विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 24 May 2025

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

 !


! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!


प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल.

१] श्रीमन्नारायण ते भगवान श्रीकृष्ण पर्यँत
२] भगवान श्रीकृष्णापासुन देवगीरीचे यादव
३] देवगिरीचे यादव ते सिँदखेडकर राजे जाधवराव पर्यँत....

पहिल्या दोन टप्प्यातील वंशविस्तार हा हेमाद्रीकृत व्रतखंडातील राजप्रशस्तीत दिलेले आहेत आणी दुसर्या व तिसर्या टप्प्यातील वंशविस्तार हा देऊळगाव राजा,उमरद देशमुख,आडगावराजा व किनगावराजा येथील राजेजाधवरावाजवळील इ स 1720 च्या सुरतमजलीसच्या न्यायनिवाड्यावेळची शिक्यासह उपलब्ध वंशावळीत आणी गो दा दळवी क्रुत जाधव घराण्याची कैफियत या पुस्तकात दिलेला आहे.

!! वंशावळी !! श्रीमन्नारायण - ब्रह्मा-अत्रि - समुद्र -सोम/चंद्र - बृहष्पती-बुध - पुरुरवा - आयु-नहुष{सोमवंश येथुन सुरु झाला} - ययाति -यदु{याच्या वंशजाना यदुवंशी /यादव म्हणतात}-कृस्थ/क्रोष्ट{याच्या वंशजांचे haihaya kingdom} - वृजिस्व -स्वाप/स्वाहित-उर्भग/नृशंकु-चित्ररथ -पृथुश्रवा - सुयज्ञ-उशना-स्थितेयु/तितेकी-मुरित - विक्रम-कबंलबर्हि - वरिश्व-रुक्माव - रुक्मेव-प्रुथुक्म - हविष्मन-पराजित - जामुग-सव्यपी-जामाघ - विदर्भ{vidarbh kingdom}-रुक्मीन- क्रंथ -कुंति - वृष्णि -केशुक - निवृत्ति - लोमपाद /व्योमाच्छ - ध्रुति-जीमुत - ऋषभ-भीमरथ - नवरथ-दशरथ/दिध्रुत -शकुंत - करंभि - कर-देवरात - देवक्षेञ - माधि/मधु-कुरुबल - दुर्वसु-पुरुहोम - गुणी-पादुप-आयु-यंतु-सात्वत{सात्वत किँगडम}-भिमा-अंधक{अंधक किँगडम}-टांक- भुजमान-विदुरथ-शुरा -सेनी-स्वयंभोज -ह्यदिक -ईढुष-देवमीढ{याचे वंशज मार्तिकावर्तीचे भोज} -शुरा-वसुदेव-भगवान श्रीकृष्ण{भगवतगितेचे कर्ता}-प्रद्युम्न-अनिरुद्ध{काठेवाडात गिरनार/जुनागड येते राज्य स्थापले}-यक्ष-वज्र{याने सुरतपर्यँत राज्य पसरवले}-प्रतिबाहु{गुजराथ व खानदेश पर्यँत राज्य वाढवले}-सुबाहु{याने आपले राज्य4 पुत्रात वाटणी केली} सुबाहुच्या वंशजापैकी आठव्या शतकात राजा दृढप्रहार याने दक्षिणेत राज्य स्थापन केले.. - दृढप्रहार {सर्वप्रथम दक्षिणेत राज्य स्थापिले व राजधानी चंद्रादित्यपुर/चांदोर जि नाशीक बनवली काळ इ स 860 ते 880}-सेऊनचंद्र 1ला{याने राजधानी सिँदिनेर/श्रीनगर-हल्लीचे सिन्नर येथे हालवली.याच्याचनावाने या भागास सेऊनदेश म्हटले गेले.काळ इ स 880 ते 900}-धाडियप्पा प्रथम-भिल्लम प्रथम-श्रीराज/राजगी-वडिँग/वद्दिँग प्रथम{इ स 950ते 970}-धाडियप्पा द्वितिय-भिल्लम द्वितिय{ इ स 975 ते 1005}-वेसुगि प्रथम-अर्जुन-भिल्लम तृतिय{इस 1020ते1045}-वडिँग 2रे-वेसुगी द्वितिय-भिल्लम 4था- सेऊनचंद्र द्वितिय{इस 1050 ते 1080}-सिँघणदेव प्रथम{इ स 1105 ते 1120}-मलुगी-भिल्लम पाचवा{याने देवगिरी येथे सार्वभौम राज्याची स्थापना केली इ स 1185 ते 1193}-जैत्रपाळ प्रथम-सिंघणदेव द्वितिय{इस 1200 ते 1246याने शिखर सिंघणापुरचे महादेवाचे मंदिर बांधले}-जैञपाळ 2रा-कृष्णदेव-महादेव-रामदेवराय{खिलजी कडुन पराभव}-शंकरदेव-गोविंददेव{याच्यापासुन जाधव हे आडनाव सुरु झाले}-ठाकुरजी-भुकणदेव/भुतजी-अचलकर्ण/अचलोजी-विठ्ठलदेव-राजेलखुजीराव{इ स 1550 ते 1629 घराण्यास उर्जितावस्था मिळवुन दिली} राजेलखुजीराव याना 4पुत्र व एक कन्या = 1] राजेदत्ताजीराव 2] राजे अचलोजीराव 3] राजेबहादुरजी 4] राजेराघोजी 5] राजमाता जिजाऊ आऊसाहेब या भावंडात सर्वात कनिष्ठ होत्या.यांचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्यासोबत झाला.. ..राजेलखुजीराव यांचे कनिष्ठ बंधु राजेभुतजी उर्फ जगदेवराव होत.

*** सिंदखेडराजा परिसरातील राजे जाधवराव घराण्याच्या वंशज शाखा :- जवळखेड,ऊमरद देशमुख,मेहुणाराजा,आडगावराजा , देऊळगाव राजा व किनगावराजा, येथिल जाधवरावांचे विवाह देऊळगावराजा येथिल श्री बालाजी मंदिराच्या गाभार्यात लावण्याचा मान इ स 1693 पासुन आजपर्यँत चालु आहे.
*** सिंदखेडराजा परिसराबाहेरील वंशज शाखा :- माळेगाव बुद्रुक, मांडवे, भुईंज, वाघोली-वाडी-नांदेड, करण खेड करवंड, घनसावंगी, सारवडी,वडाळी, तेल्हारा, माहेगाव देशमुख, कुंभारगाव, अक्कलकोट, भुम व पाटेवडी आदी...

तसेच जरासंधाच्या पराक्रमामुळे यादव-जाधव क्षत्रियाना आपली राजधानी मथुरा येथुन द्वारका येथे स्थालंतरीत करावी लागली आणी पुढे यादव क्षत्रियांची द्वारकासह आणखी 11 राज्य निर्माण झाली ती पुढिलप्रमाणे= द्वारका,चेदी,शुरसेनी,दशरन,करुशा,कुंती,अवंती,माळवा,गुर्जरा,हैयय,सौराष्ट्र आणी विदर्भ. तसेच यादव-जाधव मराठा क्षत्रियांची 12 कुळे आहेत असे वर्णन आढळते आणी ती 12 कुळे म्हणजे शिर्केँचे 6 कुळे,तोँवर-तौर यांचे 5 कुळे व यादव-जाधव यांचे 1 कुळ होत.तसेच महाराष्ट्रातील जी देवगिरी यादव-जाधव मराठा व्यतिरिक्त जी यादव-जाधव यांची जी मराठा कुळे आहेत ती यादव क्षत्रियांच्या 11 राज्यातुन आले असले पाहिजेत कारण या 12 राज्यातील यादव क्षत्रियाना महारथ-महारठ्ठ-MAHARATHA असेच संबोधले जात असे.
संदर्भ=1] हेमाद्रीक्रुत व्रतखँडातील राजप्रशस्ती
2] सिँदखेडकर राजे जाधवरावांची मोडी बखर
3] किनगावराजा येथिल राजे जाधवरावांजवळील सुरतमजलीसवेळची वंशावळी
4] गो दा दळवी क्रुत जाधव घराण्याची कैफियत
5] देवगिरीचे यादव - ब्रह्मानंद देशपांडे
6] उमरदकर राजे जाधवरावांकडील उपलब्ध वंशावळी

#राजेनरेश_जाधवराव 

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...