विनोद जाधव एक संग्राहक

Showing posts with label सरदार आनंदराव जाधव (कारंडीकर). Show all posts
Showing posts with label सरदार आनंदराव जाधव (कारंडीकर). Show all posts

Sunday, 26 January 2025

सरदार आनंदराव जाधव (कारंडीकर)

 

🚩🚩 नागपंचमीच्या दिवशी महाराणी ताराराणी साहेब यांनी मारलं

सरदार आनंदराव जाधव (कारंडीकर)यांचे मस्तक🚩🚩
मित्रांनो मी काही वर्षांपूर्वी कंरडी तालुका सातारा या गावा त भेट दिली होती त्यावेळी तेथील भैरवनाथ मंदिराच्या डाव्या हाताला एका कोपऱ्यात एक घुमटकृती समाधी होती व ती आनंदराव जाधव यांची आहे एवढेच सांगण्यात आलं काही वर्षांपूर्वी सदर भैरवनाथ मंदिराच्या शुभीकरणात ही मुख्य समाधी काढून टाकण्यात आली आणि त्याचा चौथा आजही तिथं फरशी खाली शिल्लक आहे हे विशेष कारण त्या समाधीवर एक गोल मस्त कृती दगडी तांदळा त्यावर होता व येथील जाधव मंडळी पूर्वी त्या ठिकाणी पूजा करायचे पण मंदिराच्या सुशोभीकरणाच्या नदात पाडली गेली एवढीच विनंती की तेथील दगडी चा उत्तरा काढून पुन्हा ती समाधी थोडाफार फिरकीने येथील जाधव मंडळीं मी बांधून घ्यावी अशी आशा आहे कारण तुमच्या घराण्याचा इतिहास येणारा भावी पिढीला समजण्यासाठी कागदासोबत वास्तु आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या समाजास्नेही महत्त्वाचा आहे.
सदर आनंदराव जाधव हे छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या काळापासून सातारा येथे किल्लेदार होते याबाबतची नोंद सापडते छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या निधनानंतर छत्रपती रामराजे हे गादीवर आले आणि यानंतर मराठा दौलतीचा कारभार पेशव्यांच्या नाही तर महा राणी ताराराणीच्या नेतृत्वाने चाललं पाहिजे अशी अशा ताराराणी साहेबास होती पण राजकीय पटावरील अनुभव अभावी राजमंडळातील मंडळींना घेऊन राज्यकारभार चालवण्याकडे छत्रपती रामराजेंचा कोण होता यामुळे तारण या संतप्त झाल्या त्यांनी सांगोला करारानंतर त्यांच्या आलेले महत्त्व नाकारून नव्याने आपल्या हाती सत्ता घेण्याचा माणूस केला असे इतिहासात दिसते यासाठी२५ नोव्हेंबर स. १७५० च्या चंपाषष्टीस महाराणी ताराबाईनें आपलं नातू छत्रपती रामराजास अटकेत ठेवून स्वतः
सर्व कारभार स्वीकारला छत्रपती रामराजेंच्या सुटकेसाठी पेशवे येणार म्हणून आणि पेशव्याशीं झगडा करण्याकरितां तिने दाभाडे
व गायकवाड यांजकडून युद्ध करावे वेळें. निजामाचे साह्य मिळविण्याकरितां
तिने रामदासपंतास छत्रपतीची पेशवाई देऊं केली. शिवाय एवढ्या निकराने
पेशाब्यांनीं पोतुगीझांच्ची उत्तर राजधानी वसई काबीज केली, ती त्यांस परत
देण्याचें कबूल करून पोतुंगीझांची लष्करी मदत मागितली. यासंबंधांत प्लेन
गोव्याचे गव्हर्नरास लिहिलेला मजकूर असा:
“ बुसी मळा लिहितात कौ
शाहूराजाची विधवा जिचें नांव ताराबाई व जी साताऱ्यास राहते, तिनें आपला
वकील मजकडे पाठवून पेशव्याशीं लढण्यासाठीं निजामाची मदत मागितली
आहे. यासाठीं ती स्वतः आपलें सेन्य उभारून गोवेकरांत्ची मदत मिळावी
म्हणून ती त्यांचें वसईचें ठाणें परत देण्याचें कबूल करीत आहे. वसई परत
मिळविण्याची ही उत्कृष्ट संधि गोवेकरांकडे चालून आली आहे. आपणांस
( गोवेकरांस ) ही गोष्ट मान्य असल्यास तुम्ही परभारें बुसीस काय ते कळवा. ”
यावर गोव्याच्या अधिकाऱ्यानें डुप्लेस उत्तरी कळविलें, “ वसई परत
मिळविण्याची आम्हांस मोठी उत्कंठा आहे. याबाबतींत मीं ताराबाईस पत्र
लिहिलें असून तिचे उत्तरही आले आहि. तिला कांहीं नजराण्याच्या वस्तूही मीं
पाठविल्या आहेत. तिला लष्करी मदत पाठविण्याची सिद्धता मी करीत आहें.”
गोवेकर अधिकाऱ्याने हाच मजकूर ता. १२ जानेवारी स. १७५२ च्या पत्राने
लिस्बनच्या सरकारास कळविला. त्याच हेतूनें तुळाजी आंगऱ्यासही गोवेंकरांन
ता. ८ फेब्रुवारी स. १७५२ च्या पत्रांने लष्करी साह्य देण्याचें कबूल केलें. *
सदर प्रकारामुळे पेशव्यांची धाबे दणाणले व दक्षिणेकडील च्या काळात आपल्याकडील खूप मोठी पाऊस सातारा भोवती वेडा घालून बसणे अशक्य होतं त्यामुळे लवकरात लवकर छत्रपती रामरायांची सुटका सातारा किल्ल्यावरून करावी यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले पण रामराजे सुटकेनंतर आपल्या तंत्रने चालतील का नाही याबद्दल स्पेशल नाही शंका होती प्राधान्याने छत्रपती रामरायांची सुटका करणे व सातारा परिसरातील आपली फौज काढणे हे पेशवा नानासाहेब महत्त्वाचे वाटले कारण
सातारच्या या भानगडी लवकर तर मिटल्या नाहींतच, उलट त्या कैक वषे
चालू राहिल्या. महाराणी ताराबाईशीं समेट करून छत्रपती रामराजास सोडविण्याचे प्रयत्न
पेशव्याने सारखे चालू ठेविले. त्यांत १७५१ साल फारच धामधुमीचें गेलें.
नासिरजंग व मुजफ्फरजंग हे निजामश्ाहीचे दोन प्रमुख पुरुष अल्पावकाशांत
मारले जाऊन इंग्रज-फ्रेंचांचें राजकारण रंगले, त्यांत पेशव्याला लक्ष घालणें
अपरिहार्य झालें. यास्तव विश्वासु माणसें व पुरेसा बंदोबस्त साताऱ्यास ठेवून
पेशवा व भाऊसाहेब डिसेंबर अखेर निजामाचे राज्यांत भागानगरकडे निघून
गेले. नासिरजंग ५ डिसेंबर १७५० रोजीं मारला गेला तेव्हांपासून हा नवीन
वेध पेशव्याला लागला. पेशवा दूर गेल्याने महाराणी ताराबाई साहेब यांच्या राजकारणास रंग
चढला. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत महाराष्ट्रांत मोठी धामधूम
उडाली. महाराणी ताराबाईचा पच कसा निवारण करावा यासंबंधानें नाना पुरंदऱ्यानें
कित्येक वैकल्पिक मार्ग पेशव्यास सुचविले. फेब्रवारी ३, स. १७५१ चा
हा (पे. द. ६-१४७ ) कागद अभ्यसनीय आहे. त्यांत चार पर्याय सुचविले
ते असे:
१. ताराबाई खावंद सबब त्या फर्मावतील त्याप्रमाणें सर्व कारभार करणें
२. रामराजा बाईच्या अटकेंतून निघण्यास उत्सुक असल्यामुळें, बाईस
निकर्षे करून राजाचे तंत्राने कारभार चालविणें
३. आपणच सर्व सत्ता चालवून कारभार करावा, म्हणजे बाई अल्पावकाद्यांत नरम येईल;
४. कोल्हापुरकर संभाजीस साताऱ्यास आणण्याचा सकवारबाईच्या सतीच्या
तोंडचा प्रयोग अंमलांत आणावा, ताराबाई तरी रामराजास काढून
संभाजीस आणण्याच्या उद्योगांत आहे, तो तिच्या हातांतला डाव
आपणच कां न पुरा करावा !
यावेळी किल्ल्याचे किल्लेदार व हवालदार असणारे आनंदराव जाधव हे महाराणी ताराराणी सरकारांच्या विश्वासातील मंडळी होते याबद्दल एका पत्रातील नोंद खालील प्रमाणे आहे की याबद्दल खात्री होईल हे आनंदराव जाधव तारणींच्या किती विश्वास होता पेशव्यांना आलेले एक पत्र खालील प्रमाणे
“ मातुश्रींनीं व राजश्रींनीं खालीं यावें येविसींचा प्रयत्न बहुत केला. त्यांहीं
जे जे मुद्दे घातले ते मान्य केले. आईसाहेब वसवासी फार. लोक व गडकरी यांचे
चित्तांत आमचें सूत बनो न द्यावें. त्यांचे मनांत मातुश्री व पेशवे एक
झाल्यावर आम्हांस कोण विचारतो ! यास्तव गडकऱ्यांस नरम करावयाचा
विचार केला आहे, ” असें पेशवा ता० २२मे, स. १७५१ रोजीं लिहितो.
यावेळी हवालदार व मंडळी पुढील राजकारण लक्षात घेऊन आपल्या धोरण अवलंबून असल्याचे दिसून येते म्हणून म्हणून ही मंडळी पेशवे यांच्याशी अनुकूल धोरण न घेता महाराणी ताराराणी साहेबची बाजू घेतली आहे हे वरील पत्रातून दिसून येते. या कारंदीकर जाधवांच्या घराण्यात चंदगड ची किल्लेदारही होते असे इतिहासातील काही नोंदीवरून आणि पत्रांवरून दिसून येते व अजिंक्यतारा किल्ल्याच्या या राजकारणात मंडळीची विश्वास असल्यामुळे महत्त्वाची होती हे विशेष आता किल्ले आनंद जाधव यांची हत्या महाराणी ताराबाई साहेबने केले याबद्दलची अस्सल नोंदी खाली पाहुयात आनंदराव जाधव यांचा वध महाराणी ताराराणी नी नागपंचमीच्या दिवशी केला असे दिसून येते याची तारीख 16 जुलै सन 1751 अशी येते
आईसाहेबांकडे मध्यस्थी करून कलह मिटविण्याची कामगिरी पेशव्यानें बराणजी मोहित्यास सांगितली, त्यावरून त्यानें कळविलें, "आम्ही आपल्या आज्ञेप्रमाणें मातुश्री व महाराज यांचे भेटीस जावें तर त्या उभयतांची चित्त- शुद्धि दिसोन येत नाहीं. आम्हांस भेटीस यावे म्हणोन त्यांचे हुजरे आले आहेत. आपण सांगाल तेणेंप्रमाणें वर्तणूक करूं." म्हणजे सर्व जाणत्या माणसांना ताराबाईची शाश्वती वाटत नव्हती. समेटाच्या वाटाघाटी चालू असतां संशया- वरून धरपकडीचीं कृत्यें ती करीत होती. हवालदार वगैरे मंडळीशीं पुरंदरे यांनीं बोलणीं चालविल्याचें ताराबाईस समजतांच "किल्ल्याचा हवालदार आनंदराव जाधव यास खलबतास म्हणून बोलावून त्याचा तिर्ने शिरच्छेद करविला. त्याबरोबरच लोक व सरदार वगैरे फार मारिले. त्यावरून लोक अत्यंत भयभीत झाले. *
हवालदार व पहारेकरी यांस नाहक ठार मारल्यामुळे ताराबाईची उरली सुरली पत खलास झाली आणि पेशव्याचे पाश तिच्याभोवर्ती इतके जखडूं लागले कीं त्याच्याशीं समेट केल्याशिवाय निर्वाह नाहीं
______________
मातुश्री ताराबाई गडावरी गेली ह्मणून राजश्री सांगोलियांतून भाऊचा निरोप घेऊन सातारियास आले, गडावर जाऊन मातुश्रीची भेटी घेतली. बायका घेऊन खाले आले. एक दोनदां वरते गेले, खाले आले. एके दिवशीं राजश्रीस मातुश्रीनीं अटक केली. गडावरी ठेविलें. ऐसें वर्तमान आलें, मार्गेश्वर शुद्ध. ( पुढें करें)
_____________
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक लेख व माहिती संकलन:- संतोष झिपरे
_____________
नागपंचमीचे संधीस ताराबाईनी सातारचा हवलदार आनंदराऊ जीवेंच मारिला. त्याजपासून काय अंतर पडले असेल तें असो !१८
_______________
मराठ्यांच्या इतिहासातील सरदार आनंदराव जाधव यांचा मस्त महाराणी ताराराणी यांनी मारलं एक दुर्मिळ घटना आहे कारण महाराणी या राजमाता जिजाऊ महारणी येसूबाई साहेबां त्यानंतर मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात कर्तबगार स्त्री म्हणून ओळखले जातात तसेच
प्रत्यक्ष तत्कालीन मराठी सुविचार राजकारणास छत्रपती राम राजे हे सातारा असणं गरजेचं होतं ही एक सत्य सुट्टी आहे प्रत्यक्ष मराठ्यांचे छत्रपती अजिंक्यतारा किल्ल्यावर असून काही महिने कारभारास सहभाग नसणे काही वर्ष छत्रपती प्रत्यक्ष गादीवर नसणं नसणं हे घातक होते म्हणून सरदार आनंदराव जाधव यांनी छत्रपती रामराजे यांच्या सुटके मदत केली याचा राग मनी धरून महाराणी ताराराणी साहेबांनी त्यांचं व त्यांच्या सहकाऱ्यांचे मस्त मारलं प्रत्यक्षात छत्रपतींच्या सुट्टीसाठी मराठ्यांच्या महाराणीने आणि प्रत्यक्ष ज्यांच्या नावापुढे छत्रपती लावले जातात अशा महारणीताराणी साहेबांनी मस्तक मारले करंडीकर जाधव घराण्यातील मंडळींसाठी आनंदाची बाब आहे कारण जे आहे ते छत्रपतींच ही आज ही भावना मराठ्यांच्यात आहे आणि प्रत्यक्ष छत्रपतींच्या आत्म मरण येणे आणि छत्रपतींच्या सुटकेसाठी हेही काय कमी नाही मराठ्यांची इतिहासातील हा ही दुर्मिळ घटना असून आज नागपंचमी दिवशी सरदार आनंदराव जाधव यांचे स्मृतिदिन आहे!!
त्यास विनम्र अभिवादन
आपले
लेख व माहिती संकलन संतोष झिपरे

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...