महादजी शिंदे यांच्या बायकांचे बंड.
भाग 2
इकडे पुण्यात त्याच सुमारास पेशवायीचा नवा उत्तराधिकारी कोणास करावे यावरून नाना फडणीस व दौलतराव शिंदे ह्या दोघांत भयंकर,जीवघेणा,अनैतिक संघर्ष झाला.ह्या दोघांना भावी पेशवा आपल्या अधीन,नियंत्रणात राहणारा हवा होता ज्याच्या आडून ते स्वतः मराठेशाहीचा कारभार चालवू शकले असते.नाना फडणवीस गटाचा राघोबा दादा पुत्र बाजीराव,ज्याचा प्राप्त परिस्थितीत पेशवे पदावरील दावा न्यायोचित होता,पेशवा होण्यास सक्त विरोध होता तर दौलतराव बाजीरावला पेशवा म्हणून नेमावे या मताचा होता. आपला कारभारी जिवबादादा बक्षी मरण पावल्यामुळे दौलतरावास पुण्याला येण्यास काहीसा उशीर झाला. तेवढयात नाना फडणवीसांनी राजकीय खेळी खेळून दौलतराव पुण्यात येण्यापुर्वीच ज्याला त्यांचा सुरुवातीस विरोध होता,त्या बाजीरावासच त्यांनी पेशवेपदी बसविले.त्यामुळे दौलतरावाचे सर्व आडाखे चुकले व ह्या दोघात न भूतो न भविष्यति असा वैरभाव निर्माण झाला. त्याचाच एक भाग म्हणून नाना फडणीसांनी शिंदे महिलांना दौलतराव च्या विरोधात पाठींबा दिला.तसेच विठोजी व यशवंतराव ह्या दोघा होळकर बंधूना दौलतरावा विरुद्ध चिथावले.
महादजींच्या लष्करातील शेणवी( सारस्वत )सरदारानी शिंदे महिलांची बाजू घेतली.तसेच बाजीरावचा,राघोबा दादाने दत्तक घेतलेला, अमृतराव नावाचा भाऊ त्याची कारभारी म्हणून नेमणूक होणार नसल्याचे बघून शिंदे महिलांना जाऊन मिळाला.गणेश खिंड ते पर्वती पर्यंत शिंदे महिला व अमृतराव चे लष्कर पसरले होते तर दौलतराव च्या पलटणी वानवडीच्या आसपास होत्या.एकमेकांच्या रसदी तोडणे,छुटपुट हल्ले करणे,यासारखे प्रकार चालू होते.बाजीरावने दोन्ही गटात समझोत्याचे प्रयत्न केले पण तो स्वतःच दुबळा,विपन्नावस्थेत असल्याने त्याला कुणी जुमानले नाही.दौलतरावास आपल्या सैन्याच्या खर्चासाठी पैशाची निकड होती.बाजीरावने आपल्या जवळ पैसे नसल्याचे सांगून त्यास नानान्कडे जाण्यास सांगितले.नाना सहजासहजी पैसे देणार नाही हे माहित असल्याने दौलतरावाने आपण उत्तरेकडे परत जाणार असल्याचे खोटे सांगून त्यानिमित्त आयोजित मेजवानीसाठी नानांना आमंत्रण दिले व नंतर कपटाने अटक करून अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवले.

No comments:
Post a Comment