विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 6 February 2019

होळकरांचेही पाठीराखे महाराजा महादजी शिंदे सरकार


होळकरांचेही पाठीराखे महाराजा महादजी शिंदे सरकार
धन्यवाद श्रीमंत संभाजीराव शिंदे-सेनाखासगिल
-------------------------
20 मे 1766 होळकरांच्या दौलतीसाठी काळाकुट्ट दिवस ठरला मराठ्यांचे भीष्माचार्य उत्तर हिंदुस्थानातील सुमारे पस्तीस ते चालीस वर्षे हिन्दुस्थानचे आणि मराठ्यांचे राजकारण ज्यांच्या भोवती सतत फिरत होते ते इंदूर संस्थानचे जनक सुभेदार मल्हारराव बाबांचे निधन झाले वयाची सत्तरी गाठलेल हे बुजुर्ग व्यक्तिमत्व कालाच्या पडदयाआड़ झाले आणि संपूर्ण मराठा साम्राज्यावर शोककला पसरली इंग्रजांशी लढ़ताना झालेला पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता त्यातच एकुलत्याएक मुलाचा खंडेरावाचा कुंभेरी मोहिमेमधे झालेला मृत्यु यामुले मल्हारराव पुरते खचले होते आणि अशातच काल्पीवर इंग्रजांकडून त्यांचा झालेला पराभव मल्हाररावांवर जबदरस्त आघात करुण गेला मराठ्यांशी झालेल्या पहिल्या युद्धात आपला बुलंद विजय झाल्याने इंग्रज बेहद्द खुश होते मात्र सुभेदार मल्हारराव मात्र या पराजयाने पुन्हा उठलेच नाहित आणि अशातच त्यांचा मृत्यु झाला चार पेशव्यांबरोबर मराठा साम्राज्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करणारे मराठेशाहीच एक पर्व संपल पण खरी राजनीति तर मल्हाररावांच्या मृत्युनंतर घडू लागली राघोबा पेशवे उर्फ़ दादासाहेब होळकरांच्या दौलतीवर घारीची नजर ठेऊन होते शिन्द्यांनच्या जहागिरी प्रमाने होळकरांच्या वारसाहक्काबद्दल राघोबानी बखेड़ा निर्माण केला सुमारे पंधरा सोला कोटी रुपयांची दौलत मल्हाररावांनी उभी केली होती राघोबांनी मल्हाररावांचा मानसपुत्र तुकोजीला हाताशी धरून होळकरांची जहागीर त्याला देण्यासाठी हलचाली करू लागला त्या बदल्यात दोन तीन कोटींचा मोबदला मिळेल या कूटनीतीने या प्रकरणात शिंदे सरकारांनी पडू नये यासाठी राघोबानी महादजी शिन्द्यांना पत्रे पाठवली पण याआधीच महादजींनी अहिल्याबाई होळकर यांची भेट घेऊन त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे वचन अहिल्याबाईना दिले होते त्याप्रमाणे अहिल्याबाईनी राघोबा विरुद्ध बायकांची फ़ौज उभी केली हे राघोबादादाला समजले आणि शेवटी घडायचे ते घडले दादासाहेबांनी महादजी शिंदे सरकारांनी होळकरांच्या दौलतीमधे मध्यस्थी करावी असे म्हणने पाठवले महादजींनी मात्र होळकरांची दौलत अहिल्याबाई योग्य प्रकारे चालवन्यास लायक आहेत आपण याबाबत अहिल्याबाईच्या पाठिशी आहोत असा संदेश महादजींनी राघोबास दिल्याने दादासाहेबांचा नक्षा पुरता उतरला त्यानंतर मात्र राघोबादादानी होळकरांच्या दौलतीकड़े वाकड्या नजरेने पाहिले नाही या प्रकरणात महाद्जींनी राघोबा पेशव्यांना मदत केली असती तर कदाचित पेशवाईचा अस्त करणार्या राघोबादादानी होळकरांची दौलत तेव्हाच बुडवली असती महादजी महाराजांच्या समयसुचकतेने आणि राजकीय वजनाने होळकरांची दौलत पुढे अनेक वर्षे उत्तरेत राज्य करीत होती खरोखरच महादजी शिंदे सरकारांचे मोठेपण होळकर प्रकारानात स्पष्ट झाले मात्र काही नीतीभ्रष्ट इतिहास लेखकांनी शिंदे होळकरांचे कपोलकल्पित हाड़वैर लिखानातुन मांडल्याने आजच्या तरुण युकांची माथी फिरत आहेत जातीजातीमधे राजकारण करू पाह्नार्या समाजातील आशा प्रवृत्तीना शिंदे होळकरांचे मैत्रीपर्व उमगलेच नाही याचे अतीव दुःख होत आहे

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...