विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label सरदार थोरात. Show all posts
Showing posts with label सरदार थोरात. Show all posts

Tuesday, 26 July 2022

सरदार थोरात घराण्याचा इतिहास (भाग २)


 

सरदार थोरात घराण्याचा इतिहास
(भाग २)
* सरदार दमाजी थोरातांची स्वराज्यासाठीची कामगिरी- त्यांनी स्वराज्यासाठी पार पाडलेल्या कामगिरीची इत्यंभूत माहिती उपलब्ध नाही. पण ते रामचंद्र पंत अमात्य यांच्या दिमतीस देण्यात आलेल्या सरदारांपैकी एक असल्याने जिंजीच्या वेढ्याच्या प्रसंगी त्यांनी काहीतरी विशेष कामगिरी पार पाडली असावी किंवा त्याच काळात मोघल सरदारांविरुद्ध चालू असलेल्या रणधुमाळीत त्यांनी विशेष लौकिक प्राप्त केलेला असावा कि ज्याच्यामुळे छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना पाटस व सुपे प्रांताची जहागीर दिली. त्याशिवाय रुस्तुमराव हा किताब देऊनही त्यांचा गौरव करण्यात आला.
* 'रुस्तुमराव' या किताबाविषयी थोडस काही- मराठेशाहीच्या अथवा सुलतानशाहीच्या काळात मर्दुमकी गाजवणाऱ्या पराक्रमी वीर पुरुषांना व सरदाराना वेगवेगळे किताब व पदव्या देऊन गौरवण्यात येत असे. जसे कि झुंजारराव, प्रतापराव, हंबीरराव, इत्यादी.. असा किताब देऊन त्या सरदाराचा विशेष बहुमान करण्यात येई. दमाजींच्या अगोदरच्या काळात इतर कोणा मराठा सरदाराला हा किताब देण्यात आला होता का? (मराठा छत्रपतींकडून) या विषयी पुरेशी माहिती उपलब्ध नाही. पण दमाजीनंतर जाधव व कडू या मराठा समाजातील तर कोकरे व पांढरे या धनगर समाजातील सरदारांनी हा किताब अर्जित केल्याचे अस्सल पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे दमाजी हे मराठ्यांच्या इतिहासातील पहिला 'रुस्तुमराव' ठरतात.
* 'रुस्तुम' हे अत्यंत कडव्या व लढवय्या समजल्या जाणाऱ्या काबुलकडील पठाण या जमातीतील एका श्रेष्ठ वीराचे नाव आहे. त्यामुळे रुस्तुमराव या शब्दाचा अर्थ एक श्रेष्ठ वीर किंवा अत्यंत लढवय्या असाही घेता येऊ शकतो. दमाजींनी त्यांच्या या किताबाचा उल्लेख त्याच्या शिक्क्यात हि केलेला दिसतो. त्याशिवाय त्यांच्या नामे देण्यात आलेल्या कित्येक सनद पत्रांमध्ये हि दमाजी थोरात रुस्तुमराव असेच उल्लेख आढळतात. काही कागद पत्रांमध्ये त्यांचा 'दमसिंग' असाही उल्लेख आढळतो.
माहिती सौजन्य- श्री. संतोषराव पिंगळे

Monday, 25 July 2022

सरदार थोरात घराण्याचा इतिहास (भाग १)

 


सरदार थोरात घराण्याचा इतिहास
(भाग १)
अतिप्राचीन काळापासून हट्टी लोकांमध्ये सूर्यवंशी (सुर्य- उपासक) यांची परंपरा आहे. थोरात घराणे हे सूर्यवंशी असून गृह्यक/गुहिलोत या अतिप्राचीन टोळीसंघ/कुळातील आहे. थोरात या शब्दाची व्युत्पत्ती थोर+ हाते अशी असावी, कारण आजही काही मंडळी स्वतःची आडनावे थोरहात, थोरहाते अशीच लावतात. थोर म्हणजे 'महान' आणि 'हाते' म्हणजे 'हस्त' त्यामुळे महान कार्य करणाऱ्या कुळाचे लोक असा अर्थ असावा. त्या काळानुसार 'महान कार्य' म्हणजे नक्की काय हे सांगता येणार नाही.
प्रस्तुत माहिती हि श्री. संतोषराव पिंगळे यांच्याकडून प्राप्त झालेली आहे.
* थोरात घराण्याच्या माहितीसाठी पुरालेखागार, पुणे येथील अस्सल कागदपञ उदा. संरजामपञ, वतनपञ, सनदा, आज्ञापञ, राजपञ इत्यादी. छञपती सातारा व पेशवे दफ्तरातील अस्सल कागदपञांचा आधार घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि अनेक पराक्रमी व वीर पुरुषांच्या कर्तबगारीला वाव मिळून अनेक नवीन सरदार घराणी नावारूपाला आली. अनेक जुनी सरदार घराणी ज्यांचा पराक्रम आणि शौर्य यांच्या जोरावर बहामनी सुलतानशाहीची पाळेमुळे जेथे घट्ट झाली होती. तेथेच शिवाजीराजांच्या स्वराज्याच्या उद्दात्त हेतूने भारावलेली काही घराणी स्वराज्याच्या सेवेला दाखल झाली. त्या घराण्यापैकीच एक पुणे जिल्यातील हवेली तालुका हिंगणगावच्या थोरात पाटलांचं हट्टी- धनगर घराणं हि तीच कल्पना मनात साठवून स्वराज्याच्या सेवेला दाखल झालं.
* सरदार थोरात यांचे मूळ गाव मौजे हिंगणगाव ता सांडस प्रांत पाटस हल्ली पुणे जिल्हा हवेली तालुका. याच घराण्यातील एक वीर पुरुष येसाजीराव थोरात हे शिवाजी राज्यांच्या काळात स्वपराक्रमाने नावारूपाला आले. त्याबदलात महाराजांनी त्याला सरदारकी देऊन त्याचा गौरव केला. थोरात घराण्यात होऊन गेलेल्या वीर व पराक्रमी सरदारांची नावे सरदार येसाजी थोरात, देवजी, तावजी, संताजी, दमाजी रूस्तूमराव, चंद्रभान, खंडोजी रूस्तूमराव. मराठ्यांच्या इतिहासात जो बऱ्यापैकी स्मरणात राहिला.. त्याच्या बंडखोर वृत्तीमुळे.. त्या शूर सरदाराच नाव होतं..
'दमाजी थोरात रुस्तुमराव'.. (रुस्तुमराव) या नावाने त्याने मराठ्यांच्या इतिहासात ओळख निर्माण केली ती कायमचीच...
* दमाजींचा उदयकाळ- काही अस्सल शिवकालीन पत्रांमध्ये दमाजींचा उल्लेख येतो. त्यावरून ते शिवाजी राजांच्या काळातच नावारूपाला आला होतं हे स्पष्ट होत. शिवाजी राजांच्या शेवटच्या काही मोहिमांमध्ये ते सहभागी झाले असावे. असाही एक तर्क निघतो. पण खऱ्या अर्थाने दमाजींचा उदयकाळ हा मराठ्यांचा २७ वर्षे चाललेला स्वतंत्र संग्राम मानता येईल. याच काळात त्याच्या अंगच्या उपजत गुणांना व पराक्रमाला वाव मिळून दमाजी हे मराठ्यांच्या इतिहासातील एक मात्तब्बर सरदार म्हणून नावारूपाला आले. छत्रपती राजाराम महाराज जिंजी येथे असताना सरदार दमाजी यांस रूस्तूमराव हा किताब व सुपे व पाटस प्रांतांची जहागीर बहाल केली होती.
माहिती सौजन्य- श्री. संतोषराव पिंगळे

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...