सरखेल_कान्होजी_आंग्रे
#सरखेल_कान्होजी_आंग्रे#स्वामी_दरियाचे

पाश्चात्यांची तंटा न करता अगदी सलोख्याने वागावे अशी युक्ती कान्होजी आंग्रे ह्यांनी ठेवली होती . आणि त्या धोरणानुसार त्यांनी सिद्दीशी तह केल्यानंतर इंग्रजांशी समेट करण्याकरीता त्यांचे वकील कुलाब्यास बोलावले होते .पसंतीच्या अटी वर समेट करणं ठरलेलं पण तो समेट दळमळीत होता .
सन १७१५ च्या डिसेंबर रोजी चार्ल्स बून हा उपद्यापी आणि उद्धट असा मुंबईचा गव्हर्नर झाला होता . त्याने आपणास समुद्र किनाऱ्यावर इंग्रजांच्या अनिबंध संचारास जो अडथळा करील त्याची आम्ही खोडच जीरवणार असा आपला निश्चय जाहीर केला होता .आणि आंग्र्यांची कुरापत काढण्यास ठरवले होते तेव्हा आंग्रे ह्यांनी इंग्रजांची मालवाहू जहाजे आधीच पकडून आणली होती ह्यावर चार्ल्स बूनचा अहंकार अजून दुखावला गेला होता आणि स्वताचे जंगी आरमार विजयदुर्गपर्यंत पाठविले होते पण ते ही हरवून परत आले कारण ते आरमार आंग्रे ह्यांच्या समोर न टिकण्यासारखेच होते.
No comments:
Post a Comment