विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 27 July 2019

युवराज्ञी येसूबाई भाग 7

युवराज्ञी येसूबाई :
post by: अभय शरद देवरे, सातारा

भाग 7
मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांवर जुलूम करणारा औरंगजेब महाराणी येसूबाईंशी कसा वागला असेल ? त्याच्या क्रूर वृत्तीशी त्यांनी कसा सामना केला असेल ? धर्मांतराच्या आणि अब्रूच्या भीतीच्या सावटात त्या एकोणतीस वर्षे कशा राहिल्या असतील ? आपला धर्म आणि अब्रू त्यांनी कशी सांभाळून ठेवली असेल ? या इतक्या वर्षात त्यांचे मानसिक संतुलन ढळले कसे नसेल ? महाराष्टातील सतरा वर्षांच्या कैदेत मुलगा जवळ तरी होता पण दिल्लीला गेल्यावर दोघांची बारा वर्षे जाणीवपूर्वक ताटातूट करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या मनाची अवस्था काय असेल ? या आणि अशा असंख्य प्रश्नांच्या विचारांनी मनात काहूर माजते. औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून नेल्यामुळे आणि गनिमीकाव्याने मोगलांना ज्या धनाजी संताजी यांनी सळो की पळो करून सोडले त्या धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे याना येसूबाईंची सुटका करणे का शक्य झाले नाही ? त्यांच्या सुटकेस एकोणतीस वर्षे का लागली याचा शोध इतिहासात शिरून घेतला पाहिजे.
कोणत्या मातीत जन्मलेली आणि तयार झालेली माणसे ही ? स्वराज्यासाठी तन मन धन देणे म्हणजे काय हे यांच्याकडून किती वेळा शिकायचे ? कितीही प्रयत्न केला तरी येसूबाईंइतके पराकोटीचे उच्च त्यागजीवन जगणे आपल्याला जमेल का ? राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणे हेच त्यांच्या जीवनाचे सार होते ते अंगी बाणवणे हे आपल्याला कितीसे जमेल हा प्रश्नच आहे. स्वराज्यासाठी त्यांनी केलेला आयुष्यभराचा त्याग ही त्यागाची परिसीमाच म्हणावी लागेल.
आज कैदेतून झालेल्या त्यांच्या सुटकेला ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास सर्वोतोमुखी करणे आणि त्यांच्या असीम त्यागाला वंदन करणे इतके तर आपण नक्कीच करू शकतो.
अभय शरद देवरे,
सातारा

युवराज्ञी येसूबाई भाग 6

युवराज्ञी येसूबाई :
post by: अभय शरद देवरे, सातारा


भाग 6
बाळाजी विश्वनाथ फौजा घेऊन सय्यद बंधूंच्या साहाय्यास नोव्हेंबर १७१८ मध्ये दिल्लीस गले . दिल्लीत सत्तांतरण झाले. फरुख सियरची इतिश्री होऊन महमूदशाह गादीवर आला. १७१९च्या मार्च महिन्यात सनदांवर नव्याने बादशाहचे शिक्कामोर्तब होऊन बाळाजी पेशवे येसुबाई, शाहूराजे व इतर मराठी सैनिक यांची सुटका करवून साताऱ्यास येऊन छत्रपतींस भेटले आणि मायलेकांनी एकोणतीस वर्षांनतर मोकळा श्वास घेतला.
अशा रीतीने मराठ्यांच्यातील कपट व आपापसातील बेबनाव यांच्यामुळे एकोणतीस वर्षे कैदेत असलेले हे मायलेक दिल्लीतील मुगल सरदारांच्यातील कपट आणि आपापसातील बेबनाव यांचा फायदा घेऊन सुटले आणि एक वर्तुळ पूर्ण झाले.
१६९० ते १७१९ अशी एकोणतीस वर्षे त्यांनी कैदेत कशी काढली असतील याची नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो. आजूबाजूला परधर्मीय पुरुष माणसे, संपूर्ण वातावरण परकीय, खाणे पिणे, रीतिरिवाज, पोशाख सारे, सारेच अनाकलनीय आणि अबोध असताना त्या प्राप्त परिस्थितीशी कशाकाय सामो-या गेल्या असतील ?

युवराज्ञी येसूबाई भाग 5

युवराज्ञी येसूबाई :
post by: अभय शरद देवरे, सातारा

भाग 5
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्या दोघांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची बारा वर्षे परमुलाखत वनवास सहन करावा लागला. प्रभू रामचंद्रना किंवा पांडवांना चौदा वर्षेच वनवास होता. त्या वनवासातही ते स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकत होते पण येसूबाईना आणि शाहूराजेंना एकोणतीस वर्षे पारतंत्र्याच्या वनवासात घालवावी लागली. खरोखरच त्या दोघांच्या स्वराज्यनिष्ठेला तोड नाही.
अखेर बाळाजी विश्वनाथ पेशवे म्हणजेच पहिले पेशवे यांनी त्यांची सुटका केली. मोगलांच्या कैदैतून छत्रपती शाहूंची सुटका व्हावी, यासाठी ते १७०५ पासून मध्यस्थी करीत होते. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी कर्जे काढून फौजा उभारल्या आणि छत्रपतींच्या सर्व शत्रूंचा पराभव केला. १६८१पासून मोगलांशी चाललेल्या लढ्यात धनाजी जाधव, संताजी घोरपडे, सरदार भोसले, सरदार दाभाडे, सरदार आंग्रे आदी सरदारांना त्यांनी एकत्र आणले व मोंगलांशी लढा दिला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात झगडे सुरू झाले होते. बादशाह फरूख सियर आणि त्याला गादीवर आणणारे सय्यद बंधू यांच्यात वितुष्ट आले. सय्यदांचा नाश करण्यासाठी बादशाहच्या खटपटी सुरू झाल्या. आत्मरक्षणार्थ सय्यदबंधूंना मित्र शोधावे लागले. आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी मराठ्यांशी मैत्री करणे त्यांना भाग होते. त्यामुळे दक्षिणेचा सुभेदार सय्यद हूसेन अली याने पेशव्याचे मार्फत मराठी राज्याशी नवा तह केला. त्यात शिवाजी महाराजांचे स्वराज्य बिनशर्तपणे शाहू महाराजांना देण्याचे ठरले. शिवाय दख्खनच्या सहा सुभ्यांचा चौथ आणि सरदेशमुखी हे हक्कही मान्य करण्यात आले. मोबदला म्हणून शाहू महाराजांनी पंधरा हजार फौजेनिशी दख्खनच्या सुभेदारास मदत करावी आणि चोरचिलटांचा बंदोबस्त करून मुलखाची आबादी राखावी, या अटी करारनाम्यात ठरल्या. या करारनाम्यावर बादशाहकडून शिक्का-मोर्तब व्हावयाचे होते.

युवराज्ञी येसूबाई भाग 4

युवराज्ञी येसूबाई :
post by: अभय शरद देवरे, सातारा

भाग 4
राजाराम महाराज रायगडावरून यशस्वीपणे निसटल्यावर येसूबाईंनी आठ महिने रायगड झुंजवला. खूप प्रयत्न करूनही गड ताब्यात येत नाही असे पाहून औरंगजेबाने कपटाने रायगडावरील भगवे निशाण उतरवले व येसूबाईना शाहू महाराजांसहीत अटक केली. येसूबाईंना शिवरायांची शिकवणच होती की प्रसंगी गड किल्ले शत्रूला द्यावेत पण स्वराज्य राखावे. दिलेले किल्ले लढून परत मिळवता येतात पण गेलेले स्वराज्य परत मिळवता येत नाही. शत्रूने बंदी बनवले तरी सुटता येते हा इतिहासही शिवरायांनी घडवून येसूबाईंसमोर आदर्शासारखा ठेवला होता. पण दुर्दैवाने येसूबाईना त्यांच्यासारख्या युक्तीने स्वतःची सुटका करून घेता आली नाही. त्यामुळे त्यांना आणि शाहूंराजाना आपली उमेदीची एकोणतीस वर्षे स्वराज्यासाठी कैदेत व्यतीत करावी लागली. एकोणतीस वर्षांपैकी सतरा वर्षे महाराष्ट्रात औरंगजेबाच्या छावणीत नजरकैदेत त्यांना रहावे लागले. जिथे छावणीचा तळ पडेल तिथे त्या दुर्दैवी मायलेकरांची फरपट होई. स्वराज्यात राहूनही त्यांना स्वातंत्र्य उपभोगणे नशिबात नव्हते.

युवराज्ञी येसूबाई भाग 3

युवराज्ञी येसूबाई :
post by: अभय शरद देवरे, सातारा

भाग 3
छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारल्यावर औरंगजेबाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. त्याने स्वराज्याचा घास घेण्यासाठी रायगडाला वेढा दिला. पण स्वराज्याचा धनी त्या वेढ्यात अडकून पडला असता तर सैन्याला एकत्र आणणार कोण हा प्रश्न होता. तसेच बाहेर मोकाट असलेल्या औरंगजेबाच्या सैन्याने चहूबाजुनी आक्रमण करून स्वराज्याचे लचके तोडले असते. आणि राजाच बंदीवान असल्याने राज्यकारभार हाकणे हे अवघड झाले असते. येसूबाईंची त्यावर उपाय काढला. त्यांनी राजाराम महाराजांना सुचवले की त्यांनी रायगडच्या वेढ्यातून बाहेर पडून जिंजीच्या किल्यात तळ ठोकावा व रायगड वेढ्यात अडकल्याने संपूर्ण राजधानीच जिंजीला हलवावी. असे केल्याने रायगडाचे महत्व कमी होऊन या वेढ्यातून औरंगजेबाला फारसे काही गवसणार नाही आणि स्वराज्याचा कारभार व्यवस्थित हाकता येईल. म्हणजे स्वराज्य राखण्यासाठी त्या स्वतःला तोफेच्या तोंडी द्यायला तयार होत्या. कल्पना बिनतोड होती पण आपल्या मातेसमान वहिनीला आणि छोट्या शाहूला वेढ्यात एकटे सोडून निघून जाणे हे राजाराम महाराजांना पटेना. पण येसूबाईंनी राजाने नात्यांपेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले पाहिजे तरच राज्य चालते हे त्यांना पटवून दिले. अखेर जड अंत:करणाने राजाराम महाराजांनी रायगड सोडला आणि येसूबाईंच्या सत्वपरिक्षेला सुरुवात झाली.

युवराज्ञी येसूबाई भाग 2

युवराज्ञी येसूबाई :
post by: अभय शरद देवरे, सातारा

भाग 2
आपल्या पतीच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेऊन त्यांनी स्वराज्याची विसकटलेली घडी सरळ करायला सुरुवात केली. त्यांचे मन किती मोठे होते याची चुणूक त्यांच्या पहिल्याच निर्णयात दिसते. नियमाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शाहू राज्यावर बसावयास हवा होता. महाराणी येसूबाई यांनी आग्रह केला असता तर छोट्या शाहूला राज्याभिषेकही झाला असता. पण तत्कालीन परिस्थिती पाहता त्यांच्या लक्षात आले की स्वराज्य टिकवायचे असेल तर मुलाच्या प्रेमापेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले पाहिजे. त्या काळात रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांना मानणा-या सरदारांची संख्या मोठी होती. त्यामुळे नियमाप्रमाणे शाहू महाराजांना जर राज्यावर बसवले तर काही सरदार बंड करतील, सैन्याचे दोन भाग पडतील आणि हे अंतर्गत बंड औरंगजेबाला स्वराज्याचा घास मिळवून देण्यास मदत करेल अशी त्यांना भीती वाटली. त्यामुळे त्यांनी पुत्रप्रेम बाजूला सारून आपले दीर राजाराम महाराज यांना गादीवर बसवले व स्वतः त्यांच्या वतीने काम करण्यास सुरुवात केली. आज लोकशाहीच्या नावाखाली आपल्याच मुला-नातवंडांना पुढे आणणारे नेते पाहिले की येसूबाईंची महानता लगेच लक्षात येते.
महाराणी येसूबाई यांचा त्याग इथेच संपत नाही. उलट तो त्याग इथे सुरू होतो. त्यांच्या असीम त्यागाचे दुसरे उदाहरण तर एकमेवाद्वितीय असेच म्हणावे लागेल.

युवराज्ञी येसूबाई : भाग १

युवराज्ञी येसूबाई :
post by: अभय शरद देवरे, सातारा

भाग १
एकोणतीस वर्षे ! एकोणतीस वर्षे ज्या माऊलीने स्वतःला मोगलांच्या कैदेत ठेऊन शिवछत्रपतींचे स्वराज्य अबाधित ठेवले त्या युवराज्ञी येसूबाईबद्दल इतिहासाला अधिक माहिती नाही हे दुर्दैव कोणाचे ? आपले की इतिहासाचे ? केवळ नऊ वर्षांचा संसार....तोही छत्रपती संभाजी महारांजांसारख्या सिंहाच्या छाव्याबरोबर केलेला, पती जिवंत असतानासुद्धा या पतिव्रतेला काही दिवस विधवेचे सोंग आणावे लागले ! होय, आग्र्याहून सुटल्यावर शिवछत्रपतींनी छोट्या संभाजीला दडवून ठेऊन अफवा पसरवली की युवराजांचा काळ आला ! त्यामुळे संभाजीराजे सुखरूप स्वराज्यात येईपर्यंत त्यांना विधवा म्हणून जगावे लागले ! मनाची केवढी प्रगल्भता ! त्यानंतर कपटाने आणि फितुरांच्या मदतीने औरंगजेबाने पतीला पकडल्यानंतरही धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरे जाणारी, पतीला हाल हाल करून ठार मारल्यावरही स्वराज्याचा गाडा चालविण्यासाठी स्वतःचे आभाळाएव्हढे व्यक्तिगत दुःख बाजूला सारून शिवछत्रपतींनी उभारलेले स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतःला आणि पोटच्या गोळ्याला शत्रूकडे तब्बल तीस वर्षे ओलीस ठेऊन घेणारी ही हिमालयाइतकी उंच स्त्री पहिली की राष्ट्रसेवा म्हणजे काय हे आपोआप लक्षात येते.
छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी दस्तुरखुद्द औरंगजेब महाराष्ट्रात आला होता. शिवाजी महाराज जिवंत नसल्यामुळे आता आपल्याला सहजपणे स्वराज्य ताब्यात घेता येईल हा त्याचा मनसुबा होता. पण संभाजी महाराजांनी तो मनसुबा आपल्या पराक्रमाने उधळला. अखेर कपटाने आणि घरभेद्यांची मदत घेऊन त्याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले आणि अखेर ११ मार्च १६८९ रोजी त्यांनी महाराजांना अत्यंत क्रूरपणे ठार मारले. महाराणी येसूबाई यांच्या कर्तृत्वाला आणि त्यागाला इथेच सुरुवात झाली.

Friday 26 July 2019

राजाभिषेक का ? कशासाठी ?

राजाभिषेक का ? कशासाठी ?
शिवाजी महाराजांनी आपल्या छोट्या जहागिरीचे राज्यात रूपांतर केले.
बलाढ्य फौज जमविली, आरमार बांधले, राज्यकारभार यंत्रणा उभारली, हिरे, माणके, सोने यांची अगणित संपत्ती जमा केली, तरी कायदेशीर दृष्ट्या ते सामान्य जहागीरदार होते,
ज्यांच्यावर ती राज्य करीत होते त्यांची राजनिष्ठा ते मिळू शकत नव्हते.
महाराजांच्या देणग्यांना, त्यांच्या वतनपत्रांना किंवा त्यांनी केलेल्या करार-मदारांना कायदेशीरपणा प्राप्त होऊ शकत नव्हता.
एक राजांची राजवट गेली आणि दुसऱ्या राजांची राजवट आली तरी नवा राजा पूर्वीच्या राजवटीतील इनामपत्रे करारनामे प्रमाण मानतो.
महाराजा संबंधी ते अभिषिक्त राजे नसल्याने ही अडचण होती.
एवढेच नव्हे तर हिंदू राजनीती शास्त्राच्या दृष्टीने जोपर्यंत ते राजपद स्वीकारत नव्हते तोपर्यंत त्यांनी जिंकलेल्या प्रदेशावर राज्य करण्याचा ही नैतिक व शास्त्रीय हक्क त्यांना प्राप्त होत नव्हता.
तसेच कर वसूल करणे, नवे कर जारी करणे, न्यायदान करणे, शिक्षा करणे इत्यादी राज्यकारभाराच्या बाबींनाही महाराजांनी राजपद निर्माण न केल्याने कायदेशीरपणा नव्हता.
चातुर्वर्ण्य पद्धतीत फक्त राजेच ब्राह्मण गुन्हेगारांना शिक्षा करू करत असे.
परंतु आतापर्यंत राज्याभिषेक न झाल्याने ब्राह्मण गुन्हेगारांची प्रकरणे न्यायदानासाठी ब्रह्म सभेकडे अथवा आपल्या पंडितराव या मंत्र्यांकडे महाराजांना सोपवावी लागत. अशा अनेक अडचणी दूर करण्यासाठी महाराजांच्या राज्याभिषेकाचे आवश्यकता भासत होती...!

दुरदृष्टी असलेला रयतेचा राजा " राजर्षी शाहू पुत्र छत्रपती तिसरे राजाराम महाराज " बाल विवाह प्रतिबंधक कायदा -


दुरदृष्टी असलेला रयतेचा राजा " राजर्षी शाहू पुत्र छत्रपती तिसरे राजाराम महाराज "
बाल विवाह प्रतिबंधक कायदा -
भारतीय संस्कृती मध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत. त्या प्रमाणे काही अनिष्ठ रूढीही आहेत . त्या पैकी एक म्हणजे बालविवाहाची प्रथा होय. अगदी लहान वयात मुला मुलींची लग्ने होत होती. राजाराम महाराजांनी कोल्हापूर संस्थानात पासुन बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला. हा कायदा कोल्हापूर संस्थानातील सर्व धर्माच्या व जातींच्या लोकांना लागू करण्यात आला. या कायद्यानुसार मुलींचे विवाहाचे पूर्ण वय 12 वर्षे व मुलाचे पूर्ण वय 16 वर्षे करण्यात आले.
बालविवाह कायद्याच्या अंमलबजावणी करिता जे नियम केले, त्या मध्ये अधिक मजकूर घालून 6 जुलै 1926 रोजी कोल्हापूर गॅझेट मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. त्या मध्ये बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या विरुध्द लग्न करेल त्यास रूपये 25 दंड म्हणून वसूल करण्याचा अधिकार मॅजिस्ट्रेट यांना देण्यात आला.
राजाराम महाराजांनी कोल्हापूर संस्थानात बालविवाह प्रतिबंधक कायदा लागू केला ती तारीख होती -
11 जुन 1926.

पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक -


पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक -
छत्रपती शाहू महाराज व श्री माधवराव शिंदे महाराज, ग्वालियर व इतर सर्व मराठा संस्थानिक यांनी पुण्यामध्ये छत्रपती शिवराय यांचे भव्य स्मारक करण्याचे ठरविले व छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा शनिवार वाड्या समोर उभारावा म्हणून योजना आखली. त्या साठी छत्रपती शाहू महाराज व माधवराव शिंदे महाराज यांनी सढळ हाताने पैसा खर्च करुन व अनेक अडचणींना तोंड देऊन सन 1921 मध्ये प्रिंन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते शिवस्मारकाचा पाया बसविण्याचा समारंभ झाला. पण छत्रपती शाहू महाराज व माधवराव शिंदे महाराज यांचे आकस्मात निधन झाल्यामुळे स्मारकाचे कार्य पुर्ण होण्यात अनेक अडाचणी आल्या. शिवस्मारक कमिटीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी छत्रपती राजाराम महाराजांवर आली. राजाराम महाराजांच्या अध्यक्षतेखाली शिवरायांचा अश्वारूढ पुतळा तयार करण्यासाठी शिल्पकार म्हात्रे यांना पैसेही दिले पण म्हात्रे यांनी पुतळा लवकर तयार करुन दिला नाही म्हणून श्री करमरकर शिल्पकार यांच्या कडे पुतळा तयार करण्याचे काम दिले.
त्यांनी अल्पावधीत शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तयार केला. हा अनावरण समारंभ अत्यंत दिमाखदार पद्धतीने झाला. या समारंभासाठी कोल्हापूर, मुंबईहुन खास रेल्वे सोडल्या होत्या. भारतातील सर्व मराठा संस्थानिक या समारंभासाठी मोठ्या प्रमाणात हजर राहिले. स्मारक समारंभासाठी सुमारे दहा हजार लोक मावतील इतका भव्य व सुंदर मंडप उभारला होता. स्मारकाच्या जागेभोवती शनिवार वाड्या पर्यंत दुतर्फा लष्करी मराठा व युरोपियन पलटणी व घोडेस्वार उभे करण्यात आले होते. सुमारे पंधरा हजार लोक मंडपात येऊन दाखल झाले. व्यासपिठावर क्षात्रजगदगुरू, सावंतवाडी, मिरज, सांगली, फलटण, खैरपुर, रामदुर्ग, औंध, भोरचे संस्थानिक उपस्थित होते.
शिवरायांचे वंशज म्हणून राजाराम महाराज यांनी या स्मारकाच्या उदघाटन प्रसंगी भाषण करुन स्मारक प्रित्यर्थ ज्यांनी ज्यांनी देणग्या दिल्या, त्या सर्वांचे आभार मानले व स्वतः राजाराम महाराजांनी शिल्पकार करमरकर यांना मुंबईत एक स्टुडिओ काढुन दिला.
हा अनावरण समारंभ अत्यंत दिमाखदार पद्धतीने झाला ती तारीख होती -
16 जुन 1928

व्यापार नेहमी प्रगतीच्या वाटेवर रहायला पाहिजे - राजर्षी शाहू महाराज


व्यापार नेहमी प्रगतीच्या वाटेवर रहायला पाहिजे - राजर्षी शाहू महाराज
आर्थिक सुबत्तेसाठी व्यापारउदीम वाढला पाहिजे आणि त्यासाठीच खास प्रयत्न केले पाहिजेत , अशी शाहू महाराजांनी भूमिका होती. राजर्षी शाहू महाराजांच्या काळात कोल्हापूर संस्थानात उद्योगधंद्यातून किंवा कारखान्यांमधून तयार होत असलेल्या मालाच्या व्यापाराचा प्रश्न महत्वाचा नव्हता कारण त्या प्रकारच्या मालाचे उत्पादन अतिमर्यादित होते. परंतु शेती उत्पन्न वस्तूंच्या व्यापाराचा प्रश्न निश्चितच होता.
कोल्हापूरच्या व्यापारपेठेचे जनकत्वसुद्धा राजर्षी शाहू महाराजांकडेच होते.त्यांच्या काळात तुलनात्मकदृष्ट्या निपाणी येथे व्यापार जास्त चालत असणार.राजर्षी शाहू महाराजांनी निपणीच्या व्यापाऱ्यांना कागल येथे बोलवून घेतले आणि त्यांच्याशी कोल्हापूर शहरात व्यापारपेठ बसविण्यासंबंधी विचारविनिमय केला.ह्या व्यापारात त्या लोकांना राजर्षी शाहूंनी अनेक सवलती देऊ केल्यात. ह्यावर सन १८९५ साली शाहूपुरी व्यापारपेठ स्थापन झाली आणि ह्या पेठेत व्यापारपेढ्या काढणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठमोठ्या आकाराचे प्लॉटस् मोफत देण्यात आले.
आता ही व्यापारपेठ जुन्या कोल्हापूर शहरापासून दूरवर ओढ्याच्या पूर्वेस आणि रेल्वे स्टेशनच्या जवळ वसली गेली.हा व्यापारा बद्दल दृष्तुकोन खरच महत्वाचा , शहर विस्ताराच्या क्रमात आज ही पेठही शहराच्या मध्यवस्तीत आली आणि रेल्वे स्टेशनही गावात ,भर वस्तीत आले.शहरापासून राजर्षी शाहू महाराजांनी व्यापारपेठ दूर वसवली होती म्हणून पोस्ट खात्यास विनंती करून तिथे पोस्टाची व तारा करण्याची सोय करण्यास सांगितले.
कोल्हापूर फक्त शहरापुरते न पाहता आर्थिक विकेंद्रीकरण करण्याचा दृष्टिकोन ठेवून राजर्षी शाहूंनी जयसिंगपूर व गडहिंग्लज मधे पण व्यापारास उत्तेजन दिले.म्हणून त्या भागात गूळ , मिरची, भुईमूग यांची व्यापारपेठ तयार झाली.कोल्हापुरात शेती उत्पन्नाचा मुख्य माल म्हणजे गूळ आणि आज देशभर कोल्हापुरातील गूळ प्रसिद्द झालाय. राजर्षी शाहूंच्या काळापूर्वी तसा कोल्हापुरी गूळ प्रसिद्द न्हवता. या भागातील गुळाची व्यापारपेठ म्हणजे कोकणातली राजापूरची व्यापारपेठ प्रसिद्द होती. राजर्षी शाहूंनी तसाच कोल्हापुरी गूळ पण प्रसिद्द केला आणि या सर्व प्रयत्नांचे सुपरिणाम दिसणे भागच होते. कारण संस्थानाबाहेर होणाऱ्या शेती मालाच्या निर्यातीच्या आकड्यात हे परिणाम दिसतात.सन १८९४-९५ साली ही निर्यात जेमतेम ६,००,००० रुपये झाली , आणि तीच १९२१ साली ३०,००,००० रुपये झाली म्हणजेच ५ पट वाढ. ह्या बाबतीत व्यापारवृद्दीसाठी असे प्रयत्न केलेले संस्थानिक इतर कुणी फारसे दिसत नाहीत.
लोकराजे छत्रपति राजर्षी शाहू महाराज

होदिगेरेचा अज्ञातवास : महाराज साहेब शहाजीराजे यांचे समाधीस्थळ






होदिगेरेचा अज्ञातवास : महाराज साहेब शहाजीराजे यांचे समाधीस्थळ
आवर्जून वाचावा असा अभ्यासपूर्ण लेख...
महाराज साहेब शहाजीराजे यांच्या शिमोगा जिल्ह्यात हालचाली चालू होत्या. बिदनूरच्या बंडखोर नायकास शासन करून त्यांनी आसपासच्या पाळेगारांचा बंदोबस्त केला. चन्नगिरी पासून चार मैलावर होदिगेरे या ठिकाणी त्यांचा तळ पडला होता. आज हा भाग जरी ओसाड दिसत असला तरी त्यावेळी तो घनदाट जंगलाने व्यापलेला होता . काही स्थानिक शेतकरी जंगलातील रानडुकरे त्रास देतात व शेतीचीही नासधूस करतात अशी तक्रार घेऊन महाराज साहेबां जवळ आले. महाराज साहेबांनी शिकारीची योजना आखली. शिकारी दरम्यान सावजाचा पाठलाग करताना महाराजांच्या घोड्याचा पाय विवरात अडकला आणि महाराज साहेब घोड्यावरून फेकले गेले . घोड्यावरुन पडल्यावर महाराज साहेबांना मूर्च्छा आली परंतु त्यांचा पाय रिकीबीत अडकल्यामुळे काही अंतर ते फरफटत गेले व तिथेच त्यांचा मृत्यू झाला. ती तारीख होती २५ जानेवारी १६६३.
ज्या ठिकाणी महाराज साहेबांच्या घोड्याचा पाय अडकला ती जागा आज लायदा होळा या नावाने ओळखली जाते आणि ज्या ठिकाणी घोडा थांबला आणि महाराज साहेब गतप्राण झाले त्या ठिकाणी आज त्यांची समाधी आहे.
व्यंकोजीराजांनी येथे समाधी बांधून घेतली.
या गावापासून जवळच पाच किलोमीटरवर एरगट्टीहल्ली नावाचे गाव आहे, महाराज साहेबांच्या समाधीची व्यवस्था म्हणून हा गाव इनाम म्हणून देण्यात आला होता.
समाधीपासून साधारण दीडशे मीटर वर राचीराम नावाची विहीर आहे. ही विहीर व्यंकोजी राजे यांनी महाराज साहेबांच्या समाधीची पूजा करताना पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून राचीराम नावाच्या व्यक्तीस बांधण्यास सांगितली. आज ती राचीराम या नावाने ओळखली जाते. आज ही विहीर फक्त नावापुरती उरली आहे.
महाराज साहेबांच्या मृत्यूची बातमी शिवाजी महाराजांना सुरतेच्या मोहिमेवरून परत आल्यावर कळाली. दक्षिण दिग्विजय मोहिमे वरून परत येताना शिवाजी महाराजांनी या समाधीवर छत्री बांधली .
छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी महाराज साहेब शहाजीराजे यांच्या समाधीच्या दिवाबत्तीची सोय व्हावी यासाठी दिलेले पत्र उपलब्ध आहे. थोरल्या शाहूंनी नंतर शहाजीराजे शिवाजी राजे आणि संभाजी महाराज यांची एकत्र समाधी शिखर शिंगणापूर येथे बांधून घेतली. म्हणजेच काय तर महाराज साहेब शहाजीराजांनी जो स्वराज्य रुपी वृक्ष लावला त्या वृक्षाची कोणतीही शाखा आपल्या मूळ पुरुषाला विसरलेली नाही. ही कृतज्ञता खानदानी राजघराण्याला शोभणारीच आहे . आज आम्ही या डौलदार वृक्षाची फळे चाखणारे मात्र त्या मूळ पुरुषाच्या कर्तुत्वाशी आणि त्यांच्या उपकाराशी किती कृतज्ञ आहोत ?
समाधीचा शोध:-
इ.स. १९१० ते १९१२ च्या दरम्यान समाधीचा शोध लागला. बसवपट्टण हे गाव होदिगेरे येथून 42 किलोमीटर अंतरावर आहे . ग्रँड डफ व डॉक्टर बाळकृष्ण यांच्या मते शहाजी महाराजांची समाधी बसवापट्टण येथे आहे परंतु प्रत्यक्षात ही समाधी होदिगेरे येथे असल्याचे म्हैसूर सरकारच्या पुरातत्व खात्याने संशोधन करून १९४० मध्ये सिद्ध केले.
तसेच पटवर्धन यांनीही जुनी कागदपत्रे पाहून हीच शहाजी महाराजांची समाधी आहे असे भारत इतिहास संशोधन मंडळाच्या १९१५-१९१६ च्या अहवालात मांडले होते .
खरी समाधी होदेगिरी येथेच असावी या कल्पनेस काझी बारामुद्दीन यांना सापडलेल्या शिलालेखावरून चालना मिळाली. हा शिलालेख कानडी भाषेत आहे त्यातील पहिली ओळ "श्री शहाजी " अशी असून दुसरी ओळ " राजंन्ना स... " अशी आहे. त्यानंतरची ' माधी 'ही अक्षरे नष्ट झाली आहेत परंतु ती अक्षरे समाधी अशीच असली पाहिजेत. काझी बारामुद्दीन यांना सापडलेला शिलालेख हा समाधी वरून काढून शेतातील पाणी अडविण्यासाठी लावण्याचा उद्योग कोण्या एका स्थानिकाकडून करण्यात आला होता.
समाधीची निश्चिती करण्यात चन्नगिरी येथील मराठा पुढारी एम एस पापण्णा(सुर्यवंशी) यांनी पुढाकार घेतला होता .
धारवाडचे एक थोर समाजसेवक श्री भिसे-कदम यांनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न केले. भिसे हे थोर स्वातंत्र्यसैनिक होते. १९२०,२१ व ३० या काळात इतिहास प्रसिद्ध जी असहकार चळवळ झाली त्यात त्यांनी भाग घेतला होता. १९३१ मध्ये राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना शिक्षा झाली होती .
२३ जानेवारी १९३९ मध्ये त्यांनी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त होदिगेरे येथे जाऊन श्रद्धांजली वाहिली व नंतर त्यांनी समाधीचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून महाराष्ट्रभर दौरा काढला . अनेक सभा घेतल्या नामवंत व प्रतिष्ठित व्यक्तींना या कार्याकडे लक्ष घालण्याची विनंती केली, म्हैसूर व महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, परंतु समाधीची जबाबदारी घेण्यास कोणीही पुढे आले नाही.
स्थानिक रहिवाशांना १७७३ पर्यंत या समाधीची माहिती होती , पुढे मात्र लोकांना तिचा विसर पडला , त्यानंतर दीडशे वर्षांनी या समाधीचा शोध लागला. १९४० मध्ये तिची डागडुजी करण्यात आली समाधीवर एकूण तीन फूट उंचीचे चबुतरे दावणगिरी, चन्नगिरी व शिमोगा येथील मराठा मंडळींनी बांधून घेतले. तसेच मूळच्या सपाट व जमिनीलगत असणाऱ्या चबुतऱ्याला सिमेंट ने प्लास्टर केले. परंतु नंतर समाधी बद्दलचा त्यांचा त्यांचा उत्साह मावळला. होदिगेरे येथील गावकऱ्यांनी देखील समाधीकडे लक्ष दिले नाही, उलट साफसूफ करून ठेवलेल्या या पवित्र जागेत डुकरे, शेळ्या-मेंढ्या, जनावरे व वेळप्रसंगी गावकरी यांना घाण करण्यासाठी हक्काची जागा मिळाली.
१९५६ साली त्यावेळचे केंद्रीय शेती मंत्री पंजाबराव देशमुख हे होदिगेरे येथे समाधी पाहण्याकरता आले असता त्यांनी समाधी आणि जवळपासचे भयानक चित्र पाहिले व तिथल्या तिथेच १००० रुपयांचा चेक समाधीच्या आजूबाजूची झाडी साफ करण्यासाठी दिला. दिल्लीला परत गेल्याबरोबर त्यांनी समाधीसाठी १८००० रुपयांचा निधी मंजूर करून दिला.
केंद्रीय पुरातत्व खात्याने समाधीसाठी २६ गुंठे जमीन तिमाप्पा सावकाराकडून विकत घेऊन , समाधी भोवती ६०X६०X६ अशी भिंत बांधून घेतली व पुरातत्व खात्याच्या नावाचा बोर्ड तेथे उभा केला. मिळालेल्या निधीतून रंगनाथ देवालयाची दुरुस्ती तसेच सत्तेबेन्नूरच्या कारंज्याची दुरुस्ती करण्यात आली.
त्यानंतर महाराष्ट्रातील एक-दोन मान्यवरांनी समाधीला भेट दिली परंतु भेट देण्यापलीकडे कोणीही काही भरीव कामगिरी केली नाही.
समाधी व इतर वास्तूंची आजची परिस्थिती:-
गावच्या मध्यावर चौकात Shahaji Tomb अशी पाटी लावलेली आहे . पाटी इतकी गंजलेली आहे आहे की त्यावरील अक्षरे ही स्पष्ट दिसत नाहीत . जिथे ही पाटी आहे त्याच्या विरुद्ध दिशेला गावाच्या वेशीवर एका मोठ्या वटवृक्षा जवळ महाराज साहेबांची समाधी आहे. समाधी भोवती चौकोनी कंपाऊंड व लोखंडी जाळी बसवलेली आहे. कंपाऊंडच्या भोवती झाडे लावण्यात आलेले आहेत परंतु ही झाडे म्हणजे फक्त औपचारिकता वाटते. समाधीचा केअरटेकर सकाळी दहाच्या अगोदर कधी तिथे पोहचत नाही . गावकऱ्यांचे समाधीकडे किती लक्ष आहे हे जाणून घेण्यासाठी मी मुद्दामून कंपाऊंड पार करुन आत शिरलो तब्बल वीस मिनिटे मी आत होतो , परंतु हा माणूस कंपाऊंडच्या आत शिरून काय करतोय एवढे विचारण्याची किंवा तिकडे लक्ष देण्याची ही कोणास गरज वाटली नाही.
गावामध्ये एक अंबा भवानीचे मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार महाराज साहेबांनी केला होता. पूर्वी हे मंदिर अगदी साधं होतं मधल्या काळात भोसले नामक एका व्यक्तीने त्याचा जीर्णोद्धार केला.
समाधीच्या समोरच शहाजी महाराज यांनी बांधून दिलेला तलाव आहे. हा तलाव सध्या पूर्ण चिखलाने माखलेला आहे व सर्वत्र झाडी वाढली आहे.
मलप्पा शेट्टी नावाचा एक सावकार या गावात राहत होता. त्याच्या वाड्यात महाराज साहेबांचा मुक्काम असे . त्या वाड्यात आज शेट्टी यांचे वंशज राहतात. काही वर्षापर्यंत शहाजी महाराजांची रत्नजडित तलवार, त्यांची वस्त्रे व काही मौल्यवान वस्तू शेट्टी यांच्या वंशजांकडे होत्या , परंतु आज त्यांचे वंशज त्या गोष्टींसाठी नकार दर्शवतात. हा वाडा आज जीर्ण झालेला आहे ,परंतु ऐतिहासिक खुणा बाळगून आहे. रंगनाथ देवस्थानाच्या पाठीमागे अगदी थोड्या अंतरावर हा वाडा आहे.
बेळगाव येथे राहणारे श्री श्रीहरी तेलकर ( आमचे जीवलग स्नेही श्री Arvind Telkar यांचे काका) यांनी लिहिलेल्या " हिंदवी स्वराज्याचे जनक श्री शहाजी राजे भोसले " या पुस्तकात समिधीविषयी सविस्तार माहिती आली आहे . त्यांनी समाधीला स्वतः भेट देऊन काही महत्त्वपूर्ण नोंदी करून ठेवल्या आहेत. खरंतर या पुस्तकामुळे होदीगेरे येथे जाण्याचा माझा विचार आणखी बळावला. श्रीहरी तेलकर यांचा मी सदैव ऋणी राहीन. त्यांनी समाधीला भेट दिल्यानंतर त्यांना काही गोष्टी जाणवल्या ज्या आजही होणे गरजेचे आहे, त्या पुढील प्रमाणे
१ समाधीची डागडुजी करून नवे चबुतरे व छत्री बांधावी.
२ समाधी भोवतीची सुमारे सहा एकर जमीन विकत घेऊन त्याठिकाणी सुंदर बगीचा तयार करावा.
३ बगिच्याच्या परिसरात एक म्युझियम तयार करून शहाजी महाराजांच्या काळची हत्यारे पोशाख व इतर दुर्मिळ वस्तू ठेवाव्यात.
४ महाराज साहेबांचा भव्य पुतळा येथे उभारावा.
५ महाराज साहेब होदिगेरे येथे ज्या वाड्यात मुक्काम करीत असत तो सरकारने ताब्यात घेऊन महाराज साहेबांच्या वास्तव्याची एक खूण म्हणून तो राखून ठेवावा.
६ राचीराम विहीर ही व्यंकोजीराजांनी तयार करून घेतलेली विहीर पुन्हा बांधण्यात यावी.
७ शहाजीराजांनी बांधून दिलेला दिलेला तलाव त्यातील गाळ व माजलेली झाडे झुडपे कापून स्वच्छ करण्यात यावी जेणेकरून स्थानिक शेतकऱ्यांना तो वापरता येईल
८ समाधीच्या देखरेखी करता कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी.
९ होदिगेरे गावाचे नाव बदलून ते शहाजीनगर असे असे ठेवावे.
१० यात्रेकरू व प्रवासी केंद्र म्हणून या ठिकाणी विश्रांती स्थान व उपहारगृहाची व्यवस्था करावी.
शहाजी महाराजांची स्फूर्तीदायक आठवण तरुण पिढीच्या मनात सतत जागृत ठेवण्याकरता तसेच क्षात्र वृत्तीची जोपासना करण्यासाठी वरील जीर्णोद्धाराची योजना अंमलात आणली गेली तर एक बहुमोल अशी राष्ट्रीय कामगिरी केल्यासारखे होईल.
चित्र सूची
१ शहाजी महाराजांची समाधी दर्शवणारी गंजलेली पाटी.
२ महाराज साहेबांची समाधी समाधी
३महाराज साहेबांनी बांधून दिलेला तलाव
४ महाराज साहेबांचं वास्तव्य असलेला वाडा
५ व्यंकोजीराजांनी बांधून दिलेली राचीराम विहीर
६ महाराज साहेबांच्या घोड्याचा पाय अडकलेली जागा लायदा होळा
७ महाराज साहेबांच्या समाधीसाठी दिलेलं गाव एरगट्टीहल्ली येथील प्रवेशद्वाराजवळच मंदिर
८ अंबा भवानी चे मंदिर
९ रंगनाथ देवालय
पोस्ट साभार : अमर श्रीरंग साळुंखे

मराठ्यांनी बहादुरखानाच्या पेड़गाव येथील छावणीवर हल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतास राज्याभिषेक करवून घेतला त्यासमयी मोगलांचे दोन सरदार दिलेरखान आणि बहादुरखान हे मोगल साम्राज्याचे संरक्षण करत होते. यावेळी काही कारणास्तव औरंगजेब याने दिलेरखान यास उत्तरेकडे बोलावून घेतले होते त्यामुळे एकट्या बहादुरखानावर दक्षिणेतील जबाबदारी पडली. बहादुरखान हा पेड़गाव येथे छावणी टाकून स्वस्थपणे चैन करत होता आणि महाराजांना ही संधी मिळाली व राज्याभिषेकानंतर काही दिवसातच मराठ्यांनी पेड़गावी बहादुरखानाच्या छावणीवर हल्ला केला. पहिल्यांदा २ हजार मराठा घोड़दळाच्या पहिल्या तुकडीने खानाच्या छावणीवर हल्ला केला आणि खानाच्या सैन्यास आपल्या मागे ५० मैल दूर नेले व त्याचवेळी मराठ्यांच्या दुसऱ्या ५-७ हजार सैन्याच्या तुकडीने त्याच्या छावणीवर हल्ला केला. मराठ्यांनी या मोहिमेत जवळपास १ कोटी रूपये आणि २०० घोड़े स्वराज्यात सामील केले आणि छावणी जाळून टाकली ..


मराठ्यांनी बहादुरखानाच्या पेड़गाव येथील छावणीवर हल्ला केलेली इतिहासात नोंद असलेली तारीख आहे १५ जुलै १६७४
#दिनविशेष

श्रीशैलम, कर्नूल,आंध्र प्रदेश. शिवाजी गोपूर

श्रीशैलम, कर्नूल,आंध्र प्रदेश.
मल्लिकार्जुन मंदिर(बार ज्योतिर्लिंग)

छत्रपती शिवाजी स्मृती मंदिर





शिवाजी गोपूर
श्रीशैलम हे कर्नूल जिल्ह्याच्या एका टोकाला आहे. कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील पहाडी वर बारा ज्योतिर्लिंगातिल हे मंदिर आहे.छ. शिवाजी महाराजांनी दक्षिण स्वारीच्या वेळी या मंदिराला भेट दिली होती.या मंदिराचे एक गोपुर (प्रवेशद्वार) महाराजांनी बांधले आहे. हे गोपुर शिवाजी गोपुर म्हणून ओळखले जाते. या मंदिराच्या रक्षणासाठी महाराजांनी ३०० सैनिकांची तुकडी ठेवली होती. पुढे ती तुकडी मंदिराच्या रक्षणासाठी झालेल्या युद्धात मारली गेली. महाराजांच्या या महत्वपूर्ण कार्याची दखल घेवुन आंध्रवासीय मराठी बांधवांनी हे छत्रपती शिवाजी स्मृतीमंदिर उभारलेले आहे.मंदिरात महाराजांचा सिंहासनावर बसलेला पुतळा व चार अश्व पुढील पाय उंचावलेल्या अवस्थेत उभे आहेत.
हैद्राबाद पासून अंदाजे २३२कि.मी अंतर आहे.जाताना जंगल लागते. नंतर कृष्णा नदीवर एक मोठे धरण पास केल्या नंतर ठिकाण लागते.
#मंदिरवीरगळ
Shivaji Nimbalkar यांच्या फेसबुक वाॅलवरुन साभार...

मुस्तफाखान याने शहाजी राजांना किल्ले जिंजी जवळ कैद केले ती तारीख होती 25 जुलै 1648.

शहाजीराजे यांची छावणी चोहोबाजूंनी अकस्मात वेढली गेली. दिलावरखान, मसूदखान, सर्जायाकुतखान, अंबरखाना, फरहादखान, खैरातखान, बाळाजी हैबतराव, याकूतखान, आजम खान, बहलोलखान, मलिक रेहान, राघव मंबाजी, वेदजी भास्कर, सिद्धोजी पवार, मंबाजी पवार, मंबाजी भोसले मालोजी पवार, तुळोजी भोसले, बाजी घोरपडे खंडोजी अंबाजी व मानजी तीन घोरपडे बंधू व यशवंतराव वाडवे एवढ्या #सरदार लोकांनी मुस्तफाखान यांच्या आज्ञेवरून शहाजीराजांच्या छावणीला ससैन्य घेरले. खासा मुस्तफाखान सेनेचे पीछाडीचे सर्व बाजूनी संरक्षण करीत होता. आकस्मात वेढली गेली शहाजी राजांची छावणी पूर्णपणे बेसावध होती. हत्तीवर हौदे चढवलेली नव्हते. घोड्यांवर खोगीर घातली नव्हती. सैनिकांची पथके सावध नव्हती. त्यांची नायक अजून झोपेतच उठायचे होते. रात्रीच्या जागरणामुळे पहारेकऱ्यांच्या डोळ्यावर झोपेची झापड होते. अशा अवस्थेतच चारही बाजूंनी वेढले गेल्याचे कळताच शहाजीराजांची सेना गोंधळ व कोलाहलात बुडून गेली. तेवढ्यातही या आवाजाने जागे होतच शहाजीराजांना सर्व कल्पना क्षणात लक्षात आली. त्यांनी सैन्याला सज्ज होण्याचा जोराने हुकूम सोडला. हुकमानुसार सैन्य सज्ज होऊ लागले. एवढ्यात बाजी घोरपडे घोड्यावर स्वार होऊन शहाजीराजांनी छावणीच्या रोखाने दौडत आला. त्याच्या सोबत खंडोजी अंबाजी व मालोजी घोरपडे, यशवंतराव वाडवे, मालोजी पवार, तुळोजी भोसले हेही घोड्यावर स्वार होऊन आले. त्यांचे सैनिक त्यांच्या भोवताली होतेच. शहाजी राजांची छावणी काहीशी सावरली जात असतानाच हे सारे आदिलशाही #सरदार दौडत येतानखचे चित्रं पाहून शहाजीराजांचा स्वामीनिष्ठ सेवक खंडोजी पाटील हा एकटाच त्यांच्यावर तुटून पडला. त्याने बाजी घोरपडे याच्या सैन्याशी भाल्याच्या साहाय्याने झुंज मांडली. भाला तुटला तेव्हा तलवार पुढे करून तो सरसावला. आणि बाजी घोरपडे याच्या छातीवर त्यांनी तलवारीचा वार काढला. या वराने बाजी घोरपडे चक्कर आली पण लगेच सावरून त्याने गदेच्या प्रहाराने खंडोजीला ठार केले. एवढ्या वेळात शहाजीराजे व त्यांचे सैन्य लढाईसाठी कसेबसे सिद्ध झाले होते. युद्धाला सज्ज झालेले शहाजी राजे घोड्यावरून बाजी घोरपडे वर चालून गेले. त्यांच्या समवेत दसोजी गवळी, योगाजी भांडकर, संताजी गुंजावटकर, मेघाची ठाकूर, त्र्यंबकराज व दत्त राजे बंधू इत्यादी सरदारही बाजीवय चालून आले. युद्धाची धुमश्चक्री उडाली. त्र्यंबक राजे व मानाजी, दत्तराज व खंडोजी, योगाजी भांडकर, मालोजी पवार मेचाजी व आंबाजी यांची गाठ पडून खणाखणी सुरु झाली. शहाजीराजांनी बाजीस गाठले. काही काळ जोमात युद्ध चालले. पण बाजी सैनिक मोठ्या संख्येत होता. शहाजीराजांचे बळ त्याच्यापुढे कमी पडु लागले व अखेर रक्ताने माखलेले शहाजीराजे मूर्च्छित होऊन घोड्यावरून खाली कोसळले. ऐकेकाळी निजामशाही स्वतःच्या खांद्यावर तोलून मोगलांना खडे जाणाऱ्या शहाजी राजे यांची अवस्था पाहून बाळाजी हैबतराव घोड्यावरून खाली उतरले व त्यांनी स्वतः घाल फिरवून शहाजीराजांचे रक्षण केले. तेवढ्यात बाजी घोरपडे तेथे आला व त्याने स्वतच शहाजी राजांना कैद केले. शहाजीराजांच्या छावणीची दुर्दशा उडाली.
मुस्तफाखान याने शहाजी राजांना किल्ले जिंजी जवळ कैद केले ती तारीख होती 25 जुलै 1648.

दिल्ली मधे ब्रिटिश सत्ते कडून जी. सी. आय.ई -हे किताब मिळाले- ह्या पदवीचे कर्तबगार पुरुष छत्रपति राजर्षी शाहू महाराज -


दिल्ली मधे ब्रिटिश सत्ते कडून जी. सी. आय.ई -हे किताब मिळाले- ह्या पदवीचे कर्तबगार पुरुष छत्रपति राजर्षी शाहू महाराज -
G.C.I.E - Grand Commander ( of the most eminent order) of the India Empire.
१२ डिसेंबर १९११
कोल्हापूरचे संस्थानचे चीफ इंजिनियर दाजीराव अमृतराव विचारे यांना राजर्षी शाहू महाराजांनी दिल्ली वरून धाडलेले हे पत्र अनेक दृष्टीने महत्वाचे आहे.१२ डिसेंबर १९११ रोजी दिल्लीत पंचम जॉर्ज बादशहाच्या राज्यारोहणनिमित्त खास दरबार भरला गेला त्या दरबारास महाराजांना पाचारण केले गेले. मुख्य समारंभाच्या आदल्या दिवशी म्हणजे ११ डिसेंबर १९११ रोजी व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज यांच्याकडून महाराजांना ब्रिटिश साम्राज्यातील [ G.C.I.E - Grand Commander ( of the most eminent order) of the India Empire] ही मोठ्या सन्मानाची पदवी मिळाल्याचे पत्र मिळाले. हे पत्र म्हणजे महाराजांच्या राजनिष्ठेचे जसे प्रतीक होते, तसे ते ब्रिटिशांना महाराजांविषयी व त्यांच्या कार्याविषयी वाटणाऱ्या विश्वासाचे चिन्हच समजा. हा सन्मान मिळाल्याचा आनंद महाराजांना होणे स्वाभाविकच आहे. विशेष म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या शत्रूंनी ( ज्यांना त्यांनी उपरोधाने 'स्नेही' असे संबोधले आहे) त्यांच्यावर सतत चालवलेल्या चिखलफेकी हल्ल्यांच्या व त्यांना कमी लेखण्याचा कटकारस्थानांच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिश सरकारने केलेला हा सन्मान त्यांना विशेष महत्वाचा वाटणे अस्वाभाविक नव्हता.या आनंदाच्या क्षणी त्यांना आपल्याबरोबर 'एकाच नावे'त असणाऱ्या दाजीरावसारख्या सहकाऱ्याची आठवण व्हावी आणि त्याच क्षणी राजर्षी शाहू महाराजांनी आपले मनोगत त्यांना कळवले ही गोष्ट राजर्षी शाहू महाराजांच्या व्यक्तीमत्वाच्या एका आगळ्या पैलूचे आपल्याला जाणीव करून देते.
कोरोनेशन दरबार
कोल्हापूर कॅम्प,
दिल्ली.
श्री
चि. वि राजश्री विचारेसाहेब यांसी-
आशीर्वाद विशेष-
पत्र लिहिण्याचे कारण की, आज मला [ G.C.I.E - Grand Commander ( of the most eminent order) of the India Empire] हा किताब मिळाला. हल्ली मिळालेल्या पदवीची किंमत स्नेही मंडळींनी फार समजली पाहिजे. कारण आपल्याला माहितीच आहे की, आम्हाला आमचे स्नेही मंडळींनी जवळजवळ कारागृहवास दाखवण्याचा प्रयत्न केला. तो साधणे शक्य नव्हते तरी आम्हावर शेण उडविले. आम्हाला आई बाप कोणी नाही म्हणून आज ते शेण पुसून काढून कुंकुवाचा टिळा लावला. सातवे एडवर्ड बादशाही व पंचम जॉर्ज बादशाही अनन्यभावे प्रार्थना केली पाहिजे. याबद्दल परमेश्वराचे आम्ही मानू तितके उपकार थोडेच होणार.आमचे झालेले हाल पाहून आमचे मित्र-मंडळींचे डोळे अद्याप निवाले नाहीत. तो महाराज ढोंग करतो , तो लुच्चा आहे वैगरे विशेषणे आम्हाला सुरू आहेत. ह्या पूढे आपण मला सोडू नये व नोकर हे नाते विसरून माझ्याशी विचरपूरक वागावे हीच विनंती आहे. कळावे हे आशीर्वाद.
राजर्षी शाहू छत्रपति
( हा सन्मान एवढा महत्वाचा आहे की राजर्षी शाहू महाराज समाजासाठी आहेत आणि समाजासाठीच काम करतील हे कळून येते)
राजर्षी शाहू छत्रपति जयते
संकलन - अमित राणे

मराठ्यांनी पांदिचेरी वर आपले भगवे निशाण फडकवले

मराठ्यांनी पांदिचेरी वर आपले भगवे निशाण फडकवले...🚩
मद्रास किनाऱ्यावरील बराचसा प्रदेश हा विजापूरच्या सत्तेच्या अंमलाखाली होता. आणि त्याचा सुभेदार #सरदार शेरखान लोदी होता. त्याचे मुख्य ठिकाण वालीकोंडापुरम येथे होते. या शेरखानाने फ्रेंच कंपनीला किनारपट्टीवर एक लहानसे खेडे वखार सुरू करण्यासाठी दिले. फ्रेंच कंपनीचा हिंदुस्थानातील प्रमुख फ्रँन्काईस मार्टिन याने या संधीचा फायदा घेऊन तेथे वखार तर थाटलीच, शिवाय त्या खेड्याचे एका संपन्न नगरात रूपांतर केले. पुढे हेच नगर " पांदिचेरी " या नावाने प्रसिद्धीस आले. या नगराने मराठा-फ्रेंच संबंधात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कर्नाटक मोहिमेत या शेरखान लोदीचा जबरदस्त पराभव केला आणि त्याच्या ताब्यात असणारा मद्रास किनारपट्टी वरील सर्व प्रदेश काबीज केला. त्यामध्ये ही पांदिचेरीची वसाहत होती. ती शिवाजी महाराजांनी हस्तगत केली. अशा प्रकारे मराठ्यांचे पांदिचेरी वर आधिपत्य प्रस्थापित झाले.

मराठ्यांनी पांदिचेरी वर आपले भगवे निशाण फडकवले ती तारीख होती - 17 जुलै 1677.

राजर्षी छत्रपति शाहू महाराज ( Pillar Of Social Democracy ) --



राजर्षी छत्रपति शाहू महाराज ( Pillar Of Social Democracy ) --
महारांना वतनाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याची शाहू महाराजांची उपाययोजना - सनदी नोकर म्हणून नेमणुका
१४ मे , १९२०
महार समाज आपल्या वतनाच्या गुलामगिरीत खितपत पडला होता आणि महार वतनाच्या जमिनीच्या लहान-लहान तुकड्यांचा मोह त्याला सोडवत नव्हता. यावर राजर्षी शाहू महाराजांनी उपयोजना काढली. ती म्हणजे कसबा करविरातील समस्त गावांच्या सगळ्या महारांच्या जमिनी एकत्र करायच्या. त्यांच्यापैकी मोजक्याच लोकांमधे त्या जमिनीचे प्रत्येक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल अशा पद्धतीने फेरवाटप करायचे, या मोजक्या लोकांना सरकारी सेवेत दाखल करून बाकीच्या समस्त महारांना वतनाच्या जुलमी कामातून मुक्त करायचे. कसबा करवीरच्या सगळ्या महारांनी या योजनेस संमती दिल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी १६ निवडक महारांची सरकारी नोकर म्हणून नेमणूक केली. या नोकरांनी खुद्द हुजूर स्वारी, आईसाहेब, महाराज ,युवराज व जरूर पडल्यास श्रीमहालक्ष्मी करवीर निवासिनीकडेही नोकरी करायची होती. राज्यातील "महार वतन" खालसा करण्यापूर्वी महाराजांची ही प्रायोगिक उपाययोजना होती.
श्रीशंभू भवानी
श्री महादेव श्री तुळजाभवानी ।
चंद्रिलेखेव वर्धिष्णुर्जनानंदप्रदायिनी
शाहूछत्रपतेमुद्रा शिव सूनोर्वीराजते।।
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके (२४७) रौद्रनाम संवत्सरे वैशाख बहूल १० दशमी रोज गुरुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीमन्ममहाराज शाहू छत्रपती स्वामी यांनी सदू तुकाराम बनगे यांस आज्ञा केली - ऐसीजे :-
महार लोक गावचे उत्पत्तीपासून आजपर्यंत गावचे लोकांची व सरकारची इमाने इतबारे नोकरी करीत आले.
पण, आजपर्यंत त्यांना कोणीही उन्नतीचा मार्ग दाखविला नाही. नेहमी त्यांना हीन स्तिथीत व दास्यात ठेवून अमानुषपणाने वागविल्याचे दिसून आले. अशा स्तिथीत त्यांनी आपले इमान व राजनिष्ठा थोडीपण ढळू दिली नाही. ते मानवी प्राणी आहेत व मनुष्याला मनुष्याप्रमाणे वागविण्याचे तत्वास अनुसरून सदर लोकांना दास्यापासून मुक्त करणे व त्यांना शिक्षण देऊन सुसंस्कृत करून श्रेष्ठ पदास पोहोचविणे हे हल्लीचे सुधारणेच्या काळात आद्य कर्तव्य आहे, असे स्वामींनी ध्यानी आणून कसबा करवीर येथील महार लोकांस एकंदर उत्पन्न जमीन १२९ एकर आठ गुंठे १२९६८ आकार रुपये ४९७ चे आहे, त्यास हल्ली नंबर ९ चे कागदी 'समस्त महार' याचे नाव दाखल आहे.ते महार लोकांनी एकवाक्यतीने कबुली दिल्याने कमी करण्यात येऊन सरकारी कामास १६ इसम देण्याचे ठरविले असून , त्यांची नावे पुढील प्रमाणाने -
१) बाबुराव रामराव कांबळे
२) कृष्णराव परशुराम कांबळे
३) नागोजी तिपाजी कांबळे
४) रामू शंकर कोले
५) सदू तुकाराम बानगे
६) जोती नायकू वनगे
७) लिंबारी संतू लिगाडे
८) जोती सुभाना लिगाडे
९) बाळाजी चोळोजी काळे
१०) नामू राणोजी काळे
११) मसू मानाजी काळे
१२) मसू लक्ष्मण काळे
१३) आबा जकू सरनाईक
१४) सदू राणोजी सरनाईक
१५) भाऊ तुळसा कालेकर
१६) तुळसाप्पा संतराम सरनाईक
नेमून दिलेल्या १६ जणांची सरकारी नोकरी करायची आहे.रयतेच्या कामगिरीची अगर अधिकाऱ्याची दिवाणापासून तहत गावाच्या पाटील पर्यंत कोणाचीही नोकरी असली तरी त्यांनी ती हक्काने म्हणून करून घ्यावी.मग तो मनुष्य हिंदू , मुसलमान, ब्राह्मण ,महार ,मांग ,मराठा, जैन, लिंगायत असो.
संकलन - अमित राणे

मोरोपंत पिंगळे.(पेशवा /पंतप्रधान)

शिवस्वराज्याचे अष्टप्रधान मंडळ..!!
(गाथा राज्यरक्षकांच्या राजनिष्ठतेची)
भाग -: 1

मोरोपंत पिंगळे.(पेशवा /पंतप्रधान)
दुर्गरचना तज्ञ मोरोपंत-:
मोरोपंत पिंगळे बंगलोरच्या मांडलिक राज्यातून दऱ्याखोऱ्यात होऊ घातलेल्या महाराष्ट्रातील साक्षात स्वराज्यात सन 1643 मध्ये दाखल झाले.
त्यांचे वडील त्रंबकजी शहाजी राज्यांच्या दरबारी नोकरीस होते.
शहाजी राज्यांच्या नियोजनामुळे व काहीसे शिवाजीराज्यांच्या बालपणीच्याच बंगरूळला अनुभवलेल्या व्यक्तिमत्वामुळे प्रभावित होऊन, मोरोपंत आनंदाने पुण्याला आले.
"अंतर कोपी हेतू" हा भवभूतीने टिपलेला प्रेमाच्या राज्यातील न्याय राजकारणातही आयुष्यभर लागू झाला.
शिवाजीराज्यांनी मोरोपंतांना यथोचित स्थान दिले. मोठ्या साहसाने व युक्तीने मिळवलेल्या पुरंदरचा कारभार त्यांच्याकडे सोपविला.
प्रारंभीच्या उभयतांच्या प्रयत्नातील प्राप्त दुर्गराज पुरंदर व वज्रगड सांभाळण्याची जिम्मेदारी पंतांनी चोख पार पाडली.
दुर्गसंरक्षण, दुर्गव्यवस्था व दुर्गरचना यात मोरोपंताना विशेष आवड होती.
पाश्चिमात्य इतिहासकार किंकेड यांच्या मतानुसार राजगडाची तटबंदी भक्कम करण्याची कामगिरीही मोरोपंतांवरच सोपवली होती.
रायगड राजधानी होईपर्यन्त 23 वर्षे राजगड स्वराज्याची राजधानी होती.
किंकेडच्या मतास अनुकूल असे शेडगांवकर बखरीत वर्णन आहे कि शिवाजी राज्यांनी प्रचंडगड( तोरणा) किल्याच्या आग्नेय दिशेस तीन मैलावर असलेल्या मोरबाद डोंगरावर मोरोपंतांच्या देखरेखेखाली हा किल्ला झपाट्याने उभारला, त्यावर तटबंदी केली व राजगड असे नाव ठेवले.
पुरंदर व राजगड या शिवकाळालीत स्वराज्याच्या पहिल्या दोन राजधान्यांतीलही मोरोपंतांची कामगिरी संस्मरणीय आहे.
प्रतापगड हे मोरोपंताच्या दुर्गस्थापत्य ज्ञानाचे दुसरे स्मारक. पारघाटाच्या पायथ्याशी मोऱ्यांनी एका मोक्याच्या डोंगरावर आधीच काही तात्पुरते लढण्यास व दडण्यास उपयोगी आडोसे निर्माण केले होते.
हि जागा चंद्रराव मोऱ्यांना फार शुभकारक झाली होती.
जावळी घेतल्यावर महाराज्यांच्या येथेच कुलदेवता तुळजाभवानीची प्रतिष्ठापना करण्याचे ठरवले, अश्या लाभदायी व मोक्याच्या ठिकाणाचे बांधकाम भक्कम किल्याच्या योजनेसह मोरोपंतांकडे सुपूर्द करण्यात आले.1655 साली मोरोपंतांनी हा मजबूत किल्ला बांधला. या बांधकामावर शिवाजी राजे बेहद खुश झाले.
पारघाट व कोंकण मुठींमध्ये ठेवण्यासाठी या प्रतापगडाचा अनन्यसाधारण उपयोग झाला. त्याला सभोवताली असलेली तटबंदी, बचाव व लढाई या दोन्ही दृष्टीने उपयुक्त आहे.
बुरुज पन्नास फुटापर्यंत उंच आहेत, आतील वाटा फसव्या व अत्यंत अवघड आहेत. याच किल्ल्यातून शिवरायांनी आसमंतात लवकरच गरुडभरारी घेतली, शिवरायांचे दुर्गस्वप्न मोरोपंतांनी साकार केले, कुलस्वामिनी यथाविधी स्थापना येथेच झाली.
रियासतकार सरदेसाई लिहतात, इतःपर मोरोपंत हा शिवाजी राज्यांचा केवळ उजवा हात बनला सन 1683 पर्यंत स्वतः औरंगजेब दाखल होईपर्यंत हा राजगड किल्ला मराठ्यांकडे होता.
ब्रिटिश काळात सातारकरांच्या ताब्यातील या दुर्गाचे महत्व व वास्तपरस्त फार होती. स्वातंत्रकाळात तेथे शिवरायांचा अश्वारूढ पुतळा भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी उभारला.
पराक्रमाची धार-:
प्रतापगडाच्या बांधकामानंतर अवघ्या चार वर्षांनी म्हणजे 1659 साली स्वराज्याचा घास घेण्यासाठी विजापूरचा बलाढ्य सरदार अफझलखान स्वराज्याकडे झेपावला, प्रतापगडाच्या प्रांगणात युक्तीयुक्तीने त्याला उभे केले. या सुलतानी संकटात दिनांक 10 नोव्हेंबर 1659 मोरोपंतांचे पायदळ खानाच्या पारघाट येथील बिनीच्या सैन्यावर तुटून पडले व त्यांनी कोयनापार असलेल्या लष्कराची दाणादाण उडवली.त्यांचे मुख्य काम कोयनापारच्या फौजेला गडावर चालून जाऊ न देता मध्येच अडथळा करून तिचा करावयाचा हे होते. हा हल्ला मोरोपंतांनी यशस्वी केला, त्यावेळी महाराज्यांना त्यांच्या तलवारीची धार समजली.
इतिहास पंडित शेजवलकर लिहतात अफझलखानाच्या सैन्याची दाणादाण उडवण्यात मोरोपंतांचा प्रमुख सहभाग होता.
नेताजी पालकर व मोरोपंत पिंगळे या बिनीच्या दोघा लढवय्यांना प्रतापगडाच्या विरुद्धदिशेवर संरक्षणार्थ महाराज्यांनी सैन्यासह सुसज्ज ठेवले होते.
महाराज्यांच्या दूरदृष्टीबरोबरच या दोन झुंजार साथीदारांची झंझावाती साथही प्रतापगडाच्या अभूतपूर्व यशात महत्वाची आहे.
मुजुमदार व पेशवे -:
मोरोपंतांच्या आधी पेशवेपद श्यामराज नीलकंठ रांझेकर यांच्याकडे होते.पण श्यामराज कोकण किनारपट्टीवर धुमाकूळ घालणाऱ्या सिद्धीवर स्वारी करावयास गेले असता त्यांनाच पराभव पत्करावा लागला, याउलट नंतर पाठविलेल्या मोरोपंतांनी मात्र सिद्धीला पळवून लावले, कुरबुर करणाऱ्या खेमसावंतांचीही त्यांनी खोड मोडली.
अश्या एक ना अनेक उत्तम कामगिरींमुळे त्यांना 1660साली मुजुमदारी व 1669 साली पेशवेपद मिळाले.
शाहिस्तेखान प्रसंगातील सावधानता-:
शाहिस्तेखानच्या मोहिमेच्या वेळीहि मोरोपंत निवडक फौजेसह महाराज्यांच्या मदतीस उभे होते.
प्रा.जदुनाथ सरकार बखरीच्या आधारे लिहतात कि, महाराज्यांनी नेताजी पालकर व मोरोपंत पिंगळे यांच्याबरोबर प्रत्येकी एक एक हजार सैन्य देऊन त्यांस खानाच्या पुण्याच्या प्रचंड छावणीच्या दोन्ही बाजूस एक मैलाच्या अंतरावर राहावयास सांगितले होते.
वस्तुतः मार्च 1663 च्या दरम्यान मोरोपंतांनी कोंकणात जामदार खान विरुद्ध निळोजी सोनदेवांसह लढण्यास पाठविले होते. पण 3 एप्रिल 1663 रोजी शाहिस्तेखान प्रसंग उध्दभवतेवेळी पुनश्च कोंढण्याकडे कूच करण्याचा हुकूम देण्यात आला अशी दप्तरी नोंद सापडते.
शिवरायांच्या आग्राभेटीदरम्यान मांसाहेब जिजाऊंच्या देखरेखेखाली मोरोपंतांनी स्वराज्याचा कारभार मोठ्या हुन्नरीने सांभाळला होता.
साल्हेरचे यश-:
सन 1670 मध्ये मोरोपंतानी त्र्यंबकचा किल्ला हस्तगत केला,त्यावेळी औंढा,पट्टा, रावळा-जावळा हे किल्ले हि मोतोपंतांनी काबीज केले.
प्रतापराव गुजरांची झुंजार व तडफेची साथ त्यांना होती.
असे एकापाठोपाठ किल्ले काबीज करत असताना लवकरच मोघली सरदार महाबतखान, एखलासखान व दिलेरखान यांच्याविरुद्ध साल्हेरीचा इतिहासप्रसिद्ध संग्राम छेडावा लागला.
फर्जंद आनंदराव मकाजी, सरनोबत प्रतापराव गुजर व पेशवे मोरोपंत पिंगळे या त्रयींनी वरील बादशाही त्रिकुटाचा धुव्वा उडविला.
परंतु या रणसंग्रामात सूर्याजी काकडे सारखे नररत्न खर्ची पडले.
"मध्यानीचा भास्कर पाहवेना- तैसा शिवाजी नृप जिंकवेना" असे बखरकरांनी या रणसंग्रामचे वर्णन केले आहे.
रायगडचे सुवर्णक्षण-:
जेष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1593 ( 6 जून 1674 ) पहाटेच्या सुमारास शिवराज्यभिषेकाचा मुहूर्त होता. राज्यभिषेकासमयी अष्टप्रधान उभे होते , त्यावेळी उजवीकडे पूर्व दिशेला घृतपूर्ण सुवर्ण कलश धरून उभे राहण्याचा मानसन्मान मोरोपंतांना मिळाला.
सुहासिनींनी व कुमारिकांनी ओवाळल्यानंतर पंतप्रधान मोरोपंतांनी सर्वप्रथम श्री.शिवछत्रपतींना राजमस्तकीच्या मुकुटावर आठ सहस्त्र होन हलके हलके ओतून सुवर्णस्नान घातले.
कर्तव्यनिष्ठ मोरोपंत-:
हाती घेतलेल्या कामात प्राण ओतण्याचे पंतांचे ब्रीद होते. ते चौफेर व्यक्तिमत्वाचे पुरुष होते.
न्यायमूर्ती रानडे आपल्या मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथात मोरोपंत पेशव्यांबद्दल लिहतात, उत्तम कारभारी,प्रमुख परामर्शदाता, दुर्गतज्ञ व नामवंत सेनानी म्हणजे मोरोपंत पिंगळे.
सन 1676ला शिवाजी राजे कर्नाटक मोहिमेवर असताना, आपल्या पश्चात मोरोपंतास राज्यांचा कुलमुखत्यार देऊन सचिव अनाजी दत्तो याना सहकार्याने वागण्याची आज्ञा केली.
शिवाजी महाराज्यांनी लिहलेल्या एका पत्रात मोरोपंतांच्या इच्छेप्रमाणे गोष्टी होतील असा उल्लेख आहे.
राजश्री मोरोपंत प्रधान यांसी पत्र लिहले असे, ते मनास आणून जे चालले असेल ते चालवतील अंतर पडणार नाही,जाणिजे ( संदर्भ-शिवचरित्र सा.खंड 552).
शिवसुर्यास्ताच्या वर्षीच अंत-:
3 एप्रिल 1680 शिवसूर्य अस्तंगत झाले.
त्यानंतर संभाजी राज्यांच्या विरुद्ध कारस्थानात ते सहभागी झाल्यामुळे मे 1680 ला अटक झाली, पुढे जुलै 1680 ला संभाजीराज्यांनी त्यांची मुक्तता केली.
संभाजी राज्यांनी त्यांना मुक्त करून पेशवाईच्या जागी कायम केले,
अटकेपासून मृत्युपर्यन्त मोरोपंत आजारीच राहिले. शिवप्रभुंच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा महिन्यानेच म्हणजे ऑक्टोबर 1680 ला मोरोपंत रायगडावरच अंतर्धान पावले.( संदर्भ-: जेधे शकावली ).
मोरोपंत आणखी काही काळ टिकले असते तर.....पण इतिहासात जर-तर ला वाव नसतो हेच खरे.
शंभू राज्यांनी त्यांच्यासाठी आपले कर्तव्य ठीकठाक बजावले पण काळाने ते मोडले. एवढ्या मोठ्या राजाचे पंतप्रधान काळाची चाहूल जाणण्यात शेवटी अपयशी ठरले हे मात्र निःसंशय.
समाप्त .....
विजय स.येडगे.
श्रीमानयोगी सेवा परिवार.

#लालसोट_चा_रणसंग्राम

#लालसोट_चा_रणसंग्राम
#पार्श्वभूमी




स. १७८३ मध्ये पहिल्या इंग्रज - मराठा युद्धाची समाप्ती सालबाईच्या तहाने झाली. हा तह महादजी शिंदेच्या मध्यस्थीने पुणे - कलकत्ता दरबारच्या दरम्यान घडून आला होता. पहिल्या इंग्रज - मराठा युद्धामध्ये देशभरात ठिकठीकाणी युद्धप्रसंग करावे लागल्याने इंग्लिश ईस्ट कंपनीचा व्यापार जवळपास ठप्प झाला. कंपनीच्या चालकांनी याबाबतीत हिंदुस्थानातीचा गव्हर्नर जनरल हेस्टिंग्सचे कान उपटल्यामुळे त्याने कसेबसे हे युद्ध आवरते घेतले. दरम्यान, सालबाईचा तह घडवून आणताना महादजी व हेस्टिंग्सच्या दरम्यान एखादा गुप्त करार झाल्याची शंका येते. कारण, सालबाईचा तह घडून आल्यावर महादजीने दिल्लीच्या राजकारणात हात घातला. त्यावेळी मोगल बादशहाने मागणी केली असता व परिस्थिती अनुकूल असतानाही हेस्टिंग्सने दिल्लीच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याचे साफ नाकारले. परिणामी, मोगल बादशहाने मराठ्यांचा -- पर्यायाने महादजी शिंदेचा आश्रय घेतला. पानिपतप्रसंगी व पूर्वीदेखील मराठी सरदारांनी दिल्ली दरबारचे राजकारण खेळवले होते. परंतु, आधीच्यांनी ज्या चुका केल्या त्या टाळून आपली व मराठी राज्याची सत्ता प्रस्थापित करण्याचा महादजीचा प्रयत्न होता.
पानिपतपर्यंत आणि नंतर देखील पेशव्यांची मजल दिल्ली दरबारची मीरबक्षी -- सरसेनापतीपद मिळवण्यापलीकडे गेली नव्हती. यावेळी मात्र मोगल बादशहाचे प्रतिनिधीपद -- वकील - इ - मुतलकी प्राप्त करून घेण्याचा महादजीने खटाटोप आरंभला. इकडे सालबाईचा तह झाल्यावर इंग्रजांना देखील काही काळ स्वस्थता लाभली. महादजी दिल्लीचे राजकारण हाती घेताना मोगल बादशहाच्या प्रतिनिधीचे पद घेण्याचा प्रयत्न करेल अशी हेस्टिंग्सला आरंभी बिलकुल कल्पना नव्हती. पण त्याची पावले त्या दिशेने वळलेली पाहताच हेस्टिंग्सने महादजीसोबत केलेला गुप्त सलोखा साफ उडवून लावत स. १७८४ च्या मे महिन्यात लखनौला येउन तळ ठोकला. तेथे बसून त्याने मोगल शहजादा मिर्झा जवानबख्तला मधाचे बोट लावून त्याच्यामार्फत बादशाहीत हात - पाय पसरण्याचा यत्न केला. परंतु, महादजीने स. १७८४ च्या नोव्हेंबरमध्ये हेस्टिंग्सचे प्रयत्न निष्फळ करीत बादशाही प्रतिनिधीचे पद प्राप्त करून घेतले. त्यामुळे मोगल बादशाहीची सर्व सत्ता महादजीच्या हाती आली. वकील - इ - मुतलकीचे पद पुणे दरबारकडे गेल्याने हेस्टिंग्सची मोठी निराशा झाली. त्याने लखनौला मुक्काम गुंडाळून कलकत्ता गाठला. एवढ्यात त्याच्या नोकरीचा कालावधी पूर्ण झाल्याने स. १७८५ च्या फेब्रुवारीमध्ये त्याने इंग्लंडचा रस्ता धरला, तर त्याच्या जागी नियुक्त झालेल्या लॉर्ड कॉर्नवॉलिसला अधिकारावर येउन सर्व सूत्रे हाती घेण्यास स. १७८६ चा सप्टेंबर उजडावा लागला. कॉर्नवॉलिस अधिकारावर येईपर्यंत इंग्रजांनी अगदीच तटस्थतेचे धोरण स्वीकारल्याने दिल्लीच्या कारभारात आपला जम बसण्यास फारसा अडथळा येणार नाही असा महादजीचा अंदाज होता. परंतु, त्यास मोगलांच्या राजकीय सामर्थ्याचा अजून पुरता अंदाज आलेला नव्हता. दक्षिण्यांनी मोगल बादशाहीची सूत्रे आपल्या हाती घ्यावी हे खुद्द बादशहा शहा आलमच्या परिवारातील मंडळींना सहन झाले नाही तिथे इतर उमरावांची काय कथा ? कसल्याही परिस्थितीत महादजीचा जम बसू न देण्याचा त्यांनी एकप्रकारे निश्चय केला. त्यांस इंग्रजांची देखील भर मिळाली. त्यांनी ठिकठीकाणच्या हिंदू - मुस्लिम सत्ताधीशांना महादजी विरोधात -- पर्यायाने पुणे दरबारच्या विरोधात चिथावणी देण्यास आरंभ केला. परिणामी जाट, राजपूत, शीख हे संस्थानिक महादजीच्या विरोधात बंडावा करू लागले. यावेळी महादजीकडून एक मोठी चूक घडून आली. त्याने पूर्वीची पद्धत साफ सोडून नव्या पद्धतीचा स्वीकार केला. यापूर्वी संस्थानिकांनी विरोध वा बंडाळी केल्यास थोडीफार लष्करी कारवाई करून त्यांचा बंडावा मोडण्यात येई, पण संस्थाने कायम राखली जात. त्यांचे महत्त्व एकदम न घटवता हळूहळू त्यांना निष्प्रभ केले जात होते. होळकर घराणे या धोरणाचे प्रमुख पुरस्कर्ते होते. एकेकाळी शिंदे देखील याच सूत्रानुसार वागत होते पण महादजीने यावेळी हा क्रम मोडून सरसकट संस्थानेच निकाली काढण्याचा उपक्रम स्वीकारला. परिणामी त्याच्याविरोधात उत्तरेतील लहान - मोठ्या सत्ताधीशांनी कारस्थाने उभारणे स्वाभाविक होते. राज्यकारभाराच्या अशाच घालमेलीत लालसोटचे प्रकरण उपस्थित झाले. लालसोट प्रकरणात जयपूर, जोधपुरच्या संस्थानिकांनी प्रामुख्याने सहभाग घेतला. त्यांना बादशाही अंमलदारांची उघड साथ असल्याने अल्पकाळ महादजीची परिस्थिती बिकट बनली होती. पैकी, जयपूर - जोधपुरकरांची या ठिकाणी संक्षिप्त माहिती देतो.
जयपूरास यावेळी माधोसिंगचा मुलगा प्रतापसिंग राज्यकर्ता असून पानिपत पूर्वीपासूनच जयपूरकरांचे व मराठी सरदारांचे वैर जुळले होते. जोधपुरास बिजेसिंग राजा असून, यानेच मारेकरी पाठवून जयाजी शिंद्याचा खून केल्याचे शिंदे कुटुंबीय अजून विसरले नव्हते. महंमद बेग हमदानी हा मोगल मनसबदार असून बादशाही सैन्यावर याचे बऱ्यापैकी वजन होते. लालसोट प्रसंगी याने उघड उघड फितुरी केल्यानेच महादजीवर संकट ओढवले. जयपूरकरांचा एक मांडलिक, माचेडीचा रावराजा प्रतापसिंग -- अलवार संस्थानाचा संस्थापक -- हा महादजीचा समर्थक होता. ( जयपूर व माचेडीच्या संस्थानिकांचे नाव एकच असल्याने वाचकांचा गोंधळ उडू नये यासाठी माचेडीकर प्रतापसिंगाचा उल्लेख यापुढे रावराजा म्हणून करण्यात येईल.) याखेरीज भरतपूर जाट राजा रणजितसिंग हा देखील महादजी पक्षपाती होता. या दोघांमुळेच लालसोट नंतर उत्तर हिंदुस्थानात महादजीचा निभाव लागला.

#लालसोट_स्वारीचे_प्रयोजन :-
लालसोटची मोहीम मुख्यतः जयपूरकरांमुळे उद्भवली. पेशवे व मोगल बादशहा यांच्या वतीने महादजीणे जयपूरकरांकडे खंडणीची मागणी केली. मागील थकबाकी व चालू सालची मिळून सकून साडे तीन कोटींची आकारणी महादजीने जयपूरवर केली. जयपूरकरांनी एवढी मोठी रक्कम भरण्यास असमर्थता दर्शवली. याच सुमारास माचेडीच्या रावराजाने महादजीसमोर एक नवीन प्रस्ताव मांडला. जयपूरचा खरा वारस प्रतापसिंग नसून मृत पृथ्वीसिंगचा पुत्र मानसिंग हाच खरा हक्कदार आहे. त्यास आपण जयपूरची गादी मिळवून द्याल तर मी तुम्हाला ५० लक्ष रुपये देईन. जयपूरकरांना हि बातमी लागली. यावरून महादजीचा व त्यांचा बराच वाद झाला आणि महादजीने बादशाही अधिकारांचा वापर करून जयपूरच्या जप्तीस आरंभ केला. संस्थान खालसा होणार म्हटल्यावर जयपूरकर खवळून उठले. त्यांनी जोधपुरच्या बिजेसिंगाकडे मदतीची याचना केली. जोधपुरकरांशी तर शिंद्यांचा उभा दावा होता. त्यात महादजीने जोधपुरकरांकडे अजमेरचा ताबा मागितल्याने ते नाराज झाले होतेच. तेव्हा त्यांनी जयपूरकरांची बिलकुल उपेक्षा केली नाही.

#लालसोट_मोहिमेस_आरंभ
स. १७८६ च्या दसऱ्यास महादजी मोगल बादशहा शहा आलमला सोबत घेऊन जयपूरवर चालून गेला. आरंभी उभय पक्षांमध्ये बोलाचाली झाल्या. त्यात जयपुरकरांनी माचेडीकर रावराजाच्या मध्यस्थीने साडेतीन कोटीं ऐवजी बासष्ट लक्ष रुपये देण्याचे मान्य केले. त्यापैकी आठ लक्ष रोख देऊन बाकीचे हप्ते देण्याच्या गोष्टी बोलू लागले. वस्तुतः यावेळी पैशाच्या बाजूने महादजीची हलाखी झाली होती. मोगल बादशाहीचा कारभार जरी त्याच्या हाती आला असला तरी याचा अर्थ असा नाही की, त्यास मोगलांचा धनसंपन्न खजिना प्राप्त झाला. उलट मोगल बादशहा व त्याचा परिवार आणि बादशाही सैन्यास जागवण्याची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली. जिथे खुद्द महादजीला आपल्या फौजेला दरमहा पगार देता येत नव्हता तिथे बादशाही सैन्य वा परिवारास तो काय देणार ? तेव्हा मिळेल त्या मार्गाने पैसा पदरात पाडून त्यास मोगल बादशहास राजी राखायचे होते. यासाठी त्याने दोन्ही दरडींवर हात ठेवला. जयपूरकरांनी रोख रकमा हाती दिल्या तर प्रतापसिंगासच कायम ठेवायचे नाहीतर रावराजाच्या मार्फत मानसिंग यास जयपूरची गादी देऊन पैसा उकळायचा. तात्पर्य, निव्वळ पैसे मिळवण्यासाठी महादजीने राजपुतांवर मोहीम आखली होती.
याच सुमारास म्हणजे स. १७८५ – ८६ मध्ये पुणे दरबार व निजामाची टिपू विरुद्ध नियोजित मोहिमेची तयारी जोरात सुरु होती. प्रसंगी माघार घ्यावी लागू नये म्हणून नाना फडणीसने यावेळी तुकोजी होळकरास मुद्दाम या स्वारीत सहभागी करून घेतले होते. परिणामी, उत्तरेत महादजीस प्रसंगी कुमक करणारा वजनदार मराठी सरदार कोणी राहीला नव्हता. पुणे दरबारची टिपूवर स्वारी होणार हे महादजीला माहिती होते, पण त्यासाठी त्याला राजपुतांवरील मोहीम पुढे ढकलण्याची गरज वाटली नाही. प्रथमदर्शनी तरी आपल्या व बादशाही फौजांच्या बळावर आपण सहजी राजपुतांचा पराभव करू अशी त्यास उमेद होती.
जयपूरकरांनी आरंभी बासष्ट लाखांची खंडणी भरण्याचे मान्य केले खरे पण रकमेचा भरणा करण्यास त्यांनी टाळाटाळ आरंभली. तेव्हा महादजीने युद्धाची तयारी चालवली. तिकडे जोधपुरकरांची सेनाही जयपूरच्या मदतीस येण्यासाठी रवाना झाली होती. सर्व रागरंग पाहून, ता. १० मार्च १७८७ रोजी शहा आलमच्या राज्यारोहणाचा वाढदिवस झाल्यावर महादजीने त्यास दिल्लीला रवाना केले. मोगल बादशहाची पाठवणी चालू असताना महादजीने उदेपूरकरांकडेही खंडणीची मागणी केली. परंतु, त्यांनी रकमेचा भरणा करण्याची तयारी दर्शवून युद्ध प्रसंग टाळण्याचा मार्ग स्वीकारला. त्यामुळेच महादजीचा काहीसा बचाव झाला. अन्यथा याचवेळी त्याच्यावर आणि उत्तर हिंदुस्थानातील मराठी सत्तेवर भयंकर मोठे संकट ओढवले असते. मात्र, त्याला अजूनही परिस्थितीची व्हावी तशी जाणीव झाल्याचे दिसून येत नाही, कारण, ता. १२ मे १७८७ रोजीच्या एका पत्रानुसार जयपूर – उदेपूरचा बंदोबस्त करून महादजी छावणीसाठी मथुरेस जाणार असल्याचा उल्लेख आहे. यावरून, प्रत्यक्ष लढ्याचा प्रसंग न उद्भवता लष्करी कारवाईचा धाक दाखवून आपण कार्य साधून घेऊ असा महादजीचा आरंभीचा अंदाज असल्याचे दिसून येते. असो, मे महिन्यात महादजीचा मुक्काम डिग जवळ होता. याच सुमारास इंग्रजांनी कानपूर येथील आपल्या फौजांचा तळ हलवला. तेव्हा बादशहाने महादजीला जयपूरचे प्रकरण सोडून दिल्लीस येण्याचा आदेश दिला. परंतु, महादजीने यावेळी शाही सल्ला अव्हेरून जयपूरची मोहीम पुरी करण्याचा निर्धार केला. जून महिन्यात त्याची स्वारी जयपूरनजीक आली. बादशाही उमराव महंमद बेग हमदानी यास त्याने जयपूरच्या उत्तरेस पाठवले होते. त्या ठिकाणी तो असताना दररोज तीन हजार रुपये देण्याच्या बोलीवर जयपूरकरांनी त्यास आपल्या पक्षात वळवून घेतले. महादजीच्या पक्षाला हा सर्वात मोठा हादरा होता. तरीही, शिंदे पाटलांना वस्तुस्थितीची व्हावी तशी जाणीव झालेली दिसत नाही. हमदानी सारखा मातबर सरदार फुटल्याने बादशाही फौजांवर विसंबून राजपुतांशी गाठ घालणे – तेही वजनदार मराठी सरदार आसपास नसताना – लष्करीदृष्ट्या आत्मघातच होता. त्याशिवाय, ज्या मोगल बादशहाने महादजीला आपला प्रतिनिधी बनवले होते, तो शहा आलम तरी महादजीला मनापासून कुठे पाठिंबा देत होता. बादशहाचा धरसोडपणा आणि गळेकापूवृत्ती शिंद्याच्या चांगलीच परिचयाची होती. मात्र, त्याने यावेळी एकप्रकारे हट्टास पेटून हि स्वारी पुढे चालूच ठेवली. मारवाड मोहिमेत जयाजी शिंदेने जे केले त्याचीच हि सुधारित पुनरावृत्ती होती !
स. १७८६ – ८७ च्या दरम्यान अफगाण बादशहा तयमुर अब्दालीचा मुक्काम पेशावारास होता. यावेळी राजपुतांनी तयमुरला आपल्या मदतीस येण्याची विनंती केली. खासा अफगाण पातशहास जर येण्यास सवड नसेल तर त्याने शहजादा हुमायूनला तरी पाठवावे अशी सूचनाही केली. त्याखेरीज पंजाबातून शीख रस्ता देणार नाहीत तर आम्ही आमच्या मुलखातून तुमच्या येण्याची व्यवस्था करू असे आश्वासनही दिले. परंतु, यावेळी तयमुरचे आसन अस्थिर असल्याने त्याने राजपुतांना साफ नकार कळवला. अफगाण बादशहाने मदत नाकारल्याने राजपूत काहीसे नाराज झाले. मात्र मोगल दरबारातील असंतुष्ट उमरावांना हाताशी धरण्याच्या त्यांच्या प्रयत्नास बऱ्यापैकी यश प्राप्त झाले. हमदानी तर त्यांना उघडपणे येऊन मिळाला होताच, पण त्यासोबत महादजीसोबत असलेल्या मोगल फौजेतील कित्येक अंमलदारही अंतस्थरित्या त्यांना सामील झाले. सारांश, पानिपतपूर्व शुक्रताल येथे जी दत्ताजीची परिस्थिती होती तशी आता महादजीची बनली. आता गरज फक्त अब्दालीची होती. मात्र, यावेळी अब्दालीची भूमिका बजावण्याची संधी इंग्रजांकडे चालून आली असतानाही त्यांनी या संघर्षात उघड भाग घेण्याचे टाळले. अन्यथा, शुक्रताल नंतर बुराडी येथे दत्ताजीची जी गत झाली अथवा पानिपतावर भाऊच्या फौजेचे जे झाले तेच यावेळी शिंद्याच्या सैन्याचे झाले असते.
जून – जुलैमध्ये वृंदावन येथे असलेला मानसिंग, महादजीच्या निरोपावरून त्याच्या छावणीत दाखल झाला. जयपूरकर पैसे देत नाहीत तर मानसिंगला गादीवर बसवून त्याबदल्यात पैसे उकळण्याचा महादजीने निर्धार केला. दरम्यान, जयपूर – जोधपुरच्या फौजा एकत्र येऊन त्यांना हमदानी देखील मिळाल्याने युद्धाचा प्रसंग उपस्थित झाला. ता. २८ जुलै १७८७ रोजी लालसोटची लढाई घडून आली.
#लालसोटच्या_संग्रामाचे_विश्लेषण :-
शनिवार २८ जुलै १७८७ रोजी लालसोट येथे शिंदे – मोगल यांची संयुक्त सेना जयपूर – जोधपुरकरांच्या समोर ठाकली. दोन्ही बाजूंनी सैन्यरचना कशा प्रकारे केली होती याची माहिती सध्या तरी मला उपलब्ध झाली नाही. परंतु, एक गोष्ट स्पष्ट आहे कि, युद्धक्षेत्राचा विस्तार हा कित्येक मैलांचा असून प्रतीपक्ष्याचे सर्व प्रमुख योद्धे, सेनानी रणात हजर होते तर खासा महादजी शिंदे आपल्या राखीव सैन्यासह आघाडीवरील सैन्य आणि छावणी यांच्यादरम्यान उभा राहिला होता. पानिपतमध्ये अब्दालीने मागे राहण्यात जी चतुराई दाखवली होती त्याचे एकप्रकारे महादजीने अनुकरणच केले असे म्हणावे लागते. चुकांमधून शिकत जाणारीच माणसे पुढे महत्पदास जातात, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
पहाटे सूर्योदयानंतर केव्हातरी दोन्ही बाजूच्या सेना रणभूमीवर झेपावल्या. दुपारी बारा वाजेपर्यंत दोन्हींकडून तोफखान्याचे युद्ध झाले. अखेर मारवाडच्या फौजांनी अंबुजी इंगळेवर घोडदळासह हल्ला केला. त्यावेळी धारराव शिंदे, रायाजी पाटील, खंडेराव हरी इ. च्या मदतीने अंबुजीने हा हल्ला परतवून लावत आपला मोर्चा कायम राखला. दुसऱ्या बाजूला जयपूरकर व हमदानी यांची राणेखान सोबत झटापट चालली होती. याही मोर्च्यावर मुख्यतः तोफांचे युद्ध झाले. राणेखानच्या नेतृत्वाखाली असलेल्या सैन्यातील बव्हंशी अंमलदार शत्रूला फितूर झालेह होते. त्यामुळे त्यांनी युद्धाला सुरवात होताच लांब पल्ल्याच्या तोफा वापरात न आणता हलक्या तोफांचा मारा जयपूरकरांवर चालवला. आपल्या तोफखाना अधिकाऱ्यांची हि चलाखी राणेखानच्या लक्षात येण्यास बराच वेळ लागला. शत्रूसैन्यावर तोफांचा अविरत मारा होऊनही ते आपल्या जागी स्थिर असल्याचे दिसून आल्यावर राणेखानने अधिक चौकशी केली असता, शत्रूसैन्य तोफेच्या टप्प्याबाहेर असल्याचे समजले. तेव्हा त्याने तोफखाना अधिकाऱ्यांना याचे कारण विचारताच त्यांनी लांब पल्ल्याच्या तोफा वापरता न आणल्याचे मान्य केले. माझ्या मते, सैन्यात फितुरी झाल्याचे याच वेळी खरेतर उघड झाले होते आणि या गोष्टीची जाणीव राणेखान तसेच महादजीलाही झाली होती. याचे प्रत्यंतर, या संग्रामात शिंद्यांनी घेतलेल्या सावधपणातून दिसून येते. राणेखानाने आपल्या अधिकाऱ्यांना लांब पल्ल्याच्या तोफांचा मारा करण्याची आज्ञा केली. त्यानुसार दोन मोठ्या तोफा सुरु करण्यात आला. त्यांपैकी एका तोफेने हमदानीचा बळी घेतला. हमदानीच्या मृत्यूने शत्रूची विशेष अशी हानी झाल्याचे दिसून येत नाही. त्याच्या पश्चात त्याचा पुतण्या – इस्माईल बेग याने – हमदानीच्या सैन्याचे नेतृत्व केले. शिंद्यांच्या सैन्यातून लांब पल्ल्याच्या तोफांचा मारा झाल्याने जयपूरकर व इस्माईलणे आपल्या डावपेचात बदल केला. शिंद्यांच्या लहान तोफांचा अविरत मारा होऊन त्या तापून निकामी झाल्यावर ते राणेखानच्या मोर्च्यावर चालून जाणार होते. परंतु, त्यांनी आपला आधीचा बेत साफ बदलून आहे त्याच ठिकाणी पण तोफांच्या टप्प्याबाहेर राहाणे पसंत केले. परिणामी, राणेखानच्या मोर्च्यावर प्रत्यक्ष असे हातघाईचे युद्ध घडून आलेच नाही. रात्र पडेपर्यंत उभय पक्षांनी एकमेकांवर दुरूनच तोफगोळे डागण्यात समाधान मानले व दिवस मावळल्यावर रणभूमीवर निवडक लष्करी पथकांच्या चौक्या नेमून मुख्य सैन्यास विश्रांतीसाठी गोटांत पाठवून दिले.
दुसऱ्या दिवशी सकाळी महादजीची पथके लढाईच्या तयारीने युद्धभूमीवर गेली खरी पण शत्रू सैन्य यावेळी आपल्या छावणीबाहेर पडले नाही. त्यांनी आपल्या तळाभोवती खंदक खोडून बचावाचा पवित्र स्वीकारल्याने महादजीचा निरुपाय झाला. त्याने आपली सेना मागे बोलावली. सोमवार दि. ३० जुलै रोजी महादजीचा सरदार डीबॉईनच्या आठ पलटणींनी थकीत पगारासाठी गोंधळ केला. महादजीने त्यांची हरतऱ्हेने समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु, ३१ जुलै रोजी ती सर्व पलटणे छावणी सोडून जाऊ लागली. हि बातमी मिळाली त्यावेळी महादजी आपल्या प्रमुख सल्लागारांसह बैठकीत गुंतला होता. पलटणे निघून जात असल्याचे समजल्यावर पुढील अनर्थाचे चित्र सर्वांच्या समोर स्पष्टपणे दिसू लागले. पाठोपाठ जयपूरकरांची फौज लढण्यासाठी बाहेर पडत असल्याच्या बातम्या हेरांकडून येऊ लागल्या. तेव्हा प्रसंग जाणून यावेळी सर्वांनी अक्षरशः जीवावर उदार होऊन लढण्याची तयारी केली. परंतु, महादजीच्या सुदैवाने त्या दिवशी जयपूरकरांना युद्धप्रसंग करण्याची बुद्धी झाली नाही. मात्र, रात्र पडल्यावर शिंद्यांची जी पलटणे जयपूरकरांकडे गेली होती त्यांनी शिंद्यांच्या छावणीच्या रोखाने काही काळ तोफांचा मारा करून आपल्या नव्या धन्यासमोर स्वामीनिष्ठेचे प्रदर्शन केले. यावेळी स्वतः महादजी चिलखत परिधान करून लढून मरण्याच्या इराद्याने रणभूमीकडे निघाला होता पण शिवाजीपंत बापू व राणेखान यांनी त्यास समजावले व त्याच रात्री लालसोटमधून माघार घेण्यासाठी महादजीचे मन वळवले. शिंद्यांच्या फौजांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन माघार घेण्यास आरंभ केला खरा, पण जयपूरकर महादजीला सुखासुखी माघार थोडी घेऊ देणार होते ?
महादजीसोबत मयत मोगल उमराव अफरासियाबखानाचे कुटुंब, बुणगे होते. त्याशिवाय काही बादशाही पथके व पलटणी, रावराजा माचेडीकराची फौज आणि महादजीचे दक्षिणी – हिंदुस्थानी सैन्य होते. माघार घेताना सडी फौज जयपूरकरांच्या तोंडावर ठेऊन महादजी स्वतः मागे राहिला आणि बुणगे, पलटणी, अफरासियाबखानाचे कुटुंब, तोफखाना व दारुगोळा त्याने जाट राजा रणजीतसिंगांच्या मुलखाकडे लावून दिले. यावेळी फितुरांनी महादजीच्या सैन्यातील दारूगोळ्याचा साठा उडवून देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा निर्माण झालेल्या गोंधळात शिंद्यांच्या पेंढाऱ्यांनी स्वतःच्याच सैन्यातील बाजार व बुणगे लुटले. गोंधळ कानी पडताच महादजीने जातीने सर्वांची व्यवस्था लावून त्यांना मार्गस्थ केले. त्यानंतर काही वेळाने तळास अग्नी देऊन महादजी निघून गेला व उर्वरित सैन्य घेऊन महादजीची पाठराखण करत राणेखान निघाला. ता. १ ऑगस्ट रोजी पिंपळाईस महादजीचा मुक्काम पडला. त्यावेळी बादशाही पलटणांनी थकीत पगारासाठी अडवून आणले. महादजी त्यांची समजूत काढत होता पण ते काही ऐकायला तयार नव्हते. पाठोपाठ राणेखान पिछाडी सांभाळत आला. त्याने हा प्रकार पाहून महादजीला पुढे पाठवले आणि पलटणांना चार शब्द सुनावून त्यांना काबूत आणले. या पलटणी व उर्वरीत फौज घेऊन राणेखान महादजीच्या पाठोपाठ निघाला. दरम्यान जयपूर व जोधपुरच्या फौजा आणि इस्माईल बेग महादजीच्या पाठीवर वेगाने चालून येत असल्याच्या बातम्या आल्या तेव्हा एकप्रकारे जीव मुठीत घेऊन शिंद्यांच्या फौजा मोठ मोठ्या मजला मारत डिगेस आल्या. त्या ठिकाणी जाट राजा रणजीतसिंगाने महादजीस आश्रय दिल्याने त्याचा निभाव लागला.
महादजीच्या या पराभवाने व माघारीने काय अनर्थ ओढवला याचे वर्णन दिल्लीतील पेशव्यांचा वकील हिंगणे याने नाना फडणीसला पुढीलप्रमाणे कळवले :- ( स. १७८७, जुलै – सप्टेंबर ) “ लालसोटच्या लढाईत सरकारची फत्ते होऊन नक्ष बराच जाला, परंतु पलटणांनी फितूर केला त्यावरून आपल्या फौजेस धीर न पुरे. त्याजवरून सर्व लष्कर संभाळून पाटीलबावा माघारा आले हे वर्तमान ऐकून चहुंकडे लोकांनी गव्हार गर्दी केली. गुलाम कादिराने तमाम मेरट आदिकरून अंतर्वेदीतील सरकारचा अंमल उठवून आपला बंदोबस्त केला, आणि आपण दिल्ली समीप शहादरियास आला. हे वर्तमान ऐकून शितोळे व निजामुद्दीन दिल्लीहून पातशहांस न पुसता रात्रीचे पळून गेले. त्या समयी त्यांचे वस्तभाव वीस उंटे दिल्लीच्या सोद्यांनी लुटून घेतली. गुलाम कादिराने येऊन पातशहाची भेट घेतली. पातशहाने त्याचा सन्मान केला. तो मीरबक्षीगिरीची वस्त्रे मागतो. पाणिपतपासून आग्र्यापावेतोची दरोबस्त ठाणी उठोन गेली. अवघ्या मुलखांत मराठा दृष्टीस न पडावा ऐशी बदमामली जाली. जैसा मुलुख मेळविला तैसाच गमावला. पाटीलबावा अलवारेस गेले, तेथे रावराजाने एक लाख खर्चास व अलवार किल्ला सरंजाम सुद्धां राहवयास खाली करून दिला. तेथे अंबुजी इंगळ्यांचा बंदोबस्त आहे. ता. ५ सप्टेंबर रोजी गुलाम कादिर दोन हजार रोहिले समागमे घेऊन पातशहाचे दरबारास गेले, खिजमद द्या म्हणून विनंती केली. खानाचे नेत्र आरक्त बेबदल पाहून बादशहांनी दबून मीरबक्षीची वस्त्रे इनायत केली . खानाजवळ तरवारीची नजर करावयास एक मोहोर पाहिली तर कोठे न मिळाली, हे अवस्था मीरबक्षीगिरीची आहे. तमाम मुत्सद्दी व लोक दिक्क व नाखूष जाले. कोणी कोणी बोलले की, मीरबक्षीगिरीस गुलाम कादिर योग्य नाहीत. त्यावर पातशहा बोलले, ‘ दिल्लीहून ब्याद कशी तरी काढून द्यावी इतकाच मला विचार आहे. नाही तर रोहिल्याने शहरावर हात घातला तर येथे संभाळणार कोण आहे ? याजकरितां यास येथून संतोषाने काढून द्यावे. समरूचे बेगमेनेही गुलाम कादिराची ताबेदारी करावी, याप्रमाणे कारभार ठरला. “ ( संदर्भ ग्रंथ :- मराठी रियासत खंड – ७ ) महादजीप्रमाणेच हिंगणे देखील लालसोटच्या लढाईत मराठी सैन्याचा विजय झाल्याचे लिहितो. परंतु, फितुरीमुळे महादजीने माघार घेणे, अंतर्वेदीतील ठाणी उठली जाणे, दिल्लीजवळच्या भागात मराठी माणसाचे अस्तित्वच न दिसणे इ. गोष्टी काय सुचवतात ? या सर्वांचा अर्थ उघड आहे कि, लालसोट येथून महादजीला माघार घेणे - पळून येणे भाग पडले होते.
ऐतिहासिकदृष्ट्या लालसोटची लढाई ही काही फारशी प्रसिद्ध नाही. याचे कारण म्हणजे हि लढाई निकाली निघाली नाही, त्याचप्रमाणे पराभवाचा रंग दिसताच महादजीने सावधपणे बचावाचे युद्ध खेळत यशस्वी माघार घेतल्याने मोठा अनर्थ टळला. वस्तुतः, राजपूत – मोगलांनी यावेळी निकराने महादजीवर हल्ला चढवला असता तर उत्तरेतून मराठ्यांची प्रस्थापित असलेली सत्ता मोडकळीस आली असती. प्रसंग इतका बाका होता कि, काही काळ आपण यातून वाचत नाही असे वाटून महादजीने लढता – लढता मारण्याचा निश्चय केला होता. मात्र सोबत्यांनी चार शब्द समजुतीचे सांगितल्याने महादजीने आपला निर्णय रद्द केला. त्याच वेळी दैवानेही त्यास साथ दिली. ता. ३१ जुलै रोजी तळ उठवताना राजपुतांनी शक्य असूनही महादजीवर चढाई न केल्याने त्याचा बचाव झाला. असो, लालसोटच्या प्रकरणातून एक बाब मात्र प्रकर्षाने लक्षात येते व ती म्हणजे, मराठी सरदारांमधील एकीची भावना हळूहळू लयास जाऊ लागली होती. एकाच वेळी दक्षिण – उत्तरेत दोन मोठ्या महिमा चालू असताना या दोन्ही ठिकाणच्या मोहीम चालकांमध्ये अजिबात ताळमेळ नव्हता. टिपूवरील मोहिमेसाठी नानाने हाताशी असलेले बव्हंशी सरदार लोटले होते, त्याउलट उत्तरेत प्रसंगी महादजीच्या कुमकेसाठी जाईल असा एकही फौजबंद सरदार जवळपास हजर नव्हता.
स. १७८५ मध्ये महादजीजवळ असलेल्या सैन्याची आकडेवारी मराठी रियासत खंड – ७ मध्ये दिलेली आहे ती अशी :- ७३,००० स्वार ; ६२,००० पायदळ ; ८१,००० गोसावी व बैरागी ; ४,००० प्यादे. फौजेचा हा आकडा अवास्तव वाटत असला तरी कमीत कमी १ लाख सैन्य महादजीकडे असावे असा तर्क बांधता येतो. अर्थात, हि आकडेवारी निव्वळ शिंदेशाही सैन्याची आहे कि, यामध्ये बादशाही सैन्याची गणती करण्यात आली आहे याची स्पष्टता सरदेसाई यांनी केलेली नाही. असो, एवढ्या मोठ्या सैन्याचा खर्च चालवणे शांतता काळात देखील तसे बिकट कार्य आहे, तर त्यावेळच्या धामधूमीत महादजीला आपल्या लष्करास वेळेवर पगार देता आला नाही यात आश्चर्य ते काय ? महादजीच्या पदरी असलेले हे सर्व सैन्य लालसोटच्या मोहिमेत सहभागी झाले नव्हते. शिंद्यांच्या जहागिरीच्या प्रदेशात – म्हणजे पंजाबपासून पार जांबगाव पर्यंत ठिकठीकाणी या सैन्याच्या तुकड्या विखुरलेल्या होत्या. लालसोट मोहिमेत महादजीच्या अधिपत्याखाली एकूण किती सैन्य सहभागी झाले होते याची विश्वसनीय माहिती मिळत नाही. परंतु ते पन्नास हजारपेक्षा कमी नसावे असे अनुमान बांधता येते. कारण महादजीसोबत यावेळी त्याची स्वतःची फौज अपवाद केल्यास बादशाही पथके, माचेडीकराची पथके देखील सहभागी झालेली होती. लालसोटवर शत्रूचा जमावसुद्धा पन्नास हजारांवर होता, हे लक्षात घेता पानिपतच्या खालोखाल म्हणण्यापेक्षा त्याच्या बरोबरीचा हा प्रसंग असल्याचे दिसून येते.
लालसोट प्रकरणाने कवायती पलटणांच्या निष्ठेचाही मुद्दा खरे तर याचवेळी ऐरणीवर आला होता. हि पलटणे किती विश्वासाची आहेत हे याच वेळी प्रामुख्याने सिद्ध झाले होते. परंतु यामुळे मराठी सरदारांचे डोळे न उघडल्याने दुसऱ्या व तिसऱ्या इंग्रज – मराठा युद्धांत त्यांना सडकून मार खावा लागला.
संदर्भ ग्रंथ :-
१) मराठी रियासत खंड - ७ :- गो. स. सरदेसाई

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...