विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 8 July 2020

★ बांदल सेना ★

एका विशिष्ट वर्गाच्या योद्ध्यांचीच दखल आजवरच्या 'पक्षपाती' इतिहासकारांनी घेतली आहे त्यामुळे बांदल सेनेचा पराक्रम आजवर अंधारातच आहे...
पण खरा इतिहास हा ढगांनी झाकोळलेल्या सुर्यासम असतो जास्त काळ लपुन राहत नाही..."

पावनखिंड की शौर्य गाथा ...
1) घोडखिंडीतील तो इतिहास नेमका कुणाचा.?हिरडस मावळ खोऱ्याचा एक भाग असलेल्या रोहिड खोऱ्यातील त्रेपन गावाच्या देशमुखीतील एक छोटस गाव म्हणजे 'शिंद'. या गावातील वैज्यप्रभू यांनी बिदरच्या मिर्झा अलिबेरीद शहाकडून 53 गावचं वतन मिळवून हे घराणे 'देशपांडे' झालेलं. वैज्यप्रभू यांचे पुत्र पिलाजीप्रभू, त्यांचा पुत्र कृष्णाजीप्रभू आणि त्यांचा पुत्र बाजीप्रभू पण या रोहिड खोऱ्यातील त्रेपन गावाचे देशमुख होते ,ते बाजी बांदल देशमुख. अन् त्यांचे या त्रेपन्न गावातील गाव होते ते महूड. या देशमुखांच्या त्रेपन्न गावचा कारभार शिंद गावातून देशपांडे पहायचे.
म्हणजे हे देशपांडे बांदल देशमुखांचे कारभारी होते.! देशमुखीतले बाजी बांदल देशमुख आणि कारभारी बाजीप्रभू देशपांडे हे जवळपास समवयीन असेच होते.सिद्धी जोहर याचे आक्रमण झाले तेव्हा शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्यावर बहुतेक बांदल देशमुखांना सोबत ठेवल्याचा इतिहास आहे. कारण हिरडस मावळ खोऱ्यातील वाटा, पायवाटा, चोरवाटा यांची सर्व माहिती या लोकांना होत्या. त्यामुळे बिकट प्रसंगी हे लोक फायद्याचे ठरतील म्हणून राजांनी हा निर्णय घेतला होता. महाराज गडावरून निसटले तेव्हा बांदलाची ही फौज सोबत घेऊनच.घोडखिंडीत उभे राहून त्रेपन्न गावचे कारभारी बाजीप्रभू देशपांडे लढल्याचा इतिहास आपल्याला वाचायला मिळतो.! पण या त्रेपन्न गावचे मालक असलेले बाजी बांदल देशमुख हे याचं खिंडीत शहीद झाले.! मग त्यांच्या खिंडीतील पराक्रमाचा बोटभर का होईना इतिहास का वाचायला मिळत नसेल, याचे दुःख वाटल्याखेरीज राहात नाही.! की नेमके कोणाला फ्लॅश करण्यासाठी मुद्दामच कोणी इतिहासकारांनी तो लपवला असावा ,अशी शंका मनात येते.?विजापूरकडून सिद्धी जोहर आणि औरंगजेबाकडून शाहिस्तेखान ही एकाच वेळी स्वराज्यावर झालेली दोन्ही आक्रमणे शिताफीने परतावल्यानंतर शिवाजी राजांनी रायगडावर एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सदरील कार्यक्रमात शिवाजी महाराजांनी खिंडीतल्या पराक्रमाबद्दल बांदल देशमुखांचा मानाची तलवार देऊन सत्कार केल्याचा इतिहास आहे.! मग प्रश्न असा उपस्थित होतो की जर खिंडीतला पराक्रम जर बाजीप्रभू देशपांडे यांचा होता तर महाराजांनी देशपांडे घराण्याचा मानाची तलवार देऊन सत्कार करायचा सोडून तो बांदल देशमुख घराण्याचा का केला ??
★ बांदल सेना ★
●2)  "भूपा हिर्दसो भ्धुतः प्रभुत भिजन प्रियाः ॥
मज्जैत्र यत्राः कुवर्णाः प्रोल्लो सन्ति पदे पदे ॥"
अर्थ- "हिरडस मावळामधे लोकप्रिय असणारे राजेबांदल माझी विजय यात्रा यशस्वी करत,प्रत्येक पावलाला माझ्या सैन्याचा उत्साह वाढवीत आहेत."बांदलांच वरिल वर्णन दस्तुरखुद्द शंभुछत्रपतींनी केलंय...● "जैसे अंगद हनुमंत श्रीरामाला तैसे 'जेधे' 'बांदल' शिवाजीला"असं बांदलांचं वर्णन जेधे शकावलीत आलेलं आहे...या नावाचा संधी विग्रह बाण+दल= बांदल असा केला जातो.. म्हणजे तिरकामठ्याने(धनुष्यबाण) लढणारी सेना.- कृष्णाजी बांदल हिरडस मावळाचे म्हणजे आळंद ते उंबर्डे या क्षेत्राचे स्वतंत्र वतनदार..
- सन 1625 मधे बांदलांनी निजामाचा वजिर मलिक अंबरास हरवुन केंजळगड जिंकला.- 1636 मधे दादोजी कोंडदेव(आदिलशाही,विजापुर सल्तनत) याने कृष्णाजीं बांदल यांजवर हल्ला केला व पराभुत झाला...- पराभवानंतर दादोजीने कृष्णाजींना मसलतीस बोलावुन कपटाने कैद केले व खुन केला..- कृष्णाजींच्या मृत्युनंतर पत्नी दिपाऊ व पुत्र बाजी बांदल आपल्या बांदल सेनेसमावेत स्वराज्यास सामिल झाले..
- बांदल सेनेने स्वराज्यासाठी पुढील लढायांत योगदान दिल्याचे संदर्भ मिळतात... प्रतापगड युद्ध ( अफजलखान प्रकरण, पन्हाळगड वेढा ( सिद्दी जौहर प्रकरण)
   ▶ दक्षिण दिग्विजय मोहीम-पैकी प्रतापगड युद्धात कान्होजीराव जेध्यांसमावेत बांदल सेनेने महत्पराक्रम गाजविला यानंतर शिवरायांनी रुस्तम-ए-जम्याला हरवुन राजापुर व विशाळगड हस्तगत केला विशाळगडाच्या संरक्षणासाठी महाराजांनी बांदल सेनेला तैनात केले..
- तसंच पन्हाळगडच्या पायथ्याला पडलेल्या सिद्धीच्या फौजेला गुंगारा देऊन विशाळगडाकडे जाताना वाटेत गजापुरच्या खिंडीत अवघ्या तिनशे बांदल मावळ्यांनी सिद्दी मसुदच्या फौजेला रोखुन धरुन लढता लढता विरमरण पत्करले...
- यानंतर छत्रपतींनी राजगडदरबारी तलवारीच्या पहिल्या पानाचा मान रायजी नाईक बांदल यांना बहाल केला.- बांदल हे जन्मजात योद्धे होत, बांदलांच्या सेनेनं गजापुरच्या खिंडीत गाजवलेला पराक्रम अद्वितीयच आहे पण आम्ही कथा कादंबर्या वाचुन खिंड फक्त बाजीप्रभुंनीच लढवली असा समज करुन बसलो आहोत.  पण याच लढाईत शंभुसिंह जाधव आणि तिनशे बांदलदेखिल प्राणपणानं लढले होते,ज्या प्रमाणात बाजीप्रभुंचा उल्लेख होतो त्या प्रमाणात आजही बांदल सेनेचा किंवा शंभुसिंह जाधवरावांचा साधा उल्लेख होत नाही ही मोठी खंतच...
- दक्षिण दिग्विजय मोहीमेत रायजी नाईक बांदल छत्रपतिंसमावेत होते,मोगली सेनेने शिरुर-शिक्रापुर येथे केलेल्या लुटीमुळे रायजींनी विडा उचलुन मोगली फौजेवर हल्ला केला..- या शिक्रापुरच्या घनघोर रणसंग्रामात रायजी विरगतीला प्राप्त झाले...
- रायजीचे पुत्र सुभानजी यांना छत्रपतींनी मानाची तलवार बहाल केली.. तर अशी बांदल या नावाची ज्ञात गाथा " एका विशिष्ट वर्गाच्या योद्ध्यांचीच दखल आजवरच्या 'पक्षपाती' इतिहासकारांनी घेतली आहे त्यामुळे बांदल सेनेचा पराक्रम आजवर अंधारातच आहे...
पण खरा इतिहास हा ढगांनी झाकोळलेल्या सुर्यासम असतो जास्त काळ लपुन राहत नाही..."
- छत्रपतिंशी एकनिष्ठ असणार्या बांदल देशमुख घराण्यातील विरांच्या समाध्या पिसावरे ता.भोर,पुणे या गावी असुन इतिहासप्रेमींनी थोडी वाट वाकडी करुन आवर्जुन भेट देण्यासारख्याच आहेत...
- या शुर परंतु अपरिचीत योद्ध्यांना वंदन
 बांदलांनी शंभुराजांच्या काळातदेखील स्वराज्याशी इमान ठेवले होते
संदर्भ-
1- स्वराज्याचे शुर सेनानी:दामोदर मगदुम
2- जेधे शकावली:अ.रा.कुलकर्णी
3- शिवभारत:संपादक स.म.दिवेकर
4- बांदल तकरीर:संपादक ग.ह.खरे,ना.के.जोशी
3) बाजी प्रभू हे इतिहासा मध्ये
पावनखिंडीतच प्रकटले
हे प्रकरण संशयास्पद आहे!
पावनखिंडीत शुंभूसिंह जाधवराव आणि३०० बांदलांनी जीवाची परवा न करता हि खिंड लढवली.जेधे यांच्या कडे मानाच पान होत ते बाजी बांदलांना शिवरायांनी दिल.बाजी बांदल आणि फुलाजी बांदल यांनी खिंड लढवली .
शंभूसिंह जाधवराव ,बाजी बांदल आणि त्यांचे बंधू फुलाजी बांदल
यांना मानाचा मुजरा...💐💐💐

माहिती साभार:-maratha v. a. gavhane

1 comment:

  1. बांदलांनाही तोच मान मिळाला जो बाजीप्रभूना उलट "बांदल सेना" असा आवर्जून इतिहासात उल्लेख केला जातो त्यामुळे गव्हाणे साहेब आपण असा पक्षपात करू नये.
    मी स्वतः बंडलांच्याच मावळ प्रांतातील आहे

    ReplyDelete

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...