” शंभूराजे व इंग्रज संघर्ष “
भाग 2
【 महाबली संभाजी राजांच्या नेतृत्वातील संघर्ष 】
पुढे , सन १६८३ मध्ये , मराठयांनी करंजावर हल्ला केला , आणि सहजपणे करंजा इंग्रजांकडून ताब्यात घेतला , आणि शंभूराजांनी मुंबईवरील हल्ल्याची , जोरदार तयारी तथा आखणी सुरू केली . मराठी फौजांनी मुंबईला चहोबाजूंनी घेरले ; नाईकांच्यामार्फत फिरंग्यांच्या प्रत्येक बारीक हालचालींवर , शंभूराजांनी बारीक लक्ष ठेवले होते ; त्यासमयी इंग्रजांच्या मनात , शंभूराजांविषयी प्रचंड दहशत निर्माण झाली होती . फिरंग्यांनी शंभूराजांचा राग कमी करण्यासाठी , त्यांनी जंजिऱ्याच्या सिद्दीसोबत एक करार केला . या करारानुसार , सिद्दीने स्वराज्यातील पेण , आपटे , नागोठणे व बट्टी या प्रदेशाला उपद्रव न करण्याच ठरले व इंग्रजांनी मुंबई वाचविली .
काही काळानंतर , इंग्रजांना व्यापारात मराठ्यांचा अडथळा येऊ लागला , त्यामुळे फिरंग्यांनी ,
आपला वकील हेनरी स्मिथ यास , महाड जवळील
बिरवाडी येथे पाठविले . शंभूराजांनी प्रथम तहासाठी आलेल्या , फिरंगी वकीलास ( हेनरी स्मिथ ) धुडकावून लावले ; परंतु तत्कालीन राजकीय परिस्थिती पाहता , शंभूराजांनी आपला प्रतिनिधी म्हणून प्रल्हाद निराजी यास तहाची बोलणी करण्यासाठी , दि . १५ मे १६८४ ला महाडला पाठविले , इंग्रजांमार्फत गव्हर्नरचे प्रतिनिधी म्हणून कॅ. हेनरी गॅरी , थॉमस किल्कन व दुभाषी म्हणून राम शेणवी आले होते . हा तह कर्नाटकातील सांप्रतते तिवेनापट्टम , कुडलोट व कोनिमेर या भागात व्यापरानिमित्त वखारी निर्माण करण्याबाबत होता , शंभूराजांनी वखारींच्या निर्माणसाठी परवानगी फिरंग्यांना दिली ; पण शंभूराजांनी फिरंग्यांवर अनेक अटी लादल्या होत्या . कर्नाटकातील वखारी संदर्भात ११ कलमे आणि मुंबईसाठी स्वतंत्र ३० कलमे शंभूराजांनी इंग्रजांवर लादली होती , त्यातील महत्वाची कलमे पुढीलप्रमाणे मांडली आहेत .

No comments:
Post a Comment