विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 31 December 2023

सरसेनापती संताजी घोरपडे

 


सरसेनापती संताजी घोरपडे यांचे आलमगीर बादशाहने केलेले वर्णन -
याद रखो मुकाबला संताजी और
उसकी कडवी फौज से है. संताजी तर
बहुत खतरनाक गनीम अकस्मात हमला उढवतो. बगऴ्याने मासऴी टिपावी तसा हा लचके तोडतो. शिपाईगिरीची शर्थ करतो आणि बघता बघता पसार होतो. संताजी आणि त्याची नेकजात फौज खाण्यापिण्याची, झोपेची कशाकशाची म्हणुन दरकार बाऴगत नाही. एका मुलखात आले आले म्हणताच दुसऱ्या मुलखात दिसतात. एवढी त्यांची जलद गती आहे. शिवाने अनुसरलेला गनीमी कावा पोरवयात असल्यापासुन संताजीने आत्मसात केला. बालवयातच शिवान त्याला आपल्या तालमीत तयार केल असाव.
पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा, 🙏🚩
रणमार्तंड संताजीबाबा
- रवि शिवाजी मोरे
छायाचित्र - राम बाळासाहेब देशमुख
@sarsenapati_santaji_ghorpade

Saturday 30 December 2023

*भोपाळची लढाई*

 



*भोपाळची लढाई*

लेखन :गिरीश वणारे

जेव्हा मराठा सैन्याने पाच मोठ्या संस्थानांच्या एकत्रित सैन्याचा एकहाती पराभव केला.

बाबरने घातलेले मुघल साम्राज्य औरंगजेबाच्या काळात शिखरावर होते. इराणच्या शहापासून सुरुवात करून सर्व मोठमोठ्या संस्थानांना मुघलांची भीती वाटत होती, पण मयूर सिंहासनाला फक्त "मराठा स्वराज्याची" भीती होती.

छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना औरंगाला महाराष्ट्रात पाय ठेवण्याची हिंमत नव्हती, पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध जिहाद पुकारला, पण आम्ही 27 वर्षे लढा सुरूच ठेवला, शेवटी 1707 मध्ये देशद्रोही औरंगाचा पराभव झाला. मरण पावले आणि मुघलांनी त्याचा पराभव केला.भारतातून पाय उपटायला लागले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी दिल्ली आपल्या टाचाखाली घेतली होती.

मार्च 1737 मध्ये छत्रपती शाहू महाराजांचे प्रमुख बाजीराव यांच्या नेतृत्वाखाली 70,000 मराठा सैन्याने 250,000 मुघल सैन्याचा पराभव करून दिल्ली जिंकली.राजा हेमचंद्रानंतर पहिल्यांदाच मराठा साम्राज्याच्या रूपाने दिल्लीवर हिंदू राजवट लादली गेली.

बादशहाकडून खंडणी काढून मराठा साम्राज्याची ताकद दाखवून मराठा सैन्य महाराष्ट्रात परत येऊ लागले, पण या पराभवाने बादशहा हतबल झाला. मराठ्यांचा विजय ही मुघलांच्या विध्वंसाची सुरुवात होती.

बादशहाने हैदराबादच्या त्याच्या आवडत्या निजामाला भोपाळजवळ मराठा सैन्यावर हल्ला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले, उत्तरेकडून मराठा सैन्यासह बादशहाच्या सैन्यासह अवधचा नवाब, भोपाळचा नवाब, जयपूरचा राजा सवाई जयसिंग आणि भरतपूरचा राजा बदनसिंग.निजाम स्वतः मोठ्या तोफा घेऊन प्रधान बाजीरावांना संपवायला निघाला.

पण मराठे शत्रूंपेक्षा दोन पावले पुढे होते, निजाम आणि राजाची सर्व माहिती राऊला होती. निजामाचा समोरासमोर मुकाबला करण्याऐवजी मराठा सैन्य निजामाच्या हद्दीत घुसले आणि तिकडे हल्ले करू लागले.निजामाला याची माहिती मिळताच निजामाने आपल्या तोफांचा मारा केला आणि मराठा सैन्याच्या मागे गेला.

शेवटी भोपाळमध्ये दोन्ही सैन्य आमनेसामने आले, जयपूरचा राजपूत राजा सवाई जयसिंग याच्या सैन्याचे नेतृत्व दिवाण राजा अयामलकडे होते, जाट राजा बदनसिंगच्या सैन्याचे नेतृत्व त्याचा मुलगा प्रताप सिंग आणि भोपाळचा नवाब नवाब सादत यांच्याकडे होता. अवधचा अली खान. सेनापती तयार होताच आणि त्यांचा नेता हैदराबादचा निजाम-उल-मुल्क असफ होता, संपूर्ण उत्तर भारत मराठा सैन्याचा नाश करण्यासाठी एकवटला.

दुसरा होता बाजीराव, मराठा साम्राज्याचा अजिंक्य नेता आणि त्याचे मराठा सैन्य.

24 डिसेंबर 1737 रोजी प्रधान बाजीरावांनी शत्रूच्या सैन्यावर समोरून हल्ला केला आणि शत्रूंना रसद मिळू नये यासाठी चिमाजीअप्पा 10,000 सैन्यासह सज्ज होते.

मराठा सैन्याच्या प्रभारासमोर शत्रूचे सैन्य पराभूत झाले, लढाई सुरू होताच लवकर संपली, मराठ्यांचा प्रभार पाहून राजाने दिल्लीहून अधिक रसद देण्यास नकार दिला आणि हताश झालेल्या निजामाने नाक घासून आश्रय घेतला. . मराठा सैन्याचा निर्णायक विजय झाला, एका फटक्यात मराठ्यांनी उत्तर भारतातील मोठ्या राज्यांचा पराभव केला आणि संपूर्ण भारतावर राज्य करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल केली.

दिल्लीवर हल्ला करण्यासाठी मराठ्यांचा नाश करण्याचे स्वप्न पाहणारा दिल्लीचा बादशहा या प्रचंड पराभवाने आणखीनच दुबळा झाला आणि हा विजय सम्राटाच्या ताब्यातील सर्व संस्थानांना मराठा साम्राज्याचा पराभव होणार असा इशारा बनला.

7 जानेवारी 1738 रोजी छत्रपती शाहू महाराजांचे मराठा साम्राज्याचे प्रतिनिधी प्रधान बाजीराव आणि मुघल प्रतिनिधी सवाई जयसिंग यांच्यात एक करार झाला ज्यानुसार नर्मदा आणि चंबळ नद्यांच्या दरम्यानचा माळवा प्रदेश मराठा साम्राज्याच्या पूर्ण नियंत्रणाखाली आला आणि राजाच्या ताब्यात गेला. विजयी मराठा सैन्य 5,000,000 रुपयांची युद्ध लुट घेऊन महाराष्ट्रात परत.

#धर्मरक्षक_मराठा

#मराठा_साम्राज्य

#बचेंगे तो ओर लढेंगे.

Thursday 21 December 2023

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चीतेला अग्नी दिला साबाजी भोसले यांनी

 


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चीतेला अग्नी दिला साबाजी भोसले यांनी
लेखन :आशिष माळी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चीतेला अग्नी दिला साबाजी भोसले यांनी. साबाजी भोसले हे शिंगणापूर भोसले कुळातील. महाराष्ट्रात अनेक भोसले कुळ पसरले आहे. जसे शिवाजी महाराज हे वेरूळ भोसले कुलापैकी. त्याच प्रमाणे साबाजी भोसले हे शिंगणापूर घराण्यातील . शिंगणापूर घराणे हे वेरूळ घराणे मधील मोठे पाती चे असल्यामुळे त्यांना तो आधीकर मिळाला.
एप्रिल १६८० , शनिवार ,हनुमान जयंती ,पूर्ण महाराष्ट्र साठी काळा दिवस .याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवला.छत्रपती शिवाजी महाराज यांची मृत्यूची बातमी संभाजी महाराजा पासून लपवली. रायगडच्या बाहेर ही बातमी जाऊन दिली नाही .त्यामुळे संभाजी महाराजांच्या अनुपस्थित हे काम राजाराम महाराजाना करायला हवे होते. पण सत्ताप्राप्तीसाठी त्यांनी केले नसावे किंवा करून दिले नसावे ; हिंदू आणि वैदिक संस्कृतीनुसार मृत्यू झाल्यावर , परिवारास सुतक लागते आणि काही दिवस परिवारातील व्यक्तींनी काही व्यवहारीक कार्ये तसेच महत्वाची कार्ये करायची नसतात ,पण त्या काळात मात्र घडलेल्या घडामोडी नुसार राजाराम महाराज यांच्या नावाने राज्यभिषेक करण्याचे नियोजन केले होते. महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांनी विधी केला असता तर राजाराम महाराजाना राज्यभिषेक करणे दिवसात शक्य नव्हते.आणि त्याच वेळी ही बातमी संभाजी महाराजा कडे पोचली असती. कदाचित या प्रथेनुसारच साबाजी भोसले यास राजांच्या पवित्र देहाला अग्नी द्यायला सांगितले असावे.
पुढे १५ दिवसांनी , आबासाहेब गेल्याची बातमी शंभुराजांना कळली , नंतर मंत्रीमंडळामार्फत सोयराराणी आणि कपटी अनाजीने , दि. २१ एप्रिल १६८० रोजी , राजरामास मंचकी बसविले वा मंचकरोहण केले , आणि सर्वत्र नव्या राजाची ग्वाही फिरवली . पुढे लगेचच प्रधानमंडळी ( अनाजी , मोरोपंत ) मोठी फौज घेऊन संभाजी महाराजांना अटक करण्यास निघाले .
कोण आहेत साबाजी भोसले ?
या थोरल्या पातीच्या भोसल्यांचा मुळ पुरुष परसोजी भोसले आणि वेरुळकर भोसल्यांचा बाबाजी भोसले हे संभाजी भोसलेंचे दोन मुलं. परसोजींचा मुलगा बिंबाजीं भोसलेनी (सातारा जिल्ह्यात पुण्याजवळ) घेऊन शेती वगैरे लाऊन वसाहत बसवुन गावची पाटिलकी संपादन केली.
बिंबाजीला दोन मुले मुधोजी भोसले व रुपाजी भोसले शहाजी राजांचे समकालिन असुन निजामशाहीत नौकरी करुन शिपाईगीरीचा धंदा करित असत. मुधोजींना तिन पुत्र बापुजी भोसले, परसोजी भोसले व साबाजी भोसले. रुपाजीस मुलगा नव्हता.
रुपाजी व पुतन्या परसोजी दोघेही शिवाजी महाराजांच्या सैन्यात सरदार होते तर बापुजी व साबाजी महाराजा साठी शिपाईगीरी करत आणि वडील कडे राहत.
शिवाजीं महाराजांच्या राज्यभिषेकानंतर १६७४ ला साबाजीला "एकनिष्ठ व पुरातन सेवक" सनद देऊन राक्षसवाडी तर्फे राशिग तर्फे पिंपरी कडेवाडीत गावे इनाम दिली. साबाजी विषयी इतिहासात पुढे माहिती मिळत नाही
परसोजी भोसले हे संभाजी महाराजांच्या विरोधात आणि राजाराम महाराज बाजूचे . पुढे संभाजी महाराज छञपती बनल्यावर ते निघून गेले. पण 1699 मध्ये त्यांचा उल्लेख पुन्हा राजाराम महाराज यांच्या एका मोहिमेत आढलून येतो.
परसोजीनी पराक्रम पाहुन १६९९ मध्ये "सेनासाहेबसुभा" किताब व जरिपटका देऊन वराड व गोंडवन प्रांतात चौथाई व सरदेशमुखी वसुलीची सनद दिली. नंतर या घराण्याचा विकास झाला आणि नागपूरकर भोसले म्हणून उदयास आले

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔ अग्निदिव्य भाग - 20


 

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔ अग्निदिव्य भाग - 20


नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜

अग्निदिव्य

__📜🗡भाग - 20 📜🚩🗡___

लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार

_🚩📜🚩___

वजीर जाफरखानाला रात्री बादशहाबरोबर जेवण्याचा बहुमान मिळाला. त्याला अगदी धन्य धन्य झाले. असे अतिदुर्मीळ योग फक्त भाग्यवंतांनाच मोठ्या मुश्किलीने लाभतात. तो बादशहासमोर दाखल झाला ते त्याच्या वैभवाचे पूर्ण प्रदर्शन करीतच. त्याच्या प्रत्येक कृतीतून, हालचालीतून, बोलण्यातून राजनिष्ठेचे पुरेपूर प्रदर्शन होईल याची तो काटेकोरपणे काळजी घेत होता. भले तो बादशहाच्या सख्ख्या मावशीचा नवरा होता, पण होता नोकरच ना. त्याचे जीवित आणि भवितव्य पूर्णपणे बादशहाच्या मर्जीवर अवलंबून आहे याची त्याच्याइतकी स्पष्ट जाणीव अन्य कोणालाही नसेल. त्याने बादशहाला नजर करण्यासाठी अत्यंत मूल्यवान नजराणे आणले होते. त्यात जसे उत्तमोत्तम जडजवाहीर होते, वस्त्रे, शस्त्रे होती तशीच अतिदुर्मीळ सुगंधी अत्तरे आणि औषधेसुद्धा होती. या सर्वांवर कडी करणारी एक खास चीज त्याच्या नजराण्यात होती. बादशहाचा स्वभाव आणि आवड जाणून त्याने ती नजराण्यात मुद्दाम सामील केली होती. ती चीज त्याने खास मदिनेवरून मागविली होती. आणि कित्येक महिन्यांपासून तो ती बादशहाला नजर करण्याची संधी शोधत होता. ती वस्तू होती वासराच्या मऊमुलायम पातळ कातडीवर सोन्याच्या शाईने लिहिलेली कुराणाची प्रत.

जाफरखानाची अपेक्षा होती त्याप्रमाणे बादशहाने कुलीखान किंवा त्याची मोहीम याविषयी किंवा दख्खनशी संबंधित कोणत्याच विषयाची चर्चा केली नाही. बादशहा सारा वेळ धान्याच्या किमती, त्याचा साठा, पुरवठा, बाजारभाव, सरकारी धान्यवसुली, ठिकठिकाणच्या जकातीचे उत्पन्न, राज्यातील व्यापाऱ्यांची परिस्थिती, रयतेची परिस्थिती, शेतकऱ्यांची हालत, येत्या हंगामात होणाऱ्या शेतीच्या उत्पन्नाचा अंदाज, सैन्याची भरती, त्यांचे तनखे, शस्त्रे यांविषयीच बोलत राहिला. त्याने नजराण्याकडे इतकेच नव्हे तर त्या खास चिजेकडेसुद्धा साधा निर्देशही केला नाही.

जेवण अगदीच साधे होते. त्यात पदार्थही मोजकेच होते. जेवताना शराब असणे शक्यच नव्हते पण साधा हुक्कासुद्धा नव्हता. मोजकेच जेवून बादशहाने जेवण संपविले. जाफरखनालासुद्धा मग जेवण आटोपते घ्यावे लागले. तो बिचारा अर्धपोटीच राहिला असावा. जेवणानंतर आलेला विडासुद्धा अगदी साधा होता. जर्दा किंवा किवामचा त्यात लवलेश नव्हता. खाना आटोपता आटोपता एक खिदमतगार बादशहाच्या कानाशी लागून काही सांगून गेला. निर्विकार चेहऱ्याने त्याने फक्त मान हलविली आणि मग जाफरखानाला सोबत घेऊनच बादशहा खलबतखान्यात दाखल झाला.

मुद्दाम बोलावून घेतलेले उमराव आधीच हजर झाले होते. मोगली रिवाजानुसार फक्त बादशहाच बसत असे. बाकी साऱ्यांना उभेच राहावे लागे, मग तो दरबार असो, खलबतखाना असो वा खासगी महाल. रिवाजाप्रमाणे सलाम, दुवा, कुर्निसात वगैरे सोपस्कार पार पडले. थट्टामस्करी वा वायफळ गप्पा हा बादशहाचा स्वभाव नव्हे, पण आज शाही लहर जरा वेगळीच असावी.

आज वजीरेआझमना शाही खाना आवडलेला दिसत नाही. बिचारे फारच थोडे जेवले. अर्धपोटीच राहिले म्हणा ना.

नाही नाही आलमपन्हा, तसे काही नाही. शाही महालात, प्रत्यक्ष शहनशाहे आलींसाठी तयार झालेला खाना आवडला नाही म्हणणारा दुर्भागीच म्हणावे लागेल. इतका सेहतमंद सादगीपूर्ण खाना क्वचितच कधी नशिबी येतो. मात्र आलमपन्हांसमोर बसून जेवताना थोडा संकोच वाटणे लाजमी नाही का?

यकीनन. तरी तुमचे खान्याकडे लक्ष नव्हते एवढे खरे. माबदौलतांना एक कहाणी आठवते. एक काफिर फकीर आणि त्याचा मुर्शद कोठेतरी जात असतात. कोणा नामुराद बेवकूफाने त्या काफिर फकिराला दोन सोन्याच्या विटा तोहफा म्हणून दिल्या होत्या. दर अर्ध्या घटकेने तो फकीर आपल्या मुर्शदाला विचारी की, ‘जमुरे सब खैरियत से तो हैं? चोरा-चिलटांची काही भीती तर नाही? कुठला धोका तर नाही ना?’ तीन-चार पडाव झाले हा सिलसिला जारी राहिला. एका पडावावर पथारीवर अंग टाकता टाकता फकिराने पुन्हा तेच सवाल केले. मुर्शदाने जवाब दिला की उस्ताद, ज्या वस्तूची तुम्हाला फिकीर लागून राहिली होती ती मागच्या मुक्कामावरच मी विहिरीत टाकून दिली. आता बेफिकीर होऊन झोपा. वजीरेआझम तुमची अवस्था त्या काफिर फकिरासारखी झाली आहे. माबदौलतांनी आपल्या मौसाजींची फिकीर दूर केली आहे. आता त्यांनी बेखौफ होऊन कारोबारावर लक्ष द्यायला हरकत नाही.

वजीर जाफरखान पार गडबडून गेला. त्याला काहीच अर्थबोध होईना. बाकी उमरावसुद्धा बादशहाचा नूर पाहून चमकले. त्यांनासुद्धा काही संदर्भ ध्यानात येईना.

आलाहजरत आलमपन्हांची बंद्यावर कायम मेहेरनजर राहिली आहे. हुजुरे आलींच्या अशा मेहेरबानींचे आणि उपकारांचे ओझे शिरावर घेऊन हयात काढण्यात गुलामाला आनंद वाटत आलेला आहे. पण गुस्ताखी माफ असावी. अलीजांनी आमची कोणती फिकीर दूर केली आहे काही ध्यानात येत नाही.

जनाब जाफरखान आपण मुघल सलतनतीचे वजीरेआझम, मुख्य वजीर. पुऱ्या सलतनतीमध्ये माबदौलतांच्या नंतर आपला रुतबा गणला जातो. परंतु वजिराला नुसती सोने-चांदी, हिरे-मोती, रेशीम-अत्तरे, किनखाप यांचीच पारख आणि माहिती असून चालत नाही, तर खऱ्या राज्यकर्त्याला गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, डाळी, घोस्त, जनावरे अशा प्रत्येक लहानात लहान वाटणाऱ्या बाबींचा चालू बाजारभाव अगदी तोंडावर असला पाहिजे. आज पाहिले तर वजीरेआझमना या कशाचीच माहिती नाही. किंबहुना त्यांचे माबदौलतांच्या बोलण्याकडे फारसे लक्षच नव्हते.

कसूर माफ असावी अलीजा, पण मन जरा विचलित झाले आहे हे खरे.

का? लाडक्या बेगमेने बेवफाई केली म्हणून की तिला भर जवानीत सजा-ए-मौत दिली म्हणून?

नाही हुजुरे आली, दोन्ही नाही. बस यूँ ही.

यूँ ही कैसे? माबदौलतांच्या मामूजाननी म्हणजे तुमच्या लाडक्या सालेसाहेबांनी, अमीर उल् उमरा नवाब शाहिस्ताखानांनी आपल्या जिजाजींसाठी आसामच्या कोहस्तानी जंगली मुलखातून मिळवलेली बेहद खूबसूरत नागा जातीची हूर आजच तुमच्या खास जनानखान्यात दाखल झाली आहे. आजची रात्र तिच्या सोबत रंगीन करण्याची तमन्ना बाळगून होतात. पण माबदौलतांनी शाही खान्याची दावत दिली आणि त्याउपर खलबतखान्याची ही मसलत काढली; त्यामुळे या साऱ्या झमेल्यांमधून मोकळे होतो कधी आणि त्या कमसीन परीला आगोशमध्ये घेतो कधी याकडेच सारे लक्ष लागून आहे.

बाकी मानकऱ्यांनी तोंडावर शेले धरून हसू लपविण्याची कोशिश केली. जाफरखानास मात्र धरणी दुभंग होऊन पोटात घेईल तर बरे असे होऊन गेले. अत्यंत खजील होऊन तो बादशहासमोर गुडघ्यांवर बसला आणि बादशहाच्या अंगरख्याची वारंवार चुंबने घेत क्षमायाचना करीत राहिला.

रहम जहाँपन्हा रहम, नाचीज गुलामावर रहम करा. आलाहजरत इतकी बारीकसारीक खबर ठेवतात याचा गुलामाला फक्र आहे. आयंदा अशी गलती होणार नाही. या वेळी गुन्हा पदरात घ्यावा. गरिबाला माफ करा हुजुरे आली.

ऊठ जाफरखान. मुघल सलतनतीची वजिरी म्हणजे अय्याशी, आराम, चैनबाजी आणि लौंड्या नाचवणे नव्हे, हे पक्के ध्यानात ठेव. कोणाचे खासगी शौक सरकारी कामात रुकावट पैदा करणार असतील तर त्याचा कठोर बंदोबस्त केला जाईल हे प्रत्येकाने समजून असा. ज्या गोष्टी इस्लामला मंजूर नाहीत त्या माबदौलत खपवून घेतील असे कोणी गृहीत धरू नये. हे अवामला समजावून सांगणे हे तुम्हा सर्वांचे फर्ज आहे. रही बात जानकारी की। तर नीट ध्यानात ठेव, अशी प्रत्येक बारीकातील बारीक खबर ठेवली म्हणूनच माबदौलत शहनशाहे हिंदोस्ता म्हणून तख्तनशीन आहेत अन्यथा या जागी आज दारा किंवा शुजा बसला असता. आता काळजी करू नकोस, तू शाही दस्तरखानवर खाना घेत होतास तेव्हाच शाही जनानखान्याचा दरोगा तुमच्या त्या कमसीन परीला शाही पनाहमध्ये घेऊन आला आहे. ती आता माबदौलतांच्या हमशिरा जहाँआरा बेगम यांच्या निगराणीत मेहफूज आहे. शाही दस्तरखानची शिरकत तुला त्याचसाठी फरमावण्यात आली होती.

जाफरखानाचे डोळे विस्फारले. जीभ टाळ्याला चिकटली. आज जे प्रत्यक्ष वजीरेआझमच्या बाबत घडले ते आपल्या नशिबी कधीही येऊ शकते ही जाणीव होऊन प्रत्येक उमराव नखशिखान्त हादरला. काही वेळाने भानावर आलेला जाफरखान वारंवार जमिनीवर माथा टेकवून माफीची याचना करू लागला.

ऊठ, जाफरखान. कसूर आधीच माफ केली आहे. म्हणूनच तू या क्षणी आदबखान्यात नाहीस तर खलबतखान्यात आहेस आणि तुझी वजिरी कायम आहे. मात्र याद राख, तुझे शौक जर सलतनतीच्या कामाकडे दुर्लक्ष करायला मजबूर करीत असतील तर आयंदा मुलाहिजा ठेवला जाणार नाही. ध्यानात ठेवा ही हिदायत प्रत्येक लहान-मोठ्या दरबारी मनसबदारांसाठी आणि मुलाजिमांसाठीसुद्धा आहे. बस्स एका क्षुल्लक गोष्टीसाठी भरपूर वेळ वाया गेला. वजीरेआझम कारवाई शुरू हो।

हुकूम आलमपन्हा…

कुर्निसात करीत जाफरखान बादशहाशेजारी उभा राहिला. रुमालाने चेहरा साफ करून आणि किंचित खाकरत घसा साफ करून, जणू काहीच घडले नाही अशा आविर्भावात त्याने बोलायला सुरुवात केली.

वजीर जाफरखानाने मग नेताजी पालकरला दिलेरखानाने केलेल्या अटकेपासून त्याचे धर्मांतर आणि त्याच्या प्रकृतीची त्या दिवसाची अवस्था यासंबंधीचा गोषवारा सर्वांसमोर सांगितला. त्याला मध्ये अडवून कोणी काही प्रश्न वा खुलासा विचारला नाही, कारण अर्थात खुद्द बादशहा शांतपणे डोळे मिटून ऐकत होता. त्याच्या हातातील जपमाळेचे मणी सरकत होते म्हणूनच केवळ तो जागा आहे हे समजत होते. अन्यथा तो अगदी निश्चल बसून होता. जाफरखानाचे बोलणे संपताच त्याने खाडकन डोळे उघडले. त्याची भेदक हिरवी नजर साऱ्या उमरावांवरून फिरली. जणू तो प्रत्येकाच्या मनात उठणाऱ्या प्रतिक्रिया वाचत होता. मग अगदी हळू आवाजात त्याने बोलायला सुरुवात केली–

माबदौलत जाणतात की, तुम्हा सर्वांच्या मनात एकच सवाल चालू आहे तो म्हणजे या कमअस्सल बेगैरत काफिर बगावतखोराचे माबदौलत एवढे लाड का करीत आहेत? त्याला अजून जिवंत कसा ठेवला आहे? एवढेच नव्हे तर खुद्द वजीरेआझमच्या जनानखान्यात शाही मेहमान म्हणून चैन करायला मोकळा कसा सोडला आहे? सवाल जायज आहेत; मगर फिजूल आहेत. हा माणूस दुसरा शिवा म्हणून आलम दुनियेत मशहूर झाला आहे. आता तो शिवा काय चीज आहे हे उच्चारून माबदौलतांना त्यांची मुबारक जबान नापाक करून घ्यायची नाही. मुरारबाजी नावाच्या शिवाच्या एका शिपायाने जंगे पुरंदरमध्ये जे कर्तब दाखवले, जे सैतानी साहस आणि शिपाईगिरीचा जो नमुना पेश केला त्याचे वर्णन दिलेरखानाने कळवले आहे. ते सारा दरबार जाणतो. त्या शिपाईगिरीला मिसाल फक्त एका खालिदचीच की दुसरी रुस्तमची. त्या दरिद्री कंगाल बगावतखोर शिवाला असे नगिने कुठून मिळतात, अल्ला जाणे! जर शिवाचा एक साधा शिपाई इतका तिखट, तर त्याचा सिपाहसालार सरनोबत, जो दुसरा शिवा म्हणविला जातो तो काय चीज असेल? अल्लाच्या कृपेने ऐन मोक्यावर तो दख्खनमध्ये माबदौलतांच्या पनाहमध्ये होता. इस्लामच्या कामासाठी माबदौलतांना हा मोहरा हवा होता. म्हणून त्याला येथे आणवला.

शाही खजिन्यातून इनामे, जहागिऱ्या, बक्षिसे, मानमरातबांची लयलूट होते. मोहिमांवर करोडो अश्रफींचा खर्च होतो. हजारो शिपाई आणि शेकडो दरबारी खस्त होतात पण हाती काय येते? खाक? दुर्दैवाने शाही सलतनतीचे सगळे सरदार, मनसबदार, मुत्सद्दी एकजात नालायक आणि अय्याशी झाले आहेत. अगदी तळातल्या शिपायापर्यंत हे दुर्गुण फौजेत आणि सलतनतीतल्या प्रत्येक मुलाजिमापर्यंत पसरले आहेत. या गोष्टीचा माबदौलतांना सख्त अफसोस आहे. माबदौलतांचे जन्नतनशीन परदादा शहेनशहा अकबरे आझम यांनी राजपूत काफिरांना लाडावून ठेवले आणि साहेबी इमान ठेवणाऱ्या नेक इमानदार बंद्यांकडे दुर्लक्ष करून त्यांना सही राहवरून भरकटण्यास मजबूर केले. नतीजा? आज सदिया बितली, महम्मद बिन कासिमने सरजमीने हिंदवर तबलीगसाठी जिहाद करून, पण सरजमीने हिंद दार- उल्- हरबच राहिली, सत्ता भले सुलतान आणि आता मुघल शहेनशहांची असली तरी. प्रत्यक्ष हजरत पैगंबर सलल्लाह वसल्लमचे दिव्य मार्गदर्शन लाभलेल्या इस्लामच्या पहिल्या चार खलिफांनी फक्त पस्तीस वर्षांमध्ये दुनियेच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत इस्लाम नेला आणि आम्ही? चेंगिझखान आणि तैमूरलंगाची नस्ल म्हणून मिरवणारे आम्ही पिढ्यान्पिढ्या इथे डोके आपटत आहोत. उपयोग काय?

आजघडीला मुघल सलतनतीत इस्लामचे बंदे सर्वाधिक संख्येने बंगालच्या सुभ्यात आहेत. ते काय बख्तियार खिलजीच्या पराक्रमामुळे? नाही. त्याच भूमीतल्या मूळ काफिर असणाऱ्या काळापहाडमुळे. काफिर हिंदूंचे तेवर मोठे तेज असतात. एखाद्या गफलतीने वा काही अन्य कारणाने धर्मातून बाहेर गेलेल्यांना त्यांच्यात क्षमा नाही. त्याला धर्मात परत न घेता त्याची अवहेलना आणि अपमान करण्यातच ते धन्यता मानतात. दुनियेचा दस्तूर आहे, सुहागन म्हणून तेवर मिरवणारी आणि फक्र महसूस करणारी हसीना जेव्हा दुर्दैवाने बेवा होते आणि जिल्लतभरी जिंदगी बसर करण्याची तिच्यावर पाळी येते, तेव्हा ती दुनियेतील सर्व सुहागनांचा द्वेष करू लागते. प्रत्येक स्त्री आपल्यासारखी विधवा, रंडकी व्हावी अशी तमन्ना करू लागते. तसेच हे धर्म सोडलेले काफिर हिंदू जिल्लत आणि अपमानाने पेटून उठतात आणि सूड उगवण्यासाठी प्रत्येक हिंदूला इस्लामच्या झेंड्याखाली आणण्यासाठी जी जान लावून कोशिश करतात. असाच दुसरा काळापहाड माबदौलतांना दुसरा शिवा म्हणवणाऱ्या या काफिरामध्ये नजर येतो आहे. माशाल्ला असे फक्त अकरा नेक बंदे रुस्तम माबदौलतांना मिळवता आले तर… इन्शाल्लाह सरजमीने हिंद माबदौलत चुटकीसरशी दार-उल्-इस्लाममध्ये तबदील करतील.

आमीन! सुम्मा आमीन!!

खामोश! तुमच्या दुवांच्या अपेक्षेने हे सांगितलेले नाही तर माबदौलत त्यांची दिली तमन्ना आज जाहीर करीत आहेत. यासाठीच सिद्दी फुलादखानाला सख्त हिदायत दिलेली होती की, त्याला हवी तशी मौज त्याने या कैद्यासोबत करावी, पण तो जायबंदी होता कामा नये. त्याच्या कोणत्याही अवयवाला धोका पोहोचता कामा नये. आज माबदौलतांची तमन्ना पूर्ण होण्याचे आसार नजरेत येत आहेत.

इन्शाल्लाह!

हुं! फक्त दुवांनी कामे झाली असती तर हजरत पैगंबर सलल्लाह वसल्लम यांना एकामागोमाग एक जंग लढावी लागली नसती. हिजरत करण्याची आवश्यकता भासली नसती. जो कोशिश करतो फक्त त्यालाच अल्ला मदत करतो.

बादशहा क्षणभर थांबला. त्याची तीक्ष्ण हिरवी नजर समोरच्या उमरावांवरून फिरली. बादशहाच्या मनात नेमके काय आहे याचा कोणताच अंदाज बांधता येत नव्हता. हे धार्मिक प्रवचन-वाझ-ऐकविण्यासाठी एवढ्या रात्री खलबतखान्यात गुप्त मसलत बोलाविण्याची काय गरज होती? काहीच नीट उमगत नसल्याने चेहऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया उमटू न देण्याची प्रत्येकजण कोशिश करत होता. तोंड न उघडता जांभई देण्याची चोरटी कृती बादशहाने अल्लद टिपली आणि हिरवी नजर मीर बक्षीवर स्थिर झाली. ती नजर जणू मस्तकात आरपार शिरून त्यात सुरू असलेले विचार वाचण्याची कोशिश करीत होती. मीर बक्षी नखशिखान्त हादरला. त्याला अखेर बोलावेच लागले.

आलमपन्हा अगदी वजा फरमावीत आहेत. आलाहजरतांच्या एका शब्दावर आमची जान कुर्बान आहे. आज जे आमचे आहे ते शहनशाहे आलमांच्या मेहेरबानीचेच फळ आहे. या शरीरावर आणि त्यात वसणाऱ्या रूहवर परवरदिगारे आली अल्लातालाच्या नंतर आलाहजरत जिल्हेसुभानी शहनशाहे आलम बादशहा ए हिंदोस्ता हजरत जिंदा पीर आलमगिरांचीच एकमात्र सत्ता आहे. लेकिन अलीजा जान की अमान पाउं तो गुलाम जहन में उठते सवाल पेश करने की इजाजत चाहता है.

इर्शाद.

गुस्ताखी माफ हुजुरे आला, पण मागे एकदा अलीजांनी कुलीखानाबद्दल शक जाहीर केला होता. तो फंद करण्यासाठी दख्खनच्या शाही छावणीत दाखल झाला आहे असा. म्हणून मग आज त्याची एवढी तारीफ आणि त्याच्यावर एवढी जर्रानवाजी याचे गुलामाला थोडे आश्चर्य वाटते.

बेशक. वह शुबा अपनी जगह कायम है. त्याला शिवानेच मिर्झाराजांकडे दिलेरखानाच्या छावणीत पाठवले असावे असे माबदौलतांना आजसुद्धा वाटते. इतकेच नव्हे, तर त्याने इस्लाम कबूल केला यातसुद्धा काही राज असावा असा अंदेशा आहे म्हणूनच त्याला वजीरेआझमसारख्या सर्वांत निकटच्या आणि भरवसेमंद माणसाच्या देखरेखीत ठेवले आहे. मुसलमान झाला तरी मोकळा नाही सोडला त्याला. नजरकैद कायम आहे आणि पुढे मोहिमेवर असला, तरी ती कायम असेल. फक्त त्याला न जाणवेल, न बोचेल अशी.

परंतु आलमपन्हा आम्ही तर असे ऐकून होतो की, खुद्द मिर्झाराजांनीच त्याला आदिलशाहीतून आपल्याकडे वळवून घेतले, सरदारकी आणि जहागिरी देऊन आणि त्याला आलाहजरतांनीसुद्धा मान्यता दिली होती.

शिवा बेवकूफ नाही. जर त्याचा हा माणूस थेट शाही छावणीत येता तर तो शरणागत म्हणूनच आला असता. मग त्याला जे साधायचे ते साधता आले नसते. म्हणून त्याने प्रथम आदिलशाहीत जाण्याचे नाटक केले. शिवाच्या या सापळ्यात बुढ्ढा मिर्झाराजा बरोब्बर फसला. त्याच गुन्ह्यासाठी तो बेवक्त नरकात रवाना झाला. हा मोहरा माबदौलतांना हवा होताच म्हणूनच त्या बुढ्ढ्याच्या मसलतीला शाही मान्यता मिळाली. शिवा आग्र्यातून पळता वा न पळता, काहीही झाले असते तरी कुलीखानाच्या बाबत आज जे घडते आहे ते तसेच घडविण्याचे माबदौलतांनी मान्यता देतानाच ठरवले होते.

सुभानअल्ला. आलमपन्हांची दूरअंदेशी वाकई काबिले तारीफ आहे.

बादशहाची नजर वळताच जाफरखानाचे पुढचे शब्द गळ्यातच रुतले.

इथे आपण नुसत्या अशा गप्पा मारण्यासाठी जमलेलो नाही, तर महम्मद कुलीखानाची पुढची तजवीज नक्की करण्यासाठी जमलो आहोत. जाफरखान.

हुकूम आलाहजरत.

आता कुलीखानाची तबियत सम्हलते आहे. त्याचा खुराक वाढव. आता त्याला वर्दिश करायला लाव. हत्यारांची तालीम सुरू करू दे. घोड्यावरून रपेट मारू दे. म्हणजे दोन महिन्यांत तो पुरता तयार होईल. मात्र लक्षात ठेव, त्याचा पुरुषाशी, त्यातही काफिर पुरुषाशी संपर्क जितका कमी तितका प्रयत्न कर. पुढच्या हुकमापर्यंत त्याला तुझ्या जनानखान्यातून बाहेर काढू नकोस. त्याचे खिदमतगार, नौकर, बांदी-बटकी कोणीसुद्धा हिंदू असता कामा नये. हत्याराची वर्दिश करताना जोड म्हणून तार्तर बायकांनाच सुरुवातीला पुढे कर. पुढे काय करायचे नंतर हुकूम होईल.

जो हुकूम आलमपन्हा. अल्लाच्या कृपेने माझ्या हरममध्ये औषधालासुद्धा कुफ्र आणि काफिर नाही. हुकमाची तामिली शब्दश: होईल. इन्शाल्लाह.

ठीक है. कुलीखान पूर्वी छावणीत दाखल झाला तेव्हाच त्याला पाचहजारी मनसबदारी आणि जहागिरी माबदौलतांनी कबूल केली होती. त्याप्रमाणे सुप्याची जहागिरी बहाल करण्यात आली होती; परंतु मध्यंतरी जे घडले त्या काळात त्याची जहागिरी आणि संपत्ती खारिज करून सरकारात जमा करण्यात आली. आता त्याने साहेबी इमान कबूल केले आहे; त्यामुळे दिलेला शब्द पाळणे जरूर आहे. क्यों महाबतखान?

बिलकुल दुरुस्त आलमपन्हा.

महाबतखान, पाचहजारी मनसबदार म्हणून तो तुमच्या निसबतीत राहील. त्याला नकळत, पण तो सतत तुमच्या नजरेच्या टप्प्यात राहिला पाहिजे. त्याच्या फौजेतला प्रत्येक सरदार, हवालदार, दफेदार, इतकेच नव्हे तर प्रत्येक शिपाई आणि त्याच्या खिदमतीत दिला जाणारा प्रत्येक चाकर, खिदमतगार, बांदी-बटकी मुसलमानच असली पाहिजे. त्या प्रत्येकाची खातरजमा तुम्ही जातीने करून घ्या. काही गफलत झाली तर मुलाहिजा राखला जाणार नाही. यातला प्रत्येकजण नुसता मुसलमान नव्हे तर पैदाइशी मुसलमान हवा. शक्यतो किमान ज्याचा आजा मुसलमान झाला आहे असा असला पाहिजे. दोन महिन्यांत अशा प्रकारे त्याची फौज आणि शागिर्दपेशा तयार झालाच पाहिजे. वजीरेआझम, महाबतखानाच्या कामासाठी लागणारे सर्व दस्तावेज, हुकूमनामे, फर्माने उद्याच्या उद्या माबदौलतांच्या दस्तखतीसाठी पेश करा. तात्पुरत्या खर्चासाठी एक लाख अश्रफी शाही खजिन्यातून त्यांच्या सुपुर्द करा. कुसूर किंवा ढिलाई सहन केली जाणार नाही.

जो हुकूम आलमपन्हा.

दोघेही एकदमच बोलले.

दिलावरखान…

हुकूम आलमपन्हा.

शिकारपूरजवळ तुम्ही तुमच्या नव्या काबुली बेगमेसाठी नवी हवेली बांधत आहात, असे माबदौलतांच्या कानावर आहे.

जी आलमपन्हा. आलाहजरतांच्या नजरेतून चंद्रसूर्याखालची कोणतीही गोष्ट लपून राहणे शक्य नाही. बांधकाम लगभग पूर्ण होत आले आहे. सजावट थोडी बाकी आहे. महिन्याभरात मी तेथे राहायला जायचं ठरवतो आहे.

जायचे नाही. ती हवेली आम्ही कुलीखानास बहाल करीत आहोत. राहिलेले काम महिन्याभराच्या आत पूर्ण झाले पाहिजे. जाफरखान, कुलीखानाचा कबिला, जो आता मुसलमान झाला आहे, तो हवेलीचे काम पूर्ण होताच तिथे राहायला पाठव. त्यांच्या ऐशआरामाची संपूर्ण तजवीज सरकारी खर्चाने करून दे. माबदौलतांच्या हुकुमाप्रमाणे तिथला शागिर्दपेशा तयार कर.

हुकूम आलमपन्हा.

अब रही बात दिलावरखानच्या बेगमेच्या सोईची. तर दिलावरखान, तुम्ही आग्रा शहरात कुंवर रामसिंहाच्या हवेलीच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत नवी हवेली बांधा. त्यासाठी सरकारातून तुम्हाला पंचवीस हजार अश्रफी दिल्या जातील.

जो हुकूम आलमपन्हा.

पण दिलावरखानच्या शब्दात जोर नव्हता. स्वरातील नाराजी प्रयत्न करूनसुद्धा त्याला लपविता आली नव्हती.

माबदौलतांचा फैसला जनाब दिलावरखानांना पसंद आलेला दिसत नाही. तसे असेल तर स्पष्ट बोलण्याची मुभा दिली जात आहे. दुसरी तजवीज लगेच करता येईल. दीनी कामात माबदौलतांना कोणाची नाराजी वा बददुवा नको आहे. कोणाचा हक मारून केलेले काम अल्लाच्या दरबारात रुजू होत नाही. रोशनआरा बेगमेची यमुनापार असलेली कोठी कुलीखानाला देता येईल. दीनच्या कामात ती भावाला साथ दिल्याशिवाय राहणार नाही. तिची दुसरी तजवीज होईपर्यंत ती शाही महालात गैरसोय सोसूनसुद्धा राहायला सहज तयार होईल.

झोपलेल्या वाघाच्या शेपटीवर पाय देऊन त्याला जागे करण्याचे फायदे, मोगली रियासतीत आणि दरबारात मुरलेला दिलावरखान चांगलेच जाणून होता. स्वत:वर ताबा मिळवत तो लगेच गुडघ्यांवर बसला. दुवासाठी उचलतात तसे हात उचलून दीन स्वरात तो म्हणाला–

आलाहजरत आलमपन्हांनी गलतफहमी करून घेऊन मनात कोणताही शक धरू नये अशी गुलामाची इंतजा आहे. दीनच्या या नेक कामासाठी हजरत हुजुरे आलांनी या नाचीज गुलामाची निवड केली यापेक्षा मोठा सन्मान तो कोणता? आलाहजरतांनी मंजूर केलेल्या जागेवर माझ्या बेगमेसाठी मी नवी हवेली जरूर बांधून घेईन. पण त्यासाठी आलाहजरतांनी सरकारी खजिन्यावर भार टाकण्याची तसदी अजिबात घेऊ नये. आलाहजरतांनी आरंभलेल्या या दीनी कामात माझ्यासारख्या नाचीज गुस्ताख गुलामाचा लहानसा वाटा असावा म्हणून मी शिकारपूरची नवी हवेली आलमपन्हांच्या चरणांवर अर्पण करीत आहे. कुबूल असावी.

बहोत खूब. कुबूल है. तुझा हा त्याग माबदौलत कायम स्मरणात ठेवतील.

बादशहाचे शब्द ऐकून दिलावरखानाचा जीव एकदम भांड्यात पडला. जान सलामत तो हवेली पचास! बंदगी करीत करीत तो जागेवर जाऊन उभा राहिला. बादशहाची हिरवी नजर सुरतवरून खास भेटीसाठी आलेला व्यापारी हाजी कासमखान याच्यावर स्थिरावली. आता आपल्यावर कोणती बिलामत येऊन कोसळते या चिंतेने हाजी कासम नखशिखान्त हादरला.

हाजी कासम सुरती, तुमच्याकडे एक खास उलखास जिम्मेदारी द्यायची आहे.

जहे किस्मत अलीजा. बंदा ती जिम्मेदारी पुऱ्या ताकदीने निभावण्यात जीवनाची कृतकृत्यता समजेल.

नाही, नाही; अशी काही मोठी जानची जोखीम वगैरा असणारी जिम्मेदारी नाही. तुमची नेहमीचीच कारोबारी जिम्मेदारी आहे. कुलीखानाची जी संपत्ती सरकारात जमा झाली आहे ती आता त्याला परत करण्याचे आणि त्याचे जहागिरीचे उत्पन्न सुरू होईपर्यंत कुटुंबाच्या पालनपोषणाची तजवीज करून द्यायचे ठरवले आहे. मात्र सध्या माबदौलतांची माली हालत जरा नाजूक असल्याने तुमच्याकडून दोन लाख अश्रफी कर्जाऊ मिळाव्यात अशी इंतजा आहे. तारण म्हणून काय द्यावे लागेल हे विनासंकोच सांगावे. मात्र इस्लामची मनाई असल्याने कर्जावर व्याज देता येणार नाही. तीन वर्षांच्या आत कर्ज चुकते होईल. या कर्जाला, मीर बक्षी आणि हाजी सय्यद बेग जे तुमच्याच गावचे आहेत, जामीन असतील. अर्थात त्यांना मान्य असेल आणि तुम्हाला चालत असेल तर.

तौबा! तौबा!! अलीजा, कर्ज आणि आपल्याला? तौबा!!! आज आम्ही जी डाळ-रोटी खात आहोत ती अल्लाच्या कृपेने आणि आलाहजरत जिल्हेसुभानींच्या मेहेरबानीनेच. माशाल्ला अलीजांच्या सलतनतीत छोटा-मोठा कारोबार करीत आहोत तर अलीजा, आपल्या डोळ्यांची फडफडसुद्धा आमच्यासाठी फर्मानापेक्षा वरचढ आहे. आपली ख्वाहिश पूर्ण करणे ही गरिबासाठी मोठी सुन्नतच आहे. आज अलीजा स्वत: तोशीस सहन करून इस्लाम कायम करण्यासाठी, वाढवण्यासाठी झटत आहेत. बादशहा असून फकिरी पत्करून राहत आहेत. अशा परिस्थितीत दीनच्या या नेक कामात काही हाथ बटवण्याची संधी मिळत असेल, तर ती ठोकरणाऱ्याला जहन्नममध्येसुद्धा जागा नसीब होणार नाही. दोन लाख अश्रफींचा हा जिम्मा या गुलामावर सोपवून आलाहजरतांनी निश्चिंत मनाने दीनच्या सेवेकडे ध्यान द्यावे. इच्छा व्यक्त होईल त्या क्षणी ही रक्कम हजरतांच्या पायाशी हाजिर असेल. अल्ला कसम.

सुभानअल्ला! सुभानअल्ला!!

सुभानअल्ला. अल्लाच्या मार्गावर अशी भक्ती असणारी आणि त्याच्या कामासाठी झिजण्यास तयार असणारी अवाम आम्हाला दिल्याबद्दल आम्ही परवरदिगारे आली रहिमाने रहीम अल्लातालाचे शुक्रगुजार आहोत. हाजी कासमखान सुरती, तुमची ही धर्मभावना आणि दानशूर वृत्ती माबदौलत कधी विसरणार नाहीत.

मुबारक हो हाजी कासमखान मुबारक हो।

त्यानिमित्ताने उपस्थितांनीसुद्धा सुटकेचा नि:श्वास सोडला. हाजी कासमने संधी साधून बादशहाच्या नजरेत भरण्यात यश मिळविल्याने हाजी सय्यद बेगचा जळफळाट झाला.

आता जो एक अहम सवाल माबदौलतांना छळतो आहे, त्याचा फैसला करण्यासाठी तुम्हासारख्या तजुर्बेकार दरबाऱ्यांच्या मशवऱ्याची गरज आहे. कुलीखानाची सुप्याची जहागिरी जप्त झाली आहे. त्याला ती परत करणे तर कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही; त्यामुळे नवी जहागिरी द्यावी लागणार. तर त्याला कोणती जहागिरी द्यावी हा जरा तिढाच होऊन बसला आहे.

आता आपल्या जहागिरीवर किंवा तिच्या काही भागावर गदा येते की काय या भीतीने प्रत्येकाच्या पोटात गोळा उभा राहिला. आपल्यावर येऊ पाहणारी बला परस्पर दुसऱ्यावर ढकलता आली तर पाहावी या हेतूने सल्ले पुढे येऊ लागले. हे निमित्त पुढे करून बादशहा आपल्याला गंडा घालण्याची संधी साधून घेईल या भीतीने धास्तावलेला त्याचा काका पर्वीझखान तत्परतेने म्हणाला–

वास्तविक अलीजा कोणताही निर्णय घेण्यास पूर्णत: काबील असताना आमच्यासारख्या मर्यादित बुद्धीच्या नाचीज गुलामांचा मशवरा मागतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आमच्या इज्जत अफजाहीबद्दल मी आलाहजरतांचा ऋणी आहे. माझ्या मनात असा विचार येतो की, कुलीखान सतत नजरेच्या टप्प्यात राहावा या बाबीचा विचार करता त्याची जहागिरी दिल्ली–आग्र्यापासून फार दूर नसावी.

हा सल्ला बादशहाने मानला तर आपले नुकसान होणार हे निश्चित हे जाणून खानजहान लोधी लगोलग बोलून गेला–

बिलकुल दुरुस्त फरमा रहे हैं जनाबे आली पर्वीझखान. एखाद्या गुस्ताख काफिराचे वतन जप्त करून ते कुलीखानाला सहज फरमावता येईल.

दाऊदखान कुरेशीने तत्परतेने त्याची री ओढली–

आलमपन्हा, मला गुलामाच्या तुच्छ बुद्धीला जे पटते ते पेश करण्याची इजाजत असेल तर मला असे अर्ज करावे वाटते की, मिर्झाराजा जयसिंह आणि कुंवर रामसिंह यांनी शाही तख्ताची जी बेअदबी केली आहे आणि आलाहजरतांचा जाहीर अपमान करून त्यांच्या दिलाला जी ठेस पोहोचवली आहे उसके मद्देनजर त्यांच्या वतनाचा हिस्सा जप्त करून कुलीखानाला बहाल करण्यात यावा; त्यामुळे सारे कसे व्यवस्थित साधता येईल.

बादशहाची हिरवी गहरी नजर वजीर जाफरखानावर स्थिर झाली. सुरुवातीपासूनच भरपूर शोभा झाल्यामुळे शक्यतो तोंड न उघडण्याचे ठरवून तो उभा होता. पण बादशहाची नजर चुकविणे, त्यात अभिप्रेत असलेला हुकूम डावलणे शक्य नव्हते.

आलमपन्हा जिल्हेसुभानींचा दिल लोण्यासारखा मुलायम आहे. विनाकारण आणि वाजवीपेक्षा जास्त तोशीश कोणाला पोहोचवण्याच्या ते खिलाफ असतात. एखाद्याचा जायज हक मारून मनमानी करणे ते स्वप्नातसुद्धा खपवून घेणार नाहीत. आलाहजरतांच्या दिलात शिवा आणि कुलीखान यांच्या संबंधाने जो शक आहे तो अनाठायी असणे शक्य नाही. कारण मर्यादित बुद्धीच्या अतिसामान्य गुलामांना ज्याचा वाससुद्धा जाणवत नाही, ते आलाहजरत सूर्यप्रकाशात पाहावे तसे स्वच्छ पाहतात; त्यामुळे कुलीखानाचा काफिर हिंदूंशी संपर्क टाळण्याचे जे धोरण चालवले आहे तेच यापुढेसुद्धा चालू राहावे हेच योग्य ठरेल. साहजिकच याची जहागिरी अशा प्रदेशात असावी जिथून त्याला दख्खनशी संधान ठेवणे शक्य राहणार नाही. मग दख्खन जवळ करण्याचे स्वप्न तर दुरापास्त ठरावे. त्याची आजवरची जिंदगी कोहस्तानी मुलखात गेली आहे; त्यामुळे तो डोंगराळ मुलखात सहज रमून जाईल; अर्थात त्याला पेशावर सुभ्याची जहागिरी मंजूर करावी अशी माझी राय आहे.

बहोत खूब! वहाव्वा! सुभानअल्ला वजीरेआझम जाफरखान, तुमच्या या अशा मशवऱ्यांमुळेच माबदौलतांना तुमची वजिरी कायम ठेवण्याचा मोह पडत राहतो. वा! तुमच्या या मशवऱ्यावर माबदौलत निहायत खूश आहेत. माबदौलतांच्या ओठावरचे अलफाज तुमच्या जुबानी ऐकवून माबदौलतांचा दिल तुम्ही जिंकून घेतलात. माशाल्ला आमचा दिल तुम्ही बरोब्बर वाचलात सुभानअल्ला! मघाशी तुम्ही पेश केलेले तोहफे, एक वगळून आणि हा मशवरा माबदौलत कुबूल फरमावतात. ती कुराणशरीफची प्रत परत न्या. प्रत्यक्ष अल्लाचे शब्द ज्यात दर्ज आहेत असे पुस्तक चामड्यासारख्या नापाक वस्तूवर सोन्यासारख्या मोह उत्पन्न करणाऱ्या आणि जगातल्या सर्व भांडणांचे मुख्य कारण असणाऱ्या अशा सोन्यात लिहिणे रहमाने रहीम अल्लाला कधीच मंजूर होणा?

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜⚔ अग्निदिव्य __📜⚔🗡भाग -19


 

नेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी📜
अग्निदिव्य
__📜🗡भाग -19 📜🚩🗡___
लेखक : कल्याणीरमण बेन्नूरवार
_🚩📜🚩___


नेताजींनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांचे सारे अंग ठणकत होते. अंगात ताप फणफणलेला होता. मस्तक गरगरत होते. आपण कुठे आहोत हे त्यांच्या लक्षात येत नव्हते. त्यांनी डोळ्यांची उघडझाप केली. आठवणींना ताण दिला. त्यांना जाणवले, ते आदबखान्याच्या तळघरातील कुबट कोठडीच्या फरशीवर पसरलेल्या गरम राखेत वा खिळे मारलेल्या तक्त्यावर झोपलेले नसून महालाच्या एका दालनात प्रशस्त आणि आरामदायक पलंगावर झोपले आहेत. त्यांच्या डोळ्यांवर उजेड येणार नाही अशा बेताने कोपऱ्यात ठेवलेल्या मिणमिणत्या दिव्याच्या अंधूक प्रकाशात त्यांना दिसले, पलंगाशेजारी एक स्त्री पेंगत पंख्याने यंत्रवत वारा घालीत आहे. त्यांनी उठण्यासाठी हालचाल करण्याचा प्रयत्न केला पण पाठीतून – कंबरेतून जबरदस्त कळ निघाली. त्यांच्या कण्हण्याच्या आवाजाने ती स्त्री सावध झाली आणि तिच्या तोंडातून सहजोद्गार बाहेर पडले–

या अल्ला! आप जग गये!! अल्ला की खैर है!!!
तिने घडवंचीवरील पेल्यातील द्रवाचे काही थेंब त्यांच्या अर्धवट उघड्या मुखात सोडले. ते मध मिसळलेले पाणी असावे. त्यांच्या कोरड्या घशाला किंचित बरे वाटले. छळ सोसत कैदेत, तळघरात खितपत असताना छळणाऱ्या काळ्याकभिन्न सिद्दी शिपायांशिवाय अन्य कोणाचे कित्येक महिन्यांत त्यांना दर्शन झाले नव्हते. आणि आता महालातल्या सुखकारक प्रशस्त पलंगावर शिवाय सेवेला मुस्लीम स्त्री. काही समजेना. त्यांना वाटले, अति छळाने आपल्याला भ्रम झाला आहे म्हणूनच असे काहीबाही विचित्र भास होत आहेत.

त्यांनी आठवण्याचा प्रयत्न केला. डोक्याला बराच ताण दिला, पण त्या श्रमांनी त्यांना थकवा आला आणि पुन्हा ग्लानी आली. ते पुन्हा किती वेळ ग्लानीत होते त्यांना समजले नाही. पण बऱ्याच व्यक्तींच्या वावरण्याच्या चाहुलीने त्यांना पुन्हा जाग आली. बहुधा दिवस निघाला असावा. कारण खोली प्रकाशाने उजळली होती. कोणी एक मोगली उमराव त्यांचा चेहरा न्याहाळत पलंगाशेजारी ओणवून उभा होता. त्यांनी डोळे उघडलेले पाहून त्याच्या गंभीर चेहऱ्यावर हसू उमटले. स्नेहाळ शब्दांत तो उमराव म्हणाला–
सलाम आलेकूम जनाब महम्मद कुलीखान! आपण जागे झालेले पाहून मोठाच आनंद झाला. गेल्या सात दिवसांपासून आपण बेहोश आहात. आपल्या जखमांमधून लाल मुंग्यांचे विष फार मोठ्या प्रमाणात शरीरात भिनले आहे, असे हकीमसाहेब सांगत होते. आपल्या जिवाला जर काही अपाय झाला असता तर आलाहजरतांनी मला जिवंत सोडले नसते. अल्लाची खैर आपल्याला शुद्ध आली. आता कसे वाटते?
उत्तरादाखल त्यांच्या तोंडून फक्त कण्हण्याचाच आवाज निघाला. त्या उमरावाने त्यांच्या कपाळावर हलकेच थोपटत पुन्हा त्याच स्नेहाळ आवाजात म्हटले–

ठीक है। तुम्ही तकलीफ घेऊ नका. आराम करा. हकीमसाहेबांना निरोप गेला आहे. येतील ते एवढ्यातच. आपण जागे झाल्याची खुशखबर मी आजच आलाहजरतांच्या कानी घालीन. फुरसत मिळाली की, मी सायंकाळी येईन भेटायला. खुदा हाफिज।

हा उमराव आपल्याला सलाम काय करतो? कुलीखान म्हणून काय हाक मारतो. आपल्या जिवाचे बरेवाईट झाले तर त्याच्याशी याच्या बादशहाचा काय संबंध? तो याला काय म्हणून सुळावर देईल? नेताजींना काहीच कळेना. विचार करीत ते तसेच निपचित पडून राहिले. बऱ्याच वेळाने हळूहळू त्यांना एकेक आठवू लागले. कैद, छळ, महाराजांचा निरोप घेऊन आलेला बहिर्जीचा नजरबाज, धर्मांतराचे सोपस्कार… सारे सारे लख्ख आठवले. त्यांच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागल्या, पण डोळे पुसण्यासाठी हात उचलण्याचेसुद्धा त्राण अंगात उरले नव्हते. मनाच्या अस्वस्थ स्थितीत पुन्हा त्यांची शुद्ध हरपली.
-
महाराजांच्या महालातील चोरदरवाजावर खुणेची दस्तक झाली. महाराजांनी उठून दिंडी उघडली. बहिर्जी नाइकाने महालात प्रवेश केला आणि तडक दरवाजाला अडसर लावला. मुजरा घालून अस्वस्थ चुळबुळ करीत तो उभा राहिला. महाराज एकटक निरखीत राहिल्याने त्याची अस्वस्थता वाढत गेली.
हं नाईक, बोला. काय बातम्या आहेत? या खेपी येण्यास बराच उशीर झाला. का?
मापी असावी म्हाराज, पन काही महत्त्वाच्या बातम्यांची खातरजमा करून घेण्यात स्वत: गुंतल्यानं जरा ज्यादा येळ लागला खरा.
त्यानंतर अनेक ठिकाणच्या महत्त्वाच्या बातम्या अगदी बारीकसारीक तपशिलांसह महाराजांच्या कानी घालून तो पुन्हा पायदळी नजर लावून उभा राहिला.

ठीक, पण आग्र्याची बातमी काय ते नाही सांगितले?
म्हाराज, म्हटलं तर बातमी चांगली हाय, पन म्हटलं तर लई भयंकर हाय. कशी सांगू उमगंना झालंया.

उगा घोळवत बसू नका. जे जसे आहे ते तसेच सांगा. जिवाला घोर लागतो.
आपला मानूस फुलादखानाच्या गोतावळ्यात घुसवला ह्ये तर मागंच सांगितलं. त्यानं मोका गावताच नेताजी सरकारांना वळख पटवली आनि आपला सांगावा सांगितला. नशिबानं साथ दिली म्हनून त्याला मोका गावला असं म्हनाया हवं कारन त्याच पेशीच्या वख्ताला बादशहा त्यांना गारद करन्याचा हुकूम देनार अशी मुस्तकीम खबर व्हती.
नेताजीकाकांनी त्याच्यावर विश्वास कसा ठेवला?

म्हाराज, मानूस खास माझ्या दस्त्यातला हाय. त्येची गोंदनाची खून त्येंच्या परिचयाची हाय. तसलं गोंदन असनारा खबरी कोनी ऐऱ्यागैऱ्या न्हाय तर येकदम खास, पक्क्या भरोशाचा आनि आपल्यासाठी थेट काम करनारा असतू ह्ये त्ये जानतात. तवा त्येंनी इस्वास ठेवला.
ठीक, मग पुढे?

पुडची खबर लई भयंकर हाय म्हाराज. जबान रेटंना सांगन्यास. त्याच दिशी अति छळवनुकीपाई नेताजी सरकार कोसळलं. त्येंनी मुसलमान होयाच कबूल केलं. त्यानंतर त्येंना आदबखान्यातून काडून शेरात हलवतील असा अंदाज व्हता. आपली मानसं टेहळनीवर व्हतीच. जरा जरी मोका मिळता म्हाराज, तरी हर प्रयत्न करून सरकारांना पळवून नेलं असतं. समदी तयारी चोख व्हती. पर बादशहा लई चलाख. त्येनं सरकारांना किल्ल्यातच ठेवला अन् त्याच राती सोता आपन त्येंना मुसलमान करून घेतलं. हाली सरकार लई बीमार हायती. खुद्द वजीर जाफरखान त्येंना आपल्या जनानखान्यात ठेवून त्येंची निगरानी करतुया. क्षणाचा बी मोका गावला न्हाई म्हाराज, नाय तर ह्ये अक्रीत इतक्या आसानीनं घडतं ना.
हंऽऽऽ! अखेर नेताजीकाकांना धर्मांतर करावेच लागले तर. जगदंब! जगदंब!! जगदंब!!! उद्या सकाळी ही बातमी आम्हाला सांगण्यासाठी म्हणून मोरोपंतांना द्या. यातला काय तपशील वगळणे ते तुम्हास निराळे सांगायची गरज नाही. नेताजीकाकांच्या भोवती आपली माणसं पेरण्याचा यत्न करा. ते मुसलमान झाले म्हणून ढिलाई नको. संधी साधून त्यांना परत आणण्याची कोशिश जारी ठेवा. या आता.

दुसऱ्या दिवशी सदरेवर मोरोपंत अंमळ उशिरा आले. त्यांची चर्या म्लान होती. नजर सैरभैर होती. अस्वस्थपणे ते उपरण्याने सतत घाम पुशीत होते. महाराजांना मुजरा करून ते तसेच उभे राहिले. आपल्या जागेवर गेले नाहीत.
या मोरोपंत. आज उशीरसा? आणि चर्या ही अशी उतरलेली? प्रकृती तर ठीक आहे ना?

जी. आई भवानीच्या कृपेने आमच्या प्रकृतीला काही झालेले नाही. पण स्वराज्याच्या प्रकृतीची मात्र काळजी उत्पन्न व्हावी असे काही घडले आहे.
त्यांच्या स्वरातील कटू उद्विग्नता लपून राहणारी नव्हती. वास्तविक मनातले भाव चेहऱ्यावर अथवा कृतीत उमटावे इतके ते कच्चे नव्हते; त्यामुळे सदरेचे कान टवकारले गेले.

अस्सं? असे काय घडलेय ज्याचा तुमच्या जिवाला इतका घोर लागावा?
महाराज, बातमी अगदीच वाईट आहे. नेताजीरावांसंबंधीची आहे.
अस्सं? ते बादशहाच्या कैदेत आहेत आणि सिद्दी फुलादखान आमचा राग त्यांच्यावर काढतो आहे अशी खबर होती. त्यांचे काही बरेवाईट…?

तसे झाले असते तरी परवडते. महाराज, निदान स्वराज्याची मान ताठ राहती. मोगली छळापुढे डबीर आणि कोरड्यांसारखे ब्राह्मण तगले, पण स्वराज्याचे सरनोबत, प्रतिशिवाजीच जणू अशी कीर्त मिळवलेले नेताजीराव मात्र पार कोलमडले. त्यांनी मुसलमान व्हायचे कबूल केले आणि वेळ न गमावता त्याच रात्री स्वत: आलमगीर बादशहाने त्यांना स्वहस्ते धर्मदीक्षा दिली. नवे मुसलमानी नाव दिले, महम्मद कुलीखान. त्यांना वजीर जाफरखानाच्या जनानखान्यात त्याच्या खास निगराणीत ठेवले आहे. आजारी आहेत. कोंडाजी पालकर आणि त्यांचे सारे कुटुंबसुद्धा बाटले अशी खबर आली आहे.
खबरीची खातरजमा करून घेतली?
स्वत: बहिर्जी खबर घेऊन आला आहे. त्याने स्वत: खात्री करून घेतली आहे. खबर खोटी ठरली तर काय नतीजा पावेल हे तो चांगले जाणतो. संशयास जागा नाही.

काही कल्पना नसताना आकाशातून विजेचा लोळ कोसळावा तशी बातमी सदरेवर कोसळली. सारी सदर पाषाणवत झाली. वातावरण विषण्ण झाले. नजरा पायतळ धुंडाळू लागल्या. महाराजांच्या प्रदीर्घ नि:श्वासाने शांतता भंगली.

जगदंब! एकदा पुरुषाच्या पतनाला सुरुवात झाली की, मर्यादा उरत नाही हेच खरे. आमच्या शब्दांचा राग धरून नेताजीकाका सोडून गेले. आम्हासोबत इतकी वर्षे स्वराज्यात राहून त्यांना मोगल ओळखता आला नाही. वड्याचे तेल वांग्यावर हा त्यांचा नेहमीचा खाक्या. आम्ही निसटलो. त्याने नेताजीकाकांना अडकवले. दुर्भाग्य उभे ठाकले की, बुद्धी तशीच चालते. या बातमीमुळे कुठे फंद उभा राहणार नाही, अवाजवी अफवा, बाजारगप्पा पसरणार नाहीत याची चोख काळजी घ्या. कोणी विपरीत वागू धजेल तर त्याचा मुलाहिजा करू नका. अनाजी, मोरोपंत सदर पुढे चालवा. तिसरे प्रहरी खलबतखान्यात बसून पुढचे ठरवता येईल.
बोलता बोलता महाराज सदरेवरून उठून गेले.
-
महाराज सदरेवरून उठले ते थेट आईसाहेबांच्या महाली आले. आईसाहेबांच्या सर्व सुना सकाळच्या नमस्कारासाठी त्यांच्या महालात जमल्या होत्या. महाराज वर्दीशिवाय आलेले पाहून त्यांची एकच धांदल उडाली. प्रत्येकाशी जुजबी बोलून महाराजांनी त्यांना बाहेर काढले; फक्त पुतळाबाई राणीसाहेबांना थांबवून ठेवले. सोयराबाईंनी रेंगाळण्याचा प्रयत्न करू पाहिला पण अखेर त्यांनाही निघावे लागलेच. सर्वांना बाहेर काढून आपल्यालाच मागे का थांबविले असेल या विचाराने पुतळाबाईंचा जीव धास्तावला. नेताजीकाकांसंबंधीच काही अशुभ बातमी असावी अशी त्यांनी अटकळ बांधली. धडधडत्या छातीवर हात ठेवून, पदर ओढून त्या नवऱ्याचे भाव निरखत उभ्या राहिल्या. त्यांच्याकडे तिरपा कटाक्ष टाकीत आईसाहेब म्हणाल्या–

शिवबा, काही विशेष? वर्दी न पाठवता असा अचानक आलास. काही गंभीर बाब?

नुसती गंभीर नव्हे आईसाहेब, स्वराज्यावर वङ्काघात करणारी खबर मोरोपंतांनी आणली आहे.
आता आणखी कोण चालून येतोय? स्वत: आलमगीर दक्षिणेत उतरतोय की काय?

गनिमांचा एखादा सरदार चालून येता वा तुम्हास वाटले तसा खासा आलमगीर येता तरी निभावता. पण बादशहाने या खेपी नेमका वर्मी घातलाय. नेताजीकाका छळापुढे नमले. मोडले. अखेर मुसलमान झाले.
काय सांगता? जगदंब! जगदंब!!
तोंडातल्या पदराच्या बोळ्याला न जुमानता बाहेर पडलेल्या हुंदक्याने माय-लेकांचे लक्ष वेधून घेतले. पुतळाबाईंनी विद्ध नजरेने आईसाहेबांकडे पाहिले. त्यांच्या नजरेतील कणव, माया आणि आश्वासन पाहून सारी लोकलज्जा बाजूला ठेवून त्या जखमी वासरागत सासूच्या कुशीत शिरल्या. त्यांनी आपल्या दु:खाला मोकळी वाट दिली. सुनेला कवेत घेऊन आईसाहेब मायेने थोपटू लागल्या. महाराज पुढे सांगत राहिले.

दिलेरखानाने त्यांचा सारा कबिला कैद करून आग्र्याला रवाना केला होता. नेताजींचा काका आणि साऱ्या बायकासुद्धा बाटवल्या गेल्या.
शिवबा, अरे विश्वास ठेवायला जड जाते सारे. नेताजींसारखा खंदा मोहरा असा फशी पडावा? केवळ अतर्क्य! त्यांना परत आणण्याची तजवीज करावी. मोगली गोटात त्यांचे अशा अवस्थेत असणे स्वराज्याला फारच धोकादायक ठरू शकते. जो न्याय निंबाळकरांस लावला तोच न्याय त्यांनासुद्धा लावावा. भावनेच्या ऊर्मीत त्यांची चूक झाली असेल, पण आता त्यांनी चुकीचे पुरेपूर शासन भोगले आहे. एवढा बाका मोहरा हातचा गमावू नये.

सासूचे बोलणे ऐकून पुतळाबाईंना नव्याने उमाळा आला. त्यांच्या गदगदत्या शरीराकडे कणवेने पाहत महाराज जणू त्यांनाच उद्देशून बोलत असल्याप्रमाणे आश्वासक स्वरात बोलले–
आम्ही तेच ठरवीत आहोत. पण त्याची उघडपणे चर्चा करणे ठीक नव्हे. आम्ही त्यांना परत आणण्याच्या खटपटीत आहोत असा नुसता संशय आला तरी आलमगीर त्यांचे मुंडके उडवेल. पेच बाका आहे. प्रत्येक पाऊल विचारपूर्वकच टाकावे लागणार. पण चिंता नसावी. आई यश देईलच.

मुसमुसणाऱ्या सुनेला थोपटीत आईसाहेब मायेने म्हणाल्या–
पुतळा, उगी बाळ. आवर स्वत:ला. नेताजी तुझ्या माहेरचा म्हणून शिवबाने तुला आम्हादेखत खबर दिली. त्याने परत आणतो म्हणून वचन दिले ना? मग आकाश कोसळो वा धरणी दुभंगो; तो ते पूर्ण करणारच. ऊठ. डोळे पूस. पोरी, भोसल्यांची सून आणि त्यातही शिवाजी भोसल्याची बाईल होणे म्हणजे सतीचे वाण! ते पेलणे येऱ्यागबाळ्याला साधणे नाही. जा बेटा. आपल्या महाली जा. सावर स्वत:ला. हा वङ्काघात इथेच पचवायचा. या महालातून बाहेर पडताना कोणाला वाटता कामा नये काय घडलेय आत ते. जाताना दारावरच्या बटकीला बजावून जा. म्हणावे, आम्ही बोलावल्याशिवाय आत डोकावू नको आणि कोणालाही आत सोडू नको, जोपर्यंत राजे आमच्या संगाती आहेत. उगी बाळा. जा. नीघ आता.

थोडे अवसान घेऊन पुतळाबाई उठल्या. देवघरासमोर माथा टेकून त्यांनी नमस्कार केला. नंतर सासूच्या आणि नवऱ्याच्या पाया पडून त्या आवेगाने महालाबाहेर पडल्या. आपल्या मागे त्यांनी धाडकन कवाड लावून घेतले. त्या गेल्या त्या दिशेला आईसाहेब बराच वेळ बघत राहिल्या. मग एकवार त्यांनी महाराजांच्या उदास गंभीर चेहऱ्याकडे कटाक्ष टाकला आणि देव्हाऱ्यातील महादेवाच्या

टाकाकडे त्या बघत राहिल्या. बहुधा त्या शब्दांची जुळवाजुळव करीत असाव्यात. मग त्यांनी थेट महाराजांच्या नजरेस नजर भिडविली.
एवढ्या क्षुल्लक निमित्ताने सरनोबतीचा शिरपेच मिरवणारा स्वराज्याचा बांका शिलेदार वतनाच्या लोभापायी गनिमाच्या गोटात सामील होईल हे काही केल्या आमच्या मनास येत नाही. तो काही लेचापेचा गडी नाही. तळहाती शिर घेऊन स्वराज्यासाठी आकाश-पाताळ एक करणारा, प्रसंगी धर्मासाठी मरण पत्करण्यास सिद्ध असणारा; तुमचे कर्म, धर्म, वर्म पुरते जाणणारा, तुमचा जणू बहिश्चर प्राण असणारा खंदा वीर सहजासहजी धर्म सोडून देईल? विश्वास ठेवणे शक्य नाही शिवबा.
महाराज चमकले. मग झटकन उठून आईसाहेबांच्या पायाशी बसले. दोन्ही हात त्यांच्या मांडीवर ठेवून आपली स्थिर नजर त्यांनी त्यांच्या स्निग्ध नजरेत मिसळून दिली. काही क्षण तसेच गेले.

आईसाहेब, आमचे प्रत्येक स्पंदन, हरएक श्वास आपण पूर्ण ओळखता. आमची कोणतीही कृतीच काय पण मनात उठणारा प्रत्येक बरा-वाईट विचार तरंगसुद्धा आपण स्पष्टपणे जाणून असता. स्वप्नातसुद्धा आम्ही आपल्याशी असत्य वागू-बोलू शकत नाही. पण या क्षणी सत्य बोललो तर कार्यहानीचे भय वाटते. म्हणून विनवतो, अधिक काही जाणून घेण्याचा आग्रह धरू नये. पुतळालाच नव्हे तर आम्ही ते वचन आपल्यालासुद्धा दिले आहे. आम्हाला आपल्या पायांची शपथ आहे.
आवेगाने पाय शिवून महाराज महालातून निघून गेले. आईसाहेबांनी दीर्घ नि:श्वास सोडला. काय होते त्यात? समाधान? विषाद? चिंता? पुत्रप्रेमाचा विश्वास? की अजून काही? कदाचित सारेच एकवटले असावे. देव्हाऱ्यासमोर माथा टेकून त्यांनी नमस्कार केला. पदराने डोळे कोरडे करीत त्यांनी जपमाळ हातात घेतली.
-

हळूहळू कुलीखानाची प्रकृती सावरू लागली. वजीर जाफरखान दररोज दोन वेळा येऊन जातीने विचारपूस करीत होता. सेवेत असलेल्या बांदी-बटकी आस्थेने शुश्रूषा करीत होत्या, तरी हिंडतेफिरते होण्यास दोन-तीन आठवड्यांचा काळ गेलाच. एक दिवस सायंकाळी दोन खोजांच्या मदतीने त्याला जनानखान्याच्या बगिच्यात आणून बसविले गेले. कित्येक महिन्यांनंतर तो खुले अस्मान पाहत होता. मुक्त वाऱ्याच्या झुळका अंगावर घेत होता. सरत्या उन्हाळ्याचे दिवस होते. आसपास कुठेतरी वळीव बरसून गेला असावा; त्यामुळे गरम वाऱ्याची धग उणावून किंचित सुखद गारवा आला होता. सायंकाळी फुलणारी फुले सभोवतालचे वातावरण सुगंधित करीत होती. माळ्याने हिरवळीवर पाणी घातल्याने मंद मृद्गंध वातावरण उल्लसित करीत होता. दूर वेलींच्या आडोशाला, बंदिस्त कुंजात काही स्त्रियांचा खेळ सुरू असावा. त्यांच्या मुक्त हास्याच्या लहरी वातावरण उल्लसित करीत होत्या. या प्रसन्न वातावरणाने शरीर प्रफुल्लित होऊन उठले. असे असले तरी काही वेळाने त्याच्या मनात घरच्या, महाराजांच्या, स्वराज्याच्या आठवणी दाटून येऊ लागल्या. मनावर उदासीची साय धरू लागली.

वजीरेआझम येत असल्याची वर्दी घेऊन एक बांदी आली. आता वजीर त्याचा वरिष्ठ होता; त्यामुळे योग्य ते नियम पाळून त्याचा मान राखणे क्रमप्राप्त होते. वजीर समोरून येताना दिसताच कुलीखान कुर्निसात करीत उभा राहिला. जाफरखान जलदीने पावले टाकीत पुढे झाला आणि हाताला धरून त्याला बैठकीवर शेजारी बसविले.

अजी जनाब कुलीखान, बीमार माणसाला हे दरबारी रिवाज माफ असतात. आज तुम्हाला असे मोकळ्या हवेत पाहून मनाला फार बरे वाटले. त्या बेवकूफ फुलादने जरा ज्यादतीच केली. पण तो तरी बिचारा काय करणार? तुम्ही मानतच नव्हता. शिवामागोमाग तुम्ही त्याला अपयश दिले असते तर कोणी स्वप्नातसुद्धा विचार करू शकणार नाही असे मरण त्याच्या वाट्याला लिहिले होते. आता झाले गेले विसरायचे आणि भविष्याचा विचार करायचा. आलाहजरतांची मर्जी तुमच्यावर बहाल आहे. त्याचा फायदा करून घ्या आणि स्वत:ची उन्नती साधून घ्या. आलमपन्हांच्या मर्जीप्रमाणे वागाल, तर स्वप्नातसुद्धा चिंतले नसेल असे वैभव मिळवाल.
अशा प्रकारे बऱ्याच गप्पागोष्टी झाल्या. तोपर्यंत मगरीबच्या नमाजाची अजान झाली. जाफरखान जाण्यास उठला. उठू पाहणाऱ्या कुलीखानाच्या खांद्यावर थोपटून त्याला खाली बसवत म्हणाला–

असू दे. असू दे. तुम्ही आराम करा. आता तुमची तबियत सुधारते आहे. उद्या सकाळपासून मौलवीसाहेब येऊन तुमची दीनी तालीम सुरू करतील. ध्यान देऊन शिका. तुम्हाला काही ते फार कठीण जाणार नाही. फक्त त्यात मन लावा. आता हळूहळू थोडी हलकी वर्दिश पण सुरू करा.

सकाळी-संध्याकाळी व्हरांड्यात किंवा बगिच्यात झेपेल इतकी चहलकदमी सुरू करा. लवकरच तुम्हाला हजरत आलमपन्हांच्या समोर दरबारी पेश व्हावे लागेल. त्यांच्यासोबत नमाजात शरीक व्हावे लागेल. त्यासाठी दरबारी रस्मोरिवाज आणि नमाज पढण्याचा तरीका व्यवस्थित शिकून घ्या. उगीच एखाद्या क्षुल्लक चुकीमुळे अलीजांची मर्जी खफा व्हायला नको.
गुस्ताखी माफ असावी वजीरेआझम, कदाचित तुम्ही मला पागल ठरवाल पण तुमचा स्नेह आणि आत्मीयता पाहून मनाला मोठा धीर येतो. आता मला तुमचाच आधार राहिला आहे. आपण एकटे एकाकी, बहिष्कृत नाही असा विश्वास वाटतो; त्यामुळे तुमच्यासमोर मन मोकळे करावेसे वाटते. मनास अनेक दिवसांपासून एक सवाल छळतो आहे. इजाजत असेल तर विचारीन म्हणतो. मात्र एक इंतजा आहे, सवाल गैरलागू वा गलत असला तर गैरसमज न करता माफ करावे आणि बंद्याची गलती दाखवून द्यावी म्हणजे आयंदा विचार करताना तशी काळजी घेऊन मनाला योग्य वळण लावता येईल.
पूछो. बेझिजक पूछो. आम्ही गैरसमज करून घेणार नाही. खात्री देतो. मात्र सवाल कोणाची बदनामी वा बेअदबी करणारा नसावा.
जी. असे म्हणतात की, मुसलमान झाल्यावर तोंडात गाईचे मांस कोंबतात. मी बेशुद्ध असताना असे काही केले गेले का?

प्रश्न ऐकून वजीर एकदम गंभीर झाला.
महम्मद कुलीखान, असे कधी काही होत नसते. बरे झाले तुम्ही असला प्रश्न मलाच विचारलात मात्र असले बेतुके प्रश्न पुन्हा कधी कोणा दुसऱ्याला विचारू नका. तुम्हाला तो कितीही जवळचा आणि विश्वासाचा वाटत असला तरी, नाही. मनाला आवर घाला. अशा प्रश्नांचा अर्थ तुमच्या मनात कुफ्र अजून जागे आहे असाच घेतला जाईल. नीट ध्यानी घ्या, ती इस्लामची नाफर्मानी समजली जाईल. शरियत आणि कुराणशरीफप्रमाणे या गुन्ह्यांसाठी फक्त सजाए मौतच सांगितली आहे. सावध राहा. सांभाळून वागा. खुदा हाफिज।
जाफरखान वजीर निघून गेला. कुलीखानाच्या मनात लख्खकन वीज चमकली. छळ, आजारपण आणि मानसिक ताणामुळे विचारशक्ती क्षीण झाल्याचेच, अशा प्रकारे काही

कोणाला विचारणे हे लक्षण आहे; हे त्याच्या नीट ध्यानी आले. तो जे काही दिव्य करीत होता, ते मराठी गनिमी काव्याचाच भाग होता. गनिमी काव्यात स्वत: मरून जाऊन हुतात्मा होण्याला फारसे महत्त्व नसते, तर आपण जिवंत राहून, धडधाकट राहून, सुरक्षित राहून; प्रसंगी नमते घेऊन, चार पावले माघार घेऊन शत्रूला गाफील करणे आणि गाफील क्षण, शत्रूची अडचण साधून नेमका घाव घालून शत्रूवर मात करण्याला महत्त्व असते. पण थोडी गफलत झाली, तर थेट प्राणांशीच गाठ. त्याच्या लक्षात आले की, आपण हे जे दिव्य आरंभले आहे ते अशा क्षुल्लक गफलतीने मातीमोल व्हायला नको. आता अष्टौप्रहर सावध राहिले पाहिजे; अगदी झोपेतसुद्धा. भोवतालची प्रत्येक व्यक्तीच नव्हे तर अगदी भिंत, पडदा, खांब, झाड आणि झुडूपसुद्धा आपल्यावर नजर ठेवणारे आलमगिराचे खास हेर आहेत असेच समजून वावरायचे. वागायचे आणि बोलायचे.

गेल्या कित्येक दिवसांत विचार करण्याची, सुसंगत अन् तर्कनिष्ठ विचार करण्याची सवयच तुटली होती. मन आणि मेंदू क्षीण झाले होते. या विचार करण्याने त्याच्या मनावर मोठाच ताण आला. त्या ताणामुळे त्याला इतका थकवा आला की, उठून उभे राहणे शक्य होईना. जोरदार भोवळ येऊन तो बसल्या जागीच कोसळला. अखेर काही खोजांनी आणि बटकींनी त्याला उचलून खोलीत नेले आणि पलंगावर नीट झोपविले. त्याला लगेच ग्लानी आली.
-
रात्रभर कुलीखान ग्लानीतच होता. ग्लानीतच चित्र-विचित्र स्वप्ने पडत राहिली; त्यामुळे कधी मध्येच दचकून जाग येई. पहाटेच्या सुमारास जरा शांत झोप लागली. सकाळी शाही हकीम मुल्ला सय्यद अहमद रोजच्याप्रमाणे प्रकृती तपासण्यासाठी आला, तेव्हाच मग बांदीने जागे केले. प्रकृती तपासून मुख्य बांदीला औषधे आणि पथ्य-पाण्याच्या सूचना देऊन आणि त्याच्याशी जुजबी बोलून हकीम निघून गेला. सकाळची आन्हिके आटोपून न्याहारी सुरू असताना मोती मशिदीचा पेश इमाम मौलाना मसूद अहमद कुरेशी येऊन बसल्याची वर्दी घेऊन खोजा आला. जनानखान्याच्या दरोग्याने चार तार्तर बाया हत्यारबंद करून सोबत दिल्या. कुलीखानाला कोणत्याही कारणासाठी नजरेआड न होऊ देण्याची आणि दोन्ही पुरुषांवर बारीक नजर ठेवण्याची सख्त सूचना त्याच्या देखतच दिली. त्याच्या सेवेतील मुख्य बांदी आणि वर्दी घेऊन आलेल्या खोजाच्या मागोमाग कुलीखान इमामाला भेटण्यास निघाला.
भेटीचे प्राथमिक उपचार आणि सलाम दुवा झाल्यानंतर इमामाने कुलीखानाला इस्लामी तरीक्याने नीट बसवून घेतले. स्वत: शेजारी बसला.
जनाबे आली मेरे पीछे दोहराइये – ‘बिसमिल्ला उर् रहिमाने रहीम’ कहो.
कुलीखानाने नीट लक्ष देऊन ऐकले आणि एकेक शब्द सावकाश उच्चारत बिनचूकपणे तसेच म्हटले. इमाम खूश झाला.

सुभानअल्ला! बहोत खूब! माझा मुर्शद लवकरच सारे काही शिकून घेईल याची मला खात्री आहे. आत्ता आपण जे म्हटले त्याचा अर्थ आहे की, मी परमदयाळू अल्लाच्या नावाने प्रारंभ करतो. प्रत्येक श्रद्धावान नेक मुसलमान बंदा आपली प्रत्येक कृती ही दीन आणि दुनियेचा प्रत्यक्ष मालक असणाऱ्या अल्लाच्या नावानेच करतो. मग ते जेवणासारखे साधे काम असो किंवा अन्य कोणते महान दैवी काम असो. प्रत्येक कृतीचा कर्ताकरविता अल्लाच असतो अशी त्याची दृढ श्रद्धा आहे.
जी. आले ध्यानात.

आज मी आपल्याला इस्लामची माहिती थोडक्यात सांगतो. एकदा ते नीट समजले की दोन-तीन दिवसांत आपण नमाज पढायला शिकू. इस्लामचे ज्ञान अपार आहे. एक-दोन बैठकांत सारे सांगणे शक्य नाही. प्रसंगाप्रसंगाने मी आपल्याला त्याची माहिती देतच राहीन. त्यानंतर आपण धर्माचा शास्त्रोक्त अभ्यास करू. ठीक?
जी. ठीक.
इस्लाम या शब्दाचा अर्थ समर्पण. सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान,

एकमेवाद्वितीय अल्लाला स्वत:स समर्पित करणे. अल्लावर अव्यभिचारी निष्ठा असणारा, त्याच्या मार्गावर अढळ श्रद्धा असणारा, कुराणशरीफ हाच एकमेव प्रमाण ग्रंथ आहे असा विश्वास बाळगणारा, हजरत महम्मद सलल्लाह वसल्लम हे अल्लाने पृथ्वीवर पाठवलेले आखरी पैगंबर आहेत असा अविचल विश्वास असणारा, अखिल मानव समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि अल्लाच्या समीप जाण्याचे इस्लामचे पवित्र ज्ञान ज्या कुराणशरीफमध्ये नंतर समाविष्ट झाले ते प्रत्यक्ष अल्लाने आपल्या आखरी पैगंबरावर हजरत महम्मद सलल्लाह वसल्लम यांचेवर उतरले अशी अविचल श्रद्धा असणारा जो श्रद्धावान नेक बंदा, तोच मुसलमान. अल्लाचा सच्चा भक्त.
अच्छा, म्हणजे फक्त अल्लावर निष्ठा असणारा किंवा फक्त पैगंबरावर विश्वास असणारा मुसलमान होत नाही, तर हे आता आपण जे काही सांगितले ते जसेच्या तसे मानणारा म्हणजेच मुसलमान तर.

बिलकुल दुरुस्त. मात्र पैगंबरसाहेबांचा उल्लेख नुसतेच पैगंबर अथवा नुसतेच महम्मद असा कधी करू नये, तर पैगंबर हजरत महम्मद सलल्लाह वसल्लम असाच करावा. या दुवाचा अर्थ असा की, परमेश्वर - अल्ला - त्यांना चिरंतन शांती बहाल करो.
ठीक. अच्छा।

इस्लामचे पाच अरकान आहेत. प्रत्येक श्रद्धावान मुसलमानाचा त्या सर्व अरकानांवर दृढविश्वास आणि त्यांच्या प्रति समर्पण भाव असला पाहिजे आणि कोणतीही शंका उपस्थित न करता त्यांचे कसोशीने पालन केले पाहिजे. सर्वांत पहिले अरकान म्हणजे इमान. म्हणजे मघा सांगितले त्याप्रमाणे श्रद्धा व अविचल निष्ठा. म्हणूनच आपण नेहमी कलमा पढून आपला विश्वास, इमान व्यक्त करीत असतो. इमान नुसते मनात बाळगून उपयोगाचे नाही ते व्यक्त झाले पाहिजे. दुसऱ्यांना समजले पाहिजे. म्हणून त्याचा हरहमेश उल्लेख करावा.
समजलो.
दुसरे अरकान नमाज. प्रत्येक श्रद्धावान मुसलमानाने दिवसातून पाच वेळा अल्लाच्या सेवेत नमाज अदा करणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत याला अपवाद करता येत नाही. नमाज एकट्याने पढला असता जे पुण्य मिळते त्याच्या सातपट पुण्य बाजमात म्हणजे सामूहिक पढला असता मिळते. नमाज पढताना आपला मोहरा किबल्याच्या म्हणजे मक्केच्या दिशेने ठेवावा. मक्का हिंदोस्तानच्या पश्चिमेस आहे म्हणून आपला मोहरा पश्चिमेकडे असतो पण ती तुर्कस्तानच्या दक्षिणेस, तर सीरियाच्या पूर्वेस आहे म्हणून तेथील श्रद्धावान मुसलमान त्या दिशेला तोंड करून नमाज पढतात.
असे आहे तर. पण पाच वेळा म्हणजे कसे?

सगळ्यात पहिला नमाज पहाटे सूर्य उगवण्यापूर्वी आकाशात जो लालिमा पसरतो, तो पसरण्यास सुरुवात होण्यापूर्वी पढतात. त्याला ‘फजरचा नमाज’ असे म्हणतात.

सूर्य माथ्यावरून ढळल्यानंतर एका घटकेने दुसरा नमाज पढला जातो याला ‘जौहरचा नमाज’ म्हणतात. शुक्रवारी होणाऱ्या जौहरच्या नमाजाला फार मोठे महत्त्व आहे, त्या वेळी धर्मगुरू धर्माचे विवेचन करून सांगतात आणि धार्मिक फतवे जारी केले जातात. उन्हाचा तडाखा कमी झाला, उन्हे सौम्य झाली की, सूर्यास्तापूर्वी दीड घटका तिसरा नमाज अदा होतो याला ‘असरचा नमाज’ म्हणतात. सूर्य पूर्ण अस्ताला गेला आहे पण संधिप्रकाश पसरला आहे अशा वेळी चौथा नमाज अदा होतो त्याला ‘मगरीबचा नमाज’ म्हणतात. अंधार पूर्ण दाटून आल्यानंतर सितारे पूर्ण रोशनीने झगमगू लागले असताना पाचवा नमाज पढला जातो याला ‘ईशाचा नमाज’ म्हणतात.
समजलो.

रमजानच्या पवित्र महिन्यात फजरच्या नमाजाच्या आधीपासून ते मगरीबच्या नमाजाच्या अजानपर्यंत प्रत्येक श्रद्धावान मुसलमान उपवास पाळतो. याला ‘रोजा’ म्हणतात. तो तिसरा अरकान आहे. रोजा सुरू असताना दिवसभरात तोंडात पाण्याचा थेंबसुद्धा घेता येत नाही. मगरीबची अजान झाली की, इफ्तारी करून रोजा खोलतात. मग फजरच्या नमाजापूर्वी अजान होण्याच्या आधी सेहरी करेपर्यंत सर्व काही खाण्या-पिण्यास पूर्ण मोकळीक आहे. या पवित्र महिन्यात अल्लाची इबादत करण्याव्यतिरिक्त दुसरे काही करू नये असा संकेत आहे. शव्वाल महिन्यातील पहिल्या चंद्रदर्शनानंतर रोजे संपतात आणि सकाळी ईद साजरी करण्यात येते.
कठीण आहे.

तर? इस्लाम म्हणजे मजाक नव्हे. पुढचे अरकान जकात. ज्या श्रद्धावान मुसलमानाची वर्षभरातील आमदनी एवढी आहे की, जीमधून साडेसात तोळे सोने आणि साडेबावन्न तोळे चांदी एवढी संपत्ती वर्षअखेरीस शिल्लक उरते तर अशा श्रद्धावानाने आपल्या वर्षभरातील संपूर्ण उत्पन्नाच्या अडीच टक्के इतकी रक्कम इस्लामी राज्यास कर म्हणून देणे बंधनकारक आहे. आले ध्यानात?
हो समजले.

पाचवे अरकान आहे हज. जिल्हेजच्या महिन्यात मक्केस जाऊन बैतुल्लामध्ये विराजमान असलेल्या संगे अस्वद काबा शरीकचे दर्शन घेऊन तेथे नमाज पढणे. जिल्हेजच्या दहाव्या दिवशी अल्लाच्या नावे आपल्या कुवतीप्रमाणे कुर्बानी देणे, ज्याला ईद-उल-जुहा म्हणतात त्या दिवशी. चाळीस दिवस त्या पवित्र भूमीत राहून अल्लाची इबादत करणे म्हणजे हज. प्रत्येक श्रद्धावान मोमिन मुसलमानाने आयुष्यात एकदा तरी हजची यात्रा करावी.

इतक्या दूरवर समुद्र ओलांडून जाणे प्रत्येकाला कसे काय शक्य व्हावे?
प्रत्येकाने प्रयत्न तर केलाच पाहिजे. पूर्ण निष्ठेने आणि श्रद्धेने हज करण्याची इच्छा मनात बाळगली तर रहिमाने रहीम परवरदिगारे आला अल्ला ताला बंद्याची ख्वाहिश पूर्ण केल्याशिवाय राहत नाही.
आपण हजची यात्रा केलीत का?
प्रश्न ऐकला न ऐकल्यासारखे करून इमाम पुढे बोलत राहिला.
इस्लामच्या पाच अरकानमध्ये जरी शिरकत केली नसली, तरी प्रत्येक काबिल श्रद्धावान मुसलमानाने पृथ्वीवरून कुफ्र आणि काफिर पूर्ण नष्ट करून आलम दुनिया

दार-उल्-इस्लाम बनवणे, इस्लाम पृथ्वीवर कायम करणे, प्रत्येक मानवाला अल्लाच्या नेक मार्गावर आणून इस्लामच्या झेंड्याखाली एकत्र आणण्यासाठी हाती शस्त्र घेऊन अल्लाच्या नावाने संघर्ष करणे म्हणजे जिहाद. सर्वशक्तिमान अल्लाच्या आदेशावरून जिल्हेसुभानी आलमपन्हांनी त्यासाठीच आपल्याला निवडले आहे. इस्लामच्या नेक राहवर आणले आहे.

प्रतिसादादाखल कुलीखान फक्त जोराने कण्हला. पण तिकडे दुर्लक्ष करून इमाम तसाच पुढे बोलत राहिला.
प्रत्येक श्रद्धावान मुसलमानाचा असा दृढविश्वास आहे की, सर्वशक्तिमान अल्लाच्या, जो या सृष्टीचा एकमेव निर्माता आणि मालक आहे, इच्छेप्रमाणे एक दिवस या सृष्टीचा संपूर्ण विनाश - शेवट होणार आहे. त्या दिवशी म्हणजेच कयामतच्या दिवशी रहेमाने रहीम परमदयाळू क्षमाशील अल्ला आपल्या प्रत्येक नेक बंद्याच्या, मुसलमानाच्या पाप-पुण्याचा हिशेब करून त्याला त्या-त्याप्रमाणे स्वर्ग वा नरक बहाल करणार आहे.
या वेळी कुलीखान जरा जोरातच कण्हला; त्यामुळे इमामाला त्याची दखल घेणे भागच पडले.
असो. बराच वेळ झाला. आज आपण जे शिकलो त्याची मनात उजळणी करा. उद्या हेच जरा अधिक विस्ताराने समजावून घेऊ. काही नवीन शिकू. आता आपल्याला उठणे, बसणे, झुकणे शक्य होते ना? परवापासून आपण एकेक रकातचा नमाज सुरू करू. ठीक?
चालेल.
खुदा हाफिज।
खुदा हाफिज।

इमामाचा निरोप घेऊन कुलीखान आपल्या दालनात परतला. सोबतची बांदी काहीबाही बोलून तिचे इस्लामचे ज्ञान पाजळून त्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत राहिली पण त्याचे तिकडे लक्षच नव्हते. त्याला नजरेसमोर फक्त महाराजच दिसत होते. मन जपत होते.
‘महाराज, हे सारे तुमच्या आज्ञेखातर. तुमच्या पायाशी येण्याची संधी साधता यावी याचसाठी, केवळ. देवा खंडेराया, यश दे. महाराजांचे पाय पुन्हा दिसू दे.’
-

अमानुष मारहाण आणि आत्यंतिक छळ एवढा झाला होता की, जवळपास दीड महिना उलटून गेला तरी प्रत्येक हालचालीगणिक कुलीखानाच्या शरीरातून कळा निघणे थांबले नव्हते. तरी मूळची काटक शरीरयष्टी आणि इच्छाशक्तीच्या बळावर तो दुखण्यावर मात करण्याच्या प्रयत्नात होता. सुदृढ झाल्याविना जनानखान्यातून सुटका नाही आणि येथून बाहेर पडल्याशिवाय सुटकेचे प्रयत्न करता येणार नाहीत हे स्पष्ट होते. त्याचा खुराक अत्यंत पौष्टिक होता. त्याच्या सेवेत असलेल्या बांदी, बटकी अगदी मन लावून त्याची सेवा शुश्रूषा करीत; त्यामुळे

प्रकृतीमध्ये चांगलीच सुधारणा होत होती. आता त्याने हलका व्यायामसुद्धा सुरू केला होता. त्याचीसुद्धा प्रकृती सुधारण्यास चांगली मदत होत असे.
भोवतालच्या दासी, बटकी, खोजे, पहारेकरणी यांव्यतिरिक्त कुणा पुरुषाशी त्याचा संपर्क येऊ दिला जात नव्हता. शाही हकीम उपचारासाठी येई तेव्हा बुरखा घेतलेली एक दासी उशाशी बसलेली असे. पलंगाच्या दोन्ही बाजूंस दोन सशस्त्र तार्तर स्त्रिया मौजूद असत. याव्यतिरिक्त पडद्याची सख्त झाकपाक असे ती वेगळीच. मौलवीसाहेबांना भेटण्यासाठी अनेक दालने आणि व्हरांडे ओलांडत जावे लागे. तेव्हासुद्धा सोबत सशस्त्र पहारेकरणी आणि दासी असतच.

फक्त वजीर जाफरखान एवढा एकच पुरुष काय तो तेथे मोकळेपणे वावरत असे. साहजिकच होते ते, कारण तो त्याचा स्वत:चा जनानखाना होता. महम्मद कुलीखान त्या जनानखान्यात नजरकैदेत बंद होता. त्याचा बाहेरच्या जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला होता. दासी आणि बांदी ठरावीक विषयांवर आणि विशिष्ट मर्यादेतच बोलत; त्यामुळे प्रयत्न करूनसुद्धा काही बातम्या समजत नसत. आग्रा शहरातील घडामोडी कळणे जिथे दुरापास्त, तिथे दूरवरच्या स्वराज्यातील बातम्या कुठल्या कळणार?

त्या रांगड्या मराठमोळ्या शिपाई गड्याला अशी इतक्या बायकांच्या सहवासात राहण्याची अजिबातच सवय नव्हता; त्यामुळे त्याची फारच पंचाईत होऊन जाई. स्नान करताना, कपडे बदलताना; एवढेच काय उठता-बसतानासुद्धा त्या बायकांचे अंगचटीला येणे, सूचक कामुक हावभाव करणे, अश्लील बोलणे, बाष्कळ-चावट विनोद करीत राहणे वगैरे चाळ्यांमुळे तो पार संकोचून जाई. मग त्या निर्लज्ज बायका फिदीफिदी हसून त्याची मस्करी करीत. कधीकधी त्याला वाटे या नाजूक नजरकैदेपेक्षा सिद्दी फुलादखानाचा रांगडा आदबखाना परवडला.
हळूहळू नमाज पढण्यात कुलीखान चांगलाच तरबेज झाला. उठणे, बसणे, झुकणे, वाकणे सगळे अगदी बिनचूक जमू लागले. इतकेच नव्हे तर कोणत्या नमाजाच्या वेळी कोणत्या

आयातम्हणायच्या आणि कोणता दुवा पढायचा सारे कसे तोंडपाठ झाले होते. इमाम त्याच्याकडून कुराणातील अनेक आयातपाठ करून घेत होता. त्याला निरनिराळ्या कथा सांगे. कधी कुराणातील, तर कधी हदीसमधील; कधी सिरतुन्नबीमधून, तर कधी इस्लामी तवारीखमधून. आपण सगळे खूप मन लावून शिकतो आहोत, ऐकतो आहोत हे इमामाच्या मनावर ठसविण्यासाठी तो त्याला अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडी. त्या इस्लामी पंडिताची कित्येक प्रश्नांची उत्तरे देताना पार पंचाईत होऊन जाई.

जनाबे आली, साहेबी इमान असणाऱ्या सच्चा मोमिन बंद्याने असले मनात कुफ्र पैदा करणारे सवाल विचारू नयेत. अल्लाच्या सच्च्या मार्गापासून परावृत्त करण्यासाठी सैतान श्रद्धावानाच्या मनामध्ये असले नापाक खयाल पैदा करून बंद्याला गुमराह करण्याची कोशिश करीत असतो. तोच सच्चा मुसलमान आहे जो सैतानाची ही नापाक चाल नाकामयाब करून अल्लाच्या, कुराणशरीफच्या आणि पैगंबर सलल्लाह वसल्लमच्या मार्गावरच चालत राहतो; त्यामुळेच त्याला जिवंत असताना पृथ्वीवर ऐशआराम आणि मेल्यानंतर जन्नत नसीब होतो.
एकदा सारा जनानखाना हादरून गेला. शिव्याशाप, मारझोड, किंकाळ्या यांचा एकच धिंगाणा उसळला. पहारे अधिकच सख्त झाले. क्रूर चेहऱ्याच्या राकट तार्तर आणि हबशी पहारेकरणी नंग्या तेगा खांद्यावर टाकून दारा-दरवाजात उभ्या राहिल्या.

कुलीखानाच्या कमऱ्यात आत आणि बाहेरच नव्हे तर पलंगाभोवतीसुद्धा पहारे बसले. गाद्या-गिरद्या उलट्यापालट्या करून, चादरी झाडून-झटकून कमऱ्याची तलाशी झाली. कुलीखानाचीच नव्हे तर प्रत्येक बेगमेचीसुद्धा अंगझडती झाली. खोजांची, बांद्यांची इतकेच नव्हे तर प्रत्येक पहारेकरणीचीसुद्धा सर्व कपडे उतरवून अंगझडती झाली. कित्येक तास हा प्रकार सुरू होता. नंतर बऱ्याच उशिराने कळले की, टपालाचे एक अनोळखी कबुतर जनानखान्यामध्ये उतरले होते. एका खोजाने ते पकडलेसुद्धा. त्या कबुतराकडे काय सापडले वगैरे तपशील कळू शकला नाही मात्र ते कोठून आणि कोणासाठी आले? याचा तपास अशा मोगली पद्धतीने सुरू होता.

दोन दिवसांनंतर कळले की, जाफरखानाच्या कोणा एका नव्या बेगमेच्या याराने तिला प्रेमपत्र पाठविण्याचे धाडस केले होते. त्या बेगमेला आणि तिच्या त्या याराला पकडण्यात आले होते. सायंकाळी जाफरखानासमक्ष दोघांचा शिरच्छेद होणार होता. त्या सोहळ्याला उपस्थित राहण्याचा बहुमान कुलीखानाला देण्यात आला. त्या ‘सोहळ्या’नंतर दालनात परत येत असताना जाफरखान त्याला म्हणाला–

देखा, महम्मद कुलीखान? इस्लाममध्ये नाफर्मानीची ही अशी सजा सांगितली आहे. इथे इन्साफ साफ आणि झटपट. निष्कारण वेळेची बरबादी नाही. आता या गोष्टी तुम्हीसुद्धा शिकून घेतल्या पाहिजेत. हळूहळू शरियत शिकून घ्या. शाही अंमलदार म्हणून पुढे तुम्हाला निवाडे करावे लागणार आहेत.
कुलीखानाने मुकाट्याने मान हलविली. त्यानंतर कित्येक रात्री आक्रोश करणारे आणि दयेची भीक मागणारे ते दोन जीव त्याच्या नजरेसमोरून हलत नव्हते.
-

सकाळच्या दरबाराला निघण्यापूर्वी बादशहा वजीर जाफरखानाकडून त्या दिवशी दरबारात होणाऱ्या कामाची माहिती करून घेत होता. ते काम संपल्यानंतर रोजच्या रिवाजाप्रमाणे त्याने कुलीखानासंबंधी अहवाल दिला.
आलमपन्हांच्या हुकमाप्रमाणे हकीम सय्यद अहमद दररोज जातीने त्याच्या खुराकाची आणि दवापाण्याची देखरेख करीत आहे. लेकिन गुस्ताखी माफ अलीजा, पण त्याची कमजोरी अजून पूर्ण भरून निघालेली नाही. दीनी तालममध्ये मात्र तो बराच रस घेताना दिसतो. आम्ही स्वत: काल त्याच्या सोबत फजरचा नमाज पढला. त्याने एकही चूक केली नाही. प्रत्येक रकात अगदी बिनचूक अदा केली. आयात आम्ही त्याला मोठ्याने पढायला सांगितल्या. त्याने एखाद्या काझीने पढाव्या तशा बिनचूक पढल्या. पण इमाम मसूद अहमद सांगत होता, सारख्या बारीकसारीक शंका विचारून पार भंडावून सोडतो.

हुंऽऽऽ! अच्छा तो आप फजर की नमाज भी पढते हैं. आज दुपारनंतर शाही हकिमाला माबदौलतांसमोर पेश करा. अजून किती दिवस लागतील त्याला तंदुरुस्त व्हायला ते जाणून घ्यायची इच्छा आहे. येत्या चाँदरातच्या दरबारात त्याने पेश व्हावे आणि शाही हुकमाप्रमाणे ताबडतोब मोहीमनशीन व्हावे अशी माबदौलतांची दिली ख्वाहिश आहे. त्याला

सरहिंदपासूनसुद्धा दूर अफगाणी मोहिमेवर रवाना करण्याची योजना आहे. आपल्या मुलखापासून आणि माणसांपासून तो जितका दूर राहील तितक्या त्याच्या आठवणी धूसर होत जातील आणि तो इस्लामी माहौलमध्ये जास्त चांगला रमून जाईल. त्याने आणि शिवाने कितीही मनात आणले तरी एवढ्या दूरवरून त्यांना एकमेकांशी संधान ठेवता येणे शक्य होणार नाही.

आलमपन्हा, दरबारात पेश होण्याइतपत तर त्याची हालत संवरली आहे. पण अजून महिनाभर तरी त्याला मोहीमनशीन होता येणार नाही. घोड्यावरून दौड करण्याइतकी ताकद अजून नाही आली त्याच्यात.

पावसाळा संपल्यानंतर मात्र त्याला नक्कीच मोहिमेवर पाठवणे शक्य होईल असा माझा खयाल आहे.
जाफरखान, त्याचे एकेक दिवस आग्र्यास राहणे माबदौलतांसाठी तकलीफ देय आहे. पुरानी यादें हमें बेचैन करती हैं. त्या शिवाची माणसे त्याच्यापर्यंत कधी पोहोचतील की काय याची चिंता सतत छळत असते.

आलमपन्हांनी अगदी बिनघोर राहावे. आम्ही कुलीखानाला आमच्या खास जनानखान्याच्या महालातच पूर्ण निगराणीत ठेवले आहे. पेश इमाम आणि शाही हकीम यांच्याशिवाय कोणीही पुरुष त्याला भेटूच शकत नाही. त्याच्या खिदमतीसाठी अशा काही हरहुन्नरी बांद्या तैनात ठेवल्या आहेत की, त्यांनी त्याला पूर्ण जखडूनच ठेवले आहे. खुदका बडप्पन नहीं तर हकिकत आहे की, वजीर जाफरखानाचा जनानखाना म्हणजे आमच्या सालेसाहेबांचा पुण्यातील लाल महल नव्हे. शिवाचा माणूसच काय, पण कबुतरसुद्धा आमच्या जनानखान्याची दिवार ओलांडून आत येणे शक्य नाही, अशी हुजुरेआलांनी खातरजमा बाळगावी.

बेहतर है। अशाच निगराणीने त्याला अजून दोन महिने सांभाळ. तोपर्यंत पाऊससुद्धा थांबेल आणि फौज ताबडतोब मोहिमेवर रवाना करता येईल. वजीरेआझम, मीर बक्षी, दिलावरखान, महाबतखान,
दाऊदखान कुरेशी, खान जहान लोधी, माबदौलतांचे चचा हुजूर पर्वीझ खान आणि सुरतेहून माबदौलतांच्या भेटीसाठी आलेले व्यापारी हाजी सय्यद बेग आणि हाजी करीमखान यांना आज रात्री खलबतखान्यात हाजिर होण्याचा हुकूम जारी करा. याद रहे, हुकूम गुप्त राहिला पाहिजे. त्याआधी माबदौलतांना तुला भेटायचे आहे. शाही दस्तरखानची शिरकत करण्याची दावत तुम्हाला दिली जात आहे. सोबत खालाजानला आणण्यास विसरू नका. आमच्या हमशिरा त्यांच्या सोबत असतील.

गुलाम जहाँपन्हांचा जन्मभर एहसानमंद राहील.

क्रमश:

*____📜🚩

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...