महादजी शिंदे यांच्या बायकांचे बंड.
भाग 3
पैसा मिळविण्यासाठी दौलतराव चा सासरा सर्जेराव घाटगे व त्याच्या बालाजी कुंजर,फकीरजी गाढवे या साथीदारांनी पुण्यात एकच हैदोस घातला.पुण्यातील श्रीमंत नागरिक,सावकार,प्रतिष्ठित नागरिकांच्या वाड्यात खणत्या लावल्या,त्यांना शनिवारवाड्यात बोलावून अमानवीय शारीरिक यातना ( गरम तोफेच्या तोंडावर नागडे करून बसवणे,भर उन्हात डोक्यावर दगड घेऊन उभे करणे,तोंडात गरम राखेचा तोबरा भरणे,इ.) दिल्या.हे जबरदस्तीचे पैसा वसुली सत्र जवळपास एप्रिल ते जून १७९८ असे तीन महिने चालले होते.शेणवी सरदार शिंदे महिलांच्या बाजूने असल्याने सर्जेराव भर दरबारात त्यांना सर्वांसमक्ष शिवीगाळ करायचा.
दौलतरावला नेहमी भीती वाटायची कि शेणवी सरदार,अमृतराव व नानाचे पाठीराखे शिंदे महिलांच्या मदतीने त्याच्यावर मोठा हल्ला चढवतील.ह्या भीतीपायी शिंदे महिलांना पुण्यातून अहमदनगर इथे नेऊन ठेवण्याचे ठरविले.त्या हेतूने एक दिवस सर्जेराव घाटगे आपली माणसे घेऊन शिंदे महिलांच्या तंबूत जबरदस्ती घुसला,छडीने त्यांना मारहाण करून पालखीत बसवून ताबडतोब अहमदनगर कडे रवाना केले.शेणवी सरदार व मुसाफिरखान यांनी हि बातमी कळताच त्यांनी सर्जेरावच्या लोकांचा पाठलाग करून त्यांना भीमा नदीच्या काठी अडवून शिंदे महिलांची त्यांच्या तावडीतून सुटका केली.महादजींच्या तीन पैकी भागिरथी ह्या पत्नीने दौलतरावकडे जाण्याचे ठरविल्याने तिला अहमदनगरला दौलतराव च्या सैन्याबरोबर जाऊ देण्यात आले.लक्ष्मीबाई आणि यमुनाबाई ह्या दोघींना मुसाफिरखानाने अमृतराव च्या संरक्षणात दिले.शिंदे महिलांची सुटका झाल्याचे समजल्यावर सर्जेराव सैन्य घेऊन आला पण पराभूत झाला.या चकमकी नंतर दौलतराव कडचे आणखीन दहा सरदार आपल्या फौजेसह लक्ष्मीबाईस सामील झाले.हि फौज सुमारे वीस हजाराची झाली.पुण्याच्या आसपासच्या भागात लुटालूट करून तसेच सलोख्याची बोलणी उधळून लावून महाद्जींच्या पत्नींनी आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला.परशुरामभाऊ पटवर्धन,कोल्हापूरकर छत्रपतींना आपल्या बाजूस वळविण्याचा त्यांचा इरादा होता,पण त्यामुळे होणाऱ्या प्रतिक्रियेचा विचार करून कुणीही शिंदे महिलांच्या बाजूस आले नाही

No comments:
Post a Comment