महादजी शिंदे यांच्या बायकांचे बंड.
भाग १
१८ व्या शतकात मराठ्यांचे हिंदुस्थानच्या जवळपास निम्म्या भागावर प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष नियंत्रण होते.थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यू नंतर मराठेशाहीचा डोलारा महादजी शिंदे व नाना फडणीस ह्या दोघा अनुक्रमे रणकुशल व राजनीतीज्ञ व्यक्तींनी बराच काळ सांभाळून पानिपत युद्धामुळे मराठ्यांच्या कीर्तीला लागलेला डाग धुवून काढला.
महादजी शिंदे पुण्याजवळील वानवडी इथे १२ फेबृवारी १७९४ रोजी अल्प आजाराने वयाच्या ६७ व्या वर्षी कालवश झाले.त्यानंतर दीड एक वर्षाने म्हणजे २५ ऑक्टोबर १७९५ ला सवाई माधवराव पेशव्यांचे पण अपघाती निधन झाले.ह्या एकापाठोपाठ अल्पावधीत घडलेल्या घटनांनी मराठेशाहीची उलटया दिशेने, विनाशाकडे वाटचाल सुरु झाली.परकीयांविरुद्ध एकदिलाने लढणाऱ्या मराठयांना व्यक्तिगत स्वार्थ,अहंकार,तात्कालिक फायदा,वगैरे साठी वेळ प्रसंगी निजाम,इंग्रज ह्या पिढीजात शत्रूंची मदत घेऊन स्वजनांचा छळ,लुटालूट करण्यात,आपल्याच लोकांची हत्त्या करण्यात,आपलेच प्रदेश बेचिराख करण्यात काही वाटेनासे झाले,इतकी त्यांची नैतिक पातळी ह्या काळात अधोगतीला पोहचली होती.
ह्या काळात घडलेला एक संघर्ष आज आपण माहित करून घेऊ. हा संघर्ष संपूर्णपणे मराठेशाहीच्या सरदार,कारभाऱ्यानमध्येच, आपापसात झाला. महादजी शिंदे मृत्यू पावले त्यावेळी त्यांच्या १-लक्ष्मीबाई,२-भागिरथीबाई आणि यमुनाबाई ह्या तीन पत्नी हयात होत्या.महाद्जींची कुटुंबे कायम त्यांच्या बरोबर लष्करात राहत असत.त्यामुळे ह्या स्त्रियांना युद्ध्भूमिचा तसे त्यातून उद्भवणाऱ्या समस्या,वाटाघाटी इ.ची चांगली माहिती होती.महाद्जीना स्वतःचा मुलगा नसल्याने त्यांनी आपल्या हयातीत आनंदराव ह्या आपल्या भावाच्या दौलतराव नामक नातवाला दत्तक घेण्याचे ठरविले होते.परंतु महाद्जींच्या हयातीत दत्तकविधान झाले नाही. महादजी उत्तर हिंदुस्थानातील कामगिरी बजावून पुण्याला बादशाहाकडून मिळालेले वकील मुतालकीचे शाही फर्मान पेश्व्यास देण्यासाठी तसेच अन्य महत्वाच्या राजकीय बाबींवर चर्चा करण्यासाठी पुण्यास येतेसमयी वाटेत त्यांची एक पत्नी मृत्यू पावली.तुळजापूर मुक्कामी असताना महादजींनी भोपे कदम यांच्या कन्येशी विवाह केला.( ५ मे,१७९२ ) महाद्जीना ह्या पत्नीपासून मुल( गा ) होण्याची आशा असल्याने त्यांनी दौलतरावला आपल्या ह्यातीत दत्तक घेतले नाही.महाद्जींच्या मृत्यूनंतर दौलतराव महाद्जींचा वारस म्हणून रीतसर नियुक्त झाला.दौलतरावाने महाद्जींच्या तिन्ही पत्नींना त्यांचे सर्व मान मतराब,हक्क,विशेषाधिकार कायम ठेवू असे आश्वासन दिले.पण दिलेले आश्वासन पाळण्यात दौलतराव टाळाटाळ करत असल्याचे शिंदे महिलांना दिसून आल्याने त्यांनी दौलतरावा विरुद्ध बंड पुकारले.

No comments:
Post a Comment