विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 30 November 2023

#करवीर_संस्थानचे_छत्रपती_राजाराम_महाराज ( दुसरे )

 


#करवीर_संस्थानचे_छत्रपती_राजाराम_महाराज
( दुसरे ) 
लेखन :महेश पवार
यांना पुण्यतिथी निमित्त #विनम्र_अभिवादन !
छत्रपती शिवाजी महाराज, तिसरे ( बाबासाहेब महाराज ) यांना आपत्य नसल्यामुळे त्यांच्या मृत्यु नंतर सरदार पाटणकर घराण्यातील नागोजीराव ( राजाराम महाराज दुसरे ) यांना दत्तक घेऊन गादीवर बसवण्यात आले. त्या वेळी छत्रपती राजाराम महाराज अल्पवयीन असल्यामुळे त्या वेळचे ब्रिटिश रेसिडेंट कर्नल एॅंडरसन यांच्या सूचनेवरून कॅप्टन एडवर्ड वेस्ट यांची असिस्टंट रेसिडेंट म्हणून नेमणूक करण्यात आली, महाराजांच्या शिक्षणासाठी जमशेटजी नवरोजी ,उनवाला या पारशी शिक्षकाची नियुक्ती केली गेली.
छत्रपतींनी आधुनिक पद्धतीच्या इंग्लिश शिक्षणात खूप प्रगती केली. शिक्षणाबरोबरच बिलियर्ड्स ,क्रिकेट , शिकारी यांचीही त्यांना आवड होती. मुंबईमध्ये ड्यूक ऑफ एडिनबर्ग याच्या स्वागताच्या वेळी झालेल्या कार्यक्रमात सफाईदार इंग्रजीत भाषण राजाराम महाराजांनी केले होते. कोल्हापुरातील जनतेलाही आधुनिक शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी 1869 साली राजवाड्या शेजारी एका हायस्कूलची स्थापना केली; तेच सुप्रसिद्ध #राजाराम_कॉलेज होय. खर्या अर्थाने शैक्षणिक चळवळीचा पाया कोल्हापुरात राजाराम महाराजांनीच घातला.
1870 साली छत्रपती राजाराम महाराज युरोप दौऱ्यासाठी इंग्लंडकडे बोटीने रवाना झाले. या दौऱ्यात अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या,आॅक्सफर्ड सारख्या मोठ्या युनिव्हर्सिटींना भेटी दिल्या.एतिहासीक ठिकाणे व म्युझियम पाहिली. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये जाऊन लोकशाहीचे कामकाज कसे चालते ते पाहिले. पाश्चात्त्य देशांमधील खुले विचार व आधुनिकता पाहून राजाराम महाराज प्रभावित झाले त्यांनी स्त्रियांना देखील शिक्षण द्यायला हवे हा संकल्प केला.
इंग्लंडचा पाच महिन्यांच्या दौरा संपवून 1 नोव्हेंबरला राजाराम महाराज परतीच्या प्रवासाला निघाले. वाटेत जागोजागी थांबून त्यांनी अनेक स्थळे ,प्रसिध्द व्यक्ती यांना भेटी दिल्या. बेल्जियमच्या राजाशी त्यांनी भेट घेतली , त्याच वेळी त्यांना थंडीचा त्रास सुरू झाला. ऑस्ट्रियाच्या इन्सब्रुक येथे असतांना राजाराम महाराज यांची प्रकृती खूपच खालावली. इटलीची राजधानी फ्लोरेन्स येथे पोहोचल्यावर एका डॉक्टर कडून त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचे दिनांक 30 नोव्हेंबर 1870 रोजी निधन झाले .
इटलीमध्ये हिदु रितीरिवाजानुसार अंतिम संस्कार करू देण्यास कर्मठ ख्रिश्चन प्रशासनाने परवानगी नाकारली. पण इंग्लंडच्या राणीच्या इटलीमधील वकिलांनी मध्यस्थी करून , हिंदू रितीरिवाजानुसार अंतिमसंस्कार करण्याची परवानगी मिळवली. या अंत्ययात्रेत राजघराण्यातील परंपरेनुसार एका भव्य फुलांनी सजवलेल्या रथामध्ये राजाराम महाराजांचे पार्थिव ठेऊन; राजकीय इतमामात अंतिम संस्कार पार पडले. या अंत्ययात्रेत मध्ये फ्लोरेन्स शहरातील नागरिक, इटलीच्या मंत्रिमंडळातील सदस्य , इंग्रज अधिकारी मोठ्या संख्येने सामील झाले होते. राजाराम महाराजांचा आस्थिकलश फ्लोरेन्सच्या महापौरांनी कोल्हापूरवासीयांच्या हवाली केला . भारतात गंगा नदी मध्ये त्याचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
छत्रपती राजाराम महाराजांची अकाली निधन झाल्यानंतर त्यांचे दहन झाले त्या ठिकाणी फ्लोरेन्समध्ये सुंदर स्मारक उभारण्यात आले. त्याचे डिझाईन मेजर चार्ल्स मॅंट या सुप्रसिद्ध आर्किटेक्टने बनवले तर या चार्ल्स फुलेर या शिल्पकाराने महाराजांच्या लंडनमध्ये काढलेला फोटो वरून त्यांचा पुतळा बनवला. जवळपास चारशे एकर मोठा बगीच्या असलेल्या या जागेत राजाराम महाराजांचे स्मृतिस्थळ उभे आहे. येथे इटालियन , इंग्लिश , हिंदी आणि पंजाबी अशा चार भाषेत स्मृती फलक लावण्यात आले आहेत.
🙏🏻🙏🏻🌹विनम्र अभिवादन 🌹🙏🏻🙏🏻

१ डिसेंबर १७६४ “खूबलढा मरहट्टे”.

 


१ डिसेंबर १७६४ “खूबलढा मरहट्टे”....🚩
वारंवार कुरापती काढणाऱ्या हैदरचा पुरा बंदोबस्त करावा म्हणून मराठा फौज कर्नाटकात उतरली धुळपांचे मराठा आरमारही मदतीस बोलावले गेले हैदरचे बळ या मराठा फौजे पुढे कमी होते समोर समोर हैदर लढाई करतच नव्हता...
मराठ्यांचा गनिमी कावा जणू त्याने अंगीकारला होता बंकापुर, सावनुर येथेही चकमकी झाल्या शेवटी सारी मराठी फौज धारवाडच्या किल्ल्यासमोर आली दोन महिने नेटाने वेढा चालवून अखेर मराठ्यांनी शेवटी धारवाडच्या किल्ल्यावर मराठ्यांचा ध्वज फडकला हैदरच्या सैन्याला धर्मवाट देण्यात आली...
धारवाड घेतल्यावर मराठी फौज हनगळास आली १ डिसेंबर १७६४ रोजी हैदरच्या अनवडी येथील छावणीवर मराठ्यांनी हल्ला चढवला तुफान कापाकापी झाली मराठ्यांनी बेजरब घोडी चालवून झाडीत शिरून गारद्यांचे बुरुज फोडून हजार बाराशे कापून काढले पाच सातशे धरून आणले चहूकडून सारे उठले पाच सातशे तोफा होत्या त्याही आणल्या थोडेसे मैदान असते तर खास हैदर धरला असता.. झाडीने त्याला वाचवले आमचे फौजेत २५ ते ४० माणूस व ७५ घोडे पडले असेल मुरारराव घोरपडे यांनी मोठी मर्दुमकी केली...
या अनवडी लढाईत हैदर अलीचा मोठा पराभव झाला तो जीव वाचवून कसाबसा पलायन केले...

Wednesday 29 November 2023

बाजीराव या माणसाला एवढं वलय का प्राप्त झालं आहे?

 बाजीराव या माणसाला एवढं वलय का प्राप्त झालं आहे?

लेखन :: कौस्तुभ कस्तुरे



बाजीराव या माणसाला एवढं वलय का प्राप्त झालं आहे? मला अत्यंत गमतीची वाटणारी दोन तीन उदाहरणं देतो, माणूस कसा होता हे यातून निश्चित समजेल.
१७३६च्या अखेरीस बाजीराव अटेरच्या मोहिमेवर निघाले. वास्तविक या वेळेस अंतरवेदीत उतरून सादतखानाच्या प्रदेशात धुमाकूळ घालावा, आज अंतरवेदीत मराठ्यांची दहशत बसवावी एवढंच काय ते रायानी मनात ठेवलं होतं. अटेरवर हल्ला चढवून पुढे बाजीरावांनी आपले एक जबरदस्त सरदार मल्हारराव होळकर यांना यमुना ओलांडून पुढे पाठवलं. होळकरांसोबत त्यांचे सरदार विठोजी बुळे देखील होते. यमुना ओलांडून होळकर-बुळे कोळजळेश्वर किंवा आत्ताच्या जलेसरपाशी आले तोच सादतखानाने त्यांच्यावर तुफान हल्ला चढवला. बुळे जखमी झाले, आणि मल्हाररावांना जलेसरपासून माघार घेऊन पुन्हा यमुनेच्या अलीकडे यावं लागलं.
आता गंमत अशी, की सादतने ही बातमी महम्मदशाहला कळवताना लिहिलं, "हुजूर, मी बाजीरावाचा पराभव केलाय, असा की तो कधीच आता नर्मदा ओलांडून हिंदुस्थानात येणार नाही. त्याचे सरदार होळकर आणि बुळे मी मारलेत". बादशहानेही खुश होऊन सादतला हत्ती घोडे आणि पोशाख पाठवला. राव अटेरला होते. होळकर आणि बुळे माघारी आले तेवढ्यात सादतखानाने मारलेली बढाई रावांच्या कानी आली. "काय? आमच्या मल्हाररावांना आणि विठोजीरावांना मारेल इतका सादत कधी शूर झाला?" राव चमकले असावेत बहुदा, थोडेफार चिडलेही. बेडकी कितीही फुगली तरी तिचा बैल होत नाही, हे सादतखानाला आता दाखवून देऊ म्हणून जी मोहीम मुळात ठरली नव्हती ती रावांनी अचानक उघडली. कोणती? "बाजीराव नर्मदा उतरून येत नाही काय? रे मूर्खांनो, बाजीराव नर्मदा उतरून दक्षिणेत गेलाच नाही, आणि तो तुमच्या अंगणात येऊन बसतो की नाही पहा" म्हणून रायांनी थेट आपल्या फौजा बदनसिंग-चुडामण जाटांच्या मुलखातून थेट आग्र्याच्या पश्चिमेकडून दिल्लीत घुसवल्या. बाजीरावांचं वाक्य आहे, "सादतखानाने बढाई मारली की हरिभक्तास रेवापार होऊ देत नाही, त्याचा गैरसमज दूर केला पाहिजे".
रामनवमीच्या यात्रेत दिल्लीचे यात्रेकरू बाहेर आले होते, त्यांना "झाम्बडाझाम्बड" केलं म्हणजे धाक घातला, किंचित लूटमार केली असावी. ही लोकं आभाळ कोसळल्यासारखी दिल्लीत ओरडत सुटली, शत्रू आला, बाजीराव आला. बादशाहाला समजेना काय चाललंय, कमरुद्दीन आणि सादत आग्र्याच्या रोखाने होते. दुसऱ्या दिवशी अमिरखान वगैरे सरदारांना बादशहाने बाजीरावांवर पाठवलं, तेव्हा बाजीराव मालच्यावर होते, आणि पिलाजी जाधवराव हे वेशीवर. पिलाजींची लहानशी फौज पाहून अमीरखानाला चेव चढला, पिलाजींनी काढता पाय घेतला हे पाहून तो असुरी आनंदाने पाठलाग करू लागला. पण घटकाभरात त्याला सगळा खेळ समजला. सावज आपण आहोत आणि शिकारी बाजीराव, हे समजायला आता उशीर झाला होता. मुख्य फौजेत गेल्यावर पिलाजी एकदम मागे वळले. आता आमिरखानासमोर पंधरा वीस हजार मराठी फौज उभी होती. पुढे काय झालं हे सांगत नाही वेळेअभावी, पण एवढंच सांगतो की या मुघली फौजेला स्वतःच्या पायावर उभं राहता येत नव्हतं आणि दिल्लीच्या दुकानदारांनी मालाच्या खाटा रिकाम्या करून त्यांचा वापर स्ट्रेचरसारखा केला.काय लांडगेतोड केली असेल पहा. पुढे सादत आज कमरुद्दीन दिल्लीकडे येतायत म्हटल्यावर बाजीराव दख्खनकडे वळले. बादशाहाला या स्वारीत "बाजीराव काय आहे" हे पुरतं समजून चुकलं.
निजाम यावेळेस दक्षिणेत होता, बादशहाने त्याला उत्तरेत बोलवून घेतलं.नेमकी गम्मत म्हणजे बाजीराव दिल्लीहून दक्षिणेत येताना आणि निजाम उत्तरेत जाताना एकाच वाटेने येत जात होते. मध्येच निजाम मार्गावर आहे हे पाहून बाजीरावांनी पिलाजी जाधवरावांना निजामाच्या भेटीस पाठवलं. आता गम्मत पहा, जो निजाम बाजीरावांना हरवायला उत्तरेत जात होता तो प्रत्यक्ष बाजीराव समोर आल्यावर म्हणाला, "दिल्लीदरबारात माझ्या मुलाला चांगलं पद मिळावं म्हणून बादशहांची भेट घ्यायला जातोय मी, बरं झालं आपली भेट झाली".
बाजीराव दक्षिणेत आले, निजाम उत्तरेत गेला, आणि बादशहाकडून पैसा, माळव्याच्या सुभेदारीचं आमिष घेऊन तो दक्षिणेकडे निघाला. राव शेवटी राव होते, निजाम उत्तरेत जातानाच त्याला जोखलं होतं. तो नर्मदा उतरायच्या आत रावांनी फौजेनिशी जाऊन भोपाळला निजामाची रसद बंद केली.भोपाळचा प्रसंग मोठा आहे तो सगळा सांगत नाही, पण वर जी दुसरी गम्मत सांगतो म्हणालो ती इथे आहे. दिवसा निजामाने वेढा फोडायचा प्रयत्न केला की त्याला आत ढकललं जाई, जास्त मारगिरी होत नसे. रात्री जेवण झालं की शेकोटी पेटवून बाजीराव आणि साथीदार गप्पा मारत असत. काही लोक मोर्च्यात असत. असंच टाईमपास आणि गम्मत म्हणून रावांच्या फौजेतून निजामावर पेटलेले बाण सोडले जात. ते बिचारे दिवसभर लुटुपुटूची लढाई खेळून दमलेले असून रात्री झोपेच्या वेळेस कुठून, कसा, कधी एखादा पेटता बाण येईल, दारुकोठार भडकेल, राहुट्या जळतील याची काळजी करत बसलेला असे. हे जे मी सांगतोय तीही गोष्ट स्वतः बाजीरावांनी चिमजीप्पांना सांगितलेली आहे बरं, मनाचं काही नाही यात.
निजाम उगाच नाही रावांना "शहामतपनाह" म्हणजे शौर्यवान आणि मराठ्यांचं "रब्बूलनी" म्हणजे दैवत म्हणलेला. बाकी, बाजीरावांच्या या अशाच साऱ्या गमतीजमती शहामतपनाह मध्ये मी दिल्या आहेतच विस्तृत, संदर्भनिशी.
- कौस्तुभ कस्तुरे
(लेख हा अगदी सोप्या भाषेत ठेवायचा म्हणून संशोधकीय थाट दिला नाहीये, कोणाला एखादा संदर्भ हवा असल्यास कमेंटमध्ये विचारलं तरी चालेल).
*पुढील नकाशात अटेर कुठे आहे, जलेसर कुठे आणि दिल्ली कुठे हे लक्षात येईल. नकाशा पुस्तकातील असल्याने परवानगीशिवाय कोणालाही वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी.

Tuesday 28 November 2023

२८ नोव्हेंबर १६५७ दर्यास ‘पालाण’.

 


२८ नोव्हेंबर १६५७ दर्यास ‘पालाण’...🚩
शिवकाळातील अग्रगण्य बखरीचा लेखक कृष्णाजी अनंत हिरेपारखी सभासद यांनी शिवाजी महाराजांबद्दल एक सुरेख नोंद करून ठेवली आहे...,
पानियातील डोंगर वसवुन दर्यामधे गड वसविले गड जहाजे मिळवून “दर्यास पालाण राजियानी घातले जोवर पानियातले गड असतील तोवर आपले नाव चालेल ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र” हे तत्व शिवाजी महाराजांनी चांगलेच ओळखले होते स्वराज्याचा विस्तार हा झपाट्याने होत होता महाराजानी आता जावळी काबीज केली त्या पाठोपाठ उत्तर कोकण काबीज झाल्यामुळ॓ स्वराज्याच्या सीमा आता जंजीरेकर सिदद्याला भिडल्या होत्या जंजीरयाची मोहिम आता निघणार हे निश्चित होते राजांनी ही मोहिम रघुनाथपंत बल्लाळ यांच्यावर सोपवली...
शिवशाहीचा त्रिशुळ आता कल्याण-भिवंडी कडे वळाला महाराज स्वत: जातीने कोकणात उतरले ३ ओक्टोबर १६५७ रोजी महाराज कल्याणला पोहचले कल्याण-भिवंडी एकाच दिवशी म्हणजे २४ ओक्टोबर १६५७ या दिवशी काबिज झाली त्यानंतर महाराजांनी लगेचच एका महिन्याच्या आत २८ नोव्हेंबर १६५७ या दिवशी चौल काबिज केले चौल पाठोपाठ माहूलीचा किल्ला महाराजांनी घेतला महाराज आता दक्षिण कोकणात उतरले रत्नागिरी खारे-पाटण अशी ठाणी एकामागून एक स्वराज्यात दाखल झाली महाराजांचे लक्ष होते आता घेरियावर आणि विजय नाम संवत्सरात दुर्ग ताब्यात येताच महाराजांनी त्याचे नामकरण केले विजयदुर्ग दुर्ग भांडता करून राजांनी त्यास बळकट करण्याचे काम सुरु केले आता दर्या भवानीवर मराठयांची ठाणी अस्तित्वात आली होती कल्याण भिवंडी-पनवेल ह्या प्रदेशामधे सागाची झाडे मुबलक तेव्हा या लाकडाचा उपयोग करून याची तारवे बनवण्याचा निर्णय महाराजांनी घेतला सुरवातीलाच पोर्तुगिजांबरोबर वैर धरून त्यांच्या सागरी सार्वभौमत्वाला आव्हान महाराजांना द्यायचे नव्हते, म्हणून ही तारवी आपण सिदद्याच्या विरुद्ध वापरणार आहोत हे महाराजानी आधीच जाहिर करून टाकले...
“अशी आहे मराठेशाहीच्या आरमाराची पहिली वहिली सुरवात..…”
————————————
पोर्तुगीज मराठे संबंध : श्री पांडुरंग पिसुर्लेकर...

सरदार आवजीराव कवडे गढी

 

सरदार आवजीराव कवडे गढी
 
 
लेख व माहिती संकलित
संतोष झिपरे
( राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक) ९०४९७६०८८८
संदर्भ :-+ सोलापूर जिल्ह्यातील इतिहास, मराठा रियासत
पेशवे दप्तर, वैद्य दप्तर







 
 
 
 🌞🌞 सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात असलेले गुरसाळे हे गाव मराठ्यांच्या इतिहासात सरदार आवजीराव कवडे व सरदार महिपतराव कवडे यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे या गावात त्यांची राहती गढी साडेतीन ते चार एकर मध्ये असावी आज घडीला गढीचे अवशेष आपल्याला त्या भागात दिसून येतात पण ते राहण्या योग्य नाहीत याशिवाय सदर गढीचे जे तळघर आहे ते जवळजवळ एक एकर मध्ये असून सदर तळघर हे स्वच्छता व साफसफाई केल्यास वापरण्यायोग्य आहे पण स्थानिक पातळीवरील शिवप्रेमी वंशज व ग्रामपंचायत याचे याकडे दुर्लक्ष झाला आहे कवडे गढीच्या तळघर हे एक भुलभुलय्याचा प्रकार असावा कारण तत्कालीन काळात निजाम आणि मराठ्यांच्या संघर्षात निजामाकडून या भागात वारंवार हल्ले करण्यात येत होते म्हणून सदर गढीचे बांधकाम हे तळघरात मजबूत स्वरूपात बांधलेला आहे कारण या तळघरात धान्य शस्त्रसाठा वगैरे ठेवण्याची सोय असावी तसेच या काळात घरातून एक रस्ता फुटून पाठीमागील बाजूस असलेल्या चंद्रभागा नदीच्या पात्राकडे जातो जो नित्य नेमाने नदी तून पाणीपुरवठा करण्यासाठी वापरला जात असावा तसेच सदर गडढीही गावाच्या शेवटच्या टोकाला एका उंच टेकडीवर बांधण्यात आली आहे आणि पाठीमागील बाजूला असलेल्या चंद्रभागा नदी शेजारून वाहत असल्याने नैसर्गिक संरक्षण या घडीला लाभला आहे जवळजवळ कधी गडीच्या वरच्या टोकापासून ते चंद्रभागा नदीचे पात्र हे शंभर उंची वाटते मीटर तरी बसत असावं असं दिसते प्रवेशद्वारे हे दगडी बांधकामातील चिरोबिंद असून ते 30 फूट उंच आहे आज शिरल्यानंतर दोन्ही बाजूला चौकांची सोय असून जस जस आपण ग ढी च्या आत मध्ये फिरायला सुरुवात करून तेव्हा अनेक ठिकाणी मातीच्या राशी आपल्याला पडलेले दिसतात पण याचा अर्थ काय एवढी माती कशी प्रश्न मनात येत तरी होत नाही की इतक्या मोठ्या प्रमाणात माती इथे कसे तर सदर गढी ही तीन ते चार एकर परिसरात आहे या गढीवर पूर्वी 12 ते 18 बुरुजा असल्याचं सांगितले जातात तसेच जुन्या मंडळी जुने जाणकार मंडळी हे आपल्या लहानपणात सदर गढीच्या तटबंदीवरून पूर्ण गढीला फेरी मारत होते सदर गढीची तटबंदी ही चार फूट रुंद ते कुठे कुठे आठ फूट होऊन जाईल यावरून गढीच्या बांधकामाची मजबुती व लढाईच्या काळात गढी अनेक दिवस झुंजत ठेवण्याची तयारी या स्थापत्यशास्त्रातून पडली आहे असे दिसून येते आज घडीला गढीवर चिल्लारीची झाड काटाळ हीच उगवली असून सदर झाडांचे मुळे जमिनीत जाऊन तेथील तळघरास नुकसान करत आहेत याकडे गावातील स्थानिक मंडळींनी लक्ष दिलं पाहिजे होगा ग्रामपंचायतीने ऐतिहासिक ठेवा जोपासण्यासाठी पुढाकार घ्यावा साठी पुढाकार घेतला पाहिजे परिसरातील तुळशीवर्धन असून काही इमारतीचे अवशेष आजही दिसतात विशेष म्हणजे माझ्या बघण्यात आजवर अनेक गाड्या आल्या पण या गढीचे तळघर हे मला नेहमीच भुरळ पाडीत राहील इतकी सुंदर रचना व स्थापत्यशास्त्र या ठिकाणी दिसून येतं या तळघरात जाण्यासाठी व निघण्यासाठी विविध पायऱ्या आणि चोरवाटा आहेत ज्या आता उघडे पडू लागले आहेत..
झाडांच्या चिल्लरच्या झाडांचे मुलांमुळे तळघराच्या बांधकामाला भेगा पडून पावसाळ्यात पाणी गळत असावं असं दिसतं विशेष म्हणजे मे महिन्याच्या 14 15 तारखेला या ठिकाणी दिल्यामुळे भर उन्हाळ्यात दुपारच्या बारा ते तीन यावेळी सदर गडी पडल्यामुळे अनेक नवनवीन गोष्टी अभ्यासणे या ठिकाणी मिळाले

सरदार आवजीराव कवडे

 

भोपाळच्या लढाईनंतर आवजी कवडें यास पालखीचा मान पेशव्यांच्या कडून दिला होता.तसेच तसेच





सरदार आवजीराव कवडे यांचे दोन शिक्काचा उल्लेख वाचनात येतो त्यात दोन्ही शक्य हे वर्तुळाकार असून एकावर 🔥🔥
श्री
मल्हार चरणी तत्पर आवजी कवडे निरंतर🔥🔥
असा उल्लेख असून तर दुसरा शिक्का हा 🔥🔥
श्री
मार्तंड चरणी तत्पर आवजी कवडे निरंतर🔥🔥
असं आढळून येतो दोन्ही शिक्यातील उल्लेखावरून कवडे घराणं हे जेजुरीच्या खंडोबा भक्त होते असे दिसून येते येतील एका शिक्क्यावर सूर्य चंद्र कोरला आहे. . सरदार आवजीराव कवडे यांची पुतणे सरदार तुळाजीराव ऊर्फ तुबाजीराव यांचा उल्लेख ही इतिहासात सापडतोय तसेच काका पुतण्यातील वाद असलेले पत्र ही आढळून आले आहे याबद्दल त्यांनी पुण्याला पेशव्यांच्या दिवाणी तक्रार केल्याची उल्लेख सापडतो
छ. थोरले शाहू महाराजांच्या भाऊबंद पैकी मदनसिंह राजे भोसले यांचे पुत्र शंभू सिंह यांच्या इनाम जहागिरी मध्ये सरदारजी कवडे यांनी धुमाकूळ घातला सदर गोष्ट समजतात छत्रपती थोरले शाहू महाराजांनी का निवड केली व पेशव्यास समज दिला
छत्रपती प्रतापसिंह महाराज सातारा तर यांच्या हजरीतील सरदारांमध्ये नरसिंगराव जानराव कवडे या सरदारांचा उल्लेख सापडतो आणि सरदार आवजीराव कावळे यांच्या पराक्रमाबद्दल रियासतकार गो. स. सरदेसाई म्हणतात, 🌞🌞 ‘जोराने मुसंडी मारून वाटेल तिकडे गहजब उडवीत जाणारा निर्धास्त बंडखोर 🌞🌞असे वर्णन करतात.
आवजी कवडे पहिल्या बाजीराव पेशव्यांची घोडदळावर भिस्त असणारी सरदार होते
कुरकुंभची फिरंगाई देवी ही पेशवे घराण्याचे भक्ती स्थान होय . आवजी कवडेंचे सुपुत्र सरदार महिपतराव कवडे यांनी या मंदिराची चुर्णोद्धार केली. याच महिपतरावांनी पंढरपूर विठ्ठल मंदिरात देवाच्या दक्षिण बाजूस लक्ष्मीचे मंदिर बांधले आहे.
🌙🌙सरदार आवजीराव कवडे यांच्या जीवनातील लढाया व महत्त्वाचे प्रसंग🌙🌙
१) अजनूज येथील सरदारजी कवडे यांच्या वाड्यावर वाड्यावर पहिले बाजीराव पेशवा यांचे आगमन -सतराशे एकवीस
२) 1727- निजामाच्या पुण्यावर चालून आल्या तर पुण्यातून निजामाला घालवण्यासाठी सरदार आवजीराव कवडे यांनी निजामाच्या मराठवाड्यातील राजधानी असलेल्या औरंगाबाद भागात धुमाकूळ घातला यामुळे निजाम निघून औरंगाबाद कडे वळला
३) मराठ्यांच्या अंतर्गत संघर्षा पेशव्यांच्या बाजूने सेनापती दाभाडे विरुद्ध लढाई 1730- 31
४) उत्तर कोकणात पोर्तुगाला विरुद्ध लढाईत सहभाग 1737
५) 20मे 1737 मराठ्यांनी तांदूळवाडी किल्ला जिंकला या लढाईत सहभाग
६) मनेरच्या खाडीत पोर्तुगीलांना पळवून लावले की चिमाजी अप्पांसह या लढाईत सहभाग 20 मे 1737
अजनुज येथील
७) वराडु खानदेश या भागा त पहिल्या बाजीराव पेशव्यांसोबत विविध लढत सहभाग 1736 ते 1739
८) भोपाळ येथील भोपाळ येथील लढाईत निजामा फौजेवर सरदार यशवंतराव पवार व सरदार आवजीराव कवडे या दोघांनी हल्ला केला व प्रचंड कापाकापी केली
९) 6 जानेवारी 1738 निजाम मराठ्यांना शरण आला यावेळी सरदार आवजीराव कवडे त्या ठिकाणी उपस्थित होते
१०) 1741- 42 नानासाहेब पेशव्यांचा उत्तरेतील साऱ्यांमध्ये सहभाग
लेख व माहिती संकलित
संतोष झिपरे
( राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक) ९०४९७६०८८८
संदर्भ :-+ सोलापूर जिल्ह्यातील इतिहास, मराठा रियासत
पेशवे दप्तर, वैद्य दप्तर

Monday 27 November 2023

#स्वराज्याच्या_पहिल्या_महीला_सरसेनापती #श्रीमंत_उमाबाईसाहेब_दाभाडे

 


#स्वराज्याच्या_पहिल्या_महीला_सरसेनापती
लेखन :महेश पवार  

हिंदवी स्वराज्यासाठी अनेक मराठा घराण्यांनी बलिदान दिले. त्यामध्ये सेनापती दाभाड्यांच्या घराण्याचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. दाभाडे घराणे मुळचे गुजरातमधील डभई चे. या घराण्यातील बजाजी दाभाडे गुजरातमधून महाराष्ट्रात आले. त्यांचे पुत्र यसाजी हे शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते.
शिवाजी महाराजांच्या जवळच्या विश्वासू लोकांपैकी ते एक होते…येसाजी दाभाड्यांना खंडेराव व शिवाजी असे दोन पुत्र होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराजांबरोबर जिंजीच्या प्रवासात येसाजी, खंडेराव व शिवाजी हे तिघे होते. सन १६९७ च्या अखेरीस राजाराम महाराज परत निघाले असता, मुघल झुल्फिकार खानने जिंजीस वेढा घातला. राजाराम महाराज येसाजी व दाभाडेबंधूसोबत बाहेर पडले. मुघल त्यांचा पाठलाग करीत होते. खंडेराव व शिवाजी दाभाडे यांनी राजाराम महाराजांना सुरक्षित स्थळी आणले; पण वाटचालीतील दगदगीमुळे शिवाजी दाभाडे मरण पावले.
खंडेरावांना वेळोवेळी अनेक इनामे व वतने मिळाली. त्यांना एकूण १३ गावांची सरपाटीलकी म्हणजे जवळ जवळ ७०० गावांची देशमूखी मिळाली. याखेरीज पाटील, देशमुख, राजदेशमुख, सरदेशमुख, सरदेश कुलकर्णी, अठरा कारखान्याचे हवालदार, इनामदार, मोकासदार, सेनाखासखेल वगैरे हुद्देही त्यांच्याकडे होते.
पुढे ११ जानेवारी १७१७ रोजी छत्रपती शाहुमहाराज यांनी खंडेराव दाभाडे यांची नेमणूक मराठा सम्राजाच्या ‘सेनापती’ पदावर केली. याच सेनापती खंडेराव दाभाडे यांच्या उमाबाईसाहेब या पत्नी होत.
उमाबाई दाभाडे अत्यंत कर्तबगार , हुशार, शूर व जिद्दी होत्या त्या खानदेशातील अभोणकर देवराव ठोके देशमुख यांच्या कन्या होत.
लहानपणीच उमाबाईंनी घोड्यावर बसणे व तलवार चालवण्याचे शिक्षण घेतले. बालपणी एक दिवस करवीर संस्थानाच्या संस्थापिका ताराराणी यांच्या दागिन्याच्या डब्यातून त्याचे सोन्याचे तोडे उमाबाईंनी स्वतःच्या पायात घातले. हे पाहताच त्यांचे सासरे येसाजींनी त्यांना ताबडतोब काढून ठेवण्यास सांगितले. सोन्याचे तोडे घालण्याचा मान फक्त राजघराण्यातील स्त्रियांना असतो. तो दाभाड्यांना नाही असे समजाविले. जिद्दी स्वभावामुळे आपणही हा मान मिळवायचा, असे स्वप्न उमाबाईंनी बाळगले.
पुढे एका ज्योतिषाने पायात सोन्याचे तोडे घालतील; पण लोखंडाच्या साखळ्याही घालतील, असे भाकित केले व ते खरेही ठरले. खंडेराव व उमाबाई यांना त्रिबकराव, यशवंतराव व बाबुराव अशी तिन मुले होती. १७२९ मध्ये खंडेरावांचे निधन झाले. त्यांचे थोरले पूत्र त्रिंबकराव सेनापती झाले.
त्रिंबकराव व बाजीराव पेशवे यांच्यात चौथाईवरून वाद होता. गुजरातेत बडोद्यानजिक उभईयेथे १ एप्रिल १७३१ रोजी बोलाचाली व वाटाघाटी सुरू असता दोघामध्ये युद्ध सुरू झाले व त्रिंबकरावांचा त्यात अंत झाला. हे उमाबाईंना कळताच त्या रागाने चवताळून उठल्या व त्यांनी बाजीरावाच्या कृत्याचा सूड घेण्याचे ठरविले. त्या मागे लागताच बाजीराव छत्रपती शाहू महाराजांच्या आश्रयास गेले.
बाजीरावांना घेऊन शाहूमहाराज तळेगावास गेले व उमाबाईंचे सात्वन करून बाजीरावांना त्यांच्या पायावर घालून उमाबाईंचा राग शांत केला. यावेळी शाहूमहाराजांनी उमाबाईंना शुभचिन्ह म्हणून सोन्याचे सूर्यफूल दिले.
१७३२ मध्ये अहमदाबादेवर जोरावरखान नावाचा मोघल सरदार चाल करून आला. शाहु महाराजांनी उमाबाईंना त्याचे पारिपत्य करण्यासाठी अहमदाबादेस पाठविले. मराठी सैन्य अहमदाबादेस पोहोचले.
या सैन्याची सेनापती एक स्त्री आहे हे पाहून जोरावरखानाने उमाबाईंना एक पत्र लिहिले…,
‘तू एक विधवा आहेस, तुला लहान मुले आहेत. आम्ही तुला हरविले तर तुझ्या मुलांचा सांभाळ कोण करणार ?
आमच्या वाटेला येऊ नकोस. ज्या रस्त्याने आली आहेस त्याच रस्त्याने परत जा.’ हे पत्र वाचून उमाबाईंनी ठरविले, की लढाई जिंकुनच परत येईन. अहमदाबादच्या किल्याबाहेरच युद्ध सुरू झाले. पांढरा शुभ्र पेहराव परिधान केलेल्या उमाबाई प्रचंड सैन्याच्या गदारोळात रणांगणाच्या मध्यभागी हत्तीवर बसून लढत होत्या. त्यांच्याजवळ निरनिराळी शस्त्रे होती.
जोरावरखानाच्या प्रचंड सैन्याचा मावळ्यांच्या सहकार्यांने त्यांनी धुव्वा उडविला. हे पाहून जोरावरखान किल्याच्या आत जाऊन लपून बसला. किल्याचे दरवाजे आतून बंद केले. Umabai Dabhade दरवाजाच्या आत शिरायचे कसे हा प्रश्न पडला. तेंव्हा शत्रूच्या सैन्यातील मृतदेहाचे ढीग दरवाजाला लावून, एकावर एक रचून पेटवून दिले.
दरवाजा पडला व मराठा सैन्य आत शिरले. जोरावरखानला जेरबंद करून सा साताऱ्यास तळेगावी परतल्या.
अहमदाबादेतील शौर्यावर खूश होऊन छत्रपती शाहू महाराज हे उमाबाईंचा गौरव करण्यास तळेगावी आले. तळेगावात मोठा दरबार भरवण्यात आला. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना पांढरा शालू, पांढरी शाल, दाणेदार सोन्याच्या पाटल्या आणि खास तयार केलेले सोन्याचे तोडे सन्मानाने दिले. लहानपणी सोन्याचे तोडे घालण्याचे उमाबाईंचे स्वप्न पूर्ण झाले. त्या वेळेपासून वंशपरंपरेने तळेगावच्या सेनापती घराण्याला पायात सोन्याचे तोडे घालण्याचा मान मिळाला.
१७५१ मध्ये पेशव्यांनी दाभाड्यांना पुण्यात नजरकैदेत ठेवले होते. उमाबाईंनाही नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यातली काही मंडळी १६ नोव्हेंबर १७५१ ला कैदेतून पळाली, तेंव्हा उमाबाई व त्यांची सून अंबिका बाई यांना सिंहगडावर कैदेत ठेवले.
१४ फेब्रुवारी १७५२ ला उमाबाईंना पुण्यात आणण्यात आले.
शनिवारवाड्यानजिक ओंकारेश्वराजवळ नडगेमोडी येथे त्या राहिल्या. याच डेर्यात असताना २८ नोव्हेंबर १७५३ रोजी उमाबाईंचे निधन झाले. अशाप्रकारे मराठा साम्राज्याच्या पहिल्या महिला सेनापतीने जगाचा निरोप घेतला. इतिहास त्यांच्या शौर्याला कदापि विसरणार नाही.
लेखक :
सत्यशीलराजे दाभाडे, पुणे

बडोदा संस्थानचे दहावे महाराज #खंडेराव_गायकवाड_

 

बडोदा संस्थानचे दहावे महाराज
लेखन ::महेश पवार


खंडेराव महाराज हे सयाजीराव दुसरे यांचे तृतीय पुत्ररत्न होते. त्यांचा जन्म इसवी सन 1828 मध्ये झाला. ज्येष्ठ बंधू गणपतराव महाराज यांच्या मृत्यूनंतर ते 19 नोव्हेंबर, 1856 रोजी बडोद्याच्या सिंहासनावर विराजमान झाले. खंडेरावांना कुस्तीचा शौक आणि प्रेम होते आणि याचमुळे ते स्वतः बलदंड शरीरयष्टी राखून होते. बडोदा येथील खंडेराव मार्केट येथे त्यांचा असलेला पुतळा याची साक्ष आहे. खंडेराव महाराज या कारणांमुळे जनमानसात लोकप्रिय होते. ब्रिटिशांच्या कार्यशैलीनुसार त्यांनी संस्थानचा राज्यकारभार केला.
खंडेराव यांच्या कार्यकाळातच बडोदा संस्थानात रेल्वेमार्ग सुरू झाला. ही एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद घटना म्हणावी लागेल. ही रेल्वे मियागाम ते डभोई अशी मार्गक्रमण करीत असे. इसवी सन 1862 मध्ये सुरू झालेल्या या रेल्वेला गायकवाडांच्या बडोदा संस्थानची रेल्वे म्हणून ओळखले जाई. बडोदा संस्थानाला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी नर्मदा नदीतून पाणी बडोद्यापर्यंत आणण्याची महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी त्या वेळचे सुमारे 36 लक्ष रुपये खर्चून आखली होती. परंतु ती कारणपरत्वे यशस्वी आणि फलदायी ठरू न शकल्याने अपूर्णावस्थेत बंद करावी लागली व उर्वरित फंड हा गायकवाड महाराजांच्या ‘मकरपुरा’ या राजमहालाच्या उभारणीसाठी वापरण्यात आला. हा राजवाडा शिकारीच्या हौसेपायी खंडेराव महाराजांनी प्राण्यांच्या अभयारण्यानजीकच बांधला होता. खंडेराव महाराजांना हिर्याबद्दल प्रचंड आकर्षण होते. त्यांच्याजवळ सुमारे 129 कॅरेटचा मौल्यवान हिरा तसेच 79 कॅरेट चा मौल्यवान हिरा होता अशा नोंदी आहेत.
बडोद्याच्या राज्यकर्त्यांना ‘सेनाखासखेल आणि समशेरबहाद्दर’ अशा पदव्या छत्रपतींकडून दिलेल्या होत्या. गादीवर आलेले सगळेच राजे या किताबाचा आपल्या नावासोबत वापर करीत. सेनाखासखेलचा अर्थ होतो सैन्याचे सर्वाधिकारी अथवा प्रमुख आणि समशेरबहाद्दर म्हणजे शूर व तलवारीचे अधिपती. आधीच्या दोन्ही राण्यांपासून पुत्रप्राप्ती न झाल्याने त्यांनी 1866 मध्ये जमनाबाईसाहेबांशी विवाह केला. मात्र या राणीपासूनही त्यांना 1871 मध्ये कन्यारत्नच लाभले. परंतु दुर्दैवाने त्याआधीच खंडेरावांचे निधन झाले होते.
खंडेरावांनी तांब्याची विविध प्रकारची नाणी तसेच चांदीचीही नाणी पाडली होती. यात वर श्री, मध्ये छोटीशी फांदी आणि खाली ‘ख, गा’ ही नावाची आद्याक्षरे असलेली जाडसर तसेच पातळ अशी नाणी आहेत. यातील आद्याक्षरांच्या खाली आडवी तलवार पण आहे तसेच हिजरी सन पण छापलेले आहे. अजून एका नाण्यावर ‘ख गा’ या आद्याक्षरांसह आणि समशेरसमवेत अश्वाचा खूर (हेीीश हेेष) दर्शवलेला आहे. हे चिन्ह आपले घोडदळ समृद्ध आणि युद्धात तरबेज आहे, हे सिद्ध करण्यासाठी असावे. बंधू गणपतराव महाराज यांच्या नाण्याबरहुकूम खंडेरावांच्याही नाण्यावर ‘श्री ख, गा’, कळी आणि उभी तलवार छापलेली आढळते. तांब्याच्या नाण्यांत 1/2 पैसा, एक पैसा व दोन पैसे या मूल्याची नाणी छापलेली आहेत. चांदीच्या नाण्यांत 1/8 रुपया, 1/4 रुपया, 1/2 रुपया आणि एक रुपया या मूल्याची नाणी पाडलेली आढळतात. यांवरदेखील हिजरी सन, ‘ख, गा’ ही देवनागरीतील आद्याक्षरे आणि डावीकडे वळलेली तलवार छापलेली दिसते. तत्कालीन साचा बनवणार्याचे अज्ञान अथवा चूक म्हणा यातील तांब्याच्या काही नाण्यांवर दोन्हीही बाजूला ‘ख/गा’ छापले गेलेले आढळते. तर काही नाण्यांवर चक्क ‘गा / ख’ असेही उलट्या पद्धतीने छापलेले दिसून येते. या तांत्रिक चुकांपेक्षा ते नाणे वापरण्यासाठी उपलब्ध असणे हे तेव्हा महत्त्वाचे होते. म्हणून ही नाणी तेव्हा चलनात आली असावीत किंवा कदाचित त्या काळी बाद केलेली ही नाणी आता संग्राहकांसाठी उपलब्ध झाली असावीत.
अजून एका वेगळ्या धाटणीचे खंडेरावांचे तांब्याचे नाणे आढळते, ज्यावर डाळिंब या फळासदृश आकृती / चिन्ह छापलेले आढळते.
खंडेरावांनी अगदी सयाजीराव दुसरे यांच्याएवढी वैविध्यता असलेली नाही. परंतु त्यामानाने बरीच वेगवेगळ्या पद्धतीची नाणी पाडली, हे मात्र खरे. मात्र खंडेराव महाराजांच्या नाण्यांमधील अतिशय महत्त्वाचे पाडलेले नाणे म्हणजे पर्शियन लिपीतील नजराणा रुपया. या नजराणा रुपयासोबत त्यांनी 1/2 नजराणा रुपया पण पाडला होता. यातील एका नजराणा रुपयावर महाराजांचे नाव पर्शियनमध्ये ‘खंडेराव’ असे सुयोग्य पद्धतीने आहे.
त्यांनी आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे 28 नोव्हेंबर, 1870 पर्यंत चौदा वर्षे राज्यकारभार केला.

Sunday 26 November 2023

#मावळ्यांचा_शिवकाळातील_आहार..

 



इंग्रज प्रवासी आणि डॉ. जॉन फ्रायर, महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी रायगडावर उपस्थित होता. त्याने आपल्या प्रवासाचे वर्णन करून ठेवले आहे. त्यात मराठ्यांच्या खाण्याबाबतचा मजकूर आढळतो. तो लिहितो की,
"रायरी (रायगड ) वरील आमच्या मुक्कामादरम्यान घडलेला एक प्रसंग मी येथे सांगू इच्छितो . इथल्या लोकांचे जेवण अत्यंत साधे आहे आणि ते तयार करण्यासाठी फारसा खर्च देखील येत नाही. इथल्या लोकांचा परमोच्च आवडीचा पदार्थ म्हणजे "खिचडी " ( फ्रायर या पदार्थाला cutchery असे म्हणतो ! ) हा खिचडी नावाचा पदार्थ तांदूळ आणि डाळ एकत्र करून , हे मिश्रण लोण्यामध्ये शिजवून तयार केला जातो. या खिचडीवरच या लोकांचे पिळदार देह पोसलेले असतात. परंतु आमच्या सारख्या तिन्हीत्रिकाळ मांस खाण्याची सवय असलेल्या इंग्रजांचा फार काळ पर्यंत मराठयांची ही खिचडी खाऊन निभाव लागणे अशक्य होते , त्यामुळे आम्ही राजाला ( छत्रपती शिवाजी महाराजांना ) आमच्या समूहातील लोकांना पुरेल एवढे मांस रोज देण्याची विनंती केली. आमची ही विनंती मान्य करून शिवाजी महाराजांनी , गडावर थोड्याफार प्रमाणात असलेल्या मुसलमानांसाठी (फ्रायर Moors असा शब्द वापरतो . Moors म्हणजे मुसलमान ) मांस पुरवणाऱ्या खाटकाला , आम्ही गडावर असे पर्यंत आम्हालाही लागेल तेवढे बोकडाचे मांस (दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे मांस गडावर येत नसल्यामुळे ) पुरवत जावे अशी आज्ञा केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या या आज्ञेप्रमाणे हा खाटीक आम्हाला रोज बोकडाचे मांस पुरवू लागला . आम्हाला प्रत्येक दिवसाला साधारण पणे अर्धा बोकड लागत असे. आमच्या या दररोजच्या मागणीमुळे या खाटकाचा धंदा फारच जोमाने चालू लागला ! त्याला या गोष्टीचे एवढे आश्चर्य वाटले की , " एवढे मटण रोज खातंय तरी कोण ? " हे पाहण्याकरता वृद्ध असलेला हा खाटीक , गड चढण्याचे कष्ट सोसून एके दिवशी आम्हाला पाहायला आला ! गेल्या काही वर्षात त्याच्याकडून इतके मांस कोणीच विकत घेतले नव्हते ! याचे कारण म्हणजे या प्रदेशातील लोक फारच कवचित मांसाहार करतात; शिवाय हिंदू लोक ( फ्रायर येथे Gentiles असा शब्द वापरतो . Gentiles याचा अर्थ यहुदी नसलेले लोक असा होतो, सामान्यपणे इतिहासामध्ये हिंदूंना हा शब्द वापरतात ) अजिबातच मांस खात नाहीत आणि मुसलमान किंवा पोर्तुगीज लोक मांस चांगल्याप्रकारे उकडल्याशिवाय किंवा शिजवल्याशिवाय खात नाहीत . आपल्याप्रमाणे ( इंग्रजांप्रमाणे ) मांस फक्त भाजून असे क्वचितच कोणी खात असेल ! पण मला असे वाटते की मांस खाण्याची आपली ही पद्धत चुकीची आहे. खास करून या उष्ण देशामध्ये मांस नीट शिजवून खाल्ल्यास त्याचा पोटाला त्रास होणार नाही , परंतु आपला स्वभाव सतत धावपळ करण्याचा असल्यामुळे , आपण हे मांस शिजवण्याबीजावण्याच्या भानगडीत पडत नाही . पण माझ्या मते आपली पोटं बिघडण्यामागचे हेच कारण असावे हे अनुभवी लोकांच्या लक्षात येईल !"
यावरून आपल्याला असे वाटू शकेल की त्याकाळातील मराठे अजिबात मांसाहार करत नव्हते. पण तसे वाटणे चुकीचे ठरेल. हिंदू सुद्धा थोड्याप्रमाणात मांसाहार करत होते परंतु युरोपिअन लोकांच्या मांसाहार करण्याच्या तुलनेत ते नगण्य होते.
संदर्भ - Travels in India in the 17th century - Dr. John Fryer's Account of India
लेखन - सत्येन सुभाष वेलणकर, पुणे

जंगलीमहाराज मंदिर

 


जंगलीमहाराज मंदिर कसं निर्माण झालं ?
अक्कलकोट गुलबर्गा रोडवर अक्कलकोट पासून 7-8 किलोमीटरवर होनमुर्गी नावाचं एक गाव आहे. तिथे अल्लाबक्श हा मांत्रिक व जंगलिशा अहमदशा हा त्याचा चेला लोकांची काही किरकोळ कामे करून त्यावर गुजराण करीत असत. स्वामी समर्थ जसे अक्कलकोटात आले तसा यांचा धंदाच हळूहळू बसला. आता काय करायचं ? गुजराण कशी करायची ? या स्वामीचा काटा काढल्याशिवाय धंदा सुरळीत बसणारा नाही म्हणून जारणमारणाचा मंत्र टाकून अल्लबक्षने जंगलिशाची मूठ वळवून घट्ट केली व "इस स्वामी का काम तमाम कर देते है अब" असं म्हणत ती कापडात बांधलेली हाताची घट्ट मूठ घेऊन जंगलिशा तडक अक्कलकोटात आला. *वो स्वामी कहाँ है* असं विचारत चोळाप्पाच्या घरी स्वामी आहेत असं कळल्यावर तिथं आला. स्वामी अंथरूणावर पहुडले होते ते पाहून जंगलिशाने कापड सोडवून मूठ स्वामींचे दिशेने मारली तो काय ? वीज चमकावी तसं स्वामींनी जंगलिशाकडे क्षणभर चमकून पाहिलं व परत निवांत पडले. मूठ जंगलिशा वरंच उलटली. त्याला जागचा हलता येईना की पापणी हलवता येईना की थुंकी गिळता येईना. अर्घा तास तसाच गेल्यावर जंगलिशा भयंकर घाबरला. त्यानं मनातल्या मनात स्वामींची माफी मागितली व म्हणाला, *स्वामी मेरेकू बचाव* स्वामींना ते अंतर्ज्ञानाने कळलं. स्वामींनी त्याला मनातच उत्तर दिलं *मैने कुछ नही किया. ये तो दत्तमहाराज की किमया है* मग जवळची चिमूटभर माती घेऊन त्याचे दिशेने फेकताच जंगलिशा मोकळा झाला. पुढे जवळपास वर्षभर स्वामींची दिवसरात्र स्वामींची मनोभावे सेवा केली. एक दिवस पहाटे जवळ बोलावून स्वामींनी डोक्यावर वरदहस्त ठेवला तसा जंगलिशा देहभान विसरला व संपूर्ण अवस्थेत आला. स्वामींची आज्ञा घेऊन तिथून निघाला व अल्लाबक्षला भेटला. त्याला काही उपदेश केला. आता दोघांना जादूटोण्याची गरजच उरली नव्हती.
जंगलिशा तिथून निघाला तो फिरत फिरत सांगलित नदीकिनारी येऊन बसला. तिथे घाटावर जवळच एक रखमाबाई गाडगीळ नामक विधवा बाई कपडे धूवत होती व तिचा एकुलता एक मुलगा छोटा मुलगा वरखाली वरखाली धावत खेळत होता. खेळता खेळता एका उंच ठिकाणावरून तो खाली पडला व जागीच गतप्राण झाला. हे पाहून रखमाबाईचा धीर सुटला व तिनं हंबरडा फोडला. जवळपासच्या बायकापुरूषांनी तिची पुष्कळ समजूत घातली पण व्यर्थ.
मग एकजण म्हणाला की "तिथे कोणी अवलियासदृष्य मनुष्य बसलाय त्याकडं जा"
हो नाही करता करता लेकराचं कलेवर घेऊन ती माय जंगलिशासमोर आली. *हे जग नश्वर आहे त्याचा पाश तोड असं पुष्कळ तत्वज्ञान ऐकवलं* पण रखमामाय ऐकेना. "मला मुलगा देत असाल तर द्या तत्वज्ञान नको" असं म्हणाली.
जंगलिशाने स्वामींचे स्मरण करून मुलाला उठायची आज्ञा करताच झोपेतून उठल्यागत उठून बसला व भूक लागली म्हणाला. जवळपासच्या लोकांनी जयजयकार केला. रखमा म्हणाली "मला आता संसार नको. सेवा करायची आहे"
जंगलिशा तिला म्हणाले *आता मुलगा जिवंत झालाय. आता त्याचं सर्व कर, मग मी येईन*
ही बातमी लगेच राजवाड्यावर पटवर्धनांचे कानी गेली तसे राजेसाहेब स्वतः अदबीनं घाटावर येऊन जंगलिशाची वाड्यावर मुक्कामी यावं म्हणून विनवणी करू लागले.
तसं काही दिवस पटवर्धनांचे वाड्यावर काही दिवस मुक्काम केल्यावर आशीर्वाद देऊन स्वारी सातारा जिल्ह्यातील रेठरे बुद्रुक गावी आली. तिथे काही दिवस राहिल्यावर एकाजणाचा खून झाल्यावर उदास होऊन ते गाव सोडले व पुणे पलिकडील नदीतीरी भांबुर्डा गावठाणात येऊन राहिले. रोकडोबाचे मंदिरात मागे बसत असत.
पुढे या रखमाबाई गाडगीळही तेथे आल्या. त्या ज्ञानेश्वरीवर रोकडोबा मंदिरात उत्तम प्रवचन करीत असत. त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी त्यांचे अंगाखांद्यावर येऊन बसत असत.
रोकडोबाचे समोरील राम मंदिर रखमाबाई गाडगीळांनी वर्गणी व कर्ज घेऊन बांधले. आजही प्रदक्षिणा मार्गावर डावीकडे दत्ता पाध्येचे घरासमोर या रखमाबाईंची व त्यांच्या सेवेकरीणीची समाधी आहे.
जंगली महाराजांनी गावठाणातील अजाबलीची प्रथा बंद केली. दारूच्या नशेत बुडालेल्या गावाला त्यातून बाहेर काढले व देहूहून भजनीमंडळाला बोलावून जंगलिमहाराज भजनी मंडळाची स्थापना केली. गाव सुधारलं. दुपारी गावात भिक्षा मागत असताना फक्त शिरोळेंच्या गृहिणी न चुकता भिक्षा घालत.
एकदा शिरोळेंच्या बाजूचे दोन वाडे आगीत भस्म झाले व ज्वाळा वाड्याच्या दिशेनं पसरल्या तसे महाराज समोर बसून सोटा आपटत राहिले. शिरोळ्यांच्या वाड्याचा वासाही काळा झाला नाही..
पुढे राममंदिरावरचे कर्ज शिरोळ्यांनी सोडवले. तशी शिरोळे घराण्यावर महाराजांचा वरदहस्त कायम राहिला. तो आजही आहे.
1890 मध्ये महाराजांनी देह ठेवल्यावर हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण झालं. हिंदू म्हणाले अंत्यविधी हिंदू पध्दतीने तर मुस्लिम म्हणाले त्यांच्या पध्दतीने.
यावर परत देहात प्रवेश करून उठून बसले. म्हणाले "सर्व विधी हिंदू पध्दतीने व चौचौथऱ्याचा दगड मुस्लिम पध्दतीने" व परत झोपले. त्याप्रमाणे सर्व करण्यात आले. ही बातमी त्यावेळच्या केसरीत आली होती.
शिरोळ्यांपैकी एकांनी 1921 मध्ये महाराजांना पहायचं म्हणून दगड बाजूला सारला तर देह आतच ठेवलाय असा होता.
मग पूजा प्रार्थना केल्यावर डोळे उघडले आशीर्वाद दिला व "परत कोणीही कधीच दगड हलवायचा नाही ही आज्ञा दिली.."
पुढे मंदिर बांधताना पाया मिळेना तसे शिरोळ्यांच्या स्वप्नात जाऊन सांगितले पाया मिळणार नाही कारण ही नैसर्गिक टेकडी नाही तर बाजूची लेणी कोरताना जो दगडभुसा निघाला त्यानी बनली आहे
म्हणून साधं बांबूच्या बांधणीचं मंदिर बांधायला सांगितलं. ते आजतागायत तसंच आहे.
असो.
।। श्री गुरूदेव दत्त ।।
।। श्री स्वामी समर्थ ।।
अमोल तावरे के फेसबुक वॉल से साभार 🙏🙏

।।राजे महाडिक तारळेकर घराणे।।

 


।।राजे महाडिक तारळेकर घराणे।।
महाडिक घराणे हे सरष्लकर शहाजीराजे भोसले महाराज साहेब याचा सोबत होते.
सदर घराणे हे छत्रपती घराण्याशी कायम एकनिष्ठ असलेला होय. 🙏🙏१)कनोजीराव महाडिक
२)परसोजीराव महाडिक
३)हरजीराव महाडिक(निधन-१६८९) 🚩🚩हरजीराजे याचा विवाह १६६८ मध्य छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या कन्या व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कन्या अंबिकाबाई साहेब सरकार याच्या शी माँसाहेब जिजाऊ साहेब यांना लाऊन दिले दक्षिण भारतात हरजीराव यांच्या पराक्रम बद्दल छत्रपती कडुन राजे किताबं देण्यात आले तेव्हा पासुन महाडिक घराणे राजे महाडिक म्हणून इतिहासात उल्लेख आहे
तसेच हरजीराजे महाडिक यांना व्यंकोजीराव हे भाऊ होते.. 🚩🚩
४)शकंरजीराव .राजे महाडिक(१७२८)
५)अंबाजीराव राजे महाडिक
६)दुर्गाजीराव राजे महाडिक
७)कुसाजी राजे महाडिक
८)मानसिंग राजेमहाडिक
९)स्वरूपजि राजेमहाडिक १०)भान्जी राजेमहाडिक
११)चिमणाजी राजेमहाडिक
१२)मुरारजी राजेमहाडिक
१३)मुधोजी राजेमहाडिक
१३)राघोजी राजेमहाडिक (भोहोडेकर)
१४)मनाजी राजेमहाडिक
१५)शिवाजी राजेमहाडिक
🙏🙏सदर नाव हे राजेमहाडिक घराण्यातील
आमच्या वाचनात आले असून हे छत्रपती सातारा कर याचा चरित्र मध्य १७७५ पर्यंत वरील राजे महाडिक तारळेकर याचा घराण्यातील उल्लेख असलेला नाव आहेत
भवानीबाई साहेब सरकार
छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई साहेब याचा कन्या व मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा बहीण भवानीबाई
साहेब होय🙏🙏
⛳⛳जन्म -४ संप्टेबर १६७८ रोजी शृंगारपूर मध्य झाला
विवाह- १६८६-८७ च्या दरम्यान भवानीबाई साहेब याचा विवाह हरजीराजे महाडिक यांचे पुत्र शंकराजी महाडिक यांच्या शी झाले....
पुत्र - भवानीबाई साहेब यांना दोन पुत्र झाले १) अंबाजीराजे २) दुर्गाजीराजे होय.....⛳⛳
⚔⚔शंकाराजी महाडिक यांने शाहू महाराजांना मोगली कैदेत मदत केली. कारण तो मोगलांचा४ हजारी मनसबदार होता..
सुटकेनंतर शाहू महाराजांनी शंकाराजी महाडिक यास लिहिले "........ तरी आपण दुसर्या अर्थ चित्तात न धरिता आपला समुदाय असेल तो व आपणास काय पैगाम आहे असतील त्यास बोलावून समागमे घेऊन आले पीहिजे
शंकाराजी स्वराज्य कार्यत आल्यावर छत्रपती शाहू महाराजांनी त्यांनी महाराष्ट्र व कनार्टकाची कामगिरी सांगितली आहे याचा अनेक उल्लेख शाहू दप्तर आहे त ........⚔⚔
🌙🌙इ. स. १७०९ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या बहिणीला तारळेमहालाची २८ गावे व ७२वाड्याचा सनद करुन दिली आहे त्या बरोबर कारभारासाठी त्याच्या बरोबर हणमंते - चिटणीस, तांबवेकर - राजवैध तर पेडंसे कुलोपाध्याय म्हणून सातारा तुन पाठविले🌙🌙
🌞🌞स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५५ सौम्यनाम संवत्सरे, चैत्र शुद्ध त्रयोदशी इंदुवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी, राजश्री अंबोजीराजे महाडिक यांसी दिल्हे वतनपत्र ऐसीजे - तर्फ तारळे, प्रांत कराड येथील कसबा व देहाय इनाम व सरदेशमुखी व नाडगौडी चे वतन, सौभाग्यवती भवानीबाई महाडिक यांस आंदण होते. त्यास राजश्री शंकाराजी राजे महाडिक देहावसान पावले. भवानीबाई नी सहगमन केले
शंकाराजी यांचा इ. स १७२८मध्य निधन झाले
सदर राजे महाडिक घराणे शी बक्षी असे उल्लेख दोन ठिकाणी आढळतात याचा अर्थ समजते नाही
मुधोजी राजेमहाडिक व आपासाहेब महाडिक बक्षी याचा नाव समोर बक्षी म्हणून उल्लेख आले आहे
सातारा संस्थानचे बक्षी पद...याचा अर्थ काही ठिकाणी पगार वितरीत करणारा अधिकारी/खजिनदार असा व काही ठिकाणी सेनापती ची काम व आर्थिक व्यवहार सांभाळणारे अधिकार पद.🙏
तसेच सख्याबाई माहाडकीण,ठणुकर मोहीत याची बहीण ईजला छत्रपती कडुन घर बांधून दिल्हे
स।। १०००खर्च
या सख्याबाई माहाडकीण कोण याचा अर्थ बोध होते नाही जाणकारांनी मार्गदर्शन करावेत
🌞🌞
सदर लेख बदल काही संदर्भ व अडचणीआल्यास खालील नंबरवर फोन करावेत
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य प्रमुख संतोष झिपरे ९०४९७६०८८८
💐💐जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय💐💐
🙏🙏भवानीबाई साहेब महाडिक चरणीशी तत्पर संतोष झिपरे निरंतर 🙏🙏

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...