विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 30 October 2019

अनेकांच्या मते संभाजीराजे फितूर होते असे म्हणतात त्यांना हे उत्तर


अनेकांच्या मते संभाजीराजे फितूर होते असे म्हणतात त्यांना हे उत्तर -


 sambhaji maharaj साठी इमेज परिणाम

छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या स्वारीवर निघाले होते त्यावेळी सगळे सैन्य त्यांच्या बरोबर होते त्यावेळेला बहादुर गडाला दिलेर खान आला होता तो स्वराज्यावर आक्रमण करण्याची भीती आहे महाराजांनी गोवलकोंडा आणि आदिलशाही मध्ये भांडणे लाऊन दिलेत म्हणजे ते आक्रमण करणार नाही पण दिलेर खान मोकळा आहे आपण कर्नाटकात असताना दिलेर खानने आक्रमण करू नये यासाठी त्याला रोखायची जबाबदारी महाराजनी संभाजी राजाना दिलीये त्यांना श्रुंगरपूरचे सुभेदार म्हणून नेमले आणि स सैन्य शिवराय बाहेर असताना केवळ बुद्धीच्या जोरावर संभाजी राजांनी दिलेर खानला रोखले , राजे परत येईपर्यंत रोखले
त्यासाठी पत्रव्यवहार केलाय आम्हाला पराक्रमाची संधि हावि इथे स्वराज्यात ते शक्य होत नाही , मला संधि द्यावी . दिलेर खानने लगेच उलट पत्र पाठवले अरे तू तिथे काय करतो औरंजेबाकडे चाल सह्याद्रि जिंकायची आहे तू ये माझ्याकडे आपण दोघे मिळून सगळी सह्याद्रि जिंकू
संभाजी राज्यांनी त्याला उलट पत्र पाठवून कळवले या राज्याची जबाबदारी माझ्यावर सोपवून माझे वडील परराज्यात गेले आहे ते परत येई पर्यंत मी तुझी जबाबदारी स्वीकारू शकत नाही म्हणजे संभाजी राजे येतो हो म्हणाले नाही आणि येत नाही पण म्हणत नाही . दिलेर खानला निव्वळ झुलवत ठेवले
राजे परत आले पन्हाळ्यावर दोघांची चर्चा झाली मंग राजे रायगडावर गेले . यथाकाळ निरोप पाठवतो सांगून मध्ये 6– 7 महीने गेलेत . आता संभाजी राज्यांना पलूनच जायचे होते तर राजे कर्नाटकात असताना ते सोपे होते ( कुठला चोर असा म्हणतो येऊ द्या की पोलिस मंग जातो पळून ) जायचे असते तर आधीच गेले असते न राजे नसताना राजे येण्याची वाट कशाला बघता मध्ये 6 -7 महीने गेलेत मध्ये
मंग एके दिवशी रायगडावरुन पत्र येतेय आपण रायगडस न येता सरल परळीस जाने उचित ( आता परळी म्हंटले की समर्थ रामदास स्वामी येतात संभाजी राजे बिगडले होते त्यांना मार्गदर्शनाची गरज होती म्हणून त्यांना परलीच्या किल्ल्यावर पाठविले हा एका आरोप पण समर्थ रामदास स्वामी परलीच्या किल्ल्यावर हजरच नवते हे राज्यांना नाहीत होते ) मंग सांबाजी राज्यांना तिथे पाठविण्याचा उद्देश काय - त्या परलीच्या किल्ल्यापासून अवघ्या 13 मैलावर दिलेर खानची नौका येते तेथून अगदी 13 मैलावर जाऊन संभाजी राजे मोघालणा जाऊन सामील झाले हा सगळं जर परिक्रमेचा भाग जर बगितला तर संभाजी राज्यांनी पळूनच जावे यासाठी हे जाणून बुजून केलेले नियोजन आहे
वस्तुस्थिती ती आहे शिवराय कर्नाटकच्या स्वारीवरून परत आलेत शस्र मोडली , सैन्य थकले आपण लगेच दिलेर खाणाशी मुकाबला करी शकणार नाही म्हणून शिवराया नी संभाजी राज्यांना संगितले जा अजून काही काळ त्यांच्याकड रोखून धरा दिलेर खानला . आणि जेवढा काळ संभाजी महाराज दिलेर खनकडे आहे तेवढा काल दिलेर खानने एकदाही स्वराज्यावर चाल केली नाही
भोपाल गडाचा फक्त एकच किस्सा पण त्या भोपाल गडाबद्दल संभाजी राजे बाक्रे नावच्या ब्राम्हणला दिलेल्या दानपत्रात लिहितात तो दिलेर भोपाल गडाची इच्छा घेऊन माझ्याकडे आला तेव्हा मी शंकरासारखा माझा तिसरा नेत्र उगडुन राग प्रकट केला .( म्हणजे सरल आहे संभाजी राज्यांची इच्छा नाही स्वराज्यावर चाल करण्याची , एवढी एकच घटना पण तोही गड मराठ्यांनी लगेच जिंकून घेतलाय ).
संभाजी राजे जोपर्यंत दिलेर खनाकडे आहे तोपर्यंत दिलेर खानाणे आक्रमण केले नाही तर संभाजी राज्यांनी ते होऊ दिले नाही
पण या काळात शिवाजी राजे मात्र मोघलांचे किल्ले घेत निघालेत आणि दिलेर खान काही हालचाली करेना म्हणजे त्याचे किल्ले घेत असूनही दिलेर खान प्रतिक्रिया करेना तो मुयाजजम वैतागला त्याने दिलेर खाणाला पत्र पाठवले अरे तू तिथे गप्प का बसलाय शिवाजी राजे आपले किल्ले घेताय आणि तू काहीच करेना हालचाल नाही दिलेर खानची . मंग शेवटी औरंजेबाचे पत्र आले त्यामुळे दिलेर ला हालचाल करणे भाग पडले मंग दिलेर पन्हाळ्यावर हल्ला करायला निघाला वाटेत अथणीला मुक्काम पडला ( भीमसेन सकसेना नावाचा हितिहास कार लिहितो शिवाजी राज्यांची माणसे गुप्तपणे संभाजी महाराजांकडे येत असत एके दिवशी शिवाजी महाराजांच्या माणसांनी संभाजी राज्यांना अलगद बाहेर काढले तेथून विजापूर ला मसूद खाणाकडे नेले आणि तेथून मंग संभाजी राजे पन्हाळ्यावर आले
म्हणजे शिवरायांच्या माणसांनी संभाजी राज्यांना सोडून नेले . आता संभाजी राजे जर फितूर असते मोघलांना जाऊन मिळाले असते तर शिवराय त्यांना परत कसे आणतात ?
खंडोजि खोपडे फितूर झाला महाराजांनी त्याचे हात पाय छाटाले , संभाजी कावजी मोघलाणा जाऊन मिळाला महाराजांनी त्याला ठार केले . मंग हा न्याय संभाजी महाराजांना का लावला जात नाही ?
साधी गोष्ट आहे ही चाल शिवरायांची आहे हे जे केले संभाजी राज्यांनी ते शिवारायंच्या इच्छेनुसारच केले
आता साधी गोष्ट आहे काही लोक म्हणतात की आमच्या कडे पत्र आहे आता मला एक सांगा हा जर गोपनीय कटाचा भाग असेन तर संभाजी राजे दिलेर खानला असे पत्र लिहितिल का ?
दिलेर खान साहेब यांना ची . नमस्कार
त्याचे काय झाल आमचे आबासाहेब आताच कर्नाटकाच्या स्वारीवरुन परत आले . शस्र मोडली ,सैन्य थकले आत्ता आम्ही लगेच तुमच्याशी मुकाबला करू शकत नाही . संभजी राजे करता का असे जा जरा वर्षे - दीड वर्षे जाता का दिलेर खाणाकडे जा त्याच्याकडे झूलवत ठेवा त्याला
मंग कस काय वाटतेय आमची युक्ति तुम्हाला येऊ का मग तुमच्याकडे दिलेर खान साहेब ?
येवढेच नाही संभाजी राज्यांना परत आणल्यावर शिवराय त्यांना फ्रेंच्याशी वाटाघाटी करण्याचे आधिकार देतात , मोघलांच्या विरुध्द्ध आक्रमणाची जबाबदारी पण ते संभाजी राज्यांना देतात त्यामुळे संभाजी राजे स्वराज्य द्रोही नाही हीच वसुस्थिती आहे आणि हीच परिस्थिति पण आहे
संभाजी राज्यांच्या चरित्र वरचे हे दाग सरल सरल लक्षात येतात काही अर्थ नाही त्यात एक अत्यंत शिवरायांना अपेक्षित असणारा वारस या मातीने स्वराज्यास बहाल केलाय ज्याने स्वराज्य उभं केलाय .

बाजीरावांच्या काळात जवळपास सर्व भारत मराठा साम्राज्याकडे असताना शेजारचा मराठी प्रभाग (मराठवाडा) निजामाकडे कसा राहिला?



याचे विजय आपटे यांनी सांगितलेल्या कारणासोबतच आणखी एक कारण आहे. मराठवाडा आज जरी मागास दिसत असला तरी पूर्वी तसे नव्हते. कमी परंतू भरवशाचे पर्जन्यमान आणि गोदावरी, पूर्णा, मांजरा, सिंदफणा इ. नद्यांच्या खोर्‍यातील सुपीक जमीन यामुळे मराठवाडा हा पूर्वीपासून ज्वारी सारखी धान्ये आणि कापसाचे कोठार म्हणून ओळखला जायचा. याउलट, पश्चिम महाराष्ट्राचा सह्याद्रीचा भाग हा जास्त पावसामुळे तर पूर्वेकडचा भाग हा पर्जन्यछायेच्या प्रभावात असल्याने बहूतांश भाग हा शेतीसाठी उपयुक्त नव्हता. यामुळेच पूर्वीपासून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रापेक्षा तुलनेने अधिक संपन्न होता. इथे राज्यकरणारे सहाजीकच मग संपन्न होेते. अर्थातच शेकडो वर्षे इथे अनेक राज्ये होउन गेली. पुढील गोष्टी इथे लक्षात घेण्यासारख्या आहेत.
१. दोन मोठी संपन्न मराठी साम्राज्ये सातवाहन आणि सेऊन-यादव यांच्या राजधान्या आजच्या मराठवाड्यात अनुक्रमे प्रतिष्ठान (पैठण) आणि देवगिरी इथे होत्या.
२. सातवाहन, वाकाटक काळात मुख्य व्यापरी मार्ग हा मराठवाड्यातून जात असे. भोकरदन (जालना जि.), तेर (उस्मानाबाद जि.) हि व्यापाराची मोठी केंद्रे होती.
३. राष्ट्रकूट, चालूक्य या काळात राजधानी जरी मराठवाड्यात नसली तरी मराठवाड्याचे महत्व अजीबात कमी झाले नाही.
४. शिवाजी महाराजांची देवगिरीवर भगवा फडकविण्याची इच्छा होती (कदाचित राजधानी बनविण्याची इच्छा असावी). दुर्दैवाने त्यांच्या हयातीत ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
५. मराठवाड्यावर मुघलांचा कब्जा होण्याआधी निजामाने (मूळ भारतीय) त्यांच्याशी तीव्र संघर्ष करणे तसेच मुघलोत्तर निजामाने (मूळ तुर्की) लवचिक धोरण अवलंबने.
या सगळ्या गोष्टी मराठवाड्याचे महत्व सांगतात.
मराठवाडा स्वराज्यात घेण्याची संधी चालून आली ती छ. शाहू-बाजीराव पे. यांच्या काळात. परंतू विजय आपटे यांनी याच प्रश्नाला उत्तर देतांना सांगितल्या प्रमाणे अल्पसंतुष्ट असल्याने मराठे युद्धात जिंकत पण तहात हारत. मराठवाड्यासारखा संपन्न प्रदेश निजाम इतक्या सहजासहजी सोडेल याची शक्यता मुळीच कमी होती. यातूनच मग १७४३ मध्ये झालेल्या पालखेडच्या तहात निजामाने मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखी देण्याचे मान्य केले. अर्थातच निजाम हा कर स्वत:च्या खिशातून देणार नव्हता. हा भार पडला तो थेट सामान्य जनतेवर. इथे बाजीरावांनी मराठी भाषिक प्रदेश स्वराज्यात घेण्या ऐवजी तिथून मिळणार्‍या कराला महत्व दिले. मराठा साम्राज्याच्या भारतभर झालेल्या विस्तारात या कराची मोठी मदत झाली असणार. मग मराठवाडा स्वराज्यात आहे काय किंवा नाही काय, पेशव्यांनी त्याचा विचार केला नाही.
माझ्यामते मराठवाडा स्वराज्यात न घेणे ही पेशव्यांची केवळ चूक नव्हती, तर आपल्याच जनतेवर केलेला मोठा अन्याय होता. याचे मराठवाड्यावर दूरगामी परीणाम झाले. मराठवाड्याची आर्थिक स्थिती खराब होण्याला इथुनच सुरूवात झाली. दीर्घकाळापर्यंत इथे चांगले वैचारिक नेतृत्व येऊ शकले नाही. प. महा. आणि मराठवाड्यात आज एक मोठी वैचारीक, सामाजिक, आर्थिक दरी दिसून येते. मराठवाड्याच्या आजच्या वाईट स्थितीचे मूळ असे एका चूकीच्या तहात दडले आहे. मराठवाड्याने ई.स. पू. २०० ते ई.स.१५०० असे जवळपास १३०० वर्षे महाराष्ट्राचे भाषिक व सांस्कृतिक नेतृत्व केले पण त्याच मराठवाड्याला आज सावत्र वागणूक देण्यात येते. जर मराठवाडा स्वराज्यात असले असते तर कुणास ठाऊक, आज देवगिरी अखंड महाराष्ट्राची सांस्कृतिक व राजकीय राजधानी असली असती

पानिपत युध्दानंतरच्या काळात पुण्यात एक तोतया पेशवा



तोतयेगिरी इतिहासापासून प्रसिद्ध आहे . तालिबान मध्ये सुद्धा मुल्ला अख्तर मोहम्मद मन्सूर म्हणून मानली गेलेली ही व्यक्ती प्रत्यक्षात एक तोतया असल्याचे आता उघडकीस आले आहे.मुल्ला मन्सूर याला प्रत्यक्ष बघितलेल्या एका व्यक्तीने ही तोतयेगिरी उघडकीस आणली.आता अमेरिकन, ब्रिटिश व अफगाणी अधिकारी आपण मूर्ख बनवलो गेल्याचे मान्य करत आहेत.
त्या काळीं अशा तोतयांचा बराच सुळसुळाट होई. जनकोजी शिंदे, रामराजा छत्रपति वगैरे मोठमोठ्या लोकांचे तोतये तर निघालेच होते.त्या काळात छायाचित्रे वगैरे काढण्याची शक्यता नसल्याने, एखाद्या माणसाला ओळखायचे कसे? हे इतर चार चौघे काय सांगतात यावरच अवलंबून असे. महत्वाच्या व्यक्तींची चित्रे काढली जात असत. परंतु त्यावरून तशीच दिसणारी एखादी व्यक्ती खरी तीच आहे की तोतया हे सांगणे शक्य होत नसावे.
सदाशिवराव भाऊ यांचे निधन 14 जानेवारी 1761 मधे कुरूक्षेत्र येथे झाल्याचे .परंतु सदाशिवराव भाऊ यांची द्वितीय पत्नी पार्वतीबाई यांचा सदाशिवरावभाऊ यांचे निधन झाले यावर कधीच विश्वास बसला नाही. पार्वतीबाई व इतर काही सरदार मंडळींच्या या समजूतीचा फायदा घेऊन पेशव्यांचे राज्य लाटण्याचा प्रयत्न, सदाशिवराव भाऊ यांच्याप्रमाणेच दिसणारी एक व्यक्ती व तिच्या मागचे काही कारस्थानी यांच्या कडून केला गेला होता. ही घटना, तोतयाचे बंड या नावाने प्रसिद्ध आहे. ही तोतया व्यक्ती खुद्द सदाशिवराव भाऊच आहे असे मानणारे बरेच मराठी सरदार या तोतयाला जाऊन मिळाले होते व हे तोतयाचे बंड वाढतच चालले होते.
बुंदेलखंडातं छत्रपूर जवळील कनोल गांवीं सुखलाल नांवाचा कनोजा ब्राह्मण होता; त्याच्या बापाचें नांव रामानंद व आईचें नांव अन्नपूर्णा. भाऊबंदांच्या तंट्यास त्रासून सुखलाल घरून निघून नरवर येथें आला. तेथें थकून एका वाण्याच्या दुकानीं बसला असतां दोन तीन दक्षिणी माणसांनीं त्याला पाहून म्हटलें कीं, तू भाऊसाहेबासारखा दिसतोस, तुला पेशवाई देऊं, चल. सुखलाल धाडशी व धूर्त होता. त्यानें या साम्याचा फायदा घेऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणें भाऊ म्हणून आपल्यास जाहीर केलें. नरवर येथें शंभुपुरीपंथाच्या गोसाव्यांचा एक मठ होता, तेथील पुष्कळ गोसावी सुखलालास मिळाले व हें खूळ झपाट्यानें वाढलें; तोतयानें फौजहि जमविली. या खुळांत जे बडे लोक मिळाले त्यांच्या वर्तनांत लबाडी किंवा भोळेपणा किती होता हें ठरविणें बरेंच कठिण आहे. एवढें खरें कीं, पार्वतीबाईशिवाय पेशवेकुटुंबांत व पेशवाई सरदारांतहि कोणींहि तोतयावर विश्वास ठेविला नाहीं.
नरवरहून जवळ करेरा येथें झांशीचा सुभेदार नारोशंकर याचा पुतण्या विश्वासराव राहत होता. त्याला तोतयानें तेथील किल्ला आपल्याला देण्याबद्दल कळविलें. त्यानें दोनदां माणसें पाठवून खात्री करून घेऊन मग किल्ला स्वाधीन केला. शिंद्यांच्या चिटणिसाकडूनहि तोतयानें पैका घेऊन फौज चाकरीस ठेवली. त्यानें खरोखरीच्या पेशव्याप्रमाणें फौज, तोफा, गारदी, डेरे-राहुट्या, हत्ती, पालख्या वगैरे सारा सरंजाम ठेवून तो दक्षिणेकडे आला. या स्वारीच्या खर्चासाठी त्यानें वाटेंतील मराठ्यांचेच गांव लुटले.
समशेर बहादुराच्या मेव्हण्यानें नारायणराव पेशवे यास व दोन भिक्षुकांनीं खुद्द पार्वतीबाईस पत्रें लिहिलीं कीं, भाऊ खरे आहेत. शिवाय उत्तरेकडून अनेक सरदारांच्याकडे भाऊ खरे असल्याबद्दल पत्रें आलीं. तोतया नर्मदा व तापी उतरुन खानदेशांत दंगा करूं लागला; तेव्हां थोरल्या माधवरावांनीं फौज पाठवून त्याला पकडून धनगडास कैदेंत टाकलें. पुढें त्यांची व जनकोजीच्या तोतयाची पुणें येथें जाहीर चौकशी करुन ते खोटे असें नक्की ठरल्यावर त्यांनां प्रतिबंधांत ठेविलें . भाऊच्या तोतयास नगरच्या किल्यांत पाठविलें.
तोतयाला एके जागीं न ठेविता निरनिराळ्या किल्ल्यांवर ठेवीत. दौलताबाद, मिरज, रत्‍नागिरी वगैरे ठिकाणीं त्याला ठेविलें . रत्‍नागिरीचा सुभेदार रामचंद्र नाईक परांजपे हा होता, त्यानें फितूर होऊन तोतयाला सोडून त्याची द्वाही फिरविली . तोतयाने फौज जमवून कोंकणांत धुमाकूळ घातला. सरकारचें सर्व आरमारहि त्याच्या स्वाधीन झालें. कोंकणांतील बहुतेक किल्ले व मुलूख काबीज करुन बोरघांट चढून त्यानें राजमाची घेतली व सिंहगडाकडे प्रेष लाविला (आक्टोबर). यावेळीं त्याला इचलकरंजीकर घोरपडे, इंग्रज, कोल्हापूरकर, हैदर यांनीं मदत केली. इतकें झाल्यावर नाना फडणिसानें शिंदे, होळकर व पानशे यांनां तोतयावर पाठविलें. महादजीनें प्रथम सिंहगडचा बंदोबस्त केला; पानशे यानें तोतयावर हल्ले करून त्याला मागें हटविलें व राजामाचीहून त्याला हांकलून दिलें; तेव्हां तो कोंकणांत पळाला. त्याच्या मागें शिंद्यानें आपला दिवाण बाळाराव यास पाठविलें. तोतया बेलापुरास येऊन गलबतांतून इंग्रजांकडे मुंबईस निघाला. राघोजी आंग्य्रानें बातमी राखून त्याचें गलबत मध्येंच पकडलें व त्याच्या सर्व लोकांनिशीं त्याला पुण्याला आणलें तोतयानें पुन्हां आपली चौकशी करावी म्हणून विनंति केल्यावरून नानानीं, रामशास्त्री, गोपीनाथ दीक्षित, हरिपंत फडके, बाबूजी नाईक बारामतीकर वगैरे पंच नेमून जाहीर चौकशी केली.
(याबाबत एक कथा प्रसिद्ध आहे , मला माहित नाही कि हि खरी आहे कि दंतकथा आहे . पण हे शक्य आहे त्याला पुण्यात आणलं तेव्हा त्याचा खेळ संपण्याच्या मार्गावर होता. त्याची दुसऱ्यांदा चौकशी झाली. नानांनी त्याला अनेक प्रश्न विचारले आणि सगळ्या प्रश्नांची त्याने अचूक उत्तरं दिली. तो तोतया आहे हे सिद्ध होणे कठीण दिसत होते. सुखलाल म्हणजे तोतायाची चौकशी चालली असताना पार्वतीबाई चिकाच्या पडद्याआडून सगळं ऐकत होत्या. तोतया खोटा आहे हे सिद्ध होत नाही हे बघून नानासाहेब पार्वतीबाईंकडे आले आणि त्यांनी पार्वतीबाईंना तोतयाला त्यांच्या खाजगीतला प्रश्न विचारण्याची विनंती केली. इथे तोतयाची खरी परीक्षा होती.
पार्वतीबाईनी प्रश्न विचारला की “तुम्हाला पानिपतावर जाणारपूर्वीची रात्र आठवते का”ह्या प्रश्नावर तोतयाने म्हटले, “हो आठवते ना !”पार्वतीबाईनी पुढे विचारलं, “ त्या रात्री आपण मध्यरात्रीपर्यंत बोलत बसलो होतो. अंत:पुरात अत्तराचे दिवे जळत होते, पण अत्तराचं तेल संपलं आणि काळोख झाला. त्यानंतर तुम्ही काय केलं ? सांगा.”या प्रश्नावर सुखलाल म्हणाला “हा काय प्रश्न आहे. त्यांनतर आपण झोपी गेलो.”हे उत्तर ऐकून पार्वतीबाई ओरडून म्हणाल्या, “हा तोतया आहे”. नाना फडणविसांनी खात्री करण्यासाठी पार्वतीबाईंना त्यावेळी काय घडलं होतं हे विचारलं. पार्वतीबाई म्हणाल्या की “त्यानंतर मी कपाटातल्या अत्तराच्या कुप्या काढल्या आणि दिवे पुन्हा प्रज्वलित केले आणि पहाटेपर्यंत बोलत बसल
१८ डिसेंबर १७७६ , तोतया सर्वानुमतें खोटा ठरल्यावर त्याची धिंड काढून व शहरांतील सर्व लोकांस दाखवून नंतर मेखसूनें त्यानें डोकें फोडून त्यास देहांतशासन दिले . जे फितुरांत सामील होते त्यांचे सरंजाम जप्‍त केले व दंड किंवा कैद अशा त्यांनां शिक्षा दिल्या. पुढें १।२ महिन्यांत सर्व कोकण पुन्हां कारभार्‍यांनीं जिंकून घेतलें
. (ग्रँड डफ)
-(विश्वकोश)

शूर मराठयांनी औरंगजेबावर आक्रमण करून संभाजी महाराज्यांना का सोडवले नाही?

 
दगा फटका करून आणि फितुरी करून संभाजी महाराज आणि कवी कलश ना पकडून मुकर्रबखान खान, इखलासखान आणि गणोजी शिर्के प्रचितगड मार्गे सांगली जिल्हायच्या बत्तीस शिराळा मार्गे कराड, मान खटाव वडूज भागातून आणि तिथून पेडगाव बहादूर गड ला गेले.गणोजी शिर्के नि दाखवले नासतड तर प्राचितगड सारख्या भागातून येणे केवळ अशक्य होते.एकदा कराड ला गाठले की आपण सुरक्षित हे मुकर्रबखान ला माहीत होते कारण त्यावेळी कराड एक मोठे मुघल ठाणे झले होते.हाताशी 3000 फौज घेऊन जेंव्हा प्राचितगड ला आले टेंव शिराळा गावातील ज्योतजी केसरकर हा मावळा, अप्पशास्त्री दीक्षित आणि तुळजीराव देशमुख आणि 100 लोकांना घेऊन संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला.3000 फौज असलेल्या मुघलांपुढे टिकाव लागला नाही पण अप्पशास्त्री दीक्षित आणि तुळजीराव देशमुख( की देसाई ?)यान जीव गमवावा लागला.ज्योतजीकेसारकर जखमी झाले पण पुढे शाहू महाराजांना परत आणताना त्यांची मराठ्या सरदारांना मन फिरवायला मोठी मदत झाली.
शाहू महाराजांनी अप्पशास्त्री उर्फ कृष्णभट दीक्षित (मूळ आडनाव जोशी) यांच्या वारसांना मौजे कडूनर शिराळा जवळ वतन चालू ठेवले होते.भागांनागर(हैदराबाद)वरून त्यावेळी काही ब्रह्मणे कुटुंब शिराळा गावी स्थायिक झालेली .शिवाजी महाराजांनी अप्पशास्त्री दीक्षित याना शिराळा जवळ ज्योतिषयी वतन दिले होते.त्यानंतर अप्पशास्त्री उर्फ कृष्णभट दीक्षित हंस रामदास स्वामींचे भक्त बनले. समर्थांनी 11 मारुती ची स्थापन केली आहे त्यात एक शिराळा लाआहे.त्याचे मंदिर बांधायला अप्पशास्त्री उर्फ कृष्णभट दीक्षित यांनी पुढाकार घेतला होता.
शिराळा मध्ये तुळाजी निकम आणि तुळाजी कडू देसाई यांच्या वतन वरून वाद असताना स्वतः संभाजी महाराजांनी निवड केला आणि आप्पा शास्त्री त्यावेळी तिथे होत.मिरज ला असताना औरंगझेबाने शिरालाच वतनदार ला आपल्या बाजूने फितवले पण अप्पशास्त्री उर्फ कृष्णभट दीक्षित यांनी त्याला मारून संभाजी महाराजांना कळवले.मौजे कडनूर क्सचे वतन कुळ कायदा असो तो पर्यंत दीक्षित कुटुंबाकडे कडे होते.
एकदा कराड गाठल्यावर मुकर्रबखान ला कसली काळजी लागली नाही कारण त्यावेळी कराड मध्ये 15000 मुघल खाडी फौज होती.
प्रत्यक्ष शम्भू महाराजनचे मेहुणे असल्यावर (गणोजी शिर्के )बाकीच्या लोकांना संशय आला नसावा.प्राचितगड शिवाय बाकीच्या सर्व घाटावर मराठा फौज होत्या.
तब्बल लाख फौज असलेल्या बहादूरगड वर हल्ला करून शम्भू महाराज ना सोडणे आत्मघाताचे ठरले असते.
(वरचयस गोष्टीचा कोणताही ऐतिहासीक पत्र नाही पण दीक्षित यांचे शिवकालीन वाडा, बांधलेले मारुती आणि तुळजा देवीचे मंदिर, रामदास स्वामी शि असलेलं संबंध हेच दर्शवत आहे आणि त्यावेळीच चाफळ येथील पत्रव्यवहार , ही कथा पिढ्या न पिढ्या शिराळा, पन्हाळा भागात सांगितली जाते , नंतर सुद्धा त्यांचे वतन सातारा गादीकडून चालवले गेले.)
ताळटीप:
मराठेशाहीचे अंतरंग :जयसिंगराव पवार
पुनल गावी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर ज्योतजी केसरकर यांची समाधी आहे.

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...