विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 17 June 2019

आऊसाहेबांच्या वाड्यातून दिसणारा किल्ले रायगड

आऊसाहेबांच्या वाड्यातून दिसणारा किल्ले रायगड

उतारवयात रायगडावरील अतिवृष्टी आणि थंडी आऊसाहेबांना सहन होत नव्हती, म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या मातोश्रींसाठी रायगड जवळील पाचाड येथे वाडा बांधला.  राज्याभिषेकचा दिवस जवळ येत होता, महाराजांची नजर अजून देखील आऊसाहेबांच्या वाड्यावर लक्ष ठेऊन होती.. चिंता आणि दुःख अजून देखील महाराजांच्या मनात कुठेतरी बसले होते. परंतु माँसाहेबांची इच्छा होती म्हणून महाराजांनी राज्याभिषेक करवुन घेतला.

राज्याभिषेकच्या वेळी आऊसाहेबांना  मेणा दरवाजा येथुन पालखीने गडावर नेले. त्यावेळी आऊसाहेबांची तब्येत खूपच नाजूक होती, परंतु आपल्या मुलाचा राज्याभिषेक होणार होता आणि तो आता ह्या उभ्या महाराष्ट्राचा राजा होणार आहे त्यामुळेच आऊसाहेब गडावर आल्या.

त्या वेळी महाराजांची आणि आऊसाहेबांची भेट फार कमी होत असे, राज्याभिषेक झाला आणि आता आऊसाहेबांची कायमस्वरूपी गड सोडण्याची वेळ झाली होती , पालखी सज्ज झाली.. त्यावेळी महाराजांनी विचारले आता पुन्हा कधी भेट होणार आपली? त्यावेळी आऊसाहेब म्हणाल्या आता काय आपली भेट होणे शक्य नाही.. आपण राजे झालात हीच माझी इच्छा होती आणि आत ती पूर्ण झाली..  असे म्हणताच महाराजांचे डोळे पाणावले आणि तसेच आऊसाहेबांची पालखी पुन्हा पाचाड येथील त्यांच्या राहत्या वाड्यावर घेऊन जाण्यात आली.  त्यानंतर १२ दिवसांनी आऊसाहेबांचे निधन झाले..  स्वराज्यात दुःखाची लहर पसरली..

आजही आऊसाहेबांची नजर रायगडावर आपल्या मुलाकडे टक  लावून पाहत असते .. त्यांना आपली खुशाली आपल्या मुलापर्यंत पोहोचवायची असते.. म्हणून आपण सर्वजण रायगडी जाताना प्रथम आऊसाहेबांच्या  समाधीचे दर्शन घेऊन त्यांचा काही निरोप असेल तो महाराजांपर्यंत घेऊन जायचं. कारण आता फक्त आपणच त्या आई आणि लेकरामधील दुवा  आहोत.. आऊसाहेबांचा निरोप महाराजांपर्यंत आणि महाराजांचा निरोप आऊसाहेबां पर्यंत आपणच पोहोचवायचा......

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...