विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 9 April 2019

धर्मवीर संभाजी महाराज!

धर्मवीर संभाजी महाराज!!
छ. संभाजींनी, छ. शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण पुढे चालू ठेवून अनेक देवस्थाने, मठ, सत्पुरूष यांना वार्षिक नेमणुका (मोईन) पूर्ववत करून दिल्या. राजांनी पुण्याच्या विनायक उमाजी या देशाधिकाऱ्याला लिहून संत तुकारामांचा मुलगा महादोबा यास वर्षासन दिले. पाटगावी मौनी गोसावी हे ईश्वरपुरूष होते.
छ. संभाजींनी कुडाळ प्रांतात देशाधिकारी गणीराम याला गोसाव्यासाठी त्याचा शिष्य तुरूतगिरी यास १२५ होन देण्यास आज्ञा दिली. त्यांतील वाजंत्रीसाठी २५ आणि भोयांसाठी १०० होन होते. पुणे परगण्यातील तर्फ निरथडी येथे कन्हेरी मठात वासुदेव गोसावी यांचे वास्तव्य होते. त्यांना जिराईत ९ रूके, पुष्पवाटिकेस मांढरदेवीतील ४ बिघे आणि जावळीपैकी ९ बिघे जमीन देण्याचा वाईच्या देशाधिकाऱ्याला हुकूम दिला. कऱ्हाडचे वेदशास्त्री नरसीभट शेषभट मुंज्येमणी, कांदळगावचे अनंत भट, महादेव भट यांना प्रतिवर्षी जोंधळे व तांदूळ देण्याची आज्ञा केली. तसेच महाबळेश्वरचे वेदमूर्ती राम भट यांचे वर्षासन पूर्ववत करून त्यांना संभाजींनी रोख रक्कम व काही जिन्नस दिले.
कऱ्हाडचे शिवभट नीलकंठभट अग्निहोत्री, पावसचे हरिभट पटवर्धन, रामचंद्र केशवभट पंडित, निंब येथील सदानंद मठाचे अनंतगिरी गोसावी यांना वर्षासनाच्या सनदा दिल्या. याप्रमाणे संभाजीराजांनी चिंचवड, मोरगाव, सज्जनगड, चाफळ, शिंगणवाडी, महाबळेश्वर इ. देवस्थानांची व्यवस्था नीट चालावी म्हणून पूर्वीची वृत्ती, इनामे व सनदा पूर्ववत चालू ठेवल्या. एकूण धार्मिक कारभाराकडे ते जातीने लक्ष घालत असत, हे तत्का-लीन पत्रव्यवहारांतून दिसते. याशिवाय त्यांनी रामदासी मठांच्या व्यवस्थेत बारकाईने लक्ष घातले होते. त्यावरून रामदासस्वामी व त्यांचे शिष्यगण यांविषयीचा त्यांचा आदरभाव दिसतो. त्यांनी सातारा, चाफळ, सज्जनगड, कराड येथील अधिकाऱ्यांना आज्ञा करून श्रीरामाच्या उत्सवाच्या व्यवस्थेसंबंधी पत्रे पाठविली होती.
संदर्भ : 1. Kulkarni, G. T. Moghul–Maratha Relations, Poona, 1982.
२. गोखले, कमल, शिवपुत्र संभाजी, पुणे, १९७१.
३. देशमुख, प्र. रा. छत्रपती संभाजी, नागपूर, १९८५.
४. पगडी, सेतुमाधवराव, हिंदवी स्वराज्य आणि मोगल, पुणे, १९६६.
५. पवार, जयसिंगराव, संपा. छत्रपती संभाजी-स्मारक गंथ कोल्हापूर, १९९०.
६. पिसुर्लेकर, पांडुरंग, पोर्तुगीज-मराठे, पुणे, १९६७.
७. पुराणिक, श. श्री. मराठयांचे स्वातंत्र्य समर : छत्रपती संभाजी, पुणे, १९८५.
८. सरदेसाई, गो. स. ऊगप्रकृती संभाजी, पुणे, १९६५.
९. सावंत, शंकरराव, हुतात्मा संभाजी, महाड, १९८२.
गोखले, कमल

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...