” शंभूराजे व इंग्रज संघर्ष “
भाग १
【 महाबली संभाजी राजांच्या नेतृत्वातील संघर्ष 】
सन १६८० ह्या , सालाच्या शेवटच्या मासांमध्ये ,
म्हणजे नोव्हेंबर महिन्यात , पेण – नागोठणे किनारपट्टी – – – जवळील प्रदेशात , जंजिऱ्याचा सिद्दी काहीही कारण नसताना हस्तक्षेप करत असे , मासुम रयतेला त्रास देत असे , माता भगिनींचे खूप प्रमाणात हाल होत होते .
शंभूराजांनी हेरांकडवी गुप्त माहिती काढली , तेव्हा त्यांना खरे समजले . सिद्दीला आतून टोपीकर इंग्रज साहाय्य करत होते , हे राजांना समजले ; त्यामुळे राजांनी इंग्रजांना धडा शिकवायचे ठरविले .

शंभूराजांनी आपला मोर्चा , फिरंग्यांच्या बाजूने
वळविला . फिरंग्यांवर जरब बसविण्यासाठी , राजांनी राजापूरच्या , फिरंग्यांच्या वखारीवर आक्रमण करायची रणनीती आखली . आखणीनुसार मराठी फौजा राजपुरच्या जवळ गेल्या , इंग्रजांनी तूर्तास ओळखले होते की , मराठ्यांच्या लष्करी फौझेपुढे आपला निभाव लागणार नाही ; त्यामुळेच फिरंग्यांनी साधा प्रतिकारही केला नाही व वखारीच्या आतमध्येच लपून राहिले . पुढे फिरंग्यांनी , शंभुराजांबरोबर बोलणीचा घाट घातला .
शंभूराजांनी आपला प्रतिनिधी म्हणोन , हुशार व मुरब्बी मंत्री , बाळाजी आवजी पंडितास , दि . २० नोव्हेंबर १६८० मध्ये पाठविले . आणि तहाची बोलणी सुरू झाली , बाळाजी राजकारणात पारंगत असल्यामुळे , इंग्रजांच्या एकाही काव्याला फसले नाही ; ‘ तहाप्रमाणे इंग्रजांनी सिद्दीची मदत थांबवावी , तसेच सिद्दीने पकडलेली मराठ्यांची जहाजे व गलबते , त्यास परत करावयास सांगणे ‘ . तात्काळ या दोन्ही गोष्टी फिरंग्यांनी केल्या . आणि विशेष म्हणजे , याबदल्यात शंभूराजांनी फिरंग्यांस काहीही दिलं नाही . ” शंभूराजांनी , एवढी जरब इंग्रजां – वर बसविली होती ” .

No comments:
Post a Comment