विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 25 July 2019

” छत्रपती संभाजी महाराज आणि शहजादा अकबर “

” छत्रपती संभाजी महाराज आणि शहजादा अकबर “

|| छत्रपती संभाजी महाराजांचा विजय आहे ||
” छत्रपती संभाजी महाराज आणि शहजादा अकबर “
●●●【शंभूराजांच्या दूरदृष्टीचा ज्वलंत उदाहरण 】●●●
द्वितीय आवृत्ती
शहजादा अकबर हा जन्माने महाराष्ट्रीयच , औरंगाबादला , दि. ११ सप्टेंबर १६५७ रोजी , जन्म झाला होता , वास्तविक शंभूराजे आणि अकबराचे वयवर्षं एकच होते . दोघांमध्ये खूप साम्य होते .
■ शहजादा अकबराबद्दल महत्वपूर्ण माहिती : –
१ . दि. ९ मे १६६७ रोजी , औरंगजेबाने अकबरास ८ हजारी मनसबदारी दिली .
२ . सन १६७२ मध्ये , राजपुतान्याचे बंड मोडण्यासाठी , बादशहाने त्यास पाठविले .
३ . सन १६७६ मध्ये , औरंगजेबाने त्यास माळव्याचे सुभेदार नेमले .
दि . १० डिसेंबर १६७८ रोजी , जोधपूर चा महाराजा जसवंतसिंह राठोड , याचा अफगाणिस्तान मोहिमेवर असताना निधन झाले . युद्धात धारातीर्थी पडल्यामुळे , खरं तर बादशाने जोधपूर राजघराण्याचे सांत्वन करावयास हवे होते , त्याने तर जगावेगळेच केले .
जसवंतसिंहाच्या मृत्यूमुळे , औरंगजेबाने जोधपूर संस्थान खालसा करण्याचा घाट घातला , तसा शाही फर्मानही पाठविले ; परंतु हा आदेश जसवंतसिंहाच्या राण्यांना व करभाऱ्यांना मान्य नव्हता , त्यांनी मुघल सल्तनिविरुद्ध बंड पुकारले . त्या बंडाचा बिमोड करण्यासाठी , औरंगजेबाने अकबराला तसेच शहाआलम आणि आजम या शहजाद्याना पाठविले ; परंतु मोहिमेत मोगलांना यश
मिळाले नाही . राजपुतांविरुद्ध आपल्याला यश मिळत नाही , त्यामुळे तात्काळ युद्ध बंद करावे , असा खलिता अकबराने , औरंगजेबास पाठविला . यामुळे औरंगजेबाला राग आला व त्याने अकबराचा मोठा अपमान केला , म्हणून अकबराला राग आला आणि पुढे अकबराने राजपुतांशी हातमिळवणी केली .
दुर्गादास राठोड आणि रामसिंग ( मिर्झा पुत्र ) ,
यांच्या सल्ल्यानुसारच , दि . ११ जानेवारी १६८१ रोजी , अकबराने स्वतःला बादशहा म्हणून घोषित केले व आपल्या नावाची नाणीही पाडली . झेब्बूनिसाही त्यास सामील होती .
औरंगजेबाने अकबराला पत्र पाठवून त्याचे मन
वळविण्याचा प्रयत्न केला ; परंतु त्याने राठोड आणि सिसोदिया यांच्या मदतीने आपल्या पित्याविरुद्ध युद्ध पुकारले , त्यांच्या युद्धाचा तळ अजमेर होता . औरंगजेबापेक्षा अकबर सैन्यशक्तीत प्रबळ होता . तरीही त्याच्यावर हल्ला करावयाची नामी संधी घालवून अकबर स्वस्थ बसला . पुढे , औरंगजेबाने त्याचे राजकारणातील प्रमुख अस्त्र बाहेर काढले , ” कपटनीती ” . या अस्त्राच्या मदतीने औरंगजेबाने रजपुतांना , अकबरपासून फोडले . रजपूत सोडून जाताच , अकबराने अजमेरच्या तळावरून पळ काढला व पुढे दक्षिणेत , मराठ्यांच्या रोखाने त्याची नजर पडली .
राजपुतांचे पाठबळ नाहीसे होताच , अकबर भांबावला व दुर्गादास राठोडच्या सांगण्यावरून तो , दक्षिणेकडे जाण्यास निघाला , स्वराज्यकडे यायला एकच मुख्य कारण ! अकबरास ठाऊक होते , या आलम जगात , आपले वालीद औरंगजेबास आव्हान देईल , असा एकच राजा आहे , ” छत्रपती संभाजी महाराज ” . दि . ११ मे १६८१ ला अकबराने शंभुराजांना पाहिले पत्र पाठविले , त्यात तो राजपुतांबद्दलच प्रकरण आणि साहाय्य मागतो .
पुढे दि . २० मे १६८१ ला , अकबराने राजांना दुसरे पत्र पाठविले , परंतु राजांनी दोन्ही पत्रांना काही उत्तर पाठविले नव्हते . राजांनी एकाही पत्रास प्रत्युत्तर केले नाही , म्हणून अकबर थांबला नाही , त्याने उत्तरेतून दक्षिणेकडे प्रवास चालू ठेवला . अकबर संभाजीच्या आश्रयास जातो , हे पाहून औरंगजेबाने अकबरास दोन पत्रे लिहली , परत येण्याबाबत ; परंतु त्याने औरंजेबाचा अवमान केला . पुढे औरंजेबाने , बहादूरखानास अकबराला अटक करण्याचे फर्मान पाठवले ; पण खानाला फर्मान मिळेपर्यंत अकबर दक्षिणेत पोहोचला .
■ अकबराचे स्वराज्यातील आगमन : –
शंभूराजांनी , अकबराचे स्वागत करण्यासाठी काही माणसे पाठविली व सुधागड ( पाली ) येथे अकबराच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली . अकबराजवल ५०० घोडेस्वार , २५० उंट , आणि थोडे पायदळ होते . संभाजीने त्याच्या सौरक्षणासाठी ३०० सैनिक ठेवले . दि . १५ जून १६८१ ला , राजांनी हिरोजीस १००० पागोडे , एक मोत्याचा रत्न आणि हिरेजडित मोठा कंठा , एक हिरेजडित तुरा , इराणी आणि हिंदू पद्धतीच्या काही वस्तू अकबराला नजराणा म्हणून दिल्या , तसेच पुरेशी धण्यासामग्रीही पाठविली . काही दिवसांनी , अकबरास त्याची थोडी बहुत फौज त्याजवळ आली . राजांनी २५ हजार होन अकबराला दिले . पुढे राजांनी अकबराला सैन्यबळ वाढवू नये , अशी आज्ञा दिली . योग्यवेळी राजांनी दक्षता घेतलेली आपण्यास दिसून येत . अकबराला राजांच्या भेटीची ओढ लागली होती , असा तो पत्रव्यवहारही करत होता , तरीही राजे त्याची भेट घेत नव्हते .
**[ भीमसेन सक्सेना म्हणतो , ” अकबराचे येणे म्हणजे , संभाजीला एक सुवर्ण संधी वाटली . ]
■ शंभुराजांविरुद्ध कट आणि अकबर : –
जुलै १६८१ च्या सुमारास , अण्णाजी दत्तो , सोमाजी दत्तो , हिरोजी फर्जंद आणि इतर मंडळी यांनी संभाजी राजांवर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता , त्यांनी अकबरालासुद्धा ह्या कटात गोवण्याचा प्रयत्न केला होता ; परंतु अकबर बधला नाही , उलट अकबराणेच , शंभुराजांस एक गुप्त दूत पाठवून या कटाची सर्व माहिती दिली , या सर्व प्रकरणावरून , शंभूराजांची अकबराविषयी खात्री झाली .
विषप्रयोगाचा कट फसल्यानंतरही , दुष्ट मंत्री थांबले नाहीत , सर्व मंत्र्यांनी मिळून अकबराला एक पत्र
लिहले , टीक्त असे नमूद होते की , ” तू संभाजीस दगाफटका कर , त्याबदल्यात आम्ही तूस स्वराज्याचा मोठा भाग देऊ आणि लहान भाग राजारामास ठेवू ” , हे पत्र जसेच्या जसे अकबराने , राजांना पाठविले . संभाजी महाराजांनी , पातशहापूर ( धोडसे ) येथे , दि . १३ नोव्हें . १६८१ रोजी , अण्णाजी दत्तो , सोमाजी दत्तो , हिरोजी फर्जंद , आणि बालाजी आवाजी यांना हत्तीच्या पायी दिले , तसेच प्रल्हाद निराजी यास कैद झाली ( पुढे छत्रपती राजारांमहाराजांच्या काळात यांची सुटका झाली ) , आणि राजांनी अकबराची भेट घेतली .
◆ औरंजेबाची दक्षिण स्वारी : –
दि . ८ सप्टेंबर १६८१ रोजी , औरंगजेब दक्षिणेकडे निघाला . औरंगजेबाने बरोबर आणलेला लवाजमा , खालीलप्रमाणे : –
● ८ लक्ष फौज .
● १४ कोटींचा खजिना .
● ७० हजार घोडे .
● ३५ हजार उंट .
● हत्तींचा मोठा बेढा.
● शाही तोफखाना .
● अनुभवी सरदारांची मोठी फळी .
पुढे , दि . १३ नोव्हेंबरला , औरंगजेब सर्व लवाजम्यासह , दक्षिणेत , बुऱ्हाणपूरला आला . इकडे शंभूराजांनी सुद्धा , मोगली आक्रमणास तोंड देण्याची जबर तयारी केली .
★ अकबराचा , राजांना सुरुवातीला जास्ती फायदा झाला नाही , पोर्तुगीजांच्या तहावेळी झाली होती , मदत झाली होती मदत .
शंभूराजांनी एक नामी योजना आखली , योजना
अशी होती , की अकबराला दिल्लीत पाठवायचं व राजपुतांच्या सहाय्याने त्याला शाही तख्तावर बसवायचं ,आणि बादशहा अकबरामार्फत , औरंगजेबाला अटक करण्याचं शाही फर्मान पाठवायच , अशाप्रकारे शाही मदतीनेच पुढे दिल्ली ताब्यात घ्यायची अशी प्रमाणबद्ध योजना राजांनी आखली . त्यासाठी राजांनी दोन प्रयत्न केले , परंतु ते दोन्ही प्रयत्न फसले .
१ . पहिला प्रयत्न असा होता की , कल्याण — गुजरात — राजपूताना — आग्रा या मार्गे अकबराला , शाही तख्तावर बसवायचं , परंतु अकबर गुजरात मध्ये असतानाच , औरंगजेबास या योजनेची भमक लागली आणि त्याने आझम ला ३५ हजाराची फौज घेऊन अकबराला मागे फिरावे लागले . व योजना फसली .; ( हा प्रयत्न १६८४ मध्येच झालेला ) .
२ . दुसरा प्रयत्न असा होता की , पूर्वेकडूनच अकबराला राजधानीत पाठवायचा आणि शाही तख्तावर बसवायच , ही योजना यशस्वी होणारच होती ; परंतु रामसिंग आग्ऱ्यात कमी पडला , अकबराला मागे फिरावे लागले . व योजना फसली .; ( हा प्रयत्न १६८५ मध्येच झालेला ) .
पुढे छत्रपती संभाजी महाराज , मुघल , पोर्तुगीज ,
इंग्रज , सिद्दी , डच यांविरुद्ध आघाडीवर होते , त्यामुळे राजांना अकबराकडे लक्ष देता आले नाही . नंतर सन १६८७ ला , राजापूरच्या बंदरातून , अकबर ( ५० माणसानं बरोबर ) , इराणकडे रवाना झाला , सन १७०४ ला अकबराचा इराणमध्येच मृत्यु झाला .
[ शहजादा अकबर याचा मोगली परचकास शह देण्यास
संभाजीने , पूरेपूर उपयोग करून घेतला .
— वा. सी. बेंद्रे (गुरुवर्य) ]

No comments:

Post a Comment

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...