भारतातील इंग्रजांच्या उदयास आणि विस्तारास कारणीभूत पेशवा
post by : अमित बाबाजी ठोसर - शिवरायांचा एक मावळा
भाग 4
एका इंग्रज अधिकाऱ्याने तुळाजींचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे, “तुळाजी रंगाने निमगोरे, उंच आणि रूबाबदार होते. त्यांना पाहिल्यावर त्यांच्या मूर्तिमंत शौर्याची कल्पना येते. त्यांची कृतीही त्यांच्या रूपास साजेसी आहे. कोणतेही जहाज त्यांच्या तावडीत सापडले की, ते सहसा सुटून जात नसे. इंग्रज व्यापाऱ्यांनी त्यांचा इतका धसका घेतला होता की, देवापासी ते तुळाजीस पकडून आमच्या ताब्यात आणून दे असा धावा करीत असे.तुळाजींची शक्ती आणि तयारी कायम परिपूर्ण असे. त्यांची बंदरे भरभराठींत असून रयत सुखी आहे. तीस हजार फौज त्यांच्यापाशी असून त्यांची तयारी नेहमी जय्यत असे. त्यांच्या तोफखान्यावर अनेक कुशल युरोपीय लोक, लष्करी आणि आरमारी कामे झटून करीत होते. त्यांच्या आरमारात साठांवर अधिक जहाजे आहेत शिवाय हत्ती, दारूगोळा व शस्त्रास्त्रे असंख्य आहेत.” (संदर्भ : राजवाडे खंड १, २, ३, ६, आंग्रे हकीकत.).
No comments:
Post a Comment