विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 22 April 2020

11 माशी मराठा व 12 माशी मराठा म्हणजे काय?



११ माशी
अक्करमाशी असा उल्लेख असा येतो.
आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवावरून व व्यावहारिक गोष्टींवरून रजपुतांचे व मराठयांचें मिश्रण पुष्कळ अंशी झालें आहे असें दिसतें. कांही मराठयांची आडनांवेंहि रजपूत दिसतात. उदाहरणार्थ - अहिरराव चांडेल, गुजर, कदम, कलचुरे, लाड, पवार, साळुंखे, शेलार, शिसोदे, यादव वगैरे. त्यांच्या रीतीभाती (उदाहरणार्थ, पुनर्विवाह न करणें, जानवें घालणें, पडदापद्धत, न्हाव्यामार्फत लग्ननिश्र्चय, मेजवानीच्या प्रसंगीं न्हाव्यानें पाणी देणें) रजपुतांप्रमाणें वाटतात. रजपूत राजघराण्याचे मराठे घराण्यांशीं शरीरसंबंध झालेले आहेत. अनहिलवाड येथील प्रसिद्ध राजा सिद्धराज जयसिंग याची आई गोवाकदंब घराण्यांतली मुलगी होती. शिवाजीचा आजा लखुजी जाधव, देवगिरीचे रामदेव यादव यांच्या वंशातला होता. मराठयांचा पिढीजाद धंदा लढण्याचा म्हणून म्हणतात. सांप्रत ते जहागीरदार, जमीनदार, दरबारी नोकर, व शेतकी करणारे आहेत. कित्येक मराठे संस्थानिक आहेत. त्यांच्यांत मुख्य दोन वर्ग आहेतः (१) अस्सल म्हणजे शुद्धबीजाचे व (२) इतर; यांत कुणबी व माळी या जातींचा समावेश होतो. तिसरा एक वर्ग आहे, तो म्हणजे दासीपुत्रांचा. त्यांनां लेकावळे, अक्करमासे 
असें म्हणतात. अस्सल मराठयांत मुलामुलींचीं लग्नें करण्याच्या वेळी फार विवक्षणा करावी लागते. तरी अस्स्ल मराठयाची मुलगी श्रीमंत कुणब्याच्या घरीं व श्रीमंत कुणब्याची मुलगी अस्सल मराठयांच्या घरीं असलेलीं अशीं कित्येक उदाहरणें दाखवितां येतील.
एवढाच उल्लेख सापडतो. जाणकारानी इतर माहिती दयावी.
स्त्रोत :: मराठे

4 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. शिवाजीचा आजा ?? लिहिताना आदर ठेवायला शिका की? छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा लखोजी जाधव असं नाही का लिहिता येतं ? शिवाजी महाराज काय वर्गमित्र होते का तसे लिहिलंय ? दुसऱ्याने जरी लिहिले असले तरी तुम्ही इथे टाकताना चुक सुधारली पाहिजे होती.

    ReplyDelete
  3. खुप छान माहिती दिली sir
    आपण खान्देश र रियासत चे रावल गढ़ी बंदल माहिती दया
    (करवंद गढी )

    ReplyDelete

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...