव, अमृतराव निमंबालकर असे वीर घेउन जिंजी बाहेर पडले. संताजिना त्यांनी आयेवरकुट्टी यथे गाठले, या दोघात मोठे युद्ध झाले आणि शेवटी राजारामचा पराजय झाला. धनाजी पलुन जाण्यात यशस्वी झाले तर अमृतराव निमंबालकर या युद्धात मारले गेले. खुद्द राजराम राजांस संताजिने कैद केले पण नंतर सन्मानाने मुक्त सुद्धा केले.जरी छत्रपतिशी वितुष्ट आले होते तरी सुद्धा संताजिने मोग्लंशी संगर्ष चालूच ठेवला. मराठ्यांच्या यदाविच्या बातम्या जुल्फिकार खानास कळल्या आणि त्याने आपली फौज अर्काट बाहेर काडली पण संताजी पुन्हा अर्काट दिशेनी येत असल्याची बातमी कळताच खान परत निघून गेला. पुढे संताजी कृष्णपट्टाम लूटले, मोगल सैन्य बघ्याची भूमिका घेत होते.नंतर संताजिने महाराष्ट्राची वाट धरली आणि येथेच त्यांचा शोकांतिकेची सुरवात झाली. राजाराम राजांनी आता भावनिक आव्हान केले होते आणि अनेक संताजिचे सैनिक पुन्हा राजरामांस जाउन मिलू लागले. हीच संधी साधून धनाजीने संताजिवर हल्ला केला आणि त्यांचा पूर्ण पाडाव केला. संताजी असह्य होउन आपल्या घराकडे निघून गेला. आता मोगल सैन्य सुद्धा संताजिच्या मागावर होते.सातारच्या प्रदेशात शंभुमहादेवचा डोंगर रांगात संताजिने आश्रय घेतला होता. शंभुमहादेवचा डोंगर रांगात मोगल सैन्य येण्यास कुचरत असे कारण हा प्रदेश घनदाट जंगलांनी वेढ़ला आहे. या अगोदर मराठयानी याच डोंगर रांगात दबा धरून अनेक मोगल सैन्याला कापून काढले होते.संताजिंच्या खुनाच्या अनेक आख्यायिका आहेत. कोणी सांगते की संताजिंस मोगल सरदार लुफ्तलुल्ला खानाने मारले. तर कोणी लिहिते की संताजिंस त्याच्याच माणसाने फितुरिने मारले, काहींच्या मते दवेदारानी मारले असे आहे. पण इतिहास जाणकरांच्या मते त्यांस नागोजी मानेने मारले असे आहे —

एक महान सरसेनापती संताजी घोरपडे - भाग ९

 


एक महान सरसेनापती
संताजी घोरपडे
- भाग ९
Written By Nikhil salaskar
संताजी घोरपडे यांच्या आयुशातला दूसरा मोठा विजय म्हणजे बसवापट्टणची लढाई. या युद्धात संताजिने हिम्मत खान बहादुर याचा पूर्ण बीमोड केला. दोद्देरीच्या युद्धात मराठयानी कासिम खानचे कंबरडेच मोडले होते. वास्तविक कासिम खानच्या मद्तींस औरंगजेबाने हिम्मत खानास पाठवले होते.बसवापट्टणच्या जवळ हिम्मत खानाने आपला तळ टाकला होता, तो संताजीवर चालून जाण्यास कुचरत होता. एके दिवशी संताजी अगदी अल्प फौजेनिशि हिम्मत खानवर चालून गेले. हिम्मत खानास जेव्हा हे कळले तेव्हा तो सुद्धा युद्धास तयार झाला. मोगल सैन्य संताजिंवर तुटून पडले, युद्धास तोंड फुटले. मराठे युद्धात पडू लागले आणि संताजिने माघारिचे कर्ण फूंकले. आता मोग्लांस चेव चडला आणि पळणार्या मराठ्यांचा त्यांनी पाठलाग सुरु केला.संताजी बसवापट्टणच्या गडी बाहेरच्या जंगलात घुसले. त्यांच्या मागोमाग मोगल सुद्धा तिथे घुसले. जंगलात आधीच लपून बसलेल्या मराठ्यांच्या बंदुकधार्यंनी एक एक करुन मोग्लंना टिपले. युद्धाचे पूर्ण चित्रच पालटले, जे मोगल सैन्य वरचढ़ झाले होते तेच आता पाठ दाखवून पलू लागले. पण त्यांच्या परतीचा मार्ग बंद केला होता. आता हिम्मत खान सुद्धा शर्थीने लढु लागला पण बंदुकीचा एक गोला त्याच्या डोक्यास लागला आणि तो बेशुद्ध झाला. हिम्मत खानाचा मुलगा सुद्धा या युद्धात जख्मी झाला. बाप लेकास मोगल सैनिक परत कसेबसे घेउन गेले. त्या रात्री हिम्मत खान मरण पावला. खानाच्या लष्करातील अनेक घोडे, हत्ती, तोफा, शास्त्रे संताजिच्या हाती लागले.या लढ़ाईचा खाफिखान दाखला देतो.या लढ़ाई नंतर संताजी, जिंजिंस राजाराम राजांस भेटण्यासाठी निघून गेले.

एक महान सरसेनापती संताजी घोरपडे - भाग ८

 


एक महान सरसेनापती
संताजी घोरपडे
- भाग ८
Written By Nikhil salaskar
संताजीच्या कारकिर्दीत दोन मोठे विजय म्हणजे दोड्डरी ची लढाई आणि दूसरी बसवापट्टणची लढाई. या दोन लढायांची तुलना साल्हेर किंवा कांचनबारीच्या लढायांशी होऊ शकते. संताजीस नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबाने कासिम खाना बरोबर अनेक नामवंत सरदार त्यांच्या मागे पाठवले होते. कासिम खान बरोबर खानाजाद खान, असालत खान, मुराद खान, सफसिख खान असे अनेक सरदार मोठा तोफखाना, भरपूर धन, आणि काम्बक्षचे सुद्धा सैन्य दिमतीला दिले होते.संताजी मोगल सैन्याच्या हालचाली वर लक्ष ठेउन होते. त्यांना आपल्या गुप्तहेरा कडून बित्तंबातमी मिळत होती. कासिम खानाने आपले सामान रवाना केल्याची खबर संताजीस मिळाली. संताजिने गनिमी काव्याचे डाव आखले आणि त्या प्रमाणे आपल्या सैन्याच्या ३ तुकड्या केल्या. पहिल्या तुकडीने कासिम खानाच्या सामानावर हल्ला केला. तो हल्ला परतावण्यासाठी कासिम खानने आपले बरेच सैन्य खानाजाद खाना बरोबर तिथे पाठवून दिले. संताजिच्या दुसर्या तुकडीने खानाजाद खानाला वाटेत गाठला आणि लढाई सुरु केली. आता कासिम खानाची छावणीत शुकशुकाट होता, तीच संधी साधत मराठ्यांच्या तिसर्या तुकडीने या छावणीवर हल्ला केला आणि मोगली सैन्याची पूरी वाताहात करून टाकली. मोगली सैन्य रणंगण सोडून पळत सुटले आणि दोडेरीच्या गढ़ीचा आश्रय घेतला. संताजीने या गढ़ीला वेढा घातला आणि मोगलांची रसद मारली.दोडेरीच्या मोगल किल्लेदाराने किल्ल्याचे दरवाजे बंद केले आणि बाहेर असलेल्या कासिम खानाच्या सैन्यास संताजीच्या तावडीत मोकले सोडले. कासिम खान आणि त्याचे सरदार दोरखंड लाउन एक रात्री किल्ल्यात निघून गेले, फौजेला संताजीच्या तोंडी देऊन. जसे दिवस जाऊ लागले तशी किल्ल्यातली रसद सुद्धा संपत आली. खानाचे सैन्यतर उपाशी मरू लागले. शेवटी मोग्लंनी संताजीकड़े जीवदानाची याचना केली. संताजीने मोग्लांचे अनेक हत्ती, घोडे, तोफा, नगद, आणि सोबत दोन लाख होनाची खंडणी घेतली. ही नामुष्की सहन न होउन कासिम खानाने विष पिउन आत्महत्या केली.या लढाईचे दाखले मोगल इतिहासकार देतात पण आपल्या इतिहासकारांनी या एका मोठ्या लढाईचे साधे वृत सुद्धा दिले नाही.
(संदर्भ- मराठ्यांचे स्वातंत्रयुद्ध)

एक महान सरसेनापती संताजी घोरपडे - भाग ७

 


एक महान सरसेनापती
संताजी घोरपडे
- भाग ७
Written By Nikhil salaskar
जुल्फिकार खानास वाट दिल्यावरून संताजी आणी राजाराम राजात वाद निर्माण झाला. वास्तविक संताजी हे एक खरे सेनानी होते त्यांना राजकारणाची तितकीशी जाण असण्याची शक्यता कमी होती. या उलट राजाराम राजांस अनेक राजकारणी मंडली सल्ले देत होती.संताजी जिंजी सोडून कांचीपुरमला निघून गेले. वाटेत त्यांना कासिमखान जिंजी कड़े चालून येत असल्याची बातमी मिळाली. कासिम खानास बादशाहने जुल्फिकार खानास मदत करण्यासाठी पाठविले होते. कांचीपुरम नजिक कावेरिपाक या ठिकाणी खान असताना संताजीने अचानक हल्ला चढ़विला. अगदी थोड्याच वेळात खानाच्या फौजेचा धुव्वा उडाला आणी खान कांचीपुरमला पलुन गेला, तिथे त्याने देवलांचा आश्रय घेतला आणी धोका मिटे पर्यंत तिथेच लपून बसला.याच दरम्यान बहिर्जी घोरपडेने राजाराम विरोधात बंडखोरी केलि आणी याचप्पा नायका संगे मोगलान विरोधात लढु लागले.राजारामने संताजिंस सुद्धा सेनापति पदावरून दूर केले. आता सेनापति पद धनाजी जाधवान कड़े देण्यात आले होते. येथे एक लक्ष्यात घेण्या सारखी गोष्ट म्हणजे, सेनापतिपद गेले तरी संताजीने मोग्लान विरोधातला लढा चालूच ठेवला. ते मोग्लाना वतना साठी किंवा कुठच्या पदासाठी जाउन मिळाले नाहीत. हाच खरा मराठ्यांचा स्वातंत्र लढा जो १८५७ च्या क्रांति पेक्षा ही किती तरी पटीने सरस होता.जाने १६९५ दरम्यान संताजी ने कर्नाटकातुन मुसंडी मारली ती थेट बुरहानपुरात. मोगली सुबेदाराने प्रतिकार करण्याचा प्रयन्त केला पण मराठ्यांच्या २०००० सैन्या पुढे त्याचा निभाव लागला नाही आणि तो बुरहानपुर सोडून पलुन गेला. मराठयानी बुरहानपुर लूटले आणि ही बातमी जेव्हा औरन्ग्यास कळली तेव्हा त्याने बुरहानपुरच्या सुबेदारास बांगड्यानचा आहेर पाठवला.नंतर संताजीने सुरत लूटण्याचा बेत आखला होता पण तसे न करता त्याने वेढा घातला तो नंदुरबार शहरास. नंदुरबारच्या सुभेदाराने शहर राखण्यासाठी संताजी बरोबर लढाई केली. संताजी नंदुरबारला जास्ती वेळ वेढा घालून बसले नाहीत आणि ते परत खटाव प्रांतात आले. तिथे त्यांने अनेक मोगल सरदारांना लढाईत मारले, अनेक मोगल सरदार युद्ध सोडून पलुन गेले, अनेक सरदार कैद झाले. (संदर्भ- मराठ्यांचे स्वातंत्रयुद्ध)

एक महान सरसेनापती संताजी घोरपडे - भाग ६

 


एक महान सरसेनापती
संताजी घोरपडे
- भाग ६
Written By Nikhil salaskar
पुढे हाच स्वातंत्र लढा संताजी-धनाजीने बेलगाव-धारवाड़ करत कर्नाटक प्रांतात नेला. नंतर ह्यांनी जिंजीकड़े आपला मोर्चा वळवला. जिंजी किल्ल्यास जुल्फिकार खान, त्याचा बाप असद खान, आणि शेहजादा काम्बक्ष वेढा घालून बसले होते.संताजी साधारण १५ हजाराचे घोड़दल घेउन तर धनाजी साधारण १० हजाराचे घोड़दल घेउन जिंजिंस थडकले. प्रथम धनाजी आपली फौज घेउन सामोरे आले आणि मोगली सैन्यावर हल्ला केला. मागुन येणार्या संताजिंस अलिमर्दाखान आडवा आला. अलिमर्दाखान हा जिंजिंच्या मोगली फौजेला रसद पुरवित असे. त्याची रसद मारीत संताजी पुढे निघून गेले. (संदर्भ- जेधे शकावली) या लढाईची फ्रेंच गवरनर मार्टिन याने आपल्या डायरित नोंद केलि आहे. संताजी आणि धनाजी यांच्या या जोशा समोर मोगल सैन्याची दाणादाण उडाली. जिंजीच्या मोगली सैन्याचीतर वाताहात झाली. त्यांची रसद तोडली गेली, अफवांचे पीक उठवले जाऊ लागले होते. त्यात किल्ल्यातुन मोगली फौजेवर हल्ले होऊ लागले. स्वतः जुल्फिकार खान रसद आण्यास बाहेर पडला असता त्याचा सामना संताजी बरोबर झाला. जुल्फिकार खान कसाबसा आपला जीव वाचवत परत छावनित आला.जुल्फिकार खानने राजारामकड़े वाट मागितली आणि जिंजीचा वेढा उठवण्याचा वायदा केला. २२ जानेवारी १६९३ रोजी हुक्माची वाट न पाहता मोगली सैन्य जिंजी सोडून वांदीवाश येथे निघून गेले. (संदर्भ- मराठ्यांचे स्वतंत्रयुद्ध)

एक महान सरसेनापती संताजी घोरपडे - भाग ५

 


एक महान सरसेनापती
संताजी घोरपडे
- भाग ५
Written By Nikhil salaskar
राजाराम जिंजी कड़े निसटुन जाताना त्यांना बीदनुरची राणी "चेनम्मा" हिने सहाय्य केले होते. औरंग्जेबास याचा खुप राग आला आणि त्याने जाननिसारखान, मतलबखान, व सर्जाखान यांस फौज देऊन कर्नाटकात त्या राणीचा समाचार घेण्यास पाठवले. पण ही बातमी संताजिस समजता त्यांनी या बादशाही फौजेवर आधीच हल्ला करून तिची धुलाधाण उडविली. साकी मुस्तैद खान याचे दाखले देतो. सर्जाखान हा आदिलशाही सरदार, आदिलशाही अस्ता नंतर तो मोघलांस येउन मिळाला होता. १६९० साली सर्जाखान सातारा किल्ल्यास वेढा देऊन बसला होता. त्याचा वेढा उठवण्या साठी संताजी आणि धनाजी यांनी आपल्या फौजा सातारा आसपास आणल्या. त्यांनी सर्जाखानच्या छावणीवर गनिमी हल्ले चालू केले. अशाच एक लढाइत सर्जाखान आणि त्याचा कुटुंब कबीला मराठ्यांच्या हाती लागला. हजारो मोगल सैनिक कापले गेले. नंतर एक लाख होन घेउन संताजीने सर्जाखानची सुटका केलि. (संदर्भ- जेधे शाकावली). या लढाईचे वृतांत मोगल इतिहासकार ईश्वरदास नागर सुद्धा देतो.खटाव परिसरात संताजी-धनाजी यांनी तर विजयाचा सपाटाच लावला. एका पेक्षा एक मोघल सरदारांना पाणी पाजले. मोगल सैन्यात तर या दोघांचा इतका धाक निर्माण झाला की म्हणे मोगली घोडे पाणी पिण्यास घाबरित कारन त्याना संताजी-धनाजी पाण्यात दिसत. याच दरम्यान राजारामने संताजिंस सेनापती पदावर नियुक्त केले

एक महान सरसेनापती संताजी घोरपडे - भाग ४

 


एक महान सरसेनापती
संताजी घोरपडे
- भाग ४
Written By Nikhil salaskar
शंभु राजांच्या मृत्यु नंतर मोघलंनी कोकणात मुसंडी मारली. खुद्द रायगडाला विळखा पडला, जुल्फिकार खान याने रायगड आणि आसपासचा परिसर जिंकण्यासाठी पराकाष्ट केले. याच दरम्यान संताजी खर्या अर्थाने एक नेता म्हणुन उदयास आले. त्यांनी राजाराम, ताराराणी, राजसबाई यांस धनाजी बरोबर सुखरूप विळख्यातुन बाहेर काढले. राजाराम राजे प्रतापगड मार्गे वासोटा, पन्हाला करत बेदनुरच्या राणीच्या साह्याने जिंजिंस सुखरूप निघून गेले.येथे महाराष्ट्रात, शंभुराजांच्या मृत्यु आणि मराठ्यांचे राज्य संपणार या धुंधित मोघल गाफिल झाले होते. नेमक्या याच गोष्टीचा फायदा संताजिने घेत खुद्द औरंगजेबाच्या तंबूवरील कळस कापून नेले. संताजीने आपल्या बंधू आणि विठोजी चव्हाण यांच्या साह्याने अवघ्या २००० सैन्यानिशी तुलापुर येथील मोघल छावणीवर हल्ला करुन त्यांची बहुत हानीकरुन सिंहगडावर पसार झाले. (संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध)नंतर संताजिंनी जुल्फिकार खानावर हल्ला केला. जुल्फिकार त्या वेळेस रायगडाला वेढा घालून बसला होता. या छाप्यात त्यांना बरीच लूट मिळाली, ती घेउन ते थेट पन्हाल्यास असलेल्या राजाराम राजांस भेटले.(संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध)साधारण १६८९ (नोव्हे- डिसे) या कालात शेख निजाम कोल्हापुरास होता. ह्यास संताजिने युद्धात हरवले, मुकर्रब खान याच युद्धात जबर जख्मी झाला (संदर्भ-मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध) . पुढे त्याचा (मुकर्रब खान) कुठे उलेख सापडत नाही बहूदा तो नंतर या जख्मानमुले मेला सुद्धा असेल.

एक महान सरसेनापती संताजी घोरपडे - भाग ३

 


एक महान सरसेनापती
संताजी घोरपडे
- भाग ३
Written By Nikhil salaskar
म्हालोजी घोरपडे हे शिवाजी महाराजांस आपल्या ५०० स्वरानिशी येउन मिळाले. म्हालोजी हे पुढे पन्हालगडाचे तटसरनौबत होते. शंभुराजे जेव्हा दिलेर खानाकडून निघून आले तेव्हा त्यांची व्यवस्था पान्हाळ्यावर केलि होती आणि सोबतीस म्हालोजी घोरपडे दिले होते. असे कापशीकर घोरपडे घराण्याचा इतिहास सांगतो.संपूर्ण शंभु राजांच्या कारकिर्दीत म्हालोजी घोरपडे हे स्वराज्य राखण्याचे चोख काम करीत होते. शिर्क्यंचे बंड मोडून काढण्याच्या वेळी स्वतः शंभु राजांच्या सोबत म्हालोजी घोरपडे हजर होते. मोगल सरदार मुकर्रब खान जेव्हा संगमेश्वर येथे शंभु राजांस कैद करण्यास पोचला तेव्हा म्हालोजी घोरपडे यांनी लढाई केलि पण ते मारले गेले.संताजी घोरपडे यांचे जन्म साल इतिहासाला माहित नाही पण जयसिंह पवारांच्या अंदाजानुसार साधारण १६४५ असू शकते. चिटणीस बखर सांगते की हंबिररावनच्या हाताखाली जे अनेक वीर होते त्यात एक संताजी घोरपडे होते. अहमदाबाद, बुराण्पुर, जाल्नापुर, सिंदखेड हे मुलुख लुटत हंबिरराव स्वराज्यात आले. हंबिररावनच्या विनंतीवरुन संताजिंस जुमलेदारी दिल्ही.दक्षिण दिग्विजय मोहिमेत कोप्पल प्रांत जिंकणे ही एक महत्वाची योजना होती. कोपल हे अदिल्शाहिचे सरदार हुसैनखान आणि कासिम खान यांचे ठाणे होते. या मोहिमेत हंबिरराव यांनी या पठाण बंधूंचा पड़ाव केला आणि कोपल स्वराज्यात सामील केले. ९१ कलमी बखर सांगते की या युद्धात संताजी आणि बहिर्जी घोरपडे यांनी मोठे रण माजवले.पण जालन्याच्या स्वारित संताजिच्या हातुन काही तरी चुक झाली म्हणुनच महाराजांनी त्यास मुजर्यास न येण्याची शिक्षा ठोठावली असे ९१ कलमी बखर सांगते. जालनाची मोहिम ही महाराजांच्या जिवनातील शेवटची मोहिम, जालना शहर मराठयानी ४ दिवस लुटले पण लूट परत आणताना रणमस्तखान या मोगल सरदाराने हल्ला केला आणि बरीच लूट परत घेउन गेला, या यूद्घात सिधोजी निम्बालकर कामी आले

एक महान सरसेनापती संताजी घोरपडे - भाग २

 


एक महान सरसेनापती
संताजी घोरपडे
- भाग २
Written By Nikhil salaskar
भोसले आणि घोरपडे घराणे हे एकाच वृक्षाच्या दोन शाखा. मुळ पुरुष सुजनसिंह हा उदयपुरच्या राजघराण्यातील होता. दक्षिणेत आल्यावर यानी हसन गंगूची सत्ता मजबूत करण्यासाठी पुष्कल मेहनत घेतली. याच सुजनसिंहच्या पणतूस (भैरवसिंह) मुधोल ची ८४ गावांची जहागीर प्राप्त झाली. भैरवसिंह यांस "भुशल धारी" असे संभोदले आहे. भुशल धारी म्हणजेच "भूतलावरिल शस्त्रधारी" म्हणजेच "क्षत्रिय योद्धा". पुढे कालांतराने भुशलचे भुशाल, भुसाल, भोसाल, भोसल, भोसला, भोसले असे हो़त गेले.मालिक उत्तुजरास खेळणा किल्ल्याच्या पायथ्याच्या जंगलात शिर्के आणि शंकरराव मोरे यांच्या फौजांनी हरवले. पण १४६९ साली मंहमद गवान याने कोकणची मोहिम हाती घेतली. यात त्याला भैरवसिंहचा पणतू कर्णसिंह आणि या कर्णसिंहचा पुत्र भीमसिंह यांची मोलाची साथ लाभली. जे सुलतानी फौजेला जमले नाही ते या पितापुत्र जोड़ीने केले. त्यांनी खेळणा किल्ला घोरपडीच्या साह्याने सर केला आणि हा दुर्गम किल्ला बहमनी सुलतानास बहाल केला. या युद्धात कर्णसिंह मारला गेला. तर भीमसिंहंस "राजा घोरपडे बहाद्दर" हा किताब बहाल करण्यात आला त्याच बरोबर घोरपडीच्या रंगाचे निशाण सुद्धा देण्यात आले. (संदर्भ- मुधोल घोरपडे घराण्याचा इतिहास)पुढे भीमसिंहचे वंशज घोरपडे बहाद्दर हे पद नावा नंतर लाऊ लागले. बाहमनी अस्तानंतर दक्षिणेत पाच शह्या निर्माण झाल्या. घोरपडे हे आदिलशाहशी एक निष्ट राहिले याचे कारण बहुतेक त्यांची जहागीर ही आदिलशाहच्या प्रांतात ये़त असावी म्हणुन असावे.चोलराजा हा घोरपडे घराण्याचा वंशज. चोलाराजचा मोठा मुलगा पिलाजी घोरपडे (बजी घोरपडे यांचे आजोबा) हा मुधोल ची जहागीर संभालून होता तर त्याचा दूसरा पुत्र वल्लभजी यांस वाई प्रांतातल्या पाटिलक्या देण्यात आल्या होत्या. याच वल्लभजीचा नातू म्हणजे "म्हालोजी घोरपडे" ज्यांना संगमेश्वरी वीर मरण प्राप्त झाले. आणि याच वल्लभजीचा पणतू म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे, ज्यांनी स्वराज्य रक्षणात मोलाची कामगिरी बजावली. (sources- डॉ.जयसिंह पवार)

एक महान सरसेनापती संताजी घोरपडे - भाग १

 


एक महान सरसेनापती
संताजी घोरपडे
- भाग १
Written By Nikhil salaskar
महाराजांना एका पेक्षा एक असे सेनापती लाभले तीच परंपरा पुढे शंभुराजांच्या कालात हंबिराव मोहिते यांनी चालू ठेवली.शंभुराजांना आणि कवी कलाशंना संगमेश्वरी शेख निजाम यानि पकडले आणि त्याच वेळेस म्हालोजी घोरपडे मारले गेले. या नंतर मोग्लांनी रायगड घेतला आणि जणू मराठ्यांचे हे राज्य (महाराजांचे दिव्य स्वप्नच) नष्ट होते काय अशी परिस्तिथि निर्माण झाली. पण याच वेळेस महाराजांच्या आणि शंभु राजांच्या तल्मित तयार झालेले काही रणझुंझार पुढे सरसावले आणि याच मराठी भूमीत त्या मस्ताव्लेल्या मोघल बादशाहला गाढ़ला.या योध्यात एक आघाडिचा वीर म्हणजे "सरसेनापती संताजी घोरपडे". मराठ्यांचा इतिहास सेनापती संताजी घोरपडे यांचे नाव न घेता पूर्ण होउच शकत नाही

Friday, 14 May 2021

बलाढ्य मुघल बादशाहस धड़की भरवनारा मराठा सेनापती म्हणजे संताजी आणि धनाजी..!! भाग ३

 बलाढ्य मुघल बादशाहस धड़की भरवनारा मराठा सेनापती म्हणजे संताजी आणि धनाजी..!!

पोस्तसांभार :आशिष माळी

भाग ३
मिर्झा मुहंमद--
औरंगजेब बादशहा च्या बरोबर मिर्झा मुहंमद हा इतिहास कार होते याला औरंगजेब बादशहा कडुन 150ची मनसब होते. त्याने
"तारीख मुहंमदी "ग्रंथात संताजी घोरपडे याचा उल्लेख "मुफसदाने दखन" फार्सो भाषेत च्याच मराठीत " मराठे सरदार लढवय्ये यापैकी एक श्रेष्ठ कोण व्यक्ती,"असे होते. मिर्झा मुहंमद-- आपले" तारीख मुहंमदी " मधून संताजीचा उल्लेख "'अजकबार रऊसाय मरहट्टा"' असे करून सरसेनापती संताजीराव घोरपडे याचा विशेष अधोरेखित करतात
मोगल दरबारातील बातमीपत्रे-- दोड्डेरीच्या लढाईत औरंगजेब याचा आयुष्यातील सर्वात मोठा पराभव होत कारण अनेक नामजाद सरदार एकट्या संताजीकडे पराभूत झाला हे बातमी औरंगजेब यास दरबारात सांगतील गेले तेव्हा औरंगजेब "जे काही घडले ते परमेश्वराच्या इच्छेने झाले सरदारांच्या हातची गोष्ट नव्हती, संताजी जिंकला "
काफीखान व साकी मुसस्तादखाना या मोगल लेखकाने सदैव मराठ्यांनी विरोधात लेखन केले पण संताजीच्या पराक्रम बद्दल काय लिहितात पहा " संताजी सर्वात मोठी यशस्वी सेनानी होता. त्याने मोगलावर दहशत बसण्याइतके पराक्रम करून ६/७मोगल सेनानी कैद केले, मारले घेऊन। होते. त्याच्या मुळे मोगलांना मराठ्यांचा दरारा वाटु लागला. व स्वराज्याच्या लढाईस त्याचे स्थान प्रथम व अव्वल दर्जाचे। सेनानी म्हणून आहे........
आपले इतिहासकार सुद्धा स्तुतिसुमनं बांधत आहे.
रियासतकार म्हणतात की --""विस्तीर्ण भूप्रदेशावर प्रचंड फौजा नाचवून शत्रूस हटकून गोत्यात आणणारा संताजी घोरपडे एवढा कुशल सेनानी बहुदा मराठ्यांच्या इतिहासात क्वचितच आढळतो.विरूध्दपक्षाच्या क्षणोक्षणी फिरणार्या योजनेस बिनतोड जवाब दयावे असे संताजीनेज "
सेतूमाधव पगडी --
सन १६९०पासून सन १६९७ पर्यत सेनापती संताजी घोरणपडे यांनी मोंगलचे कमीच यांनी मोगलांचे कमीते कमी बारा सेनापती लोळविले " पन्हाळा च्या लढाईत मुकर्रबखान, सातारच्या लढाईत सर्जाखान, रायबाग हुक्केरीच्या लढाईत जान निसारखान, व तहब्बुरखान , कांजीवरमच्या लढाईत अलीमर्दाखान , जिंजीच्या लढाईत
औरंगजेब याचा मावस भाऊ झुल्पीकारखान, दोड्डेरीच्या लढाईत सय्यद कासीमखान व खानजादाखान, बसवपट्टणच्या लढाईत हिमंतखान , हमीदुद्दीनखान, सफशिकखान व रूस्तुमखान अशी अनेक नाव आहेत,
संताजी घोरपडे यांनी 1689 ते 1697 पर्यंत संपूर्ण मोगल छावणीवर त्यांनी दहशत बसवली होती. शिवाजी महाराज 1680, संभाजी महाराज 1689 , हंबीरराव मोहिते 1686 महान लोकं मराठा साम्राज्याला पोरका करून गेले. त्याशिवाय अनेक मराठा सरदार मृत्यू पडले किंवा फितूर झाले . राजाराम महाराजांना सुद्धा हजारो मैल लांब जिंजी वर 1689 ते 1697 पर्यंत अडकून राहावे लागले. अश्यावेळी औरंगझेबाच्या पाच लाख सैन्याला तुटपुंजी सैन्यानं संताजी धनाजी ल नुसते थोपवून नाही धरले तर अनेक मोठ्या युद्धात अनेक नामांकित सरदार मारले गेले. संभाजी महाराज मृत्यू नंतर लगेचच संताजी विठोजी धनाजी ने शिखर शिंगणापूर जवळ थेट पाच लाख फौज असलेल्या औरंगझेब च छावणीवर हल्ला केला. ज्या तंबूत औरंगझेब झोपला होता ती जागा बदलली असल्यामुळे औरंगझेब च जीव वाचला. त्या तंबूच्या कळस कापून संताजी नी ती राजाराम महाराज ना दिली. हा होता पहिला धक्का. दैव बलवत्तर म्हणून औरंगजेब त्यादिवशी संताजींच्या हाती सापडला नाही.
त्यानंतर कोल्हापूर जवळ शंभू राजांना पकडणाऱ्या मुकर्रब खाना आणि त्याच्या मुलाला हरवले त्यातच त्यांचा मृत्यू झाला असावा. त्यानंतर सर्जा खानाला संताजी धनाजी ने सातारा जवळ रामचंद्र अमात्य आणि शंकराजी या सर्वांनी मिळून घेरले.
मराठ्या कडे तुटपुंजी फौज होती, खजिना रिकामा होता, महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी औरंगझेब च मोठी फौज महाराष्ट्रात चाल धरून होती. या काळात स्वराज्य लष्करी नेतृत्व संताजी धनाजी कडे होते. राजाराम महाराजांचे वय आणि अननुभवी पण मुळे या दोघांना तामिळनाडू पर्यंत लक्ष द्यावे लागायचे. संताजी धनाजी दोघे शुर असले तरी स्वभावात खुप फरक होता. संताजी शिस्तप्रिय होते. संताजी वागण्यात सौम्य नव्हते. पण धनाजी मात्र सौम्य होते. एखदी चूक झाली तर संताजी कडून माफी नसायची . संगाजी धनाजी दोघे घनिष्ट मित्र असले तरी नंतर कटुता आली. सत्ता संघर्ष कारणीभूत पण होता. दोघांना लष्करात उच्च पद हवे होते.सुरुवतीला धनाजी वर संताजी च इतका प्रभाव होता की धनाजी ने पहिल्या मुलाचे नाव संताजी ठेवले. दुर्दैवाने एका लढाईत संताजी जाधव च मृत्यू झाला.
संताजी शिस्तप्रिय होते , आणि शत्रूला माफी द्यायच्या फंद्यात पदात नसे. शंभू राजांचा क्रूर मृत्यू याला कारणीभूत होते. त्यामुळे मुघल वर याची चांगली जरब बसली होती. संताजी च तावडीत सापडणे पेक्ष लोकांनी मरण स्वीकारले . उदाहरण नामांकित मुघल सरदार कासिम खान
संगमेश्वरला संभाजी महाराजांना वाचवण्याच्या प्रयत्नात वडील म्हाळोजी घोरपडेंना वीरमरण आल्यावर संताजींना सरनोबत नेमण्यात आलं. ह्या तालवारबाजाच्या शौर्याला कोणतीच सीमा माहिती नव्हती. गनिमीकाव्यात तरबेज असे संताजी ह्या दृष्टीने शिवाजी महाराजांचे खरेखुरे शिष्य होते. त्यांच्या गनीमीकाव्यांनी आणि त्यातून होणाऱ्या नुकसानीमुळे मोगल सैन्य संताजींना जाम घाबरून होतं. कुठून येऊन संताजी नावाची संकट आपल्यावर कधी कोसळेल ह्याचा त्यांना नेम राहिला नव्हता.

बलाढ्य मुघल बादशाहस धड़की भरवनारा मराठा सेनापती म्हणजे संताजी आणि धनाजी..!! भाग २

 बलाढ्य मुघल बादशाहस धड़की भरवनारा मराठा सेनापती म्हणजे संताजी आणि धनाजी..!! भाग २

पोस्तसांभार :आशिष माळी
भाग २
मोगल इतिहासकार खाफी खानच्या मते संताजीं विरुद्ध लढाईचे फक्त ३ परिणाम असू शकतात - मरण पत्करणे, खंडणी देऊन वाट मागणे किंवा युद्धकैदी होणे.
मराठ्यांनी औरंगजेबाची आणि मोगल सैन्याची हालत इतकी खराब करून टाकली होती की औरंगजेबाच्या अखेरच्या काही दिवसाचे वर्णन करताना मनूची लिहतो
" त्याच्या छावणी इतकी घाणेरडी जागा पृथ्वीवर दूसरी नसेल. दररोज असंख्य माणसे, जनावरे मरून एकच घाण सुटलेली असते.
जनावरांप्रमाणे मेलेल्या माणसांना दोरी बांधून ओढुन नेतात आणि अंगावार असेल नसेल ते सर्व लुबाडून कोठे खड्डा दिसेल त्यात टाकून देतात.
प्रवासी लोकात सर्वात मोठा धाक मराठयांचा "
मुघलांच्या स्तुती करणारे अनेक नामांकित इतिहासकार हे दोघांची तारीफ करताना थकत नाही.
दोड्डेरीला संताजीने मोगलावर मिळविलेल्या यशाबाबत परकीय इतिहास कार लिहितात . खाफीखान व साकी मुस्तेदखान यांनी त्याकाळी महणाजे 1690 मध्ये लिहून ठेवले आहे (थोर इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांच्या पुस्तकात लिहलेले इग्रजी पुसकात )
" the most glorious santaji ever fought in the karnatak. This battle proved that the mavathas were mattchless in planning the battle strategy and conducting the same in the most successful manner .
He(santaji)made it clear that he was fighting against the homeland of the marathas and thus did not any grouse against those ordinary and common people in the mughal employment. Such examples are rarely found wherein a victor has shown so much of generosity and magnanimity towards a vanguished for.
It is more delightful to note that the details of this battle come to us from the pen of Muslim historians like "saki must'ad and khaki Khan

बलाढ्य मुघल बादशाहस धड़की भरवनारा मराठा सेनापती म्हणजे संताजी आणि धनाजी..!! भाग १

 बलाढ्य मुघल बादशाहस धड़की भरवनारा मराठा सेनापती म्हणजे संताजी आणि धनाजी..!!

पोस्तसांभार :आशिष माळी

भाग १
संताजी आणि धनाजी यांना पाहून मोगल सैनिक घाबरत असे आणि आपल्या घोड्याला टाच देऊन पळून जात असे अश्या अर्थाचे विधान आहे. आणि ते संपूर्ण सत्य आहे . मुघल इतिहासकार, परदेशी पत्रे आणि मराठी इतिहासकार यांनी त्याकाळी याविषयी खुप लिहलेले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचे क्रूर हत्ये नंतर (मार्च1689 ) लयाला जाणारे मराठ्यांचे राज्य मे 1690 पर्यंत राजगडापासून पन्हाळ्यापर्यंत पुन्हा जोर धरु लागले होते,आणि यासाठी संताजी-धनाजी या जोड़गोळीने आपले सर्वस्व उधळले होते.यांच्या विशेषतः संताजी घोरपडे च प्रसिद्ध लढाई यामध्ये किमान 10 मुघल सरदार मारले गेले किंवा पराभूत झाले.
1. सातारच्या लढाईत सर्जाखान
2. रायबाग हुक्केरीचा लढाईत जाननिस्सारखान,तहव्वुरखान
3. कांजीवरम च लढाईत अलीमर्दनी खान,
4.जिंजी च लढाईत झुल्फिकार खान
5.दोड्डेरी च लढाईत खानजादा खान आणि कासिम खान
6.बसवपटणं च लढाईत हमिनिदुईन खान, हिम्मत खान , सफशिखन खान, रुस्तम खान
7. खटाव सातारा जवळ ,लुत्फुल्लाखान
8. कोल्हापूर जवळ मुकर्रखान खान आणि इनायत खान
,यांसारख्या कितीतरी बलाढ्य सेनापतींचा पराभव करुन आपली घोडी संताजी आणि धनाजी चौफेर उधळत होता.[1]
खानदेशापासून जिंजीपर्यंतचे विस्तृत मैदानी युद्धक्षेत्र या दोघांच्या पराक्रमा ने गाजले होते आणि त्याचा दहशतीचा पुरेपूर वापर संताजी धनाजी यांनी केला नसता तर आश्चर्यच . धनाजी जाधव ने गुजरात पार करून भरूच वैगेरे इथे मुघल वर विजय मिळवला. नर्मदा क्षेत्रात आणि पुणे ते खानदेश मध्ये मुघाल वर अनेक हल्ले करून उत्तरेत दबाव निर्माण केला.
बुरहानपुरच्या मुघली सुभेदाराला बादशाहकडून बांगड्यांचा आहेर मिळाला,तो या दोघांनी गाजवलेल्या पराक्रमामुळे..मराठ्यांपेक्षा मुघलांचे सैन्य जास्त असूनही त्या सुभेदाराला पराभवाचे तोंड पहावे लागले होते..
जेव्हा राजाराम महाराज हे झुल्फिकार खानासोबत जिंजीच्या किल्ल्यावर मुरब्बी राजकारण करत होते,तेव्हा संताजी धनाजी साऱ्या दख्खन मध्ये आपली तलवार गाजवत हिंडत होता..!!
दोड्डेरी म्हणजे संताजीच्या लढाईचा परमोच्च कळस..छत्रपती शिवराय यांच्यानंतर त्याकाळात मराठ्यांच्या युद्धकलेमधे क्रांतिकारी बदल करण्याचा मान संताजी घोरपडे यांचाच..!!

Saturday, 1 May 2021

*सरनौबत म्हाळोजीबाबांचे चरित्र व कार्य* भाग ७

 *सरनौबत म्हाळोजीबाबांचे चरित्र व कार्य*





भाग ७
लेखन :
फोटो व लेख - प्रवीण भोसले
9422619791
 
 
*कारभाटले येथील समाधीस्थाने*
पन्हाळा सुभ्याचा लष्करी बंदोबस्त म्हाळोजीबाबांकडे असल्याने आणि प्रचितगड हा पन्हाळा सुभ्यात असल्याने छत्रपती शंभूराजांच्या संरक्षणासाठी
असलेल्या हुजुरातीच्या फौजेत प्रचितगड व कारभाटले येथील घोरपडे मंडळींचाही समावेश असणे साहजिकच आहे. म्हाळोजीबाबांबरोबरच यातील काही घोरपडे मंडळी संगमेश्वराच्या लढाईत ठार झाली असावीत.पण यांची नावे उपलब्ध नाहीत. संगमेश्वरची ही लढाई झाली तिथून कारभाटले गाव जवळच आहे.
चिपळूण-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर हे तालुक्याचे ठिकाण आहे. संगमेश्वर गावातून पूर्वेला गेलेल्या रस्त्यावर १० कि.मी. अंतरावर कारभाटले हे गाव आहे. हाच रस्ता पुढे नायरी गावावरून शृंगारपूरला पोहोचतो. शृंगारपूरहून प्रचितगडावर जायची वाट आहे.
कारभाटले गावाच्या दोन वाड्या आहेत. पहिली घोरपडेवाडी व दुसरी पवारवाडी. रस्त्याच्या दक्षिणेला चढावरती घोरपडेवाडी व उत्तरेला उतरतीवरती पवारवाडी वसलेली आहे. घोरपडेवाडीत ग्रामदैवत काळीसरी देवीचे मंदिर आहे. पवारवाडीत पवारांचे वेगळे ग्रामदैवत काळीसरीचेच मंदिर आहे. घोरपडेवाडीत ४०-४५ घरे आहेत. एक दोन अपवाद वगळता सर्व घरे घोरपडे यांचीच आहेत.लोकसंख्या अंदाजे ३०० असावी.
शिवकाळात प्रचितगड हा या भागातील प्रमुख किल्ला होता. प्रचितगडावरील शिवकालीन
सैन्यात घोरपडेंचा समावेश असून ते शिवकाळातच सातारा जिल्ह्यातील वेणेगाव येथून येऊन घोरपडेवाडीत स्थायिक झाल्याची परंपरागत माहिती मिळते.
म्हाळोजीबाबा शहाजीराजांच्या काळापासूनच पन्हाळा सुभ्याचे माहितगार असल्याने छत्रपती शंभूराजांच्या काळात या भागाच्या लष्करी बंदोबस्ताची जबाबदारी सरनोबत या नात्याने
म्हाळोजीबाबांकडेच होती. तसेच घोरपडेवाडीतील त्यांच्या भाऊबंदांपैकी अनेक घोरपडे त्यांच्या पन्हाळ्यावरील सैन्यात व प्रचितगडावरील शिबंदीत असावेत. कारभाटले गावची पाटीलकी ही सुद्धा पूर्वापार घोरपडेंकडे चालत आलेली आहे.
घोरपडेवाडीतील ग्रामदैवत काळीसरीदेवीच्या कौलारू, जुन्या व प्रशस्त मंदिराच्या आवारातच मंदिराच्या उजव्या बाजूला काहीशा चढावर पाच शिवकालीन समाध्या आहेत. साधारणपणे साडेपाच फूट बाय साडेपाच फूट या मापाच्या व अडीच फूट उंचीच्या या समाध्या आहेत. दगडाचे मोठे पाटे व चौकोनी दगड रचून या समाध्या बांधलेल्या आहेत. समाध्यांवर दिवा लावण्यासाठी दगडी देवळ्या असून यापैकी सर्वात पुढील समाधी ही सरनौबत म्हाळोजीबाबांची समाधी म्हणून ग्रामस्थाना परिचित आहे. या समाधीच्या दगडी देवळीत दगडाचाच छोटा निरांजनासारखा दिवा आहे. इतर समाधीस्थानांपेक्षा ही दगडी देवळी व दिवा वेगळ्या घडणीचा आहे.
देवीचे नवरात्र, जत्रा व गावातील इतर सणांच्या वेळी या समाध्यांना नैवेद्य दाखविला जातो. काळीसरीदेवीच्या मंदिरात स्थापनेच्या वेळच्या मूर्ती असून यापैकी उजवीकडील मूर्ती वरदायिनी मातेची (भवानी), मधील जुगाईदेवीची तर डावीकडील काळीसरी देवीची आहे.
म्हाळोजीबाबांच्या मृत्युपूर्वीपासूनच घोरपड्यांची वस्ती येथे आहे. त्यामुळे समाध्यांचा काळ देवीस्थापनेनंतरचा ठरतो. देवीचे स्थान इथे असल्यामुळेच नित्यपूजेसाठी समाध्या मंदिराशेजारी बांधण्यात आल्या.
घोरपडेवाडीतील ग्रामस्थांच्या पूर्वापार चालत आलेल्या रितींवरून, माहितीवरून व परंपरेने या समाध्या घोरपड्यांच्या असून सर्वात पुढील समाधी ही म्हाळोजीबाबांची समाधी म्हणूनच ओळखली व पूजली जाते. देवी मंदिराशेजारील अगदी महत्त्वाच्या जागेवरूनही याला बळकटी मिळते.
संगमेश्वराच्या लढाईत म्हाळोजीबाबा व इतर सैनिक वीरगती पावल्यानंतर त्यांचे व सैनिकांपैकी घोरपडे घराण्यातील व्यक्तींचे दहन व इतर क्रियाकर्मे ही कारभाटले गावच्या घोरपड्यांनी ते भाऊबंद असल्याने करून त्यांची समाधीस्थाने गावात बांधली असावीत असा निश्चित अंदाज करता येतो.
राहत्या गावी आपल्या पूर्वजांची समाधी बांधण्याची आपल्याकडे पूर्वीपासूनच परंपरा आहे. त्यासाठी ग्रामदैवताच्या शेजारचे स्थान सर्वात योग्य मानले जाते. याशिवाय नद्यांच्या संगमावर,परिसरातील प्राचीन मंदिराशेजारी, अथवा इतर पवित्र ठिकाणीसुद्धा समाध्या बांधल्या जात. समाधी बांधताना त्यात मृत व्यक्तीचा अस्थिकलश ठेवण्याची परंपरा आहे. त्यामुळे म्हाळोजीबाबा व त्यांच्यासमवेत मारले गेलेल्या इतर घोरपडे वीरांचे दहन केल्यानंतर त्यांची समाधीस्थाने घोरपड्यांच्या कारभाटले या संगमेश्वरपासून जवळ असलेल्या गावी असणे हे तर्काला धरूनच आहे. नित्यनैमित्तिक पूजा व इतर सोयींसाठी या समाध्या देवीमंदिराशेजारी बांधण्यात आल्या. इतर चार समाधीस्थानेसुद्धा घोरपड्यांचीच असून अद्याप त्यांची नावनिशीवार माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र या सर्व समाध्या एकाच वेळी बांधण्यात आल्या हे बांधकामावरून सहज समजते.
 
म्हाळोजीबाबांकडे वांगी, भाळवणी, न्हावी, जांब ही गावे होती. मात्र या गावात तसेच संगमेश्वरमध्ये म्हाळोजीबाबांची कुठेही समाधी नाही. कापशी, गजेंद्रगड, दत्तवाड ही गावे अनुक्रमे सेनापती संताजी, बहिर्जी व मालोजी या तीन बंधूना नंतरच्या काळात मिळाल्याने तेथेसुद्धा म्हाळोजीबाबाची समाधी नाही.
उपलब्ध इतिहासाप्रमाणे देवीमंदिराशेजारी समाधी बांधण्याएवढे मोठे व महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व म्हाळोजीबाबांशिवाय दुसरे कोणतेही नाही. घोरपड्यांच्या संबंधात या भागात संगमेश्वर लढाईसारखी दुसरी कुठलीही महत्त्वाची घटना म्हाळोजीबाबांच्या मृत्युपूर्वी व नंतरसुद्धा घडलेली नाही. त्यामुळे म्हाळोजीबाबांच्या समाधीच्या सत्यतेविषयी खात्री पटते.
शिवपूर्वकाळापासून म्हणजे इ.स.१६०० पासून ते १८१८ मध्ये मराठी साम्राज्य ब्रिटिशांकडून नष्ट केले जाईपर्यंतच्या काळात मराठेशाहीतील शेकडो कर्तबगार, महत्त्वाच्या पदावरील व एखाद्या प्रसंगाने प्रसिद्धी पावलेल्या व्यक्ती मरण पावल्या आहेत. काही लढायांत, काही वृद्ध होऊन तर काही आजारपणाने मृत झाल्या. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरसुद्धा गावोगावी, किल्ल्यांवर, पवित्र ठिकाणी अनेक मराठ्यांची समाधीस्थाने आहेत. लढाईत मृत्यूमुखी पडलेल्या , घराण्याचे मूळ पुरुष असलेल्या तसेच विशेष कर्तबगारी दाखवलेल्या व्यक्तींची समाधीस्थाने आवर्जून बांधली जात. लढाईत रणांगणावर आलेला मृत्यू त्याकाळी व आजही सर्वश्रेष्ठ समजला जातो. अशा व्यक्तींच्या कर्तबगारीचे स्मरण म्हणून, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच परंपरेने चालत आलेली पितृपूजा, कुलाचार, पूजाविधी करण्यासाठी या समाध्या बांधल्या व पूजल्या जात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या व्यक्तींचे चरित्र माहिती होत जाई.
इ.स.१६०० पासून ते औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंतचा (इ.स.१७०७)हा काळ महाराष्ट्रासाठी अतिशय धामधुमीचा होता. त्यामुळे या काळातील बहुसंख्य समाध्यांना कागदोपत्री अगदी काटेकोरपणे समाधीची निश्चिती करणारा पुरावा आढळत नाही. तसेच समाधीच्या पूजाअर्चेसाठी कागदोपत्री काही जमीन अथवा इनाम दिले जाण्याच्या घटना अगदी महत्त्वपूर्ण पदावरील, मोठ्या घराण्यातील तुरळक व्यक्तींच्या बाबतीतच आढळतात. त्यामुळे एखाद्या समाधीस्थानांविषयी त्या व्यक्तींच्या घराण्यातील वंशजाच्या परंपरा, वहिवाट, पूर्वापार चालत आलेली माहिती व त्या व्यक्तींच्या मृत्यूच्या प्रसंगाची व ठिकाणाची कागदपत्रातून आढळणारी त्रोटक माहिती यांच्याआधारेच एखाद्या व्यक्तीचे समाधीस्थान निश्चितपणे सांगता येऊ शकते.
अनेक मोठ्या घराण्यांची त्यांची वेगळी समाधीस्थानासाठी ठेवलेली जागा असूनसुद्धा त्या जागेतील समाध्यांपैकी कोणती समाधी कोणाची हे कागदोपत्री पुराव्याअभावी काटेकोरपणे सांगता येत नाही. मुधोळ मधील घोरपडेंच्या समाधीस्थानांची जागा, गजेंद्रगडकर घोरपडेंची एकत्रितअसणारी समाधीस्थाने, तंजावरच्या राजेभोसले घराण्यातील समाधीस्थाने, साताऱ्यातील संगम माहुली येथील छत्रपतींच्या घराण्यातील समाधीस्थाने इथेही हीच परिस्थिती आहे. पण परंपरेने या समाध्या पुजल्या जात असल्याने कोणती समाधी कोणाची हे ठरवण्यास निश्चित आधार मिळतो.अशाच प्रकारे आपल्या इतिहासातील बहुतांश वीरांची समाधीस्थळे निश्चित झालेली आहेत.
याच अनुषंगाने कारभाटले येथील समाधीस्थळे घोरपडेंचीच असून सर्वात पुढील समाधी ही सरनोबत म्हाळोजीबाबा घोरपडे यांची आहे असा निष्कर्ष खालील मुद्द्यावरून काढता येतो.
१. कारभाटले येथे
ग्रामदैवताच्या मंदिरशेजारी महत्त्वाच्या जागी समाधीस्थाने आहेत.
२. कारभाटले गाव संगमेश्वरच्या जवळ आहे.हे घोरपडेंचे गाव आहे.
३. घोरपडे घराण्याशी संबंधित इतर गावामध्ये कुठेही म्हाळोजीबाबांची समाधी नाही.
४. समाध्यांच्या बांधकामाचे साहित्य व पद्धत शिवकालीन आहेत.
५. कारभाटले ग्रामस्थ पूर्वापार परंपरागत माहितीआधारे ही समाधी म्हाळोजीबाबांचीच असल्याचे
मानतात व नैमित्तिक पूजा करतात.
६. सेनापती संताजीरावांचे थेट वंशज कापशीकर सेनापती राणोजीराजे घोरपडे सरकार यांचीही या गोष्टीला मान्यता आहे.
७. म्हाळोजीबाबांशिवाय इतर कोणतीही इतिहासप्रसिद्ध व समाधी बांधण्याच्या योग्यतेची व्यक्ती दुसरी कुणीही या भागात त्या काळात झालेली नाही.
८. संगमेश्वरच्या लढाईसारखा अतिशय महत्त्वपूर्ण प्रसंग या लढाईशिवाय दुसरा कोणताही त्यापूर्वी व त्यानंतर या भागात घडलेला नाही.
१०. प्रत्यक्ष छत्रपतींना वाचविताना प्राणार्पण केलेल्या वीरांची समाधीस्थाने बांधली जाणे सहज शक्य गोष्ट आहे.
११. म्हाळोजीबाबा हे सेनापती घोरपडे घराण्याचे मूळ पुरुष असल्याने त्यांची समाधी बांधली जाणे आवश्यकच होते.
वरील सर्व मुद्यावरून या पाचही समाध्या घोरपडे वीरांच्याच असून त्यातील सर्वात पुढील समाधी माळोजीबाबांची आहे असा निष्कर्ष काढता येतो.

*सरनौबत म्हाळोजीबाबांचे चरित्र व कार्य* भाग ६

 

 *सरनौबत म्हाळोजीबाबांचे चरित्र व कार्य*

भाग ६ 
लेखन :
फोटो व लेख - प्रवीण भोसले
9422619791
 
म्हाळोजीबाबांचा जन्म बहुधा १६२० मध्ये झाला. १६३७ चा आदिलशाही सनदेत त्यांना विटा भागातील गावे दिल्याचा उल्लेख आहे. यानंतर १५ वर्षे ते शहाजीराजांबरोबर होते. सन १६५२ ला शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजेंच्या हाताखाली ते होते. १६५५ पासून १६८० पर्यंत शिवभप्रभूंबरोबर स्वराज्यस्थापनेच्या कार्यात ते सहभागी होते. छत्रपती शंभूराजांना वाचविताना त्यांनी प्राणापर्ण केले तेव्हा ते ६९ वर्षाचे होते. सतत ५२ वर्षे स्वराज्यसेवा बजावून ते धारातीर्थी पडले. सेनापती घोरपडे घराण्याच्या या मूळ पुरुषाचे चरित्र व कर्तबगारी या प्रसंगामुळे त्या घराण्यासह सर्व मराठी जनांना व महाराष्ट्राला ललामभूत ठरलेली आहे.
छ. शंभूराजाना कडेकोट बंदोबस्तात बहादूरगड येथे मोगली छावणीत पाठविण्यात आले. औरंगजेब तेथेच होता.१ फेब्रुवारीपासून ११ मार्चपर्यंत शंभूराजांचे अतोनात हाल करून ११ मार्चला औरंगजेबाने तुळापूर येथे शंभूराजांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.
पुढच्या सतरा वर्षात मोगल मराठ्यांना संपविण्यासाठी धडपडत राहिले पण छत्रपती शंभूराजांच्या क्रूर हत्येने चिडलेल्या व छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली सेनापती संताजी घोरपडेंच्या अचाट पराक्रमाने प्रेरीत झालेल्या, स्वयंस्फूर्तीने लढणाऱ्या मराठ्यांना ते हरवू शकले नाहीत. निराश अवस्थेत अपयशी ठरलेला औरंगजेब इथे महाराष्ट्रातच मातीआड झाला.मोगलांना मराठ्यांच्या दहशतीखाली आणले संताजीं घोरपडेंनी. छत्रपती राजाराम महाराज जिंजीकडे जात असताना त्यांच्या संरक्षकात होते बहिर्जी व मालोजी घोरपडे.या प्रवासात आलेल्या मोगलांच्या एका छाप्यावेळी छत्रपती राजाराम महाराजांना निसटून जाण्यासाठी मदत करताना मालोजी मोगलांच्या हाती सापडले. त्यांना कैदेतच ठार करण्यात आले.बहिर्जी घोरपडेंनी मोगलांविरूध्द अनेक लढाया तर केल्याच शिवाय कर्नाटकात गजेंद्रगडला आपले ठाणे स्थापून पुढील काळातील दक्षिण भारतातील मराठा सत्तेच्या विस्तारात खूप मोठी कामगिरी केली.म्हाळोजीबाबांचे हे तीनही पुत्र मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाले.


*सरनौबत म्हाळोजीबाबांचे चरित्र व कार्य* भाग ५

 

 *सरनौबत म्हाळोजीबाबांचे चरित्र व कार्य*

भाग ५
लेखन :
फोटो व लेख - प्रवीण भोसले
9422619791
 
 
१ फेब्रुवारीला सकाळपासूनच काही राहिलेली न्यायनिवाड्याची कामे तातडीने उरकत असतानाच शंभूराजाना शेखनिजाम उर्फ मुकर्रबखान हा मोगली सरदार संगमेश्वरवर येऊन धडकल्याची धक्कादायक बातमी कळली. शेखनिजाम थेट कोल्हापूरहून कोणालाही न समजू देता संगमेश्वरवर संभाजीराजांवर चालून आला होता. त्याला या भागातील आडवाटांसह शंभूराजाच्या हालचालींची बातमी अचूकपणे कळविणारे या भागातीलच फितूर या घटनेचे मुख्य सहाय्यकारी ठरले असावेत.
शेख निजामाने ३००० सैन्यासह संगमेश्वर घेरले. फास आवळत तो शंभूराजे व त्यांच्या सोबतचे ४००-५०० मराठा सैन्य यांच्याजवळ पोहोचू लागला. या संकटप्रसंगी
छत्रपती संभाजीराजांनी आपली सैन्यशक्ती मोगलांपेक्षा कमी आहे हे ध्यानात घेऊन मोंगली फौजेशी लढा देत त्यांची फळी फोडून सर्वांनी जमेल तसे रायगडाकडे निसटून जायचा निर्णय घेतला. ३००० मोगल विरुद्ध ४०० मराठे अशी विषम लढाई सुरू झाली. म्हाळोजीबाबा, संताजीराव व त्यांचे बंधू, कविकलश, खंडो बल्लाळ व स्वतः छत्रपती शंभूराजे टोळ्याटोळ्यांनी मोगलाचा वेढा फोडून पार जाण्यासाठी झुंजू लागले. संताजीराव व खंडो बल्लाळांनी मोगलांची फळी फोडून रायगडाकडे दौड सुरू केली. मात्र म्हाळोजीबाबा, कविकलश व छत्रपती शंभूराजे घेरले गेले. या अटीतटीच्या प्रसंगी म्हाळोजीबाबांनी पुढे होऊन लढाईचा भार स्वतःवर घेतला. छातीचा कोट करून आपल्या छत्रपतींचे रक्षण करण्यासाठी म्हाळोजीबाबा त्वेषाने या हजारोंच्या मोगली सैन्याविरूध्द लढू लागले.मोगलांशी प्राणपणाने झुंजत स्वराज्याच्या छत्रपतींना वाचविण्यासाठी लढणारे म्हाळोजीबाबा या लढाईत धारातीर्थी पडले.जखमी कवी कलशांना वाचवण्यासाठी मागे फिरलेल्या छत्रपती शंभूराजांना मोगलांनी
कवी कलशांसह घेरून कैद केले. स्वराज्याचे छत्रपती औरंगजेबाच्या विळख्यात सापडले.पण हा दुर्दैवी प्रकार पाहण्यापूर्वीच म्हाळोजीबाबांचे डोळे मृत्यूने मिटले होते.(१ फेब्रुवारी १६८९).



*सरनौबत म्हाळोजीबाबांचे चरित्र व कार्य* भाग ४

 *सरनौबत म्हाळोजीबाबांचे चरित्र व कार्य*

भाग ४ 
लेखन :
फोटो व लेख - प्रवीण भोसले
9422619791
 
 
*संगमेश्वरची लढाई*
औरंगजेबाचे सर्व सरदार अफाट युद्धसामुग्री व बेमुबलक खजिन्यासह मराठ्यांना संपविण्यासाठी मोहिमावर मोहिमा काढू लागले. याचवेळी औरंगजेबाने आपले हुकमी अस्त्र बाहेर काढले ते म्हणजे मराठ्यांमध्ये दुही पेरण्याचे, फितुरीचे आणि आमिषे दाखवून; मनसबदारी देऊन मराठ्यांना आपल्याकडे वळवून घेण्याचे. मोगलाच्या प्रचंड सामर्थ्यासमोर मराठ्यांचे स्वराज्य कितपत टिकाव धरणार या आशंकेने व स्वतःचे वतन सुरक्षित ठेऊन बादशाही मनसब मिळवण्याच्या स्वार्थी इच्छेने काही मराठे सरदार औरंगजेबाच्या दरबारात रुजू झाले. यातच शृंगारपूरचे गणोजीराजे शिर्के हेही १६८८ मध्ये मोगलांना सामील झाले. गणोजीराजे हे शिवरायांचे जावई तसेच त्यांच्या भगिनी येसूबाई या शंभूछत्रपतींच्या पत्नी होत्या. हा शिवरायांच्या जवळच्या नात्यातील मोठा मोहरा औरगजेबाला मिळाला. शृंगारपूर, संगमेश्वर या भागाचा कारभार शिर्के मंडळीच स्वराज्यात असताना पहात असत.पन्हाळा किल्ल्याच्या परिसरात शिर्केनी छत्रपती शंभूराजांचे सल्लागार व छंदोगामात्य कवि कलश यांच्यावर हल्ला केला. कविकलश पळून पन्हाळा किल्ल्यावर आश्रयास गेले व त्यांनी ही बातमी छत्रपती शंभूराजांना कळविली. छत्रपती शंभूराजे तातडीने रायगडावरून विशाळगडावर आले. त्याचवेळी मोठी मोगली फौज कोल्हापूरवर चाल करून आली होती. ही बातमी कळताच शंभूराजांनी त्वरेने हालचाली केल्या.
म्हाळोजीबाबाना ससैन्य बरोबर घेऊन शंभूराजांनी संगमेश्वरवर हल्ला केला. शिर्के पळून गेले. या मोहिमेत संताजीराव व त्यांचे दोन्ही बंधू तसेच कविकलश, खंडो बल्लाळ चिटणीस हे सर्वजण होते.
छत्रपती शंभूराजे संगमेश्वराला आल्याचे कळताच अनेकांनी आपल्या तक्रारी निवारण्यासाठी
संगमेश्वरला धाव घेतली. या तक्रारींचा न्यायनिवाडा करण्यात दोन तीन दिवस निघून गेले.
१ फेब्रुवारी रोजी रायगडाकडे निघण्याचे ठरवून शंभूराजांनी आपली हुजुरातीची ४०० ते ५०० सैन्याची तुकडी संगमेश्वरला आपल्यापाशी ठेऊन इतर सैन्य रायगडाकडे रवाना केले. संगमेश्वर येथील देसायांच्या वाड्यात शंभूराजांचा मुक्काम होता.


*सरनौबत म्हाळोजीबाबांचे चरित्र व कार्य* भाग ३

 *सरनौबत म्हाळोजीबाबांचे चरित्र व कार्य*

भाग ३
लेखन :
फोटो व लेख - प्रवीण भोसले
9422619791
 
कर्नाटकातील कोप्पल भागात मोगलांच्या चिथावणीने उठलेल्या बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी गेलेल्या छत्रपती शंभूराजाना संताजीरावांनी ऐनवेळी दहा बारा हजारांची फौज जमवून कुमक केली. सतत तीन महिने लढाया करून संताजीरावानी तुंगभद्रा नदीच्या आसपासचा मुलुख काबीज करून महात्वाची ठाणी सर केली. ही सर्व घटना स्वतः छत्रपती शंभूराजांनी संताजीरावाना दिलेल्या
देशमुखीच्या सनदेत नोंदली गेली आहे. तसेच या सनदेतील पुढील वाक्ये महत्त्वाची आहेत. *'हा उपयोग राज्याचा चांगला केला आणि सर्व सरकारात चाकरी हिमतीने आणि इमानाने केली व आपला प्राणरक्षण करून आमचा रक्षण केला हे समजून तुम्हास राज्यातील चौधाई मुलुख इनाम करून दिला असे... तुमची चाकरी हिमतीची पाहून आम्ही संतोषाने ही देणगी दिली असे.'*(दि.१६ जानेवारी १६८२). या सनदेत म्हटल्याप्रमाणे एका अडचणीच्या आणि संकटाच्या वेळी छत्रपती शंभूराजांचे प्राणच धोक्यात आले असताना संताजीरावानी ते वाचवले. ही अतिशय मोलाची कामगिरी चौथाईची सनद देऊन गौरविण्यात आली.आपल्या पुत्राच्या या कर्तबगारीने म्हाळोजीबाबा निश्चितच सुखावले असणार.त्यांच्या पुढील पिढीच्या स्वामीनिष्ठ पराक्रमाची ही सुरुवातीची पावती होती. पुन्हा एकवार मोगलांशी लढण्यासाठी संताजीराव सन १६८६ मध्ये कनार्टकात मोहिमेवर गेले. या सर्व घडामोडी चालू असताना म्हाळोजीबाबा सरनोबत पदावर राहून पन्हाळा सुभ्याचा लष्करी बंदोबस्त चोख ठेवत होते. पन्हाळा सुभ्यात पन्हाळ्याशिवाय विशाळगड व प्रचितगड हे किल्ले व त्या खालचा भाग समाविष्ट होता. प्रचितगडावर कारभाटले येथील घोरपडे मंडळी सैन्यात होतीच.
छत्रपती शंभूराजांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांच्या प्रखर प्रतिकाराने नाउमेद होऊन औरंगजेबाने आपला मोर्चा विजापूरची आदिलशाही व गोवळकोड्याची कुतुबशाही यांच्याकडे वळविला. प्रचंड सैन्यसामर्थ्य व त्याचबरोबर शत्रूपक्षातील सरदाराना आमिषे दाखवून फोडून आपल्याकडे वळवून घेऊन औरंगजेबाने वेढा घालून या दोन्ही सुलतानशाह्या पूर्ण नष्ट केल्या. या दोन्ही पुरातन शाह्याचा खजिना, युद्धसामग्री व सैन्य कब्जात आल्याने औरंगजेबाचे सामर्थ्य दुपटीने वाढले. या वाढीव सामर्थ्यासह औरगंजेब पुन्हा प्रलयाप्रमाणे मराठ्यांच्या स्वराज्यावर तुटून पडला. आता फक्त मराठेच त्याचे एकमेव शत्रू राहिले होते. इंग्रज व पोर्तुगीज याना दम देऊन औरंगजेबाने संभाजीराजांच्या विरुद्ध उठवले. जंजिऱ्याच्या सिद्दीला आपला मनसबदार करून मराठ्यांवर हल्ले करण्यास बळ दिले. मराठ्यांच्या स्वराज्याची अशी नाकेबंदी करून औरंगजेब नव्या उमेदीने मोहिम चालवू लागला. अशातच स्वराज्याचे पराक्रमी सेनापती हंबीरराव मोहिते वाई येथील लढाईत १६८५ साली धारातीर्थी पडले. यानंतर बहुधा म्हाळोजीबाबांकडे हे पद आले असावे पण अद्याप याला ठाम पुरावा उपलब्ध नाही.
या विलक्षण वादळी स्वरूपाच्या विषम लढाईत औरंगजेबाला अकस्मात त्याला हवी होती ती घटना घडली. छत्रपती संभाजीराजे संगमेश्वर येथे मोगलांच्या हाती सापडून कैद केले गेले.




*सरनौबत म्हाळोजीबाबांचे चरित्र व कार्य* भाग २

 



*सरनौबत म्हाळोजीबाबांचे चरित्र व कार्य*

भाग २ 
लेखन :
फोटो व लेख - प्रवीण भोसले
9422619791
 
 
 
आदिलशाही दरबारातील कटकारस्थानांना कंटाळून शहाजीराजांनी कर्नाटकातील बेंगलोर शहरी आपले वास्तव्य कायम केले.या सर्व घटनांचे म्हाळोजीबाबा साक्षीदार होते. छत्रपती शिवरायांच्या पदरी आपल्या कर्तबगारीने व स्वराज्यनिष्ठेने लवकरच म्हाळोजीबाबांना
सरनोबत पद मिळाल्याचा उल्लेख कापशीकर घोरपडेंचा इतिहास या पुस्तकात आहे. पन्हाळा सुभ्याचा पूर्वीचा अनुभव असल्याने त्यांना या भागात नेमण्यात आले.
छत्रपती शिवरायांच्या युगप्रवर्तक कार्यात म्हाळोजीबाबा पूर्णपणे समरसून कार्य करत होते.शिवरायांनी १६६०-६१ च्या कोकण मोहिमेत पालवण, संगमेश्वर, शृंगारपूर काबीज केले. येथील आदिलशाही सरदार सुर्वे व दळवी हे पळून गेले. शृंगारपूर भाग शिर्के यांच्याकडे देण्यात आला. या मोहिमेत शिवरायांनी प्रचितगड जिंकून तिथे आपले मजबूत लष्करी ठाणे बसविले. बहुधा याच सुमारास म्हाळोजीबाबांनी आपल्या भाऊबंदांपैकी वेणेगाव (जि.सातारा) येथील घोरपडेंना स्वराज्यसेवेत रुजू केले. प्रचितगडावरील सैन्यात घोरपडेंचा समावेश झाला. प्रचितगडाच्या पायथ्यापासून जवळच असलेल्या कारभाटले या गावी ही घोरपडे मंडळी स्थायिक झाली.
शिवराज्याभिषेक, दक्षिण दिग्विजय मोहिम व त्यानंतर युवराज संभाजीराजांचे अल्पकाळ मोगलांना मिळून परत स्वराज्यात येणे या घटना म्हाळोजीबाबा पहात होते. मोगलांकडून परत आलेल्या युवराज शंभूराजांना शिवरायांनी काही काळ पन्हाळ्यावर राहण्यास सांगितले व त्यांच्या दिमतीला म्हाळोजीबाबांची नेमणूक करण्यात आली.
छत्रपती शिवरायांच्या अनपेक्षित व अकाली झालेल्या मृत्यूनंतर युवराज संभाजीराजे छत्रपती झाले.म्हाळोजीबाबांनी आपली निष्ठा छत्रपती शंभूराजांच्या चरणी वाहिली. यावेळी म्हाळोजीबाबांचे पुत्र संताजी, बहिर्जी व मालोजी हेही स्वराज्यात तलवार गाजवीत होते.
शिवरायांच्या मृत्यूची वार्ता कळताच आनंदित झालेल्या औरंगजेबाने महाराष्ट्रातील मराठ्यांचे राज्य संपविण्यासाठी मोठ्या मोहिमेची तयारी केली. प्रचंड सेनासागर, मुबलक युद्धसामुग्री, करोडोंचा खजिना घेऊन स्वतः औरंगजेब महाराष्ट्रात दाखल झाला. आशियाखंडातील सर्वात मोठे व बलाढ्य असे मोगल साम्राज्य विरुद्ध त्यापेक्षा कैकपटीने लहान असलेले, शिवप्रभू हयात नसलेले, मराठ्यांचे स्वराज्य असा विषम सामना महाराष्ट्रात सुरू झाला. छत्रपती संभाजी महाराजांनी अतिशय जिद्दीने,चिकाटीने आणि दुर्दम्य इच्छाशक्तीने प्रचंड धावपळीच्या लढाया मारून मोगलांना सुरुवातीच्या काळात कुठेही यश मिळू दिले नाही. म्हाळोजीबाबांचे पुत्र संताजीराव हे शिवप्रभूंच्या तालमीत तयार झालेले गनिमी काव्याचे वाकबगार सेनानी फिरत्या फौजा घेऊन मोगलांशी लढा देऊ लागले.

*सरनौबत म्हाळोजीबाबांचे चरित्र व कार्य* भाग १

 



*सरनौबत म्हाळोजीबाबांचे चरित्र व कार्य*
भाग १ 
लेखन :
फोटो व लेख - प्रवीण भोसले
9422619791
 
वल्लभजी घोरपडे हे वाई प्रांतातील विटा परगण्याचे देशमुख असून भाळवणी, न्हावी, वांगी व जांब ही गावे त्यांच्याकडे असून त्या गावांची पाटीलकीही त्यांच्याकडेच होती. यांच्याच काळात भाळवणी हे घोरपडेंच्या या शाखेचे रहिवासाचे मुख्य ठिकाण बनले. आजही भाळवणीमधे घोरपडेंचा जुना वाडा जीर्णावस्थेत आहे. वल्लभजींचे पुत्र बहिर्जी व बहिर्जींचे पुत्र म्हाळोजीबाबा होते. सन १६३७ च्या वाटणीच्या सनदेनुसार वल्लभजींचे नातू म्हाळोजीबाबा ही गावे सांभाळून होते.
विजापूर दरबारात सरदारांचे दोन प्रतिस्पर्धी गट होते. एका गटात शहाजीराजे, रुस्तमेजमान,
रणदुल्लाखान हे होते तर दुसऱ्या गटाचे मुख्य अफजलखान, खवासखान, बाजीराजे घोरपडे हे होते. वल्लभजी शहाजीराजांच्या सैन्यात असून ते ५०० स्वारांचे सरदार होते. मुधोळ शाखा व भाळवणी शाखा यांच्यात अधूनमधून वाटणीसंबंधात तक्रारी होत असत. यात शहाजीराजे वल्लभजींची बाजू घेत असत. एका प्रसंगी शहाजीराजे व बाजीराजे यांच्यात या प्रकरणावरून समझोत्याचा तहदेखील झाला होता.
सन १६५२ मध्ये शहाजीराजाचे थोरले पुत्र संभाजीराजे (छत्रपती शिवरायांचे सख्खे थोरले बंधू)हे पन्हाळ्याची सुभेदारी सांभाळत असताना म्हाळोजीबाबा संभाजीराजांच्या तैनातीत होते. याच काळात निर्माण झालेला घोरपडेंच्या कसबे वांगीच्या पाटीलकीचा वाद संभाजीराजांनी मिटवल्याचे पत्र उपलब्ध आहे.हे पत्र संभाजीराजांनी म्हाळोजीबाबांच्या अर्जाला उत्तर म्हणून लिहिलेले आहे.
१६५५ मध्ये संभाजीराजे अफजलखानाच्या कारस्थानामुळे कर्नाटकातील कनकगिरी येथे झालेल्या लढाईत मृत्यू पावले. त्याच काळात आदिलशाहाने हिंदूवर धार्मिक अत्याचार करण्याचे धोरण अवलंबले होते. या घटनांनंतर म्हाळोजीबाबांनी शहाजीराजांची परवानगी घेऊन आदिलशाहीविरुद्ध लढा देणाऱ्या शिवरायांच्या पदरी आपली सेवा रुजू केली.

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...