विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 16 October 2018

सिहाच्या जबड्यात हात घालूनी ,मोजती दात हि जात मराठ्यांची

दिलेरखानाचे पारतंत्र्य सोडुन शंभुराजे ज्यावेळी रायगडावर परतत होते तेव्हा संभाजीराजे रायगडावर परततायत याची शत्रूला चाहुल लागेल म्हणुन व ते संभाजीराजांस पकडतील म्हणुन काही गुप्त हेर वेष पालटुन संभाजीराजांच्या १० पाउले पुढे चालत शत्रूचा ठावठिकाणा घेत संभाजीराजांस व सोबत काही मावळ्यांस डोळ्यांनी इशारा देत सावध करीत होते ...सिंहाचे कुटुंब हे वाघाप्रमाणे कळते झाल्यावर एकटेच कुटुंब सोडुन मोकाट फिरत नसते तर सिंह नेहमी आपल्या कुटुंबाला घेवुन फिरतो हे सांगण्याचे कारण कि त्यावेळी संभाजीराजांच्या गुप्तहेरांना आपल्या दहा-पावले पुढे सिंहाचे बछडे(पिल्ली) झाडीत दिसली त्यांनी पुढे आल्यावर ते उचलली ते बछडे(पिल्ली )हातात उचलली व पिल्ली गुप्तहेरांनी हातात घेतली शंभुराजे यावेळी काही कारणाने मागेच राहिले . त्यावेळी घाबरुन सिंहणीची पिल्ली गुप्तहेरांच्या हाताला नख मारु लागली तेवढ्यात त्यां पिल्लांच्या मातेला पिल्ली धोक्यात ओरडु लागल्याचा सुगावा लागला व ती गुप्तहेरांवर गर्जत धावुन आली पण त्यांच्या हातात भाला ,तलवारी व आणखी काही हत्यारे यांमुळे पिल्ली लांब झाडीत टाकली व हत्यारांनी तिच्यावर वार करत सिहीनींला दुर सारले..पिल्ली झाडीत पडाल्याने पिल्लांस काही झाले नाही .तितक्यात मोठा नर सिंह त्या सर्वांकडे रागाने बघत धावत त्यांवर आला .शंभुराजांना हे मागेच मावळ्यांसोबत चालत असल्याने माहितही नव्हते .गुप्तहेरांनी त्यावरही सिहिणीप्रमाणे वार करण्यास पाहिले पण त्याचा राग ,गर्जना ऐकुन व अक्राळविक्राळ रुप बघुन त्या गुप्तहेरातील एकाने तर थरथरत तलवारच घाबरुन खाली टाकली. तो सिंह रागात गोल फिरत एकाची गुडघ्यावरची मांडी तोंडात पकडुन त्याला मातीत लोळवले झोपवले इतर गुप्तहेर त्याला वाचवायला गेले पण रागीट सिंहाने लोळवलेल्या गुप्तहेरास सोडुन धावत वाचवायास येणाऱ्याच्याच आंगावर आला.हे घाबरलेले गुप्तहेर रडत असे ओरडत होते त्यावेळी मागुन येणाऱ्या संभाजीराजे व मावळ्यांस आपले गुप्तहेर संकटात आहेत याची जाणीव झाली व रागाने शंभुराजे हातात असलेली तलवार व घुपच्या या दोन हत्यारेच घेवुन रागाने पुढे गुप्तहेरांकडे पळु लागले त्यावेळी रागीट सिंह त्या गुप्तहेरांस फाडत मातीत लोळवत असताना शंभुराजांनी पाहिले व प्रचंड रागाने शंभुराजांनी धावुन सिंहाची आयाळ पकडुन त्याला दुर घासत नेले पण जबड्याला लागलेले रक्त जिभेने चाटत रागाने सिंह परत धावत येत रागात शंभुराजांवर झेप घेतली - तेव्हा संतापलेल्या मराठ्यांच्या वाघाने ( अर्थात शंभुराजे ) यांनी तलवारीच्या एका वारातच सिंहाला मागे फिरवले. इकडे घायाळ गुप्तहेर जिवाच्या आकांताने तडफडत ओरडत होते .संभाजींना ते हाल पाहावत नव्हते काय करावे हे त्यांस सुचेना पण इकडे लालबुंद सिंह पुन्हा तिसऱ्यांदा जेव्हा परत रागात ,गर्जत रागाने शंभुराजांवर चाल करीत आला तेव्हा शंभुराजेंचा राग त्या सिंहावर इतका अनावर झाला कि शंभुराजेंनी स्वतः ची तलवार दुर फेकली व त्यांवर चाल करीत आलेल्या सिंहाचा पाठीवर बसुन जबडा मधल्या दातांवर पकडून असा फाडला कि सिंहाचे खालचे व वरचे दात वेगवेगळेच झाले ....सिंह मृत्यू पावला ......

Wednesday 3 October 2018

इतिहासातील एक अपरिचित योध्दा म्हळोजी बाबा

इतिहासातील एक अपरिचित योध्दा म्हळोजी बाबा

मुकर्रबखानाची फौज संगमेश्वराच्या वेशीला भिडलेली...आणि बघता बघता पाचशे मावळा सज्ज झाला, गनिमांच्या डोळ्यात डोळा टाकुन बघत होता...अफाट अफाट सेनासागर आणि टिचभर पाचशे मावळा राजांच्या रक्षणासाठी सिद्ध आहेत ! बघता बघता मुकर्रब हाजीर झाला.आणि कडाडला एल्गार !!! हर हर महादेव ची आरोळी दुमदुमली आणि बघता बघता तलवारी खनाणु लागल्या...झाडा-पानांवरची पाखरं फडफड करत उडाली...अरे काळोख थरारला....रात्र थरारली....अाक्रोश-किंकाळ्यांनी परिसर दुमदुमुन गेला,शौर्याची लाट उसळली...अवघं तुफान तुफान झालं...अरे एकेक मावळा झुंजत होता...शर्थीनं लढत होता....बस्स्स....मोगलांची कापाकापी करत होता...शिवाजी महाराज सांगायचे...माझा एक मावळा शंभराला भारी आहे! ईथं एक मावळा पाचशे ला भारी पडत होता, मोगलांना बस्स्स कापत होता !! मुकर्रब बघत होता...पण मराठ्यांच्या शौर्यापुढं काही चालत नाही. ईथला एकेक मावळा लढत होता राजासाठी. स्वत: साठ वर्षाचा म्हाळोजी दोन्ही हातात समशेर घेऊन लढतोय...जो समोर येईल त्याला सरळ कापतोय...रक्ताच्या चिरकांड्या,मांसांचे लगदे...अरे खच प्रेतांचा...आणि फिरतोय म्हाळोजी !! मुकर्रबनं ते शौर्य बघितलं आणि म्हणाला, इस बुढे को पहले लगाम डालो...! तसं सगळं यवनी सैन्य म्हाळोजीबाबाच्या भोवती जमा झालं..अभिमन्यु चक्रव्ह्युवात अडकावा तसा म्हाळोजी अडकला...दोन्ही हातात समशेरी...सगळ्या मोगली सेनेचे एकाच वेळी वार झाले..दोन्ही तलवारींवर पेलले,म्हाळोजी खाली बसला,साठ वर्षांचं रद्दाड शरीर, विज लखलखली...आणि रक्ताच्या चिरकांड्या उडवीत पहिली फळी गारद झाली. अरे तो जोश वेगळा..तो आवेश वेगळा...अरे ते शौर्य बघितलं, आणि मुकर्रबला कळालं, वाघ कसा असतो !! अफाट अफाट अफाट शौर्य ! पण त्याच वेळी मुकर्रबखानानं चाल खेळली,कमानमाराला बोलवलं...आणि तिस-या बाजुकडुन म्हाळोजीवर नेम धरला...तीर सुटला..उजव्या दंडात घुसला...समशेर खाली पडली..दुसरा तीर कंठात...दोन्ही समशेरी खाली पडल्या...नि:शस्त्र झाला म्हाळोजी...गुळाच्या ढेपेला मुंग्या डसाव्यात...असं मोगली सैन्य म्हाळोजीवर तुटून पडलं...शरीरावर अशी एक जागा शिल्लक राहली नाही...जिथं वार झाला नाही...रक्ताळलेला म्हाळोजीबाबा मातीत पडला...!! अखेरचा श्वास फुलला...डोळे लवले, ओठ हलले.त्या श्वासानं माती ऊंच उडाली...आणि त्या ऊंच उडालेला मातीला म्हाळोजी सांगता झाला...सांगा माझ्या राजाला...हा म्हाळोजी गेला..मातीत मेला...पण नुसता मातीत नाही मेला...मातीसाठी मेला..अरे मातीत मरणारे तर कित्येक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात!!

अप्रतिम चित्रकार - विभू मोटके

#shivajimaharajhistory

अपरिचित कान्होजी जेधे


अपरिचित कान्होजी जेधे...

शहाजीराज्यांच्या पदरी बंगलोर येथे असलेला शुर मराठा सरदार,जेधे हे भोर जवळील कारी या गावाचे असून रोहिडखो यांचे देशमुख होते,पुणे प्रांतापासून ते सर्वच मावळ खोऱ्यात त्यांच्या विलक्षण प्रभाव होता.

त्यामुळेच मावळपट्टी मध्ये शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करणे सोपे झाले,अफजलखान जेव्हा चालून अला तेव्हा त्यांच्या भीतीने अनेक देशमुख त्याला सामील झाले,पण कान्होजी यांनी शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला व वतनावर पाणी सोडले यावरूनच त्यांची राजनिष्टा अभंग असल्याचे दिसून आले.

शिवाजी महाराजांच्या दरबारात तलवारीचे पहिले पान म्हणजे कान्होजी जेधे,कोणतीही मोहीम ठरली असता पहिले पत्र त्यांना पाठवु जाऊ लागले,त्यांना सहा पुत्र होते व सारेजण स्वराज्यात पराक्रम गाजवत होते अश्या ह्या शुरवीर पराक्रमी सरदाराचा १६६० साली म्रूत्यु झाला.
चित्रकार - अमित राणे

Tuesday 2 October 2018

पन्हाळगडची लढाई..

पन्हाळगडची लढाई...

इ.स. १६६० सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता. यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडले होते.मुसळधार पावसात सुध्दा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता.या कठीण प्रसंगी महाराजांनी सिध्दीस तहाचा निरोप धाडला त्यामुळे सिध्दी गाफील राहिला.शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिध्दी जोहर यास तहाची बोलणी करण्यात गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला.शिवा काशीद चे खरे रूप कळल्यावर सिध्दीने त्यांस ठार केले,तोवर छत्रपती विशाळगडाच्या वाटेवर होते.
छत्रपती शिवरायांनी पन्हाळ्यावरून,विशाळगडाकडे पलायन केल्याचे समजल्या- नंतर,सिद्दीने,सिद्दी मसूदला छत्रपतींच्या मागावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला.मसूदच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठले,अशावेळी बाजीप्रभूंनी छत्रपतींना विशाळगडावर पोहोचून तोफानी इशारा करत नाहीत तोवर ही खिंड लढवली जाईल असे सांगितले.घोडखिंडीतील अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूदच्या सैनिकांची कत्तल आरंभली,शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू,फ़ुलाजी,संभाजी जाधव,बांदल यांनी मोठा पराक्रम गाजविला.
महाराज विशाळगडावर पोहोचल्यानंतर तोफांचा गजर झाला.इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूने तोफांचा आवाज ऎकल्यानंतरच समाधानाने आपला जीव सोडला.या युध्दात मराठ्यांचे जवळपास सर्वच ३०० मावळे कामी आले तर मसूदचे जवळपास ३००० सैनिक मारले गेले.बाजीप्रभू व इतर मावळ्यांच्या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून इतिहासात अमर झाली.

चित्रकार - वासुदेव कामत सर

शिवरायांचे शुरवीर मावळे बाजी पासलकर

शिवरायांचे शुरवीर मावळे
बाजी पासलकर
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरवात केली. तोरणा, शुभानमंगळ, रोहिदा असे किल्ले त्यांनी काबीज केले. विजापूरच्या आदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.

फत्तेखानाने जेजुरीजवळ बेलसर येथे आपला तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करुन किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता. छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भुईकोट वर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एका रात्रीत गड सर केला. तर फत्तेखान वर हल्ला करण्यासाठी बाजी पालसकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले, अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.

फात्तेखांचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला, पुरंदराला खानच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युद्ध झाले. बाजी पासलकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांनी गानिमांची कत्तल केली. फात्तेखांचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकांना भिडले. दोघात तुंबळ युद्ध झाले. अखेरीस गोदाजीच्या वीराने मुसेखानाच्या छाताडाचा वेद घेतला व खान कोसळला. मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला.

यदुनाथ सरकारांच्या मते काय सावंताच्या युद्धात बाजी मरण पावले (हे सवाई बाजी असावेत). सभासदाच्या बखरीत या युद्धाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. राज्पुरीहून काय सावंत म्हणोन पांच हजार फौजेनिशी युद्धास आला. युद्ध मोठे होतां बहुत रणखंदल जाले. काय सावंत खास व बाजी पासलकर महायोद्धा, याच्या मिश्या दंडायेवढ्या, यांस पीळ घालून वारी केशांच्या आधारे निंबे दोहींकडे दोन ठेवीत होता, असा शुरमर्द ठेविला, याशी व त्याशी खासाखाशी गांठ पडली. एकास एकांनी पंचवीस जखमा करून ठार मारले. मग उभायान्ताकडील दळ आपले जागीयास गेले.

बाजी पासाल्कारांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला. पुण्याजवळील वरसगाव धरणातील जलाशयाला बाजी पासलकर यांचे नाव देण्यात आले आहे.

शिवरायांचे अंगरक्षक जिवाजी महाले

शिवरायांनी आपल्या अनेक छोट्या-छोट्या मावळ्यांच्या मदतीने प्रचंड मोठे हिंदवी स्वराज्य निर्माण केले; परंतु स्वराज्य निर्माण करताना, अनेक मौल्यवान हिरे लयाला गेले. त्यांच्या या कार्यात तन-मन-धनाने या सर्वांनी सहकार्य केले. यात सर्वात महत्त्वाची भूमिका
शिवरायांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांची होती. प्रतापगडाच्या पायथ्याशी मु. पो. कोंडवली, जि. सातारा येथील साकपाळ कुटुंबात वीर जिवाजींचा जन्म (अश्विन शुद्ध 6 शके 1557) रोजी झाला. आईवडिलांच्या निधनानंतर जिवाजी आणि त्यांच्या भावंडांचा सांभाळ देव महाले या आप्ताने केला. तेव्हापासून त्यांचे आडनाव महाले पडले. बालपणापासून त्या काळी आलेल्या धकाधकीच्या संकटातून लढायांच्या काळात मुलांना लढाईचे प्रशिक्षण दिले जायचे. जिवाजीसुद्धा साता-याच्या तालमीतला लाल मातीत मेहनत करणारा पठ्ठा होऊ लागला. जोर, बैठका, तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे याचे शिक्षण त्याला मिळाले होते. मातीत कुस्त्या खेळणे या प्रशिक्षणात तो चांगला पारंगत झाला. जिवाजी दांडपट्टा तर असा फिरवायचा की पायाच्या टाचेखाली ठेवलेल्या लिंबाचे तो डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच दोन तुकडे करायचा. उंच उड्या मारण्यात तर तो निष्णात होता. उड्डाण मारल्यावर हवेतच शत्रूच्या शरीराचे दोन तुकडे करत असे. शिवाय त्याची नजर तीक्ष्ण होती.
शिवरायांना जेव्हा जिवाजी महालेविषयी समजले; तेव्हा त्यांनी जिवाजीला खास सैन्यात दाखल करून घेतले. तरणाबांड-भरदार मान-जाड पल्लेदार मिशा, सरळ नाक, भलेमोठे कपाळ आणि भेदक नजर पाहताच शत्रूलाही कापरे भरत होते. शरीराने वाघ-सिंह ज्याप्रमाणे भक्ष्य पकडण्यासाठी धावतात त्याप्रमाणे तो अतिशय चपळ होता. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी विजापूरच्या दरबारात बडी बेगमने सर्व मातब्बर सेनापती, सरदारांना बोलावले होते. तिने सर्वांना सवाल केला, शिवाजीला कोण पकडून आणेल? दरबारात तर शांतता पसरली. तेवढ्यात मागून एक प्रचंड देहाचा, पायातील वहाणा कर्रकर्र वाजवत दरबारात आला. त्याने बडी बेगमचे आव्हान स्वीकारले. अफजल खान निश्चितच हे काम फत्ते करणार असा विश्वास तिला वाटू लागला. भल्याबु-या मार्गाने किंवा विश्वासघाताने अनेक शत्रूंना संपवण्यात तो तरबेज होता.
अफजल खान आपल्यासोबत हजारो सैनिक, घोडदळ-पायदळ घेऊन मजल दरमजल करत महाराष्‍ट्रात दाखल झाला. तेव्हा शिवराय रायगडावर होते. रायगड सोडून शिवरायांनी प्रतापगडावर जाण्याचा विचार केला. कारण प्रतापगड सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय योग्य किल्ला होता. शिवाय डोंगरी किल्ला असल्याने एकावेळी एकच व्यक्ती तेथे जाऊ शकत होती. आजूबाजूचा परिसर संपूर्ण जंगलाने वेढलेला, त्यात हिंस्र पशू-प्राणी, जंगली श्वापदांचा वावर असल्याने प्रतापगडावर जाणे खूपच अवघड होते. शिवराय प्रतापगडावर पोहोचल्याचे वृत्त समजताच अफजल खान खूप चिडला. त्याने हिंदू देवदेवतांची देवळे पाडण्यास सुरुवात केली. त्यामुळे तर शिवाजीराजे खाली येतील असा त्याचा कयास होता. शिवरायांना ही नीती माहिती होती. ते पाहून त्याने सेवकामार्फत शिवाजीराजांना भेटण्याचा निरोप पाठवला, तुम्ही माझ्या मुलांसारखे; मला भेटण्यास या, आमचे किल्ले परत द्या, मी तुम्हाला बादशहाकडून जहागिरी देतो. शिवरायांनी टोला मारला, मला तुम्हाला भेटायची भीती वाटते, तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी या. असे म्हणताच अफजल खान खुश झाला. भेटीची तारीख आणि वेळ ठरली. महाराजांनी सगळ्यांना कामे वाटून दिली. जिवा तुम्ही सय्यद बंडावर नजर ठेवायची, असे सांगून त्यांना सोबत घेतले. भेटीचा दिवस उजाडला. प्रतापगडाच्या पायथ्याशी सुंदर शामियाना उभारण्यात आला होता. अफजल खानाचे मनोराज्य चालू होते. महाराज गडाच्या पाय-या उतरत असताना, थोड्या अंतरावर सय्यद बंडा उभा होता. जिवाजींनी सय्यद बंडाविषयीची माहिती महाराजांना दिली. त्याला तेथून दूर करण्यास सांगितले. महाराजांनी वकिलामार्फत निरोप पाठवून सय्यद बंडास दूर करण्यास सागितले. अफजल खान, त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शामियान्यात होते. अफजल खानाने शिवरायांना दोन्ही हात हवेत पसरून आलिंगन दिले. त्यांची मान डाव्या कुशीत दाबून ठेवली आणि उजव्या हाताने कट्यारीने पाठीवर वार केला. अंगात चिलखत असल्याने कट्यार घसरत गेली.
अंगरखा टराटरा फाटत होता. शिवरायांनी क्षणाचाही विलंब न लावता अस्तन्यात लपवलेला बिचवा काढून खानाच्या पोटात खुपसला. शिवरायांवर त्याच्या वकिलाने हल्ला चढवला. शिवाजीराजांनी कृष्णाजी कुलकर्णी याचेही तलवारीने दोन तुकडे केले. इकडे सय्यद बंडा गोंधळाचा आवाज ऐकून धावत आला. महाराजांवर हल्ला करणार इतक्यात जिवा महालेने सय्यद बंडाचा समशेर असलेला हात वरच्यावर हवेत कापला. शिवरायांनाही या चपळाईचे कौतुक वाटले. तेव्हापासूनच ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ हा वाक्प्रचार रूढ झाला. सुरतेच्या स्वारीतही जिवाजींनी महाराजांना वाचवल्याची नोंद आहे.

रामजी पांगेरा : साक्षात यमाचा अवतार

अपरिचित मावळे

रामजी पांगेरा : साक्षात यमाचा अवतार
दिलेरखान सुमारे तीस हजार पठाणी फौज घेऊन बऱ्हाणपुराहून निघाला आणि नाशिक जिल्ह्यात घुसला. या भागातील अनेक किल्ले मराठ्यांनी कब्जात घेतलेलेहोते. त्यातीलच कण्हेरा गड या नावाचा डोंगरी किल्ला मराठ्यांच्या ताब्यातहोता. दिलेरखान हा कण्हेरा घेण्यासाठी सुसाट निघाला. दिलेर हा अत्यंतकडवा आणि हट्टी असा सरदार होता.कण्हेऱ्याच ्या परिसरातच सपाटीवर महाराजांचा एक जिवलग शिलेदार अवघ्या सातशे मराठी पायदळानिशी तळ ठोकून होता. कारण मोगलांच्या फौजा केव्हा
स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता. म्हणून ही सातशेची तुकडी गस्तीवर राहिली होती. या तुकडीचा नेता होता रामाजी पांगेरा. हा रामाजी विलक्षण शूर होता. प्रतापगडच्या युद्धात अफझलखानच्या सैन्याविरुद्ध जावळीच्या जंगलात या वाघाने भयंकर थैमान घातले होते. (दि. १० नोव्हेंबर १६५९ ) त्याने पराक्रमाची शर्थ केली. तो हा रामाजी पांगेरा कण्हेऱ्यापाशी होता.
एक दिवस दिवसाउजेडी त्याला हेरांनी खबर दिली की , औरंगजेबाचा खासा सरदार दिलेरखान पठाण भलं मोठं घोडदळ घेऊन कण्हेऱ्यावर चालून येत आहे. दिलेरची फौज खरोखरच मोठी होती. त्याच्यापुढे रामाजीची फौज चिमूटभरच होती. ही खानाच्या आक्रमणाची खबर मिळताच खरे म्हणजे रामाजीने आपल्या सैन्यानिशी शेजारच्याच आपल्या कण्हेरा गडावर जाऊन बसायला हरकत नव्हती. ते सोयीचे आणि निर्धास्त ठरले असते. पण रामाजी पांगेऱ्यातला वाघोबा चवताळून उठला. तो

आपल्या चिमूटभर मावळ्यांपुढे उभा राहीला. दिलेरखान मोठ्या फौजेनिशी चालून येतोय हे त्या चिमुकल्या मराठी तुकडीला समजलेच होते. रामाजी आपल्या लोकांच्या पुढे उभा राहिला आणि मोठ्या आवेशात तो गरजला ,’मर्दांनो , खानाशी झुंजायचंय , जे जातीचे असतील , ( म्हणजे जे जातिवंत योद्धे असतील ते) येतील. मर्दांनो , लढाल त्याला सोन्याची कडी , पळाल त्याला चोळी बांगडी’असे बोलून रामाजीने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून फाडून फेकला. डोईचे मुंडासेही फेकले. अन् दोन्ही हातात हत्यारे घेऊन त्याने एकच हरहर केला. साक्षात जणू भवानीच संचरली. अवघ्या मराठी सैन्यानेही तसेच केले. मूतिर्मंत वीरश्रीने कल्लोळ मांडला. उघडे बोडके होऊन मराठी सैन्य भयभयाट करू लागले. अन् दिलेरखान आलाच…

वणव्यासारखे युद्ध पेटले. तलवारबाजीने दिलेरखान थक्कच झाला. त्याला पुन्हा एकदा पुरंदरगड अन् मुरारबाजी देशपांडा आठवला. झुंज शथीर्ची चालली होती. पण मराठ्यांचा आणि रामाजीचा आवेश दारूच्या कोठारासारखा भडकला होता. अखेर हट्टी दिलेर हटला. त्याचे सैन्य पळत सुटले. दिलेरलाही माघार घ्यावी लागली.

प्रतापराव गुजर "


प्रतापराव गुजर "
खानास गर्दिस मिळवणे बिगर तोंड दाखवु नये.. राव खानास ऐसेच सोडलात.. तुम्हि सरदारकी नाहि शिपाईगिरी केलीत.." ऐक तिखट आदेश नेसरीत थडकला..! खांद्यावर पद तर सरसेनापतीपदाचे.. हा कसला आदेश..? नको ते पद घ्या राजीनामा .. दुसरे राजेमहाराजे मिळतील अजुन.. कुठली मोहीम सांभाळा तुम्हीच .. हि आताची स्वामीनिष्ठा अवघा महाराष्ट्र अनुभवतोय..!! पण तो सेनापती वेगळाच होता.. शिवछत्रपतिंच्या हिंदवी स्वराज्याचा सरसेनापती कुडतोजी उर्फ प्रतापराव गुजर. स्वराज्यावर चालुन आलेला बहलोलखान आयता मराठी तलवारीत सापडलेला.. कुठे रावांचा निर्णय चुकला.. त्याला खंडणी वसुल करुन सोडला.. महाराजांना बातमि समजलीच.. थेट सह्याद्रीच्या कड्यावरुनच वाघ चवताळला.. आदेश नेसरीत प्रतापरावांसभोवती थैमान खालु लागला.. खानास जिवंत सोडले...? तो येणार नक्कीच येणार.. दिवस मावळतीला निघालेला.. प्रतापराव आणि सहा शिलेदार सहज निघाले.. वाट नेहमीचीच असेल.. गस्तफेरफटका असेल ..का ..कुठे..? निघाले इतिहासालाच माहित.. ऐक अंतरावर धुळ खुपच दिसली.. त्यात आवाज हि होते..जरा चिञ स्पष्टच दिसले... फौज.. खानाची.. बहलोलखानाची..! हत्ती .. घोडे.. मुघली मुंडकी.. अरे हरामखोरा तुला जिवंत सोडला.. तु पुन्हा फौजेसकट..? प्रतापरावांच्या अंगात तांडव संचारले.. रिकीबीला टाच बसली.. तलवार रोखाने निघाली.. राव थांबा फौजेसकट भिडु.. पण नाही राव घुसलेच.. पाठोपाठ सगळीच फौज निघाली... किती हजार.. छे फक्त सहा जण. एकुण सात तलवारी.. खानाला इशारा झाला.. कुणीतरी येतय अंगावर .. कितीजण सात जण..! मराठी तलवारी भिडल्या.. सात तलवारी.. हजारी फौजेवर.. क्षणार्धात शांतता .. गर्दिस मिळवणारे.. गर्दित हरवले.. प्रतापरावांसकट सहा शिलेदार लढता.. लढता ईहलोकी गेले.. केवढि हि स्वामिनिष्ठा.. कुठुन माणस निर्माण केली हि शिवछञपतींनी.. साध काम आहे का.. फक्त सात जण हजारोंच्या मुघली मुंडक्याना भिडले.. नेसरी पावन झाली..
माघ_व. १४, महाशिवरात्र, शके १५९५

सात बेलपञे गळाली..
मुजरा सरसेनापती प्रतापराव गुजर..
आणि सहा शिलेदारांना.

कुणी शाहिर अजुनहि गात आहे..

म्यानातुन उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात..!
वेडात मराठे वीर दौडले सात

शिवरायांचे मावळे बहिर्जी नाईक


शिवरायांचे मावळे
बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं नाव. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याचा सुरुवातीपासुन ते महाराजांच्या निधनापर्यंतचा चा साक्षीदार म्हणजेच नाईक होते.
दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. महाराजांनी त्यांच्यातील कसब ओळखली, नाईक स्वराज्यनिर्मीतीच्या कामाला हिरा आहेत हे राज्यांनी ओळखले आणि तात्काळ त्यांना त्या कामात रुजु करुन घेतले. महाराज नेहमी आपल्या माणसांतील गुण ओळखुन त्यांना कामे वाटत असत. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. त्यामुळे राज्यांनी त्यांना गुप्तहेर खात्यात रुजु करुन घेतले.
बहिर्जी नाईक यांचे गुण सांगायचे ठरले तर अंगात स्फ़ुरण आल्याशिवाय राहणार नाही. नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. फ़किर, वासुदेव, कोळि, भिकारी, संत, अगदी कुठलेही वेशांतर करण्यात ते पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातुन शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होतं. ह्यातं सर्वात मोठं आश्चर्य हे कि विजापुरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व स्व:त आदिलशहा व बादशहा कडुन ते पक्कि माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच त्यांची बुद्धीमत्ता व चातुर्य दिसुन येतं. महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तिन ते चार हजार गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होतं. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापुर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकिची माहिती देणा‍‍र्‍यास कडॆलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणुकाही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वा‍र्‍याचे आवाज असे. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचं. त्या ठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत. असं म्हटलं जात कि महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फ़क्त महराजांनाच ओळखायचे-थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहिच अशी सर्वांची समजुत असायची. ते फ़क्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये सुद्धा होते.

दत्ताजी शिंदे

दत्ताजी शिंदे
. संक्रातीचा सण असून मराठी फौज सकाळी स्नान करून, तिळगुळ खाऊन तयारीने बसली होती. सकाळी नजरेच्या टप्प्यात यायच्या आत गिलचे चारही घाटांवर ८ मैलांवर आले आणि त्यांनी तोफांच्या सहाय्याने मराठ्यांवर हल्ला चढवला. पाठोपाठ बंदुकधारी रोहील्यांचे पायदळ नदीपार करण्यास पुढे येऊ लागले. बुराडी घाटावर जानराव वाबळे याची नेमणूक केलेली होती. मराठी सैनाची मुख्य शस्त्रे म्हणजे तलवारी, भाले असून फार कमी शिपाई बंदुका वापरीत. त्याउलट रोहिले - अफगाण बंदुकधारी असून जोडीला त्यांनी तोफखाना देखील आणला होता. मराठ्यांचा तोफखाना मुख्य तळावर राहिल्याने शत्रूच्या हल्ल्याला त्यांना समर्थपणे तोंड देता आले नाही. अफगाणी सेनेच्या तोफांनी बुराडी घाटावर जानरावचे शंभर - दीडशे शिपाई मारले गेले.
दत्ताजी बुराडी घाटावर आला. दत्ताजी आल्याने सैन्याला धीर मिळाला व ते शत्रूचा नेटाने मुकाबला करू लागले.आपली तलवार गाजवू लागला परंतु दुदैवाने रोहील्यांच्या गोळीबारात मराठ्यांचा हा रणशूर सेनानी घोड्यावरून खाली आला.दत्ताऽऽऽ" म्हणून कुतुबशहाने हाक दिली तसे दत्ताजींनी त्याच्यावर डोळे रोखले. जणू काही डोळ्यांतच अंगार फुटावा तसे डोळे भयंकर दिसू लागले. कुतुबशहा खिंकाळत म्हणाला,
" क्यूं पाटील, और लढोगेऽऽ?"
आपला थंड पडत चाललेला आणि मंद मंद होत चाललेला आवाज दत्ताजींनी एकवटला आणि ते बाणेदारपणे उदगारले,
"क्यूं नही ? बचेंगे तो और भी लढेंगेऽऽऽऽ!"
कुतुबशहा व नजिब चिडून दत्ताजींच्या उरावर जावून बसले अन् खंजीराने दत्ताजींची गर्दन चराचर चिरली. नजीब भाल्याच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची भेसूर मुंडी नाचवत नाचवत अब्दालीकडे गेला.
त्या दिवशी दिवसभर मराठ्यांचा भयंकर पाठलाग सुरू होता. कोंबड्या बकर्‍यांसारखी माणसं टिपून मारली जात होती. यमुना काठ रक्तानं निथळत होता.
रात्रीच्या भयाण अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड बाहेर काढले। खिळखिळ्या झालेल्या तोफेचं लाकूड सामानं एकत्र केलं.यमुनाकाठच्या वाळूतच सरण रचलं. रानावनात कफन नाही म्हणून सोबत्यांनी नेसूची धोतरे सोडली. रणवीराचा उघडावाघडा देह झाकला. बटव्यातल्या सुपार्‍या आणि पाने सरणावर ठेवली. दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला, अन्ननलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजले. भयाण रात्रीच्या घोंगावत्या वार्‍यात आणि यमुना नदिच्या खळखळ आवाजात मृतदेह पाणी प्याला. उघड्यावरच आग लावली.
सणासुदीची माणसं भरपेट खाऊन उताणी झाली होती. तेव्हा कण्हेरखेडच्या शिंद्यांचा कृष्णाकाठच्या मातीत खेळून पोसलेला देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होता !

कोंडाजी फर्जंद


कोंडाजी फर्जंद
अवघ्या साठ मावळ्यानिशी पन्हाळगड ताब्यात घेणारा पराक्रमी वीर हा कोंडाजी होय.तुंगभद्रेपासून उत्तरेस अहिवंतापर्यंत अनेक गड राजांनी कब्जात घेतले होते.पण दख्खनचा दरवाजा असलेला पन्हाळगड त्यांना ताब्यात मिळाला नव्हता.राजेंनी दि.६ जून १६७२ रोजी रायगडावर आपल्या सहकाऱ्यांना ही सल बोलून दाखविली.
यावेळी कोंडाजी फर्जंद,राजेंना बोलिला की गड म्या घेतो.त्याने अवघे तीनशे हशम(मावळे)राजेंकडे मागितले.अवघ्या तीनशे मावळ्यानिशी पन्हाळगड जिंकावयास निघालेल्या कोंडाजीचे राजेंनी कौतुक करून त्यास सोन्याचे कडे दिधले.कोंडाजीने कोकणातून महाडमार्गे येऊन राजापुरास आपला तळ टाकला.राजापुर व पन्हाळा किल्ला हे अंतर आडवाटेने(जंगली रस्त्याने)अंदाजे ८०-९० कि.मी होते.हेरगिरीने वेष पालटून गडावर जाऊन त्यांनी गडाची पूर्ण माहिती काढली.गडावर अंदाजे दोन हजार गनिम होते.बाबूखान हा अदिलशाही किल्लेदार होता.
फाल्गुन वद्य त्रयोदशी(दि.६ मार्च १६७३)रोजी मध्यरात्री राजापुरातून येऊन फिरंगोजी गडाच्या जवळ पोहोचला.तीनशे मावळ्यापैकी त्यांनी निवडक साठ मावळे घेऊन गडावर हल्ला केला.तीन दरवाज्याजवळ असलेल्या कड्यावरून चढून त्यांनी गडावर प्रवेश केला.मध्यरात्री मराठे गडावर आल्यावर त्यांनी कापाकापीला सुरूवात केली.गडाचा किल्लेदार बाबूखान व कोंडाजी यांच्यात महाभयंकर युध्द जाहाले.अखेर कोंडाजीच्या तलवारीच्या वारात बाबूखानाचे मस्तक धडावेगळे झाले.किल्लेदार पडल्यामुळे खानाच्या सैन्यात गोंधळ उडाला.ते पळून जाऊ लागले.पण गडावरील साठ मावळ्यांनी त्यांची दाणादाण उडवून गड ताब्यात घेतला.अवघ्या साठ मावळ्यांनिशी गड ताब्यात घेणारा कोंडाजी खरोखरच वीर होता.

सरसेनापती प्रतापराव गुजर यांना वीरमरण....

सरसेनापती प्रतापराव गुजर यांना वीरमरण....

कडतोजी नावाच्या स्वाभिमानी मराठ्याने मोघलाई सहन न झाल्याने मोगलांशी आपल्या गावातून लढा देण्याचे ठरवले. प्रामुख्याने मुघल सैनिकांना विरोध करणे. गावातील स्त्रिया आणि गायींचे रक्षण करणे असा त्याचा कार्यक्रम असे.

एकदा मोगलांच्या खजिन्यावर एकाच वेळी दोन मराठी वाघांनी झेप घेतली शिकार तर झाली मात्र शिकारीवर हक्क कुणाचा यावर हातघाईवर आलेली बाब शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विचार सांगून मैत्रीत परावर्तित केली. हे दोन वाघ म्हणजे दस्तूरखुद्द शिवाजी महाराज आणि कडतोजी गुजर.

यावेळी शिवाजी महाराजांनी कडतोजीला स्वराज्याचा विचार दिला आणि कडतोजींनी आपलं इमान शिवाजींना अर्पण केलं.

पुढे कडतोजी स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच सरनौबत झाले. त्यांच्या पराक्रमाला साजेसे नाव (किताब) देऊन महाराजांनी त्यांचे प्रतापराव गुजर केले.

बहलोलखान स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. महाराजांनी प्रतापरावांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला.

मराठ्यांच्या गनीमीकाव्याने प्रतापरावांनी खानाला डोंगरदरीत पकडून जेरीस आणले. वेळ प्रसंग पाहून बहलोलखान शरण आला आणि हा रांगडा शिपाईगडी मेहेरबान झाला. युद्धात शरण आलेल्याला मारू नये असा प्रतापरावांचा शिपाईधर्म सांगत होता. प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. तो जीव वाचवून गेला.

शिवाजी महाराजांना खबर पोहोचली, “प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडला!” आपल्या रयतेचे हाल करणारा बहलोलखान जिवंत जातो याचा महाराजांना राग आला. त्यांनी एक खरमरीत पत्र पाठवून प्रतापरावांची कान उघाडणी केली. त्या पत्रात एक वाक्य असं होतं की बहलोलखानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. त्याकाळी मावळ्यांचा शिवाजीमहाराजांवर असलेला जीव पाहता ही किती भयंकर शिक्षा सुनावल्या गेली होती हे लक्षात येईल.

महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच प्रश्न कडतोजींना दिवसरात्र सातावीत होता. जीवाची तगमग होत होती. सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र जासूद पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही.

अशातच एके ठिकाणी सैन्याचा तळ पडलेला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे.

बस! प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठवला सैन्याला स्वारीचे आदेश दिला. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना थांबवल्या गेलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला.

अवघे सात मराठे सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर चढाई करतात. यात काय नाही? दुर्दम्य विश्वास , पराकोटीची स्वामीनिष्ठा सारं – सारं काही ! प्रतापरावंचं ठीक पण त्या सहांपैकी एकाचे ही पाय अडखळले नाहीत. केवळ मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.

प्रतापराव आणि सोबतचे सहा सरदार मरण पावले. महाराजांना अतीव दु:ख झाले. स्वराज्याची अपरिमित हानी झाली. मात्र शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं. पराक्रमाला एक नवं कोंदण मिळालं होतं.

प्रतापराव गुजर

३४३ वर्षाने ...
आज पुन्हा तीच महाशिवरात्र आहे आणि तोच दिवस आहे ...


प्रतापराव गुजर

" खानास गर्दिस मिळवणे बिगर तोंड दाखवु नये.. राव खानास ऐसेच सोडलात.. तुम्हि सरदारकी नाहि शिपाईगिरी केलीत.." ऐक तिखट आदेश नेसरीत थडकला..!

खांद्यावर पद तर सरसेनापतीपदाचे.. हा कसला आदेश..? नको ते पद घ्या राजीनामा .. दुसरे राजेमहाराजे मिळतील अजुन.. कुठली मोहीम सांभाळा तुम्हीच .. हि आताची स्वामीनिष्ठा अवघा महाराष्ट्र अनुभवतोय..!! पण तो सेनापती वेगळाच होता.. शिवछत्रपतिंच्या हिंदवी स्वराज्याचा सरसेनापती कुडतोजी उर्फ प्रतापराव गुजर.

स्वराज्यावर चालुन आलेला बहलोलखान आयता मराठी तलवारीत सापडलेला.. कुठे रावांचा निर्णय चुकला.. त्याला खंडणी वसुल करुन सोडला.. महाराजांना बातमि समजलीच.. थेट सह्याद्रीच्या कड्यावरुनच वाघ चवताळला.. आदेश नेसरीत प्रतापरावांसभोवती थैमान खालु लागला.. खानास जिवंत सोडले...? तो येणार नक्कीच येणार.. दिवस मावळतीला निघालेला.. प्रतापराव आणि सहा शिलेदार सहज निघाले.. वाट नेहमीचीच असेल.. गस्तफेरफटका असेल ..का ..कुठे..? निघाले इतिहासालाच माहित.. ऐक अंतरावर धुळ खुपच दिसली.. त्यात आवाज हि होते..जरा चिञ स्पष्टच दिसले... फौज.. खानाची.. बहलोलखानाची..! हत्ती .. घोडे.. मुघली मुंडकी.. अरे हरामखोरा तुला जिवंत सोडला.. तु पुन्हा फौजेसकट..? प्रतापरावांच्या अंगात तांडव संचारले.. रिकीबीला टाच बसली.. तलवार रोखाने निघाली.. राव थांबा फौजेसकट भिडु.. पण नाही राव घुसलेच.. पाठोपाठ सगळीच फौज निघाली... किती हजार.. छे फक्त सहा जण. एकुण सात तलवारी.. खानाला इशारा झाला.. कुणीतरी येतय अंगावर .. कितीजण सात जण..! मराठी तलवारी भिडल्या.. सात तलवारी.. हजारी फौजेवर.. क्षणार्धात शांतता .. गर्दिस मिळवणारे.. गर्दित हरवले.. प्रतापरावांसकट सहा शिलेदार लढता.. लढता ईहलोकी गेले.. केवढि हि स्वामिनिष्ठा.. कुठुन माणस निर्माण केली हि शिवछञपतींनी.. साध काम आहे का.. फक्त सात जण हजारोंच्या मुघली मुंडक्याना भिडले.. नेसरी पावन झाली..

#माघ_व. १४, महाशिवरात्र, शके १५९५
आंग्ल तारीख २४ फेब्रुवारी १६७४

आज तोच दिवस .. महाशिवरात्र आणि आंग्ल तारीख २४ फेब्रुवारी आजहि आहे.. सात बेलपञे गळाली..

मुजरा सरसेनापती प्रतापराव गुजर.. आणि सहा शिलेदारांना.. कुणी शाहिर अजुनहि गात आहे..

म्यानातुन उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात..!
वेडात मराठे वीर दौडले सात..

नेसरीचा रणसंग्राम..

एक स्मारक..
स्वामिनिष्ठेचे..
सरसेनापती प्रतापराव गुजर..

शिवरायांच्या एका शब्दाखातर ऐतिहासिक पराक्रम गाजवणारे नरवीर तानाजी मालुसरे!

शिवरायांच्या एका शब्दाखातर ऐतिहासिक पराक्रम गाजवणारे नरवीर तानाजी मालुसरे!
तानाजी मालुसरे यांचे नाव ज्यांना माहीत नाही असा मराठी माणूस सापडणे कठीण! लहानपणापासून शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेत असताना आपल्याला तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेची ओळख होते आणि त्या नरवीराचे शौर्य आपल्या मनात कायमचे घर करून बसते. त्याच शौर्यगाथेला पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी हा छोटासा लेख!

वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली. आपल्या काही निवडक सवंगड्यांच्या साथीने महाराजांनी स्वातंत्र्याचा एल्गार पुकारला. त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य मिळवण्यासाठी लढण्याची शपथ घेतली होती. शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एक होते तानाजी मालुसरे!

जून १६६५ रोजी मोघलांसोबत केलेल्या पुरंदर तहानुसार शिवाजी राजांना कोंढाणा किल्ल्यासह इतर २२ किल्ले मोघलांच्या हाती सोपवावे लागले. या तहामुळे मराठ्यांच्या स्वाभिमानाला कोठेतरी ठेच पोचली होती. राजमाता जिजाऊ आईसाहेब देखील या तहामुळे व्याकूळ झाल्या होत्या. जे किल्ले शिवाजी महाराजांनी इतक्या कष्टाने प्राण धोक्यात घालून मिळवले होते, जे किल्ले कित्येक मावळ्यांच्या रक्ताने पावन झाले होते असे स्वराज्याची संपत्ती असणारे किल्ले सहज शत्रूहाती जाऊ देणे त्यांना पटत नव्हते. मुख्य म्हणजे त्यातील कोंढाणा हा किल्ला पुण्याच्या तोंडाला व जेजुरीच्या बारीला असल्याने तेवढ्या प्रांतावर देखरेख राही.

शिवाजी महाराजांना देखील जिजाऊ आईसाहेबांच्या मनातील सल कळत होती, परंतु त्यांचा देखिल नाईलाज होता. मोघलांच्या प्रचंड मोठ्या संरक्षण कवचामुळे कोंढाणा परत मिळवणे वाटत होते तितके सोप्पे नव्हते. परंतु मातेच्या हट्टासमोर राजे नमले आणि त्यांनी कोंढाणा परत मिळवण्याचा प्रण केला.

शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक शूरवीर होते जे कोंढाणा जिंकून आणण्यासाठी जीवाची बाजी लावायला तयार होते, परंतु या मोहिमेचा विचार करताना महाराजांच्या मनात एकाच वीराचे नाव आले- तानाजी मालुसरे!

तानाजी मालुसरे म्हणजे शिवाजी महाराजांचे बालपणीचे मित्र आणि महाराजांच्या अतिशय विश्वासातील साथीदार. महाराजांच्या प्रत्येक संकटाच्या काळात तानाजींनी मोलाची साथ दिली होती. सुरुवातीला जेव्हा महाराजांनी किल्ले हाती घेण्याची मोहीम चालवली होती तेव्हा प्रत्येक मोहिमेत तानाजी आघाडीवर होते. ऐतिहासिक अफजल खान वधाच्या वेळी सय्यद बंडा नावाच्या अंगरक्षकास छाटण्याचे काम तानाजींनीच केले होते. शाहिस्तेखानचा फडशा फाडण्यासाठी जेव्हा महाराज १०-१२ विश्वासू साथीदारांना घेऊन लाल महालात घुसले होते त्या १०-१२ जणांमध्ये देखील तानाजी मालुसरे यांचा समावेश होता. शिवाजी महाराजांनी तानाजींचा पराक्रम प्रत्येक वेळेस जवळून पाहिला होता त्यामुळे कोंढाणा फत्ते करण्याचा पराक्रम केवळ तानाजी करू शकतात याची त्यांना खात्री होती.

तानाजी हे बारा हजार हशमाचे (पायदळ) सुभेदार होते. त्यांना पालखीचा व पांच कर्ण्यांचा मान होता. जेव्हा शिवाजी महाराजांनी तानाजींना तातडीने बोलावणे धाडले तेव्हा तानाजी उमरठे गावात आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. परंतु आपल्या राजाचे बोलावणे आल्याबरोबर हातची सर्व कामे सोडून त्यांनी थेट राजांची भेट घेतली. त्यांच्या सोबत शेलारमामा आणि बंधू सूर्याजी देखील होते. महाराजांनी आपला मनसुबा तानाजींना बोलून दाखवताच तानाजी धन्य झाले. महाराजांनी अत्यंत कठीण प्रसंगावेळी आपली आठवण काढली या पेक्षा मोठे भाग्य ते काय या विचाराने त्यांची छाती गर्वाने फुलून गेली.

त्यावेळेस शेलार मामांनी सांगितलें की,

आधी लग्न उरकून घेऊ. मग कामगिरीसाठी निघू.
तेव्हा तानाजींनी उत्तर दिले,

आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे

महाराजांची भेट घेतल्यावर तानाजी जिजाऊ आईसाहेबांना जाऊन भेटले. जिजाई आईसाहेबांनी देखील तानाजींना यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला. तानाजींनी आपला मुलगा रायबाची जबाबदारी शिवाजी महाराजांच्या हाती दिली आणि म्हटलें की,

जर कोंढाण्याहून परत आलो तर मी त्याचे लग्न लावून देईन, जर मेलो तर तुम्ही त्याचे लग्न लावून द्या

माघ वद्य अष्टमीला ४ फेब्रुवारी १६७० रोजी रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येउन पोचले. सिंहगडावर उदयभान नावाचा अतिशय शूर सरदार तैनात होता. हा उदयभान मूळचा राठोड रजपूत होता पण पुढे बाटून मुसलमान झाला होता. त्याच्या हाताखाली रजपूत सैन्य देखील बरेच होते.

तानाजी आपल्या सैन्यासह गडाच्या कल्याण दरवाज्याखाली आले. रात्र बरीच झाली होती. सगळीकडे काळाकुट्ट अंधार होता. तानाजींनी कोंढाण्यावर जाण्याचासाठी एक मार्ग निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा! हा कडा उभा तुटलेला होता. त्यास साखळी, दोराची शिडी लावून तटावर चढता येणे शक्य होते. तानाजींनी आपली यशवंती घोरपड घेऊन तिच्या कमरेस साखळी बांधून तिला ठरविलेल्या कड्याच्या वर चढविले खरे, परंतु घोरपड माघारी आली. जणू ती पुढे घडणाऱ्या अशुभ प्रसंगाविषयी तानाजींना संकेत देत होती. परंतु त्या संकेताकडे दुर्लक्ष करीत तानाजींनी आपल्या साथीदारांसह किल्ल्यावर प्रवेश केला आणि शत्रू सैन्याला कात्रीत पकडले.

पुढे दरवाजावर आपले लोक असावेत म्हणून तानाजींनी पुणे बाजूकडील पहिल्या दरवाजावर जाऊन तेथील पहारेकर्‍यांवर अचानक हल्ला केला त्यांना कापून काढले.
दरवाजा ताब्यात घेतल्यावर दुसर्‍या व तिसर्‍या दरवाजांवर जाऊन तेथील पहारेकऱ्यांना यमसदनी पाठवून ते दरवाजे देखील ताब्यात घेतले. या अनपेक्षित गडबडीमुळे किल्ल्यावरील शत्रूची फौज जागी झाली. एव्हाना उदयभान देखील भानावर आला आणि त्याने सैन्य जमवण्यास सुरुवात केली. गडाचा सरनोबत सिद्दी हलाल हा सर्वप्रथम तानाजींना सामोरे गेला. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले आणि त्यात सिद्दी हलाल पडला. ज्या साखळदंडाच्या सहाय्याने मराठे सैन्य गडावर चढत होते, तो तुटल्याने सर्वजण सुर्याजीच्या नेतृत्वाखाली गडाच्या कल्याण दरवाज्याजवळ जमले आणि दरवाजा उघडण्याची वाट पाहू लागले. तानाजी हळूहळू कल्याण दरवाज्याकडे सरकत होते. इतक्यात उदयभानाने सर्व शक्तीनिशी तानाजींवर हल्ला केला. रात्रीचा प्रवास, किल्ल्यावर चढाई-हल्ला आणि मुख्य म्हणजे मोहीम फत्ते करण्याचे दडपण या गोष्टींमुळे तानाजी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचले होते. याउलट उदयभान मात्र ताजातवाना होता.

उदयभानाच्या जोरदार हल्ल्यामुळे तानाजींच्या शरीरावर जखमा झाल्या त्यांची ढाल देखील तुटली, परंतु अश्या परिस्थितीत हार न मानता शेल्याने आपला हात बांधून त्यावर ते उदयभानाचे वार झेलीत होते. परंतु नियतीला जणू तानाजींचा हा प्रकाराम बघवत नव्हता आणि उदयभानाच्या एका जबरदस्त वाराने त्यांच्या प्राणांचा ठाव घेतला आणि तानाजी धारतीर्थी पडले. पण मरता मरता त्यांनी असंख्य शत्रूंना कापून काढले आणि आपल्या मावळ्यांसाठी पुढील वाट मोकळी करून दिली होती. आपले सुभेदार पडल्याचे पाहूनही ८० वर्षांचे शेलारमामा खचले नाहीत, त्यांनी नेतृत्व आपल्या हाती घेतले आणि त्वेषाने लढत ते कल्याण दरवाज्यापर्यंत येऊन पोचले. दरवाज्याजवळ पोचताच त्यांनी तेथील पहारा कापून बाहेर असलेल्या सूर्याजीला आणि इतर मावळ्यांना आत घेतले.

सैन्याचा धीर खचू नये म्हणून तानाजी पडले ही वार्ता शेलार मामांनी मुद्दामच गुप्त ठेवली आणि पुढे सूर्याजीने उदयभानासह त्याच्या संपूर्ण सेनेचा फडशा पाडीत कोंढाणा ताब्यात घेतला. एका रात्रीत मराठ्यांनी स्वराज्याचे मौल्यवान रत्न ताब्यात घेतले. सूर्याजीने गवताच्या गंजीस आग लावून पाच तोफा केल्या, त्या महाराजांनी ऐकल्या. गड सर झाल्याचा तो संकेत होता. महाराजांना अत्यानंद झाला. पण जेव्हा त्यांना बातमी कळली की त्यांचा सिंह तानाजी मात्र लढता लढता मेला तेव्हा मात्र त्यांना अश्रू अनावर झाले नाहीत आणि त्यांच्या तोंडून तानाजींबद्दल ते ऐतिहासिक गौरवोद्गार निघाले,

गड आला पण स्वराज्याचा सिंह गेला
आजही कोंढाणा किल्ला ऊर्फ सिंहगड आणि त्याच्या आसपासचा परिसर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या साथीदारांच्या शौर्याच्या पाऊलखुणा कणाकाणात साठवून इतिहासाची साक्ष देत अभिमानाने उभा आहे.

धन्य ते तानाजी आणि धन्य त्यांचा पराक्रम!!!

"सिंहगडाचा दुसरा सिंह- नावजी लखमाजी बलकवडे".

अपरिचित मावळे
सदर

"सिंहगडाचा दुसरा सिंह-
नावजी लखमाजी बलकवडे"...
संभाजी महाराज जाऊन ४ वर्षे लोटली होती. संपूर्ण स्वराज्याचाच घास घेण्यासाठी औरंगजेब चवताळून उठला होता. आज हा किल्ला उद्या तो किल्ला असे एक एक करून सारे किल्ले मोगलांकडे चालले होते. राजाराम महाराज स्वराज्यापासून दूर जिंजीस वास्तव्य करीत होते. स्वराज्याचे काम संताजी घोरपडे, धनाजी जाधवराव, शंकराजी नारायण सचिव, परशुराम त्रिंबक आदी लोकं बघत.
राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर आदी बलाढ्य किल्ले शत्रूच्या हाती लागले होते. त्यामुळे ठोस हालचाल करणे मराठ्यांना जमत नव्हते. सह्याद्रीच्या कुशीतल्या ह्या वाघांना जणू सह्याद्रीचीच भीती वाटत असें. हालचालींचा वेग वाढविण्यासाठीच म्हणून की काय धाडसी लोकांच्या सहाय्याने १६९३ च्या दरम्यान स्वराज्याच्या ह्या जुन्या शिलेदारांना पुन्हा स्वराज्यात सामील करून घेण्याच्या उद्देशाने काही बेत सचिव शंकराजी नारायण यांनी आखले. त्यातीलच एक म्हणजे सिंहगडावर पुन्हा कब्जा मिळवायचा
शिवा - संभाला जशी त्यांच्या यार दोस्तांनी मदत केली. स्वताच्याच जीवावर उदार होणाऱ्यांची मांदियाळी राजाराम महाराजांच्या पाठीशी देखील उभी राहिली त्यातीलच एक म्हणजे नावजी लखमाजी बलकवडे. बलकवडेंनी सिंहगड जिंकून देण्याचे कबूल केले. बदल्यात शंकराजींनी त्यांना पवन मावळातील सारगाव इनाम द्यायचे असें ठरले.
नावजी हे शंकराजींच्या पायदळातील पंचसहस्त्री. अंगापिंडाने माणूस अगदी दणकट, टोलेजंग जिवंत देखावा. जणू तान्हाजीच त्यो. पण अनुभवाने थोडे कमी. शंकराजीना सिंहगडाचा पूर्ण परिसर अवगत होता. नवजी सारख्या एकट्यांचे हे काम नाही हे टिपूणच विठोजी कारके यांना मदतनीस म्हणून धाडले.२५ जून रोजी निवडक माणसे सोबत घेऊन. या दोन वीरांनी किल्ले राजमाची सोडली. ऐन पावसाळ्याची ही मोहीम. अंधार, चिखल अशात किर्र रानं तुडवीत. ती मावळी भूतांची सेना सिंहगडनजीकच्या जंगलात येऊन पोचली आणि योग्य संधीची वात बघत ५ दिवस दबा धरुन बसले.
दि. ३० जूनच्या मध्यरात्री नावजी शिड्या व दोर बरोबर घेउन सिंहगड चढु लागले.अवघड मार्गानी खाचा-खळग्यातुन ते तटबंदीच्या खाली आले. परंतु किल्ल्यवर मोगलांचे गस्त सुरु होती आणि पहरेकरी सावध होते, २० वर्षांपूर्वी एका सिंहानेच दिलेल्या तडाक्याची याद मनात होतीच म्हणूनच प्रत्येक किल्लेदाराला सक्त गस्तीचे आदेश औरंगजेबाने आधीच दिले होते. त्यामुळे आपला कामचुकारपणा टाळत सर्वजण जागसुदच होते
म्हणून मराठ्यांना तटाला शिड्या लावता आल्या नाहीत. सुर्योदय झाला...तेंव्हा किल्ल्यवरच्या गस्तीवाल्या पथकाची वेळ संपुन नवे लोक गस्तीसाठी आले.. या लवचिक संधीचा फ़ायदा घेउन नावजींनी शिड्या तटाला लावल्या आणि ते मावळ्यांसह सिंहगडवर आले.. मराठे सैनिकांनी त्याबाजुचे पहारेकरी गुपचुप कापुन काढले. अकस्मात हल्ला झाल्याने मोगलांची फ़ार हानी झाली.मराठे किल्ल्यावर आले आहेत अशी चाहुल जर किल्लेदाराला लागली असती तर तो सावध झाला आणि मोगल सैन्याने एकवटुन नावजींच्या लोकांवर हल्ला चढवला असता.पण नावजींनी त्यांचे काम चोख बजावले होते.
पावसाळ्यतल्या धुक्यामुळे लांब वरुन काय चालले आहे ते दिसत नव्हते.जणू पुन्हा निसर्ग मराठ्यांच्या मदतीस धावला होता नावजींचे धैर्य बघुन विठोजी कारकेंना हुरुप आला. ते यावेळी तटाखाली योग्य संधीची वाट बघत थांबले होते. ते ही शिड्या लाऊन वर आले.. आत मराठ्यांचे सर्व सैन्य गडावर पोहोचले होते.. हर हर महादेव च्या गजरात सिंहगडाने परत एकदा स्वराज्याचा उंबरा ओलांडला. थोडी झटापट उडाली पण अखेर मराठी बाणा दाखवत गड फत्ते केला.
धन्य ते नावजी आणि धन्य त्यांचे ते मावळे.....

शिवरायांना माणसांची अचुक ओळख


शिवरायांना माणसांची अचुक ओळख
होती.
त्यांनी लहानपणी घोड्यावरून रपेट
मारताना अनेक जिवलग मित्र जमवले
होते जे स्वराज्यासाठी झटले,
कामी आले.अशा काहींची नावे
खालीलप्रमाणे :-
कान्होजी जेधे - शहाजीराजांचे
विश्वासू सरदार होते.
गोमाजी नाईक – पुर्वी नाईकांतर्फे
असणारे गोमाजींना लग्नानंतर
जिजाऊंसोबत भोसले घराण्यामधे
पाठवले होते.
बाजी पासलकर – आदिलशाहीचे मोठे
देशमुख म्हणुन मावळ प्रांतामधे
दरारा होता. पुरंदरच्या लढाईमधे
ते कामी आले.
येसाजी कंक – बालपणीचे मित्र,
किल्ले तोरणाचे किल्लेदार.
फिरंगोजी नरसाळा – किल्ले
चाकणचा किल्लेदार,
शायिस्तेखानाशी झुंज.
नेतोजी पालकर – स्वराज्याचे
सरनोबत
बाजीप्रभु देशपांडे – पावनखिंडीमधे
बलिदान
मुरारबाजी देशपांडे – किल्ले पुरंदरचे
किल्लेदार, दिलेरखानाविरुद् -ध
लढाईमधे बलिदान
चिमणाजी देशपांडे –
शिवरायांसोबत लालमहालामधे
छापा घातला
प्रतापराव गुजर – स्वराज्याचे
सरनोबत
हंबिरराव मोहिते – स्वराज्याचे
सरनोबत
तानाजी मालुसरे – शिवरायांचे
बालमित्र, किल्ले
कोंढाणा घेण्यावेळी बलिदान
बहिर्जी नाईक – बहुरुपी,
शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचे
प्रमुख
हिरोजी फर्जंद – आग्र्याहुन
निसटताना शिवरायांच्या एवजी त्यांच्या गादीवर
सोंग घेऊन झोपले होते.
सोनोपंत डबीर – स्वराज्याचे प्रथम
पेशवा, प्रमुख सल्लागार
स्वराज्याचा दर्यासारंग
कान्होजी आंग्रे
(आरमारप्रमुख)
मदारी मेहतर – शिवरायांचा सेवक
बाजी जेधे – कान्होजी जेधे यांचे
पुत्र
मालोजी घोरपडे – स्वराज्याचे
सरनोबत
(छत्रपती संभाजीराजांच्या -वेळी)
संताजी घोरपडे – मालोजी घोरपडेंचे
पुत्र व स्वराज्याचे सरनोबत
(छत्रपती राजारामानंतर)
हैदर अली, धनाजी जाधव, रघुनाथ
बल्लाळ, कोंडाजी फर्जंद,
फुलाजी प्रभु देशपांडे,
व्यंकोजी दत्तो अशी अनेक माणसे
स्वराज्याच्या कामी आले.

सरसेनापती धनाजीराव जाधवराव

अपरिचित मावळे

सरसेनापती धनाजीराव जाधवराव
जन्म - इ स १६४९
मृत्यू - इ स १७१०

धनाजी जाधवराव हे मराठा साम्राज्याचे इसवी सन १६९७ ते १७०८ या काळात सरसेनापती होते. त्यांनी संभाजी महाराजांच्या तसेच राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धुरा वाहिली. सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यानंतर धनाजींनी सरसेनापती पदाची सूत्रे हाती घेतली. शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यात धनाजींचा मोठा वाटा होता.

छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजी सारख्या ८००-९०० मैल दुर असलेल्या प्रदेशातुन महाराजांनी ओरंगजेबाविरुध्द दोन आघाड्या उघडल्या होत्या. जवळ पैसे नाही, सरदार नाही, सैन्य नाही अशा काळात सरदारांना परत बोलाविन्यासाठी त्यांनी वतनदारी द्यायला सुरु केली. वतनदारीच्या आमिषा मूळे परत जुने लोक स्वराज्याला सामिल होऊ लागले. एवढीच एक काय ती चांगली गोष्ट. राज्यात दुष्काळ व मोगलांची जाळपोळ यामूळे राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली. यावर त्यांनी एक सरदारच नेमला जो गावागावत फिरुन गुन्हेगारास शासन देई. राज्य कर्जबाजारी झाले. महाराजांनी हुंड्याचा रुपात वतने द्यायला सुरुवात केली. आणि ईथुनच राज्यावरच्या एकछत्री अंमल संपायला सुरुवात झाली. वतनाप्रमाने सरदार स्वतः फोज फाटा बाळगी व जेव्हा राजाला गरज पडली तेव्हा त्याचा साह्यास जाई. ह्यात झाले काय की ते वतनदार त्यांचा वतनापुरते राजे बनले.
त्यांचा सैन्यात जे शिपाई असत त्यांचे ईमान हे मुख्य राजा सोबत नसुन वतनदारासोबत असे त्यामूळे "स्वराज्य" ही कल्पनाच नष्ट झाली व वतनदारीस सुरुवात् झाली. अवघड लढाई दिसली की हे वतनदार स्वराज्याकडे पाठ फिरवीत व मोगलांना जाउन मिळत. एकच वतन अनेक लोकांना यामुळे दिले गेल व भलत्याच भानगंडींना स्वराज्याचा न्यायाधिशाला नंतर सामोरे जावे लागले.
धनाजी जाधवराव , संताजी घोरपडे हे दोघे सरदार होते ,दोघेही देशप्रेम नावाची चिज बाळगुन होते. ह्या दोघांनी परत गनिमी कावा सुरु करुन थोरल्या महाराजांप्रमाने अकस्मात हल्ले करायला सुरु केले. ह्या दोघांसोबत हुकुमतपन्हा, प्रतिनिधी, घोरपडे बंधु (बर्हीर्जी व मालोजी) ह्या सरदारांनी अनेक छोट्या आघाड्या उघडल्या. दिवस रात्र पायपिट करुन ही लोक हल्ले करुन अकस्मात माघार घ्यायची. "स्वराज्य" ही कल्पना टिकवुन ठेवन्यासाठी ह्या लोकांनी अहोरात्र मेहनत घेतली.

राजाराम महाराजांच्या काळात धनाजी जाधवराव यांनी फलटण च्या मैदानात बादशहाच्या फौजेशी हमरीतुमरीची लढाई देवून शास्तेखान व रणमस्तखान यांचा पाडाव केला या पराक्रमावर खुश होवून छत्रपती राजाराम महाराजांनी धनाजी जाधवराव यांचा सन्मान केला. त्याची एक नोंद मिळते ती अशी
" वर्तमान छत्रपतीस कळलेवर जाधवराव यांस भेटून बहुमान वस्रे ,भूषणे देवून 'जयसिंगराव' हा किताब दिला "

राजाराम महाराजांचा मुक्काम हा पन्हाळगडावर सप्टेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत होता, २६ सप्टें १६८९ या दिवशी राजाराम महाराजांनी पन्हाळगडावरून गुप्त वेश धारण करून पलायन केले. राजाराम महाराज पन्हाळगडावर असताना संताजी घोरपडे आणि धनाजी जाधवराव यांनी मोघली सैन्यावर छापे घालण्यास सुरवात केली. त्याची एक नोंद मिळते ती अशी
“…. शत्रूस उपद्रव करण्या हेतू रामचंद्रपंत यांच्या आज्ञेनुसार संताजी घोरपडे, आणि धनाजी जाधव यास शेख निजामावर पाठवले, निजामाला जिंकण्यासाठी गेलेल्या संताजी घोरपडे आदिकांनी प्रथम निजामाचा पराभव करून नंतर त्याचे हत्ती-घोडे पुष्कळ द्रव्य हरण केले. तेव्हा अंगावर जखमा झालेला निजाम जीव वाचवून पळून गेला”
राजाराम महाराज चंदी प्रांतात(जिंजी) जाताना धनाजी जाधवराव यांनी मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना ' साहेबनौबत ' हे पद दिले ,पुढे काही कारणास्तव सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यावर इतराजी झाली त्यावेळी सेनापती पद धनाजी जाधवराव यांच्याकडे दिले,
इ.स १७०६ मध्ये सरसेनापती धनाजी जाधवराव आपल्या १५००० खड्या फौजेस घेऊन गुजरातेत गेले होते व त्यांनि बादशहाच्या हंगामी सुभेदारास (अब्दुल हमीद) कैद करून मोगली सैन्याची दाणादाण उडवुन प्रंचड लुट घेऊन तो स्वराज्यात परत आले होते.
मोगलांपासून सुटका झाल्यावर शाहूराजे सैन्य गोळा करीत खानदेश मार्गे सातार्यास पोहचले. राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराबाईने शाहूराजांचा गादीवरील हक्क अमान्य केला; तथापि शाहू महाराजांनी स्वत:स सातार्यास राज्येभिषेक करविला (१२ जानेवारी १७०८) . शाहू महाराज हेच खरे वारस आहेत म्हणून धनाजी जाधवराव यांनी शाहू महाराजांचा पक्ष स्वीकारला होता.

येसाजी कंक

अपरिचित मावळा

येसाजी कंक
येसाजी वेलवंड खोर्याचे प्रतिष्ठित देशमुख होते.शिवाजीराजें तसेच शंभूराजेंचे जवळचे सहकारी होते.शिवाजीराजेंच्या दक्षिण दिग्विजयच्या मोहिमेत ते राजेंसोबत होते.छत्रपतीच्या आदेशानुसार येसाजीने गोवळकोंड्याचा बादशाह अबुलहसन कुतुबशाह याच्या मदमस्त हत्तीला आपल्या अतुल्य पराक्रमाने लोळवले होते.अनेक विजयी मोहिमेचे नेतृत्व येसाजींनी केले होते.शिवाजीराजेंनंतर शंभूराजेंसोबत त्यांनी फोंड्याला पोतुर्गीजाना पाणी पाजले या युध्दाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.गोवा जिंकल्यावर शंभूराजेंनी पोर्तुगीजशी तह केला होता.पण औरंगजेबने,कुडाळच्या सावंतने तसेच वेंगुर्ल्याच्या देसाईने,पोर्तुगीजांना फितवून फोंडा किल्यावर आक्रमण करावयास लावले.त्यावेळी फोंडा किल्याचा किल्लेदार येसाजी कंक हा होता.पोर्तुगीजांनी जोरदार आक्रमण करून फोंडा किल्यास भगदाड पाडले.यावेळी किल्यात फक्त आठशे मावळे होते.पोर्तुगीजांनी किल्याच्या भगदाडातून आत प्रवेश केल्यानंतर येसाजी त्याचा पुत्र कृ्णाजी व मावळ्यांनी असा पराक्रम केला की पोर्तुगीजांची दाणादाण उडाली.पण पोर्तुगीजांची संख्या मोठी असल्यामुळे मराठ्यांचा टिकाव लागेना.याचवेळी शंभूराजें येसाजीच्या मदतीस एक हजार घोडदळ व तितकेच पायदळ घेऊन आले.त्यामुळे मराठ्यांना अधिक चेव चढला.मराठ्यांपुढे पोर्तुगीजांचा टिकाव लागला नाही त्यांचा पराभव झाला.या युध्दात येसाजी कायमचे जायबंदी झाले तर त्यांचा पुत्र कृष्णाजी युध्दात मारला गेला.या युध्दात पराक्रम गाजविल्याबद्दल शंभूराजेंनी येसाजीस एक हजार होन नेमणूक देऊन त्यांचा सन्मान केला.

महादजी शिंदे

अपरिचित....

महादजी शिंदे:-

पानिपतच्या तिसर्या लढाईत दत्ताजी शिंदे,जनकोजी शिंदे यांच्या मृत्युनंतर महादजी शिंदे यांना १५ जानेवारी १७६८ या दिवशी सरदारकी मिळाली, ते उज्जैनचे जहागीरदार बनले आणि त्यांना सरंजामी नेमणूकही मिळाली.
शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ केली आणि ज्यांनी तिच्यावर कळस चढवला ते महादजी शिंदे,ज्यांच्याबद्दल कसल्याहि प्रसंगी न डगमगणारा, शूर, मुत्सद्दी, राष्ट्रहित जाणणारा, काटकसरी, कृष्णभक्त, सुदृढ, मध्यम उंचीचा, काळासांवळा, साध्या रहाणीचा, कवि, परधर्मसहिष्णु, शकुनादिकांवर भरंवसा ठेवणारा, त्यावेळच्या मानानें सुशिक्षित व राज्यकारभार उत्तम ठेवणारा होते म्हटले जाते .
महादजी शिंदेचे नाव मराठ्यांच्या इतिहासात महान सेनानी म्हणून घेतले जाते. ग्वाल्हेरच्या या सिंहात असामान्य शौर्य, मुत्सद्दीपणा, धडाडी, राजकर्ता असे अनेक गुण होते. त्यांच्या कतुर्त्वामुळे इंग्रजांकडून मानाने यांना 'द ग्रेट मराठा' असे म्हटले जात. पानिपतची लढाई, वडगावची लढाई सालबादचा तह, बारभाई कारस्थान अशा अनेक घटनांमध्ये त्यांनी महत्त्वाची भुमिका बजावली. पानिपतच्या तिसर्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. अस्थिर अशा मराठा साम्राज्याला महादजींमुळे स्थैर्य लाभले. मुघल, इंग्रज आणि आप्तस्वकीयांच्या विरुद्ध ते आजन्म लढले
पोस्ट शेअर करा

सिंहगडाचा दुसरा सिंह- नावजी लखमाजी बलकवडे

#अपरिचित
"

सिंहगडाचा दुसरा सिंह- नावजी लखमाजी बलकवडे"...
संभाजी महाराज जाऊन ४ वर्षे लोटली होती. संपूर्ण स्वराज्याचाच घास घेण्यासाठी औरंगजेब चवताळून उठला होता. आज हा किल्ला उद्या तो किल्ला असे एक एक करून सारे किल्ले मोगलांकडे चालले होते. राजाराम महाराज स्वराज्यापासून दूर जिंजीस वास्तव्य करीत होते. स्वराज्याचे काम संताजी घोरपडे, धनाजी जाधवराव, शंकराजी नारायण सचिव, परशुराम त्रिंबक आदी लोकं बघत.
राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर आदी बलाढ्य किल्ले शत्रूच्या हाती लागले होते. त्यामुळे ठोस हालचाल करणे मराठ्यांना जमत नव्हते. सह्याद्रीच्या कुशीतल्या ह्या वाघांना जणू सह्याद्रीचीच भीती वाटत असें. हालचालींचा वेग वाढविण्यासाठीच म्हणून की काय धाडसी लोकांच्या सहाय्याने १६९३ च्या दरम्यान स्वराज्याच्या ह्या जुन्या शिलेदारांना पुन्हा स्वराज्यात सामील करून घेण्याच्या उद्देशाने काही बेत सचिव शंकराजी नारायण यांनी आखले. त्यातीलच एक म्हणजे सिंहगडावर पुन्हा कब्जा मिळवायचा
शिवा - संभाला जशी त्यांच्या यार दोस्तांनी मदत केली. स्वताच्याच जीवावर उदार होणाऱ्यांची मांदियाळी राजाराम महाराजांच्या पाठीशी देखील उभी राहिली त्यातीलच एक म्हणजे नावजी लखमाजी बलकवडे. बलकवडेंनी सिंहगड जिंकून देण्याचे कबूल केले. बदल्यात शंकराजींनी त्यांना पवन मावळातील सारगाव इनाम द्यायचे असें ठरले.
नावजी हे शंकराजींच्या पायदळातील पंचसहस्त्री. अंगापिंडाने माणूस अगदी दणकट, टोलेजंग जिवंत देखावा. जणू तान्हाजीच त्यो. पण अनुभवाने थोडे कमी. शंकराजीना सिंहगडाचा पूर्ण परिसर अवगत होता. नवजी सारख्या एकट्यांचे हे काम नाही हे टिपूणच विठोजी कारके यांना मदतनीस म्हणून धाडले.२५ जून रोजी निवडक माणसे सोबत घेऊन. या दोन वीरांनी किल्ले राजमाची सोडली. ऐन पावसाळ्याची ही मोहीम. अंधार, चिखल अशात किर्र रानं तुडवीत. ती मावळी भूतांची सेना सिंहगडनजीकच्या जंगलात येऊन पोचली आणि योग्य संधीची वात बघत ५ दिवस दबा धरुन बसले.
दि. ३० जूनच्या मध्यरात्री नावजी शिड्या व दोर बरोबर घेउन सिंहगड चढु लागले.अवघड मार्गानी खाचा-खळग्यातुन ते तटबंदीच्या खाली आले. परंतु किल्ल्यवर मोगलांचे गस्त सुरु होती आणि पहरेकरी सावध होते, २० वर्षांपूर्वी एका सिंहानेच दिलेल्या तडाक्याची याद मनात होतीच म्हणूनच प्रत्येक किल्लेदाराला सक्त गस्तीचे आदेश औरंगजेबाने आधीच दिले होते. त्यामुळे आपला कामचुकारपणा टाळत सर्वजण जागसुदच होते
म्हणून मराठ्यांना तटाला शिड्या लावता आल्या नाहीत. सुर्योदय झाला...तेंव्हा किल्ल्यवरच्या गस्तीवाल्या पथकाची वेळ संपुन नवे लोक गस्तीसाठी आले.. या लवचिक संधीचा फ़ायदा घेउन नावजींनी शिड्या तटाला लावल्या आणि ते मावळ्यांसह सिंहगडवर आले.. मराठे सैनिकांनी त्याबाजुचे पहारेकरी गुपचुप कापुन काढले. अकस्मात हल्ला झाल्याने मोगलांची फ़ार हानी झाली.मराठे किल्ल्यावर आले आहेत अशी चाहुल जर किल्लेदाराला लागली असती तर तो सावध झाला आणि मोगल सैन्याने एकवटुन नावजींच्या लोकांवर हल्ला चढवला असता.पण नावजींनी त्यांचे काम चोख बजावले होते.
पावसाळ्यतल्या धुक्यामुळे लांब वरुन काय चालले आहे ते दिसत नव्हते.जणू पुन्हा निसर्ग मराठ्यांच्या मदतीस धावला होता नावजींचे धैर्य बघुन विठोजी कारकेंना हुरुप आला. ते यावेळी तटाखाली योग्य संधीची वाट बघत थांबले होते. ते ही शिड्या लाऊन वर आले.. आत मराठ्यांचे सर्व सैन्य गडावर पोहोचले होते.. हर हर महादेव च्या गजरात सिंहगडाने परत एकदा स्वराज्याचा उंबरा ओलांडला. थोडी झटापट उडाली पण अखेर मराठी बाणा दाखवत गड फत्ते केला.
धन्य ते नावजी आणि धन्य त्यांचे ते मावळे.....

दिपाजी राऊत


दिपाजी राऊत

शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतल्यामुळे हडबडलेल्या विजापुरी सल्तनतीने राजांवर बहलोलखान सारखा खासा पठाण धाडला होता परंतु अष्टावधानी असणाऱ्या बहीर्जींच्या खबरी मंडळींनी ही बातमी वाऱ्याच्या वेगाने महाराजां पावेतो पोहचवली. आणि त्यांच्या बंदोबास्तालाच प्रतापरावांसोबत १५ हजार फौज फाटा धाडला होता

प्रतापरावांनी साऱ्या सैन्यासमवेत जिवाच्या बाजीने घोडी हाकली अन् बहलोल खानच्या तळालाचं वेढा दिला. अचानक कोसळलेल्या संकटामुळे खानाची फौज थोडी घाबरली. परंतू लगेचच त्यांनी लढाईची सिद्धता दाखविली. लवकरच दोन्ही कडचे घोडदळ पायदळ एकमेकांवर आदळू लागले. एकच कापाकापी सुरु झाली.

सिद्दी हिलाल, विठोजी शिंदे, कृष्णाजी भास्कर, विठ्ठल पिलदेव, विसोजी बल्लाळ, व आनंदराव असे मराठी रियासतीचे अनुभवी सरदार अंगावर येणाऱ्या प्रत्येक गनिमास आपल्या तरवारीने पाणी पाजत होते. यात तरणे वीर तरी मागे राहतीलच कसे रुपाजी भोसले, सोमाजी मोहिते, सिधोजी निंबाळकर यांसारख्या त्यातल्यात्यात अनुभवी तरुणांमध्ये दिपाजी राऊत हे अगदी तलवारीच नवखं पातं पण हेदेखील तिखट हत्यार चालवीत होते.

बेहलोलखान व त्याचे सरदारही जबर युद्ध खेळू लागले. त्याचा एक सेनानी सिद्दी मुहम्मद बर्की याने चांगलाच पराक्रम गाजवला. पण नंतर त्याचीही मात्रा चालेना अंधाराचा फायदा घेऊन तोदेखील निसटून जाऊ लागला. पण दिपाजी राऊतांनी पळता पळवता केलेल्या हल्ल्यात बर्की जबर जखमी झाला. दिपाजींची तलवार गर्जतच होती. घोड्यावर बसून दिपाजी घुमत होते समोर येईल त्याला गारद करीत होते अशातच त्यांचा सामना झाला तो सिद्दी मुहम्मद या सेनानीशी तसा हा सेनानी रापलेलाच त्याच्यामानाने दिपाजी नवखं सिद्दी मुहम्मद ने दिपाजींचा घोडा मारला, दिपाजी दुसऱ्या घोड्यावर स्वारं झाले; परंतू हा देखील घोडा सिद्दी ने मारिला त्यामुळे चिडलेल्या दिपाजींनी जमदाढीचा मारा करून त्याला ठार केले.

असे हे नवं उगवत पातं म्हणजे दिपाजी राऊत परंतू आपल्या इतिहासाला या एवढ्या प्रसंगाशिवाय दिपाजींचा दि सुद्धा माहीत नाही
हा माझा छोटासा प्रयन्त इतिहासाच्या पानातच हरविलेल्या मावळ्यांना शोधण्याचा

पराक्रमी सेनानी सिधोजी निंबाळकर

अपरिचित मावळे

पराक्रमी सेनानी सिधोजी निंबाळकर

अरे भाई ये सिवा कब हात आयेगा खुदा जाने. बहलोल खानच्या सैन्यातील माहूत एकमेकांशी बोलत गजराजाला पाणी पाजण्यास न्हेत होते. अचानक आजूबाजूच्या झाडाफांदीवरील पाखरे उडाली इकडे तिकडे नजर फिरवताच लक्षात आले की मराठ्यांनी चारही बाजूने आपणास मराठ्यांनी घेरल्याचे लक्षात आल्यावर ती माहूत मंडळी जोरजोरात बोंबलू लागली. साऱ्या सैन्याचे लक्ष वेधू लागली. झाडांच्या आडगळीतून आलेल्या बाणांनी त्यांच्या नऱ्हडीचाच घोट घेतला

शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतल्यामुळे हडबडलेल्या विजापुरी सल्तनतीने राजांवर बहलोलखान सारखा खासा पठाण धाडला होता परंतु अष्टावधानी असणाऱ्या बहीर्जींच्या खबरी मंडळींनी ही बातमी वाऱ्याच्या वेगाने महाराजां पावेतो पोहचवली. आणि त्यांच्या बंदोबास्तालाच प्रतापरावांसोबत १५ हजार फौज फाटा धाडला होता आपल्या परिने योजना आखून खानास जेरीस आणावे. ही शिवरायांची ताकीदच होती.

अचानक कोसळलेल्या संकटामुळे खानाची फौज थोडी घाबरली. परंतू लगेचच त्यांनी लढाईची सिद्धता दाखविली. लवकरच दोन्ही कडचे घोडदळ पायदळ एकमेकांवर आदळू लागले. एकच कापाकापी सुरु झाली.

सिद्दी हिलाल, विठोजी शिंदे, कृष्णाजी भास्कर, विठ्ठल पिलदेव, विसोजी बल्लाळ, व आनंदराव असे मराठी रियासतीचे अनुभवी सरदार अंगावर येणाऱ्या प्रत्येक गनिमास आपल्या तरवारीने पाणी पाजत होते. यात तरणे वीर तरी मागे राहतीलच कसे रुपाजी भोसले. सोमाजी मोहिते. सिधोजी निंबाळकर हे देखील तिखट हत्यार चालवीत होते. पुढच्या फळीत लढणारे सिधोजी निबांळकर मोठ्या त्वेषाने दुष्मनावर तुटून पडत होते.

समोर येणाऱ्यांची खेर नव्हती. नंतर बहलोलखानाने आपल्या भोवती झालेली कोंडी फोडण्यासाठी त्याच्या फौजेत असणाऱ्या मदमस्त हत्तींना पुढे केले हे गजराज. मदोन्मत्त होऊन अनेक मराठ्यांना आपल्या पायदळी तुडवत होते. आकांत माजवत होते. अशा पिसाळळलेल्या जनावरास सिधोजींनी माहुता करवी जेरीस आणले. सायंकाळी सिधोजी निंबाळकरांनी तो हत्ती हस्तगत केला. आणि महाराजांकडे चालविला.

याच हत्तीच्या तोडीच्या कामामुळे राजांनी खुश होऊन राजेंनी सिधोजींना सैन्यात थोडी बढती दिली असेलच. साधनांच्या आभावी जास्त माहिती मिळत नाही बेहलोलखाना नंतर सिधोजींचा उल्लेख येतो तो जालानापुरीच्या लुटीत

Retribuition Visited the Maratha army very much sooner. jalna, both town and suburb, was thoughly plundered and devastated for four days. Then as the Marathas were retreating, loaded with booty cinsisting of "countless gold, silver, jewwls, clothes, horses, elephants and camels, an enterprising Mughal officer,Ranmast Khan, * attacked their rearguard . Sidhoji Nimbalkar with 5,000 men heald him in check for three days, but was at last slain with many of his men.

राजांच्या आयुष्यातील शेवटची स्वारी म्हणजे जालण्याची स्वारी ४ दिवस राजेंनी पेठा मारिल्या, शहर लुटून फन्ना केले. जडजवाहीर कापड घोडे हत्ती उंट फस्त केले. जालना म्हणजे मोगलाईतील महत्वाचे शहर ते मारिल्या मुळे
मोगल संतप्त जाहले. मोगली फौज घेऊन रणमस्त खान चालून आला त्याची गाठ महाराजांच्या सैन्याच्या मागच्या तुकडीशी संगमनेर जवळ पडली महाराजांच्या लष्करातील संताजी घोरपडे आणि पराक्रमी सेनानी सिधोजी निंबाळकर

हे या पाच हजाराच्या तुकडीचे प्रतिनिधित्व करीत होते. अखेर लवकर जेरीस येतील ते कसले मराठे आणि कसला मराठी बाणा कडवट प्रतिकार देत सिधोजींनी आपल्या ५ हजार सैन्यानिशी रणमस्तखानास सलग ३ दिवस झुंजवत ठेवला अखेर याच युद्धभूमीत सिधोजी निंबाळकर यांस वीरमरण आले.

धन्य ते मावळे धन्य त्यांची स्वामीनिष्ठा.........

Source -
Shivaji and his time - Jadunath Sarkar
सेनापती संताजी घोरपडे - जयसिंगराव पवार
शककर्ते शिवराय - विजयराव देशमुख
सभासदाची बखर - कृष्णाजी अनंत सभासद
मराठी रियासत - गो. स. सरदेसाई

पराक्रमी सेनानी सिधोजी निंबाळकर

अपरिचित मावळे

पराक्रमी सेनानी सिधोजी निंबाळकर

अरे भाई ये सिवा कब हात आयेगा खुदा जाने. बहलोल खानच्या सैन्यातील माहूत एकमेकांशी बोलत गजराजाला पाणी पाजण्यास न्हेत होते. अचानक आजूबाजूच्या झाडाफांदीवरील पाखरे उडाली इकडे तिकडे नजर फिरवताच लक्षात आले की मराठ्यांनी चारही बाजूने आपणास मराठ्यांनी घेरल्याचे लक्षात आल्यावर ती माहूत मंडळी जोरजोरात बोंबलू लागली. साऱ्या सैन्याचे लक्ष वेधू लागली. झाडांच्या आडगळीतून आलेल्या बाणांनी त्यांच्या नऱ्हडीचाच घोट घेतला

शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतल्यामुळे हडबडलेल्या विजापुरी सल्तनतीने राजांवर बहलोलखान सारखा खासा पठाण धाडला होता परंतु अष्टावधानी असणाऱ्या बहीर्जींच्या खबरी मंडळींनी ही बातमी वाऱ्याच्या वेगाने महाराजां पावेतो पोहचवली. आणि त्यांच्या बंदोबास्तालाच प्रतापरावांसोबत १५ हजार फौज फाटा धाडला होता आपल्या परिने योजना आखून खानास जेरीस आणावे. ही शिवरायांची ताकीदच होती.

अचानक कोसळलेल्या संकटामुळे खानाची फौज थोडी घाबरली. परंतू लगेचच त्यांनी लढाईची सिद्धता दाखविली. लवकरच दोन्ही कडचे घोडदळ पायदळ एकमेकांवर आदळू लागले. एकच कापाकापी सुरु झाली.

सिद्दी हिलाल, विठोजी शिंदे, कृष्णाजी भास्कर, विठ्ठल पिलदेव, विसोजी बल्लाळ, व आनंदराव असे मराठी रियासतीचे अनुभवी सरदार अंगावर येणाऱ्या प्रत्येक गनिमास आपल्या तरवारीने पाणी पाजत होते. यात तरणे वीर तरी मागे राहतीलच कसे रुपाजी भोसले. सोमाजी मोहिते. सिधोजी निंबाळकर हे देखील तिखट हत्यार चालवीत होते. पुढच्या फळीत लढणारे सिधोजी निबांळकर मोठ्या त्वेषाने दुष्मनावर तुटून पडत होते.

समोर येणाऱ्यांची खेर नव्हती. नंतर बहलोलखानाने आपल्या भोवती झालेली कोंडी फोडण्यासाठी त्याच्या फौजेत असणाऱ्या मदमस्त हत्तींना पुढे केले हे गजराज. मदोन्मत्त होऊन अनेक मराठ्यांना आपल्या पायदळी तुडवत होते. आकांत माजवत होते. अशा पिसाळळलेल्या जनावरास सिधोजींनी माहुता करवी जेरीस आणले. सायंकाळी सिधोजी निंबाळकरांनी तो हत्ती हस्तगत केला. आणि महाराजांकडे चालविला.

याच हत्तीच्या तोडीच्या कामामुळे राजांनी खुश होऊन राजेंनी सिधोजींना सैन्यात थोडी बढती दिली असेलच. साधनांच्या आभावी जास्त माहिती मिळत नाही बेहलोलखाना नंतर सिधोजींचा उल्लेख येतो तो जालानापुरीच्या लुटीत

Retribuition Visited the Maratha army very much sooner. jalna, both town and suburb, was thoughly plundered and devastated for four days. Then as the Marathas were retreating, loaded with booty cinsisting of "countless gold, silver, jewwls, clothes, horses, elephants and camels, an enterprising Mughal officer,Ranmast Khan, * attacked their rearguard . Sidhoji Nimbalkar with 5,000 men heald him in check for three days, but was at last slain with many of his men.

राजांच्या आयुष्यातील शेवटची स्वारी म्हणजे जालण्याची स्वारी ४ दिवस राजेंनी पेठा मारिल्या, शहर लुटून फन्ना केले. जडजवाहीर कापड घोडे हत्ती उंट फस्त केले. जालना म्हणजे मोगलाईतील महत्वाचे शहर ते मारिल्या मुळे
मोगल संतप्त जाहले. मोगली फौज घेऊन रणमस्त खान चालून आला त्याची गाठ महाराजांच्या सैन्याच्या मागच्या तुकडीशी संगमनेर जवळ पडली महाराजांच्या लष्करातील संताजी घोरपडे आणि पराक्रमी सेनानी सिधोजी निंबाळकर

हे या पाच हजाराच्या तुकडीचे प्रतिनिधित्व करीत होते. अखेर लवकर जेरीस येतील ते कसले मराठे आणि कसला मराठी बाणा कडवट प्रतिकार देत सिधोजींनी आपल्या ५ हजार सैन्यानिशी रणमस्तखानास सलग ३ दिवस झुंजवत ठेवला अखेर याच युद्धभूमीत सिधोजी निंबाळकर यांस वीरमरण आले.

धन्य ते मावळे धन्य त्यांची स्वामीनिष्ठा.........

Source -
Shivaji and his time - Jadunath Sarkar
सेनापती संताजी घोरपडे - जयसिंगराव पवार
शककर्ते शिवराय - विजयराव देशमुख
सभासदाची बखर - कृष्णाजी अनंत सभासद

कोंडाजी फर्जंद

अपरिचित मावळे
🚩

कोंडाजी फर्जंद 🚩

कोंडाजी फर्जंदाने महाराजांच्या मनी सलणारे पन्हाळ्याचे सल अलगद काट्यासारखे उचकून काढले. अन् तो म्हणाला , ‘ पन्हाळा मी घेतो. हुकूम करा. ‘ महाराजांनी कोंडाजीची शाबासकी केली. सगळेच तयार झाले होते. सगळेच मोठ्या लायकीचे होते , नायकीचे होते. महाराजांनी लगेच कोंडाजीवरच पन्हाळ्याची मोहीम नामजाद केली अन् काय सांगावं , मराठी मनामनगटाची ल्हायकी , कोंडाजी उठलाच आणि त्याच क्षणाला त्याला महाराजांनी पुसले , ‘ किती सैन्य हवं तुला ?’ बहुदा महाराजांना वाटलं असावं , कोंडाजी काही हजार गडी संगतीला मागेल. पण त्याने अवघे तीनशे हशम मागितले. तीनशे ? महाराजांनी दि. १६ जाने. १६६६ ला हल्ला केला तेव्हा महाराजांचे हजार गडी तर लढाईत पडले. तर हा कोंडाजी मुळात फक्त तीनशेच गडी मागतो ? म्हणजे याचा हा विचार की अविचार!
विचारच. याचा अर्थ गनिमी काव्याच्या पद्धतीने शक्ती आणि युक्ती लढवून कोंडाजी पन्हाळ्यासारखा बलाढ्य अंगापिंडाचा गड घारीसारखी झडप घालून उचलू पाहात होता. हेच ते शिवशाहीचे अचानक छाप्याचे युद्धतंत्र पण तेही फार सावध बुद्धीने केले तरच यश पावते.
कोंडाजी रायगडावरून तीनशे हशम (सैनिक) घेऊन त्याचदिवशी गडावरून निघाला. तेव्हा एक विलक्षण हृदयवेधी घटना घडली. कोंडाजी महाराजांना निरोपाचा मुजरा करून निघत असतानाच महाराजांनी त्याला थांबविले आणि त्याच्या उजव्या हातात सोन्याचे कडे घातले. तोही चपापला. पाहणारेही चपापलेच असतील. कारण अजून तर मोहिमेला सुरुवातही नाही अन् महाराज निघायच्या आधीच कोंडाजीला सोन्याचं कड घालताहेत!
याचा काय अर्थ असावा ? महाराजांना नक्की असं वाटलं असावं का ? मोहिमेच्या आधीच याचं कौतुक करावं. मला तान्हाजीचं कौतुक करता आलं नाही. बाजी पासलकरांचं , बाजी प्रभूंचं , मुरार बाजींचं , कावजी मल्हारचं , सूर्याजी काकडेचं अन् अशाच मुजरे करून कामगिऱ्यांवर गेलेल्या माझ्या जिवलगांचं कौतुक करायला मला मिळालं नाही. त्यांची साध्या कौतुकानं पाठ थोपटायलाही मिळाली नाही. म्हणून मोहिमेच्या आधीच या कोंडाजीचं कौतुक करून घ्यावं. इथेच महाराजांची मानसिकता इतिहासाला दिसून येते. युद्धधर्म अवघड आहे.
भरोसा देता येत नाही. पण हा माझा कोंड्या पन्हाळा नक्की नक्की फत्ते करील. हरगीज फत्ते करील असा ठाम विश्वास महाराजांना वाटत होता. तीनशे गड्यांची पागा संगती घेऊन कोंडाजी निघाला. अण्णाजी दत्तो , मोत्याजी मामा , गणोजी हे ही कोंडाजीच्या सांगाती निघाले. कोंडाजी कोकणातूनच महाड , पोलादपूर , चिपळून , खेड अन् थेट राजापूर या मार्गाने निघाला. राजापुरास पोहोचला. तिथेच त्याने तळ टाकला. अगदी गुपचूप बिनबोभाट.
कोंडाजीने राजापुरातून चोरट्या पावलांनी जाऊन पन्हाळ्याचा वेध घेतला. राजापूर ते पन्हाळा हे अंतर त्यामानाने आणि जंगली डोंगरी वाटाघाटांनी जरा जवळच. सुमारे ७० कि.मी.
कोंडाजीने गुप्त हेरगिरीने पन्हाळ्याची अचूक माहिती मिळविण्यास सुरुवात केली. त्याने काय काय सोंग ढोंग केली ते इतिहासाला माहीत नाही. त्याने वाघ्यामुरळीचा जागर घातला की , शाहीर गोंधळी बनून गडावर प्रवेश मिळविला. की यल्लम्माचा जग जोगतिणीसारखा डोईवर घेतला की फकीर अवलिया बनून मोरपिसाचा कुंचा गडावरच्या विरह व्याकुळ हशमांच्या डोक्यावरून फिरवला ते माहीत नाही.
‘ भेदे करोन ‘ पन्हाळगडाची लष्करी तबियत त्याने अचूक तपासली , यात मात्र शंका नाही. पन्हाळ्याची नाडी त्याला सापडली. गडाच्या दक्षिणेच्या बाजूनी त्याने कडा चढून गडात प्रवेश मिळविण्याचा बेत नक्की केला. ही जागा नेमकी कोणची हे बोट ठेवून आज सांगता येत नाही. पण पुसाटीचा बुरुज आणि तीन दरवाजा अन् अंधारबावडी याच्या दक्षिणांगाने असलेला कडा रातोरात चढून गडात शिरायचा बेत त्याने केला. बेत अर्थात काळोख्या मध्यरात्रीचा. यावेळी गडावर सुमारे दोन हजार शाही सैनिक होते. बाबूखान या नावाचा एक जबर तलवारीचा बहाद्दूर किल्लेदार होता.
अन् अशा बंदोबस्त असलेल्या किल्ल्याचा नागे पंडित नावाचा सबनीस होता. कोंडाजीने चढाईचा मुहूर्त धरला फाल्गुन वद्य त्रयोदशी , मध्यरात्रीचा. (दि. ६ मार्च १६७३ ) राजापूरची तीनशे मावळ्यांची टोळी घेऊन , अंधारातून कोंडाजी रान तुडवीत पन्हाळ्यानजीक येऊन पोहोचला.
फाल्गुन वद्य १३ ची ती काळोखी रात्र , सारी जमीन अन् अस्मान काळ्या काजळात बुडून गेले होते. कोंडाजीने आपल्या बरोबरच्या तीनशे सैनिकांपैकी फक्त साठ सैनिकच बाजूला काढले. अण्णाजी दत्तो यांनासुद्धा त्याने या साठात न घेता , दोनशेचाळीस मराठे हशम त्याने जागीच ठेवले. म्हणजे फक्त साठच लोकांच्यानिशी कोंडाजी पन्हाळ्यावर झडप घालणार होता की काय ?

सरखेल कान्होजी आंग्रे.

🚩अपरिचित मावळे 🚩

सरखेल कान्होजी आंग्रे.
(ऑगस्ट १६६९ ते ४ जुलै१७२९).

सरखेल या शब्दाचा अर्थ आरमार प्रमुख असा होतो.
आंग्रे १८ व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते.सरखेल कान्होजींचा दरारा....

कान्होजी आंग्रे आणि शाहू राजे (पहिले) यांच्यामध्ये १६ नोव्हेंबर १७१३ रोजी तह झाला;
सातारकर छत्रपतींची कोकणची जहागीर मोगलांपासून सुरक्षित राखण्याची जबाबदारी छत्रपती पहिले राजाराम यांनी सिधोजी घोरपडे यांचेवर सोपविली होती, परंतु हे जोखमीचे काम घोरपडे पार पाडू शकले नाही आणि पुढे ही जवाबदारी कान्होजींवर आली.

मोगलांच्या जुलमापासून मुक्त केलेल्या कोकणातील जहागिरीला राजमुद्रेची संमती मिळाली, म्हणून कान्होजी आंग्रे यांचे समाधान झाले; तर आपले हितसंबंध राखण्यासाठी आपला एक कर्तबगार प्रतिनिधी आपण कोकणासाठी मिळविला, असे समाधान शाहू छत्रपतींना झाले.

१७१३ मध्ये कान्होजींना जो प्रदेश दिला गेला त्यात सिद्दीचा काही प्रदेश दिला गेला होता यामुळे कान्होजी आणि जंजिरेकर सिद्दी यांचे युद्ध झाले. सिद्दीचे परिपत्य करण्यासाठी कान्होजींना इ. स. १७१३ ते १७१५ पर्यंत खूप परिश्रम करावे लागले. अखेर ३० जानेवारी १७१५ मध्ये कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह झाला त्यात

१. मामलत तळे व गोरेगाव, गोवेळ व निजामपूर या महलांवर आंग्रे यांना एक हजार रुपये कर मिळाला. तळेपैकी ८००, गोरेगाव ६००, गोवळ १०००, तर्फ निजामपूर १७५ मिळून रुपये २५७५ पैकी १००० रूपये कान्होजींना मिळाले.

२. तर्फ नागोठणे, अष्टमी पाली, आश्रेधार पेटा व अंतोणे यांतील निम्मा वसूल कान्होजींनी घेण्याचे ठरले.

या तहाने आपली सत्ता कमी झाली हे शल्य जंजीरेकराचे मनात सलत राहिले आणि त्याने कान्होजींचा पराभव करण्यासाठी मुंबईकर इंग्रजांची मदत घेण्याचा उपक्रम केला, इंग्रजांनी मदत केली देखील परंतु कान्होजी पुढे त्या दोघांचे काही चालले नाही.
सुरतपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत त्यांचे अनिर्बंध वर्चस्व होते.
सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आयुष्यातील प्रमुख लढाया..
१७०२ – कोचीनमध्ये सहा इंग्रजांसह काही जहाजांवर ताबा.
१७०६ – जंजिऱ्याच्या सिद्दीवर हल्ला आणि विजय.
१७१० – ब्रिटिश लढाऊ जहाज गोडोल्फिनशी
दोन दिवस झुंज दिल्यानंतर केनेरी बेटांवर
(आताचे खांदेरी) कब्जा.
१७१२ – मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम
ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज पकडले. ३००००
रुपयांच्या खंडणीनंतर सुटका.
१७१३ – ब्रिटिशांकडून १० किल्ले हस्तगत.
१७१७ – ब्रिटिशांनी केनेरी बेटांवर केलेला
हल्ला असफल. ६०००० रुपयांची खंडणी वसूल केली.
१७१८ – मुंबई बंदराची नाकेबंदी. येणाऱ्या
जाणाऱ्या जहाजांकडून कर वसुली.
१७२० – ब्रिटिशांचा घेरिया (विजयदुर्ग)
किल्यावर हल्ला असफल.
१७२१ – अलिबागवर ब्रिटिश आणि पोर्तुगीज
आरमाराचा हल्ला असफल.
१७२३ – ईगल आणि हंटर या दोन ब्रिटिश
जहाजांवर हल्ला.

बांधकाम प्रमुख हिरोजी इंदलकर.

शिवरायांचे साथीदार 🚩
अपरिचित मावळे
-

बांधकाम प्रमुख हिरोजी इंदलकर.

मराठयानी इतिहास घडविला. शिवाजी राजांनी स्वराज्य उभे केले ते नेमके याच्याच बलावर . विश्वास दिला राज्यानी "आपल राज्य उभा करायचा, मला छत्रपती व्हायच म्हणून नाही"….तमाम मराठयांच राज्य निर्माण करायच, रयतेच राज्य गरीबांच राज्य तयार करायच आहे".. ही काळजी इथल्या माणसा -माणसा मध्ये होती.
निष्ठावंत माणसे महाराजान कडे होती. हिरोजी इंदलकर नावाचा बांधकाम प्रमुख शिवाजी महाराजांकडे होता. महाराजांनी रायगड किल्ला बांधायची जबाबदारी राज्यानी त्याच्यावर सोपावली. शिवाजी महाराज स्वारी वर गेले. हिरोजीने किल्ला निम्यावर बांधत आणला आणि पैसा संपला हिरोजिला समजेणा काय करावे ..शिवाजीराजांनी तर जबाबदारी टाकली आहे. किल्ला तर पूर्ण केला पाहिजे.. तर पैसा शिल्लक नाही त्या हिरोजिने अपूर्ण काम केले. आपला राहता वाडा , आपली जमिन विकली.बायकोसह रायगडावर आला..पैशासह झोपडी घेऊन राहू लागला आणि मराठयांची राजधानी बांधून काढली.
शिवाजी महाराजांना आल्यावर कळलं हिरोजिने काय केले . राज्याभिषेकाच्या वेळी त्या शिवाजी राजांना वाटलं या हिरोजिंचा सत्कार करावा.
राज्याभिषे काच्या वेळी शिवाजी म्हणाले,"हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधला , बोला तुम्हाला काय हवय.” त्यावेळी हिरोजी नम्रपणे मान जुकवून म्हणाला ,"महाराज , उभ स्वराज्य तुम्ही पदरात टाकल .. आम्हाला आणखी काय हवय….”
महाराज म्हणाले, "नाही काही तरी मागितलेच पाहिजे"
त्यावेळी हिरोजी म्हणाला, "महाराज एक विनंती आहे ..रायगडावर आम्ही जगदिशवराचे मंदिर उभारल आहे .त्या जगदिशवराच् या एका पायरीवर आमच नाव कोरायची अनुमति आम्हाला दया".
महाराजानाकळेना हे कसल मागण.. पगार वाढ नाही मागितली, देशमुखी नाही मागितली, पाटीलकी नाही मागितली , वतन नाही मागितल …मागुन मागितले तर काय दगडावर नाव कोरयची परवानगी महाराजानी विचारल हिरोंजी अस का …????
आणि हिरोंजी उत्तर देतात, "राजे.. ज्या-ज्या वेळी रायगडावर असाल, त्या- त्या वेळी जगदिशवराच्या दर्शनाला तुम्ही याल… ज्या-ज्या वेळी दर्शनाला जाल ..त्या-त्या वेळी तुमची पाऊल त्या पायारीवर पडत जातील …आणि महाराज त्यातल्याच जर एका पायरी वर माजे नाव कोरले असेल ..तर त्या- त्या वेळी तुमच्या पाऊलाची पायधूळ म्हणजे माज्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहिल..”.

फोटो -
एका पायरीवर बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुलकर यांचे नाव.

हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे

  हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे _____ मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घो...